शनिवार, 1 अगस्त 2020

रोज एक कविता - रक्षाबंधन

साहित्य सेवक समुह प्रस्तुत

*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 02 ऑगस्ट 2020

*विषय :- रक्षाबंधन / राखी*
संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[02/08, 11:00 AM] Bharti Sawant: रक्षाबंधन

नाते भावा बहिणीचे
अतूट असे रेशमी बंध
राखीच्या धाग्यांनी घट्ट
नसतो स्वार्थाचा गंध

जपूनि पावित्र्याचे नाते
रक्षाबंधनाचे असेच सूत्र
प्राण जिवाचे वाचायाला
शत्रूलाही करूयाच मित्र

बहिणीची भावावरी अशी
आईवाणीच असते  माया
ताई असते प्रेम जिव्हाळा 
भावा देते  सदा छत्रछाया

माहेरचा असा सांगावाही 
भाऊ येतोय तिला मुराळी
डोळ्यातून धारा वाहताना
बंधू घेतोच प्रेमाने जवळी

ममता नि जिव्हाळ्याची
असेच हृदयात साठवण
रक्षाबंधनाच्याच सणाला
येईच माहेराची आठवण 

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835


[02/08, 11:09 AM] Nagorao Yeotikar: *कविता - रक्षाबंधन*

भाऊ बहिणीचा सण
त्याचे नाव रक्षाबंधन
ओवाळते भाऊराया
बहिणीचे करतो रक्षण

धागा नाही हा कच्चा
त्यात प्रेमाचे आहे बंधन
वर्षानुवर्षे टिकविण्यासाठी
करू या ऋणानुबंध मंथन

बहीण नाही ज्या भावाला
प्रेमासाठी पहा तळमळतो
राखी बांधून घेण्यासाठी
तो एका बहिणीला शोधतो

देशातल्या आया बहिणीवर
पहा अत्याचार किती वाढले
एक भाऊ येईना चालून पुढे
बहिणीला जे त्याने वचन दिले

प्रत्येक स्त्री बहिणीसमान मानावे
प्रत्येक भाऊला हे कळले पाहिजे
तोच दिवस रक्षाबंधनाचा खरा 
आपण साजरा केला पाहिजे.

- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड
9423625769


[02/08, 11:15 AM] +91 98341 14379: *कविता - रक्षाबंधन*
----------------------------------------
 आजवर जीची वाट पाहिली 
आज इथे ती भेटली 
भाऊरायाच्या मायेसाठी
आसुसलेली वाटली 
भाऊ बहिणीच्या प्रेमाची
आज मनी आठवण साठली 
उदास तुझा चेहरा पाहून 
चिंता मनात वाटली 
या भावाची अजून तुजवरची
माया नाही आटली .

     *अरविंद कुलकर्णी पुणे*


[02/08, 11:16 AM] प्रिती दबडे: रक्षाबंधन (दोन शब्दांची कविता)

रक्षाबंधन भाऊबहिणीचं
नातं पवित्र
होतं साजरं
देशात सर्वत्र

भाऊ बहिणीच्या 
रक्षणासाठी झटतो
बहिणीला भावाचा
दरारा वाटतो


काढतात एकमेकांच्या
खोड्या खूप
त्यांना भांडायला
नेहमीच हुरूप

बहीण सासरी 
जेव्हा जाई
डोळ्यांत अश्रू
आपोआप येई


थाट सणाचा
वाट रक्षाबंधनाची
घाई ओवाळणी
बहिणीला देण्याची

प्रिती दबडे,पुणे
9326822998


[02/08, 11:27 AM] सुनीता आवंडकर: राखी
 बांधून राखीचा धागा
 मागते दीर्घायुष्य भाऊराया साठी 

ओवाळून दीप प्रेमाचा !
वाढविते गोडवा अतूट नात्यासाठी

लावून भाळी तिलक, अक्षदा 

मागते ऐश्वर्य, यश लाभो सर्वदा 

राखीची वीण असते घट्ट बहु रंगांची
देते आठवण गोड नात्याची व कर्तव्याची

 एक रंग प्रेमाचा
 एक रंग ममतेचा
 एक रंग जबाबदारीचा 
 एक रंग नात्याचा

 असा हा सण उत्सव येवो प्रत्येक वर्षी
 घेऊन आनंद, प्रेम, उत्साह     यशकिर्ती!!!!

प्रा. सुनिता आवंडकर बारी नाशिक


[02/08, 12:11 PM] सौ भारती तिडके: ***कविता***
*रक्षाबंधन***

एक राखी चे बंधन
श्रेष्ठ साऱ्या धना हून
भाऊ बहिणीचे प्रेम
हेच ठेवते बांधून

राखीचा दृढ बंध
दोन मनाचंअतूट बंधन आहे
हळव्या नात्याच्या धाग्यावर
उमलणारच स्पंदन आहे

रेशीम धागा राखीचा
भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधनाचा
लाखात एक माझी बहीण
प्रतीक आहे मांगल्याचा

काय सांगतो राखीचा
पहा बांधवांनो धागा
बहिणीशी बांधवांनो
प्रेम भावनेने वागा

बहिण भावाचे प्रेम असते
मधुर आठवणी
हातातल्या राखी सोबतच
प्रेम साठवलय मनी मनी

सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
8007664039


[02/08, 12:30 PM] Hanmant Padwal: *रक्षाबंधन*
बेटीनेच बांधली राखी मला
मनी नात्याचा योग साधला
मला बहिण नाही...
तिला तरी कुठं भाऊ आहे..
हा सारा तिने दुवा सांधला....!! बेटीनेच....
छोटी म्हणाली,'ताई ,माझा भाई'
अन मी ही म्हणालो तिला ताई... 
नाते तयार झाले या सणाला..!!बेटीनेच....
धाग्याची दोन टोके जुळवूनी
बंध गेले आपसुक गुंफूनी
वलय लाभले आज रक्षाबंधनाला..!!बेटीनेच...
खंत ना कमी वाटली तिला
तिच्या भावनेतला ओलावा
मला भावला या क्षणाला...!! बेटीनेच...
उजळे चेहरा नि दाटे उमाळा
तेवते निरंजन मनी कळा
नेत्र बाहुल्या त्या तोच प्रकाश मला..!! बेटीनेच..

     *हणमंत पडवळ*        *उस्मानाबाद.*


[02/08, 12:43 PM] senkude: *राखी*

भाऊ बहिणीचे नाते 
असे अतूट बंधन धागे
धागे असते हे प्रेमाचे
नसते नाते हे स्वार्थाचे

पावित्र्याच्या या बंधनास
 जपूया आपण सर्वजण
सण रक्षाबंधनाचा करुया
गोडवा वाढवूया मिळून

बहिणीची माया असते 
आईसम ती सांभाळते
भावासाठी ती आपला
जीव ओवाळून टाकते

सासीरवाशीण बहीण 
वाट पाहते भावाची  
डोळे येतात भरुन तिचे
अशी असते उब मायेची 

डोळ्यातून वाहती धारा 
बंधू घेतो मायेने जवळी
नात्यातील हा बंध सारा 
बहिण भावास ओवाळी

प्रेम आणि जिव्हाळ्याची
राही काळजात साठवण
सण राखीचा येता मग
येती माहेराची आठवण.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.


[02/08, 12:58 PM] Rajendra Bansod
Gondia: *असती बहीण आज तर..*
(माझ्या स्मृतिशेष बहिणीसाठी सानुश्रयाने...)

कोण बांधील,तुजविण राखी मजला
सजवूनी हाताला,बांधुनी दोर प्रेमाचा
त्यागुणी संसाराला,माहेरच्या वाटेला 
कायम मनगट पोरका,  बहिणीच्या प्रेमाचा!१|

ताड परी उभी सावली, धरुणी जपली मायेपरी
जीवापाड करूनी माया,सान या भावाला
आठवूनि बरसती सरी ,पापण्याही पाणावल्या
वेदनेची कंपने छेदती,शोककळा  ह्या हृदयाला|२|

राखी आली पुन्हा,धुमसत रडलो उरी
पाहता दुकाने  राखीची,थबकलो  या रेशिमबंधनांनी
पाहिले ताई  घेवून थाल, स्वप्नात जरी पुसली  तू आसवे 
 क्षणभर सुखावलो मिटुनी डोळे,रेशीमधागा बांधुनी|३|

असती बहीण आज, सजले असते मनाचे गाभारे
न्हाहळतांना मजला ,ओवाळले असते तिने
पेटवूनी दिवा प्रकाशीत लख्ख, सजविले असते मनोरे 
चिंब निराश करी पाऊस,या नारळी पौर्णिमेने|४|

तू नाही पण आठवणीने,  मनात बसविले गावे
कष्टतांनाना  शिवार -बागा,तुडविली खडतर वाटा
झटली आई-बहीण होऊन,काय तुला देऊ नावे
राखी आली आठवणी  संगे,उडवीत त्सुनामी लाटा|५|

अंगणातील झोका एकांतात,हुंदके देत झुलतो गं
मैत्रिणीचा मेळा तुझा, घराकडे  बघून  झुरती
त्राण संपले आईबाबांचे,आठवणींचे हिंदोडे उठती गं
खुलली असते मनगट ही,जर बहिण माझी असती |5|

*राजेंद्र धर्मदास बन्सोड*
   सहायक शिक्षक
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा
पंचायत समिती गोरेगाव, जिल्हा गोंदिया
8275290252


[02/08, 1:08 PM]  Manjush Deshamukh: रक्षाबंधन

सर्व बंधनात बंध 
प्रेमाचा  तो सुगंध
भावा बहिणीचे नाते
जसा परिस - चंदन

 रुसवा- फुगवा तो
  लटका राग  तो भंग
चिडी चुप होई घर
जाई - जुई चा सुगंध

प्रेम  भावा -बहिणीचे
जसे गहू जात्यातले
अर्थ शोधू नका कुणी
या एक नात्यातले

 माय ,बहिण- मुलगी 
जगा उजेड तो देई
प्रेम लाभे ज्याला यांचे
रंका चा राव ही होई

आले रक्षेचे ते बंधन
धाग्या ची ती होई राखी
सुखी ठेव भाऊराया
मज काही नको बाकी

सौ. मंजुषा देशमुख
अमरावती


[02/08, 1:39 PM] Pradip Patil, Ganpur: रक्षाबंधन 

   चंदनाच्या पाटावर भावाला 
 सोन्याच्या ताटाने   ओवाळीते 
 अक्षता  कपाळावरच्या ब्रम्हांला 
ज्योत  ओवाळीते भाऊरायाला.....
फिरवते  लावण्य सोन्याला
बांधते  धागा भावाला
सांगते भावाच्या  मनाला
आपुली  कीर्ती ऊरुदे.... 
कळूदे या विश्वाला
धागा बांधला  मनगटाला
धार  दे तुझ्या तलवारीला
राहा  तत्पर  रक्षणाला....
सांगते तुला भाऊरायाला
सण हा रक्षाबंधनाचा आला
नको अंतर कधी नात्याला
माहेरची साडी पाठव  बहिणीला....
जाग आपुल्या संस्कृतीला
विश्व् बंधुता या संकल्पनेला
मान दे स्त्री जातीला
रूप माझंच  स्त्री वर्गाला....
ओरडून सांग मानवजातीला 
सांभाळा  विश्वातील बहिणींला 
मागणं समस्त भाऊ रायाला
भाऊ बांधील विचाराला... 


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055,©️®️


[02/08, 1:52 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: *रक्षाबंधन /राखी*

रेशमाचा दोर नसे हा
आहे प्रेमाचा धागा
रक्षण करण्या भावाचे
मना तील भाव होई जागा

भावाबहिणीचे अनमोल नाते
बांधुन ठेवी स्नेहाने
राखी च्या या सणाला
बहिण ओवाळी प्रेमाने

भाऊराया ओवाळणीला
देई बहिणीला हे वचन
 जो वर आहे या पृथ्वीवर
रक्षण करण्या मी सदा हजर

आनंदाश्रू डोळ्यातून वाहती
जशा गंगा यमुना नद्या
भानावर येई मग बहिणही
भावाच्या प्रेमळ स्पर्शा

 नको असो रक्ताचे नाते
तरिही सज्ज रहा रक्षण करण्या
बहिणीला हवी हिच ओवाळणी
स्त्री रक्षणाचे वचन दे भाऊराया

   सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
   गोंदिया
मो क्र 9423414686


[02/08, 2:27 PM] शुभदा दीक्षित: कृ ष्ण मेघ हे झर झर झरती 

                  नील अंबरातून 

चिंब नाहली सृष्टीदेवी  

                  जाई हरकून 


लपाछपीचा खेळ  चालला 

                  उन्ह पावसाचा 

अर्धगोल नभी प्रकटला 

                  इंद्रधनुष्याचा 


लेऊन शालू हिरवा गर्द 

                  कंचुकी सोनसळी 

सुंदर मोहक रूप सृष्टीचे 

                  हसरी गोड खळी 


सावन मासी पुनवेला ती 

                  गेली सागरतीरी 

अर्पून नारळ सांगे सागरा 

                  शांत हो लवकरी 


रेशीम बंधन बांधून तुजला 

                   वचन मागते भ्राता 

रक्षण करिसी सर्वांचे तू 

                    नकोस खवळू आता 


अथांग मन हे तुझे सागरा 

                    येते प्रेमाची भरती 

वंदन करिते सृष्टीदेवी ही 

                    नको कधी ओहोटी 


सुवर्णदिन हा असे आजचा 

                     राखी पुनवेचा 

प्रेमाचा संदेश दिनाचा 

                     भावा बहिणीचा  


शुभदा दीक्षित 
पुणे


[02/08, 3:29 PM] श्रीकांत गोरशेटवार: राखी : प्रेरणास्त्रोत

रक्षाबंधाच्या पवित्र दिनी राखी ताईने बांधिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

निराश मन होते जेव्हा
राखी त्यातून सावरते
आनंदाच्या मुक्त क्षणाला
मनात राखी मोहरते
सोज्वळतेची झांक तिच्यामध्ये मनोमनी मी पाहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

मुक्त बागडणे शिका तिच्याकडून
विचार गंभीर शिका तिच्याकडून
हळूवारपणावर माया शिंपडून
करारी बाणा शिका तिच्याकडून
अमूल्य ठेवा ती जीवनातला मान गर्वाने ताठली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

असता दुःखी मात ती देते 
येता संकटे ना डगमगते
भगीरथ कार्या पाठी असते
मनाचे स्फुल्लिंग ती चेतवते
आयुष्याच्या कोंदणात हिरा बनुनी राहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

आता कोठेही मागे ती नाही
सदैव पाऊल पुढेच राही
अबला नाही सबला होई
विश्वामध्ये आकार घेई
माई ताई भार्या रुपात मी राखी ती पाहिली..!
राखी ती राखी न राहिली प्रेरणास्त्रोत जाहली..!

©____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
भोकर,जि.नांदेड.


[02/08, 4:20 PM] मेघा अनिल पाटील: राखी
लहानपणासूनच प्रत्येक सुख दुःख म्हणजे काय हे समजत नसतानाच
 एकमेकांची सवय होवून जाणं...
म्हणजे.... राखी.....!!
 प्रत्येक प्रसंगात पाठीराखाण करणारा..
हसवणाऱ्या,फसवणाऱ्या तर कधी बालपणीच्या  गप्पा...
म्हणजे.... राखी.....!!
प्रत्येकाने  हेवा करावा अन् दैवानेही लाजावं असं पवित्र नातं...
म्हणजे.... राखी....!!
उतरत्या वयात सांजवेळीही ऐकू यावी अशी सुंदर तान......
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं
अस पानं...
म्हणजे.... राखी.....!!
हसता हसता अलगद टिपावं असं डोळ्यातलं पाणी...... 
आठवावेत लहानपणीचे रक्षाबंधन
अन्
स्वप्नवत वाटणाऱ्या,स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची
अशी ही कहाणी...
म्हणजे.... राखी.....!!
सर्व बंधुना  समर्पित.....!!!

 श्रीमती मेघा अनिल पाटील
         उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
नवापूर,जिल्हा नंदूरबार.
मोबाईल 9665189977
Email -  patilmeghaa@gmail.com


[02/08, 4:44 PM] दुशांत निमकर: *राखी:प्रेमबंध*

आला हा राखीचा सण
ओवाळते भाऊराया
हाती रेशीमचा धागा
देती मनगटी बांधूनिया....

बालपणीच्या आठवणीला
ठेवी हदयात थोड़ी जागा
रक्षणकर्ता माझा भाऊ
बांधते प्रेमाचा हा धागा....

बहीण भावाचे हे नाते
सलोख्याचे नि पवित्र
पाठीराखा हीच ओवाळनी
रक्षाबंधनाचे हेच सूत्र....

सासरच्या साऱ्या गुजगोष्टी
सांगते येऊनी भावाला
दुःख होते जेव्हा बहिणीला
ठेच लागते भावाच्या मनाला....

सासुरवाशीण बहिनीला
माहेराची येई आठवण
राखीच्या सणाला आई
देई प्रेमबंधाची साठवण....

✒️श्री दुशांत बाबूराव निमकर
   चक फुटाणा,चंद्रपुर


[02/08, 4:45 PM] जी एस पाटील: "रक्षाबंधन"                      
बहिन भावाचे अतुट बंधन 
जगात सर्व म्हणती रक्षाबंधन
बहिन भाऊ भेटीचे बंधन
वर्षातून एकदा येते
रक्षाबंधन
भाऊ बहिनीला देतो 
वचन
बांधून हातावरी राखी
बंधन
बहिण मागते आयुष्य
भावाचे
भाऊ  करतो रक्षण
बहिणीचे      
बहिण भावाला राखी
बांधते
बहिण रक्षणाची हमी 
मागते
बहिण भावाच्या मायेचे
लक्षण 
दरवर्षी श्रावणात येते 
रक्षाबंधन
आईच्या माघारी बहिण
माया करी 
आई बापा माघारी बंधू
माहेर करी
माझा भाऊराया येईल
भेटाया
वेडया बहिणीची वेडी 
माया.
 कवि...जी.एस.कुचेकरपाटील
भुईंज ता.वाई जि.सातारा 
मो.नं.७५८८५६०७६१.


[02/08, 4:51 PM] सुंदरसिंग साबळे: रक्षाबंधन  
==================
रक्षाबंधनाचा सण
करी भावाबहिणीची आठवण
हाता बांधून रेशमी बंधन
भाळी कुंकवाची खून
वाटे मजला सगुण !!
      भाऊ माझा पाठीराखा
       कनवाळू आहे फार
        त्याच्या कर्तुत्वाच्या पुढे 
      चंद्र सूर्य तारे फिके पडे !!
शेतकरी भाऊ माझा 
उभ्या जगाचा पोशिंदा 
अख्या दुनियेत त्याला 
रात्रंदिन कष्टच लिहीलेला !!
         भाऊ माझा गं पोलीस 
          करतो सर्वांचे रक्षण
        ना भदभाव त्याला 
        बजावत कार्य प्रवीण !!
(डॉक्टर)देवराया माझा दादा 
असे कामात तत्पर 
जगा देतो सदा जीवनदान 
करून साऱ्यांना निरोगी छान!!
         असा सैनिक माझा भाऊ 
         सदा सीमेवर ऊभा
        देशाच्या रक्षणाचा
       कधीही विसर ना व्हावा !!
असे  सर्वच वॉरिअर
समस्त जगताचे भाऊ
अशा भावांच्या मनगटी 
बांधू रेशमाच्या गाठी
 देतीलही प्राण स्वतःचे
लाडक्या बहिणीसाठी !!

श्री. सुंदरसिंग साबळे
गोंदिया मो. 9545254856


[02/08, 4:57 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य सेवक आयोजित काव्य लेखन " 

* विषय :- " रक्षाबंधन "

* शिर्षक :- " राखीपुनवं "

" राखीपुनवं "

येता सण हा नजीक
होई कासावीस जीव 
नकोरे कोपू विषाणू 
आणरे मना जरा कीव

यंदाच्या राखीपुनवेला
लागता कोरोनाची नजर 
बंधू आठवणीने झाला
बाई ओला माझा पदर

मोबाईलवरूनच करते
भाऊराया तुज औक्षण
पाळून हा लॉकडाऊन
कर तुझ्या जीवाचे रक्षण 

राहूदे मनी तुझ्या उधार 
हक्काची ही रे ओवाळणी
आजन्म प्रीतधागा जपावा
हीच माझी खरी बोळवणी

✍️ अर्चना गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376


[02/08, 5:03 PM] Shailendra Adbalwad: ..........साहित्य सेवक.........
,,,उपक्रम : दररोज एक कविता,,,
-----------रक्षाबंधन-------
..........=======..........

श्रावण पौर्णिमा दिन  भाऊ बहीण  प्रेम प्रतीकाचा सण
राखी बांधुनी मनगटी बहीण भावाला मागते स्वसंरक्षण

स्नेह प्रेम उत्साह नाते संबंध दृढाधार कृतज्ञतेचा हा दिवस
टिळा लावुनी भाळी बहीण प्रार्थिते भावा लाभो दीर्घायुष्य

औक्षण करिता बहीण संकल्प भावाचा भेटवस्तूप्रति दान
जन्मभर बहिणीची अविरत सेवा नि करीन शील संरक्षण

दानवांचा पराभव केला इंद्राणीने इंद्र देवांस राखी बांधून
जरतारी शेला फाडून भाऊ कृष्णां राखी बांधली द्रोपदीनं

हुमॉयूंस भाऊ मानून राखी दिली चितोड राणी कर्मवतीनं
बहादूरशहांशी प्राणाची बाजी लावून बादशहाने केले संरक्षण

बंगाल विभाजनांती नोबेल पारितोषिक रविंद्रनाथ टागोर
हिंदुमुस्लीम सलोखा राखण्या केला रक्षाबंधनाचा पुरस्कार

राखीस अहिंसेचे प्रतीक मानून संहारिले शत्रूंचे शत्रुत्वपण
राजपूत स्त्रियांनी जगी दाविला आदर्श शत्रूंस राखी बांधून

अनेक स्त्रिया औक्षण करितात   चंद्राचे देव भाऊ मानून
म्हणून बालपणी ऐकली आई अंगाई चंदामामा गाण्यांतून

मस्तकी टिळा म्हणजे सद्बुद्धी सद्विचार जागृतीचे  पूजन 
हाती रेशम धागा शील प्रेम पवित्रता पुरुषार्थाचे रक्षाबंधन

भारतीय संस्कृतीतील परमोच्च प्रेम वात्सल्याचा आनंदी सण
उच्च परंपरा भाऊबहीण मातापिता आप्त नाते ठेवू जपून

आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975


[02/08, 5:16 PM] वर्षा सागदेव: नातं भावाबहिणीच ,
प्रितीचा निर्मळ निर्झर ,
कधीच रिते न होणारे ,
प्रेमाने पूर्ण अक्षयपात्र.

तलम रेशमा समान,
मृदू ,मुलायम तरल,
कधी धीर गंभीर तर,
कधी रम्य अवखळ.

ह्या नितळ नात्यातचा,
प्रेमळ दुवा कधी असतो,
रेशीम धागा तर कधी,
द्रौपदीचा जरतारी पदर.
डॉ. वर्षा सगदेव


[02/08, 5:19 PM] Snehlata: साहित्य सेवक दि.2.8.2020
रोज एक कविता उपक्रम 
प्रकार...अष्टाक्षरी
विषय..रक्षाबंधन/राखी
शीर्षक..माझा भाऊ

किती गोडवा खट्याळ 
दादा तुझ्या वागण्यात
लहानपणीचा खेळ
आज आला जगण्यात...1

बंध रेशीम धाग्याचा
बांधी दादा मीच तुला
नाक ओढी माझे तू रे
मग चाॅकी देशी मुला....2

राखी बंधन रक्षणा
तुला बंधनी बांधिले
वचनाचे बोल खरे
कधी तुही न गांजिले...3

राखी बंधन बहीण
भावा ओवाळीते आज
तुज आयुष्य मागते
देवा, माथी ठेवा ताज....4
********************
स्नेहलता कुलथे बीड 🌹


[02/08, 5:22 PM] Ajay Shivkar, पनवेल: *रक्षाबंधन रक्षाबंधन*

बहिणीसाठी नसतो फक्त हा सण 
भावाची माया आणि सुरक्षेचं धन
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचासा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

साडी नको-पैसा नको ओवाळणी मला नको
दादा तुझ्यासाठी माझा,जीव तीळ-तीळ तुटतो
तू फक्त सुखी रहा सांगते अंतःकरण 
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

बाप आणि आई तूच सर्व-काही, तुझ्याविना माझा कोणीच नाही 
पवित्र हे नातं पाण्यासारखं मन,
स्वार्थासाठी तर असतो प्रत्येकजण 
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

माहेर सुटलं सासर धरलं गेली नाही आठवण,
एका उदरात जन्मलो,एका घरात वाढलो आपण,
तुझ्या सुखासाठी झूरते माझे मन,
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

राखीच्या या सणाला दादा तू जागशील का?
मनापासून मागतो तुला ओवाळणी देशील का?
दिसेल कोणी अबला जर, तिचे रक्षण करशील का?
खूप आहेत बहिणी इथे,त्यांच्यात मला बघशील का? 
विश्वात मोठा होईल हा सण
आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण.
 *रक्षाबंधन रक्षाबंधन*

अजय शिवकर 
केळवणे पनवेल 
७९७७९५०४६४


[02/08, 5:27 PM] महेंद्र सोनवने: *साहित्य सेवक*
*उपक्रम - दररोज एक कविता*
*दिनांक - 02/08/2020*
*विषय - रक्षाबंधन*
--------------------
*रक्षाबंधन*

राखीचा हा बंध प्रेमाचा , 
प्रेम आहे भावा बहिणीचा । 
रेशमाच्या धाग्यांनी बांधून त्याला , 
नात्यांचा हळूवार स्पंदनाचा ॥ 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर , 
भावास असेल बहिणीचा साथ । 
कशीही परिस्थीती आली तरी , 
असेल दोघांचा हातात हात ॥ 

दुर असून ही या दिवशी , 
लहानपणीचे दिवस आठवतात । 
हातातल्या राखी ला बघून , 
ताईचे प्रेम मनी साठवतात ॥ 

प्रेमाचं प्रतिक आहे राखी , 
त्यात भावा बहिणीचे प्रेम आहे । 
बहिणीच्या रक्षणार्थ सदा , 
भावाचा जीवन सज्ज आहे || 

भावाच्या सुखाच्या व दिर्घायुष्याची , 
कामना नेहमी बहिण करते । 
रक्षाबंधनाच्या या पवित्र सनाला , 
बहीण अगणित शुभेच्छा देते ॥ 
_____________________


*महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "*

*गोंदिया*

*दिनांक : ०२/०८/२०२०*


[02/08, 5:36 PM] Manik Nagave: कविता

रक्षाबंधन

रक्षाबंधन सण महत्त्वाचा,
बहीण अन् भावाच्या प्रेमाचा.

औक्षण करुनी तिलक लावते,
रक्षणाची ओवाळणी मागते.

सज्ज बंधू लज्जा रक्षणाला,
घोर नाही भगिणीच्या जीवाला.

धागा रेशमी मनगटी बांधला,
भाळी कुंकुम तिलक लावला.

ओवाळण्या फुलली निरांजने,
पुलकित झाली सारी मने.

भेट देता खुष लाडकी झाली,
नयनी समाधानाची लकेर आली.

असा हा सण परंपरेचा छान,
संस्कृतीचा ठेवला जातो मान

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर


[02/08, 5:41 PM] Mina Khond Hyadrabad: रक्षाबंधन

राखी बांधली बहिणीने 
भावाच्या मनगटावर 
दृढ नातेसंबंधाकरिता  ...

राखी बांधली मातेने 
आपल्या मुलाच्या हाताला
वृद्धावस्थेत रक्षणाकरिता...

पित्याने  राखी बांधली
आपल्या पुत्राच्या हाताला
म्हातारपणाच्या आधाराकरिता....

विद्यार्थीनींनी  राखी बांधली
आपल्या शिक्षकांच्या हाताला
शिक्षण ,रक्षण, विश्वासाकरिता....

मुलींनी  राखी बांधली
स्वतः आपल्याच हाताला
आत्मविश्वासाने स्वरक्षणाकरिता.....

एक रेशमी अमुल्य धागा
बांधतात प्रेमाने राखीच्या सणाला
विश्वासाच्या  नात्याकरिता...

मीना खोंड
हैदराबाद


[02/08, 5:50 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्यसेवक समूह*
 *कविता लेखन* 
*विषय :- रक्षाबंधन* 
-------------------------------------------
  श्रावण महिन्यात प्रोणिमेला
  नारळ अप्रिते बंधूरायाला
  रेशमाचे बंधन मनगटीवर
  रक्षणासाठी सज्ज मजला  ।१। 

        नातं पवित्र भाऊबहिणीचं
        रक्षेसाठी झटावे संगतीन
       माहेराचे आठवणी साठवून
      मागते आयुष्य देवाला नमून  ।२। 

ज्या भावाला बहिण नाही
 तळमळतो प्रेमासाठी
स्विकारण्या प्रेमाचा धागा
मनगटावर बांधण्यासाठी   ।३। 

बहिणीला देतो भाऊराया वचन
वर्षोवर्षी चाले रक्षाबंधन
बहिण मागते भावाचे आयुष्य 
भाऊ करितो बहिणीचे रक्षण  ।४। 


          समाजातील कुप्रथेला
         तोडण्यासाठी बहीणभावाचे, 
         कौटुंबिक  नाते येती कामाला
         सज्ज बंध आहेस रेशमाचे  ।५। 

 *सौ.यशोधरा सोनेवाने*
 *गोंदिया*
 *दिनांक : ०२/०८/२०२०*
*मो.9420516306*


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...