तथागत भगवाब गौतम बुद्ध आनंदच्या बाबतीत म्हणाले होते की,
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो
*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- एकोणिसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 07 मे 2020 गुरूवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- आनंद / सुख*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
★★★★★★★★★★★★★★★★★
*आनंदाचे मुळ स्त्रोत -प्रेम*
रविवारचा दिवस उजाडला तारीख फेब्रुवारीतील. साकेत पब्लिक शाळेच्या *आर्ट ऑफ लिव्हिंग*'च्या लाँग क्रियेच्या फाँलो अपसाठी गेली असतांना , सुदर्र्शनक्रियेनंतर कानावर पडलेले सर्वप्रथम शब्द .आजचा संदेश-" प्रेम करा आनंदी रहा " प्रेम करा फुलांवर ,पक्षावर आई-बाबांवर, भावा- बहिणीवर ,मित्र - मैत्रीणीवर जीवित असो वा वस्तू रूपाने असो सर्वांवर प्रेम करा .दुसरा आपण आनंदी ,खुश केव्हा असतो ? मन शांत असते आणि आनंदी असतो तेव्हा. आनंदी मनात सत् विचारांचा पाझर फुटत असतो . मन प्रफुल्लित होत असते.
कोणतीही वस्तू वा व्यक्ती ज्यामध्ये कुणाच्यातरी सुखाची अनुभूती निर्माण होते . त्या वस्तू किंवा व्यक्ती मध्ये असणाऱ्या मनुष्याची प्रेम भावना असते . आपण चिमुकल्या मुलांना पाहून आनंदी होतो . खुशी मुलांमध्ये निवास करीत नाही तर तो आनंद मुलाला पाहून निर्माण झालेल्या प्रेमामध्ये वास करीत असतो म्हणूनच तर म्हणतात ना ," मी प्रेम करतो " , "त्यांचे डोळे खुपच प्रेमळ आहेत."
लोभी धनाला पाहून खूप आनंदी होतो . ह्याचा अर्थ असा नव्हे की धनात आनंद लपला आहे . धनाला पाहून त्यांच्यात प्रेम निर्माण झालेला असतो. दोन मित्रांचे उदाहरण घ्या. ते एकमेकाजवळ येतात. खूप आनंदी होतात .याचे एकमात्र कारण असे आहे की तो त्यांच्यातील एकमेकासाठी असलेला प्रेमच .त्यात किंतू, परंतु ,स्वार्थ आणि भ्रमिक कल्पना असल्या तर प्रेम भावना नष्ट होते. आनंदाची अनुभूती होत नाही .तेच पुढे स्वार्थी वृतीला खतपाणी देत असतात आणि स्वार्थापोटी वातावरण धीरगंभीर करण्याला कारणीभूत ठरतो व आनंदाला दुरावतो.
*आनंदाचे डोई आनंद तरंग*
आनंद हा व्यक्तीत नसतो ,तर त्याबद्दल होत असलेल्या प्रेमात असतो. म्हणूनच आपण आनंदी असलो तर प्रेमळ भावना निर्माण होते. कलाकार किंवा भावना प्रिय व्यक्ती सोबत सामान्य व्यक्ती यांना एकत्रीत निसर्गाच्या सानिध्यात नेले तर, ते नैसर्गिक सौंदर्य बघून आनंदी होतात . त्यांना फुलाचे सौंदर्य ,पक्षाची किलबिल , झाडाच्या पानांचा स़डसडात ,नद्यांची कलकल ,आकाशातील ढगांची झुंबळ, चांदण्यांची चकमक इत्यादी सर्वच त्यांना आत्मविस्तृत करीत असते. पण,सामान्य व्यक्तीला भावणाहिन व्यक्तीला त्याबद्दल अजिबात काही वाटत नाही .याचे एकच कारण असते की, त्याच्या भावनिक तेने जोडलेला व्यक्तीत कलाकार दडलेला असतो. व्यक्तीत कवी दडलेला असतो सौंदर्य प्रेम मनात दडलेले असते. ते सामान्य माणसाला जमत नाही.
एखादा व्यक्ती ईश्वराचे गुणगाण करीत असतो. भजन,कीर्तन ,सत्तसंग यात सहभाग घेऊन आनंद लुटत असतो. त्याचे ईश्वरावर प्रेम जडलेले असते. आनंद भजनात कीर्तनात नसतो तर त्यात वास करणार्या प्रेमात असतो .घराचे काहीच अस्तित्व नसते त्याच प्रमाणे त्याला देखील स्वतःचे काहीही अस्तित्व नसते . तसेच प्रकाशाचा अभाव अंधार आहे .प्रेमाचा अभाव दुःख आहे .अशावेळी मनोविकार व कुवचन निर्माण होणे म्हणजेच सुविचार ,सत्कार्य , सत्विविचारांचा अभाव होय . इर्षा ,द्वेष इत्यादीचे अस्तित्व राहते खरं . यातही प्रेमाचा प्रकाश जो पर्यत पसरत नाही तोपर्यत त्यांच्यात आनंद निर्माण होतं नाही.
हृदयात प्रेमाचा प्रकाश पसरल्याने माणसाचे मनोविकार तर दूर होतातच .सकारात्मक भावनांचा प्रचार प्रसार होतो. जडता क्षणीच दूर होते . चंद्र समोर येताच काळे ढग दूर पांगू लागतात.
खरे प्रेम म्हणजे," जे होणार आहे,जे होणार नाही, त्यांचा स्वीकार करणे" प्रेमात माणसाला बदलण्याची शक्ती असते. आयुष्य बदलण्याची युक्ती सुचते. मनुष्य जीवनातील सर्वश्रेष्ठ वरदान आंनदअनूभुती आहे.
राग आणि द्वेशहे मानवी मनाला चंचल बनविण्यात मदत करतात .केवळ मन जेव्हा शांत असतो तेव्हाच आनंदाची उत्पत्ती होत असते.सर्वात मोठी दिव्यता म्हणजेच परमानन्द.केवळ मानवी शरीरात पाहू शकतो ,अनूभवू शकतो .आणि मानवी जीवनात असून आपण यांची गोडी चाखली नाही तर आपण खरोखरच अभागी असणार.
ज्या व्यक्तीला प्रेम मिळाला त्याच्या हृदयात प्रेम निर्माण झाला की, त्याला अपार शक्तीसंपदा मिळाल्यासारखे असते. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग काही शिल्लक उरत नाही .प्रेमाची अनूभूती अमृत रूपात असते . प्रेमाचा संचार झाल्यावर त्यांच्या हृदयात आनंदाचा पाझर फुटत असतो . शरीर स्वस्थ आणि आत्मा उजळ होत असते. प्रेमात खूप वशीकरणाचे बळ असते . त्यामुळे शत्रू मित्र व घातक पालक उपासक बनतात. देव म्हणजेच प्रेम . हे निस्वार्थ भावनेतून सेवा केल्याने प्राप्त होत असते. जर जीवनात सुख शांती ची आवश्यकता आहे तर, समाजात असलेल्या दीनदुबळ्या वर्गात जाऊन सत्कार्य करून प्रेमाचा उचांक गाठण्यासाठी सेवाकार्य हाती घ्यावे. हे केल्याने जीवनात आनंदाची प्राप्ती होत असते.असा आनंदोत्सव साजरा करावा . सेवेत घातलेला वेळ प्रेममय नजरेतून मिळणारा आनंद हा आपल्याला परमआनंदाची प्राप्ती करून देणारा असतो.
लेखिका ---
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*( 9420516306 )*
★★★★★★★★★★★★★★★★★
- *आनंद*
आनंदाचे डोही आनंद तरंग|
आनंदाचि अंग आनंदाचे ||
संत तुकारामांच्या या अभंगांमधून मन प्रसन्न आणि आनंदी ठेवण्याचा उपदेश आपल्याला मिळतो आहे. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग आहेत, आनंदाच्या लाटा आहेत, आनंदाच्या अंगी आनंद भरलेला आहे. सुखाच्या शोधात निघालेल्या माणसाला नात्यागोत्याचा विसर पडत चाललेला आहे. स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार आहे. रक्ताची नाती संपवायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. गौतम बुद्धाने ऐश्वर्याचा त्याग करून दुःखातुन मार्ग काढण्यासाठी तपश्चर्या केली. माणूस दुःखमुक्त व्हावा यासाठी त्यांनी काही तत्त्वे सांगितली. पंचशिल तत्वाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.देशात देशाबाहेर सुद्धा त्यांनी आपल्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार केला. अशा महान संस्कृतीच्या देशांमध्ये आपण जन्मलो असून सुद्धा आपल्याला खरा आनंद शोधता आला नाही. दुसऱ्याला सुख वाटल्यानंतर जी आपल्याला प्रचिती येते तो खरा आनंद आहे. परंतु आज काल दुसऱ्याचे सुख हिरावून घेण्याची प्रवृत्ती अधिक आहे. त्यामुळे आनंद हरवत चाललेला आहे. क्षमतेपेक्षा जास्त मोठी स्वप्न पाहण्यात आपला दिवस जातो, आणि ती पूर्ण नाही झाली की दुःख निर्माण होते. आणि दुःखाचं नैरश्या मध्ये रूपांतर होते. नैराश्यातून अधोगती आणि अधोगतीतून शेवट. माणसाचा आपल्या कर्तुत्वावर विश्वास असला पाहिजे. श्वास आणि विश्वास जोपर्यंत माणसाच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत खरा आनंद आहे. स्वप्न आणि सत्य यामधील फरक जर माणसाच्या लक्षात आला तर जगण्यात अडचण निर्माण होणार नाही.आणि जगण्यात अडचण निर्माण झाली नाही तर आपण दुःखी होणार नाही. आणि खरं पाहिलं तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते आणि मनासारखी होत नाही म्हणून आहे त्यामध्ये समाधान शोधले पाहिजे, समाधान जर शोधलं तर त्यातच खरा आनंद आपल्याला मिळून जाईल.जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय आनंदाची किंमतही आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्यातील अहंकार आपल्या सुखाला आणि आपल्या आनंदाला आडवा येत असतो. दुसऱ्याचा आदर करण्याची वृत्ती जर आपल्या मध्ये असेल तर आपला देखील कुठेही अपमान होणार नाही याची खात्री आपल्याला देता येऊ शकते. आपल्या बॉसचा जसा सन्मान करतो मान राखतो तेवढाच शिपायाचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. आपल्या मध्ये ही प्रवृत्ती असेल तर आपल्याला निश्चितच आनंद उपभोगता येईल. सुखाच्या शोधात वणवण फिरण्याची किंवा भटकण्याची आवश्यकता नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण त्यासाठीच म्हटले आहे. आणि आनंद प्राप्तीची सिद्धी सुद्धा आपल्याला मनातूनच मिळू शकते..... आणि म्हणूनच....
माझ्यात गुंतलो मी
मला न भान कशाचे...
उजळो नशीब कोणाचे
वा जळो घर कोणाचे....| मला काय त्याचे..
गरज नसतानाही
बरसतील फुल तुझ्यावर
अन कधी बोचतील शूल
माझ्या शब्दाचे...|| मला काय त्याचे...
तुडवून मढ्याला आम्ही
गाठतो ध्येयाला
पायाखालचे मढे
असो नात्याचे वा गोत्याचे...||| मला काय त्याचे..
स्वार्थ आमच्या रक्तात
तोच जपतो वागण्यात
घरा बांधावरच्या वादात
मुडदे पडतील भावकीचे...|||| मला काय त्याचे..
कळवळा मुळीच कोणाचा
येत नाही आम्हाला..
बेरजेचेच हिशोब साऱ्यांचे
तेच रंग आमच्या अंतरीचे..|| मला काय कोणाचे
ह्या प्रवृत्तीने आपले जगणे असेल तर यातून मिळालेल्या सुखाला आणि आनंदाला काय अर्थ किंवा काय किंमत. दुसऱ्याला समाधानी करण्यात मिळणारा आनंद आणि मिळणारे सुख हे अवर्णनीय असते. याची प्रचिती अनुभव घेणाऱ्यालाच मिळते.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
★★★★★★★★★★★★★★★★★
*आनंद हे यशाचे गमक*
स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतो. इतरांना आनंद द्या त्याबद्दल तुम्हालाही नक्कीच आनंद मिळेल, समाधान मिळेल. आयुष्याच्या यशाचे खरे गमक याच्यात आहे. सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेला माणूस शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणा ने वागलाय. जन्माची चाहून तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचे मात्र अकस्मात असतं ..कारण त्याला माहित आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो दुःख येणार हे मात्र पचवू शकत नाही. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं , विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोळलं की प्रेम संपतं. म्हणूनच स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे आनंद घ्या.
ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान असेल तोच खरा श्रीमंत माणूस .
छोट्या छोट्या गोष्टी मधला आनंद जगण्यातला मोठा आधार बनतो इच्छा आकांक्षांचा काय त्या तर पदोपदी बदलत असतात.
आनंदी राहणं ही एक कला आहे. मुख्य म्हणजे ज्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे, क्षणांमुळे आनंद मिळतोय त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहायचं. आनंदी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना पीस आणि ब्लिस, आनंद, मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं ‘रिप्रोग्रॅमिंग’ असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक आनंदाची निरंतर शक्यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.
पहिली भावना आहे कृतज्ञतेची. एक गोष्ट सांगतो, माझ्या घराजवळ एक पंचतारांकित हॉटेल आहे. अतिश्रीमंत लोकांची, आलिशान गाडय़ांची वर्दळ सुरू असते. आतलं भपकेबाज वातावरण बाहेरूनही जाणवतं. हॉटेलच्या बाजूच्या कम्पाऊंड वॉलच्या आडोशाला एक वृद्ध, चपला शिवायचं काम काम करीत असतो. नारायणकाका म्हणतात त्यांना. तेथेच भाकर खातात. अंधार पडायला लागला की आपलं सामान घेऊन चालू पडतात. अतिशय आनंदी, उत्साही असतात. प्रत्येकाशी प्रेमाने बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावर मी कधीही दु:ख, निराशा अशा भावना पाहिल्याच नाहीत. माझी नि त्यांची दोस्तीच आहे. फिरायला जाताना मी पाच मिनिटं तरी त्यांच्याशी बोलतो. खूप छान वाटतं. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलिशान गाडय़ांमधून येणाऱ्या चेहऱ्यावरचं गांभीर्य, कधी श्रीमंतीची मस्ती वागवत येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि यांच्या चेहऱ्यावरचे शांत, तृप्त भाव यातला विरोधाभास मला नेहमी जाणवतो. त्या दिवशीची गोष्ट. एका कॉन्फरन्सनंतर दुपारचं चमचमीत बुफे जेवून मी आलो होतो. पाय मोकळे करण्यासाठी आणि जेवणानंतर हलकं वाटावं म्हणून चक्कर मारायला निघालो. सवयीप्रमाणे नारायणकाकांजवळ थांबलो. तेही नुकताच भाकरतुकडा खाऊन बसले होते. मला बघून प्रसन्न हसले. निवांत होते म्हणून विषय काढला. ‘‘काका, नेहमी इतके आनंदी कसे असता हो.?’’ ते पुन्हा हसले म्हणाले, ‘‘साहेब आनंद मानण्यावर असतो. आणि या मानण्याची मनाला सवय लावावी लागते. प्रत्येक क्षणाला आपल्याला आनंद मिळत असतो कुठल्या ना कुठल्या रूपात. आपण तो जाणवून घेऊन त्याबद्दल कृतज्ञ असायला हवं. आता आपलं पोट भरलंय त्याबद्दल नशिबाचे आभार मानायला हवेत. मला या भिंतीला टेकायला मिळतंय, आभार मनात यायला हवेत. वर तरटाचं छप्पर आहे. र्अध शरीर का होईना सावलीत आहे. कृतज्ञता मनात यायला हवी. तुम्ही आपुलकीनं बोलायला थांबला, तुमच्याबद्दल कृतज्ञता वाटली. माझं हे सकाळपासून रात्रीपर्यंत असंच मनात सुरू असतं. या क्षणी काय काय छान घडतंय ते जाणवायला हवं अन् त्याची जाणीव ठेवायला हवी. आतून आनंद वाटत राहतो सारखा. आणि प्रत्येक क्षणी काहीतरी चांगलं घडत असतंच. असतं की नाही? त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आता माझ्या अंगावर वाहनांचा धूर येतो, धूळ उडते. मी तिकडे लक्ष देत नाही. इथून वर जो आकाशाचा निळाशार तुकडा दिसत राहतो ना, एखादा पक्षी दिसतो, रस्त्यावरचं एखादं मूल आपल्याच नादात मस्त चालत जातं याच्याकडे पाहत राहतो. आणि हे सगळं दिसतं त्याने मनाला आनंद होतो याबद्दल नशिबाचे आभार मानतो. आणि चपला, बूट शिवताना, मनापासून शंभर टक्के त्यातच लक्ष देतो आणि पुन्हा मनातल्या मनात त्या लोकांचे आभार मानतो, की यांनी काम दिलंय म्हणून आपल्याला पोटाला मिळतंय. मनाला सवयच झालीय.’’ नारायणकाकांना काय म्हणायचं होतं ते माझ्या लक्षात आलं होतं. अनेक तज्ज्ञांनी अनेक युगं जे सांगितलं होतं ते नारायणकाका क्षणोक्षणी जगत आले होते. सुखाच्या, आनंदाच्या प्राप्तीच्या वाटेवरचं पहिलं सूत्र जणू सांगितलं होतं. कृतज्ञता बाळगा प्रत्येक क्षणी, आपल्या आसपास काहीतरी चांगलं घडत असतंच त्याबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगा. कृतज्ञतेच्या भावनेत विलक्षण ताकद असते.
बदलणारे निसर्गाचे रंग, वाऱ्याची मंद झुळूक, आपल्या आसपासची माणसं, त्यांच्या आयुष्यातले छोटे मोठे आनंद. दु:ख, निराशा, अपयश येणार आहेतच पण तोही आपल्या वाढण्याचाच भाग आहे, एक दार बंद झालं तरी दुसरं उघडेलच असा ठाम विश्वास असला की आयुष्य सोपं होतं. आयुष्य छोटं आहे, कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. हे कटू सत्य आहे. त्यातील लक्षार्थ लक्षात घेतला तर हे वाक्य अशुभ वाटणार नाही. आता या लहान आयुष्यातला पहिला महत्त्वाचा क्षण म्हणजे आपला जन्म तर घडून गेला आहे. दुसरा महत्त्वाचा क्षण म्हणजे शेवटाचा. जन्म आणि मृत्यू या दोन महत्त्वाच्या क्षणांमधलं आपलं आयुष्य आनंदी घालवायचं तर मिळणारा प्रत्येक क्षण साजरा करायला हवा. हे समजून घेतलं की कृतज्ञतेनं मन भरून येईल.
आयुष्य आनंदी होण्यासाठी जे गुण, ज्या भावना आपल्यात रुजायला हव्यात त्यात अस्तित्वाप्रति, जे जे मिळतंय त्याप्रति कृतज्ञता वाटणं हे प्रथम आहे. त्यानंतर या मार्गावर साक्षीभाव जोपासणं, माइंडफुलनेस, अहंकाराचं निर्मूलन, सकारात्मक दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थाने विकास, इच्छाशक्तीचा विकास, स्वत:वर प्रेम करणं वगैरे बरेच सोपान आहेत. व्यक्तीमध्ये संपूर्ण सकारात्मक परिवर्तन करण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया *
*मो. 9421802067*
★★★★★★★★★★★★★★★★★
सुख
सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
मला सांगा .....
सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य केल की ते
घरबसल्या मिळतं.....
प्रसिद्ध रंगकर्मी प्रशांत दामले यांनी गायलेललेलं हे गाण खूप अर्थपूर्ण आहे .
आपली सुखाची व्याख्या काय असते ? गाडी बंगला , नौकर चाकर , ऐषारामी जिंदगी . समाजातील प्रतिष्ठा , मानमरातब , भारी भारी कपडे लत्ते , सोने नाणे , दागदागिने , बॅंक बॅलन्स म्हणजेच सुखी आयुष्य ! हे सुख मिळविण्यासाठी माणूस त्याच्या मागे एरिया फुटेस्तोवर धावत राहतो पण ते मात्र पुढे पुढें चे जात राहाते . ज्या भौतिक सुखाच्या मागे माणूस लागतो ते तर केवळ एक मृगजळ आहे . गडगंज संपत्ती कमावली . महाल माड्या उभ्या केल्या . AC लावलेल्या बेडरुम मध्ये डणलाॅप च्या गादीवर झोपला पण झोप उडालेली असते . झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात . दिवस रात्र पैसा , पैसा पैसा !
मन बैचेन होते . या उलट गरीब मजूर दिवसभर कष्ट करुन रात्री त्याच्या झोपडीत येतो . ओली सुकी भाकर भाजीची खाऊन जमीनीवर पाठ टेकवली की घोरायला लागतो . राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी सुखाची केलेली व्याख्या कीती सुंदर आहे पाहा.
महाली माऊ बिछाने , कंदील शामदाने
आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या
पाहून सौंदर्य माझे देवेंद्र तोही राजे
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या .
ज्यांनी भौतिक सुखाचा त्याग केला आणि आत्मसुखाचा अंगीकार केला त्यांनाच शाश्वत सुखाचा लाभ झाला .
भारतातील सर्व साधुसंतांनी शाश्वत सुख कशात आहे हे आपल्याला सांगितलें आहे . त्यांनी नुसता उपदेशच केला असे नाही तर स्वत:च्या आचरणातून ही दाखऊन दिले आहे .
आज महात्मा गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या ज्ञानगंगेत न्हाऊ या .. त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली तीचा अंगिकार करुया व सुखी होऊया
राजा यशोधन व राणी महामाया यांच्या पोटी इ . स. पूर्व ६२४ मधे सिद्धार्थ या राजकुमाराचा जन्म झाला . जन्मानंतर सात दिवसातच आई मरण पावली . आईच्या पश्चात मावशी गौतमी ने सिद्धार्थ चे पालन पोषण केले . म्हणूनच सिद्धार्थ ला गौतम म्हणून ही संबोधले जाते .
सिद्धार्थ ला अवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले . काही दिवसातच सिद्धार्थ चे लग्न सुंदर अशा यशोधरा या राजकन्येशी लाऊन दिले . पुढे त्यांना राहूल नावाचा मुलगा झाला .
सिद्धार्थ राजकुमाराच्या सर्व सुके हात जोडून उभी होती . राजा यशोधनाने काहीही कसूर ठेवली नव्हती . एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ ला वाटले आपण नगर प्रदक्षिणा करावी . सिद्धार्थ ने आपल्या सारथ्याला चन्न ला रथ सिद्ध करण्यास सांगितले पण तो आढेवेढे घेऊ लागला तेव्हा त्याला बाजूच सारुन सिद्धार्थाने रथ आपल्या ताब्यात घेतला तेव्हा सारथ्यालाही सिद्धार्थ बरोबर जाणे आलेच . राजवाड्या बाहेर पडताच सिदार्थला एक जराजर्जर व्यक्ती दिसली . थोडे पुढे गेल्यावर एक आजाराने खोडून गेलेला माणूस दिसला . आणखी थोडे पुढे गेल्यावर एक प्रेत दिसले आणि अजून थोडे पुढे गेल्यावर एक संन्यासी सिदार्थला दिसला . त्याला हे सर्व नवीन च होते . हे सर्व तो पहिल्यांदाच पाहात होता . मानव जन्म इतका दु:ख दायक आहे हे त्याला पहिल्यांदाच समजत होते . तो राजवाड्यात परत आला पण डोळ्यासमोरुन आज जे दृष्य पाहिले ते जाता जाता नव्हते . शेवटी एके दिवशी हा राजकुमार सिद्धार्थ गुपचूप राजवाड्यात बाहेर पडला . सर्वसंग परित्याग करुन खर्या सुखाच्या शोधार्थ निघालेला हा गौतम बुद्ध गया येथे आला . एका पिंपळाच्या झाडाखाली ४९दिवस घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना दिव्यज्ञान पर्यावरण झाले . तेंव्हापासून जग त्यांना बुद्ध म्हणून संबोधू लागले .
गौतम बुद्धांनी समाजाला खर्या सुखाची ओळख करुन दिली . सुखी होण्यासाठी चे पाच उपदेश "पंचशील " जर आपण आचरणात आणले तर नक्की चे सर्व जणतेला खरे सुख मिळेल. काय आहेत ती पांच तत्वे किंवा पंचशील ?
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते
व त्याला अक्षय , अविनाशी सुखाची प्राप्ती होते .
अरविंद कुलकर्णी
पिंपरखेड कर
9422613664
★★★★★★★★★★★★★★★★★
आनंद ,प्रसन्नता ,सुख
माणसाने आनंदी वृत्ती ठेवून जगणे अतिशय महत्वाचे आहे. आनंदी वृत्ती ,समाधान ,सुख, शांती, प्रसन्नता ही फार मोठी आपली सौंदर्यवर्धक साधने आहेत. आपली आनंदी वृत्ती असणे म्हणजे आपल्यातील उत्साह व्दिगूणीत करणे होय. ही 'आनंदी वृत्ती आपल्या आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे' असे हेली बर्टन या विचारवंताने म्हटले आहे.आपल्या जीवनात उदासिनता ठेवायची नसेल तर आपण आनंदी, प्रसन्न राहायला हवे. आपल्या सुखाचे माहेरघर म्हणजे आनंदी वृत्ती होय. प्रसन्नता हे परमेश्वराने आपल्याला दिलेले औषध आहे आणि हे औषध आपण जर घेतले तर आपले जीवन सुखी समाधानी होईल. निसर्गात, सृष्टीत जिथे आपली नजर टाकू तिथे आपल्याला प्रसन्नता दिसेल. परंतु यासाठी आपल्याला स्वतःला प्रथमता प्रसन्न राहावे लागेल आणि इतरांना प्रसन्न ठेवावे लागेल. कारण खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आपल जीवन यशस्वी करायचं असेल तर आपल्याला आपले मन प्रसन्न, आनंदी असले पाहिजे. माणसाच्या मुखावर झळकणार निर्मळ हास्य माणसाचं मन जिंकून जातं, आणि ह्या अशा आनंदी व्यक्तीच्या आठवणी माणसाच्या मनात रेंगाळतात. स्वकष्टातून खरा आनंद निर्माण होतो. आणि मनुष्याचं जीवन सुखी करतो. मनुष्याने सदैव कामात व्यस्त राहिले पाहिजे. मनन ,चिंतन करीत राहिले पाहिजे.कारण
जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.
प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.
म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.
〰〰〰〰〰〰〰
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
★★★★★★★★★★★★★★★★★
शेतकऱ्याच्या आनंद कोठे हरविला????
"शेतकरी शेती करतो
नाही त्यांचा हा छंद
पिकाला मिळे ना भाव
आता कोठे उरला आनंद??''
भारत देश खेड्यात असलेला आहे.खेड्यात सर्वाधिक जनता शेती करीत असतात आणि शेतीवरच आपली उपजीविका भागवत असतात.जवळपास 60 टक्के लोक शेती व्यवसायाशी जुळलेले आहेत त्यामुळे भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण शेतीशी निगडित असलेल्या शेतकरी बंधूंचे होत असलेले दुःख बघता त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही असेच दिसते आहे.शेतीत सिंचनाची हवी तेवढी सुविधा नसल्याने ऐन पिकाच्या मोसमात पीक वाळायला सुरुवात होते एवढेच नाही तर पीक कापणी झाल्यानंतर येणारा अवकाळी पावसाने देखील ऊस,कापूस,तूर,मूग, हरभरा,गहू यासारख्या अनेक पिकांची नासधूस होते.अशा अनेक संकटांना तोंड देत आपल्या कुटुंबाची गुजराण कमी-अधिक प्रमाणात करत असतो.विनोबा भावे म्हणत असत की,'शेतकरी जगला तर देश जगेल' पण आज शेतकऱ्याचे होत असलेले हाल व शासनाचे दुर्लक्ष यामुळे शेतीत खर्च झालेला खर्च देखील माल विकल्यानंतर मिळत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास दूर जात असतांना बघून आपल्या तन-मनावरील आनंद हरविला आहे हेच दिसून येत आहे.
सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने दीड महिन्यापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे शासनाकडून माल विकत घेतला जाण्यासाठी नोंदणी केलेली आहे पण कधी बंद,कधी चालू अशा अवस्थेत शेतीसाठी बी-बियाणे,खते घेण्यासाठी लवकर आपल्याकडील माल विकून साहित्य घेण्याची घाई झाली आहे.याचाच फायदा काही खाजगी व्यापारी अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांकडून माल घेत असल्याने शेतकऱ्याला मुद्दल देखील निघत नाही आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यात केवळ दुखाचेच अश्रू ओघळत आहेत.शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून माल विकत घेण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्याने,प्रपंच चालविण्यासाठी पैशाची गरज असल्याने नाईलाजाने खूप कमी दरात विकावे लागत आहे.उदाहरण कापूस खरेदी मध्ये कृषी मूल्य आयोगानुसार कापसाचा मुल्यतम् भाव 5 हजार असायला हवा पण व्यापारी स्वतःकडे माप समजून प्रति क्विंटल 4 हजार पर्यंत घेत आहेत म्हणजे शेतकऱ्याची शुद्ध लुबाडणूक करीत आहेत म्हणूनच आज शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला दिसत नाही आहे.
"राबराब राबणारा बळी
आहे जगाचा हो पोशिंदा
मिळेनासा झाला भाव त्याला
आता स्वतःलाच जगण्याचा वांदा"
✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
इमेल dushantnimkar15@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★
सुख
मानवी जिवनाची आजच्या काळातील धडपड बघितल्यास सर्वच जीवांना एका गोष्टीची तळमळ दिसून येते..त्यासाठी सगळ्या कृत्याचे ध्येय जर कोणते असेल तर प्रत्येक मनुष्यमात्राचे एक ध्येय जे त्याला पावलोपावली मिळावे हीच अपेक्षा असते असे ध्येय म्हणजे 'सुख' होय.
याच्या विपरीत मानवी जीवनात एक गोष्ट नकोशी वाटते आणि ती सतत उपभोगायला मिळते ती म्हणजे 'दुःख' .
सुख आणि दुःख या परस्पर विरोधी प्रक्रिया असून त्यांची किंमत एक अर्थाने दुसऱ्यामुळेच कळते. मानवी जीवनात जर दुःखच उपभोगायला मिळाले नसते तर सुखाची किंमत सुद्धा काळालीच नसती.
दुःख हे कुणालाच नको आहे या विषयी संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये लिहतात-
मजलागीं दुःख व्हावे।
ऐसें कोणी भावेना जीवे।
न वांछिता दुःख लाहे।
येणे न संभवे स्वतंत्रता।।
याचा अर्थ प्रत्येक जीवला फक्त आणि फक्त सुखच हवं असतं परंतु ते सुख त्याला मिळेलच असं नाही आणि मिळालं तरी सुद्धा ते चिरकाल टिकेलच असं नाही.
मनुष्याची त्याच्या व्यवहारात सुंदर खाणे,पीने ,आराम उपभोगणे अशीच अपेक्षा असते.
ल्यावे खावे बरे असावे सदैव।
हेची करी हाव संसारी।।
या तुकोक्ती प्रमाणे जीवन जगायला आवडते परन्तु साधारणपणे कोणीही मी अत्यंत सुखात आहे असे अंतकरणातून वाटू देऊ शकत नाही. काही माणसे वरवर जरी 'आम्ही सुखात आहोत'असे म्हणत असले ,तरी सुद्धा अनेक बाबींची नुन्यता त्यांना पोखरतच असते म्हणूनच
जगी सर्वसुखी असा कोण आहे ।
विचारी मना तूच शोधुनी पाहे ।।
असा विचार एका श्लोकात समर्थ मांडतात. किंवा या जगात कोण्हीच सर्वसुखी नाही असा विचार संत कबीर सुद्धा मांडताना म्हणतात-
'जो देखा सो दुखीया बाबा,सुखीया कोइ नहिरे....।'
यावरून सगळीकडे मनुमात्राच्या ठिकाणी दुःखच अनुभवायला येतंय असं दिसून येतंय.
याचा अर्थ मग जगामध्ये सुख नाही आहे का? की ते समजत नाही ? असा विचार मनाला ग्रासतो. कारण सुख आणि आनंद उपभोगविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात की
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू
नका चरफडू घ्यारे तुम्ही।।
यावरून आनंद आणि सुख उपलब्ध आहे परंतु एकतर ते आम्हाला मिळत नाही किंवा मिळाले तर कळत नाही असेच म्हणावे लागेल.
आम्हाला जे सुख अपेक्षित असते त्या सुखाला विषय सुख म्हणतात कारण पंच इंद्रियांपैकी एखाद्या इंद्रियाला आनंद मिळाला तरच जीवाला सुखाची जाणीव होते असे आमचे मत आम्ही ठरवतो आणि यामुळेच आमची फसगत होते,कारण इंद्रियांना सुख मिळते परंतु ते सुख हे क्षणिक असल्याने ते चिरंतन टिकत नाही . सुंदर रसामृतामुळे जिभेला आनंद मिळतो परंतु अगदी काही वेळातच आवडीचा पदार्थ हा जास्त प्रमाणात झाल्याने त्याचा वीट येतो आणि पुन्हा सातत्याने तोच पदार्थ मिळत राहिल्यास त्यापासून आनंद न मिळता दुःखच मिळयला लागते, असाच अनुभव यतोय. म्हणजे सुख ही संकल्पना या इंद्रिये सुखोपभोगापेक्षा वेगळीच आहे, असेच म्हणावे लागते.
यासाठी सुख कोठे आहे? ते कशाने मिळते? दुःखाचे कारण काय? याविषयी तथागत भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत चक्रधर स्वामी, भगवान महावीर यांनी दुःखाची वेगवेगळी करणे शोधून मानवी जीवाला सुख कसे मिळवता येईल, याविषयी विचार मांडलेले आहेत.
मानवी मनाचा हव्यास, अपेक्षांचे ओझे, तृष्णा, मायेचा भ्रम आणि स्व ची ओळख नसल्याने मनाला दुःख प्राप्त होते असाच विचार दिसून येतो.
म्हणून आपण स्वतःला ओळखून, आपली क्षमता आणि उपलब्धी यांचा विचार करून या ऐहिक सुखापेक्षा शाश्वत सुखाला जाणणे गरजेचे आहे.
किंबहुना सोय। जीव आत्मयाचे लाहे।
तेथे जे होय।तया नाम सुख।
एऱहवी सुख ते गा कीरटी।
दविजेल तुझ दिठी।
जे आत्मयाचे भेटी ।
जीवाशी होय।।
या ज्ञानेश ओव्यांमधून असे प्रतिबिंबित होते की स्वतःला ओळखून चिरंतन आपल्या स्थितीला जगून त्यानुसार कर्म आचरन विषय सुखामध्ये न रमता आंतरिक समाधान मिळवणे म्हणजे सुख होय... यासाठी आपल्या उपलब्ध दुःखांना विसरून आनंद अश्या आपल्या मूळ स्वरूपाला ओळखून जीवन ज्योत आनंदाने जगूया... म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग..... असेच आनंदून जाऊया...
श्री. ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर)
923528494
★★★★★★★★★★★★★★★★★
जीवन जगण्याचा खरा आनंद
ध्येयाविना जीवन जगण्याचा अर्थ फक्त जिवंत राहणे असा होतो. अशा प्रकारच्या जिवंतपणाचा स्वतःला तर फायदा होतच नाही शिवाय कुटुंब, समाज, देश यांना सुद्धा फायदा होत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी ध्येय नक्कीच ठरवावे. मग त्याच्या प्राप्तीसाठी कितीही त्रास सोसावा लागला तरी त्यास सर्व संकटांना तोंड देत जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. शिक्षणाने मानवी जीवनाचा उत्तम प्रकारे विकास होतो. त्यासाठी प्रत्येकाने उच्चशिक्षण मिळविण्याचे ध्येय जीवनात ठेवल्यास त्यांच्यासोबत देशाचाही विकास होतो. आज आपल्या देशातील शिक्षण प्रणाली ही फक्त नोकरी पुरती मर्यादित आहे. शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. परंतु ते शक्य नाही. कारण सर्वांनाच नोकरी मिळणे कठीण आहे नोकरीसाठी शिक्षणाचे ध्येय ठेवणे चुकीचे आहे. ज्यांना नोकरी मिळते ते मात्र आता मला अभ्यास करून काय करायचे आहे म्हणत अभ्यासाचा नाद सोडतात. त्यामुळे नोकरदार वर्गाचे जीवन चाकोरीबद्ध बनत चाललेले आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो ही बाब ज्यांना समजली ते जीवनाच्या त्यांच्या खर्या ध्येयाकडे वाटचाल करतात. भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांना संपूर्ण देश मिसाईलमॅन म्हणून ओळखते ते डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान असतानाही त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाचनात जात असे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करणारे अनेक लोक आपला वेळ अभ्यासात घालवतात. अशा लोकांनाच जीवनात खरा आनंद मिळतो. कारण अभ्यासामुळे त्यांना दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज किमान दोन नाही तर नाही निदान एक तास तरी आपल्या आवडीच्या विषयावर अभ्यास करीत राहिल्यास जीवनाचा खरा आनंद उपभोगता येईल.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
★★★★★★★★★★★★★★★★★
सुख
अन्याला चक्कर आली आणि ती गाडीवरून खाली पडली. गाडी सिग्नलला उभी होती. कोच पडली तिला. डोळ्याच्या अगदी जवळ. डोळा वाचला थोडक्यात. शुद्धीवर आल्यावर लोक म्हणत होते," तुम्हाला चक्कर आली. थोडक्यात वाचला तुम्ही." पण अन्याचं मात्र आता आपला चेहरा बिघडला हाच मनात विचार सुरु होता. आता आपण कसे दिसणार, पहिल्यासारखे चांगले दिसणार नाही. हीच गोष्ट तिच्या मनाला खात होती. वाचली ह्याचा आनंद साजरा करण्याऐवजी जखमेचं दुःख करत बसून खिन्न झाली ती. कसं असतं ना माणसाचं. तो उद्यासाठी जगतो. आत्ताच्या क्षणाचा उपभोग घेत नाही. आनंद पण आपण मानण्यावर आणि शोधण्यावर आहे.
"आनंद शोधायचा प्रत्येक क्षणात
अडकून रहायचे नाही कुठल्या मोहात
दुःख, चिंता,वाईट प्रसंग द्यायचे सोडून वाऱ्यावर
कशाचाच परिणाम होऊ द्यायचा नाही मनावर"
एकेक क्षण निसटत जातो आपल्या हातातून. नेहमी हसतमुख राहणारा माणूस सर्वांनाच प्रिय असतो. पहिल्या पावसात भिजण्याचं सुख, मातीचा सुगंध घेण्यातलं सुख, पावसात आईच्या हातची गरमा गरम भजी खाण्याचं सुख, मुलाला चांगले मार्क्स मिळाल्या नंतर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यानंतर मिळणारे सुख, कधीकधी आठ वाजेपर्यंत अंथरुणात झोपण्याचे सुख, समाजासाठी आपण काहीतरी करतोय याचं सुख. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. कोणाचं चैनीत सुख. तर कोणाचं पैशात. आपण वेड्यासारखे भौतिक गोष्टींमध्ये अडकुन त्यांना आपल्या सुखाचे कारण किंवा मूळ म्हणतो. पण खरं सुख तर जिवंत माणसाशी संवाद साधण्यात. समाधान मानले की आपोआप सुखाचे दरवाजे उघडतात. पण माझ्याकडे हे नाही ते नाही अशी कुरकुर करत बसलं तर आत्ताचा क्षण पण नकोसा वाटतो व पदरी येते ते नैराश्य, दुःख. सुख आणि दुःख हे ऊनसावली सारखे असतात. एक गोष्ट गेली की दुसरी हजर. दुसरी आली की पहिलं गायब. सुख वाटा. आनंद वाटा. दुप्पट होईल दुसऱ्याच्या चेहर्यावर आपल्यामुळे आनंद दिसणे या सारखी मोठी गोष्ट कुठली नाही जगलात तुम्ही तो दिवस खऱ्या अर्थाने.आनंदी रहा. हसत रहा आणि स्वस्थ रहा.
"हसून जीवन घालवावे
दुःख सारे विसरावे
करू नको तू कसली हाव
ठेव सतत प्रसन्न भाव"
प्रिती दबडे,पुणे
9326822998
★★★★★★★★★★★★★★★★★
आनंद म्हणजे नक्की काय?
निसर्गाने बहाल केलेलं सर्वात सुंदर रत्न म्हणजे सदैव आनंदी असणं, सुखी असणं आणि प्रसन्न दिसणं. आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे.
यामध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.
ऐहिक ते सुख आणि अध्यात्मिक तो आनंद. असा फरक केला जातो. पण आपल्यासाठी आनंद आणि सुख हे एकच असतं.
आपण आनंदी असतो तेव्हाच हसतो. 'हसा आणि लठ्ठ व्हा' म्हणजेच शारीरिक स्थिती उत्तम ठेवा. आनंदी माणसाच्या जवळ आजार फिरकतही नाही. प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. तो वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारे होतो. प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. तो भौतिक गोष्टीत आनंद शोधतो आहे. अमकं घडलं की आनंद होईल, ह्या आशेवर आजची स्थिती माणूस सोसतो आहे, स्वीकारतो आहे. म्हणजे कसं बघा. सुट्टीच्या दिवशी 'हे करू, ते करू म्हणजे आनंद होईल' या आशेवर कामाचे पाच दिवस ढकलतो.
आनंद ही स्थिती आहे, घटना नव्हे. एव्हरेस्ट सर केल्याचा हिलरी ला आनंद होतो, या घटनेचा आनंद विजयात नाही, तर त्या क्षणी हिलरी ची जाणीव जी वर्षानुवर्षे एक दुर्दम्य इच्छेत अडकली होती, ती साध्य झाल्यामुळे आहे.
बाल कवी म्हणतात तसे आनंद सगळीकडे भरलेला आहे, त्याचा अनुभव घ्यायला हवा.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला
जगात उरला
मोद विहरतो चोहिकडे.....
बालकवींना सोनेरी सूर्यकिरणात, आनंदी संध्येतील, मेघात, वाहणाऱ्या निर्झरात, डोलणाऱ्या वृक्षात, कूजन करणाऱ्या पक्ष्यात, उमललेल्या कमळात, गुंजन करणाऱ्या भ्रमरात, सगळी सगळीकडे आनंद दिसतो.
संसारिक आनंद मिळाला की माणूस खूष होतो. काही अनपेक्षित रित्या मिळाले, तर तोच आनंद द्विगुणित होतो. मी परिक्षेत चांगले मार्क मिळण्याची अपेक्षा नक्कीच केली होती. पण जेव्हा मी टॉपर असल्याचे पत्र युनिव्हर्सिटी कडून आले, तेव्हा मला इतका आनंद झाला की हसून, नाचून मी तो व्यक्त करू शकत नव्हते. तर फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. ह्याच आनंदाला परमानंद म्हणायचं का?
एकदा मी कोल्हापूरला अंबाबाई च्या दर्शनाला गेले होते. गर्दी होती. मी ओटी भरून, एक क्षणभर देवीच्या चरणी, मन एकाग्र करून प्रार्थना करत होते. तेव्हा तेथील पुजार्याने मला तिथेच खाली बसायला सांगितले व आरती सुरू होईल असे सांगितले. मी डोळे उघडताच देवीच्या अंगावरून फूल खाली पडत होते-- प्रसाद रूपात - आशीर्वाद रूपात. त्याक्षणी माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. तो आनंद अवर्णनीय! हाच का तो परमानंद ? हीच अवस्था आपल्याला अंतर्मुख बनवते.
आनंद किती सहज उपलब्ध असतो. आम्ही आम्ही स्वतःचे घर घेतले आणि नवीन घरात राहायला गेलो. लगेचच यांची बदली पुण्याहून मुंबईला झाली. ते प्रत्येक शुक्रवारी रात्री पुण्याला यायचे आणि रविवारी रात्री परत जायचे. असे बरेच वर्ष चालले होते. त्यांच्या एका मित्राने त्यांना विचारले, "किती वर्षे तुझे हे अप - डाउन चालू आहे? तुला कंटाळा कसा येत नाही?" यांनी तात्काळ उत्तर दिले, "अजिबात कंटाळा येत नाही. उलट तीन-चार तास बस किंवा ट्रेनमध्ये मला त्रास द्यायला कोणीच नसतं. अगदी आराम मिळतो. त्यामुळे वाचन करीत चिंतन करण्यास मला पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे वाचनाचा आनंद मला घेता येतो. खरंतर हा प्रवास कधीच सुखद नसतो. पण शोधणाऱ्या ला त्यातही आनंद गवसतो.
मुंबईत धावणाऱ्या लोकल घडाळ्याच्या काटावर चालतात. पण आनंद नव्हे. घड्याळाचे काटे आपल्याला आनंदाची वेळ दाखवू शकत नाही. दिवसभरात 'ही आनंदाची वेळ' हेही कधी निश्चित करता येत नाही. आनंदाचं कुठलं परिमाण नाही. खूप काम केल्यानंतर फुरसतीचे दोन क्षण हि मनाला आनंद देऊन जातात.
भूतकाळात केलेल्या चुकांमुळे स्वतःला दोष देत राहिलो, तर वर्तमानातल्या क्षणाचा आनंद गमावून बसतो. भविष्यातील आनंदाची प्रतीक्षा करता करता, आहे तो हातातला आनंदाचा क्षण निसटतो. आनंद उडणाऱ्या पक्षाला पकडण्यात नसतो, तर त्याचं उडणं, विहरणं बघण्यात आहे.
लहान मुले बघा कशी नेहमी वर्तमानात जगत असतात. सारखे हसणे, खिदळणे आणि आनंद देणे, हे सुद्धा अगदी शिल्लक गोष्टीतून. माझ्या नातवंडांना घेऊन मी नेहमी अंगणात बसते. थोडे धान्याचे दाणे जवळ घेऊन मी ते अधूनमधून अंगणात पक्षांसाठी टाकते. त्यामुळे पक्ष्यांची झुंड च्या झुंड तेथे येते, धान्याचे कण टिपायला. मुलांना ते बघून खूप आनंद होतो. लगेच मुले त्यांच्यावर धावून जातात. ते पक्षी एकदम उडाले की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. आनंदात आरडाओरडा सुरू होतो. किती लहान गोष्ट पण आनंद केवढा मोठा!!
ऐषा- आराम, पैसा या गोष्टीत आनंदाचा आभास असतो. ती क्षणिक नशा असते, जी मनाला पंगू बनवते, विकृत बनवते, अहंकारी बनवते. आनंदासाठी धनाची नाही, मनाची आवश्यकता असते. जेथे आपल्याला आतून आनंदाचा साक्षात्कार होतो.
जे गमावले त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे मिळालं त्यात आनंद मानायला हवा. यावेळी दिवाळीत 20 टक्के बोनस मिळण्याऐवजी 12 टक्के मिळाला. तर आठ टक्के कमी बोनस मिळाला म्हणून आपला मूड खराब करण्यात काही अर्थ आहे का?
मी पैशाच्या मागे धावत राहिले, अजून पैसा, अजून पैसा, करत राहिले, तर आहे त्या पैशाचा आनंद मी कसा आणि कधी उपभोगणार? 'संतोष ईश्वरदत्त संपदा आहे तर तृष्णा अज्ञानातून आलेली निर्धनता आहे.'
'आनेसे उनकी आए बहार' असं व्यक्तिमत्व असायला हवं. सकारात्मक, आनंदी वातावरण निर्माण करतो तो सर्वांना आवडतो. कारण ते वातावरण सगळ्यांना आनंदित करतं. 'आनंद द्यावा, आनंद घ्यावा, आनंद वाटत जावा' हे ब्रीद आपल्या जीवनाचे. ऐहिक सुख हे मृगजळासारखे आहे. सुखासाठी कुठे भटकायची जरुरी नाही. हातात कळसा आणि गावाला वळसा असं कशासाठी? अंतर्मुख व्हा. 'आतच' आनंदाचा शोध घ्या. स्वतःच स्वतःशी जोडले गेलो की मग आनंदच आनंद. आता आपली स्थिती अशी,
'आनंदाचे डोही, आनंद तरंग'.
शुभदा दीक्षित
पुणे
★★★★★★★★★★★★★★★★★
माझी सुखाची कल्पना
सुखाची कल्पना हा विचारच सुखप्रद आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. सुखाची कल्पना वय सापेक्ष आणि व्यक्तीं सापेक्ष ही असते. लहानपणी
चिमणीच्या दातांनी चाॅकलेटचा एक टुकडा मैत्रिणीला देताना होणारा आनंद अतिशय सुखावह असतो. हळुहळु
आपले विश्व विस्तारित होते , आणि आपली सुखाची कल्पनापार बदलायला लागते . म्हणजे सुख बाह्य वस्तु किंवा परिस्थिती वर फारसे अवलंबून नाही. ह्याची जाणीवा
सर्वांना असतेच असे नाही. किंबहुना कित्येक लोकांना सुख म्हणजे सर्व सुविधा हाताशी असणे असेच वाटते . सर्व महागडी साधनं आपल्या जवळ असावीत, कपाटात नित्य नवीन कपड्यांच्याची भर पडत जावी.ह्यालाच सुख समजणार्याची संख्या ह्या जगात कमी नाही. कोणाला
भरघोस बँक बेलेंस म्हणजे सुखाचा ठेवा वाटतो, तर कुणाला अबाधित सत्ता सौख्याची पावती वाटते.
महागड्या गाड्या रोल्सरॉयल मर्सिडीज ,ऑडी.ही सुद्धा माणसाच्या सुखाची व्याख्या असते.आता कल्पना करा, कैक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे. नव्या कोऱ्या
मर्सिडीजची डिलीवरी मिळाली आहे ,तुम्ही अतिशय आनंदाने प्लेझर ट्रीप आखली आहे पण ह्या प्लेझर ट्रीप
मधे तुमचा जिवलग मित्र तुमच्या बरोबर नाही, कोरोनाबाधिताच्या संपर्का आल्यामुळे , आयसोलेशन
मधे आहे. तुमचे मन मित्राच्या काळजी अतिशय अस्वस्थ झाले आहे. मित्रानो मला सांगा ह्या अवस्थेत सुखाचा
उपभोग घेणे शक्य आहे का? उत्तर नकारात्मक आहे.
का तुम्हाला स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगणे जमत नाही ?
कारण तुमचे मन उदास आहे,अस्वस्थ आहे. तर आपण हे समजणे अत्यावश्यक आहे की सुख बाह्य साधनां वर अवलंबून नाही.
*सुख मनाची अवस्था आहे* ,
*Happiness is state of mind*
म्हणतात ना *मन चंगा तो कठोती में गंगा* सुख आनंद ही मनाची अवस्था आहे अंतर्मनातील आनंदात तर एक
अद्भुत अद्वितीय अनुभव आहे.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
★★★★★★★★★★★★★★★★★
* सुख *
सुख म्हणजे काय असतं? हा प्रश्न कधी मनाला पडलाच नाही.जे मिळालं त्यात आनंद आणि समाधान मानून जगणं आयुष्याच तत्व असल्यामुळे सुख म्हणजे काय याचा कधी विचारही केला नाही.
प्रत्येक आई मुलांच्या बालपणी त्यांच्या बालमनावर संस्कार करीत असते.संध्याकाळी सांजवात लावली की देवाला हात जोडून नमस्कार करून मुलांना शुभंकरोती म्हणायला सांगते .शेवटी म्हणते "बाप्पाला सांग सुखी ठेव." देवळात गेल तरी तेच !.. म्हण " बाप्पा सुखी ठेव "
सुखी राहण्याची संकल्पना ,सुखाच हा संस्कार, सुखाचा विचार तेंव्हाच मानवी मनावर बिंबविल्या जातो .आणि पुढे माणूस सुखाच्या मागे लागतो.
सुखाची परिकल्पना ही स्वभाव ,परिस्थिती, वय यानुसार बदलत जाते.शेवटी सुख म्हणजे काय असतं हा विचार केला तर आनंदाचे क्षण !जीवनातील आनंदक्षण! हेच होय !!
छोट्या छोट्या गोष्टीतून सुख मिळत असतं.
क्षणाक्षणात सुख समावलं असतं.
लहानपणची दादांनी घेऊन दिलेली,डोळ्यांची उघडझाप करणारी ,नाॅयलाॅनचा गुलाबी- आकाशी फ्राॅक घातलेली, रडणारी हसणारी बाहुली ,पुण्याहून आणलेला पितळेचा खेळ फार मोठं सुख होत.वर्गात पहिला नंबर, शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी ,हुशार विद्यार्थिनी असणं ,ओपन मेरिट येणं ,शाळा काॅलेजमध्ये आपण आवडतं असणं असे हे सुखक्षण होते.
रिमझिम पाऊस पडतोय ,रेडिओवर सुरेल गाणी लागली आहेत आणि हातात पुस्तक आहे.हा असा सुखाचा क्षण!ती हळूवार गोड गाणी मनावर गारुड करायची!
मी मैत्रिणीवेडी !!मला शेवटपर्यंत मैत्रिणी खूप छान मिळाल्या.मैत्रिणींच्या विश्वात हरवून जायची ! मैत्रीचं एक वेगळच सुख होतं.
लग्न झालं आणि कळलं सुखाची परिभाषा आता बदलली आहे.आता सुख आपल्या इच्छेवर अवलंबून नाही.अगदी खाण्यापासून तर जगण्यापर्यंत !
त्यातच मातृत्व सुख लाभले . चौकोनी कुटुंब तयार झाले . सुखाचे ध्येय बदलले.सुखाची परिभाषा बदलली .मुलांच्या सुखात आपलं सुख सामावलेलं असायचं .मुलं,मुलांचे विश्व,मुलांचे शिक्षण-नोकरी-करिअर करता करता दिवस कसे भुरर्कन निघून गेलेत कळलंच नाही .
पर्यटन, निसर्ग अवलोकन,झुळझुळ वाहणार्या नदीचे गीत, भन्नाट वार्याचे संगीत सारेच ..
निर्मळ आनंद देणारे, निर्मळसुख देणारे! हिरवंगार शेत,शेतातला हुर्डा,ताजं भरीत ताजं दही,बैलगाडीतून जाणं ह्या सुखाच्या स्मृती जपून ठेवल्या आहेत.
आनंदवन माझ्याकरिता उर्जा देणारे तीर्थक्षेत्र आहे. वृद्धाश्रमात गेले होते.गोशाळेत गेले होते.
अनाथ आश्रमात गेले होते.तिथे वेदनेची फुले होतात. जगण्यातला आनंद बघायला मिळतो.
जीवन हे आनंदाने जगण्याकरिता आहे हा संदेश मनाला मिळतो.यांची सुखाची परिभाषा काय असते ? क्षणाक्षणातून सुख मिळवत जगत असतात.
लेखन माझा सखा...मी कथा कविता ललितबंध यात गुंतत गेले ! पुस्तकं प्रकाशित झालीत.सत्कार झालेत. पुरस्कार मिळालेत.
लेखनात मी इतकी तल्लीन होते की माझी समाधी लागते !
सारे ओंजळीत साठवलेले सुखदक्षण काही मनाच्या गाभार्यात, काही मखमली आठवणी हृदयाच्या पेटीत तर काही सुखक्षण सोनेरी स्मृतीत !
मॅट्रीकला ओपन मेरिट आणि सेंटरला फर्स्ट आले म्हणून वक्ता दशसहस्रेशु श्री राम शेवाळकर यांच्या हस्ते सत्कार झाला.अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन पुरस्कार दिगग्ज साहित्यिकांच्या हस्ते मिळाला .तोही सुखक्षण होता.
हायकमिशन लंडन येथे कविता सादरीकरण ,लंडन मराठी रेडिओवर मुलाखत,डिस्कव्हरी चॅनेलच्या एपिसोडचा एडिटिंगचा अनपेक्षित अनुवभव मिळाला.
युरोप टूर दोन वेळा झाला.स्वित्झरलॅंडच्या
निसर्गात रमण्याचा आनंद आगळाच होता.
प्रत्येक क्षणाला आनंद वेचत आयुष्य जगणं असतं.तेच सुख असत!!!
सुख हे सांगितल्याने ,वाटल्याने द्विगुणित होते .
आपलं सुख आपण एकट्याने अनुभवण्यात मजा नसते.
जे मिळालं त्यात मनाला समाधान असणं म्हणजे सुख .! व्यक्तीपरत्वे सुखाची परिभाषा बदलते .सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे, परिस्थिती सापेक्ष आहे ,आयु सापेक्ष आहे.
स्मृतींना न्याहाळल की पूर्वीचा आनंद मिळतो. पण तेवढी तीव्रता गवसत नाही.
नव्या सुखक्षणाची मनाला आस असते कां? काही अंशी खरेही आहे .
मी समोरच्या शेतात काम करणार्या बाई कडे गेले होते.चुलीवरच्या गरम गरम भाकरी आणि वांग्याची भाजी आनंदाने जेवत होते.मला म्हणाली बाई तुम्ही बसा .एक गरम गरम भाकर खा. हिच्या लहान मुलांना बघावं फाटक्या कपड्यात हसत खेळत आनंदी असायची .
बाईचा चेहरा हसरा प्रसन्न दिसायचा. मला
जाणवलं सुख म्हणजे पैसा नाही.बंगला, कार धन सोनं हुद्दा असणं म्हणजे सुख नाही.
त्या गरीब शेतकरीण बाईचा चेहरा प्रसन्न असतो.तर पैसेवाल्यांच्या चेहर्यावर सदा तणाव दिसतो. मी शेवटी विचार केला.सुख मानणे ही वृत्ती आहे.समाधानी प्रवृत्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीत माणूस सुखी असतो.
महान व्यक्तींच्या सुखाच्या कल्पना महान असतात.त्याच सुख असामान्य संघर्षमय जीवनात साठलेले असत.राजपुत्र सिद्धार्थ राज्य राजप्रासाद,सुंदर पत्नी पुत्र,सारं सोडून सत्य शांती,ज्ञान विश्वकल्याणाकरिता गौतम बुद्ध झाले.छत्रपती शिवाजी महाराजांचे सुख रयतेच्या सुखात होते.स्वातंत्र्यवीर सावकरांचे सुख देशभक्तीकरिता वेदना सोसण्यात होते.म.गांधीजींनी गरीब जनतेकरिता अर्धवस्र आनंदाने स्विकारले.सैनिकांचे सुख देशाकरिता शहिद होण्यात असते.
सामान्य लोकांचे सुख राहुल देशपांडेचा स्वर्गिय सुरेल क्लासिकल गाण्याचा कार्यक्रम बघायला मिळणे यात असते.एखादी मनपसंत साडी मिळाली की स्त्रीला आनंद होतो.मेडिकलला अॅडमिशन मिळाली की विद्यार्थी खुश होतो.नोकरी,प्रमोशन हा आनंद जीवनातील सुख असत.लहान मुलांना चाॅकलेट,खेळणं मिळाल की आनंद होतो.झाडं लावण्यात, झाडांची फुलं बघण्यात केवढं सुख सामावलेले
असते.सामान्यांचे सुख छोट्या छोट्या वस्तूत, लहान लहान प्रसंगात समावलेल असतं .अर्थात हे सुख ऐहिक क्षणैक असतं.या सुखावरच माणूस सुखी जीवन जगत असतो.सुख रात्रीच्या चांदण्यांसारखं असतं.सुख पहाटेच्या
कोवळ्या किरणांसारख असतं.सुख क्षणाक्षणात कणाकणात शोधून समाधान मानायचं असतं.
आम्ही माॅलमध्ये गेलो होतो.माझ्या मुलीने काही टाॅपस् आणि ड्रेसेस घेतले. ती फिटिंग रुम मध्ये ट्रायलकरिता गेली .मी तिथेच सोफ्यावर बसले होते.
तिथल्या कर्मचारी मुलीने माझ्याकडे बघितले .
नेहमीप्रमाणे स्नेहल स्मिताची देवाण घेवाण झाली.मी म्हटले " आजकाल सगळीकडे सारखेच माॅल झालेत.. सगळे कसे चकाचक ! इथे ड्रेसेसही छान आहेत."
तेवढ्यात ती मला म्हणाली "मी कशी आहे?"
"तू...तूं खूप छान दिसतेस.आणि तुझी हेअर स्टाईल स्पेशल आहे .मला आवडली."
ती मुलगी सुंदरशी लाजली. कित्ती कित्ती मोहरली.! चेहर्यावर तिच्या आनंद पसरला.
ती म्हणाली " आज पहिल्यांदा कुणी मला सुंदर म्हटले. !
त्या सावळ्या मुलीला केवढा आनंद झाला.
माझ्या एका वाक्याने तिला आभाळभर आनंद मिळाला.आत्मविश्वास तिचा जागला.तिच्या आनंदानं मला सुख मिळालं.शाळेतील,गरजू
मुलाच्या -मुलीच्या परीक्षेची फीस भरली की त्यांना केवढा आनंद व्हायचा.तेच खरं सुख वाटायचं.देण्यात आनंद असतो,दानातील सुखात समाधान असतं.
आपलं मन म्हणजेआनंदाच झाड आहे! सुंदर गोड शब्दांनी थोडं हलवलं की आनंदाची फुलं टपटप खाली पडतात. जीवनाला सुगंंध देतात,
आनंदक्षण देतात .दुसर्याला आनंद देण्यात खरं सुख असतं.देण्यात सुख असतं, दानात सुख असतं.
जे आपल्याला हवय ते मिळणं म्हणजे सुख!
कधी अनपेक्षित मिळत तेही सुख असत.कधी मागणं नसतं पण ईश्वर देतो ते सुख सुगंधी असतं.कधी सुख परावलंबी असतं. दुसर्यांमुळे आपल्याला सुख मिळतं. ऐहिक सुख, भौतिक सुख, कायिक सुख,मानसिक सुख,अध्यात्मिक सुख, आत्मिक सुख!
आणि शाश्वत सुख म्हणजे काय ?
सुखाची अपेक्षा न करणे म्हणजे शाश्वत सुख?
मन ईश्वराकडे ओढल्या जाणं! मन ईश्वरभक्तीत रममाण होणं म्हणजे शाश्वत सुख ! समाधी लागणं म्हणजे शाश्वत सुख!!
पुन्हा मी पहिल्या तत्वावर येते समाधान हेच खरे शाश्वत सुख!
मीना खोंड, हैद्राबाद
9703942425
★★★★★★★★★★★★★★★★★
!! आनंद / सुख मानवी जीवन म्हणण्यापेक्षा सर्वच प्राणी माञ आशेवर जगत असतात .पुढे काय ? पुढे काय ? असी धारणा तयाची बनत असते आणि मग प्रत्येक जीव त्या मागे धावतो अर्थात आनंद मिळावण्याची आशा त्याला असते .आता आला प्रश्न आनंद किंवा ज्याला आपण सुख म्हणतो ते असते कसे ? कोणी ते पाहिले आहे का किंवा ते अनुभवले आहे का ? जर पाहिले असेल अनुभवले असेल तर ते दुसर्याला सांगता , देता येते का असे अनंत प्रश्न उपस्थित होतात . सहजासहजी आनंद किंवा सुख मिळविता येते का ? मग प्रत्येक जन सुखी झाला नसता का ? असे एक ना अनेक गोष्टीचे कोडे आपणाला पडतात . जगातात दु;ख पर्वताएवढे सांगितले आहे तर सुख किंवा आनंद फक्त जवा एवढं सांगितले आहे " दु:ख पर्वता एवढे, सुख जवा पाढे ! मग अशा दुर्मिळ सुखाची किंवा आनंदाची प्राप्ती सहज होईल का ? तर या सर्व गोष्टींचा उलगडा करायचा झाला तर अगोदर सुख किंवा आनंद आहे कोठे ? त्याचा पत्ता माहित करून घ्यावा लागेल . एक तर सुख परमेश्वरा जवळ आहे आणि दुसरे म्हणजे संत किंवा महा पुरुष यांचे जवळ माञ ते आहे .
आपण ज्या सुखाला , आनंदाला सुख समजतो हे भौतिक सुख आहे . भौतिक सुख आणि आत्म सुख यात फरक आहे . भौतिक सुख संपणारे सुख आहे आत्म सुख चिरकाल टिकणारे सुख असते . सिद्धार्थ गौतम बुद्ध एक राजपुञ होते, त्यांना सर्व गोष्टी अनुकूल होत्या .राजवाड्यांत अनेक प्रकारचे राजशिष्टाचार होते कोणत्याही प्रकारची कमतरता तिथे नव्हती . म्हणून राजपुञाला राजवाडा सोडून बाहेर पाडण्याची अवश्यकता नव्हती . तरीही ते एक दिवस नगरामध्ये रथात फिरण्याचा आग्रह धरतात प्रधानजी त्यांना फिरण्यासाठी घेऊन जातात , फिरत असताना समोरून एक वृद्ध थरथरत येतो , बुद्ध प्रधानाला विचारतात हे काय आहे ? प्रधान सांगतो हा वृद्ध माणूस आहे . " मी ही वृद्ध होणार ." प्रधान गप्प राहतात . रथ आणखी पुढे जातो समोरून एक प्रेत याञा येते पुन्हा बुद्ध प्रधानाला तसेच विचारतात आणि लगेच रथातून खाली उडी मारून दिव्य ज्ञान प्राप्ती साठी जातात . योग्य वेळी दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दनान आणि खरे सुख एकच माणून ते भगवान गौतम बुद्ध झाले अर्थात त्यांनी खरे सुख प्राप्त केले ते सुखी झाले . सुख हा मानण्याचा भाग.आहे . सुख शोधल्याने सापडत नसते ते मानावे लागेल महात्म्ये म्हणतात " जगीसर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूचि शोधूनि पाहे !" मनाला सुख किंवा आनंद ज्या परमोच्य साधनेतून मिळेल ती साधना साधूनच जीव सुखाकडे जातो जीवाला महात्म्या सुख समजावून सांगतो आणि मग दिव्य ज्ञान मिळवूनच सुखी होतो . थोडक्यात आत्म बोध म्हणजेच सुख समाधान आनंद होय .
एरव्ही सुख शोधत शोधत कित्येक पामर जीव भटकतच राहीले पण सुख त्यांना मिळालंच नाही मिळत नाही ते सुख स्वत: जवळच आहे . तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चूकलाशी स्वत:ला स्वत: च्या स्वरूपाचे आत्म दनान झाले की सुख लांब नाही आनंद सुखाचा सोबतीच आहे !! आनंदाचे डोही आनंद तंरंग , आनंद कोंडला मागे पुढे !!
भागवत गर्कळ बीड
★★★★★★★★★★★★★★★★★
विज्ञान युगात हरविलेल्या आनंदचा शोध
मित्रांनो आनंद हा आपल्या विचारांचा एक भाग आहे.काही लोकांना भौतिक वस्तू व सुख सोयी मध्ये आनंद मिळतो तर काही लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून आनंद लुटायला आवडतो.आज मी सध्यास्तिथित लोकांचा कोणत्या आनंदाकडे कल आहे त्यावर लिहिते. बड्या श्रीमंत लोकांना महागड्या वस्तू, विदेशात फीरायला जाने, मोठमोठ्या हाँटेलमध्ये पार्ट्या करने, विविध वस्तूंचे संग्रह करने आणि यातच आयुष्य काढणे यातच तेआनंद मानतात पण हा आनंद प्रत्येक वेळेस टिकेलच याची खात्री नसते . आर्थिक परिस्थिती कमी जास्त झाली की या लोकांन मध्ये नैराश्य येत. आणि हे विकृत होतात कींवा सुखाच्या शोधात ते वाईट मार्गाचा अवलंब करतात.आणि हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो.पण मित्रांनो आनंद कशाला म्हणतातजो प्रत्येक परीस्थिती त नेहमी समाधानी राहून इतरांना आनंदी ठेवतअसतो कींवा त्याच्या आनंदात आनंद मानत असतो तो खरा आनंदी. आणि खरा आनंद हा भौतिक सुखात नसुन मानसिक समाधानात आहे. अचानक पंखा बंद पडल्यावर अंगाला स्पर्श करणारी वार्याची झुळूक , जमिनीत बी पेरल्यावर उगवलेले नाजुक कोंब,नुकतंच झालेले गाईचे वासरू,फळाफुलाने बहरलेले झाड,मृगनक्षत्रात पडलेला पाऊस आणि पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध,अंगनात दाने टाकल्यावर दाने टीपण्यासाठी आलेले विविध पक्षी, अचानक भेटलेला आवडता मित्र कींवा नातेवाईक,हे सर्व सुख कींवा आनंद बिना पैशाचा असुन चिरकाळ टिकणारा आहे.पण हा आनंद तोच घेऊ शकतो ज्याचे निसर्गावर खुप प्रेम आहे.आम्ही आजही बालपणी च्याआठवणी काढुन सगळे भावंडं आनंद घेतो. खेड्यात लग्नाला जातांना पाणी आणि कढी पिण्याकरीता सगळं गाव घरून एक एक ग्लास घरून सोबत न्यायचो,लग्नात पत्रावळी वर जे्वन सगळे वाढपी मजेदार,त्या काळात एक महत्त्वाचा आनंद मिळे १५ पैशाच्या आंतरदेशीय पत्र्याचा ,कुठल्या नातेवाईकाचे पत्र आले की शिकत असलेल्या शाळकरी मुलांने ते जोर जोरात सगळ्यांना वाचुन दाखवने, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला सगळया मावशीचे व मामाचे मुलं एकत्र राहून धमाल करने,खेळण्याकरीता चौवाष्टा त्या साठी फुटलेल्या कपबशी चे तुकडे,बोराच्या आटोळ्या, फोडलेल्या चिचोका, खेळून कंटाळा आला की गोष्टी चे पुस्तक वाचायचे , पुस्तकांची नावे,चाचा चौधरी,चंपक, चांदोबा,लोटपोट, आणि हे झालेल्या नंतर रात्रीला झोपताना भुताच्या गोष्टी.धमाल करायचो ऊन्हाळा भर आणि शाळा सुरू व्हायच्या आठ दिवस आधी सगळ्यांची घरी परतायची तयारी. मामा एकाच रंगाच्या कपड्याच थान आणत असे आणि गावातला शिंपी सगळ्यांचे माप घेऊन कपडे शिऊन आणायचा तो पर्यंत आईचे शेवया,पापड, मेतकुट,सातुच पिठ हे सर्व सुरु व्हायचे आणि आम्ही सगळे भावंडं एकसारखे कपडे घालून एकमेकांच्या गळ्यात पडून रडायचो आणि आपल्या गावी निघून जायचो. हा असा आनंद उराशी बाळगून मी आजही पैसा न लागणार्या आनंदाचा आस्वाद घेत या निसर्गरम्य वातावरणात अगदी आनंदात जिवन जगत असतांनाच शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत शैक्षणिक सहली मध्ये, स्नेह संमेलनात, शाळेतील विविध स्पर्धांचा आनंद. लुटत आयुष्य काढत आहे.मित्रांनो नेहमी आनंदी राहा आपल्या आसपास चे वातावरण आनंदी ठेवने आपल्यच हातात आहे.शेवटी इथुन काय ण्यायचे आहे.रीकाम्या हाताने आलो,रीकाम्या हाताने जाणार.
सौ. मेघा विनोद हिंगमिरे, वर्धा
7798159825
★★★★★★★★★★★★★★★★★
आनंद
काय असतो आनंद! आनंद म्हणजे नक्की काय? आनंद एक अनुभूती, सुखाचा साक्षात्कार आहे. अतृप्त मनाची तृप्ती आहे. माणसाला यश मिळाले की आनंद होतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. कोणाला वाचनात, लिखाणात तर कोणाला दूरदर्शन पाहण्यात आनंद असतो. कुणी खेळ खेळण्यात तर कोणी शांत झोपण्यातच आनंद मानते. आनंद म्हणजे हृदयातून आलेली स्फूर्ती. एखादी व्यक्ती आनंदी होते तेव्हाही तिच्या हृदयाचे ठोके वाढतात. रक्त नसांनसांतून खेळताना दिसते. आनंद झाल्याची लक्षणे न बोलता चेहऱ्यावरून प्रतित होतात. आपले डोळे चमकलेले दिसतात. स्फुल्लिंगं प्रेरित होतात.
आनंदात आपण एखाद्याला मिठी मारतो. गालावर पप्पी घेतो. म्हणजे आनंद झाला की माणसाच्या शरीराची चेतनाक्षमता इतकी वाढते की तो आनंदाच्या भरात नाचू,गाऊ लागतो. त्याला समाज भानही राहत नाही. त्याच्या रगारगांतून आनंद व्यक्त होताना दिसतो. आणि झालेला आनंद इतरांसोबत वाटण्यासाठी ती व्यक्ती उल्लासित होते. मग तो आनंद परीक्षेतील,नोकरीतील किंवा बढतीचा असो.एवढेच नव्हे तर एखादी मुलगी रोज पोळी बनवते परंतू पोळी फुगत नसेल तर ती नाराज होते. परंतु एखादेवेळी पोळी फुलली तर तिला अतिशय आनंद होतो.
मनुष्याला आनंदी व्हायला काहीही कारण पुरते. एखादे छोटे बालक घरबसल्या खेळ खेळत असेल त्या खेळातील बाहुली उभी राहत नसेल तर बालक निराश होऊन जाते. परंतु ते बालक आपला प्रयत्न सोडत नाही आणि एखादेवेळी ती बाहूली न पडता ताठ उभी राहिली तर ते बालक टाळ्या वाजून सर्वांना स्वतःकडे आकर्षित करते. त्याच्या आनंदात सहभागी करून घेते. त्यामुळे आनंद वाटण्यात जे सुख मिळते ते बंद ठेवण्यात किंवा मनात ठेवण्यात नाही. म्हणूनच दहावी, बारावीच्या निकालानंतर लोक आपला आनंदात सहभागी करून घेण्यासाठी पेढे वाटतात. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होणे ही सद्भावना किंवा सत्प्रवृत्ती असते परंतु दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होणे किंवा आनंदी व्यक्तीला टोमणा मारून दुःखी करणे ही कूप्रवृत्ती होय. समाजात अशा लोकांना हीन समजले जाते. त्यांना आनंदात सामील करून घेतले जात नाही.
काही लोक तोंडावर आनंद दाखवतात परंतु पाठीमागे निंदा करतात. ही विकृती होय. यामुळे दोन मतप्रवाह असणाऱ्या व्यक्तींपासून थोडे दूर रहाणे चांगले. काही लोकांना दुसर्यांच्या आनंदावर विरजण घालणे आवडते. असे लोक नेहमी दुसऱ्याला खेकड्याप्रमाणे खेचण्यातच आपला वेळ घालवितात नि स्वत:चे नुकसान करून घेतात. तोंडदेखले, गोड बोलणारे लोक खूपच घातक असतात त्यांचे खरे रूप समाजापुढे येतच नाही. आपण आपल्या सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो आणि ती आतल्या आत जळत कुढत राहतात. ते आपले हितचिंतक होण्याऐवजी वाईट चिंतत जातात. माणसे ओळखणे संकटाच्या वेळीच कळते. निर्मळ मनाची माणसे सुखदुःखात साथच देतात. आपला आनंद स्वतःपुरताच न ठेवता सगळीकडे कौतुकाने त्याचा गाजावाजा करतात. पाठीवर शाबासकीची थाप देत असे लोक भावी जीवनासाठी सदिच्छा देतात. अशा लोकांची संगत म्हणजे ऋषीमुनींच्या संगतीसारखीच समजली जाते. लोकांना त्यांचा सहवास विशेष भावतो. समर्पण वृत्तीही वाढते. म्हणूनच जीवनात आनंद द्यावा आणि घ्यावा. यातच तर मनुष्यजन्माचे कल्याण, सार्थक आहे.
सौ.भारती सावंत मुंबई
★★★★★★★★★★★★★★★★★
सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे असे संतांनी म्हटले आहे खरे आहे का हे ?तुम्हाला काय अनुभव आला आहे आपल्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनात . सुख जवसाच्या दाण्या एवढे छोटेसे तर दुःख पर्वताएवढे असा विचार सर्वांच्याच मनात येतो . जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा त्या बाळाचे आईवडील इतर नातेवाईक यांना गगनात मावणार नाही एवढा आनंद होतो परंतु जन्माच्यावेळी बाळाला आनंद होतो का जर त्याला आनंद होत असेल तर जन्मल्याबरोबर ते हसत का नाही रडते का? माझी आजी म्हणायची मनुष्य जन्माला आल्यावर या दुःखी दुनियेत आल्याबद्दल त्याला दुःख होते परमेश्वरापासून तो दुरावला म्हणून त्याला दुःख होते आणि इतरांना मात्र ते कळत नाही तो आपल्या बरोबर राहणार याचा त्यांना आनंद असतो आणि ते सुखी असतात बघा घटना एक त्याचे परिणाम मात्र दोन एक सुखद परिणाम तर दुसरा दुःखद परिणाम आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात त्याचे परिणाम कधी सुखाचे रूपात तर कधी दुःखाच्या रूपात आपल्याला दिसतात मग एकाच सुख दुसऱ्याचे दुःख असू शकते का? एखादी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण मुलाखत देतात आणि मग त्यांना नंतर रिझल्ट कळतो कुणालातरी एकाला नोकरी मिळाली आहे ज्याला नोकरी मिळाली तो तर खूप आनंदी असतो परंतु ज्यांची नोकरीसाठी निवड झाली नाही ते नोकरी मिळवणाऱ्याचे अभिनंदन करतात का? त्याच्या आनंदाबद्दल सर्वांना आनंद होतो की त्याला नोकरी मिळाली व
मला का नोकरी मिळाली नाही त्यालाच का मिळाली म्हणून मनुष्य दुखी होतो का?
जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुच शोधूनी पाहे.
या आनंदाच्या शोधात एकदा तीन व्यक्ती झाडाखाली बसलेल्या होत्या तीनही व्यक्ती रडत होत्या त्यातला एक जण म्हणाला माझ्यासारखा दुःखी जगात कोणीच नसेल दुसऱ्या दोघांनी त्याला विचारले काय रे बाबा काय दुःख आहे तुला तो म्हणाला काय सांगू माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत अतिशय दरिद्री आहे मी पायात घालायला चप्पल सुद्धा नाही काय कमनशिबी आहे मी तेवढ्यात दुसरी व्यक्ती म्हणाली अरे तुला पायात घालायला चप्पल नाही म्हणून तू रडतो आहेस माझे दुःख तुझ्या पेक्षा मोठे आहे तुला पायात घालायला चप्पल नाही परंतु मला तर देवाने पायच दिले नाहीत तुझ्यापेक्षा दुःखी तर मी आहे हे ऐकून तिसरा व्यक्ती बोलू लागला अरे तुम्हाला एकाला चप्पल नाही पायात घालायला एकाला पायच नाही काय सांगू मी एवढा श्रीमंत आहे परंतु माझ्याकडे डोळेच नाही तुमच्या दोघांपेक्षा ही माझे दुःख कीती मोठे आहे तिघेही जण विचारात पडले दुःखी तर तिघेही आहोत परंतु प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे कोणाचे दुःख मोठे हे कसे ठरवायचे याचाच अर्थ दुःख किंवा सूख हे आपल्या मानण्यावर आहे
दुःख भोगल्या शिवाय सुखाची किंमत कळत नाही हे खरे आहे गौतम बुद्धांना त्यांच्या राजवाड्यात काय कमी होते का? वाटले त्यांना राजवाड्याबाहेर जावे थोडासा फेरफटका मारून यावा राजवाड्यात सर्व सुखे हात जोडून उभी असताना राजवाड्याबाहेरची अशी दुनिया पाहण्याचे सुख हवे होते त्यांना
मग राजवाड्याबाहेर ही सुख दिसले का त्यांना?राजवड्याबाहेर
मृत्यू, वृद्धापकाळ ,आजारपण हे दुःख त्यांना दिसली आणि त्यांनी खऱ्या सुखाच्या शोधासाठी राजवाडा सोडला त्याग, सेवा, अहिंसा, सत्य म्हणजे सुख हे त्यांनी सर्व जगास पटवून दिले.
आनंदी राहणारे, आनंद देणारे, आनंदाचे गाणे गाणारे लोक सर्वांना आवडतात तर दुःखी असणारे दुःख देणारे सदैव दुःखाचे गाणे गाणारे लोक कुणाला हवे असतात का?
आनंद हि अशी गोष्ट आहे की जी वाटल्याने अजून वाढते आणि दुःख कितीही वाटत राहिले तर ते कमी होत नाही हे मात्र नक्की.
सत्ता ,संपत्ती ,आरोग्य ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो माणूस सुखी आहे का? की ,तिन्ही गोष्टी नाही परंतु परमेश्वराचे भजन तो करतो आहे मग दोघांपैकी नक्की सुखी कोण आहे समाधान मग नेमके कशात आहे त्यागात की भोगात?
दुःख आहे म्हणून सुख मिळवण्यासाठी लोक धडपड करतात अन्यथा सत्ता संपत्ती आरोग्य विनासायास व्यक्तीला मिळाले असते तर सर्वजण आरामात राहिले असते काम कोणी केलेच नसते परिश्रमाचे मोल कळलेच नसते दुःख आहे आणि म्हणून सुखाला किंमत आहे. दुःखी व्यक्तींचे ही दोन प्रकार आहेत कुणाला स्वतःजवळ एखादी गोष्ट नाही म्हणून दुःख होते तर कुणाला ती दुसर्या जवळ नाही म्हणून दुःख होते कुणी स्वतःचे दुःख दूर करण्यासाठी आयुष्यभर झटते तर कुणी दुसर्याचे दुःख दूर करण्यासाठी आयुष्यभर झटते मग सुखप्राप्ती कोणाला होते दुसऱ्याला की स्वतःला? काही जण स्वतःला सुख मिळाले की आनंदी असतात त्यांना दुसर्यांच्या दुःखाचे काहीच सोयरे सुतक नसते काहीजण इतरांच्या सुखात सुखी असतात.
या जगात प्रत्येकजण पैसा ,कीर्ती, संपत्ती ,आरोग्य यश मिळवण्यासाठी सतत धडपडतो कुठलीतरी एक गोष्ट मिळवण्यासाठी सतत त्याची धडपड चालू असते एखादी गोष्ट नाही मिळाली की तो लगेच दुखी होतो पण जी गोष्ट त्याच्याकडे आहे त्या बाबतीत त्याने सुखी का असू नये? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो असे म्हणतात अति सुखाची हाव ही दुःखाच्या खाईत लोटेल असेच वाटते.
अतिशय सुंदर रूपवान स्त्रीला जर चेहऱ्यावर एखादा काळा तीळ असेल तर तीला दृष्ट लागत नाही असे म्हणतात मग सुखाच्या गादीवर लोळण घेणार्या व्यक्तीला एखादे दुःख असले तर त्याच्या संपूर्ण सुखामध्ये काही फरक पडतो का नाही ना .
"ठेविले तैसेची अनंते रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान "जगामध्ये सर्वजण असे राहिले तर सर्वजण सुखी होतील . एखादे फुलपाखरू फुलांवर भिरभिरत असले की आपल्याला त्याला पकडण्याचा मोह होतो आपण फुलपाखरांच्या मागे धाव धाव धावतो ते आपल्याला दमवते ,ते आपण दमून एका ठिकाणी बसलो की अलगद खांद्यावर येऊन बसते ,सुखाचे ही तसेच आहे सुखाच्या मागे धावत राहिलो तर आपल्याला ते दमवते त्याचा हव्यास सोडला की ते अलगद आपल्याला मिळते.
सविता साळुंके
9604231747
salunkesavita42@gmail. com
★★★★★★★★★★★★★★★★★
#"सुख/आनंद"#
शीर्षक:-#जगू आनंदे#
"मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत??काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळत?"
ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या की,वाटत, खरच "सुख","आनंद"ह्या संकल्पना म्हणजे सार जीवन आहे.अशी धारणा माणूस म्हणून आपण आपल्या मनाशी घट्ट करून ठेवली आहे."दुःख"कोणालाच नको असत,सार काही सुखनैव असावं असं प्रत्येकाला वाटत राहतं.
तरीही जीवन आहे म्हंटल की,सुख-दुःख ह्या बाबी येणारच.त्याशिवाय का संघर्ष, विचारीपण, चिंतनशीलता,जीवनाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची नवशक्ती कुठून बरे मिळणार??तोचतोचपणा, सरधोपट आयुष्य तरी रुचेल का आपल्याला?हाही प्रश्न उरतोच की!
आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करणं, हसतमुख राहणं ही खरेतर खूप कठीण बाब असते.पण,काळ-वेळेवर मात करून आयुष्यात पुढे-पुढे चालत राहणं,जीवनानुभव घेत आनंदाचं गीत गाणं ही खरी जीवन जगताना करावी लागणारी व जो करेल तो जीवनात यशस्वी, सुखी बनणारी महत्वपूर्ण बाब आहे.
पण,खऱ्या आयुष्यात अस एव्हढं सरधोपटपणे वागणं,आलेल्या कठिणतम परिस्थितीवर मात करणं,सर्वांनाच सहजगत्या जमेलच असे नाही. कोलमडून जाण, एकदम आनंदाच्या भरतीचा आस्वाद घेण्याची सवय झाली अन अचानक दुःखाने सुखाला ओहोटी लागली की,माणूस अंतर्भाह्य हेलावून जाईल, काय करू नि कसे करू?असा कसोटीचा क्षणही येईल की,मग अशावेळी प्रत्येकजण धडाडीने पुनश्च ठाम,धीरगंभीरपणे आयुष्यातील प्राप्त परिस्थितीला सामोरा जाईल असे नाही होणार आणि होतही नाही"!!
माणसाच्या मेंदूवर मन स्वार असत असे म्हणतात. मग विपरीत परिस्थिती,प्रसंग, दुःख,वेदना, एकटेपणा,अपयश, संघर्षाची परिस्थिती मानवी मनाला नि जगण्याला पोखरून टाकते.नि खऱ्या जगण्याच्या कसोटीला सुरवात होते.survival of the fittest नुसार जो ह्या परिस्थितीशी दोन हात करेल तो जेता,सर्वोत्तम, कणखर,अजिंक्य ठरेल!
कस होत ना,बोलणं,उपदेश देणं,सुंदर-सुंदर बोलणं,ह्या गोष्टी खूप सोप्या असतात.पण,ज्याच्यावर एखादी परिस्थिती ओढवते त्या परिस्थितीत तग धरण, तिचा स्वीकार करणं वाटत तेवढ सोपं नसत.मग आनंदाने कस जगायचं???उद्विग्नता, तुटून जाण, खचून जाण येत मग!दोलायमान परिस्थिती निर्माण होते.जगावं की मरावं अशीही अवस्था अनेकांच्या मनात मूळ धरू लागते.प्रत्येकाच्या आयुष्यात असा बाका प्रसंग एकदातरी येतोच!कोणीच चुकत नाही मग त्या "आयुष्यातील उध्वस्तपण"पाहायला!!!
आयुष्याच्या कोणत्याही वळणावर ,कोणत्याही टप्प्यावर दुःख,यातना,अपयश, संघर्ष, अपमान,नाकारलेपण, एककल्लीपण कुठल्यातरी वळणावर उभे असणारच.मग त्यांच्या सोबत "हातमिळवणी"करणं ही कला ज्याला जमेल तोच खरा "विजेता"!!!खरा बाजीगर वा सिकंदर!!
कधी कोणाला जन्माला आल्यापासून संघर्षाची साथ लाभते ,तर कोणाला अत्युच्च आनंदाचे,ऐश्वर्य, सुखासीनतेचे सुख उपभोगल्यावर दुःखाच्या खाईत पडावे लागते.शेवटी हा वाईट काळ(बॅड पँच )कुणालाच चुकत नाही. मात्र त्यातून शिकायचं की स्वतःला आणखी शिक्षा द्यायची.हे आधी ठरवायला हवं.उगाच सुंदर आयुष्याला तिलांजली देण्याचा,दुर्मुखलेपन घेऊन जगण्यात कसलं आलं बर हशील?
कधी-कधी दुःख ,यातना यांचा डोक्यावर बोजा साचला की जगाकडे एकवार डोळे नीट उघडून पहाव,मग कळेल आपलं दुःख,यातना, त्रास म्हणजे "क्षुल्लकच"आहे बुवा अस वाटून जात.आपल्यापेक्षाही वाईट,विपरीत परिस्थिती मध्ये माणस जगत असतात,भक्कमपणे पाय रोवून, ठाम उभी असतात.मस्तवाल बनून जीवनाचा उपभोग घेत असतात.दुःखाला, यातनेला "ये तू कितीही वेळा, मला उलथून टाकायला ,मी लावेन तुला माझ्या हसण्याने वाकायला "अशी खणखणीत प्रत्युत्तर देणारी साद घालत असतात.
अशा प्रेरक व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा नक्कीच वाचाव्यात,त्यांना भेटावं,त्यांचं जगणं-वागणं,जगाकडे सकारात्मकपणे बघणं ह्या गोष्टींचा आपण अंगीकार करावा,मग बघा कस सार सुखकर होईल,नैराश्य, दुःख, वेदना,अपयश ,नाकारलेपण, यातना एकदम विरून जातील नि आनंदाचे गीत गातील!!
शेवटी काय तर,आनंदाने जीवन जगायचं असेल तर सकारात्मक राहणं!दुःखाकडे सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली एक अमूल्य संधी अशा अविर्भावात पाहिलं की सार जगणं"आनंदाचे गीत"बनून जाईल हे निश्चित!!!
मग जगायचं न आनंदात??निखळ ,प्रेरक जीवनाच "जीवनगाने"गाण्यासाठी?
©✍शुभांगी विलास पवार,(कंदी पेढा)-नागठाणे, ता.जि.सातारा
★★★★★★★★★★★★★★★★★
आनंद म्हणजे नेमके काय?
आनंद म्हणजे नेमके काय ? आपण सर्वात आनंदी केव्हा किंवा कशामुळे कशात होतो ?
एखाद्या वस्तूची, क्षणाची, एखाद्या व्यक्तीची जेव्हा आपण वाट बघत असतो. आणि ती आपल्याला प्राप्त होते तेव्हा जो होतो तो आनंद अशी सर्वसाधारण व्याख्या आपल्याला करता येईल. आनंद मिळाला की माणूस खुश होतो. या आनंदाचे सुद्धा प्रकार आहेत. आता सांगायचं झालं तर, पाहिजे ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर तो आनंद. एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली तर आपला आनंद द्विगुणीत होतो कारण आपल्याला ते मिळेल हे अनपेक्षित होतं, याला आनंदाची पुढची पायरी म्हणता येईल ज्याला आपण स्वानंद म्हणू. पण जेव्हा आपल्याला असा आनंद मिळतो की तो नाचून, हसून व्यक्त करता येत नाही त्यावेळी आपल्याला अतिशय गहिवरून आल्यासारखं होतं, आपोआप डोळ्यातून अश्रू यायला लागतात ज्याला आपण आनंदाश्रू सुद्धा म्हणतो तो आनंद म्हणजे “परमानंद”. हा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा एखादी असाध्य वाटणारी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली असते.
आनंद, स्वानंद आणि परमानंद हे प्रकार जरी वेगळे वाटत असले तरी आनंद मिळणे महत्वाचे.
थोडक्यात असे म्हणता येईल की, आनंद ही घटना नसून ती मानसिक स्थिती आहे. तो आपल्या इच्छापूर्तीचा परिणाम आहे. आशा स्थितीमध्ये स्वतःचं स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे आनंद.
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
★★★★★★★★★★★★★★★★★
लेख
आनंद
आनंदी आनंद गडे,
ईकडे तिकडे चोहीकडे.
ही कविता आजही आठवते व मन हलके होऊन बालपणात जाऊन रमते.आनंदाने नाचायला, बागडायला लागते. बालमैत्रीणींचा हसरा घोळका सभोवार असल्याचा भास होतो.आनंद शब्दातूनच आनंदाची बरसात होते.जीवनात हा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत असतो.पण निखळ आनंद सर्वांनाच मिळतो असंही नाही.
आनंद म्हणजे मनाला मिळालेले समाधान होय.आनंद मनाला प्रफुल्लित करतो.मन ताजेतवाने होते.पण हा आनंद कुणाला कशात मिळेल हे सांगता येत नाही. कुणाला घरात,, शाळेत,समाजात, कामात, दुसऱ्याला मदत करण्यात, दुसऱ्याला सुखी करण्यात मिळतो. समाधान म्हणजेच आनंद मिळणे होय.त्यातल्या त्यात सकारात्मक आनंद कायमस्वरूपी टिकतो. काहीजणांना दुसऱ्यांना दुःख देण्यामध्ये आनंद वाटत असतो. दुसऱ्याला त्रास देणे, चिडवणे ,त्यांचे वाईट चिंतने व त्यांचे नुकसान झाले की या लोकांना आनंद होणे. ही सर्व नकारात्मक आनंदाची उदाहरणे आहेत. पण अशा व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये आनंदी असल्याचं दिसत नाहीत कारण त्यांचा नकारात्मक आनंद नेहमीच त्यांना सतावत असतो. त्यातून मिळणारा आनंद हा अल्प काळ टिकतो. जो आनंद दुसऱ्याला सुख देऊन आपल्याला मिळतो, ज्याला आपण सकारात्मक आनंद म्हणू.त्या आनंदातून आपल्याला सुख समाधान आनंद तर मिळतेच. पण दुसरेही आनंदी होतात. व हा आनंद चिरकाल टिकतो. अशा वेळी मनाला झालेल्या आनंदाची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही.
मानवाने नेहमी आनंदी असावे. जी व्यक्ती आनंदाने आपले जीवन व्यतीत करते ती व्यक्ती स्वतःला आनंदी करते व समाजालाही आनंदी करत असते. आनंद मिळवण्याकरता प्रथम आपले मन हे निस्वार्थी भावनेने भरलेले असावे लागते. ज्या वेळेला आपण एखाद्या लहान मुलाकडे पाहतो,ते अत्यंत निरागस असते. त्यावेळी त्या मुलांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थी भावना नसते. त्यामुळे जेव्हा आपण लहान मुलांच्या हसण्याकडे पाहतो त्यावेळेला आपलं मन आनंदानं भरून येतं. पटकन त्या मुलाला उचलून घेऊन त्याचे पाप घ्यावे वाटतात. हे सर्व आनंदाच्या अनुभूतीतून घडत असतं. त्याच बरोबर ज्या वेळेला आपण एखादे कार्य हाती घेतो व ते कार्य प्रामाणिकपणे पार पाडतो , त्या कार्यामध्ये यश मिळवतो. त्यावेळेला आपल्याला झालेला आनंद अवर्णनीय असतो. तसेच बागेतील फुलांच्या कडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला समाधान मिळते म्हणजे आपण आनंदी होतो. अशा या आनंदामुळे आपण ताजेतवाने होतो व आपला उत्साह दुणावतो. गौतम बुद्धांच्या, महावीर भगवान च्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये यासाठी त्यांना राजमहालातच ठेवले.त्यांना सर्वप्रकारचा आनंदच नेहमी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण कालांतराने का होईना ,समाजातील दुःख त्यांना दिसले, आणि त्यांनी राज वैभवाचा त्याग करून ते गौतम बुद्ध ,भगवान महावीर बनले. व त्यांनी आपले सारे आयुष्य लोकांना आनंद ,सुख देण्याकरता व्यतीत केले. संत महात्म्यांनी सुद्धा लोकांना आनंद देण्याकरिता प्रयत्न केले.
आपण आनंद कशात मानायचा हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते. कारण एकाच गोष्टीचा आनंद एका व्यक्तीला मिळेल तर त्याच गोष्टीचा आनंद दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. त्यामुळे आनंदाची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असते. पण जीवनामध्ये सकारात्मक आनंदच चिरकाल टिकत असतो. आपण आनंदी असतो त्यावेळेला आपल्या सभोवती असणारे लोक सुद्धा आनंदी असतात. व कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव आपल्यावर असत नाही. तणावरहित जीवन जगण्याकरता आपण नेहमी आनंदी असले पाहिजे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
★★★★★★★★★★★★★★★★★
सुख
सुख हे फुलपाखरा सारखे असते.
पाठलाग केला तर उडून जात
बळजबरी केली तर मरून जात
निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसत.
प्रमाणापेक्षा जास्त सुख कोणाजवळ व्यक्त करू नये कारण लोक सुखाना नजर लावतात. सुख कणभर गोष्टीत लपला असत फक्त ते मणभर जगता यायला हवं
दुनियेत सर्वाना आपल्या मनासारखे सुख मिळत नाही परंतु जीवनाचा कंटाळा न करता आनंदात जगावे. दुसर्यांना सुख देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे देव आपल्यालापन सुख आणि समाधान देतो. आयुष्यात जर सुखी राहायचे असेल तर स्वतःची दुःख लपवायला शिका.
आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.
"आयुष्य आपले आहे खेळ ऊन सावल्यांचा
दुःख जरी पाही परीक्षा
सुख देई क्षण आनंदाचा"
Always be happy
निलम गायकवाड(पुणे)
7/5/20२0
★★★★★★★★★★★★★★★★★
लेख
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
मानवी जीवन जगताना मनुष्य सतत आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतो.जीवनात प्रत्येकाला सुख आणि दुःख यांच्याशी सामना करावा लागते.यामध्ये प्रत्येकाला सुख हवे असते.सुखाच्या शोधात माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो.मानवाच्या चांगल्या-वाईट कर्तुत्वा नुसार त्याला त्याचे फळ मिळत असते.जीवनात चांगले कर्तुत्व केले.तर जीवन आनंदीमय वाटते.चांगल्या कामाची फळ चांगलीच असतात.वाईट कर्तव्य केले,तर मात्र दुःख भोगावे लागते.दुःख वेदनादायी असते.सलणाऱ्या काट्याप्रमाणे ते सतत जीवनात सलत राहते.त्याचा त्रास माणसला होतो. आयुष्य जगतांना प्रत्येकाने प्रामाणिकपणे,निस्वार्थी,कर्तव्य करत राहिले पाहिजे.जीवनात सुखाची, आनंदाची अनुभूती घ्यायची असेल.तर आध्यात्मिक संस्काराचा मार्ग निवडला पाहिजे.जीवनात अध्यात्मामुळे मनुष्य भगवंताचे नामस्मरण करतो.स्वतःच्या रोजच्या कामात वेळ मिळेल तसे देवाचे नामस्मरण करत राहतो.त्यामुळे साहजिकच चांगली कर्तव्य व देवाचे नामस्मरण यातुन आनंद हा आपल्या घरात खेळत राहतो प्रत्येकाच्या हाताला मिळेल ते काम प्रामाणिकपणे केले.जीवनात सदैव दुसऱ्याची चांगले हित चिंतले तर निश्चितच चांगले होते.जीवनात प्रामाणिकपणा जपला पाहिजे.निस्वार्थी,निरर्व्यसनी जीवन निश्चितच आनंददायी भरलेली असते. वाईट गोष्टी हातून घडत राहिल्या,वाईट चिंतन करत राहिले.वाईट कर्तव्य करत राहिले.तर निश्चितच वाईट होत राहते. अशामुळे आनंद हा एखाद्या झऱ्याप्रमाणे आटुन जातो.जीवन जगताना अशी जगले पाहिजे.स्वतःचा आदर्श समाजापुढे निर्माण झाला पाहिजे.आयुष्यातील आनंद हा आपल्या पुरता मर्यादित न राहता.तो सर्वांन पर्यंत पोहोचला पाहिजे. संत-महात्मे,समाजसुधारक यांनी त्यांच्या चांगल्या कर्तुत्वाने त्यांच्या जीवनातील आनंद चंदनाप्रमाणे सगळीकडे दरवळत ठेवला.आज आपण त्यांना देवाप्रमाणे मानतो.तो त्यांच्या कर्तव्यरुपी आनंदाने होय. आपणही संत-महात्मे,समाज सुधारक यांच्या विचारांचा ठसा आपल्या जीवनात उमटवला पाहिजे.चांगल्या विचारांनी चांगली माणसं घडतात. चांगली पुस्तके चांगली मस्तके तयार करतात.जीवनात चांगली पुस्तके वाचून जीवन चांगले घडवूया.आपल्या जीवनाचा आनंद सुगंधा सारखा सगळीकडे दरवळत ठेवूया.
राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु.पोकिनगाव राजा ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा 9823425852
rajendrashelke2018@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★
आनंद एक सकारात्मक ऊर्जा
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
या आयुष्याला 'वन्स मोअर' नाही, म्हणून चला सुख शोधूया आनंदाने जगूया...!!!आनंद हा मानण्यावर अवलंबून असतो...!आपलं मन हाच आनंदाचा खरा आरसा आहे. दुसऱ्याचं सुख पाहूनही ज्याच्या मनात हेवा निर्माण होत नाही तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकते.आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे त्यामुळे माणूस ह्या जीवघेण्या स्पर्धेत सतत गतिमान राहता राहता आनंदाने जगण्याची कलाच विसरला आहे.'तेरी सारी मेरे सारीसे सफेद कैसी' या नको त्या स्पर्धात्मक वृत्तीमुळे जीवनातील खऱ्या अवीट गोडीलाच आपण विसरलो आहोत.
मुळातच माणूस हा बुद्धिवंत प्राणी...!!प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीत मोजून पाहणारा..!आणि त्यातूनच सुरू झाली एकमेकांशी तुलना!!ही तुलना अगदी घरातील वस्तूंपासून तर गाडी ,बंगला इथवर न थांबता अगदी स्वतःच्या दिसण्यापासून तर आपल्या मुला बाळांच्या देखणेपणा पर्यंत पोहचली. इतरांशी तुलना करता करता आनंदाच्या सुंदर करंज्याच्या सुखद भावनांनाच आपण विसरत चाललो आहोत .'माझे ते ही माझेच आणि तुझे ते ही माझेच'ही मनोवृत्ती वाढून दुसऱ्याचे अघोरीपणे हिसकावून घेण्यात आनंद मानणारी अघोरी मनोवृत्ती वाढत आहे.खरे तर या इर्षेपोटी आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींनी आनंदित होण्यापेक्षा दुसऱ्याकडे असणारी गोष्टच अशा मनोवृत्तीना दुःखी करतांना दिसत आहे.खरे तर आनंद ही एक सकारात्मक मनोवृत्ती आहे म्हणूनच समर्थानी म्हटले आहे
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण।।
आनंदाची लहर पहिल्यांदा निर्माण होते ती आपल्या मनातच.आणि म्हणून आनंदाच्या शोधात सर्व ठायी फिरण्यापेक्षा आपल्या मनाच्या गाभाऱ्यातुन त्याला मुक्त करून त्याची उधळण करायला शिकलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे
ठेविले अनंते तैसेचि राहावे
चित्ती असू द्यावे समाधान!!
ह्या ओळी शब्दशः कदाचित काहींना प्रगती रोधक वाटत असतील.परंतु या ओळींचा व्यापक अर्थ 'आनंद' चित्त म्हणजे मनाशी निगडित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. समाधान मानण्यावर अवलंबून असते हेच तुकाराम महाराजांना या ओळीतून सुचवायचे आहे.'पेला अर्धा रिकामा की अर्धा भरलेला'हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर अवलंबून असते.
सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण स्वतःच्या अंतर्मनातुन छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.वाहणारी आल्हाददायक हवा,झाडे झुडपे ,वेली इतकंच कशाला रांगणारे छोटे बाळ आशा निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधता आला पाहिजे.
पण माणसाची मनोवृत्तीच
'सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एव्हढे' अशा प्रकारची असल्याने आनंदा पेक्षा दुःख शोधण्यातच त्याची हयात जाते.खरे म्हणजे मृत्यूपर्यंत श्वास चालत राहतो त्याला जिवंत राहाणं म्हणता येईल. परंतु त्याला ‘जगणं’ म्हणता येणार नाही. जगणं म्हणजे परिपूर्ण जीवन जगण्यासाठीचे जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न, जगणं म्हणजे लढत लढत मिळवलेलं समाधान आणि रोजच्या रटाळ जीवनक्रमाकडे पाहतानासुद्धा शोधलेला आनंद!आपल्या रोजच्या धावपळीच्या रहाटगाड्यातुन मधूनच छोटासा 'थांबा' घेऊन तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाण्यात जितका आनंद आहे तितकाच आनंद मोठं असूनही कधीतरी रस्त्यात लहानमुला सारखं 'कुल्फी' खात जाण्यात आहे.....लहानपणा सारखंच कधीतरी आवडत्या गाण्यावर ठेका धरण्यात आहे....कधीतरी आपलं 'मोठं'पण विसरून लहान मुलांच्या सोबत आपल्याला आवडणाऱ्या खेळात सहभागी होण्यात आहे,इतकंच कशाला बाथरूम मध्ये अंघोळ करता करता मोठं मोठ्यने गाणं म्हणण्यातही आनंद आहे.आनंद हा जळी, स्थळी, काष्टी,पाषाणी भरलेला आहे.फक्त त्याला आपल्या कवेत घेण्याची कला साधली पाहिजे.म्हणूनच आपण
चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे
आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे।।
असं म्हणत आनंदाने जगुया आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवूया!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.co
★★★★★★★★★★★★★★★★★
" आनंद - एक अक्षयपात्र "
मित्रांनो , या सृष्टीतील प्रत्येक जीवाला आपल्या जीवनात सुख - आनंद उपभोगावेसे वाटते . प्रत्येक जीव या आनंदप्राप्तीसाठी अविरत झटत असतो . आनंदाचे स्वरूप परिस्थितीनुरूप व प्राणीमात्रानुसार भिन्न - विभिन्न असते . असा हा आनंद सर्वांना हवाहवासा वाटतो ... प्रत्येकजण ह्या आनंदाच्या पाठीमागे आजन्म धावतच असतो ....
आपल्या देशात अनेक साधू - संत , महात्मे , थोर महापुरूष या सर्वांनी आपल्या उपदेशपर संदेशातून जीवनातील खर्या आनंदाची महती वर्णीले आहे .... त्यात तथागत गौतम बुद्ध यांनी तर आपल्या जीवनात आनंदाचे स्थान हे सर्वोच्च व सर्वोत्तम मानले आहे ... त्यांनी दुःखाचे मूळ अपेक्षा असे मानले ... अपेक्षाभंगाने मानव दुःखी व उदास होतो ... परिणामी तो नकरात्मक विचारात गुरफटतो ...स्वतःसह इतरांच्याही आयुष्यात तो ही नकारात्माची बीजे पेरत सुटतो ...तो न्यूनगंड व कतृत्वशून्य बनतो .... शेवटी अशा व्यक्तीला सर्वजण टाळून एकांगी बनवितात ... म्हणून आनंद हा मनावर अवलंबून असून ती मानसिक स्थिती आहे ... तो आपल्या प्रत्येकाच्या मानण्यात असतो..
" ज्यांसी म्हणावे अक्षयपात्र
ऐसा असे आनंद एकमात्र
जो दानाने कमी न होई तिळमात्र
उलट वाढतच जाई अहोरात्र !! "
असा आहे या आनंदाचा महिमा ... तो एक असे अक्षयपात्र आहे ... कितीही कुणालाही दान केले तरीही ते तिळमात्र कमी होत नसून अहोरात्र वाढतच जाणार ....
' आनंद ' हा एक असा अनमोल दागिना असून धारण करणारा तर तेजस्वी होतो .. पण त्या व्यक्तीला पाहणाऱ्या व्यक्ती देखील तेजाने प्रकाशीत होतात ... आनंद हा मानवाचे तन - मन निरोगी ठेवून सकारात्मक ऊर्जा वाढवतो ... एखाद्या रोग्याची आनंदानं सेवा - सुश्रृषा केल्यास तो लवकरच व्याधीमुक्त होतो ... तसेच दिर्घायू होतो ...
म्हणून हा आनंदाचा हिरा प्रत्येकाच्या मनोमुकाटात असावा .... तो धारण केल्यास जीवनातील सर्व चिंता , क्लेश , दुःख , नैराश्य , ताणतणाव यापासून निश्चितच मुक्ती मिळेल ...
हा आनंद या धरेवरील स्वर्ग क्षण होय ... त्यातूनच आपल्याला साक्षात देव दर्शनाची अनुभूती मिळते ... तेव्हा ही "आनंद ज्योत " निरंतर मानवी अंर्तमनात तेवून तिचे जगभर प्रसार करावा ... ह्या " आनंदधाराचे झरा " एका ह्दयाकडून दुसऱ्या ह्दयी अखंड वाहत ठेवावा ...
" गेला अवधी न येई परत
आयुष्यही जाई असेच सरत
आनंदास मानूया आता स्वर्गसुख
ठेवूया नित्य आपले प्रसन्नमुख !! "
मग , या पृथ्वीवर कोणीही शाश्वत नाही ... तेव्हा आपण भूतकाळात व भविष्यकाळात न जगता फक्त वर्तमानातच जगायला शिकावे ... आहे त्या गोष्टींचा समाधानीवृत्तीने आनंद घ्यावा ... भौतिक सुख हे मृगजळासम असून त्यामागे लागून दुःखी होत आयुष्यभर पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नसतो.... ही धन - दौलत आपल्या मृत्यूनंतर सोबत येत नसते याची जाणिव ठेवावी ... जे काही जीवनात मिळेल त्या क्षणाचा आनंदानं स्विकार करावा ... शेवटी आनंदाबाबत एवढंच म्हणावे वाटते की ....
" दुःख लपवावे मनात
सुख वाटावे जनात
आनंदाची करता उधळण
होई सर्वां चैतन्यमय जीवन !! "
अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
★★★★★★★★★★★★★★★★★
शोध सुखाचा .....
➖➖➖➖➖➖
जगात अनेक प्रकारचे विचारसरणीचे लोक राहतात. कोणी पैशाने श्रीमंत तर कोणी तर कोणी पैशाने गरीब कोणी मनाने श्रीमंत तर कोणी मनाने गरीब.
सुख हे समाधानात असते.
दिवाळीच्या तोंडावर एक जोडपं साड्यांच्या दुकानात गेलं. बायकोला साडी आवडते पाच हजारांची पण नवर्या जवळ तेव्हा जास्त पैसे नसतात . बायकोला मात्र तीच साडी हवी असते. ती ऐकत नाही तीचा हट्ट नवरा पूर्ण करु शकत नाही .
तो तीला दुसरी साडी पसंत करायला सांगतो. त्या दोघांमध्ये भांडण होतात. नाईलाजास्तव तो तिला साडी घेऊन देतो. घरी येऊन पुन्हा दोघांचे भांडण होते .
ती म्हणाली शेजारच्या काकूंच्या अंगावर अशीच साडी होती मला खुप आवडली म्हणून घेतली.
तुमच्याजवळ नेहमीच पैसे नसतात .
तो म्हणाला मला गाडीचा हफ्ता भरायचा आहे त्याला पैसे अपूर्ण पडता आहेत तु थोडी कमी किंमतीत साडी घेतली असती तर चाललं नसतं का ? कोणी काही घेतलं म्हणून आपण ते घेतलंच पाहिजे का?
दोघांचे खुप भांडण झाले .
आता विचार करण्यासारखी बाब आहे आता खरंच ती साडी तीला दिवाळीचा आनंद घेऊ देईल का? ती साडी नेसल्या वर तीला झालेले भांडण नक्कीच आठवेल आणि आणि ती साडी तीला सुख देण्यापेक्षा दुःखच जास्त देईल.
कोणी पंचवीस लाखांची गाडी घेतली म्हणून आपण ही तीच घ्यावी अशी जिद्द मनात ठेवून गाडी तर आपण तीचे न परवडणारे हफ्त्यांवर घेऊन टाकतो. काही दिवसांसाठी ती गाडी आनंद देते पण नंतर तीचे हफ्ते फेडता फेडता घरात होणारे वाद कटकटी गाडीच्या सुखा पेक्षा जास्त त्रास दायक ठरतात.
आपण भौतिक सुखात सुख शोधतो आणि अट्टाहासाने मिळवतोही पण काही क्षणांसाठी नंतर त्या वस्तू ज्या आपल्याला नंतर त्रासदायक ठरणार हे माहिती असूनही आपण त्या मिळवण्याचा अट्टाहास करतो का ? देखावा करण्यासाठी? ह्यालाच ईर्षा म्हणतात ज्याचे मन इर्षा द्वेषाने भरलेले असते ती व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही .
सुख हे नेहमी समाधानात असते. भौतिक वस्तूंमुळे मिळणारे सुख हे क्षणभंगुर असते .तर समाधानात मिळणारे सुख हे चिरकाल आनंद देणारे असते .
समाधानात मानलेले सुख हे केवळ चिरकाल आनंदच देत नाही तर नात्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्यास मदत करते
जिथे समाधान आहे तिथे प्रेम ,सुख आनंद आणि शांती नांदते.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
७७४४८८००८७
चाळीसगाव .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें