*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- चोविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 12 मे 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- अन्न*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
Code (08)*अन्न हे पूर्णब्रह्म*
'अन्न हे पूर्णब्रह्म आहे.’
‘अन्नदानासारखे पुण्य नाही.’
‘पोटासाठी दाहीदिशा, का रे? फिरविशी जगदीशा.’
अशा प्रकारे मानवी जीवनाला नव्हे, संपूर्ण प्राणिजीवनाला व्यापून टाकणाऱ्या अन्नासंबंधी वरील प्रकारचे विचार लहानपणापासून ऐकलेले असतात. नव्हे ते रोमारोमांत भिनलेले असतात. म्हणून सर्व प्राणिमात्रांचे जिवंत राहण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे अन्नच होय.
त्यामुळेच मानवाची सर्व संस्कृती, त्याची विचारसरणी, त्याची भाषा अन्नाभोवती फिरते. भाषेच्या दालनात एकदा नजर टाकून बघा ना! सर्वत्र अन्नदेवतेचाच संचार दिसेल. आपले रोजचे जगणे, रोजचे बोलणे, रोजचा व्यवहार अन्नाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लेख झाल्याशिवाय होतच नाही. अगदी बालपणापासून हा घास काऊचा, हा घास चिऊचा- ऐकूनच आपले भरण-पोषण होत असते.
मराठी भाषेमधल्या शब्दसमूहांचा, वाक्प्रचारांचा, म्हणींचा खजिना पाहिला तर विस्मयचकित होण्याची पाळी येते. ‘रोटी-बेटी व्यवहार, खाऊन माजावे, पण टाकून माजू नये, शेजीने खाऊ घातला भात, आईने फिरविला हात, अन्नान्नदशा, दुपारची भ्रांत, तळीराम शांत होणे, पोटात कावळे ओरडणे, खाई खाई मसणात जाई, पिंडाएवढा भात खाऊन मुडद्यासारखा पडून राहीन, तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले, साखरेचे खाणार त्याला देव देणार, खसखस पिकणे, आयत्या पिठावर नागोबा, पी हळद नि हो गोरी, अध्र्या हळकुंडात पिवळे होणे, मिरच्यांचे खळे, टाळूवरचे लोणी खाणे, खाईन तुपाशी नाही तर राहीन उपशी, अन्नासारखा लाभ नाही, मरणासारखी हानी नाही, वडय़ावरचे तेल वांग्यावर काढणे, आगीत तेल ओतणे, खाई गोड की आई गोड, नावडतीचे मीठ अळणी, तिळा तिळा दार उघड, एक तीळ सात जणांत खाल्ला, तिळगूळ घ्या गोड गोड बोला, तिलांजली देणे.
इथले अन्न-पाणी संपणे, ज्या गावच्या ‘बोरी’ त्याच गावच्या बाभळी, खंडी खाऊन सलबत्ता, सुदाम्याचे पोहे, विदुराघरच्या कण्या, मीठ-भाकरीचे जेवण, दुधावरची साय, दुधाची तहान ताकावर भागविणे, अंगाची लाही लाही होणे, अंगाचा तिळपापड होणे, आवळा देऊन कोहळा काढणे, सुतविलेले कोहळे गोड मानून घेणे, चल रे भोपळय़ा टुणूक टुणूक, सांडगे खाईन कुडूम कुडूम, भाकरी मिळत नाही तर शिरा-पुरी खा. खाल्याघरचे वासे मोजणे, अन्नछत्र उघडणे, अन्नछत्रात जेवणे आणि वर मिरपूड मागणे, दही खाऊ मही खाऊ, दुधात मिठाचा खडा टाकणे, बाजारात तुरी भट भटणीला मारी, अबब! ही यादी न संपणारी आहे. लिहिण्याचा मोह आवरता घ्यावा लागतो आहे.
संस्कृतीने अशा या अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले आहे. म्हणूनच अन्नाचा मान ठेवून त्याला भजून खाणे त्याचे कर्तव्य आहे. अन्नाची नासाडी न करण्याचे व्रत घेतले पाहिजे.
पण आजही पुष्कळ घरी अन्न कचऱ्यात फेकले जाते. लग्नसमारंभात अन्नाची नासाडी बघवत नाही. तेव्हा मानवाने विचारपूर्वक वागावे. म्हणून अन्न ही राष्ट्रीय संपत्ती असे लक्षात घेऊनच अन्नाचा दुरुपयोग थांबवावयास हवा.
गरजूंना अन्न द्यावे. स्वत:च्या ताटातले चार घास इतरांनाही द्यावेत. भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे की, जो स्वत:पुरते खातो तो पाप खातो.
वाडवडिलांच्या श्राद्धपक्षदिनी अपंगांना, वृद्धाश्रमात, कुष्ठधाम, अनाथाश्रमात, जेवण देता येईल, भुकेल्यांना सुग्रास भोजन देऊन तृप्त करता येईल. यात स्वार्थ, परमार्थ, राष्ट्रीय कार्यही साधता येईल.
माणसाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचे सत्त्व, रज आणि तम असे तीन प्रकार असतात. अन्न शाकाहारी आणि सात्त्विक असेल, तर मन आणि बुद्धी सात्त्विक होते. विविध प्रकारांच्या आहाराचे शरिरावर काय परिणाम होतात
अ. ‘सात्त्विक अन्न : फलाहार म्हणजे केळी, पेरू आदी झाडावरून काढलेली पक्व फळे तशीच खाणे. पूर्वीच्या काळी, व्यक्ती सत्त्वगुणी होती. त्यामुळे ती आहारात कंदमुळे खात असे. त्यात अधिक सात्त्विकता होती.
आ. राजसिक अन्न : धान्याहार म्हणजे तांदूळ, डाळी, गहू आदी धान्ये शिजवून किंवा दळून खाणे. माणूस वरण, भात, भाजी, आमटी असे रजोगुणी पदार्थ खाऊ लागला.
इ. तामसिक अन्न : मांस, चरबी आदी पदार्थ शिजवून खाणे.. मांस, मासे, मद्यपान असा तमोगुणी आहार करू लागला.’
सात्त्विक, राजस आणि तामस आहाराची उदाहरणे :
१. पिकलेली फळे सात्त्विक आहेत, फळांची लोणची राजस आहेत, तर फळांपासून बनवलेले मद्य तामस आहे.
२. दुष्ट लोकांनी दिलेले अन्न तामस, नातेवाइकांनी आणि मित्रांनी दिलेले अन्न राजस, तर संतांनी दिलेले अन्न सात्त्विक असते.
३. मद्यासह घेतलेले अन्न तामस, बोलत-बोलत (गप्पा मारीत) घेतलेले अन्न राजस आणि प्रत्येक घासासमवेत ‘गोविंद, गोविंद’ (नामजप) म्हणत घेतलेले तेच अन्न सात्त्विक होते.
४. उपाहारगृहातील आणि लग्नाच्या जेवणावळीतील अन्न राजस असते. देवतांच्या उत्सवप्रसंगी दिलेले, तसेच संतांनी केलेल्या भंडार्यांतील जेवण सात्त्विक असते.’
सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहाराचे शरिरावर होणारे परिणाम
सात्त्विक आहार : आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो. सात्त्विक आहाराने सत्त्वशुद्धी होते, सत्त्वशुद्धीने आत्मस्मृती होते. त्यामुळे सर्व वासनाग्रंथी तुटतात आणि मुक्ती मिळते.
राजसिक आहार : याने रजोगुण वाढतो. त्यामुळे वासना उद्दीपित होतात. उत्तेजना आणि कामवासना वाढते.
तामसिक आहार : याने तमोगुण बळावतो. त्यामुळे आळस, अज्ञान, प्रमाद आणि पाप वाढते. व्यक्तीला विचार आणि विवेक करता येत नाही. मानसिक अकर्मण्यता येते.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
कोड २२)अन्नासाठी दाही दिशा
_________________________
अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा,
कृपाळूवा परम पुरुषा , करुणा कैसी तूज नये
लाॅकडाउन मुळे आपल्याला दिसतय हजा सररो मजूर , कष्टकरी काम नाही म्हणून आपापल्या गावाकडे शेकडो मैलाचा प्रवास करत चालले आहेत . त्यांची होणारी ससेहोलपट बघवत नाही . बायका , लेकरांना मिळेल त्या वाहनाने नाही तर पायीपायी आपल्या गावाकडे परत चालले आहेत , उपाशीपोटी उन्हातान्हात वणवण भटकत आहेत . पोटाची खळगी भरण्यासाठी ही त्यांची धडपड पाहून खूप वाईट वाटतेय.
एकवेळ ची भूक भागविण्यासाठी अगतीक झाले आहेत . हाताला काम नाही . जवळ पैसा नाही . खायचे काय ? जगायचे कसे ? लेकराबाळांना जगवायचे कसे ? अन्नासाठी शेंकडों मैल परमुलखात आलेले मजूर आज हाताला काम नसल्यामुळे अन्नसाठी परत आपल्या गावी जात आहेत .
हे चित्र पाहिले आणि माझीच मला लाज वाटू लागली . आपल्या घरी रोज आपण किती अन्न वाया घालवतो . ताटात अन्न शिल्लक ठेउन उठतो . आमची आई , आजी आम्हाला सांगायची अरे , जेवताना पोटभर जेवा , खाऊन माजा पण टाकून माजू नका .
आपण लग्न समारंभात , सणा सुदीला पंचपक्वांनांच जेवण तयार करतो . गावातील, शेजारी , आपले नातेवाईक यांना आग्रह करुन वाढतो . तो पहिलेच जेऊन आलेला असतो . तरी त्याला लाडू जिलेबी सर्वजण आग्रहाने वाढणे चालूच असते . जेवढे जाईल तेवढे खातो व बाकीचे पानात टाकून उठून जातो . ईकडे दारात पोट खपाटीला गेलेला भिकारी शिळ्या तुकड्या साठी तिष्ठत असतो . याचना करीत असतो . पण आपण त्याला हकलून देतो .
पंगती मधे जेवायला बसल्यावर आपण एक प्रार्थना म्हणतो
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्य हे पूर्ण ब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
वरील श्लोक म्हणून जेवायला बसतात
आणि ताटात अन्न टाकून उठून जातात
हा त्या अन्नाचा अपमान होत नाही का ?
एकीकडे अन्न हे परब्रम्ह म्हणायचे आणि दुसरीकडे त्याचा नाश करायचा ?
आपल्या देशात ४०%मुले कुपोषित आहेत
१५%मुले अतिगंभीर कुपोषित आहेत . त्यांना अन्नाची जास्त गरज आहे .
६०% गरोदर मातां मधे हेमोग्लोबीन चे प्रमाण कमी आहे . त्यांना सकस आहाराची आवश्यकता आहे .
सण , समारंभ , पार्ट्यांमधे अन्नाची होणारी नासाडी आपण टाळायला पाहिजे . एखादा जेवनावळीचा कार्यक्रम झाल्यावर दुसर्या दिवशी घराच्या शेजारीच कोपर्या मधे उरलेले अन्न फेकून दिलेले दिसते . ते इतरत्र पसरते . दुर्गंध येऊ लागते. हे किळसवाणे चित्र बघवत नाही .
सद्या कोरोना च्या संकटाला आपला देश तोंड देत आहे . लाॅकडाउन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत . जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो . आपण गरजवंताला मदत केली पाहिजे . मनुष्याचा प्राण हा अन्नमय प्राण आहे . अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे . अन्नदानात आपण आपला सहभाग देऊन पुण्य पदरात पाडायला पाहीजे .
जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पा मार्फत कर्जत तालुक्यातील माहीजळगांव येथील उपकेंद्रात रोज अन्नदान केले जाते .
प्रकल्प संचालक श्री . रवी आरोळे सर
जयेश दादा व मोनिका व मातोश्री रत्नाताई कांबळे यांनी एक वर्षापासून कुपोषित मुलांसाठी गरोदर स्रिया , अनाथ व जेष्ठ नागरिकांसाठी ते रोज सकस आहार पुरवत आहेत . त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा !
चला आपण ही अन्नाची बचत करुन आपापल्या परीने गरजूंना अन्नदान करुया .
२२) अरविंद कुलकर्णी पिंपरखेडकर
9422613664
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
34
*मानवाच्या तीनच गरजा महत्वाच्या*
(अन्न , वस्त्र निवारा )
मुळात आता कळते आहे माणसांच्या गरजा खुप कमी आहे अगदी अन्न, वस्र, निवारा म्हणाले तरी काही हरकत नाही. बाकी काही गरज सध्या तरी दुय्यम आहे हे आज सगळ्यांना कळते आहे कारण हल्ली सवय झाली आहे सगळ्यांना नको त्या गोष्टिंना आपली गरजा मानुन घ्यायची आणी दिखाव्याला कवटाळण्याची आणी आजवर आपण सगळे तेच करत आलो नको त्या गोष्टींना आपले अंग बनवतो ज्या फक्त नाममात्र आहेत. तुमच्या आज कितीही पैसा असला कितीही श्रीमंती कितिह्या डिग्री पदव्या, पद, प्रतिष्ठा असल्या तरीही आपल्याला आपली मुळ जागा दाखवण्यासाठी एक न दिसणारा व्हायरस कारणीभूत ठरतो.
काही दिवसात पुन्हा आपल्याला तो आपली सगळ्यांची लायकी दाखवतो की जागेवर रहा उगाच नको त्या गोष्टीला मोठ करुन मिरवत बसू नका कारण एक सत्य आहे. " मातीत जगणं मातीत मरण " आज जे आपल्याला जगण्यासाठी गरजेचे आहे ते सगळे आपल्या जवळ आहे तरी आपण स्थिर नाही कारण वाढल्या अपेक्षा, इच्छा कारण आपण सगळे त्याच ओळींचे धनी आहोत " तुझ आहे रे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी " आणी ही चुकलली जागा आपल्याला कोरोनाने दाखवली आहे.
तो जाणार आहे काही दिवसात कारण तो पाहुणा आहे काही दिवसांचा पण या पाहुण्याने आपल्याला शिस्त दाखवली आहे तिचे पालन सगळे तो गेल्यावरही करतील बाकी घरात रहा सुरक्षित रहा आणी एक लक्षात असूद्या या जगात काहिच कायमस्वरुपी टिकत नाही मग अगदी जड, जिव आणी सगळ काही म्हणून काळजी करु नका हे ही दिवस निघुन जातील तो पर्यंत आनंदी जगण्याचे मार्ग शोधा कितीही मोठे व्हा फक्त जमिनीवर पाय ठेवा कारण आकाशात घरटे अजुन कुणालाही बांधता आले नाही परत जमिनीवर यावे लागते. तर नसलेला दिखावा बंद करा तेव्हा समजेल उगाच धावत बसतो आपण जगाला दाखवण्यासाठी.
लेखन-श्री.सुंदरसिंग आर.साबळे (स शि)
मो.9545254856
गोंदिया
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
*अन्न हे पूर्णब्रम्ह*
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया (09)*
जीवन सुरळीत चालण्यासाठी सजीवांना ऊर्जेच्या सतत पुरवठ्याची आवश्यकता असते. ती त्यांना बाहेरून मिळवावी लागते. ऊर्जेच्या उत्पत्तीसाठी ज्या पदार्थांचे सेवन केले जाते त्यांना *अन्न* म्हणतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा उपयोग करून आपले अन्न बनवितात. प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतींवर व इतर प्राण्यांचे दूध, अंडी व मांस वगैरेंवर अवलंबून रहावे लागते.अन्नाची तीन मुख्य कार्ये आहेत . शरीरास ऊर्जा पुरविणे ,ऊतकांची वाढ करणे व त्यांची झीज भरून काढणे , शरीराच्या आतील भागातील परिस्थिती, एंझाइमे सजीवांच्या सूक्ष्म घटकांत म्हणजे कोशिकांत तयार होणारी प्रथिनयुक्त व रासायनिक विक्रिया घडवून आनने.
अन्नाचा बहुतेक भाग सुंयगांच्या तीन प्रधान घटकांचा बनलेला असतो. कार्बोहायड्रेटे, वसा आणि प्रथिने. यांशिवाय लवणे व खनिज द्रव्ये, जीवनसत्त्त्वे आणि इतर कार्बनी संयुगे व पाणी या सर्वांची प्राण्यांना अन्नात जरूरी असते.मनुष्य व इतर प्राणी यांच्या अन्नघटकविषयक गरजा सारख्याच असतात. मात्र मनुष्य अन्नद्रव्यांवर विशेष प्रक्रिया करून मगच ते अन्न खातो. इतर प्राणी अशी प्रक्रिया करीत नाहीत. दळणे, कांडणे, शिजविणे, भाजणे, तळणे वगैरे अनेक प्रक्रिया केल्यानंतरच मनुष्यअन्नतयार करतो .
प्रत्येक व्यक्तीला किती ऊर्जा लागेल हे तिचे वय, लिंग, वजन, उंची, देश, काल व ती व्यक्ती करीत असलेले काम यांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती फार श्रमाचे काम करीत असेल, तर तिला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अन्नापासून मिळणाऱ्या ऊर्जेचे मूल्य किलोकॅलरीत देण्याचा प्रघात आहे. अन्नघटकांतील १ ग्रॅम प्रथिनापासून ४•१ किलोकॅलरी, १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९•३ किलोकॅलरी व १ ग्रॅम स्टार्च-शर्करादी पदार्थापासून ४•१ किलोकॅलरी इतकी ऊर्जा मिळते.
तांदूळ , विपुल पाणीअसलेल्या राज्यांत भात पिकतो. दक्षिण भारतात व समुद्रकिनार्यालगतच्या भागांत तांदूळ हेच प्रधान अन्नधान्य आहे. तांदळात कार्बोहायड्रेटे विपुल असून त्यामानाने प्रथिने फक्त ६७ टक्के असतात. तांदळाच्या बाहेरच्या थरात ब१ जीवनसत्त्व विपुल असते.
ज्वारी, बाजरी, मका, नागली वगैरे अन्नधान्ये गरिबांचे प्रमुख अन्न असून त्यांमध्ये कार्बोहायड्रेटांचे प्रमाण पुष्कळ असते.
मूग, उडीद, तूर, हरभरा वगैरे द्विदल धान्यांत प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.
गळिताची धान्ये -भुईमूग, करडई, तीळ, मोहरी यांच्या बियांपासून तेल मिळते व जी पेंड राहते तिच्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते.
फळे - द्राक्ष, आंबा, पेरू, सफरचंद, केळी, अननस इ. विविध फळे खाद्य आहेत. फळांपासून शर्करा, कॅरोटीन आणि क जीवनसत्व मिळते. आवश्यक अशी सायट्रिक व मॅलिक यांसारखी अम्लेसुद्धा मिळतात. नारळ, बदाम व काजू यांत स्निग्ध पदार्थ व प्रथिने बरीच असतात .
भाज्या - पालेभाज्यांपासून निरनिराळी खनिजे लवणे व कॅरोटीन मिळते. फळभाज्यांत कार्बोहायड्रेटे व समूहापैकी जीवनसत्त्वे असतात.
मसाल्याचे पदार्थ -हे पदार्थ अन्नात फार थोड्या प्रमाणात वापरतात. त्यांचा मुख्य उपयोग अन्न स्वादिष्ट व चविष्ट करणे हा आहे. त्यांच्या पासून फारशी ऊर्जा मिळत नाही.
अन्नदानाची एक कथा पांडवांनी विजय मिळविल्यानंतर केलेल्या यज्ञातील घटनेची. तिथे आलेले अर्धसोन्याचे मुंगूस तेथील राखेत लोळूनही पूर्ण सोन्याचे झाले नाही. कारण एका ब्राह्मण कुटुंबाने उपासमारीने गलितगात्र झालेले असतानाही समोर आलेल्या अतिथीला आपल्यासमोरील ताट देऊन अन्नदानाचे महत्त्व पटविले. त्याच्या दानयज्ञापेक्षा पांडवांचा दानधर्म फिकाच पडला.
अनूसयेने दारी आलेल्या देवांना बालरूप देऊन दुग्धपान देऊन तृप्त केले.
आपली उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांनी खाल्ल्यावर शबरी कृतकृत्य झाली.
हाच आनंद मिळवून देण्यासाठी संत एकनाथ राणूकडे जेवणासाठी जातात. इतके च नव्हे तर वडिलांच्या श्राद्धदिनाचे जेवण दारी आलेल्या भुकलेल्यांना देऊन स्वत: धन्य होतात.
असा आहे हा अन्नदानाचा महिमा..!
एकदा ब्रह्मदेवाकडे देव आणि दानव आपआपले श्रेष्ठपण विचारण्यासाठी गेले. ब्रह्मदेवाने आधी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. आधाशासारखे दानव प्रथम पानावर बसले. पण ब्रह्मदेवाने एक अट घातली. जेवताना कोपरामध्ये हात वाकवायचा नाही. सरळ हात ठेवूनच जेवण करावयाचे. अर्थात दानवांची फजिती झाली. पण देवांचे जेवण सुखासमाधानाने पार पडले. कारण त्यांनी स्वत: जेवण न घेता समोर बसलेल्या देवांना भरविले. खरंच, दुसऱ्यांना खाऊ घालण्यातली तृप्ती काही औरच असते .
अशी अन्नाची महती! सर्व मानवी जीवनाला व्यापून उरणारी. मानवाची संस्कृती, त्याचे साहित्य, पुराणे, भाषा, विचारसरणी, दृष्टिकोन सारे सारे अन्नाभोवती फिरते आहे. त्याचा जीवच अन्नमय प्राण आहे. म्हणूनच संस्कृतीने अशा या *अन्नाला पूर्णब्रह्म* म्हटले आहे. म्हणूनच अन्नाचा मान ठेवून त्याला भजून खाणे त्याचे कर्तव्य आहे. अन्नाची नासाडी न करण्याचे त्याने व्रत घेतले पाहिजे.
पण आजही पुष्कळ घरी अन्न कचऱ्यात फेकले जाते. लग्नसमारंभात अन्नाची नासाडी बघवत नाही. तेव्हा मानवाने विचारपूर्वक वागावे. मिडास राजाची कथा काय सांगते? म्हणून अन्न ही राष्ट्रीय संपत्ती असे लक्षात घेऊनच अन्नाचा दुरुपयोग थांबवावयास हवा.
गरजूंना अन्न द्यावे. स्वत:च्या ताटातले चार घास इतरांनाही द्यावेत. भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे की, जो स्वत:पुरते खातो तो पाप खातो
जोवरी सुखाचा घास नसे सर्वाना
जोवरी न झाल्या उन्नत अवघ्या मान।
तोवरी न मानू प्रगतपथावर देश
तोवरी असेलच अंगावर रणवेश॥
यासाठी प्रत्येकाने अन्नधान्याच्या बाबतीतला आपआपला खारीचा वाटा उचलू या.आजच्या कोरोणाच्या परिस्थितीत गरीबआणि गरजवंतांना *अन्नधान्यांच्या कीट* तयार करून वाटण्याचे संकल्प घेत आहे.
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
*अन्न*
उपाशीपोटी कोणी देशभक्त म्हणू शकत नाही. रिकामं पोट आणि रिकामं डोकं समाज स्वास्थ्य बिघडवू शकते.हे जेवढे सत्य आहे तेवढेच भरलेले पोट आणि रिकामं डोके अत्यंत घातक असते. अन्न हे परब्रम्ह आहे असे आपण मानतो, परंतु याच परब्रह्माची हेळसांड कित्येक ठिकाणी होते हे आपण अनुभवतो. श्रीमंतीच्या थाटामाटाचे प्रदर्शन करताना अनेक लग्नसमारंभात जेवणावळी मध्ये अनेकविध पदार्थ असतात.ज्या पदार्थाची कदाचित तेथेच आपली पहिली ओळख झालेली असते.शिवाय बफे पद्धतीने जेवणावळ. तरीही नवनवीन पदार्थ खाण्याचा हव्यास आणि किती घ्यावे याचा न आलेला अंदाज यामुळे अन्नाची एवढी नासाडी होते की ती संवेदनशील मनाला पाहावे वाटत नाही. अंगावरती भरजरी कपडे नको नको म्हणत कोणाच्यातरी आग्रहाखातर भरपेट खाऊन बाहेर पडणारी माणसं न्याहाळत त्याच दारामध्ये अंगावरती फाटकी कपडे आणि नाकातून वाहणाऱ्या द्रवपदार्थ घेऊन केस विस्कटलेले असणारी लहान मुलं पाहून कोणालाही त्यांची नाय येत नाही. उलट यांच्या लग्नामध्ये या मुलांचं दर्शन म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार वाटत असल्या कारणाने त्या मुलांना हाकलून देण्याचा बरेच जण प्रयत्न करत असतात. परंतु भूक ही किती भयानक असते. किती दिवसापासून किती महिन्यापासून नव्हे वर्षानुवर्षे या त्यांच्या घरामध्ये असे चविष्ट पदार्थ कधी पाहायला मिळाले नसतील ना खायला मिळाले असतील तर या पदार्थाबद्दल त्यांना किती आकर्षण असेल याची जाणीव त्या पंगती मधून बाहेर पडणाऱ्यांना होत नसेल हे दुर्दैव आहे. पंगतीत बसून जेवण असो किंवा बफे असो टाटा मध्ये शिल्लक राहिलेले अन्न कितीतरी पटीने वाटोळे होते टाकून द्यावे लागते. कधी कधी तर ते अन्न खरकट्या ताटातील अन्न घेण्यासाठी बाहेर वाट पाहत बसलेले लोक पाहिल्यानंतर मनाला वेदना होऊन जातात. आता थोडीफार परिस्थिती बदललेली आहे परंतु संपूर्ण परिस्थिती बदलली असे म्हणता येत नाही. अन्नाच्या शोधासाठी भटकंती करावीच लागते. हातावर पोट असणारी माणसं अन्नाच्या शोधासाठी दाहीदिशा फिरतात. परप्रांतात त्यांना यावं जावं लागतं. ताटामध्ये भाकरीचा चंद्र दिसावा या हेतूने घरापासून मैलोन् मैल दूर राहावं लागतं. फार विचित्र असते भूक. अनेक प्रकारची कामे ती करायला लावते. हिताची अहितची, चांगली-वाईट, नैतिक-अनैतिक सारी कामे करायला लावत असते. परंतु चांगले आणि नैतिक कामातून मिळवलेले अन्न हे समाधान आणि शांती देत असते. याउलट आपल्याला अनेक उदाहरणे दिसून येतात की अनेकांकडे अनेक प्रकारची संपत्ती आहे, घरामध्ये खायलाही काही कमी नाही, परंतु खाण्यासाठी मात्र डॉक्टरांनी मज्जाव केलेला असतो. माणसाची ज्या पद्धतीने अवस्था आहे तशीच पक्षी पशू आणि इतर प्राण्यांची देखील आहे. माणसाने त्यांच्या राहत्याकडे शिरकाव केला अतिक्रमण केले. आणि त्यांची पंचायत करून टाकली. पशुपक्ष्यांच्या नही माणसेच खाऊ लागली मग अन्नाच्या शोधासाठी पशुपक्षी मानवी वस्तीवर येऊ लागले. भूक शमवणारे अन्न काळजीपूर्वक वापरून गरजवंतालाही देण्याची कृतज्ञता आपण दाखवली पाहिजे. माझ्या आसपास कोणीही उपाशी राहू नये हे मानवता आपल्यामध्ये रुजली पाहिजे. पैशाच्या आणि श्रीमंतीच्या जोरावर आपण अन्न मिळवत असलो तरी, आपल्या ताटात येणारे अन्न हे सहजासहजी आलेले नाही त्याच्यासाठी घाम गाळला आहे. आणि त्यांचे कष्ट त्याच्यासाठी लागलेले आहे. याची जाणीव आपण ठेवून त्यांना स्मरून आपले अन्नसेवन झाले पाहिजे.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
जाणिजे यज्ञकर्म
------------------------------------
श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर) (१७)
**********************
कोरोना लॉकडावून दुसरा टप्प्यात आलेला ,घरातून बाहेर पडायला सगळीकडे मज्जाव..जागोजागी पोलीस हातात दंडुके घेऊन आलेल्यांच्या पाकिस्तानावर हल्ला करायला तय्यारच...! अश्यातच कोणीतरी एक साठी ओलांडलेली म्हातारी, चेहरा सुकलेला, कोरडे पडलेले ओठ , आस्कट विस्कट केस, लुगड्याच्या चिंध्या चिंध्या नेसलेल्या.. अन थरथरत्या हातात काठी घेऊन त्याच रस्त्यावरून पोलिसासमोरून येतांना मी माझ्या घराच्या गच्चीवरून बघितली. तिचा अवतार बघूनच पोलिसांनी तिची विचारपूस केली नसावी असा अंदाज मी बांधला... लगेच ती म्हातारी आमच्याच घराकडे वळली...आणि गेटसमोर उभी राहून , "मायबाप भाकर द्या... भाकर...! म्हातारीला भाकर देगं ग माय....!"अश्या आर्त आवाजत विणवू लागली.. या कोरोनाच्या भीतीने तर घरातले सुद्धा परके वाटत असतांना त्या म्हातारीला कोण जेवण वाढणार...? याचं कोडं माझ्या मनात घुटमळत असतांना तब्बल पाच सात मिनिटे बिच्चारी म्हातारी मागत राहिली पण आमच्या पूर्ण इमारतीतून कोणीच काही तिला वाढलं नाही....
त्यावेळी ती बिचारी मनाशीच काहीतरी पुटपुटत जागीच बसली आणि तिने धरणीवर आपले अंग टाकले...ही अवस्था बघून मला राहवले नाही..मी माझ्या तोंडाला रुमाल बांधून खाली उतरलो तर एक जेवणाचं ताट आणि पाणी घेऊनच...
निस्तेज चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्या म्हातारीला जागी केलं आणि "आजी घ्या जेवण आणलं, तुमच्यासाठी..." थकलेल्या आजीच्या अंगात त्राण नसून सुद्धा जेवण म्हणताच म्हातारी ताडकन उठली...आणि दिलेल्या जेवणावर स्वार झाली. भाजीपाला नसल्याने मुंगाची डाळ आणि पोळी व सोबत मुद्दाम पापड मी या म्हातारीला आणला होता...मग भरून पाणी दिलं...म्हातारी फारसी जेवली नाही पण स्वतःच्या डोक्यावर दोन बाजूला हात ठेवून माझ्यावरून ओवाळून टाकत म्हणाली ..."बाळा पाच दिवस झाल्याती अजून घासाचा कण पण नाही मिळाला बाप्पा, तू आज पोटभर दिलं बाबा, देव तुहय भलं करो..." म्हातारीचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचाच होता....पण यातून मला त्या एका चपातीची किंमत कशी करावी याचंच गणित जमत नव्हतं...
माझ्या जीवनात आलेला हा प्रसंग नक्कीच बऱ्याचदा घडत असेल पण सतत भीक मागणे आणि देणे, दान देणे, पंगती, भंडारे, पार्ट्या यामुळेच अश्या निरोधार लोकांना पोटभरायला मिळत होतं आजकाल ते बंद झालं आणि अन्नासाठी या लोकांना काहीच पर्याय उपलब्ध नाही...खऱ्या अर्थाने अश्या भुकेल्याला जेवण देणं म्हणजे यज्ञात दान दिल्यापेक्षा मोठं पुण्य असल्याचं मला जाणवलं... म्हणूनच तर म्हणतात.... उदरभरण नोव्हे जाणिजे यज्ञकर्म...।
यारो पेट बडा बाका, सबसे लगा दिया धोका..
देख फकिरा देख संन्यासी घरघर मांगे टुकरा।
एक आसन पर कोई नहीं बैठा पिछे पेट का लकरा।।
या कबीर वाणीचा अर्थ हाच की अन्नासाठी जगणे हे जरी सामान्य जीवन असलं तरी सुद्धा पोटाची खळगी ही पहिली पायरी आहे...
आजकाल रक्तदान, नेत्र दान,वस्त्र दान ,गोदान यासारख्या अनेक संकल्पना समाजात राबविल्या जातात परंतु अन्नदान हे तर नक्कीच सर्वश्रेष्ठ दान म्हणावं लागेल...
उपाशी पोट नक्कीच माणसाला ब्रह्मांडाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही... म्हणून यज्ञातील अनेक आहुतींपैकी भुकेल्या अन्न हेच सर्वात मोठे यज्ञकर्म मानले पाहिजे...
श्री. झगरे गुरुजी (वाकदकर)
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
( 5)
लेख.....
अन्न हे पूर्णब्रह्म
माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र व
निवारा हे जगण्यासाठी चे मुख्य घटक आहेत. सजीवाला जिवंत राहण्यासाठी , पोट भरण्यासाठी अन्न खावे लागते. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी माणूस काम करत असतो. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी तो अनेक उद्योगधंदे करत असतो. या उद्योग धंद्यातून भरपूर पैसा कमवतो. व श्रीमंत होतो. धनसंचय केल्याने त्याच्याकडे भरपूर धनधान्य, अन्न असते. या धनधान्याच्या उपयोग तो भरपूर प्रमाणात करतो.
समाजात तीन घटक आहेत श्रीमंत, मध्यम आणि गरीब. त्यापैकी श्रीमंत या पहिल्या घटकातील अवलोकन केले असता श्रीमंत माणसाचा जवळ असलेले पैसे तो अनेकदा वाजवी खर्चात उडवितो. हे पैसे उडवत असताना तो गरिबांचा विचारही करत नाही. लग्नप्रसंगी अवास्तव खर्च करतो. लग्न प्रसंगात किंवा अनेक कार्यक्रमात अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अन्नपदार्थ पोटाला लागण्यापेक्षा नासाडीच जास्त करतो.
अर्थातच काही मोजके अपवादात्मक श्रीमंत लोक याचा विचारही करत असतील .अन्नाची नासाडी होऊ नये अन्नाचा वापर व्यवस्थित व्हावा. व त्यानुसार त्यांचे योग्य नियोजन सुद्धा असू शकते.असते.
समाजातील दुसरा घटक मध्यम स्वरूपाचा या मध्यम घटकातील लोकं आपले पोट भरण्यासाठी काही छोटे मोठे उद्योग धंदे करतात व छोटी-मोठी नोकरी सुद्धा करतात व आपला उदरनिर्वाह भागवतात. अन्नाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी या घटकातील लोक आवर्जून घेतात. पोटाला लागेल तेवढेच अन्न खावे, पात्रात उष्टे अन्न टाकणार नाही , पडणार नाही हे सुद्धा काळजी घेतात. लग्न प्रसंगात व इतरही कार्यक्रमात आवाका पाहूनच खर्च करतात. अन्नपदार्थाची नासाडी होऊ नये तसेच सर्वांना पोटभर जेवण मिळेल याची काळजी घेतात.
अतिशय भयानक परिस्थिती असलेला गरीब वर्ग.आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकतो. मोलमजुरी करून एक वेळच अन्न तरी मिळेल की नाही ही शाश्वती त्यांना नसते.
हातावरचे पोट असणाऱ्यांची व्यथा फार भयानक असते. पुरेसे अन्न जेवायला मिळेल की नाही आपल्या मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकतील की नाही ही अवघड बाब त्यांच्यासाठी असते.
अन्न पोटाला पोटभर नाही मिळाले तर जगायचं कसं? हा प्रश्नही त्यांच्यासमोर असतो आणि भुकेने व्याकूळ होऊन मरण्याची वेळ त्यांच्यावर येते. दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या पैशात आपली रोजीरोटी, उदरनिर्वाह ते चालवतात. पोटाला अन्न मिळावे म्हणून उन्हातानात, थंडीवाऱ्यात, पावसात आपल्या जिवाची पर्वा न करता काम करतात. भाकरीच्या चंद्राचा शोध घेतात, जेवणाची सोय करतात. आपल्या पोटाची खळगी अन्नाने भरतात आणि आपले जीवन कसेबसे जगतात.
अशाप्रकारे अन्न हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. अन्नापेक्षा मोठं कोणीच नाही.म्हणून कोणी किती जरी मोठा असेल आणि कितीही लहान असेल तरीही त्याला आपली पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न खावेच लागते. म्हणून माणसाने अन्नाचा दुरुपयोग करू नये. अन्नाची नासाडी करू नये. जेवढे लागेल तेवढेच अन्न आपल्या पात्रात घ्यावे व आपले पोट भरावे. परमेश्वराने नेिसर्गात सूर्य,चंद्र वारा व चोवीस तासाची वेळ ही सर्वांना सारखीच दिली आहे. या निसर्गनियमाप्रमाणे माणसाने आपले जीवन जगावे. वेळोवेळी इतरांना मदत करावी. कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. व ज्यांना जसे जमेल तसे इतरांना मदतीचा हात द्यावा. अन्नदान करावे. व जे उपाशीपोटी आहे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करावा. याच अर्थ आपल्याजवळ जेवढे आहे त्यापैकी थोडेफार देऊन इतरांची पोट भरावे.
आज निर्माण झालेल्या कोरोना या आजाराच्या वैश्विक संकटाचा विचार केला असता आजची परिस्थिती गरिबांसाठी हलाखीची निर्माण झालेली आहे. आजच्या निर्माण झालेल्या या संकटकाळात आपण सर्वांनी मिळून गरजूंपर्यंत गरज कशी पोहोचेल हा प्रयत्न करूया, भुकेल्यांना अन्न कसे मिळेल हा प्रयत्न केलेला अतिउत्तम राहील. हे उद्भवलेले कोरोना संकट मोठे आहे. परंतु या संकटाचापेक्षाही माणूस मोठा आहे. आणि या माणसाला वाचवण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे सर्वतोपरी मदत करायला हवी. कारण माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची फार गरज असते. म्हणूनच म्हटले आहे
' अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.'
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता. हदगाव जि.नांदेड.
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
*अन्न हे सजीव प्राण्यांसाठी अत्यावश्यक वस्तू आहे का???*
✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)
होय,अगदी बरोबर आहे.पृथ्वीवर जीवन जगत असणाऱ्या सर्व सजीवांचे अन्न हे अत्यावश्यक बाब आहे.अन्नाशिवाय सजीव जिवंत राहू शकत नाही.जोपर्यंत शरीरात ऊर्जा साठविली आहे तेवढे दिवस जीवंत राहू शकते त्यानंतर मात्र अन्नविना जिवंत राहणे अशक्य आहे त्यामुळे प्रत्येक जीव अन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतो.अन्न ही प्राथमिक गरज बनली आहे अन्नामुळे शरिरात कार्य करण्याची ऊर्जा मिळते आणि काम करू शकतो.सकाळ पासून तर सायंकाळपर्यंत जे जे पदार्थ आपल्या शरीरात प्राशन करू त्या सर्वांचा समावेश अन्न या घटकात मोडला जातो त्यामुळे प्रत्येक सजीवांचा वाढ व विकास होण्याच्या दृष्टीने अन्न हे प्रामुख्याने सेवन करीत असतो.प्राणी,पशु,पक्षी देखील अन्नासाठी वणवण फिरत असते.प्रत्येक सजीवांचे वेगवेगळे अन्नाचे प्रकार आहेत.काही प्राणी शाकाहारी,काही मांसाहारी तर मानव हा दोन्ही प्रकारात मोडत असतो.
पृथ्वीतलावर बोलका,बुद्धीमान,चतुर,शहाणा प्राणी म्हणजे मानव होय.इतर प्राणी देखील आपापल्या भाषेत बोलून विचारविनिमय करीत असतात.मानवाला निरनिराळी कष्टाची कामे करावी लागत असल्याने अन्नाची जास्त गरज भासते.अन्न हे कॅलरी मध्ये मोजल्या जाते.प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी 2100 ते 2400 कॅलरी ऊर्जा अत्यंत आवश्यक असते त्यामुळे प्रपंच चालविण्यासाठी त्याच्या पोटासाठी व घरातील इतर सदस्यसाठी पैसे कमविण्यासाठी मेहनत करावी लागते जेणेकरून आपल्या सोबत आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची पोटाची खळगी भरणे गरजेचे आहे त्यासाठी विविध कामे,व्यवसाय,रोजगार,उद्योग करून पैसे कमवत असतात त्याच पैशातून अन्न धान्य विकत घेऊन उदरनिर्वाह करीत असतो म्हणून आपण म्हणू शकतो की,अन्न हे प्रत्येक जिवासाठी प्राथमिक गरज आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही.
'अन्न हे पूर्णब्रह्म आहे' अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही.अन्न वाया घालवू नये,फेकून देऊ नये,जेवण करतांना टाळाटाळ करू नये,अन्नाला बोटे ठेऊ नये यासारखे शब्द लहानपणी आई,आजी यांच्या तोंडातून तुमच्या कानावर पडले असेलच.अन्नाची महती अधोरेखित करण्यासाठी अन्नविषयी गोष्टीतून आपल्याला माहीत झालेच आहे.अन्न,वस्त्र,निवारा या तीन प्राथमिक व मूलभूत गरजा आहेत त्यामुळे ह्या मिळविण्यासाठी मनुष्य शेतात काबाडकष्ट करून धान्य पिकवत असतो आणि बुद्धीजीवी माणसे आपल्या बुद्धीचा वापर करून पैसा कमवतात आणि त्या पैशातून अन्नधान्य विकत घेतात आणि उदरनिर्वाह करत असतात.भारतासारख्या विशाल लोकसंख्याच्या देशात उदरनिर्वाहासाठी खेड्यातून शहराकडे धाव घेऊन जो मिळेल ते काम करण्यास तयार होतात त्याचे मूळ हेच की, अन्न मिळविणे.अन्न मिळाले नाही तर अधिक काळ जिवंत राहू शकत नाही.अन्न ही प्रत्येक सजीवांसाठी सार्वजनिक गरज असल्याने आवश्यक तेवढाच अन्न सेवन करावे.
'अति तिथे माती' असं आपण म्हणतो हे अगदी खरं आहे.अन्न जास्त सेवन केले तरी शरीरावर परिणाम होतो आणि अन्न मिळालेच नाही तरी शरीरावर परिणाम होतो.अधिक सेवनाने अपचन होण्याची शक्यता बळावते तर अन्न न मिळाल्याने कुपोषित होण्याची शक्यता बळावते त्यामुळे भात, भाजी,पोळी,वरण, ताजी फळे असा संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.जर अधिक प्रमाणात स्वयंपाक तयार केलेला असेल तर फेकून न देता ज्या लोकांना एक वेळचे अन्नही धड मिळत नाही त्यांना देऊन पुण्यत्वाचे कार्य आपल्या मानवाकडून व्हावे जर संतुलित अन्न सेवन केल्यास आपल्याला कोणत्याही आजाराशी तोंड द्यावे लागत नाही पण कमी किंवा जास्त झाले तरी विविध आजाराला आमंत्रण दिल्यासारखं होईल म्हणून समतोल आहार घेऊन अन्नाची हेळसांड करू नये आणि अन्न ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे हे अगदी सत्य आहे.
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
अन्न
मनोज आणि मिताली च्या मुलाचा उद्या वाढदिवस होता. त्याची तयारी जोरात चालू होती. मनोज म्हणाला, उद्या कुणाकुणाला बोलवायचे ?मनोज चे वडील अण्णा म्हणाले अरे आपले किती नातेवाईक आहेत, बाळाचा पहिला वाढदिवस सर्व नातेवाईकांना बोलावुया .छान जेवण करूया काय काय ठेवायचे मेनू ?मनोजची आई म्हणाली हो हो माझ्या नातवाचे कौतुक. त्यानिमित्ताने अन्नदान झाले पाहिजे फारच छान कल्पना ! सासुबाई म्हणाल्या काय मिताली फार शांत आहेस .कुणा कुणाला बोलवायचे तु का बोलत नाहीस? मीटाली शांतपणे म्हणाली आई आहो आपले सर्व नातेवाईक श्रीमंतच आहे त्यांना अन्नदानाचे काय महत्त्व. मिताली ची सासू म्हणाली की तुला नेमकं काय म्हणायचं आहे?मिताली म्हणाली आई आहो ,आपले असे काही नातेवाईक आहेत की ज्यांना दररोज अन्न मिळणे नशिबात नाही. मनोज गोंधळात पडला. मिताली समजेल अशा भाषेत सांगशील का ?मिताली म्हणाली, अहो आज अनेक अनाथ मुले अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात त्यांचं आणि आपलं सामाजिक बांधिलकीचे नातं नाही का? मला वाटतं उद्या बाळाचा वाढदिवस आपण अनाथाश्रमात जाऊन साजरा करावा तेथील सर्व मुलांसाठी जेवण करूया' याशिवाय आणखी एक दिवसाच्या अन्नाचा खर्चही आपण करूया .मिताली सासऱ्यांकडे पाहत म्हणाली अण्णा तुम्हाला काय वाटतं ?तुम्ही नाही म्हणत असाल तर राहू द्या .अण्णा म्हणाले मिताली तुझं बरोबर आहे खरंच ही अनाथ मुले आपली सामाजिक बांधिलकी आहे त्यांच्यासाठी आपण अन्नदान जरूर करूया . आजच्या पिढीला अन्नदान, अन्नाचे महत्त्व याची जाण आली आहे याचे हे एक छोटेसे उदाहरण होय. आज जगभरात आर्थिक ,सामाजिक विषमता अजूनही आहे. एकीकडे भरमसाठ अन्न वाया जाते. पार्टीच्या मेजवानीच्या समारंभाच्या वेळी अनेक अन्न पात्रात टाकले जाते हे अन्न कोणाचाही पोटात जात नाही. एकीकडे उपासमारीने लोक दिवस कंठत आहेत आणि दुसरीकडे अति खाण्यामुळे लोक स्थूलपणा कडे झुकत आहेत आणि पुन्हा वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन आखत आहेत .
आपण कष्ट करतो पैसे मिळवतो मिळवलेल्या पैशांतून अन्नाची तजवीज करतो आपल्याला वाटते की आपल्या पैशाने आपण मिळवले आहे परंतु ;तसे नाही हे अन्न आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचे कष्ट त्यामध्ये असतात .सर्वप्रथम कष्ट करतो तो शेतकरी. दिवस रात्र जागतो, पिकांना पाणी भरतो; आणि हे अन्न पिकवतो पावसाने दगा दिला तर पीक हातचे जाते आणि साथ लाभली तर पीक मिळते. हे पीक तो व्यापाऱ्याला विकतो व्यापारी स्वतःचा नफा काढून ते आपल्याला विकतो आपल्याला धान्य विकून शेतकऱ्याला जे पैसे मिळतात तो ते पैसे पिकासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भरतो मग बघा जो आपल्याला देतो तो दाता आज स्वतः अन्नाविना राहतो मग आपण आपल्या पैशाने काय विकत घेतो फक्त अन्न की शेतकऱ्याचे कष्ट .
मनुष्याला जेवढी अन्नाची गरज आहे तेवढी पशू-पक्षी यांनादेखील आहे जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा मानवच उपाशी राहतो असे नाही; तर जंगलातील अनेक प्राणीही उपाशी राहतात त्यांना अन्न मिळाले नाही तर ते मानवी वस्तीमध्ये येतात याचे उदाहरण म्हणजे बिबट्या, तरस,हरीण, नीलगाय, हे प्राणी होय.
आपल्या महाराष्ट्राने अनेकदा दुष्काळाशी सामना केला आहे हे इतिहासात डोकावल्यावर कळते. संत तुकाराम महाराजांच्या काळातही दुष्काळ पडला होता तेव्हाही त्यांनी आपल्या घरातील अन्न गरिबांना वाटून दिले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडले होते तेव्हाही शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांनी गरिबांना अन्नधान्य वाटून दिले होते. संभाजी महाराज म्हणत उपाशीपोटी स्वराज्याचे स्वप्न कसे काय दाखवायचे आपल्या जनतेला? बरोबर आहे उपाशी राहिलो तर स्वाभिमान ,स्वराज्य, देशप्रेम आपल्या गळी उतरणार नाही पोटाची भूक भागवण्यासाठी अन्नच लागते . भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाले नाही तर त्याच्याकडून चोरी ,हिंसा, व्यभिचार असे प्रकार होऊ शकतात आणि आपल्या समाजासाठी हे गुन्हे, ही बाब नक्कीच भूषणावह नाही सामाजिक विषमतेमुळे आपल्या देशात अनेक लोक गरीब आहेत. परंतु; त्यांच्याकडे खायला पुरेसे अन्न आहे त्यांनी आपल्या बांधवांची थोडी काळजी घेतली तर काय हरकत आहे ?आपण दररोज प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत जर ते बांधव उपाशी झोपले तर आपण इतर आनंदात राहू शकू काय? म्हणून आपल्या बांधवांची भूक संकटकाळी तरी आपण भागवली पाहिजे .महापूर, दुष्काळ, भूकंप, संसर्गजन्य आजार या आपत्ती मध्ये आपल्या बांधवांची भूक आपण भागवली पाहिजे.
दुष्काळी भाग त्याचप्रमाणे आदिवासी भाग येथे अन्नधान्य भरपूर प्रमाणात पिकत नाही त्यामुळे या भागातील लोकांना नेहमीच उपासमारीला सामोरे जावे लागते त्यामुळे या भागात कुपोषणाचे बळी लहान बालके, स्त्रिया, वृद्ध हे असतात .शहरी भागात रोजगाराच्या संधी असतात त्यामुळे पैसे कमावून धान्य घेता येते परंतु; दुष्काळी आदिवासी भागात रोजगाराच्या संधीही नाही ,शेती असून पीक पिकत नाही त्यामुळे याठिकाणी अन्नधान्याची नेहमी कमतरता भासते .धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन 'शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन' पिक विमा' कर्ज याबाबतीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अन्न धान्य उत्पादन वाढेल शेतकऱ्यांना पोटभर खायला मिळेल .अन्न मिळाले नाही म्हणून कोणीही कुपोषित राहणार नाही.जगाचा पोशिंदा म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्याला उपाशी रहावे लागणार नाही.
"सुजलाम सुफलाम असा माझा भारत देश सदैव राहो ,
एकही दिवस उपवास येथे कुणालाही ना घडो ."
सविता साळुंके श्रीरामपूर
कोड नंबर 13
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
अन्नाची महती
माझ्या नातीचा वाढदिवस होता. "काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा करू या", असे ती सारखे म्हणत होती. आम्ही एका आदिवासी मुलांच्या आश्रमात फोन करून त्यांची परवानगी घेऊन ठेवली. तिला सरप्राईज म्हणून आम्ही वाढदिवस होता त्या दिवशी, त्या आश्रमात घेऊन गेलो. गेल्यावर त्या मुलांना चॉकलेट्स वाटली आणि फुगे दिले. माझ्या नाती सकट सगळीच मुले फुगे खेळण्यात दंगल झाली. नंतर त्यांचे थोडेसे गेम्स घेतले. त्यानंतर जेवण झाली. नंतर आम्ही घरी जाण्यास निघालो. मुले आज खूप खेळली होती. पोटभर सुग्रास जेवली होती. त्या मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता. माझी नात पण आधी खूष होती. आम्हा सर्वांनाच आंतरिक समाधान मिळाले होते.
'अन्न हे पूर्ण ब्रह्म l उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म'l हेच आम्ही आमच्या कळत्या वयापासून आईच्या तोंडून ऐकत आलो आहोत. हे शब्द रोमारोमात भिनलेले आहेत. जेवण म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे, तर तो एक यज्ञ आहे. म्हणून अन्नाचा मान ठेवा. नास-धूस करू नका. पानात अन्न टाकू नका. अन्नाला पाठ दाखवू नका. अन्नावरून वरून उठून जाऊ नका.अन्नाचा प्रार्थना करून मग अन्नग्रहण करावे. ही सगळी वाक्ये आई व आजी आम्हाला कानीकपाळी ओरडून सांगत असत. त्याच गोष्टी अगदी आजपर्यंत अंगवळणी पडलेल्या आहेत.
आपल्या शरिराला लागणाऱ्या ऊर्जेसाठी व पोषणासाठी जे आपण खातो त्यास अन्न म्हणतात.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. जगण्यासाठी अन्नाची मुख्य आवश्यकता असते. मानवी शरीराचे भरण-पोषण अन्नामुळे होते. अन्नातून आपल्या शरीराला पोषणासाठी आवश्यक असलेले घटक मिळतात. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेटस्, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स इत्यादी. त्यामुळे नेहमी पौष्टिक अन्न खावे. शिळे, खराब झालेले अन्न खाऊ नये. कारण जीवनावश्यक क्रियांसाठी लागणारी उर्जा अन्नातून मिळते. चालणे, बोलणे, श्वासोच्छ्वास, अन्नपचन, हृदय गती, विचार करणे इत्यादी क्रियांसाठी लागणारी ऊर्जा अन्नापासून मिळते.
माणसाचे वय, लिंग तो जिथे राहतो तो देश, वजन, उंची यावरून त्याला लागणारे अन्न ठरवले जाते.
साधारणपणे थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना फॅट्स, कार्बोहायड्रेट याची जास्त जरुरी असते.
शरीरमाद्यम् खलु धर्मसाधनम् l साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे.अशा शरीराच्या धारणेसाठी अन्न अत्यंत आवश्यक आहे.
आपण जसे अन्न खातो तशी आपली विचारधारणा बनते. म्हणजे तामसी अन्न खाल्ल्यास विचार ही तसेच असतात. म्हणून सात्विक अन्न खावे.
अन्नं न निंद्यात् l तद् व्रतम् l असेही म्हटले आहे अन्नाची निंदा करू नये. ते व्रत आहे. म्हणजे अन्नाला नावे ठेवू नये.
आपली खरीप पिके साधारण ऑक्टोबर महिन्यात तयार होतात. त्याप्रमाणे आपण सण किंवा उत्सवही साजरे करतो. पिके तयार होऊन धान्याने घर भरले की दसरा- दिवाळी हे सण आपण आनंदाने धामधूमीत साजरे करतो. तसेच रब्बी पिके मार्च-एप्रिलमध्ये तयार झाली की होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा हे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो.
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेनl
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी हिंडेन l
नुसते पोट भरण्यासाठी तेही फक्त दीड वीतीचे, माणसाला कुठे कुठे भटकावे लागते. पोट इतके लहान आणि त्यासाठी कष्ट केवढे मोठे!
सर्वसाधारण लोकांची 'जिव्हा' मोहास कारणीभूत असते. या जिव्हेची लालसा पुरवण्यात आपण नको असलेले चमचमीत पदार्थ, नको एवढे खातो. जंकफूड खातो.
जेवताना, खाताना नेहमी वातावरण प्रसन्न असावे. अन्न चवीने, आनंदाने खाल्ले जावे. म्हणजे सर्व पाचक रस त्यात व्यवस्थित मिसळतात. त्यामुळे पचनही चांगले होते. मजेत जेवत असताना आमटीचा मस्त भुरका मारल्या शिवाय मजा नाही.
जेवताना भांडाभांडी, वाद घालू नये, चिडू नये. ही आपली संस्कृती. टीव्हीसमोर बसून जेवू नये. त्यामुळे घास तोंडात जास्त वेळ राहून पचन नीट होत नाही. कारण समोरच्या चलत् चित्रात आपण इतके दंग असतो की अन्न योग्य रीतीने चावायचे विसरतो.
माणसाची संस्कृती, त्याची विचारसरणी, त्याची भाषा अन्ना भोवती फिरत असते. आपल्या रोजच्या बोलण्यात व्यवहारात कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्नाचा उल्लेख झाल्याशिवाय रहात नाही. मराठी भाषेत अन्नावर वाक्प्रचार म्हणी अगणित आहेत. उदाहरणार्थ साखरेचे खाणार त्याला देव देणार, पी हळद हो गोरी इत्यादी.
काव्यातही अन्न ब्रम्हाची हजेरी आहे. 'आंबा पिकतो रस गळतो', ' केळीचे सुकले बाग' इत्यादी.
अन्न देवतेवर कथा-कहाण्या तर खूपच . द्रौपदीची अक्षय थाळी, अनसूयेच्या दारी आलेल्या देवांना बाल रूप देऊन दुग्धपान देऊन तृप्त केले वगैरे वगैरे.
आज-काल मोठ-मोठ्या समारंभातून होणारी अन्नाची नासाडी पाहिली की मन अगदी विषण्ण होते. हे होऊ नये. किती लोकं अर्धपोटी, भुकेलेली असतात याचा विचार करावा. 'अन्नदान हे श्रेष्ठ दान'. तेव्हा आपल्या वाढदिवसादिवशी किंवा दुसर्या कोण्या मोठ्या माणसांच्या श्राद्धपक्ष दिनी वृद्धाश्रमाला, अनाथाश्रमाला जेवण देऊन त्यांना तृप्त करावे.
आज न्यूट्रिशनिस्ट या व्यवसायाला फार महत्त्व आले आहे. आपल्या शरीराला अन्न काय हवे आहे, किती हवे आहे, कोणत्या वेळी घ्यावे हे सगळे ही व्यक्ती म्हणजे न्यूट्रिशनिस्ट ठरवते. आणि आम्ही त्या बरहुकूम वागतो!!
असं म्हणतात की प्रेमाचा रस्ताही पोटातून जातो!! म्हणजे आवडत्या माणसाला आपण चविष्ट पदार्थ करून घातले की तो खूष होतो. त्यामुळे प्रेम वृद्धिंगत होते.
खूप भूक लागलेली असली की डोकेही काम करत नाही, आपण हाती घेतलेले काम हे चांगल्या रीतीने करू शकत नाही. खरंच, आधी 'पोटोबा मग विठोबा' म्हणतात ते काही खोटे नाही. म्हणून महत्त्वाच्या मीटिंग्ज वगैरे नेहमी भरल्यापोटी ठेवल्या जातात, किंवा मीटिंगमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली असते.
अशी ही अन्नाची महती, सर्व मानवी जीवनाला व्यापून उरणारी. म्हणून अन्न पूर्णब्रह्म आहे.
शुभदा दीक्षित पुणे
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
अन्न हे पूर्णब्रह्म
सजीवाला जिवंत राहण्यासाठी सतत काही ना काही खाण्याची गरज असते. मग ती गरज मानवाची असू दे किंवा पशुपक्ष्यांचे असू दे किंवा वनस्पतींची असू दे. प्रत्येकाला जगण्यासाठी काहीना काहीतरी खावे प्यावे लागते. त्यालाच अन्न असे म्हणतात. अन्ना शिवाय व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. दोन दिवस वेलींना जरा आपण पाणी दिले नाही तर ते लगेच कोमेजून जातात, प्राणी निस्तेज दिसू लागतात. म्हणजे अन्न हे जिवंत राहण्यासाठी आवश्यकच असते.
मानव आपला चरितार्थ चालविण्याचे करिता काहीना काहीतरी काम व्यवसाय करत असतो. म्हणजे अन्न मिळवण्याकरता जीवाचा आटापिटा करत असतो. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजांशीवाय तो आपले जीवन व्यवस्थित जगू शकत नाही." पापी पेट का सवाल है।" असे म्हणत, आयुष्यभर कष्टत असतो." हे सर्व कशासाठी? पोटासाठी." हेच उत्तर प्रत्येक काम करणाऱ्याचा तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. आपण अन्नासाठी पूर्णपणे शेतकर्याच्या जिवावर अवलंबून असतो. म्हणून आपल्या मनात शेतकऱ्याबद्दल एक आदराची भावना असली पाहिजे.
असणाऱ्या सामाजिक विषमतेमुळे अन्न मिळण्याचे प्रमाणही कमी जास्त आहे. जो कामगार वर्ग आहे ,गरीब आहे, भिकारी आहेत त्यांना पोटभर अन्न मिळण्याची विवंचना आयुष्यभर लागून राहिलेले असते.याउलट सावकार ,मालक ,भांडवलदार वर्ग आहे त्यांना कधीही खाण्याची भ्रांत व ददात नसते. ते अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणावर करत असतात. पोट भरण्यासाठी म्हणजेच अन्न मिळवण्यासाठी अनेक लोक आपले घरदार, राज्य सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये येऊन राहतात. आज कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पोटासाठी अन्नाच्या शोधार्थ आलेले हे परराज्यातील कामगार लोक आपापल्या गावी परतण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत आणि त्यांचे किती हाल होत आहेत हे आपण पाहतोच आहोत. परवाच्या रेल्वे अपघातात रेल्वेखाली चिरडले गेलेले कामगार व त्यांच्या जवळ पडलेल्या भाकरी पाहिल्यानंतर अन्नासाठी मानवाची अवस्था कशा प्रकारचे होते हे आपल्याला दिसून येते.
वनस्पती आपले अन्न मिळवण्यासाठी जमिनीच्या खोलीमध्ये आपली मुळे पाठवून अन्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न सतत करत असतात. काही वेली या सूर्यप्रकाश मिळवण्याकरता झाडाचा आधार घेऊन वर वर जात असतात तर मोठे मोठे वृक्ष सूर्यप्रकाश मिळवण्याकरता अजून उंच उंच जात असतात. प्राणी पक्षी आपले अन्न शोधण्याकरता स्थलांतर करत असतात. बऱ्याच वेळेला रस्त्यावर फिरणारी भटकी जनावरे, पशुपक्षी आहेत ते अन्नाच्या शोधार्थ भटकत असताना बऱ्याच वेळी त्यांना आपले प्राणही गमवावे लागतात अशा वेळी आपण आपापल्या परीने अन्न दिले पाहिजे.
वृद्धाद्धाश्रम, अंध, विकलांग अशा लोकांसाठी असलेले आश्रम ज्या ठिकाणी अन्नाचे महत्त्व तिथल्या लोकांना फार असते. अशा ठिकाणी आपण वेळोवेळी जाऊन मदत केली पाहिजे. मी स्वतः आमच्या गावाजवळ असलेल्या एका वृद्धाश्रमाच्या ठिकाणी कार्यरत आहे. तिथल्या लोकांना दररोज जेवण सकाळ-संध्याकाळ देण्याकरिता किंवा त्यांच्या गरजा पुरवण्या करता आम्हाला किंवा तिथल्या संचालकांना लोकांच्या समोर खूप मागणी करावी लागते. त्या लोकांचे दोन वेळचे पोट भरण्यासाठी अन्न मिळवणे गरजेचे तेवढेच जिकीरीचे झालेले आहे.
एकूण काय अन्न हे मानवी जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. म्हणून ते आपण जपून वापरले पाहिजे. अन्नाचा योग्य तो मान राखला पाहिजे. जेवताना आपण नेहमी शांत चित्ताने समाधानाने जेवले पाहिजे. कारण जर आपण शांत चित्ताने जेवलं तर ते अन्न आपल्या मध्ये सात्विक गुण निर्माण करतं. शाकाहार हा उत्तम आहार आहे. मानवासाठी बनवलेला आहे. जनावरांचा साठी मांसाहार हा बनवलेला आहे त्यामुळे शक्यतो मानवाने त्याचा आपल्या आहारात समावेश करू नये .आता आपणचं ठरवा आपण कोणते अन्न घेणार आहोत.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
नासाडी थांबूयात पूर्णब्रह्माची
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न. माणूस आपल्या व्यावहारिक जीवनातील प्रत्येक गोष्ट केवळ आणि केवळ पोटासाठी करत असतो. अन्न म्हणजे ऊर्जा ,अन्न म्हणजे जीवन जगण्याची खरी वाट....!अन्न म्हणजेच प्रत्येक सजीवाचा खरा श्वास...!
म्हणूनच कदाचित अन्नाला 'पूर्णब्रम्ह ' म्हटले जाते. 'भुकेल्याची भूक जाणणे,तान्हेल्याची तहान जाणणे'ही तर महाराष्ट्राची परंपराच!!याच अनुषंगाने आजच्या या कठीण प्रसंगातही अन्न दानाचे पवित्र कार्य करताना दिसतात.विविध कार्य प्रसंगी तृप्तीचे ढेकर देणाऱ्यांना अन्नदान करण्यापेक्षा नैसर्गिक प्रकोपाच्या वेळी तसेच कोरोना सारख्या संकटाच्या वेळी गरजूंना अन्नदानाचे काम करणाऱ्या व्यक्तींना खरोखरच सलाम करायला हवा.
अन्न हेच पूर्णब्रम्ह मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत विविध कार्यक्रमा प्रसंगी असणाऱ्या अन्न पदार्थांची रेलचेल बघितली असं वाटतं की नक्की भारत हा अति संपन्न देश असावा.म्हणूनच भारतातील दररोज विविध कार्यक्रमात वाया जाणारे अन्न बघून व एकीकडे अन्नासाठी मोहताज असणारी लोकं बघून एका विचारवंताने 'भारत हा सर्वात श्रीमंत व सर्वात गरीब देश आहे'आपण प्रत्येकानेच स्वतःचे मूल्यांकन केल्यास आपण दररोज किती अन्न वाया घालवतो.... आणि त्यात किती लोकांचे पोट भरले असते हे लक्षात येईल.
आज आपल्या देशात पिकवणारा उपाशी तर विकणारा आणि विकत घेणारा तुपाशी अशी स्थिती दिसत आहे. जो शेतकरी धान्याचे भरलेले पोते उचलू शकतो त्याच्या घरी धान्याची रिकामी पोतीही दिसत नाहीत व ज्याला पोते उचलता येत नाही किंबहुना उचलायची लाज वाटते त्याच्या घरी मात्र अन्न धान्यांनी भरलेली पोतीच्या पोती दिसतील...!!कितीही विसंगती दिसते आपल्या देशात!! ह्या विसंगतीची कारणे माझ्या सह सर्वच सुजाण नागरिकांना माहीत आहेतच.तरी सुद्धा 'कळतंय पण वळत नाही अशी काहीशी स्थिती झालेली आहे. आज जेव्हा जेव्हा गावातील हिरवीगार शेतहोल बघायला मिळते तेव्हा पूर्वी दूरदर्शनवर लागणाऱ्या 'आमची माती आमची माणसं'या कार्यक्रमातील पुढील गीताच्या ओळी तोंडावर आल्याशिवाय राहत नाहीत.
ही काळी आई धनधान्य देई
जोडीते मनाची नाती
आमची माती आमची माणसं
यातील भावार्थ लक्षात घेतल्यास मनाच्या नात्यांची गुंफण करण्याची भावना कुठेतरी लोप पावत चालली असल्याचं दिसत आहे. अन्नाची गरज भागवणारा , 'जगाचा पोशिंदाच आज संकटात आहे.अन्न ही गरज आहे कोणत्याही सजीवाला ती चुकलेली नाही परंतु त्याची गरजे पेक्षा जास्त साठवणून करणारा फक्त माणूसच आहे. इतर कोणताही प्राणी आवश्यकते पेक्षा जास्त साठवणूक करताना दिसत नाही.
'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..'असा संदेश देणारी आपली संस्कृती या संस्कृतीतील वंचित घटकावरच आज अन्नासाठी मोहताज व्हायची वेळ येते ...!!खरोखरच दुर्दैवी बाब आहे.एकीकडे पोटभर अन्न मिळविण्यासाठी धडपड तर दुसरीकडे चैनखोर खाणे..!!,ज्यात खाणं कमी आणि डामडौल जास्त अशी परिस्थिती आपल्या उदात्त भारतीय संस्कृतीसाठी नक्कीच हितावाह नाही. शेवटी 'अन्न हे पूर्णब्रम्ह' मानून जिभेचे चोचले पुरविण्यापेक्षा सर्वांच्याच पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नाची नासाडी थांबवूयात!!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
कोरोना व्हायरस;अन्नाची नासाडी नको
कोरोना व्हायरस आला.त्याची दहशत एवढी की देशाला लाकडाऊन करावं लागलं.त्या लाकडाऊन मध्ये सर्वच अडकले.लोकांचे कामधंदे बंद झाले.त्यात जे सधन होते.त्यांची उपासमार झाली नाही.पण जे सधन नव्हते.त्यांची उपासमार व्हायला लागली.मग काय कोरोनाच्या निमित्ताने अन्नछत्र सुरु झालं जागोजागी.
लोकांची उपासमार होवू नये म्हणून काही सामाजिक संस्थांनी अन्नछत्र उघडली.लोकांनी आपली नाव लिहिली आणि अन्न मिळवायला लागली.त्यातच काही महाभाग असेही दिसले की त्यांनी दोन तीन ठिकाणी नाव नोंदवली.मग काय पाहता त्यांना दोन तीन ठिकाणी अन्न मिळू लागले.ते एवढं मिळू लागलं.कि ते खराब झाल्यावर रस्त्यावर दिसू लागले.
अन्नाला पुर्णब्रम्ह म्हणतात.अन्नाची नासाडी करु नये म्हणतात.माणूस मेहनत करतो,ते अन्नासाठी.अन्नासाठी खुन मारामारी,संघर्ष.अन्नासाठी पगार वाढावा म्हणून कारखान्यात संघर्ष.हवा तेव्हा आणि हवा तेवढा संघर्ष.इथेही पोटासाठीच संघर्ष.मग असे असतांना जेवढं आपल्या पोटाला लागतं.तेवढंच घ्यावं लोकांनी.पण मला किती हवंय याचा अंदाज न करणारी माणसं......मी उपाशी राहायला नको,अशी मानणारी माणसं केवळ फुकट भेटते म्हणून ही अन्नाची नासाडी करतात हे बरोबर नाही.
जेव्हा दुष्काळी परिस्थिती उदभवली होती,तेव्हा येथील माणसाला उपासाची वेळ आली होती.लोकांनी त्यावेळी लालगुंजी सुद्धा खाल्ली.एवढंच नाही तर आंबाडीच्या भाजीवर व आंबील बनवून त्या आंबलीवर दिवसं काढले.पुर्वी तर ऋषीमुनी झाडाची पानं खावून,कंदमुळं खावून जीवन काढत.पण आता तो काळ राहिलेला नाही.आताची माणसं अशी कंदमुळावर जीवन काढणार नाही.त्यांना अन्नच हवं.
अन्न माणसासाठी एवढं महत्वाचं आहे कि या अन्नासाठी एके काळी अस्पृश्य व आदिवासी समाजाला सुग्रास अन्न मिळत नव्हतं.त्यावेळी लोकांच्या उष्ट्या पत्रावळी चाटायचा काळ होता.ते चाटून किंवा दुस-या दिवशी कांबरकी मागून लोकं आपले पोट भरत.नव्हे तर सुग्रास अन्नाची इच्छा पुर्ण करुन घेत.
आता काळ बदलला.चांगलं मिळायला लागलं.त्यातच काही ठिकाणी क्वारंनटाईन असलेल्या भागात अळ्या निघाल्या म्हणून तक्रार करायला लोकं पुढे आलेत.जिथे अन्न फुकटात मिळत असतांना तिथे एखादी अळी निघाली असेलही कदाचित.तरी लोकं एवढे मिजासखोर झाले आहेत की त्यांना घरी निघालेली अळी सहन होते.पण या अन्नछत्रच्या ठिकाणी निघालेली अळीही सहन होत नाही.कारण ही मंडळी अन्नाला पुर्णब्रम्हाचं स्थानच देत नाही.हे अन्न त्यांच्यासाठी पुर्णब्रम्ह नाही.ते सहज मिळणारी वस्तू आहे.म्हणून अन्नाची एवढी नासाडी चालली आहे.
आजच्या काळात लोकं अन्न एवढं बनवतात की ते सकाळी गाईला किंवा कुत्र्याला टाकायची पाळी येते.म्हणतात त्या जनावरालाही कोण देईल? मग द्यायचेच आहे तर त्याला ताजं अन्न द्या.जेणेकरुन त्यांचं पोट बिघडणार नाही.तुमचे शिळे अन्न खावून त्यांची पोटं बिघडतात एवढंच नाही तर तुमच्या प्लास्टिक पन्न्या खावून बिचारे मरणही पावतात. तेव्हा विचार करुन अन्नाचा वापर करा.जेवढं तुमच्या पोटाला लागते,तेवढंच आणा अन्नछत्रातून.जास्तीचा आणून अन्नदेवतेचा अपमान करु नका.गाय आणि कुत्र्याला अन्न कोण देईल हे म्हणणे तुमचे बरोबर आहे.पण गाईचे अन्न गवत.त्यांना हवं तर गवत द्या.कुत्र्याचंही ते अन्न नाही.यानं अन्नदेवता नाराज होते.हे लक्षात घ्या.
एक उदाहरण देतो.एका दाम्पत्याची गोष्ट आहे.तिचा पती कारखान्यात नोकरीवर होता.ती रोज जास्त अन्न बनवायची आणि सकाळी उठून कच-यामध्ये टाकायची.शिळं खावून पोट बिघडू नये म्हणून.त्या अन्नावर डुकरं,कुत्रे आणि कधीकधी गाई ताव मारायच्या.अन्नदेवतेचा अपमान व्हायचा.मग परीस्थिती बिघडली.कारखाना बंद झाला.पतीला कारखान्याची सवय होती.त्यांना आता दुसरं काम जमेना,वेळेवर पैसाही नव्हता की धंदा लावतील.तेव्हा त्या कुटूंबावर काही काळासाठी नक्कीच उपासमारीची पाळी आली होती.
सध्या कोरोना ठाण मांडून बसला आहे.या कोरोनाची लाट वाढतच चालली आहे.लाकडाऊन उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत.बरेच दिवस लाकडाऊन चालेल अशी परीस्थिती आहे.तेव्हा हे लक्षात घ्या की तुम्ही जे अन्न फेकता त्यानं अजून एखाद्या गरीब माणसाचे पोट भरेल.तेव्हा ते अन्न त्याच्याही पोटात जावू देण्याचा विचार करा.नाहीतर हीच अन्नदेवता तुमच्यावर केव्हा कोपेल हे काही सांगता येत नाही.म्हणून अन्न फेकतांना जरा सावधान होवून फेका.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
21 नंबर
लेख
अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान
भारतीय संस्कृतीत अनेक धार्मिक रूढी,परंपरा आजही सुरूच आहे.या रूढी परंपरा माणुसकीचे दर्शन घडविते.एक माणूस दुसऱ्या माणसाची माणुसकीची भावना जोपासतो. एका माणसाचा दुसऱ्याविषयी प्रेम,जिव्हाळा,आपुलकीची भावना जोपासली जाते.यातूनच अनेकांना मदत करण्याची भावना आज प्रत्येक भारतीयाकडे आहे.भुकेल्याला अन्न देणे,तहानलेल्याला पाणी देणे व वाटसरूला रस्ता दाखवणे ही पुण्यकर्माचे लक्षण समजले जाते.आजही प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने दानधर्म करत असतो.धर्म केल्याने आयुष्यात काहीच कमी पडत नाही.ही भावना पुर्वी पासुन रुढ आहे.जी वस्तू आपल्याला मर्यादेपेक्षा जास्त होते.किंवा मर्यादेपेक्षा जास्त आपल्याजवळ आहे.तिचा वापर झाला नाही.तर ती खराब होते.त्यामुळे ती इतरांना दिली पाहिजे. दानाचे अनेक प्रकार आहेत.ज्ञानदान,मतदान,रक्तदान व अन्नदान होय.अशा अनेक दानाच्या प्रकारामध्ये धर्म हे सांगतो.अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे.जो अन्नदान करतो तो पुण्यकर्म कमावतो." अन्नदाता सुखी भव " असे म्हटले जाते.अन्नदान करतो तो मनुष्य जीवनात सुखी राहतो. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान यासाठी समजले जाते. अन्न,वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.यातील पहिली गरज अन्न ही आहे.शरीर हे अन्नावर अवलंबून आहे. माणसाची वाढ ही अन्नावर अवलंबून आहे.अन्न हे कार्य करण्याची ऊर्जा वाढविते.अन्न पोटात नसेल तर कार्य करण्याची गती कमी होते.संपूर्ण शरीराचे कार्य हे अन्नावर अवलंबून असते.अन्न मूलभूत पहिली गरज आहे.म्हणून याला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते.अन्नदान हे मुळात भुकेल्या माणसांसाठी केले जावे.जो उपाशी आहे त्याला अन्नाची खरी गरज आहे.अशा लोकांना एक वेळचे जेवण दिले.तर आयुष्यात त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.भारत हा कृषीप्रधान देश आहे.शेतकरी हा येथील अन्नधान्याचा जनक आहे.तो दिवसरात्र उन्हा-तानात राहून अन्नधान्य पिकवितो.तेव्हा प्रत्येकाच्या पोटात अन्नाचा घास जातो.या कृषिप्रधान देशात तरीसुद्धा अनेक लोक उपाशीपोटी रात्री झोपी जातात.अनेक बालके कुपोषणाने ग्रस्त आहे.ही खरी शोकांतिका आहे.आज अनेकांना एक वेळचे जेवण मिळत नाही.अनेक मजुरांना दिवसभर कष्ट करावे लागते. तेव्हा एक वेळचे पोटभर अन्न खायला मिळते.जेव्हा जेव्हा देशावर नैसर्गिक संकटे येतात.महापूर,दुष्काळ,भूकंप अशा वेळेस अन्नदान केले पाहिजे.पोटभर जेवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.परंतु ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि प्राप्त परीस्थितीनुसार उपासमार करावी लागते.यासाठी अन्नदान होणे गरजेचे आहे.मनुष्य जगला तर इतर कार्य करत राहील.जीवनात आपल्याकडे जे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो.अन्नदान काळाची गरज आहे.हे महत्त्व जाणून घेऊन अन्नदान केले पाहिजे.वेळ-काळ लक्षात घेऊन अन्नदान केले पाहिजे.अन्नदान करताना कुठलेही मतभेद करू नये.जात-पात,धर्म,परिस्थती याला महत्त्व न देता माणूस हा देव समजून अन्नदान केले पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान ठरते.त्याचा आशीर्वाद एक मनुष्य रूपाने दुसऱ्या मनुष्याला मिळत असतो.चला अन्नदान करूया.अनेकांच्या भुकेच्या वेदना थांबूया.
राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
*अन्न हे पूर्ण ब्रम्ह*
भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते. मात्र दैनंदिन जीवनात अापण अन्नाला खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म मानताे का ? जिथे अन्नाला ब्रम्ह स्वरुप मानले जाते, देवाला अर्पण करून मग प्रसाद रुपे अन्न ग्रहण करण्याची संस्कृती आहे . ‘हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे, ’अशी प्रार्थना करून मग भोजनास सुरुवात केली जाते, मात्र दुसरीकडे अन्नाची नासाडी केली जात आहे. अन्नाला पूर्णब्रह्म मानणारा आपला देश अन्न वाया घालवणाऱ्यांमध्ये सातव्या क्रमांकाचा देश ठरला अाहे. ते ही जेव्हा अजून आपल्या देशातील जनतेची ऊपासमार होतांना ! जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत ६७ वा आहे. अाजही सुमारे २० काेटी लाेक भुकेल्यापाेटी राहतात, हे निश्चितच भूषणावह नव्हे. ह्या पार्श्वभूमी वर अन्नाची नासाडी ही ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. निदान प्रत्येकानेच कुटुंब पातळीवर काही वेगळे प्रयत्न केले तर निश्चितच अन्न सत्कारणी लागेल
अन्नाची नासाडी फक्त भारतात च होत नाही तर जगभरात होत आहे. ‘फूड अँड अॅग्रिकल्चर अाॅर्गनायझेशन’ची अाकडेवारी पाहता जगभरात १.३ अब्ज टन अन्न वाया जाते. याचा अर्थ असा की, जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. ‘आज वेगवेगळ्या देशात उपासमारीने मरणार्ऱ्याची संख्या प्रचंड मोठी आहे. ह्या पार्श्वभूमी वर अन्नाचा एक कण सुद्धा वाया घालवणे पाप आहे. ,असे म्हणतात की *देव कुणाला ही उपाशी झोपवत नाही* .हे अगदी खरे आहे उत्पादनाची आकडेवारी पाहता जगातील एकही प्राणी उपाशी राहु नये पण *देव देतो आणि कर्म नेते* अशी गत झाली आहे. आपल्या इथे लग्न आणि इतर संमारंभांत अन्न माेठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे लक्षात आले अाहे. त्या करीता कित्येक समाज संस्था पुढे आल्या आहेत ,त्यांना फोन केल्यावर ते अन्न घेऊन जातात आणि अनेक गरजू आणि भुकेल्यांना वाटतात. पण ही अगदी छोटी सुरुवात आहे.
एक खूप मोठी आशादायक सुरुवात झाली आहे . न्यूयाॅर्कमधील भारतीय वंशाच्या अनुज झुनझुनवाला, मार्गारेट टंग अाणि जेसाॅन चेन या संशाेधकांनी अन्नाची नासाडी राेखण्यास अाणि भुकेल्यांना अन्न मिळवून देण्यात मदत करणारे अॅप विकसित केले अाहे.दरवर्षी १६५ अब्जांची हाेणारी अन्नाची नासाडी राेखण्यात हे अॅप मदत करेल, असा विश्वास अमेरिकेच्या नैसर्गिक साधन संरक्षण परिषदेने व्यक्त केला आहे.
जागतिकीकरण औद्योगिकीकरण नवीन तंत्रज्ञानावर पर्यावरणाच्या हानी खापर फोडणारे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू अन्नाची नासाडी आहे. करतो हे आपल्या लक्षातच येत नाही . शिजवलेले तांदूळ अर्थात ज्याला अापण भात म्हणताे त्यामुळे तर पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान हाेते. फेकून दिलेल्या अन्नातून ३.३ अब्ज टन ग्रीन हाऊस गॅसची निर्मिती हाेते. आम्ही जर अन्नाची नासाडी राेखण्यात यशस्वी झालो तर पर्यावरणाचा समतोल आपसुक राखला जाईल.
अन्नाची नासाडी पूर्णपणे रोखणे जरी शक्य नसले , तरी नियंत्रणात अाणणे तितके अवघड नाही हे ही तेवढेच खरे आहे . सेंट्रल इन्स्टिट्यूट अाॅफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’च्या अहवालात अन्नधान्याच्या उत्पादनात सातत्याने हाेत असलेली घट अाणि वाढती दरवाढ लक्षात घेता ही नासाडी थांबवण्यासाठी अन्न अाणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला पुढाकार, केंद्र सरकार उभी करीत असलेली राष्ट्रीय चळवळ याशिवाय उल्लेखनीय म्हणजे शालेय अभ्यासक्रमात हाेत असलेला समावेश या बाबी दिलासादायक म्हणाव्यात.
अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण असला तरी उत्पादित मालाची नासाडी परवडणारी नाही. भाज्या, फळांच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर अाहे. मात्र शीतगृहे, वातानुकूलित वाहन सुविधा अशा पायाभूत बाबींचा अभाव त्यांच्या नासाडीला कारणीभूत ठरताे. ‘इमर्सन क्लायमेट टेक्नाॅलाॅजीज इंडिया’च्या अहवालानुसार दरवर्षी भारतात ४४ हजार काेटी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी हाेते. त्यात साधारणपणे १३ हजार ३०० काेटींच्या फळे, भाज्यांचा समावेश असताे. महाराष्ट्राचा विचार करता कांदा, टाेमॅटाे, फळे, भाज्यांचे विशेषत: मेथी, काेथिंबीर, चुका, पालक यांचे माेठ्या प्रमाणावर उत्पादन हाेते. मात्र त्यासाठी उपयुक्त, पुरेशी साठवण व्यवस्था अाणि क्षमता नसल्यामुळे मिळेल त्या दरात शेतीमाल विकण्याची किंवा ताे फेकून देण्याची वेळ येते. काेकणातील अांबा, काजू, जांभूळ, रातांबे यावरील प्रक्रिया उद्याेगांमुळे उत्पादकांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली अाहे. मराठवाडा, खान्देश, विशेषत: प. विदर्भात असे प्रयाेग करण्यास भरपूर वाव अाहे. , हे लक्षात घेऊन सरकारनेदेखील पुढील पावले टाकायला हवीत.
अन्नाची नासाडी राेखण्याचाच एक भाग म्हणून हाॅटेल अाणि रेस्टाॅरंटमधील अन्नाची नासाडी राेखण्याचे प्रयत्न हाेत अाहेत. जागतिकीकरणानंतर गेल्या २२ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत प्रगती करीत विकासाेन्मुख देश म्हणून ठसा उमटवला. मात्र सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या व्यक्तीला अाजच्या महागाईच्या परिस्थितीत अगदीच सामान्यपणे जगणेदेखील कठीण हाेऊन बसले अाहे. कदाचित या बाबीची पुरेशी जाणीव झाल्यामुळेच केंद्र सरकारने अन्न सुरक्षा याेजना प्रत्यक्ष कार्यवाहीत अाणली, ज्याचा लाभ सुमारे ६७ टक्के लाेकांना हाेऊ शकेल. अन्नधान्याची नासाडी राेखण्यासाठीच ;कदिचित अापल्या संस्कृतीने अन्नास *पूर्णब्रह्म*या अर्थाने संबाेधित केले. मात्र त्याकडे कानाडाेळा केला जाताे
अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वीज, पाणी, खते, कीटकनाशके, इंधन, मनुष्यबळ अशा कित्येक गाेष्टींचा वापर केला जाताे, अन्नाची नासाडी केल्यामुळे ह्या सर्व नैसर्गिक स्राेतांचीदेखील नासाडी हाेते, हे आपल्याला खिजगिणतीतच नाही. अप्रत्यक्षपणे ही नासाडी सुद्धा अापणच करताे. त्यासाठीच तर अन्नाची नासाडी ही राष्ट्रीय हानी ठरवणे गरजेचे अाहे.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
. .अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.आज अन्न साठी सर्व लोक मेहनत करत आहेत.काही लोक अन्नाचा काहीच विचार करत नाही. अन्नाचे महत्त्व ज्यालाच कळते .जो मेहनत करूनही उपाशी पोटी झोपत आहे.त्याला अन्नाचे महत्त्व समजेल. त्याच बरोबर ज्यांचे जन्म १९८० पूर्वी झाले असेल त्याला अन्नाचे महत्त्व अताही जाणवते कारण त्या वेळी अन्नाची अतोनात टंचाई भासत असतं. कोणी खायला अन्न देतो म्हणून सांगितले तर त्या वेळी दिवस भर काम करत असत.भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी माणूस कुठल्या कुठे कामासाठी जातो आणि वेळ प्रसंगी आपले जीव ही गमावून बसतो .पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोकांनी देह सुद्धा अर्पण केला आहे. परंतु अलीकडच्या काळात अन्नाचा खूप मोठ्या प्रमाणात नासाड सुरू आहे.लग्न कार्य,मुंज,अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणत अन्नाची नासाडी होते. अनेक गोर गरिबांचे पोट भरेल एवढे अन्न वाया घालवतात.बागेचे जेवण ही अलीकडच्या काळातील एक फॅशन झाली आहे .पण या मध्ये अन्नाचा खूप नासाडी होते .लोक लागलं त्या पेक्षा अधिक जास्त घेतात आणि फेकून देतात.पोटभरून खातात उंच लांब ढेकर ही देतात आणि चांगल्या अन्नाला नावही ठेऊन जातात .तोच परत भाव आता कोरॉना महामारी मध्ये उपासमारी चालू आहे. खरे अन्नाचे मोल काय आहे. हे आज प्रत्येक लोक पाहत आहे.कालच अन्नासाठी भटकंती करणारणाऱ्या औरंगाबाद येथे रेल्वे रुळावर झोपलेल्या निष्पाप,निष्कलंक ,गरीब १६महान आत्म्याची आपले जीव गमावला. लोक अन्नासाठी आता भटकत आहे .कित्येक लोकांना अन्न मिळाले नाही .आतापर्यंत आपण एवढी मोठी अन्नाची नासाडी केली याचाच प्रादुर्भाव आता सामान्य जनतेला भोगावा लागत आहे.म्हणून प्रत्येक व्यक्तीने माणसाला अन्न म्हणून ईश्वराने दिलेली एक अनमोल देणगी आहे. याचा विचार करून अन्नाची नासाडी होनारणाही.व प्रत्येक जीवाचे पोट भरले पाहिजे .अशी प्रार्थना करूनच जेवण करावे .असे केल्यास तुम्हाला कधीच कमी पडणार नाही.आपण सर्वांनी लहान मुलांना सुधा अन्नाचे महत्त्व समजावून सांगावे व आपणही स्वीकार करावा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना वर्ग २री ची भाकरीची गोष्ट संमजाऊन सांगावी म्हणजे बालमनावर अन्नाचे महत्त्व रुजेल .श्रीमंताच्या मुलांना गहू ,ज्वारी कोण पिकवतो याचे उत्तर माहीत नाही .तो सरळ सांगतो दुकानदार पिकवतो .तर असे ६०/ मुले आहेत तर अन्नाचे महत्व हे लोक काय जानू शकतील . अन्नाचे महत्व विचारा एखाद्या शेतकऱ्याच्या लेकाला तो भाकरीचे मोल सांगताना गाहीवरल्या शिवाय राहणार नाही .कारण त्या भाकरीच्या प्रत्येक कणात त्या मुलाच्या बापाचा घामाचा कान आहे. म्हणून आपण लहान पणापासून मुलांना अन्नाचे महत्त्व सांगितल्यास त्याला मोल कळेल व वेळ पडल्यास अन्न मिळवण्यासाठी समर्थ पण होईल .आणि अन्नाचे महत्व या विषयावर दुसरी ते दहावी पर्यंत अभ्यासक्रमात विस्तरा नुसार एक पाठ सुध्धा असायला हवा .कारण पुढील काळात पैसा भरपूर येईल पण अन्न महाग होईल.कारण लोकसंख्या वाढत आहे.पण शेती आहे त्या पेक्षा कमी होत चालली आहे. शहराजवळची शेकडो एकर जमीन दर वर्षी लेआऊट मध्ये जाऊन कितीतरी लोक भूमी हिन होत आहेत. याची जाण ठेऊन प्रत्येकाने अन्नाचे महत्त्व जाणायला हवे.ही पुढील काळाची गरज आहे .समोरच्या पिढीला प्रत्येक गोष्टीत समर्थ बनवणे हे आजच्या पिढीचे काम आहे.कारण या पिढी ने सुरुवातीची उपासमारी पहिली व कोरोनाची उपासमारी अनुभवली म्हणून अन्नाचे महत्त्व अधिक जान आहे .................,......राब राब राबतो या अर्धा चंद्रा कोर साठी शेवटी हातात काहीच पडत नाही शेवटी जीव गमावला या अर्ध चंद्र कोरासाठी .....या म्हणी प्रमाणे या पृथ्वीवर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ."एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ .".
जीवन खसावत . भंडारा.
9545246027
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
विषय - अन्न
शीर्षक - भ्रांत उद्याच्या पोटाची
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
हजारो किलोमीटरचे अंतर मागे टाकून माणसे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावावरून शहरात येतात नी शहराचाच हिस्सा बनतात. माणूस आजचा विचार करता करता भविष्याचा विचार करतो. 'आज' आपल्या हातात असतो, परंतु भविष्यकाळ सुकर जावा म्हणून ऊर फाटेस्तोवर दिन-रात काम करतो नि आजचे खाऊन उरलेले उद्यासाठी राखून ठेवतो. त्यातूनच बँकांचा जन्म झाला. बुद्धिवादी मानव नेहमी चाकोरीबाहेरचे विचार करतो.जंगलचा राजा सिंहदेखील पोट भरले असेल तर शिकारीकडे ढुंकूनही पाहत नाही. परंतु मानव पुढच्या सात पिढ्या बसून खातील याचाच विचार करत राहतो.
अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु मानवाच्या प्रचंड असते त्यासाठी एवढी यातायात चालू असते. ती भूक भागवण्यासाठी कष्टासोबत काळंबेरं करण्याचा त्याचा कल असतो. जरी आपण आपले गाव सोडून शहरातआलो तरी मातीशी असलेली नाळ तुटत नाही. निवृत्तीनंतर शांत जीवन जगण्यासाठी मनुष्य गावात जाऊन राहतो. त्या तयारीसाठी आयुष्यभर पैशाच्या मागे लागलेला असतो. हे खरे आहे की ताटातला एक घास दुसऱ्याला द्यावा किंवा अन्नदान हेच श्रेष्ठदान. तसेच अन्न वाया घालवू नये, टाकू नये. कारण देशात दहा टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते, तर उद्याचे जीवन त्यांच्या हातात असते. त्यामुळे अन्नाचा अपव्यय होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे.
हल्ली लग्न किंवा तत्सम समारंभात स्टेटस जपण्यासाठी अनेक अन्नपदार्थ ठेवले जातात. पंगतीत वाढले जातात. लोकही विचार न करता थप्पी लावून ताटे भरतात. परंतु त्यांना पोटाचा अंदाज राहत नाही नि उरलेले जेवण कचराडब्यात टाकले जाते. अन्नाची नासधूस करणे हे खूप मोठे पाप आहे. कारण आपण त्यातील दोन गरिबांना उपासमारीने मारत असतो. त्यामुळे" मी धनवान आहे, माझ्या बापाच्या पैशाचे खातो" अशी अहंकाराची भाषा न वापरता अन्नाचा योग्य विनियोग केला तर देशातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होईल. कारण दिवस सांगून येत नाहीत. आज दुसऱ्यावर असणारी वेळ पुढे कधी आपल्यावरही येऊ शकते हे नेहमी ध्यानात ठेवायला हवे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे समजून तसेच वागायला हवे.
माणसाची क्षुधाशांती होणे गरजेचे असते. तसेच अन्नदान करणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या वाट्यातला थोडा हिस्सा गरिबाला दान केल्यास मनःशांतीही मिळते.
सौ.भारती सावंत मुंबई
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
4)!!! अन्न !!!
सृष्टी ही सकल सजीव आणि निर्जीव साधन सामग्रीने भरलेली आहे . जे सजीव आहेत आणि जागा बिलकूल सोडतच नाहीत त्याला , त्यांना आपण वनस्पती म्हणतो आहे कि नाही .
आता जीवन जीवंत ठेवण्यासाठी त्याना ही अन्न अवश्यक आहे , आणि ते अन्न मग त्याना कोण देते तर त्याचं ही उत्तर आपल्याकडे आहेच आहे . ते स्वत: स्वत: चे अन्न तयार करतात कोणालाही त्रास वगैरे न देता ते आपले सदोदित त्याच प्रक्रियेत राहतात किंवा असतात त्यात काही बाधा झाली तर जीवन सोडून देतात . म्हणजे ते जीवन व्यतीत करण्यासाठी जगातात . अर्थात वृक्षवेली स्वत; जगतात आणि दुसर्याला जगवितात स्वत:चे अन्न स्वत बनवितात आणि दुसर्याला देतात .
दुसर्याला मग काय देतात ? तर हा प्रश्न म्हणजेच जे जीव वनस्पती नाहीत पण सजीव आहेत असे सर्व सृष्टीतील जीव मग ते अंडज असोत कि जरायूज किंवा किटकादी सर्व कोणतेही असोत या सर्वांचा पालण पोषण करण्याचा भाग तेच आहेत .
अन्न हे प्रत्येक जीवाला अवश्यक असणारा घटक आहे .मग मानव असो कि मानवेत्तर प्राणी असो कि पक्षी असो .फक्त फरक आहे.
माणूस अन्न खातो ते विविध प्रकारे म्हणजे खाण्यात विविधता आहे . त्यात आला प्रश्न शाकाहारी का मांसाहारी हा नाही बरं . हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे मला या वर बोलायचं नाही . पण शास्ञ शाकाहारी अन्नाला उत्तम आहार असं म्हणतंय मी म्हणत नाही असो. आपला मुद्दा दुसरीकडे जाईल .
गीता सांगते स्वत: तयार केलेले अन्न खावे. हा मुद्दा जरा वेगळा वाटेल आणि तो सहज आज पटकन पटणार नाही. पण बघा पक्षी आणि प्राणी (फार खोलात जात नाही ) स्वत: चे अन्न स्वत: बनवत जरी नसले तरी शोधतात आणतात झटतात. मुंगी बघा चिमणी बघा किंवा एखादा व्याघ्र पहा स्वत: तजबिज करतात.
अन्नाला शास्ञात परब्रह्म म्हटलं गेलं आणि ते खरे आहे . कारण बाकी कितीही गप्पा मारल्या तरी उदकाचा जठराग्णी प्रज्वलित झाला कि त्या ला अन्न लागतेच मग तो शांत होण्यासाठी.
अन्न..अन्न या अन्नाच्या पाठीमागे सर्व जग धावतोय जो तो अन्नासाठी अहोरात्र झटतो य , जपी, तपी , सन्यासी, विलाशी शहाणा असो वेडा असो सर्व जन यासाठी च वनवन करतात .
अन्न हे पोटाची भूक भागविण्यासाठी, शरीराची वृद्धी करण्यासाठी अवश्यक बाब आहे. एका ठिकाणी एक कवी म्हणतात " यह पेट बडा बाका, सबको लगा दिया धोका " !म्हणजे या अन्नाशिवाय कोणी जगू शकत नाही .
जीवन जगत असताना धावपळीचे जीवन असताना प्रपंच वृद्धी करताना माणसाला बर्याच गोष्टीचा मुकाबला करावा लागतो. त्यातून कुटुंब पालणपोषण करताना अन्न अतिशय गरजेचं असतं आज जो तो देश, जो तो नागरीक अन्न धान्यतेत संपन्न झालेला बहुतेक आहे. सध्या अन्न तुटवड्याचे दिवस नक्कीच नाहीत.
तरीही काही दुर्लक्षित, उपेक्षित अन्न-अन्न करीत असतील अशाना अन्न देणं हे महत्त्वाचे असते. कारण अन्न दान ही अशी बाब असते कि ती ची बरोबरी कशातच होताना दिसत नाही
कधी कधी जगण्यासाठी खावे , खाण्यासाठी जगू नये ही युक्ती प्रचलित झाली पाहीजे , अन्न संग्रह न करता शिवाय अन्न अपव्यय टाकून अन्न सुरक्षा केली पाहिजे. यांत जास्त धन्यता आहे.
अन्न या विषयावर चर्चा करत असताना सजीवांसाठी अवश्यक असलेलं, ठरवून दिलेलं, लावलेलं अन्न व्यवस्थित सेवन केले तर कदाचित खाणाराचं आरोग्य निश्चित चांगले राहील म्हणून अन्न साखळी तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अन्न हे परब्रह्म आहे कि नाही देव जाणो पण ते प्रत्येक जीवाला मिळो, कोणी अन्न अन्न म्हणता अन्नापासून वंचित न राहो हीच पुरोगामी राष्ट्राची पुरोगामी समाज रचनेची भक्कम अशी ताकद जगात नांदो हीच अपेक्षा ! सर्वे सुखी भवि !
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
" योग्य अन्न : सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली " ( 14 )
मित्रांनो , या पृथ्वीवर तुम्हांला शोधूनही असा जीव सापडणार नाही की ज्याला अन्नाची गरज नाही . कारण प्रत्येक जीव हा या अन्नामुळेच तर आपले अस्तित्व सुरक्षित व सुरळीत ठेऊ शकतो . प्रत्येक जीव आपल्या जीवनात अन्नास श्वासासम महत्त्व देत असतो . कारण हे अन्नच ह्या जीवाचे आयुष्य वाढीस कारणीभूत असतो ना ... हे एक निर्विवादित सत्य आहे जे कुणीही नाकारू शकत नाही .... म्हणून अन्न ही एक आरोग्याची गरज आहे ....
आपल्या भारतातील प्राचीन परंपरानी ह्या अन्नाला देवाचे स्थान दिलेले आहे . " अन्न हे पूर्ण ब्रह्म " असे म्हटले आहे . मित्रांनो , अजूनही देव कुणीही पाहिलेला नाही . पण एक मानसिक धारणा या देवाची काही धार्मिक ग्रंथातून मानवी मनःपटलांवर अशी दृढ झालेली आहे की ती काही केल्या पुसल्या जाऊ शकत नाही ... या देवाच्या श्रद्धेमुळेच तर मानव हा नैतिक व सुसंस्कृत बनल्या जातो , हे सत्य आपण टाळू शकत नाही .... तात्पर्य देवाची उपमा देऊन या अन्नास पवित्र व अलौकिक मानल्या जाते ....
" भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली ! " ह्या काव्यपंक्तीतून सहज उमजते की अन्न हे मानवाच्या जन्मापासून प्रारंभ होऊन त्याच्या अंतापर्यंत त्याची गरज भागवीत असते . कारण आपण पाहतो की गर्भात वाढणारा भृणही आईच्या वारेतूनच आपली भूक मिटवून वाढत असतो ना ! आणि पोटातून बाहेर आल्यावरही आपल्या इवल्याशा ओठांनी अमृततुल्य पान्हा प्राशून कसा संतृप्त होतो हे आपण पाहिले आहेच ना ... अन्न हे सर्व प्राणीमात्रानुसार भिन्न स्वरूपात सेवण केल्या जाते ... पाखरांना फळे , धान्ये , किटक आवडतात . तर गाय , म्हैस , शेळी आदींना हिरवागार चारा आवडतो ... काही कुत्री , मांजरीसह वाघ , सिंह आदी प्राणी मांसभक्षी असतात ... मानव हा देखील अन्नग्रहणावरून " शाकाहारी व मांसाहारी " अशा ठरवला जातो . " शाकाहार म्हणजे शेतातील येणाऱ्या पिकांवर , फळे , भाज्या आदींचा आहारात वापर करणे होय ! " तर " मांसाहार म्हणजे शेळी , कोंबड्या , मासे , खेकडे , रानडुकरे , लावरं , ससे , पारवे आदींचा अन्नात समावेश करणारे होत . " असे हे अन्न मानव अनादी कालापासून उत्क्रांती करत करत , नित्य - नूतन बदल करत खाऊन आपली वितभर पोटाची खळगी भरतो ...
" अन्न तारी , अन्न मारी , अन्नासारखा नाही वैरी ! "
खरंच ! भूकेलेल्या अन्न देणारी , तहानलेल्याला पाणी देणारी आपली भारतीय संस्कृती ही जगात एकमेवाद्वीतीयच आहे ... पण सध्या बदलत चाललेल्या लग्नातील भोजन पद्धतीने मात्र अन्नाचा दर्जा कमी होत चाललाय ! कारण एखाद्या भिक्षूकासम ताट घेऊन लोटालोटी करत गर्दीतून वाट काढत वर्हाडी मंडळी बफे पद्धतीने अन्नाचा असूरी व अघोरी आनंद घेतानांच दिसून येतात ... पुन्हा न मिळणार म्हणून घेतलेले अन्न ताटात सोडून वाया घालवतात .... कारण आता पूर्वीची पारंपारिक पंगत पद्धत दूर्मिळच होत आहे ना .....
एखाद्या मधुमेहग्रस्तास जर गोड अन्न खाण्याचा आग्रह करून खाऊ घातले तर.... ते अन्न त्या व्यक्तीला विषसमच ठरेल ना ... शिवाय आग्रह करून काहीजण बळेबळेच भोजन ज्यादा करण्यास भाग पाडतात ...त्यामुळं तिळातिळानं अंगावर असे चरबीचे थर साचतात ... की त्या व्यक्तीला दहा मिनिटे चालणे वा काही पायऱ्या चढणेही मुश्किल होऊन जाते ... म्हणून अशा आग्रह भोजनाचे भान भोजनकर्त्यांनी आपल्या पोटाची कोठी पाहूनच सेवण करावे ... व्यर्थ लठ्ठपणाला बळी पडू नये ....
" भूकेला कोंडा नि झोपेला धोंडा ! " असे म्हटले जाते ते यतार्थ आहे ... कारण कडाडून तहान - भूक लागल्यावर जे अन्न - पाणी घेतल्या जाते ते सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली ठरते बरं का ! अन्न हे प्रसन्न व स्थिर मनोवृत्तीने मौनपणे ग्रहण करावे ... जेवतांना बैठी पद्धतीत प्रत्येक अन्नाचा घास निदान 32 वेळानं चर्वण करून टाळूतील लाळ मिसळेल इतपर्यंत चावावे की तो पाण्यासम गिळता आला पाहिजे ... तरच त्या अन्नातून आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या रक्त , मांस , मेद , अस्थी , धातू आदी निर्माण होते ... आणि शरीर आपसूक निरोगी व आरोग्यसंपन्न बनते . शिवाय पाणीही जेवल्यानंतर अर्धा तासांनीच प्यावे तरच हितावह ठरते .. सकाळी दहा- बारा वाजता व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीच भोजन करणे उत्तम आरोग्यास उपयुक्त ठरते ...
म्हणून अन्न हे आपल्या जीवनात आरोग्यदायी बनविण्यासाठी अनमोलच ठरते ... चला तर मग या अन्नाची महती जाणून आपले आरोग्य सुंदर व संपन्न बनवूया......
अर्चना दिगांबर गरूड
ता . किनवट , जि . नांदेड
मो . क्र . 9552954415
•••••••••••°°°°°°°°°°•••••••••••°°°°°°°°°°
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें