सोमवार, 3 अगस्त 2020

रोज एक कविता - मैत्री

साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 03 ऑगस्ट 2020

*विषय :- मैत्री*

संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[03/08, 9:41 AM] senkude: कविता - बंध मैत्रीचे

बंध मैत्रीचे असतात खरे 
निस्वार्थी आणि प्रेमळ 
मनातील गुपितं उघड
करुन सांगणारे नाते निर्मळ 

बंध मैत्रीचे बेधुंद असते 
वादळ वाऱ्यातला झोका
नाते असते ते रक्ता पलीकडचे नसतो तिथे कसलाही  धोका

मैत्री म्हणजे आनंदाचा झरा, आनंदाने गगनास भिडणारा 
दोन मनास जोडणारा तो 
 असतो सांकव खरा 

मैत्री म्हणजे जीवास जीव
देणारा मायेचा जीवन धागा
असले दूर कितीतरी परी  काळजात असते त्यांच्या जागा

मैत्रीचा बंधनाचे नाते अतुट अंतःकरणातील तो असतो
 एक कप्पा, जिथं होतात
 मन मोकळ्या गप्पा...
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*


[03/08, 9:42 AM] Hanmant Padwal: *मैत्र*
मी उन्हात उभा
सावली त्याने व्हावे,
रुसवा काढण्या माझा
गीत त्यांने गावे....॥

गुंफून हातामधी हात
क्षितीज दिशेने जात....
सुटणार नाही पकड
होऊ दे कितीही वाताहात....॥

सुसाट वादळात असतो
तोच आडोसा....
अंधार भरल्या खोलीत
तोच एक कवडसा....॥ 

गुज खोलत अंतरीचे जावे
असा ठाव मिळत जातो
मी त्याच्या तो माझ्या
मनाच्या आरशात पाहातो....॥

              *हणमंत पडवळ*
               *उस्मानाबाद*


[03/08, 9:44 AM] Nagorao Yeotikar: *मैत्री नितळ प्रेमाची*

साथ असू दे अशीच जन्माजन्माची
मैत्री असू दे आपल्या नितळ प्रेमाची

विचार जुळले आचार जुळले
जुळले आपल्या दोघांचे मन
ऊन वारा वादळ थंडी पाऊस
कधी दूर राहिलो नाही आपण
या मैत्रीवर नजर आहे सर्वांची
साथ असू दे अशीच जन्माजन्माची

जीवनात सुख आले दुःख आले
नेहमीच तुझी मला साथ मिळाली
संकटात नेहमी मित्र धावून येती
साऱ्या वेदना एका क्षणात पळाली
सारे आठवण करती आपल्या मैत्रीची
साथ असू दे अशीच जन्माजन्माची

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769


[03/08, 9:47 AM] प्रिती दबडे: खरी मैत्री

रोज भेटावे असे काही नाही
पण आठवण येत नाही असा दिवस नाही
मैत्री एक निरपेक्ष नातं
आपोआपच जन्मभरासाठी आपलं होतं
रक्ताच्या नात्यापेक्षा पण वाटतं जवळ
थोडं खोडकर थोडं गोड अन् अवखळ
दाखवते मैत्री तोंडावर चुका
नाही रहात मित्र त्याबाबतीत मुका
नसते फसवेगिरी ना दिखावा
असतो फक्त खरेपणाचा दावा
राहू दे अशीच साथ तुझी
ही मागते देवापुढे मैत्री माझी

प्रिती दबडे,पुणे
9326822998


[03/08, 10:31 AM] Bharti Sawant: शीर्षक - भान मैत्रीचे

ठेवुनिच भान या मैत्रीचे 
जपूया जीवनभर नाती
नकोत हेवेदावे मैत्रीमध्ये
पाळू नकाच जातीपाती 

असावे भान अशा मैत्रीचे
जपुया नाती सगळे छान
नको रुसवे-फुगवे नखरे
द्यावा परस्परांनाही मान

टिकवावी निरंतर नाती
राखावाच  मानसन्मान
ठेवूनि भान सुंदर मैत्रीचे
फुलावी अशी मैत्री छान 

देऊया मैत्रीचा हात हाती
पीडित  दु:खी पामराला
देवाजीची ही कृपा मर्जी
वरदहस्त असा लेकराला 

बांधू रेशमी बंध नात्यांचा
जुळवून मैत्रीचे अतूट धागे
जीवन हे क्षणभंगुर असता
सोडून देऊ रागरुसवे मागे

फुलावीच मैत्री कुसुमासम
दरवळावा नात्यांचा सुगंध
हात साह्याचा देऊनी हाती
राहू आनंदाने होऊ  बेधूंद

सौ.भारती सावंत
मुंबई


[03/08, 10:50 AM] सौ भारती तिडके: **आजच्या उपक्रमासाठी**


शीर्षक:-**मैत्री**

मैत्री असावी
मनाला सतत हुरहरणारी
चांदण्यांचे शितल
उत्कर्षा ने हवी वाटणारी
चंदनापरी सुगंध दरवळणारी

मैत्री असावी
श्रावण सरीत चिंब चिंब भिजणारी
अथांग जलाशयात भ्रमण करणारी
परकी असली तरी
सतत आपली जाणवणारी

मैत्री असावी अशीही
पूर्ण अबोल मनाची
मुक्या भावनांची
सोनेरी  चाफ्यासारखी

मैत्री असावी
नाजूक पाकळ्या सह
कुठेही ,कशीही आठवली
तरीही प्रामाणिकपणाची
 निरागसतेने भरलेली.

सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर , गोंदिया
8007664039


[03/08, 10:53 AM] Gauri Shirsat: उपक्रमासाठी

मैत्री तुझी माझी

मैत्री तुझी माझी
आरसा नितळ,
दिसे प्रतिबिंब
अगदी निर्मळ...

संकटात नित्य
धावते वेळीच,
तुझी आणि माझी
मैत्री वेगळीच...

नाते ग आपले
 हे जगावेगळे,
 बंध हे मनाचे
आहेत आगळे...

मनातील माझ्या
ओळखते कशी,
आहे अशी मैत्री
ही बावनकशी...

जन्मोजन्मी हीच
मैत्रीण मिळावी,
सुखी माझी सखी
सदैव असावी...

मैत्रीचा हा हात
हाती राहो नित्य,
अखंड ही मैत्री
हेच खरे सत्य...

© सौ.गौरी शिरसाट
      मुंबई


[03/08, 11:03 AM] Mina Khond Hyadrabad: अमृत मैत्री

तुझी माझी मैत्री नात्यापलीकडची
भावभावना सखोल समजून घ्यायची
मनात रुजलेली  आनंदघन फुललेली
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !
 
तुझी माझी मैत्री शब्दांच्या पलीकडची
फुलांच्या गंधाची,शितल चांदण्यांची
अशी बोल अबोल, अशी शांत निवांत
अमृतमैत्री आयुष्यभर जपायची !

तुझी माझी मैत्री मनापलीकडची
समजून घेणार्‍या मनकवड्या मनाची
आनंदाची उधळण प्रकाशाची पखरणं
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !

तुझी माझी मैत्री रक्ताच्या नात्यापलीकडची
 सुख दुःखाची प्रसन्न खळखळ हसण्याची
स्मृती  सुगंधी तरल,हृदयीच्या कूपित खोल 
अमृत मैत्री आयुष्यभर जपायची !

मीना खोंड
हैद्राबाद


[03/08, 11:46 AM] दुशांत निमकर: मैत्री

मैत्री ही निर्मळ
वाहणारा झरा
संकटात येई
धाऊन तो खरा....

मैत्रीचा पसारा
भासे जसा वारा
येई भरभरा
सहवास न्यारा....

नाते हे अतूट
रेशीम धाग्याचे
घट्ट विणलेले
प्रेम नि स्नेहाचे....

मार्ग दाखविती
कडक बोलून
कान उघाडणी
करती टोचून....

दिवा हा मैत्रीचा
अखंड राहावा
जीवनात माझ्या
प्रकाश तू द्यावा....

मैत्री तुझी माझी
सागराचे नाव
जीव लावणारा
अतूट हे गांव....

सुखदुख क्षणी
धाव माझ्यावरी
ईजा होती मला
घाव तुझ्यावरी....

एकमेकाप्रती
सन्मान करू या
विश्वास ठेऊनी
मैत्री फुलवू या....

✒️ दुशांत बाबूराव निमकर
चक फुटाणा,चंद्रपुर
मो न 9765548949


[03/08, 12:39 PM] सुंदरसिंग साबळे: मैत्री  
===================

जन्म घेतला नवा
तुझ्याशी मैत्री झाली तेव्हा 
आयुष्यातील सुखदुःखात
मित्रा तुझा मज साथ हवा!!

विविध रुपाने मैत्रिचे
एकमेकांची मने जिंकली
ऋणानुबंधाच्या छायेत
जीवलग वीण घट्ट जोडली!!

मैत्रीच्या आपल्या नात्यात
रुसवेफुगवेपणातही राहो गोडवा 
आनंदाने, धैर्याने तयाला
प्राणपणाने,सहकार्याने सोडवा!

विविधांगी बहरली मैत्री
समजुतदारपणच्या भावाने
नाते जपले त्याचे सहकार्याने
घट्ट टिकवून ठेवले प्रेमाने !!

मैत्रीत स्पर्श आहे भावनांचा 
देता मैत्रीला साद अर्थ पावलांना 
होता मैत्री कणखर रितसर
आनंद हा हरवलेल्या गवसल्याचा !!
===================
श्री. सुंदरसिंग साबळे
गोंदिया मो. 9545254856


[03/08, 1:36 PM] Rupali Ghodvajkar: *मैत्री*

  मैत्रीला नसते सीमा
  नसते कुठली उपमा
  मैत्री म्हणजे दोन जीवांची
   प्रेमाची सुंदर प्रतिमा.

  मैत्रीत नसतो हिशेब
  नसतो कोणता व्यवहार
 एकमेकांसाठी सदैव तत्पर
 असा हा प्रेमाचा व्यापार.

मनातील गुपिते उघडायला
असते हक्काची  जागा
 सुख असो वा दुःख 
 जोडणारा हा धागा.

मनातील खास कप्पा
असतो मैत्रीला बहाल
नातेसुद्धा फिके पडते
हीच मैत्रीची कमाल.

मैत्री कधी होत नाही
जाणूनबुजून वा ठरवून
आपोआप जुळतात मने
सारे गुणदोष विसरून.

ज्याला मैत्री लाभली
भाग्यवान तो खरा
 समाधानी आयुष्याचा
 मैत्री हाच सहारा.....

*सौ.रूपाली गोजवडकर*
जि.प.कें.प्रा.शा. वाजेगाव नांदेड .


[03/08, 2:13 PM] Ajay Shivkar, पनवेल: *नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

राग  न धरता मनी न कसला,
चुक आपली कबुल करता,
होता तसा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

आले कितीही संकट चालून 
खंबीरपणे पाठीराहुन,
साथ देणारा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

जात-भेद उच-निच न मानता,
गर्दीतुन जो आपला जाणे
हक्काचा माणूस हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

दिसेल चेहरा हसरा कितीही 
उरीचे दुःख जाणे झडकरी,
असा मनकवडा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

गरीब श्रीमतीचा भेद नसावा 
मनात वाहे  निर्मळ झरा 
कृष्णा संगे सुदामा हवा...
*नसावा लुच्चा,असावा सच्चा ,मित्र पाहिजे असा*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४


[03/08, 2:25 PM] शुभदा दीक्षित: दिवसा मागून दिवस गेले वर्षामागून वर्षे 
मैत्रीस ठाऊक नाही किती जाहली वर्षे 
                  अंतरीचे उकलले धागे झालो एकमेकीत दंग 
                  पिकणाऱ्या फळास जैसा चढतो वेगळाच रंग 
सुखद ओल्या आठवणींची नेहमीच येते सय 
हिंदोळा जातो उंच माझा विसरून जाते वय 
                  मैत्रीत कसला स्वार्थ कसले हेवेदावे 
                  कठीण प्रसंगी दिले हात हातात प्रेमभावे  
पैसा मान मरातब नाही मैत्रीच्या आड 
निर्झारासम निखळ मैत्रीत झाली वाढ

                  कढ मनाचे उतू जाती जगी एक ठिकाण 

                  हलके फुलके मग वाटे हीच मैत्रीची जाण 

चेष्टा मस्करी गप्पा टप्पा सुरु किलबिलाट 

हसणे खिदळणे जणू नदीचा खळखळाट  

                 मैत्री शब्दात सामावे जिव्हाळा अन आर्द्रत
                 जशी दुधावरल्या दाट सायीची स्निग्धता 

मैत्रीचे अतूट बंधन देईल आम्हा बळ 
असाच आमुच्या मैत्रीचा पसरु दे परिमळ         


शुभदा दीक्षित 
पुणे


[03/08, 2:56 PM] महेंद्र संगावार: ........मैत्री......

गेले मी शाळेत नव्हते
 जुनी साथी
खुप शोधले त्यांना पण 
नव्हती जुनी नाती,

बोलावं वाटलं की आता लावते त्यांना फोन,
पण मनात एकच प्रश्न,,
आता माझा बेस्ट friend कोण..,

पाहता पाहता कसे गेले आपले वर्षे
अजूनही आठवतात मित्रानो तुम्हचे एक एक स्पर्श,,

सर्व जण मिळून खुप करायची मस्ती
दुकानात गेल की वस्तू करायची सस्ती,,

खुप दिवस झाले आणि ऐकले तुम्हचे जोक्स व गाणी 
ऐकण्यास खूप ताडपतात माझ्या दोनी कानी,,

आता आठवल्या तुम्ही की, आठवतात तुम्हचे वाणी,,
 मग नकळतच पडतात माझ्या डोळ्यातुन पाणी...!!
           
           Thank uu......!!

कवी-  महेंद्र संगावार,
         सोनापुर, गडचिरोली


[03/08, 3:26 PM] मेघा अनिल पाटील: मैत्री
          खरं पाहिले तर मैत्रीचा तसा
         खास फक्त एकच दिवस नसतो!
          कारण मैत्रीमुळेच प्रत्येक क्षण
           प्रत्येक दिवस हा खास असतो!
मित्र म्हणजे आत्मा
मैत्री म्हणजे परमात्मा !
मित्र म्हणजे कर्ण
मैत्री म्हणजे सूर्य!
           मित्र म्हणजे हिमालय
           मैत्री म्हणजे शिवालय!
           मित्र म्हणजे छाया
           मैत्री म्हणजे माया!
मित्र म्हणजे आधार
मैत्री म्हणजे विश्वास!
 मित्र म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे अनमोल साथ!
      मैत्रीच्या गाण्याचे शब्द 
      असतात खूप भाऊक !
      आणि स्वरांनासुद्धा 
      मैत्री सोडण नसतं ठाऊक!
मैत्री कधी संपत नाही, 
नाते कधी तुटत नाही !
जोडली जातात माणसे, 
मित्र कधी साथ सोडत नाही !
    कारण मित्र म्हणजे खात्री
     मैत्री म्हणजे पावती !
 
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com


[03/08, 3:39 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: मैत्री असावी अशी
नको असावी भिती
सर्वकाही शेअर करावे
नकोच काही बाकी

नको असो रक्ताची नाती
मैत्री साठी जीवन अपुले
आपण मित्रांसाठी
मैत्री असावी अशी

सुख असो वा दुःख असो
मी आहे तुझ्या सांगाती
म्हणे घाबरू कधीही नको
मैत्री असावी अशी

 जे होईल ते पाहून घेऊ
मिळून सारे निपटून घेऊ
चिंता शब्द येणार नाही
मैत्री असावी अशी

असेच मित्र सदा मिळु दे
माझे आयुष्य त्याला लाभु दे
चिंता दुःख सर्व मला दे
मैत्री असावी अशी

 जीवनात एक मित्र असावा
मनमोकळं करता यावा
सुखदुःखात साथ असावी
मैत्री असावी अशी

 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686


[03/08, 3:40 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *मैत्री असावी अशी*
            दि. 3 आगस्ट 2020

मैत्री असावी अशी
नको असावी भिती
सर्वकाही शेअर करावे
नकोच काही बाकी

नको असो रक्ताची नाती
मैत्री साठी जीवन अपुले
आपण मित्रांसाठी
मैत्री असावी अशी

सुख असो वा दुःख असो
मी आहे तुझ्या सांगाती
म्हणे घाबरू कधीही नको
मैत्री असावी अशी

 जे होईल ते पाहून घेऊ
मिळून सारे निपटून घेऊ
चिंता शब्द येणार नाही
मैत्री असावी अशी

असेच मित्र सदा मिळु दे
माझे आयुष्य त्याला लाभु दे
चिंता दुःख सर्व मला दे
मैत्री असावी अशी

 जीवनात एक मित्र असावा
मनमोकळं करता यावा
सुखदुःखात साथ असावी
मैत्री असावी अशी

 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686


[03/08, 3:50 PM] जी एस पाटील: " मैत्री "
मैत्री हे रक्ता विना नाते
रक्ताचे पेक्षा छान नाते
जातपातभेदविना नाते
गरीब श्रीमंत विना नाते
लहानपणा पासून नाते
शेवट पर्यंत कायम नाते
मदत नेहमी देणारे नाते
एकमेकाला तारक नाते
मित्रा विना मित्र अपुरा
मित्रा विना नाद अपुरा
मित्रा विना छंद अपुरा
मित्रा विना भाव अपुरा
मित्रच संकटात सखा
मित्र अडचणीत सखा
मित्र असतो पाठी राखा
मैत्री सर्वानीअमर राखा
  कवि-जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.


[03/08, 4:06 PM] वर्षा सागदेव: शाळेच्या, कॉलेजच्या बॅचच्या सुवर्ण आणि हीरक महोत्सवात
जेव्हा साठी-पासष्ठी उलटलेले सारे मित्र जेव्हा भेटतात तेव्हा 
त्यांच्या मैत्रीला ही नवा रंग चढतो
ती जणू मित्रांची पंढरीच असते आणि प्रत्येक मित्र वारकरीच असतो. अशा  सोहळ्याचे वर्णन.
 *मैत्रीची वारी*
भेटताच जूने मित्र, 
मित्र होतात वारकरी ,
अन् रंगते ,मैत्रीचे रिंगण,
मनाच्या  पंढरीत........

होतो दशकांचा प्रवास,
अवघ्या एका क्षणात,
मैत्रीचा अलवार पावा,
घुमतो प्राणा प्राणात ......

अवसेची होते पूनव ,
मैत्रीच्या चांदण्यात न्हाऊन,
शब्दा विण संवादे मित्र,
मैत्री पाझरते डोळ्यातून.....

भेटताच जुन्या मैत्रीणी,
फड रंगतो गप्पांचा खास, 
आसमंतात दरवळतो ,
मैत्रीचा चंदनी सुवास. ......

मैत्रीच्या गळा भेटी चा,
हळवा क्षण इवलासा, 
पापण्यांतून ओघळतो,
अलगदपणे तळ हाती....

वर्ष सरते ; ऋतू बदलते ;
मैत्रीची विण धट्ट होत जाते,
साठलेल्या ह्या आठवणींचे ;
टिपूर चांदणे मनात अवतरते....

पुन्हा भेट होइल - न-होइल, 
मैत्री चा हा शाश्वत विश्वास,
श्वासा श्वासातून मूकेपणी,
असाच निरंतर वाहत राहील. ... 

डाॅ.वर्षा सगदेव


[03/08, 4:17 PM] महेंद्र सोनवने: *मैत्री*

तुला पाहुन कितीही काळानंतर , 
मनात फुलते वसंत , 
हेच माझ्या मैत्रीच्या नात्यात , 
आहे मला पसंत ॥ 

अगदी घरच्या सारखं तुझं , 
मनात माझ्या वावरणं असतं , 
मी घसरतांना मित्रा तुझं , 
सहज मला सावरणं असतं || 

तुझ्या मनाला माझ्या मनाचा , 
रस्ता छान कळू दे , 
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही , 
ओंजळ पूर्ण भरु दे || 

मित्रत्वाचं चांदणं जेव्हा , 
मनाच्या आभाळात उतरतं , 
तेव्हा त्याच्यासाठी जगायला,
मन आपलं आतुरतं ॥ 

तुझी मैत्री व्यक्त करणं ,
रोज मला जमत नाही , 
तरीही माझे मन , 
खरचं तुझ्याविना रमत नाही ॥ 

नसावी मैत्री मुसळधार पावसासारखी , 
बरसून थांबणारी , 
असावी रिमझिम सरीसारखी , 
मनाला सुखद गारवा देणारी || 

बंध रेशमाचे माझे , 
असेच जुळून राहू देत , 
तुझे डोळे माझ्या नयनी , 
मैत्री सतत पाहू देत ॥

*महेन्द्र सोनेवाने,"यशोमन"*
*गोंदिया*


[03/08, 4:18 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य सेवक समूह आयोजित काव्य उपक्रम "

" मैत्री "

जगी श्रेष्ठ धागा 
एकच मैत्रीचा
विश्वसनीय नि
मनस्वी खात्रीचा 

मिळतो मनाला
येथेच आधार 
संकष्टी धावून 
करतो उद्धार 

नसे गर्व कधी
धन श्रीमंतीचा
असे मोह फक्त 
सहृदयी स्नेहाचा

गळालेल्या मनी
देई हा उभारी
कृष्ण साक्षात हा
सुदाम्यास तारी

हृदयाचा होऊन 
धडके स्पंदन 
प्रत्यक्ष भेटीत 
आनंदे लोचन

जरीही असला
दूरवर गावा
सुख दुःखासाठी
घेई क्षणी धावा

मैत्री ही असते 
दुर्मिळच भेट 
जी होऊन जाते
काळजाचा देठ

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376


[03/08, 4:27 PM] Rajendra Bansod
Gondia: *मैत्री तुझी माझी*

मैत्री म्हणजे...
      बागेतील फुलांचा ताटवा
     सुंगध दरवडून गंधित करणारा
     फुलपाखरांचे  नीत गोंजारत
      आयुष्याची गीत  गाणारा  

मैत्री म्हणजे....
      माझे अस्तित्व तुझ्यात पाहणे
      तुझी प्रतिबिंब माझ्यात पडणे
       सुखदुःखाची वाटणी करीत
        जीवनात मार्गक्रमण करणे

मैत्री म्हणजे...
  नात्यातील विणलेली गहिरी विन
   करमेणा  भेटल्यावाचून 
   वाट पाहत कधी झुरत बसने
  आल्यावर प्रेम व्यक्त करणे रुसून

मैत्री म्हणजे...
    आंबे,चिंचा ,बोरीची गोडी
     रानातील बेफाम फिरणं
  नावाडी बनून  चालवावी  होडी
     जीवनातील तराने गात   जिणं

मैत्री म्हणजे....
 संपदा ही सर्वांहून ठरते श्रेष्ठ मित्रवाचून मानव जणू हा रंक
संसारातील  पुढ्यात उभी ही कष्ट
 जग दाखविनारे अनमोल  हे अंक

मैत्री म्हणजे...
 जगण्याची  शिकविते खरी  रीत
रक्ताच्या नात्यातील नसतात बंधने
 जीवापाड हृदयाने जोडते प्रित
आयुष्य वेलीवरती हास्याचे फुलने
 
 
       *राजेन्द्र धर्मदास बन्सोड*
     *आमगाव, जिल्हा गोंदिया*
                            *8275290252*


[03/08, 4:44 PM] अमित बडगे: *विषय:- मैत्री*
*शीर्षक:-उल्लेख मित्रांचा*

कसा करू अनुवाद लागला 
नाद उभरत्या चित्राचा
कसा लिहू मी लेख करू
 उल्लेख प्रत्येक मित्राचा

प्रत्येकाचा रंग वेगळा 
बगळा कुणी, कुणी कावळा
दोघांची जो घेतो बाजू 
असतो तो एक मित्र सावळा

क्षणभर रडतात मनभर 
हसतात बालपणीच्या रणांगणात
 वाटते कधी थांबून जावं 
पण थांबत नाही वेळ जगात

कसा करू संवाद कळेना
 वाद मला या चरित्रांचा
कसा लिहू मी लेख 
करू उल्लेख प्रत्येक मित्राचा

खरा मित्र, खोटा मित्र
 प्रत्येक मित्र कळतोच कळतो
खरा मित्र सोबत असतो
 खोटा तोच वेळेवर पळतो

 कळते सारी दुनियादारी
 यारी असते सगळ्यात भारी
प्रेम आहे प्रत्येकाला
 प्रेमात पडली दुनिया सारी 

कसा मी बनवू चित्र विसरलो
 सूत्र आता या वीचित्रांचा
कसा लिहू मी लेख
करू उल्लेख प्रत्येक मित्राचा

-अमित प्र. बडगे, नागपूर


[03/08, 4:49 PM] Snehlata: साहित्य सेवक.. दि. 03.08.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार...अष्टाक्षरी
विषय.. मैत्री
शीर्षक..अशी ही मैत्री 

हवा नितळ नितांत
सहवास स्नेहगंध
मज मिळे तुजपाशी
प्रेम वेडा तो सुगंध......1

माया,मोह,सवड ना
बांधी मैत्रीची ही नाळ
नाही विचार जगाचा
अजुनही तान्हेबाळ.....2

सागराची लाट येई
किना-याशी स्पर्शी बाई
कधी सवड मिळाली 
मैत्री व्यक्त कर सई......3

अशा अबोल मैत्रीचे
भावविश्व ते डोळ्यात
नभ धरणी भेटेना
पाश गुंतले ह्रदयात....4

पारिजात सडा दारी
पृथेवर हिरवळं
तुझ्या माझ्या गं मैत्रीचा
गंध किती दरवळं........5
*******************
स्नेहलता कुलथे बीड 🌹


[03/08, 4:50 PM] Shailendra Adbalwad: .............साहित्य सेवक...........
___उपक्रम : दररोज एक कविता___

""""""""""""" मैत्री"""""""""""""
              =====

मैत्री म्हणजे परिचयातून जुळून  विश्वास जपणं
सदैव सुखात साथ मागून दु:खसंकटी साथ देणं

मैत्री म्हणजे स्मरणात जिवाभावाचा सखा येणं
न मागता सर्वस्वाने  समोरच्याला भरभरून देणं

मैत्री असावी जिवाभावाची प्रसंगी जीव देण्याची
सुखदु:खी एक दुस-याला खांदा देऊन जगण्याची

जन्मोजन्मी न तुटणारी उमाळ्याने भेट घेण्याची
हृदयाचा हृदयापासून मैत्रीचा परिमळ हुंगण्याची

मैत्री असावी पवित्र शुद्ध तीर्थ गंगाजलाहून निर्मळ
निर्भेळ निष्पाप प्रेमळ धाडसी नि  थोडी अवखळ

सुगंधी फुलासम आत्मभावना असावी मृदु कोमल
मैत्रित सदैव दरवळावा मंगल विवेकाचा परिमळ

मैत्री असावी सूर्यासारखी तेजस्वी सात्विक प्रखर
चंद्रासारखी शीतल शांंत हवीशी प्रकाशमय मधुर

पृथ्वीसम अभंग अढळ उपकारी क्षमाशील उदार
मैत्री असावी समुद्र वायूसम भक्कम बेडर झुंजार


आडबलवाड पाडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975


[03/08, 4:55 PM] सुनीता आवंडकर: मैत्री 
प्रा.सुनिता आवंडकर बारी नाशिक .
मैत्री !!!!!
 जेथे नकळत जुळतात ऋणानुबंध
 जेथे दरवळतो स्नेहाचा सुगंध ....

जेथे नाही बंधन वयाचे 
जेथे नाही कुठलेच हेवेदावे ....

जेथे आधी होतो विचार मैत्रीचा 

जेथे असतो त्याग आणि भाव समर्पणाचा ...

चंदेरी दुनियेतील मैत्री बनते जेव्हा स्वार्थी 
लागते गालबोट तेव्हा आपल्या संस्कृतीस ...

मैत्री केली श्रीकृष्णाने सुदामाशी  

मैत्री केली कर्णाने दुर्योधनाशी...

मैत्रीत नसावी गरीब श्रीमंती ची दरी ....
मैत्रीत विसावतील सुखे, पळतील दुःखे सारी....


[03/08, 5:18 PM] Pradip Patil, Ganpur: मैत्री 

स्न्हेह बंध नात्याचं 
सखा सोबती विश्वासाचा 
सुख दुःख साथीचा 
अवीट मैत्री गोडीचा.... 

भाव भावना सोबतीचा 
देत जीवाला जीव 
मित्र प्राण पणाचा 
सोबती आहे सजीव....

लाजवणारा रक्ताच्या नात्याला 
मित्र म्हणतात त्याला 
भाकरी अर्धी वाटणारा 
तोच जागतो मैत्रीला.... 

 नसे गरीब श्रीमंती 
जीव  संग एकीचा 
मान सन्मान दोघांचा 
त्यात सुख  मानण्याचा... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव. 
मो. 9922239055©️®️

[03/08, 5:58 PM] विजय वाघ: साहित्य सेवक समूह


मैत्री

मैत्रीच पान असत
गुलाबासारख छान असत
आयुष्यभराच वान असत
सुखदुःखाच दान असत    //१//

जीवापलीकडच नात
म्हणजे मैत्री असते
ती जपून ठेवली तर
आयुष्यभराची जंत्री असते //२//

जीवाभावाची नाती
म्हणजे मैत्री असते
ती हद्याच्या कप्यात
पक्की असते                 //३//

मैत्रीचा सुगंध
निखळपणे दरवळतो
भूवर हे नात
चांगलेच रंगत आणतो      //४//

मैत्रीत कुठलेही
बंधन नसते
सर्वकाही यात
मंगल असते                   //५//

मैत्री नावाचे
एक भांडवल असते
त्याच्या भरवश्यावर हे
नात सुमधूर होत असते      //६//


विजय वाघ
यवतमाळ
७७६८०७११७६


[03/08, 6:04 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्य सेवक समूह*
*दि.03/08/2020*

          *मैत्री*
मित्रता स्विकारावे मानवावे
दिले आम्हाला वरदान
कृष्ण सुदामाचे प्रेम 
सा-या जगतासाठी बनले महान  ।१। 

        कृष्णास आवडे सूदामा
         ज्यात आहे प्रेम विश्वास
         मैत्रीचा धागा करतो निशब्द
       जसे अतर्मनात बसतो श्वास  ।२। 

 कितीही दुःख असो
रिमझिम पावसाच्या  सरी
मित्राच्या संगतीने प्रेमाने
बरसतात आम्हावरी   ।३। 

माझ्या डोळ्यात तुझे चित्र 
गारवा देणारी सुखद क्षणी
जुळून राहू दे  साथ मैत्रीची
 स्मरणात राही गोड आठवणी ।४। 

मैत्रीत आहे प्रेम जिव्हाळा
तिथेच असतो हट्ट नी रूसवा
आठवतात बालपणीच्या गोष्टी  
 सावरण्यासाठी साथ तुझा असावा ।५ । 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया* 
      *(9420516306 )*

असा असावा मित्र

मित्र असावा सूर्यासम
प्रखर अन् तेजस्वी
मित्र असावा प्रभेसम
रम्य अन् ओजस्वी

मित्र असावा नदीसम
निर्मळ अन् प्रगाढ
मित्र असावा मेरुसम
अचल अन् दृढ


मित्र असावा काळासम
सामावून घेणारा
मित्र असावा घड्याळासम
पुढेपुढे जाणारा

मित्र असावा वृक्षासम
आधारवड असणारा
मित्र असावा पक्ष्यासम
गगनभरारी घेणारा

मित्र असावा शांतीसम
अनंतात रमणारा
मित्र असावा कांतिसम
तेजोवलय आणणारा

मित्र असावा मित्रासम
देणारा अन् घेणारा
मित्र असावा मित्रासम
सर्वस्व असणारा

©____🖊️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
बार्‍हाळी,ता.मुखेड.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...