*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- 48 वा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 05 जून 2020 शुक्रवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- अवयवदान*
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
[05/06, 11:05 AM] महेंद्र सोनवने: (08)
*अवयव दान एक महादान*
अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत. समाजामध्येही नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल. पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो.
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो.
लाईव डोनेशन – ज्यात कुटुंबातील सदस्य किंवा मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती , जिवंतपणीच आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करू शकते. जिवंत व्यक्ती केवळ आपल्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते. ( मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊबहिण अथवा पती किंवा पत्नी ) याव्यतिरिक्त इतर कोणाला जिवंतपणी दुसर्यां साठी अवयवदान करायचे असल्यास त्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. अवयवदानानंतर व्यक्तिच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते.
मृत्यू पश्चात-
कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट – एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर , त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जातात. त्यास ‘कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट’ म्हणतात. ब्रेनडेड , म्हणजे अपघातात डोक्याला मार लागल्याने ,मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू (ब्रेनडेड) होऊ शकतो. अशावेळी लाइफ सपोर्टींग सिस्टीमवर त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास, नाडीचे ठोके आणि इतर अवयवांचे कार्य सुरु असते, हे लक्षात घेऊन ब्रेन डेड रुग्णांविषयी निर्णय घेतला जातो. प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातच , ब्रेनडेड मृत्यू घोषित करता येतो .त्यामुळे अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते. परंतु डोळे आणि त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत घरी मृत्यू झाला तरी होऊ शकते.
मृतव्यक्ती ज्यांची हृदयक्रिया बंद पडली आहे, ते नेत्र व त्वचा दान करू शकतात. मात्र ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचेदेखील दान होऊ शकते.
• नेमके कोण अवयव दान करू शकते ?
1. किमान 3 वर्ष व त्याहून अधिक कोणीही.
2. लाईफ सपोर्ट सिस्टीमवरील ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास ,त्यांचे अवयव दान होऊ शकते.
3. नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते.
• किती तासांत अवयव प्रत्यारोपण शक्य आहे –
1. डोळे – काही महिने
2. त्वचा – सहा तासांच्या आत
3. फुफ्फुस – सहा तास आत
4. किडनी – ४८ तास आत
• कोणत्या प्रसंगात देहदान नाकारला जाऊ शकतो ?
1. अनैसर्गिक मृत्यू जसे की, आत्महत्या, अपघात
2. जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास
3. काही कर्करोग , एड्स असल्यास
4. विहित नमुन्यात मृत्यूचे प्रमाणपत्र नसेल तर…
• काही आवश्यक चाचण्या –
1. रक्तगट तपासणी-
मानवी रक्ताचे A , B , AB व O असे चार रक्तगट असतात. रक्तगटाच्या चाचणीतून अवयव प्रत्यारोपणानंतर होणारे भविष्यातील धोके वेळीच जाणण्यास मदत होते.
2. ह्युमन ल्युकोसाईट अॅणन्टिजन्स (HLA) – ह्युमन ल्युकोसाईट अॅान्टिजन्स या चाचणीद्वारे टिश्युंची तपासणी केली जाते.
3. क्रॉसमॅच – संसर्गापासून किंवा आजारपणापासून बचावण्यासाठी ,शरीरात काही अॅ्न्टीबॉडीज तयार केल्या जातात. जर तुमच्या शरीरात किडणीदात्याच्या विरुद्ध अॅून्टीबॉडीज असतील तर प्रत्यारोपणानंतर ते किडनीवर परिणाम करू शकतात.
4. सेरॉलोजी – या रक्तचाचणी द्वारे एड्स,हेपटायटिस यासारख्या आजारांचे निदान केले जाते. अशा आजारात तुम्ही अवयवदान करू शकत नाही.
मग आजच अवयवदानाविषयीचे गैरसमज दुर करा आणि एक पाऊल पुढे या. कदाचित मृत्यूपश्चात तुम्ही काहींचे आयुष्य थोडे सुसह्य करू शकता.
________________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
*मो. 9421802067*
[05/06, 11:06 AM] दुशांत निमकर: *(02) अवयवदान हे एक श्रेष्टदान*
आज आपल्या संपूर्ण भारत देशात अवयवदान विषयी अनेक गैरसमज आहेत त्यामुळे विशाल लोकसंख्या असलेल्या देशात अवयवदान याविषयी पुढे धजावत नाहीत.आपल्याला जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील एखादा अवयव दान करणे त्यालाच अवयव दान म्हणतात.आपल्या शरीरातील डोळे,रक्त,मूत्रपिंड,ह्दय,त्वचा स्वादुपिंड,यकृत विविध अवयव दान करू शकतो.यातील काही अवयव जिवंत असतांना तर काही अवयव मृत शरीर झाल्यानंतर करू शकतो.भारत देशात विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आहेत त्यांना या अवयवाचा उपयोग होईल त्यामुळे जिवंत असतांना आपल्याला एखादा अवयव दान करीत असल्याबाबतचे घोषणापत्र लिहून द्यावे लागेल म्हणजे आपण मृत झाल्यानंतर देखील अवयवरूपात जिवंत राहू शकते म्हणून स्वतः,कुटुंब,समाजात कोणतेही गैरसमज न ठेवता अवयव दान करण्यासाठी पुढे धजावले पाहिजे.पूर्वी शरीरातील रक्तदान करण्यासाठी देखील जागृती नसल्याने रक्तदान करत नव्हते परंतु जनजागृती झाली असल्याने रक्तदान शिबिर आयोजित करून व्यक्ती,संस्था,सामाजिक कार्यकर्ते पुढे धजावले आहेत त्याचप्रमाणे अवयव दानाविषयी मनात किंतु-परंतु न ठेवता 'अवयव दान हेच श्रेष्टदान' आहे हे समजून प्रत्येकांनी जाणीव जागृती ठेऊन अवयवदान केले पाहिजे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भारत देश असून अवयवदानात खूप मागे आहे.स्पेन या देश अवयवदानात अग्रेसर आहे.डोळ्यांचा मोतीबिंदू गेल्याने अनेक रुग्ण आंधळे झालेले आहे त्यांना जीवनदृष्टी द्यायची झाल्यास नेत्रदान करणे खूप गरजेचे आहे.नेत्रदान हे जिवंतपणी द्यायचे नाही तर मृत झाल्यानंतर काढावयाचे आहे.मृत झाल्यानंतर पूर्ण डोळे काढून मृत शरीर विद्रुप होईल अशी गैरसमजूत नातेवाईकांची होत असते पण तसे काहीही होत नाही.मृत शरीरातील नेत्रापैकी पारदर्शक पटल काढले जाते आणि त्या मृत शरिरात कृत्रिम पटल लावले जाते.इतर नातेवाईकांना डोळे काढले असे दिसून पण येणार नाही त्यामुळे नेत्रदान करण्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी.आपल्या देशात डोळ्यांची इतकी कमतरता आहे की,श्रीलंका या छोट्याशा देशातून विकत आणावे लागत आहेत म्हणून नेत्रदान करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी समोर यायला हवे.आज अनेक मुली,सुना यांना स्वयंपाक करीत असतांना अनाठायी घटनेमुळे,गृहकलह,वाद यामुळे भाजणे, जळणे, जाळणे यासारख्या घटना घडत असल्याने त्यांना होणारे व्रणामुळे वेदना कमी करण्यासाठी त्वचा दान केल्यास अशा रुग्णाचे जीवदान त्यांना मिळू शकते तसेच एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ले समाजात खूप वाढले आहे त्यामुळे विद्रुप चेहरा होतो आणि असह्य अशा वेदना होतात त्यासाठी मृत शरीर झाल्यावर त्वचादान केल्यास पुण्य नक्कीच घडू शकते त्यासाठी जागृत असले पाहिजे आणि अवयवदान करण्यासाठी मित्र, नातेवाईक, कुटुंब यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
जिवंत असतांना देखील मूत्रपिंड,यकृत दान म्हणून देऊ शकतो आणि मृत झाल्यानंतर इतर अवयव देखील दान स्वरूपात दवाखाना वा वैद्यकीय महाविद्यालयाला देता येऊ शकते.वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध,संशोधन झाले असल्याने ह्दय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण सहज करता येत असल्याने रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण आपोआप घटले आहेत म्हणून जिवंत असतांना वेगवेगळ्या कार्यातून सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वांनी मृत्यूनंतर देखील अवयवदान करून सामाजिक कार्य करावे.अपघात, हार्ट अटॅक, मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करता येऊ शकते फक्त कोमात असलेल्या व्यक्तीचे अवयवदान करता येत नाही.मेंदूमृत व्यक्तीचे ह्दय,स्वासोच्छवास सुरू असला तरी त्यांचा मेंदू मृत झाल्याने कार्य करू शकत नाही अशा व्यक्तीचा अवयव दान करण्यासाठी नातेवाईकांनी तयार व्हावे त्याचसोबत पुढील पिढीच्या भविष्यासाठी व अभ्यासासाठी देहदान देखील करून सामाजिक कार्य करू शकतो यासाठी 'मरावे परी किर्तीरूपे उरावे' असे सतत म्हणत असतो त्याचप्रमाणे 'मरावे परी,अवयवरूपी उरावे' असं म्हटल्यास वावगे वाटणार नाहीच.
✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
मो न 9765548949
[05/06, 11:47 AM] सौ भारती तिडके: 39)"नेत्रदान:-सर्वश्रेष्ठ महादान".
अवयव दान जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवाचे शरीर क्षणभंगूर आहे....... मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर "अवयव दान "करणे फार महत्त्वाचे आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे.आपल्या समाजात अवयव दानाविषयी म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. अवयव ज्ञान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरीराचे सुमारे दहा विविध अवयव आपण दान करू शकतो. त्यासाठी त्याची पुरेशी माहिती ज्ञान व इच्छाशक्ती हवी तरच अवयवदान शक्य आहे.
"जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय काय?"
असे म्हटले जाते. परंतु मनुष्याच्या मृत्युनंतर त्याने जर अवयव दान केले तर कुणालातरी जीवदान मिळू शकते. म्हणून अवयवदान ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. जागतिक स्तरावर 13 ऑगस्ट जागतिक अवयव दान दिवस साजरा केला जातो.
अमेरिकेतील बोस्टन मध्ये किडनी प्रत्यारोपणाण अवयवदानाची सुरुवात झाली. या शस्त्रक्रियेत एका जुळ्या भावाची किडनी त्याच्या जुळ्या भावाला बसविण्यात आली. त्याआधी ही नेत्रदान आणि त्वचादान सुरू झालं होतं पण किडनी प्रत्यारोपण हे एक मोठे पाऊल होते. एखाद्या जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिश्यू ज त्या शरीरातून काढून दुसऱ्या मानवी शरीरात त्याचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. त्यालाच दान म्हणतात कारण असे करण्याबाबत त्या दातयाची त्याची संमती घेतलेली असते.
मृत्यूनंतर कुणाचीतरी जीवन आपण फुलवायचे असा मनी विचार केला तर नक्कीच समाजात प्रबोधन होईल. अवयव दाना निमित्त जिल्ह्यातील मेंन आरोग्य विभाग मध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. अर्ज भरल्यानंतर मृत्यूनंतर ज्या अवयवाचे दान करायचे आहे त्याचा उल्लेख करून संमती पत्र द्यावे लागते.
मला नेत्रदान करायची खूप इच्छा आहे. माझ्या मृत्युपश्चात मी नेत्रदान करील. संपूर्ण शरीराचे देखील दान करता येते. मी जेव्हा लहान होते तेव्हा ऐश्वर्या रायची नेत्रदान विषयी ची जाहिरात टीव्हीवर यायची. तेव्हाच मी पण निर्धार केला की मला सुद्धा नेत्रदान करायला हवे. कारण आपल्या डोळ्यांनी दुसरे कोणी हे सुंदर जग पुन्हा बघू शकतील. नेत्रदान हे महादान आहे. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हा आय डोनेशन आठवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान म्हणजे डोळे डोनेट करणे. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. नेत्रदान करतानी पूर्ण डोळ्याचे दान केले जात नाही तर डोळ्याचे कॉर्निया चे डोनेट होते ते ट्रान्सपरंट असते. नेत्रदान विषयी काही अंधविश्वास दूर करायला पाहिजे. समाजामध्ये पैशांनी अवयवांची विक्री खरेदी केली जाते ते कायद्याविरुद्ध आहे. काही समाजामध्ये धार्मिक मतभेद असतात की मृत्यूनंतर जर आपण अवयवदान केले तर नरकात जाऊ आपली आत्मा तृप्त होणार नाही. नेत्रदान ही एक समाजसेवा आहे. ते स्वेच्छेने केलेले कार्य आहे.
नेत्रदान तर करायचे तर आपल्या मृत्यूनंतर आपण डोळे दान करायचे वचन देतो. भारतामध्ये लाखो लोकांना पुन्हा आपल्या डोळ्यांची रोशनी हवी असेल तर काॉनियल ट्रान्सप्लांट ची जरुरत असते. वर्तमान मध्ये केवळ काॉनिया आणि सकलैरा चा उपयोग ट्रान्सप्लांट साठी केला जातो. त्यात पूर्ण डोळा काढण्याची गरज नसते. नेत्रदान करायचे असेल तर त्यासाठी काही वयाची सीमा नसते. जर कोणी व्यक्ती आपले डोळे दान करण्यास इच्छुक असेल तर मृत्यूनंतर त्याचे डोळे काढले जातात. परंतु जर व 80 वर्षापेक्षा जास्त असेल तर ते डोळे उपयोगात पडत नाही. आणि मृत्यूनंतर चार-सहा घंटेच्या आत डोळे प्राप्त करायला हवे. आणि दान केलेले डोळे चार दिवसाच्या आत उपयोगात आणायला हवे.साऱ्या जगात नेत्र जाणारा सर्वश्रेष्ठ महादान म्हणतात कारण की कुणी त्या डोळ्याने सर्व जीवन बघू शकेल. रोशनीच्या उपहाराला मोल नाही.
दानदातयाला जवळच्या नेत्र बँकेशी संपर्क करायला हवा. त्यासाठी कोणतीही रक्कम जमा करावी लागत नाही. कमजोर डोळे किंवा मोतिया बिंदू चे इलाज केलेले व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात. परंतु ज्यांना एचआईवी, हेपिटायटीस, सिफिलिस असेल ते नेत्रदान करू शकत नाही. त्यांना जर डोळे डोनेट करायची इच्छाच असेल तर त्यांचे डोळे मेडिकल रिसर्च साठी उपयोगात आणले जाते.
"अनंताच्या पलीकडे जाऊनही
अस्तित्व आपलं सदैव उ राव
आपल्या नंतर सुद्धा आपल्या डोळ्यांनी
आपल्या लाडक्या यांनी कुणीतरी पहावं."
जगातील सर्वात सुंदर अशी गोष्ट म्हणजे सृष्टी. जी विविधतेने नटलेली आहे आणि या सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव अवयव म्हणजे डोळे. डोळे डोनेट केल्याने एक सर्वोत्तम पुन्हा आपल्याला लागते. नेत्रदान हे ऐच्छिक असते त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते. नेत्रदान ला वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचे बंधन नाही.
नेत्रदानासाठी खालील गोष्टी कराव्या लागतात.
1) मृत्यूपश्चात नेत्रदानाची इच्छा असल्यास आत्ताच नेत्रदानाचा फॉर्म भरुन द्यावा लागतो. फॉर्म भरला नसला तरी नातेवाईकाकडे आपली नेत्रदानाची इच्छा व्यक्त करायला हवी. मृत्यूनंतर ते आपली इच्छा पूर्ण करू शकतात.
2) नेत्रपेढी तसे कळवावे लागते. संपूर्ण पत्ता फोन नंबर व मृत्यूची वेळ इत्यादी कळवावी लागते.
3) मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवावी लागते.
4) मृत व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात घरातील पंखे व एअर कंडिशनर बंद ठेवावीत.
भारतातील सुमारे दहा लाख अंध लोक हे सृष्टी पाहण्यासाठी व्याकुळ , ऊसकलेले आहे. म्हणून नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ महादान आहे. जे कोणी माझ्या डोळ्यांनी सुंदर जग बघेल, म्हणून माझे नेत्रदान करायची इच्छा आहे.
सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया.
8007664039.
[05/06, 12:55 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: *(४०)* *मनिषा पांढरे, सोलापूर*
*अवयवदान एक सर्वश्रेष्ठ दान*
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे....असे साने गुरुजींनी म्हटले आहे....पण आपण खरोखरचं जगाला प्रेम अर्पण करण्यासाठी धडपडत असतो का?
आपल्याकडे दानाचे खूप महत्त्व सांगितले जाते...कर्णाचे उदाहरण, राजा हरिश्चंद्र, असे कितीतरी लोक होते ज्यांनी आजन्म दान केले पण मृत्यूनंतरही दान करता येऊ शकते.
आपल्याकडे मृत्यूवर चर्चो करायला कोणीच तयार नसत. त्यातच देहदान ,नेत्रदान, अवयवदान याबाबत लोकांमध्ये अनेक समज/ गैरसमज आहेत. देहदान व अवयवदान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आम्हालाच मुळात माहीत नसते.
दान केलेल्या देहाची विटंबना होत असेल... अवयवदान केले तर पुढील जन्मी त्या अवयवाशिवाय जन्म मिळेल? नेत्रदानानंतर चेहरा रक्तबंबाळ दिसेल, विद्रुप दिसेल असे अनेक गैरसमज व्यक्तीमध्ये असतात त्यामुळे व्यक्ती ह्या दानापासून दूर राहतो.
व्यक्तीचा ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास कृत्रीम श्वासोश्वासावर ठेवून त्याचे अवयव काढून घेतल्यास कितीतरी व्यक्तींना जीवदान मिळू शकते.
त्वचादान: व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुरुवातीला त्वचादान करता येते. यात मृत व्यक्तीची त्वचा दोन ते तीन तासांत अर्ध्या तासाची शस्त्रक्रिया करुन काढून घेतली जाते. यात रक्ताचा एकही थेंब सांडत नाही. भाजलेल्या व्यक्तीस त्या त्वचेचे प्रत्योरोपण करुन जीवदान मिळते.
नेत्रदान: व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या तीन ते चार तासांत नेत्रदान केले जाते. अंध व्यक्तींना यामुळे एक जीवदान मिळते.
देहदान: देहदान केल्यास जवळच्या मेडीकल कॉलेज ते पाठवले जाते. एका देहावर दहा डाॅक्टर शस्त्रक्रिया करून शिकतात त्यामुळे नंतर एका दिवसात एक याप्रमाणे दहा डाॅक्टर कितीतरी व्यक्तीचे जीवन वाचवतात.
अशा प्रकारे दानाचे कर्तव्य करुया आणि पृथ्वीवरील एका व्यक्तीसाठी तरी जीवदान देण्याचा प्रयत्न करुया.🙏🏻🙏🏻🙏🏻
मनिषा पांढरे, सोलापूर 9730195015
[05/06, 1:02 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *( 09 )*
*दानात दान- अवयव दान*
मानवी शरीर हे नश्वर, क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते . मात्र अवयरुपाने जिवंत रहायचे असेल तर ' अवयव दान ' करावे. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो . तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो . मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जनजागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत . अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे विविध अवयव आपण दान करू शकतो . फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व आपली इच्छाशक्ती .अवयव दान हे प्रामुख्याने दोन प्रकारात केले जाऊ शकते - लाईव डोनेशन - ज्यात कुटुंबातील सदस्य किंवा मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती , जिवंतपणीच आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करू शकते . जिवंत व्यक्ती केवळ आपल्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते . मुलगा , मुलगी , आईवडील , भाऊबहिण अथवा पती किंवा पत्नी याव्यतिरिक्त इतर कोणाला जिवंतपणी दुसऱ्यांसाठी अवयवदान करायचे असल्यास त्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते . अवयवदानानंतर व्यक्तिच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते . त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते . मृत्यू पश्चात Ad कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते . मृत्यू पश्चात कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जातात . त्यास ' कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट ' म्हणतात . ब्रेनडेड , म्हणजे अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू ( ब्रेनडेड ) होऊ शकतो . अशावेळी लाइफ सपोर्टीग सिस्टीमवर त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास , नाडीचे ठोके आणि इतर अवयवांचे कार्य सुरु असते , हे लक्षात घेऊन ब्रेन डेड रुग्णांविषयी निर्णय घेतला जातो .माझी मैत्रीण मनिषा पशिने हिने अवयव दानाचे महान कार्य केले. आपल्या पतीचे ब्रेनडेड झाल्यावर तिने ताबडतोब *अवयवदानाचा* निर्णय घेतला.तिच्या या महान कार्यामुळे सहालोकाना जीवनदान मिळाले .मनिषा तुझ्या कार्याला सलाम!
अशाप्रकारे ब्रेनडेड मृत्यू घोषित झाल्यामुळे अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते . परंतु डोळे आणि त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत घरी मृत्यू झाला तरी होऊ शकते . मृतव्यक्ती ज्यांची हृद्यक्रिया बंद पडली आहे . ते नेत्र व त्वचा दान करू शकतात.मात्र ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड , फुफ्फुसे , यकृत , स्वादुपिंड , हृदय , आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र , त्वचा , हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचेदेखील दान होऊ शकते .
नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते . नेमके कोण अवयव दान करू शकते ? किमान 3 वर्ष व त्याहून अधिक कोणीही लाईफ सपोर्ट सिस्टीमवरील ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास त्यांचे अवयव दान होऊ शकते .
नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते . किती तासांत अवयव प्रत्यारोपण शक्य आहे - डोळे - काही महिने त्वचा सहा तासांच्या आत फुफ्फुस - सहा तास आत किडनी - ४८ तास आत कोणत्या प्रसंगात देहदान नाकारला जाऊ शकतो ? अनैसर्गिक मृत्यू जसे की , आत्महत्या , अपघात जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास काही कर्करोग , एड्स असल्यास विहित नमुन्यात मृत्यूचे प्रमाणपत्र नसेल तर ... काही आवश्यक चाचण्या - रक्तगट तपासणी मानवी रक्ताचे A , B , AB व 0 असे चार रक्तगट असतात . रक्तगटाच्या चाचणीतून अवयव प्रत्यारोपणानंतर होणारे भविष्यातील धोके वेळीच जाणण्यास मदत होते . ह्युमन ल्युकोसाईट अॅन्टिजन्स ( HLA ) - ह्युमन ल्युकोसाईट अॅन्टिजन्स या चाचणीद्वारे टिश्युंची तपासणी केली जाते . क्रॉसमॅच - संसर्गापासून किंवा आजारपणापासून बचावण्यासाठी शरीरात काही अॅन्टीबॉडीज तयार केल्या जातात . जर तुमच्या शरीरात किडणीदात्याच्या विरुद्ध अॅन्टीबॉडीज असतील तर प्रत्यारोपणानंतर ते किडनीवर परिणाम करू शकतात . सेरॉलोजी - या रक्तचाचणीद्वारे एड्स , हेपटायटिस यासारख्या आजारांचे निदान केले जाते . क्रॉसमॅच - संसर्गापासून किंवा आजारपणापासून बचावण्यासाठी शरीरात काही अॅन्टीबॉडीज तयार केल्या जातात . जर तुमच्या शरीरात किडणीदात्याच्या विरुद्ध अॅन्टीबॉडीज असतील तर प्रत्यारोपणानंतर ते किडनीवर परिणाम करू शकतात . सेरॉलोजी - या रक्तचाचणी द्वारे एड्स , हेपटायटिस यासारख्या आजारांचे निदान केले जाते . अशा आजारात तुम्ही अवयवदान करू शकत नाही . मग आजच अवयवदानाविषयीचे गैरसमज दुर करा आणि एक पाऊल पुढे या .मी व माझे पती आम्ही दोघांनीही नेत्रदान केल्याचे पाल्यांना सांगितले आहेत. कदाचित मृत्यूपश्चात आपण काहींचे आयुष्य सुसह्य करू शकू .हे सुंदर जग आमच्या पश्चात पुन्हा दुसऱ्याच्या रूपाने पाहू व जगू!.
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[05/06, 1:19 PM] झगरे गुरुजी: १७)अवयवदान ही लोकचळवळ बणावी...
श्रीज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर)
..........…......................................…..
जननी जने सो दाता जनें, या दाता या शूर... नहीतो जननी वांझ भली,क्या खोवेगा नूर...!
असं संत कबीर म्हणतात. याचा अर्थ दानाला आजही संस्कृतीमध्ये फार मोठे स्थान आहे. अन्नदान, वस्त्रदान या गोष्टी आता सर्वसामान्य झाल्यासारख्या वाटतात. परंतु याहीपेक्षा आपल्याला जे निसर्गतः भगवंताने दिले त्याचं दान करण्याची हींमत दाखवण्याची आज गरज आहे. जन्मताच जर आपण अंध किंवा अपंग जन्माला आलो, तर आपण त्या अवयवाय शिवाय सुद्धा जीवन जगू शकतो..तर मग आयुष्यभर ज्या अवयवांनी आपल्याला साथ दिली, आपल्या मरणाच्या नंतर जर ते अवयव इतरांसाठी कामी पडत असतील... तर ते नक्कीच आपल्या अवयवाचे आणि पर्यायाने आपले भाग्यच म्हणावे लागेल. यासाठी गरज आहे ती समाजजागृती ची आणि अवयव दान बद्दलच्या महत्त्वाच्या जाणिवेची.
आपल्या मृत्यूनंतरही आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही. नियमित रक्तदान करणारे रक्तदाते रक्तपेढीसाठी रक्त उपलब्ध करून देत असतात. स्वयंसेवी संस्था, मंडळे वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करताना दिसतात. नेत्रदानाचेही महत्त्व आता लोकांना पटू लागलेय. त्यामुळे नेत्रदान करण्याकडेही त्यांचा कल वाढू लागलाय. परंतु अवयवदात्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अजूनही अनेकांच्या मनात अवयवदानाविषयी गैरसमज आहेत. अभ्यासक्रमामध्ये नेत्रदानाविषयी, रक्तदानाविषयी माहिती असते. मात्र आता अवयवदानाविषयी माहिती देणे गरजेचे आहे. किडनी, यकृत, त्वचा इत्यादी अवयव मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. पुराणकाळातील दधिची ऋषींनी तर आपली हाडे दान दिली होती. त्या अस्थीपासून तयार केलेल्या वज्राने वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता, अशी पुराणकथा आहे. पण तरीही अवयवदान म्हटले की भारतीय बुचकळ्यात पडतात. इतर सर्व दानांत पुढे असणा-या भारतीयांत ती म्हणावी तितकीशी रुजली नाही, असे वाटते. त्यामुळेच प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय केंद्राने राबवलेल्या अवयवदान मोहिमेंतर्गत अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. अशी आदर्श उदाहरणे समोर ठेवून इतरांनीही या दानाचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.
अवयवदानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आजच्या घडीलाही कित्येक रुग्णांना उपचाराअभावी किंवा आर्थिक पाठबळ नसल्याने मृत्यूच्या छायेत दिवस काढावे लागतात. अवयवदान करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. भारतात असलेल्या धार्मिक चालीरीती आणि त्याचा समाजावर असलेला प्रचंड पगडा यामुळे अवयवदान करण्याची मानसिकता दिसून येत नाही. सरकारने अवयवदानाबाबत कायदा केला खरा, पण त्याबाबत जागरूकता नसल्याने व काही त्रुटींमुळे अवयव प्रत्यारोपणाची वाट दुर्लक्षित राहिलेली आहे. कोणत्याही रुग्णालयात याविषयी माहिती देणारा कक्ष नाही. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा. प्रत्येक महाविद्यालयात, कंपनीत तसेच प्रत्येक गल्लीत संस्थेमार्फत अवयव प्रत्यारोपणाबाबत माहिती देणारे चर्चासत्र किंवा सेमिनार आयोजित करावे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे नऊ जणांना जीवनदान मिळू शकते, याबाबत सर्वानी विचार करून यासाठी पुढचे पाऊल उचलले पाहिजे. अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात अवयवदानाबाबत कमालीचा निरुत्साह आहे, हे दुर्दैवच आहे.
चला तर आता समाजजागृती...आणि कायद्यातील क्लिष्ट प्रक्रिया सोडविण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. मरावे परी देहरुपी उरावे या विचारधारेतून आता अवयव दान ही लोक चळवळ बनवून या चळवळीला उभारी देणे गरजेचे आहे....
[05/06, 1:40 PM] Jeevansing khasawat: ...अवयव दान एक श्रेष्ठ दान...
मानव जेंव्हा जन्माला येतो ,तेंव्हा शरीराचे परिपूर्ण अवयव घेऊन जन्माला येतो.
हात,पाय कान, नाक,डोळे त्वचा,जीभ,केस.,पोट ,छाती
असे विविध अवयवाची रचना घेऊन मानव जन्माला येतो.
मानवाचा जन्म आपल्याला मिळतो .तेंव्हा आपण खूप नशीबवान असतो.आपल्या कुटुंबात एखादा लहान बाळ जन्माला आला की आपण खूप आनंदी असतो .आपणच नाही तर आपल्या कुटुंबातील सर्व मंडळी आनंदी असते .मानवाची निसर्गाने बुध्दिमान प्राणी म्हणून रचना केली आहे .जशी गरज ,तशी गरज पूर्ण करण्यासाठी अवयव रचना निसर्गाने केली आहे. पण जीवन हे क्षण भांगुर आहे.मृत्यू झाल्या नंतर ह्या देहाचे काय ?
व्यक्ती चा मृत्यू झाल्या नंतर जीव एका आत्म्यातून दुसऱ्या आत्म्यात प्रवेश करतो .आणि शरीर म्हणजे धड तेवढे शिल्लक राहतो.आणि आपल्या आपल्या सामाजिक रूढी परंपरा नुसार धडाची वाट लावली जाते.आणि शेवटी हे शरीर माती मोल होते.
तरी असे न करता प्रत्येक जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या मनात आज मी जन्म घेतलाआणि माझ्या हातून काहीतरी मी चांगले सत्कार्य घडउन आणणार अशी अपेक्षा ठेवली पाहिजे.
.मरावे परी कीर्ती रूपे उरावे ....
किती तरी लोक ,आपण या समाजात जन्मलो,वाढलो,मोठा झालो,तेंव्हा मला या समाजाचे काही देणे आहे .या उद्देशातून गरजू लोकांसाठी किडनी ,यकृत डोळे ,फुप्पुस,या शरीराचे प्रत्यारोपण करता येते.तेंव्हा एखाद्या व्यक्तीचे वय झाल्यावर मृत्यु समई आपले देह दान ,शरीराचे अवयव दान करण्याचा संकल्प करावा .आणि सामाजिक जागृती व्हायला पाहिजे .अवयव दनाचे महत्त्व समाजाच्या सर्व घटका पर्यंत पोहोचायला हवे.लहानमुलांना व सर्व स्तरावर एकदम सोप्या भाषेत समजायला हवे.सामाजिक संस्थांनी शिबिर सुरू करून समाजाच्या तळा गळा पर्यंत पोहोचल्यास जनजागृती होऊन अवयव दानाचे महत्व लोकांना पटतील आणि लोक देह दान सुद्धा करतील.पण समाजात ही गोष्ट अजुन फक्त वीस टक्के लोकांना माहीत आहे .यामुळे अनेक अवशयक असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करून जीव वाचवता येतील.
मानवाने विज्ञान युगात खूप मोठी प्रगती केली आहे.
"मरावे परी कीर्ती रूप उरावे"
माणूस मृत्यू मुखी झल्यावर मानवच शरीर कोणत्याच उपयोगात येत नाही .परंतु आपले शरीर दान केल्यास .आपल्या माध्यमातून आपल्या इतरांना जीवन जगता येते.
अभिनेता अमिरखान यांनी सुद्धा मरणोत्तर देह दान करण्याचे ठरवले आहे ."प्रथम नेत्र दान हेच श्रेष्ठ दान "समजल्या जायचे परंतु आता संकल्पना विस्तारत जाऊन "देह दान हेच श्रेष्ठ दान"मानून प्रत्येक दवाखान्यात फलक लावायला हवा.आणि समाज परिवर्तन घडून आणायला हवा.एक चांगली मोहीम रबावयला हवी .अन्यथा सध्याच्या काळात मनोरुग्णांना ,अपघाती निधन झालेल्या लोकांची अवयव तस्करी सुरू आहे .आणि फुप्पुस ,किडनी,या सारखे अवयव प्रत्यारोपण करायचे असल्यास सर्व सामान्यांना खूप पैसा मोजावे लागते.
म्हणून आपण एकच विचारकरायला हवा .
जिवंत पाणी रक्त दान !!
मरणोत्तर देह दान !!
जीवन खसावत
भंडारा ९५४५२४६०२७
Code २६
[05/06, 3:20 PM] Nagorao Yeotikar: *मरावे परी अवयवरूपी उरावे*
जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ही कविता मनात शिरली. मराठीच्या शिक्षकांनी तसा जीव ओतून शिकविला त्यामुळे ती कविता आज ही मनात घर करून आहे. कवितेतील प्रत्येक ओळीतून एकच अर्थ मिळतो की, आपल्या मरणानंतर आपले येथे काहीच उरत नाही. जसे राम आणि कृष्ण आले व गेले तसे आपण ही आलो आहोत आणि एके दिवशी जाणार आहोत. आपल्या मृत्यूनंतर घरातील मंडळी आणि नातलगामधील लोक काही काळासाठी शोक करतील, दुःख व्यक्त करतील आणि त्यानंतर नित्यनेमाने कामाला लागतील. जो जन्माला आलेला आहे तो उद्या मरणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे यात शंकाच नाही. या पृथ्वीवर जन्माला येताना रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. याबाबतीत जगजेत्ता सिकंदराचे उदाहरण तंतोतंत लागू पडते. त्याची शेवटची ईच्छा होती की, दोन्ही हात बाहेर दिसतील असे ठेवा म्हणजे लोकांना कळेल की, एवढं श्रीमंत असून देखील त्यांनी सोबत काही नेले नाही. आपण केलेली कमाई, धनदौलत, जमीनजुमला, घर, संपत्ती, सर्व काही येथेच राहते. फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळे आपले नाव तेवढे जिवंत राहते. म्हणूनच म्हटले जाते की, पैसा कमाविण्यापेक्षा माणुसकी कमवा. धनाने गरीब असाल तरी चालेल पण मनाने गरीब राहु नका. चांगली कर्मे करणारा व्यक्ती हा कधी ही गरीब राहू शकत नाही. समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा , मानसन्मान ह्या सर्व गोष्टी अगदी फुकटात मिळतात. पैसा खर्च करून सुध्दा ह्या बाबी सहजासहजी मिळत नाहीत. समाजाला आणि देशाला उपयोगी पडेल असे कार्य केल्यास आपले जीवन व्यर्थ जाणार नाही. देशाच्या रक्षणापायी आजपर्यंत कित्येक जवान मृत्यूमुखी पडले. त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. ते अजरामर झाले आहेत. आपले अनमोल जीवन ही व्यर्थ जाऊ नये, आपण ही या देशाचे व समाजाचे ऋण फेडावे असे वाटत असेल तर अगदी फारच सोपे कार्य आपणासमोर आहे ते म्हणजे आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणे. आज आपण एकविसाव्या शतकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संगणक युगात वावरत आहोत. कवी केशवसुत यांनी आपल्या तुतारी कवितेत म्हटल्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. जुन्या चालिरिती, पध्दती, प्रथा यांना तिलांजली देऊन आपल्या मृत्यूनंतर अवयवदान देण्याची तयारी ठेवणे गरजू लोकांसाठी एक संजीवनी ठरणार आहे, एवढे मात्र नक्की.
आपल्या शरीरातून जेंव्हा चेतना नष्ट होते तेंव्हा आपला मृत्यू झाला असे जाहीर केल्या जाते. आपल्याला मृत्यू म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. हा विषय देखील चर्चिला जाऊ नये असे वाटते. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे. आपल्या मृत्यूनंतर परंपरेनुसार त्या शरीराची काही जण दफन करतात तर काही जण दहन करतात. म्हणजेच मृत्यूनंतर ते शरीर काहीच कामाचे नाही म्हणून ही कृती केल्या जाते. परंतु आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधातुन माणसाच्या मृत्यूनंतर काही तास शरीरातील काही अवयव त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे जिवंत राहतात. जसे की, डोळे ( सात ते आठ तास ) किडनी, हृदय इत्यादी ठराविक वेळासाठी मेलेल्या व्यक्तीमध्ये जिवंत राहतात. तसेच ते अवयव गरजू लोकांना ठराविक कालावधीत प्रत्यारोपण करून बसविता येते. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते. त्यामुळे त्या व्यक्तीची ती गरज पूर्ण होते आणि त्यास दीर्घकाळाचे जीवन मिळू शकते. जसे रक्त कोठेच तयार करता येत नाही अगदी तसेच मानवाच्या शरीरात असलेले अत्यंत महत्वाचे असे डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयव कोणत्याच कारखान्यात तयार करता येत नाही. त्यास मनुष्य जन्मच घ्यावा लागतो. त्यास्तव तो देह जाळणे आणि पुरणे एवढ्याच कामासाठी शिल्लक असेल तर त्यास दान दिल्याने काय बिघडते ? मात्र यामुळे अनेकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक गरजूना नवजीवन मिळू शकते. तसे जिवंत असताना आपण अनेक प्रकारचे दान देऊन पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो. दानशूर व्यक्ती त्यालाच म्हटले जाते जो आपल्या जवळील सर्व वस्तूचे दान देतो. यासाठी महाभारतातील कर्णाचे उदाहरण दिले जाते. बहुतांश लोक अन्नदान करतात. काही नवयुवक मंडळी रक्तदान करतात. काही लोक पैसा दान करतात तर काही कपडे दान करतात. काही मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प करतात. या सर्व दानाच्या प्रकारात अवयवदान सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आपणास पूर्ण माहिती झाल्याशिवाय तसेच प्रचिती आणि स्वअनुभव आल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. अवयवदान केल्यामुळे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा त्या अवयवाच्या रुपात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जिवंत असू शकतो. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या स्लोगनप्रमाणे. दक्षिण भारतीय चित्रपटातील नागार्जुना, सौंदर्या आणि श्रीकांत या अभिनेत्यांनी नुवस्तावनी या तेलगू चित्रपटात या अवयवदानाचे महत्त्व फार सुंदररित्या अधोरेखित केले आहे. प्रशासन आणि वैद्यकशास्त्र विभागानी या अवयवदानाबाबत लोकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळीनी या विषयावर चांगला चित्रपट तयार करून लोकांमध्ये अवयवदानाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न करावा. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या मी जाता राहील कार्य काय ? या प्रश्नाचे उत्तर अवयवदानाच्या संकल्पनेतून नक्कीच करता येईल. याविषयी सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे वाटते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असे पूर्वी म्हटले जायचे पण आत्ता मरावे परी अवयवरूपी उरावे असे म्हणणे उचित ठरेल.
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
[05/06, 3:22 PM] senkude: (5)
*अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान*
एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होण्याच्या प्रक्रियेस दान म्हणतात. जे जे आपल्याजवळ आहे , ते,ते दुसऱ्यास देऊन टाकन हे पुण्यप्रद कार्य असतं. महारथी कर्णाची दानशूरता हे सर्वांना ठाऊकच आहे. खरंतर दानास धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असतं. भूदान, अन्नदान ,नेत्रदान, रक्तदान, ज्ञानदान, अवयवदान आणि देहदान हे असे दानाचे अनेक प्रकार आहेत. परोपकाराच्या निर्मळ भावनेतून जे दान दिले जाते त्यास सत्पात्री दान असे म्हणतात. या सर्व दानाच्या पाठीमागे धार्मिक आणि सामाजिक विचारांची बैठक असते. जेव्हा जीवनाचा अंश म्हणजे नेत्रदान, त्वचादान, किडनी दान असे आपले अवयव दान आपण दुसऱ्यांना देतो तेव्हाच आपले खरेखुरे दान होते. असे दान देणे म्हणजे खरोखर स्वतःसाठी काही प्राप्त करणे होय.
वास्तविक परमेश्वर प्रत्येकाचा अंतकरणात आहे. तो प्रत्येक मानवाच्या हृदयात वास करतो. म्हणून माणसाने आपले स्वरूप ओळखावे व या जगावर प्रेम करावे, भेदाभेद करू नये, निर्मळ मनाने जनसेवा करावी. सत्कृत्य करीत रहावे. कारण प्रत्येक सकृत्य हे दानधर्म होय.
अवयव दान जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवाचे शरीर क्षणभंगूर आहे. मृत्यू हा अटळ आहे. माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल 'आला आणि गेला' मानवाच्या या उंबरठ्यावर यमराज येऊन केव्हा बोलवेल हे सांगता येत नाही. कारण मरण अटळ आहे. मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर अवयव दान करणे फार महत्त्वाचे आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे.आपल्या समाजात अवयव दानाविषयी म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. अवयवदान काय असते? हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही.अवयवदानाचे ज्ञान हे केवळ नेत्र, किंवा किडनी पुरत मर्यादित नसून शरीराचे सुमारे दहा विविध अवयव आपण दान करू शकतो. त्यासाठी त्याची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. अवयवदानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माणसाच्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच अवयवदान शक्य आहे.
मानवाने आपल्या मृत्युनंतर जर अवयव दान केले तर कुणालातरी
जीवनदान मिळू शकते. म्हणून अवयवदान हे सर्वश्रेष्ठ आहे. जागतिक स्तरावर १३ ऑगस्ट जागतिक
'अवयवदान' दिन साजरा केला जातो.
आपल्या मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन आपण फुलवायचे असा विचार केला तर आपण नक्कीच एक चांगले कार्य केले म्हणून समाधानी राहू. व अशा चांगल्या कार्याचे समाजात प्रबोधन व जनजागृती होईल. अवयव दान करायचे झाले असल्यास आपल्याला आरोग्य विभागमध्ये जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो. असा अर्ज केल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर ज्या अवयवाचे दान करायचे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करून आपले संमती पत्र द्यावे लागते. त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. २६ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा 'आय डोनेशन' आठवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान म्हणजे डोळे डोनेट करणे. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. नेत्रदान करतानी पूर्ण डोळ्याचे दान केले जात नाही तर डोळ्याचे कॉर्निया चे डोनेट होते ते ट्रान्सपरंट असते. नेत्रदान विषयी काही अंधविश्वास दूर करायला पाहिजे. नेत्रदान ही एक समाजसेवा आहे. ते स्वेच्छेने केलेले कार्य आहे.
जर एखादी व्यक्ती आपले 'नेत्रदान' करण्यास इच्छुक असेल तर मृत्यूनंतर त्याचे डोळे काढले जातात. परंतु जर ती व्यक्ती वयस्क असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे डोळे कमजोर असेल, मोतीबिंदू सारखा आजार असेल तर अशा व्यक्तीचे डोळे उपयोगात पडत नाही. नेत्रदान करताना त्या व्यक्तीचे डोळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असावेत. जर अशा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासाच्या आतच डोळे काढून घ्यायला हवे. आणि नेत्रदान केलेले डोळे तीन ते चार दिवसाच्या आत उपयोगात आणायला हवे.
नेत्रदान हे ऐच्छिक स्वरूपाचे असते त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते. आणि हे नेत्रदान करण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचे बंधन नाही. योग्य नियमाचे पालन करून
रीतसर अर्ज भरून आपण हे नेत्रदान करू शकतो. आणि एका नेत्रहीन व्यक्तीस नेत्रदान देऊन हे जग दाखवू शकतो. ह्या नटलेल्या सृष्टीचे सौंदर्य दाखवू शकतो. म्हणून प्रत्येकाने एकच संकल्प करावा आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान , नेत्रदान करावे. ही परोपकाराची वृत्ती व मानवतेची प्रतिष्ठा जोपासावी.माणसाने मरावे परी किर्तीरुपी उरावे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि नांदेड.
[05/06, 3:31 PM] अमित बडगे: *(38)*
*अवयवदान: एक सामाजिक कार्य*
मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.
अवयवदान प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीने जवळच्या नातेवाईकांस किडनी, यकृत दिले तर त्याच्या शरीरावर काही परिणाम होईल का? अवयव पुन्हा निर्माण होऊ शकतो का? असे काही प्रश्न आहेत. खरे तर वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली असून प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते. किडनी, हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे आदी अवयवांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाल्याचे आपण माध्यमातून वाचतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
रुग्ण दवाखान्यात भरती झाला म्हणजे त्याचे अवयव काढून घेणे, अनाथ मुले, व्यक्ती, भिकारी यांना पकडून अवयव काढून घेणे, पैशाचे आमिष दाखवून अवयव काढणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही डॉक्टर्स व अवयवांची तस्करी करणारी माणसे सहभागी होती. त्यामुळे माणसे अपंग व्हायची, मरायची. अशा अवयव प्रत्यारोपणामध्ये गरजूंना फायदा व्हावा, त्या प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी मानवी उपचाराकरिता व अवयवांची व्यावयायिक विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४' लागू केला. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ मध्ये अंमलात आल्यानंतर आजपर्यंत ११३६४ किडनी, ४६८ लिव्हर, १९ हृदय, ३ फुफ्फुसांचे आणि ४७९ डोळ्यांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन देण्यात आले आहे. आताच्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये सुमारे पाच लाख मुत्रपिंड, पन्नास हजार यकृत व २००० हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असून त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे.
या प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत संबंधित डॉक्टरला कुठल्याही व्यक्तीचे अवयव काढणे, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याचे परिणाम, धोके याची माहिती रुग्णास व त्याच्या नातेवाईकास दिली पाहिजे. या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयातच शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित रुग्णासाठी अवयव देणारी व घेणारी व्यक्ती जवळचे नातेवाईक असणे गरजेचे असते. जर असे नातेवाईक नसतील तर प्रत्यारोपण समितीची परवानगी घेणे आवश्यक असते. या समितीतील सदस्यांकडून सखोल तपासणी केल्यानंतरच प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर ज्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची व तो जेथे दाखल आहे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रत्यारोपण प्राधिकरण समितीला संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच संपूर्ण राज्यातील अवयवदान समन्वय करण्यासाठी मुंबई येथे 'झोनल ट्रान्सप्लांट कॉ-ऑर्डिनेशन सेंटर' उभे करण्यात आले आहे. या सेंटरच्या औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून अवयवदान प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचे काम केले जाते. मोठ्या शहरातील कोणत्या रुग्णालयात किती गरजू रुग्णांना अवयवाची गरज आहे.
- अमित प्र. बडगे, नागपुर
(7030269143)
[05/06, 3:58 PM] शुभदा दीक्षित: (11)
अवयव दान : महा दान
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते. पण त्याहूनही महादान आहे अवयवदान. अन्नदान, द्रव्यदान ही दाने सर्वजण करू शकतातच असे नाही. पण अवयवदान कुणीही करु शकते. फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. समजा, तुम्हाला तुम्ही जिवंत असताना अवयवदान नाही करायचे, तरी हरकत नाही. मृत्यू नंतर तर शरीराचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तेव्हा तुम्ही अवयवदान करू शकता. एक देह 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारून शकतो. दहा लोकांना जीवनदान देऊ शकतो. फक्त नेत्र व मूत्रपिंड इतकेच नव्हे तर अजून कितीतरी विविध अवयव आपण दान करू शकतो. उदाहरणार्थ हृदय, यकृत, बोन मॅरॅथॉन, स्वादुपिंड, आतडी, कॉर्निआ.
अवयव दान करण्याच्या दोन पद्धती आहेत. 1) ऑप्ट इन. यात व्यक्तीने फॉर्म भरून संमती जाहीर केलेली असते. 2) ऑप्ट आऊट. यात 'अवयव दान करायचे नाही' असा नकार दिला नसल्याने उर्वरित सगळ्यांना ते दाते आहेत असे गृहीत धरले जाते. जर्मनीमध्ये ही पद्धत आहे. तीन वर्षे व त्याहून अधिक कोणीही व्यक्ती अवयवदान करू शकते. लाइफ सपोर्ट सिस्टिम वरील ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास अवयवदान होऊ शकते. नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयवदान करता येते.
अमेरिकेतील बोस्टन मध्ये किडनी प्रत्यारोपण अवयवदानाची सुरुवात झाली.
एखाद्या जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिशूज त्या शरीरातून काढून दुसऱ्या मानवी शरीरात त्याचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. ह्याला दान म्हणतात कारण असे करण्याबाबत दात्याची संमती घेतली जाते.
अवयव दानासाठी काही चाचण्या आवश्यक असतात. जसे रक्तगट तपासणी, ह्यूमन ल्यूको साईट अँटीजन, सेरोलॉजी इत्यादी.
अवयवांची तस्करी होऊ नये, त्याचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून त्यासाठी कायदा ही 1994 मध्ये संमत झाला आहे. अनाथ मुले, अनाथ व्यक्ती, भिकारी यांना पकडून अवयव काढून घेणे, पैशाचे आमिष दाखवून अवयव काढणे, त्यामुळे ही माणसे अपंग व्हायची, मरायची. पण या कायद्यामुळे या प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होऊ लागले. अवयवाची व्यावसायिक विक्री थांबली.
जिवंत असताना अवयव दान करणारा व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी दोघांनाही त्याचे परिणाम, धोके सांगितले जातात. सर्व माहिती दिली जाते. कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयातच या शस्त्रक्रिया क्रिया केल्या जातात. संपूर्ण राज्यातील अवयवदान समन्वय करण्यासाठी मुंबई येथे 'झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर' उभे करण्यात आले आहे. त्याच्या शाखा पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे आहेत. अवयवदानात स्पेन देशाचा पहिला नंबर लागतो.
वैद्यकीय क्षेत्रात अलीकडे झपाट्याने प्रगती होत आहे. रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा मिळत आहेत. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. कितीही आजार गंभीर असो, तो बरा होण्याची शक्यता 95 टक्क्यांपर्यंत गेली आहे. म्हणुनच अवयव दान आणि प्रत्यारोपण ह्यातही यशस्वीतेची यशस्वितेची टक्केवारी वाढत आहे.
'महा अवयवदान महोत्सव 2017' हा दिनांक 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2017 दरम्यान साजरा केला गेला. समाजात अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे, जागरूकता निर्माण करणे, हा त्यामागे हेतू होता. यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट हा 'अवयव दान दिन' म्हणून साजरा केला जातो. अवयव अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना कळावे म्हणून मुंबईचा डबेवाल्यांनी पुढाकार घेतला. सुमारे शंभर डबेवाल्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय जाहीर करून अर्ज भरले.
अवयव दान देण्यात- घेण्यात जात-पात, धर्म देश काहीही आड येत नाही. अवयव दान केल्याने मृत्यूनंतरही अवयव रुपात जिवंत राहता येते. अवयवदानात एकच उदात्त हेतू आहे, 'मृत्यूनंतर कोणाचे तरी जीवन फुलवू या'
शुभदा दीक्षित (11)
पुणे
[05/06, 4:12 PM] खंडेराज वारकड: *अवयव दान एक श्रेष्ठदान*
अवयव दान हे मृत्यूनंतर आणि जिवंत असतानाही केले जाते. जिवंत व्यक्ती कायद्यानुसार आपल्या जवळच्या नातलगास अवयव दान करू शकतो. जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती अवयव दान करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जिवास धोका नसतो. तरीही त्या जिवंत व्यक्तीतील एक अवयव तर कमीच असतो त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने ते ठीक नसते. त्यासाठी जिवंत व्यक्तींनी अवयव दान करण्याची संख्या कमी व्हावी असे मला वाटते व मृत व्यक्तींच्या अवयवदानाची संख्या वाढावी असे सुद्धा मला वाटते. अवयवदानाच्या जागृतीसाठी 27 मार्च हा दिवस अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो.
18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ऐच्छिक अवयव दान करू शकते तर 18 वर्षांखालील मुलांना अवयव दान करायचे असल्यास त्यांच्या पालकांची परवानगी लागते. नैसर्गिक मृत्यू झालेला असल्यास त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मंजुरी दिल्यास व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते. आपल्यालासुद्धा अवयवदान करायला हवे पण लक्षात ठेवा आपल्याला अवयव दान मृत्यूनंतर करायचे आहे. मृत्यू अगोदर केलेले अवयवदान आपल्याला घातक ठरू शकते.
नैसर्गिक मृत्यू जसे आत्महत्या, अपघात,जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास तसेच एड्स किंवा अन्य संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास देहदान स्वीकारला जात नाही.
अवयव दान म्हणजे..." मरावे परी देहरुपी उरावे"
आपणही अवयव दान करू शकतो पण लक्षात ठेवा "अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान"
नाव: खंडेराव बळीराम वरकड
वर्ग: आठवा
शाळा: जवाहर नवोदय विद्यालय परभणी
मो.नं. 9960453288
पत्ता: भाग्यनगर वसमत रोड परभणी
[05/06, 4:54 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*अवयवदान सर्वश्रेष्ठ दान*
आपल्या ला मानवी जीवन मिळाले हे सर्वात महत्त्वाचे असून मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. सारासार विचार करण्याची शक्ती फक्त मानवाला प्राप्त आहे. मानवाने नवनवीन शोध लावले आणि त्यापैकीच महत्वाचे म्हणजे एका व्यक्तिच्या शरिरातील अवयव दुसर्या शरिरात स्थापन करणे ज्याला आपण ' अंग प्रत्यारोपण' म्हणतो. शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत रहायचे असेल तर ' अवयव दान ' करायला पाहिजे. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत असतात व प्रतिक्षेतच आवश्यक अवयव न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पुरेशी माहिती व दान करण्याची प्रबळ इच्छाहवी. अवयव दान हे प्रामुख्याने दोन प्रकारात करता येते.
*लाईव डोनेशन*(जिवंतपणी अवयव दान)
ज्यात कुटुंबातील सदस्य किंवा मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती , जिवंतपणीच आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करू शकते. जिवंत व्यक्ती केवळ आपल्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते. ( मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊबहिण अथवा पती किंवा पत्नी ) याव्यतिरिक्त इतर कोणाला जिवंतपणी दुसर्यांसाठी अवयवदान करायचे असल्यास त्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. अवयवदानानंतर व्यक्तिच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते.
माझ्याशाळेत सुद्धा एक शिक्षक आहेत ज्यांच्या दोन्ही किडनी काम करत नव्हते त्यामुळे त्यांना त्यांच्या पत्नीने आपली एक किडनी दान दिली. आता तीन वर्ष झालीत दोघेही सुखमय व आनंदी जीवन जगत आहेत. अंग प्रत्यारोपण प्रक्रिया केल्यानंतर ज्यांच्या शरीरात अवयव प्रत्यारोपण केले जाते त्यांना व दानदात्यांना काही पथ्ये पाळावे लागतात. नंतर काही दिवसांनी नार्मल जीवन जगता येते.
*मृत्यू पश्चात अवयव दान*
(कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट)
एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित केल्यानंतर , त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले जातात. त्यास 'कॅडॅव्हर ट्रान्सप्लान्ट' म्हणतात. ब्रेनडेड म्हणजे अपघातात डोक्याला मार लागल्याने ,मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू (ब्रेनडेड) होऊ शकतो. अशावेळी लाइफ सपोर्टींग सिस्टीमवर त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास, नाडीचे ठोके आणि इतर अवयवांचे कार्य सुरु असते, हे लक्षात घेऊन ब्रेन डेड रुग्णांविषयी निर्णय घेतला जातो. प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातच , ब्रेनडेड मृत्यू घोषित करता येतो .त्यामुळे अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते. परंतु डोळे आणि त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत घरी मृत्यू झाला तरी होऊ शकते.मृत्युनंतर लगेच आप्तांना अवयव दानाविषयीची प्रक्रिया पुर्ण करावी लागते.
मृतव्यक्ती ज्यांची हृद्यक्रिया बंद पडली आहे, ते नेत्र व त्वचा दान करू शकतात.मात्र ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचेदेखील दान होऊ शकते.
नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे अवयव दान करता येऊ शकते.
अवयव प्रत्यारोपण कालावधी वेगवेगळा असतो.
डोळे - काही महिने
त्वचा - सहा तासांच्या आत
फुफ्फुस - सहा तास आत
किडनी - ४८ तास आत
काही मृत्यु असे असतात की दानदात्यांने जरी अवयव दान करण्याची प्रोसीजर पुर्ण केली असली तरी शक्य होत नाही.
अनैसर्गिक मृत्यू जसे की, आत्महत्या, अपघात जळून अथवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास काही कर्करोग , एड्स असल्यास विहित नमुन्यात मृत्यूचे प्रमाणपत्र नसेल तर अशावेळी अवयव प्रत्यारोपण करता येत नाही.
अवयवदानाविषयीचे गैरसमज दुर करणे खुप गरजेचे आहे. कदाचित मृत्यूपश्चात आपण काहींचे आयुष्य थोडे सुसह्य करू शकतो. त्याकरिता अवयवदानाविषयीची संपूर्ण माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी गावागावात शिबीर, मार्गदर्शन व जनजागृती करण्याची खूप गरज आहे.
आपण शाळेत अनेक महत्वाचे दिवस कार्यक्रम घेऊन साजरे करतो त्याचप्रमाणे 13 आॅगष्ट ला 'अवयव प्रत्यारोपण दिवस' जर आपण शाळा स्तरावर साजरा केला तर नक्कीच सर्वांपर्यंत माहिती पोचवता येईल. ही एक संधी आहे ज्यामुळे मृत्यू नंतर सुद्धा अनेकांना मदत करून जीवनदान करता येईल.
म्हणून अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
[05/06, 5:24 PM] Nagesh pande Shevalkar: *मरावे परि अवयवरुपी उरावे!*
नांदेड येथील ज्येष्ठ, व्यासंगी पत्रकार श्री माधव अटकोरे यांनी निष्ठेने, मेहनतीने, जिद्दीने लिहून प्रकाशित केलेले आणि मला अगत्याने दिलेले ' अवयवदान: पार्थिवाचे देणे ' हे पुस्तक वाचले. अनेक महिन्यापासून श्री अटकोरे यांच्या अवयवदानासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाविषयी ऐकून होतो. त्या संदर्भातील त्यांचे काही लेखही वाचण्यात आले होते. या अभियानाविषयी त्यांची तळमळ एवढी पराकोटीची आहे की, पदरमोड करून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पार्थिवाचे देणे हे नावच अत्यंत काव्यात्मक आहे. हे समर्पक शीर्षक महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक, नाटककार श्री दत्ता भगत यांनी सुचविले असल्याचे लेखक आदरपूर्वक सांगतात.
आत्मा सोडून गेलेले शरीर म्हणजे पार्थिव! जिथे आत्मा नसलेल्या शरीराजवळ जाण्याचे अनेक लोक टाळतात तिथे त्या पार्थिवाचा एखादा अवयव घेऊन गरजवंताला दान करणे , तो अवयव जिवंत ठेवून त्या माणसाच्या शरीरात स्फूर्ती, चैतन्य निर्माण करून त्याला नवजीवन देणे हे कार्य खरोखरीच महनीय, वंदनीय आणि अनुकरणीय आहे. अवयवदान ही चळवळ तशी शासन अंगीकृत अशी आहे. लेखक माधवराव हे या चळवळीकडे एक चळवळ, एक शासकीय योजना म्हणून बघत नाहीत तर त्यासाठी ते तन-मन-धनाने उतरतात. त्यासाठी वाहून घेतात, सर्वस्व झोकून देतात. त्यांच्या 'न भूतो न भविष्यती ' अशा कार्यातून अवयवदानाचे कार्य आता चळवळ राहिली नसून एका क्रांतीची नांदी दिसत आहे, एक ललकारी देते आहे. क्रांती केवळ रक्तरंजीत असते असे नाही तर ती विनाशस्त्रानेही होऊ शकते. ती असते विचारांची, शब्दांची आणि लेखनीची क्रांती. माधव अटकोरे हेही अशाच एका क्रांतीची मशाल घेऊन गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत धडक देतांना दिसत आहेत.
जनजागृतीचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे लेखणी! पत्रकारिता करत असताना शब्द आणि लेखणी ही त्यांची दोन महत्त्वाची साधनं, अस्त्र! या दोन्ही आयुधांचा त्यांनी अवयवदान अभियानात अत्यंत जाणीवपूर्वक, कौशल्याने वापर करून घेतल्याचे पार्थिवाचे देणे हे पुस्तक वाचताना लक्षात येते. एकूण दोनशे आठ पानांच्या या पुस्तकात त्यांनी जणू याच संकल्पनेचा जागर मांडला आहे. विविध परिशिष्टासह स्वतःच्या एकूण एकोणसाठ लेखांचा समावेश करताना त्यांनी या विषयावर अनेकांना लिहिते केले आहे. अधिकारी, पदाधिकारी, लेखक, डॉक्टर, नागरिक यापैकी कुणाचे लेख, कुणाच्या कविता, कुणाचे आवाहन, मतमतांतरे या सर्वांनी परिपूर्ण असे हे पुस्तक आहे.
माधव अटकोरे यांनी पार्थिवाचे देणे या पुस्तकात समाविष्ट केलेले लेख अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले आहेत. त्या लेखातून जनसामान्यांपासून सर्व स्तरावरील नागरिकांचे देहदान, अवयवदान या संबंधाने निश्चितच जनजागरण झाले असल्याचे दिसून येते. वाचकांच्या, दिग्गजांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मतं, अनुभव आणि लेख या सर्वांना एकत्र पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा विचार पुढे आला परंतु, सोबतच पैशाचा ही प्रश्न समोर उभा राहिला. समाजसेवा आणि पैसा या दोन गोष्टी म्हणजे जणू रेल्वेचे समांतर जाणारे रुळ! मैलोनमैल प्रवास केला तरीही दोन्ही रुळ योग्य अंतर राखून असतात. तद्वत समाजसेवा आणि आर्थिक स्थिती यांचे असते. शेवटी मुलांनी कर्ज काढून रक्कम उभी केली आणि माधवरावांची पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा पूर्ण झाली. या पुस्तकात वाचायला मिळणारी माहिती लेखकाने अतिशय परिश्रमपूर्वक जमा केली असल्याचे पुस्तक वाचताना लक्षात येते. जिथे कुठे अवयवदानाचे कार्य चालते, जिथून कुठून अवयवदानाची माहिती मिळवता येईल, सोबत यथोचित आकडेवारी देता येईल ते सारे जमा करताना अटकोरे यांना किती कष्ट पडले असतील त्याची कल्पनाच केलेली बरी. बरे, एवढी सारी पदरमोड, कष्ट करून ही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तक विक्रीतून झालेला खर्च वसूल करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. उलट माधव अटकोरे यांनी या पुस्तकाच्या सातशेपेक्षा अधिक प्रती विनामूल्य आणि कुरिअर, स्पिडपोस्ट अशा माध्यमातून स्वखर्चाने पाठविल्या हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव ठळकपणे जाणवतात. एखाद्या ध्येयाने पेटलेली व्यक्ती काय करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे माधव अटकोरे!
या चळवळीला वाहून घेताना असे काय घडले याचे विवेचन करताना माधव अटकोरे सांगतात की, 'अवयवदान श्रेष्ठ दान ' या लेखमालेची प्रेरणा कविवर्य मंगेश पाडगावकर यांची 'मृत्यूला
म्हणतो' ही कविता! हिच कविता जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगते, जीवनस्त्रोत असल्याचे अटकोरे विनयाने सांगतात. नेत्रदान, रक्तदान, किडनीदान, देहदान, त्वचादान, मुत्रपिंडदान, यकृतदान, स्वादुपिंडदान, आतडीदान, फुप्फुसदान, गर्भाशयदान इत्यादी अवयवांचे दान जिवंतपणी वा मरणोपांत मानवप्राणी करू शकतो हे अत्यंत प्रभावीपणे अटकोरे सांगतात. त्याचवेळी पार्थिवाचे देणे हे पुस्तक लेखक अंजनाबाई लहाने यांना अर्पण करतात. या मागे लेखकाची भूमिका अत्यंत प्रांजळ आहे कारण या अंजनामाता केवळ तात्यासाहेब या अपत्याला जन्म देऊन थांबत नाहीत तर त्या तात्यांना स्वतःची किडनी देऊन मातेचे आगळेवेगळे कर्तव्य आणि एक उच्चतम आदर्श समाजापुढे ठेवतात. त्यांच्या या महत्तम त्यागातून डॉ. तात्यासाहेब लहाने प्रेरणा घेऊन पुढे नेत्रशस्त्रक्रियेचा जागतिक विक्रम होईल असा पराक्रम करतात. तब्बल दीड लाख नेत्रशस्त्रक्रिया करणाऱ्या तात्यांच्या कार्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांचा 'पद्मश्री' हा सन्मान देऊन गौरव केला आहे. मातेने किडनी देऊन आपणास पुनर्जन्म देऊन नवजीवन दिले या पवित्र भावनेने डॉ. लहाने हे ज्या दिवशी किडनी प्रत्यारोपण झाले तो दिवस स्वतःचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. या सोबत ज्या ज्या लोकांनी अवयवदान केले त्यांची माहिती माधव अटकोरे यांनी अत्यंत ह्रदयद्रावक भाषेत पुस्तकात नमूद केली आहे. अंजनाबाई लहाने यांच्याप्रमाणेच स्वतःच्या पंचवीस वर्षाच्या मुलाला स्वतःची किडनी देणारी माता औरंगाबाद येथे असताना आमच्या शेजारी राहात होती. औरंगाबादपासून जवळ असलेल्या एका खेड्यातील एक सधन शेतकरी कुटुंब मुलाच्या त्या शस्त्रक्रियेसाठी औरंगाबाद येथे अनेक महिने येऊन राहिले होते. त्या तरुण मुलाची किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते कुटुंब त्या आदर्श मातेसह स्वगृही परतत असताना कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, समाधान अजूनही माझ्या स्मरणात आहे. धन्य त्या माता!
श्री माधव अटकोरे यांच्या अथक परिश्रमानंतर अनेकांनी देहदान, अवयवदानास संमती दिली असल्याची माहिती त्या दानशूर व्यक्तींच्या नावासह पुस्तकात वाचायला मिळते. श्री अटकोरे यांचे पुत्र सदानंद आणि रश्मी यांचा ०५नोव्हेंबर२०१७ या दिवशी पुणे येथे विवाह संपन्न झाला. नवविवाहीत जोडप्याने स्वतःच्या लग्न सोहळ्यात देहदानाचा संकल्प केला. यापेक्षा आणखी मोठे यश ते कोणते? नागपूर येथील प्राध्यापक योगेश बनकर यांचा विवाह २९ मार्च २०१७ रोजी प्रियंका बागडे यांच्याशी झाला. नवदाम्पत्याने लग्नमंडपात अवयवदानाचा निश्चय जाहीरपणे घेतला. असे अनेक अनुभव माधव अटकोरे यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. लेखक अटकोरे यांची भेट एका सत्तर वर्षाच्या ज्येष्ठासोबत झाली. बोलताना त्या व्यक्तीने स्वतःची त्वचा दान करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. त्या निर्णयामागे असणारी प्रेरणा स्पष्ट करताना तो महातारा (म्हातारा नव्हे) म्हणाला की, त्याच्या नात्यातील एका तरूणाने स्वतःची त्वचा अशा एका तरुणीला दान केली आहे की, जिचा चेहरा कुण्या तरी माथेफिरुने अँसिड हल्ला करून विद्रुप केला होता. दानामागचा शुद्ध हेतू लक्षात येताच वाचणारा, ऐकणारा दोघेही अशा 'कर्णांपुढे', त्यांच्या दानशूर भावनेपुढे नतमस्तक होतात.
अजून एक भावविभोर करणारी, संवेदनशील मनाला अंतर्मुख करणारी, चटका लावणारी घटना लेखकाने नमूद केली आहे. दिल्लीजवळ असलेल्या रोहतक येथील एका टँक्सीचालकाच्या चाळीस वर्षीच्या पत्नीने स्वतःच्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून स्वतःची किडनी विकायला काढली. किडनी विकताना आणि नंतर मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश देताना ते कुटुंब दोन्ही ठिकाणी असलेल्या दलालांच्या जाळ्यात अडकते. परंतु, त्या मातेला एक समाधान निश्चित लाभले ते असे की, किडनी गेली, दलालांनी लुटले तरीही माझ्या मुलाला मला हव्या त्या शाळेत प्रवेश देता आला. अवयवदानाचा ही बाजार होतो हे आकडेवारीसह लेखक वाचकांपुढे मांडतात. त्या संदर्भात वेगवेगळी उदाहरणे देताना 'मराठवाड्यात किडनी अँटँक' ,आणि 'भारत दानापेक्षाही तस्करीतच पुढे' हे दोन लेख वाचकांपुढे अवलोकनार्थ ठेवतात.
अवयवदान : पार्थिवाचे देणे हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु भविष्यात घडू पाहणाऱ्या क्रांतीचे आपण साक्षीदारच नव्हे तर भागीदार असू शकतो अशी भावना निर्माण करणारे आहे. लेखक माधव अटकोरे हे जवळपास चाळीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. प्रत्येक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांची भाषा ओघवती, सरळ, सोपी आणि सहज समजेल अशी आहे. पुस्तकाच्या सातशेपेक्षा अधिक प्रती स्वखर्चाने, मोफत पोहचवूनही माधव अटकोरे यांचा अवयवदानाचा यज्ञ शांत न होता अजूनही धगधगतो आहे. लवकरच त्यांच्या पार्थिवाचे देणे या पुस्तकाची दुसरी आव्रुत्ती प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. या दुसऱ्या आव्रुत्तीसाठी अनुभव, लेख, कविता, चारोळी पाठविण्याचे आवाहन ते वाचकांना करत आहेत. श्री माधव अटकोरे यांच्या जिद्दीला, मेहनतीला,प्रामाणिकतेला सलाम! त्यांच्या धडपडीला शुभेच्छा!
नागेश सू. शेवाळकर
पुणे (९४२३१३९०७१)
[05/06, 5:26 PM] Milind Gaddamwar: (४३) सत्पात्री दान देहदान !
सत्पात्री दान ' देहदान ' ही संकल्पना समाजात रूजणे फार गरजेचे झाले आहे. आजचा काळ हा धकाधकीचा काळ आहे.रस्त्यांवरून वाहणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे.यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.दररोज हजारो लोक अपघातात सापडून कुणी गंभीर जखमी होत आहेत तर कुणी तरूणपणीच मृत्यूपंथाला लागत आहेत.हे चित्र भयावह आणि चिंतीत करणारे ठरते आहे.
महाराष्ट्र अॅनाटाॅमी अॅक्ट 1949 हा लागू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात देहदानाच्या प्रक्रियेला सुरुवात ही झालेली आहे.अजुनही या कायद्याबाबत जनतेला माहीती नाही.जनता ही याबाबत अनभिज्ञ आहे.एखाद्याचे ब्रेनडेड झाल्याचे आजकाल डॉक्टर्स लोक आवर्जून सांगतांना आढळून येतात.डाॅक्टर्सचा सांगण्याचा उद्देश हाच असतो कि तरूण वयात काही कारणाने किंवा अपघाताने ब्रेन डेड झाले असेल तर अश्या परिस्थितीत मनुष्य जीवंत असूनही तो मृतच गणला जातो.कारण तो कुठलिही हालचाल जाणू शकत नाही किंवा करू शकत नाही.फक्त तो प्राण टिकून असल्याने देहाने अस्तित्वात असतो.अशावेळी केलेले देहदान हे सत्कारणी लागते.त्या व्यक्तीचे बरेच अवयव डोळे,यकृत,ह्रदय,किडनी, त्वचा इत्यादी अवयव हे गरजू व्यक्तींच्या कामी येऊ शकतात.दोन डोळे दोघांना दृष्टि देऊ शकते.तर दोन किडन्या दोघांना जीवदान देऊ शकतात.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य होत आहे. ह्रदय रोपणासारखी अत्यंत जटील शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर्स यशस्वी होत आहेत.ही अभिमानाची बाब ठरते आहे.तसेच आज किडणी फेलीवरचे प्रमाण हे तरूणाईत वाढलेले पहायला मिळते आहे.ही बाब चिंतनीय ठरते आहे.
गरीबी ही मोठी वाईट असते असे म्हणतात.लोक गरीबीपायी पोटच्या मुलांना सुध्दा विकण्यास कमी करीत नाहीत.काही जण पैशाच्या आशेने,लालचेने आपली किडनी विकण्यास तयार होतात.कारण एकाच किडणीवर जीवन जगणारे बरेचजण आज अस्तित्वात आहेत.ते चांगले आयुष्य जगत आहेत.सत्पात्री दान हे कसलिही अपेक्षा न ठेवता करायचे असते. आपले शरीर हे निरोगी असले पाहिजे.आजही लोक देहदान करण्यासाठी घाबरतात.देहदान केल्याने आपले अहीत होईल अशी भिती त्यांच्या मनात असते.आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मी माझे संकल्पपत्र घरच्यांना विश्वासात घेऊन आधीच तालुका आरोग्य अधिका-यांना सुपूर्द केलेले आहे.यामुळे भविष्यात अडचणी उद्भवणार नाहीत. देहदान हे तेंव्हाच सत्कारणी लागते जेंव्हा मृत्यूपश्चात तुमचे अवयव हे दुस-यांच्या कामी येतात.ही प्रक्रीया फार वेगाने करावी लागते.यासाठी डाॅक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर तीन तासांच्या आत अवयव दानाची प्रक्रीया ही पार पाडावी लागते. व्यक्तिचे वयोमानानुसार ब-याचदा अवयव दान करण्याची इच्छा असूनही अवयवाची काम करण्याची क्षमता कमी झाल्याने ती इतर गरजुंना देणे शक्य होत नाही.अशावेळी आपला संपुर्ण देह दान केल्यास तो मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कामी येऊ शकतो. आजच्या परिस्थितीत हे करणे भाग आहे. त्याशिवाय मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती आणि मानवी शरीरा संबंधाने असलेले ज्ञान हे प्राप्त होणार नाही. यासंबंधाने लोकांमध्ये जनजागृती करणे जास्त हिताचे आहे असे वाटते.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा
भ्र.क्र.9511215200
[05/06, 5:30 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ विषय : - "अवयवदान" आपण समाजात आज पर्यन्त अन्नदान,कन्यादान,रक्तदान,जलदान,जीवनदान,अशाप्रकारची त्यापेक्षा एक वेगळेदान हे "अवयवदान"हे महत्वाचे दान समजले पाहिजे.कारण प्रत्यक्ष माणसाच्या आरोग्याशी संबध येत असतो.त्यामुळे इतर दानापेक्षा हे दान महत्वाचे आहे.हे दान करणारा जीवंत असताना करू शकतो.किवा जीवंत असतानाच जर माझ्या मृत्यु नंतर माझे कोणता अवयव दान करावयाचे जर प्रतिज्ञा पत्र करुन दिले तर त्याचे नातेवाईक आरोग्य यंत्रणेस माहिती देवून अवयव दान करू शकतात.अवयवदान करताना नेत्रदान,यकृतदान फुफुसदान,किडनीदान,त्वचादान,मूत्रपिंड दान,
कानाचा ड्रमदान,स्वादुपिंड दान,आतडी दान अशा वेगवेगळ्या अवयवदान आपण करू शकतो.नेत्रदान आपण केले नंतर जो अंध असतो त्याला दिसू शकते नजर प्राप्त होत असते आपण त्याच्या जीवनात कधी न मिळणारा आनंद देवू शकतो.आजहि आपल्या देशात असे लाखो लोक अंध आहेत ते नेत्रदान करणारांच्या प्रतिक्षेत आहेत. आपण जर मनावर घेतले तर आपल्या माघारी नेत्राचा काही उपयोग नसेल तर नेत्रदान केले तर अंधाच्या जीवनात प्रकाश पाडछ शकतो.हे लाख मोलाचे दान आहे.पण अवयव दानाचा प्रसार होत असताना आपल्या मनावर पाहिजे तो सकारात्मक परिणाम दिसत नाही याचे दुःख वाटते आहे.अवयवदान मधील नेत्रदान हा एक महत्वाचा अवयवदान
आहे.पण याशिवाय अपघात झालेनंतर खरी अपघातात
ज्या कोणाला गरज असते ती एखाद्या अवयवाची ती वेळेत पूर्ण केली पाहिजे. ती वेळेत पुर्ण नाही केली तर अपघातातील व्यक्ती मरण पावतात.मग त्या प्रमाणे वेगवेगळे अवयव दान करणारे दानशूर हवे असतात ते वेळेत मिळाले तरच प्राण वाचू शकतात.काही बाबतीत अवयवदान करणारे अवयव सक्षम असणे हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. कारण अवयव निरोगी माणसाचे हवेत.एखादा एडग्रस्त असेल तर त्याचे अवयव घेता येत नाहीत.अवयवदान मध्ये महत्वाचे दान करणारांचा रक्तगट जसे ए,बी,एबी,आणि ओ हे चार रक्तगट असतात.हे रक्तगट पाहिले जातात तरच अवयवदान योग्य होते.एखाध्याचा अपघातात बळी गेला असेल तर शवविच्छेदन करते वेळी दुस-यास भविष्यात उपयोगी पडणारे अवयव काढून घेतले जातात कारण ते इतरांना डोळे मिळू शकतात काहीना मुत्रपिंड ,त्वचा मिळू शकते.काही बाबत तर ब्रेनडेड झालेले असा कोणी असेल तर त्याचे नातेवाईकांचे संमतीने ब्रेन शिवाय इतर अवयव उदा.यकृत वगैरे महत्वाचे अवयव दान करून इतरांना जीवदान मिळू शकते. पण हे सर्व आरोग्याच्या नियमानुसार व वेळेत करावे लागते.जसे डोळे काही महिने,त्वचा सहा तासाच्या आत,फुफुस सहा तासाचे आत,किडनी ४८ तासाचे आत इत्यादि आरोग्य नियमाचे पालन करूनच अवयवदान केलेचा उपयोग असतो.त्या मुळे आपण अवयवदान हे किती गरजेचे आहे हे समाजात जाग्रती केली पाहिजे. केवळ आपल्या शाळेत प्रतिज्ञा म्हणून उपयोग नाही त्या प्रतिज्ञेचा या ठिकाणी दुरूपयोगी होऊ शकतो. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणायचे आणि अवयवदान करणेस मागे रहावयाचे हे कितीसे योग्य वाटते. त्यामुळे याचा प्रचार व प्रसार जास्ती जास्त लोकांनी सहभाग घेऊन केला तर अवयवदान करणारे स्वत:हून पुढे येतील व आपल्या बांधवाचे प्राण वाचवितील एवढे नक्की..... लेखक जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१
[05/06, 5:33 PM] सुंदरसिंग साबळे: 34
*अवयवदान करण्यासाठी जागृती करण्यात आपले योगदान*
===============
आपल्या सभोवती डोळस नजरेने पाहिले तर जो तो आपआपल्या परीने दानधर्म करीतच असतो.ज्ञानदान, अन्नदान,अवयवदान,देहदान,सुवर्णदान, रक्तदान शक्य आहे ते प्रत्येकजण करत असतो. भुकेल्याला जेऊ घालणे,तहानलेल्याला पाणी पाजने,गरजुला आर्थिक आधार देणे, ज्ञानदान करने या सगळ्या ने जगण्याला मदत होते पण अवयवदानाने एखाद्याला जीवदान मिळते. आज देशात कोरोनाने थैमान घातले आहे. आपलीच माणसं जीवन मरणाचा संघर्ष करत आहेत.कोरोनाचे युध्द जिंकन्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याकडून दोनच अपेक्षा ठेवून आहे एक घरात बसा आणि शक्य असेल तर रक्तदान करा. मित्रहो आपल्या आरोग्यास कसलीच बाधा न येता जर आपण एखाद्याला जीवदान देऊ शकलो तर यापेक्षा दुसरे श्रेष्ठ दान असूच शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांसाठी एक दिवशी जिल्हा रुग्णालय येथे जावून रक्तदान करण्यात यावे.
चला तर मग आपणही रक्तदान करु या व जगण्याचा आधार देऊ या. मी रक्तदान करुन माणूसपण जपणार आहे तुम्ही पण जपणार ना रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरीरातील किडनी, यकृत, डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हरमुळे जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही अवयवदानाचे महत्व जाणून रुग्ण सेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती होण्यासाठी अवयवदानाचे अभियान हाती घेण्याबाबत सूचीत केले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी प्रथम जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी, यासाठी राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान अभियान ३० ऑगस्ट २०१७ ते १ सप्टेंबर २०१७ दरम्यान घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली साजरे करण्यात येत आहे. यात वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागामार्फत महा अवयवदान जागृतीबाबत तसेच महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. गेल्यावर्षी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आपण यात लोकाना जागरूक करणे आणखी गरज आहे.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻::
🔸 श्री.सुंदरसिंग साबळे
गोंदिया
मो.9545254856
[05/06, 5:35 PM] Bharti Sawant: अवयवदान
अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान असे कितीतरी दान आपण आजवर करत आलो आहोत. परंतु अवयव दानाविषयी आपल्या समाजात म्हणावी तितकी जागृती झाली नाही.परंतू हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण इतर दान जिवंतपणी केले जाते, परंतु अवयवदान मृत्यूनंतरही करू शकतो. आपल्या स्वेच्छेने आपल्या जिवंतपणी आपण अवयवदानासाठी अर्ज भरू शकतो. म्हणजे मृत्यूनंतरही आपण इतरांच्या उपयोगी पडतो ही कल्पनाच सर्वोत्तम आहे.
आपले शरीर नश्वर आहे नि जीवन क्षणभंगुर. अशावेळी जर आपल्या शरीराचा अवयव चांगल्या धडधाकट,तरूण व्यक्तीस दान झाला तर वावगे ठरू नये. आपण दृष्टिदान केले तर जणू आपण त्याच्या डोळ्यांनी पुन्हा जिवंत आहोत हा आभासही महत्त्वाचा आणि आनंदाचा. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव पैशात मोजता येणार नाही इतका अनमोल आहे.एक अवयव शरीरात बसवायला लाखो रुपये खर्च होतात.मग तो मौल्यवान अवयव ज्या व्यक्तीचा त्यांचे मूल्य कसे चुकवू शकणार!!.
परंतु अवयव बसविल्यानंतर त्याचे जीवन कार्य सुरळीत चालू होते.हल्ली मेडिकल सायन्स फार पुढे गेले आहे. सर्व महत्त्वाचे आंतर्इंद्रिये डॉक्टर्स लीलया काढू आणि बदलू शकतात.ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात सहज बसवले जातात. त्यामुळे एखाद्या युवकाचा अपघात किंवा दुर्धर रोगामूळे अवयव खराब झाला असेल तर मृत शरीराचा बसवला जातो.तेव्हा त्या तरूणांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत होतो. तर त्या तरुणाचे आयुष्य नव्याने बहरते,फुलते. मेल्यानंतर तसेही शरीर मातीतच जाणार.अवयवदान केल्याने दात्याच्या नातेवाईकांना मानसिक समाधान मिळते. आपल्या माणसाच्या मृत शरीराचा चांगल्या कामासाठी उपयोग झाल्याचे चीज होते.त्यामुळे प्रत्येकाने जिवंतपणीच मनाशी हा निर्णय घ्यावा नि मृत्युपुर्व अवयवदानासाठीचा अर्ज भरून द्यावा.
सौ.भारती सावंत
मुंबई
[05/06, 5:57 PM] Manik Nagave: 07 लेख
अवयवदान
अवयवदान आज अतिशय महत्त्वाचे होऊन बसले आहे.समाजात याबद्दलची जनजागृती करण्याची खूप गरज आहे. याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.त्यासाठी 29 ऑगस्ट 2017 ला राज्यस्तरावर जनजागृतीसाठी महा अवयवदान महोत्सव हाती घेण्यात आला. जनजागृती करण्यात आली. लोकांना महत्त्व पटवून सांगण्यात आले. त्यामुळे हळूहळू समाजातील काही लोकं आता अवयवदानासाठी पुढे येत आहेत.ही एक चांगली सुरुवात आहे.
अवयवदानामुळे व्यक्ती तीच्या मृत्यूनंतर सुद्धा या जगात आपल्या अवयवांच्या आधारे राहू शकते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या कुणाच्यातरी जीवनाच्या अंधारात आपण प्रकाश देऊ शकतो.त्यामुळे आता सरकारी तसेच सामाजिक, खाजगघ संस्था अवयवदानाचा अर्ज भरुन घेत आहेत.
आज लोकांच्या मनामध्ये अवयवदानासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे. आपल्या शरीरातील कोणताही अवयव आपण मृत्यूनंतर दान करु शकतो.पण जिवंतपणी आपल्या शरीरातील जे दोन दोन अवयव आहेत त्यातील एक आपण दान करुन एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो.वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली आहे. यामुळे डोळे, यकृत, फुफ्फुसे,ह्दय,कीडणी यासारखे अवयव प्रत्यारोपण सहज करत आहेत.त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 अंतर्गत कोणत्याही डॉ. ला अवयव दाता व घेणारा या दोघांना ही या प्रत्यारोपणाचे महत्त्व, धोके,माहिती सागणे बंधनकारक आहे. शिवाय मानवी अवयवांची तस्करी केली तर गुन्हा ही दाखल होतो.
त्यामुळे आज गरज आहे अवयवदानाची. करुया अवयवदान व मृत्यूनंतर ही जीवंत राहुया.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
[05/06, 5:59 PM] Sujata Jadhav: देहदान किंवा अवयवदान (28)
शरीर हे नाशवंत आहे ,या नुसार मृत झाल्यावर व्यक्तीला दहन किंवा दफन करण्याची त्या त्या धर्मानुसार पध्दत आहे,हे आपल्याला माहिती आहे,परंतु पूर्वी ममी ठेवण्याची पध्दती काही देशात होती,त्याची वेगवेगळी कारणे आहेत,शरीर नाशवंत जरी असले तरी या आधुनिकतेच्या जगात विज्ञान व तंत्रज्ञान याने इतकी प्रगती केली आहे,की हे शरीर पुन्हा जिवंत रहावून जगू शकते.
आता देहदान,अवयवदान बरेच लोक करतात,एक पैशाच्या गरजेपोटी दुसरे समाजकार्य म्हणून देखील मग हे दान दोन प्रकारे करता येते--
१.जिवंत असताना-त्वचा,रक्तदान,यकृत,एखादी किडनी
२.मरण पावल्यावर-त्वचा,हृदय, डोळे,यकृत,फुफ्फुसे,
किडनी,सर्वच अवयव
या मध्ये जो व्यक्ती अवयव दान करणार आहे,त्याला मेडिकल कॉलेज मध्ये फॉर्म भरावा लागतो, त्याची परवानगी आहेच,परंतु ऐनवेळेस नातेवाईक विरोध करू नयेत,म्हणून त्यांची सुद्धा ना हरकत असावी लागते,हॉस्पिटलमध्ये असतांना एखाद्याने केलेले हे दानही विचारात घेतले जाते.
मृत व्यक्ती झाल्यास सहा तासातून दोन वेळा ब्रेनडेड नक्की झाले आहे का?हे डॉक्टर तपासून त्याला मृत घोषित करतात,आणि त्या व्यक्तीचे अवयव घेतात, अपवादात्मक जो कोमा मध्ये गेला आहे त्याचे अवयव घेऊ शकत नाही.
गरजवंताची गरज भागली जाते,महान आहे असे कार्य!!
सुजाता जाधव
नवी मुंबई
[05/06, 5:59 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: कोड क्र . ( 14 )
" सर्वश्रेष्ठ दान अवयवदान "
मानव जन्म हा लाखमोल असतो ... आणि सर्व मानवप्राण्यास तो अतिशय प्रिय असतो ... जेव्हा आपल्याकडे सर्व शारीरिक अवयव असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळतंच नाही ... पण जेव्हा एखादा अवयव निकामी होतो तेव्हा मात्र त्या अवयवाची खरी किंमत आपणांस प्रकर्षाने कळते ... म्हणून हा लाखमोलाचा अवयव दागिना सर्वांनी काळजीपूर्वक जपला पाहिजे ... त्याचे योग्य ते संरक्षण केले पाहिजे ... ते प्रदीर्घ कार्यक्षम राहण्यासाठी आवश्यक ती शारीरिक व मानसिक व्यायाम , प्राणायाम केली पाहिजे ... एकंदरीत आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा स्वस्थ व सुंदर राहिला पाहिजे ह्यास्तव तत्पर रहावे ...
आपण या विश्वात फक्त काही दिवसांचे प्रवासी आहोत ... मानवी मृत्यू हा अटळ असतो ... मग तो नैसर्गिक वा अपघातीही असू शकतो ... आणि मृत्यूनंतर या नश्वर देहास आप्तप्रियजन दहन वा दफन करतात ... पण जर का या मृत देहाचे काही व्यवस्थित अवयव गरजूस दान केल्यास ते श्रेष्ठदान ठरेल ... कारण ह्या दानाने ती मृत व्यक्तीही अप्रत्यक्षपणे पुर्नजीवीतच होईल की हो ... मग आपण सारे मिळून एक शुभ संकल्प करूया ... तो म्हणजेच या अवयवदानाचा ... जगी आपण नसलो तरीही जगूया पुन्हा या गरजुरूपाने ...
एखाद्या अंध व्यक्तीस दृष्टी येईल .... तो ही रंगीन दुनिया आपल्या माघारी आपल्याच नजरेनं पाहीन ... त्या व्यक्तीस पाहून आपले स्वजनही आनंदीत होतील ... एखाद्याच्या शरीरात आपले ह्दय धडधडून तोही व्यक्ती पुर्नजीवीत होईल ... किडनी , त्वचा आदी अवयव निकामी न होता सत्कर्मी होतील ... शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू विद्यार्थ्यांना मृत शरीर प्रयोगात आणून ते विशेष प्रावीण्य मिळवतील ....
चला तर मग लेखी योग्य ती कागदपत्रे भरून आपल्या या अनमोल देहाला मृत्यूनंतर दान करूया .... आणि जीवनही सार्थकी लावूया .. इतरांनाही आपल्या पश्चात आनंदाने जगवूया ...
अर्चना दिगांबर गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552963376
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें