मंगलवार, 2 जून 2020

रोज एक लेख :- 46 वा दिवस पर्यावरण

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- सेहेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 03 जून 2020 बुधवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- पर्यावरण*
( या आधी वसुंधरा विषयावर लेखन झाले आहे, ते वगळून लिहावं, तेच परत पोस्ट करू नये )

कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

[03/06, 11:18 AM] सौ भारती तिडके: 39)*******

*पर्यावरण दिवस*****

पर्यावरणाची करा रक्षा

पृथ्वीची होईल सुरक्षा.


आपल्या पर्यावरणाचे जतन करणे हा महत्वाचा विचार आहे, तो केवळ विचारच नाही तर ती एक प्रवृत्ती ,अभिवृत्ति ,कृती ही आहे. पर्यावरणाच्या विषय हा संपूर्ण मानव जातीच्या हिताचा जागतिक विषय बनलेला आहे. निसर्गातून सर्व जीवन जन्माला येते, निसर्गाच्या कुशीत असते आपले अस्तित्व अनुभवते, आणि त्या निसर्गातच लय पावते. जीवसृष्टीचा अत्युच्च बिंदू असणारे आपले मानवी जीवन या निसर्गाचे  एक अमोल लेणे आहे. आपले निसर्ग मातेचे आपण रक्षण केले पाहिजे. आपली भूमी, हवा ,पाणी ,वनश्री आणि साधन संपत्ती या सर्वांचे काळजीपूर्वक जतन व संवर्धन केले पाहिजे.

दरवर्षी पाच जून हा दिवस "जागतिक पर्यावरण दिन" म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे,हा पर्यावरण दिन साजरा करणे मागचा मुख्य हेतू आहे.

   पर्यावरण हा शब्द मुळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे.Environ म्हणजे Surrounding. या वैभवशाली भारतात चैतन्यदायी शुद्ध हवेच्या लहरी खेळतील, स्वच्छ पाण्याच्या नद्या वर्षभर खळखळतील, हिरव्यागार शेतात भरगच्च पिके डोलतील, सुगंधी फुले फुलतील आणि रसदार फळे पिकतील. या समृद्ध व  संपन्न देशात कुणी भुकेले, तहानलेले राहणार नाही. हे स्वप्नरंजन वास्तवात आणण्याची सुप्त क्षमता असलेले बालमनात पर्यावरण रक्षणाची संवर्धनाची बीजे रुजवायला हवी.

आपल्या सभोवताली जे जे दिसते ते सारे म्हणजे पर्यावरण. या सजीव निर्जीव सर्व काही येते. ज्या वातावरणात सर्व वनस्पती आणि प्राणी निर्माण होतात, पोसतात ते पर्यावरण असते.. पर्यावरण चांगले राखण्यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांची जोपासना करायला हवी. परिसर स्वच्छ ठेवायला हवा. आपली जमीन ,पाण्याचे साठे ,जंगले, आणि वातावरण याची आपण काळजी घेतली पाहिजे.

पृथ्वी, आप ,तेज , वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे सूर्य, पंचमहाभूते म्हणजे निसर्ग, हा निसर्ग सजीवांची निर्मिती करतो.

1972 साली* युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या विषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक ,असे सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. आणि त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

इ.स.1960 मध्ये पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्र पणे लागू करण्यात आले. मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक आहे.आज पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात विभागला आहे. पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.

आपल्या भोवतालच्या दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित गोष्टी म्हणजे परिसर. नैसर्गिक गोष्टीत पृथ्वी, जमीन, झाडे ,पाणी, हवा ,सजीव, आकाश ,अवकाशातल्या सर्व गोष्टी येतात. तर मानवनिर्मित गोष्टीत घरे ,शहरे, रस्ते, पूल, धरणे हे सगळे येते. सहाजिकच या दोन्हीचा एकमेकांवर परिणाम होत असतो.निसर्ग हे अनेक पशुपक्षी, कीटक ,पंचमहाभूते, झाडे ,यांनी बनलेले जाळे आहे. त्यातला एक धागा जरी तुटला तरी सगळे जाळे सैल पडू शकते.

        भौतिक सुविधा वाढल्या, जीवनमान आधुनिक झाले. पण कारखान्यामुळे नद्या- समुद्र दूषित होत आहे. प्रदूषण वाढत आहेत. वाहनांच्या धुरामुळे वातावरण दूषित होत आहे. रसायनिक खते वापरून जमिनीचा कस कमी होत आहे.या सर्वांमुळे जलचरांच्या, सजीवांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

त्यामुळे हे सर्व वाचविण्यासाठी जन जागृती करणे काळाची गरज आहे. पर्यावरण विषयी समज निर्माण करणे, ज्ञान देणे, आणि दृष्टिकोन तयार करणे हे मोठे आव्हान आहे. प्रगतीच्या नावाखाली होणारा निसर्गाचा गैरवापर नवीन पिढीच्या लक्षात यायला पाहिजे. यासाठी जाणीव निर्माण करणे गरजेचे झाले आहे.

5 जून पर्यावरण दिनानिमित्त सर्व पृथ्वी, सृष्टीला वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. शालेय स्तरावर पर्यावरण उपक्रम म्हणून परिसरातील पक्ष्यांची, प्राण्यांची, कीटकांची ,फुलांची चित्रे, काढण्याची स्पर्धा घेऊन प्रदर्शन भरविले पाहिजे. त्याचबरोबर वकृत्व स्पर्धा घ्यायला पाहिजे. वृक्षारोपण ,सहली आयोजित करायला हव्या. आणि निसर्गाचे रक्षण करायला हवे.


"पर्यावरणासाठी झाडे लावा,

देश वाचवा ,दूनिया वाचवा".


सौ.भारती दिनेश तिडके

 रामनगर गोंदिया

8007664039.

[03/06, 11:25 AM] Bharti Sawant: पर्यावरण संवर्धन


    वंदे मातरम वंदे मातरम

    सुजलाम सुफलाम् मलयजशीतलाम्

         बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताचा जयघोष करत अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. या गीतात भारतातील निसर्ग आणि पर्यावरण यांचे रसभरीत वर्णन आले आहे. खरेच! भारत देश हा 'गरिबांचा श्रीमंत देश आहे'. निसर्गाने भारताला बरेच काही बहाल केले आहे. या 'आसेतूहिमाचल' भूमीला विविध प्रकारची झाडे, फुले, प्राणी, पक्षी,खनिजे आणि फळांचे वरदान मिळाले आहे. त्यामुळेच भारतभूमी सुजलाम् सुफलाम् झाली आहे. महासागर, नद्या, पर्वत रांगा, बर्फाच्छादित डोंगर कडा यामुळे भारतातील सर्व भाग नयनरम्य वाटतो. या निसर्गशोभेमुळे कवी त्यांची प्रतिभाशक्ती फुलवित कवितेतून निसर्गाचे वर्णन करतात.

   हिरवे हिरवे गार गालिचे

   हरित तृणांच्या मखमालीचे

      या काव्यपंक्तीत बालकवींनी निसर्गाचे, वसुंधरेचे अप्रतिम वर्णन केले आहे. या वसुंधरेच्या कुशीत वाढून मानवाने आपला उत्कर्ष साधला आहे. त्याला या निसर्गाचा लळाच लागला आहे. सातशे पन्नास वर्षापूर्वी तुकारामांनी वृक्षवल्लींना साद घातली होती आणि निसर्गाशी नातेच जोडले होते.

' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' विसाव्या शतकात विनोबांनी 'निसर्गाकडे वळण्यास' सांगितले. महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला' म्हणजेच निसर्गाशी नाते साधण्याचा संदेश दिला.

  'दिधले असे जग तया, आम्हांस खेळावया' 'आम्ही कोण म्हणोनि काय पुसता?' असे म्हणत या विद्रुप मानवाने सर्वांगसुंदर वसुंधरेला विद्रूप करण्याचा विडाच जणू काही उचलला आहे. आणि हे मानवाच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत होत आहे.

              मानवाचे अस्तित्व पूर्णतः पर्यावरणावर अवलंबून आहे हे कळत असूनही मानवाने स्वतःच्या डोळ्यावर झापडे लावली आहेत. आज वातावरणाचे तापमान भयानक वाढलेले आहे. ओझोन वायूचे संरक्षण कवच विरळ होत आहे. पूर्वी वीस-पंचवीस फुटावर विहिरीला लागणारे पाणी आता दोनशे ते अडीचशे फुटांवर लागते. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्माघात, हिमालयातील बर्फाचे विरघळवून पाण्याची पातळी वाढणे या सार्‍या गोष्टींचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरण संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे हे मानव विसरला आहे. पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा त्रास ही आज जागतिक समस्या बनली आहे. त्यासाठी मानवाच्या इच्छा आकांक्षा कारणीभूत आहेत. मानव विसरला म्हणून सजीव सृष्टीवर पर्यावरण प्रदूषणाचा महाराक्षस झेप घेऊ लागला आहे. पृथ्वीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पावले उचलायला हवीत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन प्रकल्प हाती घेऊन राबविले पाहिजेत. प्रदूषणविरहित वाहने वापरून सहकार्य करायला हवे.

          निसर्गाचा उपयोग करून मानवाने जन्मदर वाढवला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. लोकसंख्यावाढीचा भस्मासूर इतका फोफावलाय की निसर्गाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. निसर्गाचा समतोल राखायचा तर वनीकरण मोहिम उघडायला हवी व प्रत्येकाने संकल्प करायला हवा.

  झाडे लावू झाडे जगवू|

  हिरवळ करूया अवनिवरी|

  प्रकृतीचे संरक्षण करूनी|

   विकृती पळवू दूरवरी|| 


सौ.भारती सावंत

मुंबई

[03/06, 2:44 PM] 33 Manisha Pandhare, Solapur: (४०) *मनिषा पांढरे*


*उपक्रमांतून पर्यावरण ग्रीन आर्मी प्रोजेक्ट*



झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा असे आपण नेहमीच म्हणत असतो पण त्यासाठी आपण आपल्या पातळीवर कार्य करणे जास्त महत्त्वाचे आहे.‌माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनकडून मी *ग्रीन आर्मी* नावाचा उपक्रम करु घेतला ज्यामुळे विद्यार्थ्यांना यात सहभागी होता आले व पर्यावरणाचे महत्त्व सहज समजले.


प्रथमतः मुलांचे पाच पाच विद्यार्थी यांचे गट केले. काही भाग त्यांना वाटून दिला व त्या परिसरातील वृक्ष ,त्यांची नावे, घरातील मोबाईल संख्या, गाडी, चारचाकी, टूव्हीलर, शेततळे, चूल आहे की गॅस, यांसारख्या अनेक बाबी सर्व्हे केला. यामुळे विद्यार्थ्यांना घरातील वृक्षांची संख्या ही मोबाईल व गाड्यांपेक्षा जास्त आहे हे लक्षात आले.

      विद्यार्थी नकळतपणे पर्यावरण रक्षणासाठी तयार झाला. किती लोक चुल वापरतात हे लक्षात आल्याने होणारी वृक्षतोड लक्षात यायला मदत झाली. लोकांमध्ये गॅस वापराबाबत जागृती निर्माण केली ज्यायोगे वृक्षतोड कमी करता आली.

       मुलांना परिसरातील वृक्षांची संख्या निश्चित केल्यानंतर त्यावर आधारित एक नकाशा तयार करण्यासाठी तयार केले. त्या त्या 

 विभागानुसार वृक्ष नकाशे तयार केले त्याचे एकत्रीकरण करून एकच गाव नकाशा बनवला त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे झाडांची संख्या कमी आहे हे समजले.

      पुढील टप्प्यात मुलांना 

वृक्षांचे सावलीचे क्षेत्रफळ काढायला शिकवले. ही कृती देखील करुन घेतली नंतर विद्यार्थ्यांना छायांकित भागाचे क्षेत्रफळ लक्षात आणून दिले व ज्या भागात वृक्षसंख्या कमी आहे तिथे झाडे लावण्यास प्रवृत्त करुन ती झाडे पालकांना संगोपनासाठी दत्तक दिली.


     अशा पद्धतीने पर्यावरण रक्षणासाठी एक छोटासा प्रयत्न केला.


मनिषा पांढरे, सोलापूर🙏🏻🙏🏻🙏🏻

[03/06, 2:47 PM] Jeevansing khasawat: .....पर्यावरण संवर्धन..

          पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे.मानवाने स्वतच्या गरजा भागवण्यााठी पर्यावरणाचा संहार केला आहे .त्या मुळे मानवाला मोठ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याचे भाग पडत आहे.लोकसंख्या अतोनात वाढत आहे.त्याच बरोबर पृथ्वी वरील संकटे देखील वाढत आहे.

मानव हे लक्षात घेत नाही ,की निसर्ग आपली गरज भगवते हाव नाही.मानवाने स्वतःच्या हाव साठी निसर्ग उद्ध्वत केली आहे.

भारतात शहरात धावणाऱ्या ची संख्या वाढली आहे.शहरे खूप लांब पर्यंत गेली आहे.त्या मुळे हजारो एकर जमीन शहरात घरे बांधण्यासाठी उपयोगात आणली जात आहे .त्या मुळे जमिनीवरची झाडे पूर्ण तोडत आहे.मानव झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन पटकन उभा होतो .परंतु सबल घेऊन खड्डा खदून एक झाड लावण्या साठी उभा कधी होत नाही.झाड लावण्या साठी सरकारची वाट बघतात .ही मानवा मध्ये पूर्ण चुकीची भावना भरली आहे .याचा परिणाम पूर्ण सजीव घटकाला भोगावा लागत आहे. झाडे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी देतात याचा विचार माणूस कधीच करत नाही.तर फक्त झाडे कसे कापता येईल आणि आपले स्वार्थ कसे साध्याहोईल ह्याच गोष्टी कडे मानवाचे लक्ष लागले आहे.

ह्याचे गंभीर परिणाम म्हणजे.पृथ्वीवरचे तापमान अतोनात वाढत आहे .यामुळे ओझोन वायूचा थर कमी होऊन  सुर्यातून निघणारे अतिनील किरण पृथ्वीवर पोहचत आहे 

आणि मानवाला पृथ्वीवर राहणे असह्य झाले आहे. मानव वैतागला आहे.मानवाची दमकोंडी झाली आहे.

तापमान वाढीमुळे समुद्रात चक्री वादळ निर्माण होत आहेत. आतापर्यंत एकूण छतीस चक्रीवादळ येऊन गेले आहेत.त्यापैकी सर्वात जास्त चक्रीवादळ बंगालचा उपसागर मध्ये 25आणि अरबी समुद्रात 10अशी चक्री वादळ निर्माण होत आहेत .हा परिणाम म्हणजे फक्त तापमानाचा आहे.या मुळे खूप मोठ्या प्रमाणात जीव हनी होते .आर्थिक नुकसान,मानसिक त्रास होतो.जागतिक पर्यावण  दिन  5 जून ला साजरा केला .त्या पूर्वीच 3 जून रोजी  मोठा चक्रीवादळ तयार होत आहे .आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 चक्रीवादळ कसे तयार होतात.?


समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे  चक्रीवादळ तयार होतात .आणि पृथ्वीवर धडक्तात.

पृथ्वीवरून गरम हवा समुद्राकडे वाहते .आणि समुद्रातील थंडी हवा यांचे मिश्रण तयार होऊन  गोल गोल चक्री वादळ तयार होते .या साठी पृथ्वीवरील तापमान स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येकानी मदत करायला हवी.अन्यथा एक दिवस आपली पृथ्वी पूर्ण जलमय होईल.

 पृथ्वीवर ईबोला,कोरोणा सारखे महाभयंकर आजार तयार झाले 

आहे .हे फक्त दूषित हवा मुळे.

मनुष्य दवाखान्यात गेल्यावर व्हेंटिलेटर ची हवा घेण्यासाठी कितीही पैसा मोजतील परंतु घरी एक झाड लावून शुद्ध हवा घेण्यासाठी मागे पुढे पाहतो.

या साठी प्रत्येक व्यक्तींनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक

झाड लावून वृक्ष संवर्धन करण्यास सहकार्य करावे कारण आपली पिढी निघून जाईल पण पुढच्या पिढी साठी आपण काय ठेवणार?

 जेंव्हा राकेश शर्मा अंतराळात t-11या अंतराळ यान ने अंतराळात गेले .तेंव्हा त्यांना तत्कालीन प्रधान मंत्री महामहीम इंदिरा गांधी यांनी आपल्या भारत भूमी विषयी विचारले होते.की जगात आपली पृथ्वी कशी दिसते ?

तेंव्हा राकेश शर्मानी उत्तर दिले ,नदी नाले वाहत आहेत पृथ्वी ने हिरवा शालू नेसली आहे सारीकडे हिरवळ दिसत आहे. "सारे जहासे अच्छा , 

हिंदुस्तान हमारा"  

          तेंव्हा त्यांचं  देश प्रेम पाहून मन भरून आलं होत मग अस सर्वानाच वाटायला हवे. की आपण हा सौंदर्याचा शालू काढून फेकला ,याला झाकण्याचा काम माझं आहे .

 संतांनी सांगितलं आहे .आपण जसे जगतो तसे प्राणी ,वनस्पतींना पण जगण्याचा अधिकार आहे ."वृक्ष वल्ली 

आम्हा सोयरी" म्हणून आपण झाडांची योग्य काळजी ग्यायलाच  

हवी.

  पृथ्वीवर झाडे नसल्या मुले तापमान अतोनात वाढला आहे .आणि पाऊस अतिशय कमी झाला आहे.पाणी पिण्यासाठी भरपूर लागते .पण पावसाळा चार महिने असतो परंतु पाऊस मात्र फक्त चार दिवस पडतो.पाणी बोत्तल मध्ये घेण्याची वेळ आली आहे.काही दिवसाने दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर आपल्याला औषध देतात तसे झकानाने पाणी पिण्याची वेळ येईल या साठी खास उपाय शोधण्यासाठी तत्पर असायला हवे."तहान लागल्यावर विहीर खोदल्यास पाणी हाती लागणार नाही .त्या साठी अजच सतर्क होणे गरजेचे आहे.

 .  सर्व  मिळून धरू एकच कास

मिळून करू पर्यावरणाचा विकास

अन्यथा पृथ्वी होईल भकास

आपले जीवन होईल उदास!!

जीवन खसावत

भंडारा ९५४५२४६०२७

Code 26

[03/06, 2:52 PM] अमित बडगे: *(38)*

*विषय:- पर्यावरण*


*शीर्षक:- "प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरनाचे रक्षण पाळा"*.....!!


    भूमीवर जिकडे पहावे तिकडे केरकचरा पडलेला दिसत आहे,प्लास्टिक, पॉलिथिन दिसत आहे, संपूर्ण पृथ्वी मलिन झालेली मला दिसत आहे, सगळीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, हे कुठे तरी आपणाला थांबवायला हवं. 

     एके दिवशी मी बाजाराच्या रस्त्याने जात होतो तेव्हा एक व्यक्ती दुकानातून प्लास्टिक ची बॉटल आणि पॉलिथिन खरेदी केली. आणि ती बॉटल संपल्यानंतर त्यांनी कचराकुंडीत न टाकता खाली फेकून दिली. या प्लास्टिकच्या बॉटलमुळे किंवा पोलिथिनमुळे या प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या वस्तूचा वापर केल्यानंतर हे आपल्याला पुन्हा वापरता येत नाही म्हणून आपण रस्त्यावर फेकून देतो.हि प्लास्टिक ची वस्तू बाहेर फेकण्याऐवजी कचराकुंडीत टाकून जाळायला पाहिजे पण आपण असं करीत नाही.प्लास्टिकच्या प्रत्येक वस्तू शंभर वर्षे झाले तरी जमिनीच्या आत जसेच्या तसेच असतात.प्लास्टिकचे विघटन होत नाही, आणि अशाच प्लास्टिकच्या फैलावामुळे भविष्यात मानवाला बाधा येईल, हे समजणे काळाची गरज आहे. अशा घातक वस्तूचा वापर टाळणे खूप रजेचे आहे..

        रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना काही लोक पॉलिथिन मध्ये खाण्यासाठी खाद्य घेतात , आणि आणि ती पूर्ण संपल्यानंतर खिडकीबाहेर फेकून दिली जाते. अशीच परिस्थिती बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते.काही ग्राहक वस्तू खरेदी करतात आणि ते  वस्तू ठेवण्यासाठी  त्यांना पॉलिथिन दिली जाते.आणि ती पॉलिथिन घरी आणून तिचा वापर झाल्यानंतर ती फेकून दिली जाते.आणि जमिनीवर सगळीकडे घानच घाण दिसेल. धरती मलिन झालेली दिसेल. प्लास्टिक चा वापर बाजारात जास्त प्रमाणात होत असताना आपल्याला दिसते. हि प्लास्टिकची वस्तू घेणे ग्राहकांनी टाळलं पाहिजे.

              आज देशात अनेक नानाविध इमारती कारखाने  लोकांनी उभारल्या आहेत. या कारखान्यातू निघणाऱ्या धुरामुळे  मानवाच्या जीवनाला बाधा येत आहे.  त्याचप्रकारे शहरात पेट्रोल ,डिझेलवर चालणाऱ्या वाहनातून जो धूर निघतो  अशा धुरामुळे मानवी जीवन धोक्यात आलेले आहेत, पर्यावणाला हानी होत आहे .या मानवाच्या वाढत्या  चेंगळंपणामुळे  सगळीकडे प्रदूषण होत आहे, या सगळ्याला  कारणीभूत माणवच आहे.नद्या नाल्या मध्ये अनेक प्रकारच्या प्लास्टिकचा  फैलाव असलेला आपल्याला दिसतो, हीच अवस्था भूमीवर पडलेल्या केर कचऱ्याची आहे.प्लास्टिक, पिशव्या आज जागतिक समस्या बनलेली आहे.कारखान्यातून निघालेले काळे पाणी , मानवाने केलेली घाण हि सर्व सांडपाणी , प्लास्टिक, पिशव्या, केरकचरा वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये, गटारामध्ये, पाईप्समध्ये,नद्या आणि समुद्रात कचरा अडकून राहतो. संपूर्ण पाणी प्रदूषित होते यामुळे  पाण्यामध्ये असणाऱ्या जलचर  प्राण्यांचे जीवन धोक्यात येते, काही प्राणी  दूषित पाणी पिल्यामुळे मृत अवस्थेत पडलेले दिसतात, याला जबाबदार सुद्धा माणूसच आहे.

                  आई नऊ महिने जेव्हा आपल्या बाळाला गर्भात ठेवून ज्या वेदनांशी झुंज देत असते आपल्या बाळाची नेहमी काळजी घेत असते.आपल्याला जग दाखविते, चालायला शिकविते, मायेने लहानाच मोठं करते, आपल्याला एखाद्या फुलांच्या कळीप्रमाणे फुलविते त्याचप्रमाणे निसर्ग आपली आई ,माता , माउली आहे हे  असा कसा रे भुललास तू...!

             आपल्याकडे घरी शेती आहे आणि त्या शेतीमध्ये आपण पॉलिथिन , प्लास्टिक, अशा विघटन न होण्याऱ्या वस्तू भूमीमध्ये टाकले तर त्या शेतामध्ये बीजांकुर फुटणार नाही. याचप्रमाणे बाजारात उत्पादक आपल्या ग्राहकाला वस्तू देण्यासाठी पॉलिथिन वापर करीत असतात आणि ती प्लास्टिक ची पिशवी बेकामी झाले तर भूमीवरती  फेकून दिली जाते याच प्लास्टिकच्या पिशव्याच्या फैलावामुळे  पर्यावरण, भूमी दूषित झालेली आहे. 

               आज आपल्या देशामध्ये प्लास्टिक चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शास्त्रज्ञानी न गंजणारी ,वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे *"प्लास्टिक"* हा पदार्थ बनविला आहे.जणू हि हलक्या प्रतीची , पातळ प्लास्टिक  माणसाच्या दैनंदिन व्यवहारातील उपभोगाची वस्तूच झालेली आहे. आणि हि वस्तू निरुपयोगी झाली की जमिनीवर फेकून दिली जाते.यामुळे प्लास्टिकचा ढीग तयार होतो. आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य तयार होते यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिगडलेला आहे आणि याचे गंभीर परिणाम प्राणी आणि मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे.

अशा प्लास्टिकचे वापर करणे  मानवाने स्वतःच्या मानाने  टाळले तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.


     *प्लास्टिक पॉलिथिनचा वापर टाळा*

*पर्यावरणाचा समतोल सर्वांनी पाळा* 

*झाडे लावूया ,झाडे जागवूया*

*पर्यावरण वाचवूया, देश वाचवुया*....।।

               

- अमित प्र. बडगे, नागपुर

  (7030269143)

[03/06, 3:02 PM] सुंदरसिंग साबळे: 34

आजचा लेखन विषय - *पर्यावरण*

-----------------------

पर्यावरण संतुलन राखण खरं आव्हान.....


===============


     संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.

      UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी ५ जून  रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. 

      अवकाळी पावसामुळे शेतांमधील उत्पादनांवर घातक परिणाम होत आहे. यावर्षी आंबे, काजू उत्पादने कमी झाले. आता कोरोनाच्या प्रभावामुळे काही प्रमाणात माणसे चैन कमी करतील. पण श्रीमंत माणसे आपल्या जीवनशैलीत बदल करणे अशक्य आहे. त्यांच्या उपभोगामुळे कार्बन उत्सर्जन जास्तच वाढेल. परिणामी तापमानवाढ होतच राहील. कोरोनाची महासाथ काही महिन्यांत संपुष्टात येईल असं वाटतं. त्यानंतर आपण किमान उपभोग घेऊन जगणं आवश्यक आहे. निसर्गाचा वापर चैन करण्यासाठी वा संपत्ती करण्यासाठी केल्यामुळेच पर्यावरणीय विनाश घडत आहे. आपण फक्त काही काळासाठीच या पृथ्वीवर असतो. म्हणून ही पृथ्वी चांगल्या पर्यावरणीय स्थितीत पुढच्या पिढीला उपलब्ध करून देणं आपलं कर्तव्य आहे.

      आत्ताच्या भांडवली व्यवस्थेत निसर्ग व श्रमिकांचं शोषण करूनच उत्पादन केलं जात आहे. उत्पादनाचा उद्देश नफा कमवणं हा असल्यामुळे श्रम व निसर्ग  या दोघांचंही संवर्धन केलं जात नाही. दोघांचाही विनाश होत आहे. जर उत्पादनाचा हेतु समाजाच्या अत्यावश्यक गरजा पुरवणे असा असेल तर चैनीच्या वस्तू वा सेवा यांचे उत्पादन जाणीवपूर्वक केलं जाईल. समाजातील संसाधने व श्रमशक्ती यांचा वापर जीवनावश्यक वस्तू व सेवा उत्पादित करण्यासाठी केला तर दारिद्र्य व विषमता यासारखे प्रश्न सोडवणं शक्य होईल. सध्याच्या सरकारचं उद्दिष्ट कष्टकरी वर्गावर अंकुश ठेवणं हेच आहे. खरं तर श्रीमंतांवरच्या करात वाढ केली पाहिजे. म्हणजे वाढलेल्या पैशांचा उपयोग शिक्षण व आरोग्य सेवा सर्वांना स्वस्तात देण्यासाठी करता येईल. त्यांची गुणवत्ता समान असेल.


      सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ यांनी कोरोना विषाणूबाबत महत्त्वाचे विचार मांडले आहेत. जंगलतोड व पर्यावरणीय विनाश ही दोन कारणे आत्ताच्या जगभर हाहाकार उडवणाऱ्या कोरोना महासाथीस जबाबदार आहेत. जगभरातील वैज्ञानिक या विषाणूशी संबंधित चाचण्या, उपायोजना, रोगाचा प्रसार याबाबत संशोधन करत आहेत व या विपरीत परिस्थितीबरोबर संघर्षसुद्धा करत आहेत. १५ मे २०२० पर्यंत कोरोनामुळे जगात ३ लाखापेक्षा जास्त माणसं मरण पावली आहेत. मानवजात या बदललेल्या वस्तुस्थितीशी जुळवून घेत असताना व प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे बाह्य परिस्थितीबाबत अंधारात असताना निसर्ग स्वतःला तीव्र वेगाने संवर्धित करत आहे व प्रत्येक दिवशी त्याचे घटक असलेले पाणी व हवा अधीकाधिक शुद्ध व समृद्ध होत आहेत. पाण्याचे साठे अधिक स्वच्छ होत आहेत. हवेच्या प्रदूषणाची पातळी खूप खाली येत आहे. अधिकाधिक पक्षी व प्राणी मुक्तपणे जंगलाबाहेर विहार करीत आहेत.


    काही व्यक्तीच्या ज्ञानानुसार गेल्या ५० वर्षांच्या काळात ३०० पेक्षा जास्त नवीन विषाणूंनी मानवी जीवनावर प्रभाव टाकला आहे. हा जंगलतोडीचा परिणाम होता.  त्या असं सांगतात की पश्चिम घाटावरील पर्यावरणीय विनाशामुळे ‘मंकी’ रोग आला होता. तसंच माणसाने जंगलात शिरकाव केल्यामुळे आणि तिथे केलेल्या विनाशामुळे इबोला, सार्स व मर्स या विषाणूंनी जगभर  प्रभाव टाकला होता. कोरोना हा नवीन विषाणू जंगलांच्या विनाशाचाच परिणाम आहे. तज्ञ यांनी पुन्हा पुन्हा जोर देऊन हेच सांगितलं आहे की पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही खोल राजकीय बाबीदेखील आहेत. टिकाऊ विकास आणि कार्यक्षम संवर्धन या दोघांसाठी सशक्त राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता  आहे. लाखो लोकांचं अस्तित्व राजकीय इच्छाशक्तीवर वा या इच्छाशक्तीच्या अभावावर अवलंबून आहे. या इछाशक्तीच्या अभावामुळेच पर्यावरणीय विनाश वेगाने घडत आहे.


       जागतिकीकरण व भांडवलशाही या दोघांच्या जहाल विरोधक असणाऱ्या व पर्यावरण चळवळींच्या खंद्या समर्थक असणाऱ्या विचारानुसार पर्यावरण हा परिसंस्था व राजकारण या दोघांशी संबंध असणारा घटक आहे. जर आपण पर्यावरणाबाबत परिपूर्ण व संवेदनशील धोरण स्वीकारलं असतं तर पर्यावरणाचा विनाश टाळता आला असता. आत्ताचा काळ आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवत आहे आणि सुचवत आहे कीमाणसाने त्याच्या जीवनशैलीत बदल घडवला पाहिजे. कोरानाचं संकट आपल्याला सांगतंय की विकास म्हणजे नक्की काय याचा विचार करण आता अटळ झालं आहे. अ‍ॅमॅझॉन व इंडोनेशिया या देशांमधील जंगलात माणसाने हस्तक्षेप केल्यामुळेच आपल्याला वारंवार येणाऱ्या रोगांना तोंड द्यावं लागत आहे. 

===============

 लेखन

*श्री.सुंदरसिंग आर. साबळे*

   गोंदिया 

मो.9545254856

[03/06, 3:02 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09)* *क्वारंटाईन ते पर्यावरण*


मातीत राहायला मिळाल्याचा आनंद

वेळोवेळी शाळेत यायला मिळत नव्हते .अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांना उपस्थिती  दर्शविता  येत नव्हती. मात्र आता ह्याच शाळेच्या सहवास  मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत आहे .अशावेळी  मनातील भावना गीतातून व्यक्त केल्यात.

*जिल्हा परिषदेची ती शाळा होती*। 

*जिचा अंगाखांद्यावर खेळलो ,रमलो*। 

*आसरा दिला जेव्हा, परकी झाली नाती* । 

*श्रृण तुझे फेडण्यासाठी पुरतील का* । 

*जन्म  साती, गे माय जन्मसाथी* । 

*ती जिल्हा परिषदेची शाळा होती*।  

*ती जिल्हा परिषदेची शाळा होती* । 

         शाळेतून निघाल्यावर परत त्याच शाळेत  येण्यासाठी कधी वेळ मिळत नाही. मात्र  आपल्याला जीवन जगणे शिकविणार्या शाळेचे हे श्रृण फेडण्याची  संधी क्वारंटाईन  मुळे मिळाली .अशा आपल्या भावना व्यक्त केल्या.  ग्राम हलबीटोला  शाळेला चकाचक करून टाकले .कित्येक वर्षानंतर  शाळेत आलेल्या गौरव व राहूल या युवकांना त्यांच्या शाळेतील आठवणींनी हेलावून सोडले . भुतकाळातील क्षण त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागले.याच शाळेने मानूस बनवून जगात वावरण्याची व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिकवण दिली व आपण काहीच देऊ शकलो नाही असे त्यांना वाटू लागले ,अशातच शाळेचे श्रृण फेडण्यासाठीच,  क्वारंटाईन होण्याची पाळी आपल्यावर आली  असे म्हणत त्यांनी शाळेत स्वच्छता सुरू केली. शाळेतील कॅरी मध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सकाळ-संध्याकाळ पाणी देणे ,कचरा काढणे,इ. काम केले .शाळेच्या आवारात अनेक मोठी झाडे असून झालेल्या पडझडीमुळे पटांगणात जमा झालेला कचरा व शाळा झाडून त्यांनी स्वच्छ केले. यांच्या परिश्रमानंतर शाळेतील झाडे  आनंदाने डोलू लागले. स्वच्छता बघून एवढे दिवस ही शाळा बंद होती असे कोणीही बोलू शकणार नाही . शाळेचे ऋण फेडण्यासाठी क्वारंटाईनची भेट अमुल्य ठरली.पर्यावरण व शाळेचे श्रृण फेडण्यास संधी मिळाली ,आणि त्यांनी  संधीचे सोने केले.

निसर्गा सारखा नाही रे सोयरा,

गुरु, सखा, बंधु, माय, बाप,

त्याच्या कुशिमध्ये सारे व्यापताप, 

मिटती  आपोआप.

विविध प्रकारची जीवसृष्टी तसेच मानवी समूह वा समाज ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील सर्व घटकांना साकल्याने पर्यावरण म्हणतात. माणसाचे आगमन होण्यापूर्वीचा जो नैसर्गिक परिसर, तोच भौगोलिक पर्यावरणात गृहीत धरला जातो. कोणत्याही परिसरात वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या यांसारख्या विविध घटकांना विविध प्रकारचे स्थान लाभलेले असते. त्या परिसराच्या मर्यादेत या विविध घटकांचा एकमेकांशी येणारा स्थानविशिष्ट संबंध कशा प्रकारचा आहे, याचा विचार भौगोलिक पर्यावरणात करण्यात येतो.  त्याच अर्थाची प्राकृतिक पर्यावरण अशी एक संज्ञा रूढ असून तीदेखील मानव व मानवनिर्मित गोष्टी वगळून, केवळ नैसर्गिक घटकांनाच उद्देशून वापरली जाते . पुष्कळदा अमानवी पर्यावरण असाही पारिभाषिक शब्द वापरल्याचे दिसून येते. त्यात प्राकृतिक पर्यावरणाच्  घटकांबरोबरच अभयारण्ये,  उद्याने      व       उपवने, पुनःप्रापित भूमी, धरणे व कारखाने यांचे परिसर इ. निसर्गरूपावर परिणाम करणारे मानवनिर्मित घटक समाविष्ट होतात. तथापि या सर्वच संज्ञा काटेकोर व्याख्या करून वापरणे आवश्यक असते.

   आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप. पण प्रत्यक्षात ही समस्या त्याहून खूप जास्त गहन आहे. त्याचे कित्येक सारे पैलू आहेत. आधी ह्या सर्व पैलूंना समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण ही सगळी परिस्थिती समजू शकू. 

         निसर्ग म्हणजेच प्रकृती सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग. आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. दुष्काळाचाचं उदाहरण घेऊ. दुष्काळ एका प्रकारचा रोग आहे किंवा तणावाची स्थिती आहे. पण आपलं लक्ष आपण रोगापेक्षा आरोग्याकडे- मूळ स्वस्थ स्थितीकडे द्यायला पाहिजे. त्यामुळे अशी मूळ स्वस्थ स्थिती म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवं. स्वस्थ स्थिती कशाला मानता येईल? हा तसा फार गुंतागुंतीचा प्रश्न. कारण अबसोल्युट पातळीवर बघितलं तर जे काही होतंय, जे काही भीषण, कितीही अमानवी, आर्टिफिशिएल किंवा अनैसर्गिक वाटणारं होतं, ते सर्व निसर्गातच होतं. पण इथे आपण स्वस्थ स्थिती संतुलनाची स्थिती आहे, असं मानूया. स्वस्थ स्थिती म्हणजे प्रकृतीमधील सर्व पैलूंमध्ये समन्वय आणि समन्वय. ज्याला सिंबायोसिस म्हणतात- साहचर्य. अशी स्थिती ज्यामध्ये सर्व घटक समान प्रकारे विकसित होऊ शकतात आणि सर्वांसाठी अनुकूलता असते.

मूलत: पृथ्वी अशाच स्थितीमध्ये होती. पण मानवाचा दर्जा विशिष्ट आहे. त्यामुळे ही स्वस्थ स्थिती संकटात सापडली आहे. त्यामुळे ह्या दृष्टीकोनातून बघितलं तर दुष्काळ एक रोगाची स्थिती आहेच, पण एका अर्थाने तो निसर्गाचा स्वत:ला संतुलित करण्याचा मार्गही आहे.

          कधी ती पाणी असते, कधी बर्फ तर कधी बाष्प बनते. कधी ती हिरव्या झाडांच्या रूपात असते, तर कधी जीवाश्माच्या किंवा तोडलेल्या लाकडांच्या रूपात असते. ही सर्व ऊर्जेची माध्यमं मात्र आहे.

त्यामुळे ह्या समस्याकडे आपण माणूस ह्या नजरेतून न बघता प्रकृतीतील एक घटक म्हणून बघायला हवं. प्रकृतीमध्ये प्रत्येक व्यवस्थेचे नियम असतात. सर्व काही नियमांनुसारच होत असतं. निसर्गामध्ये पृथ्वी ग्रहावरच्या मानवासाठी असे नियम काय आहेत?  ह्याला अशाही प्रकारे विचारात घेता येऊ शकेल- पृथ्वीवर मानवासाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे? नैसर्गिक व्यवस्थेचं फ्रेमवर्क काय आहे? संतुलन टिकवून ठेवण्यासाठी त्या चौकटीत रहावं लागेल. जर मानव त्याच्या बुद्धीमुळे त्या चौकटीचे उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे पूर्ण संतुलन बाधित होईल आणि हळु हळु त्याचे परिणाम होऊ लागतील. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या काळी मानव- प्रकृती संतुलनाच्या स्थितीचा विचार करावा लागेल. आज पृथ्वीवर वेगवेगळ्या जागी आणि देशांमध्ये मानव- प्रकृती संतुलन स्थिती कशी आहे, हे बघावं लागेल. गुरुत्वाकर्षण हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून रस्त्यावर चालताना त्याचं पालन करावं लागतं. जर कोणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध गेलं तर तो खाली पडेल. हा निसर्गाचा सरळ नियम. आणि हाच इतर परिस्थितीमध्ये बघण्याचे अनेक निकष आहेत.सकारात्मक दृष्टिकोन वापरा पर्यावरणाचा ह्रास टाळा । । 


लेखिका 

  *सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*

         *(9420516306 )*

[03/06, 3:14 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)


*पर्यावरण संरक्षण जबाबदारी प्रत्येकाची*


          आज आपण पाहतो आहोत सगळीकडे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. सध्या उष्णता खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ येण्याचे संकेत मिळाले आहेत व लगेच पावसाळा सुरू होईल. चक्रीवादळ, ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या; पर्यावरणाचा असमतोल हेच याचे मुख्य कारण आहे. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, पर्यावरणाचा व वन्यजीवांचा र्‍हास  या व अशा विविध गोष्टींमुळे ग्लोबल वार्मिंग सारखे राक्षस पुढे येत आहेत.


     आपण आपल्या आजुबाजुला बघतो पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून गेली काही वर्षे त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने; याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.जेव्हांपर्यंत पर्यावरण समतोल साधले जाणार नाही, तोपर्यंत अशा अनेक समस्या पुढे येणारच. 


 1972 साली पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत,पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

        पर्यावरण संतुलन बिघडण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे व मुख्य कारण - झाडांची कत्तल करणे. ही मानवाने तयार केलेली समस्या आहे. झाडांची बेसुमार वृक्षतोड केल्यामुळे वातावरणातील आक्सीजन चे प्रमाण कमी व कार्बनडाय आक्साइड चे प्रमाणात वाढ झालेली आहे. आता भर उन्हात लाकडाऊन च्या काळात अनेक मजुर पायी रस्ता तुडवत आपल्या गावाकडे जातांना कुठे सावली मिळेल याचा शोध घेतांना दिसतात ;उन्हातान्हात अनवाणी, भुकेने व्याकूळ त्या प्रवाशाला जेव्हा झाडाची थंडगार सावली मिळाल्याने जो आनंद मिळतो तो एसीमध्ये बसल्यावर सुद्धा मिळत नाही.

   पण तरीही माणसाची मानसिकताबदलतांना प्रत्यक्षात मात्र दिसत नाही. दरवर्षी 'एक व्यक्ति एक झाड', पावसाळ्यात वृक्षारोपण केल्याच्या बातम्यांनी वर्तमानपत्र भरलेला दिसतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना रोपटे भेट म्हणून दिले जाते. जर दरवर्षी वृक्षारोपण एवढ्या मोठ्या प्रमाणात केले जाते तर मग झाडे मोठी झालेली कां दिसत नाही? वृक्षसंवर्धन केले जाते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. एक दिवस झाडे लावली जातात व दुसर्‍या च दिवशी कुणीतरी ते रोपटे बाहेर काढुन फेकून देतो. ही मानसिकता बदलने आवश्यक आहे. 


ही समस्या फक्त आपलीच नाही तर संपूर्ण देशात कमीजास्त प्रमाणात सगळीकडे आढळून येते. पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे. मानव स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण पृथ्वीतलावरील पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे!जर आपल्याला पर्यावरण समतोल साधायचा असेल तर प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून काही गोष्टी नियमित पाळणे आवश्यक आहे. जसे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, ध्वनिक्षेपकाच्या वापरावर नियंत्रण, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण,पाण्याची बचत करणे, विजेची बचत अशासारख्या अनेक दैनंदिन जीवनात आपण जर नियमित केलं तर नक्कीच पर्यावरण समतोल साधला जाईल.

 आज सर्वात मोठ्या प्रमाणात मोबाईल चा वापर होत आहे. मोबाईल वापराकरिता वेगवेगळ्या कंपनीचे सिम वापरले जातात. प्रत्येक कंपनीचे टाॅवर आहेत यामुळे रेडियन मुळे पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत व पक्ष्यांची संख्या रोजच्यारोज कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कमीझाल्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे.

चला तर मग सर्वांनी आपल्याला सहजपणे फक्त आपल्या दैनंदिन जीवनात काहीगोष्टींवर संयम ठेवून पर्यावरण पुरक वातावरण निर्मिती मध्ये आपलं योगदान देऊया.

 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'

'झाडे लावू, झाडे जगवू

 पर्यावरणाचे संतुलन साधू.'

'कावळा म्हणतो काव काव

माणसा माणसा झाड लाव.

 पाने, फुले, फळे देतील.

सावली आणि निवारा देतील.' 

  आपण एक जरी झाड लावलं तरी भविष्यात त्याचे लाखो झाडे होणार. आपल्याला फक्त सुरुवात करायची आहे. बघा,

 एकाएका झाडांची शंभर शंभर झाडं,

शंभर शंभर झाडांची हजार हजार झाडं, हजार हजार झाडांची लाखोलाख झाडं. 

    सोबतच प्लास्टिक वापरावर प्रतिबंध आणुया. प्लास्टिक मुक्त अभियान सुद्धा सुरू होऊन वर्ष झाले पण संपूर्ण प्लास्टिक मुक्ती दिसत नाही. जेव्हा पर्यंत आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टींची गंभीरता घेणार नाही तेव्हा पर्यंत कोणतेही अभियान फक्त कागदावरच राहील. आपल्याला आपली वसुंधरेला पर्यावरण युक्त व प्रदूषण मुक्त करायची असेल तर आतापासूनच आपल्या प्रत्येक गोष्टीत लक्षपूर्वक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

 पर्यावरण संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ही मानसिकता बनवून आपलं आचरण असणे ही आजची गरज आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ति आपली जबाबदारी समजून प्रत्यक्षात ती कृती उतरवले तोच दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होईल.

      सर्वांना या जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा 🌳🌳🌳

           

*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*

          गोंदिया

            9423414686

[03/06, 3:34 PM] senkude: ( 5)


*जतन करूया पर्यावरणाचे*


*“झाडे तोडून करू नका,*

 *निसर्गाचे प्रदूषण*

*झाडे लावा, झाडे जगवा*

*जतन करा पर्यावरण”*


आज धकाधकीच्या जीवनात माणूस कसा त्रस्त होऊन गेलाय. घड्याळ्याच्या काट्यात माणसाने आपले जीवन  बंदिस्त केले. माणसाचा स्वभाव काही विचित्र आहे. आजचा माणुस हा यंत्रयुगाच्या आणि विज्ञानयुगाच्या जाळ्यात अडकला आहे. 

आपले घर आणि आपला परिसर यांचा किती परस्परसंबंध असतो ही जाणीव ठेवून माणसाने पर्यावरणाचे हित जोपासले पाहिजे. मुंगीपासून गरुडापर्यंत सर्वजण धरतीची प्रकृती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; पण माणूस मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्यशक्तीने पर्यावरणाचा तोल बिघडवून टाकत आहे. मानवाचे हे बेजबाबदार वागणे एक दिवस खूप धोकादायक ठरेल. पर्यावरणाचा ह्रास  करणाऱ्या या अविचारी माणसाला जागे करण्याकरता  'वसुंधरा दिन' व 'पर्यावरण दिन' पाळायला सुरुवात केली आहे. आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदे नियम केले गेले आहेत. पण ते सर्वचजण आचरणात आणीत नाही.


निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान राहिलेला आहेे. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे, निसर्गाने माणसाला मुबलक दिलेली हवा आणि पाणी यांचा योग्य उपयोग माणसाने योग्य चांगल्या प्रकारे केला पाहिजे. 

उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून  पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. 

कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल ची जबाबदारी पार पाडणे; ओला कचरा कोरडा कचरा यांची विल्हेवाट लावून विभागणी करणे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. या लहानसहान पण फार महत्वाच्या गोष्टी करून ' विशुद्ध पर्यावरण' टिकवणे हे मानवाच्या हातात आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. पर्यावरण जतनाची निष्ठा प्रत्येकात रुजली गेली पाहिजे. 

तेव्हाच प्रगतीपथाची वाटचाल सुरू होईल. 


निसर्गाचे सौंदर्य वर्णन करताना कवी भा. रा. तांबे यांनी अतिशय सुंदर सौंदर्य निसर्ग कवितेतून मांडले आहे.


"हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे

झोके घेते कसे , चहुकडे हिरवे गालीचे l

सोनेरी ,मखमली ,रुपेरी पंख कितीकांचे

रंग कितीवर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे l"


आकाशातील बदलणारे नित्य रूप रंग पाहून कवीने सौंदर्य रेखाटले आहे.

कवी, लेखक यांच्या वाणीला निसर्ग सौंदर्यामुळे भरती येते.


या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग माणसाची भूक भागवतो, तहान शमवीतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो, थकल्या भागलेल्यांना सावली देतो, मंद मधुर वायूलहरीचा परिहार करतो. निसर्ग मानवाला फळे,फुले ,सावली देतो. या निसर्गाचे आणि मानवाचे अतूट नाते आहे. माणूस पर्यावरणाशिवाय राहू शकत नाही. निसर्ग माणसाचा सखा सोबती आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.प्रत्येक माणसाने पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचे महत्त्व जाणून, पर्यावरण जागरूक नागरिक आता तरी व्हायला हवे. 

 मानवाने सृष्टीचे सौंदर्य जोपासून पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. 

〰️〰️〰️〰️〰️〰️

✍ लेखन 

प्रमिलाताई सेनकुडे

ता. हदगाव जि.नांदेड.

[03/06, 3:42 PM] दुशांत निमकर: *(02) पर्यावरण समतोल*


                 मानवाला जीवन जगण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते.निसर्गाचा समतोल राखणे सध्या काळाची गरज बनली आहे.पर्यावरण समतोल राखण्यासाठी मानवाच्या स्वार्थी वृत्तीवर अंकुश ठेवावे लागेल.मानवाची लोभी, स्वार्थी वृत्ती ही पर्यावरण प्रतिकूल करण्यास कारणीभूत ठरत आहे.जगातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली.वृक्षतोडीचा परिणाम असा झाला की,पर्यावरणाची अगणित हानी झाली हे नाकारता येत नाही.मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध प्राणवायूची गरज असते पण वनस्पतीपासून मिळणारा प्राणवायूमध्ये घट होऊन पर्यावरणात बदल झाला याउलट हवेत कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढू लागले त्याचा परिणाम मानवी जीवनावर होऊ घातला आहे.शहरीकरण,उद्योगिकीकरण यामुळे खेड्यातील तरुण रोजगार मिळविण्याच्या हेतूने शहरात येऊ लागले त्यामुळे लोकसंख्या वाढू लागली.इमारतीची उंची वाढू लागली.झोपडपट्टीची संख्या वाढू लागली.अन्न, वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण या सारख्या मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत.केवळ जागे अभावी कमी जागेत वास्तव्य करू लागल्याने लोकसंख्येची घनता वाढल्याने मानवाला भौतिक सुविधा मिळेनासे झाले म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे आद्य कर्तव्य समजले जाते.


         शहरात मोठे-मोठे उद्योगधंदे उभारले गेले आहेत.कागद कारखाने,ऊस कारखाने इत्यादी अनेक कारखाने उभारले परंतु यातून निघालेला धूर थेट हवेत मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होत आहे.हवेमध्ये सल्फर डायऑक्सईड,कार्बनमोनाक्सीड यासारखे विषारी वायू हवेत मिसळल्याने हवा प्रदूषित झाली आहे.हवेतील अशुद्ध ऑक्सिजन घेत असल्याने भिन्न-भिन्न आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमिटर अंतरावर असलेल्या ओझोन वायूचा थर विरळ होत असल्याने सूर्यापासून येणारे अतिनील किरणे त्वचेवर पडत असल्याने त्वचेचे कॅन्सरला मानवाला सामोरे जावे लागत आहे म्हणूनच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाऊल उचलायला हवे.


         आज पर्यावरणाचा समतोल ढासळलेला दिसून येत आहे.मुख्यत्वे उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हे तीन ऋतू असले तरी अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस,कोणत्याही ऋतूत खूप ऊन कधी थंडी या ऋतूमध्ये एकसमान दिसून येत नाही आहे.उन्हाळ्यामध्ये देखील शेतकऱ्यांचे पीक कापणीला असतांना खूप पाऊस पडतो यावरून समजून येते की,पर्यावरण बिघडले असून त्याचा परिणाम पृथ्वीवरील सजीवसृष्टी प्राणी,पक्षी,सूक्ष्मजीव यांना भोगावे लागत आहे.जंगलातील जैवविविधता धोक्यात आलेली आहे. एकमेकांवर अवलंबून असलेली अन्नसाखळी तुटत जात आहे आणि त्यामुळे काही प्राणी,पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.वाघ,चित्ता,रानगेंडा हे प्राणी दिसेनासे झाले आहेत त्यामुळे वेगवेगळे साथीच्या आजाराने मानवाला ग्रासले गेले आहेत.शेतीसाठी वापरले जाणारे रासायनिक औषधे तेच अन्नधान्य आपण सेवन करीत असल्याने अप्रत्यक्ष आपल्या पोटात विष उत्पन्न होऊन वेगवेगळ्या आजाराला आमंत्रण देत आहोत असं वाटते यामुळे चिकणगुणीया,डेंग्यू, मलेरिया यासारखे अनेक आजार निर्माण होत आहे याचे कारण म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास होय.यासाठी पर्यावरणाची हानी न करता समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करायला हवेत.


         केवळ पर्यावरणाचा समतोल राखणे ही भारताचीच गरज नसून संपूर्ण जगाची गरज आहे त्यामुळे पूर्ण जगात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण व्हायला हवी,मानवाची स्वार्थीपणा सोडून भौतिक सुखाकडे न बघता जागतिक हीत जोपासण्याचा दृष्टीने पर्यावरणाच्या रक्षणाकरीता झटले पाहिजे.प्रत्येक देशात पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांच्यावर कारवाई करण्यासाठी कडक कायद्याची अमलबजावणी व्हावी.पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यास संस्था हिहीरीने कार्य करेल.पर्यावरणस्नेही संस्था यांचे कार्य कौतुकास्पद आहे.वृक्षतोड जेवढ्या प्रमाणात झाली त्याच्या दहा पटींनी वृक्षारोपण चळवळ राबविली गेली पाहिजे.चिपको चळवळ,अप्पीको चळवळ यासारख्या चळवळी पर्यावरण राखण्यास मदतगार आहेत सोबत नदी,नदीजोड प्रकल्प,धरणे यांना वाजवीपेक्षा अधिक उंचीचे धरणे उभारून पर्यावरणाला बाधा पोहचतील अश्या कार्याला विरोध व्हायला हवा यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाने कार्य करायला हवे. पर्यावरणाची जगात जागृती निर्माण होण्यासाठी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचे सर्वांना स्मरण व्हायला हवे नि त्यानुसारच कार्य करायला हवे.


✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर

       चक फुटाणा, चंद्रपूर

 मो न 9765548949

[03/06, 4:00 PM] शुभदा दीक्षित:               ( 11)


          


               पर्यावरण : एक मित्र


       


             'पर्यावरणाची रक्षा, जगाची सुरक्षा' हा नारा देऊन सर्वसामान्यांना जागृत करत पर्यावरण दिन साजरा करू या.


             पर्यावरण शब्द परी + आवरण असा बनला आहे.  परि म्हणजे आपल्या चारही बाजूला आहे. ज्याने आपल्याला चारही बाजूंनी घेरले आहे, ज्याचे आपल्या चारही बाजूने अच्छादन आहे, आवरण आहे,  ते म्हणजे पर्यावरण.


             पर्यावरणाच्या जैविक घटकात सूक्ष्म जीवाणू पासून किडे- कीटक सर्व जीवजंतू म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी, मानव इत्यादी.  झाडे वृक्ष हे तर सर्व असतात पण त्यांच्यामुळे चालणारी जैविक क्रिया आणि प्रक्रिया यांचाही समावेश होतो. अजैविक घटकात निर्जीव तत्व आणि त्यांच्या प्रक्रिया असतात. म्हणजे पर्वत, टेकड्या, नदी, हवा, पाणी, वायू, भूमी, इत्यादी.


              खरे तर पर्यावरण- निसर्ग हा मानवाचा मित्र..  त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याचे काम मानवाचे आहे. पर्यावरणाचा आणि मानवाचा फारच घनिष्ठ संबंध पार पूर्वापारपासून आहे. हिंदू धर्मात निसर्ग पूजनाला फार महत्त्व आहे. तुळस आपल्याला प्राणवायू देते. जगायला ऊर्जा देते. तिन्हीसांजेला तुळशीजवळ म्हणूनच आपण दिवा लावतो. वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो. नदीला आपण आईच्या स्वरूपात पाहतो. नर्मदेला आई म्हणतो. नर्मदा परिक्रमेला तेवढे महत्व आहे. गंगा सर्वात पवित्र नदी. हिमालय पर्वतावर शंकराचे वसतिस्थान म्हणून त्याला महत्व. जवळजवळ प्रत्येक पर्वताचे देवस्थानाचा रूपात आपण पूजन करतो. होळीला अग्नीची पूजा करतो. मारुती वायुपुत्र त्याला पुजितो. ग्रह-नक्षत्रे सगळ्यांचेच आपले नाते जोडले गेले आहे. आपल्या प्रत्येक सणांमागे, परंपरेमागे काहीतरी वैज्ञानिक रहस्य लपलेले आहे. 'जगा आणि जगू द्या' हे तत्व हिंदूधर्म मानते. त्याचाही प्रचार करते. गीतेतही म्हटले आहे, वृक्षात् वर्षति पर्जन्यः, पर्जन्यात् अन्न संभव:l अर्थात वृक्षामुळे पाऊस पडतो, पावसामुळे अन्न तयार होते. इतके महत्त्व पर्यावरणाला दिले गेले आहे.


            निसर्ग मित्र असल्यामुळे प्रथम निसर्गाकडून मानव खूप शिकला. पण त्या बदलात निसर्गाला काही देण्याचे मात्र तो विसरला. विज्ञान क्षेत्रात मानवाने खूप प्रगती केली. नवीन शोध लावले. त्या जोरावर मानव निसर्गावर मात करू पाहू लागला. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले. पृथ्वीवर लोकसंख्या वाढते आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण जास्त गतीने वाढते आहे. त्यामुळे वृक्षतोड, हिरवी राने- वने यावर अतिक्रमण होत आहे. ह्याचा -हास होतो आहे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हेही खूप वाढले आहे. अणूस्फोटामुळे वातावरण दूषित बनत आहे. ओझोन लेयर ची हानी होते आहे. वायुमंडलाचे तापमान वाढत आहे. मोठ्या कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी धूर वायुप्रदूषण करीत आहे. वाहनांच्या संख्येमुळे अतिवापरामुळे कार्बन-डाय-ऑक्साईड वाढतो आहे. कारखान्यातून पाण्यात विषारी द्रव्य सोडली जात आहेत. त्यामुळे जल प्रदूषण वाढते आहे. या सगळ्या रासायनिक द्रव्यांमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मातीवर आणि पिकांवर कीटकनाशके मारल्यामुळे मातीचा कस कमी होतो आहे. कार्बन डाय ऑक्साइड चा वाढता प्रभाव, ऋतुचक्राचे परिवर्तन यामुळे हिमखंड वितळू लागला आहे. जसे आपण निसर्गाला- पर्यावरणाला तडाखे देत आहोत, तसेच निसर्गही आपल्याला महापूर, त्सुनामी, दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ,भूकंप या रूपात तडाखे देऊ लागला आहे. त्यामुळे उद्याच्या चांगल्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे हे सार्‍या जगाच्या लक्षात आले. त्यामुळे 5 जून 1972 रोजी संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे 'विश्व पर्यावरण संमेलन' आयोजित करण्यात आले. पर्यावरणा संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.


          आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो. तसेच आपले पर्यावरणही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मित्राची काळजी आपणच घेतली पाहिजे.


          पर्यावरण संतुलन राखण्यासाठी डोंगर, पर्वत, जंगले ,राने, वने यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. जंगलतोड होता कामा नये. लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे. कारखाने शहरे व गावापासून दूर ठेवली पाहिजेत. ध्वनी प्रदूषणावर ताबा मिळवला पाहिजे. प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे. आपली शहरे म्हणजे विषारी गॅस चेंबर बनताहेत. वायुप्रदूषण कमी झाले पाहिजे. नद्या नाले साफ करून जल प्रदूषण कमी केले पाहिजे. जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर पुढच्या काही शतकात माणसाचे अस्तित्व धोक्यात येईल.  म्हणून उद्याच्या चांगल्यासाठी निसर्गाला मित्रत्वाचा हात पुढे करा. मग पुढे दिसेल ती फक्त हिरवळच हिरवळ.



शुभदा दीक्षित (11)

पुणे

[03/06, 4:06 PM] महेंद्र सोनवने: *(08)*पर्यावरणाचे रक्षण -काळाची गरज*

पर्यावरण शिक्षण शाळा- महाविद्यालयांत आल्यावर लहान मुलांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यास-परीक्षामधून पर्यावरणाची परिभाषा हळूहळू पसरू लागली. घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्टिंग, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, व्हर्मी कंपोस्टिंग, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर अशा अनेक शब्दांचा आपल्या दैनंदिन बोलण्यात समावेश होऊ लागला. जागतिक पर्यावरण परिषदा, त्यात वाचले जाणारे क्लिष्ट प्रबंध, त्यामध्ये दिली जाणारी सांख्यिकी माहिती आणि त्या माहितीचा उद्गम व सत्यासत्यता याबद्दल सामान्य खातरजमा करण्याची काही व्यवस्था नसते. होणाऱ्या संशोधनाबद्दल, संशोधकाबद्दल तसेच या संशोधनासाठी आर्थिक रसद पुरवणाऱ्याबाबतही पुरेशी माहिती न मिळाल्याने या संशोधनवृत्तांवरही सर्वांचा पूर्ण विश्वास नसतो. अनेकदा तर या संशोधनाचा व संशोधकांचा हवाला देऊन परस्परविरोधी दावेही केले जातात. या संशोधन परिषदांतील किंवा जागतिक संघटनांच्या अहवालातील निष्कर्ष हे अनेकदा सामान्य माणसाला न कळणारे असतात. म्हणजे त्या अभ्यासात केलेल्या विचारांचा वा परिणामांचा आपल्यावर काय परिणाम होईल, त्याबद्दल सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. अनेकदा त्या संशोधनातील अत्यंत छोट्या मुद्द्यावर रान उठविले जाते. परंतु त्यातून होणाऱ्या मोठ्या नुकसानाकडे लक्ष दिले जात नाही. समाजाला त्याच्या भाषेत व त्यांच्या दैनंदिन व्यावहारिक गोष्टींमध्ये पर्यावरणीय संशोधनाचा अंतर्भाव करून त्यासाठी योग्य ती उत्तरे मिळत नाहीत. समाजशास्त्रीय वा समाजातील सवयींमध्ये बदलासंबंधी मार्गदर्शन अभावानेच आढळते. त्यामुळे आपल्या परिसरातील हवेच्या प्रदूषणात झालेली वाढ, ध्वनिप्रदूषणाचा अतिरेक किंवा जल प्रदूषणाचा परिणाम याबाबत सार्वत्रिक पातळीवर निषेध किंवा त्यांना जबाबदार यंत्रणांचा निषेध करण्यापलीकडे आपल्या समाजातील सुबुद्ध नागरिकांचीही उडी जात नाही. यावर उपाय सुचविणे आपापल्या शक्तीनुसार त्या आपल्या परिसरात योग्य त्या यंत्रणांचा वापर करून राबविणे किंवा त्या संबंधातील उपाययोजनांचा पाठपुरावा करणे यासाठी सर्वसामान्यांनी स्वयंसेवी वृत्तीने काम करण्याची गरज आहे.

झाड, पाने, फळे, फुले, निसर्ग हे सर्व आपल्या दैनंदिन चर्चेमध्ये येऊ दे. मॉल, चित्रपट, फास्ट फूड वगैरे सर्व विषय बाजूला ठेवा. नव्या मोबाइलवरील नव्या अॅपचे प्रयोग करून पाहण्यापेक्षा निसर्गाच्या सृजनाचा एखादा प्रयोग प्रत्यक्ष करा आणि मग निसर्गाच्या निर्मितीक्षमतेचा आनंद घ्या! आपल्या कल्पनाशक्तीने आभासी जगात काहीतरी अगम्य शोधण्यापेक्षा भौतिक जगामधील नैसर्गिक सत्यही प्रत्यक्षात अनुभवा! आपल्या घरात, परिसरात, कार्यालयात, कॉलेज-शाळा सगळ्या ठिकाणी आपल्या जगण्यामध्ये वनस्पतींचा अंतर्भाव करा. आत्यंतिक यांत्रिकतेच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या युरोपीय जगातही आता नव्या कार्यालयीन जागांमध्ये वनस्पतींना महत्त्वाचे स्थान आहे. निसर्गाने आपली संपदा भरभरून ओतलेल्या आपल्या देशात मात्र निसर्ग हळूहळू आपल्या सभोवतालातून अदृश्य होत आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून मी आजूबाजूच्या मूक वनस्पतींचा जागरूक सहकारी म्हणून त्यांच्या सहअस्तित्वासाठी प्रचंड प्रयत्न करणे आवश्यक आहे.

       आपल्या भोवतालच्या जगात अनेकविध छोट्या-मोठ्या सजीवांचे अस्तित्व आहे. आपले जीवनही त्यांच्याभोवती गुंफलेले आहे. पण आजच्या नव्या 'स्मार्ट' रचनेमध्ये आपण ह्या सर्व सजीवांसाठी रिपेलंटस्‌ची निर्मिती केलेली आहे. त्या सर्व सजीवांचे अस्तित्व नाकारल्यावर किंवा समूळ नष्ट केल्यावर मानव जात जगणार हे आपले ठाम  मत पाळीव कुत्र्या-मांजरांच्या पलीकडे आपल्या गॅलरीमध्ये फुलपाखरांना आवडणारी झाडे लावून फुलपाखरे आणणे किंवा मधमाशांचे पोळे लावणे ही संकल्पना आपण रुजवायला हवी.

माझ्या कचऱ्याचे व्यवस्थापन हा माझा प्रश्न आहे. कारण कचऱ्याची निर्मितीही आपल्याच हातात आहे. माझ्या घरात परिसरामध्ये रिड्यूस, रियुज, रिसायकल आणि रिफ्यूज ह्या शब्दावलीची उदाहरणे सांगणारे प्रसंग कधी घडणार, त्यावर चर्चा कधी होणार? कचरा व्यवस्थापनाचा श्रीगणेशा त्वरित व्हावा. पाण्याचे महत्त्व सर्वांना कळते कारण ते जीवन आहे. पण त्याची उपलब्धता त्याची किंमत ठरविते आणि अनेकदा हे जीवनदायी पाणी कवडीमोल होते. आपल्या परिसरात पडून वाहून जाणाऱ्या पाण्याने आपली पाण्याबद्दलची धारणा पातळ होत जाते. मग पाणी कमी यायला लागल्यावर पाण्याच्या संवर्धनाची आठवण होते. पाणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि ती योग्य पद्धतीने वापरली पाहिजे ही धारणा निर्माण करणारी चळवळ आपण सर्वांनी जिवंत ठेवली पाहिजे.

'स्मार्ट' सिटीच्या संकल्पनेने 'उर्जेचा' वापर अनिवार्य केला आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये वीजेशिवाय जगणारे आपले देशबांधव असतानाही आपण मात्र सहज शक्य असलेल्या सर्व गोष्टी ऊर्जेच्या उपयोगाने करण्याचा प्रयत्न करतोय. 'टेक्नॉलॉजीने' जीवन सुसह्य बनविले असले तरीही तंत्रज्ञानाचा वापर आता 'ऊर्जाआधारित' दैनंदिन गोष्टींसाठी होऊ लागला आहे. उर्जेचा आवश्यक तेवढाच वापर करणे हा संस्कार आहे. आवश्यक तेवढीच उपकरणे विकत घेणे, वापरणे हे सर्व आपणच ठरवले पाहिजे.

       सुविधांच्या अतिरेकामध्ये आपण आपल्या सर्वसामान्य क्षमताही विसरू लागलो आहे. सहजपणे आठवणाऱ्या गोष्टीही आपल्या इलेक्ट्रॉनिक फोन साठवू लागलो आहे. आपण छोटे-छोटे हिशोबही कॅलक्युलेटरवर करू लागलो आहोत. खरंतर आपण यंत्र व यंत्रणाचे गुलाम होऊन आपल्या बुद्धिचा वापर कमी करीत आहोत. प्रयत्नपूर्वक हा वापर वाढविला पाहिजे. चालणे, धावणे आणि इतर श्रमांची कामे आपल्या दैनंदिनीत फारतर आपल्या व्य़ायामाच्या वेळात करतो. अन्यथा आपल्या कामांतून ह्या हाताने, पायाने वा श्रमाने करण्याच्या क्रिया हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत. पूर्ण क्षमतेने नैसर्गिक जीवन जगायचे असेल तर ह्या सर्व क्षमताही पूर्णपणे वापरल्या पाहिजेत, उपयोगात आणल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत श्रमांतून कोणतेही प्रदूषण होत नाही.ग्लोबल वॉर्मिंग हे जागतिक संकट आहे पण त्याचे उत्तर मात्र सार्वत्रिक आहे, व्यक्तिगत आहे. आपण सर्वांनी जर आपापल्या समजाप्रमाणे पर्यावरणसहयोगी वागायचे ठरविले तरीही हळूहळू हे पर्यावरणावरचे संकट दूर होईल. हा केवळ आशावाद नाही कारण या संकटाची निर्मितीही आपण सर्वांनी मिळून केली आहे. आपल्या सर्वांच्या सवयी या संकटाला अधिक कठीण बनवित आहेत. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ह्या संकटातू' न आपल्याला मुक्ती मिळू शकेल. आपल्याला सवयी बदलण्याचा जीवापाड प्रयत्न करायला हवा!


*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*

      *(9421802067 )*

[03/06, 4:41 PM] Manik Nagave: 07 लेख


पर्यावरण


5 जून जागतिक पर्यावरण दिन


जागतिक पर्यावरण दिन युनायटेड नेशन्सचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. 1 9 72 साली संयुक्त राष्ट्र महासभेच्या जनरल असेंब्लीने त्यांची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) मध्ये आहेत. 5 जूनला, पर्यावरण पर्यावरण महत्त्व समजण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध अबाधित आहे. "आम्ही जिथे राहतो तेथील वातावरण, संपूर्ण परिसर किंवा ज्या परिस्थितीत आपण राहतो तो परीसर म्हणजे पर्यावरण " असे म्हटले जाते .जैविक आणि अजैविक, घटक हे दोन घटक आहेत .स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी,  मनुष्याने अनेक नवीन शोधांचा शोध लावला आहे. 

   प्राचीन काळातील गुरुकुल पद्धतीमुळे, पर्यावरणाला  वेगळे ओळखण्याची आवश्यकता नव्हती. 20 व्या शतकात, गुरु रवींद्रनाथ टागोरांनी नैसर्गिक, पर्यावरणीय जागेत "शांतीनिकेतन" स्थापन केले. ज्यायोगे निसर्गाच्या दिशेने कृतज्ञताची भावना मनात निर्माण झाली. प्रकृतीची हाताळणी संवेदनशील पणे केली जात होती परंतु आजकाल आम्ही प्रत्येक वेळी पर्यावरणाला इजा पोहोचवत आहोत. मानवांने पर्यावरण प्रदूषित केले आहे.


आजची मानवाची स्थिती शेखचिल्लीसारखी बनली आहे. आम्ही ज्या पर्यावरणामुळे जिवंत आहोत  त्याला आपण नगण्य स्थान दिले आहे .वातावरण प्रदुषित केलं आहे. अगणित वृक्षतोड केली आहे. शहरीकरणाच्या नावावर आम्ही जंगलतोड केली आणि सिमेंटची जंगले वाढवली. रस्तारुंदीकरणासाठी वृक्षतोड केली. धरणांच्या नावाखाली अनेक एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्याच वेळी, वाढत्या लोकसंख्येचा परिणाम देखील पर्यावरणावर होत आहे. या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर ,त्याच्या असंतुलनावर होत आहे. पर्यावरणाचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित असे दोन प्रकार पडतात.धर्म, संस्कृती, वाढती लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक, सर्व मानवनिर्मित वातावरणात येतात.  निर्जीव वातावरणात निसर्गातील प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्म जीव या जिवंत घटकांचा समावेश होतो. माती, पाणी, पर्यावरणाचे घटक आहेत. परंतु मानवी जीवनाचा हस्तक्षेप झाल्यामुळे मानव आणि इतर जिवंत प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. जर आपण मानव निःस्वार्थी वृत्तीने जगलो तर आपण या पृथ्वीचा आवाज ऐकू शकलो तळ खूप झाले. सूर्याची अतीनिल कीरणें वातावरणातील ओझोन थरांमुळे अडवली जातात. हरीतगृहांसारख्या उपक्रमांमुळे व त्यांच्यातून बाहेर पडणाऱ्या सीएफसी वायू म्हणजेजच क्लोरोफ्लोरो कार्बन यामुळे ओझोन थराला धोका ऊत्पन्न होत आहे.मानवाला  त्वचाविकार,कर्करोग यासारख्या असाध्य रोगांना सामोरे जावे लागत आहे.यासाठी आपण काय केले पाहिजे ?

आपल्याला पर्यावरणाचे विविध घटक हाताळणं गरजेचं आहे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी स्वच्छ ठेवणं व साठवणं ,जमीन, पाणी आणि वन यांचे संवर्धन  करणे आवश्यक आहे. आम्ही पर्यावरणाला अनुकूल असे पाहिजे . ग्रामीण किंवा शहरी भागातील लोकांनी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करू नये. झाडे मोठ्या प्रमाणात लावावीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक जागरुकता निर्माण करावी आणि वाहतूकीच्या साधनांचा आवाज कमी केला पाहिजे. सरकार प्रयत्न करीत आहे, आम्हाला हे देखील लक्षात घ्यावे लागेल की पर्यावरण पाळणे हे आमचे कर्तव्य आहे.निसर्ग आपल्याला भरपूर देत असतो . आम्ही आपल्याला संरक्षण मिळविण्यासाठी पर्यावरण रक्षण करु शकत नाही काय? आपण हे करू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.


करू नका विनाश वृक्षवल्लींचा 

रक्षण करा पर्यावरणाचा जोमाने

भविष्य आपले आपल्या हाती

जपा व घडवा ते  नेटाने


लेखिका


श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड, 

ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर

 9881862530

[03/06, 5:07 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13


पर्यावरण


पृथ्वीवर सजीव, निर्जीव ,तसेच विविध वायु ,पाणी, वातावरण हे सर्व पर्यावरणाचा भाग आहे.सर्व जगात 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून घोषित करण्यात आला व सर्व जगात तो आता साजरा केला जातो. मग कसा साजरा करायला हवा पर्यावरण दिन? पर्यावरणासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे प्रदूषण होय प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी कित्येक वर्षांपासून  होत आहे मग ते वायु, जल ,ध्वनी या माध्यमातील प्रदूषण आहे. आपली काय भूमिका आहे पर्यावरणाचा  समतोल राखण्यासाठी?

 जून महिना हा पावसाचा महिना म्हणून या महिन्यांमध्ये खूप झाडे लावून आपण ऑक्सिजन वाढवण्यासाठी पर्यावरणाला मदत करू शकतो. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने देखील कोटी-कोटी वृक्षांचे उद्दिष्ट ठेवले एक मूल एक झाड या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या लोकसंख्या एवढी वृक्ष महाराष्ट्रात लावले गेले तर पर्यावरणाचा समतोल नक्कीच राखला जाईल. महाराष्ट्राप्रमाणे जगामध्ये देखील जेवढी लोकसंख्या तेवढे प्रत्येकाने जर वृक्ष लावले तर नक्कीच तापमान वाढीचे संकट दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला एखादी वर्षासहल करावीशी नक्कीच वाटते. या वर्षा ऋतू मध्ये आपण चिंब भिजण्याचा आनंद घेतो परंतु पर्यावरणाला हातभार लागेल अशी एखादी गोष्ट करण्यास काय हरकत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे, चिंचा, रामफळ, चिकू, पपई अशी अनेक फळे आपण खातो त्यांच्या बिया आपण जपून ठेवल्या तर त्यापासून सीड बॉल तयार करता येतील .वर्षा सहलीला जाताना असे सीड बॉल आपण डोंगर माथ्यावर घेऊन तेथे टाकल्यास असंख्य वृक्ष निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. सीड बॉल तयार करणे सोपे आहे. शेण आणि मातीचा चिखल करून त्यामध्ये बिया खोवायच्या . उन्हाळ्यामध्ये ते बॉल सुकवायचे आणि पावसाळ्यामध्ये हेच बोल डोंगर माथ्यावर  फेकून द्यायचे. सुंदर हिरवा शालू संपूर्ण धरती या उपक्रमामुळे नेसू शकेल.

पावसाळा म्हटला की पूर त्या ओघाने आलाच मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी पुराने हाहाकार उडाला होता. या पुराचे कारण म्हणजे मुंबईमधली तुंबलेली गटारे व प्लास्टिक हे होते. प्लास्टिक हे पर्यावरणाला घातकच आहे प्लास्टिक नष्ट व्हायला बरीच  वर्षे लागतात त्यामुळे प्लास्टिकला आपण पर्याय शोधणे गरजेचे आहे. पूर्वी शेतकरी शेतामध्ये काम करताना पावसापासून बचाव व्हावा म्हणून बांबूच्या काड्यांपासून संरक्षक अशी टोपी बनवत असत. अजूनही आदिवासी भागात अशा टोप्या घातल्या जातात .काही ठिकाणी पोती अंगावर घेतली जातात. शहरात मात्र पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट चा सर्रास वापर होता .रेनकोट साठी वापरले जाणारे प्लास्टिक हे नष्ट व्हायला बरेच कठीण असते त्यामुळे ह्या रेनकोट ला पर्याय नक्कीच उपलब्ध व्हायला हवा. ताडपत्री हा प्लास्टिकला पर्याय होऊ शकतो. चहाचे कप प्लास्टिकची न वापरता कागदी वापरू शकतो. सध्या मिनरल वॉटर पॅक करण्यासाठी बाटल्या वापरल्या जातात. या बाटल्या तशाच फेकून दिल्या जातात या बाटल्या तुंबलेल्या गटारातून मध्ये पाणी तुम्बनण्यासाठी  कारणीभूत ठरतात. आणि त्यामुळे पुराचे कारण बनतात. प्लास्टिकच्या पिशव्या भूखंडावर फेकून  दिल्या जातात तिथे कुत्रे, मांजरी ,किंवा गाई अशी जनावरे असतात ती जनावरे हे प्लास्टिक खातात त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक केल्यामुळे अनेक गाईंचा मृत्यू मृत्यूही होतो.

पावसाळ्यात आषाढी वारी पंढरपूर ला करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पंढरपूर साठी निघतात हे वारकरी पावसापासून बचाव करण्यासाठी सर्रास रेनकोट वापरतात. तसेच त्यांचे रोजचे कपडे भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत भरून मग ते आपल्या मोठ्या बॅगमध्ये ठेवतात. तहान लागल्यावर लगेच पाणी मिळावे म्हणून प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून ती पाणी पिऊन झाल्यावर  बाटली कुठेही फेकली जाते; त्यामुळे प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. वारकऱ्यांना प्लास्टिकचे रेनकोट देण्याऐवजी आपण जर ताडपत्रीचा वापर केला तर प्लास्टिक मुक्त पर्यावरण नक्कीच होऊ शकते. शालेय विद्यार्थ्यांना देखील त्यांची आई प्लास्टिकच्या डब्यात जेवण देते हे प्लास्टिक आरोग्यास हानिकारक आहे त्याऐवजी धातूच्या डब्यांचा वापर करायला हवा. महाराष्ट्रात पर्यावरणाला  हानीकारक अशा प्लास्टिकच्या बॅग व प्लास्टिकवर बंदी आहे. फक्त कायद्याची अंमलबजावणी, कायद्याचा बडगा दुकानदारांना दाखवला जातोय. ग्राहकांना देखील असाच कायद्याचा बडगा दाखवल्यास ग्राहकांचाही प्लास्टिक मागणीचा विचार थोडासा दूर होईल.

आपल्याकडे लग्न समारंभ, वाढदिवस या निमित्ताने भेट देण्याची पद्धत आहे आणि प्लास्टिकच्या वस्तू या निमित्ताने भेट दिल्या जातात परंतु लग्नात आलेल्या कित्येक वस्तू वापरल्या देखील जात नाही त्या पुन्हा आहेर म्हणून दुसरीकडे वापरल्या जातात. लग्नात नवीन जोडप्यास एखादे रोप भेट दिल्यास व त्यास सांगितले तुम्ही याचे संगोपन करा जर तीन वर्ष हे झाड जगले तर नववधूस पैठणी व नवरदेवास एखादा ड्रेस भेट मिळेल असे जर सांगितले तर त्या झाडाचे संगोपन नक्कीच होईल झाडामुळे भरपूर ऑक्सिजन त्या दांपत्याला तर मिळेल आणि  तुम्हाला पर्यावरण संरक्षणात हातभार लावण्याचे समाधानही मिळेल. 1 ग्रॅम सोने घेण्यास चार हजार रुपये लागतात. सोन्याऐवजी तुम्ही वरील पद्धत जर वापरली तर  त्या रोपापासून मिळणारा ऑक्सिजन किती असेल व आरोग्याची नक्कीच किंमत किती आहे? हा संदेश सर्वांना मिळेल.

प्लास्टिक जाळले तर त्यापासून प्रदूषण निर्माण होते व जमिनीत गाडले गेले तर जमीन पुर्ण नापीक होते. प्लास्टिक मुळे जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरांमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवला तर प्लास्टिक वेगळे करणे सोयीचे होईल. प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. चला तर मग प्लास्टिक मुक्त पर्यावरण करूया .झाडे लावूया व पर्यावरण संरक्षित करू या.


सविता साळुंके, श्रीरामपूर

9604232747

[03/06, 5:30 PM] मेघा अनिल पाटील: ( 27)

                       पर्यावरण

              निसर्गातील घटकांच्या सजीवांच्या अस्तित्वासाठी व विकासासाठी उपयोग होतो नैसर्गिक घटक विना मानवी अस्तित्वच शक्य नाही त्यामुळे मानवी जीवनात नैसर्गिक साधनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विकास साधत असताना पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वारेमाप वापर केला आहे. त्यामुळे काही मौल्यवान अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा कायमचा ऱ्हास झाला. मानवाने पर्यावरण संतुलना कडे दुर्लक्ष केले त्यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या .त्यात तापमान वाढ ,प्रदूषण ,दुष्काळ, अतिवृष्टी इत्यादी समस्यांचा समावेश होतो. पर्यावरणाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. मानवासहित सर्व सजीव सृष्टीला ते घातक आहे .भविष्यात या सजीवसृष्टीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहे .अशा परिस्थितीत पर्यावरण शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची ही काळाची गरज आहे .भारतात शिक्षणाच्या सर्व स्तरावर पर्यावरण शिक्षण अनिवार्य विषय बनवून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. सदर विषय अधिक प्रभावीपणे मांडायला  हवा हे अपेक्षित आहे. पर्यावरण शिक्षणाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या सखोल अभ्यास करून शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक, संस्थाचालक या सर्वांची भूमिका काय असावी याबाबत सखोल चिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

     पर्यावरणातील हवा ,पाणी ,वनस्पती ,मृदा, प्राणी ,अन्न या सर्व घटकांवर मानवी जीवन अवलंबून आहे .या सर्व नैसर्गिक घटकांचा उपयोग करून मानव आपले जीवन व्यतीत करीत आला आहे .आज मानवाने यांत्रिक_ तांत्रिक वैज्ञानिक प्रगतीचा कळस गाठला आहे. आपले जीवन अधिकाधिक सुखकारक            बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केला, याचाच परिणाम म्हणून मानवापुढे अनेक गंभीर अशा स्वरूपाचे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातील पर्यावरण संरक्षण समस्या ही प्रमुख समस्या आहे ,यातूनच पर्यावरण संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण विषयक संघटना स्थापन होऊन, पर्यावरण विषयक परिषदा घेतल्या जात आहेत. या परिषदेद्वारे जागतिक पातळीवर पर्यावरण शिक्षणाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत .जगातील सर्व देशांनी शिक्षण संस्थान मध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून, पर्यावरण दृष्टिकोन निर्माण करावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. भारतात पर्यावरण शिक्षण हा विषयअनिवार्य विषय असून शिक्षणाच्या विविध स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे .

 विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षण संस्थाचालक, प्रशासकीय अधिकारी यांनी पर्यावरण शिक्षणाविषयी केवळ गुण मिळवणे असा दृष्टिकोन  न ठेवता ते काम मानवाच्या निरोगी जीवनाचे शिक्षण आहे असा दृष्टीकोन बाळगावा.

आजकाल सर्वजण पर्यावरणावर चर्चा करतात  निसर्ग पर्यावरण म्हणजे नेमकी काय पर्यावरण हे अत्यंत व्यापक संज्ञा आहे .पर्यावरण म्हणजे घनदाट जंगल त्यातील असंख्य वनस्पती व प्राणी ,त्यात वाहणारी  नदी ,भरपूर ऑक्सिजन  सूक्ष्मजीव कीटक माती डोंगर दर्‍या वाळवंट बर्फाने झाकलेले हिमशिखरे समुद्र इत्यादी इतकेच नव्हे तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे कारखाने ,त्यामुळे होणारे प्रदूषण अशा सर्व गोष्टी पर्यावरणाचा भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर पर्यावरण म्हणजे आपला परिसर. सर्वकाही  भौतिक ,रासायनिक व जैविक घटक या सर्वांना मिळून पर्यावरण म्हणतात .यामध्ये सर्व घटकांचा  समावेश आहे .पर्यावरणातील जैविक व अजैविक घटक असतात नैसर्गिक पर्यावरणाच्या मानवाचे अस्तित्व ही आहे . नैसर्गिक पर्यावरणाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याची जतन करणे ,हे मन मानवाचे आद्य कर्तव्य आहे .आपल्या पूर्वजांकडून पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली असून , ती आपल्या पुढच्या पिढीकडून आपण सुरुवात घेतलेली आहे म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ठेवून सांभाळण्याची जबाबदारी आहे .मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेप वाढला आहे. जंगले नष्ट करीत आहे. सृष्टीची वैभव असणाऱ्या नद्या व समृद्ध प्रदूषित होत आहेत. पशुपक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होताहेत .वाढत चाललेले सूर्याची उष्णतेत तळपणे ,पावसाची आणि पर्यावरणाचे नुकसान करून घेतली आहेत . माणूस निसर्गाला ओरबाडून काढत आहे .वाळू ,माती ,वृक्ष यांची बेसुमार लूट करत आहे. कालांतराने त्रास मानवालाच होईल म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

    श्रीमती मेघा अनिल पाटील

     उपशिक्षिका

    श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार

मोबाईल नंबर 9665189977

[03/06, 5:49 PM] जी एस पाटील: पर्यावरण हा शब्द पदोपदी आपण उचारत असतो.पण पर्यावरण या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला तर पर अधिक आवरण   या शब्दापासुन बनलेला आहे.पर म्हणजे भूमि आणि आवरण म्हणजे सभोवती मग त्या मध्ये आपण सर्व प्राणी,नध्या नाले,डोंगर,सागर,सर्व प्रकारची झाडे झुडपं, सर्व प्रकारचे जीव हे मिळून हे पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहोत.हे सर्वजण अप्रत्यक्ष एकमेकावर अवलंबून असल्यानेच हे निसर्ग चक्र अनादी काळा पासून आजही चालूच आहे. निसर्गाचे वर्णन एका मराठी महिन्याचे वर्णन एका कवितेतून ऐकलेले आहे."श्रावण मासी हर्ष मानसी हरवळ दाटे चोहीकडे  ,क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे,ऊठती वरती जलधा वरती अनंत संध्या राग पहा,बलाक माला ऊडता भासे कल्प सुरांची माळीच ते" या काव्य पंगती तून निसर्गाचे अप्रत्यक्ष पर्यावरणाचेच अंश असलेले आपणास दिसेल.पण अलीकडे आपण हे विसरून गेलो आहे निसर्गाचे नुकसान होणे आपणच जबाबदार आहोत.कारण आपण केलेले अतिक्रमण हे पर्यावरणास त्यामुळे धोका पोहचला आहे यामुळे भूमीचे तापमान वाढले आहे,जमीनीतील पाणयाची पातळी खाली गेलेली आहे. केव्हाहि पाऊस पडू लागला आहे.केव्हाहि चक्रीवादळ तयार होऊ लागली त्याचे उदाहरण म्हणजे आज दिनांक ३-५-२०२० रोजी झालेले " निसर्ग चक्रीवादळ" तयार होते. यापूर्वी सुध्दा वादळे झाली आहेत. हे सर्व "पर्यावरण" दाखले आहेत....लेखक..जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.

पर्यावरण दिन 

         सुधाकर रामदास पाटील

    

     ठाणे

    मो.7798963063

नमस्कार मित्रहो, 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो.

 'Nature is our best friend'  असे म्हटले जाते. मोहक फुले, मधुर फळे, उंच उंच डोंगर, मंजुळ जाणारे पक्षी, संथ वाहणारी नदी, डेरेदार वृक्ष, प्राणवायू देणारी हवा ,विशाल सागर ,महाकाय प्राणी, आमची काळी आई म्हणजे अन्नदात्री धरणी, आकाश, सूर्य ,चंद्र ,तारे हा सर्व निसर्गाचा अविष्कार आहे. 

 जो जो जयाचा घेतला मी गुण 

तो तो केला गुरु मी जाण!

 निसर्ग हा दोस्तच नव्हे तर तो माणसाचा खरा गुरु आहे. निसर्गातील नदी, सागर, झाडे आम्हाला परोपकार शिकवतात. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'  या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचा संदेश निसर्ग देतो.  थांबू नका, पुढे पुढे चला .'जय चालत्याला थांबल्याला पराजय'  हे नदीच शिकवते.       

    'मानवाच्या रूपापेक्षा गुण श्रेष्ठ आहे'  हे कोकिळा सांगते.  सुगंधित फुले एका दिवसाचे आयुष्य असतानाही दुसऱ्याला गंधित करण्याचे गुज कानी सांगून जातात. विशाल सागर, विस्तीर्ण आकाश हे माणसाच्या मनाच्या मोठेपणाचे द्योतक आहेत. आकाशातील सूर्य, चंद्र , तारे हे नकळत मानवाला नियमितपणाचा संदेश देऊन जातात. सर्व जीवांचा जीवनदाता निसर्ग आहे. कितीतरी परिसंस्था ,  अन्नसाखळ्या निसर्गात सामावलेल्या आहेत. सूक्ष्म जीवांपासून ते महाकाय प्राण्यांपर्यंत अनेक पशुपक्षी निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाची विविधता मनाला विलक्षण भावते. अशावेळी कवी मनाच्या माणसाला काव्यपंक्ती सुचल्याशिवाय राहत नाहीत. कवी नारायण दरोडा म्हणतात,

 ' निसर्ग कसा रे तू फुलशी 

तुझ्या फळांचा रे, तुझ्या फुलांचा रे 

गंध सारीकडे पसरशी '.

संत तुकाराम महाराज म्हणतात ,

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ,

पक्षीही सुस्वरे आळविती'

       एकविसाव्या शतकात मात्र विज्ञानयुगाचे अवडंबर माजवत मानवाने निसर्गावर अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. म्हणतात ना, ' कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ'  या उक्तीप्रमाणे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. बेसुमार वृक्षतोड करून तिथे सिमेंटची जंगले उभी केली .कधी गरजेपोटी तर कधी मौजेसाठी शिकार करण्याचा मोह माणसाला आवडत नाही. त्यामुळे वनस्पतींच्या, प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन अन्नसाखळीच धोक्यात येऊ लागली आहे. 'औद्योगिक प्रगती' या गोड शब्दाने तर कहरच केला आहे . भूजलाचा प्रचंड उपसा करून निर्माण होणारे सांडपाणी नदीत, समुद्रात सोडले जाते. कारखान्यातून निर्माण होणारा धूर हवेत मिसळून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन विषारी वायूंचे प्रमाण वाढत आहे.  वाहनांचे वाढते प्रमाण, त्यांचे कर्णकर्कश आवाज ,त्या आवाजाचा लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्धव्यक्ती यांना होणारा त्रास यामुळे मानवी जीवनच धोक्यात आले आहेत.  रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून थोड्या दिवसात पीक घेण्याची घाई , औषधांचा मारा केलेली बियाणे, धोकादायक इंजेक्शनचा वापर केलेला भाजीपाला ,रासायनिक प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ या सर्वांमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत चालला आहे.  पृथ्वीच्या पोटात असलेली खनिजे माणूस हावरटपणे काढून घेत आहे . पृथ्वीचा जीवनरसच आपण शोषून घेत आहोत .त्यामुळे आजवर सुप्त व निद्रिस्त असलेले ज्वालामुखी जागृत होत आहेत. माळीण दुर्घटना म्हणजे निसर्गाचाच प्रकोप होय.  समुद्रातून येणारी चक्रीवादळे, कोरोना सारखी वैश्विक आपत्ती ही सर्व पर्यावरणाच्या ढासळलेल्या समतोलाची परिणती आहे. आणि म्हणून आता तरी निदान सावध होण्याची गरज आहे . कवी केशवसुत म्हणतात , 

'गोते खाल न चालवा हे मेंढरांचे व्रत 

गेल्याचाच शोक करीत बसणे वाईट ही पद्धत'

 झालं गेलं विसरून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागायला हवे .शेकडो एकर पडलेल्या माळरानावर वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचे शिवधनुष्य आपल्याला पेलावे लागेल. वृक्ष लागवड , वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे .केवळ वर्तमानपत्रात फोटो छापून येण्यापूरते वृक्षारोपण महत्त्वाचे नाही . 'हातांच्या कामात आत्म्याचा जिव्हाळा ओतल्याशिवाय सुंदरता येत नाही'  या उक्तीप्रमाणे हे काम मनापासून करूया .आणि गाऊया 

' एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू 

त्याची गाणी गातागाता मोठे मोठे होऊ ' पर्यावरण दिनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया. तरच नवी पिढी उद्याचे सुवर्णयुग पाहू शकेल.


कोड क्र . ( 14 )


" असेल पर्यावरण तर टिकेल मानव " 


     आज 5 जून ... म्हणजेच " जागतिक पर्यावरण दिन " ... हा फक्त वर्षात एकदाच का आपण साजरा करतो ? ज्या पर्यावरणाची नाळ ही मानवाच्या जीवनाशी जुळलेली आहे ... तिचा फक्त आजच स्मरण व्हावा ? किती खेदाची बाब आहे नाही ही ... ज्या पर्यावरणाने आपले सर्वस्व मानवाला समर्पित केले ... त्याची आज आपण सर्वांनी किती दुर्दशा व विटंबना केलीय ... ह्या पर्यावरणाचे एकही अंग मानवाने प्रदूषित केले नाही तर शपथ .... जल , स्थल , वायू , भूमी , आकाश , नदीनाले , डोंगर दर्या , आदी सर्वांगी मानवी स्वार्थी विळख्यातून सुटले नाही ... आणि या मानवाने अती हव्यासाने मानवासह पशुपक्षी , प्राणी , निसर्ग हेही सुटले नाहीत हो ... का करतोय असा स्वार्थांध माणूस ? का तो स्वतः स्वतःच्या पायावर कुर्हाडीचे घाव घालून आपले सुंदर जीवन कुरूप का करीत आहे ? एक दिवस असा येईल की हे पर्यावरण म्हणणेल , 


" वनवन भटकत राहशी

  मानवा तू रे रानावनात 

  न भेटणार तुला कधीच

  शुद्ध श्वास या जीवनात 


  मूळी घालून आमच्या घाव

  घेतलास आमचा बळी

  आमच्या शापानेच झाली                                                 कोरडी नदीनाले तळी


अर्पिले रे तुम्हां सर्वस्व

हाव न तुमची होई कमी

निष्ठूर निर्दयी मन तुमचं 

आम्हां संगोपना न घेई हमी


5 जून जागतिक पर्यावरण दिन

लावून दारी सांभाळ एखादं रोप

वाढवीत जाईल तुझा शिण

येईल तुज सुख समाधानी झोप "


असे परखड मत आज पर्यावरण मानवाला देत आहे ... तेव्हा ऊठून सारे मानव जागे होऊन या पर्यावरणाचे संरक्षक बनूया ... पर्यायाने आपल्यासह इतरांच्याही जीवनाचे संरक्षण करूया ... प्लॅस्टिक बंदी , व्यसनमुक्ती , काटेकोरपणे सरकारी नियम पालन करून आपण सुखी सार्थक जीवन जगूया ... 


"  जगा आणि जगू द्या "  हे तत्त्व अंगीकारून कोरोनामुक्त भारतही करून पर्यावरणास सुंदर व स्वच्छ करूया ..

अर्चना दिगांबर गरूड 

ता. किनवट , जि.नांदेड 

मो. क्र. 9552963376


चला थांबवू पर्यावरणाचा ऱ्हास 


  डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)

         शहापूर(ठाणे)


  पर्यावरण अर्थात निसर्ग ...! मानवी जीवन चक्रच नव्हे तर संपूर्ण सजीवांचे जीवन चक्र यावर अवलंबून  आहे.खरे तर नियमितता शिकावी ती या पर्यावरणातुन आणि निसर्गातूनच!पण मानवाने आपला अवाजवी हस्तक्षेप वाढवला आणि मग पर्यावरणही आपल्यावर रुसायला सुरुवात झाली. आणि मानवी स्वभावाप्रमाणे त्याचाही दोष मानवाने स्वतःवर न घेता निसर्गावरच ठेवला.

 आज पर्यावरणाच्या वेग वेगळ्या समस्यांनी मानवी जीवन हैराण झाले आहे.आज जागतिक तापमान वाढीची समस्या निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे....कदाचित ती जल प्रलयाची नांदीच म्हणावी लागेल.यातून सुधारेल तो माणूस कसला आपल्या पाशवी हव्यासामुळे पर्यावरणाच्या नैसर्गिक साखळीचा ऱ्हास करण्याचा त्याने जणू विडाच उचलला आहे. आज वेग वेगळ्या कारणांनी होणारी वृक्ष तोड, पाणी अडवणे ,पाणी जिरवणे,इमारतीसाठी शेतीसाठी कारखान्यासाठी नैसर्गिक दऱ्या भरणे यासारख्या अनेक कारणांमुळे पुराचे भयाण संकट दरवर्षी उभे ठाकत आहे.,पर्यावरणातील सजीव सृष्टीची  नैसर्गिक जीवन साखळी धोक्यात आल्याने आज हिंस्र श्वापदे मनुष्यांच्या भर वस्त्यांवर हल्ले करू लागले आहेत.लावलेल्या पिकांवर एका रात्रीत रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे...जल चक्राची साखळी खंडित होऊन कोणत्याही मोसमात धुवाधार पाऊस कोसळून जनजीवन विस्कळित होत आहे.या साऱ्या गोष्टींना आपणच जबाबदार नाहीत का??

  आज अतिरेकी हव्यासापोटी  विविध वृक्षांची लागवड केली जात आहे...पण त्यातही आपण आपला स्वार्थीपणा सोडू शकलो नाही.आपल्याला नगदी उत्पन्न देऊ शकतील अशाच झाडांची लागवड आपण करीत आहोत.त्यामुळे वृक्षांमधील जैव विवीधता संपुष्टात आली आहे.

 माणूस आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी खोलवर जमिनी खोदून आपल्या खनिजाची,पाण्याची गरज पूर्ण करून घेतानाच त्यामुळे होणारे तोटे बेमालूम पणे डोळेझाक करू लागला आणि त्यातून सजीव सृष्टीवर होणाऱ्या विषाणूंचे आक्रमणाचा त्या पासून होणाऱ्या विविध आजाराच्या रूपाने बळी जाऊ लागला.खरे तर पर्यावरण आपली गरज  भागवू शकतो ,अतिरेकी हव्यास नाही  याचाच विसर समस्त मानव जातीला पडला आहे.म्हणूनच आजच्या या दिवशी चला प्रतिज्ञा करूया 'पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू आणि वसुंधरा वाचवूया!!'

       डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर

         शहापूर(ठाणे)

           9226435827


पर्यावरण संवर्धन(28)

        वसुंधरा रक्षण,सजीवांचे रक्षण!! पर्यावरण ऱ्हास थांबवला पाहिजे,पर्यावरण आहे,म्हणून आपण मोकळा सहवास घेत आहोत,त्याला जपणे त्याचे संवर्धन करणे,आपले कर्तव्य आहे,पर्यावरण संतुलन बिघडत आहे,निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे,जीवनचक्र सुरळीत चालण्यासाठी शहरीकरणाचा हव्यास,अवास्तव जंगलतोड,इत्यादी गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे परंतु त्यापाठोपाठ साधन संपत्ती नष्ट होते,याकडे मानवाने लक्ष दिले पाहिजे.

        निसर्ग मानवास तारतो व मारतोही,भौगोलिक माहिती आपल्याला सर्वाना माहिती आहेच,जलचक्र, सजीवांचे जीवनमान, अन्नसाखळी या एक मेकांवर अवलंबून असतात,उदा.जंगलात हरीण जास्त दिसू लागले,की समजावे वाघ,सिंह यांची संख्या कमी आहे,आणि हिंस्त्र प्राणी जास्त दिसू लागले की साधारण समजावे हरीण कमी झालेत,कारण निसर्गाचा नियम असाच आहे की,एकमेकांवर उपजीविका करणे,नाहीतर जीवनमान कसे चालणार,पर्यावरण समतोल कसा राखला जाणार!

           निसर्ग आपला सोबती आहे, त्यामुळे त्याला सांभाळून वागले पाहिजे,अधिक हव्यासापायी प्रदूषणे,भूकंप,पाण्याचा तुटवडा,अवषर्ण, पूर इत्यादी समस्या भेडसावतात यासाठी आपण प्रगती करताना पर्यावरणाला

इजा पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सुजाता जाधव नवी मुंबई



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...