बुधवार, 3 जून 2020

रोज एक लेख :- दिवस 47 वा पहिला पाऊस

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- सत्तेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 04 जून 2020 गुरूवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- पहिला पाऊस*

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

[04/06, 10:06 AM] Manik Nagave: 07  लेख

विषय -पहिला पाऊस

 तप्त ज्वाळात काया ही करपून गेली,
  तुषारात या पर्जन्याच्या मन मोहून गेले.
 गाऊ महिमा किती वर्षा ऋतूचा,
 आनंदाच्या शब्दसरि या नाचू लागल्या.

 खरंच यावर्षीचा उन्हाळा आपल्याला अजिबात सहन होत नव्हता. शरीराची काहिली तगमग होत होती.  उन्हाचा चटका इतका होता की घरातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. चोवीस तास पंख्याची गरज भासत होती. पण शेवटी तो कृत्रिमच ना ?  गरज होती ती पावसाची, पर्जन्याची, मनाला ,शरीराला, वातावरणाला आराम देणाऱ्या गारव्याची !!  पर्जन्याचा महिमा किती सांगितला, किती गाईला तरी तो कमीच आहे ,अपुराच वाटेल.त्यात कोरोना महामारीचा हल्लकल्लोळ सर्वत्र सुरु आहे.काय करावे कळत नव्हते

 झाडे ,वेली ,पशुपक्षी, मानव सारे वातावरण  ऊन्हाच्या ज्वाळांनी  तगमगत होते. पावसाच्या प्रतीक्षेत  सर्वजण चिंतातुर होते. पावसाच्या आगमनाची वाट पाहत होते. नदी, नाले,विहिरी ,पाण्याचे साठे या सर्वांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली होती. काही ठिकाणी तर ते कोरडे पडलेले होते. जलचरांची अवस्था तर अतिशय वाईट झालेली होती. काही भागात प्यायलाही पाणी नव्हते. जिथे माणसाला प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची काय कथा ?  वनस्पती कोमेजू लागल्या होत्या. सर्वत्र निराशेचे वातावरण झाले होते. आणि या सर्वांची मनीषा, प्रार्थना फळास आली. सर्वत्र आनंदाचे ,हर्षाचे वातावरण झाले

 अचानक आकाशात ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या. वातावरणात अंधार दाटू लागला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. चराचर झोपेतून जागे झाल्यासारखे वाटू लागले. एक गोड शिरशिरी शरीरात पसरली. निराशेची जागा आशेने घेतली. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जलधारा पृथ्वीकडे वेगाने धावू लागल्या. धरणीमातेने आपले दोन्ही हात पसरून त्यांना आपल्या कवेत येण्याचे निमंत्रण दिले. आकाशातील जलधारा व धरणीमाता यांची गळाभेट झाली. आहाहा !!!  काय ते दृश्य सुंदर होते !!!  मातीचा सुंदर सुवास सगळीकडे पसरला होता. सारा आसमंत अल्हादित झाला.पावसाचा कण आणि कण धरणीमाता आपल्यात सामावून घेऊ लागली. वनस्पतींनी पर्जन्यवृष्टी झेलण्याकरता आपले दोन्ही हात पसरले. ते आनंदाने डोलू लागले. लहान मुले पावसात भिजण्यासाठी घरातून बाहेर आली व गाणे म्हणत पावसात भिजू लागली. त्या निरागस चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. शेतकरी राजा इतका खुश झाला की जणू त्याला त्याच्या पोटच्या मुलाचे प्राण परत आल्या सारखा आनंद वाटत होता. काही दिवसांपूर्वीची भेगाळलेली , पाण्यासाठी आ वासून पडलेली जमीन त्याला आठवली व आत्ताची पाण्याने तृप्त झालेली जमीन जेव्हा त्याने पाहिली तेव्हा खरंच त्या समाधानाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. त्याच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत मोत्या पेक्षा जास्त होती. नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले. तगमग, तडफड जाऊन समाधानाची लकेर सर्वत्र पसरली. सर्वत्र आनंदाचे चित्र दिसू लागले. वर्षा ऋतु चा महिमा किती आनंदी आहे ,किती महत्त्वाचा आहे हे सर्वांना पटले.  पावसाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे. जल म्हणजे जीवन हे सर्वांना पटले. पाऊस जर झाला नसता तर काय झाले असते?  या विचारानेच थरकाप उडला ! पाऊस न पडण्याच्या पाठीमागची कारणमिमांसा  पाहायला गेले तर  यालाही  मानवच कारणीभूत आहे हे लक्षात आले. स्वतःच्या स्वार्थासाठी, उद्योगधंद्यासाठी, शहरीकरणांसाठी, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मानवाने बेसुमार झाडांची कत्तल केली. जंगले नष्ट केली.हिरव्यागार जंगलांच्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली. याचा वाईट  परिणाम झाला. झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप थांबली. पावसाने हात आखडता घेतला. याचा वाईट परिणाम मानवा बरोबर निसर्गालाही भोगावा लागला.  यासाठी सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी, वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. झाडे लावूया ,झाडांचे संवर्धन करूया. महिमा वर्षाऋतूचा जाणून घेऊया.

 झाडे लावू झाडे जगवू घोष हा न्यारा,
 जलधारांनी भरलेला मेघ आम्हा प्यारा.
 जाणून महिमा पर्जन्याचा हे मानवा,
 पर्यावरण रक्षणाची कास तुम्ही धरा.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[04/06, 10:42 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09)*

 *धूंद वादळाची-रात्र पावसाची*

 रस्तावर खेळणारी मुलं , जनावरं इकडे तिकडे पळत होती. रस्त्यावरची धूळ वातावरणात पसरली होती . आकाशात पक्षी किलबील करत उडत होते . कोही झालं का ? हे पाहायला मी जशी घराबाहेर पडली तसाच खूप जोरात पाऊस सुरु झाला . वादळी वारे वाहू लागले . बाहेर असलेली माणसं आपल्या घराच्या दिशेने धाव घेऊ  लागले . हळूहळू पाऊस वाढतच होता . त्याच्या मोठ नोठ्या मोत्यासारख्या थेंबांनी मी घरच्या ओरणी जवळ मौज घेत होती . पाऊस इतका वाढला की अंगण पाण्याने भरन निघालं , थंड वारे वाहू लागले . सायंकाळचा अंधार कसा जवळ आला कळलचं नाही . इतक्यात लक्षात आलं की, तो मला भेटायला आज येणार आहे , जशी डोक्यात कल्पना आली तसं, डोकं भारी व्हायला लागलं . मी विचारात गुंग झाली की ,या अशा वातावरणात तो कसा येईल ? येऊ शकणार की नाही ? दिडशे किमीचे अंतर पार करून  तो मला भेटायला येणार व या गावच्या किनाऱ्यावर   वाहत असलेला नाला रस्त्यावरून  वाहायला लागला तर त्याचे हाल कसे होतील ? अशा वेळेस गावात येण्यासाठी काहीच साधन नव्हते . त्यावेळी मोबाईलची सोय सुध्दा नव्हती , मग कळणार सुध्दा कसे ? मला ठाऊक होतं तो जिद्दी आहे . एकदा संकल्प केला तर तो येणारच ! पण त्याला माझ्यापर्यंत येताना किती कष्ट सहन करावे लागणार . मी याच विचारात मग्न होती . त्याला एखादी गाडी लवकर भेटली असती तर बरे झाले असते . आज मी येथे एकटी उभी आहे .  माझी नजर शोधते आहे त्याला, पण तो दिसत नाही . मनाची तळमळ वाढत आहे . त्याची वाट बघता बघता रात्र कशी झाली कळलचं नाही .
    हुंकारला  पारवा ।
    तेजाळला काळवा । 
      हालून गेला जरा । 
     काळोख  चहूकडे । 
 रात्रीचे नऊ वाजले ,दाराची कडी वाजली . मी दचकली  दारावर जाऊन बघितलं तर काय ओला चिंब ! शरीराने व टॉगळयाभर चिखलाने माखलेला !चेहऱ्यावर समाधानाचे हास्य .... तो माझ्या समोर उभा होता . मी स्तब्ध झाली , त्याला पाहातच राहीली काही वेळ आम्ही एक दुसर्याला पाहतच राहिलो . अबोल.. त्याला मी कोणत्या स्थितीत पोहोचला ? विचारु शकली नाही. कारण त्यावेळी त्याच्या संसर्गामुळे माझे श्वास व शरीर प्रफुल्लीत झाले होते . त्याला भेटून जे मानसिक  सुख मला भेटत होते  , पुन्हा पुन्हा तेच सुख घ्यावे असं वाटलं , त्या भेटीच्या प्रेमाची मनाला अनावर मिठी पडली . त्यामुळे स्फुर्तीच्या अखंड लहरी येऊ लागल्या . प्रेमाचा स्वभाव हा असा दारुण आहे . हे मला माहितच नव्हते .
         सर्वात आधी गरमागरम चहा करान मी त्याला दिला . त्याच्यात थोडी ऊब निर्माण झाली व तो बोलता झाला.  ती काळोख रात्र ,बेधुंद वारा ,मुसळधार पाऊस , रस्त्यावरील टोगळाभर किचड - पाणी,विजांचा कळकळाट अशा अवस्थेत त्याला ओढत आणल होतं माझ्या प्रेमानं ! मी काही वेळ त्याच्याकडे पाहतच राहिली . पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हते . विजेनेही बुट्टी मारली . चिमणीच्या प्रकाशात आम्ही बोलत बसलो . दोघांनाही वेळेचा भान नव्हता . त्याच्या डोळ्यांत मला भेटण्याचा आनंद ओथंबळून वाहत होता. बोलत बोलत आम्ही झोपी गेलो.
          सकाळ होताच बघितलं की घराच्या समोरील व मागील दारापर्यंत पाणीच पाणी . तीन नदयांच्या (वैनगंगा,चुलबंद,वाघ) संगमावर वसलेले "सोनी"गाव पूराने वेढून घेतलं होतं.  नदी किनार्र्यावर असलेली काही घरे पाण्याखाली आलेली होती.काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.  लोकांना जनावरे मृत अवस्थेत सापडली. गावातून डोंगा फिरत होता . लोक डोंग्यातून सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याची  सोय ग्रामपंचायत  मार्फत  सुरू होती. गेलो . होतं . नदीच्या किना - यावर असलेले काही घरे पाण्याखाली आले होते . काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली , लोकांना जनावरे मृत अवस्थेत सापडली . लोकांची सोय सामाजिक संस्थातर्फ सुरु होते.. सतत चार दिवस पाऊस पडल्याने गावाचा दशा फारच केविलवाणी झाली होती . गावाचा संपर्क तुटला होता . फोन नाही , विज नाही , पिण्याचं पाणी नाही . गावात पाणीच पाणी तरीही पिण्याच्या पाण्याची दानादान उडाली होती . खिशात पैसे होते पण खायला अन्न नव्हते . अशी दैनिय अवस्था  त्यावेळी झाली होती . 
          आया - बाया कणकीचे दिवे करुन पाण्यात घालीत होते . नदीमायला विनवणी घालून शांत होण्यासाठी पुजाअर्चा करीत होते.दूरवरून जाणारी रेल्वेगाडी गाय हंबरून वासराला बोलावते त्याप्रमाणे हाक देत होती. आकाशातून हेलीकप्टरने लोकांसाठी अन्न पुरविण्याची सोय करण्यात आली . शासनाच्या या व्यवस्थेत सुध्दा किती कंजूशी होती . ती पुरविण्यात येणाऱ्या  या पूरी - भाजीच्या पॉकिटावरुन दिसत होती . गावात तीन हजारावर लोकसंख्या आणि पुरी-भाजीचे तिनशे पॉकीट , कुणाच्या वाटयाला येणार ? लोकांनी ती स्वतः न खाता आपल्या लहानग्या मुलांना दिली . मुले सुध्दा रडता रडता बेजार झाले होते . अशा अवस्थेत ते अन्न खाऊ शकले नाही . कसा होता तो प्रकार ? कसे होते ते दिवस ? आजही आठवले तर अंगावर शहारे उठतात.
               गावाजवळूनच पाच - सहा किलोमिटरवरून रेल्वे जात होती . त्या दिवशी तिची हाक , जणू काही गाय आपल्या ' भटकलेल्या वासराला हंबरून बोलाइते त्याप्रमाणे रेल्वेगाडीची हाक ऐकू येत होती . सुरक्षत ठिकाणी लोकांना पोहचविण्यासाठी तिची मायेची हाक होती . लोक तिथपर्यंत पोहचू शकत नव्हते . त्या ट्रेनचा आर्त स्वर आजही काळजाला हालवून सोडतो . आज त्या करुण घटणेची आठवण झाली तर मला या ओळी आठवतात ...
 “ भेट तुझी माझी स्मरते , अजून त्या दिसाची , धुंद वादळाची होती , 
रात्र पावसाची " .
   *यशोधरा सोनेवाने गोंदिया*
          *(9420516306 )*
[04/06, 12:32 PM] महेंद्र सोनवने: (08)

*पाऊसाच्या आठवणी*

*मला आवडतो पाऊस , मनाला फुलवणारा*,
 *अन् तेवढया मायेनं , ओलावा देणारा* . 
      पावसाचे दिवस होते बाहेर खुप काळे ढग जमलेले होते . अनिश्चितपणे ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळत होते . आज न कळत खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनात जुन्या आठवणींचे ढग जमून आले . पाहाता पाहाता मन केव्हा भूतकाळात गेलं काही कळलच नाही . मे महिण्याचा शेवट होऊन जून महिण्याची सुरुवात झालीच होती . मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहुल लागली . शाळा सुरु झाल्या होत्या व आता छत्री आणि रेनकोड बाहेर काढायचे दिवस आले होते . छत्री काढल्यावर आपल्याला कळायचे की तीचे तर एक - दोन काडया तुटल्या आहेत . मग काही दिवस तशीच छत्री वापरायची . अर्धे ओले होत बाहेर पडायचे . शाळेत जाताना फक्त आपला दप्तर सुखरुप राहिला पाहिजे एवढीच त्या छत्रीकडून अपेक्षा होती . शाळेतून परत येताना एखादया मुलीने “ मी तुझ्या छत्रीत येऊ का ? " अस म्हटलं तर त्या छत्रीची मोठी कीव येत होती . नाही न म्हणता , “ हो , चाल सोबत " असं म्हणून आपण ओले होत तीचं मुंडकं त्या छत्रीत घेऊन आम्ही जात होतो . ओले तर दोघोही होत होतो पण छत्रीत येण्याचे भाग्य लाभत होते . आपल्या एक दोन वहया पुस्तक छत्रीच्या वरच्या काडयामध्ये अडकवून ठेवून आम्ही त्या छत्रीचा पुरेपुर उपयोग करून घेत होतो . पुढच्या वर्षी आपण नविन छत्री घेऊ अस ठरवून त्या बिघडलेल्या छत्रीवरच तो पावसाळा काढायचा . 
*जसे अतुट नाते असते , पाऊस आणि छत्रीचे*
 *तसेच काही नाते असते , आपले नि पावसाचे*

*पाऊस येतो आणि जोतो*
*साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो*. 
          पाऊस दररोज येत नव्हता . कधी यायचा तर कधी बराच उशीरा याचचा . पण पहिला पाऊस पडल की काय मस्त वाटायचे . आम्ही अगदी लहान होतो तेव्हा ही पावसात खुप मज्जा घ्यायची . कागदाची नाव तयार करुन पाण्यात टाकायची . चिखलात ओले होत एक दुसऱ्याला आले करायची खुप मौज करत होतो . साचलेल्या पाण्यात उडी मारुन दुसऱ्याला पण ओढायचे आणि पाणी उडवायचे त्याच्यात जो आनंद मिळत होता तो शब्दात व्यक्त करणे कठिण आहे . एकदा खुप पाऊस आला . घराबाहेरचे अंगण व मोकळया मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलेले पण ते वाहतही होतं . मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही त्या पाण्यात खुब खेळलो अनवानी पायानं त्या पावसात कितीदा तरी आम्ही भटकत होतो . शेवटी थकून जेव्हा घराकडे जायला निघालो तेव्हा कपडयाकडे लक्ष गेलं तर घरी गेल्यावर काय झालं असेल ते काही सांगायलाच नको . 
           पावसात एक गोष्ट नक्कीच आठवते की शाळेच्या रस्त्यावर चिखल फार असायचा . आणि शाळेत जाता येताना मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरुन तो चिखलात पडलेला असायचा . आणि त्याच्यावर सर्व मुलं हसायचे या सुखाची मज्जा मात्र खुप घेतली . तशी वेळ मला कधी आली नाही . 
           शाळेत जायचे ते दिवस . पावसाळ्याच्या दिवसात शिक्षकही सांगत होते की पावसात ओले व्हायचे नाही तरी हो म्हणून कधीच न ऐकायचे . पाऊस आल्यावर पावसाची मज्जा घ्यायची ओले व्हायचे . दिवसभर ओल्या कपडयांनी राहायचे . तरी काही होत नव्हते . पावसात भिजण्यासाठी कधी
आपल्या शिक्षकांचे मार कधी आई बाबांचे मार ही खावे लागे . दप्तर झिल्लीच्या पाकिटात भरुन आम्ही फक्त त्याची काळजी घेत होतो . युनिफार्म ओला झाला म्हणून कोणतेही कपडे घालून शाळेत जात होतो . 
             सुटीच्या दिवशी किंवा शाळेतून आल्यावर आम्ही खुपसणी नावाचा खेळ खेळत होतो . एक लोखंडी सळाखीचा तुकडा घेऊन औल्या झालेल्या मातीत तो जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी तो प्रकार होता . ज्या मित्राची सळाख जमिनीत खुपसली नाही तिथुन त्याला लंगडी करत सुरुवातीच्या ठिकाणी यावं लागत होतं . या दिवसात कोणताही खेळ खेळलं तर कपडे भरायचे नाही तर भरवायचे जेव्हा घरी परत यावे तेव्हा पुन्हा मार खायचे . असे ते दिवस कधीही न विसरणारे होते .
           पावसाळ्याच्या दिवसात फाफे , फुलपाखरु यांना पकडायचे . कधी कधी तर त्यांना एका धाग्याने बांधून हवेत उडवायचे . हे सर्व करता करता दिवस कसे भुर्रकन् निघून गेले कळलेच नाही . पहिला पाऊस त्या पावसात गरम गरम चहा किंवा खालेल्ली गरम गरम भजी आजही खायला आठवते .     
                 कॉलेज चा पहिलाच दिवस . त्या दिवशी पाणी भरपूर आले . सुट्टी झाल्यावरही पाऊस काही थांबत नव्हते . मी माझ्या पुस्तकांना एका मित्राकडे देऊन मी माझ्या सायकलने आधि कॉलेजच्या मैदानात दोन तीन राऊउ फिरलो व नंतर पूर्ण ओला होत घरी परतलो . ओला चिंब होऊन जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या मोठया भावानं मला खुप दाटलं होतं . तो ही प्रसंग मला आठवतो . तो त्या वर्षिचा पहिलाच पाऊस होता . पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा पृथ्वीवर पडतो व त्या जमिनीची जी गंध येते त्याचा काय तो मोहक गंध घेऊन त्या पावसात भिजण्यात मनमुराद आनंद मिळतो . 
           पहिल्या पावसाचे आनंद घेण्यास सर्व उत्सुक असतात . आणि आपआपल्या जीवनात याचा अनुभव सर्व घेतात .

 *पाऊस पडत असताना,* *मातीचा सुगंध आणि गार वारा*
*मला नेहमीच आवडतो* *मुसळधार पावसाच्या बरसणाऱ्या धारा*
_________________________

*महेन्द्र सोनेवाने , गोंदिया*
*मो. 9421802067*
[04/06, 12:40 PM] Bharti Sawant: पहिला पाऊस

   पावसाच्या धारा येती झरझरा
   झाकोळले नभ सोसाट्याचा वारा
            जून महिना, चार महिने रणरण तापलेल्या धरतीला थंडगार पावसाचा शिडकावा मिळावा म्हणून वाट पाहणारी भुमाता मृगनक्षत्र सुरू होऊन बरेच दिवस लोटले. सर्व मनुष्य, पशुपक्षी पावसाची वाट पाहत होते. सर्व रस्ते उन्हाने चमकत होते. भरदुपारी डोक्यावर आग ओकत सूर्यनारायण तटस्थ उभे होते. नांगरून ठेवलेली शेते,बिया पेरण्यासाठी वाट पाहत होती. अंगातून घामाच्या धारा गाळत नोकरदार आपापल्या कार्यालयात पोहचत होते. आकाश निरभ्र होते. कधी संपणार हा उन्हाळा? प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. आतूर अवनीने मेघमल्हार आळवायला सुरुवात केली. मेघराजांची कृपादृष्टी व्हावी अशी सर्वांची इच्छा असते.
          उन्हाळ्यामुळे  सर्वजण हवालदिल झाले होते. 'नेमेचि येतो मग पावसाळा' पाऊस कुणाला आवडत नाही? मग जून महिना पावसाचा असूनही पावसाचे लक्षण दिसत नव्हते.शेतकऱ्यांचे तर सर्व आयुष्य शेतीवर आणि पर्यायाने पूर्ण पावसावर अवलंबून असते.सगळेच चिंताग्रस्त होतात आणि एकदाचा वरूण देव प्रसन्न झाला. पाहता पाहता नभात काळे  मेघांनी दाटी केली. वाराही वाहू लागला. धरतीची आर्त साद ऐकून टपटप थेंब वर्षु लागले.पाऊस दरवर्षी पडतोच. पण पहिला पाऊस म्हणजे अमृतधारांचा वर्षाव. या अचानक आलेल्या पावसाने सर्व लहानथोरांची तारांबळ उडाली. बरीच लहान मुले,
 येरे येरे पावसा तुला देतो पैसा
 पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा   
          असं गाणं म्हणत पावसात भिजण्याचा आनंद घेत होते. पावसाने धूळ खाली बसली, पण कागद, वाळलेली पाने, कपडे यांनी एकमेकांभोवती फेर  धरला. झाडावरची फुले, मोहर वाऱ्याबरोबर गळून पडू लागले. झाडावर विसाव्याला टेकलेली चिमणी पाखरे इतस्ततः पंखांचा फडफड आवाज करत कावरीबावरी होऊन उडू लागली.धुराने सारा आसमंत भरून गेला आणि शिरीष पै यांच्या काव्यपंक्ती आठवल्या अस्मानात आलेल्या वातचक्रात पुन्हा एकवार जग हरवले
फडफडत आले वाऱ्याचे प्रचंड झोत गदगदा हलवित माडांना 
         अंगणात आणि गच्चीवर पसरलेली वाळवणे गोळा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू झाली. मुलींनी पावसाची गाणी म्हणत फेर धरला.बायांनी मृदगंधाचा वास घेत पन्हाळीखाली पाण्यासाठी भांडी लावली. साऱ्या सृष्टीचं रुपडंच बदललं. सर्व सृष्टी चैतन्यानं फुलली. गाई-म्हशी पावसाच्या शिडकाव्याने शहारून गेल्या आणि गोठ्यात हंबरू लागल्या. चिमण्या कावळे पावसाच्या आगमनामुळे काळजीपोटी घरट्याकडे परतले.छत्री न घेता बाहेर गेलेली माणसं पावसानं चिंब झालेले कपडे सावरत घराकडे परतू लागले. जगण्यासाठी जीवसृष्टीचं जणू नवगान सुरू झालं. पावसाचे टपोरे थेंब पत्र्यावर, कौलांवर आपटून जणू काही नव्या ऋतूचे स्वागत करू लागले. उंच वृक्षांनी आपल्या फांद्या झुकवून वरूणदेवाला अभिवादन केले.
              वर्दळ नसलेल्या रस्त्याला जाग आली. आयाबाया आपल्या साड्या, लुगडी सांभाळत मुलां नातवंडांना पदराखाली झाकू लागल्या. इंद्रधनूने आकाशाला आपल्या सप्तरंगी कमानीचे  तोरण बांधले. म्हणता म्हणता नद्या, नाले, तलाव भरून वाहू लागले.अडगळीतील छत्र्या  बाहेर काढून लोकं रस्त्यावर येवून उभी राहिली. धरणीमाता, वृक्ष, पशु-पक्षी म्हणजे  एकुणच चराचर सृष्टी तृप्त झाली. पाऊस थांबताच सर्वजण घरी परतले.सगळीकडे मृदगंधाने वातावरण धुंदफुंद झाले. धरणीला धुमारे फुटले.   
 पाऊस हा असा येतो सारं काही देऊन जातो
 कोमेजलेल्या चराचराला जिवंतपणा
 देऊन जातो

सौ. भारती सावंत
मुंबई
9653445835
[04/06, 1:53 PM] senkude: (5)

*नेमीची येतो पावसाळा*

धो-धो पाऊस बरसला
मुसळधार काळ्या नभातुनी
कधी बरसतो डोंगरमाथ्यावरी
तर कधी स्पर्शतो गुलाब पाकळ्यातुनी

*'नेमीची येतो मग पावसाळा'* असे आपण म्हणत असलो तरी, नित्यनेमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतोच. पाऊस येण्यापूर्वी सारी धरती अगदी तापून निघालेली असते.
दरवर्षी पावसाचे आगमन होत असते. प्रत्येक वेळी तो नवीन नव्या रंगरूपात येतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची सूर छेडीत येतो तो पाऊसच. प्रत्येकाला आपल्या तारूण्यातला पाऊस 
ओलाचिंब करतोच असे नाही. कोणाला हा पाऊस कसा वाटेल हे सांगता येत नाही.
' एकदाचा घृणा देऊन जाते
शतदा शतदा
तुझे पाऊसरुपी प्रतिबिंब
आघात करून जाते.'

असा हा पाऊस प्रत्येक वेळी नुतन संदर्भ नव्या रंगरूपात घेऊन येतो.
या पावसाला सुद्धा भेदाभेद असतोच कधी कोणाला पाऊस आवडणारा असतो, तर कधी नाचणारा, साजिरा गोजिरा, धरणीला ओल देणारा हा पाऊस, तर कधी तन आणि मन भिजवणारा ओलाचिंब पाऊस, असतो तर सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांना 
सुखविनारा हा पाऊस असतो...
पाऊस हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले जाते. हा पाऊस जसा माणसाचे मन प्रफुल्लित करतो, तसेच माणसाचे जीवननही फुलवितो. खरंतर माणसाच जीवनच खऱ्या अर्थाने या पावसावर अवलंबून असते. पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी हा पाऊस ओल्या दुष्काळ घेऊन येतो, तर कधी कोरड्या  दुष्काळाने येतो. कधी हा पाऊस धो - धो पडत असतो तर कधी हा रिमझिम रिमझिम बरसत असतो.  कोणास हा पाऊस म्हणजे मरगळ वाटेल तर  काहींना हा पाऊस हिरवी शाल पांघरून जीवन फुलविणारा, शेत पिकवणारा, जीवन गाणे गाणारा वाटेल. 
असा हा पाऊस म्हणजे निसर्गाचे भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस आपल्या जिवाभावाचा सखा सोबतीच आहे. हा पाऊस अनेक रुपात भेटतो आहे.
पाऊस हा माणसाचा पोशिंदा आहे, सुखदाता आणि कठोर शास्ताही ! तो कसाही असला तरी पाऊस हा सर्वांना प्रिय असतो. 
“आला पाऊस, गेला पाऊस, 
राने ओली झाली रे l
मुरली वाजे ,महिमा गाजे ,
मनमोहन वनमाली रे l " 

असा हा पाऊस सुखदायी,आनंददायी सृष्टीचे सौभाग्य आहे, चैतन्यरुपी जीवन फुलविणारा हा पाऊस खरोखरच आपला जीवनदाता आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि. नांदेड.
[04/06, 2:25 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: (४०) मनिषा पांढरे, सोलापूर

*पाऊसातील गंमती जंमती*

पाऊस आला म्हणजे आम्हा मुलांना मस्त पावसात भिजायला मिळते. मला तर पावसात भिजायला खूप आवडते आणि आईने  नाही जाऊ दिले तर आईला विनवणी करावी लागते.....
   *ऐ आई मला पावसात जाऊ दे...*.
*भिजुनी मला एकदाच गं.... चिंब चिंब होऊ दे...*.
कागदी होड्या करायच्या आणि वाहत्या पाण्यात सोडायच्या, पाऊस जमा झालेल्या डबक्यात उड्या मारायच्या, विविधरंगी इंद्रधनुष्य पाहायचे, कधी ऊन- पावसाचा खेळ तर कधी चिमणा- चिमणीचे लग्न , थुई थुई नाचणारा मोर, पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेची कुहूकुहू ... अशा कितीतरी गंमती जंमती पावसाळ्यात पाहायला मिळतात.
      जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे....
झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारी तुरे......
पाऊस आला म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. झरे, ओढे तुडुंब भरून वाहत असतात. त्यातच सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेले असते. सगळीकडे हिरव्या अनुभवायला मिळते... हे निसर्गसौंदर्य न अनुभवणारा माणूसच नसेल.
   आनंदी आनंद गडे... जिकडे तिकडे चोहीकडे.... पावसातून सौंदर्यावर अनेक कवींनी कविता केलेले आहेत. पावसात सृष्टी विविध रंगांनी रंगलेली असते. विविध प्रकारचे किडे, आळ्या, काजवे, पैसा, बेडूक इ. किटक पहायला मिळतात. 
      पावसाळ्यामुळे मिळणारा आनंद वर्णन करावा तेवढा कमीच आहे. शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणेन......
येरे येरे पावसा रुसलास का? 
माझ्याशी गट्टी फू केलीस का?


           मनिषा पांढरे, सोलापूर🙏🏻
[04/06, 2:30 PM] Nagorao Yeotikar: पावसाळा आणि शेतकरी

भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नासा येवतीकर, 9423625769
[04/06, 3:06 PM] अमित बडगे: *(38)*

*पहिला_पाऊस_अन्_प्रत्येकाचे_वेगवेगळे_भिजणे...*

पहिला पाऊस पडून बारा तास उलटून गेले अन् मी अजुनही खिडकीचा पडदा सावरत त्याला बघत बसलो आहे...
अधून-मधून एखादी पावसाची सर येऊन जातेय,ती मी आलो आहे म्हणून खुणावत मला अस्वस्थ करत पुन्हा पुन्हा तीच जाणीव करून देत आहे.माझ खिडकीचा पडदा सावरणं होतं,सोबतीला पहिला पाऊस अन् कॉफी समीकरणही रात्रीच जुळुन आले आहे...
अजुनही तो कॉफी कप खिडकीच्या ग्रील जवळ तसाच पडून आहे,पाऊस त्याला निमित्त मात्र की काय म्हणून त्याला भेटायला येणाऱ्या मुंग्या काही त्याला भेटायला आलेल्या नाहीये....

कसे असतं नाही का... 
प्रत्येकाचं पहिल्या पावसात भिजणं त्याला अनुभवणं वेगवेगळं असते,जस माझं पावसात भिजणे नसून ते फक्त आठवणीत भिजणे असते..‌.
पण असो हा आठवणींचा विषय इथेच थांबवूया कारण मग दोघांचं पावसात भिजणं राहून जाईल.पहिला पाऊस आहे सो तो फार वेळ थांबणारा नाहीये,फक्त सरीवर सर तो अधून मधून बरसत राहणार आहे,आपणही वेळोवेळी एकमेकांवर बरसत राहूत....

तर पहिल्याच पावसात भर उन्हाळ्यात साथ देणारा प्राजक्त अंगणात उन्मळून पडलेला आहे.
शेवटचं त्याचं बरसणे देऊन आयुष्यभर फुलांची मुक्त उधळण करून त्याचा मोसम संपल्याची जाणीव करून देत तो उन्मळून मोडून गेला आहे...त्याचं भिजनं किती वाईट आहे हे तो दाखवून कायमचा सोडून गेला आहे...

इथे प्रत्येकाचं पाऊस अनुभवणे वेगळं आहे...माझा पाऊस आठवणी घेऊन,भविष्यातील स्वप्नांची मुक्त उधळण करणारा आहे...

तर...
त्या झोपडीत काल रात्री अंधारात त्यांना पाऊस अनुभवता आला की नाही हे समजलेच नाही,पण सकाळी सकाळी त्या झोपडीतून पावसावर शिव्यांच्या रुपात बरसणे चालू होते...
कारण तिचा पाऊस अनुभवणे वेगळा आहे,तिला बरसलेला पाऊस अन् अंधारलेलं समोर दिसणारं अस्तित्व धडकी भरवत राहतं,तिला माणसाने बरसने खूप आवडते...हे नाही कळणार तुम्हाला हे गणित जुळवणे थोडे वेगळे आहे...

रस्त्यावर चालणाऱ्या त्या वाटसरूचा पहिला पाऊस वेगळाच आहे,अख्खी रात्र येणाऱ्या पावसाच्या सरिवर सरी त्या प्लास्टिकच्या पान कापडाला सावरण्यातच त्याची निघून गेली आहे...उन्हाळ्यात काळे पडलेले त्याचे तळवे पांढरे शुभ्र चमकत आहे,त्यालाही बगळ्यासारखे पंख फुटले की काय असे वाटून गेले... 
त्याचा मार्ग अन् त्याचं मार्गस्थ होणं हेच काय ते खर आहे,हाच त्याचा पहिला पाऊस हेच त्याचं बरसने पूर्ण पावसाळा इथून पुढे कारण त्याला त्याची शेवटची सीमा भेटली जगण्यासाठी जगत नाही तो तर मरण अनुभवण्यसाठी जगतो तो...

रात्री पाऊस बरसत होता अन् अंधारलेल्या खिडकीतून बाहेर असलेल्या खांबावरच्या लाईटच्या उजेडात मोत्याप्रमाणे दिसणारे पावसाचे थेंब तो बघत मनातच द्विधा मनस्थितीत तो गेला आहे...तो मनाशीच बोलू लागला आहे लागवडीचा,वखर-फाट्याचा होणारा खर्च याची वजबाकी,बेरीज तो करू लागला आहे,पण गणित काही जुळत नाहीये अन् त्याची चिडचिड होत आहे...
इतकेच कमी की काय म्हणून,एक प्रश्न त्याच्या उत्तराची वाट बघत आहे 

लागवड करायची की नाही ?

कारण दुसऱ्यांदा पेरणी करायचा खर्च यावर्षी त्याला पेलवणारा नाहीये, लोकं म्हणतात शेतकरी राजा खुश झाला जेव्हा पहिला पाऊस आला...पण असं काही नसते,तो मात्र आतून खूप अस्वस्थ झालेला असतो,या काही दिवसात तो तोंडावर फक्त खोटं हसू घेऊन मिरवत असतो.
ज्याला हे उमगत नाही त्याला शेतकरी कळला नाही...
तो खूश तेव्हाच असतो जेव्हा पावसात त्याचं रुजवलेले सर्व बी-बियाणे बाळसं स्वीकारू लागतं...तर इथ त्याचं भिजनं सुद्धा खोटं अन् तोंडावर खुशीचा खोटा आव आणत जगण्याचं असते....

त्यांचा पाऊस अनुभवने वेगळाच,खडतर आहे.
समुद्र किनारी वादळ सुटलेलं,बोटी स्थिर झाल्या आहे,समुद्रात उंच उंच लाठा येत आहे,त्याचं दिसणारे भीषण रौद्र रूप काळीज धडकवणारे आहे... 
अश्या या परिस्थती सुद्धा किनारी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या माझा भावांचा पाऊस अनुभवणे सुद्धा वेगळाच आहे...
त्यांचं भिजणे हे वेगळच आहे,जिथे स्वार्थ नाही जगण्यासाठी असलेली मरणाची स्पर्धा नाही.फक्त एकच माझा देश सुरक्षित कसा राहील,तासंतास     सेफ्टी जॉकेट नावाला घालून दुरून दिसणारं संकटाला तोंड देत येणाऱ्या संकटावर बरसत राहणं हे वेगळ आहे अन् ते त्यांना आपल करणारं आहे....

- अमित प्र. बडगे , नागपुर
   (7030269143)
[04/06, 3:14 PM] सुंदरसिंग साबळे: 34

*पहिल्या पावसाच्या सरीचे अनुभव*

===============

        पृथ्वीवरती मुख्य तीन  ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच म्हणावी लागेल. या बदलत्या ऋतूंमुळेच पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. भुतळ,वारा, पाणी, दबाव, चंद्र, सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ मांडतात, ते सुद्धा दरवर्षी, न चुकता. तसे सर्वच ऋतू महत्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतू पासून वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर सगळेच पण मला आवडतो तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू. तसा सर्वाना हिवाळा जास्त आवडतो, पण मला आवडतो पहिल्या पाऊसाची गोष्टच वेगळी आहे. 
      जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मे च्या शेवटच्या आठवड्यात आभाळ दाटू लागते, वारा सुटतो, आणि पावसाची पहिली सर पडते. मातीचा सुटलेला वास, वातावरणात अचानक पसरलेला गारवा वेगळाच आनंद देऊन जातो. या क्षणांची जादू काही अशी असते कि भरपूर कवी, लेखकांना प्रेरणा देते. पावसाच्या या पहिल्या सरीचे अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये कैद करून ठेवले आहे.

        पहिल्याच प्रेमाचा
        पहिलाच पाऊस
        मनसोक्त भिजण्याची
        दोघांनाही हौस

        तू चिंब मी चिंब
        मनही आलेचिंब
        थेंबा थेंबात दिसे
        तुझेच प्रतिबिंब

        बावरे होई मन
        येता मातीचा सुगंध
        विसरुन देहभान
        तुही धुंद मीही धुंद

        वाटे संपूच नये
        या पावसाची मजा
        कृपा कर थोडी
        विनंती वरुणराजा

        आयुष्यभर स्मरेल
        ही गोड आठवण
        हर पहिल्या पावसाने
       प्रित होईल चिरतरुण

     पाऊस फक्त कवीमन प्रसन्न करत नाही तर धरतीला सुद्धा तृप्त करतो, म्हणून मला पावसाळा ऋतू आवडतो. उन्हाने होरपळलेली धरती, झाडे, झुडपे आभाळातून पडलेले अमृत पिऊन खूष होतात. 

=={=={=={=={=={==
✍️ शब्दांकन 
*श्री सुंदरसिंग साबळे* 
          गोंदिया 
मो.9545254856
[04/06, 3:33 PM] AK 664: २२) पावसाळ्यातली शाळा
__________________________________
आम्ही राहायला आष्टीला होतो पण आमची शेती आष्टीहून आठ कि. मी. वर मांडवा या गावी होती . त्या गावाला बेलगांव मांडवा असेही म्हणतात .
 पेरणीच्या दिवसात  जून , जुलै मधे व काढणीच्या (सुगी) दिवसात म्हणजे फेब्रुवारी , मार्च महिन्यात असे दोन दोन महिने आमचा मुक्काम  मांडव्याला होत असे.
       दिवस पेरणीचे असल्यामुळे आई वडील व मी मांडव्यास राहायला गेलो. मी सायकल वर आष्टीला शाळेला येत असे व शाळा सुटली की सायकल वर आठ कि. मी. मांडव्याला जात असे .
आष्टी पेक्षा मला मांडवे हे गाव फार आवडायचे.दोन एक हजार लोकसंख्येचे ते टुमदार गाव !  गावाजवळ भव्यपटांगणात  विशाल असे  मांडवेश्वराचे मंदिर !
 आमचे घर शेतात होते . गावापासून दोन किलोमीटर लांब लेंडी नदीच्या काठावर. लेंडी नदी  बारा महिने वाहात असे.

        मी इयत्ता आठवीत असताना घडलेला प्रसंग !
            एके दिवशी सायकल ची चेन तुटल्यामुळे मी पायीच शाळेत आलो. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. माझे सोबती आपापल्या सायकवर पुढे गेले.मी एकटाच पायी मांडव्यास  निघालो. झपझप चालू लागलो. पावसाळ्याचे दिवस होते . ढग आकाशात गर्दी करु लागले .पाहाता पाहाता अंधारुन आले.वाटेत शिदेवाडी नावाचे छोटेसे गाव लागते तेही चांगलेच मागे पडले होते.शिदेवाडी च्या पुढे आमराई नावाचे शेत लागते. त्या शेतात रस्त्याच्या दोन्ही बाजूस आंब्याची चांगली पाच पंन्नास झाडे होती . मी तिथपर्यंत आलो होतो . एव्हाना अंधार पडला होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूस गर्द आमराई !   एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला .  त्या आमराईतून वारा वाहात होता . भयाण आवाज करीत होता . पाठोपाठ पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या . चहुकडे गडद अंधार !  मोरांच्या किलकार्या !  मध्येच लख्ख विज चमके . ढगांचा गडगडाट ! निसर्गाचे रौद्ररुप मी अनुभवत होतो .  विजांच्या उजेडात पुढचा मार्ग निरखीत . दगडधोंडे तुडवीत एकटाच चालत होतो . आठ किलोमीटर चा रस्ता कटता कटत नव्हता .मात्र भिती वाटत नव्हती. कुठून येवढा धीर आला होता कुणास ठाऊक ? 
      आता घराच्या अगदीं जवळ  लेंडी नदीच्या अलीकडे आलो होतो . नदीचे पाणी वाढू लागले होते .तसाच घुसलो पाण्यात . . पाणी ओढू लागले .मी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होतो . एकदाचा कसा तरी पलीकडे पोहोचलो . शेतातल्या घरी आलो . घरी आई वडील माझी वाटच पहात होते .. तसाच ओल्या कपड्यानिशी मी आई च्या कुशीत शिरलो ! 

                   अरविंद कुलकर्णी 
                 पिंपरखेड कर 
                 9422613664
[04/06, 3:49 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*वेड लावणारा पाऊस*

 ये रे ये रे पावसा, 
जीव झाला नकोसा, 
नुसत्या घामाच्या धारा, 
आणि कोरडा वारा...
 एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण जग उन्हाने होरपळून गेलं आणि पावसाचे वेध लागले. आंब्याच्या झाडावर कोकिळेचे कुहू कुहू, चातक पक्ष्यांची पावसाला हाक कानावर ऐकू येऊ लागली. सर्व सृष्टी ला वेध लागतात ते पावसाचे. कधी एकदा पाऊस येतो असं होतं आणि अशा वेळी जेव्हा पाऊस पडतो तो आनंद शब्दाने व्यक्त करने सुद्धा अवघडच. प्रत्येकाला पावसाचे वेगवेगळे अनुभव येतातच, मला तर पावसाचं वेडच आहे.
पहिला पाऊस म्हटलं की पावसासोबत येणारा वारा, आकाशातील काळे ढग, पक्ष्यांची घरट्याकडे जाण्याची घाई, शेतकर्‍यांची लगबग, बाहेर असलेलं सरपण आत ठेवणे, सगळीकडे आनंदाचं व प्रसन्न वातावरण. तितक्यात पावसाचे थेंब उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडतात तेव्हा तो मातीचा सुगंध...हातातील कामं टाकून त्या पावसात भिजण्याचा मोह कितीही केलं तरी आवरत नाही.
       पावसात भिजायला फक्त पहिलाच पाऊस आवश्यक नाही. जेव्हा कधी संधी मिळाली तर पावसात भिजण्याचा आनंद घेतेच.
शाळा शिकतांना तर खुप मज्जा असायची. शाळेतून घरी जातांना पाऊस यायचा तेव्हा पुस्तकं पाॅलिथिन मध्ये टाकून डोक्यावर पकडायची कारण डोकं ओलं झालं तर आई रागवायची. केसं वाळत नाही, सर्दी होइल, ऊ होण्याची भिती सांगायची. माझी शाळा गावातच पण घरापासून थोडीशी लांब दररोज दहा मिनिटं लागायची पण पाऊस येत असलं की अर्धा तास लागायचा. नाचत, अंगावर पडणार्‍या थेंबाचा आस्वाद घेत रमत गमत घरी पोचायची. दारावर आई वाटच बघत असायची आणि एवढा उशीर कां झाला म्हणून विचारलं की मग खोटं बोलावं लागायचं पाऊस उघडण्याची वाट पाहत होते म्हणून पण आईला सुद्धा माहित असायचं काय झालं ते.
       घरी गेल्यानंतरही आईला मदत करण्याच्या निमित्ताने पुन्हा भिजायचं. भिजले आहे तर अजून काही कामं सांग म्हणून आणि पुन्हा भिजण्याचा आनंद घ्यायचं. 
      लग्नानंतर मला नोकरी लागली नसल्याने सासरी शेतीच्या कामात सुद्धा मदत करावं लागे मला ते खूप आवडायचं. शेतात रोवणी रोवतांना पाऊस आला की सगळे पांघरूण घ्यायचे आमच्याकडे त्याला मोर्या म्हणतात. मला तर ते पकडताच येत नव्हते. मी मात्र पावसात भिजायची, सासुबाई खुप रागवायच्या. ताप येईल, सर्दी होईल पण मी आधीच शेतात जातांना सोबत कोणतंच साहित्य नेत नसे त्याचं कारण मला पावसात भिजायला मिळावं. मी तशीच पावसात ओलीचिंब व्हायची. मग  रोवतांना रोवणाऱ्या बाया लोकगीत म्हणायचे ते ऐकायला सुद्धा खुप मजा यायची. पाऊस उघडला की सासुबाई मला घरी पाठवायच्या जास्त वेळ भिजून राहु नको...
     एक मात्र अजूनही आहे की मला पावसात भिजल्यामुळे कधी ताप आलेला नाही किंवा सर्दी होणं, डोकं दुखणं अजिबात नाही. उलट नव्याने काम करण्याचा उत्साह वाढतो. माझ्या मनाची अवस्था ही अशी व्हायची,
     ऋतु ही बहरून गेला, 
     पावसाच्या स्पर्शाने...
    झाडेवेली शहारून गेली, 
      त्याच्या भेटीच्या हर्षाने....
पहिल्याच पावसाने मातीही सुखावून जाते आणि तृप्त होते. तसंच काहीसं माझं सुद्धा होतं. याच पहिल्या पावसातमातीची कुस्ती भरून जातेआणि मातीमध्ये पडलेल्या बियांचा अंकुर फुटू लागतात तसंच पहिल्या पावसात भिजल्यानंतर मानवी मनात सुद्धा आशेचे अंकुर फुटू लागतात. शेतकरी अति उत्साहाने शेतीच्या कामात मग्न होतो. पहिल्या पावसात भिजल्यावर मोक्ष प्राप्तीचा आनंद होतो जो शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही.
     पावसात भिजायला वेळेचे बंधन नसते मी आजही शाळेमध्ये जातांना जर का पाऊस पडत असेल तरच रेनकोट घालून जाते अन्यथा  नेत पण नाही. घरी येताना जरी पाऊस पडत असेल तर मी आपला रेनकोट डिक्की मध्ये टाकते आणि आपल्या गाडीने आरामात भिजत येत असते. माझ्या सोबत असलेले शिक्षक शिक्षिका रेनकोट घालतात, पाऊस थांबायची वाट बघतात किंवा रस्त्यात पावसाने पकडलं तर आडोशाला थांबतात. मी मात्र एकटीच भिजत भिजत पावसाचा आनंद घेत घरी येते. पावसात भिजल्यानंतर गरमागरम भजी व वाफाळलेला चहा.... मजाच काही न्यारी असते.
         श्रावणातला पाऊस हा उनाड मुलांसारखा असतो. क्षणात ऊन पडते आणि क्षणातच पाऊस पडतो. बालकवींनी सुद्धा या पावसाचं सुंदर वर्णन केलं आहे.
 श्रावणमासी हर्ष मानसी, 
हिरवळ दाटे चोहीकडे, 
 क्षणात येती सरसर शिरवे, 
क्षणात फिरूनी ऊन पडे....
        या श्रावणातल्या पावसाचा एक अनुभव सांगावासा वाटतो. मागच्याच वर्षी मी शाळेत जायला निघाले जोराचा पाऊस सुरू झाला. दिवसभर भिजून राहिले तर शाळेतील शिक्षक व स्वयंपाक करणार्‍या आमच्या ताई सुद्धा मला भिजून आहे म्हणून त्रासून टाकतील. म्हणून त्यांच्याशी काय हुज्जत घालावी या कारणाने मी रेनकोट घालून निघाले. रेनकोट शोधण्यात आणि घालण्यात आधीच उशीर झालेला. माझी शाळा घरापासून आठ किलोमीटर. तीन किलोमीटर गेल्यावर बघते तर पाऊसच नाही. उशीर होईल म्हणून मी तशीच रेनकोट घालून शाळेत पोचले. तिकडे तर कडक ऊन आणि मी रेनकोट घालून घामाने ओलीचिंब झालेली. सगळे एवढे हसले की मला रडावं की हसावं अशी अवस्था झाली. मला कवीचं नाव तर नाही आठवत पण ओळी आठवतात.
कधी रडवितो, कधी हसवितो, 
कधी झुलवतो , कधी झुरवितो,
कधी झोडतो , कधी मोडतो, आनंदाने कधी गर्जतो.
इंद्रधनूला आडवे करूनी, कधी भुईला चिंब भिजवतो....
       असा हा पाऊस आणि माझं पावसाचं वेड. 

*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
[04/06, 4:14 PM] दुशांत निमकर: *(02) पाऊस आणि बळीराजा*

        जगामध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू आहेत पण भारतामध्ये पृथ्वीची परिवलन,परिभ्रमण गतीमुळे तीन ऋतू प्रकर्षाने सांगता येईल.उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या तीन वेगवेगळ्या ऋतूचे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.उन्हाळ्यामध्ये हवामान उष्ण असून सारी मानव सृष्टी गरमीने त्रस्त झालेले असतात यासाठी कृत्रिम पंखे,स्कुलर व थंड पेय पिण्यासाठी फ्रीज उन्हाळ्यात वापरत असतात.मानवासह सर्व सजीव सृष्टी पावसाच्या पाण्याची आतुरतेने वाट बघत असतात.उन्हाळ्यात उन्हाच्या सानिध्यात शेताची मशागत करून बळीराजा चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट बघत असतो.शेतीची सारे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.भारत देश कृषिप्रधान देश असल्याने अधिकाधिक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती करीत असल्याने पावसाच्या पाण्याविना शेती करणे अशक्य आहे त्यामुळे मृग नक्षत्र जवळ येत असतांना बी-बियाणे,खते घेऊन बळीराजा पावसाची वाट बघत असतो म्हणजेच बळीराजा आणि पाऊस यांचा परस्परसंबंध आहेत कारण मशागतीनंतर पेरणी करण्यासाठी तेवढी सिंचनाची सोय सर्व शेतकऱ्याकडे नसल्याने पाऊस आणि बळीराजा यांचे दृढ नातेसंबंध आहे असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

        पावसाची जशी बळीराजा प्रतीक्षा करीत असतो त्याचप्रमाणे पहिल्या पावसाच्या आगमनाने नि ओलेचिंब भिजण्याचा आनंद उपभोगण्यासाठी लहान मुले देखील गाण्यातून आनंद व्यक्त करीत असतो.'ये रे ये रे पावसा,तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा अन पाऊस आला मोठा' यासारख्या बालगीतातून पावसाचा मनमुराद आनंद लहान मुले घेत असतात त्या प्रमाणे खरीप पिकाची पेरणी करण्यासाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असतो.बळीराजाच्या मनाप्रमाणे कधी कधीच घडतो.पावसाचे कधी अतिवृष्टी,अल्पवृष्टी त्यामुळे ओला दुष्काळ,सुका दुष्काळ असे नानाविध पावसाचे रोद्र रूप बळीला बघायला मिळते त्यामुळे बळीराजाचे देखील पावसाच्या संदर्भात मत व्यक्त करतांना 'कभी खुशी,कभी गम' असेच विचारमंथन करीत असतो.कधी कधी पेरणी झाल्यानंतर अचानक पाऊस दडी धरून बसतोय आणि पावसाच्या सरी पृथ्वीवर कोसळत नाही तेव्हा पिकासाहित बळीराजाची हवालदिल होतो कारण महाग असलेले बी-बियाणे,खते महाग आहेत आणि कधी पावसाविना व्यर्थ जात असते त्यामुळे पावसाचा आणि बळीराजाचा संबंध आहेच.

          यावर्षी तर पिके काढल्यानंतर वादळवाऱ्यासह घोंघावत येणारा पाऊस बळीराजाने बघितला त्यावेळी आवश्यक असतांना पाऊस बरसत नाही पण गरज नसतांना धो..धो बरसणारा पाऊस त्यामुळे पिकाची नुकसानकारक स्थिती निर्माण होत असल्याने बळीराजा आपली व्यथा सातत्याने मांडत असतो. आज निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे यासाठी पाऊस वेळेवर पडण्यासाठी वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन केल्यास वातावरण अगदी आल्हाददायक होईल यात शंका नाही.वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड चे प्रमाण वाढणार नाही.पर्यावरणाचा समतोल राहिल्यास महापूर,भूकंप,अतिवृष्टी, अल्पवृष्टी,चक्रीवादळ निर्माण होणार नाही यासाठी मानवाने सतर्क राहून निसर्गाची हानी न करता नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे तेव्हाच पाऊस वेळेवर पडेल आणि बळीराजा देखील आनंदून जाईल. अवेळी, अचानक बरसणाऱ्या पावसावर अंकुश राहील.

✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
    चक फुटाणा, चंद्रपूर
मो न 9765548949
[04/06, 4:29 PM] शुभदा दीक्षित:    
(11)

माझ्या मनातला श्रावणातला पाऊस



            जिथे शाम निळा तिथे प्रेमधारा 

            अशा श्रावणाच्या सुखाच्या गं धारा

            श्रावणाचं भुलवणारं, हवहवसं वाटणारं, असं गोड रूप असतं. श्रावणात श्यामल मेघात प्रेम दाटलेलं असतं. सुखद गारवा लागताच त्यातून जणू बरसणाऱ्या धारा सुखाच्या असतात. असा हा लोभस श्रावण.

            हा पाऊस वसुंधरेच्या घरात, गर्जना करत, फक्त चारच महिन्याकरता पाहुणा म्हणून येतो. त्यात श्रावणात तर तो, शांत प्रवृत्तीने, आशिर्वाद देत, नाचत- बागडत, ऐश्वर्याच्या पायघड्या घालतो. तो वसुधेच्या पदरात केवढा मोठा आहेर टाकून जातो. धान्य-धुन्य, फळावर,  भाजीपाला एवढेच नव्हे तर रंगीबेरंगी फुलांचे ताटवे ही तिच्या स्वाधीन करतो. वसुधा ही त्याच्या प्रेम धारात ओली चिंब भिजून कौतुकाने हा सोहळा न्याहाळत असते, आणि कृतज्ञतेची पावती देत असते.

              क्षणात ती झरझर  

              क्षणात सोन किरणं 

              क्षणात रूप पालटे 

                                       असा हिरवा श्रावण

           झरझर झरणारा पाऊस आणि सूर्यकिरण यांच्या  लपाछपीचा खेळ बघून वसुधेला हिरवा हर्ष होतो. त्यामुळे हा श्रावणातला पाऊस हिरवाच वाटतो. तो कधी नाजूक-साजूक पावले टाकत भुरभुरत ही येतो.

              भुरभुर पावसाची 

              भुलवी हे तन-मन 

              मोरपीस तुषारांचे 

                                      फिरवी धुंद श्रावण

           सगळीकडे पसरलेले हिरवे गालिचे त्यावर चमकणारे तुषारांचे बिंदू पाहून वसुधेला सौंदर्याची धुंदी चढते.  हिरव्या गवतावर तुषार उडवताना त्याच्या पैंजणा तले घुंगरू तो सांडतो. कधीकधी हा पाऊस रिमझिम रिमझिम पदन्यास टाकत येताना गुलाबी स्वप्नेही घेऊन येतो जणू हा प्रीतीचे आमंत्रण द्यायला आला आहे.

              रिमझिम पावसाची 

              उडवी परागकण 

              स्वप्ने गुलाबी घेऊन 

                                        येई प्रीतीचा श्रावण

            श्रावणात कधीकधी पावसाच्या मुलायम सर सर धारा येतात. त्यामुळे आठवांच्या गंधित कुप्या उघडल्या जातात. अशा वेळी या धारा घेऊन येणारा मेघ, दूत होऊन प्रियेचा निरोपही पोचवतो. असा हा जवळचा सखाही असतो.

                सरसर पावसाची 

                माजे आठवांचे रण 

                निरोप माझ्या प्रियाला 

                                          पोचवि मेघ श्रावण

             कधी कधी हा श्रावणातला पाऊस टप् टप् थेंबातून  बरसतो. वसुधा हा मकरंद पिते. सृजनतेचा वसा घेतलेली वसुधा गर्भारशी होते.

              टपटप पावसाची 

              करी धरेला सृजन 

              ठेवून शिंपात मोती  

                                     येई सोनेरी श्रावण

              ह्या गर्भारशी वसुधेचे सगळे डोहाळे श्रावणात पुरवले जातात. पावसामुळे तृप्त झालेली वसुधा हिरवा शालू नेसून, मोत्याचे दागिने घालून, श्रावणातले सणवार साजरे करते. हा पाऊस आनंदाचा सडा घालत पुढे जातो.

             अमृतधारा जीवनी 

             आनंदाची पखरण 

             गंधीत आसमंतात  

                                     होतो साजरा श्रावण

              तांबूस पिवळ्या सोनेरी उन्हात, श्रावणाच्या रेशीम लडी मिसळतात. तेव्हा उन्हात पाऊस पडतोय की पावसात ऊन पडतंय, तेच कळत नाही. पण वर श्यामल मेघां कडे पाहिले कि तिथे मात्र सप्तरंगी इंद्रधनुष्याची मनाला मोहवणारी कमान दिसते.. हे पाहून कुठल्याही अरसिक माणसाच्याहि ओठावर  स्मिताची एक लकेर उठल्याशिवाय राहणार नाही. लहानपणी हा ऊन पाऊस आला की 'कोल्हा कोल्हीचं लगीन लागतं' असं मोठी माणसे म्हणायची. दाद द्यावी त्या कोल्हा कोल्ही च्या रसिक पणाला!!

             तहानलेली वसुधा आषाढातच अमृतधारा पिऊन तृप्त झालेली असते. त्यामुळे श्रावणात तिचं रूप अगदी मनमोहक असतं. श्रावणधारा मांगल्याचे प्रतीक असतात. किती व्रतवैकल्य, उपास-तापास लोकं करीत असतात. श्रावणातल्या धारांमुळे वसुधा सृजन झालेली असते. तिला नवचैतन्य लाभतं. सगळ्या प्राण्यांना ओला हिरवा नाजूक लुसलुशीत चारा मिळाल्यामुळे ते खुषीत असतात. पक्षी कणसातले मोती टिपून तृप्त होतात. शीळ घालतात.

             श्रावणधारा वसुधेवर अलंकारांची उधळण करीत असतो. कधी सोनेरी वड्या, कधी चंदेरी साखळी,  कधी मोत्यांचा सर. नद्या-नाले पोट भरून उसळत वाहत असतात. डोंगर-दऱ्या टेकड्या हिरवा शालू लपेटून पावसाचा आनंद घेत असतात. धबधबेही आपले विराट रूप दाखवून उड्या मारत नदीकडे झेपावत असतात. आमच्या घरातून दिसणाऱ्या अशा उत्साही धबधब्याकडे मी तासन्-तास बघत बसत असे. तो पावसाचा नाच आणि धबधब्याचे धीरगंभीर आवाजात त्याचे कोसळणे, हे विलोभनीय दृश्य मी मनाच्या कुपीत जपून ठेवले आहे.

             असा हा विलोभनीय, ओठावर गीत नाचवत ठेवणारा, हमखास येणारा पाहुणा, चार महिने राहिला तरी हवाहवासा वाटणारा, मनाला तृप्ती देणारा, आनंद वाटत येणारा, श्रावणातला पाऊस!!!!

                

शुभदा दीक्षित (11)
पुणे 



            
[04/06, 4:54 PM] Jeevansing khasawat: ......पहिला पाऊस.....
   
      पहिला पाऊस म्हणल्यावर मनाला आनंद देणारा एक सुखद अनुभव आहे.पावसाळा सुरू होताच मन प्रफुल्लित होत असते. पहिला पाऊस हा वादळाचा ही असू शकते ,त्यात गुरे _ढोरे कची घरे ,अशा कित्येक गोष्टींचे नुकसानही होत असते.तरीही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला सुखद आनंद देणारा असतो.
कारण  उन्हाळ्यात पशू पक्षी गुरे ढोरे मानव जात झाडे झुडपे किडी मुंगी असे सर्व सजीवांचे पाणी पिण्यासाठी हाल होतात .कित्येक प्राणी पक्षी या वर  मरण्याची वेळ पण येते .आणि पहिला पाऊस पडला की सर्व सजीवांना नवसंजीवनी मिळते.आणि आनंद मिळतो.मोर सारखे पक्षी तर आकाशात ढग जमले की थुई थुई नाचून आनंद साजरा करतात. चातक पक्षी पहिल्या   पावसाची पाणी पिण्यासाठी वाट बघतो .कारण तो दुसरे पाणी पीत नाही.कोकीळ पक्षा चा  कुहू  कु हू असा सुंदर आवाज कानाला गोडवा देतो.आणि वसुंधरा हिरवा शालू नेसण्या साठी अतुर असते . आपली जन्म दात्री आई जशी आपली काळजी घेते त्या प्रमाणे आपली मातावसुंधरेला प्रत्येक सजीवाची काळजी घेण्ासाठी ती तयार होते.जेव्हढे शक्य होईल तेवढे पाणी ती आपल्या पोटावर साठून ठेवते आणि सगळ्या जंगली प्राणी ,पाळीव प्राणी,कीटक ,जीव ,जंतू यांना पुरवन्याचा प्रयत्न करते. आणि त्यांची तहान  भागवते.

  "किती वर्णू महती या वासुंधरेची लाभले आम्हास भाग्य चढवाया साज या भू मातेवर ,काय कायाा भारी या माझ्या भू मातेची"
   
शेतकरी राजा हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे.उन्हाळा भर शेतकरी सर्व काम करून पहिल्या पावसाची शेतीची मशागत करण्या साठी वाट पाहत असतो.पहिला पाऊस पडल्या बरोबर आपल्या कामाला लागतो .कारण त्याला उभ्या जगाची अन्नाची काळजी आहे. 
पाऊस पडल्या बरोबर नांगरणी, ओखरणी, भांगलन,शेत साफ सफाई ,वेचणी या कामाला लागतात आणि मान्सूनच्या पाण्याची वाट बघतात.शेतकऱ्यासाठी तर हा पाऊस अतिशय आनंद देणारा असतो.
.                "लहान मुले ..
लहान मुले ही देवाघरची फुले असतात" लहान मुलांना पावसात खेळायला खूप आवडते. त्यात पहिल्या पावसात तर खूप खेळायला आवडते .कारण उन्हाळा भर तापमानामुळे लहान मुलाची अंगाची लाही लाही झालेली असते .आणि अचानक सुटलेला सोसाट्याच्या थंड थंड उनाड वारा ,आकाशात जमलेले ढग,बाहेर असणाऱ्या वस्तू घरात ठेवण्या साठी सर्व घरातील लोकं काम करतात , काड्या ठेवणे.अशा सर्व गोष्टी लहान मुलांना ऊर्जा निर्माण करतात.आणि पाऊस पडायला लागले की पावसात धावतात.पावसात गारा पडल्यास गारा गोळा करणे ही लहान मुलांना खूप आवडतात .आणि पहिल्या पावसातच लहान मुलांची शाळा कडची ओढ सुरू होते.आणि एक प्रकारची ऊर्जा लहान मुलामध्ये तयार होते. .घरातील वरिष्ठ मंडळी पावसात जाण्यासाठी नकार देतात .या वर्षी तर Corona असल्या मुळे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुधा पावसाचा अजिबातच आनंद घेता येत नाही .

पहिला पाऊस ,म्हातारी मानस आणि आरोग्य!
    पहिला पाऊस म्हणल्यावर सर्व सजीवांना हर्ष देणारा असतो.पहिला पाऊस पडल्या बरोबर चार महिने उनाचे चटके झेलणारी भू मातेच्या रंध्रा रध्रा तून सुवसित सुंगंध जशी काही लेणे लाऊन नटलेल्या नवरी जवळून जसा श्वास येतो तसा मातीचा सुगंध सर्वी कडे दरवळतो. त्यात 
 म्हाताऱ्या माणसांच्या मनात नावचेत्ना ,ऊर्जा नर्मिती करतात. आणि तिथून रोग राईची ,सुरुवात होते म्हाताऱ्या माणसांना दमा स्थमा या सारखे रोग त्रास देण्यास सुरुवात करतात म्हणून .प्रत्येक गोष्ट काळजी पूर्वक हाताळावी लागते.
पहिला पाऊस म्हटल्यावर प्रत्येकाच्या जुन्या आठवणी ताज्या होतात .आणि लागते .नवीन सणांची चाहूल.मन भरून येतो.आणि खाणे पिने या प्रत्येक गोष्टींची काळजी घेणे तिथून सुरू होऊन जाते .


पहिल्या पावसाची    
लहान मुलांची उन्हाळ्यात उन्हामुळे ,लग्न कार्यामुळे, मानसिकता पूर्ण ढासळलेली असते.पण पाऊस पडला की  सर्वांचेच मन आनंदी होते 
रानात असलेली गुरे ढोरे लपण्यासाठी जागा शोधतात
प्रवासात असलेली मानस थोडेसे थांबण्यासाठी जागा शोधतात.
सरवी कडे आनंदी आनंद चहूकडे पहिल्या पावसामुळे पसरते.


जीवन खसावत
भंडारा 9545246027
[04/06, 5:16 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13

मी अनुभवलेला पाऊस

पृथ्वीवर उन्हाळा ,पावसाळा,हिवाळा हे तीन ऋतु एकामागून एक येतच राहतात पण प्रत्येक वेळी त्यांचा येणारा अनुभव हा निश्चित वेगळा असतो म्हणून तर आपण दरवर्षी प्रत्येक ऋतू ची आतुरतेने वाट बघतो.
 मला तर हे तिन्ही ऋतू पृथ्वीचे पाहुणे आहेत असे वाटतात कारण पाहूणे  हे कायमचे थांबत नसतात एका विशिष्ट कालावधी पर्यंत थांबतात आपल्याला वेगळाच आनंद देतात आपणही त्यांच्या सानिध्यात आनंदी राहतो आणि ते पुन्हा जातात पुन्हा परत येण्यासाठी.
 आपण दर वर्षी उन्हाळ्यात परीक्षा  संपल्यावर सुट्ट्या मध्ये मामाच्या गावाला जाण्याची तयारी करतो. दरवर्षी जातो; वेगळा अनुभव घेतो ;त्याच प्रमाणे पावसाळा देखील पृथ्वीवर दरवर्षी येण्याची वाट पाहात असेल काय ?
पाहुणे येण्यापूर्वी आपण आपले घर व्यवस्थित आवरतो. पाहुणे आल्यावर काय काय मज्जा करायची हे ठरवतो तसेच पावसाळा येण्यापूर्वी देखील आपण त्याच्या आगमनासाठी पूर्वतयारी नक्कीच करतो जसे रेनकोट शोधून ठेवतो छत्री शोधून ठेवतो उन्हाळ्यात सर्व वाळवण करून ठेवतो. म्हणजे पावसाळ्यात आपल्याला मस्त भिजण्याचा आनंद लुटता येतो. पहिल्या पावसात होड्या सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो .जुन्या वह्या शोधून ठेवायच्या; वर्तमानपत्र बघून ठेवायचे आणि मस्त चार घड्या घालून होड्या करायच्या. पावसाचे पाणी साठले की एकामागून एक त्या पाण्यात सोडायच्या किती मज्जा येते! उन्हाळ्यात धुळीने संपूर्ण घरे, झाडे माखलेली असतात इतकी दुर्दशा झालेली असते त्यांची. आपण नवरात्र, दिवाळी यामध्ये जसे घर आवरायला घेतो ना तसेच सृष्टी देखील पावसाळ्यामध्ये घर आवरते असे मला नेहमी वाटते. उन्हाळ्यात सगळीकडे धुळीचे साम्राज्य परंतु पहिला पाऊस पडला की सगळे कसे धूऊन निघते. इमारती चमकायला लागतात. झाडे ,सृष्टी न्हाऊन निघते व हिरवाई नवीन शालू पांघरलेला आहे अशी वाटते.
 घर धुतल्यावर कसे संपूर्ण रस्त्यावर पाणी जाते तसेच पावसाने संपूर्ण सृष्टी धूऊन काढली जाते झाडे , इमारतींना अंघोळ घालून झाले की मग ते पाणी दऱ्याखोऱ्यातून वाहू लागते.
उन्हाने घामेजलेल्या जीवाला पहिल्या पावसाने दिलासा मिळतो. बाहेर पहिला पाऊस पडत असताना घरी बसवत नाही पाऊले आपोआप अंगणात बाहेर पडतात आणि पावसामध्ये मन आणि शरीर दोन्ही गिरक्या घेऊ लागते. पहिल्या पावसात चिंब भिजल्यावर संपूर्ण उष्णता निघून जाते व मन शांत होते. पहिल्या पावसात भिजले की सर्दी कधीच होत नाही हा माझा अनुभव आहे. तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन बघा. लहान मुलांनी तर या पहिल्या पावसात अवश्य भिजायला हवे त्यांना उष्णतेचे विकार अजिबात होत नाहीत.
भंडारदरा, महाबळेश्वर ,चिखलदरा या ठिकाणी सतत पावसाचा सामना करावा लागतो येथील लोक या पावसाने कधीही आजारी पडत नाहीत. पाऊस चालू असतानाच गुडघाभर चिखलात कोकणात भाताची लावणी केली जाते. पावसाळ्यात वर्षा सहलीचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे असे मला वाटते .या वर्षा सहलीला तुम्ही गेलात ना की आजारी पडणार नाहीत ती हमखास.
मला तर वाटते पावसाळ्यात जो पावसात चिंब भिजतो ना पावसाच्या सरीचा मारा जो आनंदाने सहन करतो त्याच्यामध्ये वर्षभर संकटाला सामना करण्याची ,त्याला झेलण्याची ताकद आपोआप निर्माण होते.; म्हणजे पावसात भिजल्यावर निसर्ग आपल्यामध्ये संकटाशी सामना करण्याची एक प्रतिकारशक्ती तयार करतो असेच म्हणा ना. निसर्ग जो आनंद आपल्याला देतो तो भरभरून आपल्यालाही घेता आला पाहिजे पावसाच्या रूपात निसर्ग आपल्याला आनंदाचं एक मोठं दान पदरात टाकत असतो आपण फक्त पदर मोठा करून ते स्वीकारायला हवं. चातक पक्षी बघा पावसाचे पाणी आ करून ते पिण्यासाठी सदैव तयार असतो आपण देखील या पावसाचे स्वागत करायला हवं मग तो आनंदाने येतो आणि आपल्यालाही आनंद घेता येईल. पाऊस असा पाहुणा आहे की ज्याच्या येण्याची शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी सर्वजण आतुरतेने वाट बघतात पण हा पाहुणा जर जास्त काळ आपल्याकडे रमला तर आपल्याला तो कधीकधी नकोसा वाटतो कधी जाईल बाई हा पाऊस नको नको रे पावसा असा धिंगाणा असा घालू असे म्हणण्याची वेळ येते. पाऊस पडताना कधीकधी वादळ येते विजाही चमकतात या वादळाने नुकसान होत. विजा चमकणे हे वैज्ञानिक दृष्ट्या चांगले म्हणले गेले आहे कारण या वीज चमकणे यामुळे वातावरणातील नायट्रेटचे नायट्रिक ऍसिड मध्ये रूपांतर होते व वनस्पतींना ते पोषक द्रव्य म्हणून वापरले जाते हे पोषकद्रव्य पावसाच्या सरीचा रूपात जमिनीच्या मातीत मिसळते व वनस्पतींच्या मुळांना मिळते. आपण जसे शरीराला पोषक द्रव्य म्हणून विटामिन च्या गोळ्या घेतो ना त्याचप्रमाणे वनस्पतींना देखील विजांच्या चमकणे यामुळे
नायट्रिक ऍसिड च्या रूपात विटामिन मिळत असते असे म्हणा ना.
पाऊस प्रत्येकाला काही ना काही देत असतो .शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी, लहान मुलांना होडीचा आनंद ,प्रियकराला प्रियसीच्या ओढीचा आनंद, निसर्गाला नटण्या मुरण्याचा आनंद, होरपळलेल्या धरणीला कोल्ड्रिंक चा आनंद, कवी मनाला कविता करण्याची संधी हा पाऊस नक्कीच उपलब्ध करून देतो. पावसा प्रमाणेच आपणही आनंद घेऊ या आणि आनंद देऊया. ही आनंदाची देवान-घेवान सदैव चालू ठेवूयात.

सविता साळुंके, श्रीरामपूर
9604231747
[04/06, 5:19 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ "पावसाळा" 

भारतातील   उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीन मुख्य ऋतु पैकी एक हा पावसाळा असतो.हा जून त सप्टेंबर असा चार महिन्याच्या कालवधीस आपण पावसाळा समजतो.याला मान्सून असेहि समजले जाते.भारत हा आपला कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपली भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिवर अवलंबून असते मग आपली शेती चांगली पिकावायाची असेल तर  त्यासाठी पाण्याची गरज भासत असते टी गरज या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर भागवली जात असते त्यामले इतर उन्हाळा किवा हिवाळ्या पेक्षा पावसाळाच अधिक जवळच वाटतो सर्वत्र हिरवेगार आल्हाद असे वातावरण असते .या हंगामामध्ये शेतकरी राजा पाऊस समाधानी पडल्यामुळे समाधानी असतो पण कधीकाळी हाच पाऊस गेल्यावर्षी कोल्हापूर व सांगली ची जरी आठवण झाली तरी अंगावर काटे शहरले जातात.कारण एवढा पाऊस पडला की पंचगंगा व कृष्णा नदी तुंडुंब भरून गावातील रस्त्यावर म्हणजे बोटीचे मार्ग झालेले होते घरांच्या छपरावर पाण्याची पातळी होती छोटया छोट्या बोटीत बसवून लोकांना वाचवित होते काही वेळा तर बोटी बुडून जलसमाधी सुध्दा मिळालेल्या आहेत शेतखमध्ये असणारी सर्व पिके वाहून गेलीत गुरांच्या गोठयात पाणी गेल्यामुळे व गुरे बांधलेली असल्यामुळे बरीच आपल्या प्राणास मुकली या ठिकाणी नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशीच ही बाजू समजू तो निसर्ग आहे त्याचे माणसाचे काही चालत नसते.कोणत्याही बाबीचे अति झाले ते धोक्याचे असते.त्यामुळेच म्हण आहे"अति तेथे माती"ही चुकीची नाही अति पाऊस धोका असतो.पण पाऊस हा पडलाच पाहिजे त्याशिवाय आपण जगू शकणार नाही.कारण पाणी हे जीवन आहे. याच पावसाळात सर्व धरणे भरली जातात याच धरणातील पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी व काही उध्योगासाठी  वापरले जाते म्हणून पावसाळा आपणासाठी हवा आहे.पावसाळ्यात आपली भूमी हिरवीगार झालेली असते. लहानपणी शाळेत शिकलेली कविता आठवली."श्रावणमास"बालकवि ची कविता पावसाचे छान वर्णन करते ते किती आल्हाददायक वाटते .निसर्गाचे छान वास्तव चित्र मांडलेले आहे.श्रावण मासी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे.. क्षणात येते सर सर हिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे....वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे....मंगल तोरण काय बांधले नभो मंडपि कुणी भासे...झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहहा तो उघडे...... तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळेऊन पडे.....उठती वरती जलदावरती अनंत संध्याराग पहा....बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळी च ते......उतरूनी येतो अवनी वरती ग्रह गोलचि की एकमते....फडफड करुनी भिजले आपले पंख पाखरे सावरती....सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती...खिल्लारे ही चरती रानी गोपहि गाणी गात फिरे...मंजूळ पावा गाई तयाचा श्रावण महिमा एकसुरे....सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला .....पारिजातहि बघता भामा रोष मनीचा मावळला....सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुध्दमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती.....देव दर्शना निघती ललना हर्ष मावेना र्ह्दयात.... वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे  गीत..." ही बालकवि ची कविता पावसाळ्याचे वर्णन केलेले आहे सर्व नध्या नाले ,डोंगर सर्व हिरवेगार झालेली धरती झालेली आहे. असा हा पावसाळा आम्हाला फार आवडतो....

लेखक.. जी.एस.कुचेकर-पाटील.भुईंज ता.वाई जि.सातारा.म़ो.नं.७५८८५६०७६१.
[04/06, 5:39 PM] वर्षा सागदेव: *पाऊस*
वर्षांच्या स्वागताची नांदी झाली 
पावसात सद्यस्नाता धरा सजली 

घननिळ्या अंबरातूनी बरसली 
हरित-वसना धरा प्रसन्न हसली

पर्जन्य  असा काही बरसला
मृदगंधानी वारा असा गंधाळला

निळ्याशार  आभाळात सांडली ,  
इन्द्रधनुषाची सप्तरंगी ऊधळण ,

हिरव्याकंच पानावर  विसावली ,
पर्जन्य बिंदूंच्या मोत्यांची पखरण✔ 


       वैशाखी वणव्यात ,सारी सृष्टी होरपळून निघते. तृषार्त-क्षुधित प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत असतात, आणि आभाळातून  मेघराजा पाण्याची पालकी वाहुन येतो. पावसाचा पहिला थेंब पडतो, माती त्या पहिल्या स्पर्शाने शहारते, मातीला फुटतो मृदगंधचा घुमारा. जीवसृष्टीत पसरतो जीवन गंध. तृषार्त धरेच्या भेगाभेगातून पाऊस धरेच्या अंतरी झिरपतो. सगळ्या सृष्टीला ओले चिंब करुन, होरपळलेल्या  वनराईला नवपल्लवित करतो. .
   पाऊस म्हटले की आठवते *पहिल्या पावसाची ती ओलेती संध्याकाळ, ती हूरहूर, ती विरह व्यथा आणि भरपावसात तना-मनात अवतरणारा अनंग*. पहिला पाऊस म्हणजे कवि आणि साहित्यिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. 
त्यानां आठवतो *आद्य कवी कालीदास, विरहाने  होरपळणारा यक्ष* आणि *मेघदूत*.त्यांच्या कल्पनेला सुद्धा घुमारे फुटतात आणि एकसेएक अशा कविता रचल्या जातात. मन मोहरवणारे  ललित लिहिले जाते.
 *आषाढस्य प्रथम दिन साजरा होतो*, 
        पावसा किती रे तुझे रुप ,किती विविध छटा तुझ्या. कधी बरसतो रिमझिम रिमझिम, हलकेच मातीला गोंजारणारा फुलविणारा. तिच्या रोमा-रोमातून सामावून जातो, आणि मातीच्या कणा-कणातून नवांकूर फुटतात . कधी घननिळा हलकेच आळवीतो मेघ-मल्हार. सगळा आसमंत मोहरून जातो. मोराच्या पिसाऱ्यात संचारतो , ईन्द्रादिक देवानांही मोह पडतो, सप्तरंगाची उधळण करीत इन्द्रधनुषी कमान घेऊन आकाशी  अवतरतात.
     कधी गर्जत बरसत शंखनाद करीत,हा पाऊस  धोधो कोसळतो. धरणीच्या ह्रदयात रुजणारा तिच्या तृषार्त-क्षुधित  काळज्या चा ठाव घेणारा, तिच्या जीवलग सख्या सारखा . सद्यस्नाता धरणीला कडकडून भेटणारा .पावसाचे टपोरे थेंब जणू मोत्यांची पखरण. मध्येच काळ्याभोर ढगात वीजेचा लोळ चमकतो  खट्याळ सौदामिनी लपंडाव खेळते. हरीत-वसना धरणीच्या हिरव्या गार शालूवर रंगीबेरंगी फुलांची नक्षी आख्ख्या सृष्टीला सजवते. घननिळ्या आभाळातून बरसणारे  जलद , कधी मुसळधार बरसतात,मनमुराद बरसतात , तर कधी सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा झरतात. डोंगरमाथ्यावरून झरणारे फेनील धवल निर्झर धरेवर झेप घेतात. सरिता संतृप्त होते. कधी खळाळत ,कधी उड्या मारत, कैक जलधाराच्या रुपात ,परत जलधीच्याच कुशीत सामावतात. तृप्त करतात, तृप्त होतात. 
*हे तरआहे पावसाचे जीवनदायी लोभासवाणे रुप* 
       पण हाच जीवनदायी पाऊस कधी कधी कर्दनकाळ होऊन येतो. वादळी झंझावात घेऊनच अवतरतो , ढगांचा गडगडाट,कानठळ्या बसवणारा विजेचा कडकडाट , धोधो कोसळणाऱ्या जल धारां ,सोसाट्याचा वारा , समग्र सृष्टी जलमय होते ,जळबंबाकार होते. पावसाचे हे रौद्र तांड़व बघुन भीतीने गाळण उडते .जीवनाचा , सृष्टीचा त्राता कधी असा काळ होऊन अवतरतो, महापूराचे थैमान घालतो. जान मालाची प्रचंड हानी होते होत्याचे नव्हते  होऊन जाते.
         *ह्या विनाशकारी रुपाला  ब्ऱ्याच अंशी मानव ही जबाबदार  आहे. विकासाच्या वावटळीत महाकाय तरु धारातीर्थी पडले. अमर्याद जंगलतोड ,नदी ,नाले, तलावात साचलेला गाळ, पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व वाटा मानवाने बंद केल्या आहेत*.
 *चंद्र मंगळावर स्वारी करणाऱ्या मानवा, पहिले आपल्या ह्या काळ्या माये कडे लक्ष दे . नाहीतर होत्याचे नव्हते  होऊन जाईल*

डाॅ.वर्षा सगदेव

[04/06, 5:59 PM] झगरे गुरुजी: १७) शेतकऱ्याचा अविस्मणीय आनंद पहिला पाऊस...

श्री. ज्ञानेश्वर झगरे गुरूजी 
(वाकदकर)
.........................................................

वैशाखाच्या वणव्याने तापलेली धरणीमाता, अंगाचा लाहीलाही होणारा दाह, पक्षांनी आणि प्राण्यांनी पाण्यासाठी शोधलेला पानवठा , चातक पक्षाची पाणी पिण्यासाठी चाललेली आरोळी. मस्तकावरून निघालेल्या घामाच्या धारा अंगाला खारट करत ज्यावेळेला सगळ देहाला स्पर्शुन जातात...कुणासोबत मनाचीही त्राही त्राही व्हायला लागते आणि मग मनुष्य जीवन असो अथवा पशुपक्षी किंवा जमीन ती वाट पाहते त्या निरभ्र आकाशाकडे, केंव्हा आकाशात काळे ढग जमतील आणि केव्हा एकदाचा  गार पावसाचा वर्षाव होऊन धरणीला सुखावेल..! असं होऊन जातं. यातच निसर्गाची किमया सुरू होते, मृग नक्षत्राची चाहूल लागता न  लागता च तोच सूर्यनारायण आणखीच आग ओकू लागतो, चातका चा आवाज आणखी तीक्ष्ण पणे कानावर पडायला लागतो. सुरु होते निसर्गाची किमया, येतात आकाशात काळेभोर ढग दाटून,  ढगांना जणू प्रेम दाटून येतो आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटतो, एखाद्या लेकरांना नाचून नाचून आनंद साजरा करावा त्याच पद्धतीने गडगडाटासह  पावसाच्या अमृत रुपी सही बरसायला लागतात.  जिकडेतिकडे नव्याची नवलाई सुरू होते.  

सुरुवातीला खमंगपणें दरवळणारा मातीचा वास सर्वांनाच हवाहवासा वाटतो. काहीच दिवसांमध्ये नव्या नवरीला शृंगार चढवावा त्याचप्रमाणे धरणीमाता सुद्धा आपलं भरजरी हिरवं  वस्त्र परिधान करून बहरून येणार असते. नुकतीच  गुरे आणि वासरांसाठी नीटनेटकी केलेली गोठे , छपरे तसेच बसून पक्षांनी बांधलेली घरटी यामध्ये ती विसाव्याला जातात. जमिनीचं पोट तृप्त करत करत खाच आणि खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी पक्षी आणि प्राण्यांसाठी नवीन उपलब्धी असते. कधीकधी सोसाट्याने उन्मळून पडलेली झाडे, घरावरची उडालेली छत्रे, जुन्या घरांच्या टीन पत्रांमधून गळालेले पाणी, शेतातील बांध बंधूर्यांची झालेली लुटालूट आणि फुटाफूट हे सगळं काही ही आनंदी मनानं स्वीकार केल्या जातं. कारण याच बदलात नवीन यशाची नांदी असते. 

अनेक दिवसांपासून आकाशाकडे आस लावून बसलेला शेतकरी राजा या पावसाने मात्र फार आनंदी झालेला असतो. मागचे सगळे दुःख वीसरून तो आता पुन्हा नव्या जोमाने नवा संसार उभा करण्यासाठी तयार झालेला असतो.
'नेमेची येतो पावसाळा' हे जरी सर्वांसाठी सहज असेल तरीसुद्धा पावसाची वाट पाहणारा शेतकरी राजाच्या आनंदाला आज पारावार उरत नाही.....

सर्जाराजा च्या जोडीला औताला जुंपून शेतातील काळया मातीची सोय आणि मशागत करण्यासाठी शेतकरी राजा तयार होतो. उन्हाळाभर कामा वाचून शांत बसलेल्या बैलांना आणि गुरांना सुद्धा आपली पाऊल मोकळे करण्यात फार मजा येते. सुरु होतो सर्जा-राजाचा नवा संसार.
बँकेचं अथवा सावकाराचं कर्ज काढून तो शेतकरी दादा पुन्हा बी बियाणे ,खते, कीटकनाशके घेण्यासाठी त्याची थैली उचलतो आणि सुरु होते त्याच्या जीवनाची नवी शॉपिंग.... सुरु होतो पुन्हा त्याचा नवा खेळ जो असतो.. केवळ दुसऱ्याचा  भरोशावर..... पुन्हा त्याची निधडी छाती तयार होते अस्मानी आणि सुलतानी संकटांना झेलण्यासाठी.....

पडरं पाण्या पडरं पाण्या कर पाणी पाणी ....
शेत माझं लय तान्हेल चातकावाणी.. असं म्हणत शेतकरी राजा अती आनंदी होतो.

आजवर कितीही दुःख सोसलं असलं,तरीसुद्धा पहिला पाऊस हा तयार करतो त्या निसर्गाला आणि आणि कट्टर बनवतो त्या शेतकरी राज्याच्या हळव्या मनाला .. अखेर पहिला पाऊस हा शेतकरी राजाला अविस्मरणीय आणि अवर्णनीय आनंद देऊन जातो....
[04/06, 6:00 PM] अर्चना गरुड, किनवट: कोड क्र . [ 14 ]

" पावसाळा आणि शेतकरी "

     भारतात मुख्यतः तीन ऋतू आहेत . ते म्हणजे उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा हे होत . यापैकी उन्हाळा हा ऋतू फारसा उष्ण व गरम वातावरण असल्यामुळे कुणालाही आवडत नाही . तसेच हिवाळ्यात तर कडाक्याची थंडीमुळे हाही ऋतू बर्याचशांना नकोसा वाटतो . पण पावसाळा हा ऋतू मात्र एकमात्र असा आहे की जो बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच प्रिय आहे . आणि सर्वप्रिय आहे तो म्हणजे माझ्या लाडक्या शेतकरीराजाला ... तो तर या ऋतूची अगदी चातकासम वाट पाहत असतो ... 

     शेतकरीराजा हा आतुरतेने उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीची कामे आटोपून घेतो .. बिचारा तो रखरखत्या उन्हातही घामाच्या धारा वाहत आपली या लाडक्या काळ्या आईच्या सेवेत अष्टप्रहर हजरच असतो ... तो कधीच तिच्या सेवेत खंड पडू देत नाही ... अविरत तो दिनरात तिच्या सेवेत तल्लीन असतो ... आणि जेव्हा पहिल्या मृगधारा बरसतात तेव्हा तर ह्या शेतकरीराजाला एवढा आनंद होतो की त्याच्या आनंदाला हे गगनही ठेंगणे होऊन जाते ... आणि या पावसाच्या प्रत्येक सरी त्याच्या मनात एक एक नव आशा , स्वप्नं  शेतीच्या पेरणीसोबत पेरत जातात ... हिरव्या स्वप्नात तो रममाण होतो ... अंगातून घामासह तो या काळ्या आईला आपल्या रक्ताचाही अभिषेक करीत असतोच ... कारण ह्या मातीच्या ढेकळात चप्पल थीडीच चालणार हो.... आणि शेतातील काटेकुटे हे त्याच्या पायात रूततात , टोचतात .. पण ते काढायलाही वेळ कुठं असतो त्याच्याकडे ... हे जणू त्याचे व्रण म्हणजे एक दागिनेच आसतात बिचाऱ्या या बापाचे ... 

      शेतातील पावसाळ्यातीलच पाण्यावरच तर ही शेती अवलंबून असते ना ... तो आपल्या शेतातील पिकांची कोवळी कोंब पाहून खूपच खूष होतो .. भलेही त्याच्या नशीबात मालाला भाव येवो वा न येवो .. हाती पीक येवो वा न येवो ... तो कधीच थकून व खंगून जात नाही ... आज नाहीतर उद्या येईल .... दुसऱ्या पावासाळ्यात येईल अशी आस मनात बाळगून आपले कष्टमय जीवन जगतच राहतो ... 

" आता मेल्या मरणाला 
  जीती पालवी फुटेल
  सुकलेल्या आसवांना
  पंख नवीन येतील "

अशा आशेच्या ओळी मनात गुणगुणत हा शेतकरीराजा प्रत्येक पावसाळ्यात आपल्या जीवनात सुखाची पीक येतील ... म्हणून आतुरतेने पावसाळ्यात वाट पाहतो ..

अर्चना गरूड 
किनवट , जि. नांदेड
[04/06, 6:01 PM] Sujata Jadhav: लेख: लडिवाळ पाऊस( 28)
      
         येरे घना येरे घना,असे म्हणता आभाळात काळेभोर ढग जमतात,आणि त्या गारा मिश्रित सरी भुईवर येतात,किती मनलोभणीय दृश्य असते,मला पाऊस अनुभवायला आवडतो,बालपणीचे दिवस अजूनही आठवतात,किती छान बालपण गेले,कागदी होड्या,रेनकोट,साठलेल्या डबक्यात उड्या मारणे, किती सुंदर!!  बालपण दे गा देवा!! असा पाऊस मनसोक्त जगायला मिळत असेल तर मी पुन्हा लहान होईन.
         पावसाळ्यात सर्व हिरवेगार झालेले असते,सृष्टी सौंदर्य घेऊन नटली आहे असे वाटते,शेतकरी सुखावतो,सर्वच आनंदी असतात,बोलू न शकणारा निसर्ग व्यक्त होतो,तप्त जमीन थंड होते,शांत वातावरण निर्माण होते,तळणी,भज्यांचा सुवास पसरतो,त्यातच गरम चहा ,कॉफी असेल तर मजा औरच , या दिवसात पावसाळी सहली सुद्धा असतात,काही पावसाला घाबरून घरात बसतात,परंतु काही या दिवसात धबधबा अनुभवतात,काही रिसॉर्टला कृत्रिम धबधबे निर्माण केलेले असतात,पर्यटकांना आनंद घेता यावा हा उद्देश असतो.
     पावसाळा आल्हाददायक वाटतो, हल्ली फॅशन झाले फिरण्याची पावसाळा अनुभवण्याची.

सुजाता जाधव
नवी मुंबई

39)पहिला पाऊस****
"नेमचि येतो मग पावसाळा"असे आपण म्हणत असलो तरी नित्यनियमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्यापूर्वी उन्हाळा असतो.आणि ग्रीष्माच्या भव्य कढ ईत आपल्या देहाची अगदी लाहीलाही उडालेली असते. त्यामुळे पहिला पाऊस हवाहवासा असणारा पाहुणा ठरतो. दरवर्षी मी त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते. मला पावसात भिजायला खूप आवडते. हा पाऊस जसा माणसाचे मन  रिझवतो, तो माणसाचे जीवनही फुलवतो. या पावसावरच माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने अवलंबून असते.
पाऊस येण्यापूर्वी सारी धरित्री अगदी तापून निघालेली असते. जमिनीला भेगा पडलेला असतात. झाडे पाणी पाण्यासाठी आसुसलेली असते. दिवसाकाठी सर्वांचे डोळे पाच-दहा वेळा तरी आकाशाकडे वळत असतात. पण लबाड मेघ मात्र मानवाला हुलकावणी देत असतात.

आज नक्की पाऊस कोसळणार असे त्यादिवशी वाटू लागते, तो सारा दिवस आणि ती सारी रात्र कोरडी जाते. मग माणूस काळा मेघांची कुंडली मांडतो. मल्हार राग गाऊन त्याला आळवतो. प्रतीक्षा करत राहतो.
अशा अवस्थेत एखाद्या दिवशी अचानक नभांगण आतील राग रंग बदलतात., आणि टपोरे थेंब कोसळू लागतात. मला तर पहिला पाऊस खूप आवडतो त्या पावसात भिजायला खूप मजा येते. झाडे पाने पशुपक्षी पावसाच्या आगमनाने आनंदित होतात. पावसात नाचणारी मुले पाहिली तर मन अगदी प्रसन्न होते. धरतीमाता देखील प्रसन्न होते. शेतकऱ्यांना तर फार आनंद होतो. त्यांची लगबग शेतीची कामे करण्याची सुरू होते. मला पावसाळा खूप आवडतो.
पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. कधी हा पाऊस रुसून बसतो तर कधी रागारागाने दिवस-रात्र बरसत असतो. तेव्हा मात्र हा पाऊस नकोसा वाटतो.परंतु जेव्हा पाऊस येतो तेव्हा चैतन्याची सनद घेऊन सृष्टीचे सौभाग्य घेऊन येतो. म्हणून मला पाऊस खूप आवडतो.

सौ. भारती दिनेश तिडके
 गोंदिया.

पावसातील अनुभव

         एके दिवशी मी माझ्या शाळेसाठी दररोज सारखा जायला निघालो पण अर्ध्या वाटेतच ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोरात वारी यायला लागली मी पाहिले कधीही इतके जोरात वारे बघितले नव्हते वाई का जोरात ढगांचा गडगडाट सुद्धा ऐकला नव्हता. थोड्यावेळाने मला कळले की पाऊस येणार आहे. आपण कुठेतरी असला घेतला पाहिजे. मी किराणा दुकानाच्या छपराखाली आसरा घेतला. पाऊस सुरु झाला व इतका मुसळधार झाला की मी आतापर्यंत अशा मुसळधार पावसाचा अनुभव घेतला नव्हता. 
 थोड्यावेळाने दुकानातील दुकानदाराने मला माझे नाव विचारले मी सांगितले माझे नाव खंडेराव बळीराम वारकड आहे. दुकानदाराने पुन्हा विचारले तू कुठे राहतोस मी म्हणालो दोन गल्ल्या सोडून चौथे घर माझे आहे. मी आणि दुकानदार थोडावेळ विचारपूस करत बसलो. नंतर पाऊस येणे थांबला. रस्त्याने खूप पाणी झाले होते. रस्त्यावरच्या नाल्या तुडुंब भरल्या होत्या मी आतापर्यंत कधी पावसाचा असा अनुभव घेतला नव्हता. हा माझा सर्वात चांगला अनुभव होता. इतक्यात माझ्यासमोर वीज पडली. मी खूप घाबरलो व दचकलो. विज एका झाडावर पडली होती. बरं झालं त्या झाडाखाली कोणी थांबले नव्हते. पण ते झाड सर्व जळून गेले होते. 
            मी माझ्या शाळेत पोहोचलो. तेव्हा कळाले की शाळेला पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सर्व मुले आपापल्या घरी गेली गसर्व मुले आपापल्या घरी गेली व मीसुद्धा माझ्या घरी पोहोचलो. मी खूप उत्सुक होतो आईला झालेल्या घटना सांगण्यासाठी कारण माझा हा अनुभव अविस्मरणीय होता

 नाव:खंडेराज बळीराम वारकड
 वर्ग:आठवा 
शाळा:जवाहर नवोदय विद्यालय, परभणी. 
 मो.नं:9960453288
पत्ता: भाग्यनगर वसमत रोड परभणी


1 टिप्पणी:

  1. पावसातील अनुभव

    एके दिवशी मी माझ्या शाळेसाठी दररोज सारखा जायला निघालो पण अर्ध्या वाटेतच ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोरात वारी यायला लागली मी पाहिले कधीही इतके जोरात वारे बघितले नव्हते वाई का जोरात ढगांचा गडगडाट सुद्धा ऐकला नव्हता. थोड्यावेळाने मला कळले की पाऊस येणार आहे. आपण कुठेतरी असला घेतला पाहिजे. मी किराणा दुकानाच्या छपराखाली आसरा घेतला. पाऊस सुरु झाला व इतका मुसळधार झाला की मी आतापर्यंत अशा मुसळधार पावसाचा अनुभव घेतला नव्हता.
    थोड्यावेळाने दुकानातील दुकानदाराने मला माझे नाव विचारले मी सांगितले माझे नाव खंडेराव बळीराम वारकड आहे. दुकानदाराने पुन्हा विचारले तू कुठे राहतोस मी म्हणालो दोन गल्ल्या सोडून चौथे घर माझे आहे. मी आणि दुकानदार थोडावेळ विचारपूस करत बसलो. नंतर पाऊस येणे थांबला. रस्त्याने खूप पाणी झाले होते. रस्त्यावरच्या नाल्या तुडुंब भरल्या होत्या मी आतापर्यंत कधी पावसाचा असा अनुभव घेतला नव्हता. हा माझा सर्वात चांगला अनुभव होता. इतक्यात माझ्यासमोर वीज पडली. मी खूप घाबरलो व दचकलो. विज एका झाडावर पडली होती. बरं झालं त्या झाडाखाली कोणी थांबले नव्हते. पण ते झाड सर्व जळून गेले होते.
    मी माझ्या शाळेत पोहोचलो. तेव्हा कळाले की शाळेला पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सर्व मुले आपापल्या घरी गेली गसर्व मुले आपापल्या घरी गेली व मीसुद्धा माझ्या घरी पोहोचलो. मी खूप उत्सुक होतो आईला झालेल्या घटना सांगण्यासाठी कारण माझा हा अनुभव अविस्मरणीय होता

    नाव:खंडेराज बळीराम वारकड
    वर्ग:आठवा
    शाळा:जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.
    मो.नं:9960453288
    पत्ता: भाग्यनगर वसमत रोड परभणी

    जवाब देंहटाएं

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...