ऑनलाईन ई बुक प्रकाशन सोहळा
*नासा येवतीकर* यांच्या 'हिंदू सण' या आठवे ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,
दि. 05 जून 2020 रोजी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमा सणानिमित्त ई साहित्य प्रतिष्ठानकडून *नासा येवतीकर* यांच्या हिंदू सण या आठव्या ई पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
प्रतिक्रिया ................
आदरणीय ना.सा येवतीकर सर,
सप्रेम नमस्कार.🙏🏻🙏🏻
आजच्या हिंदू सण या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन ....🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻
आपण लिहलेले हे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे तसेच योग्य तेथे (काकुळते सरांच्या) चित्रांचा वापरही केलेला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांनाच उपयुक्त असे हे पुस्तक आहे. सणांविषयी सविस्तर माहिती, जुन्या आख्यायिका देखील त्यात समाविष्ट केलेल्या आहेत.
आपली प्रेरणा घेऊनच मी ही लिहायला शिकले आहे. आपल्या या वैशिष्ट्यांमुळे आपण नक्कीच वाचन व लेखन समृध्द करण्यासाठी धडपडत आहात हे सहज लक्षात येते.
आमच्यासारखे अनेक वाचक ई साहित्य आवडीने वाचत असतात. तुमच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. त्याचे अनुकरण करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
इथून पुढे ही आपणाकडून असेच उत्कृष्ट दर्जाचे साहित्य निर्मिती व्हावी यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
आपली विश्र्वासू, मनिषा पांढरे, सोलापूर.🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी अविस्मरणिय क्षण ...सुस्वागतम 🙏
- सौ. यशोधरा सोनेवाने
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम...!
खूपच अप्रतिम आहे सर.
हिंदू सणांची वैशिष्ट्ये, महत्व, संस्कृती, परंपरा सगळं अगदी व्यवस्थित मांडलंय सर.
अजून पूर्ण वाचायचे बाकी आहे. प्रत्येक सणाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
- गणेश सोळुंके, जालना
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आज संपूर्ण भारतासह जगामध्ये कोविड-19 या विषाणूने जनमानसात अनामिक भीती निर्माण केली आहे.त्यामुळे मागील तीन महिन्यापासून लेखनाचा व्यासंग ठेऊन सदोदित लेखन करणारे ना.सा. येवतीकर सर यांनी समाजवास्तव चित्र लेखनातून उभे केले आहे.शाळा व शिक्षण या संदर्भात बोलायचे झाल्यास त्यांच्या लेखनातून विद्यार्थी हा घटक सुटलेला नाही.आजतागायत विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम व प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून त्यांचा विद्यार्थ्याप्रती असलेला लळा दिसून येतो.येवतीकर सर यांच्या नसानसात जीवनाशी नाळ जोडण्याची लेखनशैली दिसून येते.
'मी पुस्तकाशिवाय जगू शकत नाही' असे थॉमस जेफर्सन नेहमी म्हणत असायचे.येवतीकर सर यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते की,लेखनाशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाही हे ठामपणे सांगू शकतो.भारत देश बहुसंख्याने हिंदू धर्मातील लोक राहत असतात.गुढीपाडवा पासून सुरुवात होणारे तर होळी पर्यत सर्रास हिंदू सण, उत्सव,महत्व,त्याचे गोडवे गाण्याची प्रथा परंपरागत चालली आहे.हे येवतीकर सरांच्या लेखणीतून सुटणार तरी कसे??? लेखक हा समाजाचा वास्तव उभा करणारा खराखुरा आरसा असतो.अतिशय सुंदररित्या हिंदू सणाचे महत्व अधोरेखित केलेले आहे.आपण सर्वांनी या इ-साहित्य प्रकाशनाद्वारे वटपौर्णिमेच्या शुभपर्वावर प्रकाशित होत आहे.तरी सर्वांनी या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा.
आपल्या इतरांना लेखनासाठी प्रोत्साहीत करणारे व्यक्तिमत्व लेखक श्री ना.सा. येवतीकर सर यांनी असेच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करून समाजमन जागे करण्यासाठी आपल्या लेखनशैलीला खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹
आपलाच
श्री दुशांत बाबुराव निमकर,चंद्रपूर
सहसंपादक,जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*'' हिंदू सणांची परिपूर्ण माहिती देणारे पुस्तक "*
नासा येवतीकर सर यांचे आठवे पुस्तक 'हिंदू सण' वर आधारित ई प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित आज होत आहे. यापूर्वी त्यांचे प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक, संवेदना, रोज सोनियांचा दिनू हे वैचारिक, सारिपाट कवितासंग्रह आणि हरवलेले डोळे कथासंग्रह ई बुकच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत. आज वटपौर्णिमा या सणानिमित्ताने नासा येवतीकर यांचे आठवे ई बुक हिंदू सण प्रकाशित होत आहे.
एकच ध्यास , हिंदू सणाचा प्रचार, प्रसार 'हिंदु सण' हे छान व आकर्षक पुस्तक आहे. यात हिंदू धर्मातील सणाची निवड करण्यात आली. मुखपृष्ठ देखील छान असून यात दिवाळीला आपण आपल्या घरी रांगोळी टाकतो ती आहे यात पेटते दिवे आहे; या रांगोळीची रंगसंगती छान आहे. या पुस्तकात एकूण एकोणवीस लेख वाचन करयला मिळेल. प्रत्येक सणाची माहिती व तो सण कसा साजरा करावा, आपण सर्वजण पारंपरिक पध्दती ने सण साजरे करतो. सद्याची नवीन पिढी हिंदू सण विसरत चालले आहे, पण हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. यात लिहिलेली माहीती कंटाळवाणी वाटणार नाही याची दक्षता लेखक नासा येवतीकर यांनी घेतली आहे. मला आवडलेल्या काही उल्लेखनीय लेखाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो,
वटपौर्णिमा या सणाविषयी यात अश्वपती नावाचा राजा होता आणि त्याची मुलगी सावित्री याने अंध राजाचा मुलगा सत्यवान राजकुमार सोबत लग्न करण्याचे ठरवले. त्याचे राज्य नव्हते ते जंगलात राहत होते आणि सत्यवान हा एक वर्ष जगेल अशी शाश्वती होती तर हे सावित्रीने खर ठरू दिले नाही, पवनपुत्र हनुमान याच्या विविध हालचालीची माहिती दिले आहे, आणखी एक लेख जो गुरूची महती सांगणारा लेख पण समाविष्ट आहे. चित्रकार श्री विनायक काकूळते यांनी आपल्या हातानी फलक लेखन केलेली जिवंतपणा असलेली चित्र यात घेण्यात आली आहे. नासा सरांनी ही संपूर्ण माहिती आपल्या अनुभवातून व काही इंटरनेटचा वापर करून केली असे मनोगतामध्ये व्यक्त केलेले आढळून आले. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे. या लेख संग्रहातील अनेक लेख नवीन आहे. विद्यार्थी, पालक, वाचक यांना संदर्भ म्हणून हे ई बुक नक्की उपयोगी पडेल.
हे पुस्तक शाळेत, घरी, मित्रांना शाळेतील मुलांसाठी व एखाद्याला काही कार्यक्रमानिमित्ताने भेट देण्यासारखे हे आहे. सदर पुस्तक pdf स्वरूपात मोफत पाठविल्या जाईल. अधिक माहिती आणि पुस्तक मागविण्यासाठी नासा येवतीकर यांच्या 9423625769 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे. "हिंदू सण" हे पुस्तक आपल्या वाचतांना आपणांस आनंद मिळेल अशी मला खात्री आहे. नासा येवतीकर सरांच्या आगामी लेखनास अनंत शुभेच्छा !!!
पुस्तकाचे नाव - हिंदू सण
लेखक- नासा येवतीकर (विषय शिक्षक)
प्रकाशन- ई साहित्य प्रतिष्ठान
चित्रकार - विनायक काकुळते सिन्नर
शब्दांकन
श्री.सुंदरसिंग साबळे ( स. शि.)
जि.प. व. प्रा.शाळा सिलेगाव
ता. गोरेगाव, जि. गोंदिया
मो.क्र. :- 9545254856
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पुस्तक प्रकाशन मनोगत!
नासा येवतीकर लिखित हिंदू सण या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुनील सामंत, अध्यक्ष ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे, नाशिक येथील चित्रकार मित्र विनायक काकुळते, पुस्तकाचे लेखक माझे मित्र नासा येवतीकर, साहित्य सेवक समूहातील सर्व विचारवंत ....
सर्व प्रथम मी नासा येवतीकर यांनी लिहिलेल्या आणि सुनील सामंत अध्यक्ष ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे यांनी प्रकाशनासाठी सज्ज केलेल्या हिंदू सण या ई पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले असे जाहीर करतो. नासा यांचे हे ऑनलाईन साहित्य प्रकारातले हे आठवे पुष्प वाचक दरबारी माझ्या हस्ते सादर होते आहे हे मी माझे भाग्य समजतो.
मित्रांनो, सध्या ऑनलाईन साहित्य सेवा जोरदार मुसंडी मारत असल्याचे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल. सध्याचे धावपळीचे युग पाहता ऑनलाईन साहित्य ही काळाची गरज आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. भ्रमणध्वनीसारख्या अतिशय छोट्या पेटीमध्ये कितीतरी पुस्तके आणि नानाप्रकारचे साहित्य आपण सोबत कुठेही नेऊ शकतो. हवे तेव्हा साहित्याचा आस्वाद घेऊ शकतो. याचा अर्थ मी छापील पुस्तकांचे महत्त्व नाही असे मुळीच मानत नाही. छापील पुस्तकाचे महत्त्व मान्य करावेच लागेल परंतु ज्या जोमाने ई साहित्य भरारी घेते आहे ते नाकारून चालणार नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे सत्कारमूर्ती नासा येवतीकर. आठ ई पुस्तके प्रकाशित होणे एवढीच त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी नाही तर आज ज्या ज्या ई साहित्य संस्था आहेत त्या सर्व ठिकाणी एक नाव ठळकपणे आहे ते म्हणजे नासा येवतीकर! साहित्य निर्मिती करताना ते अनेक सामाजिक विषय हाताळताना दिसत असतात. यावरून ई साहित्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
आपल्या संस्कृतीमध्ये सणांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. आपण सारे सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे करतो. परंतु अनेकदा अनेकांना सणांचे महत्त्व ते का साजरे करतात, किंवा का साजरे करावे हे माहिती नसते नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नासांनी हिंदूसण या सहासष्ट पानांच्या पुस्तकात एकूण एकोणवीस सणांची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. नासा येवतीकर यांच्या आगामी साहित्य सेवेला खूप खूप शुभेच्छा!
पुस्तकात समाविष्ट अनेक सणांची आकर्षक चित्रे ख्यातनाम चित्रकार विनायक काकुळते यांनी मोठ्या तन्मयतेने चितारली आहेत. पुस्तकाची मांडणी अतिशय मनमोहक रीतीने ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत आणि त्यांच्या चमूने केली आहे. एका अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असलेल्या, सर्वांगसुंदर अशा पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले असे जाहीर करताना मला मनस्वी आनंद होतो आहे. ही संधी दिल्याबद्दल मी लेखक, प्रकाशक आणि सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.
जयहिंद। जय महाराष्ट्र।
- नागेश सु. शेवाळकर, साहित्यिक, पुणे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमस्कार, सर्वप्रथम मी या ग्रुपवर मला मौनी साक्षीदार म्हणून राहू देणार्यांचे आभार मानतो. या ग्रुपवर एखादे व्रत घेतल्याप्रमाणे सर्वजण ज्याप्रकारे साहित्यसेवा करता करता स्वतःच्या शब्द सामर्थ्यवृद्धी आणि वैचारिकतेला धार लावण्याचे काम करत आहेत ते केवळ अद्वितीय आहे. या ग्रुपवरील सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि यातून नक्कीच काहीतरी भरीव निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो. काही नावे उल्लेखणे उचित ठरेल पण ते आता नाही.
आज आपण येथे श्री. नासा येवतीकर सरांच्या "हिंदू सण" या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जमलो आहोत. अतिशय कष्टांनी माहिती मिळवून आणि ती योग्य शब्दांत गुंफ़ून सरांनी हे पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ई साहित्यवर करून त्यांनी ई साहित्यचा गौरवच केला आहे. ई साहित्यच्या हजारो पुस्तकांच्या आकाशगंगेमध्ये नासा सरांची सात पुस्तके सप्तर्षींप्रमाणे चमकतात आणि हे पुस्तक तर ध्रुव ताराच होईल.
माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे. आपण सर्वांनी आज www.esahity.in या वेबसाइटला भेट देऊन हे पुस्तक वाचावे. आणि त्या पुस्तकाला आपल्या मनानुसार स्टार देऊन व आपली शाब्दिक दाद देऊन आपले मत व्यक्त करावे. ई साहित्यवर आता प्रथमच आपले पुस्तक किती लोकांनी वाचले ती संख्या तसेच त्यांचे मत, नाव आणि त्यांचा मेल आयडी सह सर्व काही लेखकाला उपलब्ध होत आहे. लवकरच पुस्तकांचे ऑडिओ व व्हिडिओही सुरू होणार आहेत.
तरी सर्वांनी www.esahity.in (in for INDIA) ला भेट द्यावी ही विनंती.
नासा सरांचे "हिंदू सण" हे पुस्तक प्रसिद्ध झाले असे मी जाहिर करतो व त्यांचे जाहीर अभिनंदन करतो.
- श्री सुनील सामंत, अध्यक्ष
ई साहित्य प्रतिष्ठान
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आतिशय उपयुक्त होईल....नवीन पिढीसाठी आपला वारसा कळेल त्यांना🌹
- ज्ञानेश्वर झगरे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नासा येवतीकर (विषय शिक्षक धर्माबाद तालुका नांदेड )या सरांचे सण हे पुस्तक ई-बुक अत्यंत सुंदर सुबक व सहज आणि सोप्या भाषेत हिंदूंच्या सर्व सणांचे महत्व सांगणारे आहे.हे पुस्तक विद्यार्थी ,शिक्षक ,पालक तसेच समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त असून मानवी आयुष्याचे सांगड सणाशी घातली गेली आहे .हे पुस्तक वाचल्यानंतर समजते .
दरवेळी सण येतात ,सण जातात,
एकमेकात प्रेम निर्माण करतात.
सणाचे महत्त्व समजून घेतले तर
प्रत्येक सण सदा आनंदच देतात.
भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व जीवनात आनंद व उत्साह निर्माण करते. अत्यंत सोपे आणि समर्पक शब्दात त्यांनी पुस्तकाचा शेवट करताना लिहिले आहे. मनाला स्पर्शून जाणाऱ्या या ओळी आहेत.
नासा येवतीकर सर आणि ई-साहित्य प्रकाशन यांचे खूप खूप अभिनंदन.
- सौ. मेघा अनिल पाटील
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
'हिंदू सण' या आदरणीय नासा येवतीकर सरांच्या ईबुक प्रकाशन प्रसंगी मा. नागेश शेवाळकर सरांनी अगदी थोड्या शब्दात या पुस्तकाचे संपुर्ण सार आपल्या मनोगतात मांडले आहे.खुप खुप अभिनंदन सर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
19 सणांची माहिती असलेल्या 66 पानांच्या 'हिंदू सण 'या पुस्तकाचे माध्यमातून माझ्यासारख्यांना पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल व आपल्यामुळे लेखनास चालना मिळाली व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
पूनश्च सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन
- सौ. जयश्री सिरसाटे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नासा येवतीकर सरांचे हार्दिक अभिनंदन. आपले सण हिंदु संस्कृतीशी निगडीत आहेत.त्यांचे वैशिष्ट्य नि महती वाखाणणीय आहे.सरांनी सर्व सणांची महत्वपुर्ण माहिती आपल्या पुस्तकात समाविष्ट केली आहे.सर्व लहानथोरांना समजणाऱ्या सहजसाध्या भाषेतील हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी बोधप्रद आहे.सरांना त्यांच्या कार्यासाठी अशीच प्रेरणा मिळो नि त्यांच्या लेखणीतून अशा शेकडो ज्ञानवर्धक कलाकृतींची निर्मिती होण्यासाठी खूप शुभेच्छा
सौ. भारती सावंत
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदननीय शुभेच्छा
आदरणीय श्री नासा येवतीकर सर
आपले सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन
आपण करीत असलेल्या साहित्य लेखनाच्या माध्यमातून आजचे हे ई बुक प्रकाशन सोहळा खरोखरच खूप छान आहे. आपल्या लेखणीतून प्रकाशित झालेले साहित्य विद्यार्थ्यांच्या उपयुक्त व बोधपर आहे.
- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हिंदू सण या त्या पुस्तकांच्या माहिती तून खूप छान सणांची माहिती दिलेली आहे व सरांनी माझ्या लेखनाची चालना दिली त्यांचे मनःपूर्वक आभार मानते पुनच्छ एकदा मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन
- सौ. भारती तिडके
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजकालच्या मुलांना आपले अनेक सण व त्याविषयी माहिती नाही. आधुनिकीकरणाच्या नावाखाली परंपरागत सण समारंभ साजरे करणे मागे पडत चालले आहेत.अशावेळी नासा सरांचे हिंदू सण हे पुस्तक लहानथोर सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल. सरांचे हार्दिक अभिनंदन पुढील लेखन कार्यास शुभेच्छा- श्रीमाती माणिक नागावे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बातमी -
*नागेश शेवाळकर यांच्या हस्ते नासा येवतीकर लिखित 'हिंदू सण' पुस्तकाचे ऑनलाईन थाटात प्रकाशन!*
धर्माबाद/पुणे- सध्या ऑनलाईन साहित्य जोरदार मुसंडी मारत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सध्याचे धावपळीचे युग पाहता ऑनलाईन साहित्य ही काळाची गरज आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. भ्रमणध्वनीसारख्या अतिशय छोट्या पेटीमध्ये कितीतरी पुस्तके आणि नानाप्रकारचे साहित्य आपण सोबत कुठेही नेऊ शकतो. हवे तेव्हा साहित्याचा आस्वाद घेऊ शकतो असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर यांनी व्यक्त केले. ते ना. सा. येवतीकर लिखित 'हिंदू सण' या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन समारंभात बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे येथील सुनील सामंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील विनायक काकुळते यांची उपस्थिती होती.
नागेश शेवाळकर पुढे म्हणाले की, याचा अर्थ मी छापील पुस्तकांचे महत्त्व नाही असे मुळीच मानत नाही. छापील पुस्तकाचे महत्त्व मान्य करावेच लागेल, छापील पुस्तकाचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु ज्या जोमाने ई साहित्य भरारी घेते आहे ते नाकारून चालणार नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे सत्कारमूर्ती नासा येवतीकर. आठ ई पुस्तके प्रकाशित होणे एवढीच त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी नाही तर आज ज्या ज्या ई साहित्य संस्था आहेत त्या सर्व ठिकाणी एक नाव ठळकपणे आहे ते म्हणजे नासा येवतीकर ! साहित्य निर्मिती करताना ते अनेक सामाजिक विषय हाताळताना दिसत असतात. यावरून ई साहित्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
या आगळ्यावेगळ्या ई पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन साहित्य सेवक व्हाट्सअप्प समूहाने केले होते. या अभिनव कल्पनेनुसार शेवाळकर यांनी पुणे येथून पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले तर सुनील सामंत यांनी ठाणे येथून अध्यक्षस्थान भुषविले आणि विनायक काकुळते यांनी नाशिक येथून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नोंदवली. तसेच याप्रसंगी सौ. मनिषा पांढरे, गणेश सोळुंके, दुशांत निमकर, सुंदरसिंग साबळे, सुनील सामंत, सौ. मेघा अनिल पाटील इत्यादी मान्यवरांनी पुस्तकासंदर्भात विचार व्यक्त केले. लेखक नासा येवतीकर यांनी धर्माबाद येथून संचलन केले तर समूहातील सदस्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभाग नोंदवला. हे पुस्तक सुनील सामंत अध्यक्ष, ई साहित्य प्रतिष्ठान यांनी ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांच्या सेवेत सादर केले.
आपल्या संस्कृतीमध्ये सणांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. असे सांगून शेवाळकर पुढे म्हणाले की, आपण सारे सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे करतो. परंतु अनेकदा अनेकांना सणांचे महत्त्व ते का साजरे करतात, किंवा का साजरे करावे हे माहिती नसते नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नासांनी हिंदू सण या सहासष्ट पानांच्या पुस्तकात एकूण एकोणवीस सणांची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
या ऑनलाईन ई बुक प्रकाशन सोहळ्यास साहित्य सेवक समुहातील श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, सौ. भारती तिडके, हणमंत पडवळ, सौ. भारती सावंत, सौ. जयश्री सिरसाटे, सौ. मेघा पाटील, सौ. सुजाता जाधव, अंकुश शिंगाडे, जीवनसिंग खासावत, सुंदरसिंग साबळे, सौ. मनीषा पांढरे, श्रीमती माणिक नागावे, दुशांत निमकर, सौ. यशोधरा सोनेवाने, ज्ञानेश्वर झगरे गुरुजी, सौ. शुभदा दीक्षित, अमित बडगे, डॉ. हरिश्चंद्र भोईर, प्रदीप पाटील, गणेश सोळुंके, महेंद्र सोनेवाने, प्रतिक उकले, प्रिती दबडे, सुनीता आवंडकर, श्री जी एस. पाटील इत्यादी साहित्यिकांची ऑनलाईन उपस्थिती होती. समारंभाच्या शेवटी लेखक ना. सा. येवतीकर यांनी सर्वांचे आभार मानले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आदरणीय सर
हिंदू सण हे पुस्तक नुकतेच वाचनात आले साहित्या तर्फे ऑनलाईन प्रकाशित झालेले आहे.हे पुस्तक खूपच सुंदर व वाचनीय आहे .प्रत्येक सणाला एक चित्र व त्याचे ऐतिहासिक माहिती त्याचबरोबर कालानुरूप झालेला बदल यावर केलेले चिंतन खूपच मार्मिक व चिंतनीय आहे. या पुस्तकाच्या वाचनाने विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीचा अभिमान निर्माण होईल, त्याचबरोबर संस्कृतीत निर्माण झालेल्या ज्या काही विकृती आहेत त्या विकृती दूर करण्याचा वाचकाच्या मनात विचार निर्माण होतो. व अशाच पुस्तकांच्या वाचनाने आपला समाज निश्चितच सुसंस्कृत होईल हे मात्र नक्की
- श्री मनमोहन कदम, मुख्याध्यापक
गुरूकुल विद्यालय, धर्माबाद
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माझ्या गुरुजींची प्रतिक्रिया
ना.सा.येवतीकर
कवी, स्तंभलेखक,
स.न.वि.वि.(शुभाशीर्वाद)
प्रथमत: आपले मनस्वी अभिनंदन. आपल्या सर्जनशील व सृजनशील साहित्यात्म्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
काल दि.05 जून 2020 रोजी ईमेल साहित्य प्रकाशनाकडून आपल्या "हिंदू सण" पुस्तकाचे अॉनलाईन प्रकाशन महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात विनाहारतुरे व अनौपचारिक संपन्न झाले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक नागेश शेवाळकर, प्रकाशक सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील सामंत आणि प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य चळवळीतील नामवंत विनायक काकुळते रंगमंचावर उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा पाहून मी खूपच हरखून गेलो. माझ्या मनाला खूपच मोठा आनंद झाला. माझी छाती अभिमानाने रसरसून आली.
ना.सा.आमच्या (हु. पानसरे हायस्कूल, धर्माबाद जि.नांदेड.) शाळेचा आदर्श प्रिय जिज्ञासू, अभ्यासू व होतकरू विद्यार्थी आहे; याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यापूर्वीचीही यांची साहित्यसंपदा महाराष्ट्रास पूर्ण दूरवर माहीत आहे.
यांचे "पाऊलवाट" हे पुस्तक असून मी एक शिक्षक ,जागृती, शाळा आणि पुस्तक,संवेदना, हरवलेले डोळे, सारिपाट इ. अॉनलाईन प्रकाशनपर साहित्यसंपदाही सर्वश्रुत आहे. आमच्या शाळेतील भरपूर विद्यार्थी प्रशासकीय सेवेत मोठमोठ्या हुद्यांवर व राजकीय, सामाजिक सेवेत आहेत आणि आज भारताचे उत्तम नागरिक म्हणून अविरत उत्कृष्ट सेवा बजावत आहेत; ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद नि संस्मरणीय बाब आहे. परंतु साहित्य क्षेत्रांत मुसंडी मारून आपले भविष्य उजळणारा विद्यार्थी सापडणे हे दुर्मीळ व विरळाच. ना.सा. शालेय वयापासूनच हुशार ,कर्तृत्ववान, आदर्श, मनमिळावू सर्जनशील विद्यार्थी याची चुणूक त्याच्या दैनंदिन शाालेय व्यवहारांतून जाणवत होती. सुंदर मोत्यांच्या अक्षरात आपले विषयनिहाय गृहपाठ, वर्गपाठ दाखवित असे. एवढेच नाही तर आपल्या कल्पना, विचार, चिंतन छोट्या छोट्या कव्यरुपात तयार करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उद्धृत करीत असे. म्हणतात ना लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात.तद्वतच हे ब्रिद ना.सा. च्या रुपात यथार्थ ठरले.
आज साहित्य क्षेत्रांतही ठिकठिकांनी कंदील लावून मला पाहा म्हणणा-या साहित्यिकांचा ऊत शिगेला आला आहे. साहित्य लेखनांस एक विशिष्ट प्रतिभा लागते. याशिवाय चिंतन, मनन, समाजातील दैनंदिन सूक्ष्म निरीक्षण हवे असते.त्याचबरोबर कायिक, मानसिक व नैतिक शुद्ध होऊन कुशाग्र, विनयी, स्वाभिमानी, निरोगी, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, प्रसन्न, परोपकारी, विश्वासू, धाडसी, चतुर, समृद्ध, महत्वाकांक्षी, अनुकरणप्रिय व समाजप्रिय असावे लागते. याशिवाय साहित्यिकांचे जीवन नीरस, भकास व उपेक्षणीय होईल. म्हणून साहित्यिकांनी जीवनात नवे रंग भरून स्वतःस व समाजास महत्वपूर्ण, प्रेरणादायक स्फूर्ती, कल्पना, सार्थकता, सहकार्य व स्वावलंबनाने सामाजिक, भावनिक, धार्मिक, पारंपारिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असते. दैनंदिन कामात सुसंवाद, शांतता व प्रसन्नता आणण्याचे साधन साहित्य असून आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत व परमात्म्याचा आवाज आत्म्यापर्यंत पोहचवणाराच खरा साहित्यिक होय. आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करण्याचे बळ साहित्यात असून ओढून-ताढून, मारून-मुटकून किंवा चोरून आणल्याने साहित्य निर्मिती होत नाही तर ती ओघवत्या शब्दांची आरासच ती असते; असे मला वाटते.
जीवनाचे नंदनवन करण्याचा मार्ग परिश्रम असून तेच राष्ट्राचे भूषण आहे. व त्यातूनच खरा हिरा निर्माण होत असतो. निष्ठापूर्वक केलेल्या कार्याने आत्मा तृप्त होऊन राष्ट्रास परमोच्च वैभव प्राप्त होते. उपरोक्त सर्व बाबी ना.सा.त अर्पित, अलंकृत असून प्रकाशनीय व दर्शनीय आहेत.
मी नवतंत्रज्ञानाच्या बाबतीत तसा निरक्षरच आहे. अलिकडे या विषारी महाभयंकर बिमारी कोरोनामुळे मिळालेल्या संधीत व्हॉट्सअँप, फेसबुकमध्ये थोडाफार साक्षर झालो आहे. तेव्हा या दोन अडीच महिण्यांच्या काळात ना.सा.ला खूपवेळा ऑनलाईन साहित्य चळवळीत क्रियाशील व चैतन्यव्रत पाहिले आहे. नाहीतर माझ्यासारखे पृथ्वीजड महाभाग आहेतच.
ना.सा.चे मनोरंजक कोडे, प्रश्नावली, प्रश्नमंजुषा, कविता, लेख, कथा, प्रतिदिन परिपाठ, परीक्षण हे विविध सदराखाली वेगवेवेळ्या दै.वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक आणि महाराष्ट्ररातील जवळपास सर्वच नियतकालिकांमध्ये प्रकाशित होत असते. ही आपणां सर्वांसाठी उपयुक्त व अभिमानाची गोष्ट आहे.
ना.सा.ने लिहिलेल्या "हिंदू सण" पुस्तकात अगदी पौर्णिमा ते अमावस्या आणि गुढीपाडवा ते होळीपर्यंतचा परामर्श घेतला आहे. याशिवाय त्यात धार्मिक, आध्यात्मिक व पारंपारिक अनुभव सिद्धता प्रमाणबद्ध निदर्शित केली आहे. जन्माला आलेल्या आपत्यास वाढत्या वय व अनुभवाप्रमाणे आईवडील, भाऊबहीण, काकाकाकू, मामामामी इ. सर्व आप्त कळतात नंतरच त्याचं विचारविश्व वाढून जगण्यातील प्रगल्भता येते. तद्वतच आपण हिंदू सण साजरे करतो परंतु त्यामागची कारणमीमांसा करीत नाही. सण साजरे का करतो? असा प्रश्न सुज्ञ, जाणकारांना केला तरीही.. उत्तर 'पंरपंराच' येईल. याचाच अर्थ आपली ब-यांच गोष्टींकडे अचूक डोळेझाक झालेली असते ते आपणांस कळत नाही आणि जरी कळले तरी आपण त्याचा शोध घेत नाही हा मानवी स्वभाव आहे. म्हणूनच जीवनात चिंतनशील, कृतीशील, गतीशील व प्रयोगशील असावं लागतं. अशी माणसंच त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे यशस्वितेला पोहचून अलौकिक ठरतात याची शेकडो उदाहरणे आपणास माहीतच आहेत. त्यापैकीच एक माझा प्रिय विद्यार्थी ना.सा.येवतीकर होय; हे मीे उंच मान करून व ऊर भरून सांगयला धजत आहे. आम्हांलाही असे विद्यार्थी आमच्या शाळेतून निपजून पुढे जग प्रकाशमय करण्यासाठी सरसावल्याचा अमर्याद आनंद वाटतो.
शाळा, शिक्षक,परिसर एकंदरीत वातावरण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक दीर्घ चित्रपट असतो आणि विद्यार्थी हा त्यातील एक हिरो असतो या अनुषंगाने एवढे सांगावेसे वाटते. पुन:श्च एकदा ना.सा.चे मनःपूर्वक अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! भावी वाङमयीन चळवळीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा! व त्यांना दीर्घायुष्य लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे साहित्यिकी आप्तवल्लय वृद्धींगत होवो. ही सद्कामना!
आडबलवाड पांडुरंग सरसमकर
(सहशिक्षक) हुतात्मा पानसरे हायस्कूल, धर्माबाद.
मो.नं:- 9158551975
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें