*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- बारावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 30 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- नशीब किंवा दैव*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
01) *नशीब*
जीवनाचे रंग प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळया प्रकारे येतात..ज्याला जो रंग आवडतो तो त्याला
निवडता आला पाहिजे नि आपलासा करता आला तर आपोआपच त्याच्या जीवनात सौख्याचं इंद्रधनुष्य निर्माण झाल्यावाचून राहत नाही.पण बऱ्याचवेळा आपल्या मनात असते एक, आपण करतो एक आणि घडते मात्र निराळेच कदाचीत यालाच लोक नशीब म्हणत असतील.आता आपलं नशीब फिरवण्याचं वा त्याच त्या गोष्टी गिरवण्याचं आपल्याच हातात असतं. बहुतेक वेळा जीवनात नैराश्य येतं आणि मग जीवनयात्रा संपवून टाकावी अशी भावना होते.तशा घटना जीवनात खरंच पुन्हा पुन्हा घडतात आणि मग आपली धारणा पक्की होते की आता जगण्यात आर्थच नाही.पण समस्या या खरंच तुम्ही कोण आणि कसे आहात हे आजमवण्यासाठी आलेल्या असतात,ते आव्हान स्विकारुन जीवन जगले
पाहिजे.प्रवाहाबरोबर तर कचरासुद्धा सहज वाहून
जातो थोडं प्रवाहाच्या विरूद्ध उभं राहता आलं
पाहिजे.सदैव्य तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती
कशी राहिल आणि का राहावी.लढण्यात आणि
लढून उभं राहण्यात जी मजा आहे ती सहज आणि सुलभतेत नक्कीच नाही.म्हणून जीवनातील आव्हानांना स्विकारा आणि जगा.
संकटांना तुमचा ताबा घेऊ देऊ नका,संकटावर स्वार व्हा अन बघा कशी गंमत असते ती....पण
आपण तिथं पर्यंत पोहचतच नाही. असे कांही क्षण जीवनात येतात आणि बदलून जातं सारं जीवन. टरनिंग पॉईंट त्याचंच तर नाव.पाणी मातीचा आधार नसतानाही भिंतीच्या फटीतून एखादे रोपटे आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण पाहिले असेल कधीच नशीबाला दोष देत ते थांबत नाही. कित्येक वेळा त्याला संपवण्याचा प्रयत्न करा. कालांतराने पुन्हा उगवण्याच्या त्याचा प्रयत्न असतो. अन्न दुसऱ्याचे असले तरी किती खायचे हे आपल्याला कळले पाहिजे.आपले नशीब,दैवं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. त्याला कोणी दुरुस्त करेल किंवा त्याला कोणी उंचीवर नेईल याची वाट पाहात बसलो तर आपण निष्क्रीय व्हाल. तेव्हा तूच तूझ्या जीवनाचा शिल्पकार हे लक्षात ठेवुन जगा.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
02) नशिबाचे दुसरे नाव विचार
मित्रांनो, तुम्ही कधी विचार करता का ? बहुतांशजण या प्रश्नाचे उत्तर होय असे देतात. कारण विचार केला नसता तर आपली प्रगती झाली नसती. सजीवांमध्ये मानवाला वगळता अन्य कुण्या सजीवांना विचार करता येत नाही. कारण विचार करण्यासाठी ज्या बुद्धीची आवश्यकता आहे ती परमेश्वराने फक्त मानवालाच दिली आहे. त्याचमुळे इतरांपेक्षा मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर प्रगल्भ विचार करून लक्षणीय प्रगती केली. कुठे अश्मयुगीन काळातील मानव तर कुठे आधुनिक काळातील मानव ! आपली विचार करण्याची क्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचे विचार प्रक्रिया चालूच राहते. विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनेल, असे विनोबा भावे म्हणतात. त्यामुळे नेहमी विचारात गढुन राहावे. विशेषकरून शालेय जीवनातील वयात विचारांची प्रक्रिया सतत चालू असावी. विचार न करणारी मुले मंदबुद्धी किंवा ढ समजली जातात. ऍझक टेलर यांनी फार सुंदर विवेचन केले आहे, ते म्हणत की मनुष्याची वाढ ही अवयवांनी होत नाही, तर विचारांनीच होते. विचारांना वाचनाने सहज सहकार्य मिळते. वाचन केले नाही तर आपल्या मनात नवनवीन विचार कसे निर्माण होतील ? त्यामुळे नित्य काहीतरी वाचन करण्याची सवय आपणाला असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके तर वाचावीच लागतात याशिवाय वृत्तपत्रे, मासिके, गोष्टींची पुस्तके ही नियमित कशी वाचता येतील ? याचा विचार जरूर करावा. महात्मा गांधीजींची लिहिण्याच्या किंवा बोलण्याचा शक्तीपेक्षा वैचारिक शक्तीवर अधिक श्रद्धा होती. म्हणूनच वैचारिक पातळीवर गांधीजी खूप श्रेष्ठ महात्मा होते. खूप वाचन करून चिंतन व मनन केल्यानेच वैचारिक पातळीत काहीतरी सुधारणा होते, अन्यथा नाही. स्वामी विवेकानंद सांगतात की, वाईट संस्कारापासून दूर राहण्यासाठी पवित्र विचारांचे नेहमी चिंतन व मनन केले पाहिजे. जगात सर्वच सुंदर आहे तशी विचार करण्याची दृष्टी आपणाला मिळाली पाहिजे. आपले विचारच आपले भवितव्य ठरवतात. म्हणूनच स्वामी रामतीर्थ म्हणतात की, नशिबाचे दुसरे नाव विचार आहे. म्हणूनच आपल्या विचाराने आपले नशीब बदलून टाकू या.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
( माझ्या पाऊलवाट या पुस्तकातून साभार )
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
03) *खेळ नशिबाचा*
दत्त मंदिराजवळ असलेल्या हॉलमध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या सत्संग कार्यक्रमाला गेलेली असतांना ची घटणा झाली होती . आज बर्याच दिवसांनी सुमित्रा काकू कार्यक्रमाला दिसल्या. नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला त्या अगदी आवर्जून उपस्थित राहत होत्या. गेले दोन महिने त्या कोणत्याही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. मला रहावले नाही .सत्संग संपल्यावर मी त्यांना विचारले ," काय काकू ,इतके दिवस कुठे गेला होतात ? गावाला वगैरे ?"
सुमित्रा काकू "हूश्श ",करीत म्हणाल्या ,कशाची गावाला जाते ग .काय सांगू माझी सुन गेली. तिने जीव दिला .तिसऱ्या खेपेस ही मुलगी झाली म्हणून तिने खूप जीवाचा त्रागा करुन घेतला होता. तिच्या बहिणीला मुलगा झाला व मला कशी तिसऱ्यांदा ही मुलगी झाली. सासूला सगळे मुलगेच मग, मलाच कसा मुलगा झाला नाही?माझे नशीब च फुटके; म्हणून संतापाच्या भरात तिने कुणाला न कळत अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले .व त्यातच ती गेली .लेकरांना पोरकं करून गेली. एवढा जंजाळ माझ्यामागे सोडून गेली . मनात सुमित्रा काकू रडू लागल्या. त्यांचे सांत्वन करीत विचारले, ” आता छोटी मुलगी बरी आहे का ?” त्या म्हणाल्या ."छोटीचे तर, नशीबच उजाळले. इकडे आई स्वर्गवासी झाली आणि तिसऱ्या दिवशीच तिला अमेरिकेत राहणाऱ्या श्रीमंत दांमपत्यान दत्तक घेतले.
तिचा किती थाट आहे .किती कपडे, खेळणी ,पाळणा काही काही कमी नाही.
त्यांच्या शेजारी एक जोडपे राहत होते. त्यांना मूलबाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते .विशेष म्हणजे त्यांना मुलगीच हवी होती .काकू म्हणाल्या ,कृष्णा जसा मथूरेत जन्माला आला.आणि गोकूळात लहानाचा मोठा झाला. तसेच ही मुलगी भारतात जन्माला आली आणि अमेरिकेत गेली.
मी अंतर्मुख झाले .मुलीच्या योगाने (नशिबाने)एका आईचे जीवन दुःखाने होरपडून उद्ध्वस्त झाले .तिने मरणप्राय यातना सहन करून मृत्यूला कवटाळले .जगाचा निरोप घेतला .तर, दुसऱ्या आईचे जीवन फुलून उजळून निघाले. चंदनासारखे सुगंध दरवडू लागाले. तिचे जीवन नंदनवनासारखे खुलू लागले .
आजही आपल्या समाजाला प्रबोधनाची आवश्यकता आहे, मुलगा झाला की आनंद व्यक्त करणारे आणि मुलगी झाली की दुःखीकष्टी होणारे लोक दिसून येतात , मुलीला गर्भातच कुस्करून टाकले जाते, समाजाला लागलेली ही कीड नष्ट करण्यासाठी ” शिक्षण ” हाच रामबाण औषधोपचार आहे नशीब काय? कर्तव्याची जोड हवी. .
******************************
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
(9420516306 )
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
04) *खेळ नशिबाचा*
कधी कधी आपण आयुष्याविषयी बोलत असताना किती सहजतेने बोलून टाकतो की आयुष्य किती सोपे आहे पण एखाद्याच्या आयुष्यात काय लिहिलेलं असतं हे कुणाला ठाऊक नसतं आणि तसेच एखाद्याच्या आयुष्यात किती सुखदुःखे लिहिलेली आहेत याची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते. आठवण ही जीवनातील जणू एक दुर्लभ अशी गोष्ट आहे ज्यामुळेे कधीकधी आपण त्यांना आठवून खूप हसतो सुद्धा आणि कधी त्यांना आठवून आपल्याला खूप रडायला सुद्धा येते.
आज मी सुद्धा ज्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे त्या जरी माझ्या जीवनात निगडित नसल्या तरी पण आजही मला त्या आठवणी मुळे फार दुःख होतं आणि त्यांना आठवलं की रडायला येतो की एखाद्याच्या आयुष्यात इतकं दुःख का बर येत असेल?
आज त्याला जाऊन तेरा वर्षे झाली पण आजही त्या घटनांना आठवून वेदिका स्वतःला दोष देत असते की मी जर त्या दिवशी त्याच्यासोबत गेले असते तर आज तो जिवंत राहिला असता.
आज माझ्या मित्राकडे त्याच्या घरी सगळे आनंदात होते कारण उद्या लग्न होणार होता त्याच्या बहिणीचा. त्याच्याकडे एक मंगल कार्य होणार होते त्यांच्या दोन आत्म्याचा मीलन होणार होता आणि लग्न म्हटलं तर एक मोठा उत्सव होणार होता सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं लग्नाची तारीख जशी जवळ यायची तशी घरचे कामे पण बाकी होती आणि तेवढ्यात, आम्हाला एक तार आली. ज्या मुलाबरोबर वेदिकेच लग्न होणार होते त्या मुलाचा अपघात झाला होता आणि तो त्या ठिकाणी जागीच ठार झाला होता. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. आणि वेदिका खूप वेदनेने रडायला लागली. घरी असणारे सर्व जण काही क्षणाकरिता स्तब्धचं झालेत.
त्या दिवशी वेदिका कुणासोबतही बोलली नव्हती. पण तिचे दुःख सर्व लोक समजत होते. आई बाबा व आजी तिला धीर देऊन समजावन्याचा प्रयत्न करीत होते.
तरी वेदिका काहीच बोलत नव्हती. तिला यापुढे खूप लोकांच्या चुकीच्या भावनांना सामोरे जावे लागणार होते. वेदिका आणि संजय हे दोन्ही सोबतच इंजिनिअरच्या वर्गाला शिकत होते. फार चांगले मित्र होते व ते एक दुसऱ्या ला पसंत करत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर संजय ला पुण्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर दोघांच्या परवानगीने त्यांचं लग्न जमलं होतं आणि ते दोघेही फार खुश होते.
संजय आपल्या लग्नाच्या पत्रिका स्वतः वाटत होता. आणि पत्रिका वाटून परत येतांना त्याचा एका ट्रक शी त्याच्या बाईक सोबत अपघात झाला होता.
या दुःखातून वेदिकेला सावरायला खूप वर्षे लागली. हळूहळू आई बाबानी तिला समजावल की बाळ आता आम्ही तुझा दुसऱ्या मुलाशी लग्न करून देतो. पण वेदिका तयार होत नव्हती म्हणून तिला नोकरी करण्याचा सल्ला दिला. की तू कामात व्यस्त राहशील तर तुझं मन लागेल. शिकलेली मुलगी होती ती तयार झाली आणि तिला तिच्या संजय ज्या कंपनीत काम करीत होता त्याच ठिकाणी तिला ही नोकरी मिळाली.
हळूहळू दिवस सरकत गेले व संजय च्या आठवणी पुसट होत गेल्या. दोन तीन वर्षांनी बाबांनी तिला पुन्हा लग्न करायला बोलले तेव्हा तिने होकार दिला. त्याच कंपनीत तिच्या सोबत काम करणारा एक इंजिनिअर मुलगा तिला आवडायला लागला होता त्याच्याबद्दल वेदिका ने बाबांना सांगितलं. बाबांनी विचार केला की मुलगी आपल्या आयुष्यात खूश राहिली पाहिजे असे त्यांचे विचार, म्हणून त्यांनी वेदीकाचे लग्न पुण्यातच लावून दिले.
सुखा समाधानान वेदिका व वीरेंद्र आपले आयुष्य जगत होते. दोन वर्षात त्यांनी पुण्याला घर विकत घेतला आणि त्यांना एक गोंडस मुलगा सुद्धा झाला. वेदिकाचा परिवार सुखात नांदत होता. दोघेही नोकरी करून कमवत होते पैशाची चणचण नव्हती. मुलगा मोठा झाला होता तो शाळेत जाऊ लागला होता.
एक दिवस अचानक वीरेंद्र ची प्रकृती बिघडली. त्याला घेऊन वेदिका डॉक्टर कडे गेली. तपासणी केल्यावर डॉक्टर ने सांगितले की वीरेंद्र ला डोक्याचा कँसर आहे आणि तो फक्त दोन तीन महिनेच जगणार. पुन्हा वेदिकेच्या डोक्यावर खूप मोठा डोंगर कोसळल्यासारखं झालं. वीरेंद्र चा चांगल्यात चांगल्या दवाखान्यात वेदिका उपचार करत होती. विरेंद्र च्या उपचारासाठी तिच्या जवळ असलेला पैसा संपलेला होता. बाबांना सांगून गावाकडची जमीन विकून तो ही पैसा वीरेंद्र च्या उपचारासाठी लावला पण तो एक दिवस वेदिकेला सोळून नेहमी साठी फार दूर निघून गेला होता.
पुन्हा वेदिकेच्या नशिबी दुःख आले होते व उरले सुरले पैसे ही सर्व खर्च झाले होते. वेदिका आपल्या मुलाला घेऊन खुप रडायची.
वेदिका आता जीव गमवावा असे अनेक वेळा विचार करत होती. जगण्यात तिचे काहीच रस नव्हते पण मुलगा होता त्याकडे पाहून स्वतः सावरण्याचा प्रयत्न करीत होती. पण देवाला का मंजूर होते. की तिच्या नशिबात फक्त दुःख चं भोगण्याचे होते. एक दिवस मुलगा शाळेतून घरी येत असतांना त्याच्या शाळेच्या बस चे अपघात झाले. व त्या दिवशी त्या बस मधले वीस मुलं देवास मुकली व त्यात एक वेदिकेचा मुलगा होता. तिच्या जीवनातला शेवटचा दिवा तो ही विझला होता. वेदिकेच्या दुःखाचा विचार न केलेला बरा. त्या वेळी वेदिका दोन महिने कोमात राहिली. डॉक्टरांच्या खुप प्रयत्नानंतर आज वेदिका जिवंत तर आहे. पण फक्त तिचे शरीर...
कधी विचार करावा लागतो की देव सुध्दा किती कठोर आहे. वेदिकेने कोणते पाप केले असेल? तिला तिच्या जीवनात एका नंतर एक दुःखाचे डोंगर कोसळत होते.
–-------------------------------
महेंद्र सोनेवाने, गोन्दिया
तह जिल्हा- गोन्दिया
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
05) नशीब / दैव. . मानवी जीवन विविध पैलूंवर अवलंबून असते . त्यामध्ये मानवी जीवनातील चांगुलपणा दडलेला असतो . माणूस आपल्या कर्तृत्वाने बनतो , ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने जो तो घडतो , मोठा होतो . सुभाषित म्हणतेच ना " नर करनी करे ! तो नर का नारायण बन जाये ! " या प्रमाणे माणसाने आपल्याला नेमून दिलेले काम केलेच पाहिजे . म्हणतात ना कर्तृत्वा धर्म मानावे ! मनोभावे तेचि करावे ! जर कर्तृत्व केले तरच प्रत्येकाला फल प्राप्त होते विना कर्तृत्व फल मागण्याचा तसा अधिकार प्राप्त होत नाही . कारण विना काम कोणाला ही काही प्राप्त होत नाही . हा निसर्ग नियमच आहे . " दे रे हरी ! पलंगावरी !! अशाने काही प्राप्त होत नाही . आता प्रश्न येतो नियमित काम करणाराचा तो झटतो, मेहनत घेऊन श्रम करतो पण आपण जे काही करतो , ते योग्य किंवा बरोबर असेल का ? असे मानन्याचा पण त्याचा नियमित पणा , सातत्य हे त्याला एक ना एक दिवस ध्येया पर्यन्त घेऊन जाणारच. यात त्याच्या नशीबाचा ही भाग आहे . काम न करता एखाद्याला परमोच्य शिखरावर नशीबाने नेलं असं आणखी इतिहासात उदाहरण नाही . प्रत्येकाला नशीब उज्वल बनविण्यासाठी हातपाय हालवावे लागतील . नुसती नशीब-नशीब म्हणून नशीबाला दोष देत राहणं किंवा गुणगान गात राहणं ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धा ठरेल . म्हणजे थोडक्यात नशीब आपल्याला आपल्या स्वत: च्या कर्तृत्वाने बदलता येते " रंकाचा राजा , आणि राजाचा रंक " होणं हे नशीबाचं उदा. होईल. आता आणखी आपण थोडा दैव चा विचार करूयात दैवात आणि नशीबात फरक आहे दैव हे कोणत्याही प्रकारे आपल्या हातात नाही आपल्याला भारतात ( भारत मातेच्या पोटी ) जन्म घेण्याचे थोर भाग्य लाभलं हे आपलं दैव आहे . दैव हे ज्याच्या त्याच्या पूर्व संचितावर अवलंबून असते . जसे आपले उत्तर आयुष्य हे आपल्या अगोदरच्या आयुष्यावर अवलंबून असते थोडक्यात म्हणजे जुन्या काळात राजे महाराजे असत , एक राजा निधन पावला कि त्याच्या गादीवर त्याचा मुलगा ( युवराज) गादीवर बसवून त्याला लगेच राजा बनविण्यात यायचे हा नविन राजा दैवाने राजाच्या पोटी आलेला असतो , तो तसाच दैव गतीनेच राजा झालेला असतो यात नशीबाचा संबंध नाही . जसे आता राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही राजवट आली आणि ज्याचे नशीब उज्वल तो देशाचा राजा बनतो . अशा प्रकारे.नशीब आणि दैव यात फरक आहे . दैव हे बदललच जात नाही आणि नशीब हे कधीही बदलत , नशीब हे जीवनातील चढ - उतार आहे म्हणून आपलं नशीब आपण बदलले पाहिजे .
दैव , भाग्य , कर्म हे जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत नशीब त्याच्या थोडा जवळचा शब्द आहे . .. मी आपणाला एक पौराणिक उदाहरण देईन अर्थात हे उदाहरण फक्त आपला मुद्दा पटवण्यासाठी असेल त्याच्या खर्या खोट्याशी आपला संबंध नाही बघा दैवाने सैन्याच्या लंकेचा राजा रावन असतो ( तो खूप हुशार होता, पंडित होता थोर शिवभक्त ही होता ) अर्थात हे सर्व दैवाने.प्राप्त त्याला झालेलं होतं , पण त्याचा अंत माञ नशीबाने वाईट केला याला नशीब म्हणावे अशा प्रकारे दैव आणि नशीब यांच्या तील भेद आणि साम्य होय ठिक धन्यवाद !
भागवत .लक्ष्मण गर्कळ
(बीड)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
06) " नशीब - एक ऊन - सावलीचा खेळ "
मानवी जीवन हे अनेक गुढ व चमत्कारिक गोष्टींनी बनलेला एक रहस्यमयी अद्भुत खजीनाच आहे . कारण आपल्या जीवनात कधी कोणत्या चमत्कारिक व आश्चर्यकारक गोष्टींची अनुभूती मिळेल हे आपल्यालाही माहिती नसते . जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक काही सुवर्ण काळ येतो नि त्याचे जीवनचित्रचं पार बदलून टाकले जाते . त्या व्यक्तीला अत्यानंद होऊन ती सुखाची अनुभूती अनुभवत असते . हा " सुवर्ण काळ " म्हणजेच दुसरे - तिसरे काही नसून ते एक " नशीब " किंवा " दैव " होय ! जो आपल्या आयुष्यात अचानकच प्रवेश करून आपल्याला खूपच आनंदी व उत्साही बनवतो .
नाण्याच्या दोन्ही बाजूप्रमाणेच हे ' नशीब ' , देखील आपल्या दोन्हीही बाजूंचे दर्शन आपल्याला घडवीतो बरं का ! नशीबाचे एक रूप आनंददायक तर दुसरे रूप मात्र क्लेशदायक असते . असोत , आपल्याला या दोन्ही रूपात दर्शन घ्यावे लागणार . ते काही चुकणारी वा टळणारी बाब थोडीच आहे !
खरंच ! हे ' नशिब ' आपल्या आयुष्यात कोणता खेळ खेळल याचा काही नेम नसतो . तो रस्त्यावरील भिक्षूकाला राजा बनवितो व एखाद्या राजाला भिक्षूक ! हे आपण महाभारत , रामायण आदी ग्रंथातून सर्वज्ञात आहेच . आत्ताचे आपल्या देशाची धुरा सांभाळणारे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचेही उदाहरण हे या नशीबासंदर्भात आवर्जून सांगावे वाटते . एक चहाविक्रेता मोठेपणी एवढ्या मोठ्या पदावर केवळ नशीबनेच जाऊ शकतो ....
" नशीब म्हणजेच एक प्रकारचा आत्मविश्वास ! "
" नशीब म्हणजे एक स्वतःला सिद्ध करून दाखवून देण्याची एक सुवर्ण संधी ! "
" नशीब एक ऊन - सावलीचा खेळ ! "
मी नववीत असताना आम्ही खेडेगावी रहायला आलो होतो . आता खेडे म्हटलं की बालविवाह ह्या पद्धती आल्याच ! बाबा नोकरी करीत असल्यामुळे आम्हांला गावोगाव भ्रमंती करीत शिक्षण घ्यावे लागत होते . पण म्हणतात ना , " संगत गुण की सोबत गुण ! " बाबांना आपल्या या गावी आल्यावर जुन्या व्यसनी मित्रांमुळे जुगार व दारू ह्या व्यसनांचा नाद लागला . ते एवढे आहारी गेले होते की सर्व पगार या व्यसनावर उधळायचे ! माझ्या पाठचा एक भाऊ सातवीत तर दुसरा पाचवीत शिकत होता . आई शेतीकाम करीत एक म्हैसही चारत असे , सोबत दोन - तीन शेळ्याही चारवत असे . अशा नाजूक आर्थिक परिस्थितीत आम्ही कसेबसे दिवस काढत होतो . दोन्ही भावात फक्त एकच शाळेचा गणवेश होता ! शाळा शिफ्टमध्ये असल्यामुळे बाथरूममध्ये जाऊन ते दोघे कपडे बदलून घ्यायचे . सकाळी एक भाऊ हॉटेलात दूध घेऊन विकायचा . पण लहान मुलांना आडून भाव देत असत . तेव्हा तो किनवटमध्ये गल्लो - गल्लीत जाऊन दूध विकायचा . त्या मिळणाऱ्या पैशांवरच आमची शैक्षणिक गरज भागवायचो ! अशातच आईच्या आईने म्हणजे आजीने माझ्यासाठी एक विवाहस्थळ आणले . मला त्या आजीच्या निर्णयाचा खूपच राग आला . मी खूप - खूप रडले . मी दोन दिवस उपवासही केला . पण त्यांच्या निर्णयात काडीमात्र फरक पडला नव्हता . या अशावेळी फक्त माझे व्यसनी बाबांना माझी किव येत होती . तेही रडत म्हणाले , " माझी पोरगी काय एवढी जड झालीय का ? तुम्ही तिचे कोवळ्यापणीच लग्न का लावता ? तिला शिकू द्या ! खूप मोठी होऊ द्या !! " हे बाबांचे वाक्य ऐकून मला माझं हे " खडतर नशीब " बदलण्याची नवी आशा निर्माण झाली . एक आशेचा किरण दिसू लागला ! आणि मी उद्गवीत होऊन या अन्यायाविरूद्ध पेटून ऊठले . एक प्रकारची वीजच जणू अंगात संचारली होती . मी एक रणरागिनी बनून आई व आजीवर शाब्दिक तलवार व संविधानाची ढाल घेऊन नशीबाशी युद्ध करण्यास सज्ज झाले .
मी आई नि आजीला खणकावून सांगितले की , " हे पहा ! मी अजून नाबालक आहे . लग्नासाठी मी काय अठरा वर्ष पूर्ण केले नाही . तुम्ही जर माझ्या लग्नाच्या गोष्टी केल्या तर मी पोलीसांकडे तुम्हां दोघीही विरूद्ध तक्रार करून तुमच्या हातात हातकड्या अडकवून दाखवीन ! " हा माझा असला आक्रमक अवतार पाहून दोघेही घाबरल्या . आजी म्हणू लागली , " माझ्या पांढऱ्या केसाला असा काळा डाग लावू नको ग बाई ! " नि आईलाही वाटू लागले , असे मनाविरूद्ध लग्न करून दिल्यावर जीवाच काहीबाही केले तर लोक काय म्हणतील ? एकूलती एक पोरगी गमावून बसू का ? आणि अशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात बालविवाहाच्या स्वरूपात येणारे खडतर जीवन मी अशा दुर्गम व दृढ इच्छाशक्तीने पालटू शकले . त्यावेळी केलेल्या संघर्षामुळेच आज मी स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरतेने उभी आहे ! हेही एक नशीबाचाच भाग म्हणूनच .....
म्हणून " नशीब हा एक जादूगारच " होय ! ते एक सुख - दुःख देणारा एक ऊन - सावलीचाच खेळ होय ! हा खेळ प्रत्येक मानवाने आत्मविश्वासाने खेळून आज ना उद्या जिंकून जगायचं !!
अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
07) नसिब/दैव
जे काही होते ते नसिबामुळे झाले. असे म्हणतो. नसिब म्हणजे काय तर एखादी हवी असलेली गोष्ट झाली नाही तर नसिबामुळेच मिळाले नाही असे म्हणतो. याचे कारण तो आपले दोष आपल्यावर घेत नाही तर नसिबाला देतो व चांगले काम झाले की,स्वतःला श्रेय देतो. यावरून मानवी स्वभावाचे दर्शन होतो. मानव हा कधीही अपयशाचे खापर इतरावर फोडतो किंवा नसिबावर .
नसिब म्हणजे निसर्गाने/दैव शक्तीने उपलब्ध करून दिलेली संधी होय. काही व्यक्ती खुप प्रयत्न करतात पण त्यांना यश भेटत नाही तेव्हा म्हणतात आपल्या नसिबातच नाही. नसिबाची ही एक दुसरी बाजु आहे. एखादा व्यक्ती मोठ्या अपघातातून वाचतो आपण कल्पना ही करू शकत नाही. यालाच म्हणतात दैव शक्ती. नशिब अशी एक बाजू आहे की, मनुष्य प्राणी हा अंबानी यांच्या घरी जन्माला यावे की एखाद्या गरीब झोपडीत.तोंडात सोन्याचा चमचा किंवा स्टीलचा चमचा हे नसिबावरच आहे.
बोईनवाड गुणवंत किशनराव
नांदेड
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
08) नशीब
नशिब, दैव, भाग्य, किस्मत, तकदीर, प्रारब्ध, मुकद्दर, लक शब्द वेगळे असले तरी अर्थ मात्र एकच.
मनुष्याच्या चांगली किंवा वाईट कोणतीही घटना घडली की लगेच त्याचा संबंध नाशीबाशी जोडला जातो. जसं देव खरंच आहे की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. तसेच भाग्य-दुर्भाग्य हा सुद्धा प्रत्येकाचा वैचारिक प्रश्न आहे.
एखाद्याच्या आयुष्यात चांगली घटना घडली की आपण लगेच म्हणतो "किती नशीबवान आहे हा", एखादी वाईट घटना घडली की "किती खराब नशीब आहे याचं".
थोडक्यात काय तर मनुष्याच्या जडण-घडणीत त्याच्या यश-अपायशामध्ये श्रम, मेहनत, इच्छाशक्ती, आत्मविश्वास या बाबी जश्या कारणीभूत असतात तसंच त्याचे नशीब सुद्धा काही अंशी कारणीभूत असतं हे एका उदाहरणाद्वारे सांगू इच्छितो.
एका व्यक्तीने रस्त्यावर पडलेले दोन दगडं उचलून घरी नेले. त्यातल्या एका दगडाला चांगला आकार देऊन त्याची देवाची मूर्ती तयार केली आणि दुसरा दगड बाहेरच पडू दिला. याठिकाणी दोन्ही दगडांचे कर्तृत्व शून्यच होते परंतु एकाच्या नशिबी हारं-फुलं आले तर दुसऱ्याच्या नशिबात नारळाचे दणकेच आले.
म्हणजे सगळंच नशिबावर सोडून मोकळं व्हावं असाही याचा अर्थ काढू नये. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या कर्तृत्वाने आणि मेहनतीनेच प्राप्त कराव्या लागतात. त्या मेहनतीला जर नशिबाची साथ मिळाली तर मात्र सोन्याहून पिवळे...!
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
gnsolunke0092@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
09) खेळ कुणाला दैवाचा कळला ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
'खेळ कुणाला दैवाचा कळला ? दैव लेख न कधी कुणा टळला ....'
हे त्रिवार सत्य आहे ...! ,
दैवाचा लेख आजवर कुणाला ही टळलेला नाही . आजवर दैव लेख कुणीही वेळेआधी वाचू शकलं नाही . याला देव सुध्दा अपवाद नाहीत , आपण तर साधारण मनुष्यच आहोत .
रामायणात एकीकडे श्री रामाच्या राज्यभिषेकाची तयारी तर दुसरीकडे रामाला वनवासात पाठविण्याचा डाव त्यांच्या सावत्र आई ने रचला . आणि लगेच रामाला वनवासात जावे लागले ..
दैवाचा लेख देवताही बदलू शकले नाही .
प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक रहस्यमय चित्रपट .. आपापल्या चित्रपटाचा प्रत्येक जण मुख्य कलाकार असतो . प्रत्येकजण आपापल्या जीवनात येणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो . जीवनात एक कोडे सोडवत नाही तोपर्यंत दूसरे तयारच असते .. असा रहस्यमय चित्रपटासारखे प्रत्येकाचे आयुष्य असते ..
'पडद्यावरील चित्रपटातील नायक नायिकेला चित्रपटाची कहाणी माहित असते.' पण प्रत्यक्ष जीवनातील भूमिका करणार्या नायक नायिकेला आपल्या जीवनाची कहाणी वेळेआधी माहित नसते .
मनुष्य जन्माला यायच्या आधीच तर
त्याचं जीवनरुपी रहस्यमय पुस्तकात दैव लेख लिहून ठेवले असतात . त्यातील काही लेख सुखाचे , काही दुःखाचे, काही आनंदाचे तर काही लेख संघर्षाचे असतात . त्यातील प्रत्येक भाग म्हणजे हिशोब असतो आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा आणि ऋणानुबंध असतो नात्यांचा .. कर्माचे फळ आणि नात्यातील ऋणानुबंध कोणालाही चुकत नाही ... मग ते नाते कोणतेही असो ...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या पुस्तकातील पाठ निरनिराळे असतात ... आणि त्यानुसार प्रत्येकाच्या परीक्षा वेगवेगळ्या असतात . म्हणून तिथं कोणी कोणाचीही नक्कल करून शकत नाही .. ज्याची त्याची परिक्षा ज्याला त्यालाच द्यावी लागते.
एकाच आईच्या कुशीतून एकाच वेळी जन्मलेले दोन जुळ्या बालकांचे भाग्य निरनिराळे असते ..
प्रत्येकाचे कर्म बंधन निरनिराळे असतात . कुणाच्या दैवामध्ये दुःखाचे क्षण जास्त तर कोणाच्या दैवामध्ये सुखाचे क्षण जास्त !
आपण सर्वत्र पाहतो एकाच घरातील भावंडे एक इंजिनिअर, एक वकील, एक शिक्षक तर एक शेतकरी . सर्वच आई-वडील आपल्या सर्वच पाल्यांना सारखेच संस्कार आणि सारखेच पालनपोषण करतात . पण प्रत्येकाला आपापले कर्मफळ खेचत असते .जिथे आपले ऋणानुबंध कर्मफळानुसार लिहलेले असतात . तिकडेच आपला कार्यभाग नेमलेला असतो .
प्रत्येक मूल त्याच्या दैव लेखाप्रमाणे घडत असते .
कुठं दैव साथ देत तर कुठं दैव पाठ फिरवतं ... कुणाला सर्वच गोष्टी सहज प्राप्त होतात तर कुणाच्या हातात येऊन निसटून जातात ..
एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते दैवा कडून परिक्षेत ८० टक्के मार्क मिळतील , आणि त्याला ९० टक्के मार्क पडतात .. आणि एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षा असते ९० टक्के मार्क मिळतील पण त्याला पडतात ८० टक्केच ! यातील एक जण खुश होतो आणि एक जण दैवाला दोष देत रहातो .
"कुणी दैवावर खुश असतं तर कुणी दैवाला आयुष्यभर दोष देत राहतं .."
तसं पाहिलं तर सुखदुःख हा खेळ असतो आपल्या मनातील विचारांचा .. दैवावर आणि एकमेकांवर ठेवलेल्या अपेक्षांचा ...
आयुष्यातील घडणाऱ्या घटनांना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर आपलं सुखदुःख अवलंबून असते . कुठल्याही घटने कडे अथवा परिस्थिती कडे आपण जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला दुःख होईल आणि जर आयुष्यात प्रत्येक घटने कडे पहायचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपण दुःखी न होता त्यातून सहज मार्ग काढू शकतो ..
गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे "जे होते ते चांगल्यासाठीच "!
अपेक्षा ठेवायच्या असतील तर फक्त आपल्या मेहनतीवर आणि विश्र्वास ठेवायचा तो आपल्या कर्मांवर !
प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ आपला दैव लेख लिहीत असते ..
भगवंताचे गीतेमधले बोल आहेत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सग्डोऽस्त्वकर्माणि।।
➖➖➖➖➖➖➖
✍🏻 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
10) नशीब
मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे असं म्हणतात. आपल्या नशिबाला
योग्य आकार देणे हे कार्य मानवाच्या शक्ती बाहेरचे नाही. जर मनुष्याने ठरवले तर तो करू शकतो. जर नाही ठरवले तर तो निष्क्रिय राहू शकतो, अथवा काहीच करू शकत नाही. मानवाला स्वतःचे भाग्य स्वतः उज्वल करायचे असेल तर त्याने आपल्या चारित्र्याचा, वर्तनाचा आपल्या हातून घडून येत असलेल्या कार्याचा आधार घ्यावा, नशिबाचा नवे. असं म्हणतात माणसाच्या मनगटातील ताकद संपली की तो नशिबाला दोष देत बसतो. परंतु हे योग्य नाही. मनुष्य हा स्वतःच्या भाग्याचा स्वतः शिल्पकार आहे. मग नशिबाला दोष का बर द्यावे?
एखादा मनुष्य अडचणीत असला किंवा संकटात असला तर त्या मनुष्याला साथ देण्याचे धाडस अपवादात्मक सोडून इतर कोणी करत नाही. अंधारात त्याची पडछाया सुद्धा त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे एखादा माणूस दूर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या मनुष्याचे पण त्याचे आप्तेष्टपण साथ सोडून देतात. आपले दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तृत आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत. माणसाची कर्तबगारी अपुरी असली तर तर त्याचा उपयोग होत नाही. आपलं नशीब आपल्या सोबत हवं असेल तर आपली कर्तबगारी मोठी असायला हवी. कारण आपलं नशीब कर्तबगारीने वाढत असते, महानता प्राप्त होते. नशीब रज:कणाचा पर्वत बिंदूचा सिंधू बनवू शकतो. असे महान कन्फ्युशिअसने म्हटले आहे. याचा अर्थ असा की एखादा रज: कण सुद्धा पर्वताच्या छोट्याशा बिंदूच्या सिंधूत रूपांतर करू शकतो. कारण मनुष्य ठरवेल तर सर्व काही होत असते. आपणच आपल्या स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हायचे असेल तर आपल्या कर्मातील दोष जाणुन घेणे आवश्यक आहे. संकटात , अडचणीत सापडलेला मनुष्य आपल्या दैवाला दोष देतो; परंतु स्वतःच्या कर्माचे दोष तो जाणून घेत नाही. आपले दोष आपल्यातील उणीवा आपणच शोधून काढल्या पाहिजे व ते दूर केले पाहिजे. तरच आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार होऊ. आपल्याला स्वतःला जिंकायचे असेल तर या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे तरच आपण स्वतःला जिंकू शकतो. मग आपल्या सारखा दुसरा नशीबवान कोणी नाही असं समजायला हरकत नाही. माणसाच्या अंगी भेकडपणा असू नये. माणूस हा दैवावर विश्वास ठेवून राहतो. म्हणजे हा केवळ भेकडपणा आहे.माणसाच्या अंगी धाडशी प्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण धाडसी लोकांना नशीब साथ देत असते. असे म्हणायला वावगे होणार नाही.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
11) नशीब नावाची गोष्ट....
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
जीवन एक रणसंग्राम आहे....अनेक सुख दुःखाच्या प्रसंगांना यात सामोरे जावे लागते.कोणत्याही प्रसंगात तोंडातून सहज शब्द बाहेर पडतो...'शेवटी नशीब'
अगदी भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनीही 'नशीब से ज्यादा और समय से पेहेले किसीं को कुछ नही मिलता...।' असा उल्लेख केलेला पाहायला मिळतो.खरे तर कोणतीही व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक सगळ्यांच्या तोंडी 'नशीब'हा शब्द ऐकायला मिळतोच....!!मग कुणी त्याला 'दैव',कुणी भाग्य तर कोणी 'सटवाई'ची रेषा म्हणतं...
मी लहान असताना कुणाच्या तरी पाचवीला जात असताना आईने सांगितलं होतं...'पाचवीच्या दिवशी पाटा पूजल्यानंतर रात्री सटवाई येऊन त्या लहान बाळाचं नशीब लिहून जाते'ते ऐकल्यानंतर मला खूप नवल वाटे...!मी त्या रात्री हमखास खूप वेळ जागे राहून सटवाई कुठं दिसते का त्याचा कानोसा घेत असे....कुठं थोडं 'खुट्ट' जरी झालं तरी 'सटवाई'आली असं वाटायचं..! सकाळी आईला विचारल्यावर आई म्हणायची ...'देव-देवता'कुठं दिसतात होय...' माझ्या मनात असे अनेक प्रश्न पडायचे..
पुढे थोडं मोठं झाल्यावर नशिबाचा खरा अर्थ समजायला लागला!!पुढे वाचन व्यासंग वाढला आणि 'माणसाचं नशिब त्याच्या मनगटात असतं' हे कळायला लागलं...!! तरी सुद्धा जेव्हा सर्व प्रयत्न करून आपण हात टेकतो आणि सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतो....'आता सारं काही दैवाच्या हाती..'
खरोखर जीवनात असे अनेक प्रसंग येतात की ,एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट,महत प्रयास करून थकून आशा सोडलेली असते आणि अचानक अशी काही दैव गती येते आणि ती अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडून जाते....किंवा कधी कधी आता 'ही'गोष्ट प्राप्त होणार असं वाटत असतानाच एखाद्या अवखळ फुलपाखरा प्रमाणे ती हाता तोंडाशी आलेली गोष्ट क्षणात दूर निघून जाते....मला वाटतं अशा 'दैवाचा'प्रत्येकाने कधी न कधी तरी अनुभूती घेतलीच असेल....कदाचित प्रत्येक जण याला वेगवेगळ्या नावाने जरी हाक मारीत असला तरी 'नशीब...नशीब'! म्हणजे ते हेच असावं!!
'जो दैवावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला..'हे वाक्य जरी खरे असले तरीही कोणत्याही प्रयत्नांना जर दैवाची साथ नसली तर ये कार्य पूर्णत्वास जाईलच याची खात्री नसते.तसे पाहिले तर 99.99टक्के प्रयत्न आणि 0.01 टक्के दैवाचा भाग हा प्रत्येक कृतीत आणि प्रसंगात दिसून येतोच.... मला तर वाटते 99.99टक्के प्रयत्नांना 0.01भाग बऱ्याचदा भारी पडतो.नाहीतर एखाद्या भीषण अपघात गाडीचा चक्काचुर होतो पण आतील प्रवाशांना साधं 'खरचटलं' देखील जात नाही ....डॉक्टरांसह सर्वांनीच आशा सोडलेली व्यक्ती खणखणीत बरी होऊन घरी परतून आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करायला लागून पुढे अनेक वर्षे आरोग्यमय जीवन जगते ...ह्या साऱ्या गोष्टी 'दैव' किंवा नशिबाचाच भाग नाही का???
आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे.प्रत्येक गोष्ट आपण बुद्धीच्या कसोटीवर घासून,सुलाखून तपासून पाहूनच विश्वास ठेवायला हवा हे जरी खरे असली तरी...प्रयत्नांच्या जोडीला दैवाची साथ नसेल तर केलेली मेहनत वाया जायलाही वेळ लागत नाही.'याची देही याची डोळा ,पाही मुक्तीचा सोहळा'असं संत वचन आहे.त्याच प्रमाणे 'राजाचा रंक ,आणि रंकाचा राजा....'झालेली अनेक उदाहरणं पहिली की सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतात..... सारा काही 'नशिबाचा खेळ आहे'!!
*शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?* कदाचित
खेळ कुणाला दैवाचा कळला?
दैवलेख ना कधी कुणा टळला!
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो!!' असं म्हणण्याची वेळ येणार नाही..!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
12) नशीब लागत
आयुष्यात प्रेम मिळायला
नशीब लागत
जगात माणसं कमवायला
नशीबच तुम्हाला
मातीतून उचलून राजा बनवते,
नशीबच भल्या भल्यांना,
धनाढ्यांना धुळीत मिळवते.
नशीब, भाग्य ,प्राक्तन, दैव असे किती अगणित नावे , आज आपण एका अगोचर आणि अगम्य विषयावर भाष्य करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्यात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. कधी कधी तर ही उत्सुकता इतकी शिगेला पोहोचते की माणूस त्याच्या करीता भरपूर खर्च ही करतो. काही लोक तर कित्येक वेगवेगळ्या ज्योतिषाचे उंबरठे झिजवत असतात. काही लोकांना प्रत्येक समस्येचे उत्तर ज्योतिषशास्त्रातच शोधायची सवय असते.
असे का? माणसा भवितव्य जाणून घेण्याची एवढी धडपड का? त्याचे सर्वात महत्वाचे मनोवैज्ञानिक कारण म्हणजे . माणसाच्या मनात असलेली अनामिक भिती. माणसाला अनिश्चिततेची, अनामिक गोष्टींची आत्यंतिक भिती वाटते. विशेषतः जेव्हा नशिबाचे फासे उलटे पडत असतात तेव्हा सकारात्मक भविष्य त्यांना मानसिक आधार देते म्हणून त्यांना आपले भवितव्य जाणून घ्यायचे असते. एवढेच नव्हे तर काहींना खात्री करून हवी असते म्हणून ते वेग वेगळ्या ज्योतिषाला भेटत असतात. काहीजण शॉर्टकट म्हणुन नशीबाचा आधार घेतात.
एकाधा व्यक्तीला सतत यश मिळाले, सर्व काही मना सारखे घडून आले तर त्याला भाग्यशाली अहे, पुर्वजन्माची पुण्याई आहे, नशिबाची साथ आहे असेही म्हणतात. तसेच उभे आयुष्य नुसत्या दुःख यातना सोसणाऱ्याना कमनशिबी म्हटले जाते .
आमचे एक स्नेही होते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. ते सरकारी अधिकारी होते. पण त्याचे वर्तविलेली कित्येक भविष्यवाणी सत्य ठरायची. पण मी आश्चर्यचकीत झाले जेव्हा त्यांची स्वतःच्या आजारा विषयीची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. त्याना पोटाचा केंसर चवथ्या स्टेज असताना,निदान झाले , डाॅक्टरांच्या मते सहा ते आठ महिनाच्या वर आयुष्य नाही. मी त्यांना किमोथेरपी शुरू केली . त्यानी मला अगदी छाती ठोकपणे सांगितले माझा मृत्यू केंसरने होणार नाही. मी काही बोलले नाही सहा महिन्याच्या किमोथेरपी नंतर त्याचा केंसर पूर्ण बरा झाला आणि तब्बल चौदा वर्ष ते जगले.
मला मात्र प्रारब्ध की पुरुषार्थ ह्याचे कोडे पडायचे. वर्तमान जीवनात घडणाऱ्या घटना पुर्वजन्माचे कर्मफळ आहेत ,तर आपल्या प्रयत्न, कर्तबगारीला काहीच अर्थ नाही. आता मात्र हे कोडे काही अंशी सुटले,आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचण, घटना ,दुर्घटनेने गांगरून न जाता त्याचा सर्व शक्तीने सामना करायचा असतो त्यातून बोधपाठ घ्यायचा असतो. त्या चुका परत होणार नाही याची दक्षता घ्यायची असते. मी नशिबाला मानतच नाही असे नव्हे, ज्योतिषशास्त्र एक शास्त्र जरी असले तरी आजच्या गल्लाभरू ज्योतिषाच्या ज्ञाना विषयी कसलीच खात्री देता येत नाही. त्यावर विसंबून राहणे मला पटत नाही. गाईडलाईन म्हणून त्याचा कडे पाहणे जास्त योग्य असे माझे मत आहे.
डाॅ.वर्षा सगदेव
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
13) नशीब
"खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो, तू असो, हा असो, कुणी असो"
गाणं आठवलं मला एकदम. खरंच आपल्या हाती काही नाही. पुढच्या क्षणी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. फक्त नशीब बलवत्तर असून चालत नाही. प्रयत्नांची पराकाष्टा पण करावी लागते त्याला.
खूप यश मिळाले की आपण सहज म्हणतो नशीबवान आहे हा. तर दुसऱ्या बाजूला एखाद्याचं लवकर लग्न जमत नसेल किंवा काही वाईट झालं तर आपण कम नशिब्याचं लेबल लावून रिकामं होतो. असं जरी असलं तरी जसं होईल तसं होईल असं म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. माझ्या नशिबात हे नाही कदाचित असं म्हणून एखाद्या गोष्टीची आस सोडून देऊन प्रयत्न करणे सोडून देणे हे चुकीचे आहे. म्हणतात ना 'प्रयत्नांती परमेश्वर'. नशिबाची साथ असावी लागते हे जरी बरोबर असले तरी फक्त नशिबावर अवलंबून राहणे नको. पूर्वीच्या काळी नव्हे आजही काही भागांमध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्मली की पांढऱ्या पायाची म्हणजेच कम नशिबी असं म्हटलं जातं स्त्रीला. हे तिच्या हातात थोडंच असतं. पुढे काय होणार, कसं होणार हे आधीच माहिती असतं तर काय मजाच नसती जगण्यामध्ये. एखाद्याचं चांगलं होणं म्हणजे खूप नशीबवान असे नाही. त्यामागे अतोनात कष्ट असतात. समजा एखाद्याचा अपघात झाला आणि तो थोडक्यात वाचला. तर तोही नशीबवानच नाही का? नशिबाची व्याख्या प्रत्येक जण आपल्या परीने करतो. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसेच एकाच माईच्या लेकरांचे नशीब सुद्धा सारखे नसते. कोण खूप हुशार असूनही थोड्या पगारावर आयुष्यभर काम करतो आणि कोणाचे नशीब कधी एकदम अल्लादिन च्या जादुई दिव्याच्या जादू प्रमाणे फळफळेल काही सांगता येत नाही.कधी राजा होईल आणि कधी भिकारी होईल तो काही सांगता येत नाही.
शेजारची रमा कंपनीत बरीच वर्षें खूप मोठ्या पोस्टवर होती. सगळेजण तिची वाहवा करत होते. पण काही वर्षांनी काय झाले कोणास ठाऊक कंपनीने तिला घरचा रस्ता दाखवला आता यात दोष कुणाचा? नशिबाचा....????
प्रिती दबडे,पुणे
9326822998
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
14) नशीब
आजचा विषय खंरच खुप छान आहे.पण विषय हि खूप खोल आहे. मी नशिबावर विश्वास ठेवते.पण त्या सोबतच कर्मावर जास्त विश्वास आहे माझा . काही प्रमानामध्ये नशिब हे कर्मावरही अवलंबून असते. असं म्हनतात एखाद्या व्यक्तीने या जन्मात चांगले कर्म केले तरी त्याला दुंख का? तर संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या तत्त्वावर मानुस जिवन जगत असतो.जरी आपण या जन्मात चांगले कर्म केले तरीसुद्धा मागच्या जन्माचे भोग आपल्या वाट्याला येतात आणि ते भोगुन द्यावे लागतात. हे जरी बरोबर असले तरी आपल्या हातातही बरेच काही आहे. परीक्षेत नापास झाल्यावर जर आपण म्हटले की माझ्या नशिबात च पास होने नव्हते तर हे चूक होईल कारनं आपण अभ्यासात कुठेतरी कमी पडलो आणि त्याचे फळ मिळायचे ते मिळाले. पण जेव्हा दोन विद्यार्थ्यांन मध्ये एक, दोन गुणांची स्पर्धा होते तेव्हा मात्र जो पुढे जातो त्याचे नशिबच म्हणावे लागेल.खुप अश्या गोष्टी आहे की त्या बरेचदा आपल्या हातात नसतात. दवाखान्यात डॉ बरेच प्रयत्न करतो पेशेंटला वाचवायचे पण शेवटी तो हि देवा वर व नशिबावर सोडून देतो. बरेचदा दारू पिऊन गाडी चालवताना माणसं मरतात आणि लोक म्हणतात त्याच मरण आलं तो मेला. पण हे चूकीचे आहे. आध्यात्मा मध्ये मृत्यू चे तीन प्रकार सांगितले आहे. एक आध्यात्मिक मृत्यू , दुसरा आदिदैविक आणि तिसरा आधिभौतिक. पहिल्या मृत्यू हा कशानेच टळत नाही उदा.कृष्णासमक्ष अभिमन्यू रणांगणावर मृत्यू मुखी पडला पण कृष्ण नाही वाचु शकला,आता दुसरा प्रकार बघा हा आहे आदिदैविक उदा.जर एखादा व्यक्ती मरणाच्या दारात असेल आणि त्याच्या साठी श्रध्देने नवस केला असेल तर तो वाचू शकतो पण तितकी ताकद त्या श्रध्देत असावि लागते. आता तिसरा प्रकार बघा.हा आधिभौतिक आहे या मध्ये कुपथ्यांने मनुष्य मरनाच्या दारातउभा राहतो जर त्याने आजारात कुठले पथ्यच पाळने नाही तर रोगी दगावतो पण इथे औषध देनारा वैद्य जर तज्ञ असेल तर रोगी या संकटातून बाहेर पडतो.म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टी वर डोळसपणे विचार करावा लागेल. नशीबाच्या पुढे माणसाला काहीच करता येत नाही . एकदा माझ्या एका मैत्रिने मला मोठ्या दिमाखात म्हटले बघ हिंगमिरे मी इतकी संपत्ती जमा करून ठेवली की तीन पिढ्या घरी बसून खाऊ शकेल . मी शांतपणे हसली आणि ती संपत्ती गोळा करने तुझ्या हातात आहे पण पिढी तयार करने त्या परमेश्वराच्या हातात आहे ती जरा कचरली. मित्रांनो शेतकरी शेत नांगरतो ,बि बियाणे आणतो पण पाणि पाडने त्या परमेश्वराच्या हातात आहे. उन्हाळ्यात जमिनी उताण्या पडतात पण जेव्हा पाऊस पडतो तेंव्हा शेतकरी आपले कर्तुत्व दाखवू शकतो. म्हणजे नशिब हे महत्त्वाचे आहे. परमेश्र्वराच्या कृपेने निव्वळ खडकास झरे फुटतात. याला नशिब नाही तर काय म्हणायचे?
सौ मेघा विनोद हिंगमिरे.शिक्षिका भारत विघालय वेळा. त हिंगणघाट जि.वर्धा.
7798159828
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
15) नशीब
अहो ऐकल का शेजारच्या वसुधा आणि शशांकने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्विफ्ट कार आणली
सगळ्यांना पेढे वाटत आहेत.सहा महिन्यापूर्वीच आलेत रहायला शेजारी नवीन बंगल्यात काय बाई लक्ष्मी पाणी भरते आहे त्यांच्या घरी नशीबवान आहेत
दोघेही असे म्हणत सुमन अशोकला नाश्त्याला वाढत होती,
अशोक ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता आज अशोकला त्याच्या प्रमोशनची बातमी कळणार होती नाष्टा करता करता अशोक म्हणाला अग त्यांना काहीआपल्यासारख्या
जबाबदाऱ्या नाहीत आपल्या दोन्ही मुलांची शिक्षण झाली, घराचे कर्ज अजून फेडतोय
मला ना आई वडिलांची प्रॉपर्टी ना लग्नात हुंडा मिळाला ना कमावती बायको मी तर कमनशिबी आहे, हे ऐकल्याबरोबर सुमन संतापली
अहो लग्नाआधी नोकरीला होते मी म्हणूनच तुम्ही लग्नाला होकार दिला होता विसरलात का तुमची आई आजारी होती वडील थकलेले म्हणून चांगली नोकरी सोडावी लागली मला त्यांच्या सेवेसाठी कमनशिबी तर मी आहे असलं घर मिळालं मला नुसतं राब राब राबते पण कदर नाही तुम्हाला.दोघांचा आवाज ऐकून अशोकचे वडील पेपरची घडी घालत बोलू लागले अरे कोणकोण आहे कमनशिबी या घरात .अरे मी तर नशीबवान आहे कर्तृत्ववान मुलगा आहे, कर्तव्यदक्ष सून आहे, आयुष्यभर न कुरकुरता साथ देणारी माझी म्हातारी बायको आहे आणी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी नात आणि नातू आहेत आणखी कोणी आहे का नशीबवान माझ्यासारखा? तेवढ्यात अशोकची आई म्हणाली मीदेखील नशीबवान आहे बर का
निर्व्यसनी मुलगा आहे,खंबीरपणे घर सांभाळणारी सून आहे. अभ्यासात सदैव पुढे असणारी नातवंड आहेत माझ्या नशिबाचा तर कुणालाही हेवा वाटेल .हे सर्व ऐकून अशोक आणि सुमन विरघळले अशोक आई बाबांचे दर्शन घेऊन ऑफिसला निघाला
सुमनने सासू सासऱ्यांना नाष्टा वाढला व स्वतःला ही वाढून घेतले.
अशा प्रकारचे संवाद आपण आपल्या शेजारी ,घरात, कामाच्या ठिकाणी नेहमीच ऐकतो
कुणाला मनासारखे शिक्षण घेता येत नाही कुणाला स्वतःचे घर घेता येत नाही कुणाला अनाथ म्हणून आई वडिलांचे प्रेम मिळत नाही कुणाला मुले असून वृद्धाश्रमात रहावे लागते आणि यासाठी सर्व आपल्या किंवा दुसऱ्यांच्या नशिबाला दोष देतात.
एडिसन या शारत्रज्ञाने हजार वेळा प्रयत्न केले आणि बल्पचा शोध लागला नशिबाला दोष देत बसला असता तर हे संशोधन करू शकला असता का? सिंधताई सपकाळ या नशिबाला दोष देत बसल्या असत्या तर आज शेकडो अनाथांच्या आई त्या झाल्या असत्या का?अनाथाश्रमला उत्पन्नाचे कोणते साधन असते सांगा पण न डगमगता मी आई आहे या अनाथ लेकराची जबाबदरी आहे या सर्वांची माझ्यावर असे म्हणत ठिकठिकाणी जाऊन आपल्या वाणीच्या सामर्थ्याने आणि मुलांसाठी मला जगायचे आहे या विश्वासावर माई जगभरातून मदत गोळा करते आहे आणि मुलांना सांभाळत आहे.
काय आहे नशीब ?नशीबाने कर्तबगारी ठरते का ?यश अपयश नशिबावर आहे का ?ज्योतिषी हात पाहुन नशिबाचे वार्तांकन करतात ते खरेच असते का
मनुष्याच्या श्रमाला कर्तव्यनिष्ठेला मग काहीच अर्थ नाही का?
निसर्गात ज्या वस्तूची निर्मिती होते तिचा अंतही होतो, प्राणी वनस्पती ,पशु यांचे प्रत्येकाचे आयुर्मान ठराविक असतेच,पेराल तसे उगवते जसे कष्ट तसे फळ
जसे विचार तसे आचरण घडते
काम, क्रोध, मद, मोह,मत्सर यामुळे मनुश्याकडून काही सतकर्मे तर काही दुषकर्मे
घडतात त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात ज्याचा स्वतःच्या सत्कर्मा वर विश्वास आहे तो नशिबाला दोषही देत नाही आणि श्रेयही देत नाही .ज्यांचा स्वतःच्या
सत्कर्मावर विश्वास नाही तेच नशिबाला दोष देण्यात व्यर्थ आयुष्य घालवतात.
एखाद्या व्यक्तीस यश मिळाले तर तो त्याचे श्रेय त्याच्या प्रयत्नांनां
देतो आणि अपयशी ठरला तर पुन्हा प्रयत्न करतो आपल्या अपयशाचे खापर इतरांवर किंवा नशिबावर फोडत नाही याचाच अर्थ विवेकबुद्धी जागृत आहे.
अशाच व्यक्ती इतिहास घडवतात
याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.आज त्यांचे विचार व आयुष्य आपणासाठी प्रेरणादायी आहे.नशिबावर विश्वास ठेऊन कोणतेही निर्णय त्यांनी घेतले नाहीत अथवा बदलले नाही.
तुम्हालाही यशस्वी व्हायचंय ,आंनदी जीवन जगायचंय मग विश्वास ठेवा सत्य,सेवा, कर्तव्य ,प्रामाणिकपणा, खडतर श्रम यावर मग नाही तुम्ही विसंबुन राहणार नशिबावर.
सविता वि साळुंके
salunkesavita42@gmail.com
श्रीरामपूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
16) नशीब:मेहनतीच्या झाडाला आलेली फळं...
"पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांच्या,
नशिबात असते सर्व काही..
जोड हवी मेहनतीची,
अन्यथा फळ नाही"
मनुष्य जन्मतःच विशिष्ट गुण, कलाकौशल्य घेऊन येत असतो यात काहीही शंका नाही पण उज्वल नशीबच घेऊन येतो या बाबीवर अजिबात विश्वास नाही.आज जगात हातावरच्या रेषा बघून कार्य करणारे भरपूर आहेत.ज्यांना हात नाही अशा ही लोकांचे 'नशीब' असतेच की,म्हणजेच आपण एखाद्याविषयी बोलतांना सर्रास बोलून जातो की,त्याचं नशीबचं चांगलं होतं म्हणून तो एवढ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहचला.नशीब हे प्रयत्नवादी व दैववादी असे त्याचे प्रकार बघावयास मिळते.'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणजे सतत नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे प्रयत्न करीत राहणाऱ्या व्यक्तीचे नशीब नक्कीच उजळून निघते कारण त्याच्या प्रयत्नाला,मेहनतीला विश्वासाची जोड असते म्हणून केवळ नशीब माझे उज्वल आहे म्हणून काहीही करत नसेल तर नशीब साथ कसे देईल???हे एक न उलघडणारे कोडंच आहे ना!!!
समाजातील,गावातील,शहरातील,चित्रपट,औद्योगिक,राजकारण या सर्व क्षेत्रातील एखादी दिग्गज किंवा सामान्य व्यक्तीचे देखील निधन झाले तर म्हणतो की,त्याचे नशीबच ठेवढं होतं.. जन्माला आल्याक्षणी नशीब घेऊन जन्माला येत नाही तर त्याच्या कर्तृत्वाला खूप महत्व आहे.मागील दोन दिवसात चित्रपट क्षेत्रातील दोन तारे निखळले त्यांचे नशीबच तेवढं होतं असं आपण म्हणतो पण त्यांच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.अभिनेता स्व.इरफान खान दुर्धर कॅन्सर सारख्या रोगाशी दोन वर्षांपासून लढा देत होते.आज सकाळी-सकाळी वाईट बातमी कानी ऐकू आली की,ऋषी कपूर देखील काळाच्या पडद्याआड गेले आहेत.याबाबतीत मला असं वाटतं की,मृत्यू आणि नशीब यांचा काहीही संबंध नसतो.आज भारतासह जगात नशिबाला दोष देतात.माझं नशीबच फुटकं आहे.एखादी दुःखद गोष्ट जीवनात आली की त्याचा थेट संबंध जोडण्याची क्रिया आपण करीत असतो.
भरपूर जण बोलतात की,त्याच्या नशिबाच्या रेषा खूप उज्वल आहे तर तोच व्यक्ती परीक्षा न देता पास होऊ शकतो का?? नाही ना!! त्याला परीक्षा द्यावीच लागते.परीक्षा देण्यासाठी मेहनत करावी लागते.'देगा हरी पलंगावरी, मी नाही जात कोणाच्या घरी' असं म्हटल्याने त्याला नशीब साथ देणार आहे का??नाही ना!!त्यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे तेव्हाच आपलं नशीब उजळू शकते अन्यथा जसे आहेत तसेच राहावं लागेल.आपल्या कार्याने,कर्तृत्वाने,मेहनतीने आपले नशीब उजळून टाकू शकतो हा उदात्त आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.'मेहनतीशिवाय फळ नाही' हेच सिद्ध होते.
आज आपल्या अवतीभोवती ज्योतिषावर विश्वास ठेवणारे दैववादी भरपूर आहेत.काही भोंदूबाबा खोटे-नाटे सांगून लुबाळून जातात.तुमच्या आयुष्यात राहू,केतू,शनी आहे त्यामुळे मनुष्य प्राणी खूप भित्रा आहे त्यांचं सांगितलेलं योग्य असेल म्हणून लगेच विश्वास ठेवतो नि सांगितलेले प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो.हातात अंगठ्या,गळ्यात ताईत, अंगारा घेणे,तीर्थयात्रा करणे यासारख्या अनेक बाबी करून नशीब उजळविण्याचा प्रयत्न करीत असतो पण जर या सर्व बाबीला मेहनतीची जोड नसेल तर 'पालथ्या घागरीवर पाणीच' आहे. कधी कधी तुम्ही गावात जिलेबी वाटा मग तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल अशा अनेक व्यक्ती नशीबाची साथ मिळण्याकरिता करीत असतो पण या सर्व गोष्टी दैववादी आहेत.श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.केवळ नशीब नशीब म्हणत कपाळावर हात ठेवून राहणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या अधोगतीला सामोरे जाणे होय.
मनुष्य जीवन जगत असतांना विविध समस्येला तोंड देत जगावे लागते त्यावेळी आपसूकच आपल्या तोंडातून शब्द फुटतो की,माझं नशीब मला साथ देत नाही.आज वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व त्यांच्या नशीबामुळे उभे नाहीत तर त्यांच्या मेहनतीच्या बळावर,विचार कौशल्यावर,संघटन वृत्तीवर,स्वभावावर अवलंबून आहे.उदा.अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कृष्णवर्णीय असून देखील त्या पदापर्यत पोहचले त्यांचे नशीब नसून मेहनतीचे फळ आहे,अनेक वर्षाची साधना आहे तसेच आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चहा विक्रेते यांचे सुपुत्र असून नशिबाने उच्च पदावर नाही तर कठोर मेहनतीच्या बळावर सर्वोच्च स्थानी पोहचू शकतो हे सिद्ध करून दाखविले आहे. कोणाच्याही नशिबात अगोदरच विधिलिखित नसते अचानक एखाद्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की त्याचं पाण्यात बुडून मरण्याचेच नशीब होतं असं म्हटल्या जाते पण योग्य नाहीच.यश मिळणे म्हणजे नशीब नव्हेच तर त्याच्या मागे मेहनतीचे अपार कष्ट आहे हे विसरता कामा नये.नशीब हे मेहनतीच्या झाडाला लागलेले फळ आहे असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
"हातावरच्या रेषा बघणारे नकोत तर हाताच्या रेषा मेहनतीने बदलविणारेच जीवनात यशस्वी होतात."
✒श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
ई-मेल:dushantnimkar15@gmail.com
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
17) दैव : प्रयत्नांती परमेश्वर
' नशिबात जे असेल ते होईल. आता देवावर हवाला.' असे मी माझ्या आजारी वडिलांजवळ बसून म्हंटले. होती तेवढी सगळी ट्रीटमेंट देऊन झाली होती. पण परिणाम शून्य होता. ही परिस्थिती बदलणे शक्य नव्हते. मग कुठेतरी आपण हतबल होतो. आणि दैववादी बनून शांत बसून राहतो.
त्या दिवशी माझा भाऊ माझ्याकडे येणार होता. कामाच्या व्यापामुळे त्याला येणे जमत नसे. एकटाच येणार म्हणून तो एस.टी.ने येणार होता. मी त्याची अगदी आतुरतेने वाट बघत होते. घड्याळाचे काटे लवकर हालत नव्हते, असे मला वाटत होते. वेळ जात नसल्यामुळे मी टीव्ही लावला. मराठी न्यूज चॅनल लावला. संवादक शिरा ताणून ताणून बोलत होता. तो एका नुकत्याच घडलेल्या एस.टी.च्या अपघाताबद्दल सांगत होता. माझे कान टवकारले गेले. तो सांगत असलेली वेळ, कुठे जाणारी गाडी, मार्ग सगळे अगदी तंतोतंत माझा भाऊ ज्या एस.टी.ने येणार होता त्याच्याशी जुळत होते. आणि माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. एस.टी. दरीत कोसळल्यामुळे त्यातून कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती. माझा तोंडाला कोरड पडली होती. हात पाय कापत होते. तसाच मी भावाला फोन लावला. फोन वर त्याचा आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला. तो म्हणत होता, "अगं, 'नशीब बलवत्तर' म्हणूनच आज माझी बस चुकली. नाही तर, खरे मी त्या बसमध्ये असायचो. आज घड्याळाचा गजर न झाल्यामुळे मी उशिरा उठलो. त्यामुळे बस चुकली. आता ह्याला दैव नाही तर काय म्हणायचे?
सीतेचे वडील मिथिला पती जनक, तेही राजघराणे. अयोध्येचा राजा दशरथ त्याचा पुत्र राम व सून सीता . यांच्या राज्याभिषेकाची वेळ येऊन ठेपली होती. पण कैकयीच्या एका वराने ती वेळ चौदा वर्षे आलीच नाही. दोघांच्या आयुष्यात राजोपभोग सोडून वनवास आला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मग ग. दि. माडगुळकर म्हणतात ,
दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा.
कुश आणि लव खरेतर इंग्लिश मध्ये म्हणतात तसे , ' Born with silver spoon'. पण त्यांचा जन्म वाल्मीकींच्या कुटीरात, वनात झाला. तेव्हा सीतेला कुटीरात लागणारे कष्ट करावे लागत होते. तसेच कुश आणि लव यांनाही करावे लागले. म्हणूनच म्हटले आहे, 'दैव जाणिले कुणी?
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी
दैव जाणिले कुणी?
ह्या सर्व गोष्टी एका दृष्टीने पाहिले तर पटतात हि. पण त्यास दुसरी बाजू ही आहे. आपल्या आयुष्यात काय घडणार, काय घडणार नाही, हे आधी ठरवणारी कुठलीही शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे ललाट लेख लिहिणे आणि त्यात बदल करण्याची शक्यताही अस्तित्वात नाही, हेही तितकेच खरे.
प्रत्येकवेळी दैवावर हवाला ठेवून निष्क्रिय बनायचे का? योग्य तो निर्णय घेऊन तो अमलात आणायचा, किंवा नवीन निर्णय घ्यायचा हे आपल्याला समजणे फार इष्ट असते. ही सजगता अतिशय आवश्यक आहे. काहीतरी हातपाय हलवायलाच पाहिजेत हे कळणेहि इष्ट च असते.
'नशीब' याचा अर्थ दोन प्रकारे सांगता येईल. एक म्हणजे जे अजिबात बदलता येत नाही ते. म्हणजे आपण स्त्री किंवा पुरुष असणे. कोणत्या घरात आपला जन्म होतो ते. आपले आई-वडील इत्यादी. दुसरा अर्थ 'प्रयत्न' आपण आपल्याला बदलवून परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. ही गोष्ट त्या मानाने सोपी आणि आनंददायी. पण समोरची परिस्थिती बदलणे अवघड असते.
आमचे आजोबा 'नशीब काढण्यासाठी' कोकणातून मुंबईला आले. म्हणजे त्यांनी आपल्या
समोरची -आजूबाजूची परिस्थिती बदलली. जिथे नोकऱ्या चांगल्या मिळतात तेथे आले. पैसा कमावला. असे 'नशीब काढले'. येथे प्रयत्न कामाला आले.
आपली मुले परदेशात जातात. तिथे खूप कष्ट करून शिक्षण घेतात आणि मग डॉलर्समध्ये कमावता. असे ते 'नशीब कमावतात' ही.
भरपूर अभ्यास करून शेखरला बारावी थोडेसे म्हणजे 89 टक्के मार्क पडले म्हणून त्याने लगेच नशिबाला बोल लावला. आमचे 'नशीब खोटे.' माझे प्रयत्न, माझ्या अभ्यासाचा रियाज कमी पडला, असे त्याच्या मनातही आले नाही.इथेच सारेच चुकते. प्रयत्न आणि नशीब याची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे.
काहीवेळा यशाचे दरवाजे अगदी सहज उघडतात. कधी आटोकाट प्रयत्न करूनही उघडत नाही. पण अशावेळी थांबायचे का? स्कूटर चालू होत नसेल तर एका पाठोपाठ एक किक आपण मारतोच ना? पुढच्या किकला स्कूटर सुरू होईल असे वाटते म्हणून . ही आशा असते. आणि खरच 50 नंतर 51 व्या किकला स्कूटर सुरू होते. आपल्याला आनंद होतो. मला वाटते प्रयत्ना पाठोपाठ नशीब पण आपोआपच येते.
चालताना वाटेत येणारा दगड हा अडथळा आहे की पायरी हे आपणच ठरवायला हवे. ज्यांना ती पायरी वाटते, ते आनंदात असतात. ज्यांना ती अडथळा वाटते ते म्हणतात, "माझे 'नशीबच खडूस,' " ते स्वतःला दोष देत दुःखाला आमंत्रण देतात.
बरेचदा आयुष्यातील सुख दु:खांना आपणच जबाबदार असतो. बरेचदा नशीब आपले दार ठोठवायला येते. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. किंवा 'तो' आतला आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मग 'नशीब पाठ फिरवून निघून जाते'. नशीब किंवा संधी एकदाच दार ठोठावते. गेलेली वेळ परत येत नाही.
मला वाटते प्रयत्न आणि दैव किंवा नशीब यात जास्त महत्त्व प्रयत्नाला आहे. कारण ते आपल्या हातात असतं. नशिबाने साथ दिली तर उत्तम. 94 टक्के मार्क मिळणारा आणि 96 टक्के मार्क मिळवणारा दोघांची बुद्धी एक सारखीच असते. पण आपल्याला हवा तिथे प्रवेशासाठी 96 टक्क्या ला लगेच प्रवेश मिळतो .पण 94 वाल्याला मिळतोच असे नाही. येथे मला वाटते प्रयत्नांना नशिबाची साथ लागते. अशी नशिबाने साथ दिली तर उत्तम. नाहीतर ती मिळेपर्यंत उत्साहाने लढायचे. कदाचित प्रयत्नच आपले 'नशीब पालटवू' शकेल. म्हणूनच म्हटले आहे,
God help those who help themselves
प्रयत्नांती परमेश्वर.
शुभदा दीक्षित
पुणे
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
18) कोरोना व्हायरस;नशिबाला दोष देवू नका
कोरोना व्हायरस आला आहे आणि या ना त्या प्रकारे सत्यानाश करुन राहिला असून आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे.हा व्हायरस वूहानसारख्या शहरातून शेकडो किमीचा प्रवास करुन भारतात आला आहे.या व्हायरसची दहशतच माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास लोकं पाखरासारखे मरत आहेत.लोकांना सावरायलाही जागा नाही.कारण या व्हायरसवर निदान करण्यासाठी लस अजूनही प्राप्त झाली नाही.
त्रेतायुगात रामाला ज्यावेळी कैकयीने वनवास दिला.त्यावेळी लक्ष्मण कैकेयीला दोष देत होता.पण रामानं म्हटलं,
"हे लक्ष्मणा,माता कैकेयीला दोष देवू नकोस.कारण वनवास होणं हे विधीलिखीत होतं.तो वनवास आपल्या नशिबात होता."
द्वापरयुगात द्यूत खेळल्यानंतर व द्रोपदीही हरल्यावर याच प्रकारच्या द्रोपदीच्या प्रश्नाला उत्तर देतांना युधीष्ठीर तेच म्हणतो,
"द्रोपदी दुर्योधन हा आपला अनुज असून हा वनवास व अज्ञातवास विधीलिखीत आहे अर्थात आपल्या नशिबात आहे."
असे असतांना या कलियुगात एखाद्या द्रोपदी किंवा एखाद्या लक्ष्मणाने जर कोरोना का आला? असा प्रश्न केल्यास कोणीतरी म्हणतात की हा कोरोना येणे विधिलिखित होते.तो आपल्या नशिबात होता.मी बरेचदा काही लोकांच्या तोंडून हेच ऐकलंय.
अडाणी मत.देव चमत्कार करतो.या सगळ्या अंधश्रद्धा भरलेल्या.त्या चमत्कारापुढं माणुसकी हरलेली असून कोरोना जगातील कित्येक राक्षसासारखे माणसे मारत सुटलेला आहे.तरी आजही आमचे डोळे उघडलेले नाहीत.आज आमचा देव कुलूपात बंद आहे.तरीही आमचे डोळे उघडलेले नाहीत.आम्ही आजही दिव्य चमत्कारावर विश्वास करतो.कोणी होम हवन करायला सांगतात तर कोणी गाईचं मुत्र प्यायला सांगतात.तुपही लावायला सांगतात.कोणी टाळ्या वाजवायला सांगतात.तर कोणी घंट्या वाजवायला,मेणबत्ती जाळायलाही सांगतात.
टाळी वाजवणे ठीक आहे.कारण त्यातून हातात उर्जा निर्माण होवून हातावरील जंतू मारले जातात.तसेच पंतप्रधानाने लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच एकत्रीकरण करण्यासाठी मेणबत्ती,टाळीचा वापर केला.काहीतरी करण्यासाठी काहीतरी माध्यम हवं.पण होमहवन करणं हे माध्यम नाही.ते मोदी साहेबांनी सांगीतलेलं नाही.तूप किंवा गाईचं गोमुत्र कोरोना हटविण्याचं माध्यम नाही.तसंच कोरोना काही विधीलिखीत नाही.तो नशिबाचाही खेळ नाही.त्यामुळं तो येणे नशिबात होता.विधिलिखित होता.असे म्हणणे धांदात खोटे आहे.अशा अफवांना कोणीही बळी पडू नये व त्यावर विश्वास करुन वावरु नये.
मात्र आजही अडाणी मत असंच सांगत असून परिसरातील लोकं म्हणतात,
"कोरोना नशिबाचा खेळ हाये जी,तो येणार होता.म्हून आला.त्याले का घाबराचं एवळं.ज्याच्या नशिबात मरणं असन,तो मरणच.मरण चुकणार तरी आहे का?"
होय,ज्याच्या नशिबात मरण असेल,तो मरेल.मरण चुकणार नाही.पण थोडी काळजी घेतल्यास मरण काही काळ तर पुढं ढकलता येईल नं तुमचं.तुम्ही जर हाच विचार करुन बिनधास्तपणे वावरत राहिल्या,तर कोरोनाचे वाहक बनणार नाही का?कोरोना तुम्हालाही लागेल व तुमच्या घरातील लोकांनाही आणि तुमच्या परीसरातील लोकांपाठोपाठ तुमच्या देशालाही.कोरोनाची लागण तुम्हाला होणे हे काही तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही.ज्या मनूस्मृतीत माणसानं कसं वागावं हे कित्येक पिढ्यांपुर्वी लिहिलं होतं.त्या कित्येक पिढ्यांपासून तशाच प्रकारे माणसं वागत होती.कोणी विरोध करीत नसत.ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी एका झटक्यात जाळून टाकली.वेळ लावला नाही.नशीब माणसालाच घडवता येतं.कोणी चमत्कार करीत नाही वा कोणाला घडवता येत नाही.
आपण केवळ नशिबाला हवाला देवून डॉक्टरकडे गेलो नाही.तर आपण उद्या मरायचे ते आजच मरु.नव्हे तर कित्येकांना मारुन मरु मानवी बाँब बनून.ठीक आहे,तुम्हाला मरायचे आहे तर खुशाल मरा.पण ज्यांना मरायचे नाही.त्यांना मारु नका जबरदस्तीनं नशिबाच्या नावावर.कारण तुमच्यासारखंच नशिब सर्वांचंच लिहिलेलं नाही.नशीब बदलता येतं.कोरोना वाहक बनून नाही तर घरातल्या घरात बसून.हातपाय स्वच्छ ठेवून.त्यामुळं नशिबाला दोष देवू नका.नशीब घडविण्याची ताकद याक्षणी तरी तुमच्याजवळ आहे.तुम्ही घरातच बसल्यास वा स्वच्छता बाळगल्यास या कोरोनावर मात करुन वागलात काही दिवस तर काहीतरी नक्कीच करु शकाल.नशीबही तुम्हाला तुमच्या मनानुसार घडवता येईल.यात काही दुमत नाही.फक्त त्यासाठी नशीबावर अवलंबून राहू नका.अन् नशीबावर विश्वासून बाहेर पडू नका.नाहकच कोरोना वाढवून डॉक्टर,नातेवाईक,पोलिस आणि आपले सरकार यांना त्रास देवू नका.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
19) लेख
नशीब
" माझं नशिबचं फुटकं , कयम मी अशीच चडफडत राहणार." " नाही रे , माझं ना नशिबच बेकार आहे,मी असाच राहणार कायम ", " मी कीतीही अभ्यास केला ना तरीही मला पेपर अवघडचं जातो,माझं नशिबच असलं आहे "अशी अनेक वाक्ये आपण समाजात नेहमी ऐकत असतो.यावर मी नेहमी विचार करत असते.हे खरं असेलं का? माझ्यामते ही एक पळवाट आहे.
जीवन जगताना रोज सगळे चांगलच होईल ही अपेक्षा आपण गृहीत धरून कृती करत असतो.कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगला की वाईट हे कशावरून ठरते? आपल्या कृतीवर ते अवलंबून असते.आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते.काम करत असताना ध्येय न ठरवता जर जनावरांसारखे फक्त राबतच राहिलो तर दिशाहीन तारुसारखी आपली अवस्था होते व आपण भरकटतच राहतो.व शेवटी अपयशाला सामोरे जावे लागते.व आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो.नशिबाला दोष देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वतःची सुटका करुन घेणे होय.स्वतःचा नाकर्तेपणा झाकून टाकायचा असेल तर नशिबाचा हवाला देणे होय.
काही लोकं नशीब म्हणजे त्यांचे पूर्वजन्मातील पाप-पुण्य समजतात.नशीब घडवायचे असेल तर ते आपल्या हातात आहे असे मला वाटते.आपले नशीब आपण कसे काय घडवू शकतो? असे तुम्हाला वाटेल.पण ते खरेच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मन,मनगट,व मेंदूवर विश्वास हवा.तरच कोणतीही जबाबदारी आपण लिलया पेलू शकतो.अपयश आले तर आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे लगेच आपल्या लक्षात येते व पुढच्या वेळी ती चुक सुधारुन आपण यशस्वी होतो.
विद्यार्थ्यांनी जर वेळच्यावेळी लक्षपूर्वक अभ्यास पूर्ण केला तर साहजिकच त्यांना परीक्षेत धवल यश संपादन होते.यात कुठेही नशिबाचा, दैवाचा भाग येत नाही." कर नाही त्याला डर कशाला " अशी गत प्रयत्नशील व्यक्तीची होते." प्रयत्नांती परमेश्वर" हे ही तेवढेच खरे आहे." प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे " या उक्तीप्रमाणे दैवाचा,नशिबाचा भाग येथे गौणच आहे.म्हणून सर्वांनी नशिब , नशिब न म्हणता प्रयत्न, प्रयत्न म्हटले पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका एका सेंकदासाठी आपले नंबर गमवावे लागतात.प्रयत्न थोडेसेच कमी पडलेले असतात.हे सकारात्मक विचार करणारा खेळाडूच स्विकारु शकतो. नाहीतर बाकीचे नशिब म्हणत बसतात.
एखादी व्यक्ती आयुष्यात सफल होते.एखाद्या बाईचा संसार सुखाचा होतो.कुणाला वाईट अनुभव येतात.कुणी अयशस्वी होते.अशावेळी आपण यशस्वी लोकांना भेटून त्यांचे जीवन जवळून पाहिले तर आपल्याला ही आशेचा कीरण दिसतो.तेंव्हा कधीही निराश होऊ नका.प्रयत्न करा व यश मिळवा.सर्व संतानीही आपल्याला हेच सांगितले आहे.सर्व शास्त्रज्ञ जर नशिब, दैव करत बसले असते तर इतके शोध लागले नसते.अश्मयुगातच मानव खितपत पडला असता.वेळेचा सदुपयोग करुन घ्या.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
20) नशीब
नशीब म्हणजे प्राक्तन.जे नशिबात लिहिलेले आहे तेच घडणार.असे आपण नेहमी ऐकतो.कित्येकदा तर त्याचा अनुभव पण घेतलेला आहे.अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या मनासारख्या घडाव्याशा वाटतात पण घडण नाहीत.अनेकदा एखादी सुवर्णसंधी आपल्याला मिळते परंतु ती सफल होईलच असे नाही.आपण कितीही म्हटलं की नशीब वगैरे काही नसते पण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवावा लागतो.परंतु याचा अर्थ असा असा नाही की नशीबात आहे तेच घडणार म्हणून आपण ते घडण्याची वाट बघत बसायची.याउलट आपण आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करायचा.यश मिळेलच याची मनाशी खात्री बाळगायची.
फक्त हातावर हात ठेवून बसल्याने नशीबात सगळं चांगलं होईलच असे नाही.प्रयत्न करता करता जरी अपयश आले तरी त्याने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत राहणे हे महत्त्वाचे असते.त्यामुळे माझे नशीबच फुटके आहे किंवा खराब आहे असा दोष देऊ निष्क्रिय जीवन जगणे चुकीचे आहे.
शेवटी प्रयत्नाने ,कष्टाने आपण आपले आयुष्य घडवायचे असते.
©सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे.
संयोजक :- नासा येवतीकर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें