[01/08, 10:41 AM] Nagorao Yeotikar: ।। आला श्रावण ।।
आषाढ संपला की येतो श्रावण
आपल्या संगे घेऊन अनेक सण
पहिल्यांदा येतो सण नागपंचमी
नागराजाची पूजा करतो आम्ही
पौर्णिमेला येतो सण रक्षाबंधनाचा
बहीण भावाला बांधे धागा प्रेमाचा
यालाच म्हणती नारळी पौर्णिमा
कोळी बांधव सागरी होती जमा
अष्टमीला कृष्ण जन्माचा सोहळा
दहीहंडीने साजरा होई गोपाळकाला
महिन्याच्या शेवटी येतो बैलपोळा
रानातले बैल गावात होतात गोळा
असा हा श्रावण चाले तीस दिन
संपतो मास पोथी पुराण वाचून
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769
[01/08, 10:41 AM] सौ भारती तिडके: *कविता **
श्रावण
श्रावण बहरूनी आला
आनंदित झाले मन
थुईथुई मयूर नाचते
बावरले माझे मान
सणांची घेऊनी पर्वणी
आला माझा श्रावण
शेतकरीही आनंदी
धरती झाली पावन
नदी-नाले खळाळती
रानी पारवा घुमतो
पाहून सृष्टीचे सौंदर्य
मनी श्रावण फुलतो
क्षणात सरसर करी
मधेच उन्हाची कडी
इंद्रधनु अंबरात दाटे
माझिया मनी या भिडी
हिरवी राने ,सुगंधी फुले
श्रावण महिन्यात मन हे डोले
श्रावण देतो रेशीम स्पर्श
श्रावण म्हणजे हर्षच हर्ष.
सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया.
[01/08, 10:42 AM] Bharti Sawant: विषय - श्रावण
शीर्षक - श्रावणधारा
निळंशार आभाळ हे
माझ्या दारात फाटलं
लेक निघाली सासरी
आसू नयनात दाटलं
श्रावणाच्या चिंबसरी
ओघळती पागोळ्या
रंगसांगातीनं न्हाल्या
अंगणातील रांगोळ्या
करूनि मुक्त बरसात
पडलेय लख्ख ऊन
श्रावणसरींना झेलून
धूके पसार ते पिऊन
काळ्या मेघांनी साऱ्या
केली आकाशात दाटी
सौदामिनी कडाडली
पाखरे शहारली घरटी
काळ्या मेघांच्या रेघा
ओघळल्यात धरेवरी
पाखरेही झाली चिंब
पंखही फडफड करी
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835
[01/08, 10:43 AM] वर्षा सागदेव: श्रावणोत्सव
श्रावणोत्सवाची नांदी होता
निरभ्र आकाश झाले सावळे,
श्रावणाच्या स्वागतासाठी
नोबत नगारे वाजू लागले ,
श्रावण सख्याला भेटावया,
वसुंधरेचे मन अधीर झाले,
सावळे मेघ रिमझिम बरसले,
धरणीच्या काळजात रुजले,
श्रावणी मेघ सिंहा सम गरजले,
पावसाच्या धारा धोधो कोसळे,
सौदामिनीचे रिंगण कडाडले,
सारे नभांगण उजळून निघाले.
डोंगरावरून खळाळणारे झरे,
हिरव्या वनात डोलणारी झाडे,
निसर्गाच्या हिरवाईने मंत्र मुग्ध,
मन माझे सख्यासाठी आतुरले.
ओल्या ढगांच्या धुंद गंधाने
प्रेमाची नशा, अशी काही चढे,
श्यामल मेघात लपला,शुक्रतारा,
इंद्रधनुष्य घेऊन अनंग अवतरे.
डॉ.वर्षा सगदेव
[01/08, 10:43 AM] senkude: कविता - श्रावणसरी
येती श्रावणसरी श्रावणसरी
ऊन-पावसाचा खेळ खेळती
प्रतिबिंब दिसे इंद्रधनुचे नभात
सप्तरंगी कमान घेऊन संगती
येती श्रावणसरी श्रावणसरी
ओलीचिंब होई रानमाती
नदी-नाले,तळे तुडुंब भरती
गीत समृद्धीचं मग गाती
येती श्रावणसरी श्रावणसरी
सासुरवाशीण वाट पाहती
झोके बांधू झाडावरती
नागोबाच गाणं गाती
येती श्रावणसरी श्रावणसरी
मन नाचे माझे मोरा परी
बहिण भावास बांधूनी राखी
सण रक्षाबंधनाचा साजरा करी
येती श्रावणसरी श्रावणसरी
हर्ष तनमनी माझ्या दाटती
ओल्या काळजात धून वाजती
सौदामिनी बिन वाजवती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे
नांदेड.
[01/08, 10:50 AM] Rajendra Bansod
Gondia: *चिंबधारा श्रावणातील*
श्रावणाच्या चिंब धारा
बरसुनी गंधित केलं आज
सरी गाती बरसुनी, रूप न्यारा
सृष्टी सजली,लेवूनी हिरवा साज|१|
नटली बागे ,फुलली फुले
रानीवनि पक्षी, प्राणी घुमती गातांना
आनंद डोही बागळती मुले
होडी घेऊनी ,भिजती धुंद नाचतांना|२|
हर्षित गंधित मंद धारा
बागा फुलवी शेतमळ्यांना
धो-धो बरसित गाती धारा
दुथडी भरुनी नाले ,मिळती नद्यांना|३|
नवचैतन्य या जीर्ण जीवांचे
श्रावनांनी कसे बहरूनी गेले
स्वप्न उरातील गर्द नैराश्य
श्रावणमासी हर्षित न्हाले|४|
राजेंद्र धर्मदास बन्सोड
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा
पंचायत समिती गोरेगाव
जिल्हा गोंदिया
मो.न.८२७५२९०२५२
[01/08, 10:56 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्यसेवक समूह*
*कविता लेखन*
*विषय :- श्रावण*
-------------------------------------------
*श्रावण*
श्रावणात हा निसर्ग नटला ।
नेसूनी आला हिरवा शालू ॥
रंगछटा पसरवित आला ,
निसर्गाला आम्ही दंडवंत घालू ।।
सजून थटून सृष्टि सारी ,
हिरवीगार दिसते ती न्यारी ।
बरसूनी खेळती श्रावण धारा ,
येतात पावसाच्या सरी ॥
लाजऱ्या निसर्गास पाहूनी ,
धराही हसती लाजूनी ।
नको जाऊ असा सोडूनी ,
वाट पाहे तुझी सजनी ॥
भेट घडविण्या निसर्गाची ,
अंगावर बरसती श्रावण धारा ।
जिकडे तिकडे पाणीच पाणी ,
हास्य मोहक श्रावण रंग बावरा ॥
श्रावणात हर्ष मनाशी ,
हिरवळ दाटे चोहीकडे ।
कोकीळा गोड गाणी गाते ,
पडती दवबिंदूचे सडे ।।
*सौ.यशोधरा सोनेवाने*
*गोंदिया*
*दिनांक : ०१/०८/२०२०*
*मो.9420516306*
[01/08, 10:59 AM] महेंद्र सोनवने: *श्रावण*
रिमझीम रिमझीम श्रावणात या ,
चिंब भिजून सोबत राहावे ।
विसरुन सारे देहभान मी ,
स्पंदनात रोमांच असावे ।।
अंतर मिटूनी श्वासातील हे ,
अंगावर शहारे फुलावे ।
नजरेस तुझ्या मी हेरुन घेऊन ,
काळीज माझे घायाळ करावे ॥
शरीरावर कोवळी ऊन ही ,
अल्हड वारा स्पर्शनी जावे ।
पाने फुले बहरुन येऊनी ,
इंद्रधनुचे रंग खुलावे ॥
आला श्रावण रंग बावरा ,
सांगे सर्वाना ही ढिंढोरा ।
पावसाच्या सरीत त्याच्या ,
मोर नाचतो फुलुन पिसारा ||
श्रावणाच्या पावसाने कमाल केली ,
धो धो कोसळून धमाल केली ।
उसंत न घेता क्षणभराचीही ,
सर्वाना चिंब भिजून गेली ||
--------------------
*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "*
*मो. 9421802067*
*गोंदिया*
[01/08, 11:12 AM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " श्रावण "
सर्वांनाच हवाहवासा
असा लाडका श्रावण
धार्मिकता रूजवून हा
करी अंर्तमनास पावन
लेकीबाळींचा आनंद पर्व
येई थाटात मंगळागौरी
नवीनवेली लाजरी बुजरी
येई माहेरा ही नवनवरी
पंचपक्वानांची रेलचेल न्यारी
होई श्री गणेश चतुर्थीला
धावती शिवभक्त सोमवारी
बेल वाहण्या शिवशंभूला
वारूळाच्या नागदेवाचे
घेती दर्शन नागपंचमीला
जीव शिणून सासूरवाशीण
धावे माहेरी रक्षाबंधनाला
कृष्णजन्माष्टमी येते घेऊन
दहीहंडी नि गोपालकाला
लगबगीनं जाती तयारीत
स्वातंत्र्याच्या ध्वजादिनाला
झुल झुलवीत ऐटीत येई
बैलराजाचा उत्सव पोळा
होता सांगता या मासाची
निरोपाने होई ओला डोळा
✍️ अर्चना गरूड
[01/08, 11:12 AM] शुभदा दीक्षित: श्रावण
जिथे श्याम नीळा तिथे प्रेम धारा
अशा श्रावणाच्या सुखाच्या गं धारा
किती रंग रंगात रंगूनि जावे
मनी आनंदाच्या गं झूली झुलावे
अनोखी गं खेळी उन्हा पावसाची
नभी गुंफली माळ इंद्रधनू ची
अशा रेशमी ह्या लडी पावसाच्या
सुगंधी कुप्या सांडिल्या चंपकाच्या
जरी काठ पाचू गं लेवूनि शेला
सृष्टी लाजली पाहुनी सावळ्याला
वनी गूंजला वेणु त्या श्रीहरीचा
करी ऊर बेधुंद ह्या राधिकेचा
अशी चिंब ओली कुपी आठवांची
सुखावून जाई निशा श्रावणाची
सुखावे सणाला तनाला मनाला
नमावे सदा रे गुरू श्रावणाला
शुभदा दीक्षित
[01/08, 11:13 AM] विजय वाघ: साहित्य सेवक
कविता लेखन
विषय--- श्रावणमास
श्रावण आला श्रावण आला
मनात माझ्या आनंद झाला//धृ//
श्रावण मास पवित्र मास
चाले भक्तांचा सद्भावाने उपवास//१//
उगवत्या सूर्याने मन हर्षून जाते
इंद्रधनुष्याच्या रंगाने मन स्पर्शून जाते //२//
क्षणात ऊन पावसाच्या सरी
श्रावण मासातल्या आनंदाचे पर्व घरी //३//
अलगद आल्या श्रावणाच्या सरी
आनंदाचे पर्व आहे श्रावणात जरी//४//
इवल्याश्या तृणावर शोभून दिसे कळी
सुहासिनीच्या हास्याने खुले गालावरची लाली//५//
सूर्याच्या उगवण्याने पहाटेची सुरवात झाली
श्रावणमासी उत्सवाने बहरून गेली//६//
श्रावणमासात सुवासिनी सजल्या
श्रावण झुल्यात झोके घेण्यात दंगल्या//७//
विजय वाघ
यवतमाळ
७७६८०७११७६
[01/08, 11:13 AM] प्रिती दबडे: *श्रावण*
(दोन शब्दांची कविता)
श्रावणात पसरे
हवेत गारवा
निसर्ग पांघरे
शालू हिरवा
सप्तरंगी इंद्रधनुष्य
देई दर्शन
हिरव्या छटांची
होई उधळण
व्रतवैकल्यांची होते
सुंदर सुरवात
उत्साह वाटे
साऱ्या कामात
ऊनपावसाचा चाले
खट्याळ खेळ
पक्षी घालती
उडतांना मेळ
गुरेढोरे चरती
होऊनी तृप्त
दृश्य करी
प्रसन्न चित्त
बहरलेली फुलं
पसरलेला सुवास
डोलणारे गवत
शेतकऱ्याची आस
सौ.प्रिती दबडे
पुणे
९३२६८२२९९८
[01/08, 11:24 AM] Manik Nagave: श्रावण
आला आला श्रावण मास ,
हर्ष मनी दाटुन आला .
उनसावल्यांच्या खेळात ,
शिण सगळा निघून गेला .
धरतीमाता तृप्त झाली ,
तगमग जीवाची शांत झाली.
श्रावणधारांच्या सरीमध्ये ,
अंगअंग न्हाऊन निघाली .
बहरली सृष्टी चहुबाजूने ,
पोपटी ,हिरवा रंग पसरला.
नयनमनोहर दृष्य पाहता ,
मनमंदिरी आनंद जाहला .
ऊनसावल्यांच्या खेळामध्ये ,
सानथोर हे हरवून गेले .
पृथ्वीवरच्या कणाकणातून ,
सोनपिवळे रंग बरसले .
श्रावणमास असा बहरला ,
फुलपानांची नक्षी सजली.
निसर्गमाता हासुन बोले ,
मीच तुमची मायमाऊली .
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
[01/08, 11:30 AM] Sujata Jadhav: श्रावण
आला आला श्रावण
घेऊनी पावसाच्या सरी
तप्त झालेली वसुंधरा
मोकळा श्वास घेते उरी
नववधू समान सृष्टी नटली
श्रावण हिरवाईने नाचतो
आसमंती खग स्वछंदी
मध्येच इंद्रधनू डोकावतो
डोंगरकपारी वाहे पाणी
ओढ पळण्याची भुईवरी
नद्या,ओढे सुखावले
पाणी खळखळाट करी
सृष्टीची सारी किमया
ऊन पावसाचा खेळ
सरी बरसण्यास नसे
ठराविक ती वेळ
चौफेर रानफुले डोकावती
सृष्टी पेलवते सारा संभार
मास सुरू सण समारंभाचे
मानू या सृष्टीचे आभार
सुजाता जाधव
नवी मुंबई
[01/08, 11:37 AM] Manjush Deshamukh: श्रावण
श्रावणाचा महिमा
मनाचा नाचे मोर
जिकडे पाहावे तिकडे
हिरवळ चहू ओर
कोवळे ते ऊन पडे
सोनेरी रुपडे त्याचे
जशी रूपेरी किनार
काळ्या ढगाला शोभे
वसुंधरा ती शोभे
नाजुक कोवळी नार
भिजुन चिंब जाई
जेव्हा सतत होई धार
हर्षित बळी राजा
शेत ही डौलदार
सर्वाच्या पदरी नांदो
सुख,शांति समाधान
सौ.मंजुषा देशमुख,
अमरावती
[01/08, 11:56 AM] Mina Khond Hyadrabad: श्रावण गंध
आला आला श्रावण....फुललं गोरीच मन
हिरवी हिरवी धरती....कांतीवर पिवळेपण
माहेरचा निरोप.... घेऊनी येई श्रावण
मायेच्या ममतेत....साजरे होती सण
फुलाफुलांची गौर ....आली गुंफून अंगणी
सख्या खेळती फुगडी....गाती गोफ गाणी
सोमवार श्रावण...,उपवासाच व्रत
सदाशिवाच पूजन....मन राही शुचिर्भूत
नारळाची महती....पोर्णिमा श्रावण
भावाच्या मनगटी...प्रेमाचे रक्षाबंधन.
मंगवागौर मंगलदेवी....मंगळवारी श्रावण
सखीसह पूजन....सौभाग्यवर्धन.
जिवती पूजन...शुक्रवार श्रावण
मनोमनी माता वंदी...कर बाळाच रक्षण.
नागपंचमीचा सण...पोळा श्रावणाखेरी
प्राण्यांचे पूजन....भूतदया अंतरी.
श्रावणाच्या झुल्यावर...हर्षोल्हासित मन
झोक्यासरशी एकेका....आठवे ग साजण
श्रावणाचा ओलावा ...साठे दोन्ही डोळ्यात
धरेचा मृद् गंध....मनाच्या गाभार्यात.
मीना खोंड
हैद्राबाद
[01/08, 12:45 PM] Gauri Shirsat: मनभावन श्रावण
आला श्रावण महिना
गोड शिरशिरी तनी,
तुझ्या आठवांची सख्या
नक्षी उमटते मनी...
तुझ्या प्रेमाचा वर्षाव
जशा श्रावणाच्या सरी,
पसरतो दरवळ
मंद धुंद माझ्या उरी...
ऊन पावसाचा खेळ
मज मनाला भावतो,
तुझ्या मिठीत साजणा
जीव माझा बहरतो...
सांज छटा गुलबक्षी
श्रावणाची मनोहर,
तुझ्या ओलेत्या स्पर्शाची
लाली चढे गालावर...
धरा पालटते रूप
शेला नवा पांघरून,
नाते तुझे माझे तसे
जाते पुन्हा मोहरून...
©सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई;
[01/08, 1:04 PM] Hanmant Padwal: *"श्रावणझुला"*
रिमझिम बरसत श्रावण आला
उंच फांदीला,झुला बांधीला.....!!
झुल्याला माझ्या वेलीचा दोर
फुलवूनी पिसारा नाचतो मोर
खळखळ मंजुळ वाहती झरे
किलबील वनी करी पाखरे
ढगाआड रविराज लपला......!!
रंगली मेंदी माझ्या हाती
सणाला आल्या सख्या सोबती
साठले अंतरी नवे गुज
कानामधे करी कुजबूज
झुल्यावर दिसतो साजन मोपला.....!!
उंच गेल्या हिंदोळयावरुनी
नजर फिरते वाटेवरुनी
वाटे धावत यावा सखा नि
बिलगुनी राहावा वाऱ्यावानी।
जीव ओढावतो सख्याच्या भेटीला...!!
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
[01/08, 1:48 PM] Rupali Ghodvajkar: *श्रावण*
---------------
हिरव्या हिरव्या गवततृणाचे
लेऊन अलंकार मखमालीचे
सजली ही अवघी वसुंधरा
आला नाचत श्रावण हसरा...
विविध सणांची घेऊन बरसात
अंगणी बहरला हा पारिजात
मादक,मोहक गंधाचा फुलोरा
आला नाचत श्रावण हसरा...
हर्ष भरूनी मनी मानसी
हितगूज चाले फुलापानांशी
रिमझीम रिमझीम वर्षाधारा
आला नाचत श्रावण हसरा...
हिरवी हिरवी सजली सृष्टी
सौंदर्याची देऊनी दृष्टी
हर्षोल्हास भरूनी सारा
आला नाचत श्रावण हसरा...
*सौ. रूपाली गोजवडकर*
*नांदेड.*
[01/08, 2:03 PM] मेघा अनिल पाटील: श्रावण
उन्हाळ्याची सुट्टी संपली
अभ्यासाला सुरुवात झाली
खेळ खेळूया श्रावणात
नको कट्टी बट्टी आपल्यात !
नको अभ्यास गड्या
नको करू खोड्या
पावसामध्ये मारू चला
चार-पाच उड्या !
पाऊस आहे म्हणून
नका बसू गप्प
करू ओल्यात कामे
थांबू नका ठप्प !
पाऊस गातो गाणे
टप टप टप्प
तालावर चालूया
झप झप झप्प !
गाऊ चला गाणी
होऊ आनंदाचे धनी
पंख करू हातांचे
उडून जाऊ रानी !
रान भर धावू
चिंचा बोरे खाऊ
झाडाभोवती फेर धरू
श्रावणात खेळत राहू !
खेळ येई रंगात
नाचू गाऊ ढंगात
आकाशाची बिजली
शिरे जणू अंगात !
श्रीमती मेघा अनिल पाटील.
नवापूर जिल्हा नंदूरबार .
मोबाईल 9665189977
[01/08, 2:34 PM] जी एस पाटील: "श्रावण"
श्रावण महिनाआवडता
सर्व तिकडे खळखळता
ऊन पाऊस खेळसारा
श्रावण सर्वाचा प्याराद्र
इंद्रधनुचा गोफ दुहेरी
जणू बांधले तोरण घरी
सप्तरंगी उधळण सारी
पाहून मनोमन मोहरी
श्रावण सणाची सुरुवात
पंचमी येते प्रथम सर्वात
सासुरवाशिनी माहेरात
मुलीचा नाच अंगणात
बहिण भाऊ रक्षाबंधन
गोकुळष्टमी दहीहंडीन
नारळ सागराला अर्पण
कोळी लोकांचाच सण
वसुंधरा शोभेहिरवळीत
गुरे गोजिरी रानावनात
झाडावर पक्षी गातात
धबधबे पडतात जोरात
हवासा श्रावणच मनात
कवी-जी.एस.कुचेकर
पाटील भुईंज
ता.वाईजि.सातारा
मो.नं.७५८८५६०७६१.
[01/08, 2:42 PM] Jeevansing khasawat: श्रावण
लाही लाही होते अंग
मासी चैत्र वैशाखी
चाहूल लागे मनाशी
ऊन सावल्यांचा चौ
झुळ झुळं झुळूक वाहते
ऊन सावली करत लपंडाव
थेंब टपोरे आनंद देत हर जीव
ज्येष्ठ आषाढी सृष्टीचा वर्षाव
तन मन मोहक श्रावण मास
हिरवा शालू नेसून दिसे वसुंधरा जणू खंडोबाची बानायी हमखास
नदी नाले तुडुंब वाहे ,गगन धारा
सन वारांचा भरतो मेळा
आनंदाचा मोठा सोहळा
कुटुंब होती बिखरलेले गोळा
वाट पाहती सासरी लेकी वाळा
सृष्टीवर डुलती झाडे वेली
त्यावर नाचे आनंदाने फुलपाखरे
सजते सुंदर चहूकडे हरयाली
ऊन कोवळे,इंद्रधनुष्य हासरे.
जिवनसिंग खसावत
भंडारा 9545246027
[01/08, 2:46 PM] Ajay Shivkar, पनवेल: *पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
क्षितिजावरती सप्तरंगाचे सुरेख तोरण मनी भासे,
*पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
शितलवारा पाऊसधारा खुळून गेला आसमंत सारा,
ऊन कधी पाऊस कधी लपाछपीचा खेळ असे
*पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
सरसर सरी वरून बरसतील
फूल कळ्या माती चिंब भिजतील
हिरवा शालु नेसून धरणी नववधू भासे
*पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
फुले फुलती, पक्षी गाती, पिके डोलती शेतात
तुडुंब वाहून नद्या नाले गाऊनी गाणे खळखळते
*पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
मास असे हा सणासुदीचा ,चराचराच्या समृद्धीचा तहानलेल्या मनामनाला तृप्त करूनी हर्ष देतसे
*पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे*
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४
[01/08, 2:52 PM] श्रीकांत गोरशेटवार: नानारंगी श्रावण
श्रावण चितचोर हा
जणू सोहळा निसर्गाचा
आनंदित होती सारे
उघडे बोडके माळ
आटलेल्या विहीरी तळी
भरभरुन जाती सारे
पक्षी फुले अन् झाडे
नेसती नव अलंकार
प्रसन्नचित्त होती सारे
येई भक्तिला उधाण
सुंदर देवाचे ते ध्यान
तल्लीन होती सारे
सर्प, वृषभ वंदिती
सागर कृष्णाला पुजिती
भावभक्तीत लीन सारे
पुत्रदा, सीतला, रक्षाबंधन
अलौलिक दान जगती
रत जीवनी होती सारे
वाटे सर्वांना हवासा
स्थैर्य देई जीवनाला
संतोषून जाती सारे
नवनिर्मितीचा जागर
जगत होई वर्धिष्णू
सृजनात गर्क सारे
____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
भोकर
[01/08, 3:18 PM] Snehlata: साहित्यसेवक
रोज एक कविता उपक्रम
काव्यप्रकार..अष्टाक्षरी
विषय ..श्रावण
शीर्षक .. श्रावण आला
निळ्यांगणी घन दाटे
सरसर धावे पृथा
आला भेटीस मजला
किती सोसल्या मी व्यथा..1
नाचे मोर रानोमाळ
पिसा-याचा रंग मोही
पावसाशी त्याची नाळ
आनंदाने डोले तोही.....2
सरीवर सरी येती
चिंब ओली धरा झाली
आनंदाश्रू नेत्री दाटे
येती ओघळुन खाली....3
प्रफुल्लित झाले मन
हिरवाई चहुकडे
नागपूजा पंचमीला
माहेराला लेकगडे....4
नटलेली सुहासिन
शोभे भाळी कुंकू टिळा
आला मास श्रावणाचा
आनंदाचा घन निळा....5
*******************
स्नेहलता कुलथे बीड 🌹
[01/08, 3:34 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *श्रावण *
आला आला श्रावण मास
आली सणांची आरास
माहेरच्या आठवणीने
मन झालं कासावीस.... (१)
आला आला श्रावण मास
चला जाऊ माहेराला
बंधुरायाला ओवाळु
रक्षाबंधन सणाला.....(२)
आला आला श्रावण मास
शेतकरी आनंदला
हिरवेगार शेत झाले
मनातून हरखला....(३)
आला आला श्रावण मास
खेळू झिम्मा नई फुगडी
झाड शीळ घालती
कान्हा वाजवी बासरी....(४)
आला आला श्रावण मास
करू गोपालकाला
शेतकरी ही पुजतो
अपुल्या ढवळ्यापवळ्या ला...(५)
आला आला श्रावण मास
किती गाऊ मी महती
आनंदाने उत्सवाच्या
मन हरखून जाती.....(६)
आला आला श्रावण मास
पाऊस पडतो मुसळधार
कधी तापे खुप ऊन
कधी झाकोळले नभ(७)
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
9423414686
[01/08, 4:31 PM] Shailendra Adbalwad: ..........साहित्य सेवक........
...दररोज एक कविता उपक्रम...
,,,,,,,,,,,विषय :- श्रावण,,,,,,,,,
'''''''''''''''""""""""श्रावण"""""""""""""
...............=====...............
आला आनंदी श्रावण
सरीवरती सरी घेऊन
ऊब मिळता पाण्याची
सृष्टी नटली सौंदर्यानं
निर्झर वाहे झुळझुळ
वसुंधरी थंड हिरवळ
वैविध्य सुंदर फुलांचा
पशुपक्षी हवा परिमळ
ऊन सावलींचा खेळ
अंबरी इंद्रधनू साक्षित
पक्षी स्वच्छंदी उडती
नशा पशूंच्यांही अंगात
रंगगंधी हिरवा शालू
रानीवनी उभी वरात
वसुंधरा शोभे नववधू
श्रावण मास मंडपात
पंचमी लेक बोळवण
बैलांचाही पोळा सण
आला आनंदी श्रावण
करुया भजन कीर्तन
आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. न. 9158551975
[01/08, 4:33 PM] सुंदरसिंग साबळे: श्रावण आला
मनीच्या कळ्या धुंद झाल्या
उमलून बहरून गेल्या
धन्य वाटे आज धरणीला
श्रावण आला हो श्रावण आला।।
धरणी अमुची विविध फुलांची
अत्तरे ही झाली अमुच्या मनाची
सुगंधित झाली धरा
हा प्रमोद दाटून आला
श्रावण आला हो श्रावण आला।।
सणावारांचा थाट घातला
सासुरवाशीण फुलवी मनाला
अंतरीचा हा दिवस उगवला
धावूनिया श्रावण आला
श्रावण आला हो श्रावण आला।।
ऋतूराज हा बहरून आला
वाटेतून घुमतो हा मधूपावा
शालू मखमली ल्याली धरा
उन्मोद वाटे या वसुंधरेला
श्रावण आला हो श्रावण आला।।
श्री. सुंदरसिंग साबळे गोंदिया
मो. 9545254856
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें