*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- 49 वा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 06 जून 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- बेरोजगार*
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
[06/06, 10:13 AM] दुशांत निमकर: *(02) बेरोजगार:एक समस्या*
"क्षमता व काम करण्याची इच्छा
असून देखील मिळे ना रोजगार
सुशिक्षित राहून कमी दर्जाची नोकरी
करून चालवितो संसाररथ तो बेरोजगार"
'बेरोजगार' ही संज्ञा मूळता अर्थशास्त्रीय संकल्पना आहे.बेरोजगारांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने 40 कोटी जनता भारतात बेरोजगार आहेत म्हणून स्वातंत्र्यानंतर शासनाने स्वयं निर्मितीच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत.महाराष्ट्रातून वि.स.पागे यांच्या संकल्पनेतील रोजगार हमी योजना केंद्रात राबवून बेरोजगारी दर कमी करण्याचा शासन स्तरावर कार्य चालू आहेच पण वेगवेगळी बेरोजगारीचे प्रकार असल्याने भारतात बेरोजगार ही समस्या आवासून उभी आहे.मुळात बेरोजगार म्हणजे काम करण्याची क्षमता असून देखील रोजगार मिळावा अशी इच्छा असते पण मिळत नाही त्याला बेरोजगार म्हटल्या जाते.धडधाकट,सुदृढ, शारीरिक व मानसिक दृष्टीने समर्थ असणारा व्यक्ती,काम करण्याची प्रबळ इच्छा असणारा आणि चालू असलेल्या वेतनावर काम करण्याची तयारी असून देखील काम मिळत नाही अशा व्यक्तींना बेरोजगार संबोधले जाते.आपल्या देशात 10.9 टक्के बेरोजगारीचा दर असल्याने विशाल लोकसंख्येपुढे एक संकट म्हणून उभे ठाकले आहे.बेरोजगारीचे संरचनात्मक,छुपी,खुली,सुशिक्षित, घर्षणात्मक,चक्रीय,दीर्घकालीन,हंगामी बेरोजगारी असे त्याचे प्रकार बघता येईल.बेरोजगारी असल्याने राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत नाही त्यामुळे ही एक समस्या बनली आहे.
सध्या बेरोजगारीचे आजच्या युवक पिढीला ग्रासले आहे.आजचा युवक उच्च शिक्षित असला तरी त्याच्या शिक्षणाच्या आधारावर त्याला नोकरी न मिळता कमी दर्जाची नोकरी पत्करावी लागते ही कमी दर्जाची बेरोजगारी म्हणून त्याचा उल्लेख करता येईल.उदाहरणार्थ अभियंता पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांला कारकूनची नोकरी स्वीकारावी लागणे ही एक कमी दर्जाची बेरोजगारी किंवा सुशिक्षीत बेरोजगारी म्हणता येईल.युवकाची क्षमता व काम करण्याची इच्छा असतांना रोजगार मिळविण्यासाठी स्थलांतर करणे याला खुली बेरोजगारी म्हणता येईल.उदा.रोजगार मिळविण्यासाठी खेड्यातून शहरात स्थलांतर करणे तसेच सर्वात मोठी समस्या म्हणजे हंगामी बेरोजगारी होय.कृषी क्षेत्रात कार्य करीत असतांना मजुरांना बारा ही महिने काम न मिळता केवळ त्या त्या विशिष्ट ऋतूमध्ये शेतात काम मिळते इतर वेळी रिकामे राहावे लागते अशा प्रकारच्या बेरोजगारीला हंगामी बेरोजगारी म्हणतात म्हणून रोजगार मिळविण्याच्या हेतूने मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवीत असतात यासाठी शासन स्तरावर बेरोजगारी भत्ता व अंशदायी पेंशन योजना यासारख्या योजना शासन स्तरावर राबवून बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्याचा अल्पशा उपाययोजना तोकडी ठरली आहे.
बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर मेहनती,जिद्दी,होतकरू युवकांसाठी बेरोजगार मासिक प्रोत्साहन हप्ता देण्यात येत आहे त्याचसोबत युवकांनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःचा उद्योग,व्यवसाय उभारून आपली उपजीविका भागविता येते यासाठी केंद्र सरकारने मुद्रा बँक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला आहे.केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील मुद्रा बँक योजनेत कोणतेही तारण न ठेवता बँक कर्ज मंजूर करीत असतात आणि त्याद्वारे स्वतः उद्योजक बनून राष्ट्राच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजनेतून राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेऊन युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल याचा सर्व बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा.सर्व युवकांनी आत्मनिर्भर होण्यासाठी व बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी स्वतः बँकेतून कर्ज उभारून व्यवसाय उभा करायला हवा.कोणताही व्यवसाय उभा करण्यासाठी पैशाची चणचण भासत असते यासाठी शासन अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार युवकांसाठी निधी राखून ठेवलेला असतो त्याचा सर्व बेरोजगारांनी लाभ घ्यावा तेव्हाच ही समस्या सुटू शकते.
✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
मो न 9765548949
[06/06, 10:28 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09)*
*बेरोजगारी - भेडसावणारी समस्या*
भारतात सध्या लाकडाऊनमुळे विविधांगी बेरोजगारी निर्माण झाली आहे. बेरोजगार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही असा व्यक्ती होय. कोरोणाच्या कहर वाढल्यामुळे बेकारीचा भस्मासूर डोके वर काढू पाहत आहे. अनेकांच्या हातून रोजगार निघून गेला बेरोजगारी मुळे कित्येकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
बेरोजगारी म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली आहे की, जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार आहे परंतु त्याला काम मिळत नाही. . बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो . बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होत आहे. . बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी होऊन आणि समाज हा गरीब व मागासलेला बनत चालला आहे. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ पाहत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात बेकारी आहे. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला आहे . तरीही बेकारीची समस्या वाढते आहे .
बेरोजगारीची संकल्पना अनैच्छिक बेरोजगारी या बेकारीला दृश्य किंवा उघड बेरोजगारी असेही म्हणतात . ही बेरोजगारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते , काम करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातून निर्माण होते . यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विनामोबदला किंवा कमी मोबदला ; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्चाटन होत असलेले दिसून )येते . तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आश्रित आणि काम करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातून निर्माण होते . यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विनामोबदला किंवा कमी मोबदला ; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्चाटन होत असलेले दिसून येते . तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते .
ऐच्छिक बेरोजगारी हा बेकारीचा असा प्रकार आहे की जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते . खऱ्या अर्थाने ही बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे .
न्यून किंवा अर्ध बेरोजगारी ही एक अशी स्थिती होय , की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही , किंवा तिला कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते . उदा . पदव्युत्तर शिक्षित व्यक्तीने पहारेकऱ्याची नोकरी करणे . इंजिनिअर व्यक्तीने शिपायाची नोकरी करणे . पूर्ण बेरोजगारी व्यक्तीकडे पात्रता , कौशल्य , इच्छाशक्ती , असूनही कोणत्याच ठिकाणी काम प्राप्त होत नाही . याला पूर्ण बेरोजगारी म्हणतात .
संघर्षात्मक बेरोजगारी या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेरोजगार व्हावे लागते . यंत्रातील बिघाड , कच्च्या मालाची टंचाई , वीज कपात इ . मुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते . अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्विकारेपर्यंत बेकार राहावे लागते , म्हणून त्याला संघर्षात्मक बेरोजगार म्हणतात . कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केलेला असतो .
चक्रीय बेरोजगारी तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्याअवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी म्हणतात . ' हा बेकारीचा प्रकार व्यापार चक्रामुळे निर्माण होतो . मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया मंदावतात त्यामुळे उद्योगांचे मालक उत्पादन कमी करतात . परिणामी कामगारांना कामावरून कमी केले जाते . उदा . २००८ च्या मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अशाच प्रकारची चक्रीय बेकारी निर्माण झाली होती .
संरचनात्मक बेरोजगारी जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते . जेव्हा मागासलेल्या व परंपरागत अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल होऊन ती आधुनिक व विकसित होत जाते तेव्हा मागणीमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल होतात . त्यातून संरचनात्मक बेकारी निर्माण होते . बेरोजगारी ही एक दीर्घकालीन घटना होय .यासाठी आत्मनिर्भर होऊन आँनलाईन स्पर्धा घेऊनही बेरोजगारी वर मात करता येईल .
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[06/06, 10:35 AM] सौ भारती तिडके: 39) बेरोजगार
बेरोजगार असणे ही भारतातील फार मोठी समस्या आहे. ते एक अभिशाप आहे. शिक्षणाचा अभाव ,रोजगाराची उपलब्ध नसलेली संधी, इत्यादीमुळे बेरोजगाराची समस्या निर्माण झालेली आहे. सर्वसामान्यपणे बाजारात चालू असलेल्या वेतनाचा दर स्वीकारून काम करण्याची तयारी असणाऱ्या सक्षम काम कर याला जर काम मिळू शकले नाही तर त्याची गणना बेरोजगारी मध्ये केल्या जाते."देगा हरी पलंगावरी"असे कधीच घडत नाही. आधी मनुष्यबळावर सर्व कामे व्हायची. कारखान्यात, शेतात ,मानवी श्रम जास्त व्हायचे. परंतु मानवाने विज्ञानात जशी प्रगती केली, यंत्राची अदावत निर्मिती झाली, तसे यंत्रमानवाचे कार्य करायला लागले त्यातूनही बेरोजगारी उद्भभवत आहे.
अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा रोजगार उपलब्धता कमी असेल तर या अर्थव्यवस्थेत बेरोजगारी आहे असे म्हणता येईल. रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या समर्थ असावी. तिची काम करण्याची इच्छा असावी,तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी. या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. या बेरोजगारीचे प्रकार आहेत.
1) खुली बेरोजगारी:-काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.उदा. ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसलेले अकुशल कामगार. रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार इत्यादी.
2) हंगामी बेरोजगारी:-शेतीची नांगरणी पासून कापणी पर्यंतचा कालावधी सोडून इतर काळात भासणारी बेरोजगारी.
3) अदृश्य बेरोजगारी:-आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेली असल्यास ते व्यक्ती अदृश्यपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते. उदाहरणार्थ शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करुन पिकवू शकतो तर त्याऐवजी चार-पाच लोक तेथे काम करीत असल्यास ते अदृष्य बेरोजगार असतात.
4) कमी प्रतीची बेरोजगारी:-ज्यावेळी एखाद्या इंजिनीयरला क्लार्कची नोकरी करावी लागणे म्हणजे त्याला कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात.
5) सुशिक्षित बेरोजगारी:-जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्यांना सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. आपल्या भारतात सुशिक्षित बेरोजगार पुष्कळ आहे. त्याचप्रमाणे चक्रीय बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी ,आढळून येते. भारतासाठी मात्र बेरोजगारीचे चित्र भयावह आहे. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की 2013-14 मध्ये बेरोजगारीचा दर 3.4 टक्के मध्ये तो सदर 3.7 टक्के म्हणजे अगदी कमी प्रमाणात वाढला आहे. भारतात बिहार ,उत्तर प्रदेश ,मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर भारतातील पहाडी राज्यांमधील तरुणांमध्ये ेबेरोजगारीचा प्रश्न फार भीषण झाला आहे. या राज्यांमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे. उद्योगधंदे काढण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते. लहान सहान नोकरीसुद्धा मिळत नाही. मग ते गुन्हेगारीकडे वळतात.उत्पादन कृषी सेवा या तीन क्षेत्र क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील रोजगार हाच मुद्दा सध्याच्या सरकार पुढे सगळ्यात मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मूलभूत पाया ,वीज आणि निर्यात यावर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.भारत देशात बेरोजगारीचा दर साडेचार टक्के झाला आहे. काही बेरोजगार तर आत्महत्या करीत आहेत.
बेरोजगारी दूर करण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवे. शिक्षण व्यवस्था कौशल्याधिष्ठित असायला हवी. औद्योगीकरण करायला हवे. विदेशी कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावी.भारत सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी पुष्कळ कार्यक्रम हाती घेतले आहेत. विदेशी देशात रोजगार, लघु आणि कुटीर उद्योग सुरुवात, स्वर्ण जयंती रोजगार योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, रोजगार आश्वासन योजना,Dpap, जवाहर रोजगार योजना, रोजगार गारंटी योजना अशाप्रकारे भारत सरकारने बेरोजगारांची समस्या दूर करण्यासाठी वरील कार्यक्रम हाती घेतलेले आहे त.
बेरोजगारीची समस्या फार मोठी आहे. त्यामुळे सर्वांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा. म्हणजे देशाचे आर्थिक उत्पादनात वाढ होईल.व बेरोजगारी ची समस्या दूर होईल.
सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
8007664039.
[06/06, 11:35 AM] महेंद्र सोनवने: *(08)*
*बेरोजगारी एक गंभीर समस्या*
बेरोजगारी ही प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या होत आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढले की सरकारची डोकेदुखी पण वाढत असते. भारतासाठी मात्र बेरोजगारीचे चित्र भयावह आहे. नीती आयोगाने नुकताच एक आराखडा जाहीर केला होता. या कृती आराखडय़ात सरकारकडे अनेक प्रस्ताव देण्यात आले. आपल्या देशातील ग्रामविकास, संरक्षण, कृषी, आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते आणि अन्य भांडवली खर्चाच्या गुंतवणुकीत वाढ करण्याबरोबरच देशात सध्या वाढत असलेल्या बेरोजगारीवर सुद्धा भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे देशात वाढत असलेल्या बेरोजगारीकडे गंभीरपणे बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्रीय कामगार मंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, बेरोजगारीचा दर चार टक्के होता. सर्वसाधारण वर्षात तीस दिवस काम केलेला कर्मचारी वा कामगार हा ‘नियुक्त कर्मचारी’ म्हणजेच रोजगारीत असलेला कर्मचारी असा अर्थ सरकारी ‘डेटा’मध्ये लावला जातो. या तत्त्वानुसार सरकारी ‘गॅझेट’मध्ये ‘नियुक्त कर्मचारी’ असलेल्याना वर्षभर काम नसले तरी तो कर्मचारी ‘नियुक्त’ म्हणून समजला जातो. या उलट पाचव्या ‘वार्षिक रोजगार-बेरोजगार सव्र्हे’च्या निष्कर्षाप्रमाणे बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. भारतात दर वर्षी कोट्यावधी तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडत असतात, परंतु त्यांच्यासाठी फक्त वीस लाख नोक-यांची निर्मिती होत असते असे गंभीर चित्र आज या देशात आहे. मध्यंतरी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने एक पाहणी केली होती. या संस्थेचे निष्कर्ष बेरोजगारीचे भयानक चित्र स्पष्ट करतात. एका अर्थशास्त्रीय सव्र्हेप्रमाणे भारतात लाखो कुटुंबात कायमस्वरूपी नोकरी करणारी व्यक्ती असत नाही. म्हणजेच रोजंदारी किंवा हंगामी नोकरी असते. तर काही कुटुंबे अशी आहेत की त्यांना महिन्याला हजारांपेक्षा कमी उत्पन्न असते. निती आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या त्रवार्षकि कृती आराखडय़ात रोजगारी निर्मितीचे प्रमाण प्रचंड घटल्याचे स्पष्ट केले आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटिरग ऑफ इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने नोटाबंदीनंतर केलेल्या एका सव्र्हेप्रमाणे याच काळात लाखो कामगारांच्या नोक-या गेल्या असा निष्कर्ष काढला. हे कामगार बहुतेक अति लघु उद्योग, लघु आणि मध्यम उद्योगांमधील होते. त्याचप्रमाणे आयटी क्षेत्रातील ब-याच कर्मचा-यांच्या नोक-या गेल्या आहेत. हे झाले नोकरकपात झालेले बेरोजगार/कर्मचा-यांचे दु:ख, परंतु भारताच्या प्रचंड लोकसंख्येत तरुण पिढीची संख्या खूप मोठी आहे. दरवर्षी अनेक तरुण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतात. यामध्ये पदवीधारकांप्रमाणेच उच्चशिक्षित विद्यार्थीपण असतात. उच्च पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा नोक-या मिळत नाहीत तेव्हा ते हताश होतात. अशा परिस्थितीत नोकरी शोधून निराश झालेला तरुण समाजासाठी घातक ठरू शकतो. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तोच ख-या अर्थाने बेरोजगार समजला पाहिजे.
भारतात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि उत्तर भारतातील पहाडी राज्यांमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार भीषणसमस्या झाली आहे. या राज्यांमध्ये तरुणांची संख्या भरपूर आहे. उद्योगधंदा काढण्यासारखी आर्थिक परिस्थिती नसते. लहान-सहान नोकरी सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीत ही मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे सहज वळू शकतात, असा निष्कर्ष एका समाजशास्त्रीय सव्र्हेतून निघाला आहे. उत्पादन, कृषी आणि सेवा या तीन क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊ शकते. सध्या कृषी क्षेत्राची स्थिती खालावली आहे. सेवा क्षेत्र काही प्रमाणात विस्तारत आहे, तर उत्पादन क्षेत्र हळूहळू जम बसवू पहात आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मेक-इन-इंडिया सारखी महत्त्वाकांक्षी घोषणा झाल्यानंतर सुद्धा उत्पादन क्षेत्रात प्रगती होत नाही. या योजनेचे पुढे काय झाले, कितपत प्रगती झाली याची आकडेवारी स्पष्ट नाही. मेक-इन-इंडिया, स्टार्ट-अप-इंडिया, स्किल इंडिया यासारख्या चांगल्या योजना कागदावरच राहिल्या, त्यामुळे उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही.उत्पादन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होऊशकते. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांची संख्या भारतात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात असते. सर्वसाधारणपणे दरवर्षी लाखो इंजिनीअर्स शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. यामधील हजारो इंजिनीअर्सना नोक-या मिळत नाहीत. हा निष्कर्ष ‘ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ने काढला आहे. यामध्ये या सव्र्हेप्रमाणे भारतात
शिक्षण संस्था दर्जेदार किंवा मान्यताप्राप्त नसतात. दर्जेदार आणि चांगल्या स्वायत्त शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्या इंजिनीअर मुलांना चांगल्या नोकरीची उपलब्धता होऊ शकते. सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये फक्त इंजिनीअर्सना नोक-या मिळू शकतात, तर टेक्निकल आणि मेकॅनिकल इंजिनीअर्सना नोक-या मिळू शकतात.
त्याचप्रमाणे देशात रोजगारांची कमतरता असल्याचे नीती आयोगाच्या कृती आराखडय़ात म्हटले आहे. म्हणजेच एखाद्या इंजिनीअरकडे पूर्ण क्षमता असूनही किंवा एखाद्या व्यक्तीकडे उच्च दर्जाचे कौशल्य असूनही त्याला हलक्या किंवा न्यून दर्जाचा रोजगार करावा लागणे ही समस्या सध्या निर्माण झाली आहे. उच्चशिक्षितांना न्यून दर्जाचे काम करावे लागत असल्याने असमाधानाने आणि निरुत्साहाने काम केले जाते. आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. पुढे उत्पादन कमी म्हणून रोजगार कमी हे चक्र सुरू राहते. सध्या भारतात अशी स्थिती आहे की उच्चशिक्षित मुलांना एक तर रोजगार मिळत नाही किंवा त्यांच्या पात्रतेचे काम मिळत नाही. तर लाखो अकुशल मुलांना रोजगारासाठी वणवण करावी लागते. ‘मेक-इन-इंडिया’ ही योजना चांगली आणि महत्त्वाकांक्षी होती, पण सरकारचे नियोजन आणि पूर्वतयारी नसल्यामुळे ही घोषणा लाखो तरुणांचे फक्त स्वप्नच ठरून गेली. ‘स्किल इंडिया’ सारखी चांगली योजना सुरू करूनही कुशल कामगार निर्मिती सरकार करू शकत नाही. त्यामुळे ही योजना सुद्धा फोल ठरली. सत्तेवर आल्यावर दरवर्षी कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी युवकांना दिलं होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने युवा पिढी वैफल्यग्रस्त झाली आहे हे वास्तव सरकार,आपल्याला नाकारता येणार नाही!
*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
*(9421802067 )*
[06/06, 1:13 PM] senkude: (5)
*बेरोजगारी एक भीषण समस्या*
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात बहुसंख्य लोकांचे पोट शेतीवर अवलंबून आहे. पण आजही बहुतांशी लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. ती पूर्णता बेभरवशाची आहे. अपुरे उत्पन्न तेही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेले. त्यामुळे शेती वरील माणसे ही बेकारीच्या झुंडीत सामील होताना आज आपल्याला पाहायला मिळते. आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. एक यंत्र अनेक माणसाचे काम करते. त्यामुळेही बेकारीत भर पडलेली पाहायला मिळते.
बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो त्याला आणखी एक कारण आहे.लोकसंख्यावाढ. या लोकसंख्येच्या वाढीमुळे आपल्यासमोर बेकारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली तरीसुद्धा आपल्या देशातील सामान्य माणूस हा सामान्यच राहिलेला आहे. जनसामान्यांच्या अन्न,वस्त्र ,निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा सुद्धा भागत नाही,आणि त्यातून दारिद्र्याला आमंत्रण मिळते. व बेरोजगारीचे प्रमाण वाढतच जाते. हाताला काम नाही पोटाला भाकर नाही.
अशा परिस्थितीत माणूस आपले जीवन असहाय्यपणे जगतो. अशा बेकारीमुळे कितीजण आत्महत्या करतात. तर काहीजण बायकामुलांना स्वतःला जाळून घेताना दिसतात. चोऱ्या, दरोडे यांच्यात वाढ झालेली आज दिसत आहे. बेरोजगार तरुण आपसुकच गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आज रोजगार पुरवणे अशक्य झाले आहे. उद्योग जगतात नवीन बदलांचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. त्यामुळे आणखी माणसे बेकार बनतात. काळ बदलतो लोकांच्या आवडीनिवडी बदलतात जीवनशैली बदलते. राहणीमानात फरक पडतो. त्यामुळे आधीच्या जीवनशैलीच्या अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात. जुनी उद्योग बंद पडत असल्यामुळे येथील कामगार बेकार होतात. त्यांच्या रोजगारीच्या वाटा बंद होतात. पण अशा बेकार, बेरोजगार झालेल्या लोकांनी हताश न होता, आपले धैर्य खचू न देता स्वतःचे मनोबल वाढून नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. काळानुसार बदललेल्या जीवनशैलीच्या गरजांचा वेध घेतला पाहिजे म्हणजे की शक्ति तिथे कामाला येईल. बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. एक यंत्र अनेक माणसाचे जरी काम करीत असले तरी यंत्रांनी उद्योगाची नवीन दालने उघडून दिली आहेत. हेही मानवाने लक्षात घ्यायला हवे. या यंत्राची निर्मिती, सुट्या भागांची निर्मिती दुरुस्ती ,देखभाल यासाठी माणसाची गरज लागणारच. म्हणून या यंत्रांना आपत्ती न मानता आपल्यासाठी रोजगाराची वाट निर्माण करून देणारे मार्गदर्शकच मानली पाहिजे. बेरोजगारी कमी करायचे असेल तर आपण शेतीची पारंपारिक पद्धत सोडून दिली पाहिजे. तसेच शेतीला पूरक व शेतीवर आधारित असे उद्योग अंगीकारले पाहिजेत.
आणि आपल्यामध्ये आळस असता कामा नये.आपल्यात असणारा आळस हा एक बेकारी उत्पन्न करण्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण मुंगी सारखे उद्योगी असणे आवश्यक आहे. 'देगा हरी पलंगावरी' असे तर कधी होणार नाही. माणसाने स्वतः श्रम केले पाहिजेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी आळसाला दूर लोटले पाहिजे. संतांनीही श्रमाचे महत्व वेळोवेळी सांगितलेले आहे. 'आराम हराम आहे, तर कामात राम आहे'. हे ध्यानात घेऊन श्रम केले पाहिजेत.
बेकारी ,बेरोजगार नाहीशी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे शिक्षण. परंतु असे शिक्षण जे व्यक्तीला जीवनाभिमुख करणारे स्वावलंबी बनवणारे केवळ पुस्तकी , परीक्षार्थी न राहता उद्योगशील, यांत्रिकीकरणाची माहिती, असे व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे.
“व्यवसाय शिक्षण घ्यावे l बेकारीला दूर करावे ll
श्रमप्रतिष्ठालाही जपावे l स्वावलंबनाचा मार्ग खरा ll
या उक्तीप्रमाणे युवा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःला एका विशिष्ट व्यवसाय करता येईल का, करायला हवा. व त्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण घ्यावे. कारण यात स्वतःच्या बुद्धीला वाव आहे. कर्तुत्वाला महत्व आहे. व्यवस्थितपणे व्यवसाय केल्यास आर्थिक प्राप्ती भरपूर प्रमाणात होते. व अल्पावधीतच आपल्या व्यवसायात अनेक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देता येतो. व अशाप्रकारे व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन बेरोजगारी कमी करता येईल.
बेरोजगारीच्या समस्येवर अशा वेगवेगळ्याप्रकारे उपायोजना करून या योजना तातडीने अमलात आणले पाहिजे. जर बेकारीच्या समस्येवर सर्वंकष योजना तातडीने अमलात आणली नाही तर, भविष्यकालीन तरुण पिढी व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीची निर्माण होईल. व देशात अराजक परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच बेकारीची समस्या समाजाला गर्तेत नेणारी आहे, बेरोजगारीचे हे थैमान थांबविण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बेकारीच्या समस्याची जाणीव शासनाला व पर्यायाने समाजाला होणे अत्यावश्यक आहे.
बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढले तर देशाची प्रगती होणे केवळ अशक्य होईल. बेरोजगारीचे हे थैमान कमी करण्यासाठी आळस दूर लोटून श्रम केले पाहिजे, शिक्षणाला महत्व दिले पाहिजे, व्यवसायिक शिक्षण घेतले पाहिजे, उद्योगशील राहून छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे. व बेरोजगारीची ही भीषण समस्या कमी केली पाहिजे.....
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि. नांदेड.
[06/06, 1:37 PM] Bharti Sawant: बेरोजगारी
शीर्षक- बेकारी वाढण्याची कारणे
बेकार म्हणजे ज्याला काम मिळालेले नाही अशी व्यक्ती होय. वयाच्या अठरा वर्षांनंतर जेथे एखादा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो, परंतु त्याला काम मिळत नाही असे काही वेळेस पदवीधर होऊनही आपली प्रमाणपत्रे घेऊन कंपन्या, शाळा नि बँकांच्या दरवाजात मुलाखतीसाठी जावे लागते. आणि मुलाखत देऊनही नोकरीसाठी बोलवले जात नाही अशा व्यक्तींना बेकार म्हटले जाते. बेरोजगार मनुष्यजातीला लागलेला अभिशाप आहे. त्यामुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. देशाच्या आर्थिक व्यवहारात खूप चढउतार होत असतो. समस्यांमध्ये वाढ होते. राष्ट्रीय उत्पन्नही घटते. समाज दरिद्री व मागासलेलाच राहतो. बेकारीच्या समस्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. हल्ली मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी झाला असला तरी संपलेला नाही. हल्ली तरुण स्वयंरोजगार किंवा लहान-मोठे उद्योगधंद्यांमध्ये येणे पसंत करतात. त्यामुळे स्वयंचलित रोजगार वाढून बऱ्याच बेकारांच्या नोकरीचा प्रश्नही सुटला आहे.
काही वेळा लोकांच्यात काम करण्याची धमक किंवा पात्रता असते ते कितीही वेळ श्रमाचे काम करायला तयार असतात, परंतु त्यांना ते काम मिळत नाही. मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती असते.एखाद्या कंपनीत दोन-चार व्हॅकेंन्सीसाठी हजार बेरोजगार युवक मुलाखतीसाठी गेलेले दिसतात. त्यामुळे लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याप्रमाणात नोकरीची संधी वाढत नाही. प्राप्त होत नाही त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काही लोकांना उच्चशिक्षण घेऊनही नाईलाजाने मनाजोगी नोकरी किंवा काम मिळत नाही परंतु तेच करण्याशिवाय तरणोपायही नसतो. काही ठिकाणी १२-१४ तास काम करूनही म्हणावे असे वेतनही नसते.अशा ठिकाणी काम करण्यास युवकांना मनही नसते परंतु घरसंसार सांभाळण्यासाठी ते पत्करावे लागते. त्यामुळे तिथे त्यांच्या हक्कांचे उच्चाटन होत असलेले दिसून येते.वेतन किंवा मोबदला कामाच्या, शिक्षणाच्या मानाने कमी मिळत असल्याने काम करताना उदासीन वृत्ती असते.शिवाय परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारीचे प्रमाण वाढतच जाते.
कर्जबाजारी होण्याचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे काम करण्याची इच्छा असूनही ती व्यक्ती निष्क्रिय बनते. उदा. काही ठिकाणी बॉसपेक्षा शिपायाचे शिक्षण अधिक असते त्यामुळे दोघांच्याही मनात न्यूनगंड येतो. आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या तरुणांस "पाणी आण" वगैरे काम सांगायला साहेबांना लाज वाटते नि एवढे शिक्षण घेऊन हलकी सलकी कामे करायला शिपायाला लज्जास्पद वाटते. इंजिनियर होऊनही आठ- दहा हजार रुपये पगारावर काम करणेही नकोसे वाटते. ग्रामीण भागात शेती निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला की शेतीव्यवसाय करू शकत नाही. अशावेळी तो युवक हातावर हात धरून बसून राहतो किंवा पर्यटन स्थळातील मार्गदर्शक लग्नसमारंभातील केटरर्स,वादक या लोकांना हंगामी नोकऱ्या असतात.इतरवेळी त्यांना बेरोजगार होऊनच बसावे लागते. आजही देशात उच्च शिक्षण घेऊन घरी बसलेल्यांची, नोकरी शोधणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्याचा असा विपरित परिणाम होतो की हीच युवापिढी झटपट पैसा किंवा वाममार्गाने पैसा कमावण्याच्या मागे लागते.
शिक्षण पूर्ण केल्यावर घरातून नोकरीसाठी दट्ट्या लागतो त्यामुळे नैराश्य वाढते. दोन्हीकडून अशा तरुणांची गोची होती. त्यामुळे चोर्या, दरोडे किंवा अफरातफर करून गंडा घालणे अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढते किंवा नैराश्येच्या गर्तेत येऊन काहीजण आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारतात. असे होऊ नये म्हणून सरकारनेही खबरदारी घ्यायला हवी. नवतरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्यावी. छोटे-मोठे उद्योगधंदे करण्यासाठी कर्ज किंवा भांडवल द्यावे.त्या धंद्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे जेणेकरून नवयुवकांना पैसे मिळविण्यासाठी नवनवे मार्ग उपलब्ध होतील आणि ते स्वयंपूर्ण होऊन जातील. स्वतःचा व्यवसाय असल्याने तो वाढविण्यासाठी ते जागरूक राहतील. दुसऱ्याचा हाताखाली गुलामाप्रमाणे नाही. आपण आपल्या धंद्याचे मालक ही भावना वाढीस लागून पैसे कमविण्यासाठी त्यांचा हुरूप वाढेल. काही वेळा तेजी-मंदी च्या काळातही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते.स्वत:चा व्यवसाय असेल तर अशा संकटांना धैर्याने मात करता येईल. आपल्याला आवडणारे काम असेल तर ते करण्याचा उत्साहही वाढेल. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली. आर्थिक विकासामुळे श्रमशक्तीला सर्व क्षेत्रात सामावून घेता आले नाही. आपली शेती उर्फ काळी आई आजही आपणास मोती पिकवून देऊ शकते. परंतु प्रशिक्षणाच्या अभावामुळे पारंपरिक प्रकारे शेती व्यवसाय केला जातो. अशात येणारे उत्पन्न फक्त पोटापुरतेच असते. त्यामुळे प्रगतीच्या वाटा खुंटल्या जातात नि शेतकरीवर्ग एवढे कष्ट करूनही हतबल होतो.
जलसिंचनाच्या योग्य पद्धती आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर सर्व मोठ्या उद्योगधंद्यावर ही शेती मात करू शकते. फक्त गरज आहे श्रमाची नि संयमाची. आपल्या देशात श्रम करण्याची तयारी असणारा युवावर्ग मुबलक आहे, परंतु त्यांच्या हातांना काम देण्यासाठी सरकार कमी पडते त्यामुळेच दिवसेंदिवस बेकारीचे प्रमाण वाढलेले आहे.
सौ. भारती सावंत
मुंबई
[06/06, 2:09 PM] Ankush Shingade: वाढती बेरोजगारी;एक भीषण समस्या की शिक्षणाचा परीणाम
आज देशात बेरोजगारी वाढलेली दिसत आहे.जग चंद्रावर जरी जात असले तरी दुसरीकडे बेरोजगारीने आत्महत्या होतांना दिसत आहे.याला जबाबदार जर कोण असेल तर आपण सरकारवर दोष देवून मोकळे होतो.खरंच वाढत्या बेरोजगारीला सरकार जबाबदार आहे का?याचं उत्तर नाही असंच येईल.
शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे असं मानतात.खरंही आहे.मग जो हे दुध प्राशन करेल तो गुरगुरेल असंही म्हटलं जातं.तेही खरं आहे.मग अलिकडे हेच वाघिणीचं शिक्षणरुपी दुध प्राशन केलेले,दुध प्रेमी गुरगुरत का नसावे ते कळत नाही.वाटल्यास त्यांनी हे दुध प्राशन केल्यानंतर लाथ मारुन पाणी काढायलाच पाहिजे अर्थात बेरोजगारीवर मार्ग काढायलाच पाहिजे.पण तसे होत नाही.ही बेरोजगार मंडळी आत्महत्या करुन मरणे पसंत करतात.पण बेरोजगारीवर मात करीत नाहीत.
आम्ही शिकलो.लहानाचे मोठे झालो.उच्च शिक्षण घेतलं.पण नेमकं या शिक्षणातून आम्ही काय घेतलं?असं जर कोणी विचारल्यास याचं उत्तर असेल की या शिक्षणातून आम्ही लाज,भीती,गुलामी आळसपणा,लाचारी इत्यादी सा-या गोष्टी विकत घेतलेल्या दिसतात.आम्ही शिक्षण शिकतो.कशासाठी?तर स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच स्वतःला सक्षम बनविण्यासाठी.तसेच शिक्षणातून माणूस घडविण्यासाठी.....पण आम्ही स्वतःचा सर्वांगीण विकास तर करीत नाही.स्वतः माणसे घडवीत नाही तसेच स्वतःही माणुस बनत नाही.तसेच त्यातून स्वतः सक्षम बनत नाही.उलट या शिक्षणातून आम्ही गुलाम बनतो.शाळेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास आज कित्येक खाजगी शाळेत कित्येक शिक्षक मंडळी लाचारी आणि गुलामीचं जीवन जगतात.संचालक मुख्याध्यापक म्हणेल तसं वागतात.संचालक लुट लुट लुटतात पैशाने नव्हे तर अनन्वीत अत्याचारही करतात.पण स्वतःवर संकट येवू नये म्हणून चूप बसतात.शाळेत ते कोणता इतिहास शिकवीत असतील देवजाणे.घरीही महिला गृहीणी कितीही शिकली असली तरी ती पतीचं ऐकतेच.स्वतःच्या पायावर धड उभी राहू शकत नाही.पण असो आमचा विषय बेरोजगारी आहे.जिथे शिकलेला आणि जगाला शिकविणारा शिक्षक आपल्या भीतीखातर संचालकाच्या विरोधात जात नाही.तिथे हा शिकलेला व रोजी रोटी नसलेला बेरोजगार तरुण खरंच भीती आणि लाजेपायी काम करु शकेल काय?ही विचार करायला लावणारी बाब आहे.
तरुण शिकतात.शिकायला पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.पण या शिक्षणाचा जीवनात यथावकाश उपयोग करायला पाहिजे.जास्त शिकलेले असाल तर त्या ज्ञानाचा उपयोग करुन तुम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयोग करायला हवा.नव्हे तर जीद्दी आणि प्रयत्नांच्या जोरावर एखादा उद्योग उभा करायला हवा.तसेच इतर तरुणांना रोजगार दिला पाहिजे.भांडवल तर सरकार देते.आज देशात बेरोजगारांसाठी उद्योगाच्या अनेक योजना आहेत.त्यातून तुम्हाला उद्योग सुरु करायचा असेल तर मार्गदर्शनासह भांडवलांचीही मदत होते.पण आमची मानसिकता आम्हाला नोकरीशिवाय दुसरं करु देत नसल्याने आम्ही मागे आहोत.आम्हाला मेहनत आवडत नाही.आम्हाला सुख हवं आहे.उद्योग डुबण्यापुर्वी आमची मानसिकता आधी डुबते.आम्ही विचार करतो की आम्ही लावलेला उद्योग भविष्यात डुबला तर.......त्यापेक्षा नोकरी केलेली बरी.ही मानसिकता.म्हणूनच आज बेरोजगारी वाढली आहे.खरं तर या तरुणांनी संशोधन क्षेत्रात जावून नवनवे शोध लावायला हवे.पण आम्हाला वाटते की उद्योग काय कमी शिकलेलाही माणुस करतो.मी कसा करु?याही लाजेमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे.कामे आहेत पण आम्हाला ती कामे करायला लाजच पुष्कळ वाटते.
शेतक-यांच्या मुलाचं उदाहरण घेतल्यास शेतक-यांच्या मुलांनी शिकून शेती विकून नोकरीवर लागण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्याच शेतीत नवनवे प्रयोग करुन वाण शोधले पाहिजे.सध्या शेती पिकत नाही.रासायनिक खताने जमीनीचा पोत कमी झाला आहे.तेव्हा या बेरोजगारांनी लोकांना आपल्या शिक्षणाच्या जोरावर मार्गदर्शन करुन कंपोष्ट किंवा सेंद्रीय शेतीकडे वळवले पाहिजे.तसेच शेतकरी ज्या आत्महत्या करतात त्याही आपल्या शिक्षणाच्या व बुद्धीच्या जोरावर रोखल्या पाहिजेत.त्या शेतक-यांना पीक कसे जास्त प्रमाणात होईल याचा विचार करुन आपल्याला लागलेला बेरोजगारीचा दाग नष्ट केला पाहिजे.
सरकारकडे उद्योगाच्या योजना जरी असल्या तरी ते पाहिजे त्या प्रमाणात उद्योग उभारु शकत नाहीत.तसेच बेरोजगारीला आणि बेरोजगारालाही सरकार न्याय देवू शकत नाही.त्यांना काही एकच काम नाही.तेव्हा आपण सरकारला दोष न देता आपणच स्वतः होवून पुढं येवून बेरोजगारी संपवायला हवी.बेरोजगारी हा कलंक असून आपण जरी उच्च शिक्षण घेतलं असलं तरी ते उच्च शिक्षण लाजण्यासाठी आणि गुलामीसाठी घेवू नये.जर शिक्षण घेवून कोणत्याही कामाची लाज वाटत असेल तर असले शिक्षण न घेतलेले बरे.कोणतेही उद्योग हे हिन आणि उच्च दर्जाचे नाहीत.तुम्ही जर उद्योगाला श्रेष्ठ कनिष्ठच्या कसोटीत बसवत असाल तर तुम्ही जीवनात काहीच करु शकत नाही.उद्योगाला जास्त शिक्षण लागत जरी नसलं तरी जे जास्त शिक्षण घेतात,ते यशस्वी उद्योग करु शकतात.जे कमी शिकलेले असतात.ते मात्र तेवढी कर्तबगारी उद्योगात दाखवू शकत नाहीत.
खरंच बेरोजगारी एक गंभीर समस्या जरी असली तरी तिला कसं हाताळायचं हे आपण ठरवायला हवं.बेरोजगारीवर मात करण्यासाठी तुमच्यात हिंमत असायला हवी.जोपर्यंत तुम्ही बेरोजगारीवर मात करण्याची हिंमत करणार नाही,तोपर्यंत तुम्हाला कामाचं मुल्य कळणार नाही आणि तुम्ही जीवनात यशस्वी ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवं.तेव्हाच ख-या अर्थानं बेरोजगारीवर मात करता येईल.
अंकुश शिंगाडे
९९२३७४७४९२
[06/06, 3:06 PM] अमित बडगे: *(38)*
*बेरोजगारी*
जगतामध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रंमाकावर आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १०० कोटीहून अधिक आहे. ज्या भारत देशात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता त्या देशात आज ज्या मुख्य समस्यांना तोंड द्यावे लागते त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे प्रचंड बेरोजगारी ची समस्या आहे. एका सम्पन्न देशावर ही वेळ का आली याचा खोलवर जावून विचार केला सर्वात आधी बोट सत्ता राबवणाऱ्य राजकीय नेत्याकडे जाते. बेरोजगारी नाहीशी करण्यासाठी भारतात असलेल्या उपलब्ध साधनसम्पत्ति चा वर्षानुवर्षे वापरच केला गेला नाही. बेरोज़गारी वाढन्याचि कारणे शोधली गेली नाहीत, तरुणांना आसणारे व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल केला गेला नाही, रोजगार निर्मीती केंद्रे स्थापन केली नाहीत आणि स्वातंत्र्या नंतरच्या ७० वर्षाच्या कालखंडात केवळ सत्ताधीशांच्या प्रचंड इच्छा शक्तिचा अभाव हेच भारतातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे
प्रती वर्षी लाखोच्या संख्येने युवक पदव्यांची नुसती कागदी प्रमाणपत्र घेवुन महाविद्यालया तून बाहेर पडतात त्यांच्या हातात पदवी असते परंतु व्यावसायीक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने एखादा व्यवसाय उभा करता येत नाही, पदवी हातात पडल्यावर युवकांचे लोंढे नोकरीच्या शोधात भटकत असतात आणि प्रत्येकाला नौकरी मिळण्याईतपत व्यवसयाची निर्मीती झालेली नसल्याने बेरोजगार युवकांची संख्या दिवसोदिवस वाढते आहे
बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करता येवू शकते..
सर्वप्रथम समाजात नोकरदार हाच सर्वोत्तम ही कल्पना दूर केली पाहिजे
युवकांना अधीकाधिक व्यावसायीक शिक्षण दिले पाहिजे
यूवकांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे
राष्ट्रीयक्रूत बॅकानीं युवकांना कमी व्याजदरात कर्ज दिले पाहिजे
या बरोबरच अनेक उपाययोजना अमलात आणता येतील जेणेकरुन यावर मात करता येवू शकेल.
- अमित प्र. बडगे, नागपूर
(7030269143)
[06/06, 3:46 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: *(४०) मनिषा पांढरे*
*बेरोजगारी एक समस्या*
बेरोजगारी ही एक आपल्या देशासमोरील भीषण समस्या आहे. एका अर्थेशास्त्रीय सर्व्हेप्रमाणे भारतात ७७% लोकांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही. तर रोजंदारी किंवा हंगामी नोकरी करणारे ६७% लोकांना दहा हजार पेक्षा कमी उत्पन्न मिळत आहे.रोजगार निर्मिती प्रचंड घट निर्माण झाली आहे.
मेक- इन- इंडिया सारखे उपक्रम हाती घेऊन गावागावात विविध व्यवसाय सुरू केले आणि आपल्याच वस्तूंचा वापर केला तर यावर थोडेफार नियंत्रण मिळू शकते.
आज गावागावात असंख्य मुलं उच्चशिक्षित पदव्या घेऊनही त्यांना नौकरी न मिळाल्याने वैफल्यग्रस्त, नाउमेद होतात आणि मग आत्महत्येकडे वळतात. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर हेच तरुण देशाचा विकासासाठी प्रयत्नशील राहतील. शिक्षण देत असतांनाच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
भरपूर शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना हलकी नौकरी किंवा व्यवसाय करावासा वाटत नाही. त्यांच्या शिक्षणाबरोबरच श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवले तर त्यांना कोणतेही काम करण्यास लाज वाटणार नाही. शेती, उद्योगधंदे, कुक्कुटपालन, शेळीपालन असे छोटे छोटे व्यवसाय सुध्दा भरपूर फायदा मिळवता येईल. हेच तरुण पिढी समजले तर बेरोजगारी कमी होईल.
आज बॅंका तरुणांना उद्योग धंदे उभारण्यासाठी मुद्रा दोन देत आहे.याची माहिती तरुणांना करुन दिल्यास तरुण पिढी व्यवसायाकडे वळतील पण समस्येवर दहा टक्के तरी घट होईल.
वाढते शहरीकरण रोखून आपण आपल्या गावातच रोजगार करून समृध्द झालो तर भारतात बेरोजगारी कमी होईल हे नक्की.
*मनिषा पांढरे ,सोलापूर*
[06/06, 3:53 PM] शुभदा दीक्षित: (11)
बेरोजगारी : गहन समस्या
'दारिद्र्य मरण ह्यातूनी मरण बरे वा दरिद्रता खोटी'. ही उक्ती म्हणते तसे दारिद्र्या पेक्षा मरण बरे. दरिद्रता म्हणजे जिवंतपणी मरण भोगणे. नोकरी नाही, काम धंदा नाही, म्हणजे बेकारी. बेकारी येताना दारिद्र्य घेऊन येते. त्यातून बाहेर पडणे, कष्टाचे काम.
देशात काम करणाऱ्यांची संख्या अधिक, ते काम करायला तयार असतात, पण त्यांना योग्य मजुरीवर काम मिळत नाही, त्याला बेरोजगारी म्हणतात. अशा व्यक्ती ज्या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या योग्य असूनही, त्यांना इच्छा असूनही, योग्य मजुरीवर काम मिळत नाही त्यांना 'बेकार' म्हणतात.
बेरोजगारी देशाच्या विकासातला प्रमुख अडथळा आहे. भारतात बेरोजगारी ही गंभीर समस्या आहे. शिक्षणाचा अभाव हेही एक त्यास कारण आहे. रोजगाराच्या कामाची उपलब्धता आपल्या देशात कमी आहे. विकसनशील देशांपुढे ही मोठी समस्या आहे. या बेरोजगारीचा व्यक्तिगत परिणाम होतोच. तसेच समाजावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून सरकारला या समस्येवर काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
सध्यातरी बेरोजगारी हा समाजाला मिळालेला शाप आहे. ही समस्या नियंत्रित करण्यासाठी काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आपल्या देशाची वेगाने वाढणारी लोकसंख्या हे एक बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. आपल्याकडे बेकार लोकात इतके आहेत त्यांना सगळ्यांना काम देणे सरकारला कठीण आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास खूप हळूहळू होत आहे. त्यामुळे कामाच्या संधीच कमी असतात. आपला कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे ठराविक काळातच कामाची संधी असते. उदाहरणार्थ, पावसाळ्यात लावणी करताना, कापणी करताना किंवा ऊस तयार झाल्यावर कारखान्यात काम मिळते. औद्योगिक क्षेत्रातही आपल्या देशाची वाढ बेताचीच आहे. त्यामुळे रोजगारहि त्याच प्रमाणात उपलब्ध असतो. हल्ली कुटीर उद्योग पण कमी झाला आहे. बरेचसे उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे खूप कारागीर बेरोजगार झाले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून आपण वर आले पाहिजे, तरच बेरोजगारी कमी होईल.
बेरोजगारी कमी करण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण हवे. लोकांना असे शिक्षण दिले पाहिजे ज्यामुळे ते पैसे कमवू शकतील. आपली औद्योगिक क्षेत्रात प्रगती जास्त झाली, तर नोकऱ्यांची उपलब्धता वाढेल. विदेशी कंपन्यांना आपल्या कडे येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रामीण भागात रोजगाराची संधी वाढवली पाहिजे. सगळ्यांनी शहराकडे धाव घेण्यापेक्षा, ग्रामीण भागात कारखाने सुरू झाले पाहिजेत. म्हणजे तेथे रोजगार वाढेल.
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे सगळ्या देशात लॉक डाऊन करावेच लागले. त्यामुळे मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स, विमानसेवा, रेल्वेसेवा दुकाने, कारखाने सर्व ठप्प झाले आहे. त्यामुळे कुणाला नोकरीवरून काढले आहे, कोणाच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. छोटे छोटे धंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेकारी, बेरोजगारी खूपच वाढली आहे. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पैसे मिळवण्याचा कुठलाच स्त्रोत उपलब्ध नाही. देशात आर्थिक मंदी आली आहे. त्यातून वर येण्यासाठी खूपच धडपड करावी लागणार आहे. मला तर वाटते कोरोनाच्या महामारी पेक्षा बेरोजगारीच्या महामारीचे संकट फार मोठे आहे. त्याला तोंड देताना ससेहोलपट होणार आहे. ह्या बेरोजगारीमुळे मानसिकरीत्या माणूस कमकुवत होतो. नकारात्मक विचार डोक्याला भेडसावून टाकतात.
बेरोजगारीमुळे कामगारांना मानसिक तणावांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारने 'बेरोजगारी भत्ता योजना' राबवली आहे. ही बेरोजगारी भत्ता योजना ज्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे त्यांच्यासाठी आहे. रुपये 1000- रुपये 3500 पर्यंत हा भत्ता दिला जातो. ही योजना प्रत्येक राज्य राबवित आहे.
सर्वात प्रथम आपण आपले दुःख, आपले बेकारीचे संकट, याचा स्वीकार केला पाहिजे. जीवनशैलीत बदल करायला हवा असेल तर तोही केला पाहिजे. बेकारी तून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. हात-पाय मारल्यावर किनार्यावर पोहोचतोच. लक्षात ठेवा, 'प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असतेच'.
शुभदा दीक्षित (11)
पुणे
[06/06, 4:07 PM] सुंदरसिंग साबळे: 34
खडूफळा नव्हे; बेरोजगारीचा मळा!
===============
डी. एड., बी. एड. पदवी घेतली, पण शिक्षक बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. शिक्षकाची सरकारी नोकरी मिळवायची, तर "टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट' म्हणजे "टीईटी' किंवा "टेट' अन् "महाराष्ट्र टीचर्स ऍप्टिट्यूड ऍन्ड इंटेलिजन्स टेस्ट' म्हणजे "टैट', अशा चाचणीचे अडथळे पार करायचे. तेही केले, तरी दहा वर्षांत भरतीच झाली नाही.
डी. एड., बी. एड. पदवी घेतली, पण शिक्षक बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. शिक्षकाची सरकारी नोकरी मिळवायची, तर "टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट' म्हणजे "टीईटी' किंवा "टेट' अन् "महाराष्ट्र टीचर्स ऍप्टिट्यूड ऍन्ड इंटेलिजन्स टेस्ट' म्हणजे "टैट', अशा चाचणीचे अडथळे पार करायचे. तेही केले, तरी दहा वर्षांत भरतीच झाली नाही. नुसत्या घोषणा सुरू आहेत. बेरोजगारीचा ब्रह्मराक्षस अंगावर चालून आलाय. वय निघून चाललं, लग्नं थांबलीत. ही अशी बेरोजगारी, उपासमार नशिबी आलेल्यांची केवळ शिक्षण क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींची संख्या लाखोंच्या घरात आहे. शिक्षणमंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर, पर्यायाने सरकारवर दबाव आणण्याचे अन्य सगळे मार्ग खुंटल्याने हतबल युवावर्गाने सोशल मीडियाचा आधार घेतलाय. शिक्षकभरतीसाठी रोज सरकारला साकडं घातलं जातंय. पण सरकार काही लक्ष देत नाही.
बेरोजगारीचा प्रश्न किती अक्राळविक्राळ आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर केवळ शिक्षक बनण्यासाठी पात्र असलेल्यांची आकडेवारी पुरेशी आहे. डी.एड. किंवा बी.एड. झालं, की लगेच खडूफळा मिळेल असं नाही.
सरकार एकीकडे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तिथल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याचं धोरण अमलात आणू पाहत आहे. त्याशिवाय, मोठमोठ्या कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात उतरावं, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उघडाव्यात यासाठी पायघड्या घातल्या जाताहेत, पण त्या आंतरराष्ट्रीय शाळा ग्रामीण किंवा डोंगराळ आदिवासी भागात नव्हे, तर शहरांच्या आजूबाजूला उघडल्या जातील. जिथं शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची, झोपड्यांपर्यंत ज्ञान पोचवण्याची गरज आहे, तिथं या कंपन्या जाणार नाहीत. सार्वत्रिक शिक्षणाची जबाबदारी सरकारची असल्यामुळं त्या धोरणाची मदत ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कशी होणार?तसं पाहता शिक्षकांचा दर्जाही चिंताजनक स्थितीत आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील असे गृहीत धरले, तरी त्या सगळ्यांना पुन्हा अभियोग्यता चाचणीचा आणखी एक अडथळा पार करावाच लागणार आहे. हे मनोगत एका भावी शिक्षका चे आहे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणे सुध्दा पाप आहे असे आपले मत व्यक्त करतो तो सर्वसाधारण कुटुंबातील आहे.
===============
श्री.सुंदरसिंग आर.साबळे
गोंदिया
मो.9545254856
[06/06, 4:41 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ विषय : - बेरोजगारी --बेरोजगारी म्हणजे रोजगार करण्यास पात्र असून सुध्दा रोजगार न मिळणे.अशी वेळ आपणावर कधी येते तर ज्यावेळी काम करणारांची संख्या जास्त असते आणि कामाची संख्या कमी असते.त्या मळे बेरोजगारी वाढत असते.बेरोजगारीच्या वेगवेगळ्या पध्दती आपण अभ्यास केला तर लक्षात येईल.त्यामधील पहिला प्रकार (१)अनैच्छिक बेरोजगारी वर सांगितले प्रमाणे लोकांची काम करण्याची पात्रता असून कामाची उपलब्धी कमी असल्यामुळे कमी मोबदल्या मध्ये काम इच्छे विरोध करावे लागते त्यास अनैच्छिक बेरोजगारीच म्हटले जाते. (२) ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करणेची इच्छा नसते ख -या अर्थाने ही बेरोजगारी ची स्थिती नसून निष्क्रियतेची स्थिती म्हणावी लागेल.(३) अर्ध बेरोजगारी- ही एक अशी परिस्थिती असते की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता असते ती पुर्णपणे वापरली जात नाही.परवा कोरोनाच्या अगोदर म्हणजे सन २०१९ मध्ये नोकरीची जाहिरातीची माहिती सोशल मिडीया वर फिरत होती की पदव्युयर शिक्षीत व
यक्तीने पहारेक-याची नोकरी करणे किवा इंजिनिअर व्यक्तीने शिपाई याची नोकरीकरणे म्हणजे अर्ध बेरोजगारीच म्हणतात.
(४) पुर्ण बेरोजगारी -व्यक्ती कडे पात्रता,कौशल्य,इच्छाशक्ती असुनहि कोणत्याच ठिकाणी काम मिळत नसेल याला पु्र्ण बेरोजगारी म्हणतात. बेरोजगारी चे प्रकार (१) ग्रामीण बेरोजगारी -ही ग्रामीण भागात आढळते.( अ) हंगामी बेरोजगारी -- ग्रामीण भागात काही काळा पुरतेच काम असते जसे शेती चे काम ४-५ महिन्याचे ते संपल्यावर बेरोजगारी शिवाय काही पर्यटन ठिकाणी मार्गदर्शक,लग्न समारंभातील वादक किवा यात्रेच्या गावोगावी जाणा-या तमाशा मधून काम करणारे कलावंत इत्यादी हे हंगामी बेरोजगारीच म्हणतात.
(ब) प्रच्छन्न बेरोजगारी- - (छुपी) ज्या ठिकाणी कमी मजूरांची गरज असताना जास्त मजूर लावणे समजा २०कामगारांची गरज असताना तेथे २५ मजूरानी काम करणे येथे अतिरीक्त ५ कामगार हे छुपे बेरोजगारी ठरतात.ते उत्पादनात कोणत्याहि भर टाकत नाहीत.अशा अतिरिक्त कामगारांनी उत्पनाचे मूल्य विनाकारण वाढते . शहरी बेरोजगारी--जी बेरोजगारी शहरी भागामध्ये आढळते तिला शहरी बेरोजगारी असे म्हटले जाते.(अ) सुशिक्षित बेरोजगारी -- ज्या व्यक्तीने शिक्षण घेतलेले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनहि काम मिळत नसेल अशा स्थितीला सचशिक्षीत बेरोजगारी असे म्हणतात. ही बेरोजगारी १०वी,१२वी,पास झालेले पदवी पू्र्व पदवीधर,पदव्युतर शिक्षण घेतलेले या बेरोजगारी मध्ये आढळून येतात.(ब) तांत्रिक बेरोजगारी-- उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेरोजगारी निर्माण होते त्या बेरोजगारी ला तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार कामगारा ऐवजी यंत्राना प्राधान्य देतात.त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे या मुळे कामगारांना कामावरून कमी केले जाते.त्यामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते.(क) घर्षणात्मक बेरोजगारी--आर्थिक अडचणी मुळे कामगारांना तात्पुरते काढले जाते,यंत्रातील बिघाड,कच्च्या मालाची टंचाई, वीज कपात इत्यादिमुळे कामगारांना कमी केले जाते.अशा स्थितीत कामगारांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारे पर्यंत बेरोजगार रहावे लागते.म्हणून त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. कारण या बेरोजगारी च्या मधल्या काळात त्यांनी परस्थितीशी संघर्ष केलेला असतो.( ३) चक्रीय बेरोजगारी -- तेजीच्या अवस्थे नंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारी ला चक्रीय बेकारी म्हणतात. (४) संरचनात्मक बेरोजगारी-- जेव्हा अर्थ व्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.उदाहरण ध्याववयाचे झाल्यास रिक्षा मुळे शहरातील घोडागाडी कालबाह्य झाली म्हणजेच त्यांना संचरचनात्मक बेरोजगारी म्हणतात. भारतातील बेरोजगारी ची परस्थिती ( सध्यस्थिती) ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणावर कामगारांना इच्छेविरुद्ध बेरोजगारी व्हावे लागते. हे सत्य आहे.बेरोजगारी ची कारणे-(१) लोक संख्या वाढीची जास्त गती आहे (२) शेतकरी शेती मध्ये परंपरागत पध्दतीचा वापर करतात त्या मुळे भूमीची उत्पादकता कमी राहते आणि रोजगार वाढत नाही.परिणामत: बेरोजगारी वाढते..... लेखक-- जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१
[06/06, 4:44 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*बेरोजगारी आणि समाज*
बेरोजगारी याचे व्यक्ति परत्वे अर्थ बदलताना आपण पाहतो. बेरोजगारी ची निश्चित अशी व्याख्या करने जरा कठीणच आहे. बेरोजगार कुणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो. विनावेतन घरगुती कामात मदत करणारे, दिवसरात्र कुट आधार देण्यासाठी कोणताही मोबदला न घेता मेहनत करणारा मोठा समुह समाजात आहे. ते बेरोजगार काय? किमान किती वेळ काम केले तर तो बेरोजगार नाही असं म्हणता येईल. काही दिवस काम करुन मग काम सुटलं असेल तो बेरोजगार की ज्याला आजपर्यंत कधीच कुठेही काम करण्याची संधी मिळाली नाही तो बेरोजगार? असे सुद्धा लक्षात येते की मनाप्रमाणे काम मिळाले नाही म्हणून काम करत नाही म्हणून तो बेरोजगार काय? या व अशांसारख्या अनेक अडचणी बेरोजगार ठरवताना लक्षात येतात. सर्वप्रथम बेरोजगार कुणाला म्हणायचं हे निश्चित करणे आवश्यक आहे. एकदा का हे निश्चित झाले कि आपल्या देशात बेरोजगारांची संख्या कमी करता येईल. याची एकदा निश्चिती झाली की मग त्यांच्या कुवतीनुसार, शिक्षणानुसार संधी उपलब्ध करून देऊन बेरोजगारी कमी करता येईल.
आपल्या देशात लोकसंख्या वाढ ही सुद्धा बेरोजगारी मागिल मोठी समस्या आहे. ज्याप्रमाणात जन्मदर वाढत आहे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. याला जबाबदार जनता तर आहेच पण काही प्रमाणात अर्थव्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे.
बेरोजगारी ची अनेक कारण आहेत. त्यात लोकसंख्या वाढ, व्यसनाधीनता, जास्त पैशाची हाव, स्वभाव, शिक्षण इत्यादी गोष्टी यात मोडतात.
प्राचीन काळी रोजगाराच्या संधी कमी होत्या, उद्योगधंदे सुद्धा कमी होते, कारखाने नव्हते परिवहनाची साधने नव्हती तरी त्या काळात उपासमार, बेरोजगारी या समस्या कमीच होत्या. अर्वाचीन काळात कोणतंही काम करायचं म्हटलं तर मनुष्यबळाची जास्त आवश्यक्ता होती. जसजसे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले तसतशा या समस्या भेडसावत आहे. याच अगदी छोटंसं उदाहरण,
शेतकरी आधी शेतातील प्रत्येक कामात बैल व माणसे या दोन स्त्रोत वापरायचा आता याठिकाणी ट्रॅक्टर, पंखे, विजेवरील उपकरणे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता हजारो माणसे कामापासून वंचित होऊन त्यांची जागा इलेक्ट्रॉनिक्स साधनांनी व तंत्रज्ञानाने घेतली. हीच लाखो माणसं आता बेरोजगार झालीत. कल्पना केली तर एका बैलजोडीच्या शेती मागे शेतकर्यांच्या शेतात राबणारे हजारो हात आता रिकामे झालेत.
शिक्षण आज सर्वांनाच वाटतं की खुप शिकावं आणि शिकायलाच पाहिजे. शिक्षण घेणे प्रत्येकाचा हक्क आहे पण शिक्षणानंतर नोकरीचा अट्टाहास करण्यात सुद्धा बेरोजगार वाढत आहेत. एवढे शिक्षण घेतले आणि आता क्षुल्लक काम कसे करायचे या भावनेने अनेक सुशिक्षित तरुणवर्ग बेरोजगार आहे. कोणतेही काम उच्च किंवा कमी दर्जाचे नसुन काम महत्वाचे आहे हे जेव्हा पर्यंत समजणार नाही तेव्हा पर्यंत आपल्या देशातून बेरोजगारी ची समस्या सुटणार नाही. याकरिता मानसिकता बदलने अत्यावश्यक आहे.
सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेलं आहे. ग्रामीण भागातील मजुरांचा खुप मोठा समुह रोजगार बंद पडल्यामुळे व कोरोना व्हायरस आजारापासून बचाव करण्यासाठी आपल्या गावाकडे ग्रामीण भागात परत आले. यांना शेतीची कामे, अंगमेहनतीची कामे, ही सवय आता सुटलेली आहे. गावाकडे पोचल्यानंतर आता काय करायचे ही मोठी समस्या या बेरोजगार झालेल्या समुहापुढे आलेली आहे.
आताच खरी कसोटी आहे बेरोजगारी वर मात करण्याची. काम केलं नाही तर उपाशी राहावं लागेल आणि काम करायचं तरी कोणतं? आजच्या या महामारी मुळे बेरोजगारी या समस्येबरोबरच मानसिक आधाराची सर्वात जास्त आवश्यकता आहे अन्यथा शेतकरी आत्महत्या प्रमाणेच बेरोजगारांची आत्महत्यांचे प्रकार पुढे येण्याचे नाकारता येत नाही.
आज गरज आहे ती एकमेकांना साथ देण्याची. समाजातील बांधिलकी जोपासायची व बेरोजगारांना आधार द्यायची.
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
9423414686
[06/06, 4:46 PM] Jeevansing khasawat: बेरोजगारी
बेरोजगारी ही समाजाला लागलेली एक कीड आहे.प्रत्येक मुलाला वाटते आपण खूप शिकावे खूप शिकून मोठे व्हावे आणि चांगल्या नवकरी ल लागून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे . व प्रत्येक पालकाला वाटते आपलां मुलगा खूप शिकवा चांगल्या पदावर नोकरी करून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे .या साठी समाजात प्रत्येक पालक मेहनत करतो .आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत शिकवतो .चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो.पण आपल्या पाल्याला गुणवत्ता मागे धावण्यासाठी भाग पाडतो .पण जीवन जगण्याचे कौशल्य त्यात निर्माण करत नाही .त्या मुळे मुलगा चांगला शिकतो .त्या साठी पालक ही भरपूर खर्च करतात आणि आता स्पर्धा अतोनात वाढली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अतोनात प्रयत्न करावं लागत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे.आणि संगणकाने कर्मचाऱ्याची जागा घेतली आहे.त्या मुळे सुध्दा बेरोजगारी वाढली आहे.संगणक युगात मानवाने अतोनात प्रयत्न केले आहे.डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तर तरुणाईच्या जोरावर भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले आहे.कारण जगात सर्वात जास्त तरुणाई भारतात आहे.तरुणाई तडफदार असल्यामुळे भारत अतिशय प्रगती पथावर आहे.
परंतु कोरॉना lockdown काळात समजले की कोणत्या राज्यात किती बेरोजगारी आहे.महाराष्ट्रातच नाही तर अख्या भारतात खूप मुले शिकलेली आहे .परंतु त्याच्या हातात काम नाही .मुलांना लहानचे मोठे करणे ,त्यांना शिक्षण देणे ,यात आई वडिलांची पूर्ण कंबर मोडते .मुलगा लहान वयापासून शिकत असतो आणि शेवटी त्याला दुसरे काम जमतनाही त्या मुळे त्याच्या जीवनात निरागसता येते .आणि बेरोजगारीच्या खाई मध्ये ढकलल्या जातो.शेवटी निराशा हाती येते.
हातात डिग्र्या घेऊन खिसा रिकामा असणाऱ्या तरुणांची संख्या खूप वाढली आहे .या साठी शिक्षणात बदल करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वेगळे वेगळे संकट देखील येत आहे या साठी समोरचे शिक्षण हे आवाहन पेलण्यास सक्षम करणारे शिक्षण असायला हवे.तर कागदाच्या डिग्र्या गोळा करणारे शिक्षण नको.
या साठी शासन स्तरावर नियोजन असायला हवा.आणि समाजाची साथ असायला हवी.
हल्लीच्या पिढीचे बेरोजगार वाढण्याचे असेही कारण आहे .की एखाद्या शाखेकडे काही मुले वळल्यास सर्व मुले त्याच शाखेकडे वळतात
आणि ज्यांच्यामध्ये खरे कौशल्य आहे ती मुले रोजगार निर्माण करतात .आणि बाकी मुलामध्ये बेरोजगारी. चे सावट येते.
आपण कितीही शिकलो तरी त्याला अर्थ नाही त्या साठी तरुणांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता हातात आले ते काम करावं आणि कौशल्य निर्माण करावं.शिकून फक्त नोकरीच्या च मागे न धावता वेगवेगळ्या मिळेल त्या क्षेत्रात तरुणांनी आपले जीवन व्यासस्थपण करायला हवं.
चर्च. म्हणतात की संधी आहे ,तुम्ही ठोटावा संधी दार उघडेल , मागा मिळेल.सशर्त ठेवा संधी मिळेल ,आपण जे ही काम करत असाल ते प्रामाणिक पने इमानदारीने करा .कामात झोकून द्या ,हे काम माझं म्हणून करा आपल्या कामाशी प्रामाणिक रहा .तेंव्हा यश तुमच्या हाती आहे.
नोकरी मध्ये प्रतिष्ठा असते . येवढं जरी सत्य असेल परंतु.नोकरी मध्ये फक्त गरजा पूर्ण होतात.
जगाच्या सर्वात श्रीमंत यादीत आपल्याला व्यावसायिक लोकं च दिसतील त्यात नोकरी वाला दिसणार नाही. म्हणून आपण प्रामाणिक पने संधी शोधून आपले करिअर करायला हवे.
सायकल वर दूध विकणारे रामदेव बाबा आज व्यवसाय करून अब्जो रुपये मध्ये खेळत आहे. त्यांना रोजगारी नव्हती का.?होती परंतु त्यांनी संधी शोधली त्यांच्याकडे कोणती डिग्री आहे ,ते आज किती तरी लोकांना गळेगाठ पगार देत आहे.महणून आपणही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून कार्याची योग्य दिशा ठरवायला हवी व एखाद्या कामात परिपूर्ण कौशल्य निर्माण करायला हवा.
पेट्रोल पंप वर काम करणारे धिरुधाई अंबानी यांना मालकाने कामावरून काढून टाकले तेंव्हा ते उदास न होता स्वबळावर कार्य करून जगाच्या श्रीमंत यादीत आहेत.त्यांनी कोणती डिग्री कमावली असेल.
जीवन जगण्यासाठी पैसा हा महत्वाचं साधन आहे.आणि सर्व आपण धडपड करतो फक्त पैशासाठी .एकवेळ पैसा यायला सुरुवात झाला की अपो आप पैसा यायला सुरुवात होते म्हणून संधी शोधा सापडेल. आपण बेरोजगारी म्हणत बसल्यास भारताची परिस्थिती अतिशय हलाखीची होईल या साठी तरुणाईला भरपूर काम करण्याची विविध स्तरावर संधी उपलब्ध करून द्यायला हवे.काही तरुणांनी उद्योग करायचं ठरवल्यास पैशाची गरज असते.त्या साठी काही नियम कडक असतात त्या वर शिथिलता देण्यात यावी म्हणजे तरुण पिढी सळसळत्या रक्ताने कामाला लागेल.
एक चहा विकणारा देशाची सत्ता हातात घेऊन जगावर वर्चस्व गाजवण्याच प्रयत्न करतो .हे फक्त बुद्धिमत्ताच्या जोरावर .अशे आदर्श समोर ठेऊन आजच्या पिढीने कार्य केल्यास आपो आप बेरोजगारी कमी होईल या साठी गरज आहे
खरे मार्गदर्शन आणि आत्मविशवासपूर्वक काम करण्याची .
,"प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे"
,"प्रयत्ना अंती प्रमेश्र्वर "
या उक्तीचा वापर करून सतत कार्यशील आसावे.
जीवन खसावत
भंडारा ९५४५२४६०२७
[06/06, 5:10 PM] Manik Nagave: 07 लेख
बेरोजगारी
आज भारत देशासमोर सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे बेरोजगारी होय. व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अर्थार्जनासाठी साधन उपलब्ध नसणे म्हणजे बेरोजगारी होय. आपले दररोजचे जीवन-यापण करण्याकरता व्यक्ती कोणते ना कोणते तरी काम करत असते. कामातून आलेल्या पैशाचा उपयोग ती आपल्या कुटुंब चालविण्याकरिता करत असते. पण जर कामच नसेल तर ती व्यक्ती अर्थार्जन करू शकणार नाही, कारण त्याच्या हाताला कोणतेच काम नसणार आहे.
बेरोजगारी ही देशाच्या प्रगतीच्या वाटेतील मोठा अडथळा ठरत आहे. कारण देशामध्ये बेकार तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. कारण आहे वाढती लोकसंख्या, जरी लोकसंख्या वाढली तरी त्या प्रमाणामध्ये कामाची उपलब्धता नाही. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे,90% टक्के लोक शेतीच्या कामावर अवलंबून असतात. शेतीची कामे ठराविक काळात,वेळेत उपलब्ध असतात. सुशिक्षित व अशिक्षित असे बेरोजगारांचे प्रमुख दोन प्रकार करता येतील
बेरोजगारी वाढण्या पाठीमागच्या कारणांचा शोध घेतल्यास महत्त्वाची तीन कारणे पुढे येतात त्यापैकी पहिले म्हणजे,
1) वाढती लोकसंख्या होय.
कामाची उपलब्धता कमी असल्यामुळे अशिक्षित यांच्याबरोबर अनेक सुशिक्षित ही बेकार फिरत आहे.
दुसरे कारण
2) आपली शिक्षा पद्धती-
आपली शिक्षा पद्धतीत अनेक वर्षांपासून महत्त्वाचे बदल करणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाहीत. त्यामुळे अनेक उच्च शिक्षीत तरुण-तरुणी हातामध्ये पदव्यांचे भेंडोळे घेऊन नोकरीसाठी दारोदार फिरत आहेत.व नीराश ,नाराज होऊन बऱ्याच वेळा आत्महत्या देखील करत आहेत. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
तिसरे कारण
3) लघु उद्योगांचे नष्ट होणे.
परंपरागत वारसाहक्काने चालत आलेले व्यवसाय सोडून अनेक तरुण-तरुणी नोकरी करण्याच्या उद्देशाने शहराकडे धाव घेत आहेत.पण योग्य काम न मिळाल्यामुळे बेकार फिरत आहेत.
यावर उपाय म्हणजे, आजच्या तरुण वर्गाची मानसिकता बदलणे हाच आहे. मी एवढा शिकलेलो आहे आणि मी अशा प्रकारची कामे का करू? अशी मानसिकता तयार झाल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.
त्यावर दुसरा उपाय म्हणजे विद्यार्थीदशेतच मानसिकता बदलणे. कोणत्याही कामाला हलके न समजण्याची प्रवृत्ती तयार करणे. अशाप्रकारे सकारात्मक बदल शिक्षण पद्धतीमध्ये करता येतील.
त्याचबरोबर व्यवसायिक शिक्षण देणे, जेणेकरून त्या शिक्षणाचा पुढे विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये अर्थार्जनासाठी नक्कीच उपयोग होईल. म्हणजेच जीवनाभिमुख शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल.
सरकार ही याचा विचार करत आहे. कारण पंचवार्षिक व इतर योजनेद्वारे लघुउद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. तरुण उद्योजकांना कमी व्याजामध्ये, बिनव्याजी कर्ज दिली जात आहेत. त्यामुळे तरुण वर्गाने या आलेल्या संधीचा फायदा घेऊन तसेच पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर योजनेचा फायदा करून घेऊन भविष्य सुधारण्यास हरकत नाही. आज लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक लोक, लहान मुले, तरुण वर्ग आपला उदरनिर्वाह चालवण्या करता लहान-मोठे व्यापार, उद्योग, कामधंदा करत असलेले दिसतात.ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कोणतेही काम करण्यास न लाजता काम केले की, बेरोजगारीला थोडा आळा बसेल. कोरोना सारख्या महामारी रोगामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. त्यामुळे बरेच जणांच्या असलेल्या नोकरीवर सुद्धा गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या नवीन नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. बऱ्याच जणांच्या पगारामध्ये कपात सुद्धा झालेली आहे. नोकरी टिकवण्यासाठी सर्व हे सहन करत आहेत. त्याला दुसरा उपाय नाही. त्यामुळे कौशल्य भिमुख शिक्षण घेणे हीच काळाची गरज आहे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[06/06, 5:56 PM] वर्षा सागदेव: बेरोजगार
बेरोजगारी आपल्या देशाला लागलेला श्राप आहे. त्यांची कारण मीमांसा करण्या एवजी ती दूर कशी करता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे.
स्किल्ड, सेमी स्किल्ड, अन स्किल्ड पेक्षा बेरोजगारी पदवीधारकां मध्ये जास्त आहे. आमचे एक स्नेही आहेत त्याचे शेत कोंढाळी जवळ आहे. ते सांगत होते गावातले बारावी किंवा पदवीधर ऑटो रिक्षा चालवतात, पण स्वतःच्या शेतात सुद्धा काम करायला तयार नसतात. स्वतःच्या शेतीचा भाजीपाला आजुबाजुचा तालुक्यातील बाजारात विकायला जायला तयार नाही.
गावात एकच आई. टी .आई . सर्टीफिकेट कोर्स केलेला इलेक्ट्रिसीयन आहे .मग तो मनमानी करतो. सरकारी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन ट्रॅक्टर, थ्रेशर घेऊन सगळ्याचा शेतात तास दिठ पैसे मिळतात पण नाही. सगळ्यांना सरकारी, निमशासकीय नोकऱ्या पाहिजे म्हणून बेरोजगारी वाढत चालली आहे. अंग मेहनतीची कामे करायची कोणाचीच तयारी नाही.
ह्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आपली शिक्षण प्रणाली आहे. प्रत्येक जण साक्षर झालाच पाहिजे त्या करीता आठवी दहावी पर्यंत शिक्षणा नंतर ज्याचा आई. क्यु. कमी आहे पुढे शिकणे शक्य नाही त्याना त्या परिसरातील आवश्यकतेनुसार स्किल्सच्या शिक्षणासाठी सोय असावी. म्हणजे त्याला गावात रोजगार मिळेल आणि गावाकडची कामे गावातच होतील .अशा अनेक योजना आहे
वेळेचे बंधन आहे म्हणून पुढे लिहित नाही
डाॅ.वर्षा सगदेव
[06/06, 5:57 PM] Sujata Jadhav: बेरोजगारी!एक शाप!! (28)
भारत देश हा विकसनशील देश आहे,विविध धर्मीय लोक येथे रहातात, याची संस्कृती, परंपरा इतर देशांच्या तुलनेत न्यारीच आहे,म्हणून इतर प्रगतीमध्ये भारत देश मागे असला,तरी संस्कृतीने नटलेला आहे,आपल्या देशात बेरोजगारी चे प्रमाण बरेच वाढलेले आहे,बरीच त्यामागे कारणे आहेत,त्यात सर्वात मोठे कारण-
लोकसंख्या आहे,भारतात अधिक लोकांना रोजगार मिळवून देणे,शक्य नाही,तसेच शेतीतून मिळणारे उत्पादन इतक्या लोकसंख्येसाठी पुरेसे नाही.
हंगामी शेती आपल्याकडे शेतीविषयक इतके आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने किंवा आर्थिक परिस्थिती नसल्याने सुधारित शेतीतील प्रकार नाहीत,म्हणजे काही ठराविक काळात शेती करायची आणि नंतर ती तशीच ठेवायची.
मंद आर्थिक विकास व औदयोगिक विकास हे देखील कारण आहे,आपण इतर देशांच्या ठेवी आपल्या बँकेत ठेवला तरी आर्थिक चलन यात वाढ होऊ शकते,तसेच आर्थिक क्षेत्र ठराविक उत्पादनावर अवलंबून असते,उदा.ठराविक काळानंतर उसतोड मजूर बेरोजगार रहातात त्यांचे काम हंगामानुसार चालते.
कुटिरोद्योग व लघुउद्योग या मध्ये हे पुरेसा पैसा मिळत नाही मजुरांकडून कमी दरात खरेदी केली जाते,तसेच या उद्योगांचे प्रमाण कमी आहे.
प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आपण पाहिले असेल की बेरोजगारी ही आहेच आहे,म्हणजे ती आपल्या सोबतच राहिले,ती कमी व्हावी किंवा हळूहळू तिचे उच्चाटन होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे!!
सुजाता जाधव
नवी मुंबई
कोड नंबर 13
बेरोजगारी एक समस्या
भारतामध्ये बेरोजगारी ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे. आजचा तरुण बेरोजगार बेरोजगारीच्या
चक्र व्यूहात अडकत चाललेला आहे. अनेक तरुणांकडे पात्रता आहे परंतु हाताला काम नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामागे अनेक कारणे आहेत. आजचे युग यंत्राचे युग आहे युग आहे एक यंत्र अनेक मानवांचे काम करू शकते म्हणून कारखानदार विचार करतात जर यंत्र एवढे काम करू शकत असेल तर मानवाची काय गरज त्यामुळे देखील मानव बेरोजगार होत आहे. तरुणास काम दिले तर त्यामागे पगार देणे त्याचप्रमाणे त्याच्या जीवनाची जोखीम म्हणून आयुर्विमा असो भविष्य निर्वाह निधी असून हा खर्च येतो हा टाळण्यासाठी अनेक कारखानदार यंत्रांचा मार्ग निवडताना दिसत आहेत. वाढती लोकसंख्या हेदेखील बेरोजगारीचे प्रमुख कारण म्हणता येईल भारत जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे ज्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हायला हवा त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे देखील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.
वाढती महागाई यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कमी पगाराची नोकरी तरुण नाकारत आहे. रोजगाराच्या संधी या शहरी भागांमध्ये अधिक उपलब्ध आहे त्यामुळे खेड्यातील तरुण मात्र बेरोजगार बनताहेत. खेड्यातील तरुणाला शहरात नोकरी करावयाची असल्यास जागेचे भाडे त्याचप्रमाणे रोजचा खर्च भागत नाही त्यामुळे त्यास शहरात येऊन नोकरी करणे परवडत नाही. रोजगाराच्या रूपात नोकरीची संधी प्रत्येकाला हवी आहे कारण व्यवसायामधील धोका पत्करण्यास आजची तरुणाई घाबरत आहे. व्यवसायासाठी लागणारे भांडवल ही मोठी समस्या आहे त्याचप्रमाणे व्यवसाय पुढे वाढेल की नाही त्यात तोटा येईल का आणि तो सहन करण्यासाठी तरुणाला कर्जबाजारी व्हावे लागते त्याची भीती तरुणास असल्यामुळे तरून हा आयत्या नोकरीकडे रोजगाराचे साधन म्हणून बघतो व्यवसाय करणे नाकारतो.
भारत हा शेती प्रधान देश मानला जातो परंतु पावसाची अनिश्चितता हवामानाची अनिश्चितता यामुळे आजची तरुणाई शेतीकडे वळण्यासाठी कचरत आहे आजचा तरुण सुशिक्षित आहे आधुनिक शेती करण्यास त्याने हरकत नाही. भारतामध्ये अनेक कृषी विद्यापीठे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मातीचा नमुना कोणते पीक व्यवस्थित येईल याची माहिती व्यवस्थित मिळाल्यास कमी पैशात अधिक किफायतशीर शेती तरुण करू शकतो ही बाब आजच्या तरुणांना कळणे गरजेचे आहे. लहान लहान खेड्यांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सहकार चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळवून अनेक लघुउद्योग सुरू करता येतात फक्त गरज आहे जिद्दीची मेहनत करण्याची आणि आपला दृष्टिकोन बदलण्याची. मध्यंतरी च्या दशकात शिक्षकी पेशा म्हणजे रोजगार मिळवून देण्याचे हमखास साधन झाले होते. त्यामुळे आणि विद्यार्थी डीएड करीत होते डीएड करणाऱ्यांची संख्या खूप वाढली परंतु संधी मात्र कमी होत्या राज्यात आणि डी एड ची कॉलेजेस उघडली . अनेकांनी पैसे भरून देखील आपले डीएड चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर सीईटी परीक्षेची तयारी केली परंतु उमेदवार अधिक व संधी कमी झाल्या कुठल्यातरी एकाच क्षेत्राकडे वळण्याचा लोकांचा कल वाढला.
आर्ट शाखेमध्ये पदवी संपादन केल्यास फारशा नोकऱ्या मिळत नाही असा युवकांचा समज झाला आणि त्यांनी विज्ञान शाखेकडे उडी घेतली परंतु विज्ञान शाखेमध्ये अनेक शाखा उपलब्ध आहेत फक्त डॉक्टर इंजिनियर याच नाही तर इतर अनेक शाखा व्यवसायासाठी उपलब्ध आहेत याची बऱ्याच लोकांना माहिती नसते. दहावी-बारावीनंतर सर्वच विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स मिळाले तर बेरोजगारीची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल फक्त नोकरी हेच उदरनिर्वाहाचे साधन नाही तर व्यवसाय करून देखील आपण स्वतः बरोबर इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो ही भावना सर्व तरुणाईमध्ये रुजणे गरजेचे बनले आहे.
लग्नासाठी वरांना पसंती देताना शेतकरी वरास नाकारले जाते त्यामुळे देखील तरुणाई शेती करत नाही व नोकरीकडे मिळते उच्चशिक्षण घेऊनही आज कमी पगाराची नोकरी असली तर दर महिन्याला विशिष्ट पैशाची हमी असल्याने बऱ्याच मुली वराला पसंती देताना नोकरी करणारा वर हवा अशी अट घालतात त्यामुळे देखील शेतीकडे आजचा तरून वळत नाही . लग्नानंतर मुलीला शेतीत काम करावे लागेल त्यामुळे तिला खूप कष्ट करावे लागतील असा गैरसमज सर्व पालकांचा व मुलींचा झालेला आहे परंतु शेतीत कष्ट केल्यामुळे आरोग्य राखले जाते पैसाही मिळतो शिवाय शेती ही अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे साधन आहे विशिष्ट वेळ काम करावे लागत नाही. आपल्या मर्जीचे मालक आपण असतो निर्णय आपल्याला घेता येतात त्यामुळे प्रयोगशीलतेला वाव मिळतो. संशोधन वृत्ती त्यांना मिळते. जगण्याची मोकळीक शेती देते. शेती हे देखील अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे साधन आहे. येथील कष्ट अधिक व पैसा कमी असा गैरसमज अनेकांचा झालेला आहे. शेतीस जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन पशूपालन, दुग्ध व्यवसाय, रेशमी कीडे पालन , मधुमक्षिका पालन फळबागा व्यवसाय देखील फायदेशीर आहेत. शेती म्हटले की दिवसभर कष्ट करावे लागतात असा समज तरुणाईचा झालेला आहे त्यापेक्षा नोकरीमध्ये फक्त दहा ते पाच जायचे आणि घरी यायचे इतर वेळ आराम करायचे अशी तरुणाईची मानसिकता झालेली आहे.
कोरोना या साथीच्या आजाराच्या काळात इतर कोणतेही व्यवसाय चालू नव्हते चालू होते ते फक्त शेती व शेती संबंधित व्यवसाय म्हणजे शेती ही जीवनावश्यक बाब असल्याने त्या संबंधित रोजगार चालू होते व आणि त्यांचे पोट भरत होते करणामुळे शेती व्यवसायाचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे आजच्या तरुणाईला फक्त नोकरीकडे न वळता शेतीकडे वळण्याचे संकेत करोना आजारामुळे मिळालेली आहेत निसर्गानेच रोजगारी ची एक मोठी संधी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे या संधीचा फायदा आजच्या तरुणाईने नक्कीच घेतला पाहिजे.
सविता साळुंके ,श्रीरामपूर
9604231747
कोड क्र. ( 14 )
" बेरोजगारी सर्व समस्यांचे मूळ "
आपला भारत देश हा अनेक समस्यांच्या विळख्यात जखडलेला आहे . भिकारी , दारिद्रय , अंधश्रद्धा , बालविवाह , बालगुन्हेगारी , लोकसंख्या , स्त्रीभ्रुणहत्या , व्यसनाधीनता , सायबर ब्रोकरता , आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बेरोजगार ह्या सर्व समस्यांचा बळी आपला देश ठरत आहे . यापैकी विशेषतः बेकारी किंवा बेरोजगारी ही एक ज्वलंत समस्या होय ...
" बेरोजगारी म्हणजे आवश्यक गुणवत्ता अंगी असूनही कामाच्या संधीचा तुटवडा होय . "
" नाही हातात काम
वाढली ही बेकारी
नाही खिशात दाम
आली गरीबी दारी "
अशाप्रकारे बेकारी ही सर्व समस्यांचे मूळ आहे . ती आपल्यासह दुःख , दारिद्रय , नैराश्य , न्युनगंड , नकारात्मकता , आदी मानसिक व्याधीही घेऊन येते ... परिणामी काही व्यक्ती ह्या नैराश्येला बळी ठरून जीवनाला कंटाळून जाऊन नको ते टोकाचे पाऊलही उचलतात ... आणि आत्महत्या करून आपल्या जीवनज्योतीस विझवून टाकतात ... ह्यांची हजारो उदाहरणे आपल्याला शेतकरी आत्महत्या दर्शवितो ... शिवाय अनेकांना उच्च शिक्षण घेऊन गुणवत्ता असूनही डीग्र्यांचा डझनभर साठा हस्तगत करूनही नोकरी मिळत नाही .... आणि शिक्षणासाठी आईवडीलांनी कर्जाचा डोंगरही डोक्यावर ठेवलेला ... तो फेडता फेडता शरीर व मन हतबल होऊन जाते ... आणि शेवटी हाती येते फक्त दारिद्रय .... शिवाय एवढं शिक्षण घेऊन शेतावर काम करणे म्हणजे हे कमीपणाचे लक्षण होय ... असा गैरसमज मनात बाळगून आजचा हा सुशिक्षित तरूणवर्ग श्रम करण्यास कचरतो .... म्हणून प्रत्येक बालकाच्या मनात अगदी बालवयातच श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जोपासावे ... स्त्री पुरूष समानताही जपावी ... कारण स्त्री ही शरीराने नाजूक असली तरी मनाने खंबीर असते ... म्हणून स्त्रीयांनाही ' चूल आणि मूल ' एवढंच मर्यादित न ठेवता तिनेही आपली कंबर कसून घराबाहेर पडून रोजगार व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे ... पुरूषप्रधानसंस्कृतीची मानसिकताही बदलणे देशहितासाठी अपेक्षित आहे ...
अनेक बेकारी व्यक्ती ह्या नैराश्येमुळे व्यसनी , गुन्हेगार झालेल्या दिसून येतात ... काहींना लग्नासाठी कुणी जोडीदारही देत नाहीत ... त्यामुळेच वाढते स्त्री अत्याचार , लैंगिक शोषण आदी समस्याही उदयास येत आहेत ... शिवाय काही इंजिनियर पदवीप्राप्त बेकार व्यक्ती ह्या नाईलाजाने सेवकपदीही भरातीसाठी धाव घेत आहेत ... तर कुणी कंडाक्टर कुणी रेल्वेभरतीत आगेकूच करीत आहेत ... खरंच बेकारीमुळे आईवडील व पाल्यांचे स्वप्नंही पार धूळीत मिळत आहे ... शिक्षणाचा केलेला खर्च आणि व्यतीत केलेले वय हे दोन्हीही परत कधीच मिळत नाही ... मनातील आशेवर निराशेचे सावट घेऊन ही बेकारी येत असते ...
तेव्हा मनात व मनगटात बळ हे अफाट असायला हवे ... कितीही कठीण परिस्थिती आली तरीही न डगमगता संकटातून धैर्याने वाट काढायला शिकले पाहिजे ... त्यासाठी घरी , समाजात , शाळेत सर्वत्र चांगले संस्कार व आदर्श मूल्ये बालपणीच रूजवावी .. जेणेकरून ही बेकारी , बेरोजगारीची समस्याच निर्माण होणार नाही .. हाती मिळाले ते काम करून उपजीविका करण्याची कलाही प्रत्येक व्यक्तीने अवगत करावी ....
" येणारा दिवस हा
कायम राहत नाही
मनी संयम ठेवता
दुःख होणार नाही "
अर्चना दिगांबर गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552963376
बेरोजगारी:एक मानसिकता
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
शहापूर,ठाणे
भारत हा सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब देश आहे असे गंमतीने म्हटले जाते.याचे कारणही तसेच आहे.भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या पेक्षा जास्त लोकसंख्या ही कार्यशील गटात मोडते.या अर्थाने भारत हा कार्यशील लोकसंख्येबाबत श्रीमंत देश आहे.परंतु अशा सर्वच हाताना काम नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे.
भारतात दरवर्षी विविध क्षेत्रात पदवी प्राप्त करणाऱ्यांची संख्या कितीतरी कोटी आहे.पण या सर्वानाच त्यांच्या शिक्षणाप्रमाणे कामाची संधी न मिळाल्याने भारतीय शिक्षण बेरोजगारी निर्माण करण्याचा कारखाना आहे की काय असा प्रश्न पडतो.
दरवर्षी वाढत जाणारी सुशिक्षित बेरोजगारी ही इतर अनेक संकटाना आमंत्रित करीत आहे.कारण अशी युवा पिढी काहीच काम नसल्याने विविध प्रकारच्या गुन्हेगारीकडे वळत असल्याचं दिसत आहे.'रिकामे मन म्हणजे सैतानाचा कारखाना',असं म्हटलं जातं ते उगीच नाही.अशा सुशिक्षित बेरोजगारांची टोळकीच्या टोळकी आपल्याला ग्रामीण भागापासून शहरी भागातही दिसत आहे.काहींना काम मिळते पण ते काम त्यांच्या शिक्षणाप्रमाणे मिळत नाही...मिळालं तर पगार चांगला नाही ,काहींना स्वतःचा रोजगार सुरू करायचा असतो पण आवश्यक भांडवल नसतं... असं करता करता नोकरीच्या अनेक संधी निघून जातात.आणि मग अपवाप अंगात आळशी पणा भरला जाऊन इतर अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.
भारतातील छुपी बेरोजगारी ही तर फारच गंभीर समस्या म्हणावी लागेल.अशी छुपी बेकारी प्रामुख्याने ग्रामीण भागात बघायला मिळते.काम करण्याची इच्छा असूनही कामाच्या संधी ग्रामीण भागात मिळत नाहीत.शहरी भागात कामाची संधी असते पण अल्प मोबदल्यामुळे कामाला जाणे परवडत नाही.मग मिळेल ते काम मिळून केले जाते., त्यात एका व्यक्तीचे काम अनेकजण मिळून करतात...ज्याने छुपी बेरोजगारी वाढत जाते.
आज प्रत्येकाला शिक्षणानंतर सरकारी नोकरीची आस लागलेली असते.पण तिथेही जागा कमी आणि अर्ज प्रचंड प्रमाणात असा प्रकार असल्याने वाट बघता बघता हयात संपून जाते. अशा प्रकारे तरुणाई ची शक्ती फुकट जात आहे हे नाकारून चालणार नाही.
या साठी तरुणाईने मानसिकता बदलण्याची गरज आहे.आपल्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नाही म्हणून हाताला हात लावून बसण्यापेक्षा जी नोकरी पदरात पडेल ती स्वीकारावी. मोठा उद्योजक होण्याची आस ठेवतानाच सुरुवात छोट्या उद्योगापासून करावी व त्याचं रूपांतर मोठ्या उद्योगात करण्याची स्वप्ने पहावीत. एकदम श्रीमंत होण्याच्या नादात अनुभवजन्य नोकऱ्या नाकारण्यात काहीच हशील होणार नाही.माझ्यामते बेरोजगारी ही एक मानसिकता आहे त्यातून बाहेर येऊन 'उद्योगाच्या घरी ,रिद्धी सिद्धी पाणी भरी'ह्या उक्ती प्रमाणे आवडणाऱ्या कामाच्या अपेक्षेत राहण्यापेक्षा मिळालेले काम आवडीने करावे.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
शहापूर,ठाणे(9227435827)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें