*"दारूडा सहदेव"*
सहदेव नावाचा एक मोलमजूरी करून
जीवन जगत असणारा गरीब कुटुंबातील इसम होता.त्या कुटुबातील पाच भावापैकी व पाच बहिनी पैकी सर्वात धाकटा होता.
एकत्र कुटुंब असतानाच त्याचे लग्न झाले नंतर प्रत्येकजण आपोआपला संसार करू लागले त्याप्रमाणे सहदेव सुध्दा त्याच्या वाटणीला आलेल्या घरात पत्नी व तो राहु लागला.पत्नी सुध्दा गरीब कुटुंबातीलच होती.त्यामुळे दोघे एकत्रित काम करून संसाराचा गाढ़ा ओढ़त असताना एका पुत्र रत्नाचा जन्म झाला.त्या दोघाना आंनद झाला.मुलाचे पालन पोषण करणेची अधिक जबाबदारी त्याचेवर येवून पडली पण त्याने काही मन खचू न देता अधिक काम करुन आपले कुटुंब कसे सुखी समाधानी राहील याचा प्रयत्न करू लागला.हळू हळू मुलगा मोठा होवू लागला शाळेत जावू लागला.
पुन्हा दोन-तीन वर्षात दुसऱ्या पुत्र रत्नाचा जन्म झाला.आता त्यांच्या कुटुंबात सोन्या सारखे दोन मुलगे व पति पत्नी मिळून चार लोकांचा सुखी संसार चालू होता.मंजूरी करणेचा प्रयत्न करून मजूरीतून मिळणाऱ्या पैशावर कुटुंबाचे छान पालन पोषण करुन रहात असतानाच जशी दृष्ट लागावी तशी त्यांच्या कुटुंबाला दृष्ट लागली कारण सहदेवला दारू पिण्याची सवय सुरु झाली.सुरवातीस आठवड्यातून एकदा रविवारी मांसाहार असेल तेव्हा दारू घेऊ लागला पण नंतर ती दारूची सवय रोजचीच सुरु झाली.रोजच्या मिळणाऱ्या मजूरीतुन रोजच दारुची सवय सुरु झाली.समाजात असणारी किंमत दिवसे दिवस कमी होऊ लागली.मिळणाऱ्या कामावर सुध्दा परिणाम झाला.काम करून पैसे मिळविण्याचा त्याच्या संसारावर परिणाम झाला.घरात पुरेशे पैसे देवू शकत नव्हता,घरात टंचाई सुरु झाली. घरात सर्व खाती तोंडे होती व व्यसनाधीन झालेमुळे ना विलाज म्हणून दारू पिण्यासाठी घरातील काही सुख सोई च्या वस्तु उदा. खाट,टेबल,खुर्ची,पंखा अशा घरातील वस्तु विकुन दारू पिण्यासाठी पैसा गोळा करू लागला.कारण ऊत्पन्न बंद झालेमुळे व शारीरिक क्षमता सुध्दा दारुमुळे कमी झालेली होती.जास्त ताक़दीच्या मजूरीचे काम करू शकत नव्हता.
मुले लहान असतानाच त्याने राहते घर सुध्दा कोणा इसमाला विकायचे ठरवून त्याच्या कडून थोड़े थोड़े उसने पैसे संबधित इसमाकडून घेऊन शेवटी घराचा खरेदी दस्त देऊन वडीलार्जित मोकळ्या जागेत छोटेसे छप्पर घालून तेथे राहु लागला.शेवटी शरीर साथ देत नसलेमुळे व दारुच्या आहारी गेलेमुळे एके दिवशी त्याचे निधन झाले. त्याचेवर अवलंबून असलेले कुटुबांत दोन मुलगे व पत्नीला दारू पायी वा-यावर सोडून निघुन गेला.बिचा-या पत्नीवर सर्व जबाबदारी येऊन पडली.मजूरी करून मुलांच्या संभाळ करू लागली.कुटुबाची अशी वाताहत झालेने मुलांना सुध्दा पुरेशे शिक्षण न मिळाल्याने मुले सुध्दा छोटी छोटी मिळेल ती शेतीची,हमालीची कामे करू लागली.पालक जर व्यसनाधीन असला तर कुटुंबाची कशी अवस्था होत असते हे यावरून दिसून येते.दारूमुळे असे किती तरी संसार देशो धड़ीला लागलेले आहेत.
मोठ्या मुलाला गरीब कुटुंबातील होतकरु मुलगी मिळाली. सर्वजण एकत्र राहू लागले.आई हीच त्यांची कुटुम्ब कर्ता होती. काही दिवसा नंतर मोठा मुलगा त्याच्या पत्नीच्या माहेरी राहणेस गेला तेथे त्याला सुध्दा वडिलांचे सारखे दारू पिण्याचे व्यसन कधी लागले ते कळले नाही.गावी छोटा मुलगा होता त्याला सुध्दा गरीब कुटुंबातील एका मूलीशी लग्न करून दिले. तो मिळेल ती मोलमजूरी करून त्या छपरामध्ये आई पत्नी सोबत राहु लागला पण वडील, मोठा भाऊ ,यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याला सुद्धा दारु पिण्याचे व्यसन लागले.त्यामुळे त्याची पत्नी पळून गेली.तो सुद्धा तिच्या माहेरी जावून राहु लागला.पण "दारुडया तो दारूड्या कधी सुधारत नसतात."त्यामुलीने त्याला सोडून दिले.नंतर दुस-या मुलीशी लग्न करून आता त्याला दारुचे पहिल्या पेक्षा जास्तच व्यसन लागलेले आहे.आता पर्यन्त दोन मुलींना जन्म दिलेला आहे.
मुलीच्या माहेरची गरीबी असल्यामुळे ती बिचारी नवरा मारहाण करतो तरी ना विलाज म्हणून अशा दारुडया नव-या सोबत रहात आहे. दारूड्याने आई माहेरी गेल्यावर पत्नीच्या परस्पर सिलेंडर सुद्धा विकला होता आईला कळल्या नंतर आईने पैसे उसने पासने करून तो विकलेला सिलेंडर सुद्धा परत आणला एकदा तर या दारूड्याने छपरावर असणारी पत्र्याची काही पाने सुद्धा दारुला पैसे हवेत म्हणून विकली होती .
या कथे मधील घटनेचा अभ्यास केला तर दारूच्या व्यसनापायी आपल्या कुटुंबाची कशी दुर्दशा होत असते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही.मुलांचेवर चांगले संस्कार करु शकत नाही.स्वत: व्यसनी असल्यामुळे मुले सुद्धा भविष्य काळात व्यसनीच निघाली.सुखी संसाराची राख रांगोळी झाली.माणसात माणूस राहिला नाही.कारण एक दारूड्या भाऊ पत्नीच्या माहेरी,आई माहेरात,धाकटा एकटाच गावी छोटयाशा पाचटीच्या छपरा मध्ये जीवन कंठीत आहे.जनतेने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे कारण व्यसन हेच आपले दुश्मन किवा शत्रु आहे.हे लक्षात ठेवले पाहिजे.कथेतील "दारुडा सहदेव "जागोजागी भेटेल "बाप तसे बेठे."हाच बोध या कथे मधून घेतला पाहिजे.ही कथा काल्पनिक असली तरी सत्य वाटते.या कथेतील प्रसंग कोणाशी समान वाटत असतील तर तो एक योगायोग समजणेत यावा.
*लेखक - जी.एस.कुचेकर -पाटील.* भुईंज
ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें