रविवार, 26 अप्रैल 2020

रोज एक लेख :- नववा दिवस काळ कसोटीचा

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- नववा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 27 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*विषय :- काळ कसोटीचा*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
01) काळ कसोटीचा...संकट कोरोनाचा

  "समस्या आता जीवनात
   झाल्या आहेत शंभर
   दूर सारण्यासाठीच
   मानवाने कसली कंबर"

         जीवन जगत असतांना नानातऱ्हेच्या समस्या आपल्यासमोर येऊन उभ्या होतात तेव्हा प्रथमतः कोणत्या समस्येला प्राधान्य देऊन सोडविण्यात यावी यासाठी थोडा वेळ विचारच करावे लागेल कारण की,मानव आता समस्येने ग्रासला आहे असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही.अगदी चार महिन्यांपूर्वी आलेला कोविड-19 नावाच्या विषाणूने तळमळीने कार्य करणाऱ्या संपूर्ण मानवजातीला घरी बसवले त्यामुळे भारतासह संपूर्ण जगात कोरोना नावाच्या सूक्ष्मतम अदृश्य विषाणूने मानवाला जीवन जगतांना अनेक गोष्टीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज विमानसेवा,हेलिकॉपर सेवा,रेल्वेसेवा,बससेवा इ वाहतूक सेवा बंद करून मानवाला दाराआड बंद केलेले आहे.मी धनाढ्य आहे,मी सर्वश्रेष्ठ आहे,मी महासत्ता आहे..असले सगळे मानवी जगाचे कृत्रिम भरजरी साज आणि माज एका विषाणूने उतरवून टाकले आहेत.म्हणूनच असं वाटतं की,काळ कसोटीचा आला आहे.
           प्रत्येक मनुष्य जातीला मरणाची खूप भीती वाटत असते.सध्या जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोना नावाच्या विषाणूला 'वैश्विक साथ' म्हणून घोषित केले आहे. कोरोनाचा प्रसार नि प्रचार हा मानवाच्या स्पर्शाने होत असल्याने लॉकडाऊनचा पर्याय शासनाने निवडला आहे.म्हणून देशातील सर्व उद्योग, चित्रपट, कारखानदारी, बांधकाम, शिक्षण यामधील सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आले आहे.जनतेची सुरक्षितता राखणे शासनाचे कर्तव्य असल्याने संचारबंदीचं पाऊल उचलले आहे पण 'प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात'.एकाच दृष्टीने विचार करणे वैध होणार नाही त्यामुळे संचारबंदी लागू झाल्यानंतर सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागते आहे याकडे देखील लक्ष देणे भाग आहे कारण काळ कसोटीचा आहे आणि प्रश्न कोरोनाचा असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो.
           संचारबंदी लागू झाल्याने शेतमजूर, शेतकरी यांचे प्रश्न देखील ऐरणीवर आले आहेत.भरपूर शेतकऱ्यांचे पीक शेतातच राहून गेले तर काहींचे पीक घरात आले पण अचानक खरेदी केंद्र बंद झाल्याने व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने माल विक्रीचा देखील प्रश्न निर्माण झाला.कापूस,तूर,सोयाबीन उत्पन्न विक्री न झाल्याने संसाराचा गाडा ओढण्यासाठी शेतकऱ्यांना अवजड होऊ लागले.दुसऱ्या वर्षी साठी बी-बियाणे,खते घेण्यासाठी तसेच पैसेच नसल्याने पुष्कळ समस्येला सामोरे जावे लागत आहे म्हणूनच ही परिस्थिती प्रतिकूल निर्माण होण्याला कारणीभूत कोरोना विषाणू असल्याने सामान्य जनांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे.
          संचारबंदी लागू करीत असतांना देशातील नागरिक या ना त्या कामानिमित्य बाहेर ठिकाणी गेले त्यांचे खूप हाल होत आहे.'जिथे रोजगार..तिथे कामगार' या प्रमाणे खेडी ओस पडून शहरे फुगू लागली होती पण संचारबंदी लागू झाल्यानंतर 'हातावर पोट' असलेल्या मजूर वर्गाला काम मिळेनासे झाले.कामच बंद झाले तर पैसा नाही आणि पैसा नाही तर अन्न नाही अशी उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ लागली.एवढेच नाही तर बिहार,उत्तरप्रदेश मधील अनेक स्थलांतरित मजूर रोजगाराच्या निमित्ताने आलेत पण संचारबंदीमुळे स्वगावी जाऊ शकले नाही.शेतमजूर म्हणून इतर राज्यात गेलेले ऊसतोड मजूर,मिरची तोड मजूर यांचे देखील हाल झालेत.या कोरोनाच्या सावटात मजुरवर्ग,शेतमजूर,भटक्या जमाती,स्थलांतरित,बेघर असणारे,बसस्थानकावर भीक मागणारे,कचरा वेचक,मोलकरण या सारख्या अनेकांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून म्हणता येईल की,'काळ कसोटीचा..संघर्ष उदरनिर्वाहाचाही' निर्माण झाला आहे.
         कोरोना नावाचा घातक विषाणूच्या हाहाकारमुळे सामान्य लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला.यापूर्वी देखील अशा अनेक साथीच्या आजार आलेत पण मानवाच्या मनात भीती नव्हती. आज कोरोना नावाची दहशत खूप निर्माण झाली असली तरी उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याकरिता मानवच धावून येईल हे ही तेवढेच सत्य आहे.काळ संकटाचा असला तरी संकटाच्या वेळी जात,धर्म,पंथ,भाषा यांचा कोणताही भेदभाव न करता माणुसकीच्या नात्याने 'एक हात मदतीचा..' म्हणून मानवच समोर येतो.म्हणूनच म्हणता येईल की,काळ कसोटीचा असला तरी मानवाचा वारसा संघर्षाचा असल्याने 'मानव जिंकेल नि विषाणू हरेल' हा आशावाद आहे.पुढील काही दिवस संयम बाळगणे आवश्यक आहे.मानवापुढील समस्या सोडविण्याचे सामर्थ्य अजूनही शिल्लक आहे.

✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
      चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
02) काळ कसोटीचा

तावून-सुलाखून निघण्यासाठी संकटही आलीच पाहिजेत. जीवनामध्ये आव्हानं जेव्हा निर्माण होतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने जगण्याचे बळ निर्माण होत असते. आपल्यामधील धैर्य आपल्यामधील सहनशक्ती आपल्यामधील असणारी ऊर्जा खर्‍या अर्थानं कसोटी काळांमध्ये दिसून येत असते. आज आपल्यासाठी अत्यंत कसोटीचा काळ सुरू आहे. तुमच्या आमच्यासाठी, देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी कसोटीचा काळ आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट आपल्यावर कोसळले आहे या संकटावर मात करण्यासाठी आपले मनोधैर्य खचता कामा नये. पायाला चाके लावून रस्त्याने धावणारी माणसं आज घरामध्ये बंदिस्त झालेली आहे. जीव मुठीत घेऊन वावरणारे वन्य प्राणी आज स्वातंत्र्य भोगत आहेत. कदाचित त्यांनाही प्रश्न पडला असेल की माणसे गेली कुठे..? बेफाम धावणाऱ्या गाड्या माणसाचे जथेच्या जथे, कानाच्या कंठाळा बसाव्या असे कर्कश आवाज सारा असाच अचानक शांत कसा झाला असेल असा प्रश्न त्या प्राण्यांना पडला असेल. मी माझं आणि माझ्यासाठी एवढ्याच वर्तुळात फिरणारा माणूस. डोळ्यालाही न दिसणाऱ्या विषाणूने थांबवला आहे, स्थिर केला आहे. माणसाला लागलेली सवय ही जेव्हा व्यसनात बदलते तेव्हा ती अधोगतीकडे घेऊन जात असते. प्रगतीच्या नावाखाली माणूस बेचेन झालेला होता माणूस अस्थिर झालेला होता. नको त्या गोष्टीचा अंगीकार करून फक्त धावत होता धावत होता धावत होता न थांबता धावत होता. परंतु एका लयीमध्ये चालणारा काळ कधीच थांबला नाही आणि त्याचा नियमही त्याने कधी मोडला नाही. ते वागणे या विपरीत होते. शहरी संस्कृतीचे आकर्षण, आणि पाश्चात्त्यांच्या राहणीमानाचा प्रभाव आम्हा भारतीयावर पडत होता. गती हे प्रगतीचे लक्षण असले तरी सुसाट धावणे म्हणजे गती नव्हे. आणि नेमके हेच माणूस करत होता. निसर्गावर मात करण्याची घमेंड माणसांमध्ये पूर्वीपासूनच आहे. खरं पाहिलं तर निसर्गावर मात ही निव्वळ भ्रामक कल्पना आहे. मला माणसाला न उलगडलेल्या अनेक गोष्टी या जगामध्ये आजही दडलेल्या आहेत. एक गोष्ट उलगडुन दाखवी पर्यंत दुसरा गुंता होऊन बसलेला असतो आणि अशा अनेक गुंते निसर्गाकडे आहेत. त्यामुळे या पृथ्वीवरती हक्क दाखवण्याचा मूर्खपणा किंवा मक्तेदारी केवळ माणसाने करता कामा नये. आणि जिंकल्याचा अविर्भाव तर कधीही दाखवता कामा नये. ही घमेंड मग्रुरी माणसांमध्ये दडलेली आहे. आणि त्यामुळेच धाव धाव धावणाऱ्या माणसाला लॉक डाऊन मुळे घरात बसवेनासे झाले आहे. आता मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आणि आता हीच खरी कसोटी आहे हाच खरा कसोटीचा काळ आहे. स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी आलेली ही इष्टापत्तीच आहे. कधी कमविण्याच्या निमित्तानं तर कधी शिक्षणाच्या निमित्ताने आईबापांना गावाकडे सोडून शहरात गेलेली मुले जीव वाचवण्यासाठी धाव धाव गावाकडे धावतात. शहरात जाऊन कमवलेला पैसा कधी आई बापाला दाखवला नाही परंतु आज त्याच बापाने आपल्या मुलांना दार सताड उघडे ठेवलेले आहे. त्याच मुलांसाठी आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. या अर्थाने त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. या कसोटीला तुम्ही उतरला तर तुमच्या आयुष्यात कल्याण आहे. उशिरा सुचलेले शहाणपण म्हणून तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि हा शहाणपणा स्वीकारण्याची संधी कसोटी म्हणूनच आजकालच्या मुलांनी स्वीकारणे आवश्यक आहे. वैयक्तिक माणसाच्या पातळीवरती ही कसोटी झाली.परंतु प्रशासनाच्याही पुढे एक मोठी कसोटी आहे की या बेजबाबदार माणसांना रोखून घरांमध्ये थांबवणे. स्वैर भटकण्याची सवय असणाऱ्या माणसांना घरांमध्ये थांबवणे. या साठी पोलीस दलावरती अत्यंत  जोखमीची जबाबदारी आलेली आहे. आणि खरं पाहिलं तर त्यांची देखील ही कसोटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे. राज्यातील उद्योगधंदे बंद पडले आहेत, आर्थिक बाजू कोलमडून पडली आहे. हातावर पोट असणारे लोक उपाशी मरत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शासनाने स्वीकारलेली आहे. शासनासाठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे. ची राज्यात परिस्थिती आहे तीच देशात परिस्थिती आहे संपूर्ण देश आज बंदिस्त आहे. देशातील उद्योग धंदे देखील बंद आहेत. मंदीचे सावट दिसून येत आहे. बेरोजगारीचा भस्मासूर आ वासून बसलेला दिसत आहे. देशाचे नेतृत्व वारंवार खंबीरपणाने आपल्याला संवाद साधून बळ देत आहे. काळ कधीही थांबत नाही हेच शेवटी खरे, आलेले संकट आणि आलेले दिवस जाणार आहेत. या संकटातून बाहेर पडल्यानंतर मात्र आपली मानसिक स्थिती देशोन्नतीसाठी कोणतेही आव्हान पेलणारी असली पाहिजे. आणि सध्याच्या कसोटीच्या काळामध्ये सय्यम आणि सहकार्याची भावना बजावण्याची असली पाहिजे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी एकट्याने न लढता एकमेकांच्या सहकार्याने लढू या. आणि कसोटीच्या काळातून संकटावर मात करून बाहेर पडू या.
              हणमंत पडवळ
              उस्मानाबाद.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
03) काळ आला कसोटीचा
    उपाय त्यावर विवेकाचा
  
'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' किंवा 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे' अशी वाक्ये आपण नेहमीच ऐकतो. पण तोच काळ इतका कठोर असतो याची प्रचिती सध्या आपणा सर्वांना येतेय. 
    आपण एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधी असलो तरी ज्यांनी विसावे शतक निम्म्यापेक्षा जास्त अनुभवले आहे अशा अनेक वयोवृद्ध नागरिकांशी चर्चा केली किंवा इतिहासाची कितीही पाने चाळली तरी एवढा कठीण आणि कसोटीचा काळ येऊन गेल्याचे ज्ञात नाही.
   कोरोना हा तीन अक्षरी शब्द सध्या संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवतोय. 
   यापूर्वी देखील प्लेग, दुष्काळ, भूकंप , कॉलरा अशी अनेक दिव्य आपण अनुभवली आहेत. पण चक्क तीन तीन महिने जगातील प्रगत म्हणून ओळखले जाणारे देश लॉकडाऊन  झालेत हा अनुभव मात्र मन विषन्न करणारा आहे . 
     आपल्या कुटुंबातला एक जरी सदस्य अचानक आपल्याला सोडून गेला तरी त्या दुःखाची कल्पना करवत नाही. इथे तर दररोज हजारो मृत्यू दररोज उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य आपण अनुभवत आहोत.
  चीनमधील वुहान शहरातून पडलेली एक छोटीशी ठिणगी एवढा मोठा वणवा पेटवेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
   अगदी इंग्लंड, अमेरिका, इटली,स्पेन या देशाची प्रचंड मोठी जीवितहानी झाली आहे. 
   मोठमोठे उद्योगधंदे बंद पडल्याने संपूर्ण जगासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर अजूनही लस उपलब्ध नसल्याने आणि वैद्यकीय सेवा पुरवणारेच अधिक बळी जात असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 
  देशभरातील शिक्षण संस्था, विद्यापीठे बंद असल्याने शिक्षण क्षेत्रासमोर देखील निर्माण झाले आहे. 
  विशेष म्हणजे स्वतःच्या आईच्या   मयताला मुलगा उपस्थित नाही तर मुलाच्या अंत्यसंस्काराला आई बाप उपस्थित राहू शकत नाही एवढे भयानक चित्र निर्माण झालेले दिसत आहे. 
   एका बाजूला उत्पादित झालेला शेतमाल ग्राहकांअभावी फेकून द्यावा लागत आहे तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना मिळेल त्या भावाने किराणा किंवा भाजीपाला  विकत घ्यावा लागत आहे. गावी जाण्यासाठी हजारो मजूर चातकासारखी वाट पाहत आहेत.  हजारो किलोमीटर पायी चालत आलेल्या आपल्या माणसांना आपलीच माणसे स्वीकारायला तयार नाहीत यापेक्षा कठीण काळ आणखी कोणता असू शकतो ?
   पण आजवर आलेली अनेक संकटे आपण लीलया पेलली आहेत. शासनाला सहकार्य करूया .घरातच थांबूया.आणि या संकट काळातून बाहेर येऊन पुन्हा नव्या आव्हानांना सामोरे जायला सज्ज होऊया.
   सुधाकर रामदास पाटील, ठाणे
7798963063
srp1672@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
04) *काळ कसोटीचा*

     सध्या दिसतो नव्हे तर संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना च्या संकटाने जीवनातील सर्वच क्षेत्राबाबत नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. समाजातील सर्वच स्तरातील सर्वच व्यवसायातील लोकांसमोर या संकटात जुने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातही समोर देश स्वतंत्र करण्याचे ध्येय होते. वैद्यकीय सुविधा अद्यावत नसल्याने अनेक रोगांच्या साथी त्याकाळात देश विदेशातही आरोग्यसेवा बाबत अशीच परिस्थिती होती त्यानंतर देश स्वतंत्र झाला हळूहळू देशाने मोठी प्रगती केली स्वातंत्र्यापासून आज पर्यंत महामारीत धैर्याने समोर कसे जावे. महासंकट म्हणावे असे प्रसंग देशावर आले.  मात्र आज उद्भवलेल्या कोरोना नामक विषाणू च्या भयाने संपूर्ण जगाला वेठीस धरल्याचे चित्र आहे.
 जागतिक संकटाने आपल्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली.  हे बदल कायमचे असतील किंवा तात्पुरते असतील हे समजायला अजून बराच अवकाश आहे.  मात्र कोरोणाच्या या विषारी जिवाणूने राजकीय जीवनावरही प्रभाव टाकला आहे.  जगभरच्या लोकशाही शासनव्यवस्थेत विरोधी पक्ष नावाच्या अतिशय महत्त्वाच्या घटका समोर कोरोनाने वेगळेच आव्हान उभे केले आहे. लोकशाही शासनव्यवस्थेत विरोधी पक्षांची भूमिका परंपरेने ठरली आहे. व ती म्हणजे सरकारच्या कारभारातील चुका आणि त्रुटी वगैरे समाजाच्या वेशीवर टांगले ही भूमिका जगभराच्या लोकशाही शासन व्यवस्थेतील राजकीय पक्ष यथाशक्ती निभावत होते.  कोरोणाच्या काळात ही भूमिका मागे ठेवावी लागत असून सरकारशी जास्तीत जास्त  सहकार्य ही नवी भूमिका घ्यावी लागली आहे या अभूतपूर्व बदलाची चर्चा करणे गरजेचे आहे
 भारतासारख्या लोकशाहीत अतिशय तीव्र स्वरूपाची सत्तास्पर्धा दिसून येते. १९५० साली प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ते मागच्या वर्षीच्या मे महिन्यांत संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत देशातील निवडणुकांतील स्पर्धा अधिकाधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. आता मात्र देशातील विरोधी पक्षांना वेगळ्या भूमिका घ्याव्या लागत आहेत. त्यानुसार प्रमुख विरोधी पक्ष काँगे्रसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे काँगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीसुद्धा केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी गांधींचे आभार मानले आहेत. नड्डा एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी गांधींच्या प्रकृतीची चौकशीसुद्धा केली. सरकारच्या बाजूने पंतप्रधान मोदीसुद्धा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करत असल्याचे दिसत आहे. ते देशातील मुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात असल्याचे दिसते. आजपर्यंत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर तीन व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या आहेत. यातील एक बैठक तर तब्बल चार तास चालली. यादरम्यान मोदीजी मुख्यमंत्री करत असलेल्या विविध सूचना शांतपणे ऐकत होते व सकरात्मक प्रतिसाद देत होते. केंद्र-राज्य संबंधातील सूचित ‘आरोग्य’ हा विषय राज्य सरकारांच्या यादीत असला तरी सर्व मुख्यमंत्र्यांनी याबद्दल वाद न घालता मोदींच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकण्याचे मान्य केल्याचे दिसत आहे. आजही कोरोनाचा सामना कसा करावा याबद्दल देशात मतभेद आहेच. पण, त्यांना समोर करून वादावादी करण्याची ही वेळ नाही, याबद्दल सर्व थरांत एकमत आहे. हे फार आश्वासक म्हणावे लागेल. अशी वादावादी करण्यात समाज माध्यमातील ‘ट्विटरवीर’ जरी आघाडीवर असले, तरी वरिष्ठ नेते कमालीच्या संयमाने वागत आहेत, याची दखल घेतलीच पाहिजे.
 काही वेळा देशाच्या इतिहासात अशी स्थिती निर्माण होते की, जेव्हा नेहमीचे स्पर्धेचे राजकारण पूर्णपणे मागे ठेवावे लागते व सर्व देशाच्याच अस्तित्वाला आव्हान देत असलेल्या संकटाचा सामना करावा लागतो. यासंदर्भात इंग्लंडचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे लागेल. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष सत्तेत होता व नेव्हील चेंबरलेन पंतप्रधानपदी होते. त्यांच्या शांततावादी धोरणांमुळे हिटलरचे फावले, असे अभ्यासक नमूद करतात. त्यांनी ३० सप्टेंबर, १९३८ रोजी हिटलरबरोबर वादग्रस्त ‘म्युनिक करार’ केला, ज्यामुळे हिटलरची हिंमत आणखी वाढली व दुसरे महायुद्ध अटळ झाले. दुसरे महायुद्ध ३ सप्टेंबर, १९३९ रोजी सुरू झाले. ती अभूतपूर्व परिस्थिती हाताळणे पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांना जमत नव्हते. सरतेशेवटी इंग्लंडमध्ये व्हिन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली १० मे, १९४० रोजी ‘राष्ट्रीय सरकार’ स्थापन केले, ज्यात विरोधी पक्षाचे म्हणजे मजूर पक्षाचे नेते क्लेमन्ट अॅरटली उपपंतप्रधान होते. हे सरकार २३ मे, १९४५ म्हणजे दुसरे महायुद्ध संपेपर्यंत कारभार पाहत होते. थोडक्यात म्हणजे, मे १९४० ते मे १९४५ अशी तब्बल पाच वर्षे इंग्लंडसारख्या लोकशाहीच्या माहेरघरात पक्षीय राजकारण बंद होते. दुसरे महायुद्ध संपल्याबरोबर म्हणजे जुलै १९४५ मध्ये इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. याअगोदर इंग्लंडमध्ये १९३५ साली लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. याचाच अर्थ असा की, इंग्लंडमध्ये दहा वर्षे निवडणुका किंवा पक्षीय राजकारण बंद होते. थोडक्यात म्हणजे, जर देशाला एखादे संकट भेडसावत असेल, तर तो देश पक्षीय राजकारण व निवडणुका बंद ठेवू शकतो. भारतात अजून तरी तशी स्थिती उद्भवलेली नाही. आपल्या देशात मे २०१९ मध्ये तर राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणुका झालेल्या आहेत. पुढच्या निवडणुका येईपर्यंत कोरोनाचे संकट टळलेले असेल यात शंका नाही.
 दुसरे म्हणजे, आज भारतातील विरोधी पक्ष जरी मोदी सरकारला साथ देत असले, सरकारच्या प्रत्येक योजनेला पाठिंबा देत असले, तरी त्यांनी सकारात्मक टीका करणे सोडलेले नाही. याची असंख्य उदाहरणे उपलब्ध आहेत. विरोधी पक्षांनी सरकारने घोषित केलेल्या ‘लॉकडाऊन’ला पाठिंबा दिला आहे. मात्र, सुरूवातीपासून विरोधी पक्ष व स्वयंसेवी संस्था सरकारला सांगत होत्या की, सरकारने कोरोनाबाधित ओळखण्यासाठी टेस्टिंग जास्तीत जास्त केले पाहिजे. सरकारने सुरुवातीला याकडे जरा दुर्लक्ष केले. नंतर मात्र हे टेस्टिंग कसे वाढवता येईल, याकडे खास लक्ष पुरवले. तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने जास्तीत जास्त टेस्टिंगची सामुग्री उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. सर्वांच्या समोर दक्षिण कोरियाचे उदाहरण होते व आहे. तेथे टेस्टिंग करणे एवढे सोपे करण्यात आले आहे की, त्यामुळे फार लवकर त्यांना कोरोनाबाधित ओळखता आले व त्यामुळे त्यांचे विलगीकरण करणे शक्य झाले. त्या-त्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणता आला. शिवाय विरोधी पक्षांनी सातत्याने ‘लॉकडाऊन’चा समाजातील असंघटित कामगारांवर कसा विपरीत परिणाम होत आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधत राहिले. यातून शहर व इतरत्र अडकलेल्या व काम नसलेल्यांपर्यंत सरकारला मदत पोहोचविणे शक्य झाले.
 हे सर्व मान्य करूनही एका गोष्टीचे भान ठेवले पाहिजे की, कोरोनासारखे संकट भारतानेच नव्हे, तर जगानेही कधी बघितले नव्हते. कोरोनाचा जबरदस्त आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. एवढेच नव्हे तर हा फटका समाजातील घटकांना वेगवेगळ्या तीव्रतेचा बसणार आहे.

महेंद्र सोनेवाने, गोंदिया 
तह. जिल्हा - गोंदिया
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
05) काल कसोटीचा, सिद्ध होण्याचा !
          आज जग बदललंय , जो तो धावतोय नुसता धावतोय मग ते धावन वैयक्तिक असो सामूहिक असो कि अन्य कसे धावणे.असो सर्व जन धावतायेत कधी कधी.धावणे साध्य गाठूनही देतंय कधी कधी धावणे असफलही बनवतंय  पण धावणे कोणी सोडत नाही . गोष्ट चांगली पण आहे कारण काही तरी करत राहणं हा सजीवाचा आणि पर्यायाने मानवी गुणधर्म आहे. परंतु धावण्यासाठी दिशा ही योग्य असावी नाहीतर फसगत होण्याची घोटाळा होण्याची शक्यता जास्त असते कारण काल कसोटीचा आहे .                  
आता बघा कसोटी म्हणजे परीक्षा आणि मग परीक्षा देण्यासाठी मेहनत घेऊनच परीक्षा.दिली पाहिजे . कधी कधी परीक्षेतील आपले उत्तर चूकते कारण परीक्षकाला वेगळे उत्तर अभिप्रेत असते आणि आपण वेगळे लिहिलेले असते कारण आपण गोंधळलेले असतो .आणि तोही काल कसोटीचाच असतो .कसोटी म्हणजे कधी कधी संकट असा ही कोणी अर्थ घेतात .तर कोणी आव्हान असा ही घेतात . अर्थात कसोटीला प्रत्येकाला सामोरे जावा लागते , आणि धैर्यानं कसोटीला म्हणा किंवा आव्हानाला म्हणा सामोरे गेलेच पाहिजे  तर त्या घटनेला महत्त्व प्राप्त होते.                            अगदी सोन्याचे उदा. घ्या सोन्यालाही कसोटीला उतरावेच लागते त्या शिवाय त्यास सोनेपण प्राप्त होत नाही .पाषाणाला.ही त्याच रितीने टाक्याचे घाव सोसावे लागतात त्याशिवाय त्याला मुर्तीरूप मिळत नाही थोडक्यात कसोटी , आव्हान, परीक्षा, आणि संकट यांना सामोरेसाठी मानसिकता प्रगल्भ ठेवायाला हवी , नियोजन सुनियोजित असावे.जेणेकरून कसोटीचा काल आपणाला ओलांडून जाता येईल.             कसोटी म्हणजे कस ज्या कोणा व्यक्तीच्या जीवनात म्हणा कि समूहाच्या जीवनात कसोटी काल येतो तो हेच सुचित करतो की हे क या संकटांत कसा कस धरतात .                                      पुरातन कालातीत उदा आहे महाभारतीय युद्ध संपले , युद्धिस्टिर धर्मराजा चक्रव्रती बनले आणि नंतर श्रीकृष्ण भगवान द्वारकेला जाण्याची तयारी करतात इतक्यात कुन्ती माता त्यांना भेटते भगवान जाण्याची परवानगी मागतात आणि मग ते कुन्ती मातेला म्हणतात आत्या आता काय हवं तर कुन्ती माता हे परमात्मा आम्हाला दु:ख दे . याचा अर्थ असा की  दु:खात आपण विचार करतो कि काल कसोटीचा आहे .     सध्याचा काल कसोटीचाच आहे . आणि कसोटी थोडी वेगळी कसोटी आहे जे कोणी बिचारे अहोराञ देशसेवा करतात , कोणी प्राण पणाला लावून या साथ रोगाच्या लागण झालेल्या रूग्णाना वैद्यकिय सेवा देतात . पोलिस बांधव अहोरात्र झटतात आणि देशसेवा अदा करतात कारण देशाच्या दृष्टीने काल कसोटीचा आहे .अशा या संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वर जबाबदारी.आहे कि ज्याने त्याने सध्या जाबबदारीने वागले पाहिजे सांगितलेले सर्व नियम पाळले तर या कसोटीच्या कालातून निश्चित सुटका होईल अशी अशा बालगू या !!      
   
श्री भागवत लक्ष्मण गर्कल (बीड)
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
06) *काळ कसोटीचा, विचार सचोटीचा*

मनुष्याच्या आयुष्यात चांगले-वाईट क्षण हे नेहमीच येत-जात राहतात. जोपर्यंत एखादी वाईट घटना घडणार नाही तोपर्यंत चांगल्या क्षणांचे महत्व सुद्धा आपल्याला कळणार नाही.  जीवन म्हणजे नेमकं काय ? असा प्रश्न पडला की...
"जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये, कभी ये रुलाये", 
"जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना",
"जिंदगी की यही रित है, हार के बाद हि जीत है",

यासारखी लोकप्रिय गीतं आठवायला लागतात. 
आपल्या जीवनात जर सगळं चांगलंच घडत राहीलं असतं तर आपल्याला त्याची किंमतच राहिली नसती. त्यामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःख, हसू-रडू, भय-आनंद या गोष्टी आळीपाळीने घडत असतात. जगात केवळ सुखच सुख उपभोगणारा एकही व्यक्ती नाही. त्यामुळे आलेल्या कठीण काळाला आत्मविश्वासाने, जिद्दीने सामोरे जाणे हेच गरजेचे असते आणि तेव्हाच खऱ्या यशाची, खऱ्या सुखाची प्राप्ती होत असते.
अंधाराला भेदूनच प्रकाशाचा मार्ग सापडत असतो.
सध्या कोरोना सारख्या विषाणूमुळे आपण सगळेच कठीण काळाचा सामना करत आहोत पण, याच कठीण काळाने मानवाला त्याच्या जमेच्या बाजू व  मर्यादा लक्षात आणून दिल्या. जगण्याचा खरा अर्थ आज आपल्याला कळायला लागला आहे. त्यामुळे इतकेच म्हणता येईल की, आपल्या आयुष्यात जे हि घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं असा सकारात्मक विचार घेऊन आयुष्य जगायचं असतं. कसोटीच्या काळात सुद्धा जो सचोटीने कार्य करतो त्याचे यश हे ठरलेलेच असते.

आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी हे गाणं नेहमी गुणगुणत रहा....  

"जीवन गाणे... गातच रहावे जीवन गाणे..., 
झाले गेले विसरुनी जावे पुढे-पुढे चलावे... जीवन गाणे... गातच रहावे जीवन गाणे."


गणेश सोळुंके, जालना
8390132085
gnsolunke0092@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
07) ..... जीवन सुंदर आहे ......

"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य संपविली होती.  
जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलांमुलींनी सुद्धा फार लहानसहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. जीवनात सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक येतच असतात. प्रत्येकांच्या जीवनात जसे दुःखाचे दिवस असतात तसे सुखाचे देखील असतात. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा असला पाहिजे. याबाबतीत एक कथा सांगावीशी वाटते. एक राजा होता आणि त्याने आपल्या सर्व सल्लागार मंत्र्यांना सांगितलं की, मला असा एक उपदेश सांगा जे की केंव्हाही कामाला येईल. सल्लागार लोकांनी खूप विचारांती एक चिठ्ठी लिहून दिली आणि म्हटलं की, खूप दुःख किंवा खूप सुख मिळालं तरच ही चिठ्ठी उघडायची आणि वाचायचं. राजाने ती चिठ्ठी आपल्या अंगठ्याच्या खाली ठेवली. काही दिवसांनी शत्रूने त्यांच्या राज्यावर हल्ला केला आणि राजाचा त्यात पराभव झाला. राजा शत्रूच्या तावडीत न सापडता जंगलात खुप दूर पळून गेला. राजा आता एकटाच होता, त्याच्यासोबत कोणतेच वैभव नव्हते, नोकर चाकर नव्हते, तो खूप दुखी कष्टी झाला. त्याचवेळी त्याला सल्लागार मंत्र्यांनी दिलेली चिठ्ठी आठवली. त्याने ती बाहेर काढली आणि वाचू लागला. त्यात लिहिलं होतं, ' हे ही दिवस निघून जातील. ' रोजच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. क्षणभरापूर्वी मी एक राजा होतो पण आता माझ्याजवळ काहीच नाही. पण उद्या कदाचित वेगळं असू शकते. त्या चिठ्ठीमुळे राजाच्या मनात सकारात्मक विचार आले आणि त्याने हळूहळू सैन्य जमा केले आणि आपलं गतवैभवाचे राज्य परत मिळविला. राजा आज खूपच खुश होता.तेंव्हा त्याला परत त्या चिठ्ठीची आठवण झाली, त्यात लिहिलेलं वाक्य आठवलं. राजा स्वतः शी म्हणाला आजचे उद्या राहत नाही मग ही सारी संपत्ती, धन दौलत जमा करण्यात काय अर्थ आहे. चला दान करू या असा विचार करून त्याने सर्व प्रजेला दान देऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवलं. राजा भित्रा असता किंवा त्याच्या डोक्यात नकारात्मक विचार आले असते तर तो आपले जीवन संपवून टाकलं असतं. सकारात्मक विचार हे नेहमीच आपणाला ऊर्जा देत असतात.त्याचसोबत आजचा दिवस उद्या कधीही नसतो म्हणून संघर्ष करीत जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, त्याचे जीवन सपक अळणी सारखे वाटते, त्यात कुठलीच चव नसते. म्हणून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
08) काळ कसोटिचा
     मित्रांनो आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्यला वेगवेगळ्या संकटाच सामना करावा लागतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात. जगी असा सर्व सुखी कोण आहे विचारे म्हणा.खरंच आहे. या विश्वात असा एकही व्यक्ती नाही कि जो सुखी आहे कींवा त्याला जे पाहिजे ते मिळालेच असेल म्हनुन. कुणी आर्थिक अडचणीमुळे हैराण आहेत तर कुणी आजाराला कंटाळले आहे तर कोणी मुल होत नाही म्हनुन दुंखी आहे. तर शिक्षण पूर्ण करूनही नौकरी नाही म्हनुन हताश आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच की प्रत्येकझन कुठल्यानकुठल्या कसोटी चा सामना करीत जिवन जगत आहे. आणि जिवन जगण्याची धडपड करत असतांनाच अचानक एक नवीन संकट आपल्या समोर ऐऊन उभे झाले. आणि ते म्हणजे कोरोना नावाचा संसर्गजन्य आजार. या आजाराने सगळ्या जगात थैमान घातले. अमेरिका सारख्या बलाढ्य देशात कोरोना मुळे प्रेता मागुन प्रेत घराबाहेर पडले. जनजिवन विस्कळीत झाले.विदेशातील आपले भारतवासी भारतात परतले आणि येतांना सोबत कोरोनालाही घेउन आले.त्याचा परीणाम असा झाला की त्याची लागन आता भारतात मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली.कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आम्हाला एकच गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे की आपण कुणाच्या हि संपर्कात येवु नये. हि एवढी छोटीशी गोष्ट पण‌ ती सूध्दा आपण बरोबर न पाळल्यामुळे भारतात कोरोनाचे प्रमान वाढल्या मुळे आता आपल्या देशातील जनजिवन विस्कळीत व्हायला सुरुवात झाली.याचा खुप मोठी किंमत आम्हाला मोजावि लागणार आहे.आता अन्नधान्याचा साठा खुप लोकांना वाटण्याचे काम सुरू आहे आणि जनता कोरोना मूळे आपले काम घंदे सोडून घरी बसले आहे.आता भविष्यात अन्नाचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे लग्ण,बारसे, वाढदिवसाचसारखे समारंभ करावे पण कुठलीच उधळपट्टी न करता तरच सगळ्यांना धांन्य पुरु शकेल . त्याच प्रमाने कंपन्या अडचनीत आल्यामुळे कामगार कमी करतिल . त्यामुळे कुटुंब प्रमुखाची धांदल उडेल. अश्या वेळेसघरातिल इतर सदस्यांनी न लाजता कींवा कुठलाही कमीपणा न मानता चांगल्या मार्गाने मिळेल ते काम करायला सुरुवात केली पाहिजे.तरच आपले कुटुंब जागेवर येईल. विशेष म्हणजे सर्व जनतेने कुठलाही बडेजाव पणा न करता साधे जिवन जिने गरजेचे आहे. कारण कोरोना मुळे भल्याभल्याची वाट लागली आहे.साधे जिवन‌ जगणारा व्यक्ती‌ हा भौतिक सुविधांचा जेव्हा त्याग करायला लागतो तेंव्हा तो आपोआपच निसर्गाच्या सान्निध्यात येतो . पर्यावरन संवर्धनाची आवड निर्माण होते. आणि त्यातूनच नवेनवे छंद जोपासले जाऊ लागतात. हळूहळू त्यांच्या गरजा कमी होऊ लागतात.आम्ही आमच्या देशातील समाज सुधारक बघितले तर आमच्या लक्षात येते की हे कीती सुंदर जिवन जंगले. उदा.मा.बाबा आमटे,प्रकाश बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ हे सगळे इतकं आनंदात जिवन का जगत आहे . कारण त्यांनी भौतिक सुविधांचा त्याग केला . निस्वार्थपने समाजकार्याला महत्त्वाचे स्थान दिले. आणि हाच मार्ग आम्ही पत्करला तर नक्कीच आपण देखिल या कोरोनाची लढाई जिंकु शकु आणि सगळ्या आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू शकु. मित्रांनो हे जग सुंदर आहे आनंदाने जगा आणि आपल्या सोबत इतरांनाही आनंदात ठेवा.

सौ.मेघा विनोद हिंगमिरे. शिक्षिका भारत विघालय वेळा त.हिंगणघाट जि.वर्धा.७७९८१५९८२८
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
09) *काळ कसोटीचा*
परमेश्वराने मनुष्यप्राणी निर्माण केला व जगाला सौंदर्य प्राप्त झाले निसर्गाला एक अनोखी दृष्टी मिळाली.माणसाला दिवसेन दिवस जे जे करता आले ते ते मनुष्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हे आजतागायत माणसाची स्व निर्मीती चालुच आहे. अग्नीचे ही ज्ञान नसलेला माणुस आज आकाशात मिसाईल सोडत आहे.आज माणसाकडे काय नाही?चंद्रावर घर बांधण्याची स्वप्न पाहत आहोत आपण
निसर्गावर राज्य करण्याची तयारी ठेवणारा माणुस खूपच सबल झाला आहे.इंटरनेटने अख्या जगाला एकत्र जोडून ठेवले आहे.
निसर्गाच्या विरोधात जाऊन सर्व सोयीसुविधा स्वतः साठी उपलब्ध करून घेत आहे.व्वा रे मानव!
       प्रत्येकाची वेळ असते.असे म्हणतात 
प्रत्येकाची  सहनशक्ती वेगवेगळी असते
कुठे तरी कधी तरी त्याचा स्फोट होत असतोच.सुखमय जीवन जगत असताना 
काही वेळेस जीवनात कठीण काळ येत असतो च जीवनात संघर्ष नाही असा माणुस पृथ्वीतलावर सापडणे नाही.
     स्वतःच्या जीवनाचे तर सोडा आज  पूर्ण जगात हाहाकार माजवणारी घटना 
सध्या चालु आहे व ती म्हणजे कोरोना ची.
सर्व जगाच्या तोंडचे पाणी पळवणा-या या कोरोना संसर्गाने अख्ख जग त्रस्त आहे.
दररोज मैदानावर फेरफटका मारल्या शिवाय न राहणारा माणुस स्वतः ला घरात कोंडुन घेऊन बसला आहे.जीवनात पैसा कमावण्याच्या मागे धावणारा माणुस आज मात्र करोडोचे  नुकसान सहन करायला तयार आहे.कशासाठी "स्वतःचा व कुटुंबियांचा जीव".किती दिव्यातून जात आहोत आपण ..घराच्या बाहेर पडायचे नाही,कुणाशी बोलायचे नाही,खाण्याचे सगळे नियम,मोलमजुरी करणा-या मजकुराचे शेतक-याचे हाल ...शेतात पिकलेल्या मालाला गि-हाईक मिळायला अवघड "माय खाऊ देईना बाप भीक मागू देईना "असे हाल .समाजशील प्राणी आपण एकटं राहणे ते ही घरात बंदिस्त खूप अवघड आहे हो...प्राणी पक्ष्याचा पिंज-यात डांबून ठेवणारे आपण आज मात्र आपल्याच जगण्यावरी गदा आली आहे. माणसाने माणसासाठी चालवलेले हे 
आपले माणसाचे राज्य...पण आज प्रत्येक माणुस प्रत्येक माणसापासून दुर राहतो आहे..नसता सृष्टी विनाशाची शक्यता दर्शवणा-या या कोरोनाला आपण 
पळू नाही शकणार.अशा ह्या कसोटीच्या काळात अनेक जणांची उपासमार होत आहे .घरापासून दुरावलेल्या मुलाबाळासाठी आईवडीलाचा जीव टांगणीला लागला आहे .देवाची मंदिरं देखील बंद करण्यात आली आहेत.
पूर्वी एकटा होता ...पुढे एकटा होणार आहेस याची तर जाणीव करून देत नसावेत हे दिवस....एक ना अनेक शंका येत आहेत ...हळूहळू जग विनाशाकडे वाटचाल करत आहे की काय?असे ही वाटु लागले आहे.परंतु आपण पुढील जीवन जर चांगल्या पद्धतीने निरामय 
स्वच्छंद जगू इच्छित असाल तर आजचा हा कसोटीचा काळ आपल्याला सोसल्या शिवाय शक्य नाही.
      आज जर आपण अंतर ठेवुन व एकाकीपणाने ,उदासवाणी जगलो तरच उद्या जवळीकता, एकत्रीत, मनमोकळेपणाने जगण्याचे सुंदर दिवस नक्की येतील .आजचा हा परीक्षेचा काळ जाऊ द्या..वनवास कोणालाही चुकला नाही.प्रत्येकाची ती वेळ ठरलेली असतेच.
तो कालावधी जाई पर्यंत आपण निवांत नाही.
        जगा जगू द्या तुम्ही 
        रहा ना सगळे घरात
        जीवन आहे अनमोल
        येईल सुख तुमच्या दारात 
*****************************
स्नेहलता कुलथे बीड 
मोबा.7588055882
Kulthe.lata@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
10) लेख

काळ कसोटीचा

 आज सर्व जगापुढे यक्षप्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे महामारी ठरलेला कोरोना रोगाशी कसा मुकाबला करायचा? सारे जग या पुढे हतबल झालेले आहे. कारण नकळतपणे, अज्ञानाने हा रोग पसरत आहे. विषाणूंपासून होणारा हा रोग फार महाभयंकर आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे. कोविड-19  नावाने हा रोग ओळखला जातो. कोरोनाव्हायरस च्या संपर्काने हा रोग होतो. हा रोग झालेल्या रोग्याच्या खोकल्यातून, शिंकन्याने,तो बोलत असताना त्याच्या थुंकीतून उडालेल्या तुषारांमुळे,एवढेच नव्हे तर या व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंपासून सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे हा रोग अतिशय वेगात पसरतो. मानवी साखळी द्वारे कमी वेळेत खूप मोठा प्रसार करू शकतो.चीनमधल्या वूहान या  शहरातून या रोगाची सुरुवात झाली. या रोगाची संहारकता पाहता चीनने या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी अतिशय कडक पावले उचलली. या रोगाची भयंकरता पाहून चीन देशामध्ये काम करणारे लोक भीतीने आपापल्या गावी परतू लागले. सुरुवातीला या रोगाची भयानकता लोकांच्या लक्षात आली नाही. हे लोक जिथे जिथे गेले तिथे तिथे या रोगाचा प्रसार होऊ लागला. सुरवातीला या रोगाबद्दल अनभिज्ञ असणारे लोक  त्यांच्या नकळतपणे या रोगाचा प्रसार त्या त्या देशात त्यांनी केला. हा विषाणू नवीनच असल्यामुळे याची लसही नाही. त्यामुळे अनेक लोक या रोगाला बळी पडले. चीन बरोबर फ्रान्स, इटली, स्पेन या देशांना याचा फार मोठा फटका बसला. या रोगापासून वाचण्यासाठी सर्वजण सर्वार्थाने प्रयत्न करू लागले. सर्व आरोग्य कर्मचारी प्राण पणाला लावून कामास लागले. लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तिथल्या लोकांची अवस्था पाहून मनाचा थरकाप उडत होता. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे व शेवटी दम लागून मृत्यू होणे अशी लक्षणे या रोगाची आहेत. हा कोरोनाव्हायरस  फुफ्फुसावर  हमला करत असल्यामुळे रोग्याला श्वास घ्यायला अडचण येते. सुरुवातीलाच जेव्हा घशामध्ये खवखव वाटते त्यावेळी वारंवार गरम पाणी ,चहा इत्यादी पेय जर आपण थोड्या थोड्या वेळाने पित राहिले तर या पेयाद्वारे ते विषाणू पोटात जातात व जठरातील आम्लामुळे मरून जातात.पण जर ते फुफ्फुसात गेले तर मात्र पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हा रोग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
  कोरोना एक जागतिक रोग - एक समस्या की नुसतीच भीती असा विचार करायची आता वेळ आलेली आहे. हा एक जागतिक रोग झाला आहे हे नक्की. संपूर्ण जगामध्ये ही एक फार मोठी समस्या झालेली आहे.या रोगाबद्दलची भीती सर्वांच्या मनामध्ये आहेच. पण नुसतीच भीती म्हणून याला सोडून देता येणार नाही. कारण ही आता फार मोठी गंभीर समस्या झालेली आहे. या रोगाचा सामना करण्यासाठी सर्व देशाच्या सरकारने संचारबंदी,लॉकडाउन सारखे उपाय योजलेले आहेत. नागरिकांना अलगीकरण,विलगीकरणाचा मार्ग स्विकारायला भाग पाडले जात आहेत. विविध प्रसारमाध्यमे, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामान्य जनता ओरडून, विनवून,हात जोडून लोकांना बाहेर फीरु नका म्हणून सांगत आहेत, रोगाची भयानकता समजावून सांगत आहेत.जेणेकरुन लोकं घरात बसतील. पण काही लोकं हे मनावर घ्यायलाच तयार नाहीत. त्यांना कोणत्या प्रकारे,कशा माध्यमातून समजून सांगितले तरी ते या ना त्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत.गर्दी करत आहेत.या अशा लोकांना पोलिसांनी मारसुद्धा दिला. पण लोकांचे हवे तसे सहकार्य मिळेना झाले आहे.एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा रोग अतिशय वेगात संक्रमित होत असल्याने याचे गांभीर्य लोकांना कधी समजणार? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी वेळोवेळी आपल्याला विनंती करत आहेत.घरी राहण्याचे फायदे व घराबाहेर पडल्यास कोणता धोका आहे परोपरीने समजावून सांगत आहेत.याचा जनतेने थोडातरी विचार करायला हवा.जोपर्यंत परीस्थिती आवाक्यात आहे तोपर्यंतच आपल्याला उपाययोजना करता येतील.पण जर का हा रोग तिसऱ्या स्तरावर पोहचला तर त्याला आवरणे कुणाच्याच हाती नाही. म्हणून सर्वांनी आपल्या घरातच बसणे हाच उत्तम उपाय सध्यातरी आहे.कारण हा रोग संपर्कात आल्यानंतर एकमेकांना वेगात लागण होत जाते. म्हणून आपल्याला ही साखळी तोडायची आहे.त्यासाठी घरी बसणे हाच आहे.जर कुणी बाहेर पडलेच नाहीत तर ही रोगाची साखळी वाढणार नाही व हा रोग आटोक्यात आणला जाईल.या रोगाची भिती बाळगून ही जागतिक समस्या सर्वांनी मिळून पळवून लावायची आहे.जर घरातच राहिलो तर भिती बाळगण्याचे कारणच नाही. म्हातारे लोक व लहान मुलांना या रोगापासून धोका आहे.अशांना आपण जपले पाहिजे. तरुणांनीही फालतू आत्मविश्वास न बाळगता स्वतःला जपले पाहिजे. हे विषांणूंचे तिसरे महायुद्ध आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या युद्धात आपल्याला जिंकायचे आहे.हा काळ कसोटीचा आहे.तेंव्हा आशा न सोडता निर्धाराने या रोगाला सामोरे जाऊया व देश वाचवूया.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
11) काळ आला कसोटीचा

      काळ आला कसोटीचा
      मानवजातीच्या धैर्याचा
      देऊ लढा विवेकबुद्धीने
      एकमेकांच्या सहकार्याचा
                     जगातील एका कोपर्‍यात वसलेल्या चीनमधून कोरोनाचा विषाणू जगभरात फैलावला. त्याने सर्वत्र थैमान घातलेय. नि आता तो ठाणच मांडून बसला आहे. बलशाली आणि विकसित म्हणवणाऱ्या अमेरिका इंग्लंड सारख्या देशांनाही या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूने सळो की पळो करून सोडले आहे. आर्थिक व्यवहार, उद्योगधंदे आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. किती जण मृत पावले आहेत. जगभरातील शिक्षणसंस्था, कंपन्या, सरकारी कार्यालये कुलूपबंद झाली आहेत. जगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ही प्रत्येकाला स्ट्रगल करावे लागत आहे.
          वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्या, फळे शेतात किंवा कोठारात सडले जात आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातुन पोटाची खळगी भरण्यासाठी येऊन राहिलेले मजूर, ऊसतोड कामगार भुकेकंगाल झाले आहेत. बेरोजगारीने आपले शस्त्र पाजळले आहे. आधीच महागाईने पिचलेला सामान्यवर्ग आता पूर्ण गळून पडला आहे. उद्या काय खायचे असा प्रश्न बऱ्याच कुटुंबांमध्ये सतावत आहे. वाहतूक बंद असल्याने आणि संसर्गाच्या भीतीमुळे सर्वांवर भयानक अशी परिस्थिती सर्वजण घरात बंदिस्त झाले आहेत. आपल्या घरात संशयास्पद स्थितीत दिवस कंठत आहेत. स्वातंत्र्य संपल्यातच जमा आहे. आजवर जगाने कितीतरी संकटांचा मुकाबला केला आहे, त्यातून मार्ग काढला आहे.
         महायुद्धाच्या संकटालाही निस्तरले आहे. प्लेग, स्वाइनफ्लू, इबोला, बर्डफ्लूचाही सामना केला आहे. परंतु आता हृदयात धडकी भरणारा अतिसूक्ष्म विषाणू मानवाच्या काळजात भयानक रीतीने कोरला गेला आहे. मास्क लावून नि सॅनिटायझर वापरून पूर्ण खबरदारी घेऊनही  मोठ्या रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, वार्ताहर, हॉटेलचे कुक तसेच पोलिसांनाही जे आपल्या जीवावर उदार ठेवून होऊन आपली ड्युटी निभावत असतात त्यांनाही करून आणि ग्रस्त केले आहे. विज्ञानातील संशोधकांपुढे मोठे चॅलेंज येऊन ठेपले आहे. आज बुद्धिमत्तेच्या जोरावर निसर्गावर मात करत अंतराळात उड्डाण करण्यास मानव एका विषाणूमुळे हारला आहे.
            तरीही मानव आता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा उठणार आहे. कोविड १९ चाही मुकाबला पुरेपूर करणार आहे. मानवापुढे आता जरी कसोटीचा क्षण असला तरी तो विषाणूला हारविणार आहे,पिटाळून लावणार आहे. परंतु तोवर गरज आहे फक्त सर्वांच्या सहकार्याची. सहकार्य इतकेच करायचे की घरातच बंदिस्त रहायचे आणि सरकारच्या आदेशाचे पालन करायचे.
       येऊदे लाखो संसर्गाचे विषाणू
        नेटाने आम्हीं सामना करू
        जगतो माणूस म्हणूनी सारी
        धैर्याने एकमेकांचा हात धरू

      सौ.भारती सावंत
      मुंबई
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
12) संयम आणि कसोटी

सायली तेव्हा सत्तावीस वर्षांची होती. तान्हं बाळ होतं. सुखाचा संसार चालला होता. आणि अचानक काळाने घाव घातला. तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला.दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याची प्राणज्योत मावळली होती.सगळं संपल्यासारखं वाटत होतं. नवरा चांगला कमवतो म्हणून शिकलेली असून ती नोकरी करत नव्हती. अटच होती तशी नवऱ्याची. काय करायचं?बाळासाठी तरी जगावं लागेल अशी मनाची तयारी तिने दाखवली. नवऱ्याच्या कंपनीत तिला घेण्यात आले. रमली ती नोकरीत. तिने सामना केलेला हा तिच्या जीवनातील सर्वात कठीण काळ.         
काव्या ची अवस्था थोडी वेगळी होती. कर्तबगार,हुशार. पण तिला तिची नोकरी गमवावी लागली ऑफिस मधील राजकारणामुळे. खूप डिप्रेशनमध्ये गेली होती ती. एवढी की तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. सांगण्याचा उद्देश हा की आपल्या सर्वांच्या जीवनात कठीण काळ, चढ-उतार येत असतात. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला आपण कसे तोंड देतो हे स्वबळावर अवलंबून असते.मानसिक खच्चीकरण झाले की सर्व धूसर होत जाते. पुढे जायची वाट दिसत नाही. सुख आले की त्याबरोबर दुःख न सांगता येते. पण त्याचा आपल्या जीवनशैलीवर कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्यावर असते. ऊन संपलं की सावली येते अन् सावली नंतर ऊन. सकाळ संपते आणि दुपार होते. दुपार संपून रात्र आणि रात्री नंतर परत सकाळ. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की कोणतीही गोष्ट चिरकाल नसते.क्षणभंगुर असते. 
करोनाचे महासंकट घ्या. त्यातूनही आपण सारे लवकरच बाहेर पडू. कसोटीचा काळ हा आपली परीक्षा घेणारा काळ. संयम हाच तोडगा आहे त्यावर.धैर्याने वागायचे. एक नवीन उमेद ठेवून.पुढे काय होणार हे आधीच माहिती असते तर आयुष्यात मजाच राहिली नसती.

"धबधब्याच्या पाण्यासारखं खाली पडलं तरी
हिंमतीने परत उभं रहायचं असतं.
वादळे जीवनात आली म्हणून हरायचं नसतं.
जगण्याची नवी उमेद बाळगून
लढायचं असतं.
मोठ्या धाडसाने सामोरं जायचं असतं.
स्वतःला पराभूत होऊ द्यायचं नसतं.
तुम्ही हरणार असं वाटणाऱ्या लोकांना जिंकून दाखवायचं असतं. "

प्रिती दबडे,पुणे
9326822998
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
13) काळ कसोटीचा
       मागील महिन्यापासून सारे जग  लॉकडाऊन मध्ये आहे .अनेकदा मनात डोकावून बघितले तर असं वाटतं की जगभरातील विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निसर्गाचे पुनर्स्थापन होते आहे. लॉकडाऊननंतर काय होणार ही खरोखर मोठी आणि गंभीर समस्या आहे. महामारी एका रात्रीतून संपणार नाही किंवा टाळ्या वाजवून आणि दिवे पेटवून तिची तीव्रता कमी होणार नाही. तसेच विषाणू ग्रस्त शहरे सहजपणे शांत होणार नाहीत. खेडी आणि लहान शहरात स्थलांतरित मजुरांची गर्दी झाली आहे. ते रिकाम्या खिशाने घरी परतले आहेत. ते आगामी काही महिन्यात उदरनिर्वाह कसा करतील? शेतकरी बाजारात आपली पिके कसे भेटतील ?कसे विकतील ?ट्रक वाले व वाहतुकीची साधने कुठे आहेत ?गरजेचे पण महाग साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा कुठे आहे ?बहुतांशी लहान व्यवसाय बंद आहेत. मोठे व्यवसायही ही ऑक्सिजन'वर आहेत. लाखो लोक बेरोजगार आहेत . शहरांमध्ये नोकऱ्या सुरू झाल्या तरी हे लोक विषाणू संक्रमित शहरात परत जातील का ?त्यापैकी बहुतांश शहरे अधिकृतरित्या करोना मुक्त आहेत का ?  हे लोक परतले तर त्यामुळे विषाणू हल्ल्याचा पुढील टप्पा सुरू होणार नाही का ? या अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही आणि त्यावर विचारही करत नाही .आपण काय पाहत आहोत? सहानुभूती बाळगणारे ,प्रतिक्रिया देणारे ,मानवी मन नैसर्गिक आपत्तीचा करण्यास तयार आहे का ? याचे उत्तर मागत आहे त्यात अपयश येऊ शकते.
        या आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या लोकांना मदत होऊ शकेल असे निर्णय घेण्याची ही वेळ आली आहे केंद्र सरकार व राज्य सरकारने आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला आहे पण त्यांना जास्तीत जास्त पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारा निधी आणि राष्ट्रीय आरोग्य सेवा यंत्रणेची गरज पूर्ण केली पाहिजे .आहे त्या डॉक्टरांवर कामाचा बोजा आहे म्हणून डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी मेडिकल कॉलेज ची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अत्यावश्यक सेवा करणारे कर्मचारी व सुरक्षा उपकरणे यांची सांगड घातली पाहिजे. आरोग्य सेवा व पर्यावरण रक्षण या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे .उद्योग व्यवसाय वाचवणे ,आणि  नोकऱ्या वाचवणे ,कर कपात करणे ,बँकांकडून सर्वसामान्यांना कर्जाची सहज उपलब्धता मिळवून देणे ,ज्येष्ठांची बचत वाढवणे ,पेन्शन वाढवणे गरज आहे
       यापुढील काळात आपल्या आयुष्याचे नवीन नायक म्हणजे पोलीस डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी सफाई कर्मचारी बँक ऑफिसर्स प्रशासकीय यंत्रणा ज्यांनी जोक सुरू ठेवला आहे हे असे सर्व आपल्या आयुष्याचे नायक असतील त्यांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त महत्व देणार सहाजिकच आहे आपण आशा करू शकतो की सर्व विचार आणि मूल्य नष्ट झाल्यावर ही जिवंत राहतील तिला पण एक देखील आहे की जेव्हा आपण करू जेव्हा आपण विषयांवर विषाणू वर मात करू तेव्हा आपला आयुष्य जगण्यासाठी आपण स्वतंत्र असू पण ज्यावेळी सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत काय आपण मास वापरणे सुरू ठेवू शकतो का या काळात आपण स्वत धडा घेतला आहे सोने इमेज तो नाही मीच नेहमीच आपल्या स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.
         भावी काळात सर्वांमध्ये बदल होतील आणि हे बदल सर्व जगात दिसून येतील तील कारण ही घटना प्रत्येकाचे आयुष्य बदलणारी आहे. आपले जीवन बदलण्याच्या विषाणूच्या क्षमतेमुळे संपूर्ण जग भारावून गेले आहे यापुढे आयुष्य कधीच एकसारखे राहणार नाही अशी एक तीव्र भावना निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक कल्पना मनात येते त्यापैकी आपल्या आयुष्याची गतिमंद करणे शिवाय ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे महत्व लोकांना वाटू लागेल अनावश्यक गोष्टींचा वापर कसा टाळता येईल येईल याकडे प्रत्येकाचा राहील तसेच आवश्यक गोष्टी किती मर्यादित आहे या सर्वांची जाणीव होईल. करुणा महामारी नंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे आहेत. आजवर ज्या गोष्टींना आपण महत्त्व दिला नाही त्या गोष्टी आपल्यासाठी किती गरजेच्या होत्या हे कळले. लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुडा, मृत्युसमयी अंतिम संस्कार, वास्तुशांती, सामाजिक सभा, स्नेहसंमेलने यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असायची, पण यापुढे मात्र अनावश्यक गर्दी निश्चितच कमी होईल. लोकांमध्ये हळूहळू जाणीवजागृती विकसित होईल व आरोग्य जपण्यासाठी विनाकारण गर्दी टाळण्याकडे कटाक्ष राहील. प्रत्येक कार्यक्रमाची आचार संहिता नव्याने निर्माण होईल व ती लागू करण्याकरिता लोक स्वतःहून प्रयत्न करतील. प्रत्येक व्यक्ती ती अधिकाधिक कौशल्यपूर्ण कसे होता येईल येईल यावर आपले लक्ष केंद्रित करेल. इतरांच्या मदतीशिवाय आपण आपले आयुष्य परिपूर्ण रीतीने जगण्यासाठी विविध कला जोपासना कडे सर्वसामान्यांचा कल वाढेल.
       शालेय विद्यार्थ्यांना घरी राहून अनेक गोष्टी शाळेशिवाय व शिक्षका शिवाय शिकायला मिळतील. त्याआधारे जरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येणार नाही, तरीदेखील पालक लक्ष देतील . प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळणार नाही तरीदेखील समूह संपर्क साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा विकास करता येईल .
     श्रीमती मेघा अनिल पाटील
           उपशिक्षिका
   श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.४२५४१८
मोबाईल नंबर 9665189977
ईमेलpatilmeghaapatil
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
14) काळ कसोटीचा, धैर्याने लढण्याचा

संकट टाळणं मनुष्याच्या हातात नसत परंतु संकटाचा सामना करन त्याच्या हातात असत.असेच एक कोरोनारूपी संकट जगावर आले आहेआज संपूर्ण जगात तिसरे जैविक महायुद्ध सुरू झाले आहे. कोणकोणते देश आहेत या लढाईत,कोणत्या देशाविरुद्ध
लढत आहेत,कोण आहेत सैनिक,कोणती शरत्र आहेत या युद्धात किती काळ या संकटाचा सामना करावा लागणार.असे अनेक प्रश्न मनात येत आहेत ना?
आपणास ठाऊक आहे कोरोना विरुद्ध लढाई म्हणजेच महायुद्ध संपूर्ण जग या लढाईत उतरले आहे.देशातील डॉक्टर ,पोलीस, सैनिक,आरोग्य यंत्रणा हे सर्व या संकटसमयी चे योद्धे आहेत.युद्धातील शस्त्र म्हणजे सॅनिटायझर होय.आत्तापर्यंत पृथ्वीवर समोरोसमोर अनेक लढाया झाल्या आहेत पंन ही
इतिहासातील पहिली अशी लढाई आहे जिथे सर्व जग एक बाजूने आहे आणी विशेष म्हणजे घरात लपून राहून बाहेर न पडता लढायची आहे.
  सुख वाटल्याने वाढते व दुःख सांगून हलके होते भारतीय संस्कृती हेच सांगते, परंतु कोरोना आजार झालेल्या व्यक्तीला आपण भेटायला जाऊ शकत नाही.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जाऊ शकत नाही त्याच्या कुटुंबियांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वन करू शकत नाही,खरच किती भयानक संकटाचा सामना करत आहे जग.
परदेशात अनेक भारतीय नोकरी, व्यवसाय, शिक्षण,पर्यटन आशा कारणांमुळे गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने या सर्व व्यक्ती आता परदेशात अडकल्या आहेत त्यांचे कुटुंबिय नाही भेटू शकत त्यांना.भारततही  राज्यराज्यातील लोक कामानिमित्त इतर राज्यात गेले आहेत सध्या दळणवळण बंद आहे. हातात काम नाही ,दैनंदिन गरजांसाठी पैसे नाहीं अशी स्थिती किती दिवस असेल माहिती नाही  त्यामुळे अनेक मजूर पायी आपापल्या राज्यात जायला निघाले आहेत उपासमार, आरोग्य समस्या, अपघात अशी संकटे उभी राहत आहेत त्यात आहे त्या ठिकाणी  राहणे शासनाने बंधनकारक केले आहे  त्यामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा सर्व संकटाचा सामना करावा लागतोय.लहान मुलांना कोरोनामुळे  विलगिकरणाला सामोरे जावे लागते किती काळापर्यंत एकटेपणा सहन जर शकतील ही मुले.
भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगलाच फटका बसला आहे लोकडाउनमुळे महसूल कमी झालाय शासनाच्या तिजोरीत खडखडात होत आहे,आरोग्यववस्थेवरील ताण वाढत आहे,खाजगी दवाखान्यात कोरोनापासून बचावासाठी कर्मचार्यांसाठी पुरेशी साधने नाहीत.लोकांनी गर्दी करू नये म्हणून पोलिस यंत्रणेला खूप ताण सहन करावा लागतोय,दूचाकी चारचाकी वाहने जप्तीची,तुरुंगात टाकण्याची कार्यवाही करावी लागतेय हे सर्व करताना पोलीस, डॉक्टर, परिचरिका यांनाही कोरोनाची लागण होते आहे.काही
ठिकाणी तर स्वतःच्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारासाठी जात येत नाही.एस टी कामगारांचे वेतन, शासकीय कामगारांचे वेतन
देण्यात शासनाला निधी कोठून उपलब्ध करावा प्रश्न पडलाय. 
काही खाजगी कंपन्यांनाही उत्पादन नाही वितरण नाही मग कामगारांचे वेतन कसे द्यायचे याचे संकट उभे आहे अशी अनेक संकटे कोरोनमूळे आ वासून उभी आहेत म्हणूनच हा काळ मानवाच्या कसोटीचा काळ आहे.
  कसोटी म्हणजे दीर्घकालीन संकट जे बराच काळ चालते त्यामुळंच सर्व मानवजातीला
संयमाची आवश्यकता आहे कसा येणार हा संयम आपल्या सर्वांमध्ये ?नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे संकटालाही दोन बाजू आहेत एक बाजू म्हणे आर्थिक, भावनिक, शारीरिक नुकसान आणि दुसरी बाजू म्हणजे संयम, माणुसकी, शिकवण.
  असे म्हणतात कसोटीचा काळ मनुष्याला खूप काही शिकवतो मग काय शिकलोय आपण मानव या कसोटीच्या काळात?
पृथ्वीवर प्रत्येक व्यक्ती, देश पुढे राहन्यासाठी धावत आहे कोरोनामुळे ही धावपळ थांबली आहे, प्रगतीचा अतिरेक थांबलाय, जंगली प्राण्याच्या मांसाचा मोह थांबलाय त्यांचे प्राण तरी वाचतील,निसर्गात मानवी हस्तक्षेप कमी होईल,दळणवळण थांबले आहे कारखाने बंद आहेत त्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे.मद्यपान धुम्रपान ही व्यसने दुकान बंद असल्याने कमी झालीय  माणूस कुटुंबात रमतोय.
जीवनाच्या मुख्य गरजा कमी झाल्याने ऑनलाइन खरेदी कमी झाली शेतकऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.अपघात कमी झाले .
 घरातील ताज्या सकस अन्नाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.निसर्गाने उन्मत्त झालेल्या मानवाला कोरोनाच्या रुपात चांगला धडा शिकवलाआहे
  कोरोनाच्या रुपात निसर्ग आपल्या सर्वांची कसोटी पाहत आहे या कसोटीवर आपणा सर्वांना खरे उतरायचे आहे,या संकटाकडून  माणुसकी,संयम,शिकायचे आहे .समाधान आणी हव्यास यातील फरक जाणून घ्यायचाय, देव देवळात ,मशिदीत,चर्चमध्ये नाही मानवाची सेवा करणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे , पैसा सत्ता, मालमत्ता यापेक्षा सेवा त्यागाचे मोल अधिक आहे.

सविता वि साळुंके
salunkesavita42@gmail.com
श्रीरामपूर
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
15) वेळ कसोटीची....

      डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
 

     'जीवन एक संघर्ष है
   इसे हर पल निभाना पडेगा ।।'
   माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच आपले जीवन जगत असताना अनेकदा अनेक  सुख दुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते.'सुख पाहता तिळा पाडे दुःख पर्वता एव्हढे'असे संत विभूतींनी सांगितलेलं आहे ते काही उगाच नाही.प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर आलेले संकट हे पर्वता समान भासतं..... हे नाकारून चालणार नाही.
   आपले संपूर्ण जीवनच हसू आणि असू यांचा सुरेख संगमानी बनले आहे.जीवन जगत असताना आपल्या जीवनात अनेक कसोट्यांचे  लक्षणीय क्षण येत असतात.कदाचित आपल्याला छोटे वाटणारे दुःख ज्याने ते भोगले आहे  त्यांना ते खूप मोठे वाटण्याची शक्यता असते. फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणात आलेली अडचण,शेतीसाठी आवश्यक साधने खरेदी करताना आलेली अडचण,हाती आलेलं पीक आणि अवकाळी आलेली निसर्गाची अवकृपा इतकेच कशाला सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अचानक आपल्या अति प्रिय व्यक्तीचं आपल्या मधून अचानक जाणे हे सर्व प्रसंग कसोटीचेच आहेत.अशा अनेक प्रसंगांना कमी अधिक प्रमाणांत प्रत्येकालाच सामोरे जावे लागते.अचानक आलेल्या या कसोटीच्या क्षणांना धैर्याने सामोरी जाणारी व्यक्ती यातून सहीसलामत बाहेर पडू शकते. 'सर सलामत तो पगडी पचास'असे म्हटले जाते ते उगीच नाही.
     आज जगावर आलेलं covid 19 या रोगाचे संकट देखील आपल्या सर्वांच्याच कसोटीचा फार मोठा काळ म्हणावा लागेल.संकटे  येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच.कदाचित हे कसोटीचे क्षणच आपल्याला आतून दृढ आणि सामर्थ्यवान बनवीत असतात.आपण लावलेल्या वृक्षांची काळजी घेऊनही त्यावर रोग पडण्याची आणि ती झाडं मरून जाण्याचं प्रमाण हे ज्यांचे अजिबात संगोपन न केलेल्या जंगली झाडांपेक्षा जास्त असते.कारण जंगली झाडे ऊन,वारा,पाऊस झेलत सामर्थ्यवान होऊन जगत असतात.आपल्या जीवनात येणारे कसोटीचे क्षण ही अशाच प्रकारचे असतात.जीवन हे साप शिडीच्या खेळाप्रमाणे आहे.यात यशापासून वंचित ठेवणाऱ्या भरपूर शक्यता निसर्गानेच वाटेत पेरून ठेवलेल्या असतात.....त्यांनाच आपण कसोटीचे क्षण म्हणतो.या कसोटीच्या क्षणात जो आपला विवेक जागृत ठेवून कार्य करतो तोच यातून सहीसलामत निसटतो!!!
    कसोटीचे क्षण जीवनात नाहीत अशी व्यक्ती सापडणे मुश्किल आहे कुणाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तर कुणाला असलेले वैभव ,सामर्थ्य टिकविण्याची भ्रांत...हे देखील कसोटीचे क्षणच!! फक्त तिव्रता भिन्न भिन्न म्हणूनच रामदास स्वामींनी सांगितलेलं असावे....
'जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूच शोधूनि पाहे'
   मानवी जीवनात त्याच्या अस्तित्वापासूनच covid 19 सारखे अनेक कसोटीचे क्षण आले आहेत.नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग, महायुद्धे यात हजारो, लाखो माणसे जिवानिशी गेली आहेत. अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धातही आपल्या राज्यात, देशात प्लेगच्या साथीने हजारो माणसे मरण पावली.महाराष्ट्रात सलग पडलेला व हजारो लोकांचा प्राण घेणारा ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ही कुविख्यात आहे.
  एकविसाव्या शतकात सर्वांत स्मार्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे आपण स्वतःला अगदी सुरक्षित समजून चाललो होतो. एखाद्या स्वैर उधळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन स्वैरपणे दौडत निघावं, तसे आपण सगळेच जण  सुखाच्या शोधात बेभान होऊन दौडत होतो. अचानक या वेगाने पळणाऱ्या बेफाम घोड्याच्या पायात ‘करोना विषाणू’चा अडथळा येऊन आपण नुसते धाडकन आपटलोच  नाहीत तर पुरते जखमी होऊन चारी मुंड्या चित झालो  आहोत. त्यामुळे आपली वेगात निघालेली जीवनाची स्वैर गाडी अचानक गचके देत थांबली आहे व जगातील सर्वांचीच  मती गुंग झाली आहे!
  या संकटकाळात खरी कसोटी लागते ती माणुसकीची. जीव वाचविण्यासाठी आपल्या पिलाला पायाखाली धरून पाण्याबाहेर येणाऱ्या माकडिणीची कथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे.अशा संकटांच्या काळात  आपला जीव वाचविण्यासाठी सैरभैर होऊन सैरावैरा धावणारे या माकडिणीच्या वंशातली पिल्लवळ आता अनेक रुपात दिसत आहे. आपल्या घरी आवश्यकतेपेक्षा अन्नधान्याचा साठा करून ठेवणारे, शिस्तीचे भान न ठेवता रांगा मोडून विविध दुकानातल्या वस्तू हडप करणारे, संकट काळात मयताच्या टाळूवरील लोणी हडप करणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतातच. परंतु  दुसऱ्या बाजूला स्वत:चं घरदार विसरून आजारी रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक सेवांचे ड्रायव्हर-कंडक्टर, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस, मेडिकल दुकानदार असे किती तरी लोक या संकटाचा निर्धाराने सामना करतानाही दिसत आहेत. आपण कुठल्या बाजूला असावं हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याची हीच ती कसोटीची वेळ असते! संकटे येतात आणि जातात पण अशा कसोटीच्या काळात आपली नैतिकता शाबूत ठेऊन वागणारी माणसेच खऱ्या अर्थाने समाजाचे तारणहार असतात!! म्हणून नेहमी सुख आणि दुःख दोन्ही कसोट्यांमध्ये 'हे ही दिवस जातील' या भगवान श्रीकृष्णांच्या ओळीचा विसर पडू  देऊ नये!!

             डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
16) " काळ आला कसोटीचा - कस लागेल अंर्तगुणाचा "

     मित्रांनो , माणूस कितीही प्रगती केली तरी तो काळाला हरवून त्याच्यपुढे जाऊचं शकत नाही ! कारण काळाचे रूप हे गूढ व अनाकलनिय अशा स्वरूपाचे असते . हे सत्य " त्रिकालबाधित सत्य " आहे ! असेही म्हणतात , " काल बहूतही बडा़ बलवान होता है ! " आणि हे वाक्य आता आपण अवघे जग या कोरोनाच्या स्वरूपात अनुभवत आहोत !
     जीवसृष्टी ही याच काळानुसार चालत असते . जशी काळचक्रे फिरतात तशीच जीवसृष्टी आपले स्वरूप व गती अंगीकारित असते . काळाचे हे चक्र कधी सुलट तर कधी उलट अशा दुहेरी मार्गाने फिरत असते . म्हणून हा काळच आपल्या सृष्टीजीवनाचा " कर्ताकरविता व भाग्यविधाता " असतो हे आता या कोरोनाच्या रूपात काळाने सिद्ध करून दाखवून दिले आहे ! एवढंच नाहीतर हा काळचं आपल्याला रंकाचा राजा व राजाचा रंक बनवितो हे ऐतिहासिक पुरावे व दाखले यांनी सिद्ध करून दाखवून दिलेले आहे . जशा नाण्याच्या दोन्ही बाजू भिन्न स्वरूपाची असतात . तशाच या काळाबाबतही आहे बरं का! तो एकीकडे मानवाला सर्वस्व गमावून कफल्लक करून पूर्णपणे निर्बल व आत्मविश्वासशून्य करून टाकतो . तर दुसरीकडे मानवाला आपल्या आंतरिक गुणांची पारख करायला लावून त्याच्यात जिद्द , आत्मविश्वास , उमेद , यशप्राप्तीची तृष्णा अशी अनमोल गुणबीजांची रूजवातही करत असतोच ! 

   " मानवा काळ असतो कसोटीचा
     लावण्या कस तुझ्या सचोटीचा !! "

     खरंय ! काळ आल्यावरच माणूस धडपडायला लागतो ! आपल्याकडे असलेले कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात अनुभव व आस्वाद घेत असतो . सध्या लॉकडाऊनमुळे न्हाव्याची दुकाने बंद आहेत ! मात्र माणूस गप्प बसला का ? नाही ना ! स्वतःच घरी तो स्वतःची व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची दाढी - कटिंग करतच आहे ना ! अहो , एवढंच नाहीतर तो आपल्या पत्नीला पापड , शेवया , इत्यादी कामात हातभार लावून एक आर्दश पतीची भूमिकेतून वेळही सार्थकी लावत आहे हे आपण दैनंदिन वर्तमानपत्रातून अनुभवतच आहोत ! शिवाय आपल्या कुटुंबातील सदस्यासह एकत्र येऊन जीवनातील हरवलेल्या व पारख्या झालेल्या आनंदात न्हाऊन निघत आहे , हे केवळ या कसोटीच्या काळामुळेच !! 
      
    " कोरोना तू आणला काळ संयमाचा
      निद्रिस्त मानवाच्या  आत्मचिंतनाचा !! "

     मानवाला या काळापासून खूपच मोठा धडा शिकायला मिळाला ! त्याला समजून चूकले की तोच या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तीमान नाहीये !! तर हा 
काळच आहे बलाढ्य व बलवान !! तो आता या काळाचे आक्राळ - विक्राळ अशा स्वरूपाचेही दर्शन देखील भयग्रस्त होऊनच घेत आहे.....

     शेवटी ! या सचोटीच्या काळात आपले अस्तित्व तग धरून ठेवण्यासाठी लॉकडाऊन शिवाय अन्य पर्यायही नाही ! फक्त मनात आत्मसंयम व धैर्य बाळगून या काळावर आपण मात करूया . " काळजावर दगड ठेवून आपल्याच घरात रहा ! विश्वाचे रूप आपल्याच घरात पहा !! "  " हे विश्वची माझे घर न म्हणता हे घरची माझे विश्व !!" असे म्हणून निदान ही काळचक्रे सुस्थिर होईपर्यंत तरी गुपचूप घरातील चिल्ल्या - पिल्ल्यासह शांत व सुरक्षित रहा ! बाहेर उगाचच व्यर्थ भटकून बिचाऱ्या पोलिसांना विनाकारण त्रास देऊ नकोस नि कोरोनाची शिकार होऊन इतरांना लागण देऊन निष्पाप बळींचे पातक माथी लावू नकोस !!
     
    " सर सलामत तो पगडी पच्चास !! "

     या संकट काळापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाने एक त्रीसुत्री अंगीकारावी ! (1) योग्य शाकाहार , (2) योग्य व्यायाम व प्राणायाम , (3) योग्य प्रमाणात गाढ झोप .
     या त्रीसुत्रीमुळे आपल्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढून मनातील संयम व धैर्य वृद्धींगत होणार ! आपण या सचोटीच्या काळालाही धिटाईने व आत्मविश्वासाने सामोरे निश्चितच जाऊ !! लोखंडालाही घणाचे घाव सोसल्याशिवाय एखादे रूप प्राप्त होत नाही .... मग आपण तर सजीव प्राणी आहोत ना ! आपल्या अंर्तगुणाचा कसही याच कसोटीच्या काळात लागणार आहे . तेव्हा , हे माझ्या नवा सुसज्ज हो स्वतःच्या अंर्तगुणांची कस लावायला या अशा कसोटीच्या व संकटातून स्वतःचे व इतरांचेही अस्तित्व अबाधित व कायम टिकवून ठेव ! हे कायमचे  मानवा तुझ्याचं फक्त नि फक्त तुझ्याच हातात आहे .

    " येतील वारे , जातील वारे 
      सोडू नकोस तू घर - दारे
      आजचं हे वादळही शमेल
       सुंदर विश्व तुझ्याच हिंमतीवर जमेल !! "

     शेवटी ज्याचे त्याला ठरवायचे असते हो ! या कसोटीच्या काळरूपी समुद्रात तरायचं की बुडायचं ...

अर्चना दिगांबर गरूड (स. शि.)
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552954415
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
17) लेख

कोरोनाचा काळ कसोटीचा 

कोरोना नावाची दहशत सध्या जगाने घेतली आहे.अनेक देशात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे.यातच भारतात सुद्धा कोरोनाने हळूहळू आपला प्रसार वाढविला आहे.रोजच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोनाची दहशत प्रत्येक भारतीयांच्या मनावर आदळत आहे परंतु भारत हा असा देश आहे.ज्याला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. भारत इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक संकटावर मात करत पुढे आलेला आहे.भारताच्या इतिहासात डोकावले तर अनेक संकटे भारतात आली.व प्रत्येक संकटावर मात करत भारत आज ताठ मानेने जगाच्या स्पर्धेत टिकून आहे.अठराशे च्या दशकात सुरुवातीला इंग्रज भारतात आले व दीडशे वर्षे भारतावर राज्य गाजविले. संपूर्ण भारतात स्वतःचा प्रसार वाढविला.देशातील जनतेला गुलाम बनविले.देश लुटला जाऊ लागला.या संकटावर मात करण्यासाठी सुद्धा भारतातील जनता एकत्र आली. एकजुटीने या संकटाचा सामना करत राहिली. जनसामान्यांच्या स्वातंत्र्याच्या इच्छाशक्ती पुढे इंग्रज नतमस्तक झाले व भारत सोडून निघून गेले.भारत देश स्वतंत्र झाला.तेव्हापासून आजपर्यंत भारत देश एकजुटीने,एकसंघतेने ताठपणे उभा आहे.स्वतंत्र भारताच्या 72 वर्षात अनेक छोट्या मोठ्या संकटावर मात करत आला आहे.आता सुद्धा कोरोना सारख्या विषाणूच्या विरुद्ध देश पुन्हा एकदा लढतोय.या लढ्यात संपूर्ण भारत देशातील जनता कोरोना च्या विरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी सज्ज आहे.फरक एवढाच आहे.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांना एकजुटीने रस्त्यावर उतरावे लागले होते.व कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने घरात थांबायचे आहे.केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाच्या आहे.गर्दी टाळणे,गरज नसताना घराच्या बाहेर न पडणे.समूहाने एकत्र न जमणे,स्वच्छतेच्या सवयी चे पालन करणे, लक्षणे जाणवताच त्वरीत डाॅक्टरांना दाखविणे.अशा गोष्टीचे पालन एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने करायचे आहे.भारत हा सुसंस्कृत व संस्कारित देश आहे.येथे संस्कृतीची पार्श्वभूमी लाभलेली आहे.भारताची ओळख संस्कृती व संस्कार आहे.हीच ओळख आपण कोरोनाच्या विरोधात दाखवण्याची गरज आहे.कोरोना सारखा विषाणूलाही देशाच्या जनतेच्या पुढे झुकायला लावणारी इच्छाशक्ती या देशात आहे.फक्त गरज आहे ती प्रत्येक नागरिकाने स्वतःमध्ये इच्छाशक्ती जागवण्याची.जगाच्या या संकटातून भारताला सहजपणे बाहेर काढण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.हे ओळखून प्रत्येकाने वागणे गरजेचे आहे.पुन्हा एकदा भारत देशाला ताठपणे उभे राहण्यासाठी कोरोनाला हरविणे गरजेचे आहे.म्हणून प्रत्येकजण कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला,सरकारला मदत करूया.व भारतीय जनतेच्या इच्छाशक्ती पुढे कोरानाला पळवून लावू या.

राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु पो किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
18)       हाच तो कसोटीचा काळ


सोन्याची झळाळी तेव्हाच वाढते, जेव्हा ते तावून-सुलाखून निघते. तसेच माणसाचे आहे. माणसांवर संकटे आली की तो काळ कसोटीचा असतो. त्यातून यशस्वी बाहेर पडण्यासाठी आपली वैयक्तिक क्षमता, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती, ह्याचे प्रकटीकरण होते. माणूस तावून सुलाखून बाहेर पडतो. त्यातून येणाऱ्या अनुभवातून तो बरेच काही शिकतो. आपत्ती ज्या प्रकारची असेल त्यानुसार त्याच्या अंगातील गुणांचा व शक्तीचा कस लागतो.

          शिवाजी महाराजांच्या काळातील मोगल राजे हिंदवी राज्यावर अत्याचार करून, राज्य हस्तगत करण्याच्या तयारीत होते. आपल्या हिंदवी राज्यासाठी- शिवाजी महाराजांसाठी तो काळ कसोटीचा होता. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून संघटन तयार केले. त्यांना युद्धाचे शिक्षण दिले. शौर्य, वीरता, संघटन आणि एकता या जोरावर शिवाजी महाराज यशस्वी झाले. त्यांच्या गुणांचा कस लागला होता. कसोटीच्या काळावर त्यांनी मात केली होती. इतिहासात असे कसोटीचे काळ बरेचदा येऊन गेले. आपला इतिहास संघर्षाचा आहे.

          एकोणीसशे एकसष्ठ साली पुण्यात आलेल्या पुरात अर्धेअधिक पुणे पाण्याखाली होते. त्यावेळी घरोघरी कसोटीचा काळ होता. आमचे घर पण पाण्याखाली होते. घरातल्या बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या. ज्या होत्या त्या चिखलात रुतलेल्या होत्या. अशा परिस्थितीतून बाहेर पडायला खूप वेळ लागला. धैर्याची कष्टाची कसोटीच होती. देणाऱ्याचे हातही होतेच. आम्ही केलेल्या कष्टाचे फळ मिळाले व नंतर दिसले ते दिवस सोनेरी होते.

        लातूर जवळचे किल्लारी गाव. तेथे पहाटे अचानक मोठा भूकंप झाला. त्यावेळी माझी एक मैत्रीण नवपरिणिता होती. तिची हळद निघायच्या अगोदर तिचा पती तिला दुःखाच्या खाईत लोटून कायमचा पैलतीरी निघून गेला होता. हाच तो तिच्यासाठी कसोटीचा काळ होता. तिने खंबीरपणे निर्णय घेतला. ती शहरात आली. एकीकडे नोकरी, दुसरीकडे शिकून, जीवनाच्या रणांगणात ठामपणे येऊन उभी राहिली. सलाम तिच्या कर्तृत्वाला.

          या झाल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आलेला कसोटीचा काळ. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तरी संकटे अचानक येतात. ज्यामुळे होत्याचे नव्हते होऊन जाते. जीवन उद्ध्वस्त होते. घरातल्या कर्त्या माणसाचा अवेळी, अपमृत्यु. कर्जबाजारी झाल्याने देशोधडीला लागणे, रस्त्यावर येणे. चोरी, दरोडा यामुळे घरावर नांगर फिरवला जाणे, असा आजार होणे ज्यात असतील नसतील तेवढ्या पैशांचा व्यय होणे, अशा अनेक संकटात माणसाचा कस लागतो. तो हा कसोटीचा काळ असतो. अशा काळोख्या काळातून प्रकाशात येण्यासाठी मनाची, शरीराची हिम्मत लागते. ही हिम्मत कसोटीच्या काळातून तारून नेते.

           देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा, सर्वाधिक चाललेला आणि संवेदनशील काळाचा टप्पा आता चालू आहे. तो कोरोनाव्हायरस किंवा महामारीच्या  रूपाने साऱ्या जगाला पछाडतो आहे. पाश्चात्य देशात कोरोनाचे थैमान चालू आहे. माणसे मुंग्या सारखी कोरोना खाली चिरडली जात आहेत. चिरडल्या गेलेल्या माणसांची विल्हेवाट कशी लावावी हा यक्षप्रश्न त्या त्या देशां पुढे उभा आहे. 

       आपल्या देशातही कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या ह्या  सूक्ष्म व्हायरसशी आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. हाच तो कसोटीचा काळ. प्रत्येक माणसाच्या संयमाची परीक्षा. नव्हे, संयमाचा कसोटीचा काळ. हे युद्ध मोठी मोठी अस्त्रे, अवजारे यांनी जिंकण्यासारखे नाही. या युद्धाला मर्यादित रंग युद्धभूमी नाही. सारे जग हेच रणांगण झाले आहे. या युद्धात मिलिटरी फक्त काम करते असे नाही. झोपडी ते उंची वाडे या सर्वांचा त्यात सहभाग आहे. पहिले, दुसरे महायुद्ध यात बरेच देश भरडले गेले. पण युद्धभूमी मर्यादित होती. आता जणू हे तिसरे महायुद्ध सुरू आहे. ज्यात बॉयाॅलॉजिकल हल्ला होत आहे. तो हल्ला परतावून लावण्यासाठी  घरात बसणे, माणसाने माणसापासून लांब राहणे, हेच महत्त्वाचे उपाय आहेत. गावाची स्वच्छता आणि स्वतःची स्वच्छता हे मुख्य भाग आहेतच.

          जणू हा हल्ला देशातील वुहान या गावातून केला गेला. तेथील प्रयोगशाळेत हा व्हायरस तयार केला गेला. तो कसा कोण जाणे बाहेर पडला आणि वुहान शहरात पसरला. म्हणजे दुसर्‍यासाठी खणलेल्या खड्यात स्वतः चायना पडला, असे झाले. अर्थात कोरोनाने संबंध जग व्यापले आहे, यात शंकाच नाही. सबंध जग जवळजवळ लॉक डाऊन झाले आहे. असे इतिहासात कधी घडलेच नाही. ह्या लॉक डाउनमुळे सबंध जगावर आर्थिक संकट आले आहे. कितीतरी माणसे भूकबळी चे शिकार होणार आहेत. बेरोजगारी वाढते आहे. हाच तो आपला कसोटीचा काळ आहे. आपण झाडावर उपाय योजलेले आहेतच. यातून आपण यशस्वीरीत्या बाहेर पडूच. म्हणतात ना, " हे ही दिवस जातील" प्रत्येक काळ्या  ढगाला चंदेरी किनार असतेच.

शुभदा दीक्षित पुणे 
9881062115
Shubhada09@gmail.com
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
19) कसोटीचा काळ
        दुःख, संकट,  अपयश , ठोकरा खाव्या लागणे,हे मानवी आयुष्याचे अभिन्न अंग आहेत .किंबहुना हा तर आमच्या  कसोटीचा काळा असतो. कसोटी सोन्याची होते,कथिलाची ( टीन) नाही.  तर, अशा प्रत्येक वेळी विचलित न होता, स्थिर आणि सश्रद्ध असणे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने धीरोदात्त पणे  त्यां संपूर्ण परिस्थिती कडे पहायला हवे.त्याचा आढावा घेऊन साधकबाधक विचार करून कृती करायला हवी. आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवे की कसोटीच्या काळात जेव्हा  आपण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होतो,तेव्हा च आपले सुप्त गुणांना वाव मिळतो ,आपण स्वतःच आश्चर्यचकित होतो ,इतके मानसिक बळ आपल्यात आहे ह्याचा सुखद धक्का आपल्याला बसतो.
      बहुतांशी कसोटीच्या  पोटात संधी दडलेली असते.  _Boon in disguise_ प्रत्येक यशस्वी व्यक्ति अशाच अनेक कसोटीच्या सामना करुनच यशस्वी झाली असते. त्या कसोटीत दडलेली संधीच आपल्याला उत्कर्षाची गुरुकिल्ली असते. कित्येक वेळा एकाच वेळी अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यावर त्वरित समाधानकारक तोडगा नाही निघाला तर त्याचे दूरगामी परिणाम होतात. अशा वेळी गांगरून न जाता परिस्थितीचे योग्य आकलन करणे,त्यामुळे उद्भवणाऱ्या परीणाटमचा आढावा धेणे  धीरोदात्त पणे आणि समर्थपणे परिस्थितीचा सामना करणे हेच आपल्या हातात असते.
       मी अशा अनेक परिस्थितीचा सामना केला आहे. आणि मी स्वानुभवाने सांगते की त्याने आपले व्यक्तीमत्व सोन्या सारखे लख्ख ऊजळून निघते. मी नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते तेव्हाची गोष्ट आहे. मला सकाळी आठ वाजता फोन आला की क्लासफोर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप ताबडतोब मिटविणे आवश्यक  असते नाहीतर परिस्थिती चिघळते आणि पुढे खूपच समस्या निर्माण होतात. मी लगेच रुग्णालयात पोहोचले. हाॅस्पिटलच्या  अधीक्षकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आणि परिस्थिती जाणून घेतली. आदल्या रात्री  एका एम.एलेच्या भावाने एका कर्मचार्‍यांला मारहाण केली होती. आता सर्व कर्मचारी संपावर गेले होते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बाह्य़रुग्ण भागात येऊन बोलणी करावी अशी मागणी केली होती. मी म्हटले चला जाऊ या. पण ते सर्व  अधिकारी घाबरले होते त्यांना मारहाणीची भीती वाटत होती. मी त्यांना त्वरित कारवाई करण्याचे सांगितले. मी ऑफिस मधे आहे असे त्यांना सांगितले. मी ऑफिसात गेले. ऑफिसच्या चौकीदार कडून सगळी माहिती घेतली. 
    मी हाॅस्पिटलच्या आतल्या रस्त्याने सरळ बाह्य़रुग्ण भागात गेले. मला सरळ तिथे आलेले पाहून ते कर्मचारी चपापले. मी त्यांना सांगितले की मला सगळी माहिती  मिळाली  आहे. मी तुमच्या पाठीशी आहे .आताच आपण एफ आई आर नोंदवू या. त्यावर सगळे वातावरण बदलले. लगेच त्यांनी संप मागे घेतला. सगळे आपापल्या जागेवर जाऊन कामाला लागले. माझे तिथे जाणे, त्याना आश्वासन देण्याने त्यांना धीर आला,मॅडम आपल्या सोबत आहे ह्या एका गोष्टीचा मोठा परीणाम झाला. कधी कधी असे निर्धोकपणे तातडीने घेतलेला निर्णय,शूळीचा घाव सुईवर निभावून जातो.
   डाॅ.वर्षा सगदेव
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
20) *काळ कसोटीचा*
  ” मॅडम 29 एप्रिल ला आपले जग संपणार आहे” सहावीची  एकता अगदी निरागसपणे म्हणाली. मी प्रेमाणे तिला जवळ घेत तिच्या  कोवळ्या मनाचा विचारकरून माझ्या बालपणी घडलेला प्रसंग  सांगितला.मी चौथीत असतानी माझे वर्ग शिक्षक बिसेन सरांनी सांगितले की “ आपल्या जगात स्काँयलप पडणार आहे. सर्वांनी आपल्या आपल्या घरी मना सारखे जेवण करून घ्यावे.यानंतर   आपण जगणार किंवा नाही याची शाश्वती नाही.”
   चाळीस वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर चला चित्रपटासारखा पुढे पुढे सरकू लागला. तिच्या मनाचा विचार करीत मी  एकताचे आपल्या परीने समाधान केले
सध्याच्या काळात संपूर्ण जगात अशांती पसरलेली 
आहे . थरारलेल्या वातावरणात मानव या जगात जगत  आहे.
या वेळी देशाच्या इतिहासात अशी स्थिती निर्माण होते की जेव्हा नेहमीचे स्पर्धेचे राजकारण पूर्णपणे मागे ठेवावे लागते .सर्व देशाच्याच अस्तित्वाला आव्हान देता आले असते. त्या संकटाचा सामना करावा लागतो. या संदर्भात इंग्लंडची उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे लागते. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष सत्तेत होता.  नेव्हिल चेंबरलेन पंतप्रधानपदी होते, त्यांच्या शांततावादी उपोषणामुळे हिटलर चे फावले असे अभ्यासक नमूद करतात त्यांनी 30 सप्टेंबर 38 रोजी हिटलर बरोबर वादग्रस्त  म्युनिक करार केला ज्यामुळे हिटलरची किंमत आणखी वाढली व दुसरे महायुद्ध अटळ झाले.

       देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा  आणि सर्वाधिक  कठीण काळ चाललेला. सर्वात संवेदनशील वाद आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशातच जीवन जगणे कठीण झाले आहे
      लोकशाही प्रधान देशातच नव्हे तर संपूर्ण जगातअतिशय तीव्र स्वरूपाची व्रण दिसून येते सध्याच्या काळी भारतात हातावर पोट घेऊन  आपले उपजीविका कशी जगायची याचा विचार आहे,  तिथे घेऊन आणि लोकांच्या मनात काय काय होते आणि काय नाही हे समजून येत नाही .
कोरोणाच्या जागतिक संकटाने आपल्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली आहे हे बदल कायमचे असतील किंवा तात्पुरते असतील समजायला बराचअवकाश आहे .कोरोणा या विषारी जीवाणूचे राजकीय वआर्थिकजीवनावर  प्रभाव टाकला आहे .

आजही कोरोणाचा सामना कसा करावा  यात वादावादी करण्याचीही वेळ नाही. याबद्दल सर्व थरात एकमत आहे .हे फार आवश्यक म्हणावे लागेल अशी वादावादी करण्यात तर बरे ही आघाडी वरिष्ठ नेते कमालीच्या संयमाने वागत आहेत.
आजच्या या कसोटीच्या काळात आपल्या भारतातील सर्व स्तराववरील नागरिक  जे मदत करू शकता असे नेते .अभिनेते. सामान्य नागरिक श्रीमंत आपल्या  परीने  मदत करीत आहेत, गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत, या संकटाच्या वेळी सर्व लोकांना संयमाने वागणे गरजेचे आहे.
कसोटी  आहे संयमाची, कसोटी आहे नियमांची, कसोटी आहे स्वच्छतेची कसोटी  आहे विनम्रतेची. जे जीवनात सचोटीने वागतील तेच कसोटीवर खरे उतरतील. यात तीळमात्र शंका नाही.
--------------------------------------
यशोधरा सोनेवाने गोंदिया
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
21) "कसोटीचा काळ "
कोरोनाच्या दहशतगर्द वातावरणातील " मी "आणि "माझे जग "
                       खूप मनोरंजन झाले. खूप उपहास झाला. खूप कविता झाल्या. खूप अभ्यास झाला. आणि कोरोना माणसाला जगणं शिकवून गेला असं जाहीरही झालं......  पण खरंच कोरोना जगणं शिकवून गेला का?  नाही.  तो जाणारही नाही. आपल्याला खरोखरच जगणं शिकविल्याशिवाय. कारण ह्या एका सूक्ष्म विषाणूने आज संपूर्ण जग हादरवून टाकले असले तरी आपल्यातील " मी आणि माझं जग " हा दृष्टिकोन मात्र परिदृढ आहे. प्रत्येकजण मी आणि माझ्या कुटुंबावर कोरोनाचं ( आर्थिक वा शारीरिक ) संकट येऊ नये म्हणून आपापल्या परीने योग्य ती खबरदारी घेत स्वतःला आणि कुटुंबाला जपत आहे ; हेच अपेक्षितदेखील आहे.पण कोरोनाच्या अनुषंगाने जी वेगवेगळ्या गोष्टींची साठेबाजी सुरु आहे त्याला काय म्हणायचं? अबालवृद्धांपर्यंत आज प्रत्येक जण कोरोनाच्या दहशतीने थरारलेले असताना "मी आणि माझं जग " हा दृष्टिकोनही बळावताना आपल्याला दिसतोय. 
                     कोरोनाचं हे संकट माणसाला जगणं जरी शिकवून जात असलं तरी त्यात काही लोकांचं जगणं हरवलं जातंय हे काळीज कालवणारं सत्य आहे. काही निरागस जीव कोरोनाची लागण न होताही, अन्नपाण्याची आबाळ झाल्यामुळे आपल्या जीवनापासून मुकत आहेत. तर कितीतरी कुटुंब असे आहेत कि या कोरोनारूपी भस्मासुराने गिळंकृत करून टाकलेले आहेत, कुण्यातरी तान्हुल्याची आई दुरावलीय , कोणत्यातरी कुटुंबाचा कणा मोडलाय.किती मोठे  आणि भयानक संकट आज जगावर आहे हे वेगळं सांगायची आज मला गरज वाटत नाही, त्याची  कल्पना प्रत्येकलाच आहे. अशा वेळी संकटात सापडलेल्या त्या वेदनेने भारलेल्या जीवांना बघून ज्या मनाने उद्विग्न व्हायला हवे, तेच मन सोशल मीडियावर या कोरोनारूपी भस्मासुराचा उपहास करताना बघायला मिळत आहे. आज संकटात सापडलेल्या व्यक्तीला जर तुम्ही मदत करत आहात तर काय गरज आहे तो फोटो मीडियावर पसरवून स्वतःच्या महानतेची जाहिरात करण्याची? एकीकडे आपल्याच बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मन तरी कस धजते आपलं विविध पंचपक्वान्न करून खायला? एकीकडे जगण्याची धडपड चालू असताना आपण मात्र सोशल मीडिया वर वेगवेगळे चॅलेंजेस एन्जॉय करत आहोत हे खरोखरच पाशवी नव्हे का? 
                      लॉकडाऊनच्या या दिवसांत घरात  बसण्याचा कंटाळा आलाय म्हणून कितीतरी व्यर्थ आणि खर्चिक गोष्टींच्या नादात आपण स्वतःला गुंतवतोय ; जगात उसळलेला हा कोरोनाच्या आगीचा डोह विसरून केवळ स्वतःचे मनोरंजन करतोय. आपण जर "मी आणि माझे जग " याच दृष्टीकोनाची पूजा करत असाल तर माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचे आपण आहोत का? यावर मनन करणे ही आज काळाची आणि वस्तुस्थितीची गरज आहे. 
                      "सद्रक्षणाय खलनिग्रणाय " हे ब्रीद तंतोतंत पाळत असलेले पोलीस बांधव, हाडाची काड करणारा गरीब शेतकरी, तुमचं जगणं सुखकर करणारे सफाई कामगार, डॉक्टर नर्सेस च्या रूपाने राबत असलेले दवाखान्यातील देव,  सीमेवरील सैनिक हे सगळे आपले प्राण पणाला  लावून ही लढाई लढत आपली खंबीर भूमिका बजावत आहेत. एकीकडे सर्व ताकदीनिशी होईल तेवढी मदत करणारी सामान्य जनता देखील आहे. अशा वेळी आपला हा "मी आणि माझे जग " असादृष्टिकोन मागे टाकून  " या संकटात सापडलेल्या बांधवांमधलाच एक मी पण आहे " हा दृष्टिकोन विकसित करा. घरात  बोर होणार नाही. आणि तुमच्यातला संवेदनशील माणूस जागा होईल. 
                    या कसोटीच्या काळात आज प्रत्येकाला या परिस्थितीचं गांभीर्य आणि त्यामागील भीषण वास्तव कळणे हे नितांत आवश्यक आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागा. आपलं कुटुंब सुरक्षित तर ठेवाच पण इतरांची उपासमार होणार नाही याची पूर्ण घ्या. 

 श्वेता रमेशपंत अंबाडकर
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
सर्व लेख वाचन केल्यावर आपल्याला आवडलेल्या तीन लेखकांची नावे कळवावे. 
धन्यवाद .......!
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...