[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत
*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 05 ऑगस्ट 2020
*विषय :- घर*
संयोजक :- नासा येवतीकर, धर्माबाद
[05/08, 10:28 AM] Nagorao Yeotikar: माझे घर
चार भिंतीचे कोपरे मिळून होते घर
याचसाठी माणूस करतो किती मरमर
आजी आजोबा आई बाबा सोबती
काका काकू बहीण भाऊची संगती
आनंद मिळतो जेंव्हा असती घरात सारे
एकट्याला घर खायाला उठती रे
घरात आपल्या सारे प्रेमाने राहू या
सुखदुःखात एकमेका समजून घेऊ या
- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड, 9423625769
[05/08, 10:34 AM] सौ भारती तिडके: कविता
*घर**
घर असावे घरासारखे
नातीगोती जपणारे
नको नुसत्या भिंतीचे
प्रेम जिव्हाळा वाटणारे
घरामध्ये असावा सर्वांमध्ये
प्रेमाचा गोडवा
वैमनस्य बाजूला ठेवून
मायेचा ओलावा
घर म्हणजे केवळ घर नसतं
आपुलकीचं नीती
जगण्यासाठी विणलेलं
सुंदर स्वप्न असते मिती
प्रेमाचं वार वाहावे
घरामध्ये नेहमी
नात्यातला गोडवा असावा
संस्कृती असावी जन्मी
संस्काराचे बीज घरामध्ये
असावे गोड गोष्टीत
आजी आजोबांच्या प्रेमात
नातवंड खेळावी संगतीत
सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
तालुका समन्वयक अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
८००७६६४०३९.
[05/08, 10:42 AM] Ajay Shivkar, पनवेल: *तुझे नी माझे असे घर असावे*
सिमेंट विट माती ,नकोत असल्या भिंती
अडले-नडले किती बिघडले,तरी जपली जातील नाती
थोर विचार मनी बसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*
पाया ज्याचा प्रेम असावा,माणसं असाव्या भिंती
छत सुखाचे बनेल जेव्हा , बनेल शांतता तव लक्ष्मी
वाहो सुगंध सदाचाराचा,मनी वैर नसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*
आईची असावी अथांग माया,बाबाचीही खंबीर छाया
माणूसकीच्या तिजोरी मध्ये शांतेच धन असता
तया ईश्वरी बसावे
*तुझे नी माझे असे घर असावे*
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४
[05/08, 11:44 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *साहित्य सेवक समुह प्रस्तुत*
*रोज एक कविता लेखन*
दिनांक :- 05 ऑगस्ट 2020
*विषय :- घर*
विटा माती सोबतिला रेती
तेव्हाच घराच्या तयार भिंती
तेथे असावा प्रेम जिव्हाळा
संकोच नकोच ! नुसती नाती ।१।
घर असावे घरासारखे
बाळ खेळती बागळती
त्या घराला घरपण यावे
आदर व्हावे मोठ्यावरती ।२।
कमाल आहे नात्याची
वेणीत जसे फुले गुंफिती
एकमेका विना अधूरी
घरात हसरे तारे चमकती । ३ ।
परिवारात असते साजूकता
आई बाबा करीती पोषण
संगोपन करून पाल्यांना
बाळाचे जाई संस्कारात बालपण । ४।
शिदोरी घेऊन जाई समाजात
जसे शिवबांवर गिरवी जिजाई
शिवाय स्वराज्याचे कोरून धडे
घराघरात देते संस्कार आई । ५।
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[05/08, 1:05 PM] वर्षा सागदेव: *हक्काचे घर*
चार भिंती आणि एक छत ,
दगडी भिंती दगडी उंबरठा,
तो उंबरठा तिची लक्ष्मणरेषा
त्याला दिले घर ऐसे नाव
पहिले घर बाबांचे,अन् भावाचे,
दुसरे घर नवऱ्याचे,अन् लेकाचे,
ती आहे आश्रित दोन्ही घरात
तिला तिच्या हक्काचे घर नाही
बाबांना मुलगी वाटते परकेधन
नवरा गाजवतो तिच्यावर हक्क
सासरच्या घरात अहोरात्र राबते
तिला तिच्या हक्काचे घर नाही
ओलांडला तो दगडी उंबरठा ;
सावित्रीच्या लेकींने स्वबळावर ,
वाढले तिचे व्याप, तसेच वाढले,
घरच्या दगडी उंबरठ्याचे माप.....
रुढीवादी परंपरेचे ते दगडी डोळे,
आज ही करतात तिचा पाठलाग,
घराच्या,त्या चार भिंती, रुंदावल्या
होऊनी एक अदृश्य लक्ष्मण रेषा ....
वळणा वळणावर वाट अडवते,
त्या घराची ती अदृश्य लक्ष्मण रेषा
जे कधी तिचे नव्हतेच,अन् नसणार ,
ती आज ही शोधतेय तिचे हक्काचे घर..
डॉ. वर्षा सगदेव
[05/08, 1:44 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: साहित्य सेवक समुह प्रस्तुत
*रोज एक कविता लेखन*
दि. 5 आगस्ट 2020
विषय - घर
*घर असावे असे*
घर चार भिंतीचे नसावे
घराता असावा जिव्हाळा
घरासारखे घर असावे
सोबत असावा गोतावळा
विचारांची देवाणघेवाण व्हावे
अथांग प्रेम मोठ्यांचे मिळावे
सुसंस्कार मुलांवर ती करावे
एकमेकास समजून घ्यावे
मोठ्यांच्या अनुभवांची
जोड असावी नात्यांची
सुखदुःखं दोन्हीही वाटावे
गरज आहे ही आजची
परोपकार, कृतज्ञता
मानसन्मान, लहावपणा
समय पाहुनी निर्णय घ्यावे
क्षमा हा मनाचा मोठेपणा
सामाजिक बांधिलकी जपुया
कुटुंबात संवाद साधुया
सर्व काही मनमोकळे बोलुया
घराला घरपण देवुया
कठीण समयी राहु पाठीशी
चुकले तर रागावू ही
चांगल्याचे करावे स्वागत
सामना कराया होवु प्रबळ
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
मो क्र 9423414686
[05/08, 1:58 PM] senkude: कविता - असावे घर असे
घर तुझे नी माझे त्यात
सुगंध प्रीतीचा असावा
ओलावा मायेचा दिसावा
आनंद त्यात दरवळावा
चंद्रसूर्य सुद्धा लाजेल
असा संसार असावा
फुलासारखा फुलून मग
टवटवीत असा दिसावा
जीवनभर संगतीत राहून
एक एक पान साठवावे
आयुष्याच्या आठवणीचे
गुज मनी घेऊन ठेवावे
घर तुझेनी माझे असे असावे
सुंदर नात्यांची गुंफण जसे
संस्काराच्या जडणघडणीत
सजवून वसलेले असावे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
मो.नंबर (9403046894)
[05/08, 2:01 PM] प्रिती दबडे: हक्काचे घर (तीन शब्दांची कविता)
दगडाचे असो किंवा
असो सिमेंट काँक्रीटचे
पण ते असावे
फक्त स्वतःच्या मालकीचे
छोटेसे का होईना
असावे हक्काचे घर
जिथे नांदावा जिव्हाळा
दिला जावा आदर
शांतता अन आपलेपणाचा
जपला जातो ठेवा
नाही केला जात
कुठल्याच प्रकारचा दावा
दिवसरात्र झटतो माणूस
ध्येयासाठी होई मग्न
उराशी बाळगलेले असते
त्याने घराचे स्वप्न
पूर्ण आयुष्य जाते
कर्जाचे हप्ते फेडण्यात
समाधान मात्र वसते
इथे प्रत्येकाच्या मनात
प्रिती दबडे,पुणे
9326822998
[05/08, 2:20 PM] जी एस पाटील: " घर "
थकुन भागून आलेवर
विश्रांतीचे ठिकाण घर
चार भिंती वर छप्पर
असलेच आपले घर
:१:
माता पिता भाऊ बहिण
गोळयामेळयाचेच घर
पाऊस वारा ऊनापासून
निवारा म्हणजेच घर
:२:
घरातच असते सुख
घरातच मिळते माया
घरातच मिळते छाया
घरातच करतात दया
:३:
घरातच मिळते शक्ती
घरातच सर्वाची एकी
घरातच नसावी बेकी
घरातच सर्वजण सुखी
:४:
घरातच होते पालन
घरातच होते पोषण
घरातच होते मिलन
घरातच होते रक्षण
:५:
कवि..जी.एस.कुचेकरपाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
[05/08, 2:33 PM] Mina Khond Hyadrabad: कोरोनाच्या महाभयानक
महामारीच्या महायुद्धात
सारे विश्व चिंतेत आहे
घर मात्र आनंदात आहे ...
आई बाबा आजी आजोबा
मुलं सार्यांचा गोड घरोबा
एकमेकांच्या सहवासात आहे.
घर आता आनंदात आहे...
एकत्रित संवाद
स्वादिष्ट स्वयंपाक
सुग्रास जेवण आहे
घर हसत आनंदात आहे
अंत्याक्षरी नाच गाणे
पत्ते व्यापार कॅरम खेळ
भरपूर गप्पागोष्टी आहे
घर मजेत आनंदात आहे..
कुठे जाऊ नका
कुणाला भेटू नका
घरात सुरक्षा आहे.
घर सुरक्षा कवच आहे...
मीना खोंड
[05/08, 3:23 PM] शुभदा दीक्षित: घरा, तुझा निरोप
आमचे घर ,घर होते ,ज्यात होते घरपण
भिंतींना होता ओलावा अन आपलेपण
घराने जपली नातीगोती ,नाही कुणी उपरा
दारे खिडक्यातून वाहिला 'मन'मोकळा वारा
प्राजक्ताच्या सुगंधाने प्रसन्नता भरे घरात
उंबरठा करे स्वागत आल्यागेल्याचे दारात
शेजारधर्म पाळण्या नीती घराची धावली
छप्पराने धरली डोक्यावर मायेची सावली
ह्याच घराने दिला मला भरभक्कम आधार
दमदार पाऊले टाकीत चाले माझा संसार
ह्याच घराने पाहिली यशाची चढती कमान
म्हणाले जमिनीवर राहू दे पाय ठेव हे भान
तुला सोडून जाताना जड जाहली पाऊले
ऊर भरले अडखळली उंबरठ्यात पाऊले
नि:श्वास टाक मोकळ्या घरा घे शांत झोप
साश्रू नयनांनी मागे वळून घेते तुझा निरोप
शुभदा दीक्षित
पुणे
[05/08, 3:55 PM] सुनीता आवंडकर: घर
मी खेळवतो लहानग्यांना
माझ्या अंगाखांद्यावर!!
घेतो प्रत्येक संकट माझ्याच खांद्यावर!!
बनतो मी साक्षीदार तुमच्या प्रेमाचा!
मीच करतो नाश
तुमच्या संकटांचा !
करतो मी स्वागत येणाऱ्या पाहुण्यांचं!
करतो भरभरून कौतुक तुमच्या यशाचं !
मन होतं माझं दुःखीकष्टी!
जेव्हा होते शोधाशोध सुरू नव्या जागेची !
नंतर हा स्वर्ग वाटतो छोटा !
हवा असतो तुम्हाला बंगला मोठा !
मी मात्र हिरमुसतो
जेव्हा मला देतात निरोप
मारू लागतो मी आर्त हाक
मला सोडून न जाण्याची !
पाहू लागतो वाट परत दुसऱ्या दोघांची!
प्रा. सुनीता आवंडकर बारी नाशिक
[05/08, 4:19 PM] मेघा अनिल पाटील: घर
घरचा कर्ता सर्वगुणी
कर्तव्यनिष्ठा दिसे उमटुनीं
परंपरा जोपासतो सर्व मिळूनीं
वैभव टिकवतो एकत्र होऊनी !
घरी माझ्या होई साजरे सर्व सण
आठवुनी पूर्वजांचे पुण्यस्मरण
होई नव्या पिढीला प्रबोधन
निमित्तमात्र स्नेहभोजन !
रम्य संस्कारांची खाण
घर माझे मनमोहक छान
उत्सवात विशेष नवलाई
आप्त भेटुनी चकित होई!
घरात माझ्या सत्य वाणी
गातो सर्व प्रेमळ गाणी
स्वकष्टाची कमवतो नाणी
त्याच बरोबर जपतो पाणी !
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशीक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
नवापूर,जिल्हा नंदूरबार.
मोबाइल 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
[05/08, 4:55 PM] दुशांत निमकर: *घर असावे*
घरात प्रेम,स्नेह,आपुलकी असावा
देशाच्या संस्कृतीचा वारसा चालावा
नात्यातील कटूपणा स्वतः ओळखा
एकमेका घरामधे घालू नका विळखा
बोलू नये घरामधे सारखे टोचुन
सुसंवाद ठेवावे विश्वासात घेऊन
नाते ठेवा गुण्यागोविंदाने नांदणारे
सुख दुःख रे एकमेकांचे वाटणारे
घरे असावे नातलग सांभाळणारे
घरातील दुःख अंगावर झेलणारे
✒️श्री दुशांत बाबूराव निमकर
चक फुटाना,चंद्रपुर
मो न 9765548949
[05/08, 4:55 PM] Snehlata: साहित्य सेवक दि.05.08.2020
रोज एक कविता उपक्रम
प्रकार....अष्टाक्षरी
विषय ..घर
शीर्षक..माझे घरकुल
शांती मिळावी आयुष्या
क्षण विश्रांतीचा घास
उभारतो घर आम्ही
धरू आनंदाची कास.....1
तंटा,मस्करी,मस्तीची
रात्र असे गमतीची
गोष्ट,गाणी,नृत्य,गीत
आई बाबा ममतेची....2
मना मनात उमेद
होई निर्माण घरात
अर्थ येतो जीवनाला
प्रेम भावना मनात....3
डोही आनंदी तरंग
वाहु भेटु सागराला
गोठ्यातील गाय सुद्धा
आधी पाजि वासराला....4
घर माझे औदुंबर
भासे दत्त धाम मज
गाय,माय, पोरे, गोठा
धनी गाळतोयं घाम
*****************
स्नेहलता कुलथे बीड 🌹
[05/08, 5:14 PM] Shailendra Adbalwad: ..................साहित्य सेवक.................
..........उपक्रम :दररोज एक कविता........
"""""""""""""""""""""""= घर =""""""""""""""""""""""
घर माणसांचे आगार सुख वैभवांचे भांडार
घरात सजतो संसार घर जीवनाचा आधार
घर प्रपंचाचा बाजार नि मांगल्याचा सागर
छत्र सावली थोर कधी न फिटती उपकार
दु:ख प्रसंग येता असतो घराचाच पुढाकार
काळ कितीही कोणता घरकृपा साक्षात्कार
घर म्हणजे नव्हे केवळ वास्तूचाच आकार
सांभाळुनी आपणांस स्वप्न ते करीे साकार
घराचीच कृपा असू नये परिवारात द्वेष वैर
स्वच्छ शांत प्रसन्नतेचा घर करिते स्वीकार
घर गजांतलक्ष्मी मुखी देई स्वादिष्ट आहार
घर ऋणांनुबंधाची भेट त्यास हवा सदाचार
भलेबुरे असो कसेही असो किती सान थोर
घर आपुले आपणांस असते स्वर्ग नि मंदिर
आजन्म आमरण घर सर्वांना असे साभार
कार्यभार पेलुनी तेच सांभाळिते आयुष्यभर
अचल खंबीर हे घर ऊब मायेची खरे ईश्वर
कीर्तीमान व्हावे सर्व जगी जरी जग नश्वर
अन्न वस्त्र निवारा अवघ्या जीवनाचे सार
असंख्य जीव संरक्षिते घर हेच परमेश्वर
आडबलवाड पांडुरंग सरसमकर ( सहशिक्षक )
हु.पानसरे हायस्कूल, धर्माबाद. जि. नांदेड.
मो. नं. 9158551975
[05/08, 5:14 PM] Pradip Patil, Ganpur: घर
विश्वची माझे घर
सुंदर आकाश प्रवेशद्वार
जमीन देते आधार
अन्न उचलतं भार....
हवा करते गार
पाणी जीवन सार
जीव सजीव फार
सृष्टी जगण्या आधार....
जन्म मिळाला उधार
निर्माण मातीतुन सारं
शरीर भासतं कणभर
ओझं वाटतं मणभर...
प्रपंच करावा सुंदर
कोण नेलंय वर
असलं छोटंसं घर
चित्त समाधान त्यावर..
नातं त्यात दृढ
आयुष्य असावं सदृढ
काढावं अवैध मार्गाने
संम्पत्ती जमवण्या खुळ...
जाणं निर्मिते आईवडिलांचे
ऋण फेडू भ्रम्हांडाचे
विचारत येतील जन
हेच घर का त्या महापुरुषाचे ........
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
मो. 9922239055©️®️
[05/08, 5:14 PM] Pradip Patil, Ganpur: घर
सत्य संस्कार घरात
मंदिर वास त्यात
सारे एकत्रित राहत
निर्मळ मन ज्यात....
साथ संगत एकमेकात
घेऊन हातात हात
एकीत करून मात
रममाण कुटुंब संसारात....
सडा रांगोळी अंगणात
आजी आजोबा घरात
आई वडील हृदयात
तुळशी दिवा लावी सांजवात...
जीव साऱ्यांचा एकदुसऱ्यात
आनंदी मुलं घरात
दंग गोष्टी आयकण्यात
जरी आईबाप रानात....
सुख समृद्धी जीवनात
आरोग्य नांदे शरीरात
मान सन्मान जगात
पिकं डोले शेतात....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
मो. 9922239055©️®️
[05/08, 5:33 PM] महेंद्र सोनवने: *साहित्य सेवक समुह*
*दैनिक उपक्रम - रोज एक कविता*
*दिनांक - 05/08/2020*
*विषय - घर*
--------------------
*घर*
घर असावे दिसायला सुंदर,
तो आपला निवारा असतो ।
त्यात जातो आपला जीवन,
कारण तिथं जिव्हाळा असतो ।।
घर बनतो विटा माटीचं ,
त्यात लोहा सिमेंट असते ।
अंगणात तुळसी बहरली ,
दारापुढे रांगोळी असते ।।
घरात असतात घरची माणसं ,
त्यात आम्ही मजेत असतो ।
घरी आजोबा सर्वात मोठे,
त्यांचा आजही दबदबा असतो ।।
घरी आचार विचार एक असावे,
प्रेम हा घरचा पाया असावा ।
सदाचार घरातील संस्कृती असावी,
माणुसकीचा कळस असावा ।।
या घरातून मिळे सर्वांना,
आपुलकीची शक्ती ।
आकांक्षाचे पंख असूनही
उंबरठ्यावर असते भक्ती ।।
--------------------
*महेन्द्र सोनेवाने,"यशोमन"*
*गोंदिया*
[05/08, 5:34 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: " साहित्य समूह आयोजित दैनंदिन काव्य उपक्रम "
* विषय :- " घर "
" घर "
घर असते
मनामनांचे
सहकार्याचे
आत्मियतेचे
घर असते
सुसंस्काराचे
सदाचाराचे
मानवतेचे
घर असते
बांधीलकीचे
सहृदयतेचे
जीवाभावाचे
घर असते
सद्भावनेचे
कृपाछायेचे
वात्सल्याचे
घर असते
दया शांतीचे
सामंजस्याचे
क्षमादानाचे
✍️ अर्चना गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552963376
[05/08, 5:50 PM] Rupali Ghodvajkar: *घर*
गुहेतील जगणे संपवून
घरे उभारली माणसाने
स्थिरावला मनुष्यप्राणी
खुलली प्रगतीची दालने.
घरामुळे लाभले मानवा
स्थिर आणि सुखी जीवन
भटकंतीचे संपले चक्र
सुखावला प्रत्येकजण.
वर्षामागून वर्षे गेली
माणूस गुंतला घरात
सुखांची झाली रेलचेल
उरली ना कशाची ददात.
सर्वांच्या एकत्र राहण्याने
होता जिव्हाळा टिकून
स्वतंत्र झाल्या चुली आता
आणि दुरावले घरपण.
आधुनिक घरे म्हणजे
राजाराणीचा संसार
वृद्धांना नाही जागा इथे
फक्त मी- माझे पाहणार.
कोरडेपणाने केली जाते
खोटी चौकशी वरवरची
लटके आपलेपण दाखवून
नाटकी बांधिलकी जपायची.
घरे झाली उदंड सारी
भौतिकसुखाने भरलेली
एकमेकांना नसे आधार
माणूसकी मात्र दुरावली...
सौ.रूपाली गोजवडकर
नांदेड.
[05/08, 5:56 PM] Hanmant Padwal: *आज घराघरात*
धडपड माझी कधीची
बोलायचे आहे काही मला...
सारेच कसे ठार बहिरे,
सांगायचं काही मला...||
प्रश्र्न साठले मनात माझ्या
उत्तरे हवीत की मला...
आजी-आजोबा दूर कुठे
बोलायचे आहे त्यांच्याशी मला...||
चार भिंतीत विश्र्व माझे
उंबरठयाबाहेर यायचेय मला...
हिरवळीवर लोळन घेऊन
पाखरांशी खेळायचे आहे मला..||
आई-बाबाचं उशिरा येणं
फेसबुक व्हाॅट्स अॅपमधी ...
आपणच आपल्यामध्ये रमणं
मुक्या घराला बोलतं करायचं मला...||
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद.*
[05/08, 5:57 PM] Bharti Sawant: घर
घर असुदे शेणा मातीचे
असावा त्यात जिव्हाळा
नांदावी सारी एकोप्याने
नको वर्तनातुन उन्हाळा
पाझराव्या प्रेमाच्याराशी
घरातील प्रेमळ नात्यात
घट्ट राहू दे मनीचे बंधही
नको यावे कुणी गोत्यात
घरात असाव्या प्रेमलहरी
सुखाचा घ्यावा नित्य श्वास
दुःखाचे कढ जिरविताना
असावा दुसऱ्यावर विश्वास
सौ.भारती सावंत
मुंबई
[05/08, 5:58 PM] श्रीकांत गोरशेटवार: आजची कविता : घर
हरएक घर असावे
प्रतिक मांगल्याचे
हरएक घर असावे
छत्र वात्सल्याचे
इथे सदा रहावा
जिव्हाळा भरभरुन
सर्वांशी इथे व्हावा
संवाद भरभरुन
इथल्या भिंतीनी द्यावे
सकलांना संरक्षण
इथल्या उंबर्यावर व्हावे
विजयाचे औक्षण
इथल्या वस्तूवस्तूतून
झिरपत रहावी माया
इथल्या कणाकणातून
पुलकित व्हावी काया
उत्कर्ष सर्वांचा
इथे इच्छिला जावा
प्रगतीचाच आस
सदा मनी असावा
आठवणींनी व्याकूळ
चित्त सदा असावे
घर नव्हे 'गोकूळ'
इथे सदा फुलावे
©_____🖋️
श्रीकांत दशरथराव गोरशेटवार,
मु.पो.बार्हाळी,
ता.मुखेड,जि.नांदेड
घर
घर हे माझे असावे सुंदर
कधी त्यात येऊ नये अंतर
असे असावे घर माझे सुंदर
घर हे माझे आहे सुंदर !!
आईबाबा जेथे मायेचा सागर
आम्हा भावंडांवर प्रिती अपार
प्रेमाला त्यांच्या नाही पारावार
माझी लक्ष्मी माझी माय
जणू दुधावरची साय!!
सुखाने नांदते आनंदात
माझा बाप कष्टकरी
देतो कष्टाची भाकरी
यात नांदती सदैव
प्रेम जिव्हाळ्याचे भाऊ
सदा संगतीत राहू
नाती जपुनिया ठेवू !!
ह्या घरपणासाठी
साथ दिली या घराने
सदा ताठ मानेने
कधी पडले नाही ऊणे
या माझ्याच घरात !!
सदा आनंदीत मन
माझ्या घराची देन
बांधू मांगल्याचे तोरण
हेच घरपण सावराया!!
आकांक्षा चे पंख घेऊ
घेऊनिया दिव्य शक्ती
ठेऊन उंबरठ्यावर भक्ती
घेऊ उत्तुंग भरारी
याच माझ्या घरट्यातून!!
श्री. सुंदरसिंग साबळे गोंदिया
मो. 9545254856
कविता:घर
जवाब देंहटाएंघर नसते केवळ
दिसणारा मोठा बंगला
घरासाठी जीव एकमेकात
पाहिजे मनापासून रंगला
घर नको केवळ प्रशस्त दिसायला
माणसे घरात असली पाहिजे
विसरून हेवेदावे सारे
केवळ मने एकमेकांची वाचायला
घरामध्ये नको केवळ
सतत भांडण आणि वाद
घर असले पाहिजे
एकमेकांना देणारे प्रतिसाद
घरात नको केवळ
शोभेच्या साऱ्या वस्तू दिसायला
जागा असू द्या घरात
मनात एकमेकांच्या बसायला
घर नाही केवळ पैसे
कमविण्यासाठी बाहेर पडणे
घर असले पाहिजे आपले
ढाल एकमेकांची बनून लढणे
घरात नको केवळ आपल्या
मीपणाचा खोटा नारा
घर म्हणजे एकमेकांना समजून
फक्त माया प्रेमाचा पसारा
कवी: गणेश रामदास निकम(सर)
चाळीसगाव*गणेशपूर*
मी.न.7057904677
9834361364
6/8/2020
* कविता आवडल्यास कवीचा नावासहित पोस्ट करा*