बुधवार, 5 अगस्त 2020

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 05 ऑगस्ट 2020

*विषय :- घर*

संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
[05/08, 10:28 AM] Nagorao Yeotikar: माझे घर

चार भिंतीचे कोपरे मिळून होते घर
याचसाठी माणूस करतो किती मरमर

आजी आजोबा आई बाबा सोबती
काका काकू बहीण भाऊची संगती

आनंद मिळतो जेंव्हा असती घरात सारे 
एकट्याला घर खायाला उठती रे

घरात आपल्या सारे प्रेमाने राहू या
सुखदुःखात एकमेका समजून घेऊ या

- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड, 9423625769
[05/08, 10:34 AM] सौ भारती तिडके: कविता
*घर**

घर असावे घरासारखे
नातीगोती जपणारे
नको नुसत्या भिंतीचे
प्रेम जिव्हाळा वाटणारे

घरामध्ये असावा सर्वांमध्ये 
प्रेमाचा गोडवा
वैमनस्य बाजूला ठेवून
मायेचा ओलावा

घर म्हणजे केवळ घर नसतं
आपुलकीचं नीती
जगण्यासाठी विणलेलं
सुंदर स्वप्न असते मिती

प्रेमाचं वार वाहावे
घरामध्ये नेहमी
नात्यातला गोडवा असावा
संस्कृती असावी जन्मी

संस्काराचे बीज घरामध्ये
असावे गोड गोष्टीत
आजी आजोबांच्या प्रेमात
नातवंड खेळावी संगतीत

सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
८००७६६४०३९.
[05/08, 10:42 AM] Ajay Shivkar, पनवेल: *तुझे नी माझे असे घर असावे*


सिमेंट विट माती ,नकोत असल्या भिंती 
अडले-नडले किती बिघडले,तरी जपली जातील नाती
थोर विचार मनी बसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*

पाया ज्याचा प्रेम असावा,माणसं असाव्या भिंती 
छत सुखाचे बनेल जेव्हा , बनेल शांतता तव लक्ष्मी 
वाहो सुगंध सदाचाराचा,मनी वैर नसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*

आईची असावी अथांग माया,बाबाचीही खंबीर छाया
माणूसकीच्या तिजोरी मध्ये शांतेच धन असता 
तया ईश्वरी बसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४
[05/08, 11:44 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्य सेवक समुह प्रस्तुत*

*रोज एक कविता लेखन*

दिनांक :- 05 ऑगस्ट 2020

*विषय :- घर*

विटा माती सोबतिला रेती
तेव्हाच घराच्या तयार भिंती
तेथे असावा प्रेम जिव्हाळा 
 संकोच नकोच ! नुसती नाती ।१। 

घर असावे  घरासारखे
बाळ खेळती बागळती
त्या घराला घरपण यावे
आदर व्हावे मोठ्यावरती  ।२। 


कमाल आहे नात्याची
वेणीत जसे फुले गुंफिती
एकमेका विना अधूरी
घरात  हसरे तारे चमकती  । ३ । 


परिवारात असते साजूकता
आई बाबा करीती पोषण
संगोपन करून पाल्यांना
बाळाचे जाई संस्कारात बालपण । ४। 

शिदोरी घेऊन जाई समाजात
जसे शिवबांवर गिरवी जिजाई
 शिवाय स्वराज्याचे कोरून धडे
 घराघरात देते संस्कार आई      । ५।


*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
  *(9420516306 )*
[05/08, 1:05 PM] वर्षा सागदेव: *हक्काचे घर*
चार भिंती आणि एक छत ,
दगडी भिंती दगडी उंबरठा, 
तो उंबरठा तिची लक्ष्मणरेषा   
त्याला दिले घर ऐसे नाव 

पहिले घर बाबांचे,अन् भावाचे,
दुसरे घर नवऱ्याचे,अन् लेकाचे,
ती आहे आश्रित दोन्ही घरात
तिला तिच्या  हक्काचे घर नाही 

बाबांना मुलगी वाटते परकेधन
नवरा गाजवतो तिच्यावर हक्क
सासरच्या घरात अहोरात्र राबते 
तिला तिच्या हक्काचे घर नाही 

ओलांडला तो दगडी उंबरठा ;
सावित्रीच्या लेकींने स्वबळावर ,
वाढले तिचे व्याप, तसेच वाढले,
घरच्या दगडी उंबरठ्याचे माप.....

रुढीवादी परंपरेचे ते दगडी डोळे,
आज ही करतात तिचा पाठलाग,
घराच्या,त्या चार भिंती, रुंदावल्या
होऊनी  एक अदृश्य लक्ष्मण रेषा ....

 वळणा वळणावर वाट अडवते,
 त्या घराची ती अदृश्य लक्ष्मण रेषा
जे कधी तिचे नव्हतेच,अन् नसणार ,
ती आज ही शोधतेय तिचे हक्काचे घर..

डॉ. वर्षा सगदेव
[05/08, 1:44 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: साहित्य सेवक समुह प्रस्तुत
*रोज एक कविता लेखन*
दि. 5 आगस्ट 2020
विषय - घर

*घर असावे असे*

घर चार भिंतीचे नसावे
घराता असावा जिव्हाळा
घरासारखे घर असावे
सोबत असावा गोतावळा

विचारांची देवाणघेवाण व्हावे
अथांग प्रेम मोठ्यांचे मिळावे
सुसंस्कार मुलांवर ती करावे
एकमेकास समजून घ्यावे

मोठ्यांच्या अनुभवांची
जोड असावी नात्यांची
सुखदुःखं दोन्हीही वाटावे
गरज आहे ही आजची

परोपकार, कृतज्ञता
मानसन्मान, लहावपणा
समय पाहुनी निर्णय घ्यावे
क्षमा हा मनाचा मोठेपणा

सामाजिक बांधिलकी जपुया
कुटुंबात संवाद साधुया
सर्व काही मनमोकळे बोलुया
घराला घरपण देवुया

कठीण समयी राहु पाठीशी
चुकले तर रागावू ही
चांगल्याचे करावे स्वागत
सामना कराया होवु प्रबळ

 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
             गोंदिया
मो क्र 9423414686
[05/08, 1:58 PM] senkude: कविता  - असावे घर असे

घर तुझे नी माझे त्यात 
सुगंध प्रीतीचा असावा
ओलावा मायेचा दिसावा
आनंद त्यात दरवळावा

चंद्रसूर्य सुद्धा लाजेल
असा संसार असावा
फुलासारखा फुलून मग
टवटवीत असा दिसावा

जीवनभर संगतीत राहून
एक एक पान साठवावे
आयुष्याच्या आठवणीचे
गुज मनी घेऊन ठेवावे

घर तुझेनी माझे असे असावे
सुंदर नात्यांची गुंफण जसे
संस्काराच्या जडणघडणीत
सजवून वसलेले असावे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
मो.नंबर (9403046894)
[05/08, 2:01 PM] प्रिती दबडे: हक्काचे घर (तीन शब्दांची कविता)

दगडाचे असो किंवा
असो सिमेंट काँक्रीटचे
पण ते असावे
फक्त स्वतःच्या मालकीचे

छोटेसे का होईना
असावे हक्काचे घर
जिथे नांदावा जिव्हाळा
दिला जावा आदर

शांतता अन आपलेपणाचा
जपला जातो ठेवा
नाही केला जात
कुठल्याच प्रकारचा दावा

दिवसरात्र झटतो माणूस
ध्येयासाठी होई मग्न
उराशी बाळगलेले असते
त्याने घराचे स्वप्न

पूर्ण आयुष्य जाते
कर्जाचे हप्ते फेडण्यात
समाधान मात्र वसते 
इथे प्रत्येकाच्या मनात

प्रिती दबडे,पुणे
9326822998
[05/08, 2:20 PM] जी एस पाटील: " घर "
थकुन भागून आलेवर
विश्रांतीचे ठिकाण घर
चार भिंती वर छप्पर
असलेच आपले घर
 :१:
माता पिता भाऊ बहिण
गोळयामेळयाचेच घर
पाऊस वारा ऊनापासून
निवारा म्हणजेच घर
:२:
घरातच असते सुख
घरातच मिळते माया
घरातच मिळते छाया
घरातच करतात दया
:३:
घरातच मिळते शक्ती
घरातच सर्वाची एकी
घरातच नसावी बेकी
घरातच सर्वजण सुखी
:४:
घरातच होते पालन
घरातच होते पोषण
घरातच होते मिलन
घरातच होते रक्षण
:५:
कवि..जी.एस.कुचेकरपाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
[05/08, 2:33 PM] Mina Khond Hyadrabad: कोरोनाच्या महाभयानक
महामारीच्या महायुद्धात
सारे विश्व चिंतेत आहे 
घर मात्र आनंदात आहे ...

आई बाबा आजी आजोबा
मुलं सार्‍यांचा गोड घरोबा
एकमेकांच्या सहवासात आहे.
घर आता आनंदात आहे...  

एकत्रित संवाद
स्वादिष्ट स्वयंपाक 
सुग्रास जेवण आहे
घर हसत आनंदात आहे

अंत्याक्षरी नाच गाणे 
पत्ते व्यापार कॅरम खेळ
भरपूर गप्पागोष्टी आहे
घर मजेत आनंदात आहे..

कुठे जाऊ नका 
कुणाला भेटू नका 
घरात  सुरक्षा आहे.
घर सुरक्षा कवच आहे...

मीना खोंड
[05/08, 3:23 PM] शुभदा दीक्षित: घरा, तुझा निरोप



आमचे घर ,घर होते ,ज्यात होते घरपण 

भिंतींना  होता ओलावा अन आपलेपण 

 

घराने जपली नातीगोती ,नाही कुणी उपरा 

दारे खिडक्यातून वाहिला 'मन'मोकळा वारा 

 

प्राजक्ताच्या सुगंधाने प्रसन्नता भरे घरात

उंबरठा करे स्वागत आल्यागेल्याचे दारात 

 

शेजारधर्म पाळण्या नीती घराची धावली 

छप्पराने धरली डोक्यावर मायेची सावली 

 

ह्याच घराने  दिला मला भरभक्कम आधार 

दमदार पाऊले टाकीत चाले माझा संसार 

 

ह्याच घराने पाहिली यशाची चढती कमान 

म्हणाले जमिनीवर राहू दे पाय ठेव हे भान 

 

तुला सोडून जाताना जड जाहली पाऊले 

ऊर भरले अडखळली उंबरठ्यात पाऊले 

 

नि:श्वास टाक मोकळ्या घरा घे शांत झोप 

साश्रू नयनांनी मागे वळून घेते तुझा निरोप 


शुभदा दीक्षित 
पुणे 

  
[05/08, 3:55 PM] सुनीता आवंडकर: घर 

मी खेळवतो लहानग्यांना  
माझ्या अंगाखांद्यावर!!
घेतो प्रत्येक संकट माझ्याच खांद्यावर!!

बनतो मी साक्षीदार तुमच्या प्रेमाचा!
मीच करतो नाश
तुमच्या संकटांचा !

करतो मी स्वागत येणाऱ्या पाहुण्यांचं!
करतो भरभरून कौतुक तुमच्या यशाचं !

मन होतं माझं दुःखीकष्टी!
जेव्हा होते शोधाशोध सुरू नव्या जागेची !

नंतर हा स्वर्ग वाटतो छोटा !
हवा असतो तुम्हाला बंगला मोठा !

मी मात्र हिरमुसतो 
जेव्हा मला देतात निरोप

मारू लागतो मी आर्त हाक 
मला सोडून न जाण्याची !

पाहू लागतो वाट परत दुसऱ्या दोघांची!

प्रा. सुनीता आवंडकर बारी नाशिक
[05/08, 4:19 PM] मेघा अनिल पाटील: घर

घरचा कर्ता  सर्वगुणी
कर्तव्यनिष्ठा दिसे उमटुनीं
परंपरा जोपासतो सर्व मिळूनीं
वैभव टिकवतो एकत्र होऊनी !
       घरी माझ्या होई साजरे सर्व सण
        आठवुनी पूर्वजांचे  पुण्यस्मरण
         होई नव्या पिढीला प्रबोधन
         निमित्तमात्र स्नेहभोजन !
रम्य  संस्कारांची खाण
घर माझे मनमोहक छान
उत्सवात विशेष नवलाई
आप्त भेटुनी चकित होई!
         घरात माझ्या सत्य वाणी
          गातो सर्व प्रेमळ गाणी 
          स्वकष्टाची कमवतो नाणी
          त्याच बरोबर जपतो पाणी !
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशीक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
  नवापूर,जिल्हा नंदूरबार.
मोबाइल  9665189977
Email patilmeghaa@gmail.com
[05/08, 4:55 PM] दुशांत निमकर: *घर असावे*

घरात प्रेम,स्नेह,आपुलकी असावा
देशाच्या संस्कृतीचा वारसा चालावा

नात्यातील कटूपणा स्वतः ओळखा
एकमेका घरामधे घालू नका विळखा

बोलू नये घरामधे सारखे टोचुन
सुसंवाद ठेवावे विश्वासात घेऊन

नाते ठेवा गुण्यागोविंदाने नांदणारे
सुख दुःख रे एकमेकांचे वाटणारे

घरे असावे नातलग सांभाळणारे
घरातील दुःख अंगावर झेलणारे

✒️श्री दुशांत बाबूराव निमकर
चक फुटाना,चंद्रपुर
मो न 9765548949
[05/08, 4:55 PM] Snehlata: साहित्य सेवक दि.05.08.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार....अष्टाक्षरी
विषय ..घर
शीर्षक..माझे घरकुल

शांती मिळावी आयुष्या
क्षण विश्रांतीचा घास
उभारतो घर आम्ही 
धरू आनंदाची कास.....1

तंटा,मस्करी,मस्तीची
रात्र असे गमतीची
गोष्ट,गाणी,नृत्य,गीत
आई बाबा ममतेची....2

मना मनात उमेद
होई निर्माण घरात
अर्थ येतो जीवनाला
प्रेम भावना मनात....3

डोही आनंदी तरंग
वाहु भेटु सागराला
गोठ्यातील गाय सुद्धा
आधी पाजि वासराला....4

घर माझे औदुंबर 
भासे दत्त धाम मज
गाय,माय, पोरे, गोठा
धनी गाळतोयं घाम
*****************
स्नेहलता कुलथे बीड 🌹
[05/08, 5:14 PM] Shailendra Adbalwad: ..................साहित्य सेवक.................
..........उपक्रम :दररोज एक कविता........

"""""""""""""""""""""""= घर =""""""""""""""""""""""

घर माणसांचे आगार सुख वैभवांचे भांडार
घरात सजतो संसार घर जीवनाचा आधार

घर प्रपंचाचा बाजार नि मांगल्याचा सागर
छत्र सावली थोर कधी न फिटती उपकार

दु:ख प्रसंग येता असतो घराचाच पुढाकार
काळ कितीही कोणता घरकृपा साक्षात्कार

घर म्हणजे नव्हे केवळ वास्तूचाच आकार
सांभाळुनी आपणांस स्वप्न ते करीे साकार

घराचीच कृपा असू नये परिवारात द्वेष वैर
स्वच्छ शांत प्रसन्नतेचा घर करिते स्वीकार

घर गजांतलक्ष्मी मुखी देई स्वादिष्ट आहार
घर ऋणांनुबंधाची भेट त्यास हवा सदाचार

भलेबुरे असो कसेही असो किती सान थोर
घर आपुले आपणांस असते स्वर्ग नि मंदिर

आजन्म आमरण घर सर्वांना असे साभार
कार्यभार पेलुनी तेच सांभाळिते आयुष्यभर

अचल खंबीर हे घर ऊब मायेची खरे ईश्वर
कीर्तीमान व्हावे सर्व जगी जरी जग नश्वर

अन्न वस्त्र निवारा अवघ्या जीवनाचे सार
असंख्य जीव संरक्षिते  घर हेच परमेश्वर


आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु.पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975
[05/08, 5:14 PM] Pradip Patil, Ganpur: घर 

विश्वची माझे घर 
सुंदर आकाश प्रवेशद्वार 
जमीन देते आधार 
अन्न  उचलतं  भार.... 

हवा करते गार 
पाणी जीवन सार 
जीव सजीव फार 
सृष्टी जगण्या आधार.... 

जन्म मिळाला उधार 
निर्माण मातीतुन सारं
शरीर भासतं कणभर 
ओझं वाटतं मणभर... 

प्रपंच करावा सुंदर 
कोण नेलंय वर
 असलं छोटंसं घर 
चित्त समाधान  त्यावर.. 

नातं त्यात दृढ 
आयुष्य असावं सदृढ 
काढावं अवैध मार्गाने 
संम्पत्ती जमवण्या खुळ... 

जाणं निर्मिते आईवडिलांचे 
ऋण फेडू भ्रम्हांडाचे 
विचारत येतील जन 
हेच घर का त्या महापुरुषाचे ........ 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव 
मो. 9922239055©️®️
[05/08, 5:14 PM] Pradip Patil, Ganpur: घर 

सत्य संस्कार घरात 
मंदिर वास त्यात 
सारे एकत्रित राहत 
निर्मळ मन ज्यात.... 

साथ संगत एकमेकात 
घेऊन हातात हात 
एकीत करून मात 
रममाण कुटुंब संसारात....

सडा रांगोळी अंगणात 
आजी आजोबा  घरात 
आई वडील हृदयात 
तुळशी दिवा लावी  सांजवात... 

जीव साऱ्यांचा एकदुसऱ्यात 
आनंदी मुलं घरात 
दंग गोष्टी आयकण्यात 
जरी आईबाप रानात.... 

सुख समृद्धी जीवनात 
आरोग्य नांदे शरीरात 
मान सन्मान जगात 
पिकं डोले शेतात.... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव 
मो. 9922239055©️®️
[05/08, 5:33 PM] महेंद्र सोनवने: *साहित्य सेवक समुह*
*दैनिक उपक्रम - रोज एक कविता*
*दिनांक - 05/08/2020*
*विषय - घर*
--------------------
*घर*

घर असावे दिसायला सुंदर,
तो आपला निवारा असतो ।
त्यात जातो आपला जीवन,
कारण तिथं जिव्हाळा असतो ।।

घर बनतो विटा माटीचं ,
त्यात लोहा सिमेंट  असते ।
अंगणात तुळसी बहरली ,
दारापुढे रांगोळी असते ।।

घरात असतात घरची माणसं ,
त्यात आम्ही मजेत असतो ।
घरी आजोबा सर्वात मोठे,
त्यांचा आजही दबदबा असतो ।।

घरी आचार विचार एक असावे,
प्रेम हा घरचा पाया असावा ।
सदाचार घरातील संस्कृती असावी,
माणुसकीचा कळस असावा ।।

या घरातून मिळे सर्वांना,
आपुलकीची शक्ती ।
आकांक्षाचे पंख असूनही
उंबरठ्यावर असते भक्ती ।।
--------------------
*महेन्द्र सोनेवाने,"यशोमन"*
*गोंदिया*
[05/08, 5:34 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य समूह आयोजित दैनंदिन काव्य उपक्रम " 

* विषय :- " घर " 

" घर "

घर असते 
मनामनांचे
सहकार्याचे
आत्मियतेचे

घर असते 
सुसंस्काराचे
सदाचाराचे
मानवतेचे

घर असते 
बांधीलकीचे
सहृदयतेचे
जीवाभावाचे

घर असते
सद्भावनेचे 
कृपाछायेचे
वात्सल्याचे

घर असते 
दया शांतीचे
सामंजस्याचे
क्षमादानाचे

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376
[05/08, 5:50 PM] Rupali Ghodvajkar: *घर*

गुहेतील जगणे संपवून
घरे उभारली माणसाने
स्थिरावला मनुष्यप्राणी
खुलली प्रगतीची दालने.

घरामुळे लाभले मानवा
स्थिर आणि सुखी जीवन
भटकंतीचे संपले चक्र
सुखावला प्रत्येकजण.

वर्षामागून वर्षे गेली
माणूस गुंतला घरात
सुखांची झाली रेलचेल
उरली ना कशाची ददात.

सर्वांच्या एकत्र राहण्याने
होता जिव्हाळा टिकून 
स्वतंत्र झाल्या चुली आता
आणि दुरावले घरपण.

आधुनिक घरे म्हणजे
राजाराणीचा संसार
वृद्धांना नाही जागा इथे
फक्त मी- माझे पाहणार.

कोरडेपणाने केली जाते 
खोटी चौकशी वरवरची
लटके आपलेपण दाखवून
नाटकी बांधिलकी जपायची.

घरे झाली उदंड सारी
भौतिकसुखाने भरलेली
एकमेकांना नसे  आधार
माणूसकी मात्र दुरावली...

सौ.रूपाली गोजवडकर 
नांदेड.
[05/08, 5:56 PM] Hanmant Padwal: *आज घराघरात*

धडपड माझी  कधीची
बोलायचे आहे काही मला...
सारेच कसे ठार बहिरे,
सांगायचं काही मला...||

प्रश्र्न साठले मनात माझ्या
उत्तरे हवीत की मला...
आजी-आजोबा दूर कुठे
बोलायचे आहे त्यांच्याशी मला...||

चार भिंतीत विश्र्व माझे
उंबरठयाबाहेर यायचेय मला...
हिरवळीवर लोळन घेऊन
पाखरांशी खेळायचे आहे मला..||

आई-बाबाचं उशिरा येणं
फेसबुक व्हाॅट्स अॅपमधी ...
आपणच आपल्यामध्ये रमणं
मुक्या घराला बोलतं करायचं मला...||


               *हणमंत पडवळ*
                  *उस्मानाबाद.*
[05/08, 5:57 PM] Bharti Sawant: घर 

घर असुदे शेणा मातीचे
असावा त्यात जिव्हाळा
नांदावी सारी एकोप्याने
नको वर्तनातुन उन्हाळा

पाझराव्या प्रेमाच्याराशी
घरातील प्रेमळ नात्यात 
घट्ट राहू दे मनीचे बंधही
नको यावे कुणी गोत्यात

घरात असाव्या प्रेमलहरी
सुखाचा घ्यावा नित्य श्वास
दुःखाचे कढ  जिरविताना
असावा दुसऱ्यावर विश्वास

सौ.भारती सावंत
मुंबई
[05/08, 5:58 PM] श्रीकांत गोरशेटवार: आजची कविता : घर

हरएक घर असावे
प्रतिक मांगल्याचे
हरएक घर असावे 
छत्र वात्सल्याचे

इथे सदा रहावा
जिव्हाळा भरभरुन
सर्वांशी इथे व्हावा
संवाद भरभरुन

इथल्या भिंतीनी द्यावे
सकलांना संरक्षण
इथल्या उंबर्‍यावर व्हावे
विजयाचे औक्षण

इथल्या वस्तूवस्तूतून
झिरपत रहावी माया
इथल्या कणाकणातून
पुलकित व्हावी काया

उत्कर्ष सर्वांचा
इथे इच्छिला जावा
प्रगतीचाच आस
सदा मनी असावा

आठवणींनी व्याकूळ
चित्त सदा असावे
घर नव्हे 'गोकूळ'
इथे सदा फुलावे

©_____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
मु.पो.बार्‍हाळी,
ता.मुखेड,जि.नांदेड

घर 
     
             
 

घर हे माझे असावे सुंदर 
कधी त्यात येऊ नये अंतर
 असे असावे घर माझे सुंदर
घर हे माझे आहे सुंदर !!

आईबाबा जेथे मायेचा सागर
आम्हा भावंडांवर प्रिती अपार
 प्रेमाला त्यांच्या नाही पारावार
माझी लक्ष्मी माझी माय
जणू दुधावरची साय!!

सुखाने नांदते आनंदात
माझा बाप कष्टकरी 
देतो कष्टाची भाकरी 
यात नांदती सदैव 
प्रेम जिव्हाळ्याचे भाऊ
सदा संगतीत राहू
नाती जपुनिया ठेवू !!

ह्या घरपणासाठी
साथ दिली या घराने
सदा ताठ मानेने 
कधी पडले नाही ऊणे
या माझ्याच घरात !!

सदा आनंदीत मन
माझ्या घराची देन
बांधू मांगल्याचे तोरण
हेच घरपण सावराया!!

आकांक्षा चे पंख घेऊ
घेऊनिया दिव्य शक्ती
ठेऊन उंबरठ्यावर भक्ती 
घेऊ उत्तुंग भरारी 
याच माझ्या घरट्यातून!!

श्री. सुंदरसिंग साबळे गोंदिया
मो. 9545254856


मंगलवार, 4 अगस्त 2020

रोज एक कविता - मोबाईल

साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 04 ऑगस्ट 2020

*विषय :- मोबाईल*

संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~★~~~~~~~~~~
[04/08, 10:46 AM] सौ भारती तिडके: ****कविता****

***मोबाईल***

आज काल आला
मोबाईलचा जमाना
नेटवर्क कवरेज
वाटतो महत्वाचा सर्वांना

मोबाईल मुळे
मेसेज करता येतो चटकन
पत्र न पाठवता
मिस कॉल होतो पटकन

सकाळी उठल्यावर
ब्रश करायचे लोक
आता चार्जर शोधतात
इकडे तिकडे टोक

टच स्क्रीन चा जमाना आला
लहानापासून मोठ्यापर्यंत
अंगाई गीत झाले जुने
मुलांना झोपायला हवे मोबाईल चे गाणे

मोबाईल असतो
दिवस-रात्र सगळ्यांच्या हातात
टच स्क्रीन केल्याशिवाय
जेवण जात नाही पोटात

मोबाईल होऊन गेला
जीवनावश्यक वस्तू
आधी चेन लॉकेट असायचे गळ्यात
आता इयर फोन असतात लटकून

सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया.
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
८००७६६४०३९.
[04/08, 10:57 AM] प्रिती दबडे: मोबाईल (तीन शब्दांची कविता)

मोबाईल बनला जीवनातील
एक अविभाज्य घटक
लागली आम्हा सर्वांना
त्याची अति चटक

संदेश लिहिणे, वाचणे
वाटते खूप छान
दूध तापवायला ठेवल्याचे
रहात नाही भान

मुलांचा असतो पबजी,
कँडीक्रश खेळण्यावर जोर
हरायला लागलं की 
लागे जीवास घोर

फोटो होतात अपलोड
इंस्टा अन् फेसबुकवर
लाईक्स आणि कमेंटचा 
पडतो पाऊस त्यावर

अतिवापर टाळण्याचा करून
मनाशी आज पण
उपयुक्त साधन म्हणून 
करू वापर आपण

प्रिती दबडे,पुणे
9326822998
[04/08, 11:02 AM] Nagorao Yeotikar: मोबाईल वापरा जपून

एकविसाव्या शतकातील शोध हा मोबाईल
आता चिंता ना कशाची 
वेळ कसा जाईल

पूर्वी घरात ट्रीन ट्रीन 
वाजत असे टेलिफोन
खूप आश्चर्य वाटायचे
लावला शोध कोण

मोबाईल बाजारात आले 
नि झाली क्रांती
रेडिओ व घड्याळ 
वस्तूवर आली संक्रांती

मोबाईल पोहोचले आज
प्रत्येकी घराघरांत
सर्वांचे बोलणे होऊ लागले
देश विदेशात

मोबाईल चांगले आहे 
वापरा जरा जपून
लक्ष ठेवावे पोरं पोरी 
काय करतात लपून

उठल्यापासून झोपेपर्यंत
मोबाईल हातात
हे ही एक व्यसन होऊन 
राहू नये जीवनात

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423635769
[04/08, 11:03 AM] Hanmant Padwal: *मोबाईल स्तोत्रं*
लागते ओढ होता प्रातःकाळ
तसे पाहता,नसे ओढीची वेळ...||१||

सर्वांठायी लावूनी वेढ तू गोड
सहान थोर भोवती तुझ्या सर्वकाळ..||२||

क्षणाक्षणा वाढे आतुरता होई घालमेल
पाहत राही कोणता मॅसेज,कोणाचा मेल..||३||

प्रभाते कर दर्शनमचा सहज पडला विसर
मुल्य वाटे ना कशाचे तूचं वाटे अग्रेसर..||४||

जातील डोळे, स्थूल शरीर,लागेल चष्मा
कळते सारे परी तुझाच राहील वरचष्मा...||५||

अतिशहाणे झाले जन तुझ्याचमुळे
पसरु दे चौफेर तुझे तुझेच जाळे...||६||

डोके हॅंग झाले तरी चालेल देवा
तू नको तसे राहू, चाखू दे मेवा...||७||

मन मुके झाले,शब्द बोलते केले...
जग जवळ आले,जवळचे दूर गेले...||८||

बेचैन जीवाची बेचैनी वाढते क्षणाक्षणाला
ध्यास लागला लागला हरेक जीवाला...||९||

मन हरवले धन जाऊ दे तुझ्या ठायी, तुझं पायी
इति आदिदेवमोबाईल स्तोत्रं संपूर्णम् ॥

             *हणमंत पडवळ*
                   *उस्मानाबाद.*
[04/08, 12:17 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित् सेवक*
*दैनिक उपक्रम* 
*दि.04/08/2020* 

*मोबाइल*

हातात फोन लावता कानी
समोरचा ऐकतो आपली वाणी
असतो सर्वाजवळ मोबाइल 
असोतना मग तो अनवाणी ।१। 

बाबानी दिला मजला
मोबाइल एक सुंदरसा
मोहक नांरंगी रंगाचा 
 मन  करी वेडापिसा     ।२। 

आधूनिक युगाचा मोबाईल
असतो प्रेमळ संगणक
गणिता आकडेमोड  सहित
साधतो मस्त सहगुणक    ।3। 

खिशात कोंबणारी चिवचिव
करीतसे मनोरंजन सारे
बाह्य अंगानेही लोभस
म्हणे जगाला जवळ घ्यारे  ।४। 

शिक्षण न नवीन तंत्रज्ञान 
डब्बीत सारे दडले ज्ञान
शिकवी सार मोबाईल
कोणासही नलगे अज्ञान  । ५। 

*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया 
*(9420516306 )*
[04/08, 12:27 PM] दुशांत निमकर: *मोबाईल*

आला संगणकाचा जमाना
सर्वांच्या हाती हा मोबाईल
लहान मोठे सर्वच लोक
मोबाईलने झाले हो पागल....

कागद,पेन,टिपणी नाही
लिहा,वाचा मोबाईलवर
माय,बाप,पोरं सारेजण
व्यस्त सोशल साइटवर....

तंत्रज्ञानी युग आहे आता
वेळ,श्रम बचतीची आस
कार्य पटकन व्हावे हेच
सर्व व्यावसायिकांचा ध्यास....

मोबाईलच्या नादात पोरं
विसरली मैदानी ती खेळ
दिवसरात्र गेम खेळती
अभ्यासाला देई ना ते वेळ....

एन्ड्राइड मोबाईलचा रे
दुष्परिणाम खुपच भारी
मुलं अभ्यास करतो काय?
पालकांनी बघा जरा घरी....

मोबाईल आहे वरदान
जुळली मोबाईलशी नाळ
आता आवश्यक झाली वस्तू
आला हा नवक्रांतीचा काळ....

✒️श्री दुशान्त बाबूराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपुर
मो न 9765548949
[04/08, 12:53 PM] Jeevansing khasawat: मोबाइल

पाटी गेली ,पेन्सिल गेली मोबाइल आले हातात
आजकालची लहान मुले उठल्या बरोबर मागतात.
 
वाचन गेले ,लिखाण गेले आली अता  चॅटिंग
बाप पोरगा मिळून करतात पब्जी वर बॅटिंग 

म्हणे आता मोबाईल मुळे जग आले  खूप जवळ
होय  म्हणूनच तर माजली शारीरिक दुरीकरणाची खळबळ

झाडे गेली,पक्षी गेली  गेली शुद्ध नैसर्गिक हवा
तरीही सरकार म्हणते अता शिक्षणासाठी मोबाईल घ्यावा

पोस्ट कार्ड गेले,बखरी गेली
गेली सारी माणुसकी 
काय जमाना आहे बाबा ,पोरगा मोबाईलसाठी काढतो बापाची लायकी
 आचार गेले ,विचार गेले ,गेले सारे  
.   सुख समाधान 
हातात राहिले फक्त संगणक मोबाईल तंत्रज्ञान
जीवन ख सावत
भंडारा 9545246027
[04/08, 12:56 PM] Ankush Shingade: मोबाईल 

मोबाईल चांगला असला तरी
चांगल्यासाठी चांगला आहे 
कोणी अपराध केला तयासाठी 
आमचा जीव पांगला आहे 

मोबाईल असला वरदान तरी 
आम्हाला कर्दनकाळ आहे 
पब,रमी अन् अनेक खेळातून 
अनेकांचे आयुष्य बरबाद आहे 

वापर करू जर चांगला तर 
बरीच माहिती देते आम्हा
बरेच शिकवून जातो तो 
घरबसल्या ताबडतोब आम्हा

ज्ञानाचा खजिना  कित्येकदा 
एकाच आमच्या टिचकुलीवर 
संसार आमचा कित्येकांचा 
अन् संपतोही एकाच क्लिकवर 

     अंकुश शिंगाडे नागपूर 9923747492
[04/08, 1:11 PM] Ajay Shivkar, पनवेल: *आला जमाना मोबाईलचा*

माझ्या आहारी जर तू जाशील 
जवळच्यांनाच दूर तू करशील
त्या सर्वांना तू विसरशील
जे होते कधी आपले म्हणशील
*आला जमाना मोबाईलचा,जपून वापर कर तू त्याचा*

सवय माझी होऊन जाईल 
हावी मीही होऊन जाईन 
आधी डोळे मग झोप
नंतर आरोग्य हिरावून घेईन 
*आला जमाना मोबाईलचा,जपून वापर कर तू त्याचा*

वेळ नसेल तुला खेळण्यासाठी
जेवणासाठी ना आरोग्यासाठी
कमी कामे करशील बाकी 
मला वेळ देशील जादा
*आला जमाना मोबाईलचा,जपून वापर कर तू त्याचा*

लहाणपण घेईन तुझे 
जवानी सुद्धा तुझी हिरावेन
वार्ध्यक्य आणीन तुला
विचार करून वापर मला
फायद्यासोबत तोटा तुला 
*आला जमाना मोबाईलचा,जपून वापर कर तू त्याचा*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४
[04/08, 2:18 PM] Manik Nagave: कविता

मोबाईल

आला जमाना मोबाईलचा,
नांदी ऑनलाइन शिक्षणाची.
अशी पसरली एक महामारी,
झाली दारे बंद विद्यालयाची.

आप्तस्वकीय दूरदेशी गेले,
आसुसला जीव भेटण्याला.
हाती मोबाईल काय आला,
समोर उभा आप्त बोलण्याला.

कार्यालयीन कामकाजासाठी,
आला धावून सखा मोबाईल.
मांडले विचार वेबिनार झाली,
शंका साऱ्या निघून जातील.

नको तार ना टपाल पाठवायला,
मोबाईल आहे उभा दिमतीला.
निरोप कळतो तत्परतेने,
असो मित्र लांब दूरदेशीला.

जेवढा उपयोगी तेवढा घातक,
ठरवायला हवी पद्धत वापरायची.
म्हटलं तर आबादी नाहीतर बरबादी.
योग्य रीत आपणच ठरवायची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[04/08, 2:33 PM] जी एस पाटील: "मोबाईल" 
ज्ञानाची पेटी मोबाईल
वेळ दाखविते मोबाईल
संभाषण देतो मोबाईल
फोटो काढतो मोबाईल
लेखन करतो मोबाईल
संदेशहि देतो मोबाईल
माहिती देतो मोबाईल
अंतर दाखवते मोबाईल
गीत ऐकीवतो मोबाईल
औषध सांगतो मोबाईल
स्थळ दाखवते मोबाईल
गोष्टी सांगतो मोबाईल
संदेस देते घेत मोबाईल
माहिती जपते मोबाईल
लेखनहि करते मोबाईल
दृश्य दाखविते मोबाईल
मुले शिकवतो मोबाईल
गजर करतो मोबाईल
विज्ञान देन मोबाईल
सर्वांची गरज मोबाईल
कवि..जी.एस.कुचेकर पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
[04/08, 2:38 PM] Bharti Sawant: मोबाईल

आला आला जमाना
नानाढंगी मोबाईलचा
लहानथोरांच्या हाती
तो इमोजी स्माईलचा

नको लिहाया सग्यांना
लांबलचक असे ते पत्र
इमोजीसह व्यक्त होतो
मोबाईलच बनला मित्र

संदेश चॅटिंग नि फोटो
असा तो ऑल ईन वन 
बालकांपासून वृद्धांचे
जिंकलेय त्यानेच मन

फेसबुक व्हाट्सअपने 
केलीय सर्वत्रच कमाल 
कथाकविता सिनेमाची
कराच कितीही धमाल 

ऑनलाइन शाळेमुळेच
मोबाईलच बनलाय गुरु 
घरात बसून विद्यार्थ्यांची
झाली अशी शाळा सुरू 

मर्यादित वेळेतच वापरा 
ठरतोय साऱ्यांना वरदान
जास्त वापर करण्यामुळे 
येतोय डोळ्यांवरती ताण 

सौ.भारती सावंत
मुंबई
[04/08, 2:54 PM] मेघा अनिल पाटील: मोबाईल
दिवस उगताच तुझे दर्शन घेऊन
वाटे देशील तू जगाच्या पुढे ठेवून
अरेरे असे काही पण होत नसून
जातो तुझ्याच सवयीने मग त्रासून .... 
          कधीही वाटले नव्हते की
          इतक्या सुविधा तू देशिन
          मानव इतकी प्रगती करीन
          अन् होती सर्व तुझ्या आधीन.......
आणलेस लांबच्यांना जवळ
वाटले होते की तू केलेस
पण वाढले मनी अंतर तुझ्यामुळे 
समोरील लोकांना दूर केलेस....... 
            पण लोक एकमेका विसरली
             सर्वस्व तुजला ठायी झाली
            तूझ्या सोबतीने निवांत राहिली
             जीवन जगणे समूळ विसरली.... .. 
       रूनझुण तुझा आवाज वाजे
        सर्वांच्या हाती तूच विराजे
         सर्वत्र तर तुझीच हवा वाहे
          सर्वांच्या हाती तूच तर राहे......
आम्हा कळत नाही रे तू 
शाप  की आहेस वरदान
तुझ्या अती वापराने
वाढतो आहे मानसिक ताण.......... 

श्रीमती मेघा अनिल पाटील
      उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
 नवापूर, जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
[04/08, 3:20 PM] सुंदरसिंग साबळे: मोबाईल 

===================

काय बाई जमाना आलाय
भल्याभल्यांना वेड लावून गेलाय
शिकून सवरलेले ही वेडेपिसे झाले
मोबाईल, मोबाईल सारे म्हणू लागले

पहावे तेव्हा मोबाईलमधे गळले
लहान लहान मूलंसुदधा
मोबाईलमध्ये हरवून गेली
नको तेव्हा नको ते 
हवं तेव्हा पाहू लागली 

मैदानावरचं नेट आज 
मोबाईलमध्ये आलं
अन् इवलसं आयुष्य 
पार कोमेजून गेलं

कोमेजणाऱ्या आयुष्याला 
वाचवा हो आईबाबा 
पोरापासून मोबाईल 
थोडा दूरच ठेवा....

नसला जवळ मोबाईल म्हणून 
अडत काहीच नाही 
घडायच्या वयात पोरं
बिघडायची नाही......

उघडली ज्ञानाची कवाडं
क्षितिज केले ठेंगणे 
असे असले तरीही
वागण्यात आले ऊणे

 मोबाईलच्या या दुनियेत
तारांबळ नुसती उडाली 
जीव झाला कासावीस 
माणुसकी ही हरवली
क्षणिक सुख मिळे फक्त .......

चांगले लाभले जीवन
करू नका  हो उद्वस्त 
मोबाईलच्या नादापायी
गिळंकृत होईल फक्त.....
===================

श्री. सुंदरसिंग साबळे गोंदिया
मो. 9545254856
[04/08, 3:46 PM] senkude: *मोबाईल*

आता टपाल नाही  तार नाही
नाही दुसरे कुठले संदेश वहन
निरोप मिळण्या काही दिवस लागायचे
आता अगदी क्षणात बटन दाबल्या बरोबर

जमाना जलद गतीचा निघाला
थोडं थांबायला कुणाला नाही वेळ
सुबत्ता समृद्धी वाढली सगळीकडे
लाखोंचे व्यवहार होती याची दाबून कळ

प्रियकर अन प्रेयसीचा प्रेम विरह
याच्या मुळे झाला आहे खूप कमी
रात्र न दिवस येते आता बोलता
व्हीडीओ कॉल ने वाढली जवळीक

फेसबुक, वॉट्सअप्प, ट्यूटर, मॅसेज
गुगल, युट्युब, पेटीएम, बँक मनी
गॅलरी,  शब्द कोष
जणू काही अलिबाबाची गुहा ही

लहान असो थोर असो पुढारी
महिला असो पुरुष असो कुणी कामगार
प्रत्येकाच्या हाताची शान बनला आहे
अहो तो दुसरा कुणी नसून मोबाईल आहे.....
~~~~~~~~~~~~~
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
[04/08, 3:46 PM] Rajendra Bansod
Gondia: शीर्षक-वेड मोबाइलचे
मोबाईल मोबाईल 
झाली वेडी हो दुनिया
रडनारा शांत होते मुल
अजब गजब भुलभुलैया|1|
विडिओ, फोटो ,व्हाट्सएप
फ़ेसबुक चे लाइक अन कॉमेंट
वेडीवाकडी  तोंड काढती  क्लोजअप
नाही भेट तरी होई समेट |2|
मोबाइलचे व्यसन
बाधित सारे आबालवृद्ध
घोर होइ जीवन
म्यूट सारे नातेसंबंध |3|
व्हावा मोबाईल मनीषा बाळाला
नवनवी केस आई लाडवेल
ताईदादाच्या  उभा आडोश्याला
पापाच्या ऑफिसमध्ये जाईल |4|
साधन हे जीवन सुगमासाठी
नका होऊ म्युट जीवनाशी 
उपयोग्य त्याचा व्हावा कामासाठी
नित्य आनंद योग्य वापराशी|5|
 राजेंद्र बन्सोड
स.शिक्षक 
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा, 
पंचायत समिती गोरेगाव
जिल्हा परिषद गोंदिया
8275290252
[04/08, 4:14 PM] Pradip Patil, Ganpur: मोबाईल 

यंत्र मानव निर्मित 
तंत्र त्यात भारी 
माहिती अद्यावत सारी 
अनेकातून एक तरी... 

नवेजुने चांगलं वाईट 
देत नवीन बाईट  
अंनत सोशल साईट
दाखवतो अंधारात लाईट... 

घटक अविभाज्य जीवनाचा 
वेळ त्यात जाण्याचा 
खेळ शिक्षण घेण्याचा 
लळा त्यात वाचनाचा.... 

बाजू दोन्ही त्याच्या 
दृष्टी छान देण्याची 
वाटा अंनत याच्या 
संदेश गोष्टी शिकवण्याची .....

लळा लागला मानवास 
करतात त्याचाच ध्यास 
मुलंही करतात अभ्यास 
जरी डोळ्यांना त्रास... 


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा
 जिल्हा जळगाव 
मो. 9922239055©️®️
[04/08, 4:18 PM] शुभदा दीक्षित:           मोबाईल

हृदयी भरे पोकळी 

करताच पार साठी 

फुलल्या वसंत वेली 

तरी आहे मी एकटी


बहरला होता वृक्ष 

लेकरे नातवंडांचा 

पाहण्यास आसुसला 

जीव माझा एकटीचा


मित्र-मैत्रिणींचा ताफा 

गंधीत ही नातीगोती 

भेटीस आतुर जरि 

जाणार कशी एकटी?


वाटता करू शॉपिंग 

पुस्तके आणू घराला 

जाता गर्दीत मॉलच्या 

उमजेना एकटीला


रेंज आली धावतच 

वायफाय बोले बोल, 

"सर्वास उत्तर एक 

वापर तो मोबाइल

वापरतो मोबाईल"



शुभदा दीक्षित 
पुणे
[04/08, 4:25 PM] वर्षा सागदेव: मोबाईल
कधी कधी मला नकोसा होतो मोबाईल, 
माझा मोबाईल मला करतो ईम-मोबाईल,
कधीही, कुठेही, केव्हाही, खणखणतो,
ना काळ  ना वेळ,  रात्री-बेरात्री वाजतो.

 बाजारातून भाजी घेतांना खणखणतो,
एका हातात पर्स,दुसर्‍या हातात पिशवी,
फोन शोधतांना भाजीची पडते पिशवी ,
 रस्त्यावर इतस्ततः सांडते सारी भाजी.

टोमॅटोची चेंगराचेंगरी होते गाड्या खाली,
बटाटे घरंगळत जातात दूर दूर रस्त्याभर,
कोथिंबीर मिरच्यांची चटणी होते तिथेच,
सगळ्या भाज्या झाल्या शहिद फोनमुळे.

हा मोबाईल फोन सुद्धा खेळतो अशी खेळी,
लपतो सगळ्यात खाली अगदी पर्सच्या तळी,
सरत शेवटी एकदाचा तो मोबाईल येतो हाती, 
तो वर बंद झाली असते ती खणखण त्याची.

पर्स मधून फोन शोधतांना, उडते  तारांबळ
मोबाईल नाही घेउन गेले, तरी होते पंचाईत,
नेमका नवऱ्याचा येतो फोन, तो लावतो बोल,
कितीही फायदे असले,तरी होते फजिहत.
डॉ.वर्षा सगदेव
[04/08, 4:32 PM] Snehlata: साहित्य सेवक दि 04.08.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार...अष्टाक्षरी
विषय...मोबाईल
शीर्षक...सहवास

जीव प्राण आहे तोच
माझा शूर वीर जानी
रोज ऐकतो, ना मी ही
त्याची सुमधूर गाणी.....1

किती जवळ झोपतो
रात्रदिनी सहवास
जाता दुर कधी तरी
विरहाचा होतो भास....2

सांगे आई रोज मला
वेडी बोर.. जा,जांभळा
असे,प्राण जरी कुणी
जीव आपुला सांभाळा....3

नाती गोती कोणी नाही
तुझ्यातच सामावली
वेड लागले जीवाला
डोळे कान गमावली....4

जानी माझा मोबाईल 
मज त्याची लत लागे
अन्न पाणी गोड नाही
डोळे सहवास मागे.....5

जरी मित्र मोबाईल 
काही नियम रे पाळा 
हवे तेच वापरूनी
अति वापर रे टाळा.....6
********************
स्नेहलता कुलथे बीड 🌹
[04/08, 5:08 PM] Mina Khond Hyadrabad: मोबाईल

त्या दिवशी पोराचे गुर्जी आले
आन् रागा रागात फाडफाड बोलले.
पोराने म्हणे पेपरात कापी केली
पोराची माह्या तक्रार केली....
माहा असा अपमान झाला
पोराचा राग राग आला.
आता पोराले  फैलावर  घेतो
कानाखाली सण्ण वाजवून देतो....
कडक आवाजात पोराले बलावले
आन् दोन रट्टे लावून दिले.
असं काहून  तून केलं
कापीच खुळ कोठूनशान आल?....
" बापू ,माहा मोबाईल रोज पाह्यतो
कापी पेस्ट करुन मेसेज पाठवतो.
मले वाहवाची शाबासकी मिळते
आन् लाईकची लई भडिमार व्हते ....
व्हाटसॅप त कापी पेस्टवर चालते
मोठमोठ लोकं बी कापी पेस्ट करते.
बापू, तू बी त  कापी करतो 
मंग आता काऊन रागाले येतो "....
"हाव रे !मंग येथच का झालं?
कापीला काहून नामंजूर केलं?.
तुमी सोता कापी पेस्ट करता 
माह्या पोराले काऊन दम भरता?"....
म्या थेट गुर्जी  कडे जाऊन पुसलं
कापी पेस्ट प्रकरण  वर पावेतो गेलं.
गुर्जीनं शिक्षण मंत्र्याकड कापी पेस्ट पाठवले
त्याइनी बी वर कापी पेस्ट मेसेज पाठवले....मोबाईल बिगर शिक्शन नाही हे समजलं
सरकारने मंग फरमानच काढलं .
आता परीक्षा मोबाईल व्हईल
सरकार सार्‍या पोराइले मोबाईल फुकट देईल.

©मीना खोंड 
हैद्राबाद
[04/08, 5:18 PM] Shailendra Adbalwad: ............साहित्य सेवक..........
......उपक्रम : दररोज एक कविता......

"""""""""""""""""मोबाईल""""""""""""""""
...............=======................

जगात आले अद्भूत आश्चर्य साक्षात मोबाईल
नव्या युवा पिढीला हवेच नसता जीव जाईल

जेवण ना तहान नाही कोणतहीे निष्ठेचे काम
शेती घरी कोठेही पाहा माणसे  झाली बेकाम

सान नको अंड्राईड मोबाईल हवा सर्वांना आज
कामधंदा सोडून रिकामे नाही कुणा थोडी लाज

शाळा कॉलेज प्रवास वा कार्यक्रम एखादे लग्न
मोबाईल हाती डोके वरती बोटेही कामात मग्न

व्हाट्सअॅप मेसेज येता एकाचे असंख्य हजार
खेळ खेळुनी चित्रे पाहता आनंद अथांग सागर

रंगीत चित्रे असंख्य मित्रे मोबाईलचे झाले सूत्र
अविरत कॉल चॅटींग चालू हेच आपुले गणगोत्र

मोबाईल खरेदी रिचार्ज करणे बेकाम झाले सुरू
मातापिता वरिष्ठ नि गुरुजनांचे मुलेच झाले गुरू

चांगले घ्यायचे की वाईट करू सर्व विचारमंथन
मोबाईल हाताळून घेऊ मनोरंजन नि ज्ञानार्जन

शिक्षण बाजार व्यवहार करुया घरी बसुनी मजेत
उत्तम घेऊनी वाईट त्यागू जपू जीवन घेऊ शपथ

नवतंत्रज्ञान तीर्थक्षेत्रे पाहू इतिहास निसर्ग सुंदर
ज्ञान घेऊनी प्रगत होऊया खरे मोबाईल बहादुर

आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975




..
[04/08, 5:25 PM] श्रीकांत गोरशेटवार: साहित्य सेवक समूह

💠असा हा मोबाईल💠

इटुकला पिटुकला
अरे माझ्या मोबाईला
मुळी नाही करमत
तुझ्याशिवाय रे मला

गजराने उठवतो
सर्वांशी हा बोलतो
तालावर तो आपल्या
सगळ्यांना नाचवतो

रेडिओ नि ट्रान्झिस्टर
हिशेब नि रुपांतर
रस्ता सुचेना कोणाला
याची मदत हजर

याच्यातला तो कॅमेरा
भासे सर्वांगसुंदर
कैद करी आठवणी
ठेवा राही निरंतर

मुलांचे होई शिक्षण
व्यवसाय, प्रशिक्षण
चित्रे व्हिडिओ संगीत
इंटरनेटी ते सण

असे असले तरीही
हा तितकाच वाईट
वेळ झोप नासवतो
माणूस स्वमग्न होतो

आपले वेड लावतो
नानारंगी भुलवतो
याच्या पाशातून सुटे
तोच शहाणा ठरतो

©____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
मु.पो.बार्‍हाळी,
ता.मुखेड,जि.नांदेड.

[04/08, 5:58 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *मोबाईल मोबाईल*


आला बघा जमाना हा असा 
 मोबाईल विना जीव होतो कसा
काय सांगू या जीवाची व्यथा
मोबाईल साठी जग वेडापिसा 

मोबाईल मोबाईल मोबाईल मोबाईल 

सकाळी उठलं की हवं मोबाईल
देवाचं नावाआधी हाती मोबाईल 
डोळ्यात झोप हातात मोबाईल
उशीखाली बघा तिथं मोबाईल


  आनलाइन अभ्यास हवा मोबाईल
हिशोब करायचा काढला मोबाईल
बातम्या ऐकायला ही मोबाइल
गुगल बाबा सर्च करण्या मोबाइल


पाककृती करण्या बघा मोबाईल
अंगाईगीत ते सुद्धा मोबाईल
तव्यावर पोळी हाती मोबाईल
 युट्यूबवर बघायला आहेच मोबाईल


शेताच्या कडेला कानाला मोबाईल
हातात नांगर खिशात मोबाईल
वाढदिवस आला हवा मोबाईल
रक्षाबंधन ला बहिण मागे मोबाईल


व्हाट्सप, फेसबुक त्याला मोबाईल
 लाईक करा शेअर करा व्वा रे मोबाईल
व्हिडीओ काढायचा हवाच मोबाईल
फोटो आणि सेल्फी त्याला मोबाईल


 आठवन आली लावा मोबाईल
टाईमपास करायचं काढला मोबाईल
 मनोरंजनासाठी मोबाईल
तरुणतरूणीच्या हाती सतत मोबाईल

मोबाईल मोबाईल मोबाईल मोबाईल.......

 सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686
[04/08, 5:59 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: आजचा उपक्रम 

" मोबाईल "

सर्वांना लावी
लळा हा फार 
खोली सर्वांच्या 
हृदयाचे द्वार

मुठीत घेता
वाढे रूबाब
मोबाईलच
हा लाजवाब

कोरोनाकाळी
वाढे किंमत 
नातेवाईका
देण्या हिंमत 

अॉनलाईन
शिक्षण देई
सुखदुःखाच्या
वार्ताही वाही

आबालवृद्धा
होई व्यसनी 
हैराण होती 
मनोव्याधीनी

असेल जरी
नामी साधन
जपून व्हावे 
उपयोजन

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड
[04/08, 6:05 PM] विजय वाघ: साहित्य सेवक

मोबाईल

सुरवातीला निघाले
रेडिओ या जगात
त्यावर गाणे ऐकले
टकलावून घरात    //१//

मग टेलिव्हीजन आले
या जगात
त्यावर सिनेमा पाहौ
एकसारख घरादारात  //२//

मग आला जमाना
मोबाईलचा या धरतीवर
मोबाईलमुळे सर्व काही
झाले मस्त पृथ्वीवर      //३//

मोबाईल वर
फोटो काढो क्षणात
दुर असो की जवळ
बोलो खळखळ जगात    //४//

मोबाईल हा
सर्वाच्या फायद्याचा
आँनलाईन शिक्षण 
घेती सर्वांच्या हितांचा       //५//

विजय वाघ
यवतमाळ
७७६८०७११७६

सोमवार, 3 अगस्त 2020

रोज एक कविता - मैत्री

साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 03 ऑगस्ट 2020

*विषय :- मैत्री*

संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[03/08, 9:41 AM] senkude: कविता - बंध मैत्रीचे

बंध मैत्रीचे असतात खरे 
निस्वार्थी आणि प्रेमळ 
मनातील गुपितं उघड
करुन सांगणारे नाते निर्मळ 

बंध मैत्रीचे बेधुंद असते 
वादळ वाऱ्यातला झोका
नाते असते ते रक्ता पलीकडचे नसतो तिथे कसलाही  धोका

मैत्री म्हणजे आनंदाचा झरा, आनंदाने गगनास भिडणारा 
दोन मनास जोडणारा तो 
 असतो सांकव खरा 

मैत्री म्हणजे जीवास जीव
देणारा मायेचा जीवन धागा
असले दूर कितीतरी परी  काळजात असते त्यांच्या जागा

मैत्रीचा बंधनाचे नाते अतुट अंतःकरणातील तो असतो
 एक कप्पा, जिथं होतात
 मन मोकळ्या गप्पा...
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*


[03/08, 9:42 AM] Hanmant Padwal: *मैत्र*
मी उन्हात उभा
सावली त्याने व्हावे,
रुसवा काढण्या माझा
गीत त्यांने गावे....॥

गुंफून हातामधी हात
क्षितीज दिशेने जात....
सुटणार नाही पकड
होऊ दे कितीही वाताहात....॥

सुसाट वादळात असतो
तोच आडोसा....
अंधार भरल्या खोलीत
तोच एक कवडसा....॥ 

गुज खोलत अंतरीचे जावे
असा ठाव मिळत जातो
मी त्याच्या तो माझ्या
मनाच्या आरशात पाहातो....॥

              *हणमंत पडवळ*
               *उस्मानाबाद*


[03/08, 9:44 AM] Nagorao Yeotikar: *मैत्री नितळ प्रेमाची*

साथ असू दे अशीच जन्माजन्माची
मैत्री असू दे आपल्या नितळ प्रेमाची

विचार जुळले आचार जुळले
जुळले आपल्या दोघांचे मन
ऊन वारा वादळ थंडी पाऊस
कधी दूर राहिलो नाही आपण
या मैत्रीवर नजर आहे सर्वांची
साथ असू दे अशीच जन्माजन्माची

जीवनात सुख आले दुःख आले
नेहमीच तुझी मला साथ मिळाली
संकटात नेहमी मित्र धावून येती
साऱ्या वेदना एका क्षणात पळाली
सारे आठवण करती आपल्या मैत्रीची
साथ असू दे अशीच जन्माजन्माची

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769


[03/08, 9:47 AM] प्रिती दबडे: खरी मैत्री

रोज भेटावे असे काही नाही
पण आठवण येत नाही असा दिवस नाही
मैत्री एक निरपेक्ष नातं
आपोआपच जन्मभरासाठी आपलं होतं
रक्ताच्या नात्यापेक्षा पण वाटतं जवळ
थोडं खोडकर थोडं गोड अन् अवखळ
दाखवते मैत्री तोंडावर चुका
नाही रहात मित्र त्याबाबतीत मुका
नसते फसवेगिरी ना दिखावा
असतो फक्त खरेपणाचा दावा
राहू दे अशीच साथ तुझी
ही मागते देवापुढे मैत्री माझी

प्रिती दबडे,पुणे
9326822998


[03/08, 10:31 AM] Bharti Sawant: शीर्षक - भान मैत्रीचे

ठेवुनिच भान या मैत्रीचे 
जपूया जीवनभर नाती
नकोत हेवेदावे मैत्रीमध्ये
पाळू नकाच जातीपाती 

असावे भान अशा मैत्रीचे
जपुया नाती सगळे छान
नको रुसवे-फुगवे नखरे
द्यावा परस्परांनाही मान

टिकवावी निरंतर नाती
राखावाच  मानसन्मान
ठेवूनि भान सुंदर मैत्रीचे
फुलावी अशी मैत्री छान 

देऊया मैत्रीचा हात हाती
पीडित  दु:खी पामराला
देवाजीची ही कृपा मर्जी
वरदहस्त असा लेकराला 

बांधू रेशमी बंध नात्यांचा
जुळवून मैत्रीचे अतूट धागे
जीवन हे क्षणभंगुर असता
सोडून देऊ रागरुसवे मागे

फुलावीच मैत्री कुसुमासम
दरवळावा नात्यांचा सुगंध
हात साह्याचा देऊनी हाती
राहू आनंदाने होऊ  बेधूंद

सौ.भारती सावंत
मुंबई


[03/08, 10:50 AM] सौ भारती तिडके: **आजच्या उपक्रमासाठी**


शीर्षक:-**मैत्री**

मैत्री असावी
मनाला सतत हुरहरणारी
चांदण्यांचे शितल
उत्कर्षा ने हवी वाटणारी
चंदनापरी सुगंध दरवळणारी

मैत्री असावी
श्रावण सरीत चिंब चिंब भिजणारी
अथांग जलाशयात भ्रमण करणारी
परकी असली तरी
सतत आपली जाणवणारी

मैत्री असावी अशीही
पूर्ण अबोल मनाची
मुक्या भावनांची
सोनेरी  चाफ्यासारखी

मैत्री असावी
नाजूक पाकळ्या सह
कुठेही ,कशीही आठवली
तरीही प्रामाणिकपणाची
 निरागसतेने भरलेली.

सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर , गोंदिया
8007664039


[03/08, 10:53 AM] Gauri Shirsat: उपक्रमासाठी

मैत्री तुझी माझी

मैत्री तुझी माझी
आरसा नितळ,
दिसे प्रतिबिंब
अगदी निर्मळ...

संकटात नित्य
धावते वेळीच,
तुझी आणि माझी
मैत्री वेगळीच...

नाते ग आपले
 हे जगावेगळे,
 बंध हे मनाचे
आहेत आगळे...

मनातील माझ्या
ओळखते कशी,
आहे अशी मैत्री
ही बावनकशी...

जन्मोजन्मी हीच
मैत्रीण मिळावी,
सुखी माझी सखी
सदैव असावी...

मैत्रीचा हा हात
हाती राहो नित्य,
अखंड ही मैत्री
हेच खरे सत्य...

© सौ.गौरी शिरसाट
      मुंबई


[03/08, 11:03 AM] Mina Khond Hyadrabad: अमृत मैत्री

तुझी माझी मैत्री नात्यापलीकडची
भावभावना सखोल समजून घ्यायची
मनात रुजलेली  आनंदघन फुललेली
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !
 
तुझी माझी मैत्री शब्दांच्या पलीकडची
फुलांच्या गंधाची,शितल चांदण्यांची
अशी बोल अबोल, अशी शांत निवांत
अमृतमैत्री आयुष्यभर जपायची !

तुझी माझी मैत्री मनापलीकडची
समजून घेणार्‍या मनकवड्या मनाची
आनंदाची उधळण प्रकाशाची पखरणं
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !

तुझी माझी मैत्री रक्ताच्या नात्यापलीकडची
 सुख दुःखाची प्रसन्न खळखळ हसण्याची
स्मृती  सुगंधी तरल,हृदयीच्या कूपित खोल 
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !

मीना खोंड
हैद्राबाद


[03/08, 11:46 AM] दुशांत निमकर: मैत्री

मैत्री ही निर्मळ
वाहणारा झरा
संकटात येई
धाऊन तो खरा....

मैत्रीचा पसारा
भासे जसा वारा
येई भरभरा
सहवास न्यारा....

नाते हे अतूट
रेशीम धाग्याचे
घट्ट विणलेले
प्रेम नि स्नेहाचे....

मार्ग दाखविती
कडक बोलून
कान उघाडणी
करती टोचून....

दिवा हा मैत्रीचा
अखंड राहावा
जीवनात माझ्या
प्रकाश तू द्यावा....

मैत्री तुझी माझी
सागराचे नाव
जीव लावणारा
अतूट हे गांव....

सुखदुख क्षणी
धाव माझ्यावरी
ईजा होती मला
घाव तुझ्यावरी....

एकमेकाप्रती
सन्मान करू या
विश्वास ठेऊनी
मैत्री फुलवू या....

✒️ दुशांत बाबूराव निमकर
चक फुटाणा,चंद्रपुर
मो न 9765548949


[03/08, 12:39 PM] सुंदरसिंग साबळे: मैत्री  
===================

जन्म घेतला नवा
तुझ्याशी मैत्री झाली तेव्हा 
आयुष्यातील सुखदुःखात
मित्रा तुझा मज साथ हवा!!

विविध रुपाने मैत्रिचे
एकमेकांची मने जिंकली
ऋणानुबंधाच्या छायेत
जीवलग वीण घट्ट जोडली!!

मैत्रीच्या आपल्या नात्यात
रुसवेफुगवेपणातही राहो गोडवा 
आनंदाने, धैर्याने तयाला
प्राणपणाने,सहकार्याने सोडवा!

विविधांगी बहरली मैत्री
समजुतदारपणच्या भावाने
नाते जपले त्याचे सहकार्याने
घट्ट टिकवून ठेवले प्रेमाने !!

मैत्रीत स्पर्श आहे भावनांचा 
देता मैत्रीला साद अर्थ पावलांना 
होता मैत्री कणखर रितसर
आनंद हा हरवलेल्या गवसल्याचा !!
===================
श्री. सुंदरसिंग साबळे
गोंदिया मो. 9545254856


[03/08, 1:36 PM] Rupali Ghodvajkar: *मैत्री*

  मैत्रीला नसते सीमा
  नसते कुठली उपमा
  मैत्री म्हणजे दोन जीवांची
   प्रेमाची सुंदर प्रतिमा.

  मैत्रीत नसतो हिशेब
  नसतो कोणता व्यवहार
 एकमेकांसाठी सदैव तत्पर
 असा हा प्रेमाचा व्यापार.

मनातील गुपिते उघडायला
असते हक्काची  जागा
 सुख असो वा दुःख 
 जोडणारा हा धागा.

मनातील खास कप्पा
असतो मैत्रीला बहाल
नातेसुद्धा फिके पडते
हीच मैत्रीची कमाल.

मैत्री कधी होत नाही
जाणूनबुजून वा ठरवून
आपोआप जुळतात मने
सारे गुणदोष विसरून.

ज्याला मैत्री लाभली
भाग्यवान तो खरा
 समाधानी आयुष्याचा
 मैत्री हाच सहारा.....

*सौ.रूपाली गोजवडकर*
जि.प.कें.प्रा.शा. वाजेगाव नांदेड .


[03/08, 2:13 PM] Ajay Shivkar, पनवेल: *नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

राग  न धरता मनी न कसला,
चुक आपली कबुल करता,
होता तसा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

आले कितीही संकट चालून 
खंबीरपणे पाठीराहुन,
साथ देणारा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

जात-भेद उच-निच न मानता,
गर्दीतुन जो आपला जाणे
हक्काचा माणूस हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

दिसेल चेहरा हसरा कितीही 
उरीचे दुःख जाणे झडकरी,
असा मनकवडा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

गरीब श्रीमतीचा भेद नसावा 
मनात वाहे  निर्मळ झरा 
कृष्णा संगे सुदामा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४


[03/08, 2:25 PM] शुभदा दीक्षित: दिवसा मागून दिवस गेले वर्षामागून वर्षे 
मैत्रीस ठाऊक नाही किती जाहली वर्षे 
                  अंतरीचे उकलले धागे झालो एकमेकीत दंग 
                  पिकणाऱ्या फळास जैसा चढतो वेगळाच रंग 
सुखद ओल्या आठवणींची नेहमीच येते सय 
हिंदोळा जातो उंच माझा विसरून जाते वय 
                  मैत्रीत कसला स्वार्थ कसले हेवेदावे 
                  कठीण प्रसंगी दिले हात हातात प्रेमभावे  
पैसा मान मरातब नाही मैत्रीच्या आड 
निर्झारासम निखळ मैत्रीत झाली वाढ

                  कढ मनाचे उतू जाती जगी एक ठिकाण 

                  हलके फुलके मग वाटे हीच मैत्रीची जाण 

चेष्टा मस्करी गप्पा टप्पा सुरु किलबिलाट 

हसणे खिदळणे जणू नदीचा खळखळाट  

                 मैत्री शब्दात सामावे जिव्हाळा अन आर्द्रत
                 जशी दुधावरल्या दाट सायीची स्निग्धता 

मैत्रीचे अतूट बंधन देईल आम्हा बळ 
असाच आमुच्या मैत्रीचा पसरु दे परिमळ         


शुभदा दीक्षित 
पुणे


[03/08, 2:56 PM] महेंद्र संगावार: ........मैत्री......

गेले मी शाळेत नव्हते
 जुनी साथी
खुप शोधले त्यांना पण 
नव्हती जुनी नाती,

बोलावं वाटलं की आता लावते त्यांना फोन,
पण मनात एकच प्रश्न,,
आता माझा बेस्ट friend कोण..,

पाहता पाहता कसे गेले आपले वर्षे
अजूनही आठवतात मित्रानो तुम्हचे एक एक स्पर्श,,

सर्व जण मिळून खुप करायची मस्ती
दुकानात गेल की वस्तू करायची सस्ती,,

खुप दिवस झाले आणि ऐकले तुम्हचे जोक्स व गाणी 
ऐकण्यास खूप ताडपतात माझ्या दोनी कानी,,

आता आठवल्या तुम्ही की, आठवतात तुम्हचे वाणी,,
 मग नकळतच पडतात माझ्या डोळ्यातुन पाणी...!!
           
           Thank uu......!!

कवी-  महेंद्र संगावार,
         सोनापुर, गडचिरोली


[03/08, 3:26 PM] मेघा अनिल पाटील: मैत्री
          खरं पाहिले तर मैत्रीचा तसा
         खास फक्त एकच दिवस नसतो!
          कारण मैत्रीमुळेच प्रत्येक क्षण
           प्रत्येक दिवस हा खास असतो!
मित्र म्हणजे आत्मा
मैत्री म्हणजे परमात्मा !
मित्र म्हणजे कर्ण
मैत्री म्हणजे सूर्य!
           मित्र म्हणजे हिमालय
           मैत्री म्हणजे शिवालय!
           मित्र म्हणजे छाया
           मैत्री म्हणजे माया!
मित्र म्हणजे आधार
मैत्री म्हणजे विश्वास!
 मित्र म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे अनमोल साथ!
      मैत्रीच्या गाण्याचे शब्द 
      असतात खूप भाऊक !
      आणि स्वरांनासुद्धा 
      मैत्री सोडण नसतं ठाऊक!
मैत्री कधी संपत नाही, 
नाते कधी तुटत नाही !
जोडली जातात माणसे, 
मित्र कधी साथ सोडत नाही !
    कारण मित्र म्हणजे खात्री
     मैत्री म्हणजे पावती !
 
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com


[03/08, 3:39 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: मैत्री असावी अशी
नको असावी भिती
सर्वकाही शेअर करावे
नकोच काही बाकी

नको असो रक्ताची नाती
मैत्री साठी जीवन अपुले
आपण मित्रांसाठी
मैत्री असावी अशी

सुख असो वा दुःख असो
मी आहे तुझ्या सांगाती
म्हणे घाबरू कधीही नको
मैत्री असावी अशी

 जे होईल ते पाहून घेऊ
मिळून सारे निपटून घेऊ
चिंता शब्द येणार नाही
मैत्री असावी अशी

असेच मित्र सदा मिळु दे
माझे आयुष्य त्याला लाभु दे
चिंता दुःख सर्व मला दे
मैत्री असावी अशी

 जीवनात एक मित्र असावा
मनमोकळं करता यावा
सुखदुःखात साथ असावी
मैत्री असावी अशी

 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686


[03/08, 3:40 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *मैत्री असावी अशी*
            दि. 3 आगस्ट 2020

मैत्री असावी अशी
नको असावी भिती
सर्वकाही शेअर करावे
नकोच काही बाकी

नको असो रक्ताची नाती
मैत्री साठी जीवन अपुले
आपण मित्रांसाठी
मैत्री असावी अशी

सुख असो वा दुःख असो
मी आहे तुझ्या सांगाती
म्हणे घाबरू कधीही नको
मैत्री असावी अशी

 जे होईल ते पाहून घेऊ
मिळून सारे निपटून घेऊ
चिंता शब्द येणार नाही
मैत्री असावी अशी

असेच मित्र सदा मिळु दे
माझे आयुष्य त्याला लाभु दे
चिंता दुःख सर्व मला दे
मैत्री असावी अशी

 जीवनात एक मित्र असावा
मनमोकळं करता यावा
सुखदुःखात साथ असावी
मैत्री असावी अशी

 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686


[03/08, 3:50 PM] जी एस पाटील: " मैत्री "
मैत्री हे रक्ता विना नाते
रक्ताचे पेक्षा छान नाते
जातपातभेदविना नाते
गरीब श्रीमंत विना नाते
लहानपणा पासून नाते
शेवट पर्यंत कायम नाते
मदत नेहमी देणारे नाते
एकमेकाला तारक नाते
मित्रा विना मित्र अपुरा
मित्रा विना नाद अपुरा
मित्रा विना छंद अपुरा
मित्रा विना भाव अपुरा
मित्रच संकटात सखा
मित्र अडचणीत सखा
मित्र असतो पाठी राखा
मैत्री सर्वानीअमर राखा
  कवि-जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.


[03/08, 4:06 PM] वर्षा सागदेव: शाळेच्या, कॉलेजच्या बॅचच्या सुवर्ण आणि हीरक महोत्सवात
जेव्हा साठी-पासष्ठी उलटलेले सारे मित्र जेव्हा भेटतात तेव्हा 
त्यांच्या मैत्रीला ही नवा रंग चढतो
ती जणू मित्रांची पंढरीच असते आणि प्रत्येक मित्र वारकरीच असतो. अशा  सोहळ्याचे वर्णन.
 *मैत्रीची वारी*
भेटताच जूने मित्र, 
मित्र होतात वारकरी ,
अन् रंगते ,मैत्रीचे रिंगण,
मनाच्या  पंढरीत........

होतो दशकांचा प्रवास,
अवघ्या एका क्षणात,
मैत्रीचा अलवार पावा,
घुमतो प्राणा प्राणात ......

अवसेची होते पूनव ,
मैत्रीच्या चांदण्यात न्हाऊन,
शब्दा विण संवादे मित्र,
मैत्री पाझरते डोळ्यातून.....

भेटताच जुन्या मैत्रीणी,
फड रंगतो गप्पांचा खास, 
आसमंतात दरवळतो ,
मैत्रीचा चंदनी सुवास. ......

मैत्रीच्या गळा भेटी चा,
हळवा क्षण इवलासा, 
पापण्यांतून ओघळतो,
अलगदपणे तळ हाती....

वर्ष सरते ; ऋतू बदलते ;
मैत्रीची विण धट्ट होत जाते,
साठलेल्या ह्या आठवणींचे ;
टिपूर चांदणे मनात अवतरते....

पुन्हा भेट होइल - न-होइल, 
मैत्री चा हा शाश्वत विश्वास,
श्वासा श्वासातून मूकेपणी,
असाच निरंतर वाहत राहील. ... 

डाॅ.वर्षा सगदेव


[03/08, 4:17 PM] महेंद्र सोनवने: *मैत्री*

तुला पाहुन कितीही काळानंतर , 
मनात फुलते वसंत , 
हेच माझ्या मैत्रीच्या नात्यात , 
आहे मला पसंत ॥ 

अगदी घरच्या सारखं तुझं , 
मनात माझ्या वावरणं असतं , 
मी घसरतांना मित्रा तुझं , 
सहज मला सावरणं असतं || 

तुझ्या मनाला माझ्या मनाचा , 
रस्ता छान कळू दे , 
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही , 
ओंजळ पूर्ण भरु दे || 

मित्रत्वाचं चांदणं जेव्हा , 
मनाच्या आभाळात उतरतं , 
तेव्हा त्याच्यासाठी जगायला,
मन आपलं आतुरतं ॥ 

तुझी मैत्री व्यक्त करणं ,
रोज मला जमत नाही , 
तरीही माझे मन , 
खरचं तुझ्याविना रमत नाही ॥ 

नसावी मैत्री मुसळधार पावसासारखी , 
बरसून थांबणारी , 
असावी रिमझिम सरीसारखी , 
मनाला सुखद गारवा देणारी || 

बंध रेशमाचे माझे , 
असेच जुळून राहू देत , 
तुझे डोळे माझ्या नयनी , 
मैत्री सतत पाहू देत ॥

*महेन्द्र सोनेवाने,"यशोमन"*
*गोंदिया*


[03/08, 4:18 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य सेवक समूह आयोजित काव्य उपक्रम "

" मैत्री "

जगी श्रेष्ठ धागा 
एकच मैत्रीचा
विश्वसनीय नि
मनस्वी खात्रीचा 

मिळतो मनाला
येथेच आधार 
संकष्टी धावून 
करतो उद्धार 

नसे गर्व कधी
धन श्रीमंतीचा
असे मोह फक्त 
सहृदयी स्नेहाचा

गळालेल्या मनी
देई हा उभारी
कृष्ण साक्षात हा
सुदाम्यास तारी

हृदयाचा होऊन 
धडके स्पंदन 
प्रत्यक्ष भेटीत 
आनंदे लोचन

जरीही असला
दूरवर गावा
सुख दुःखासाठी
घेई क्षणी धावा

मैत्री ही असते 
दुर्मिळच भेट 
जी होऊन जाते
काळजाचा देठ

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376


[03/08, 4:27 PM] Rajendra Bansod
Gondia: *मैत्री तुझी माझी*

मैत्री म्हणजे...
      बागेतील फुलांचा ताटवा
     सुंगध दरवडून गंधित करणारा
     फुलपाखरांचे  नीत गोंजारत
      आयुष्याची गीत  गाणारा  

मैत्री म्हणजे....
      माझे अस्तित्व तुझ्यात पाहणे
      तुझी प्रतिबिंब माझ्यात पडणे
       सुखदुःखाची वाटणी करीत
        जीवनात मार्गक्रमण करणे

मैत्री म्हणजे...
  नात्यातील विणलेली गहिरी विन
   करमेणा  भेटल्यावाचून 
   वाट पाहत कधी झुरत बसने
  आल्यावर प्रेम व्यक्त करणे रुसून

मैत्री म्हणजे...
    आंबे,चिंचा ,बोरीची गोडी
     रानातील बेफाम फिरणं
  नावाडी बनून  चालवावी  होडी
     जीवनातील तराने गात   जिणं

मैत्री म्हणजे....
 संपदा ही सर्वांहून ठरते श्रेष्ठ मित्रवाचून मानव जणू हा रंक
संसारातील  पुढ्यात उभी ही कष्ट
 जग दाखविनारे अनमोल  हे अंक

मैत्री म्हणजे...
 जगण्याची  शिकविते खरी  रीत
रक्ताच्या नात्यातील नसतात बंधने
 जीवापाड हृदयाने जोडते प्रित
आयुष्य वेलीवरती हास्याचे फुलने
 
 
       *राजेन्द्र धर्मदास बन्सोड*
     *आमगाव, जिल्हा गोंदिया*
                            *8275290252*


[03/08, 4:44 PM] अमित बडगे: *विषय:- मैत्री*
*शीर्षक:-उल्लेख मित्रांचा*

कसा करू अनुवाद लागला 
नाद उभरत्या चित्राचा
कसा लिहू मी लेख करू
 उल्लेख प्रत्येक मित्राचा

प्रत्येकाचा रंग वेगळा 
बगळा कुणी, कुणी कावळा
दोघांची जो घेतो बाजू 
असतो तो एक मित्र सावळा

क्षणभर रडतात मनभर 
हसतात बालपणीच्या रणांगणात
 वाटते कधी थांबून जावं 
पण थांबत नाही वेळ जगात

कसा करू संवाद कळेना
 वाद मला या चरित्रांचा
कसा लिहू मी लेख 
करू उल्लेख प्रत्येक मित्राचा

खरा मित्र, खोटा मित्र
 प्रत्येक मित्र कळतोच कळतो
खरा मित्र सोबत असतो
 खोटा तोच वेळेवर पळतो

 कळते सारी दुनियादारी
 यारी असते सगळ्यात भारी
प्रेम आहे प्रत्येकाला
 प्रेमात पडली दुनिया सारी 

कसा मी बनवू चित्र विसरलो
 सूत्र आता या वीचित्रांचा
कसा लिहू मी लेख
करू उल्लेख प्रत्येक मित्राचा

-अमित प्र. बडगे, नागपूर


[03/08, 4:49 PM] Snehlata: साहित्य सेवक.. दि. 03.08.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार...अष्टाक्षरी
विषय.. मैत्री
शीर्षक..अशी ही मैत्री 

हवा नितळ नितांत
सहवास स्नेहगंध
मज मिळे तुजपाशी
प्रेम वेडा तो सुगंध......1

माया,मोह,सवड ना
बांधी मैत्रीची ही नाळ
नाही विचार जगाचा
अजुनही तान्हेबाळ.....2

सागराची लाट येई
किना-याशी स्पर्शी बाई
कधी सवड मिळाली 
मैत्री व्यक्त कर सई......3

अशा अबोल मैत्रीचे
भावविश्व ते डोळ्यात
नभ धरणी भेटेना
पाश गुंतले ह्रदयात....4

पारिजात सडा दारी
पृथेवर हिरवळं
तुझ्या माझ्या गं मैत्रीचा
गंध किती दरवळं........5
*******************
स्नेहलता कुलथे बीड 🌹


[03/08, 4:50 PM] Shailendra Adbalwad: .............साहित्य सेवक...........
___उपक्रम : दररोज एक कविता___

""""""""""""" मैत्री"""""""""""""
              =====

मैत्री म्हणजे परिचयातून जुळून  विश्वास जपणं
सदैव सुखात साथ मागून दु:खसंकटी साथ देणं

मैत्री म्हणजे स्मरणात जिवाभावाचा सखा येणं
न मागता सर्वस्वाने  समोरच्याला भरभरून देणं

मैत्री असावी जिवाभावाची प्रसंगी जीव देण्याची
सुखदु:खी एक दुस-याला खांदा देऊन जगण्याची

जन्मोजन्मी न तुटणारी उमाळ्याने भेट घेण्याची
हृदयाचा हृदयापासून मैत्रीचा परिमळ हुंगण्याची

मैत्री असावी पवित्र शुद्ध तीर्थ गंगाजलाहून निर्मळ
निर्भेळ निष्पाप प्रेमळ धाडसी नि  थोडी अवखळ

सुगंधी फुलासम आत्मभावना असावी मृदु कोमल
मैत्रित सदैव दरवळावा मंगल विवेकाचा परिमळ

मैत्री असावी सूर्यासारखी तेजस्वी सात्विक प्रखर
चंद्रासारखी शीतल शांंत हवीशी प्रकाशमय मधुर

पृथ्वीसम अभंग अढळ उपकारी क्षमाशील उदार
मैत्री असावी समुद्र वायूसम भक्कम बेडर झुंजार


आडबलवाड पाडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975


[03/08, 4:55 PM] सुनीता आवंडकर: मैत्री 
प्रा.सुनिता आवंडकर बारी नाशिक .
मैत्री !!!!!
 जेथे नकळत जुळतात ऋणानुबंध
 जेथे दरवळतो स्नेहाचा सुगंध ....

जेथे नाही बंधन वयाचे 
जेथे नाही कुठलेच हेवेदावे ....

जेथे आधी होतो विचार मैत्रीचा 

जेथे असतो त्याग आणि भाव समर्पणाचा ...

चंदेरी दुनियेतील मैत्री बनते जेव्हा स्वार्थी 
लागते गालबोट तेव्हा आपल्या संस्कृतीस ...

मैत्री केली श्रीकृष्णाने सुदामाशी  

मैत्री केली कर्णाने दुर्योधनाशी...

मैत्रीत नसावी गरीब श्रीमंती ची दरी ....
मैत्रीत विसावतील सुखे, पळतील दुःखे सारी....


[03/08, 5:18 PM] Pradip Patil, Ganpur: मैत्री 

स्न्हेह बंध नात्याचं 
सखा सोबती विश्वासाचा 
सुख दुःख साथीचा 
अवीट मैत्री गोडीचा.... 

भाव भावना सोबतीचा 
देत जीवाला जीव 
मित्र प्राण पणाचा 
सोबती आहे सजीव....

लाजवणारा रक्ताच्या नात्याला 
मित्र म्हणतात त्याला 
भाकरी अर्धी वाटणारा 
तोच जागतो मैत्रीला.... 

 नसे गरीब श्रीमंती 
जीव  संग एकीचा 
मान सन्मान दोघांचा 
त्यात सुख  मानण्याचा... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव. 
मो. 9922239055©️®️

[03/08, 5:58 PM] विजय वाघ: साहित्य सेवक समूह


मैत्री

मैत्रीच पान असत
गुलाबासारख छान असत
आयुष्यभराच वान असत
सुखदुःखाच दान असत    //१//

जीवापलीकडच नात
म्हणजे मैत्री असते
ती जपून ठेवली तर
आयुष्यभराची जंत्री असते //२//

जीवाभावाची नाती
म्हणजे मैत्री असते
ती हद्याच्या कप्यात
पक्की असते                 //३//

मैत्रीचा सुगंध
निखळपणे दरवळतो
भूवर हे नात
चांगलेच रंगत आणतो      //४//

मैत्रीत कुठलेही
बंधन नसते
सर्वकाही यात
मंगल असते                   //५//

मैत्री नावाचे
एक भांडवल असते
त्याच्या भरवश्यावर हे
नात सुमधूर होत असते      //६//


विजय वाघ
यवतमाळ
७७६८०७११७६


[03/08, 6:04 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्य सेवक समूह*
*दि.03/08/2020*

          *मैत्री*
मित्रता स्विकारावे मानवावे
दिले आम्हाला वरदान
कृष्ण सुदामाचे प्रेम 
सा-या जगतासाठी बनले महान  ।१। 

        कृष्णास आवडे सूदामा
         ज्यात आहे प्रेम विश्वास
         मैत्रीचा धागा करतो निशब्द
       जसे अतर्मनात बसतो श्वास  ।२। 

 कितीही दुःख असो
रिमझिम पावसाच्या  सरी
मित्राच्या संगतीने प्रेमाने
बरसतात आम्हावरी   ।३। 

माझ्या डोळ्यात तुझे चित्र 
गारवा देणारी सुखद क्षणी
जुळून राहू दे  साथ मैत्रीची
 स्मरणात राही गोड आठवणी ।४। 

मैत्रीत आहे प्रेम जिव्हाळा
तिथेच असतो हट्ट नी रूसवा
आठवतात बालपणीच्या गोष्टी  
 सावरण्यासाठी साथ तुझा असावा ।५ । 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया* 
      *(9420516306 )*

असा असावा मित्र

मित्र असावा सूर्यासम
प्रखर अन् तेजस्वी
मित्र असावा प्रभेसम
रम्य अन् ओजस्वी

मित्र असावा नदीसम
निर्मळ अन् प्रगाढ
मित्र असावा मेरुसम
अचल अन् दृढ


मित्र असावा काळासम
सामावून घेणारा
मित्र असावा घड्याळासम
पुढेपुढे जाणारा

मित्र असावा वृक्षासम
आधारवड असणारा
मित्र असावा पक्ष्यासम
गगनभरारी घेणारा

मित्र असावा शांतीसम
अनंतात रमणारा
मित्र असावा कांतिसम
तेजोवलय आणणारा

मित्र असावा मित्रासम
देणारा अन् घेणारा
मित्र असावा मित्रासम
सर्वस्व असणारा

©____🖊️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
बार्‍हाळी,ता.मुखेड.

शनिवार, 1 अगस्त 2020

रोज एक कविता - रक्षाबंधन

साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 02 ऑगस्ट 2020

*विषय :- रक्षाबंधन / राखी*
संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[02/08, 11:00 AM] Bharti Sawant: रक्षाबंधन

नाते भावा बहिणीचे
अतूट असे रेशमी बंध
राखीच्या धाग्यांनी घट्ट
नसतो स्वार्थाचा गंध

जपूनि पावित्र्याचे नाते
रक्षाबंधनाचे असेच सूत्र
प्राण जिवाचे वाचायाला
शत्रूलाही करूयाच मित्र

बहिणीची भावावरी अशी
आईवाणीच असते  माया
ताई असते प्रेम जिव्हाळा 
भावा देते  सदा छत्रछाया

माहेरचा असा सांगावाही 
भाऊ येतोय तिला मुराळी
डोळ्यातून धारा वाहताना
बंधू घेतोच प्रेमाने जवळी

ममता नि जिव्हाळ्याची
असेच हृदयात साठवण
रक्षाबंधनाच्याच सणाला
येईच माहेराची आठवण 

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835


[02/08, 11:09 AM] Nagorao Yeotikar: *कविता - रक्षाबंधन*

भाऊ बहिणीचा सण
त्याचे नाव रक्षाबंधन
ओवाळते भाऊराया
बहिणीचे करतो रक्षण

धागा नाही हा कच्चा
त्यात प्रेमाचे आहे बंधन
वर्षानुवर्षे टिकविण्यासाठी
करू या ऋणानुबंध मंथन

बहीण नाही ज्या भावाला
प्रेमासाठी पहा तळमळतो
राखी बांधून घेण्यासाठी
तो एका बहिणीला शोधतो

देशातल्या आया बहिणीवर
पहा अत्याचार किती वाढले
एक भाऊ येईना चालून पुढे
बहिणीला जे त्याने वचन दिले

प्रत्येक स्त्री बहिणीसमान मानावे
प्रत्येक भाऊला हे कळले पाहिजे
तोच दिवस रक्षाबंधनाचा खरा 
आपण साजरा केला पाहिजे.

- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड
9423625769


[02/08, 11:15 AM] +91 98341 14379: *कविता - रक्षाबंधन*
----------------------------------------
 आजवर जीची वाट पाहिली 
आज इथे ती भेटली 
भाऊरायाच्या मायेसाठी
आसुसलेली वाटली 
भाऊ बहिणीच्या प्रेमाची
आज मनी आठवण साठली 
उदास तुझा चेहरा पाहून 
चिंता मनात वाटली 
या भावाची अजून तुजवरची
माया नाही आटली .

     *अरविंद कुलकर्णी पुणे*


[02/08, 11:16 AM] प्रिती दबडे: रक्षाबंधन (दोन शब्दांची कविता)

रक्षाबंधन भाऊबहिणीचं
नातं पवित्र
होतं साजरं
देशात सर्वत्र

भाऊ बहिणीच्या 
रक्षणासाठी झटतो
बहिणीला भावाचा
दरारा वाटतो


काढतात एकमेकांच्या
खोड्या खूप
त्यांना भांडायला
नेहमीच हुरूप

बहीण सासरी 
जेव्हा जाई
डोळ्यांत अश्रू
आपोआप येई


थाट सणाचा
वाट रक्षाबंधनाची
घाई ओवाळणी
बहिणीला देण्याची

प्रिती दबडे,पुणे
9326822998


[02/08, 11:27 AM] सुनीता आवंडकर: राखी
 बांधून राखीचा धागा
 मागते दीर्घायुष्य भाऊराया साठी 

ओवाळून दीप प्रेमाचा !
वाढविते गोडवा अतूट नात्यासाठी

लावून भाळी तिलक, अक्षदा 

मागते ऐश्वर्य, यश लाभो सर्वदा 

राखीची वीण असते घट्ट बहु रंगांची
देते आठवण गोड नात्याची व कर्तव्याची

 एक रंग प्रेमाचा
 एक रंग ममतेचा
 एक रंग जबाबदारीचा 
 एक रंग नात्याचा

 असा हा सण उत्सव येवो प्रत्येक वर्षी
 घेऊन आनंद, प्रेम, उत्साह     यशकिर्ती!!!!

प्रा. सुनिता आवंडकर बारी नाशिक


[02/08, 12:11 PM] सौ भारती तिडके: ***कविता***
*रक्षाबंधन***

एक राखी चे बंधन
श्रेष्ठ साऱ्या धना हून
भाऊ बहिणीचे प्रेम
हेच ठेवते बांधून

राखीचा दृढ बंध
दोन मनाचंअतूट बंधन आहे
हळव्या नात्याच्या धाग्यावर
उमलणारच स्पंदन आहे

रेशीम धागा राखीचा
भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधनाचा
लाखात एक माझी बहीण
प्रतीक आहे मांगल्याचा

काय सांगतो राखीचा
पहा बांधवांनो धागा
बहिणीशी बांधवांनो
प्रेम भावनेने वागा

बहिण भावाचे प्रेम असते
मधुर आठवणी
हातातल्या राखी सोबतच
प्रेम साठवलय मनी मनी

सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
8007664039


[02/08, 12:30 PM] Hanmant Padwal: *रक्षाबंधन*
बेटीनेच बांधली राखी मला
मनी नात्याचा योग साधला
मला बहिण नाही...
तिला तरी कुठं भाऊ आहे..
हा सारा तिने दुवा सांधला....!! बेटीनेच....
छोटी म्हणाली,'ताई ,माझा भाई'
अन मी ही म्हणालो तिला ताई... 
नाते तयार झाले या सणाला..!!बेटीनेच....
धाग्याची दोन टोके जुळवूनी
बंध गेले आपसुक गुंफूनी
वलय लाभले आज रक्षाबंधनाला..!!बेटीनेच...
खंत ना कमी वाटली तिला
तिच्या भावनेतला ओलावा
मला भावला या क्षणाला...!! बेटीनेच...
उजळे चेहरा नि दाटे उमाळा
तेवते निरंजन मनी कळा
नेत्र बाहुल्या त्या तोच प्रकाश मला..!! बेटीनेच..

     *हणमंत पडवळ*        *उस्मानाबाद.*


[02/08, 12:43 PM] senkude: *राखी*

भाऊ बहिणीचे नाते 
असे अतूट बंधन धागे
धागे असते हे प्रेमाचे
नसते नाते हे स्वार्थाचे

पावित्र्याच्या या बंधनास
 जपूया आपण सर्वजण
सण रक्षाबंधनाचा करुया
गोडवा वाढवूया मिळून

बहिणीची माया असते 
आईसम ती सांभाळते
भावासाठी ती आपला
जीव ओवाळून टाकते

सासीरवाशीण बहीण 
वाट पाहते भावाची  
डोळे येतात भरुन तिचे
अशी असते उब मायेची 

डोळ्यातून वाहती धारा 
बंधू घेतो मायेने जवळी
नात्यातील हा बंध सारा 
बहिण भावास ओवाळी

प्रेम आणि जिव्हाळ्याची
राही काळजात साठवण
सण राखीचा येता मग
येती माहेराची आठवण.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.


[02/08, 12:58 PM] Rajendra Bansod
Gondia: *असती बहीण आज तर..*
(माझ्या स्मृतिशेष बहिणीसाठी सानुश्रयाने...)

कोण बांधील,तुजविण राखी मजला
सजवूनी हाताला,बांधुनी दोर प्रेमाचा
त्यागुणी संसाराला,माहेरच्या वाटेला 
कायम मनगट पोरका,  बहिणीच्या प्रेमाचा!१|

ताड परी उभी सावली, धरुणी जपली मायेपरी
जीवापाड करूनी माया,सान या भावाला
आठवूनि बरसती सरी ,पापण्याही पाणावल्या
वेदनेची कंपने छेदती,शोककळा  ह्या हृदयाला|२|

राखी आली पुन्हा,धुमसत रडलो उरी
पाहता दुकाने  राखीची,थबकलो  या रेशिमबंधनांनी
पाहिले ताई  घेवून थाल, स्वप्नात जरी पुसली  तू आसवे 
 क्षणभर सुखावलो मिटुनी डोळे,रेशीमधागा बांधुनी|३|

असती बहीण आज, सजले असते मनाचे गाभारे
न्हाहळतांना मजला ,ओवाळले असते तिने
पेटवूनी दिवा प्रकाशीत लख्ख, सजविले असते मनोरे 
चिंब निराश करी पाऊस,या नारळी पौर्णिमेने|४|

तू नाही पण आठवणीने,  मनात बसविले गावे
कष्टतांनाना  शिवार -बागा,तुडविली खडतर वाटा
झटली आई-बहीण होऊन,काय तुला देऊ नावे
राखी आली आठवणी  संगे,उडवीत त्सुनामी लाटा|५|

अंगणातील झोका एकांतात,हुंदके देत झुलतो गं
मैत्रिणीचा मेळा तुझा, घराकडे  बघून  झुरती
त्राण संपले आईबाबांचे,आठवणींचे हिंदोडे उठती गं
खुलली असते मनगट ही,जर बहिण माझी असती |5|

*राजेंद्र धर्मदास बन्सोड*
   सहायक शिक्षक
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा
पंचायत समिती गोरेगाव, जिल्हा गोंदिया
8275290252


[02/08, 1:08 PM]  Manjush Deshamukh: रक्षाबंधन

सर्व बंधनात बंध 
प्रेमाचा  तो सुगंध
भावा बहिणीचे नाते
जसा परिस - चंदन

 रुसवा- फुगवा तो
  लटका राग  तो भंग
चिडी चुप होई घर
जाई - जुई चा सुगंध

प्रेम  भावा -बहिणीचे
जसे गहू जात्यातले
अर्थ शोधू नका कुणी
या एक नात्यातले

 माय ,बहिण- मुलगी 
जगा उजेड तो देई
प्रेम लाभे ज्याला यांचे
रंका चा राव ही होई

आले रक्षेचे ते बंधन
धाग्या ची ती होई राखी
सुखी ठेव भाऊराया
मज काही नको बाकी

सौ. मंजुषा देशमुख
अमरावती


[02/08, 1:39 PM] Pradip Patil, Ganpur: रक्षाबंधन 

   चंदनाच्या पाटावर भावाला 
 सोन्याच्या ताटाने   ओवाळीते 
 अक्षता  कपाळावरच्या ब्रम्हांला 
ज्योत  ओवाळीते भाऊरायाला.....
फिरवते  लावण्य सोन्याला
बांधते  धागा भावाला
सांगते भावाच्या  मनाला
आपुली  कीर्ती ऊरुदे.... 
कळूदे या विश्वाला
धागा बांधला  मनगटाला
धार  दे तुझ्या तलवारीला
राहा  तत्पर  रक्षणाला....
सांगते तुला भाऊरायाला
सण हा रक्षाबंधनाचा आला
नको अंतर कधी नात्याला
माहेरची साडी पाठव  बहिणीला....
जाग आपुल्या संस्कृतीला
विश्व् बंधुता या संकल्पनेला
मान दे स्त्री जातीला
रूप माझंच  स्त्री वर्गाला....
ओरडून सांग मानवजातीला 
सांभाळा  विश्वातील बहिणींला 
मागणं समस्त भाऊ रायाला
भाऊ बांधील विचाराला... 


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055,©️®️


[02/08, 1:52 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *रक्षाबंधन /राखी*

रेशमाचा दोर नसे हा
आहे प्रेमाचा धागा
रक्षण करण्या भावाचे
मना तील भाव होई जागा

भावाबहिणीचे अनमोल नाते
बांधुन ठेवी स्नेहाने
राखी च्या या सणाला
बहिण ओवाळी प्रेमाने

भाऊराया ओवाळणीला
देई बहिणीला हे वचन
 जो वर आहे या पृथ्वीवर
रक्षण करण्या मी सदा हजर

आनंदाश्रू डोळ्यातून वाहती
जशा गंगा यमुना नद्या
भानावर येई मग बहिणही
भावाच्या प्रेमळ स्पर्शा

 नको असो रक्ताचे नाते
तरिही सज्ज रहा रक्षण करण्या
बहिणीला हवी हिच ओवाळणी
स्त्री रक्षणाचे वचन दे भाऊराया

   सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
   गोंदिया
मो क्र 9423414686


[02/08, 2:27 PM] शुभदा दीक्षित: कृ ष्ण मेघ हे झर झर झरती 

                  नील अंबरातून 

चिंब नाहली सृष्टीदेवी  

                  जाई हरकून 


लपाछपीचा खेळ  चालला 

                  उन्ह पावसाचा 

अर्धगोल नभी प्रकटला 

                  इंद्रधनुष्याचा 


लेऊन शालू हिरवा गर्द 

                  कंचुकी सोनसळी 

सुंदर मोहक रूप सृष्टीचे 

                  हसरी गोड खळी 


सावन मासी पुनवेला ती 

                  गेली सागरतीरी 

अर्पून नारळ सांगे सागरा 

                  शांत हो लवकरी 


रेशीम बंधन बांधून तुजला 

                   वचन मागते भ्राता 

रक्षण करिसी सर्वांचे तू 

                    नकोस खवळू आता 


अथांग मन हे तुझे सागरा 

                    येते प्रेमाची भरती 

वंदन करिते सृष्टीदेवी ही 

                    नको कधी ओहोटी 


सुवर्णदिन हा असे आजचा 

                     राखी पुनवेचा 

प्रेमाचा संदेश दिनाचा 

                     भावा बहिणीचा  


शुभदा दीक्षित 
पुणे


[02/08, 3:29 PM] श्रीकांत गोरशेटवार: राखी : प्रेरणास्त्रोत

रक्षाबंधाच्या पवित्र दिनी राखी ताईने बांधिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

निराश मन होते जेव्हा
राखी त्यातून सावरते
आनंदाच्या मुक्त क्षणाला
मनात राखी मोहरते
सोज्वळतेची झांक तिच्यामध्ये मनोमनी मी पाहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

मुक्त बागडणे शिका तिच्याकडून
विचार गंभीर शिका तिच्याकडून
हळूवारपणावर माया शिंपडून
करारी बाणा शिका तिच्याकडून
अमूल्य ठेवा ती जीवनातला मान गर्वाने ताठली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

असता दुःखी मात ती देते 
येता संकटे ना डगमगते
भगीरथ कार्या पाठी असते
मनाचे स्फुल्लिंग ती चेतवते
आयुष्याच्या कोंदणात हिरा बनुनी राहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

आता कोठेही मागे ती नाही
सदैव पाऊल पुढेच राही
अबला नाही सबला होई
विश्वामध्ये आकार घेई
माई ताई भार्या रुपात मी राखी ती पाहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

©____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
भोकर,जि.नांदेड.


[02/08, 4:20 PM] मेघा अनिल पाटील: राखी
लहानपणासूनच प्रत्येक सुख दुःख म्हणजे काय हे समजत नसतानाच
 एकमेकांची सवय होवून जाणं...
म्हणजे.... राखी.....!!
 प्रत्येक प्रसंगात पाठीराखाण करणारा..
हसवणाऱ्या,फसवणाऱ्या तर कधी बालपणीच्या  गप्पा...
म्हणजे.... राखी.....!!
प्रत्येकाने  हेवा करावा अन् दैवानेही लाजावं असं पवित्र नातं...
म्हणजे.... राखी....!!
उतरत्या वयात सांजवेळीही ऐकू यावी अशी सुंदर तान......
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं
अस पानं...
म्हणजे.... राखी.....!!
हसता हसता अलगद टिपावं असं डोळ्यातलं पाणी...... 
आठवावेत लहानपणीचे रक्षाबंधन
अन्
स्वप्नवत वाटणाऱ्या,स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची
अशी ही कहाणी...
म्हणजे.... राखी.....!!
सर्व बंधुना  समर्पित.....!!!

 श्रीमती मेघा अनिल पाटील
         उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
नवापूर,जिल्हा नंदूरबार.
मोबाईल 9665189977
Email -  patilmeghaa@gmail.com


[02/08, 4:44 PM] दुशांत निमकर: *राखी:प्रेमबंध*

आला हा राखीचा सण
ओवाळते भाऊराया
हाती रेशीमचा धागा
देती मनगटी बांधूनिया....

बालपणीच्या आठवणीला
ठेवी हदयात थोड़ी जागा
रक्षणकर्ता माझा भाऊ
बांधते प्रेमाचा हा धागा....

बहीण भावाचे हे नाते
सलोख्याचे नि पवित्र
पाठीराखा हीच ओवाळनी
रक्षाबंधनाचे हेच सूत्र....

सासरच्या साऱ्या गुजगोष्टी
सांगते येऊनी भावाला
दुःख होते जेव्हा बहिणीला
ठेच लागते भावाच्या मनाला....

सासुरवाशीण बहिनीला
माहेराची येई आठवण
राखीच्या सणाला आई
देई प्रेमबंधाची साठवण....

✒️श्री दुशांत बाबूराव निमकर
   चक फुटाणा,चंद्रपुर


[02/08, 4:45 PM] जी एस पाटील: "रक्षाबंधन"                      
बहिन भावाचे अतुट बंधन 
जगात सर्व म्हणती रक्षाबंधन
बहिन भाऊ भेटीचे बंधन
वर्षातून एकदा येते
रक्षाबंधन
भाऊ बहिनीला देतो 
वचन
बांधून हातावरी राखी
बंधन
बहिण मागते आयुष्य
भावाचे
भाऊ  करतो रक्षण
बहिणीचे      
बहिण भावाला राखी
बांधते
बहिण रक्षणाची हमी 
मागते
बहिण भावाच्या मायेचे
लक्षण 
दरवर्षी श्रावणात येते 
रक्षाबंधन
आईच्या माघारी बहिण
माया करी 
आई बापा माघारी बंधू
माहेर करी
माझा भाऊराया येईल
भेटाया
वेडया बहिणीची वेडी 
माया.
 कवि...जी.एस.कुचेकरपाटील
भुईंज ता.वाई जि.सातारा 
मो.नं.७५८८५६०७६१.


[02/08, 4:51 PM] सुंदरसिंग साबळे: रक्षाबंधन  
==================
रक्षाबंधनाचा सण
करी भावाबहिणीची आठवण
हाता बांधून रेशमी बंधन
भाळी कुंकवाची खून
वाटे मजला सगुण !!
      भाऊ माझा पाठीराखा
       कनवाळू आहे फार
        त्याच्या कर्तुत्वाच्या पुढे 
      चंद्र सूर्य तारे फिके पडे !!
शेतकरी भाऊ माझा 
उभ्या जगाचा पोशिंदा 
अख्या दुनियेत त्याला 
रात्रंदिन कष्टच लिहीलेला !!
         भाऊ माझा गं पोलीस 
          करतो सर्वांचे रक्षण
        ना भदभाव त्याला 
        बजावत कार्य प्रवीण !!
(डॉक्टर)देवराया माझा दादा 
असे कामात तत्पर 
जगा देतो सदा जीवनदान 
करून साऱ्यांना निरोगी छान!!
         असा सैनिक माझा भाऊ 
         सदा सीमेवर ऊभा
        देशाच्या रक्षणाचा
       कधीही विसर ना व्हावा !!
असे  सर्वच वॉरिअर
समस्त जगताचे भाऊ
अशा भावांच्या मनगटी 
बांधू रेशमाच्या गाठी
 देतीलही प्राण स्वतःचे
लाडक्या बहिणीसाठी !!

श्री. सुंदरसिंग साबळे
गोंदिया मो. 9545254856


[02/08, 4:57 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य सेवक आयोजित काव्य लेखन " 

* विषय :- " रक्षाबंधन "

* शिर्षक :- " राखीपुनवं "

" राखीपुनवं "

येता सण हा नजीक
होई कासावीस जीव 
नकोरे कोपू विषाणू 
आणरे मना जरा कीव

यंदाच्या राखीपुनवेला
लागता कोरोनाची नजर 
बंधू आठवणीने झाला
बाई ओला माझा पदर

मोबाईलवरूनच करते
भाऊराया तुज औक्षण
पाळून हा लॉकडाऊन
कर तुझ्या जीवाचे रक्षण 

राहूदे मनी तुझ्या उधार 
हक्काची ही रे ओवाळणी
आजन्म प्रीतधागा जपावा
हीच माझी खरी बोळवणी

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376


[02/08, 5:03 PM] Shailendra Adbalwad: ..........साहित्य सेवक.........
,,,उपक्रम : दररोज एक कविता,,,
-----------रक्षाबंधन-------
..........=======..........

श्रावण पौर्णिमा दिन  भाऊ बहीण  प्रेम प्रतीकाचा सण
राखी बांधुनी मनगटी बहीण भावाला मागते स्वसंरक्षण

स्नेह प्रेम उत्साह नाते संबंध दृढाधार कृतज्ञतेचा हा दिवस
टिळा लावुनी भाळी बहीण प्रार्थिते भावा लाभो दीर्घायुष्य

औक्षण करिता बहीण संकल्प भावाचा भेटवस्तूप्रति दान
जन्मभर बहिणीची अविरत सेवा नि करीन शील संरक्षण

दानवांचा पराभव केला इंद्राणीने इंद्र देवांस राखी बांधून
जरतारी शेला फाडून भाऊ कृष्णां राखी बांधली द्रोपदीनं

हुमॉयूंस भाऊ मानून राखी दिली चितोड राणी कर्मवतीनं
बहादूरशहांशी प्राणाची बाजी लावून बादशहाने केले संरक्षण

बंगाल विभाजनांती नोबेल पारितोषिक रविंद्रनाथ टागोर
हिंदुमुस्लीम सलोखा राखण्या केला रक्षाबंधनाचा पुरस्कार

राखीस अहिंसेचे प्रतीक मानून संहारिले शत्रूंचे शत्रुत्वपण
राजपूत स्त्रियांनी जगी दाविला आदर्श शत्रूंस राखी बांधून

अनेक स्त्रिया औक्षण करितात   चंद्राचे देव भाऊ मानून
म्हणून बालपणी ऐकली आई अंगाई चंदामामा गाण्यांतून

मस्तकी टिळा म्हणजे सद्बुद्धी सद्विचार जागृतीचे  पूजन 
हाती रेशम धागा शील प्रेम पवित्रता पुरुषार्थाचे रक्षाबंधन

भारतीय संस्कृतीतील परमोच्च प्रेम वात्सल्याचा आनंदी सण
उच्च परंपरा भाऊबहीण मातापिता आप्त नाते ठेवू जपून

आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975


[02/08, 5:16 PM] वर्षा सागदेव: नातं भावाबहिणीच ,
प्रितीचा निर्मळ निर्झर ,
कधीच रिते न होणारे ,
प्रेमाने पूर्ण अक्षयपात्र.

तलम रेशमा समान,
मृदू ,मुलायम तरल,
कधी धीर गंभीर तर,
कधी रम्य अवखळ.

ह्या नितळ नात्यातचा,
प्रेमळ दुवा कधी असतो,
रेशीम धागा तर कधी,
द्रौपदीचा जरतारी पदर.
डॉ. वर्षा सगदेव


[02/08, 5:19 PM] Snehlata: साहित्य सेवक दि.2.8.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार...अष्टाक्षरी
विषय..रक्षाबंधन/राखी
शीर्षक..माझा भाऊ

किती गोडवा खट्याळ 
दादा तुझ्या वागण्यात
लहानपणीचा खेळ
आज आला जगण्यात...1

बंध रेशीम धाग्याचा
बांधी दादा मीच तुला
नाक ओढी माझे तू रे
मग चाॅकी देशी मुला....2

राखी बंधन रक्षणा
तुला बंधनी बांधिले
वचनाचे बोल खरे
कधी तुही न गांजिले...3

राखी बंधन बहीण
भावा ओवाळीते आज
तुज आयुष्य मागते
देवा, माथी ठेवा ताज....4
********************
स्नेहलता कुलथे बीड 🌹


[02/08, 5:22 PM] Ajay Shivkar, पनवेल: *रक्षाबंधन रक्षाबंधन*

बहिणीसाठी नसतो फक्त हा सण 
भावाची माया आणि सुरक्षेचं धन
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचासा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

साडी नको-पैसा नको ओवाळणी मला नको
दादा तुझ्यासाठी माझा,जीव तीळ-तीळ तुटतो
तू फक्त सुखी रहा सांगते अंतःकरण 
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

बाप आणि आई तूच सर्व-काही, तुझ्याविना माझा कोणीच नाही 
पवित्र हे नातं पाण्यासारखं मन,
स्वार्थासाठी तर असतो प्रत्येकजण 
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

माहेर सुटलं सासर धरलं गेली नाही आठवण,
एका उदरात जन्मलो,एका घरात वाढलो आपण,
तुझ्या सुखासाठी झूरते माझे मन,
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

राखीच्या या सणाला दादा तू जागशील का?
मनापासून मागतो तुला ओवाळणी देशील का?
दिसेल कोणी अबला जर, तिचे रक्षण करशील का?
खूप आहेत बहिणी इथे,त्यांच्यात मला बघशील का? 
विश्वात मोठा होईल हा सण
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४


[02/08, 5:27 PM] महेंद्र सोनवने: *साहित्य सेवक*
*उपक्रम - दररोज एक कविता*
*दिनांक - 02/08/2020*
*विषय - रक्षाबंधन*
--------------------
*रक्षाबंधन*

राखीचा हा बंध प्रेमाचा , 
प्रेम आहे भावा बहिणीचा । 
रेशमाच्या धाग्यांनी बांधून त्याला , 
नात्यांचा हळूवार स्पंदनाचा ॥ 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर , 
भावास असेल बहिणीचा साथ । 
कशीही परिस्थीती आली तरी , 
असेल दोघांचा हातात हात ॥ 

दुर असून ही या दिवशी , 
लहानपणीचे दिवस आठवतात । 
हातातल्या राखी ला बघून , 
ताईचे प्रेम मनी साठवतात ॥ 

प्रेमाचं प्रतिक आहे राखी , 
त्यात भावा बहिणीचे प्रेम आहे । 
बहिणीच्या रक्षणार्थ सदा , 
भावाचा जीवन सज्ज आहे || 

भावाच्या सुखाच्या व दिर्घायुष्याची , 
कामना नेहमी बहिण करते । 
रक्षाबंधनाच्या या पवित्र सनाला , 
बहीण अगणित शुभेच्छा देते ॥ 
_____________________


*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "*

*गोंदिया*

*दिनांक : ०२/०८/२०२०*


[02/08, 5:36 PM] Manik Nagave: कविता

रक्षाबंधन

रक्षाबंधन सण महत्त्वाचा,
बहीण अन् भावाच्या प्रेमाचा.

औक्षण करुनी तिलक लावते,
रक्षणाची ओवाळणी मागते.

सज्ज बंधू लज्जा रक्षणाला,
घोर नाही भगिणीच्या जीवाला.

धागा रेशमी मनगटी बांधला,
भाळी कुंकुम तिलक लावला.

ओवाळण्या फुलली निरांजने,
पुलकित झाली सारी मने.

भेट देता खुष लाडकी झाली,
नयनी समाधानाची लकेर आली.

असा हा सण परंपरेचा छान,
संस्कृतीचा ठेवला जातो मान

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर


[02/08, 5:41 PM] Mina Khond Hyadrabad: रक्षाबंधन

राखी बांधली बहिणीने 
भावाच्या मनगटावर 
दृढ नातेसंबंधाकरिता  ...

राखी बांधली मातेने 
आपल्या मुलाच्या हाताला
वृद्धावस्थेत रक्षणाकरिता...

पित्याने  राखी बांधली
आपल्या पुत्राच्या हाताला
म्हातारपणाच्या आधाराकरिता....

विद्यार्थीनींनी  राखी बांधली
आपल्या शिक्षकांच्या हाताला
शिक्षण ,रक्षण, विश्वासाकरिता....

मुलींनी  राखी बांधली
स्वतः आपल्याच हाताला
आत्मविश्वासाने स्वरक्षणाकरिता.....

एक रेशमी अमुल्य धागा
बांधतात प्रेमाने राखीच्या सणाला
विश्वासाच्या  नात्याकरिता...

मीना खोंड
हैदराबाद


[02/08, 5:50 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्यसेवक समूह*
 *कविता लेखन* 
*विषय :- रक्षाबंधन* 
-------------------------------------------
  श्रावण महिन्यात प्रोणिमेला
  नारळ अप्रिते बंधूरायाला
  रेशमाचे बंधन मनगटीवर
  रक्षणासाठी सज्ज मजला  ।१। 

        नातं पवित्र भाऊबहिणीचं
        रक्षेसाठी झटावे संगतीन
       माहेराचे आठवणी साठवून
      मागते आयुष्य देवाला नमून  ।२। 

ज्या भावाला बहिण नाही
 तळमळतो प्रेमासाठी
स्विकारण्या प्रेमाचा धागा
मनगटावर बांधण्यासाठी   ।३। 

बहिणीला देतो भाऊराया वचन
वर्षोवर्षी चाले रक्षाबंधन
बहिण मागते भावाचे आयुष्य 
भाऊ करितो बहिणीचे रक्षण  ।४। 


          समाजातील कुप्रथेला
         तोडण्यासाठी बहीणभावाचे, 
         कौटुंबिक  नाते येती कामाला
         सज्ज बंध आहेस रेशमाचे  ।५। 

 *सौ.यशोधरा सोनेवाने*
 *गोंदिया*
 *दिनांक : ०२/०८/२०२०*
*मो.9420516306*


रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...