सोमवार, 1 जून 2020

रोज एक लेख :- दिवस त्रेचाळीसावा प्रेरणा

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- त्रेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 31 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- प्रेरणा / प्रोत्साहन*

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे. 

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769


[31/05, 10:01 AM] सौ भारती तिडके: 39)शालेय विद्यार्थी व प्रेरणा
       " प्रेरणा "या शब्दाचा व्यावहारिक दृष्ट्या विचार केल्यास त्याचा अर्थ स्फूर्ती किंवा शक्ती असा होतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्ट्या वर्तनाचा "आंतरिक प्रवर्तक म्हणजे प्रेरणा" होय अशी व्याख्या प्राध्यापक मन यांनी केलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रेरणा म्हणजे साधारणत आपण motivation असे म्हणतो. प्रत्येकाच्या यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करते. कुणी जिंकलेल्या व्यक्तीला त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो. लहान मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्त्रोत असते. लहान मुले शाळेत जाऊ लागली की की हळूहळू मित्र-मैत्रीण, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, समाज, वातावरण कळत-नकळतपणे प्रेरणा देत असतात.
प्रेरणा चे वर्गीकरण  गरजांमध्ये केलेले आहे त्यात शारीरिक, व्यक्तिगत ,सामाजिक असे तीन भाग पडलेले आहेत. भूक-तहान, विश्रांती ,आणि झोप ,काम तापमान नियंत्रण, इत्यादी शारीरिक गरजा आहेत. तर कृती, यशापयश, जीवन विषयक ध्येय, पुनरावृत्ती, इंद्रियांचे समाधान, अभिरुची व दृष्टिकोन, प्रतिष्ठा या व्यक्तिगत गरजा आहे. सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, श्रेष्ठत्व ,सत्ता, स्थैर्य या सामाजिक गरजा आहेत. प्रेरणा निर्माण होण्यासाठी काही बाबी देखील आहेत. यश आणि अपयश हे घटक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी वर, इच्छेवर, वृत्तीवर तसेच कार्यक्षमतेवर चांगला वाईट परिणाम करीत असतात. जसे यश मिळाले तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, याउलट जीवनात अपयश आले तर मानसिक दृष्ट्या तो खचून जातो.व्यक्तीच्या अंगी कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी तीव्र इच्छा असायला हवी. उदाहरणार्थ घोड्याला पाण्याजवळ नेता येते पण त्याची पाणी पिण्याची इच्छा नसेल तर त्याला पाण्याजवळ नेणे देखील व्यर्थ ठरते. पारितोषिक किंवा बक्षिसांचे साह्याने विद्यार्थ्यांच्या प्रेरणे मध्ये वाढ करता येते. प्रेरणा निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. उदाहरणार्थ पाठांतर स्पर्धा, क्रीडा ,निबंध, हस्ताक्षर ,चित्रकला ,रांगोळी इत्यादी. आदर्श व्यक्तीचे जीवन चरित्र कुणालाही प्रेरणा देणारेच असतात. केलेल्या कृती वर जर शाबासकी दिली तर अधिक चांगले करण्याची प्रेरणा लाभते.तसेच वाईट कृत्याबद्दल शिक्षा किंवा मार्गदर्शन केले तर प्रेरणा मिळते. आदर्श शिक्षक कसे सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचे उत्तम व आदर्श व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लिहिणे ,वाचणे, कोडी सोडविणे, चित्रे काढणे, नकाशा भरणे इत्यादी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अभिरूची टिकवून ठेवल्या जाते, व योग्य प्रेरणा मिळते.
माझ्या जीवनात देखील माझी आई ,माझे गुरुवर्य हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. प्रेरणा म्हणजे चालना देणे...... प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे हृदय....... शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेरणा. प्रेरक म्हणजे motive. विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला प्रेरक म्हणतात. आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे. आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते. सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. अभिरुची ,आवड, अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते. आंतरिक प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांचा ध्यास पूर्ण होतो. संकट , बाधा,अडचणीतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात. म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात. प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा. बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन देणे होय.उद्देशा प्रति एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्य प्रेरणा होय.
आंतरिक प्रेरणेस थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हटले आहे. प्रेरणा विद्यार्थ्यांचे आयुष्याच्या मार्गावरील चांगले-वाईट टप्पे ठरवतात. बंदुकीच्या बळावर समाजाला धाक दाखविणारा, असत्य बोलणारा, भेसळ करून समाज हिताशी खेळणारा कोणीही चांगली प्रेरणा देऊ शकत नाही. अनु करण्याबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवांची गरज आहे. परिस्थितीशी मिळते-जुळते घेणे हा देखील स्वयम् प्रेरणेचा भाग आहे. शाळेतील मुलांना अध्ययनात अभिरुची वाढावी तसेच उत्तेजन देण्यासाठी खालील बाबी महत्त्वपूर्ण आहे.
1)मुलांना भाषा गणित यासारखे विषयात केलेल्या प्रगतीचे ज्ञान करून देणारे आलेख द्यावेत.
2) एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्याबद्दल किंवा सहकार्याच्या भावने बद्दल मिळालेली शाबासकी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवून देते.
3) शिक्षकाचे प्रेम व वासल्य, शिक्षका बद्दलची प्रेमाची, आदराची व आपुलकीची भावना.
4) भाषा शास्त्र, भूगोल ,इतिहास व नागरिक शास्त्र आणि समस्या सोडविण्याचे अनुभवातून स्वतःला व स्वतभोवताल चे  जगाला समजून घेण्याची जिज्ञासा व इच्छा या विषया मधून निर्माण होते.
5) आत्मविष्कार याच्या बाबतीत किंवा सामाजिक कार्य करण्याच्या बाबतीत झालेल्या स्वतःच्या उन्नतीची जाणीव करणे.
6) विजेच्या ज्ञानाचा उपयोग करून एखादे विजेवर चालणारे उपकरण तयार करणे. किंवा भाषा ज्ञानाचा उपयोग करून प्रयोगाचे वर्णन करणे.
7) स्वतः निवडलेले वाचन, प्रकल्प घेतलेला भाग किंवा कलेतील आत्मविष्कार या सारख्या वैयक्तिक अथवा सामुदायिक अभिरुचीच्या बाबीतून मिळणारे ज्ञान व आकलन शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते.
8) चुकांची दुरुस्ती व्हावी या उद्देशाने केलेल्या टीका प्रोत्साहित ठरणारी असते.
9)अध्यापन पद्धतीची योग्य सांगड घातली तर विद्यार्थ्यांना प्रेरणा लाभते.
10)ज्ञान आणि आकलन वाढविणारी कौशल्ये विकसित केली तर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होते.
        अशाप्रकारे शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे फार गरजेचे महत्त्वपूर्ण आहे.
"आजचा संघर्ष
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
विचार बदला
आयुष्य बदलेल."

सौ. भारती दिनेश तिडके
 गोंदिया
8007664039.
[31/05, 10:13 AM] महेंद्र सोनवने: (08)

*प्रेरणा*

         जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते . जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो.अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे .
मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रीण ,शिक्षक,आजूबाजूचा परिसर ,समाज वातावरण कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात .
प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो . पण ,प्रेरणा म्हणजे नक्की काय ? प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे होय . प्रेरणा म्हणजे चालना देणे प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे हृदय साध्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे प्रेरणा  एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा रोजमर्रा आयुष्यात आपण प्रेरणा हा शब्दप्रयोग करतो.अनेकमानसशास्त्रज्ञ,विचारवंत ,लेखक यांचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे प्रेरणा आज आपण जगभर प्रसिद्ध अशा विचारवंतांच्या वैविध्यपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रेरणेच्या व्याख्या पाहणार आहोत . आपल्या बुद्धीला पटेल आणि झेपेल एवढाच विचार आपण एखाद्या विषयाचा करतो ,आणि स्वतःभोवती काही मर्यादांचे कुंपण आखून घेतो . हे मर्यादांचे कुंपण म्हणजेच प्रगतीच्या मार्गातील भलामोठा अडथळा.
आपण या लेखपुष्पात प्रेरणा या विषयाचा अगदी जवळून ,अंतर्बाह्य आणि सांगोपांग विचार करणार आहोत .. सर्वप्रथम प्रेरणा यावर मॅगडुगल,सिगमंड फ्राईड ,अब्राहम मास्लो यांनी मोलाचे योगदान दिले आहे.त्याचबरोबरस्किनर,वुडवर्थ,गिलफोर्ड , एडकिन्सन यांच्या व्याख्या देखील प्रेरणा या विषयावर प्रकाशझोत टाकतात .
स्किनर -शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेरणा.मॅकडुगल-शारीरिक आणि मनोवैज्ञानिक अवस्था जी कोणतेही कार्य करण्यास आपणास प्रेरित करते.एच.डब्ल्यू .बेनार्ड - एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे उत्तेजन म्हणजे प्रेरणा .
एम.सी .मॅकडोनाल्ड - अभिप्रेरणा म्हणजे व्यक्तीच्या अंतर्मनात होणारे शक्ती परिवर्तन होय .जी भावात्मक जागृती किंवा पूर्वानुमान उद्देश व प्रतिक्रियांद्वारे वर्णन करता येते .
जॉन्सन - अभिप्रेरणा ही सामान्य क्रियांचा प्रभाव आहे जो प्राण्यांच्या व्यवहारास प्रेरक ठरतो आणि आपणास मार्ग आणि दिशा निर्देश करतो .
           अशाप्रकारे प्रेरणा म्हणजे काय याच्या व्याख्यांवरून प्रेरणेचे ढोबळ स्वरूप लक्षात येते.
प्रेरणा मिळण्याची मुख्य ठिकाणे किंवा प्रेरणा स्रोत एकूण चार आहेत. गरज भासणे हा पहिला प्रेरणास्रोत आहे . शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि उद्दीपक असे आहेत . भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक बनण्याची अवस्था होय . उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . प्रेरक म्हणजे motive . विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला प्रेरक म्हणतात.आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे . आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते . सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. अभिरुची, आवड ,अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते . काही लोकांना आंतरिक प्रेरणा साध्याप्रती उद्युक्त करते.आपण आजूबाजूला पाहतो ,काही माणसे धडपडत असतात.आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणता ना कोणता ध्यास घेऊन कार्यरत असतात. काहीतरी क्रिया,काम वारंवार केल्याने यांना यश आणि संकटे पावलोपावली भेटत जातात. एखादे काम करत असताना जेवढी अधिक संकटे येतील तेवढे अधिक शिकावयास मिळते . संकट ,बाधा ,अडचणींतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात.म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात.आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे हि प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते .
प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा प्रत्येकालाच अंतःप्रेरणेने झोडपलेले असते असे नाही ,काहींना बाह्य प्रेरणेची चावी दिल्यास ते देखील यशाच्या वाटेवर सुसाट पळू लागतात .
बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन (Incentive )देणे होय.उदेश्याप्रती एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्यप्रेरणा . याशिवाय पुरस्कार बक्षीस,दंड ,प्रशंसा ,निंदा ,सहयोग ,हे बाह्य प्रेरणेचे घटक आहेत.
आंतरिक प्रेरणेस थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हंटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हंटले आहे .
गेरेट मनोवैज्ञानिक म्हणतात की मनाच्या विविध अवस्थांमुळे आपणास प्रेरणा मिळते.कामक्रोध, ,सुखदुःख,      भय यांमुळे आपण उत्तेजित होऊन कार्य करण्यास उद्युक्त होतो. थोडक्यात तणाव, बाधा , पीडा 
,उपेक्षा ,निंदा ,अपमान यांमुळे देखील एखादे मोठे आवाहन पेलण्यास आपण तयार होतो .म्हणून मनाच्या या अवस्था प्रेरणा स्रोत आहेत . भर सभेत एखाद्याचा अपमान झाल्यामुळे देखील प्रचंड चीड येऊन कार्यास ती व्यक्ती उद्युक्त होते . आत्मप्रदर्शन ,दिखावा ,प्रौढी मिरवणे हे देखील सामाजिक प्रेरणा स्रोत
 आपणास मानता येतात .
मॅगडुगल यांनी प्रेरणेचे आठ घटक एकत्रित पणे सांगितले आहेत .
काही माणसे आपल्याला भेटतात आणि नेहमी म्हणतात की मला खूप मोठे व्हायचे आहे ,पण नेमके काय करावे हे कळत नसते . यांना एकच सांगावेसे वाटते की प्रत्येकामध्ये प्रेरणा या निरनिराळ्या असू शकतात . फक्त अभ्यासात प्राविण्य मिळविणे म्हणजे बुद्धिमान असणे असे जणू एक समीकरण बनले आहे.प्रत्येक सजीवात एखादा बुद्धीचा घटक म्हणजेच एखादी कला ,कौशल्य असतेचं फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे . एकदा का हे कलागुण ओळखले गेले मग बाह्य प्रेरणेची गरज भासत नाही . आपल्या मुलांच्या रोजच्या वागण्याबोलण्यातून पालक ,शिक्षक व मित्रमंडळींना पाल्यातले एकूणच कलागुण ओळखता आले पाहिजे . एखाद्या मुलामध्ये सद्यस्थितित कोणताही गुण अथवा आंतरिक प्रेरणा दिसत नसल्यास दोन गोष्टी करावयास हव्यात . बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन, बक्षिसे, प्रशंसा वर नमूद केलेले घटक करावी .मोकळ्या ,निसर्गरम्य वातावरणात पाल्यास ठेवून मूल कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होते ते निरीक्षण करणे .
________________________

     *महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
        *(9421802067 )*
[31/05, 10:27 AM] सुंदरसिंग साबळे: 34

*प्रेरणा/प्रोत्साहन*
==============

      ध्येय स्पष्ट असेल, मार्ग निश्‍चित असेल आणि प्रामाणिक, अथक प्रयत्नांची जोड असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्‍यक आहे. 

        यशस्वी होणं म्हणजे निश्‍चित केलेल्या अंतिम ध्येयाप्रत पोचणं. यश हा अपघात किंवा योगायोग नसतो. यशाला शॉर्टकट नसतो. यशस्वी होण्यामधील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे भीती. स्वामी विवेकानंद म्हणतात, "भीती म्हणजे मृत्यू, भीती म्हणजे दुबळेपणा. मित्रांनो, निर्भय व्हा. भीतीवरचा जालीम उपाय म्हणजे कृती!‘ 

"अशक्य'" या शब्दापासून आपण जितके दूर जाऊ, तितके यशाच्या समीप जाणारच! यशस्वी होण्यासाठी पुढील बाबींवर लक्ष केंद्रित करायला हवे - 
१) ध्येय निश्‍चित करा. 
२) ते कसं प्राप्त करता येईल, याचा सतत विचार करा. 
३) ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका. 

     विश्‍वविख्यात शिल्पकार मायकल ॲंजेलोला त्याच्या अप्रतिम कलाकृतींबद्दल विचारलं गेलं होतं, तेव्हा तो म्हणाला होता, "दगडातील पुतळा तर आधीपासूनच होता. मी फक्त त्याच्यावरचा अनावश्‍यक भाग काढून टाकला!‘ या शिल्पकाराप्रमाणेच ध्येयाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपल्या मेंदूला ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना आवश्‍यक असतात; तरच आपण आपल्या सर्व शक्ती त्यावर केंद्रित करू शकतो आणि त्यातूनच अजरामर कार्य उभं राहतं. तुमचं ध्येय हेच तुमचं सर्वस्व असायला हवं. ध्येयानं झपाटून जा. ध्येय स्पष्ट असेल, मार्ग निश्‍चित असेल आणि प्रामाणिक, अथक प्रयत्नांची जोड असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे आवश्‍यक आहे. नकारात्मक विचार, व्यक्ती, जागा, भावना यांचा विषाप्रमाणे त्याग करायला शिका. मग अनुभवा निसर्गाची संपूर्ण ताकदीनिशी तुम्हाला दिलेली सकारात्मक, प्रतिसादात्मक स्पंदने! प्रयत्न कधीच सोडू नका. जबाबदारी, जोखीम पत्करा. 

       टॉम वॉटसन म्हणतात, "तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा - ते असफल ठरत असले तरीही - वेग दुप्पट करा.‘ प्रत्येक अपयशानंतरही जोमानं उभं राहता आलं पाहिजे. उत्कृष्ट नियोजन हाच यशाचा गुरुमंत्र.

    जलतरणपटू मायकल फेल्प्स ऑलिंपिक सुवर्णपदकाचा विजेता. जागतिक विक्रम मोडण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यासाठी "फक्त २४.६ सेकंद‘ हाच विचार त्याच्या मनात सतत घोळत असे. रोज अठरा तास तो पाण्यात सराव करीत असे. जिद्द, चिकाटी असावी तर अशी!

      यशस्वी लोकांची मानसिकता अशीच असते. जास्तीत जास्त काम करण्याची तयारी दर्शवा. तुमच्याकडून जे अपेक्षित आहे, ते दिल्यानंतर तुम्ही आणखी काय देता यावरच तुमचं यश अवलंबून असतं. मोबदल्यापेक्षा कितीतरी अधिक द्यायला शिका. फोर्डच्या "बिझिनेस फिलॉसॉफी‘चं सार होतं, "जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगली वस्तू द्या.‘ 

"तुला संगितातली जाण नाही, प्रतिभा नाही,‘ असं ज्याला हिणवलं जायचं त्या बिथोव्हेननं अजरामर संगीतरचना जगाला दिल्या. त्यानं दृष्टिकोन बदलला. अपयशी होणं नाकारलं. आपण जे आहोत, ते केवळ आणि केवळ आपले विचार आणि कृती यामुळेच! 

    दोन-तीन ग्रॅम वजनाचा हमिंग बर्ड त्याच्या लवचिक शरीरामुळे नेत्रदीपक कसरती करू शकतो; परंतु आकाशात उंच भरारी घेऊ शकत नाही. याउलट दीडशे किलो वजनाचा शहामृग पक्षी असूनही उडू शकत नाही; मात्र बळकट पायांमुळे तो ताशी पन्नास मैल वेगाने धावू शकतो.

 थोडक्‍यात, आपली बलस्थानं ओळखा आणि सर्व ताकदीनिशी लढा. आत्यंतिक तळमळ हीच कार्यसिद्धीची सुरवात असते. 

    यश मिळवण्यासाठीची संधी नेमकी असते कुठं? कुठंही. आत्ता तुम्ही आहात तिथंच. वर, खाली, आजूबाजूला! फक्त मन खुलं ठेवा. प्रयत्नवादी व्हा. आशावादी बना... मी प्रार्थना करते, तुम्ही स्वप्नं बघा! स्वप्नांचा पाठलाग करताना येणाऱ्या संकटांचा निर्भीडपणे सामना करा. तुमची स्वप्नं पूर्ण होवोत!

"जीवन किती सुंदर आहे, आयुष्य तुला सांगत जाईल प्रयत्न करायला विसरू नको,मार्ग तुला सापडत जाईल"

==============

✍️ *श्री.सुंदरसिंग आर. साबळे*
           *गोंदिया*
मो. 9545254856
[31/05, 11:28 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: ( 09) *प्रेरणास्त्रोत -महत्वाचे*
       माझे प्रेरणास्त्रोत माझे वडील आहेत. वडिलोपार्जित व्यावसायिक वडिलांकडे पाहूनच  मी स्वतःचे व्यवसाय धोरण ठरविले. माझे वडील कोणत्याही बाबीत तडजोड करीत नसत. शिस्त प्रिय ,प्रसंगी नारळासारखे कठोर, तर  तसा प्रभाव माझ्या  वागण्यात प्रभावित पणे पडला. पण  प्रत्येकवेळी वडील हे करत नसतील तर तो काय करेल? ठराविक वयात त्याच्या प्रेरणांचे भरण-पोषण त्याच्या वडिलांकडूनच झालेले पाहिजेत.असा अट्टहास,आग्रह बरोबर नाही.तरी मला प्रेरक माझे वडील पावलोपावली मला मार्गदर्शन करीत राहिले .आजही करीत आहे .माझे प्रेरणा स्थान  मला आदर्श शिक्षक ,पालक,सखा रूपाने पदोपदी समोपदेशकआहेत.
               माझ्यावर समज आली त्या वयात एखाद्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला आणि माझ्यासाठी ती व्यक्ती प्रेरणादायी ठरली, तरी त्या व्यक्तीच्या  विचार निश्चितपणे मी करावयास हवा. ही खूणगाठ एकदा मनाशी बांधली गेली की रस्ता कधी चुकणार नाही. माझ्या मित्राने जुगारात दहा रुपयाचे दहा हजार रुपये केले आणि म्हणून माझी प्रेरणा ती असेल तर असे प्रेरणास्थान एक दिवस  मला खड्ड्यात घालेल. बंदुकीच्या बळावर समाजाला धाक दाखविणारा, असत्य बोलणारा, भेसळ करून समाजहिताशी खेळणारा, दुही माजवून पोळी भाजणारा असा कोणीही चांगली  प्रेरणा देऊ शकत नाही. ही दगडावरील रेघ आहे.

       मी उत्तम वागले, साधनशुचितेचा आग्रह धरून राहिली तर माझ्या प्रेरणास्थानांचा लोकांना निश्चित आदर वाटेल आणि कदाचित उद्या मीच माझ्या भोवतीच्यांचे प्रेरणास्थान बनेन, हा विचार मनावर बिंबवला की माझे पाऊल वाकडे पडेलच कसे? 
            प्रेरणा म्हणजे आहे तरी काय? प्रेरणा कुठुन प्राप्त होते. ? प्रेरणा कशी निर्माण होते? या आणि अशा विविध बाबींचा शोध म्हणजेच प्रेरणास्थान प्राप्त होण्याचा मार्ग सुकर होणे होय.जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते . जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो.अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे .
              मूल शाळेत जाऊ लागले की    हळूहळू         मित्र नातेवाईक , -मैत्रीणी ,शिक्षक,आजूबाजूचा परिसर ,समाज वातावरण कळत नकळतपणे प्रेरणा देत  असतात .प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो . पण ,प्रेरणा म्हणजे नक्की काय ? प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे होय . प्रेरणा म्हणजे चालना देणे होय.. प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे हृदयस्त्रोत होय.  साध्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे प्रेरणा होय .एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा होय दैनंदिन  आयुष्यात आपण प्रेरणा हा शब्दप्रयोग करतो.अनेक मानसशास्त्रद्न्य,विचारवंत ,लेखक यांचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे प्रेरणा  होय.
                 आपल्या बुद्धीला पटेल आणि झेपेल एवढाच विचार आपण एखाद्या विषयाचा करतो ,आणि स्वतःभोवती काही मर्यादांचे कुंपण आखून घेतो . हे मर्यादांचे कुंपण म्हणजेच प्रगतीच्या मार्गातील भलामोठा अडथळा !
     प्रेरणा मिळण्याची मुख्य ठिकाणे किंवा प्रेरणा स्रोत पुढीलप्रमाणे  आहेत. गरज भासणे हा पहिला प्रेरणास्रोत आहे . शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि उद्दीपक असे आहेत . भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक बनण्याची अवस्था होय . उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . प्रेरक म्हणजे motive . विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला प्रेरक म्हणतात.
       लहान पणी बाबाबरोबर सकाळी सकाळी फिरायला जायचे.बाबा चालायचे आणि मी  धावायची .याच प्रेणेतून मी एक चांगली धावपटू बनली. हाँयस्कूल मध्ये शिकत असतांना इयत्ता पाचवी ते दहावी पर्यत  *शंभर/दोनशे मीटर शर्यतीचा* पहिला क्रमांक  माझा सोडला नाही ,सुटला नाही. आंतरिक  प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे . आंतरिक प्रेरणा ही दैवी समजायला हवी. चांगल्या प्रेरणेमुळे आयुष्य कुठल्या कुठे निघून जाते .म्हणजे प्रेरणास्त्रोत महत्त्वाचे .आपले आदर्श महत्वाचे.त्यांचे संस्काराचे धडे कायापालट करणारे असतात ध्येयपूर्तीस प्रेरणास्त्रोत ठरतात .
लेखिका 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[31/05, 12:27 PM] जी एस पाटील: कोड न.३६  विषय : -प्रेरणा/प्रोत्साहन : -.......प्रेरणा म्हणजे स्पुर्ती देणारी शक्ति आहे.प्रेरणा ही आपणास वेगवेळया पासून मिळत असते.सुरुवातीस आपल्या कुटुंबापासुन सुरुवात केले तर आपणास समजू लागल्या पासून आपल्या आई व वडील यांच्या पासून प्रेरणा मिळत असते.कसे वागायचे कसे राहयचे धड़े आपणास मिळत असतात आई वडील आपणास इतिहासातील वेगवेगळ्या शुर वीर स्त्री व पुरुषांच्या गोष्टी सांगतात त्या गोष्टीमधुन आपणास प्रेरणा मिळत असते.मा   जिजाऊ शिवरायांना अशाच थोरांच्या गोष्टी सांगुणत्यातून शिवरायांना प्रेरणा मिळत गेली.तेच पुढे स्वराज्य संस्थापक झाले.जगातील एकमेव जाणताराजा होवून गेले.कोणाला पुस्तका मधून प्रेरणा मिळाली.महात्मा गांधी म्हणतात मी जे काय काम शकलो ते लियो स्टाल्सटाय यांच्या "The kingdom god is with in you" हे पुस्तक वाचुन प्रेरणा मिळाली.जगप्रशिद्ध शास्त्रज्ञ मायकेल फैराडे म्हणतात पुस्तक बांधनीच्या दुकानामध्ये काम करीत असताना वाचनाचा छंद जोपासला तेथील सर्व पुस्तके वाचून प्रयोग करून पाहण्याची प्रेरणा मिळाली.महात्मा फुले म्हणतात "थामसपेन"यांचेपुस्तक वाचून समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली.कालच डॉक्टर बाबा आढाव यांची मुलाखत एबीपी माझा दूरदर्शन वाहिनी वर ऐकली तेव्हा ते म्हटले प्रत्यक्ष जेव्हा मी हमालांचे जवळून काम पाहिले तेव्हा मला त्याच्या विषयी काम करण्याची प्रेरणा मिळाली.यातून आपल्या लक्षात येते प्रसंग पाहिल्या नंतर प्रेरणा मिळत असते. म्हणजे प्रेरणा कोठनहि मिळू शकते.काही ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर यांचा पहिला पुतळा तर ते जीवंत असताना कोल्हापुर येथे बागुल यानी उभारलेला आहे ते पुतळा पाहुन इतराना प्रेरणा त्यांमधुन मिळेलच पण स्वतः बाबासाहेब यांना सुध्दा जीवंतपनी आपला पुतळा उभारल्या मुळे अधिक काम करणेची एक प्रकारे प्रेरणाच मिळाली असेल.अशा महापुरुषांचे पुतळे ही सामाजिक प्रेरणा स्थल आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.कमीत कमी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथि दिवस हे पुतळे वंदन करणेसाठी प्रेरणा स्थल होतात.त्या पुतळयामधुन प्रेरणा घेत असतो व आपण त्यांच्या कार्यासारखे कार्य केले पाहिजे ही प्रेरणा स्थळे आपणास चांगला मार्ग दाखाविन्याचे काम करतात.काही पूर्वीच्या थोताण्ड रूढ़ि परंपरा यातून बोध घेवून चांगली सुधारना करणेची प्रेरणा मिळत असते.एखाद्या पुस्तकातील एक ओळ सुध्दा संबधित वाचकाला प्रेरणा देवून जात असते.त्यामुळे त्याचे आयुष्य बदलू श कते त्यामुळे आपण प्रेरणा ही दुर्लभ अशी गोष्ट  नाही. सहज ती कोठेही मिळत असते.अगदी निसर्गाच्या बाबत विचार केलातरी आपण    छोटी असणारी मुंगी पाहिली तरी ती कशी एका रांगेत ओळीने मार्गक्रमण करीत असते यामधून सुध्दा आपण प्रेरणा घेणेची  गरज आहे.याशिवाय चंद्र किवा सूर्य यांची रोजची दिनचर्या यातून सुध्दा प्रेरणा आपण नियमित प्रेरणा घेऊ शकतो.रस्त्यावर थांबले ले गाढव पाहिले तर आपल्या लक्षात येईल वहाने ये  जा थांबले
शिवाय जागेवरून हलणार नाही गडबड करणार नाही या मधून सुध्दा आपण प्रेरणा घेऊ शकतो.त्यामुळे अपघात होणार नाहीत.
भगतसिंग,राजगुरु,सुखदेव हे आपला देश स्वतंत्र करण्यासाठी फासावर गेलेले आहेत त्याच्या देशाप्रति असलेले देशप्रेम पाहुन यातून आपणास प्रेरणा मिलत असते.शाळे तील मुलाना बक्षीस मिळाले तर बक्षीस न मिळालेली मचले आपण सुध्दा अभ्यास करून बक्षीस मिळविण्याची प्रेरणा घेत असतात.मा सवित्रीबाईचे शिक्षणाचे काम पाहून इतर महिला त्यामधून प्रेरणा घेऊन आपले करू शकतात.सचिन तेंडूलकर सारखे आपणास कधी खेळता येईल अशी प्रेरणा घेऊ शकतात.महिला सुध्दा मागे नाहीत.आपल्या इंदिरा गांधी,प्रतिभाताई पाटील यांच्या प्रेरणा घेऊन महिला काम करीत आहेत.आपला देश प्रगति करत आहे ही प्रेरणेचेच काम आहे..  लेखक... जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
[31/05, 12:34 PM] senkude: ( 5)

प्रेरणा / प्रोत्साहन

मनुष्याच्या जीवनात ज्या काही विकासासाठी, तेजविकासासाठी घटना घडतात त्या त्यांचं  जीवन गतिमान,  प्रवाहित करण्यासाठी होतात. 
कोणत्याही प्रसंगानुसार घडलेल्या घटनेला माणसाने निराशा ओढवून माणसाच्या मनातल्या दुर्दम्य आशेला बळ मिळत नाही. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या बाधांमुळे निराशेला कधीही जवळ करु नये. याउलट जगाचा प्रवास करताना आलेल्या विविध अनुभवातून आपण प्रेरणा घेऊनच योग्य वाटचाल केली पाहिजे. हेच जीवनाचे वास्तव आहे. अनेक समस्यांवर मात करून आपण आपले कार्य त्यावर उपाय शोधून अविरतपणे चालू ठेवणे जीवनाची हीच खरी प्रेरणा आहे. मनुष्य एखाद्या घटनेत सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मक विचारांना अधिक प्राधान्य देतो त्यामुळे त्याच्या आशेचा अंकुर नष्ट होण्यास फारसा वेळ लागत नाही.त्यामुळे माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले कार्य केले पाहिजे. या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते.

निसर्गाच्या सनिध्यातून आपल्याला ईश्वराच्या कर्तुत्व शक्तीचा आविष्कार पाहावयास मिळतो त्यातूनही व्यक्तीस प्रेरणा मिळत असते. कलेला प्राधान्य मिळत असते. जसे की रांगोळीची कल्पना माणसाला आकाशातील नक्षत्र यांवरून सुचली. निसर्गातून कविला कविता करण्याची प्रेरणा मिळाली. "हे सृष्टी म्हणजे अन्योक्ती आहे. दिसायला जरी सृष्टी असली तरी असायला देव असे" असे विनोबाजी भावे म्हणतात. मानवी जीवन हे कलेमुळे समृद्ध बनते. आणि ह्या कलेचे प्रोत्साहन त्याला सृष्टितून सतत मिळत असते.
उदा.
फुलपाखराच आयुष्य फक्त काही दिवसाच असतं तरीही ते अनेकांच्या आयुष्यात रंग भरतं आपल्यासारख्या माणसांना तर  कित्येक वर्षाच आयुष्य लाभतं. मग या फुलपाखरा कडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कार्याला आपण प्रेरणा द्यायला हवी. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग-तरंग उमलतात. काहीतरी नव करण्याची उमेद मिळते.  आपल्याकडून मिळालेली हीच प्रेरणा त्याच्या आयुष्यात नवसंजीवनीचे कार्य करते. म्हणून आपण प्रेरणा, प्रोत्साहन,उत्साह , हिम्मत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची विचारसरणी ठेवली तर आपण तर समाधानी, आनंदी राहतोच परंतु दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे झरे निर्माण करता येतील.  ही स्फुर्तीदायी प्रेरणा शक्ती सर्वांना लाभो.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि.नांदेड
[31/05, 12:57 PM] दुशांत निमकर: *(02)विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य बाहेर काढावे*

           जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक मानवाला प्रेरणेची गरज भासते.प्रेरणा म्हणजे एक प्रकारचे प्रबलन,प्रोत्साहन होय.विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी मनात जिद्द,चिकाटीने कार्य करण्याची शक्ती प्रदान होणे म्हणजे प्रेरणा होय असं आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्मल्यानंतर प्रथम गुरू प्रेरणा देणारी आईच असते.बोबडे बोल बोलायला लावणारी,चालायला शिकविणारी,पालनपोषण करणारी आई म्हणजे एक प्रेरणास्त्रोत होय.मूल सहा वर्षे झाल्यानंतर शाळेत टाकल्या जाते त्यांच्यामधील कलाकौशल्य,क्षमता,सुप्तगुण ओळखण्यासाठी त्याला प्रेरणेची आवश्यकता असते.विद्यार्थ्यांमध्ये असलेली आवड-निवड,अभिरुची,अभिवृत्ती बाहेर काढून यशाच्या उंच शिखरावर पोहचविण्यासाठी प्रबलनाची गरज आहे.थोर मानसशास्त्रज्ञ स्किनर यांनी प्रयोगातून प्रेरणेची व्याख्या स्पष्ट करून दाखविली आहे.स्किनर यांच्या मते,प्रेरणा म्हणजे शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग होय.प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी खूप लाजाळू,मनात शिक्षकविषयी भीती निर्माण झाल्याने त्यांच्यातील कलाकौशल्य वृद्धीसाठी पुढे धजावत नाहीत त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन डान्स,गायन,वादन,अभिनय व इतर सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी सदोदित प्रयत्न करायला हवे.

        शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची समजून घेण्याची प्रक्रिया भिन्न-भिन्न असते.कोणाला सांगितलेलं लवकर समजून येते तर कोणाला उशिरा त्यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रेरणा दिल्यास अभ्यास करण्यात वा आवडीच्या क्षेत्रात निश्चित नाव कमवू शकतो. प्रेरणा देखील दोन प्रकारच्या आहेत.स्वाभाविक प्रेरणा त्यालाच आंतरिक प्रेरणा म्हणतात.आंतरिक प्रेरणा या जन्मजात त्या विद्यार्थ्यांत ठासून भरलेले असतात. त्यांच्या मनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या क्रियाशील वाटाची निवड करून यशस्वी होण्याचा मार्ग निवडत असतो आणि दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा होय त्यालाच कृत्रिम प्रेरणा असे म्हणता येईल. कृत्रिम प्रेरणेमध्ये विद्यार्थ्याला उद्देशाप्रती एखाद्याचे लक्ष खेचून आणण्यासाठी प्रेरणा देणे गरजेचे आहे त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेऊन प्रोत्साहन दिले जाते.

            थोर विचारवंत एच. डब्लू बेनार्ड यांनी दिलेल्या व्याख्येनुसार 'एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे उत्तेजन म्हणजे प्रेरणा होय'.शाळेत विद्यार्थ्याला विविध शैक्षणिक अनुभव देत असतांना चांगले कार्य करणाऱ्या विद्यार्थ्याला पुरस्कार,बक्षीस, प्रशंसा, सहकार्य केले जाते आणि चांगले कार्य करण्यास प्रोत्साहित करण्याचे काम करीत असतो.एखाद्या विद्यार्थ्याला तू हे डान्स,काव्यलेखन,गणिते सोडविणे यासाठी प्रोत्साहन दिल्यास त्याचे मन सकारात्मक विचार करून ते काम पूर्णत्वास नेत असतो.बऱ्याचदा वर्गात सर्वांच्या समोर अपमान झाल्यास आणखी जिद्दीने पेटून उठून अभ्यासाकडे वळतो असे अनेक उदाहरणे आपण बघितले आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला पदार्पण करतांना आंतरिक व कृत्रिम प्रेरणेने ध्येयवादी होऊन कार्य करू शकतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य बाहेर काढण्यासाठी प्रेरणा महत्वाची आहे हे स्पष्ट दिसून येते.

✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
       चक फुटाणा, चंद्रपूर
  मो न 9765548949
[31/05, 1:06 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: *प्रेरणा*
*(४०)* *मनिषा पांढरे, सोलापूर*

प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन. प्रत्येकाच्या जीवनात व्यक्तीला प्रेरणा देणारी व्यक्ती मिळतात... काही लोक प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष प्रेरणादायी ठरतात.
माझ्याही जीवनात मला असेच प्रेरणादायी काही व्यक्ती भेटल्या ज्यामुळे जीवनात चांगले, वाईट अनुभवायला मिळाले.
   आपणही अगदी छोट्या,छोट्या गोष्टीत इतरांना प्रेरक ठरेल असे काही केले तर आपल्याकडून देखील प्रेरणा घेतली जाऊ शकते.
माझ्याकडे मागील वर्षी एक मुलगी शाळाबाह्य होती‌. तिचा मी इयत्ता पाचवी प्रवेश घेतला.प्रवेशानंतर पहिल्याच दिवशी तिला काही समजत नसल्याने ती रडत होती.... तिला समजावून सांगत तिला दररोज शाळेत येण्यासाठी प्रवृत्त केले आणि तिच्यात लाक्षणिक बदल झाले. आज ती एक हुशार विद्यार्थी म्हणून गणली जाते यासाठी तिला योग्य वेळी प्रेरणा देण्याचे कार्य झाले. हाच बदल आपल्या पाठीवर पडणा-या कौतुक थाप यामुळे प्रेरणादायी ठरला.
     हेलन केलर हिला तिच्या प्रशिक्षकांनी प्रेरणा दिली... म्हणून ती चालू शकली. कविता राऊत, किरण बेदी, सुनिता विल्यम अशा कितीतरी महिलांची यशोगाथा ही प्रेरणेतूनच तयार झालेली असते.
    सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रेरणा देत राहिल्यास, आत्मविश्वास निर्माण केल्यास जीवन प्रेरणादायी ठरते.

मनिषा पांढरे, सोलापूर🙏🏻
[31/05, 1:09 PM] Jeevansing khasawat: .... प्रेरणा......
        सामाजिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला वाटते आपण काही तरी करावं .पण सामाजिक जीवनात वावरताना माणूस चांगलं ते सोडतो .कारण त्याची ध्येय निछिती झालेली नसते.आणि प्रेरणा मिळत नसते.त्या मुळे मार्ग चुकतो. प्रेरने ने आयुष्य  बदलता येते.कुटुंब बदलता येते.गाव बदलता येतो.या साठी चांगलं काम करणाऱ्या च्या पाठीवर शाबासकची थाप हवी असते.त्या मुळे काम करणाऱ्या व्यक्तीला मानसिक धैर्य प्राप्त होत असते.आणि काम करताना नवी प्रेरणा मिळत असते.आणि तिथून सत्याच्या शोधाची सुरुवात होते.
 प्रेरणदायी विचारातून जे अशक्य असेल तेही शक्य घडत असते.
       एक मुलगा अतिशय खोडकर होता.व मंद होता.पण काहींना काही नवीन करत राहावं ही त्याची इच्छा असायची .पण अभ्यास मात्र अजिबात करत नव्हता .या मुळे शाळेतील शिक्षक ही त्या पासून कंटाळले आणि मुलाच्या आईला शाळेत बोलावून एक चीठी लिहिली त्या वर लिहिलं होत की तुमचा मुलगा अतिशय मंद आहे. आम्ही त्याला शाळेत शिकऊ शकत नाही.तुम्हीच त्याला.घरी शिकवा.तेंव्हा आईने चिठी वाचली व चिठी ठेवली आणि तेंव्हा मुलाने विचारले आई चीठीवर काय लिहिले आहे ग! आईने आत्मविश्वास पूर्वक उत्तर दिले .की तू अतिशय हुशार आहेस तुला शिकवण्यासाठी तुझ्या ऐवढे हुशार शिक्षक त्यांच्या कडे नाहीत .म्हणून तू आजपासून घरीच  खुप अभ्यास करायचा .मुलाला खरेच वाटले आणि मुलगा आत्मविश्वास पूर्वक अभ्यास करायला लागला.आणि समोर चालून एक महान शास्त्रज्ञ बनला.आईच्या एका प्रेरणा दाई विचाराने मुलाचेच नाही तर अख्या जगाचे भविष्य उजळून टाकले.मुलाला नियमित प्रेरणा मिळत राहिली आणि त्याने विद्युत चा शोध लावला .अशा या मुलाचे नाव आहे थॉमस अलवा एडिसन.
      आपण काम करताना गती हळू असली तरी चालेल पण ती प्रगती कडे असली पाहिजे.नियमित आपल्या हातून  सत्कार्य घडतील तेंव्हा आपोआपच चांगल्या कामाचे कौतुक व्हायला लागते आणि त्यातून आत्मविश्वास वाढत जातो.
जे काम तुम्हाला आज येत नाही आहे.त्याचा इतका सराव करा की कामात पूर्ण तन ,मन झोकून द्या.
उद्या ते काम तुमच्या पेक्षा कोणीच चांगले करू शकणार नाहीत.त्या कामासाठी तुमची कमतरता भासेल.
 आपले काम चालू असताना जर कधी. कोणी तुमचं मन तोडल तर 
निराश होऊ नका.कारण
हा निसर्गाचा नियम आहे ,!!!
ज्या झाडावर गोड फळ 
असतात त्याच 
झाडावर लोक जास्त दगड
मारतात...!!
    म्हणून या नाण्याच्या दोन बाजू असतात.चांगले ,वाईट  ,द्वेष या गोष्टी चालूच असतात म्हणून आपण चांगलं असेल ते स्वीकारावं .,! आणि वाईट असेल ते सोडून द्यावं.
 लहान मुले असोत किंवा मोठी माणसं सगळ्यांना मनापासून प्रेरणा मिळाली तर खूप मोठी काम होतात.शिवाजी महाराजांनी  जिजामाता यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली.,सावित्री बाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून मुलींना शिक्षण देऊन अखा भारत बदलून टाकला. या साठी कोणतेही चांगले काम हाती घेतल्यावर पाठीवर थाप देऊन फक्त! फक्त लढ म्हणणारा हवा असतो.

Code .26
जीवन खसावत भंडारा9545246027
[31/05, 2:12 PM] +91 95275 94821: $$ 4 $$ प्रोत्साहन  
 
शबासकी किंवा वा! वा! मानवी मनाला अंतिम ध्येय जरी गाठून देत नसले तरी त्या स्थितीला समिपता माञ निश्चित प्राप्त करून देऊ शकतात हे सत्य वाटते. 
       यशात खूप साक्षीदार होत असतात, पराजयात ती कमतरता भासते. यश आमच्या मुळे मिळालय नाही तर काय खरं होतं. अशी यशस्वी पक्षाची साथ बहुतेक मंडळी धरतात. पण यश ज्या गोष्टी मुळे मिळालय त्या कडे माञ कदाचित कानाडोळा होऊ शकतो. ही खर्या अर्थाने शोकांतिका आहे. 
     एखाद्या लढाईतील यश असेल, परीक्षेतील कठीण साध्य असेल किंवा सध्याच्या प्रचलित पध्दतील लढत असेल, त्या साठी योग्य असे कामाचे नियोजन लागेल, श्रम किंवा मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल. आणि नंतर या सर्व गोष्टी अनुकूल झाल्या नंतर मागून पाठीवर थाप मारून शाब्बास म्हणणे म्हणजे खर्या अर्थाने प्रोत्साहन देणे होय.
प्रोत्साहन कोणी कोणाला दिले पाहिजे? चांगले काम असेल त्या मधून निष्पन्न होणारं फलित लोकांना उपयोगी पडणारे असेल तर जरूर त्या काम करणाराला प्रेरणा दिली पाहिजे. 
       वाईट काम असेल तर अशा कृत्य करणाराला वेळीच त्या कामापासून परावृत्त करणे आणि त्या कार्याच्या परिणामांची जाणिव दिली पाहिजे. ही जाणिव जागृती एक प्रकारची चांगलीच गोष्ट आहे हे समजून घेतले पाहिजे.
प्रोत्साहन देणे म्हणजे एक प्रकारची संजीवनी देणं असते. ते एक प्रकारचे बळ देणे असते. शिक्षक विद्यार्थी मंडळीला अभ्यास करण्यासाठी सारखे प्रोत्साहीत करत असतात. कठीण भाग समजावून सांगत असतात. त्याच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग शोधतात आणि नविन गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करतात. प्रोत्साहन देणे हे शिक्षकांचे मुख्य आणि महत्त्वाचे काम आहे. जर एखादा शिक्षक जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणत असतील ते खूप अवघड आहे, ते तुला जमणार नाही, तुझ्या कडून ते शक्य नाही, तू खूप ढ आहेस.  अशा वेळी सदरील विद्यार्थी न्यूनगंडी होऊ शकतो, कशाला काय करायचं, आपण काही अभ्यास केला आणि तो चुकला तर शिक्षक बोलतील , मग इतर विद्यार्थी आपल्याला नावे ठेवतील त्यापेक्षा नकोच ते करायला.  म्हणून या गोष्टी टाळाण्यासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची असली पाहिजे विद्यार्थी मन अतिशय नाजूक असते, त्या मनाला अजिबात इजा न होऊ देता त्यावर उपचार करणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे.  तो विद्यार्थी मिञ बनला पाहिजे. विद्यार्थी अंतरक्रिया साधत असताना विद्यार्थी मित्रांना हूरूप कसा येईल आणि तो पुढे काय पुढे काय अशी धारणा बाळगून खिळून कसा राहील हे पाहणं म्हणजे प्रोत्साहन ठरेल.
खर्याचा ध्यास आणि खोट्याची चिड प्रवृत्तीला असली पाहिजे, खरे काम करताना शाबासकी दिली की म्हणतात हत्तीचे बळ माणसाच्या अंगात संचरते.  शिवरायांचे मावळे थोडे का असेनात परंतू "हर हर महादेव  " म्हटलं कि शञूवर तटून पडत असत.  हर हर महादेव हे त्यांना प्रेरणा देणारे शब्द होते अध्यात्मिक बाजू तर होतीच होती पण प्रेरणादायी बाजू जास्त होती. 
         महाभारतातील युद्ध धर्म आणि अधर्म , सत्य आणि असत्य या विचारातूनच घडले असत्य आणि अधर्म काही महान योध्याना माहित असताना अधर्माच्या बाजूला राहावे लागले, ते गोञज, गुरूदेव असताना त्यांना मारण्यासाठी धनूर्धर अर्जून तयार होत नव्हता, त्याला धर्म काय असतो, अधर्म काय असतो असा महान उपदेश देऊन गिताख्य देऊन, एक प्रकारचे प्रोत्साहन देऊन भगवान श्रीकृष्णाने मारण्यास भाग पाडले  .
       देईन मी एक साधे उदाहरण आपणास जे आपल्या दैनंदिन जीवनात दिसते ते सुगीच्या दिवस असतात शेतकरी आपल्या शेतात राहतात, पिकाची कापणी म्हणा कि काढणी म्हणा बाजरी, ज्वारी किंवा गहू अशा पिकांची त्या वेळी शेतकरी खूप गाणी म्हणतात स्ञी असोत कि पुरुष कोणी ही असोत ते भलरी गित गातात "भलरी" गीत हे हूरूप वाढवते कष्टाचा सीन भाग घालवते म्हणून ते एक प्रकारचे प्रोत्साहन होय. 
          एखादा माणूस एखादी गोष्ट सांगत असेल अशा वेळी त्याला मध्ये मध्ये हूकंर द्यावी लागते ती हूकंर म्हणजे प्रोत्साहनच होय
प्रोत्साहन, प्रेरणा, शबासकी दिल्याने कित्येकांनी आपल्या अयुष्यात चैतन्य निर्माण केलीत, कित्येकांची जीवन बदललीत. 
  म्हणून माणसाला अपमानित न करता त्याचा हूरूप वाढवणे हेच प्रोत्साहन देणे होय. 
       भागवत लक्ष्मण गर्कळ बीड (  4. ) 9527594821
[31/05, 3:16 PM] अमित बडगे: *(38)*
*विषय: - प्रेरणा*

प्रेरणा म्हणजे काय?... प्रेरणा येते कुठून?... प्रेरणा कशी मिळते? म्हणजे... प्रेरणा म्हणजे नेमके काय असते?
जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो. यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मत: मुलांसाठी आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना, प्रत्येक व्यक्ती आपल्या आईला प्रथम प्रेरणास्थान मानते. कुटुंबातील आणि परिसरातील इतर व्यक्तीदेखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात. अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. तर, मोठेपणी काही व्यक्ती आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरते.

खरं आहे की, दुसऱ्याचे विधायक कार्य हे आपणास निश्चितच प्रेरणा देणारं होऊ शकतं आणि ते अनेक उदाहरणांनी पटवूनही देता येईल. परंतु, मग सगळीकडेच अशी सकारात्मक परिस्थिती का निर्माण होत नाही, याचाही विचार व्हायला पाहिजे. उणीव कशाची आहे, तर प्रेरणेची नव्हे अंत:प्रेरणेची. अंत:प्रेरणा म्हणा किंवा ‘सिक्स्थ सेन्स’ म्हणा, हा एक तर नैसर्गिक असतो किंवा तो प्राप्त करावा लागतो. या अंत:प्रेरणेमुळे वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणं सोपं जातं. एखादा अवघड निर्णय घेणंही यामुळे शक्य होतं. नातेसंबंधांमध्ये योग्य ती भूमिका घेण्यास मदत होते आणि अर्थातच करिअरचा मोठा पल्ला गाठायलाही याचा उपयोग होतो. व्यक्तीची वैचारिक बैठक व आपल्या कर्तव्याविषयी असलेली नितांत श्रद्धा यातूनच अंत:प्रेरणा जागृत होत असते. आपल्या कामाची जबाबदारी व आपली व्यक्तिगत वर्तणूक यांचा साकल्याने विचार करणारी व्यक्ती ही आपल्या कार्यक्षेत्रात व सार्वजनिक जीवनात नेहमी यशस्वी होताना तसेच अधिक कार्यक्षम होताना दिसत असते.

आपली अंत:प्रेरणा अर्थात आपल्या कार्यक्षेत्रातील कार्य करण्यासाठी आपणास प्रवृत्त करणारी किंवा उद्युक्त करणारी एक प्रकारची ऊर्जाच होय. त्या अनुषंगाने आपले विचार, त्यानुसार आपली कृती यांच्यामागील असलेला कार्यकारणभाव आणि त्याला नियंत्रित करणारी शक्ती म्हणजेच अंत:प्रेरणा होय.

अंत:प्रेरणेतून आपली धडाडी, ऊर्मी, इच्छाशक्ती व आपला दृष्टिकोन स्पष्ट होत असतो. आपली आपल्याकडून असलेली मूलभूत इच्छाच आपली अंत:प्रेरणा जागृत करत असते. मला काय हवं आहे? मला काय करायचं आहे? अशा प्रकारच्या प्रश्नांतूनच खरी सुरुवात होत असते. यात कोणतेही दडपण किंवा लादणे नसते. ते आपल्या हृदयातूनच यायला हवं. यात खूप खोलवर अशी तृष्णा दडलेली असते. हे मी करायला हवे, असे सतत जाणवत असते. यात एक भावनिक जुळवणूक निर्माण झालेली असते. अशा इच्छा पूर्ण झाल्यावर होणारा आनंद फार मोठा असतो. ज्याची किंमत व मोजदाद होऊच शकत नाही.

मात्र, अशी अंत:प्रेरणा जागृत असणाºया व्यक्तींचेही तीन वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण केलेले असते. तेही समजून घेणं गरजेचं आहे.
थोडक्यात काय तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या विचारावर व आपल्या कृतीवर आपण आपले कार्यक्षेत्र उजळून टाकू शकतो. दुसरीकडून प्रेरणा घ्यावी, परंतु बाहेरून मिळणारी प्रेरणा ही खूपच अल्पजीवी असते. त्यामुळेच तिच्यात ताकद नसते. परंतु, जेव्हा आपल्याला आतून, आपल्या हृदयात एखादी गोष्ट बसते, एखादी गोष्ट पटते, तेव्हा त्यापासून ऊर्जा मिळते आणि तेव्हा मात्र आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. यश, यश म्हणजे तरी नेमकं काय हो? तर आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घडवता आलं की, ते मिळालंच समजा.

- अमित प्र. बडगे, नागपुर
  (7030269143)
[31/05, 3:24 PM] Nagorao Yeotikar: *नवसाहित्याची निर्मिती म्हणजे प्रेरणा*

प्रेरणा व्यक्तीला प्रोत्साहित करून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून पुढे जाण्याची चालना देते तर शिक्षा ही व्यक्तीच्या मनात न्यूनगंड निर्माण करून मागे नेत असते. म्हणूनच शिक्षेने जे काम होत नाही ते एका प्रेरणाद्वारे होऊ शकते. व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा देणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. जिच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस बाळ सुरक्षित वाढते ती आई आपल्या बाळाला नेहमीच प्रेरणा देत असते. बाळ जन्माला आल्यापासून आई आपल्या बाळासाठी झटत असते. त्याची प्रगती होत असताना तिला किती आनंद होत असतो. बाळाला बोलता यावे, चालता यावे, पळता यावे, यासर्व बाबीसाठी आई आपल्या बाळाला नेहमी प्रेरणा देते. नुसती प्रेरणा देत नाही तर कठीण प्रसंगात मदत देखील करते. प्रेरणा देणारी दुसरी व्यक्ती म्हणजे शिक्षक. जेंव्हा मूल सहा वर्षाचे होते तेंव्हा ते शाळेत प्रवेशित होते. त्याठिकाणी त्यांचा संबंध शिक्षकांशी येतो. शिक्षक शाळेत शिकवण्यासोबत प्रत्येकाला प्रेरित करत असतो. तुम्ही हे करू शकता याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक निर्माण करतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना ओळखून त्यांचा आविष्कार करण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थी कठोर मेहनत करून अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवतात. त्यानंतर तिसरे प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणजे मित्र. आपल्याच वयाची मंडळी एकत्र येतात तेंव्हा ते मित्र म्हणून ओळखले जातात. जो अचूक मार्गदर्शन करतो कदाचित ते कडू असेल  तोच खरा मित्र समजला जातो. व्यक्तीच्या अंगात असलेल्या अनेक बलस्थानाना मित्र चांगल्या प्रकारे ओळखतात आणि तू हे करू शकतोस असा आत्मविश्वास निर्माण करतात त्याचसोबत वारंवार शाबासकीची थाप देत त्याला प्रेरणा देत राहतात. मित्रांच्या या शाबासकीने वेगळा विश्वास मिळत राहते आणि उत्तरोत्तर प्रगती करत असतो. रामायणातील एक प्रसंग येथे नमूद करावेसे वाटते. रावणाने सीतेला अपहरण करून लंकेत नेऊन ठेवलेले असते. सीतेच्या शोधात भगवान श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि वानरसेना सर्व सागर किनारी येऊन पोहोचतात. सीता लंकेत असेल तर तिला संदेश देऊन येण्यासाठी हनुमानाची निवड होते. त्यावेळी हनुमान सागर किनारी चिंतीत मुद्रेत जाऊन बसतो. मी सात समुद्र पार करून लंकेत पोहोचू शकतो की नाही यावर तो विचार करत बसलेला असतो. जांबुवंत त्यांची समस्या ओळखून घेतो आणि हनुमान काय करू शकतो याची जाणीव करून देतो. तेंव्हा हनुमानाला स्वची जाणीव होते आणि तो लंकेकडे उड्डाण करतो. मित्र आपल्यामध्ये लपलेल्या स्वला जागे करण्याचे काम करतात. म्हणून जीवनात आई आणि गुरुजी यांच्यानंतर तिसरे महत्वाचे स्थान आहे. लहान मुलांकडून काही काम करून घ्यायचे असेल तर तिथे प्रेरणाच कामाला येऊ शकते. लहान मुलेच नाही तर कोणाकडूनही काही काम करून घ्यायचे असेल तर प्रेरणा द्यावेच लागेल. आज मी जे काही लिहीत आहे यामागे माझे गुरुजी, मित्र आणि सर्व वाचक वर्ग आहे. ज्यांच्या प्रेरणेने गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने लिहीत आलो आहे. एखादा वाचक जेंव्हा आपला लेख आवडला म्हणून फोन करतो तेंव्हा जी ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळते ते किती ही पैसा खर्च करून मिळत नाही. वाचकांचे हे प्रेम लेखकांना मिळायला हवे. म्हणून सर्वाना विनंती करतो की, लिहिणाऱ्या हाताला बळकटी येण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी लेख पूर्ण वाचल्यावर एक फोन करावं, एक संदेश पाठवावे. त्यामुळे ते अजून नवनवीन साहित्य लिहून आपली भाषा समृद्ध करतील. आपली मराठी भाषेच्या विकासासाठी नवसाहित्यिकांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. साहित्य हेच आपल्या समाजाची ओळख आहे.

- नासा येवतीकर, 9423625769
[31/05, 4:04 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*माझे वडील माझे प्रेरणास्रोत*

       प्रत्येकाच्या जीवनात कमीत कमीअसा एक तरी व्यक्ती असतोच ज्यांच्या प्रेरणेतून आपण पुढे जात असतो. मला माझ्या जीवनातील प्रेरणादेणारे महत्वपूर्ण व्यक्ति म्हणजे माझे वडील आहेत. मी स्वतः ला धन्य समजते की मी त्यांची मुलगी म्हणून जन्माला आले. आज जेव्हा' प्रेरणा' या विषयावर लेख लिहीण्याचा विचार केला तेव्हा सर्व प्रथम माझ्या मनात विचार आले की लिहीण्याची प्रेरणासुद्धा माझ्या वडिलांकडून मला लहानपणापासून मिळाली आहे. मग आपण आज मिळालेली संधी न दवडता त्याच्याविषयी लिहायला पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या लेखाला शीर्षक' माझे वडील माझे प्रेरणास्रोत' दिलं.
    मी आज ज्या मुक्कामावर पोचले त्याचे सर्वात मोठे श्रेय माझ्या वडिलांना जातं. माझे वडील शिक्षक होते. त्यांनी आपल्या कर्तव्यात कधीच लापरवाही केली नाही. मनुष्य आजीवन विद्यार्थी असतो हे मी त्यांच्या कडून अनूभवले. त्या काळात फक्त अकरावी नंतर शिक्षक म्हणून नोकरीस लागले. हळूहळू नोकरी व वैवाहिक जीवन जगतांना त्यांनी मराठी, इंग्रजी व इतिहास या तीन विषयात एम. ए. व बी. एड. पुर्ण केलं आणि ते सुद्धा प्रथम श्रेणी मध्ये. मी यामध्ये वैवाहिक जीवन या शब्दाचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे त्या काळातील बालविवाह पद्धति होय. कमी वयात लग्न, आम्ही चौघे भाऊबहिण, आजोबा बालपणीच वारल्यानंतर आजी दोन काका व आत्या यांची जबाबदारी स्वीकारून त्यांनी हे शिक्षण पुर्ण केलं.
 हे सगळे करतांना आपल्या कर्तव्याला ते कधीच चुकले नाही. शिस्त, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, हजरजबाबी, दमदार नेतृत्व हे गुण मी त्यांच्याकडूनच आत्मसात केले. मला ते नेहमीच मार्गदर्शन करतात. आता सुद्धा मला कोणतीही अडचण भासली तर मी सर्वप्रथम त्यांनाच फोन करते कारण मला माहीत आहे मला योग्य मार्गदर्शन व प्रेरणा फक्त माझे वडीलच देऊ शकतात.
  ते नेहमी सांगतात या जगात आपल्याला जमणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. फक्त आपल्याला ध्येय निश्चित करून त्यावर लक्षकेंद्रित करायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची भिती बाळगू नको जिथे भिती हा शब्द आला तिथे निराशा व नकारात्मक भावना येत असते. नकारात्मक भावनेला जवळ येऊच देऊ नको. तु सर्व करू शकते.
मला अगदी पहिल्या वर्गापासूनच त्यांनी मंचावर जाण्यास प्रोत्साहन दिलं ते मला दर शनिवारी आमच्या शाळेत बालसभा व्हायची तेव्हा तु या वेळी कोणती कविता म्हणणार मला म्हणून दाखव. मग मी म्हणून दाखवली की त्यात कोणते बदल आवश्यक आहेत ते सांगायचे. नंतर हळूहळू त्यांनी मला मंच संचालन करणे, समयसूचकता या गोष्टींकडे विशेष करून भर दिला. त्याकरिता उन्हाळ्यात सुट्टी तेल सुद्धा स्वयंस्फूर्त भाषण, वादविवाद विषय, अंताक्षरी असे अनेक उपक्रम ते खेळाच्या माध्यमातून घ्यायचे. ते हायस्कूल शिक्षक होते परंतु त्यांची इंग्रजी विषयावर अशी पकड होती की त्यांच्याकडे गावातील अनेक लोकं इंग्रजीमध्ये कुणाला काही पत्र आलं असेल तर ते समजून घ्यायला यायचे.
 आज मी सुद्धा कितीही मोठा कार्यक्रम असला तरी अगदी वेळेवर सुद्धा मंच संचालन करू शकते हे शक्य झालं आहे माझ्या वडिलांनी मला दिलेल्या प्रेरणेतून अन्यथा मी हे करु शकले असते किंवा नाही हे सांगता येणार नाही.
   त्यांच्याप्रेरणेतूनच मला दररोज वाचनाची सवय लागली. घरी वर्तमानपत्र आले की त्यांचा आवडता छंद शब्दकोडे भरणे;ते मला विचारायचे मला शब्द आठवले नाही तर स्वतः सांगायचे त्यामुळे माझ्याशब्दसंपत्तीत वाढ झाली आणि मला सुद्धा शब्दकोडे भरण्याचा छंद जडला.
    त्यांच्या प्रेरणेने आज मी विद्यार्थी आणि पालकांच्या नजरेत सुद्धा कर्तव्यदक्ष व आवडती शिक्षिका म्हणून ओळखले जाते.
 प्रत्येकाकडे उपजत गुण असतात पण त्यांचा वापर कधी आणि कसा करावा याची योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करणारे प्रेरणा देणारे योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. प्रत्येकाचे प्रेरणास्थान वेगवेगळे व्यक्ति असू शकतात.
या जगात काहीही अशक्य नाही फक्त आपल्याला आपली शक्ती जागृत करता आली पाहिजे. आज वयाच्या ब्याएंशी व्या वर्षी ते स्मार्ट फोन वापरतात, व्हाट्सअप चालवतात व न चुकता दुर दर्शन वरील बातम्या ऐकतात. त्यांनीच मला प्रेरणादिली आपल्याला इंग्रजी समजत नसेल किंवा मुकबधिरांकरिता येणार्‍या बातम्या समजत नसतील तरी आपण कोणतेही प्रशिक्षण न घेता हे शिकू शकतो. मला ते मराठी बातम्या व त्याच बातम्या इंग्रजीत ऐकायला लावायचे नंतर मुकबधिरांकरिता येणाऱ्या बातम्या सुद्धा ऐकायला लावायचे हे नियमित सुरू असायचं त्यामुळे हळूहळू मला इंग्रजी शब्द व त्या शब्दांकरीता हाताच्या बोटांच्या हालचालीतून समजायचे. दररोज नियमित  मराठीत ऐकलेलं वाक्य लक्षात ठेवायला लावायचे मग तेच वाक्य इंग्रजी भाषेत कसे बोलतात ते ऐकायला लावायचे व नंतर बोटांच्या हालचालीने ते वाक्य कसे सांगितले ते विचारायचे. असा हा सुट्टीत दैनिक क्रम चालायचा. तेव्हा कधीकधी खुप राग पण यायचा पण थोडी भिती व आदर यामुळे मी नियमित बसायची आणि हेच मला आता कामात येत आहे.
      म्हणून म्हणतात देणार्‍या ने देत जावे घेणार्‍या ने घेत जावे. घेताघेता एक दिवस देणार्‍या चे हात घ्यावे. या ओळी काही प्रमाणात मला लागु होतात कारण मी माझ्यावडीलांच्या प्रेरणेतून त्यांनी जे देऊ केले ते व सोबतच सहवासाने त्यांचे बहुतांश सर्वच गुण मी आत्मसात केलेत. आजच्या प्रसंगी मी जे लेख लिहीलं आहे याचे प्रेरणास्थान हे माझे वडील आहेत. अशा माझ्या प्रेरणास्रोत वडीलांना या लेख लिहिण्याच्या प्रेरणेचा लेख मी माझ्या वडिलांना समर्पित करते.
     तुम्हीच माझे तात, तुम्ही च माझे गुरू.
 तुम्हीच माझी प्रेरणा, तुम्हीच सद्गुरु.
 तुमच्यामुळे मला या जगात आहे स्थान,
 तुम्हाला मी करते या लेखाचे समर्पण.
   
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
[31/05, 5:04 PM] शुभदा दीक्षित:                 प्रेरणा: स्फूर्ती देते

           लॉक डाऊनच्या नियमांमुळे बाहेर पडू शकत नाही. तसेच गर्दी कुठेही होता कामा नये. त्यामुळे सध्या कुठल्याही मॅचेस् होत नाही. खरे पाहिले तर क्रिकेटची, टेनिसची इत्यादी मॅचेस होऊ शकतील. पण खेळायला कोणी तयार नाही. कारण प्रत्यक्ष पॅव्हेलियन मध्ये पाहायला आलेले प्रेक्षक तेथे हजर नसणार. तिकिटाचे पैसे मिळणार नाही तो आर्थिक तोटा होणार. पण त्यापेक्षा महत्त्वाचे प्रेक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन. तेही नसणार. प्रोत्साहन नाही तर खेळायला प्रेरणा कशी मिळणार?

          ध्येयापर्यंत पोचण्यासाठी चालना देणे म्हणजे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे.

           शाळेत मुलांना, तेथील वातावरण, मित्र-मैत्रिणी,  शिक्षक यांकडून प्रेरणा मिळत असते, स्फूर्ती मिळत असते. म्हणूनच पूर्वी गुरुकुलाची पद्धत होती आणि आता शाळा.

            तहान, भूक, काम, क्रोध, मलमूत्र ह्या शारीरिक, प्राथमिक आणि स्वाभाविक प्रेरणा आहेत.

             प्रेरणेचे आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे दोन प्रकार आहेत. आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते. अभिरुची, आवड, अभिवृत्ती, तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते. या आंतरिक प्रेरणेने झपाटलेले लोक साध्या पर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या संकटांवर, अडचणींवर मात करून बिनबोभाट तिथे पोहोचतात.

           प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा. उद्देशा प्रति एखाद्याचे लक्ष खेचून घेणे म्हणजे बाह्य प्रेरणा. एखाद्या खेळण्याला चावी दिल्यावर ते जसे पळू लागते. तसे प्रेरणा मिळाली ती माणसे यशाच्या वाटेवर पळू लागतात.

          ही बाह्य प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे अशी थोडीशी सवयी आपल्याला लहानपणापासून लागलेली असते. कारण लहानपणी आई आपल्याला बोलायला, चालयला शिकवताना, आपल्याला टाळ्या वाजवून कौतुक करून नेहमी प्रेरणा देत असते. हे कौतुक आपल्याला प्रेरणा देत असतं.

            कारखान्यातील लोकांना दिवाळीला बोनस मिळणे म्हणजे बाह्य प्रेरणा. लोकांना माहीत असते, आपण सांगितले आहे तेवढे काम चांगल्या रीतीने पूर्ण केले नाही तर बोनस मिळणार नाही. त्यामुळे काम करण्याची प्रेरणा या बोनस मधून त्यांना मिळते.

           अशातऱ्हेने पुरस्कार, बक्षीस, दंड, निंदा, प्रशंसा यामुळे बाह्य प्रेरणा मिळते. माणसाची गाडी तुरुतुरु साध्याच्या दिशेने पळू लागते.

            माणसाला नेहमीच काहीतरी करून दाखवायचे असते. पण काय करावे ते कळत नसते. त्यामुळे तो भ्रमाच्या भोपळ्यात अडकलेला असतो. अशावेळी आपण आपल्या 'आत' डोकावून पाहिले पाहिजे. आपल्यात काय काय गुण आहेत, आपण काय करू शकतो याचा शोध घेतला पाहिजे. ते एकदा कळले की ती कला आपली प्रेरणा बनते. स्फूर्ती मिळाल्यामुळे आपली गाडी रुळावरून धावू लागते.

           कर्णाचा भर सभेत द्रौपदी कडून अपमान झाल्यामुळे, संतप्त होऊन, तो अर्जुना विरुद्ध लढण्यास, पराक्रम गाजविण्यासाठी उद्युक्त होतो.

           जमशेदजी टाटांना इंग्रजांनी ते जात असलेल्या हॉटेलमध्ये हिंदुस्तानी म्हणून येण्यास मनाई केली. त्यामुळे इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी 'हॉटेल ताज' बांधले. ही 'मनाई' त्यांची प्रेरणा ठरली.

          अशा तऱ्हेने दिखावा, तणाव, निंदा, अपमान, उपेक्षा, या मनाच्या अवस्था ही प्रेरणा बनतात. एखादे वेळेस एखादे ऐकलेले भाषण, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंगही प्रेरणादायी असू शकतो.

         'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते'. म्हणजेच मागे उभी असलेली स्त्री प्रेरणा स्थान असते. कवी, लेखक यांचीहि प्रतिभा आणि प्रतिमा उत्तम असली तरी लेखनाला धुमारे फुटायला प्रेरणे शिवाय दुसरा पर्याय नाही.

           एक राजा युद्ध हरतो आणि युद्धाला पाठ दाखवून पळून जातो. एका गुहेत येऊन लपतो. गुहेत जमिनीवर पडल्या पडल्या गुहेच्या छताशी एक कोळी जाळे विणत असलेला दिसतो. जाळे विणता विणता तो अनेकदा खाली पडत होता. पण तितक्या वेळा उठून परत तो जाळे विणू लागत होता. ते पाहून राजाच्या मनात विचार आला, "हा एवढासा किडा आपले ध्येय  गाठण्यासाठी इतक्या वेळा पडून परत उठून कामाला लागतो आहे. मी एकदा हरलो तर काय झाले? पुन्हा तयारीनिशी प्रयत्न करू शकतोच ना!." तो पुन्हा युद्धास तयार झाला आणि युद्ध जिंकूनच आला. एक साधा क्षुल्लक कोळी राजाचा प्रेरणास्थान बनला.

           प्रोत्साहन दिल्याने, आपली लोकांना कदर आहे, किंमत आहे असे वाटते. दुसऱ्याच्या चांगल्या कामाची, गुणाची आपण प्रशंसा केली पाहिजे. त्यामुळे त्या माणसाला प्रेरणा मिळते. तो दुप्पट उत्साहाने पुढच्या कामास लागतो.

         एखाद्या निराश, दुःखी माणसाचे सांत्वन केले पाहिजे. चार चांगल्या गोष्टी त्याच्या बरोबर शेअर केल्या पाहिजेत. आलेल्या काळोखातून तो बाहेर कसा पडेल हे पाहिले पाहिजे. त्यातूनच त्याला प्रेरणा मिळते. तो उठून पुन्हा उभा राहतो.

         आपल्याकडे असे प्रेरणादायक संस्कृत श्लोक किंवा सुभाषिते आहेत. जे माणसाला प्रेरणा देऊन सक्रिय बनवतात. उदाहरणार्थ,

        काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् l

        व्यसने च मूर्खाणाम् निद्रया कलहेन वा ll

      बुद्धीमान लोक काव्य, शास्त्राचा अभ्यास करण्यात आपला समय व्यतीत करतात. परंतु मूर्ख लोक निद्रा, कलह अशा वाईट सवयीत आपला समय घालवतात.

          मला एपीजे अब्दुल कलाम यांचा हा प्रेरणादायी सुविचार खूप आवडतो. ते म्हणतात, 'अपने मिशन मे सफल होने के लिए आपको अपने लक्ष्य के प्रति एकचित्त भाव असे समर्पित होना पडेगा l'

           

            
शुभदा दीक्षित  (11)
पुणे 
             
[31/05, 5:10 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13

"प्रेरणा"

'प्रेरणा' म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन अर्थात प्रबोधन होय. प्रेरणेमुळे ध्येयाची उच्च शिखरे गाठता येतात. अशक्यप्राय गोष्टी शक्य करता येतात .एखाद्या सैनिकाला 'देशभक्ती ही प्रेरणा असते तर, विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाने
 केलेले' कौतुक' ही प्रेरणा असते.
शिक्षे मुळे मनुष्य खचतो तर प्रेरणेमुळे त्यास कृती करण्यास प्रोत्साहन मिळते.
 प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी प्रेरणा त्यास मिळाली तर तो नक्कीच यशस्वी होतो. कोण देतो प्रेरणा ? काय घडू शकते प्रेरणेमुळे? इतिहासात डोकावून पाहिले तर असे दिसते की 'मंगल पांडे चा उठाव' प्रेरणा होती स्वातंत्र्यासाठी!
'खाशाबा जाधव' या कुस्ती वीराने  मिळवलेले पहिले ऑलिम्पिक पदक प्रेरणा आहे आजच्या सर्व भारतीय खेळाडूंसाठी.
 पारतंत्र्यात खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याची प्रेरणा मिळते ते शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्रतिज्ञे मुळे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी प्रत्येक तरुणाला प्रेरणा मिळते ती नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा" या मागणीमुळे.
प्रत्येक स्त्रीला आपले मूल कसे घडवावे याची प्रेरणा मिळते ती जिजाऊ मुळे. जिजाऊला शहाजी राजांसोबत सत्ता, संपत्ती यांचा उपभोग घेता आला असता व जीवन व्यतीत करता आले असते परंतु; जिजाऊने वैयक्तिक हिताचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राचा त्याच्या स्वराज्याचा विचार केला आणि म्हणून जिजाऊ आज सर्वांसाठी प्रेरणा आहेत. 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आज प्रेरणा आहेत सर्व स्त्रियांसाठी कारण सती जाऊन वैयक्तिक पुण्य कमावणे पेक्षा आपल्या जगण्याने संपूर्ण रयत सुखी करावी हा विचार माऊलीच्या मनात आला व आयुष्यभर त्या विचारासाठी त्या ध्येयासाठी कार्य करीत राहिल्या म्हणून अहिल्याबाई होळकर प्रेरणा आहेत संपूर्ण समाजासाठी.
'गौरी महाडिक' या प्रेरणा आहेत सर्व जवानांच्या पत्नीसाठी कारण लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात त्यांच्या पतीला वीरमरण आले अशा वेळी चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी देश सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षाच्या  प्रशिक्षणानंतर त्या लष्करी सेवेत रुजू झाल्या. पतीच्या मृत्यूनंतरही पतीच्या देशसेवेच्या कार्यात त्यांनी खंबीरपणे साथ दिली स्वतः लष्करात दाखल होऊन.
शिक्षणाचे महान कार्य करणारे शिक्षक आज हजारो विद्यार्थ्यांची प्रेरणा आहेत. विद्यार्थ्यांमधील बलस्थाने ओळखून शिक्षक त्यांना प्रेरणा देतात आणि म्हणून मुले गगन भरारी घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी सुप्त गुण दडलेला असतो शिक्षक तो ओळखतात आणि तू लढ, तू हे करू शकशील असे म्हणून त्यास शाब्बासकीच्या ,बक्षिसाच्या रुपात प्रेरणा देतात .
थोर समाजसेवक बाबा आमटे व साधना आमटे या दाम्पत्याने आदिवासी लोकांसाठी, कुष्ठरोग्यांसाठी जे काम आनंदवनात केले आहे ते सर्वांना निस्वार्थ समाजसेवेची प्रेरणा देते. कानाने बहिरा असूनही एडिसन सारख्या शास्त्रज्ञाने चिकाटीने 999 वेळा अपयश आल्यानंतरही 1000 व्या वेळी बल्बचा शोध लावला आणि प्रयत्नाने यश साध्य होते ही प्रेरणा आजच्या संशोधकांना दिली आहे. 
दुसर्‍या जागतिक महायुद्धात अनुबॉम्ब च्या वर्षावाने बेचिराख झालेली हिरोशिमा व नागासाकी शहर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने उभे राहिले आणि मातीतून ही नवा इतिहास घडवता येतो हे त्यांनी आपल्या कार्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
 प्रेरणा ही कुणीतरी द्यावी आणि आपण घ्यावी असेही नाही तर प्रेरणा ही अंतरीची इच्छा आंतरिक इच्छाशक्तीही असू शकते. इतरांचे यश आपली प्रेरणा बनते असे नाही तर इतरांना किंवा स्वतःला मिळालेले अपयश देखील आपल्याला यश मिळविण्यासाठी प्रेरणा देऊ शकते.
स्वतः अंध असून ब्रेल लिपी ने संपूर्ण जगाला वाचनाची दृष्टी देणारी हेलन केलर आज सर्वांसाठी प्रेरणा आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्याला आत्महत्येच्या शापाने ग्रासलेले असताना पाणी फाउंडेशन च्या अविरत कार्याने दृढ संकल्पाने दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास प्रेरणा मिळाली आहे .
'साधी राहणी उच्च विचार' या संकल्पनेप्रमाणे आयुष्य जगलेले महात्मा गांधी आजही सत्य, अहिंसा, याची प्रेरणा उभ्या जगाला देत आहेत.
हातात झाडू ठेवून गाव स्वच्छ करणारे 'गाडगेबाबा 'संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छता अभियानासाठी तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रेरणा देत आहेत.
सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश देखील लोकशाही, शांतता, अहिंसा ,सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता ,विविधतेतून एकते ची प्रेरणा उभ्या जगास देत आहे.
कमी लोकसंख्या असलेला जापान देश दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या असताना आज त्याचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक खेळामध्ये यश मिळवून ऑलिम्पिकची मेडल खेचून आणत आहे व क्रीडा जगताला प्रेरणा देत आहे.
 जगात अशक्य काहीच नाही तुम्ही हे करू शकता. तुमच्यामध्ये आंतरिक प्रेरणा असते आणि ती तुम्हाला यशप्राप्तीसाठी झुंजवत असते. झुंजण्यात  तुम्हाला यश मिळत असते आणि तुम्ही यशाच्या शिखरावर विराजमान होता.

सविता साळूंके, श्रीरामपूर
9604231747
[31/05, 5:20 PM] Manik Nagave: 07
लेख

 प्रोत्साहन

"  अरे वा!!! सुरज, किती छान चित्र काढलेस तू, मस्तच हं " "  नमिता, तुझी वही दाखव पाहू? छान!!!  तू पण छानच काढलेस हं " शाब्बास दोघांनाही." अशा प्रतिक्रिया ऐकल्या की समोरच्या व्यक्तीला खूप बरे वाटते. व आपल्या केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते. व तो दुप्पट उत्साहाने कामाला लागतो. यालाच त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे असे म्हणतात. प्रोस्ताहन म्हणजे, एखादे काम चांगले करण्यासाठी त्या व्यक्तीला दिलेला  शाब्दिक, भावनिक आधार होय. प्रोत्साहनाने सर्वजण काम करण्यास उद्युक्त होत असतात.

 लहान बाळ जेव्हा हळूहळू चालायला लागते, बोलायला लागते, तेंव्हा त्याच्या पहिल्या शब्दावर ,त्याच्या पहिल्या पावलावर सर्वांचे लक्ष असते. व जेंव्हा ते पहिला शब्द बोलते, पहिले पाऊल टाकते सर्वजण त्याच्याकडे कौतुकाने पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात, त्याला प्रोत्साहन देत असतात.त्यावेळी त्या बाळाला असे वाटते की आपण काहीतरी चांगले करत आहोत. आपल्या कृतीमुळे समोरच्या लोकांना खूप आनंद झालेला आहे म्हणून मग ते आणखीन बडबडायला लागते ,आणखीन पाऊल पुढे टाकायला प्रयत्न करते. त्याच्या मनामध्ये हे बिंबते की आपण काहीतरी चांगले काम केले की समोरच्याला आवडते  व तो आपल्याला प्रोत्साहन देतो, आणखीन चांगलं करण्यास ते मुल प्रवृत्त होते. जेव्हा त्याच्या हातून नको ती गोष्ट घडत असते तेव्हा त्याला लोक रागावून सांगतात ,प्रसंगी मारतात त्यामुळे त्या मुलाच्या मनात हे बसते की हे काम केल्यानंतर आपल्याला मार बसतो ,रागावून घ्यावे लागते त्यामुळे ची गोष्ट न करण्याकडे त्याचा कल असतो. मूल पुढे मोठे झाले की ते शाळेत जाते हे समाजात वावरते. त्यावेळीही त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक हे सगळीकडे होते. विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेत असतो. जर त्याचा नंबर आला तर त्याला पुढच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास बरे वाटते. अशाप्रकारे प्रोत्साहनाने व्यक्ती क्रियाशील होतो कार्यरत होतो. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा पीले चांगली वागली की जनावरे आपल्या पिलांना चाटतात, व त्यांच्या मनाविरुद्ध केले की त्यांना ढकलून देतात. म्हणजेच प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती माणसाबरोबर जनावरात सुद्धा असते. परीक्षेत चांगले गुण पडले, तर अभ्यास करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळते. सर्व वर्गापुढे सर्व शिक्षकांनी त्याला चांगले म्हटले तर तो आणखीनच प्रोत्साहित होतो. परंतु ज्यापद्धतीने आपण चांगल्या गुणांना प्रोत्साहन देत़ो ते सर्वांच्या समोर करावे पण जर चुका दाखवायच्या असतील तर त्या आपण सर्वांच्या समोर न दाखवता वैयक्तिक एकट्याला बाजूला बोलवून आपण त्याच्या चुका सांगितल्या तर त्याला अपमानित वाटणार नाही व तो पुढच्या वेळेला चांगला करण्याचा प्रयत्न करेल. कंपनीमध्ये काम करताना सुद्धा जेव्हा एखादा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला एखादे चांगले काम केल्यानंतर त्याला वाढीव रक्कम  देऊन त्याची प्रशंसा केली, तर ते बाकीच्या लोकांच्या साठी सुद्धा एक चांगले उदाहरण बनते व तेही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी कंपनीचे कार्य सुद्धा चांगले होते. बोनस देणे हा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रोत्साहनाचाच एक भाग आहे. एखाद्या साहित्यिकांच्या साहित्याचे जर आपण कौतुक केले तर त्याला लिहिण्यास उभारी येते. आपण फक्त चुका काढत बसलो तर समोरच्या व्यक्तीला अजिबात उभारी येणार नाही आपल्याबद्दल ही त्याचे मत चांगले होणार नाही.तेव्हा आपण नेहमी चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन द्यावे.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[31/05, 5:51 PM] झगरे गुरुजी: कोड नं.17
स्वतः बनुया स्वतःचा प्रेरणा स्त्रोत...

श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर जालना)
**********************

'तुझे आहे तुजपाशी परी तू जागा भुललाशी '...
या उक्तीप्रमाणे मनुष्याला स्वतः स्वतःच्या समस्या सोडवण्याची कुवत स्वतःमधून जागृत करावी लागेल...  'अत्त दीप भव।' या तथागत भगवान गौतम बुद्धाचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्यामध्येच डोकावयाला लावतो. यातूनच मनुष्याला 'तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या संबोधापर्यन्त सहज येता येतील.

कोणत्याही यशस्वी व्यक्तीला त्याच्या मुलाखतीच्या वेळेस आवर्जून आपले प्रेरणास्थान विचारले जाते.….आणि ती यशस्वी व्यक्ती सुद्धा कोणाचे तरी नाव सांगते, परंतु इतरांकडून मिळणारे यशस्वी होण्याचे विचार जोपर्यंत आपण स्वतः स्वीकारत नाही तोपर्यंत कुणीही यशस्वी होऊ शकत नाही, याचा अर्थ हाच आहे की कोणतीही चांगली कृती करण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतः धजावत नाही तोपर्यंत कितीही चांगले विचार ऐकले,वाचले , तरीही आपण यशस्वी होऊ शकत नाही. 

आपला स्वतःचा आत्मा व अवचेतन मन हेच खरे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. तसही कोणताही व्यक्ती दुसऱ्या चे ऐकून जसेच्या तसे अनुकरण करत असेल तर तो कळसूत्री बाहुली होईल... यावरच श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आवर्जून सांगतात की , दुसऱ्याचा फूटबॉल बनू नका.. याचाच अर्थ चांगल्या लोकांकडून काहीच घ्यायचे नाही असा मात्र अजिबात नाही.. परंतु यशस्वी होण्यासाठी मात्र स्वतःलाच आपलं प्रेरणास्थान बनावे लागेल.

आकाशात घिरट्या घालून आपल्या पिलावर नजर ठेवण्यासाठी त्या घारीने कधी कुणाकडून प्रेरणा घेतली का..? स्वतःच स्वतःचे पंख, नखे उपटून टाकून पुन्हा अस्थीपंजर अवस्थेत काही काळ ऊपभोगून पुन्हा नव्या उंम्मेेदीने गरुडभरारी घेण्यासाठी घेतली का गरुडाने कुणाकडून प्रेरणा? मुंग्यांना कितीही अशक्य वाटणारा प्रवास शक्य करण्यासाठी जि मेहनत घ्यावी लागते तिच्यासाठी त्यांनी बघितले का कुणाकडे..? 

या सगळ्या प्रश्नांची एकच उकल आहे.. नर करणी करेंगा तो नरका नारायण बनेगा...। शेवटी त्यालाच त्याची प्रेरणा व्हायचे आहे. तसही इतरांनी आपल्याला चांगलं म्हणया अगोदर स्वतःच्या अंतरातम्याने आपल्याला चांगले म्हणणे गरजेचे आहे. प्रत्येक मनुष्याला यशस्वी होण्यासाठी  शेवटी त्याच्या मनाचं बळ हे अत्यंत आवश्यक असते.

स्टीफन हॉकिंग सारख्या अगदी तारुण्यात अपंगत्व आलेल्या शास्त्रज्ञाने कोणाचीच प्रेरणा न घेता तेच जगासमोर प्रेरणास्थान बनून उभे राहिले... आता ज्यांना ज्यांना तशी दुर्दैवी परिस्थिती येवो अथवा न येवो परंतु त्यांचे साहस नक्कीच आधारस्तंभ असेल.. परन्तु आजही कित्येक लोकांनी त्यांचे जीवनचरित्र वाचले तरी सुद्धा त्यांच्यासारखं यशस्वी नक्कीच होता नसेल आले.. म्हणून इतरांकडून प्रेरणा घेता येईल पण तूच अनुकरण मात्र स्वतःलाच करावे लागते, यासाठीच... आपणच आपले स्वतःचे प्रेरणास्थान बनुया...
[31/05, 5:51 PM] Bharti Sawant: प्रेरणा/ प्रोत्साहन

       'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' प्रत्येक जण आपापल्या विश्वात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्रीचा म्हणजेच आई किंवा पत्नीचा हात असतो, तसे प्रत्येक मुलाच्या मागे त्याच्या आई किंवा आजीचा  हात असतो.या शब्दाचा अर्थ असा की कोणालाही त्याच्या कामात प्रोत्साहन मिळाले की ते काम करायला आणखी हुरूप येतो आणि ते काम चांगल्या पद्धतीने होईल याची खात्री पटते. ते काम होतंही छान.म्हणून पाठीवरची शाबासकी खूप लोकांच्या जीवनात आनंद देऊन जाते.
            लहान मुलांनासुद्धा आपण "किती छान आहे रे बाळा" किंवा "खूप छान" म्हटले की त्या बाळाच्या गालावरची खळी फुलते.ते बाळ हसत-खेळत सर्वांना ते गुपित सांगत सुटते  किंवा जो आनंद होतो तो वर्णातीत असतो .कारण त्या बाळाला असं वाटतं की हे काम मला जमणार नाही आणि जर आपण खूप छान म्हटले की त्याला अजूनच प्रेरणा येते. म्हणून लहान मुलांना नेहमी प्रेरणा दिली जाते. हल्ली तर शाळेत चांदणी  करून मुलांना शेरे  दिले जातात. त्यामुळे एक चांदणी की दोन,तीन चांदण्या मिळतील या आशेने ते मूल हातातील काम अचूक करण्याचा प्रयत्न करते. यावरून त्या मुलांची पात्रताही ओळखली जाते आणि त्या मुलांना जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी किंवा चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे काम सर्वप्रथम आई करत असते. आईला आपल्या बाळाचा सर्वात चांगलं वाटत असते.ती नेहमीच बाळाची प्रगतीच पहात असते नि त्याला प्रोत्साहन देत असते.बाळही जास्त आतुरतेने किती छान आहे या शब्दांची वाट पहात असते.
          प्रत्येक व्यक्तीचे कोणी ना कोणी प्रेरणास्थान असते आणि आपणही त्याच्या सारखे बनावे असे त्यास वाटत असते आणि त्याच्यासारखे बनण्यासाठी त्याचा प्रयत्नही चालू असतो. प्रयत्न नि नशिबाची जोड मिळाली तर तो तसा बनतोही. त्यामुळेच प्रेरणा, प्रोत्साहन माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते हे सिद्ध होते.

सौ भारती सावंत 
मुंबई
[31/05, 5:52 PM] डॉ हरिश्चंद्र भोईर: प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या

     डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
    शहापूर(ठाणे)
     
 या जगात घडलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी प्रेरणा असतेच.प्रेरणा ही एक अशी शक्ती आहे जी दुर्बलाला शक्ती देण्याचं काम करते,आजारी व्यक्तीला बरे करण्याचं काम करते, आणि काम करणाऱ्या व्यक्तीला अधिक काम करण्यासाठी प्रेरित करते.
  यशस्वी प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून प्रेरणा घेतलेली दिसेल.शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडून घेतली तर आपल्या अंधत्वातुन सामजिक कार्य करण्याची प्रेरणा हेलन केलर यांनी घेतली...प्रेरणेसाठी जशी सकारात्मक गोष्ट महत्वाची तशी नाकरात्मक गोष्टही महत्वाची ठरू शकते हे हेलन केलर यांच्या उदाहरणातून दिसून येते.आपल्या सर्वांनीच याची अनुभूती घेत आपआपल्या क्षेत्रात झेप घेण्याची प्रेरणा घेतलीच असेल.अगदी घरात असलेले दारिद्र्य व गरीबी यातून प्रेरणा घेत शिक्षण घेणारी खूप सारी मंडळी आपल्यातच दिसून येईल.कमी गुण मिळाले त्यातून प्रेरणा घेवून अधिक जोमाने अभ्यास करून यश प्राप्त करणारे कितीतरी माणसे मिळतील.म्हणजेच चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थीतीतून प्रेरणा घेता येते हे मात्र  नक्कीच.
 आज माणसाचे जीवन गतिमान होत असताना.वेगवेगळ्या प्रकारची माणसे दररोज भेटत असतात.डोळसपणे अशा विविध प्रकारच्या माणसांच्या निरीक्षणाची सवय लागली की त्यातून दररोज प्रेरणेची नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकते.प्रेरणा दोन प्रकारची असते पहिली आहे आंतरिक प्रेरणा व दुसरी आहे बाह्य प्रेरणा.
   प्रेरणा मिळण्याची मुख्य ठिकाणे किंवा प्रेरणा स्रोत एकूण चार आहेत. गरज भासणे हा पहिला प्रेरणास्रोत आहे . शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि उद्दीपक असे आहेत . भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक बनण्याची अवस्था होय . उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . प्रेरक म्हणजे motive . विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला प्रेरक म्हणतात.
  आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे . आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते . सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. अभिरुची, आवड ,अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते . काही लोकांना आंतरिक प्रेरणा साध्याप्रती उद्युक्त करते.आपण आजूबाजूला पाहतो ,काही माणसे धडपडत असतात.आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणता ना कोणता ध्यास घेऊन कार्यरत असतात. काहीतरी क्रिया,काम वारंवार केल्याने यांना यश आणि संकटे पावलोपावली भेटत जातात. एखादे काम करत असताना जेवढी अधिक संकटे येतील तेवढे अधिक शिकावयास मिळते . संकट ,बाधा ,अडचणींतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात.म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात.आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे हि प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते .प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा .. प्रत्येकालाच अंतःप्रेरणेने झोडपलेले असते असे नाही ,काहींना बाह्य प्रेरणेची चावी दिल्यास ते देखील यशाच्या वाटेवर सुसाट पळू लागतात .
बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन (Incentive )देणे होय.उद्देशाप्रति एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्यप्रेरणा . याशिवाय पुरस्कार ,बक्षीस ,दंड ,प्रशंसा ,निंदा ,
मदत ,हे बाह्य प्रेरणेचे घटक आहेत.
 आंतरिक प्रेरणेस थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हंटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हंटले आहे .
  प्रेरणा मग ती आंतरिक असो वा बाह्य.जो पर्यंत प्रेरणेची तिडीक मस्तकात जात नाही तोपर्यंत भव्य दिव्य असे कार्य व्यक्तीकडून होत नाही.हे प्रेरणास्रोत कदाचित वेग वेगळे असू शकतात. कोणी स्वतःच्या कुटुंबाच्या परिस्थितीतुन वा व्यक्तीकडून प्रेरित होतो तर कुणाला प्रबलन मिळाल्याने प्रेरित होऊन काम करतो तर कोणी आपले काम अधिक चांगले व्हावे यातूनच स्वयं प्रेरणा घेऊन काम करतो.एक मात्र निश्चित आहे 'प्रेरणा' हा घटक माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तीक विकासातील महत्त्वाचा घटक आहे.म्हणून प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या आणि विकास करा.

     डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
    शहापूर(ठाणे)
     9226435827
[31/05, 6:00 PM] Sujata Jadhav: प्रेरणा (28)

             प्रेरणा म्हणजे"स्फूर्ती" ,"चालना"  प्रत्येक कामात प्रेरणा मिळाली की,कामाला उत्साह येतो,एखाद्या व्यक्तीला थोडी चालना दिली की त्याला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहचता येते,विद्यार्थी दशेत असताना त्यांना सतत उत्साही करण्यासाठी शाबासकीची थाप दिली,तसेच त्याला त्याच्या आवड,छंद याबद्दल प्रोत्साहन दिले की ते आनंदी होतात,कधी प्रेरणादायी व्यक्ती समोर आल्या किंवा त्यांचे विचार ऐकले की त्यांचे या कोवळ्या मनावर चांगले परिणाम होतात,विविध उपक्रम शाळेत राबविले जातात,शासनाच्या अखत्यारित ते पूर्ण करावे लागतात.
              हे कार्यक्रम आपल्या पुरते मर्यादित न रहाता ते समाजातून राबविले जातात,उदा.पालक,मान्यवर व्यक्ती इतर कोणी याद्वारे त्यांचे विचार,मुलांपर्यंत पोहचतात आणि त्यांच्या जीवनात असलेले चढ-उतार त्यांनी भूषविलेले पद त्यांनी मिळवलेले यश हे विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन जातात,
आताही आपण सतत काही व्यक्तीकडून काही तरी शिकत असतो, त्यांचे कार्य मनांत घर करून जाते, मी सिंधुताई सकपाळ,मदर तेरेसा यांच्या कार्यांनी प्रेरित झाले,हे कार्य समाजासाठी कसे केले,किती अडचणी त्याना आल्या.
          तसेच नुकताच मी प्रकाश आमटे यांचा चित्रपट पाहिला त्यात त्यांचे डॉक्टरी जीवन फक्त समाजासाठी होते,ते पाहून एक प्रेरणा मिळाली

सुजाता जाधव
नवी मुंबई
[31/05, 6:08 PM] Nagorao Yeotikar: कोड क्र. [ 14 ]

" प्रेरणा मानवाची संजीवनी "

     आज सध्या कोरोनामुळे जी लॉकडाऊन परिस्थिती आलीय ... तेव्हा माणूस हा आपल्या घरातल्या घरातच बंदिस्त राहत आहे .... ते केवळ स्वसुरक्षेच्या व इतरांच्या काळजीच्या प्रेरणेमुळेच ... प्रेरणा ही एक मानसिक अंर्तगत स्वरूपाची बाब आहे ... पण बाह्यघटकावरही ती अवलंबून असते ... जर एखाद्या रडणारा बालक स्वतःच्यापुढे एखादा पक्षी  , प्राणी वा खेळणे दिल्यास क्षणात त्याला हसण्याची प्रेरणा मिळते ... तो रडणे विसरून खदखदून हसायला लागतो .... 

     " प्रेरणा अशी एक संजीवनी
       ज्यायोगे संचारे अंगी स्फूर्ती 
       येतात सुख आपसूक जीवनी
       चौफेर प्रसरे यश कीर्ती "
  
      अशी ही प्रेरणा मानवी जीवनात सुख , समाधान , चैतन्य , शांती , स्वानंद घेऊन येते ... मानवाला यथोचित मार्गाने नेऊन जीवन सार्थक करते ... मानवाला कणखर  , आत्मविश्वासू , महत्त्वकांक्षी बनवते ... जगण्याचे निश्चित उद्दिष्ट ठरवून त्याप्रती मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहीत करते ... जीवनाला एक विशिष्ट दिशा देते ... एवढं महात्म्य आहे जीवनात या प्रेरणेचे ....

     मानव हा सृष्टीतील सर्वच घटकांपासून प्रेरणा घेत असतो ... मुंगीपासून शिस्ती व चिकाटीने जगण्याची प्रेरणा घेतो .... वाघ - सिंहापासून शौर्य व धाडसी प्रेरणा घेतो ... वृक्षापासून दातृत्वाची प्रेरणा घेतो ... नदीकडून सतत जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा घेतो ... फुलांकडून टवटवीत राहण्याची प्रेरणा ... फुलपाखरांकडून तोकड्या आयुष्यातही स्वच्छंद जगण्याची प्रेरणा .... भूमी आकाश यांच्याकडून समर्पणाची प्रेरणा .... अशा असंख्य घटकांतून मानव प्रेरणा घेत घेत जीवनाचा आस्वाद घेत असतो ...

     शिवाय सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे आईवडील , गुरू आणि मित्र यांपासून मानव हा सदोदित प्रेरित होतच असतो ... कारण तो त्यांना सोय अलिप्त राहूच शकत नाही ... हे सर्व त्याचे हितचिंतक व शुभेच्छूकच असतात ना ... अशी ही प्रेरणा मानवी जीवनात एक संजीवनी नाहीतर तर काय ? कारण मरगळलेल्या जीवनात नवजीवन देणारी हीच तर एकमेव प्रेरणा पृथ्वीवरील संजीवनी होय ... जी जीवनात आनंद व समाधान यांचा झरा अखंड वाहत ठेवते .. चला तर मग या संजीवनीला आत्मसात करून जीवन सुखी व समृद्ध करूया ...

अर्चना दिगांबर गरूड 
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...