*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- पंचेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 02 जून 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- आत्मनिर्भर*
( पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे आवाहन आहे आत्मनिर्भर व्हा )
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
[02/06, 10:17 AM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09) *आत्मनिर्भर बनू या!*
'स्वतःवर अवलंबून राहून इतरांबरोबर आपले ,समाजाचे आणि राष्ट्रांचे उपयोगी पडणे म्हणजेच *आत्मनिर्भर* बनणे होय'. आपल्या भारतात गेल्या 8महिण्यापासून" सुपर ॲप्स"*elyment app*तयार करण्यात आलेले आहे.भारतातील युवा लोकांचा सेवा प्रोजेक्ट आहे.भारतीयांनी तयार केलेला हा सेवा प्रोजेक्ट भारतीयांसाठी उपयोगात येणार आहे. व्हाट्सअँप, फेसबूक ,इंष्टाग्रँम इ.मध्ये असलेल्या सुविधांसह आपल्याला "*सुपर ॲप- एलिमेंट्स अँप"* मध्ये उपयोग करता येणार आहे. फोन कॉल ,व्हिडिओ कॉल,सह सर्व सुविधा त्यात उपलब्ध आहेत.एक विशेष म्हणजे भारतीयांचा *डेटा* आता इतर देशात पोहाचण्यात मज्जाव होणार हे मात्र नक्की . भारत आत्मनिर्भर सिद्ध होण्यात आत्मनिर्भर होण्यास यामधील नैतिक सामाजिक राजनैतिक माहिती आपल्याच देशात राहण्यास मदत होईल .लवकरच *राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती* यांच्या हस्ते " *एलिमेंट ॲप्स*"चे उद्घाटन होणार आहे .या ॲप्सवर टेस्टिंग सुरू आहे .आपणही हा "एलिमेंटॲप्स "ला प्ले स्टोरमधून डाउनलोड करून वापर करावे. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपल्या खारीचा वाटा उचलावा. AOl चा स्त्यृत उपक्रम आपल्या भारतीय , तरूण पिठीला नक्कीच आत्मनिर्भर ते नेणारा हा उपक्रम ठरणार यात तिळमात्र शंकेला वाव नाही. जय गुरूदेव .AOLद्वारे प्रत्येक गावागावात 5-5चे गट तयार करून सेवायोद्धा तयार आहेत .जे स्वयंप्रेरणेने गावाला व स्वतःला आत्मनिर्भर बनवित आहेत.
*आत्मनिर्भर भारत* कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या संकाटवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं.देशातल्या चौथ्या लॉकडाऊनबाबत मोदींना ठाम घोषणा केली नसली, तरी लॉकडाऊनच्या पुढील स्थितीबाबत 18 मे पूर्वी माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन-4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.आत्मनिर्भर भारत अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी '*आत्मनिर्भर भारत अभियान*'ची घोषणा केली. या अभियानासाठी भारताच्या GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवी गती देईल. गृहउद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची माहिती देतील. या पाच खांबांवर आत्मनिर्भर भारत उभा राहील . याआधी त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील. ते पाच खांब म्हणजे - अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी आपण भारताला आत्मनिर्भर (स्वावलंबी) नक्की बनवू, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला.
पुढील लॉकडाऊन आधीपेक्षा वेगळा असेल "कोरोना मोठ्या काळासाठी आपल्या जीवनाचा भाग असेल, असं शास्त्रज्ञ सांगतात. पण याचा अर्थ असा नाही की, आपलं आयुष्य फक्त कोरोनाभोवतीच फिरेल. आपण अंतर राखून काम करू," असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पुढील लॉकडाऊनबाबत सूतोवाच केला. "लॉकडाऊन-4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू आणि पुढेही जाऊ," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
चौथ्या लॉकडाऊनची माहिती 18 मे पूर्वी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.'एकविसावं शतक भारताचं, ही आपली जबाबदारी'"एकविसावं शकत भारताचं असेल, हे स्वप्नच नाही, तर आपली जबाबदारी आहे. यासाठी एकच मार्ग आहे - स्वावलंबी भारत," "आमच्या स्वावलंबीपणाच्या व्याख्येत आत्मकेंद्रीपणा येत नाही. आपण 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीवर विश्वास ठेवतो. भारताच्या प्रगतीच्या संकल्पनेत नेहमी विश्वकल्याणाचा विचार असतोच," असंही ते म्हणाले.
'आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय' "आपण राष्ट्र म्हणून महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत. हे संकट आपल्यासाठी संधी घेऊन आलं आहे. आपण रोज 2 लाख पीपीई किट्स बनवत आहोत. आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय."
'स्थानिक उत्पादनच जीवनमंत्र बनवायचा' "जगात आयुष्य आणि मरणाची लढाई सुरू असताना भारतातली औषधं जीव वाचवत आहेत. भारतीयांना याचा अभिमान आहे,"
भारताच्या सुवर्णयुगाची आठवण करत ते म्हणाले, "एकेकाळी देशात सुवर्णयुग होतं. त्यानंतर पारतंत्र्य ओढावलं. आता भारताकडे सामर्थ्य आहे. आपण उत्तम उत्पादनं निर्माण करू. हे आपण करू शकतो आणि नक्की करू"संकटाच्या वेळी स्थानिक उत्पादकांनीच आपल्याला वाचवलं. वेळेने आपल्याला शिकवलं आहे की स्थानिक उत्पादनच आपलं जीवनमंत्र बनवायचं आहे. आजपासून प्रत्येक भारतीयाने "लोकलसाठी व्होकल" व्हायचंय. स्थानिक उत्पानदं घ्यायची आहेत आणि त्यांचा प्रचार करायचा आहे," असं आवाहन मोदींनी केलं.
धाडसी सुधारणा कराव्या लागतील -देशात धाडसी सुधारणा कराव्या लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं."धाडसी सुधारणा कराव्या लागतील. सुधारणांची व्याप्ती वाढवावी लागेल. शेतीच्या पुरवठा साखळीत सुधारणा होतील. सुधारणा करांमध्ये होतील. या सुधारणा उद्योगांना शक्ती देतील आणि गुंतवणुकीला चालना देईल,"
आत्मनिर्भर , स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनता येणार आहे . नाही करायचंय , वर्ल्ड टूर . आपल्या देशातच बरे आहोत. पुढे आमच्या देशात स्वच्छ भारत अभियानाला वेळ मिळाला आहे जगात श्रीमंत अधिक श्रीमंत गरीब अधिक गरीब होता या गोष्टीला मात्र तडा गेला आहे आमच्या भारतात श्रीमंत गरीबातला गरिबाच्या मदतीला धावून आलेला आहे सहकार्य करू लागलेला आहे मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी मदत करू लागले आहेत फक्त सरकारवरच अवलंबून नाही तर स्वतः धावले आणि मदत गारबनले.
भारत "डिजिटल इंडिया" बनला आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेला ऑनलाईन घेऊ लागले आहेत. घरी बसल्या बसल्या अभ्यास करू लागलेले आहेत. आणि हा तुझ्यामुळे जंगफूड तर बंद झाला. स्वदेशी चाच नाहीतर ट्रेडिशनल फुड सुद्धा स्वतः तयार करून खायला लागले आहोत आम्ही . गृहिणी लोकांची सेवा सुश्रुषा करीत आहे. अजून एक सांगू, दवाखान्यात आजारी लोकांची गर्दीच कमी झाली.तुझ्यामुळे चोरी-चकाटी, अपघात ,अपहरण यांच्यावर काही प्रमाणात तरी आळा बसला आहे.
आत्मनिर्भर बनण्यासाठी सर्वानी सकारात्मकतेचा अवलंब करून ध्येय प्राप्ती करू या!.
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[02/06, 10:40 AM] सौ भारती तिडके: 39)****आत्मनिर्भरता:-एक संदेश****
आयुष्याची एक चांगली सुरूवात........ आत्मनिर्भरता.
"शांतीने चिरकाल शांती टिकते,
हिंसेने नव्हे."
आत्मनिर्भर म्हणजे दुसर्यावर अवलंबून न राहणे. स्वयंपूर्ण स्वावलंबी बनणे म्हणजे आत्मनिर्भर होणे होय. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 12 मे 2020 ला राष्ट्राला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियान ची सुरुवात केलेली आहे. covid-19 महामारी संकटापासून लढण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान निश्चितच एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि आधुनिक भारताची एक ओळख बनेल. या योजने किंवा अभियानाचा उद्देश एकशे तीस करोड भारतवासीयांना आत्म निभर बनवायचे आहे कारण की देशाचा प्रत्येक व्यक्ती covid-19 सारख्या संकटाच्या काळात खांद्याला खांदा लावून चालू शकेल तसेच या महा मारीला हरवण्यासाठी आपले योगदान देतील. पीएम मोदी राहत पॅकेज अंतर्गत आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकार द्वारे वीस लाख करोड रुपये देशाच्या जीडीपी साठी दहा टक्के घोषित केलेले आहे. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवीन गती देईल. कोरोनाव्हायरस मुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली.
हे पॅकेज गृह उद्योग, छोटे ,मध्यम आकाराचे उद्योगासाठी आर्थिक पॅकेज आहे. ज्या वस्तू आपल्या देशात आयात होत
होत्या त्या आता देशातच निर्माण
करायच्या, दुसऱ्या देशातून बोलवायचं नाही. हा आत्मनिर्भर योजनेचा हेतू आहे.
"व्यवसाय आपला प्रयत्न आपला".
आत्मनिर्भर भारत पाच खांबावर उभा राहिला आहे. ते पाच खांब म्हणजे अर्थव्यवस्था ,पायाभूत व्यवस्था ,तंत्रज्ञान व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी.
आपल्या भारताला स्वावलंबी बनवायचे आहे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. कोरोणा मोठ्या काळासाठी आपल्या जीवनाचा भाग असेल असं शास्त्रज्ञ म्हणतात पण याचा अर्थ असा नाही की आपला आयुष्य फक्त कोरोना भोवतीच फिरेल. आपण अंतर राखून काम करू असे पंतप्रधानांनी संदेश दिला आहे.
"एकविसावे शतक भारताचे असेल हे स्वप्नच नाही तर ती आपली जबाबदारी आहे -यासाठी एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे स्वावलंबी भारत."
"वसुधैव कुटुंबकम'"या उक्तीवर आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वास ठेवायला हवा.. शाळा-कॉलेज covid-19 च्या प्रादुर्भावाने बंद आहेत तर विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होऊन स्वतः सेल्फ स्टडी करायला हवे. स्त्री आता आत्मनिर्भर झालेली आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. जगात आयुष्य आणि मरणाची लढाई सुरू असताना भारतातील औषधे लोकांचा जीव वाचवीत आहे. पहिले भारतामध्ये सुवर्णयुग होतं. त्यानंतर पारतंत्र ओढावल. आता भारताकडे सामर्थ्य आहे. उत्तम उत्पादन निर्माण करायला हवे. स्थानिक उत्पादनाचा आपला जीवन मंत्र बनवायचे आहे.स्थानिक उत्पादन करायला हवे व त्याचा प्रचार करायला हवे तसेच धाडसी सुधारणा देखील देशात करायला हवी त्यामुळे उद्योगांना शक्ती येईल व गुंतवणुकीला चालना मिळेल. पाश्चात्त्य देशात आई-वडील मुलांना अठरा वर्षाचे झाले तर आत्मनिर्भर व्हायला सोडून देतात परंतु आपल्या देशात म्हातारा होईपर्यंत आई-वडील मुलांची काळजी घेतात त्यांना आत्मनिर्भर बनवायला हवे. काही व्यक्ती नोकरी सोडून स्वतःचा रोजगार सुरू करत आहे हे आत्मनिर्भर तेचे लक्षण आहे.
कोरोना संकटापासून वाचविण्यासाठी आर्थिक पॅकेज म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियान आहे. म्हणजेच आपल्या गरजा आपणच पूर्ण करणे. तसेच देशी स्वातंत्र्यपूर्वकाळात होते. Make in India . हे सांगितलेले आहे. संपूर्ण जगाला कोरोना च्या संकटाने विळखा घातलेला आहे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. परंतु कोरोनामुळे संपूर्ण लोक जग एकत्र आले आहेत. देशात दोन लाख मास्क किटस तयार होत आहेत. लोकल गोष्टीसाठी होकल बना असा नरेंद्र मोदी यांनी संदेश सांगितला आहे. तर मोहन भागवत यांनी स्वदेशीचा वापर करा असे म्हटलेले आहे. देशातील अर्थव्यवस्था मजबूत बनविणे फार आवश्यक आहे. पायाभूत सुविधांमध्ये चीनला भारताकडे आकर्षित करण्यासाठी जमीन, पाणी, वीज इत्यादी कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तंत्रज्ञान बाबतीत सकारात्मक पाऊल उचलायला हवे. सशक्त मनुष्यबळ म्हणजे आपल्या देशात पस्तीस वर्षे खाली पुष्कळ व्यक्ती आहेत ते भारताचे स्टेरिंग आहेत. मागणी आणि पुरवठा म्हणजे भारत देशात मोठी बाजारपेठ आहे. गुंतवणूक दर ,मागणी, ग्लोबल जागा, जागतिक पुरवठा साखळी तयार करायला हवे. आत्मनिर्भरता ही फार मोठी भिंत आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प झालेत. आत्मनिर्भरता ,स्वदेशी, स्वालंबन आवश्यक आहे. आत्मकेंद्रित होणे जरुरी नाही. राष्ट्रीय संघ वक्ते यांनी म्हटले आहे की की अमेरिकेत शेअर बाजारात घसरत आहे. त्याचा परिणाम भारत-चीन वर होत आहे. म्हणून स्थानिक उद्योजकांना संरक्षण द्यावे लागेल. covid-19 त्यामुळे अनेक कंपन्या मायदेशात आणू पाहत आहे. covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर पाचव्या वेळी देशातील जनतेला संबोधित करते वेळी आत्मनिर्भर बनले व सोबतच कोरोनाला हरवायला हवं असे मोदींनी संदेश दिला आहे.
आत्मनिर्भरता ही नवीन संकल्पना नाही. कारण गुरुकुल पद्धतीमध्ये मुले आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत होते. त्यामुळे आत्मनिर्भरता भारतीय संस्कृतीत सुरू झालेली होती.
"भारतातील विविधतेतील एकतेचे कारण
आमच्या संस्कृती आणि ज्ञानाचे उदाहरण."
सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
8007664039.
[02/06, 1:25 PM] Nagorao Yeotikar: आत्मनिर्भर व्हा !
समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परपोशीने जगणाऱ्या वनस्पतींचे काही खरे नसते कारण त्याचे संपूर्ण जीवन दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते आणि स्वयंपोशी वनस्पती स्वतःवर आत्मनिर्भर असतात म्हणून ऊन, वारा, वादळ, थंडी आणि पावसात दीर्घकाळ टिकून राहतात. माणसांचे ही तसेच नाही का ? दुसऱ्यावर जगणारा माणूस किती दिवस जगू शकेल ? शंकाच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. किती दिवस बाप-दादांच्या पैश्यावर ऐश करायचे. जोपर्यंत मनुष्य एक रूपाया कमावण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तो आळशी समजला जातो. माणसांच्या प्रगतीत आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. जो आळस झटकून काम करतो त्याच्या पदरात लक्ष्मी खेळत असते. मात्र दे रे हरी पलंगावरी या वृत्तीने जगणाऱ्या माणसाला जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते एवढे मात्र खरे आहे. आजकाल शिक्षण घेता घेता मुलाचे वय 25 ते 30 संपून जात आहेत. नोकरी लागली तर ठीक आणि नाही लागली तर बेरोजगार म्हणून तो घरावरच एकप्रकारे अवजड वाटत आहे. शिक्षण जास्त घेतल्यामुळे शेतात काम करणे लज्जास्पद वाटते तसेच त्यांच्या पात्रतेनुसार कोणते काम नसल्याने ते कोणत्याच कामात रस दाखवत नाही. शालेय जीवनात जीवन शिक्षण देऊन आत्मनिर्भर कसे राहता येईल ? हे शिकवले जात नाही त्यामूळे शिक्षण घेऊन सुद्धा तो काहीच करू शकत नाही. त्यामुळे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली म्हणजे तो भारताचा नागरिक बनतो आणि त्याच दिवसापासून देशासाठी एक तरी रूपाया कमावण्याचा विचार चालू करणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ह्या धोरणाने प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होऊ शकतो, यावर विचार करणे गरजेचे आहे. परंतु सध्या आई-वडिलांकडे भरपूर पैसा उपलब्ध आहे आणि ते आपल्या लाडक्या लेकरांसाठी किती ही पैसा खर्च करायला तयार असतात. हीच प्रवृत्ती मुलांना परावलंबी करून टाकते आणि भविष्यात तो काहीच करू शकत नाही. पूर्वीच्या कुटुंबात आणि आजच्या कुटुंबात हा एकच फरक आहे. म्हणून पूर्वीच्या एवढं आजची मुले आत्मनिर्भर नाहीत. देशात कित्येक युवक आज रिकामटेकडे फिरत असतांना दिसून येतात. त्यांनी छोटा उद्योग जरी निर्माण केलं तरी त्यात ते कमाई करू शकतात मात्र यांना दुसऱ्याच्या पदरातील गलेलठ्ठ पगाराची प्रतीक्षा असते. दहा हजार रुपये पुणे मुंबईत कमावलेले आपल्या गावाकडे कमावलेले दहा रूपायाप्रमाणे आहे. आज आपल्या देशावर आणि आपल्यावर कोरोनाचे संकट आले आहे. मोठ्या शहरातील अनेकजण आपल्या गावी परतले आहेत. बाहेर राज्यातील अनेक मजूर आपल्या स्वतःच्या राज्यात स्थलांतर झाले आहेत. आज आपली खरी परीक्षा आहे. ही योग्य वेळ आहे स्वतःमध्ये असलेली क्षमता सिद्ध करून दाखवण्याची. म्हणून कसलाही विचार मनात न आणता छोटे छोटे काम करून मोठी मोठी स्वप्ने पूर्ण करता येऊ शकतात. आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनानुसार स्वदेशी वस्तूचा वापर करू या आणि आपण स्वतः आत्मनिर्भर होऊ या. फार पूर्वीच्या काळी जी बारा बलुतेदारची पद्धत होती त्याचा थोडा अभ्यास करून गावातला माल गावात कसे खेळविता राहील यावर संशोधन करू या. गावातील पैसा बाहेरगावी जाणार नाही याचा विचार प्रत्येकांनी करून तसे रोजगार गावातच निर्माण करावे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार काम करत गेल्यास नक्कीच यश मिळेल.
- नागोराव सा. येवतीकर
[02/06, 1:44 PM] सुंदरसिंग साबळे: 34
*आत्मनिर्भर"*
===============
*सोप्या साध्या भाषेत "आत्मनिर्भर म्हणजे, "स्वतःच स्वतः बघा, स्वतःची काळजी घ्या,*
*‘करोना’ची सुटी म्हणजे मुलांना आत्मनिर्भर करण्याची संधी* करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शाळांना देण्यात आलेली सुटी ही पालकांसाठीची चांगली संधी आहे. या सुटीच्या काळात मुलांचा टीव्ही, मोबाइलचा वापर कमी करून त्यांना वाचनाची आवड लावण्याची, त्यांना स्वतंत्रपणे खेळू देण्याची, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करण्याची चांगली संधी आहे, असे बालतज्ज्ञांचे मत आहे.
‘किती वेळ घरात किंवा टीव्हीसमोर बसणार आहेस,’ ‘जरा बाहेर जा खेळायला’ असे घरोघरी उन्हाळ्याच्या सुटीत ऐकू येते. मात्र, करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, मैदानावर जाऊ देणेही शक्य नाही. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या सुटीच्या काळात मुलांचे काय करायचे असा पालकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या सुटीकडे पालकांनी सकारात्मक दृष्टीने पाहून पालकांनीही चौकटीबाहेरचा विचार करावा. जेणेकरून मुलांनाही नव्या गोष्टी शिकायला मिळतील.
काही तज्ञ वयोगटानुसार मुलांच्या कृती बदलत असतात. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना नवे शोधायचे असते. पाच ते दहा वर्षांच्या मुलांना अनुभव घ्यायचा असतो. तर दहा वर्षांपुढील मुलांना काहीतरी प्रयोग करायचा असतो, आव्हान हवे असते. वयोगट कोणताही असला, तरी मुलं रोज तेच खेळ खेळणार नाही. त्यामुळे रोज खेळण्यात वेगळेपण आणण्यासाठी काय करायचे याचा विचार करून पालकांनी मुलांना खेळू द्यावे. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून त्यांना वाचन, कृतियुक्त खेळ, कुटुंबातील व्यक्तींची ओळख, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे असे काही उपक्रम करता येऊ शकतात. आजूबाजूच्या गोष्टींवर मुलांना विचार करायला लावला पाहिजे. मुलांना ‘एंटरटेन’ करणे हा विचार न करता त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर द्यावा. मात्र, एकटे खेळू देताना काही अपघात होणार नाही याकडे लक्ष ठेवावे.
‘पालकत्व म्हणजे मुलांना चोवीस तास गुंतवणे, त्यांच्याशी खेळत राहणे नाही. पालकांकडून मुलांचा अनावश्यक बाऊ केला जातो. मुलांना सोबत घेऊन किंवा त्यांना स्वतंत्रपणे घरातील साफसफाई करायला सांगणे असे काही करणे शक्य आहे.
मुले स्वत: काही खेळ शोधू शकतात. प्रत्येक वेळी मुलांकडे लक्ष दिलेच पाहिजे असे नाही. संगणक, मोबाइल वापरणारी मुले असल्यास त्यांना शिकण्यासाठीचे व्हिडिओ दाखवता येऊ शकतात. मात्र, अचानक आलेली सुटी मुलांना स्वतंत्र करण्यासाठी, त्यांना स्वत: काही करू देण्यासाठीची संधी आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे,’
‘सुटीच्या काळात पालकांनी मुलांशी संयमाने वागल्यास मुलांशी असलेले नाते चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकते. पालकांनी आपले काम करताना मुलांना वेळ दिल्यास मुलांनाही आनंद वाटेल. आजच्या काळात हरवलेला संवाद, मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येऊ शकते,’
===============
✍️श्री.सुंदरसिंग साबळे
गोंदिया
मो.9545254856
[02/06, 2:28 PM] दुशांत निमकर: *(02) आत्मनिर्भरता*
आजपर्यत भारत देशावर अनेक आक्रमण करून वेगवेगळ्या देशांनी संपत्ती लुटली.इंग्लंड देशांनी तर भारतावर 150 वर्ष राज्य केले यामध्ये भारत देशाची अतोनात लूट केल्या गेली.पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता पण इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन भारताची अर्थव्यवस्थेला खीळ बसविली.आज भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अजुनपर्यंत विकसित देशांच्या यादीत भारताचे नाव नाही यासाठी भारतातील 130 कोटी जनतेने आत्मनिर्भरतेचे तत्व अंगी बानवून विकास केला पाहिजे.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी 'भारत-2020' या पुस्तकात भारताला महाशक्तीशाली देश बनविण्यासाठी तीन मुख्य बाबी सांगितल्या आहेत त्यात स्वातंत्र्यता,विकास आणि आत्मनिर्भरता या तीन बाबीवर देश अवलंबून आहे तेव्हाच भारत देश विकसित होऊन इतर देश भारताचा सन्मान करेल,भारत देशाचा सन्मान करण्यासाठी भारतातील युवकांनी पुढे येऊन आत्मनिर्भरता,स्वावलंबन,स्वाभिमान ठेऊन कार्य करायला हवे तेव्हाच भारत देश जगात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.
आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.ज्या देशात तरुणांची संख्या अधिक तो देश लवकरच प्रगती पथावर जाऊ शकतो.तरुणांचा मुख्य उद्देश ज्ञान मिळविणे असला तरी त्या ज्ञानाचे उपयोजन करून कौशल्य निर्माण करणे आवश्यक आहे म्हणूनच 'कौशल्य भारत' अभियानाची योजना राबवून देश आत्मनिर्भर बनविण्यास शासन स्तरावर आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन दिले जाते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून रयत शिक्षण संस्थेद्वारे 'कमवा व शिका' याचा मूलमंत्र दिला.प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा हा मूल्यातून स्वावलंबनातून देश प्रगतीपथावर नेता येऊ शकतो.विविध व्यवसाय करणारी तरुण मंडळी त्यांच्यात असलेली कौशल्य वाढीस लागावी आणि भारत देशाचा राष्ट्रीय उत्पन्न वाढून इतर देश आपल्या देशाचा सन्मान होऊ शकतो.सध्या कोरोना विषाणूने आपल्या भारतासह इतर देशात हाहाकार माजविला आहे.याच्या प्रसाराची गती रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय निवडला आहे त्यामुळे उद्योग, कारखाने,बांधकाम,सेवा,दळणवळण,वाहतूक सर्व ठप्प पडले आहेत आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जनता बाहेर जाऊन काम करण्यास धजावत नाहीत.आता जवळपास तीन महिन्यापासून व्यवहार ठप्प झाले असल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे म्हणूनच भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत योजना' ची घोषणा 12 मे 2020 रोजी केली आहे.
भारत देशाला महाशक्तीशाली देश होण्यासाठी कोणावरही अवलंबून न करता देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेऊन आत्मनिर्भर व्हायला हवे यासाठी मा.नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 20 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून ठेवलेला आहे.प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नभिन्न कौशल्य आहेत त्याचे उपयोजन करून देशाचा GDP(एकूण राष्ट्रीय उत्पन्न) वाढला पाहिजे आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्के रक्कम लघू ,मध्यम उद्योगधंद्यासाठी वापर करण्यात येईल आणि कोरोनावर मात करून पूर्ण लढाई जिंकण्यासाठी आत्मनिर्भर बनायलाच हवं.
✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
मो न 9765548949
[02/06, 2:48 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: (४०)
मनिषा पांढरे, सोलापूर
*आत्मनिर्भर*
आत्मनिर्भर याचाच दुसरा अर्थ होतो स्वावलंबन. स्वावलंबी जीवन हेच खरे जीवन. गांधीजी एवढे मोठे असूनही स्वत:चे स्वत: करत असत. कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज यांच्या शाळा स्वावलंबी शिक्षणाचे धडे देतात. आत्मनिर्भर बनायला शिकवतात. कमवा आणि शिका ही योजना सुरू करण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता. प्रत्येक नागरिकाने आत्मनिर्भरता अंगी बाणली तर देशाचा विकास होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
आज परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, मुलांनी भरपूर शिक्षण घेतले आहे आणि तुटपुंज्या पगारात नौकरी करत आहेत. गाव सोडून शहरीकरणाकडे त्यांची धाव सुरू आहे पण ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू केला तर तिथे मिळणाऱ्या पैशांपेक्षा गावाकडे पैसे तर मिळतील पण त्याचबरोबर आरोग्य, सुख, समाधान मिळेल.पण हव्यासापोटी व्यक्ती सदसद्विवेकबुद्धी हरवून बसला आहे.
शिक्षणातच विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण शिक्षणक्रम सुरू करायला हवे. व्यवसाय कौशल्य व त्याचे होणारे फायदे यांचा मुलांना अभ्यास कृतीतून करून घेतल्यास व्यवसायाचे महत्त्व लक्षात येणार आहे.ग्रामीण भागात मिळणारे उत्पन्न कमी असले तरीही ते पुरेसे असते. शहरातील पैसे महागाईमुळे परवडणारे नसते पण जनसामान्यांच्या हे लक्षात येतं नाही.
आपल्या बरोबर देशाचा विकास याचाही विचार येथे क्रमप्राप्त ठरतो. भारतीय व्यक्तीनी भारतीय वस्तू, भारतीय अॅप, इलेक्ट्रॉनिक्स, औषध सर्व आपल्या देशातील वापरल्यास बाहेर देशात जाणारा पैसा वाचवता येईल पर्यायाने भारतीयांना फायदा होईल.यासाठी आपण सर्वांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे.
चला तर मग आत्मनिर्भर बनवू, आत्मनिर्भर होऊ आणि तोच संदेश सर्वांना देऊ.🙏🏻🙏🏻
मनिषा पांढरे, सोलापूर🙏🏻
[02/06, 2:50 PM] senkude: (5)
*आत्मनिर्भर बनू या*
'स्वतः स्वतःची चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन योग्य वर्तन करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय.'प्रत्येक व्यक्तीने स्वहितासाठी व समाजहितासाठी विधायक कार्य करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय. 'आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन होय',
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हाच एक प्राणी आहे कि ज्याला हात दिलेले आहेत तेही श्रम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी नव्हे.इतर प्राण्यांना पाय तेवढे आहेत. हाताचा विश्राम, आळस हा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या हाताचा अवमान आहे. हा अवमान होता कामा नये. म्हणून प्रत्येक व्यक्तीने श्रमाचा विश्राम, विसर, अवमान होउ देता कामा नये. त्यासाठी प्रत्येकांना स्वावलंबी असणे आवश्यक आहे. या स्वावलंबनातूनच आत्मनिर्भरता निर्माण होते. मानव हा समाजशील प्राणी आहे. विचारशील प्राणी आहे. आपल्या जीवनोपयोगीचे ज्ञान दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतः मिळण्याची शक्ती तो स्वावलंबनातून प्राप्त करू शकतो. आणि आत्मनिर्भरतेने आपले जीवन जगण्यात समर्थ ठरतो. माणूस सहृदयी आहे असे आपण म्हणतो. दुसऱ्याचे सुखदुःख जाणता येणारे संवेदनशील हृदय माणसाला लाभले आहे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि त्याच्या दुःखाने दुःखी होणे हे मनुष्याची लक्षण आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणे, हे महापुरुषाचे किंवा संतांचे लक्षण आहे.
जोपर्यंत आपल्याच सुखाची चिंता असते, तोपर्यंत पशुता असते, जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरु होते, तेथे मानवतेची सुरुवात होते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही मानवतेची शिकवण अंगी ठेवून प्रत्येकाने मानवताधर्म बाळगावा. प्रत्येक मनुष्याने सामाजिक उत्तरदायित्व ओळखून निस्वार्थीपणे आपले जीवन जगावे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे
सर्वार्थाने मीच माझ्या रक्षक आहे.
व म्हणून मी माझे स्वहित व समाजहित जोपासून आत्मनिर्भर बनणार आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हादगाव जि नांदेड.
[02/06, 3:37 PM] अमित बडगे: *(38)*
*आत्मनिर्भर*
आत्मनिर्भर बना या संदेशाची टिंगल होणे ही या देशातल्या त्या लोकांच्या बिनडोक पणाची हद्द आहे !
आत्मनिर्भर हा आर्थिक विचार आहे. त्या टिंगल टवाळी करणाऱ्या तमाम नागरिकांना हे माहिती आहे का की जे ते खाण्यासाठी ( गोडे ) तेल वापरतात त्या पैकी ७५ टक्के तेल आयात केले जाते ??? साधे तेल सुद्धा ? ही कृषीप्रधान देशाला लाज आणणारी बाब नाहीय का ? असे अनेक पदार्थ आपल्याला आयात करावे लागतात. विनाकारण ! पिचकारी ते फर्निचर पर्यंत...
आंतर्राष्ट्रीय संबंधाच्या गणिताचा विचार केला तर "*बाहेरचे नका वापरू, इथे बनवा आणि आत्मनिर्भर व्हा* " असा संदेश एका पंतप्रधानाने देणे हे प्रचंड मोठे धाडस आहे हे कधी कळणार आपल्याला ? नाहीतर पुन्हा एक दिवस सोने गहाण टाकायची लज्जास्पद वेळ देशापुढे येऊ शकते ही अक्कल नसणाऱ्या लोकांना अशा अनेक वक्तव्यांची टिंगल करावी वाटते. मांडी वर करून ठुसकी सोडणाऱ्या या समस्त जनतेला जगण्याची किंमत कळत नाही हे सगळ्यात मोठे आव्हान या देशातील गरिबी संपविण्यात आहे.
टिंगलच करायची आहे तर बाबांनो स्वतःची करा. थायलंड, सिंगापूर, कोरिया सारखे देश तोंडचा घास एकदा अशाच आपल्या टिवल्या बावल्या करण्याच्या नादात पळवून घेऊन गेले. अरे मेणबत्त्या, आकाशदिवे, चप्पल अशा अनेक किरकोळ वस्तू देखील बाहेर बनलेल्या वापरताय. टिंगल स्वतःची करा. तयार कपडे बनविण्यात तुम्हाला बांगलादेशला देखील अजुनी मागे टाकता आलेले नाही. तुम्ही वापरता ते मोबाईल इथे बनत नाहीत. झाम्बियामध्ये पोलीस दलात देखील चिनी लोक घुसडण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ही जबाबदारी सरकारची नाहीय. मुर्खानो बाबासाहेबांच्या कृपेने हा देश प्रजासत्ताक बनलाय. त्याचा अर्थ अजुनी तुम्हाला समजला नाही, त्यामुळे आरश्यात बघून दिसणाऱ्या चेहऱ्याची टिंगल करा आणि मग थोडी जरी लाज बाकी असेल तर कामाला लागा, नाहीतर एक दिवस स्पेन सारखी सरणावर चढवायची लाकडे देखील चीनमधून आयात करावी लागतील.
-अमित प्र. बडगे, नागपूर
(7030269143)
[02/06, 4:01 PM] शुभदा दीक्षित: (11)
आत्मनिर्भरता : एक गरज
" किनारे पर बैठे रहने से नदियाँ पार नही होती l आत्मनिर्भर व्यक्ती को मंजिल मिल ही जाती है l उसकी कभी हार नही होती "l
खरंच नुसते नदीच्या काठावर बसून काय होणार? 'ये रे हरी अन् दे रे खाटल्यावरी' असे कधीच होत नाही. आपण स्वतः हात-पाय हलवल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही.आत्मनिर्भर असणे अतिशय गरजेचे आहे.
आत्मनिर्भरता या शब्दाची आत्म + निर्भय +ता अशी फोड होते. आत्म म्हणजे स्वतः. निर्भयता म्हणजे अवलंबून असणे. कुठलेही काम करताना आपण स्वतःवरच अवलंबून असले पाहिजे. 'दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला'. हा अनुभव आपण कित्येकदा घेतो.
जी माणसे आपल्या जीवनाचा लगाम आपल्या हातात ठेवतात, ती माणसे लवकर आत्मनिर्भर होतात. आत्मनिर्भर लोकांना आपले लक्ष्य साध्य करण्यास दुसऱ्याची जरुरी लागत नाही. अशा लोकांना आपल्या समस्यांवर उपाय शोधून स्वतः त्या समस्यांवर मात करण्याचे स्वातंत्र्य असते. आत्मनिर्भर माणूस नेहमीच अधिक समाधानी व अधिक यशस्वी असतो.
आत्मनिर्भर होण्यासाठी आपण स्वतः जसे आहोत तसेच स्वीकारायला पाहिजे. आपले शरीर, आपले व्यक्तिमत्त्व, आपले विचार, आपली आवड आणि जीवन जसे आहेत ते स्वीकारले पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करू. आपल्या हातून झालेल्या चुका विसरुन, त्यातून धडा घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे.
आत्मनिर्भर बनवायचे असल्यास स्वतःवर विश्वास ठेवा. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात. दुसऱ्याची मदत लागत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाहीत, तर दुसरे कशाला ठेवतील?
आत्मनिर्भर माणसाला कसलीही घमेंड असता कामा नये. जग जसे आहे तसे स्वीकारा. जगातील चांगले काय किंवा वाईट काय याचा शोध सतर्क राहून घ्या. त्याप्रमाणे आचरण ठेवा.
भावनात्मक आधारासाठी प्रथम आई-वडील, जवळचे मित्र, भाऊ-बहीण यावर अवलंबून असाल तर ते तुम्हाला किती दिवस पुरणार? तुम्ही आयुष्यभर त्यांच्यावर अवलंबून राहू शकता का? ते तुम्हाला सोडून लांब गेले तर? तेव्हा भावनात्मक आत्मनिर्भरता हवीच. आपला आनंद दुसर्या कोणावर अवलंबून असता कामा नये. तुम्ही स्वतः स्वतःला ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करा, प्रोत्साहित करा.
जगाने पक्षपातीपणा केला, तुम्हाला वाईट म्हटले तरी लक्ष न देता स्वतःला proove करा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आपले ज्ञान, माहिती अद्ययावत ठेवा.
आत्मनिर्भर होण्याचा आनंद, समाधान काही वेगळेच असते. जेव्हा आर्थिक आत्मनिर्भरता येते, तेव्हा भरून पाहिल्या सारखे वाटते. पहिली नोकरी, पहिला पगार, याचा आनंद वेगळाच.
महात्मा गांधींचे म्हणणे होते भारतातील गांधीजींचे म्हणणे होते भारतातील कारखानदारांच्या समोर दोन मार्ग आहेत. एक- अधिकाधिक उत्पादन आणि दुसरा- अधिकाअधिक लोकांच्या द्वारा उत्पादन. पहिल्या मार्गाने आपण आर्थिक गुलामीच्या दिशेने जाऊ. दुसरा- आर्थिक आत्मनिर्भर तेच्या मार्गावरून आपल्याला पुढे येईल.
देश आत्मनिर्भर होणे याचा अर्थ देशासाठी आवश्यक सर्व वस्तूंची निर्मिती देशातच केली जाणे. त्यासाठी कुठल्याही बाहेरच्या देशावर अवलंबून असता कामा नये. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी 'मेक इन इंडिया' हे अभियान राबवले.
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारी मुळे निर्माण झालेल्या संकटावर आपल्याला मात केली पाहिजे. त्यातील आर्थिक मंदीचे संकट महत्त्वाचे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी 'आत्मनिर्भर भारत अभियान' ची घोषणा केली. गृह उद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आत्मनिर्भर भारताची इमारत पाच बळकट खांबांवर उभे राहील. 1) अर्थव्यवस्था 2) पायाभूत सुविधा 3) तंत्रज्ञानाधारित व्यवस्था 4) आपली डेमोग्राफी 5) मागणी. पं. मोदींनी आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे आव्हान सर्व भारतीयांना केले आहे. स्थानिक उत्पादनच जीवनमंत्र बनवायचा. भारत आत्मनिर्भर झाला की एकविसावे शतक भारताचे असेल. ही जबाबदारीही त्यांनी देशवासीयांनी वर टाकली आहे. त्यांनी असेही म्हटले की, "आमच्या आत्मनिर्भरते च्या व्याख्येत आत्मकेंद्री पणा येत नाही. 'वसुधैव कुटुम्बकम' या उक्तीवर भारत विश्वास ठेवतो."
प्रत्येक भारतीय आत्मनिर्भर झाला, तर पर्यायाने देश पण आत्मनिर्भर होईलच. म्हणूनच आपण म्हणू या,
लोगोंको आत्मनिर्भरता का पाठ पढाना है l
लोगों को स्वदेशी वस्तुओं के लाभ बताना है l अर्थव्यवस्था में सबको भागीदारी निभाना है l
हम सबको यथासंभव स्वदेशी ही अपनाना है l
शुभदा दीक्षित (11)
पुणे
[02/06, 4:27 PM] महेंद्र सोनवने: (08)
*भारत-आत्मनिर्भर*
आत्मनिर्भरतेचा उपयोग समाजातल्या कोणत्या स्तरातल्या, क्षेत्रातल्या लोकांना याचा फायदा होईल, आत्मनिर्याभर योजनेची अंमलबजावणी कशी होईल, असंघटित क्षेत्रासाठी यात काय आहे यासंदर्भात माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं होतं. आपल्या या संबोधनात त्यांनी भारताला 'आत्मनिर्भर' म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा कार्यक्रम दिला.
'आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी लाखो कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या दहा टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसंच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे. असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. त्यानूसार लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती दिली.
यापूर्वी केंद्र सरकारनं गरीबांसाठी लाखो कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकरी, गोरगरीब, रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातले मजूर अशा घटकांचा विचार केला होता. लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार. स्थानिक ब्रँड्सना जागतिक बनवण्याचं लक्ष्यकोरोनाच्या काळातही देशासमोर संधी असल्याचं पंतप्रधान मानतात.
आवास, आणि उज्ज्वला योजनांतून गरिबांना फायदा होत आहे. कोटी रुपयांचा आयकर परतावा करदात्यांना आतापर्यंत दिला, अनेक कोटी मध्यमवर्गीयांना त्यातून फायदा मिळाला.
MSME कंपन्यांसाठी करमाफीसाठी पंचेवीस कोटी रुपये,बारा महिन्यांचा करहप्ता स्थगित करण्याची सोय,
लघु आणि कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांची कर्ज योजना
अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी कोटीं रुपयांचा निधी मध्यम आणि सूक्ष्म आकाराच्या आणि अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी कोटी रुपयांचा निधी तयार करणार. लाखो उद्योजकांना याचा फायदा होईल. लघु, कुटीर उद्योगांना कर्ज दिलं जाणारं .
सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी लघु आणि मध्यमआकाराच्या उद्योजकांना प्रोत्साहनमिळत आहे.
बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न, नोंदणी आणि पूर्णत्वाचा दाखला सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवण्याचा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश देण्यात आले.
कोव्हिड-19 नंतर उद्योजकांचा माल खपावा यासाठी ट्रेड फेअर शक्य होणार नाहीत. अशावेळी ई-फेअरची सोय करून देणार ज्यांना आधी लिहिलेला लाभ मिळणार नाही, अशांसाठी आता EPF चा हप्ता बारा टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
यातून लोकांकडे जास्त पैसे खेळतील. लोकांकडे अनेक संधी चालून येत आहे.आत्मनिर्भर होण्यासाठी मार्ग मोकळे होत आहेत.आनैकांना रोजगार उपलब्ध होण्यास मार्ग सुकर झालेत.निर्यात ही वाढेल. या सर्व संधीचे सोने केले तर आणि भविष्याच्या वेध घेत आज मेहनत केली तर आपला आत्मनिर्भर भारत उभा करू हे निश्चितच !!
________________________
*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
*मो. (9421802067 )*
[02/06, 5:04 PM] Bharti Sawant: आत्मनिर्भर
मनुष्यजन्म म्हणजे प्रज्ञावान बुद्धीवंतांचा जन्म. यात आत्मनिर्भर होण्यासाठी बालपणापासूनच धडपड होताना दिसते.मूल जन्मले की हात-पाय हलवू लागते म्हणजे स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत असते. आईकडुन ,कुटुंबाकडून आत्मनिर्भरतेचे धडे द्यायला सुरवात होते. स्वतःच्या स्वच्छतेच्या, कामाच्या गोष्टी शिकत असताना त्याचे शाळेत पाऊल पडते. त्याची स्वत:साठी जीवन जगण्याची आत्मनिर्भरतेची धडपड चालू होते.
स्वतःचे दप्तर,वस्तू सांभाळणे, गृहपाठ करणे, हाताने जेवण करताना किंवा दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः कशी करायची हेही शिकवले जाते. त्याच्या बुद्धीची कार्यक्षमता वाढते. ते मूल आपसुकच हुशार आणि शहाणे बनते. अमुक आपलेच काम आहे नि आपणालाच करून आपले पुढचे आयुष्य काढायचे आहे हे समजून जाते.त्यासाठी आपणच हातपाय हलवून चांगले जीवन व्यतित करण्यासाठी स्वयंप्रयत्न करायचा आहे हे समजून जाते. शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने कंगाल झाले तर सरकारकडून त्यांना मदत पुरवली जाते. त्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होते. कितीतरी तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी, स्वयंरोजगार किंवा स्वयंउद्योग चालू करण्यासाठी सरकारकडून सबसिडी मिळते.त्या युवकाचा आपल्या व्यवसायात जम बसल्यानंतर सरकारचे देणे तो फेडू शकतो. परंतु सुरुवातीला त्याच्याकडे भांडवल नसेल तर तो नवीन व्यवसाय कसा करू शकणार ??....म्हणून युवकांना नवीन उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी कमी व्याजदराचे कर्ज ही पुरवले जाते.
मुलगा आत्मनिर्भर होण्यासाठी आई वडील मुलाला मनाजोगे शिक्षण देतात. आपल्या कुवतीप्रमाणे पैसे पुरवतात. त्यांची इतकीच माफक अपेक्षा असते की मुलांने मिळालेल्या संधीचे सोने करून यशाच्या शिखरावर जावे. आपल्या मेहनतीने पुरवलेल्या पैशाचा विनियोग योग्य मार्गाने करावा. प्रसंगी ते आपल्या अपत्याला सल्लाही देतात.परदेशात मूल अठरा वर्षाचे झाले की आत्मनिर्भर बनते. स्वतःच स्वतःच्या हिमतीवर, कष्टावर पोट भरायला लागते. परंतु संस्कृती प्रधान असणार्या भारत देशात आईवडिल नि अपत्याचे खूप जिव्हाळ्याचे नाते असते. त्यांची सर्व कमाई त्यांच्या उपयोगी पडावी हाच प्रयास असतो.त्यामुळे मूल जोवर आत्मनिर्भर होत नाही तोवर आई-वडील त्याचे पालनपोषण करत असतात. त्याला लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवत असतात.एकदा मुल आत्मनिर्भर झाले की ते जबाबदारीतून मुक्त होतात. त्यामुळे जोवर मुलाची कमाई पुरेशी नसते तोवर आई-वडील त्याचे भरण-पोषण करतात. त्याला एकटेपणा जाणवू देत नाहीत.
सौ.भारती सावंत
मुंबई
[02/06, 5:05 PM] Hanmant Padwal: १)
*आत्मनिर्भरता*
स्वावलंबी जीवन शैली केव्हाही चांगली असू शकते. मला कोणाचीही गरज भासणार नाही असा अहम किंवा अभिमान असणे, आणि सर्वानाच माझी गरज आहे असा गर्वही असू नये. आत्मनिर्भरतेच्या बाबतीमध्ये स्वावलंबन हा शब्द महात्मा गांधीनी वापरला होता. स्वावलंबन म्हणजे स्वतःचे कार्य स्वतः करणे म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण आपले सर्व कार्य किंवा स्वयंपूर्ण असणे. दुसऱ्यावर अवलंबून असणे म्हणजे भीक मागून जगण्यासारखेच नाही का..? स्वावलंबी जीवन हे आपल्या स्वतःला ओळखण्याचे साधन आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची क्षमता आपल्या मध्ये असली पाहिजे. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आणि स्वावलंबन म्हणजे कठोर परिश्रम आणि ती क्षमता निर्माण करण्याचे सामर्थ्य स्वावलंबनाने असते. वास्तवात जगून आशावादी राहण्याचे सामर्थ्य स्वावलंबनाने येते. खरं पाहिलं तर स्वावलंबनाचा असा अर्थ होतो की स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे, जो मनुष्य स्वतःला स्वतः मदत करत नाही त्याला ईश्वरही मदत करत नाही असे आपण बऱ्याच वेळा ऐकतो. अर्थात आपण स्वावलंबी असने हाच त्याचा मतितार्थ होतो. आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपला देश सुद्धा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर , स्वावलंबी आहे. बऱ्याच वेळेला काही क्षमता आपल्यामध्ये असतानादेखील मित्र देशाकडून किंवा इतर देशाकडून अनेक उत्पादने आपण विकत घेत असतो. आणि खरं पाहिलं तर आपल्यात क्षमता असून आपण दुसर्या देशाचा त्यामुळे फायदा करत असतो. कोरोना काळाच्या संदर्भात सर्व भारतीय अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकांना आवाहन केले की आता निर्भर बनले पाहिजे आत्मनिर्भर बनले पाहिजे. पूर्वीच्या काळात खेडी स्वयंपूर्ण होती म्हणजेच आत्मनिर्भर होते. गावातील लोकांच्या गरजा स्थानिक पातळीवर भागवल्या जायच्या. बाहेरच्या लोकांकडून किंवा बाहेरच्या वस्तूवर गावातील लोक अवलंबून नसायचे. स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करत होते. आज भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा सक्षम बनवण्यासाठी. भारतामध्ये तयार झालेला माल आणि भारतीयांनी केलेल्या वस्तू भारतीयांनी विकत घेतल्या पाहिजेत. म्हणून स्वदेशीचा नारा जपत देशाला आत्मनिर्भर करण्याची वेळ आली आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी निश्चय करूया आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेला पुन्हा मजबूत करूया.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
[02/06, 5:09 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ विषय : -"आत्मनिर्भर" आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी बनने.आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबीपणे आपले जीवन जगत राहीले पाहिजे. आपण लहान असताना आपले आई वडील आआपले पालन पोषन करीत असतात.पण आपण सज्ञान झाले नंतर आई वडीलांच्या वर अवलंबून न राहता उलट आई ववडीलांना आपण स्वतः म्हटले पाहिजे आता तुम्ही काही काम करायचे नाही.आता मी सक्षम झालो आहे. मी माझे पायावर उभा राहू शकतो.मी मा.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विध्यार्थी आहे.आमच्या रयत संस्थेचे ब्रीद वाक्य आहे " स्वालंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद"आहे.त्यामुळे तुमची सर्व जबाबदारी योगाने माझी आहे. मी आपली असणारी शेती मी करणार आहे त्याला जोडून एखादा उधोग सुरु करणार आहे मी आता स्वत:च्या पायावर उभा राहणार आहे एकेदिवशी कर्मवीर अण्णा त्यांचे घरी पाहुणे व वडिलांचे सोबत जेवत असताना पाहुणे यांनी वडीलांना विचारले भाऊराव सध्या काय करतात ? तेव्हा वडील म्हणतात काही नाही फिरणे भूक लागली की घरात येवून जेवणे याशिवाय त्यांना काहीच काम नाही भरल्या ताटावरून ताडकन ऊठले या ठिकाणी त्यांचे मन दुखवले गेले त्यानंतर काहीतरी करून दाखवले शिवाय घराचे तोंड पाहणार नाही ते च पुढे गरीबांच्या दारात शिक्षणाचा गंगोत्री घेवछन येणारे थोर शिक्षण महर्षी झाले महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी कार्यरत असणारी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आज लाखो विध्यार्थी शिकून बाहेर पडून लाखो शिकत आहेत.शिकत असताना मुलांच्या साठी "कमवा व शिका" ही योजना सुरू केली मुले काम करून त्यापैशाच्या मोबदल्यात शिकत होती.त्या मुलांना शाळेतूनच आत्मनिर्भर बनण्याचे धडे मिळत होते.त्यामुळे रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आत्मनिर्भर होवूनच काम केलेले आपणास जागोजागी पाहवयास मिळतील.सध्याच्या या कोरोना महामारीच्या संकटात प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे.आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.कोणी तरी म्हटलेले आहे."ना ही कद बडा होता है और ना पद बडा होता है बडा वो होता है,जो मुसीबत में एक दुसरे के लिए हमेशा खडा होता है ।"त्यामुळे या कोरोना संकट समयी सर्वानी एकजूट होवून आत्मनिर्भर बनले पाहिजे. वेगवेगळे उध्योग स्वतः सुरू करून आत्मनिर्भर झाले पाहिजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भय योजना आणली आहे त्या साठी २० लाख करोड पैकेज आणले आहे त्याचा फायदा करून घ्यावा.त्यामध्ये जे पाच खांब म्हणजे अर्थव्यवस्था,पाया भूत सुविधा, तंत्रधानाधिरात व्यवस्था,आपली डेमो ग्राफी आणि मागणी तसेच हे पैकेज ग्रहधोग,छोटे, मध्यम आकाराचे उध्योग असे सुरू करून आत्मनिर्भर बनण्याचा आपल्या कुवतीनुसार किवा पात्रते नुसार प्रयत्न केला पाहिजे.आपण नेहमी भविष्य काळाचा विचार केला पाहिजे.या ठिकाणी एक विचार पुढील प्रमाणे आपले लक्ष वेधून घेईल" वाहनांची पुढची काच कधीहि मोठी असते. आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण कालचक्रात भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे.तेव्हा मागे तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा.मात्र भविष्य काळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात रहा.यामधून आपण आत्मनिर्भर होणेचाच संदेश प्रत्येकाने घेतला पाहिजे..... लेखक..जी.एस.कुचेकर -पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा. मो.नं.७५८८५६०७६१.
[02/06, 5:32 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*आत्मनिर्भर*
आज प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. कोविड19 या आजाराने तर प्रत्येकाला हे शिकवून दिले. कुणी सांगेल का आणि कुणी करेल का अशी स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत अभियान'ची घोषणा केली. या अभियानासाठी भारताच्या GDP च्या 10 टक्के रक्कम म्हणजे 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली. हे पॅकेज 2020 मध्ये या अभियानाला नवी गती देईल.या मध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
गृहउद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे.आत्मनिर्भर
भारत अभियान हा पुढील पाच गोष्टींवर आधारित आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी.
या पाच गोष्टी आत्मनिर्भर भारत अभियान चा गाभा आहे.
आपण भारताला आत्मनिर्भर (स्वावलंबी) नक्की बनवू, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला.
मोदींनी फक्त आशावाद केलेला आहे ते प्रत्यक्षात साकारण्याची भुमिका सर्व भारतीयांची आहे. प्रत्येकाला आत्मनिर्भर, स्वावलंबी जीवन जगायला आवडते. असा कुणीही नाही ज्याला दुसर्याची गुलामी किंवा परावलंबित्व आवडत असेल.
आत्मनिर्भर बनण्याकरिता कठोर परिश्रम व प्रबळ इच्छाशक्ती ची गरज आहे. आधीच्या काळात लोकं आत्मनिर्भर होती. जसजसे शहरीकरण व लोकसंख्या वाढत गेली तसतसे परावलंबित्व सुद्धा वाढु लागले. त्या काळात प्रत्येक व्यक्ति स्वावलंबी होता. स्वतः ची कामे व स्वतःच्या आत्मनिर्भर तेवर आपल्या कुटूंबाची जबाबदारी आनंदाने पार पाडायचा.
आज कोविड19 आला आणि लाकडाऊन झाले तेव्हा सर्वांना कळून चुकलं की आता आपल्याला आत्मनिर्भर बनने किती गरजेचे आहे. आज सगळे शहर सोडून गावाकडे आलेत ते एक निश्चय करून की यानंतर स्वबळावर आपल्या गावातच छोटे मोठे उद्योग करून कुटुंबाचं पालन पोषण करेन पण शहराकडे जाणार नाही. आत्मनिर्भर होण्यासाठी या दृढनिश्चयी व कठिण परिस्थिती ला सामोरे जाण्याची तयारी पाहिजे. आता सर्वांना आत्मनिर्भर होण्यासाठी मार्ग मोकळे होत आहेत. हीच खरी वेळ आहे प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्याची.
चला तर मग आज सर्व निश्चय करूया आत्मनिर्भर बनण्याचा आणि संधीचं सोनं करुया. मग उशीर कशाला 'कल करे सो आज कल, आज करे सो अभी' या हिंदी तील उक्तीप्रमाणे आपण सगळेच आतापासूनच आत्मनिर्भर बनू व आत्मनिर्भर भारत बनवून दाखवू.
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
[02/06, 5:43 PM] Milind Gaddamwar: आम्ही " आत्मनिर्भर " आहोत कां ?
मनुष्य प्राणी किंवा कोणताही जीव जन्माला येतो तेंव्हा तो परावलंबी असतो. त्याचे पालन पोषण-उदरभरण हे मातेच्या अमृततुल्य दुधावर अवलंबून असते. त्याशिवाय तो क्षणभरही जीवंत राहू शकत नाही.निसर्गानेच जन्मतः सर्वाच्या पालनपोषणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे.म्हणूनच त्याने ही जीवसृष्टी निर्माण केलेली आहे.असे असतांना आत्मनिर्भर होण्याचा प्रश्न उपस्थित कां होतो आहे ? तसाही मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.तो समुहाने राहणेच पसंत करतो. बरेचसे प्राणी हे पण समुहाने,कळपाने राहणेच पसंत करतात.यामागे सुरक्षिततेची भावना आणि मरणाची भिती ही कारणीभूत असते. प्रत्येकाला आपल्या जीवाची भिती असते.मनुष्य प्राणी हा सर्वात जास्त मरणाला घाबरत असतो.स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आत्मनिर्भरता ही महत्त्वाची असते.
आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वत:च्या
पायावर ऊभे होणे होय.आजच्या काळात संपुर्ण जग हे खुले झालेले असल्याने मनुष्य प्राणी हा संपुर्ण जगावर आपली छाप पाडू शकतो.आपला व्यवसाय सातासमुद्रापार नेऊ शकतो.यासाठी स्वत:चे सामर्थ्य ओळखून आपले साम्राज्य उभे करावे लागते. आत्मनिर्भर होणे म्हणजे कुणाचिही मदत न घेता स्वबळावर आपला उद्योग-व्यवसाय स्थापीत करणे होय. आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे म्हणजे काय ? थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले कुठलेही काम कुणावाचून अडले नाही पाहिजे.हीच गोष्ट प्रत्येक मनुष्याला लागू पडते. परंतु प्रत्यक्षात हे शक्य आहे आहे कां ? याचे उत्तर नाईलाजाने नाही असे मिळते.कारण एकमेकांशिवाय,एकमेकांची मदत घेतल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. अशी निर्मिती ही निसर्गानेच केलेली आहे.
आपण आत्मनिर्भर झालो पाहिजे म्हणजे आपले स्वबळावर आर्थिक साम्राज्य उभे राहिले पाहिजे.आपले कुणावाचूनही अडले नाही पाहिजे.यातूनच अहंकाराची निर्मिती ही होत असते.सर्वांना सोबत घेऊन चालणे,सर्वांच्या सुखदुःखाचा विचार करणे हेच मनुष्याच्या जीवंतपणाचे लक्षण समजले जाते.आत्मकेंद्रीत मनुष्य हा यशाचा मोठा पल्ला गाठू शकत नाही.जो स्वयेची कष्टत गेला त्याचा कार्यभाग साधला.जो दुस-यावरी विश्र्वासला त्याचा कार्यभाग बुडाला अशी म्हण प्रचलित आहे.हे एखाद्या व्यक्तीपुरता सिमीत आहे.हाच भारतीय स्वभाव बनलेला आहे.म्हणूनच आपली प्रगती ही बेताचीच किंवा सिमीत राहीलेली आहे.भारतीय लोक बाजारपेठेतील आव्हानांचा मुकाबला करण्यात कमी पडतात.आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.एकापेक्षा एक आव्हाने समोर उभी आहेत.या आव्हानांना तोंड देण्याची आपली तयारी असली पाहिजे.काळानुसार व्यवसाय, उद्योग धंद्यात बदल हा घडवून आणता आला पाहिजे.यासाठी लागणारे कौशल्य विकसित करण्याची आपली तयारी असली पाहिजे.
आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वत:चे काम कुठेही अडता कामा नये.समजा शिक्षक व्यवसाय स्विकारला तर शिक्षणातील नवनविन आव्हानांचा सामना हा करता आला पाहिजे.जसे आज संगणकाचे ज्ञान असणे आणि ते हाताळता येणे ही काळाची गरज बनली आहे. आत्मनिर्भर होणे म्हणजे आपल्या क्षेत्रातले संपुर्ण ज्ञान प्राप्त करणे होय.असे असले तरीही एखाद्या कमी शिक्षीत व्यक्तीकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य हे असू शकते.जसे दिवंगत धिरूभाई अंबानी यांचे सोदाहरण घेता येईल.ते गल्फ कंट्री मध्ये एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते.पेट्रोल भरता भरता आपण पेट्रोल च्या विहीरी भाडे तत्त्वावर घेऊन भारतात पेट्रोल विक्री केली तर आपले स्वत:चे पेट्रोल
पंप असतील आणि यातून मिळणारा नफा हा जास्त असू शकेल असे त्यांना वाटले. आज पेट्रोलियम च्या व्यवसायात त्यांची मुलें ही अग्रेसर आहेत.थोडक्यात काय तर आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वावलंबी होणे होय.
आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला आहे.यासाठी शेतकरीवर्गांनी घेतलेली मेहनत ही कारणीभूत ठरते आहे.यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे.संपुर्ण देशाला तीन वर्ष पुरेल एवढा अन्नधान्य साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे.ही देशासाठी अभिमानाची बाब असली तरी शेतक-यांच्या जीवावर उठली आहे.कारण यामुळे शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आहे. शेतकरी वर्ग हवालदील झालेला आहे.तो आत्महत्तेस प्रवृत्त होतो आहे.ही एक विडंबनाच म्हणावी लागेल.आज आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.भारतात टॅलेंट ची कमी नाही तर ती वापरून घेतल्याची क्षमता आपल्या राज्यकर्त्यात नसलेल्या कारणाने आपली बुद्धी, टॅलेंट हे अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रे पैशाच्या जोरावर वापरून घेत आहेत.भारत सरकारने याकडे लक्ष देऊन आपल्या लोकांना,तरुणांना प्रोत्साहीत केले पाहिजे.त्यांना जास्तीचे पेमेंट देऊन भारतात बोलविले पाहिजे.तरच आपला देश ख-या अर्थाने आत्मनिर्भर होवू शकेल असे वाटते.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा
भ्र.क्र.९५११२१५२००
[02/06, 5:46 PM] Manik Nagave: 07 लेख
आत्मनिर्भर
आत्मनिर्भर शब्द आजकाल खूपच लोकप्रिय झाला आहे. आत्म - स्वतः, निर्भर - अवलंबून. म्हणजेच स्वत:वर अवलंबून राहणे होय.आपले पंतप्रधान पी.एम.मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरक्षा निधी योजना सुरु करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे.12 मे ला राष्ट्रीला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी या आत्मनिर्भर योजनेबद्दल जाहीर केलं. वहे कोविड-19 चं संकट आपल्या देशावर आलेलं आहे त्यातून देशवासियांना सावरण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी ही योजना जाहीर केली.यामुळे संपूर्ण जगात भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.या योजनेद्वारे मा.पंतप्रधानांना 130 करोड भारतीय जनतेला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या 20 लाख करोड निधीचा वापर करणार आहेत.कारण कोविड- 19 च्या महामारीच्या कालावधीत जनता आपले संतुलन न हरवता आलेल्या संकटाला निर्भयपणे तोंड देतील.हा निधी म्हणजे या संकटाच्या काळात लोकांना दिलेला आधार आहे.
देशात केस कापणारे, चांभार काम करणारे, पानपट्टी ची दुकाने,परीट लोकांची दुकाने, हात गाडा ढकलगाडा घेऊन फिरणारे छोटे-मोठे व्यापारी अशा लोकांचे या लोकडाऊनच्या कालावधीमध्ये फार मोठे नुकसान झालेले आहे. या लोकांना प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात आलेली आहे. ज्या अंतर्गत बँकेतर्फे दहा हजार चे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. जेणेकरून हे लोक आपल्या पायावर उभे राहू शकतील.
याचा अर्थ असा होतो की कोणतेही काम करत असताना आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून न राहता जर स्वतःकडे भांडवल असेल तर ती व्यक्ती आपले काम आपण करून आपल्याला लागणारा पैसा स्वतः कमवू लागेल. त्या व्यक्तीला कर्ज काढावे लागणार नाही. कर्ज काढले की बऱ्याच वेळेला व्यक्तीला कर्जाचे व्याज भरूनच तिच्या नाकीनऊ येत असते. समाजामध्ये सुद्धा आपण अशी अनेक उदाहरणे पाहत असतो की ज्या व्यक्तींमध्ये स्वतः कमावण्याची अक्कल नसते किंवा अक्कल जरी असली तरीसुद्धा त्याच्याकडे भांडवल नसते अशा वेळेला त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या हाताखाली आपले मन मारून रहावे लागते. तेच जर त्या व्यक्ती जवळ भांडवल असेल ती व्यक्ती स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वाभिमानाने जगू शकते. जीवनात जर आपल्याला आत्मनिर्भर होऊन जगायचे असेल तर आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून आपले जीवन यशस्वी बनवण्याकडे आपला कल असला पाहिजे."अब पछताएँ क्या होय,जब चिडीयाँ चुग गयी खेत "म्हणजे नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही.
आत्मनिर्भर बना.स्वतः बरोबर देशाचा विकास करा.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[02/06, 5:53 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13
आत्मनिर्भर भारत
मूल जन्माला आले की आई वडील त्याची काळजी घेतात त्याला स्वतःच्या पायावर चालण्याची ताकद येईपर्यंत सांभाळतात. आई वडील सतत म्हणतात; तू तुझ्या पायावर उभा राहिला म्हणजे माझी काळजी मिटली; म्हणजेच प्रत्येकाने स्वतःच्या जीवनासाठी आवश्यक कौशल्य शिकून घेतली व उदरनिर्वाहासाठी योग्य साधनसामुग्री जुळवली म्हणजेच तो आत्मनिर्भर झाला असे म्हणता येते.
व्यक्ती आत्मनिर्भर झाला म्हणजे समाज आत्मनिर्भर होतो आणि समाजात आत्मनिर्भर झाला म्हणजेच देश सुद्धा आत्मनिर्भर होतो. मग आज आपल्या भारतात मध्ये आहे का या प्रश्नाचे उत्तर? शोधल्यास आपल्याला नाही असे उत्तर येईल का कारण आपण घरांमध्ये ज्या नेहमी वस्तू वापरतो त्यात किती वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत? साबण, तेल , ते जीवनावश्यक औषधे, प्लास्टिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने,सौंदर्यप्रसाधने,भारतीय बनावटीच्या आहेत काय? कोण कोणत्या वस्तू भारतामध्ये तयार होतात हे तरी आपल्या भारतीयांना माहित आहे काय?
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे इथे राज्य होते इंग्रज भारतामधून कच्चामाल त्यांच्या देशांमध्ये नेत तिथे वस्त्रे बनवत आणि ते पुन्हा आपल्या भारतात आणून विकत असत आणि भारतीयांना ती घेण्यात मोठेपणा वाटत असेल परंतु स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली आणि 'चलेजाव' हा नारा दिला गेला तेव्हा चलेजाव मध्ये विदेशी वस्तूंना देखील चलेजाव म्हटले गेले व स्वदेशी कल्पना भारतामध्ये रुजू लागली. परदेशी कापड परदेशी, वस्तू, परदेशी पदव्या इत्यादींचा भारतीय त्याग करू करू लागले त्यामुळे आपल्याला स्वदेशीचे महत्त्व कळू लागले. हे झाले स्वातंत्र्य मिळेपर्यंत असे परंतु स्वातंत्र्यानंतर काय झाले? आपण स्वतंत्र झालो परंतु खऱ्या अर्थाने आपण आपल्या गरजांसाठी परकीयांवर अवलंबून राहिलो. महात्मा गांधीजींचे म्हणणे असे होते खेडी जर आत्मनिर्भर बनली तर शहराकडे येणारे नागरिकांचे लोंढे नक्कीच थांबतील. भारत संगणकामध्ये आत्मनिर्भर झाला तो 'परम' संगणकाच्या रूपात पहिल्यांदा भारताने संगणक बनवला आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. अवकाश यानाच्या बाबतीत देखील सुरुवातीला भारत रशिया अमेरिका या देशांवर अवलंबून होता परंतु मंगळ ग्रहा वर जेव्हा यान पाठवले तेव्हा मात्र भारताने संपूर्ण स्वदेशी पद्धतीने यान बनवले व त्यात ते यशस्वी झाले. युद्ध साहित्याच्या बाबतीतही तसेच अनेक तोफा ,लढाऊ विमाने परदेशी बनावटीची आहेत युद्धनौका ही परदेशी बनावटीच्या परंतु भारताने ठरवले तर तो प्रत्येक गोष्टीत आत्मनिर्भर होऊ शकतो हे त्याने काही उदाहरणातून दाखवून दिले. संशोधन क्षेत्रात आपण अग्नि क्षेपणास्त्र बनवले आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले संशोधनातही भारत अग्रेसर आहे व तो आत्मनिर्भर होऊ शकतो. परदेशातून आपण ज्या काही वस्तू मागवतो किंवा संशोधनासाठी जे काही सहाय्य घेतो त्यासाठी खूप मोठी रक्कम भारताला मोजावी लागते. जेव्हा मंगळयान बनवले तेव्हा कमी खर्चात ते कसे बनवावे यावर भारतीयांनी खूप काथ्याकूट केला व त्यातून ते बनले म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्ता असल्यावर तुम्ही आत्मनिर्भर नक्कीच होऊ शकता पैसा ही तुमची अडचण असू शकत नाही.
चीन हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारा देश आहे. चीनकडे युद्धसामग्री असो किंवा सैन्य बल किंवा इतर साधनसामुग्री असोत तिथे स्वदेशी वापरण्याची सक्ती केली जाते त्यामुळे तेथील स्थानिक उद्योगधंद्यांना उत्तेजन मिळते परिणामी त्यांना विकासासाठी संधी उपलब्ध होतात व ते आत्मनिर्भर झाले आहेत. भारताची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे इथे असणारा सर्वात मोठा तरुण वर्ग कुशल कामगार आहे. आज जगाला मनुष्य बळ पुरविणारा एक महत्त्वाचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. संगणक क्षेत्रात तर आपली तरुणाई अगदी झपाट्याने उतरली आहे .बुद्धिमत्ता आपल्याकडे अफाट आहे परंतु उणीव आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची आज इथला तरुण परदेशात नोकरी करतो. आयुष्यभर पैसा कमावतो आणि मग पुन्हा भारतामध्ये येतो. परंतु त्याने आपली ही बुद्धिमत्ता आपल्या देशासाठी वापरली तर तो स्वतः बरोबरच देशाच्या आर्थिक विकासात योगदान नक्की देऊ शकतो. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी परदेशात चाललेला हा बुद्धिमत्तेचा लोंढा थांबवायला हवा .उद्योग उभारणीसाठी मनुष्यबळ ,जमीन, पैसा, सचोटी, चिकाटी हे गुण प्रत्येक भारतीयांमध्ये आहेत या गुणांचा उपयोग करून आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत नक्कीच आत्मनिर्भर बनू शकतो.
दूध, प्राणीज उत्पादने याबाबतीत सहकार क्षेत्राने मोठी क्रांती घडवली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक उद्योग धंदे बाळसे धरू लागली आहेत व भारत या बाबतीत तरी आत्मनिर्भर झालेला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संदेश आपणास सर्वांना दिला आहे लॉकडाऊन संपल्यानंतर भारतापुढे आत्मनिर्भर बनण्याची एक मोठी संधी आहे फक्त तिचे सोने आपणा सर्वांना करता यायला हवे छोट्या उद्योगधंद्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज देऊ केलेले आहे महिलांना देखील भरपूर संधी आहेत छोट्या उद्योगांना दहा हजार रुपयांचे कर्ज वर्षांमध्ये फेडण्याची मुदत दिलेली आहे जो कोणी वर्षभरात त्याची परतफेड करेल तर त्याला व्याजा मध्ये सुट देखील देऊ केलेली आहे. ऑनलाईन खरेदी विक्री जवळजवळ बंद झाली आहे त्यामुळे स्थानिक दुकानदार कामगार, उद्योजक यांच्या पुढे आता विक्रीसाठी नामी संधी उपलब्ध आहे आळस झटका आणि आत्मनिर्भर बना कारण ,आळसे कार्यभाग नासला, हे सर्वांनाच माहीत आहे भारतीयांचा आळस सुटला तर ते नक्कीच आत्मनिर्भर होतील यात शंका नाही.
सविता साळुंके, श्रीरामपूर
9604231747
जीवन खसावत
भंडारा 9545246027
Code.26
....आत्मनिर्भर.....
आत्मनिर्भर ही यशाची गुरकिल्ली आहे.
. आत्मनिर्भर म्हणजे आपण ठरवलेल्या ध्येयावर ठाम राहणे.जी गोष्ट प्रत्यक्षात येईल.आपली योजना आपण यश अप यश आले तरी न घाबरता मनाची अवस्था आपल्याला करायला भाग पाडते.ती म्हणजे आत्मनिर्भरता होय .
संतांचे सूवचन आहे.,"जो दुसऱ्यावर निर्भला त्याचा संसार वाया गेला." हे वचन अगदी सत्य आहे.आपल्यात कोणतेही कार्य करण्याची क्षमता नसेल आणि आपण जर दुसऱ्या वर अवलंबून असलो तर आपला संसार पाण्यात गेल्या शिवाय राहणार नाही .त्या साठी आपण स्वतः आपल्यात क्षमता ओळखायला पाहिजे.आणि प्रत्येक कौशल्य प्राप्त करून घेतले पाहिजे.
आपण म्हणतो ."पैसे वाल्याकडे पैसा येतो" पण हेही आपले चुकीचे आहे.कारण पैसा कमावणार्याने पैसा कमावण्याचे कौशल्य प्राप्त करण्या साठी छातीला माती लावून कौशल्य प्राप्त केले आणि. आता ते त्यांच्या अंगवळणी पडले म्हणून त्याला आता पैसा कमावणे सोपे जात आहे.त्या साठी कोणतेही काम करण्या साठी आधी मनापासून तयारी असायला हवी.
काही लोक काम सांगितल्यास कारण शोधून काढतात.पण नाही, काम करण्यासाठी कारण शोधत बसल्यास आपल्या सोबत आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांचेच आयुष बुडेल.
महान नेते मोठ्या मोठ्या सभेला मार्गदर्शन करून खिळउन ठेवतात.त्यांनी ती कला अवगत केलेली असते.त्यांना आपल्या मनापासून आत्मविश्वास असतो.की आपण करू शकतो.
कोणतेही काम करण्यासाठी सकारात्मक विचाराची गरज असते. सकारात्मक विचाराने कार्याची सुरुवात केल्यास .आपल्या विचारानेच अर्धे काम होते.
. आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर ठरवलेलं काम आपण पटकन करतो .आणि काम करण्यात आनंद ही वाटते.
आपल्याकडून चुका झाल्या तरीही आपण चुका मान्य करून दुसऱ्याकडून शिकून घेतो.परिश्रम करण्याची तयारी ठेवतो.आणि यश मिळवतो आणि कौतुकास पात्र ठरतो.
कोणतेही काम करताना मनातली भीती प्रथम काढायला पाहिजे.मला हे सर्व काम जमते.हे आपल्या देह बोलीतून सांगितलं पाहिजे.मनातली भीती पूर्ण काढून टाका.परत परत चिंता करू नये .काही चुकल तर "मला काही फासावर चढवणार नाहीत.
मी स्वप्रयत्नाने करतो.ही अशा बाळगून धैर्याने कामाला लागा यश तुमच्या हाती आहे.
ध्येय प्राप्ती साठी ध्येय डोळ्या समोर ठेऊन आपले कार्य सतत सुरू ठेवले पाहिजे."ध्येय गाठेपर्यंत झोकून जा."प्रयत्नांना तडा जाऊ देऊ नका,"छातीला माती लावून ,विवेक बुद्धी जागृत ठेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करा.
यश तुमच्या हाती हाती आहे.
विवेक जागृत ठेऊन नियमित कल्पना शक्तीचा वापर करून
आत्मविश्वासाचा उपयोग करायला हवा.
यशस्वी लोकं आपले कार्य कोणी करतील याची वाट पाहत नाहीत.दिशा ठरऊन स्वतः कामाला लागतात.आणि कोणतेही काम आनंदाने करतात.
आत्मविश्वास कसा वाढवावा?
१)प्रथम मला हे जमत नाही ,हा नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका.
२) कशीही परिस्थिती असो चांगला विचार करा.
३)मी काही कमी नाही. असा विचार करा.पण गर्व नको कारण आपली लढाई आपल्या मनाशी आहे.
४)माझा माझ्यावर विश्वास आहे.
५)माझ्या मनात कोणतीही भीती नाही.
६)मी यशस्वी होणारच .
या भावना आपल्या मनात असल्यास आपले यश नीच्छित आहे.
यशस्वी लोकांमध्ये मनातून
खद- खद असते .काम काढण्यासाठी ही लोक त्यांच्या जवळ जात नाहीत तर काम होऊन त्यांच्या कडे येते. आणि
आपण म्हणतो "असतील शिते तर जमतील भूते"
ही म्हण त्यांच्या साठी खरे ठरते .
धाडसी लोकांमध्ये आत्मविश्वास असतो ही लोक सर्वांना आवडतात .या लोकांवर समाजाचा विश्वास बसतो.समाजाचे.किंवा एखाद्या घटकाचे नेतृत्व खंबीर पने ही लोक करतात.
महात्मा गाधीजींनी आत्मविश्वासाने अंहिषेच्या मार्गातून भारताला स्वतंत्र मिळवण्या साठी अतोनात प्रयन करून यश मिळवले.
थॉमस एडिसन यांनी दिव्याचा शोध आत्मविश्वासने लावला.
शिवाजी महाराजांनी अग्र्यातून अत्मिश्र्वसाने
सुटका करून घेतली .त्यांनी करणे शोधली नाही .यशस्वी लोकं कारण शोधत नाही .फक्त उपाय शोधत असतात.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सोळाव्या वर्षी लिहिला .ती ध्येय ,चिखती,अभ्यास व जोडीला आत्मविश्वास यांच्या जोरावर.
अशक्य कोणतीही गोष्ट नाही .म्हणून आपण प्रयत्न केल्यास यश मिळवणारे मानकरी आपणच असतो.
आत्मविश्वास ऐवढे असायला पाहिजे की आपल्याला दगडावर जरी फेकले तरी आपण खंबीर उभे राहून आपले जग तयार करू.
प्रयत्न असे असले पाहिजे की आपण पाण्यात बुडल्यावर जेंव्हा जीव वाचवण्या साठी प्रयत्न करतो तसे प्रयत्न असायला हवे.
कोड क्र . [ 14 ]
" चला सारे होऊ आत्मनिर्भर "
" चला सारे होऊ आत्मनिर्भर
देशाचा विकास करू भरभर
जीवन आहे हो हे अनमोल
व्यर्थ न करावे मातीमोल "
वरील काव्य पंक्तीतून आपल्याला ' आत्मनिर्भरेचे ' जीवनात काय महत्त्व आहे हे जाणवते . " आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवून इतरांवर न विसंबता स्वतंत्रपणे स्वतःवर अवलंबून स्वतःचे स्थान निर्माण करणे होय ... अशा आत्मविश्वासू व्यक्तीच्या अंगात ही आत्मनिर्भरता वास्तव्य करीत असते ... आणि हीच व्यक्ती देशाचा कणा बनत असतात ... देशाचे खरेखुरे आधारस्तंभ असतात ....
आत्मनिर्भरता हा गुण अंगी बाणण्यासाठी आधी मानसिक सद्गुण अंगीकारले पाहिजे ... धैर्य , चिकाटी , प्रामाणिकपणा , देशभक्ती , सेवावृत्ती , परस्परांविषयी भूतदया , आंतरिक तळमळ इत्यादी .... शिवाय महत्त्वाचे म्हणजे मनात जोपर्यंत स्त्री - पुरूष समानता हे मूलतत्त्व पूर्णपणे मानवी मनात रूजणार नाही तोपर्यंत ही आत्मनिर्भरता कुचकामीच ठरणार ... कारण आजही स्त्री ही पुरूषांच्या गुलामीतच वावरते ... आणि स्त्री व पुरूष ह्या दोन्ही चाकावरच जगाचा भार चालतो ना ! मग एक चाक असे खिळलेले असताना कसाबरे हा देश , समाज , कुटुंब प्रगतीपथी मार्गक्रमण करेल ? म्हणून आधी ही पौरूषी अधिकारशाही , हुकूमशाही , गुलामगिरी कायमचीच मूळासकट उखडून टाकली पाहिजे ... तरच ही आत्मनिर्भरता खर्या अर्थाने देशांत नांदेल अन्यथा नाही ... कारण भरपूर स्त्रीया ह्या अंगी गुणकौशल्ये असूनही ह्या कोत्या संकुचित विचारसरणीला बळी पडून आपले आयुष्य व्यर्थ घालत आहेत ह्या गुलामीत ...
सध्याच्या काळात काही मोजकेच लोक हे मॉडर्न विचारांची आहेत ... चला आपल्या देशातील ह्या जुन्या विचारसरणीला तिलांजली देऊन स्त्री आत्मनिर्भरतेची कास हाती घेऊया .. शिवाय कोरोनाशीही आत्मनिर्भयतेने झुंजून आपल्या व देशाच्या जीवाचे रक्षण करूया ...
अर्चना दिगांबर गरूड
ता . किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552963376
लेख:आत्मनिर्भर भारत(28)
प्रत्येकाने आत्मनिर्भर होणे,गरजेचे आहे,कारण आताची परिस्थितीत इतकी बिकट आहे,आलेले संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधान यांनी आपल्याला संदेश दिला आहे.याचा अर्थ देश आपल्यासाठी प्रयत्न करतच आहे,परंतु त्याआधी आपण प्रत्येकजण सक्षम असायला हवे.
आलेले संकट दूर करण्यासाठी प्रथम आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,ठराविक अंतर एक दुसऱ्या पासून ठेवावे,स्वछतेच्या सवयी अंगी बाळगाव्यात, की जेणेकरून संसर्ग होणार नाही.सरकार आपल्या सोबत आहेच,परंतु देशाचा नागरिक म्हणून काही गोष्टींची स्व जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी,संकट वाढत गेले की,ते आटोक्यात आणणे कठीण आहे.
लहानपणी सानेगुरुजी चे पुस्तक वाचताना श्यामची आई त्याला आत्मनिर्भर बनविण्यासाठी धडपडत असते,ती मित्रांबरोबर पोहायला पाठविते,त्यासाठी तो खटाटोप आईचा असलेला आग्रह कशासाठी असतो,तर त्या आपल्या बाळाच्या काळजी पोटी, तसेच आताचे प्रत्येक पालक हे आपल्या पाल्यास आत्मनिर्भर बनविण्यास झटत आहेत,कारण स्पर्धेचे युग आहे,त्यात आपलेही मुलं तग धरून राहिले पाहिजे.यासाठी प्रत्येक मूल बालवयातच निर्भर झाले पाहिजे,त्यामुळे ते सशक्त होईल,चीन,जपान मध्ये लहानपणापासून कसरतीचे व्यायाम दिले जातात,आपण मात्र मुलांना जपतो,विकसीत देशात ठराविक वयानंतर घराबाहेर मुलांना स्व कष्टास पाठविले जाते,आपण तसे करत नाही,ती आपली संस्कृती नाही,आपण आपली संस्कृती जपून आत्मनिर्भर भारत करूया!!
सुजाता जाधव
नवी मुंबई
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें