लघुकथा................
शिर्षक... *अबोली*
"आई,अग ये आई,"नळाला पाणी येत नाही आपल्या".ॠतुजा आईला सांगत होती.आई धावतच आली,' काय झालं गं?'
का ओरडतेस?.नळाला पाणी येत नाही ,हे सांगत होते.अरे देवा,पाणी नाही येणार कसे काय?तेवढ्यात ॠतुची मैत्रीण आली स्नेहा.अहो काकू,आपली पाईप लाईन फुटली आहे .त्यामुळे पाणी येणार नाही.
"आठ दिवसाची गॅरंटी आहे आता".
बापरे ,परेशानीच आहे आता.
"शेजारी नळ आहे ना"त्याच्या नळाचे भरा ना तोपर्यंत. हो ,अगं चालेल तसे ही.
आणि दोघी ही ऋतुजाच्या खोली मध्ये निघून गेल्या.ऋतु आणि स्नेहा खूप चांगल्या मैत्रीणी होत्या.
उद्या आपलं काॅलेज सुरू होणार
ये ॠतु,"कुठला ड्रेस घालणार आहेस गं"
उद्या मी की नाही तो गुलाबी रंगाचा नवीन घेतलेला ड्रेस घालणार आहे."आता आपण काॅलेजला जाणार ,ये किती मज्जा येईल ना! सर्व मैत्रीणी भेटतील आता सुट्टीनंतर .होना.. ऋतु म्हणाली ,स्नेहा अस म्हणतात की,"काॅलेजला गेल्यावर प्रेम होतं म्हणे."स्नेहा हसली व हो म्हणाली,
"ऋतु तू तर किती सुंदर आहेस ,"गोरीगोरी पान,लांबसडक केस घारे घारे डोळे,कमनीय बांधा"बघ बाई सांभाळ स्वतःला.तशा दोघीही जोरात हसल्या.
दुस-या दिवशी काॅलेजला जावयाचे होते.स्नेहा व ऋतु दोघी मिळुन काॅलेजला गेल्या.काॅलेजच्या दारातच मुलांचा घोळका, स्नेहा म्हणाली "जणू काही नवीन मुलीचे स्वागता साठीच उभे आहेत वाटतं हे".ऋतुजा मात्र हलकेच हसली.तिची नजर प्रतिक वर पडली आज काही औरच दिसत होता तो "दोघांची नजरानजर झाली
मनात कुठे तरी हलकेच कळ निघाली".
घरी आली तर डोळ्यासमोर प्रतिक
दिसत होता स्नेहा म्हणाली,"तू थोडी बावरल्यासारखी वाटत आहेस".
ऋतुराधा,"तू का बावरी गं".
लाजली थोडी व म्हणाली ,कुठे काय,काही नाही...असे क्षण येतात ..
स्नेहा निघून गेली पण ऋतुजा मात्र प्रतिकचा चेहरा आठवून स्वतःच लाजत होती.ऋतु,"अगं उठ ना ..नळाला पाणी येणार आहे आज",पाणी तुलाच भरावं लागणार आहे.बाबांना जेवण बनवून द्यायचे आहे मला.काॅलेजला पण जायचे
आहे ना?.तशी ऋतुजा ताडकन उठली.
हो आई,"शेजारच्या काकू च्या नळाचे पाणी घेऊन ये,हंडा घेऊन जा".आई म्हणाली .तशी ऋतुजा देखील शेजारच्या काकू च्या घरी गेली.काकू,"नळाचे पाणी न्यायचे आहे".आले ना पाणी."हो गं ऋतुजा,घेऊन जा".तुझी आई कालच बोलली मला त्याबद्दल .'ये ना नाष्टा कर थोडा'.नाही नको काकू ,'केला मी नाष्टा'
तशी पाणी भरण्यासाठी नळाजवळ गेली व पाच सहा हंडे भरून घरी नेऊन टाकले व घरी येऊन आटोपून स्नेहा सोबत काॅलेजला गेली.प्रतिक काॅलेज मध्येच बी एस्सी थर्ड एअर ला शिकत होता .
स्नेहाने प्रतिकला पाहिले तशी ऋतुला म्हणाली,ऋतु बघ ना ,प्रतिक तुझ्याकडेच पाहतो आहे.ऋतु म्हणाली ,तुला त्याचे नाव कसे काय माहित.स्नेहा म्हणाली," मी ओळखते त्याला."ऋतूला हायसे वाटले आता प्रतिक बद्दल काय काय विचारू स्नेहाला सुरवात कशी करू असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले.रात्रभर मनात प्रेमांकुराला वाढवत होती ऋतु.रात्री झोप कधी लागली हे तिचे तिलाच कळले नाही.
नळाला पाणी तर आठ दिवस येणार नव्हते म्हणून ऋतुजा ला पाणी भरण्यासाठी काकू कडे जावयाचे होते ऋतु गेली,हंडा भरला मन विचलित होते हंडा उचलताना," ऋतु एकदम खाली पडली".हंडा अंगावर पडला व ती खाली पडली."प्रतिक धावतच आला,व त्याने तिला त्याच्या हाताने पकडले".प्रतिक तू,"इथे कसा काय "हे घर माझेच आहे"प्रतिक म्हणाला"मी तुला रोज पाहतो
हंड्यानी पाणी नेताना"आवडतेस गं मला "
"माझ तुझ्यावर प्रेम आहे ",होशील
माझी,वेड्यासारखा एकटाच बडबडत होता.ऋतुजा मात्र ऐकूनच "शहारली होती".जन्मोजन्मी ची ओळख असावी असे ती पाहत होती.ऋतु उठायला गेली,"तिचा तोल गेला व प्रतिकच्या अंगावर पडली".दोघांचा एकमेकांना स्पर्श झाला व ती मिठी जणु कायमची पडली."
'आकाशात विजांचा कडकडाट झाला 'तसा जोराचा पाऊस सुरू झालाजणु निसर्गाने देखील त्याच्या या प्रेमाला कबुली दिली होती."विजेच्या कडकडाटात मिठी तर अजून घट्ट झाली."ती स्पर्शाची दाहकता पावसात देखील पेटत होती".परमेश्वराने जणु दोघाना एकमेकांसाठीच बनवले होते".पाऊस थांबला तसे दोघे भानावर आले.एका वेगळ्याच विश्वातून बाहेर आलेल्या व्यक्तीसारखे एकमेकांकडे पाहत होते.ती
रिकामाच हंडा घेऊन निघून गेली मन मात्र प्रेमाने ओतप्रोत भरून वाहत होते.प्रतिक मात्र तिच्या पाठमो-या आकृती कडे पाहत होता.घरी आली तशीच पलंगावर पडली
माहित नाही कुठल्या विश्वात होती.पूर्ण अंग ओले होते.जणु शरीरात त्राण नव्हते ह्रदयाची धडधड वाढली होती. डोळ्यासमोर फक्त आणि फक्त प्रतिक दिसत होता.इकडे प्रतिक तर स्तब्ध झाला होता.मेंदुने संदेश देणे बंद केले होते.एकच चित्र डोळ्यात प्रतिबिंबीत झाले होते"ऋतुजा"मनात गुणगुणत होता "ऋतु कधी गं येशील तू"
ऋतूला सावरलेल्या हाताकडे पाहत होता
हळूच त्याच हाताचे पापे घेत होता.रात्र जागुन काढली झोप कशी ती आलीच नाही.
पहाट झाली तसा नळाजवळ गेला,"आई ,पाणी कधी येणार आहे गं!"
आई ला आश्चर्याचा धक्का बसला,का रे बाळा ,पाणी हवंय का तुला प्यायला?
नाही गं ,असच विचारलं.आई निघून गेली पण प्रतिक नळाकडेच पाहत राहिला.
इकडे ऋतुदेखील आईला म्हणाली,"आई,पाणी आणु का नळाचे?
आई म्हणाली,अजून वेळ आहे गं.
दोघांच्याही मनात एकमेकांना भेटण्याची तळमळ व आतुरता वाढली होती.जेवणाच्या टेबलवर तर बसले होते पण जेवणाची ईच्छा ही नव्हती.ताटातील
अन्नाकडे दोघेही पाहात ताटात रेघोट्या
ओढत बसले होते तसे,ऋतूचे बाबा म्हणाले.ऋतु बेटा,"जेवण कर,ते काय करतेस ताटाशी ..खेळतसे..काय झाले काॅलेज आवडले नाही का?"
ऋतु हसली व निघुन गेली. दोघांच्याही बाबांना आश्चर्य वाटत होते.दोघेही अस का वागतात.दुस-या दिवशी पाणी आणण्यासाठी ऋतु जाणार होती व तेव्हा प्रतिक देखील तिला भेटणार होता.दोघे ही आनंदी होते एक वेगळीच हुरहुर त्याना लागली होती. ती गेली.."ऋतूचे लक्ष ही नव्हते हंडा तर भरून जात होता दोघांची नजरानजर झाली नजरेत."अबोल कबुली होती प्रेमाची".
पाचसहा महिन्यापासून हा प्रेमाचा लपंडाव चालला होता.परंतु आई आईच असते मुलांच्या वागण्या बोलण्यावरून
ती त्याचं मन जाणत असते.
प्रतिक नळाकडेच पाहत होता,आई म्हणाली ,"बाळा काय पाहतोस एकटक नळाकडेच ,काही हवंय का?".तसा प्रतिक चटकन निघुन गेला.आईला मात्र घबराट झाली.मनात शंकेची पाल चुकचुकली.
दिवस जात होते ..हळूहळू दोघांची प्रेमकहाणी आईबाबाना कळाली.प्रथम दर्शनी नकारच होता .दोघेही हट्टी होते.
परंतु धर्मबंधन, समाजातील प्रतिष्ठा
एक ना अनेक जातीबंधनाच्या जोखडाचा ओझे मानगुटीवर घेऊन चालणारे आपण
सामान्य माणसं..आपल्याला कुणाचेही अपशब्द सहन नाही होणार म्हणून ऋतूच्या वडिलांनी चक्क बदली करून घेतली. पहाटेच ऋतूच्या घरासमोर प्रतिकला एक सामानानी भरलेला टेम्पो दिसला लगेच ऋतूची आईबाबा ऋतु बाजुच्या गाडी मध्ये बसले व गाडी निघुन गेली.प्रतिक पाहतच राहिला विचारणा केली असता कळले की त्याची बदली झाली व ते बारामतीला निघून गेले.प्रतिक तर पार मोडुन गेला.
प्रतिक ,"अरे काय चालले आहे तुझे "
नील म्हणाला. ऋतुवर एवढ प्रेम करतोस
स्वतःच्या जीवाची पर्वा नाही सुपारी न खाणारा तू आज दारू ;सिगारेट काय चाललं आहे तुझं."?एवढा नको यार तू...संपून जाशील.आईवडिलाना तू एकुलता एक आहेस त्याना कोण सांभाळणार?नको नील,"तू मला समाजावून सांगु नको", "मी ऋतु शिवाय जगू शकत नाही"."दारू सिगारेट पिऊन ऋतु भेटणार नाही प्रतिक"त्यासाठी तिला भेटून काय ते ठरवावे लागेल. नऊ दहा महिने झाले होते.नीलने ठरवले," प्रतिक व ऋतुची भेट करून द्यायची"..आणि दोघे ही निघाले बारामतीला...
प्रतिक ,मनाला आवर ,"भेटु या ऋतुला व ठरवु काय करायचे ते मी समजावून सांगेन सर्वाना व लग्न लावून देईल तुम्हा दोघांचे "नील बोलत होता.बारामती केव्हा आली ते कळलेच नाही.प्रतिकने तिला फोन केला,ऋतु ,"मी आलो आहे ",तू लवकरात लवकर मला भेट ".ती ऐकत होती,तिने फोन उचलला होता.गेल्यापासून आज फोन उचलला होता.प्रतिकला खूप आनंद झाला."मी आलो आहे तुला न्यायला ",लवकर ये.
ऋतु म्हणाली,"मी क्लासमध्ये आहे दोन तासांनी येईल".दोन तास झाले पुन्हा फोन केला,परत म्हणाली,"मी मैत्रीणीसोबत आहे"दोन तासांनी येते.ऋतु ,"अगं ये ना
माझा जीव जायची वेळ येत आहे".असाच वेळ गेला ,सहा सात तास वेळ झाला "ऋतु मात्र आलीच नाही. प्रतिक रडवेला झाला
मित्राने सावरले म्हणाला,"आपण तिच्या घरी जाऊन तिला भेटुया".आणि घराचा शोध घेत दोघे तिच्या घरी गेले.
दारावरची बेल वाजवली आई आल्या
दार उघडले दोघे आत गेले.बसले "भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे प्रतिकचे लक्ष गेले ".ऋतूच्या फोटोला हार घातलेला
होता."मग फोनवर कोण बोलत होते?"आई म्हणाल्या मीच बोलत होते ".
ऋतुनी इकडे आल्यापासून अन्न जणु वर्ज्य च केल होत व शेवटी....."तुझ्या नावाचाच
जप होता."तिला फक्त तुच हवा होतास" पण तिच्या बाबांनी ते मान्य केलेच नाही.
तुझी ऋतु, "आम्हाला सोडुन गेली रे प्रतिक".म्हणत आईने जोराचा हंबरडा फोडला."प्रतिक तर निशब्द,स्तब्ध झाला."
ऋतूच्या फोटो समोर धाडकन कोसळला.
*****************************
स्नेहलता कुलथे
मोबा.7588055882
Kulthe.lata@gmail.com
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें