*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- पस्तीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 23 मे 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- बालविवाह*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*बालविवाह*
शारीरिक, मानसिक परिपक्वता येण्याअगोदर किंवा वयात येण्याअगोदर जे विवाह केले जातात, याला बालविवाह असे संबोधले जाते. मुलींमध्ये गर्भधारणेची क्षमता आणि मुलांमध्ये प्रजोत्पादन करण्याची क्षमता प्राप्त होण्याअगोदर विवाह केले जातात त्यालाही बालविवाह असे संबोधले जाते. बालविवाह ही पद्धत केवळ भारतामध्येच प्रचलित होती आहे असे नाही. बहुतांशी देशांमध्ये देखील बालविवाह पद्धत प्रचलित आहे. पण आपण आपल्या देशाबाबत विचार करायचा म्हटला तर बालविवाह ही पद्धत निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. शासनाने यासंदर्भात कायदा केला असला तरी बालविवाह पद्धत समूळ नष्ट झाली असे म्हणता येत नाही. लपून-छपून असे प्रकारचे विवाह आजही होताना दिसतात. बालविवाह मध्ये मुलीच्या कौमार्याचा अधिक विचार केलेला दिसून येतो. ज्या पद्धतीने मुलींच्या वयाचा विचार होतो त्या पद्धतीने मुलांच्या वयाचा विचार बालविवाहामध्ये करण्यात येत नाही. मुलगा आणि मुलीच्या वयामध्ये पंचवीस-तीस वर्षे कधीकधी त्याहून अधिक असते. पुराण काळामध्ये अथवा काही शतकांपूर्वी बालविवाह पद्धती होती परंतु त्या पद्धतीची वेगवेगळी नावे होती. असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. मुलीच्या महिलेच्या चारित्र्याला अधिक महत्त्व दिले जाते. समाजामध्ये आजही त्या पद्धतीने वागले जाते वागविले जाते. आणि म्हणूनच तिचे कौमार्य भंग होऊ नये, ती कोणाच्या वासनेची बळी पडू नये म्हणून बालविवाह करण्यात येतो. जुन्या काळामध्ये बालविवाह करण्यासाठी काही मानसिक भावना होते. नातवाचे तोंड पाहता यावे यासाठी लहान वयामध्ये लग्न लावून देण्याची प्रथम. भारतामध्ये परकीय आक्रमण झाल्यानंतर इथल्या लहान मुली आणि महिला परक्यांच्या अत्याचाराला बळी पडत असत त्यातून वाचण्यासाठी बालविवाह करण्याची पद्धत अधिक प्रमाणात रूढ झाली असावी असा अंदाज आहे. मुलगी म्हणजे बोज वाटत असून तिला सांभाळणे तिचे रक्षण करणे तिचे कोमार्य संभाळणे या सार्या गोष्टी त्रासदायक वाटत असल्याकारणाने बालविवाह लावण्याची पद्धत आकाराला आली असावी. त्याच्याही पलिकडे महाराष्ट्रामध्ये एक पद्धत प्रचलित होती असे ऐकिवात आहे, बालविवाह म्हणजे नेमका किती वयापर्यंतचा विवाह.... पाण्यात असलेल्या मुलांचे देखील विवाह होत होते. एवढेच काय परंतु आई गरोदर असेल तर तिच्या पोटाला कुंकू लावून तो व्यवहार निश्चित करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये होती.एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध मोहीमच उघडली. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जात होते. ज्या वयात शिक्षण घ्यावयाचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत. यामुळे समाजातून शिक्षण नाहिसे झाले. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन कंठणे भाग पडे. त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होत, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे. बालविवाहाच्या प्रतिमांची काही कारणेही आहेत आणि त्यामध्ये मुलगी म्हणजे बोज वाटणे, रूढी परंपरा जपणे, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य आणि दयनीय परिस्थिती. अशा विविध कारणांमुळे देखील बालविवाह ही प्रथा जोपासली जाते. बालविवाह प्रतिबंध कायदा जरी केला असला तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने हे विवाह होतात आणि काही जाती काही जमाती तर आशा आहेत की त्यांना या कायद्याचा गंधही नाही. किंवा तो कायदा यांचे काही करू शकत नाही. अर्थात बालविवाह आजही होतातच. परंतु 21 व्या शतकामध्ये वावरत असताना आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती साधली असे म्हणत असताना आपली मानसिकता आणि आपल्या रूढी परंपरा त्यागून बदललेल्या जीवनशैलीला आपण अंगीकारले तर बालविवाहमुळे होणारे अनर्थ आणि शारीरिक आणि मानसिक होणारे नुकसान टाळता येईल.
*हणमंत पडवळ उस्मानाबाद*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*बालविवाह रोखता येतील ?*
विवाहासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य करत असल्या बाबतचे वृत्त वाचून आनंद वाटला. याबाबतीत एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात येत आहे. पुरोहित किंवा विवाह लावणारा धर्मगुरू अथवा घरातील कोणत्याही जबाबदार व्यक्तीने लग्नाच्या वेळी दारक-दारिकांच्या वयाचे प्रमाणपत्र दाखविले पाहिजे. त्यामुळे बालविवाह प्रथा मोडित निघण्यास मदत होईल. खरोखरच असे झाले तर बालविवाहाची पध्दत हळूहळू संपुष्टात येईल. देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६ चा कायदा असून देखील त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे सर्व प्रकार वाढत आहेत म्हणून आता विवाहबंधनात अडकणार्या नवदाम्पत्यांना वयाचा दाखला अनिवार्य करण्याचा विचार शासन करीत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या संदर्भात राज्य सरकारांना निर्देश देत मुलींचे वय १८ पेक्षा कमी आणि मुलांचे २१ पेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचे विवाह रोखण्यासाठी वय प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्याचे सूचविले आहे. त्यानुसार सरकार यावर काय पाऊल उचलणार हे अजुन निश्चित झाले नाही. आंध्रप्रदेशातील पंचायतींमध्ये विवाह नोंदणीच्या वेळी वयाचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे बालविवाह रोखण्यात यश मिळत असल्याचे जैन यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. लग्नाच्या नंतर नोंदणी करण्याऐवजी लग्नाच्या पूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि मनपा यांच्या कार्यालयाकडून वधू आणि वराकडील मंडळीनी मुलींचे आणि मुलांचे वय तपासून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास अजुन सोइस्कर होईल असे वाटते. जे मुले-मुलीं वयाची अट पूर्ण करणार नाहीत ते लग्न झाल्या वर नोंदणी कार्यालयात येणारच नाहीत. पण लग्नापूर्वी ना हरकत मिळणे म्हणजे एक प्रकारे लग्न करण्याचा परवाना असे समजण्यास हरकत नाही. जसे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो त्या नुसार विवाह परवाना आवश्यक नाही का वाटत ? या पध्दतीद्वारे मुलगी 18 वर्षाची आणि मुलगा 21 वर्षाचा झाला की त्यांची नोंदणी करून कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ठेवले की लग्न करण्यासाठी मोकळे. ज्यावेळी एखादे स्थळ एकमेकाना पसंद पडेल त्यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांची ना हरकत प्रमाणपत्र पाहून सोयारिक जुळवून घेणे सोपे होईल. बहुतांश वेळा नविन लग्न झालेली मंडळी आपल्या विवाहाची नोंदणी करीत नाहीत असे सर्रास दिसून येते. त्यामुळे सर्वप्रथम विवाहाची नोंदणी करणे सर्वाना बंधनकारक करणे आवश्यक आहे.
भारतात वयाची आठरा वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकते आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळतो. त्यासाठी त्यांना निवडणूक ओळखपत्र दिल्या जाते. हे ओळखपत्र देताना निवडणूक आयोग पूर्ण काळजी घेते. परंतु यात विवाह झालेल्या मुलींच्या वयाच्या बाबतीत काळजी घेतली जात नाही. लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींचे नाव या मतदार यादीत लग्नपत्रिका पाहून समाविष्ट केल्या जाते. कारण भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींचे लग्न करणे कायद्याने आवश्यक आहे. तिचे लग्न झाले अर्थात ती वयाची 18 वर्षा ची अट पूर्ण केली असा ढोबळ अंदाज बांधून तिचे नाव मतदार यादीत समाविष्ट केल्या जाते. ही पध्दत कुठे तरी बंद झाली पाहिजे. लग्नाची अधिकृत नोंदणी पत्र पाहिल्याशिवाय मुलींचे नाव निवडणूक मतदार यादीत समाविष्ट करण्यात येवू नये असा नियम तयार झाले तरी थोड्या प्रमाणात बाल विवाहाला आळा बसू शकतो, असे वाटते. बालविवाह रोखण्यासाठी फक्त सरकारने काही करावे किंवा शासनाने कठोर कायदे तयार करावे असे नाही तर प्रत्येक मुलां-मुलींच्या पालकानी याबाबतीत सजग होऊन विचार करणे आवश्यक आहे. कमी वयात लग्न लावल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात याची जाणीव पालकानी करून घ्यावी आणि समाजातील जागरूक लोकांनी याबाबतीत लोकांचे वेगवेगळ्या माध्यमातून उदबोधन करावे. बालविवाहच्या बाबतीत जनजागृती ही अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी बालविवाह पध्दत समूळ नष्ट करणे अत्यावश्यक आहे. चला तर मग आपल्या परीने जसे होईल तसे बालविवाह थांबविण्यासाठी उपाय शोधू या..!
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*सह्याद्रीच्या नवज्योती- बालविवाह थांबविण्यासाठी*
*(09) सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
गोष्ट आहे 2011ची.माझ्या शाळेत मीना राजू मंच मोठ्या उत्साहाने कार्यतत्पर होता.तस पाहिलं तर गैरहजर मुलांना शाळेत आनण्यासाठी *मीना राजूमंचची* स्थापणा झाली होती . शाळेपासून एक किलोमीटरवर असलेल्या पुजारीटोला येथील विद्यार्थी शाळेत यायचे .जि.प.गोंदिया वरुन सर्व शिक्षा अभियान आँफिसमधून फोन आलं ,की युनिसेप चे अधिकारी शाळेला भेट देणार ,तो दिवस 31आँक्टोबर *प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी* शाळेत कार्यक्रमांत *गलिचा स्पर्धेचे* आयोजन केले.अपेक्षेबाहेर मुलांनी खुप सुंदर प्रतिसाद दिला.अधिकार्यांनी पोट भरून ग्रामीण मुलांच्या कलागुणांचा कौतूक केले.आणि नंतर आचल ची भेट घेतली .तिने केलेल्या कार्याची मुलाखातच होती ती.
दूरदर्शन आणि युनिसेफ च्या संयुक्त विद्यमाने *सह्याद्रीच्या नवज्योती पुरस्कारासाठी इयत्ता सहावीची आचल बागडे हिची निवड झाली* .काय तो थाट...अगदीच निराळा...नऊ जिल्ह्यातील .नऊ कन्या ..नवरत्न दरबारच तो....सर्व सिने सृष्टी तील ,टी व्ही स्टार आणि गाजलेले कलाकार...पवित्र रिस्ता चे कलाकार निशीगंधा वाड सहीत मुकेश खन्ना....काय केल या बालिकांनी.....का सत्कार यांचा....हो जरा धीर...अगदी एसी बस मधून संपूर्ण मुबंई दर्शन ..राहणे..खाणे..अगदी कपड्यापासून सर्वच *राजशाही थाट* मुबंई च्या अरबी समूद्रातीललाटा आणि त्यातील खारट पाणी.आणि हं लाटांबरोबर जाणारा तो दुप्पटा.. वारंवार पर्यत करूनही हातात येतायेता सुटायचा नं लाटासोबत यायचा.शेवटी मानव साखळी ने कसाबसा गवसला काय मज्जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटझाली निशिगधा वाड यांच्याशीजुहू चौपाटीवर ..त्यांनी आचलला पाहिल आणि मोठ्या गर्वाने सोबात्यांना सांगत होत्या *ही नवज्योती*
. सर्व कशासाठी तर नवज्योतींच्या सत्कारासाठी.ज्यांनी आपआपल्या भागात मोठ्या धैर्याने *बालविवाह* थांबविण्यासाठी कसोशीने सिंहाचा वाटा उचलला होता .त्यांच्या या शौर्याबद्दल कौतूक करण्यासाठी दूरदर्शन व युनीसेफ ने योजलेला हा राजशाही थाट होता. प्रत्येकीने शर्थिने बालविवाह थांबविले होते .इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या ह्या नवज्योती.
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात.
बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.. या सार्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपले बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच नवीन विचार शक्तीला काळिमा आहे .अशा कोवळ्या कळ्यांना उमलण्यासाठी नवज्योतीनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती .या पूरयत्नांचा सन्मान होता तो.
देशानुसार कायदे बालविवाह प्रतिबंध कायदा: २००६या कायद्याने बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे.
बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. बालविवाह पूर्णपणे रोखणे.या कायद्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करून योग्य ती कार्यवाही करणे.
बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.
या कायद्यातील नियमांचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यास पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करता येतात.बालविवाह जबरदस्तीने झाल्यास जर बालवधू वा बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात.असा अर्ज दाखल करतांना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राच्याद्वारे व बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याच्या सोबत दाखल करावा लागतो.
हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या २३ वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या २० वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात.या अर्जानंतर संबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालय सोबतच दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागिने, रोख रक्कम, व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तूंची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल. मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल.विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतांनाच न्यायालय वर मुलाला वा त्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना, वधूचा पुनः विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधीही आदेश देईल.
हा निर्वाहभत्ता एक रकमी असावा किंवा मासिक असावा. याबाबत निर्णय घेतांना न्यायालय दोन्ही पक्षांची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेईल.
बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरच असते.
बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल.
शिक्षा १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्यास किंवा प्रोत्साहन देणार्यावर दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते .अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.
रोखण्यासाठी उपाय कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याप्रमाणे सर्व अधिकार असतात. असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकून घेईल.तसेच एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर सामूहिक बालविवाहाची प्रथा असेल तर असे सामूहिक बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी न्यायालय योग्य कार्यवाही करून मनाई हुकूम जारी करू शकते.वरील प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी मनाई कायद्याचे चे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या पुरुषांना दोन वर्षापर्यंतच्या सक्त मजुरीची कैद व रुपये एक लाखापर्यंत दंड ही शिक्षा होऊ शकते. पण गुन्हेगार स्त्रियांना फक्त दंड होऊ शकतो.तसेच मनाई हुकमाचे उल्लंघन करून केलेले बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात. या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत.
*नसे स्त्री गौण ,दासी वा वस्तू उपभोगाची . पुरूष स्त्री शक्ती समानता गुणाचे.
स्त्री ने धरावी आज प्रगतीपथावरील
जागृत शक्ती उन्नती जगाची!
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
...........*. बालविवाह.......
अनिष्ट प्रथा*
39,). सौ. भारती दिनेश तिडके
गोंदिया.
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ओठी अमृत नयनी पाणी"
विवाह हे एक पवित्र बंधन आहे.द़ोन जीवांचे मीलन आहे. परंतु बालविवाह म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात येण्यापूर्वीच त्यांचा विवाह. पूर्वीच्या काळी पडदा पद्धती होती. केशवपन, बालविवाह, सती प्रथा इत्यादी अनिष्ट रूढी होत्या. त्यातील बालविवाह हीदेखील अनिष्ट प्रथा आहे. विवाह हा शारीरिक व मानसिक परिपक्वता आल्यावरच करायला पाहिजे. परंतु जुन्या काळात बालविवाह व्हायचे. शारीरिक व मानसिक परिपक्वता येण्याअगोदरच मुला-मुलींचा विवाह करणे म्हणजे बालविवाह होय. जुन्या काळात काही वेळेला तर मुलगा-मुलगी जन्मल्याबरोबर त्यांचा विवाह ठरवून टाकायचे. वैवाहिक जीवनातल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य हे मुला मुलींना माहीत नव्हते. आदिवासी, पारंपरिक जीवन जगणाऱ्या मानव समुहात ही चाल आजही दिसून येते.
परंपरा, रूढी परंपरेमुळे मासिक पाळी येण्याच्या अगोदरच मुलींचे विवाह केले जात होते. मेला निशियन जमातींमध्ये ही बालविवाहाची चाल दिसून येते. त्याचप्रमाणे सर्वोच्च श्रीमंत देश अमेरिकेमधील निग्रो समाजात तसेच आपल्या आशिया खंडातील अनेक जमातीत बालविवाह आताही होतात. तेराव्या शतकात कोरियामध्ये बालविवाहाची प्रथा आढळते. भारतामध्ये आता लग्नाचे वय मुलीचे अठरा वर्ष तर मुलाचे 21 वर्ष ठरलेली आहेत. कारण त्यापेक्षा कमी वयात लग्न केले तर कायद्याने गुन्हा आहे. परंतु वेद काळात बालविवाहाची उल्लेख आढळत नाहीत. महाराष्ट्रात तर पाळण्यातील मुला मुलीचे विवाह लावण्यापर्यंत ही मजल गेली, इतकेच नव्हे तर दोन गरोदर स्त्रियांपैकी एकीला मुलगा व दुसरीला मुलगी होईल असे गृहीत धरून लग्न ठरवले जाई याला "पोटाला कुंकू लावणे"असे म्हणतात. 19व्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरू झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न जास्त भेडसावत होता. राजा राम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन, ज्योतिराव फुले, रानडे, आगरकर, महर्षी कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरुद्ध मोहीमच उघडली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. राय बहादुर बक्षी, मलबारी, हरविलास सारडा यांनी कायदा करून सुधारणा करावी या मताचा पुरस्कार केला. त्यापैकी तर काहींनी कायदेमंडळात बालविवाह बंदी ची विधेयके देखील आणली होती.
बालविधवा ची समस्या, स्त्रियांचे अनाचार, व त्यातून जन्माला येणाऱ्या संततीचे प्रश्न तसेच भ्रूण हत्या इत्यादी अनेक विषय बालविवाहाची निगडित आहेत.बालविवाहाची अनिष्टता समजावून देण्यासाठी सुधारकांनी लेख लिहिले. व्याख्याने दिली, वादविवाद केले, समाजात जनजागृती केली. औद्योगीकरण जसजसे वाढत गेले व शहरांची जशी वाढ होत गेली तस-तशी बालविवाहाला कारणीभूत असलेल्या गोष्टी नष्ट होऊ लागल्या. परंतु आजही ग्रामीण भागात, आदिवासी भागात तुरळक प्रमाणात बालविवाह होतच आहेत. बालविवाह दूर करायचा असेल तर स्त्री शिक्षणाचा प्रसार फार महत्त्वपूर्ण आहे."शिकलेली आई घराला पुढे नेई". बालविवाहाचे दुष्परिणाम देखील होतात आई व लहान शिशु यांच्या मृत्यूच्या दरांमध्ये वाढ होते. शारीरिक मानसिक विकास झालेला नसतो. त्यामुळे प्रजनन क्षमता विकसित झालेली नसते. बाल विवाह करणाऱ्या मुला मुलींची अवस्था भातुकलीच्या खेळा सारखी होते. अल्लडपणा , निरागसता त्यांच्यामध्ये असते. त्यांना काही समजत देखील नाही की त्यांचा विवाह होत आहे म्हणून. बालविवाह ही एक अनिष्ट प्रथा आहे. ही एक सामाजिक समस्या देखील आहे. बालविवाह फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात होत आलेले आहेत. संपूर्ण भारतात एकूण 49 टक्के मुलींची विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात होते. भारतात केरळ मध्ये जो पूर्ण साक्षर राज्य आहे तिथे आताही ही प्रथा प्रचलित आहे. दोन जीव एक मेकांशी अनभिज्ञ असतात, अपरिपक्व असतात. त्यामुळेच मग घटस्फोट, मृत्यू इत्यादी कारणे उद्भवतात. बालविवाह मध्ये एच आय व्ही जसे यौन संक्रमित रोग होण्याचे प्रमाण जास्त असते. भारतामध्ये बालविवाह होण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
१) आई-वडील मुला-मुलींना बोझ समजतात.
२) अशिक्षितपणा
३) रूढी परंपरा
४) अंधविश्वास
५) आर्थिक परिस्थिती इत्यादी
बालविवाह थांबविण्यासाठी काही उपाय केले जात आहे. समाजामध्ये जनजागृती करणे, मिडीयाद्वारे माहिती देणे, शिक्षणाचा प्रसार करणे, गरिबी दूर करणे, पथनाट्य, नाट्य मंच
द्वारे जनजागृती करून समाजाचा विकास करणे. बालविवाह ही अनिष्ट प्रथा समूळ नष्ट व्हायला हवी.
या अनिष्ट प्रथा रूढी सुधारण्यासाठी भारतात पुढील कायदे करण्यात आले.
१)1860:-बाल विवाह प्रतिबंधक कायदा 1929 मध्ये झाला त्यापूर्वी बालविवाहाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल म्हणून कलम 375 मधील ही तरतूद लक्षणीय म्हणावी लागते.
२)1894:-मैसूर सरकारने बालविवाहाचा कायदा करून 18 वर्षाखाली मुलीचे वय असल्यास विवाहाला बंदी केली.
३)1904:-बडोदा सरकारने मुलीचे विवाहयोग्य वय बारा व मुलाची 14 ठरविली.
4)1927:-इंदूर सरकारने मुलीची वयोमर्यादा 12 व मुलाची 14 ठरविली.
5)1929:-बालविवाह प्रतिबंध कायदा सारडा कायदा या अन्वये मुलीचे वय 14 व मुलाचे वय 18 ठरविण्यात आले.
6)1955:-हिंदू विवाह कायदा मुलीचे वय पंधरा वर्षाचे ठरले व मुलाचे 18 तसेच 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 व मुलाचे 21 वर्ष ठरले.
अशा प्रकारे कायदे करण्यात आले.
सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.8007664039
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(08) *महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*बाल विवाह-समाजाला लागलेला कलंक*
मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य होणे व मुलगा प्रजोत्पादनक्षम होणे.थोडक्यात सांगावयाचे तर, शारीरिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त होण्यापूर्वीच मुलामुलींचा विवाह करणे, अशी बालविवाहाची व्याख्या करता येईल. या विवाहात वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांविषयी वधू-वर अनभिज्ञ असतात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या जगातील अनेक मानवसमूहांत ही चाल असल्याचे दिसते.
बालविवाहाच्या संदर्भात वधूच्या वयाचा विचार जेवढा झाला, तेवढा वराच्या वयाचा झालेला नाही. समावर्तनाचा संस्कार झाल्याशिवाय त्रैवर्णिक पुरुषाचे लग्न होऊ शकत नाही आणि समावर्तनाचे वय पंचवीस वर्षे- म्हणजे वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर-येते. याचा अर्थ पंचवीस वर्षांचे आत तर त्रैवर्णिक विवाह होतच नसे, असा होतो. मनूने असे म्हटले आहे, की तीस वर्षे वयाच्या पुरुषाने बारा वर्षे वयाच्या मुलीशी विवाह करावा. वराचे वय चोवीस व वधूचे आठ, असे अंतरदेखील मनूने मान्य केलेले आहे. महाभारतात वराचे वय तीस व वधूचे दहा किंवा वराचे एकवीस व वधूचे सात असावे, असे म्हटले आहे.
वरील सर्व विवेचन लक्षात घेता, प्राचीन स्मृतिकारांनी मुलीच्या कौमार्यावर जास्त भर दिलेला आढळतो. ऋतू वाया जाऊ नये. याविषयी त्यांचा कटाक्ष होता. वाया जाणाऱ्या प्रत्येक ऋतूबरोबर एक एक भ्रूणहत्येचे पातक लागेल, असे त्यांनी बजावून ठेवले आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी ही पित्याची असते. वंश, जात, गोत्र-प्रवर, पिंड इत्यादींसंबंधी अंतर्विवाही व बहिर्विवाही नियम अस्तित्वात असल्यामुळे व वयात आलेली मुलगी स्वत:च वरसंशोधन करून कदाचित वरील नियमांचे पालन करण्याची शक्यता कमी असल्यामुळे, मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचे लग्न उरकून टाकावे, अशी वृत्ती बळावली असावी. तसेच स्त्रीच्या चारित्र्याला अतिशय महत्त्व दिले जात असल्याने, मुलगी वयात आल्यानंतर एखाद्या पुरुषाच्या वासनेस बळी पडू नये किंवा स्वत: ही मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रुढ झाली असावी. यात पुन्हा परकीय आक्रमकांनी भर घातली.
गेली दोन हजार वर्षे बालविवाहाची चाल केवळ स्थिरच झाली असे नव्हे, तर पक्की होत गेली. विवाहाचे वय अधिकाधिक कमी होत गेले. पाळण्यातील मुलामुलींचे विवाह लावण्यापर्यंतही मजल गेली; इतकेच नव्हे तर दोन गरोदर स्त्रियांपैकी एकीला मुलगा व दुसरीला मुलगी होईल, असे गृहीत धरून लग्न ठरवले जाई. याला ‘पोटाला कुंकू लावणे’, असे महाराष्ट्रात म्हणतात.
एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध मोहीमच उघडली. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. बेहरामजी मलबारी, लाला गिरिधारीलाल, रायबहादुर बक्षी सोहनलाल, हरी सिंग गौर, हरविलास सारडा यांनी कायदा करून सुधारणा करावी या मताचा पुरस्कार केला व त्यांपैकी काहींनी कायदेमंडळात बालविवाहबंदीची विधेयकेदेखील आणली.
संमतिवयाचा प्रश्न बालविवाहाच्या चालीतूनच निर्माण झाला. जरठकुमारी विवाह, बालविधवांची समस्या, अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या काही स्त्रियांचे अनाचार व त्यातून जन्माला येणाऱ्या अनौरस संततीचा प्रश्न, भ्रूणहत्या इ. अनेक विषय बालविवाहाशीच निगडित आहेत. बालविवाहाची अनिष्टता समजावून देण्यासाठी सुधारकांनी लेख लिहिले; व्याख्याने दिली; वादविवाद केले. औद्योगीकरण जसजसे वाढत गेले व शहरांची जसजसी वाढ होत गेली, तसतशी बालविवाहांना साह्यभूत होणारी एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होऊ लागली. स्त्री-शिक्षणाचा प्रसार होत गेला व बालविवाहाची चाल हळूहळू बंद होत गेली.
बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जाण्याचा दोष होता. ज्या वयात शिक्षण घ्यावयाचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत. यामुळे समाजातून विद्या नाहीशी झाली. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन कंठणे भाग पडे. त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होत, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे.
ही स्थिती सुधारण्यासाठी पुढील कायदे करण्यात आले :
१८६० : इंडियन पीनल कोड, कलम ३७५ व ३७६ – दहा वर्षाखालील मुलीशी वा पत्नीशीही समागम करण्यास बंदी. बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ मध्ये झाला. त्यापूर्वी बालविवाहाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल म्हणून कलम ३७५ मधील ही तरतूद लक्षणीय मानावी लागेल. १८९४ : म्हैसूर सरकारने बालविवाहाचा कायदा करून, आठ वर्षांखाली मुलीचे वय असल्यास विवाहाला बंदी केली.
१९०४ : बडोदा सरकारने मुलीचे विवाहयोग्य वय बारा व मुलाचे सोळा वर्षांचे ठरवले.
१९२७ : इंदूर सरकारने मुलीची वयोमर्यादा बारा व मुलाची चौदा ठरविली.
१९२९ : बालविवाह प्रतिबंधक कायदा (सारडा कायदा) – या अन्वये मुलीचे वय चौदा व मुलाचे वय अठरा ठरवण्यात आले.
१९५५ : हिंदू विवाह कायदा-मुलीचे वय पंधरा वर्षांचे ठरले व मुलाचे अठरा. तसेच
१९७८ च्या कायद्यानुसार मुलीचे वय अठरा व मुलाचे एकवीस वर्षे ठरले.
बालविवाहासंबंधी वरील स्वरुपाचे कायदे करण्यात आलेले असले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(15)
बालविवाह रोखणे कायद्यापुढील मोठे आव्हान
ज्या वयात बाहुल्यांसोबत खेळले पाहिजे त्या वयात मुला-मुलींना बोहल्यावर चढवल्या जाणे हि खरंतर खूपच लाजिरवाणी बाब आहे. कायद्याने बालविवाहावर बंदी आणलेली असली तरी देशातील कित्येक भागात हि प्रथा अजून सुद्धा चालूच आहे. या कुप्रथेचे सर्वाधिक प्रमाण हे ग्रामीण समूहात तसेच अशिक्षित समुदायात जास्त असल्याचे दिसून येते. राजस्थान, मध्यप्रदेश मध्ये बालविवाहांचे प्रमाण जास्त दिसून येते. वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवून किंवा दुष्परिणामांची माहिती देऊन सुद्धा कोणताही परिणाम लोकांवर होत नाही. धर्मसंस्काराच्या नावाखाली बऱ्याच समाजामध्ये उजळ माथ्याने या प्रथेचे समर्थन केले जाते. बऱ्याच सामाजिक संस्था या प्रथेला विरोध करत असतात, जनजागृती करत असतात. एव्हडे करून सुद्धा लोकांच्या मानसिकतेत काहीही बदल होतांना दिसत नाही.
बालविवाह हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या कुप्रथेला नष्ट करण्यासाठी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे, शासनाने सुद्धा केवळ कायद्याच्या भरवश्यावर न राहता मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, निरोगी आरोग्यासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी ठोस योजना अंमलात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.
मुलींवर वाढत्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा बालविवाह प्रथेस कारणीभूत धरता येतील. कारण, अशा प्रकरणामुळे काहींना मुलगी हि जबाबदारी न मानता ती ओझे वाटत असते. त्यामुळे हे ओझे जमेल तितक्या लवकर कमी करण्यासाठी लहान वयातच मुलींचे लग्न लावली जातात.
वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा यास कारणीभूत आहे. वर्षानुवर्षे रखडत राहणारी प्रकरणे यामुळे सुद्धा तक्रारदार न्यायालयाच्या चकरा मारून शेवरी कंटाळून आपली तक्रार मागे घेतात व अश्याने या प्रथेचे अनुकरण करणारे लोक अधिकच शेफारतात. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी अतिशय कठोर पद्धतीने होणे गरजेचे आहे.
बालविवाह प्रथा हि सामाजिक समस्या असल्याने समाजाने सुद्धा आपली जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह रोखले गेले पाहिजे
जेव्हा स्त्री आणि पुरुष धार्मिक विधीनुसार एकत्र येतात तेव्हा त्यास विवाह म्हणतात. दोन शरीरच नव्हे तर दोन मन एकत्र जोडणे म्हणजे विवाह असते.
परंतु एकोणिसाव्या शतकात हिंदू समाजात एक वाईट प्रथा होती ती म्हणजे बालविवाह होय. जेव्हा दोन शरीर दोन मन अपरिपक्व अवस्थेतील असतात तेव्हा त्यांना विवाहाच्या बंधनात बांधणे म्हणजे बालविवाह होय. ही बालविवाहाची अनिष्ठ प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी बंड पुकारले. पूर्वीच्या काळी या बालविवाह प्रथेचा इतका अतिरेक झाला होता की, मूल गर्भावस्थेत असतानाच त्यांचा विवाह करत असत. या प्रथेस 'पोटालाकुंकू 'लावणे असे म्हणत होते. परंतु गर्भावस्थेतील काही रोगामुळे ते मूल मृत्यू पावले तर संपूर्ण जन्मभर त्या स्त्रीला विधवेचे नरका प्रमाणे वाईट जीवन कंठावे लागत असे. अशा या वाईट प्रथेविरुद्ध स्वामी दयानंद सरस्वती यांनी बंड पुकारून लोकांना पेटविले की, शास्त्राच्या नियमानुसार स्त्री-पुरुषांचे योग्य वयातच लग्न करावे. नियमांचे पालन करूनच विवाह करण्यात यावा. आणि जे नियमभंग करतील ते जीवनात तर दुःखी होतातच पण त्याच बरोबर ते अनैतिकतेची गुन्हेगार ठरतात. स्वामीजींनी बालविवाहास विरोध करून शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य याला प्राधान्य देऊन राष्ट्राचा समाजाचा विकास कसा होईल हे समाजाला पटवून दिले.काही कारणामुळे स्त्रियांना खूपच कमी लेखले जात असे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. समाजातील अनिष्ट चालीरीती ,रुढी-परंपरा, वाईट प्रथा ,अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव या सर्व कारणांमुळे बालविवाह होतात. आजही आपण बघत आहोत समाजातील काही भागात बालविवाह होतात. हे बालविवाह रोखण्यासाठी समाज हा शिक्षित झाला पाहिजे. मानव प्राणी हा सतत समाजात वावरत असल्यामुळे तो समाजशील देखील आहे. म्हणून जर हा मानव निरक्षर असेल तर तो समाजाच्या नुकसानीला कारणीभूत ठरतो. आजचे युग हे विकासाच्या मार्गावर धावणार युग आहे, आधुनिक यांत्रिकीकरणाचे युग आहे. जुन्या ,चालीरीती,परंपरा यांचा नाश करून नवीन कल्पक समाजाची निर्मिती करण्याचे कार्य मानवाच्या हाती आहे .चांगले विचार, चांगले आचार, चांगले वर्तन हे शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे काळाची गरज आहे. व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती नियमांचे'पालन करेल. नियमांचे पालन झालेले असल्या कारणाने बालविवाह होण्यास प्रतिबंध घालता येईल. 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यावरच विवाह करण्यात यावा. या कायद्यानुसारच समाजातील प्रत्येकाने याचे जाणीवपूर्वक पालन करून आपल्या मुला मुलीचे विवाह कायद्याच्या चौकटीतच राहून विवाह करून द्यावे तरच बालविवाह बंद होतील, रोखता येईल.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता .हदगाव जि. नांदेड.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
07 लेख
बालविवाह
विवाह म्हंटला की एक आनंदाचा क्षण सर्वांनाच जाणवतो.विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. दोघांच्याही जीवनात एका नवीन जोडीदाराने प्रवेश केलेला असतो. त्यामुळे दोघेही एकमेकांना समजावून घेणे हे क्रमप्राप्त असते. लग्नाच्या वेळी वधू वर दोघेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असतील, त्यांची वैचारिक पातळी उच्च असेल, एकमेकाला समजावून घेण्याच्या प्रवृत्ती चा विकास झाला असेल. तर अशा जोडीदारांचा विवाह हा त्यांच्या अंतापर्यंत व्यवस्थित टिकून राहतो.
पूर्वीच्या काळी बालविवाहाची प्रथा होती. मुलीच्या वयाचा विचार लग्नाच्या वेळी अजिबात केला जात नव्हता. बालविवाह म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात येण्यापूर्वी त्यांचा केलेला विवाह होय. ज्या वेळेला मुलगी गर्भधारणेस योग्य होते व मुलगा पुनरुत्पादनक्षम होतो, म्हणजे त्या दोघांना शारीरिक व मानसिक परिपक्वता येते. पण त्या आधीच या दोघांचा विवाह जर लावला गेला तर त्याला बाल विवाह असे म्हणतात.पूर्वी बालविवाहाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होते. वयाने कितीही मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर त्या लहान बालिकेचे लग्न लावून दिले जात असे.मग तिथून सुरु व्हायची स्त्री जन्माच्या परवडीची कथा.
धर्मसूत्रात तर असे सांगितले आहे की, ज्यावेळी मुलीचे लग्न करण्यात येईल त्यावेळी ती नग्निका असावी. या शब्दावरून प्रत्येकाने याचा वेगवेगळा अर्थ काढला. एकंदरीत याचा अर्थ असा होतो की मुलीचे लग्न हे रजोदर्शन व्हायच्या पूर्वीच झालेले असावे. मुलीचे लवकरात लवकर लग्न केले जात असे. नवरामुलगा हा मुलीपेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठा असे. त्या वेळी आठ वर्षाच्या मुलीला गौरी असे संबोधले जायचे, नऊ वर्षाच्या मुलीला रोहिणी, तर दहा वर्षाच्या मुलीला कन्या असे संबोधले जायचे. व त्या नंतर च्या मुलीला रजस्वला असे समजले जात असे. मुलगी गौरी असतानाच तिचे लग्न लावले जात असे. कारण रजस्वला झाली तर ती कुणाच्या मोहाला बळी पडू नये, किंवा ती स्वतः कुणाच्या आहारी जाऊ नये, त्याच बरोबर घराचा कुलीन पणा टिकवण्यासाठी मुली कुठल्या मोहाला बळी पडण्याच्या आधी त्यांचे लग्न लावणे हे इष्ट समजले जायचे. या अशा कारणांनी व मनुवाद मानणाऱ्या लोकांनी बालविवाह चालूच ठेवले.
दोन हजार वर्षापासून चालत आलेली ही परंपरा खंडित करण्याचे काम राजा राम मोहन राय, ईश्वरचंद विद्यासागर, केशवचंद्र बेन या बंगाली तर ज्योतिराव फुले, म. गो.रानडे, ग. गो. अगरकर, धोंडो केशव कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाह विरोधी मोहीम उघडली.स्त्री-शिक्षणावर भर देण्यात आला. कारण बालविवाहाचे तोटे सर्वांना माहिती होते. बाल विवाह केल्यामुळे मुलीवर अकाली मातृत्व लागले जायचे, त्यामुळे बऱ्याच वेळेला तिचा मृत्यू व्हायचा किंवा नवरा-बायको यांच्या वयामध्ये भरपूर फरक असल्यामुळे दोघांच्यात मतभेद व्हायचे. त्यावेळी पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे घटस्फोट व्हायचा. घटस्फोटानंतर पुरुष दुसरा विवाह करायचा पण दुसरा विवाह करण्यास परवानगी स्त्रीला नव्हती. त्यामुळे त्या स्त्रीला परित्यक्त्यांचे किंवा विधवेचे अतिशय वाईट जीवन जगावे लागे. हे सर्व पाहता या थोर समाजसुधारकांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1860 साली दहा वर्षाखालील मुलीशी विवाह करणे, तिच्याशी समागम करणे हा गुन्हा मानला गेला. पुढे जाऊन 1904 ला बडोदा सरकारने लग्नाच्या वेळेला मुलीचे वय 12 व मुलाचे वय सोळा असावे असा नियम केला. 1927 ला इंदूर सरकारने लग्नाच्या वेळी मुलीचे वय 12 व मुली मुलाचे वय 14 असा नियम केला. 1929 ला बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार लग्नाचे वेळी मुलीचे वय 14 व मुलाचे वय 18 मानण्यात आले. त्यानंतर 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार मुलीचे वय 15 व मुलाचे वय 18 ठरविण्यात आले. 1978 ला याच कायद्यानुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 करण्यात आले.
कायदे केल्यामुळे बालविवाहाची प्रथा थोडीफार कमी झाली. पण समाजातील परिस्थिती पाहता बरेचजण त्यातून पळवाटा शोधून काढताना दिसतात.आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना दिसतात.
बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा वापर जर योग्य प्रमाणात कुठल्याही आमिषाला बळी न पडता केले तर बऱ्याच अंशी आपण हे बालविवाह रोखू शकतो. त्याचबरोबर समाजातील व्यक्तींनी ही याचे महत्त्व लक्षात घेऊन जर बालविवाह होत असेल तर त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कळवणे गरजेचे आहे. बालविवाहाचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. ते पूर्णपणे नष्ट होणे गरजेचे आहे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे*
*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
प्राचीन काळात आपल्या भारतावर होणारे विविध देशाचे आक्रमण आणि मुलींवर होत असलेले अत्याचार यामुळे अगदी कोवळ्या वयात विवाह लावून देण्याची पद्धत होती त्यालाच 'बालविवाह' संबोधले जातात.परकीय व्यक्तीपासून मुलींचे संरक्षण व्हावे,आई-वडिलांना बोझ ठरू नये यासाठी अगदी कमी वयात लग्न उरकवले जात असत.एवढेच नाही तर गरोदर असतांनाच काही समाजात विवाह लावण्याची प्रथा आजही 21 व्या शतकात दिसून येते.भारतावर इंग्रजांचे राज्य असतांना अन्याय,अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने आपल्या मुलींचा कौमार्य अवस्थेत येण्याच्याच पूर्वी विवाह लावण्याने अनेक समस्यांला मुलीला समोरे जावे लागत असत.कोवळ्या वयात विवाह केल्याने संसाराचा भार डोईवर यायचा.यापेक्षाही कमी वयातच गर्भधारणा वगैरे झाल्यास शारीरिक,मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत.कुटुंबातील व इतर शेजारी ना समज बालिकेला अनेक हालअपेष्टा सहन करावे लागत असे.पूर्वी या अनिष्ट रूढी परंपरेला छेद देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर,राजा राम मोहन राय, गो.ग.आगरकर,लोकमान्य टिळक,महर्षी कर्वे या समाजसुधारकांनी समाजात जागृती करून बालविवाह पद्धतीला आळा घालण्याचा प्रयत्न केला गेला.
एकविसाव्या शतकात बालविवाह होऊ नये,मुलींचा विकास खुंटू नये यासाठी भारत देशात बालविवाह कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे.आजच्या घडीला विवाह करावयाचे झाल्यास मुलांचे वय 21 वर्ष आणि मुलींचे वय 18 वर्ष असणे अनिवार्य आहे अन्यथा याउलट कमी वयाचा मुलगा वा मुलगी असल्यास बालविवाह संबोधले जाते.अजूनही काही भटक्या समाजात बालविवाह प्रथा सुरू आहे.काही गावामध्ये असे बालविवाह जात पंचायती समोर सर्रास लावले जातात यावर शासनाचा जरब असावा यासाठी 2006 साली बालविवाह प्रतिबंध कायदा लागू करण्यात आलेला आहे.शासनाने ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण करीत नसल्याबाबत त्यांना शिक्षा ही दिली आहे आणि कायद्याने अपराध आहे म्हणून बालविवाह रोखणे आज काळाची गरज बनली आहे.
भारत देश इंग्रजांच्या सावटात असतांना समाजात जास्तीत जास्त प्रमाणात बालविवाह,जरठविवाह आयोजित केले जात असत.सामाजिक प्रबोधनात अग्रेसर राहून बालविवाह प्रथा समाजाची प्रगती खुंटण्यास कारणीभूत आहे म्हणून राजा राम मोहन राय,महात्मा फुले यांच्या पुढाकाराने बालविवाह प्रथेला आळा घालायला सुरुवात झाली.स्वतः महात्मा फुले यांचे 13 व्या तर त्यांच्या अल्पवयीन पत्नी सावित्रीबाई देखील केवळ 9 वर्षाच्या होत्या त्यामुळे अशा अल्पवयीन विवाह झाल्यामुळे संसाराची दोरी सांभाळणे अवघड झाले होते म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील काही राज्यातील काही विशिष्ट समाजात अजूनही बालविवाह प्रथा आहे याला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज बनली आहे.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
४० मनिषा पांढरे, सोलापूर
*बालविवाह*
बालविवाह या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. पूर्वीच्या काळी लहान वयातच बालविवाह केले जात असत. आज भारत स्वतंत्र होऊनही अनेक वर्ष झालेल्या आहेत परंतु अजूनही ग्रामीण भागात बालविवाह होताना दिसतात.
बालविवाह होण्याची अनेक कारणे आहेत. समाजातील लोकांची ही विचारसरणी बदलण्यासाठी समाजातीलच काही तरुणांनी समोर येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मुलगी मोठी झाली की तिचा बालविवाह केला जातो.
ग्रामीण भागातील लोक दिवसभर पोटापाण्यासाठी बाहेरगावी कामाला किंवा शेताला जात असतात. घरात मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नसते. आणि म्हणूनच मुलगी अत्याचाराला बळी पडू नये किंवा तिने पळून जाऊन लग्न करु नये या भितीनेच माता पिता मुलीचा बालविवाह करतात.
शालेय शिक्षण सुरू असतानाच किशोरवयीन मुलींना जबाबदारीची जाणीव व शारीरिक व मानसिक होणारे बदल याचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. ज्यामुळे मुलींना अचूक मार्गदर्शन मिळेल व होणारे होणाऱ्या चुका टाळल्या जातील.
लहान वयातच लग्न केल्यामुळे मुलींवर अनेक जबाबदाऱ्या पडतात आणि लहानपणीच पालकत्व आल्यामुळे शारीरिक हानी होण्याचीही शक्यता असते आणि हेच टाळण्यासाठी साठी समाजातील काही सुशिक्षित लोकांनी समोर येणे गरजेचे असते.
मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 झाल्याशिवाय विवाह होऊ नये यासाठी गावागावात चळवळ उभी करायला हवी. किशोरवयीन मुले व मुली यांना भिन्नलिंगी आकर्षण असते व त्यांच्यामुळे त्यांच्या वागण्यात होणारे बदल याविषयी त्यांना वेळीच जागृकता निर्माण करता येणे गरजेचे असते.मुले चित्रपट सृष्टीतील विविध चित्रपट पाहत असतात व मुले काल्पनिक जीवनात रममाण होतात आणि चुकीच्या दृष्टीने पाऊल टाकतात.
यासाठी संस्कारक्षम चित्रपटांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील पालकांनी सुजान पालकत्व स्वीकारले तर होणाऱ्या चुका टाळून बालविवाह टाळता येऊ शकतात.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*38)*
*बालविवाह*
बालविवाह ही आजची समस्या नसून तो मागच्या शतकातला विषय होता, अशीच अनेकांची समजून असते. पण आजही बालविवाहाचे प्रमाण भारतात ४७ टक्के ,तर महाराष्ट्रात ३५ टक्के इतके आहे.... लोकसंख्यावाढीशी थेट संबंध असणाऱ्या बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके(राष्ट्रीय प्रमाण ४२टक्के), याचबरोबर स्त्रीशिक्षत आणि स्त्रीसक्षमीकरणा संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. महिला अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाह झालेल्या मुलींचे प्रमाण खूप मोठे आहे.. म्हणूनच..
तर मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. बालविवाह हा काही बलात्कारापेक्षा कमी नाही... कारण भारतीय दंड विधानामध्ये जर १६ वर्षांखालील मुलीशी संमतीने अथवा विनासंमतीने शरीरसंबंध ठेवल्यास त्याला बलात्कार मानले आहे... कायदा आणून पण त्याची अंमलबजावणी कधी होणार काय माहित...?
लहान वयात झालेल्या लग्नामुळे लैगिंकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. त्यामुळे त्यांना कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भधारणा झालीच तर काय काळजी घ्यावी हे माहित नसल्यामुळे ते त्यांचे बाळ पोटात किंवा जन्म झाल्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांना गमवावे लागते... कारण त्यांचे अपुरे पोषण... सक्षम नसेलेले शरीर...बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जात होते. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत असत... यामुळे समाजातून विद्या नाहीशी झाली. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे, आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन त्यांना काढणें भाग पडत होते.... त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होत, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे. परंतु स्त्रीच्या चारित्र्याला अतिशय महत्त्व दिले जात असल्याने, मुलगी वयात आल्यानंतर एखाद्या पुरुषाच्या वासनेस बळी पडू नये किंवा स्वत: ही मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रुढ झाली असावी....
एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे या मराठी समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध मोहीमच उघडली. बालविवाह हा तर गुन्हा आहेच पण जर आजही हे घडत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट आहे...यावर निर्बंध घातले पाहिजेत...
- अमित प्र. बडगे, नागपुर
(7030269143)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह : एक कुप्रथा
भारत देश, जेथे राष्ट्रपती सारख्या महत्त्वपूर्ण पदावर एक महिला विराजमान होते, त्या देशात काही ठिकाणी बालविवाहा सारखी कुप्रथा अजूनही चालू आहे. ज्यामुळे बालिका आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. केवढा हा विरोधाभास!!
आज एकविसाव्या शतकात बालविवाहाच्या नुसत्या कल्पनेनेही भीतीचा काटा अंगावर उभा राहतो. ज्या मुलींचे बाहुला - बाहुली, भातुकली खेळण्याचे वय, उड्या मारणे, बागडण्याचे वय, चॉकलेट खाण्याचे वय, आई-वडिलांकडून लाड-कोड करून घेण्याचे वय , शिक्षणाचे वय, वेगवेगळ्या कला साध्य करण्याचे वय, त्या वयात लग्नाच्या बेडीत त्यांना अडकवायचं? त्या बालमनाचा त्याकाळी कोणी विचारही करत नसे. त्यांच्या पसंती नापसंतीचा तर प्रश्नच नाही. एवढी त्या बालमनाला विचारशक्ती कुठली? पण परंपरेप्रमाणे विवाह अगदी लहानपणी झालाच पाहिजे म्हणून मोठ्या अनुभवी घरच्या लोकांनी पाळलेली ही प्रथा. लहान मुलगा-मुलगी म्हणजे वस्तूची देवाणघेवाण असे त्याचे रूप असे. त्यात मुलांचे हित वगैरे कधीच पाहिले जात नसे. वयात येण्याअगोदर केलेला विवाह म्हणजे बालविवाह.
बालविवाहाची प्रथा फक्त भारतातच होती असे नव्हे, तर इतर देशातही होती. ही प्रथा भारतात आदि काळापासून नव्हती. भारतात दिल्ली चे तख्त अस्तित्वात आले, तेव्हा परकीय राजे होते. राजेशाही होती. तेव्हा बालविवाह बालिकांना परकीय शासकांपासून बलात्कार व अपहरणापासून वाचण्यासाठी एक हत्यार म्हणून हा विवाह केला जात असे.
बालविवाह सुरू होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे घरातल्या बुजुर्ग लोकांना पतवंडे पाहण्याची घाई असे. म्हणून ते अगदी लहान वयात मुला मुलींची लग्न करायचे. म्हणजे मरण्यापूर्वी नातवंडांबरोबर काही दिवस तरी आनंदाने घालवू शकू.
बरेचदा बालविवाहाला कारणीभूत गरिबी असायची. कोणीतरी त्यांचा उपकार कर्ता असायचा. त्याची परतफेड करण्यासाठी लहान बालिकेचा सौदा केला जायचा.
कधी घराण्याची इज्जत राखली जावी. मुलाने किंवा मुलीने गैरव्यवहार करून लग्न करू नये. म्हणून बालविवाह करून दिले जात असत.
मुलीचे लग्न म्हणजे आई-वडिलांना एक ओझे वाटे. सासर कसे मिळेल, हुंडा किती द्यावा लागेल, लग्न खर्च किती होईल, ह्या काळजीमुळे, जमेल तसे, जमेल तेव्हा 'लवकर' लग्न उरकून टाकायचे हे ध्येय असायचे.
पूर्वी शिक्षणाचा अभाव होता. शिक्षणामुळे जी विचारांना प्रगल्भता यायची, योग्य निर्णय घेण्याची कुवत यायची, पण तसे काही घडत नसे.
पूर्वी रुढीला, परंपरेला धरून वागणारी लोकं जास्त असायची. तसेच लोकांचा अंधविश्वास फार असायचा. अमूक एका वयात लग्न झाले पाहिजे. नाहीतर काहीतरी बालंट येईल, असा अंधविश्वास असायचा.
कुटुंबातील एक तोंड विवाह करून दिल्यामुळे खायला कमी होईल. इतके दारिद्र्यहि घरात असायचे.
बालविवाह मुळे लहान मुले, मुली शिक्षणापासून वंचित राहत असत. त्यांच्यातील गुणांचा विकास होत नसे. विवाहानंतर अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबली जात असत. त्यामुळे आपल्या जीवनाला आपल्याला पाहिजे तसे वळण देऊ शकत नसत. जीवनाबद्दल ची स्वप्ने पाहणे तर दूरच!
लहान वयात गर्भारपण आल्यामुळे मुलींचा मृत्यू दर जास्त असे. अर्भकाचा मृत्यू दरही जास्त असे. तसेच मुलाचे कुपोषण होत असे. बरेचदा विकलांगता पण असे. काही कळायच्या अगोदर दिवस राहिल्यामुळे, आता जशी गर्भवती स्त्री व गर्भाची काळजी घेतली जाते, तशी काळजी त्याकाळी घेतली जात नसे. मुलींना चांगलंचुंगलं पोटभर खायला देणे हेही समाजाला मान्य नसे.
बालविवाहामुळे मुलीचं जिवंत संकुचित व्हायचं. तसेच मुलांच्या जीवनावरही हा परिणाम होत असे.
मुलाचा- मुलीचा शारीरिक व मानसिक विकास पूर्ण झालेला नसायचा. लवकर आलेल्या गर्भावस्थेत मुळे आलेल्या जबाबदाऱ्या ते पेलू शकत नसत. कशाचीच फारशी माहिती नसल्यामुळे यौन संक्रमित रोग होण्याचा धोका पण वाढायचा.
ह्या अन्यायकारक प्रथेविरुद्ध सर्वात प्रथम पुढे आले ते, राजा राम मोहन रॉय आणि केशवचंद्र सेन. त्यांनी ब्रिटिशांकडून एक बिल पास करून घेतले. त्यात मुलाचे लग्नाचे वय 18 वर्षे व मुलीचे 14 वर्षे वय प्रतिबंधित केले गेले. नंतर त्या सुधारणा करून Child Marriage Restraint नावाचे बिल केले. त्यात मुलाचे वय वाढवून 21 वर्षे व मुलीचे वय अठरा वर्षे केले गेले. तरीही बालविवाह पूर्ण थांबले नव्हते. सरकारने आणखी काही कायदे केले. बालविवाह निषेध अधिनियम 2006 हा नियम केला गेला. या कायद्यांतर्गत मुले वयात आल्यानंतर दोन वर्षाच्या आत आपला बालविवाह अवैध घोषित करू शकतात. आता मात्र बालविवाहाचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
हा बालविवाह थांबवण्यासाठी समाजात जागरूकता आली पाहिजे. ह्यात मिडीयाने मनावर घेतले तर खूप काही होऊ शकते. नाटके, सिरीयल जाहिरातीद्वारे या गोष्टींचे वाईट परिणाम दाखवू शकतात.
दृक-श्राव्य मिडीयाचा परिणाम जास्त होतो. शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हायला हवा. म्हणजे विचारांची व्याप्ती वाढेल. गरिबी दूर करण्यासाठीही झटले पाहिजे.
आज मुले, मुली खूप शिकतात. उच्चशिक्षण घेतात. त्यानंतर आपल्याला आवडेल अशी नोकरी किंवा धंदा करतात. त्यातही आपली काही ध्येये गाठण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या rat-race मध्ये लग्न मागे पडते. त्याला इतकी प्रायोरिटी दिली जात नाही. लग्नाचे वय उलटून जाते. तिशी केव्हाच उलटून जाते. एकीकडे असेच घडते आहे आणि दुसरीकडे बालविवाह.....?
शुभदा दीक्षित (11)
पुणे
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
"बालविवाह" .............बालविवाह या शब्दामध्येच बलविवाहाची व्याख्या दडलेली आहे.पूर्वी अगदी पाळण्यात सुध्दा लग्न ठरविलेले किस्से आजहि सर्वत्र ऐकावयास मिळतात.म्हणजे त्या मुलगा व मुलगीला कळू लागल्यानंतर त्याना सांगितलं जात असे की अमूक अमूक याचेशी पाळण्यातच लग्न ठरविले आहे.या ठिकाणी त्या दोघाच्या वयाचा अगर मनाचा अजिबात विचार केला जात नसत.आई वडील सांगितील त्या मुलाला अगर मुलीला संमती ध्यावी लागत असे.मुलाला ती मुलगी पसंत आहे का? आणि त्या बिचा-या मुलीला तो मुलगा तरी पसंद आहे का ? हा विचार त्या बालविवाहात केलेला नाही आज त्या मुलाचे वय किती आहे त्याच्या पेक्षा कितीतरी लहान व मुली चे आहे है पालकांनी समजून घेणेची गरज आहे. अशा बालविवाहामुळे त्या मुलीचे फार नुकसान झालेल्या कथा ऐकवयास येतात.कधी कधी बालविवाहात ठरविलेला मुलगा असाध्य रोगाला वैवाहिक सुख उपभोग ण्या अधीच जगाला निरोप देवून गेलेला असतो मग त्या अलपवयीन मुलीला तिच्या आयुष्यात सगळीकडे आंधारच पसरलेला संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून काढावे लागत असे.ज्या वयात मुलींच्या सोबत खेळण्या बागडण्याची वेळ असते त्याच वयात या बालविवाहाच्या वाईट चाली मुळे संपू्र्ण संसाराचे ओझे डोक्यावर पेलावे लागते ते केवळ वाईट परंपरागत चाली रितीमुळे पण उशिरा का होईना पालकांच्या
हे धोके लक्षात आल़ेले आहेत. समाज सुधारक सुध्दा पुढे येवून अशा पध्दती बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे.पूर्वी पती मयत झाला की पतीच्या चिते मध्ये पत्नी ने उडी घेवून स्वतः संपवून अशी अघोरी प्रथा या बालविवाहातून पुढे आलेली कारण विधवा स्त्री ला पतीच्या माघारी जगण्याचा अधिकारच हिसकावून घेतला जात असे ती पत्नी पतीच्या चितेमध्ये उडी घेणेस नकाळ देत असेल आरडाओरड करीत असेल तर तिचा आवाज इतरांना ऐकू जाऊ नये म्हणून नगारे किवा ढोल वाजवून तिला त्या चितेमध्ये ढकलून देत असत.हे सर्व त्या बालविवाहामुळे अशी प्रथा राजाराम मोहनराय किवा महात्मा जोतिबा फुले यांनी बंद करणेचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बालविवाह प्रतिबंद कायदा केलेला आहे.पूर्वी मुलीचे लग्नाचे वय १६वर्षे होते.पूर्वी गीताचे बोल ऐकलेले आहेत"सोळावं वरीस ग सरल..लगीन माझ ठरल " परंतु अलीकडे मुलीचे लग्नाच वय वर्षे १८ व मुलाचे वय वर्षे २१असे सरकार ने ठरविलेले आहे.यापेक्षा कमी वय असेल तर ते अलपवयीन समजली जातात.वय वाढल्या मुळे पालक मुलीला शिकवू शकतात.तसेच १८ वर्षानंतर सज्ञान समजली जात असल्यामुळे मुलगी व मुलगा एकमेकांना पसंत असलेतर लग्न करू शकतात त्याना कोणी अडवू शकत नाहीत. पालक सुध्दा तक्रार करु शकत नाहीत. कारण दोघांना सुद्धा मतदानाचा अधिकार सध्दा १८ वर्षानंतर प्राप्त झालेला आहे तसेच घटनेनुसार व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने ते दोघे सुखाने राहू शकतात. पण बालविवाह प्रतिबंदचा कायदा करुन सुध्दा चोरून अलपवयीन मुलीची लग्ने लावली जातात. मुलीच्या पसंती शिवाय आता लग्ने ठरत नाहीत मुलीला जर शिकण्याची इच्छा असेल तर पालक तिला पाठिंबा देतात आता ब-याच मुली शिकून उच्च पदावर काम करीत आहेत हे केवळ ती बालविवाह मुलींचे शोषण करणारी फध्दत बंद केल्यामुळेच हे शक्य झालेले आहे. आता मुलीचे वाढल्याने विवाह नंतर येणा-या सर्व शारिरीक जबाबदारी सक्षमपणे पेलू शकते.तसेच गर्भधारणा झाली तरी बाळाला जन्म देवून चांगली त्याची देखभाल योग्य रितीने करु शकते ही जाण आलेली असते जी बालविवाहाच्या वेळी तिच्या कडे नसते. आज एखादा पालक जबरदस्तीने अशा कोण्या मुलीचे लग्न लावून देत असेल तर अशा पिडीत मुलीला सहकार्य करुन पोलीसांना माहिती देवून होणारा बालविवाह थांबवला पाहिजे.पालकांना सुध्दा यातून धडा मिळेल.पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणी प्रमाणू बालविवाह नक्कीच थांबले जातील.आता मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत.आंतरधर्मीय व आंतरजातीय लग्ने करीत आहेत.त्यामुळे जातीअंत करणेचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला जात आहे.हे बालविवाह प्रथे सारखेच सामाजिक काम आहे.....
लेखक...जी.एस.कुचेकर-पाटील भुईज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
34
श्री.सुंदरसिंग आर साबळे
मो.9545254856
गोंदिया
बालविवाह प्रतिबंधक कायदा
==============
बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम' १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी मुलींचे वय किमान १८ आणि मुलाचे वय २१ वर्षाहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा सर्व जातिधर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे.
जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २. ५ कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताच्यादृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे.
भारतात किशोरवयीन लोकसंख्येपैकी २० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन भारतात आहेत. त्यातही दक्षिण आशियामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे युनिसेफच्या बालसंरक्षण विभागाचे प्रमुख जावियर एग्लिवार यांनी सांगितले आहे. मागील दशकात १८ वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात जवळपास ४७ टक्के होते. हे प्रमाण आता कमी झाले असून २७ टक्क्यांपर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बालविवाहामुळे महिलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान या सगळ्यांवर गदा येत असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत. भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. मात्र भारतीय समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात रुढ झालेला असल्याने कायद्याचा विचार न करता सर्रास बालविवाह लावले जातात. परंतु याचे प्रमाण मागील काही काळात कमी झाले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह रोखा ,
टाळा समाजाच्या प्रगतीचा धोका.
भारतात 2006 साल बाल विवाह प्रतिबंधक कायदा मंजूर झाला त्यामुळे वधूचे वय 18 पेक्षा कमी व वराची वय 21 पेक्षा कमी असेल तर शिक्षेची तरतूद व दंडाची तरतूद करण्यात आली. असे समाजविघातक कृत्य जो करेल त्यास दोन वर्षांची कैद; तसेच एक लाखाचा दंड .असे या शिक्षेचे स्वरूप होते .कायदा निर्माण झाला की लोक त्याला पळवाटा शोधतात हे तर नेहमीचे झाले आहे; मग कायद्याची अंमलबजावणी करणे थोडेसे अवघड होऊन बसते .भारतात वर्षानुवर्षे बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे अनेक मुलींचा मुलांचा 18 किंवा 21 पूर्वी विवाह होत असे परंतु ;यामुळे मुलीचे शारीरिक, मानसिक खूप नुकसान होत असे .अठरा वर्षांपूर्वी मुलीचे शरीर गर्भधारणा करण्यास सक्षम नसते. तिच्यावर मातृत्व लादले जाते. शिक्षणाचा अभाव' अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा यामुळे बालविवाह सर्रास होत असत. मुला-मुलींच्या जन्माअगोदर असे त्यांचे विवाह ठरवले जात असेल या प्रथेला महाराष्ट्रात "पोटाला कुंकू लावणे" असे म्हणत असत. बाल विवाह मुळे स्त्रीला शिक्षणाला आडकाठी आलेली होती .अठराव्या वर्षाच्या आत आधीच लग्न केल्यामुळे शिक्षण तर दूरच होते याचा परिणाम पुढच्या पिढीवर देखील होत असे' लैंगिक शिक्षणाचा अभाव' गैरसमजुती यामुळे स्त्रीवर कामाचा वाढता बोजा' कौटुंबिक जबाबदारी अधिक प्रमाणात पडत असे; यातून बाळंतपणामध्ये स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते. लवकरच मुले झाल्यामुळे स्त्रियांना आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. स्त्रीचे गर्भाशय आई होण्यासाठी अठरा वर्षांपूर्वी फारसे सक्षम नसते. आई होण्यासाठी ,बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी, मानसिक व शारीरिक रित्या तयार तयार नसते. याचा परिणाम बाळाच्या संगोपनावर होतो त्यामुळे स्त्रियांचा आणि मुलाचा देखील मृत्यू होऊ शकतो. स्त्रियांचा बाळंतपणात मृत्यू होण्याचा मृत्यूदर भारतामध्ये 2006 पूर्वी बराच होता. हा कायदा झाला त्या काळात लोकांना याविषयी फारशी जाणीव नव्हती त्यामुळे काही लग्न गुपचुप लावली जात असत परंतु काही स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी बरीच जनजागृती झाली; पथनाट्य झाली त्याद्वारे जाणीवजागृती झाली. त्यामुळे जे कोणी बालविवाह करतील अशांना दंडाची तरतूद असल्यामुळे प्रशासनाकडून दणका मिळाल्यामुळे या बाबतीत बरीच सुधारणा झाली. बालविवाहाला स्त्री बळी पडण्याची अनेक कारणे होते जसे मुलगी हे पालकांना ओझे असे वाटते लवकर लग्न करून दिले म्हणजे जबाबदारीतून मोकळे असे काही पालकांना वाटते. समाजात अत्याचाराच्या घटना वाढत आहे त्यामुळे मुलींना न शिकवता लवकर लग्न करून देण्याकडे पालकांचा कल आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर हमखास अठरा पूर्वी मुलींचे लग्न करून देण्याचा उपाय शोधला जातो. काही जमातींमध्ये मुलाकडून मुलीला लग्नाबाबत हुंडा घेण्याची प्रथा आहे मुलीचे वडील किंवा नातेवाईक यांना व्यसन असेल पैशाची हाव असेल तर अशा जमातींमध्ये अठरा पूर्वी लग्न करण्याची प्रथा पाळली जायची. मला आठवते 2008 झाली शाळे मध्ये तारा नावाची एक मुलगी होती तिचे वय 13 वर्ष होते ताराची पहिली आई वारलेली असल्यामुळे ताराच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते तिला घरी भरपुर काम करावे लागत असे ताराच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांनी ताराच्या आरोग्याकडे शिक्षणाकडे पुर्ण दुर्लक्ष केले होते त्यांनी अशा स्थितीत तारा चे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला परंतु शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सर्व जागरूक असल्यामुळे ताराच्या वडिलांना त्यांनी समजावून सांगितले तुम्ही असे केले तर तुम्हाला अटक होऊ शकते शिवाय नुकसान भरपाई म्हणून पैसे पोलिसात भरावे लागतील तेव्हा ताराचे वडील घाबरले; आणि त्यांनी हा विवाह थांबवला आणि तारा च्या आयुष्याचे होणारे नुकसान टळले. अशा कितीतरी तारा आपल्या सर्वांच्या अवतीभवती आहेत. आई वडील नसणे किंवा आई वडील यापैकी एखादे हयात नसणे ;त्यामुळे ही जबाबदारी नको म्हणून देखील मुलींचे विवाह लवकर केले जातात. त्यात समाजामध्ये असलेली वाईट अत्याचाराची प्रवृत्ती देखील कारणीभूत आहे. वयाच्या अठरा पूर्वी लग्न लावून दिल्यास ना शिक्षण; ना शारीरिक क्षमता यामुळे आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या स्त्रीयांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते .त्यात लवकर वैधव्य आल्यास तिच्यापुढे शिक्षण नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी कोणता मार्ग शोधायचा हादेखील प्रश्न आ वासून उभा असतो. स्त्रियांना पूर्ण शिक्षण घेऊन दिल्यास ; त्यांच्या पायावर उभे केले असता त्यांना सामाजिक आर्थिक जबाबदारीची जाणीव होते, व पुढे त्यांच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या संकटांशी लढण्याची ताकद निर्माण होते. आई म्हणून, कुटुंबातील स्त्री म्हणुन ती कणखर रित्या सर्व आव्हानांना सामोरे जाऊ शकते व एक सशक्त भारतीय पिढी जन्माला येऊन सशक्त राष्ट्र उभारणीस नक्कीच हातभार लागेल. तेव्हा सर्वांनी बालविवाह रोखण्यासाठी जरूर पुढाकार घ्यावा सशक्त समाज उभा करण्यास सज्ज व्हा.
सविता साळुंके, श्रीरामपुर, कोड नंबर 13
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह....
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
[१७] (वाकदकर)
********************************
सरणावर जळताना
मज इतुके कळले होते
मरणाने सुटका केली
जगण्याने छळले होते
.... ही अवस्था आहे स्त्रीच्या जगण्याची.ही सत्य परिस्थिती आहे इथल्या समाजाने तिला उपभोगायला लावलेल्या परिस्थितीची.
फुलनारं फुल तयार होण्याआधीच कळी या अवस्थेेमध्ये असतानाच त्याला कुचकारून टाकणेे म्हणजे निसर्गाच्या विरोधात हत्यार उपसल्या सारखेच आहे.
या अवस्थेत तोडलेली कळी म्हणजे मानवी नजरेच्या हावरटपणा चे कुश्चीत धोरण आहे...कळीचे फूल उमलले असते तर त्याचा सुगंध सुद्धा अनंत दरवळला असता,आणि निसर्गाचं सौंदर्य सुध्दा आपसूकच खुलले असते..
याच पद्धतीचे प्रतिबिंब आज समाजात बघायला मिळतं आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या अगोदरच मुलींचा विवाह पार पाडल्या जातोय.आणि असुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्त्रीच्या म्हणजेच मुलीच्या जबाबदारीतून फार मोठी उतराई झालो आहोत असा आव मुलीच्या पालकाकडून व्यक्त केला जातोय....याचा अर्थ कायद्याने किती अंमलबजावणी करायची ठरवली तरी सुद्धा बालविवाह ही आपल्या समाजव्यवस्थेला लागलेली कीड आणखी तरी पूर्णतः नष्ट झालेली नाही असे चित्र सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर दिसून येत आहे.
एक दुर्लक्षित असलेली परंतु अत्यंत गंभीर असलेली 'बालविवाह' ही एक समस्या आहे. आजही भारतात होणाऱ्या एकूण विवाहांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विवाहांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त विवाह हे बालविवाह असतात. आजही बालविवाह होणाऱ्या मुलींचे वय 12 ते 16 वयोगटात असते. केवळ आदिवासी, भटके यांच्यातच नव्हे तर सर्वच जातींमध्ये बालविवाहाचे प्रमाण अत्यंत गंभीर आहे.
राजा राम मोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि प्रथम विरोधात बंड पुकारले आणि समाजाला सत्याची जाणीव करून मानवतेची जागृती करून दिली.पण तो आजही इतक्या वर्ष झाले तरीसुद्धा 'बेटी धन पराया का' तेव्हा 'मुलगी म्हणजे काचेचे भांडे' या अवस्थेमध्ये तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याचे चित्र समाजात बघायला मिळतं.
वयात आलेली मुलगी म्हणजे आई-वडिलांच्या जीवाला घोर होऊन बसते आणि कधी एकदाचा हीच दोनाचे चार हात करून टाकल्या जातात....? असा प्रश्न पालकांच्या मनाला भेडसावत असतो.मुलीचं पाऊल वाकडं पडलं तर समाज सुद्धा त्या कुटुंबाला उपेक्षित करतो हे त्यामागचं कारण असलं तरी सुद्धा यामध्ये विटंबना आणि कुचंबणा होते ती त्या मुलीचीच....
स्त्रीत्वाचा रक्षणासाठी अनेक कायद्यांच्या कलमा आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेल्या असून त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती सुद्धा केलेल्या आहेत... हे शब्द आजही मुलींवर होणारे अत्याचार ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे.याच भीतीपोटी अगदी पंधरा सोळा वर्षाची मुलगी असताना तिच्या अंगाला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधलं जातं,आणि या चिमुरडीला त्या विवाहबंधनात अडकून तिच्या जीवनाचा खेळ मांडला जातोय.
कमी व यामध्येच सांसारिक जबाबदारी पडल्याने नक्कीच त्या मुलीच्या मनाची ससेहोलपट झाल्याशिवाय राहत नाही.ज्या वयात खुलायच असत त्याच वयामध्ये जबाबदारीचं ओझं त्या मुलीच्या खांद्यावर टेकवल्या जातं आणि यातूनच सुरू होतो तिच्या भविष्याच्या अंधकाराचा खेळ.शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतानाही, संसारिक जबाबदारीची जाणीव पूर्णता नसतानासुद्धा ही जबाबदारी स्वीकारायची व त्यातल्या त्यात 'चूल आणि मूल' या संबंधाना तिला जखडवल्या जात असल्याने खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीला संपवण्याचे हे जणू षडयंत्रच दिसून येतं.
एकीकडे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करताना आणि सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा प्रत्यक्षात आणताना बालविवाह हा सर्वात मोठा अडथळा आहे. याचे कारण ती मुलगी बालविवाहानंतर कायमस्वरूपी आजारी होते. तिच्यात सातत्यानं न्यूनगंड राहतो, होणारी संतती ही कमी वजनाची आणि कुपोषित असते ती मुलगी कमी शिकलेली आणि निरक्षर राहिल्याने स्वावलंबी होऊ शकत नाही.
बालविवाहाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जीवन, ग्रामीण जीवन शैलीतील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण, मुलींच्या असुरक्षिततेची भावना, पालकांचे अज्ञान आणि दारिद्रय, शिक्षण व्यवस्थेचा अभाव, आरोग्य चळवळीची असक्षमता, परंपरागत चालीरीती अशा अनेक कारणांनी कच्चा राहणाऱ्या या घड्याला तडा दिला जातो. आणि त्याचे अनिष्ट परिणाम समाजाला दिसून येतात.
'नारी तू नारायणी' हा विचारच खुंटीला लटकून दिला जात असताना शासनस्तरावर आणि समाजसेवी संस्थांनी अनेक उपाययोजना करणे गरजेचे ठरते.यामध्ये किशोरवयीन मुलींची शिक्षण विषयक जागरुकता आणि शारीरिक सुदृढतेचे जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण करून देणे याचबरोबर पालकांचे समुपदेशन करणे अगत्याचे ठरते.शासनस्तरावरून घटनेतील बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे.विविध उपलब्ध विचारपीठावरून बालविवाह प्रतिबंध यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून समाजाची मानसिकता बदलणे सध्यातरी गरजेचे वाटते.......
-श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
...... बाल विवाह...........
बाल विवाह हा एक समाजातील सोळा संस्कार पैकी एक आहे.विवाह अनेक प्रकारचे आहेत.बालविवाह म्हणजे काय ? तर याचे उत्तर म्हणजे मुली चे वय अठरा वर्ष होण्या पूर्वी व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होण्याच्या आधी जो विवाह केला जातो त्याला बालविवाह म्हणतात.कारण मुलीला वय वर्ष १२ते१४या कालावधीत ऋतु प्राप्ती होते आणि मुलामध्ये वय वर्ष १४ते१६ या कालावधीत रज उत्पन्न होते.आणि या वयात मुल मुली एकमेकांकडे आकर्षित होतात.मुलाला या कालावधीत ओठावर मिषा येतात आणि आवाज घोगरा येतो.या मुळे मुल वयात आल्याचा भास होतो.आणि मुलींमध्ये या वयात शारीरिक बदल घडून येतो आवाज घोगरा निघतो .तोंडावर मुरूम येतात .आणि समोर ही लहान पण पासून एकत्र बसणारी मुल मुली एकमेकांपासून दुरावतात.आणि भावनिक अकर्शिक्तेत अटक्तत आणि वाम मार्गाने वळतात आणि.शेवटी याचे रूपांतर विवाह पर्यंत पोहचते.परंतु या कालावधीत मुल आणि मुलींची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता झालेली नसते.पुढे हे मुल संसाराच्या जाळ्यात अटक्तात आणि पुढे अनेक मानसिक ,सामाजिक,शारीरिक आर्थिक अशा विविध समस्या चा सामना करण्या शिवाय यांना पर्याय नसतो.पुढे जन्माला येणारे बाळ ही नाजूक जन्म घेतो.
यांमध्ये समाजाचा खूप मोठं नुकसान होते.
पूर्वीच्या काळी दोन स्त्रिया गरोदर असतील तर त्यांचा पोटातच विवाह ठरवल्या जायचे.आणि जन्म झाला की काही दिवसात नंतर लग्न लाऊन टाकत आणि वयात येई पर्यंत मुलीला मासिक पाळी येई पर्यंत आई वाडीलाकडे ठेवत असत.आणि नंतर पाठवत असत.या मध्ये मुली आयुषयभरासाठी दडपणात राहत असत.मुलींना फक्त "चूल आणि मुल " तेवढयाच बंधनात अतकवल्या जात असे.समाजाचा पूर्ण विकास खुंटला होता .पुढे काही अभ्यासकांच्या लक्षात आले आणि त्यांनी बालविवाह विरोधी कायदा तयार केला.समाज जागृती घडवण्यात आली पुढे समाज चळवळीतून संदेश देण्यात आला.आणि शासनाने बालविवाह विरोधी बडोदा सरकारने १९०४ सली कायदा केला मुलीचे वय १२व मुलाचे वय १६ असा कायदा केला होता.पुढे १९२७ या वर्षी इंदूर सरकारने मुलगी १२ वमुलगा १४ वयाचा असावा असे ठरवले.आणि पुढे हळू हळू समाजात प्रतिसाद मिळत गेल्यावर मुलाचे वय २१व मुलीचे वय १८ वर्ष करण्यात आले . कायदा १९२९ कलम ३७५ नुसार कडकं कायदा करण्यात आला.आणि बालविवाह साठी अळा बसत गेला.
विवाह चे प्रकार
१)ब्रम्ह विवाह. .. ब्रह्म विवाह म्हणजे वर आणि वधू या दोन्ही पक्षांकडून असलेली सहमती म्हणजे ब्रम्ह विवाह.
२)दैव विवाह...धार्मिक कार्यात मुलगी देवाच्या नावावर दान देऊन केलेला विवाह .
३)आदर्श विवाह...वधू मुली चे पक्षांना दान देऊन केलेला विवाह
४)प्रजा पत्य विवाह...मुलीची सहमती नसताना केलेला विवाह.
५)गंधर्व विवाह.....परिवराच्यालोकांची सहमती न घेता केलेले विवाह .
६)असुर विवाह...मुलीचे मोल करून विवाह करणे .
७)राक्षस विवाह....मुलीचे अपहरण करून केलेले विवाह.
८)पैशाचं विवाह ...मुलीचे गैर मार्गाने शारीरिक संबंध साधून केलेलं विवाह.
अशा प्रकारे विवाहाचे प्रकार आहेत.आणि हल्ली काळामध्ये तंत्र ज्ञाना मुळे प्रेम विवाह अतिशय वाढले आहे.मोबाईल, फोन,फेसबुक,या माध्यमातून ओळख पटवतत आणि कोणाचीही परवानगी न घेता विवाह करतात आणि आपल्या संसाराचे वाटोळे करतात.
म्हणून सर्व समाजातील घटकाचा मुद्दा आहे की बाल विवाह रोखणे.
तरीही पण भारतात ७५/ लोक ग्रामीण भागात राहतात आणि मागास प्रवर्गातील जनतेमध्ये अजुन सुधा सुधारणा झाली नाही.मी एकदा मागच्या वर्षी झारखंड येथे lep च्या प्रशिक्षणात सह भागी झालो होतो.त्या भागातील मुलांची मुलाखत घेतली .त्यांनी सांगितले आमच्या भागात लग्न खूप कमी होतात . तेथे गावागावात यात्रा भरते यात्रेनिमत्त मुले मुली एकत्र येतात आणि सरळ मुलगी मुलाच्या घरी जातात त्यात वयाचे काहीही बंधन नसते.तात्पर्य की अजुन देखील बालविवाह थांबलेले नाही .याचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव.
जीवन खासावत
भंडारा ९५४५२४६०२७
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह
बालविवाह म्हणजे बालपणी नकळत्या वयात झालेले विवाह. आमची आजी सांगायची, फार पूर्वी पाळण्यातच लग्न लागायची. त्यानंतरच्या काळात मुलगा-मुलगी पाच ते नऊ वर्षांचे झाल्यावर विवाह होऊ लागले. या वयात लग्न म्हणजे काय याचा अर्थही कळत नाही त्या वयात लग्न करून सासरी यायचे म्हणजे मुलीवर अत्याचार केल्याप्रमाणे होते. इंग्रज राजवटीने भारतीयांना शिक्षणाचे बाळकडू पाजले नि बालविवाह, सतीप्रथा, विधवा विवाह या सर्व कूप्रथा आहेत हे समाज सुधारकांच्या लक्षात येऊ लागले.त्या काळी बालमृत्यूचे प्रमाणही जास्त होते. बालवयात लग्न झाल्याने वधू किंवा वर यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असायची. शिवाय पुनर्विवाहाची प्रथाच
नव्हती.
नवरा मेल्यावर त्या बालिकेला सती जावे लागे किंवा केशवपन करून एका बाजुला बसावं लागे. नातेवाईकांचे लग्न, सणसोहळा,समारंभामध्ये भाग घेणे तिच्यासाठी वर्ज्य होते. त्यामुळे सर्व आयुष्य वैधव्यात काढणे म्हणजे मरणप्राय होते. त्यातून समाजाच्या नजरा चुकवून राहणे म्हणजे अजूनही कठीणच. त्यातून एखादीचे पाऊल वाकडे पडले तर तिला आत्महत्या करण्यावाचून पर्याय नसे. लग्न झाल्याने मुलगी वयात येईपर्यंत म्हणजेच गर्भधारणा होईपर्यंत मुलगा प्रजोत्पादन सक्षम होणे म्हणजे परिपक्व होईपर्यंत त्या बालकांना लहान मुलांसारखे वागण्यावर निर्बंध लादले जात.ते बालक असूनही लहान मुलाप्रमाणे खेळणे ,उड्या मारणे यावर निर्बंध होते. वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मानसिक कुचंबणा केली जाई. त्यामुळे समाजविघातक अशा चाली-रीती, रुढी-परंपरा समाजासाठी किंवा सुधारणांसाठी किती बाधक आहेत हे कळू लागल्यावर कायद्याने या प्रकारांवर बंदी आणली.
महात्मा फुले,ईश्वरचंद्र विद्यासागर भांडारकर, महर्षी कर्वे, राजाराम मोहन राय या अशा सुशिक्षित लोकांनी प्रथम कूप्रथांविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. सनातनी लोकांना हे सर्व समाज विघातक कृत्य वाटून त्यांनी समाज सुधारकांना प्रचंड विरोध केला.तरीही सुधारकांनी आपल्या हेका सोडला नाही. त्यामुळे सनातनी म्हणवणार्या लोकांना माघार घ्यावी लागली. वधू किंवा वर स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत किंवा त्यांना जबाबदारीची जाणीव होत नाही तोपर्यंत लग्न लावणे म्हणजे पोरखेळ होता. आता समाज बराच पुढारलेला किंवा विकसित झालेला आहे. साक्षर झालेला आहे. आपल्या बरेवाईट समजण्यास सक्षम आहे. त्यामुळे बाल विवाहातील नफे तोटे किंवा त्यांतील फलित चांगलेच ओळखून आहेत. सरकारनेही आता मुलीचे लग्नाचे वय १८वर्षे तर मुलाचे २१वर्षे केले आहे. त्या पूर्वी लग्न केले तर कायद्याचा बडगा दाखवला जातो.तरीही काहीवेळा समाजामध्ये कायद्याच्या पळवाटा शोधून मुलांचे किंवा मुलींचे बालविवाह केले जातात. तरी हे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. आता समाज साक्षर झाल्याने त्यातील तथ्य ओळखून गेला आहे.या जुन्या रूढी,प्रथा समाजासाठी आणि मुला-मुलींसाठीदेखील किती घातक आहेत हेही कळून चुकला आहे.
सौ.भारती सावंत
मुंबई
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बालविवाह:एक अनिष्ट प्रथा
फार पूर्वी भारतात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती.त्या काळच्या सामाजिक दृष्टिकोनातून कदाचित ती प्रथा त्या काळच्या अराजक स्थितीतून निर्माण झाली असावी.यवनांचे आक्रमण ,विविध सम्राटांमधील साम्राज्यविस्ताराचे धोरण यातून सतत अस्थिरतेचे वातावरण असल्याने मुलीचा जन्म म्हणजे पालकांना मोठे संकट वाटायचे.अशा परिस्थितीत मुलींचा विवाह अगदी बालवयातच नव्हे तर कधी कधी पाळण्यातच विवाह करण्याची पद्धती होती.
तत्कालीन सामाजिक स्थिती व स्त्रिया,मुलींवर होणारे अत्याचार या साठी राजस्थान मध्ये स्त्रियांनी केलेला जोहर इतिहासात वाचायला मिळतो. त्यातूनच या बालविवाहाला भारतात जास्तच चालना मिळाली.भारतात 2006 ला बालविवाह प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला.तत्पूर्वीच कायद्यानुसार मुलीचे वय अठरा व मुलाचे एकवीस वर्षे ठरले आणि कायद्यानुसार मुलीचे वय18 च्या आत व मुलाचे वय 21 च्या आत असेल तर तो बालविवाह मानला जाऊ लागला.अगदी शिवरायांच्या स्वराज्याच्या काळातही बाल विवाह पद्धती आतित्वात असल्याचं दिसून येतं. परंतु आपण वैदिक काळाचा विचार केला तर मात्र त्या काळी बाल विवाह प्रथा अस्तित्वात असल्याची उदाहरणे आढळत नाहीत. या बालविवाहामुळे समाजात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत होते.पुढे पुढे ही प्रथा म्हणजे एक सामाजिक ओझं वाटू लागलं .यातूनच पुढे संमतिवयाचा प्रश्न निर्माण झाला. जरठकुमारी विवाह, बालविधवांची समस्या, अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या काही स्त्रियांचे अनाचार व त्यातून जन्माला येणाऱ्या अनौरस संततीचा प्रश्न, भ्रूणहत्या इ. अनेक विषय बालविवाहाशी निगडित अनेक प्रश्न निर्माण झाले .
यातूनच एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेच्या चळवळी सुरु झाल्या. त्यात बालविवाहाचा प्रश्न अतिशय तीव्रपणे चर्चिला गेला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन या बंगाली व जोतीराव फुले, म. गो. रानडे, गो. ग. आगरकर, धो. के. कर्वे अशा अनेक समाजसुधारकांनी बालविवाहाच्या विरूद्ध सामाजिक रणशिंग फुंकून स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. बेहरामजी मलबारी, लाला गिरिधारीलाल, रायबहादुर बक्षी सोहनलाल, हरी सिंग गौर, हरविलास सारडा यांनी बालविवाहच्या संदर्भात कायदा करून सुधारणा करावी या मताचा पुरस्कार केला.त्यासाठी कायदेमंडळात बालविवाहबंदीची विधेयकेदेखील आणली.बालविवाहात स्त्रियांवर अकाली मातृत्व लादले जाण्याचा दोष होता. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्याच वयात स्त्री-पुरुष संसारात पडत. यामुळे समाजातून शिक्षणाची आवडच नाहीशी झाली. आयुर्मान घटण्यास बालविवाह आणि अकाली मातृत्व हीदेखील कारणे होती. समज येण्यापूर्वीच लग्न होत असल्यामुळे,पसंत नापसंत हा भागच नसल्याने आईवडील शोधून देतील तशा वराबरोबर अथवा वधूबरोबर जीवन कंठणे भाग पडे. त्यातून कौटुंबिक ताण निर्माण होऊन, संघर्ष होत आणि पहिली पत्नी सोडून देऊन दुसरी केल्यामुळे पहिलीला परित्यक्तेचे जीवन जगावे लागे. ही स्थिती सुधारण्यासाठी पुढे अनेक कायदे करण्यात आले
तत्कालीन समाज सुधारकांनी बालविवाहाची अनिष्टता समजावून देण्यासाठी वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले;व्याख्याने दिली; वादविवाद केले. औद्योगीकरण जसजसे वाढत गेले व शहरांची जसजसी वाढ होत गेली, तसतशी बालविवाहांना साह्यभूत होणारी एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होऊ लागली. स्त्री-शिक्षणाचा प्रसार होत गेला व बालविवाहाची चाल हळूहळू बंद होत गेली.आजही काही ठिकाणी ही चाल वेगळ्या पध्दतीमध्ये सुरू असल्याचं दिसून येतं.आजही अशिक्षित असणाऱ्या दुर्गम भागात बालविवाह केल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.
बालविवाहासंबंधी विविध स्वरुपाचे कायदे करण्यात आलेले असले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे इतकंच काय ते समाधान!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें