*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- तिसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 18 मे 2020 सोमवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- प्रदूषण*
( जल, वायू, ध्वनी व इतर )
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*प्रदुषण*
जाणीव जागृती व्हावी म्हणून शालेय जीवनापासून प्रदूषणवरती निबंध लेखन, तर जनजागृतीसाठी लोकांमध्ये प्रदूषणाच्या संदर्भात व्याख्याने आयोजित करणे, शासकीय पातळीवर ती काही विशेष योजना राबवून सेमिनार ठेवणे, तसेच काही खास योजना देखील आखणे. असे अनेक प्रयत्न आजपर्यंत झालेले आहेत. विहीर तलाव तळे किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी अनेक प्रकारे अनेक बाबीतून लोकप्रबोधन झालेले आहे. कारखानदारीचा वाढता पसारा लक्षात घेऊन कारखान्यातून निघणारे पाणी, दूषित पाणी नदी ओढे किंवा साठवणीच्या पाण्याच्या अनियंत्रित सोडण्यात येते त्यालादेखील आळा घातला पाहिजे याबाबत जागृती झालेली आहे. परंतु अंमलबजावणी होत नाही ही गोष्ट अलविदा. आणि खरं पाहिलं तर जागृती झाले असेही म्हणता येत नाही जागृती झाल्यानंतर असे बेजबाबदार वागणे लोकांकडून होतच नसते. कोरोनाच्या धास्तीने आणि लॉक डाऊनच्या निमित्ताने लोक जेव्हा घरामध्ये बसले त्यावेळेला कधीही नव्हती एवढी गंगा स्वच्छ झाली. खरं पाहिलं तर कोरोना ही इष्टापत्ती म्हणून जर आपण स्वीकारली तर त्याच्या मधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायलाही मिळाल्या. पाणी प्रदूषण बाबतीत तर ही गोष्ट झालीच झाली, परंतु हवा प्रदूषणची पातळी देखील अत्यंत खालावली. एखाद्या प्रांतातून हिमालयाची शिखरे गेली तीस वर्षापासून दिसत नव्हती. ती आता स्पष्ट दिसू लागली आहेत. याचे कारण हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. अनावश्यक गोष्टीसाठी वाहनाचा केला जाणारा वापर. पायी चालण्याची सवय बंद होऊन प्रत्येक गोष्टीसाठी केला जाणारा वाहनांचा वापर, शुल्लक कामासाठी आणि कमी अंतरासाठी देखील वाहनांचा अवास्तव वापर प्रदूषणाला कारणीभूत ठरत होता. आणि त्यामुळेच वायु प्रदूषण भयंकर वाढले होते. ओझोनच्या छिद्राचे रूपांतर भगदाडात झाले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि जग स्थिरावले. याचाच परिणाम म्हणून ओझोनचे छिद्र भरून येण्यास कमालीची मदत झाली. जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाबाबत ऊहापोह झाल्यानंतर ध्वनिप्रदूषण याबाबत बोलायचे म्हटले तर आपला भारत देश उत्सवप्रिय देश आहे. अनेक धर्मियांचे अनेक उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात आणि ते साजरे करण्याची पद्धत म्हणजे अगदी धूमधडाक्यामध्ये. लाऊड स्पीकर, बँड बाजा डॉल्बी त्याचा वारेमाप वापर करून बेसुमार असे उत्सव साजरे केले जातात. आणि ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला जातो. ध्वनी प्रदूषणाचा ज्या ज्या वेळेला उल्लेख येतो त्या त्या वेळेला मुस्लिम बांधवांच्या मशिदीवरील लाऊड स्पीकरचा आवर्जून उल्लेख केला जातो. अजान साठी मुस्लिम बांधव या स्पीकरचा उपयोग करतात. आणि त्याचा इतरांना त्रास होतो. परंतु याही पेक्षा आधिक कर्कश आवाज आपल्या कानावर पडत असतात. त्यामध्ये कारखान्याचे भोंगे असतील, रस्त्यावरून जाणार्या वाहनांचे अवाजवी हॉर्न वाजवणे असेल. लग्नसमारंभ किंवा इतर समारंभामध्ये डॉल्बी असेल. असे अनेक प्रकार ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत आहेत. या सर्व प्रदूषणा पलीकडे आणखी एक प्रदूषण आहे. ते म्हणजे माणसांच्या मनाचे आणि बुद्धीचे प्रदूषण. राजकारणाच्या सुपीक जमिनीत या पिकाचे वारेमाप उत्पन्न निघते.तेथेच त्याला आणखी खतपाणी मिळते. जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करून डोकी प्रदुषीत केली जातात आणि आपला स्वार्थ साधला जातो. यामध्ये आपल्या येथील धुरीण यात फार प्रारंगत आहेत. हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आणि बुद्धीने कमजोर असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचे प्रदूषण लवकर होते. आणि आपली क्रयशक्ती या प्रदूषणामध्ये निष्कारण वाया घालवली जाते. परंतु त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत असतो. सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक शांतता भंग पावण्याचे कारण हे प्रदूषण होत असते. त्यामुळे मनाचे आणि बुद्धीचे संस्कारन झाले पाहिजे. आपमतलबी राजकारण्यांपासून आपण सावध असले पाहिजे. त्यांच्या कल्पक बुद्धीला आपण बळी न पडता मन आणि मेंदू जागृत ठेवून या प्रदुषणापासून आपण दूर राहिले पाहिजे. हे विश्वची माझे घर या संकल्पनेवर चालणारा भारत देश आपल्या मोजक्या लोकांच्या प्रदूषित बुद्धीमुळे अशांत होऊ देता कामा नये. इथली शांतता भंग होता कामा नये. सौख्यभरे नांदण्यासाठी आपल्या मनाचे आणि बुद्धीचे प्रदूषण आपण टाळले पाहिजे. एकमेकांच्या सहकार्याने आणि सहयोगाने आपला देश उन्नत करूया.
*हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
*प्रदूषण -कारणे व उपाय*
*(09) सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
प्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचेआहे.वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्न व सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचवून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो .आणि जीवनचक्र ढासळते.
जल वा पाणी प्रदूषण—अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, विविध कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे.
जल(पाणी) हे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.जल प्रदूषणाची कारणे -औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.नदीत कपडे धुणे, भांडी घासणे,जनावरे धुणे फुलांचेमाळा, प्लास्टर आँफ पँरिस च्या मुर्त्या विसर्जन करणे यामुळे जल प्रदूषण होते. रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते . औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने,रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने,पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने, कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,जल प्रदूषण होते.
जलप्रदूषण थांबणे यासाठी औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सूचना करणे, रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे. सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, कीटकनाशके मर्यादित प्रमाणात वापरणे. मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरून सणांचा सात्त्विक आनंद लुटणे ,पाणी उकळवून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे. कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीतकमी प्रमाणात कशी होईल याची काळजी घेणे.घरगुती अशुद्ध पाणी योग्य ती प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडणे.
हवाप्रदूषण:— हवा म्हणजे हवा प्रदूषण,कारखान्यातून मोठ्या प्रमाणात निघणारा धूर हवेत सोडला जातो, तसेच वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते. आरोग्यावरील परिणामवायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते.
उपाय योजना. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणार्या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणार्र्या प्रदूषणावर विकसित देशात बरेच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशात अजूनही म्हणावी इतके यश मिळालेले नाही. प्रदूषणरहित नवीन व स्वस्त ऊर्जास्रोताचा शोध यावर अवलंबून रहाणे आवश्यक आहे.
ध्वनिप्रदूषण:— आवाज म्हणजे ध्वनी . वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनिप्रदूषण' म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती.
ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत-परिवहन प्रणाली चालू असताना आवाज करणारी यंत्रसामग्री, वाहने वगैरे. लोकांचा गोंगाटध्वनिप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही. म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदी मध्ये स्पिकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते.
ध्वनिप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काही उपाय- ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर , फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात. भारतात सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ डेसिबल्सपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मृदा प्रदुषण - मृदा म्हणजे मातीचे प्रदुषण मृदा प्रदुषण माती प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यावर आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे. औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते.
मृदा प्रदूषणाचे परिणाम औद्योगिकीकरणाचे दूष्परिणाम -उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरत आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटकांच्या मिश्रणातून माती नापीक होते. शिवाय हवा पाण्याच्या व मृदेच्या प्रदूषनामुळे रोगांच्या साथी पसरतात. हानिकारक किरणोस्तारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पति, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ. समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो.
मृदा प्रदुषणावरील उपाय -जलसंचयन व वनस्पति व जंगल क्षेत्रात वाढ करणे आवश्यक :जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा -पाणी जिरवा’ योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने ताली घालणे, त्या त्या हवामानात वाढणार्याा वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड करणे आवश्यक आहे.
*प्रदूषणाच्या विळख्याने,बिघडत चालले आरोग्य* !
*पर्यावरणाचे रक्षण करणे हाच उपाय ठरेल योग्य* !
अशा प्रकारे प्रदुषण थांबवण्यासाठी तसेच कोरोणा ला दूर पळविण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. तरच आपला देश प्रगती करू शकतो .
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
*प्रदूषण एक समस्या*
*(08)महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
प्रदूषण’ फार-फार ‘सामान्य’ म्हटलं तर, ‘कॉमन’ विषय आहे. ‘प्रदूषण’ म्हणताच डोळ्यापुढे धूळ-धूर, जमीन, घाण पाणी कच-याचे ढीग येतात. कानात कर्कश ‘हॉर्न’ वाजू लागतात आणिक विचार केला की, ह्याचे प्रकार ‘जल प्रदूषण’, ‘वायू प्रदूषण’, ‘मृदा प्रदूषण’, ‘ध्वनी प्रदूषण’ लक्षात येतात...आणखी खोलवर गेलो की ह्याची कारणे पण आढळतात. वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारी विषारी रसायने. झाडांची-वनांची नासधूस प्लास्टिकचा प्रयोग इतर सर्वांना सर्व माहित आहे. अगदी पाचवी-सहावीची मुले पण ‘प्रदूषणाचे प्रकार, त्याची कारण त्याची निवारणं धडाधडा सांगतील. मोठी समजूतदार मंडळी तर अगदी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून ‘प्रदूषणाचे विकराळ रूप आपल्या समोर मांडतील.
थोडक्यात ‘कळतंय पण वळत नाही’ असे झाले आहे. कां? हे सर्व माहिती असून देखील प्रदूषण कमी होत नाही. कारण? आपण आजवर वैज्ञानिक किंवा गौण प्रकार कारणं आणि त्याचे निवारण ह्यावरच विचार केला आहे. मुख्य किंवा मानसिक/आंतरिक प्रकारावर कारणांवर विचारच केला नाही.
**प्रदूषणाच्या विळख्याने,बिघडत चालले आरोग्य* !
'प्रदूषणाचा’ मुख्य प्रकार आहे मन आणि मस्तिष्क प्रदूषण आणि हाच तो प्रकार ज्यावर मुख्य कारणे अवलंबून आहे. आपण ‘वायू प्रदूषणाबद्दल बोलतो, पण वाहतुकीची साधने, त्यातून निघणारा धूर, झाडांना कापून तेथे इमारती बांधणे. पुल, फ्लायओव्हर काढणे ह्या सा-यावर बंदी लावली कां? आपण अंगणाच्या जागेवर एक ‘एक्स्ट्रारूम’ बांधतोच ना? आधी घरात झाडे असायची, जास्त आणि फर्नीचर कमी. पण आज उलट झालं आहे. फ्रीज, ए.सी. ह्यातून निघणारी विषारी गॅस’ क्लोरोफ्लोरो ‘कॉर्बन’ वायूमंडळासाठी नुकसानदायक आहे. पण आज घरोघरी ए.सी., फ्रीज आहेतच नं? आधी आपण सायकल किंवा ‘पब्लिक ट्रांसपोर्ट’ जास्त वापरायचो पण आज घरोघरी दुचाकी वाहन आणि कार आहे. ‘बस’ किंवा ‘टैंपो’ मधे बसणे म्हणजे ‘कमीपणा’ वाटतो. वेळ वाया जातो, इ.
आपण जल प्रदूषणावर बोलतो. शासनाने अभ्यास पुरतकात धडे लावले आहे. पण नदी किनारी हज्जारो कारखाने विषारी रसायने पाण्यात सोडत आहे. उर्वरक, कीटनाशक, पाण्यात सर्रास वाहवत आहेत. त्यांची मुले (कारखाना मालकांची) पण शाळेत जातच असतील नं? ‘प्रदूषणा’ वर धडे वाचतच असतील नं? पास पण होत असतील चांगल्या मार्कांनी. शासनाद्वारे शाळेत धडे शिकवले जातात पण त्याच उपयोग उद्योगपती किंवा कारखाना मालकांवर नियंत्रण नाही. हा विरोधाभासच नं!
आज घरात जेवढे सदस्य तेवढेच मोबाईल. आजपासून १० वर्षा आधी बिना मोबाईलच्या पण आयुष्य सुरू होतंच नं? सर्वांना कळतंय की मोबाईल वेव्ह/तरंगांनी वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतोय, चिमण्या आणि इतर पक्षी नष्ट होत आहेत. प्रवासी पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. आणि हे सर्व आकडे शासना जवळ आहेत. पण ह्या दिशेत काहीच सख्ती नाही. शासन सोडा, साधारण माणसाला पण कळतंय तरी तो ‘मोबाईल’ सोडून राहूच शकत नाही. जाणून-समजून आपण आपले भविष्य रसातळात नेत आहोत, कारण आपले ‘मन’ आपले ‘विचारच’ प्रदूषित झाले आहे. आणि हेच ते ‘मन आणि मस्तिष्क’ प्रदूषण.
आता जर ‘मन आणि मस्तिष्क प्रदूषण’ च्या कारणांवर विचार केला तर पहिलं कारण ‘नैतिक मूल्य’ ढासळणे. आज ‘सादा जीवन उच्च विचार’ ही विचारधाराच राहिली नाही. ‘सत्य’, ‘प्रामाणिकपणा’, आत्मसम्मान’ , ‘दया’, ‘परोपकार’ हे सारे शब्द फक्त आणि फक्त साहित्यात आढळतात. ‘पैसा’ हाच खरा धर्म झाला आहे.दुसरं कारण म्हणजे, ‘स्टैंडर्ड ऑफ लिव्हिंग’ जीवनस्तर वाढले आहे. घरात एसी, फ्रीज, कार हवीच. प्रत्येक खोली ‘वेल फर्निश्ड’ हवीच. कापडी विंâवा कागदी पिशव्या, ‘आऊटडेटेड’. नवी टेक्नोलॉजी येताच जुना मोबाईल बदलायचा.
सायकल चालवायची नाहीपण ‘जिम’ मधे जायचे. एका व्यक्तिचे किमान दोन फ्लॅट तरी हवे. प्रत्येकाची वेगळी ‘बेडरूम’, ‘स्टडीरूम’ हवी म्हणून झाडे लावायला जागाच नाही. ‘प्रदूषण’ ह्या विषायवर चर्चा पण ‘ए.सी.’ रूम मधे होते.तिसरं कारण म्हंटल तर अप्रायोगिक शिक्षण पद्धती! ‘छात्र’, ‘मुले’ ही राष्ट्राचे भविष्य! लहानपणी झालेले संस्कार आयुष्यभर साथ देतात. आजची मुलेतर फारच हुषार पण आहे. पण त्यांची अभ्यास पद्धती दोषपूर्ण आहे. ती फक्त वाचतात पाठ करतात, लिहितात आणि नव्वद टक्के मार्क आणतात. पण ती शिक्षा त्यांच्या अंगवळणी पडत नाही. झाडांची उपयोगिता, पर्यावरण, जैव मंडळ, प्रदूषण, कारणे, निवारणे हे सर्व त्यांचा अभ्यास क्रमात आहे पण फक्त ‘थ्योरिटिकल’, ‘प्रेक्टिकल’ काहीच नाही. अभ्यास म्हणजे फक्त चांगले गुण मिळवा आणि चांगली नोकरी मिळवा एवढेच. आपण त्यांचे पण ‘मन आणि मस्तिष्क’ प्रदूषित करत आहोत नं?
तर आता जर निष्कर्ष लावायचा आहे आणि प्रदूषणांच्या कारणांचे निवारण हवे आहे, तर सर्वात आधी विचारांची शुद्धी व्हायला हवी. काय चूक काय बरोबर हे कळायला हवं. ‘लोकं काय म्हणतील’ ह्या पेक्षा ‘तुमचं मन काय म्हणतं’ हा विचार करायला हवा. ‘पैसा’ हा ‘देव’ नाही हे समजून घ्यायला हवं. आज मोठमोठाले बिल्डर शासनाला लाच देवून हिरवीगार झाडे कापून, झील/तलाव भरून त्यावर मोठमोठाल्या इमारती बांधत आहे. पैसा एवढा की मोजता मोजता आपले आयुष्य निघून जाईल. तरी हव्यास कमी होत नाही. हे ‘मन आणि मस्तिष्क प्रदूषण’ नं?
*झाडे लावू अन् जगवून ,ठेऊ प्रसन्न वातावरण ,काळाची गरज ओळखून रोखू या वाढते प्रदूषण*
आज लोकांच्या मनात चांगले विचार, चांगले संस्कार पेरायची गरज आहे. ‘विकास’ आणि ‘विनाश’ फक्त एक अक्षराचा फरक आहे. जास्त ‘विकास’ विनाशाकडे नेणार हे लक्षात असणे गरजेचे आहे.
*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
*(9421802067)*
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
*प्रदूषण एक भीषण समस्या*
परिसरातील अहितकारक बदलांना 'प्रदूषण 'असे म्हणतात. हे प्रदूषणाचे अहितकारक बदल आजच्या बुद्धिमान माणसाने स्वतः च्या समोर स्वतः हे प्रदूषणाचे संकट निर्माण केले आहे.
प्रदूषणाचे हे संकट काही प्रमाणात कमी करता येईल. मर्यादा ठेवता येईल पण त्यासाठी पृथ्वीवरील प्रत्येक मानव जागरूक झाला पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम फक्त मोहीमच न राहता ते प्रत्यक्षात उतरून झाडे लावली पाहिजे आणि जगवलीच पाहिजे.
पर्यावरणातील झाडे न कापता अधिकाधिक लावून जगवणे हे ध्येय ठेवले तरच प्रदूषणाची ही भीषण समस्या कमी करता येईल.
संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' झाडे हे आपल्याला सावली, फुले ,फळे देतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व जगविणे आवश्यकच आहेत. हे जग निर्माण करताना परमेश्वराने माणूस व पर्यावरण यात सुंदर समतोल साधला आहे. निसर्ग व मानव एकमेकांना पूरक होते. परंतु औद्योगिक क्रांती झाली आणि हा सर्व समतोल बिघडला. प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने ध्वनिप्रदूषण वायुप्रदूषण , जलप्रदूषण हे जास्त प्रमाणावर निर्माण झालेली भीषण समस्या आहे. प्रदूषणाचा परिणाम होत असल्यामुळे वातावरण दूषित झालेले आहे. (वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम)
माणसाची गती वाढली हवेचे प्रदूषण निर्माण झाले. हवेच्या प्रदूषणामुळे माणसाला श्वासोच्छवासला त्रास होतो. विविध आजार होतात. आकाशातील दूषित हवेचे ढग, पावसाळी ढगांवरही मात करतात. माणसाने गिरण्या कारखाने सुरू केले. आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण , जल प्रदूषण निर्माण झाले.
(जल प्रदूषण) कारखान्यामुळे दूषित पाणी नदीत सोडण्यात आले. नद्यांचे सारे पाणी दूषित झाले. या जलप्रदूषणामुळे माणसाला नाना प्रकारच्या आजाराला , रोगराईला आणि साथीच्या आजाराला बळी पडावे लागले. पाण्याची अवस्था किंवा त्यामधील घटक द्रव्य यांच्यामधील माणसाने अहितकारक बदल घडून आणून जलप्रदूषण निर्माण केले आहे.
(ध्वनी प्रदूषण) वातावरणातील अनावश्यक, असुविधाजनक ,अप्रिय, प्रतिकूल यांच्या हानिकारक परिणाम होऊन ध्वनी प्रदूषण निर्माण झाले.
माणसाने लावलेले विविध शोध स्वतःसाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टी ध्वनिक्षेपक, दूरचित्रवाणी अशा कितीतरी गोष्टी ध्वनिप्रदूषण निर्माण करीत आहेत. सतत मोठे मोठे आवाज कानावर पडल्याने कर्णबधिरता येण्याची मोठी शक्यता आहे. या ध्वनिप्रदूषणामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होतो, रक्तदाबावर ही विपरीत परिणाम होतो.पोट भरण्यासाठी पोटाच्या मागे लागलेला ग्रामीण समाज शहराकडे धावू लागला . त्यामुळे शहरातील झोपडपट्टी वाढली आणि प्रदूषणही वाढले. यांत्रिकीकरणाचा दुष्परिणामांच्या अनेक संकटापैकी वातावरणातील ओझोन वायू नष्ट होण्याचे संकट आता वसुधेवर कोसळले आहे.म्हणजे प्रदूषणाचा भस्मासुर माणसानेच निर्माण केला आहे. आणि आज तो माणसाच्या जीवावर उठला आहे. या सर्वच्या सर्व प्रदूषणामुळे वातावरणाचा तोल ढासळला असून तो समतोल ठेवण्याकरिता प्रदूषणावर नियंत्रण ठेवावयास तसेच प्रदूषण होणाऱ्या गोष्टींची दक्षता पाळावयास पाहिजे. त्यामुळे प्रदूषणास सहाय्य होते अशा व्यवस्थेवर प्रतिबंध घातले पाहिजे. कारण माणसासाठी प्रदूषण ही भीषण समस्या होऊन बसलेली आहे.
ही समस्या नष्ट करायची असेल तर पर्यावरण विषयाच्या दृष्टिकोन लहानपणापासूनच मानवी मनावर बिंबवायला सुरुवात केली पाहिजे. कारण उद्याचा नागरिक हा पर्यावरण जागरूक नागरिक हवा, तरच मानवजातीची धडगत आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
लेखिका
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( सहशिक्षिका)
ता. हदगाव जि. नांदेड.
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदूषण
प्रदूषण हा शब्द परवलीचा शब्द बनलेला आहे. प्रदूषण हा शब्द माहीत नसलेला व्यक्ती दुर्मिळच. प्रदूषण म्हणजे सभोवतालच्या परिसरामध्ये घातक अशा घटकांची निर्मिती प्रमाणाबाहेर होणे.ज्याचा परिणाम सर्व सजीवावर होतो. प्रदूषणामध्ये ध्वनि प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, रासायनिक प्रदूषण असे प्रकार पडतात.
ध्वनि प्रदूषणामध्ये आपल्या अवतीभवती होत असणारे विविध आवाज जे आपल्याला त्रासदायक ठरतात, जे आवाज आपल्याला नकोसे वाटतात. ते आवाज ध्वनी प्रदूषणामध्ये मोडतात.गाड्यांचे कर्णकर्कश्य आवाज, मोठ्याने लावलेले स्पिकर,गोंधळ गडबड, उद्योगधंद्यांचे भोंगे इ. अनेक कारणांमुळे ध्वनी प्रदूषण होत असते.
यावर उपाय म्हणजे आवाजाची तिव्रता कमी करणे.
जल प्रदूषण म्हणजे पाण्यात घाण टाकल्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य बनणे होय.पाणी प्रदूषण कशामुळे होते? पिण्यायोग्य पाण्यात असे प्रदुषित घटक मिसळणे की ज्याच्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य रहात नाही. जर ते पाणी पिले तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, व पिणारी व्यक्ती विविध आजारांना बळी पडते.कारखान्यातून बाहेर सोडलेला मैला नदीत मिसळणे,शहरातील मैलायुक्त व सांडपाणी नदीत मिसळणे,नदीच्या पात्रात कपडे धुणे,जनावरांना धुणे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे पाणी प्रदूषण होते. त्यामुळे आपण अशाप्रकारे नदीच्या पात्रात घाणेरडे पाणी न सोडता त्याचघ दुसरी व्यवस्था करावी.
वायु प्रदूषण म्हणजे शुद्ध हवेमध्ये विविध प्रकारचे घातक वायू मिसळणे व ती हवा आरोग्यासाठी घातक बनणे होय.कारखान्यातून, विविध प्रकारच्या वाहनांमधून, घराघरातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड वायू,हरितगृहांतील क्लोरोफ्लोरो कार्बन वायू,त्याचबरोबर कार्बन मोनाक्साईड वायू या सर्वांमुळे वायू प्रदूषण होते.
त्यामुळे या सर्वांचा वापर कमी प्रमाणात करुन आपण हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणू शकतो.
त्याचबरोबर रासायनिक खते,औषधांचा वारेमाप वापरामुळे देखील मानवावर,निसर्गावर वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे कॅन्सरसारखे महाभयंकर रोग होत आहेत.
त्यामुळे रासायनिक खतांचा, औषधांचा वापर कमी करुन सेंद्रीय खते व औषधे वापरली पाहिजेत.
जर आपण स्वच्छ वातावरणात राहिलो तळ आपले आरोग्य चांगले राहील. म्हणून प्रत्येकाने आपल्या घराबरोबरच सभोवतालचा परीसर ही स्वच्छ ठेवावा.म्हणजे प्रदूषण आपोआपच कमी होईल.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदूषण
*********************
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
वाकदकर【17】
_____________________
अगदी शालेय जीवनापासून सहज समजणारा आणि आजपर्यंत उकल न झालेला टॉपिक म्हणजे 'प्रदूषण'...
प्रदूषण म्हणजे काय...? त्याचे प्रकार कोणते..?
प्रदूषणाची कारणे कोणती..?
प्रदूषणाचे दुष्परिणाम कोणते...?
यावर उपाययोजना कोणत्या...?
वरील सगळे प्रश्न सहज लिहिणारे विद्यार्थीे आणि या प्रश्नाला डोळेझाक करून तपासून बक्कळ मार्क्स देऊन टाकणारे शिक्षक या दोनही भूमिकेतून जाताना आजपर्यंत ही समस्या का सुटली नाही याचा विचार येऊन मन खिन्न होतं आणि 'तुझे आहे तुजपाशी परी तू जागा भुललाशी।।' या संतोक्तीची आठवण येते.
प्रदूषण समस्या आणि तोडगा सगळ्यांनाच माहिती आहे परंतु... याचे तात्काळ परिणाम ज्याचे त्याला मिळत नसल्याने ...येरे माझ्या मागल्या....या पद्धतीने या मुद्द्याकडे डोळेझाक केलें जाते. आजपर्यंत अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी कितीदा तरी चेतावणी दिली तरी सुद्धा हा भोंगळ कारभार सर्वच माणसांचा सुरूच आहे.
जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असो की मुर्दा प्रदूषण असो या सगळयांना कारणीभूत म्हणजे मानवी मनाचा हव्यास आणि उत्क्रांतीपायी चाललेली प्रगतीची धडपड, त्यातूनच स्वीकारलेले जागतिकीकरण आणि याचाच परिणाम म्हणजे अमर्याद वृक्षतोड त्यावर बांधलेले मोठमोठे कारखाने, रस्ते आणि इतर सुविधांची उपलब्धी.
आत्ताच्या काळात कोरोनासारखे संकट चालून आले आणि सगळ्यांना लॉकडावून करून घ्यावे लागले याचाच अर्थ.... जीवनावश्यक सोडून बाकीचा चाळा बंद करावा लागला.... आणि याचं एक वेगळं अनपेक्षित फलित म्हणजे आज कोसोदूर पासून हिमालय आपलं सौंदर्य दरवळतोय... नद्यांच्या पाण्यात नितळशार जीवन बघून मन प्रसन्न होतंय... आणि समुद्रात अनंत प्रजातीच्या सजीवांचा वावर दिसून येतो आहे....
याचा अर्थ असा की आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यातूनच राष्ट्रा राष्ट्रात चढाओढी सुरू झाल्या आणि मग तंत्रिकतेच्या जोरावर प्रगतीच्या हवेतील उडया मारत मारत आम्ही आजण खाईकडे प्रवेश करत होतो याची साधी जाणीव सुद्धा आमच्या धृतराष्ट्री डोळ्याला झालीच नाही..
यासाठी सर्वांच्या प्रयत्नाने आवर्जून वृक्षलागवड व संवर्धन करूया. वृक्षतोड थांबवूया.. शक्य तेथे डिझेल, पेट्रोल ,रसायन, पाणी यांचा अमर्याद वापर कमी करून ...
जमिनीमध्ये जैविक खतांचा आणि किटकानाशकांचाच वापर करूया ...
विनाकारण वाहनाचा वापर टाळूया.
प्रदूषण रोखुया...सुरक्षित जगूया...आणि राष्ट्र उभारणी साठी हातभार लावूया..
-श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर)
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदूषण
आज-काल प्रदूषणाविषयी माहीत नाही अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. कुणाला लहान मुलाला जर तुम्ही विचारले प्रदूषणाचे प्रकार कोणते ?तर तो सहज सांगेल जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण ते कसे होते हे देखील तुम्हाला सांगेल. ते थांबवायचे कसे हे देखील माहिती आहे. मग एवढे सगळे असून प्रदूषण थांबत का नाही? कारण माणसांचे विचारच प्रदूषित झाले आहे दुष्परिणाम माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विचारांचे प्रदूषण होय.
जगातील महान आश्चर्यात ज्याची गणना होते असा ताजमहल का बर काळवंडत आहे? याचे कारण म्हणजे आग्रा व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात होत असलेले कारखान्यातील वायु प्रदूषण . त्याच प्रमाणे यमुना नदीत आजूबाजूच्या कारखान्यातील पाणी सोडले जाते त्यामुळे देखील आजूबाजूच्या जमिनीवर त्याचे परिणाम होऊन जमीन नापीक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याचे देखील प्रमाण वाढलेले आहे. प्रदूषण होऊ नये मग सरकार काळजी करत आहे परंतु; त्या कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होते आहे का? कारखान्यांनी आपले प्रदूषित पाणी नदीत सोडले या कारखान्यांवर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे हे पाणी शुद्धीकरण करून मगच वापरण्यात यावी असा नियम केल्यास का बर कारखाने मग हे पाणी नदीत सोडतील? परंतु सरकार आणि कारखानदार दोन्ही याबाबतीत उदासीन वाटते आहे का?
कारखान्यातील धुरामुळे वायुप्रदूषण होते सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायॉक्साइड यासारखे घातक विषारी वायू वातावरणात सोडले जातात ज्यांचे कारखाने आहेत त्यांना झाडे लावण्याची व त्यांच्या संगोपनाची सक्ती केल्यास हे प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल .
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे भरपूर प्रदूषण होते या वाहनांसाठी काही नियम व अटी लागू करता येतील एखादे वाहन किती वर्षे वापरात असावे याबाबत निर्बंध करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे वाहन मालकांनी वेळोवेळी आपले वाहन किती प्रदूषण करत आहे याबाबत अंदाज घ्यावा व त्यानुसार आपल्या वाहनाची देखभाल करावी.
अनेक सण उत्सवात डीजे चा वापर केलेला दिसतो डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य जसे ढोल, ताशा ,झांज पथक, लेझीम यांना प्रोत्साहन दिल्यास ध्वनिप्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
धार्मिक विधी करताना आपण फुले, हार हे निर्मालय पाण्यात टाकून न देता त्यापासून खत निर्मिती केली व त्यास प्रोत्साहन दिल्यास पाण्यामध्ये होणारे प्रदूषण देखील काही प्रमाणात कमी होईल.
धार्मिक स्थळ शिर्डी येथे गुलाबाच्या पाकळ्या पासून उदबत्ती बनवण्याचा व्यवसाय एका बचत गटाने सुरू केलेला आहे हा एक आदर्श सर्वांसमोर आहे. गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस यापासून न बनवता मातीपासून, शाडूपासून बनवल्यास त्या मातीमध्ये विरघळ ल्या जातील त्यामुळे देखील पाण्यातील प्रदूषण कमी होईल असे वाटते.
प्लास्टिक मुळे देखील प्रदूषण वाढत आहे प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या, कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणे देखील गरजेचे आहे .ओल्या कचऱ्यापासून जे नागरीक खत निर्मिती करतात अशा नागरिकांचा गुणगौरव केल्यास इतरही त्यांच्यापासून प्रेरणा घेतील त्याचप्रमाणे छतावरील पाण्याचे व्यवस्थापन करेल ,वृक्ष लाऊन त्यांचे संवर्धन करेल अशा व्यक्तींना घरपट्टी मध्ये सवलत दिल्यास लोक हे काम नक्कीच आनंदाने करतील .
मनुष्य म्हणून जल ,वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण बरेच जण प्रयत्न करत आहोत. अनेक देशांमध्ये वाहनांपासून प्रदूषण होऊ नये म्हणून सायकल चालवतात. भूतानसारखा छोटा देश प्रदूषण मुक्त आहे याची कारणे आपणा सर्वांना माहिती झालीच पाहिजे. तेथील नद्या अतिशय स्वच्छ आहेत. तेथे अधिककाधीक नैसर्गिक वस्तू पासून बनवलेल्या विविध वस्तूंचा वापर केला जातो. कोणतीही अनावश्यक प्लास्टिकची वस्तू खरेदी केली जात नाही अथवा विक्रीही केली जात नाही. प्रदूषण कमी असल्यामुळे तेथील लोकांचे आरोग्य अतिशय चांगले आहे.
मनुष्य म्हणून प्रदूषणाची कारणे परिणाम माहीत असूनही जर मनुष्याकडून त्याबाबत दुर्लक्ष होत असले तर निसर्गाने आपल्याला कोरोनाच्या स्वरूपात चांगलाच धडा शिकवला आहे. वाहने वापरायचे आपण कमी केले नाही परंतु यामुळे आज लॉक डाऊन मुळे रस्त्यावर वाहने धावत नाही त्यामुळे ध्वनिप्रदूषण त्याचप्रमाणे वायुप्रदूषण अतिशय कमी झाले आहे. कारखान्यात धडधडणारी यंत्रे बंद झाली आहे कारखान्यातून समुद्रात मिळणारे प्रदूषित पाणी बऱ्याच अंशी कमी झाले आहे. नद्या देखील सध्या स्वच्छ आहेत गंगा ,गोदावरी, यमुना या सारख्या नद्यांमधील प्रदूषण कमी झाले आहे मुंबई, नागपूर, कल्याण-ठाणे ,या शहरातील प्रदूषण नक्कीच कमी झाले आहे. पंजाब मध्ये वायुप्रदूषणामुळे दूरचे डोंगर दिसत नव्हते परंतु आज हिमालयाचे दर्शन होत आहे. दिल्ली व पंजाब यामधील प्रदूषणास तेथील शेती ही कारणीभूत आहेत गव्हाच्या उत्पादनाचे कोठार म्हणून पंजाब ओळखला जातो पिके लवकर घेता यावे जमिनी पटकन रापली जावी म्हणून येथे बर्याचदा पिकाचा काड जाळला जातो. त्याचे प्रदूषण दिल्ली शहरावर फार मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे मनुष्याचा हव्यास हा प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. सध्या केंद्र सरकारने या प्रदूषणासाठी राज्यांना जबाबदार धरले .दिल्लीतील लोकांचे आरोग्य धोक्यात आणले त्याची नुकसान भरपाई या राज्याकडून का करून घेऊ नये असा सवाल न्यायालयाने केला आहे त्यामुळे राज्य खडबडून जागी झाली आहेत व आता पीक योजनेसाठी नवीन उपाययोजना शोधताहेत.
अशीच कठोर पावले उचलली केली तरच मनुष्य प्रदूषणाबाबत काहीतरी विचार करेल आणि प्रदूषण कमी होऊन त्याला मोकळा श्वास घेता येईल हे नक्की.
सविता साळुंके ,श्रीरामपूर, कोड नंबर 13
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
*प्रदुषण*
प्रदूषण एक अदृश्य पण विकराळ राक्षस आहे. ज्याची आपण आता गंभीर पणे दखल नाही घेतली तर सर्वनाश अटळ आहे. प्रदूषण ’‘सामान्यांचा, बुद्धीबवाद्यांचा , पर्यावरणवाद्यांचा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे". ‘प्रदूषणाचे' सारे प्रकार धूळ-धूर, जमीन, घाण पाणी , आणि कच-याचे ढीग . कानात कर्कश ‘हॉर्न’ , गणपती आणि नवरात्रीचे वाजणारे डी. जे. जल प्रदूषण ‘वायू प्रदूषण’, ‘मृदा प्रदूषण’, सर्वांना सर्व माहित आहे. अगदी पाचवी-सहावीची मुले पण ‘प्रदूषणाचे प्रकार, त्याची कारण त्याची निवारणं धडाधडा सांगतील. तरीही ‘प्रदूषण वाढतच चालले आहे.
*का* ?? आपण आजवर वैज्ञानिक किंवा गौण प्रकार कारणं आणि त्याचे निवारण ह्यावरच विचार केला आहे. मुख्य किंवा मानसिक/आंतरिक प्रकारावर कारणांवर विचारच केला नाही .ह्याला कारणीभूत आपली मानसिकता, *आपल्या मनातले प्रदूषण*.अगदी एक साध उदाहरण घेऊया. आपल्यातील किती लोकं इमानेइतबारे ओला आणि सुका कचरा वेगळ्या डब्यात जमा करून कचरा गाडीत टाकतो. रस्त्यावर कुठलाही कचरा न टाकण्याचे पथ्य पाळतो. इकडेतिकडे बघत पटकन हातातली टरफले,चाॅकलेटचा कागद रस्त्यावर टाकतो.
प्रदूषण करीता सर्वांना दोष देताना आपणही प्रदूषणाला हातभार लावतो, हे आपण सोईस्करपणे विसरून जातो. आपले सणवार साजरे करताना थोडी काळजी घेतली तर आपण प्रदूषण नियंत्रितकरू शकतो. एक छोटेसे उदाहरण,
आपला गणेशोस्तव ( कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. ) प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मुर्ती प्रदूषणकारी आहे तरी लाखों लोक ती मुर्ती खरेदी करतात. मोठ्या मोठ्या गणपतीच्या मुर्त्या,ते सारे देखावे हजारो टन निर्माल्य आपण आपल्या गावाच्या शहराच्या तलावात, नदीत आणि समुद्रात विसर्जित करतो. आपण किती प्रमाणात प्रदूषणाची हातभार लावतो ह्याचा कधीतरी विचार करतो का ? गणपती मध्ये वाजणारे डी. जे. ध्वनी प्रदूषण नाही कलत का ? ह्या विषयी आपल्या मनात किती जागरुकता आहे ह्याचा आपण किती विचार करतो.
थोडक्यात काय तर ‘कळतंय पण वळत नाही’ असे झाले आहे.
आम्ही प्रत्येक नागरिकाने स्वतःपुरताच जर विचार केला की मी प्रदूषणा मध्ये भर पडेल अशी कृती करणार नाही. तर खरोखर प्रदूषण नियंत्रण करणे शक्य आहे. आपण कित्येक वर्षांपासून हजारो करोड रुपये खर्च करून ही गंगा स्वच्छ करु शकलो नव्हतो. चाळीस दिवसाच्या लाॅकडाॅउनचाने ती किमया करुन दाखविली. म्हणजेच आपण ठरविले तर प्दूषणाला आळा घालु शकतो. पण त्या करीता सर्वप्रथम आपले मन जुन्या सवयीच्या प्रदूषणातून मुक्त करावे लागेल . *प्रदूषण मुक्त मनच जगाला प्रदूषण मुक्त करू शकते.
डाॅ.वर्षा सगदेव.
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
(15) प्रदूषणाचे दुष्परिणाम समजणे गरजेचे
प्रदूषणाचे अनेक प्रकार सांगता येतील जसं... जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. हे प्रदूषण कशा मुळे होते, यावर कसे नियंत्रण घालता येते यावर आपण मोठी माणसं नेहमीच चर्चा करत असतो. पण त्याचा फायदा किती होतो हे सांगता येत नाही. पण प्रदूषणाचे दुष्परिणाम जर बाल-चिमुकल्यांना समजून सांगितले तर ते कधीच विसरत नाही. हि बाब लक्षात घेऊन आम्ही आमच्या शाळेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळी आणि प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन हे उपक्रम राबवत असतो. फटाके फोडल्याने वायू प्रदूषण कसे होते ? ध्वनी प्रदूषण कसे होते ? त्याचा कसा त्रास होतो त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले. दिवाळी प्रमाणेच गणेशोत्सव साजरा करतांना सुद्धा शाळेमध्ये शॅडो मातीच्या गणपतीची स्थापना करतो. शेवटच्या दिवशी एका कुंडीमध्ये पाणी टाकून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करतो. साधारणपणे तीन दिवसांत मूर्तीची माती झालेली असते आणि त्याच मातीमध्ये गुलाबाचे रोप लावले जाते.
हे उपक्रम राबवित असतांना गणेश विसर्जनामुळे जलप्रदूषण कसे होते हे समजून सांगितल्यामुळे यावर्षी 70 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी शॅडो मातीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती.
हे संगण्यामागचा हेतू असा की आपण कितीही प्रदूषणावर भाषणे दिली, लेख लिहिले तरी त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याचे महत्व बालमनावर रुजवणे गरजेचे आहे.
गणेश सोळुंके, जालना
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
समस्या प्रदूषणाची
'कळते पण वळत नाही' अशी माणसाची आजची स्थिती आहे. वाढते प्रदूषण जीवन विस्कळीत करू शकतेच. कदाचित नष्टही करू शकेल. पण मोह,माया, लोभ यात अडकलेला माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. तो काँक्रीटची जंगले उभारतो आहे. गरज असो-नसो चार चाकी गाड्या वापरतो आहे. वृक्षतोड करून माणूस पाऊस थांबवतो आहे. जागतिक तापमान वाढवतो आहे. तो वायू प्रदूषण, जलप्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण करतो आहे. कुठे थांबायचे हे मानवाला कळत नाही.
निसर्गातील अहितकारक बदल म्हणजे प्रदूषण. पृथ्वीवर वनस्पती, मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात राहतात तेथे विविध घटकात संतुलन प्रस्थापित झालेले असते. एखादे जरी प्रदूषण वाढले तर असंतुलन निर्माण होते. त्यामुळे जीवनाच्या सातत्याला धोका निर्माण होतो.
ज्याची आपल्याला अत्यंतिक जरूरी आहे तो प्राण जाता असा प्राणवायू. पण आज शहरातून मनापासून मोकळा, शुद्ध श्वास तरी घेता येतो का ?माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. रस्त्यावर नको इतकी वाहनांची गर्दी होते आहे. त्यातून सल्फर मिश्रित धूर वातावरणात मिसळतो. त्यामुळे ओझोनच्या थराला हानी पोहोचते. त्यामुळे नको इतकी अतिनील किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. जीवनचक्र ढासळते. तसेच कार्बन डायॉक्साईडचे प्रमाणही वाढते. त्यामुळे श्वसन रोग , अस्थमा वाढतो. जागतीक तापमान वाढते. त्यामुळे उष्माघात, त्वचेचे कर्करोग यासारखे धोके वाढत आहेत. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहने अगदीच कमी आहेत. त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप कमी झाले आहे. हा फरक आपल्यालाही जाणवतो. आकाशात एक प्रकारचा धुराचा थर दिसायचा तो हल्ली दिसत नाही. जेथे वायूचे प्रदूषण अवाजवी असते, तेथील माणसे आनंदी नसतात असाही एक निष्कर्ष आहे.
पाण्याचा नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते , म्हणजे जलप्रदूषण होते. जलप्रदूषणामुळे चव बिघडते, ते घाणेरडे दिसते किंवा त्यास दुर्गंधी येते. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बदलल्यामुळे ते मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करतात. मानवी मलमूत्र तसेच औद्योगिक कारखान्यातील कार्बनी पदार्थ पाण्यात म्हणजे नदी, समुद्र किंवा जलाशयात मिसळतात व पाणी प्रदूषित होते. शेतजमिनीत रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जातात. ही खते पावसाबरोबर वाहात जाऊन पाणी प्रदूषित करतात. ही खते भूजलहि प्रदूषित करतात. इतर कचरा, प्लास्टिक सगळे पाण्यात आणून टाकले जातात. त्यामुळे रोगकारक जिवाणूत वाढ होते. ते जीवनाला अपायकारक असतात. टायफाईड, कॉलरा यासारखे रोग पसरतात. खनिज तेल, किरणोत्सारी अपशिष्टे, औष्णिक जलप्रदूषण यामुळे समस्या आणखीनच गंभीर होत आहे. खतांचा, किटकनाशकांचा वापर कमी केला पाहिजे. जलीय प्राण्यांवर त्यामुळे परिणाम होतो. सांडपाण्याची व्यवस्था, प्रक्रिया याकडे लक्ष दिले पाहिजे. जलशुद्धीकरण तर हवेच.
मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादे पलिकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. ध्वनी हा हवेच्या माध्यमातून प्रवास करतो. म्हणून त्याचे मापन हवेच्या व्यापक गुणवत्ता पातळीमध्ये केले जाते. ध्वनीचे मापन डेसीबल मध्ये केले जाते. गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण फारच वाढते. ध्वनिप्रदूषणामुळे चिडचिड वाढते. रक्तदाब वाढतो. डोकेदुखी सुरू होते. हृदयाच्या कार्याची गती वाढते. छातीत धडधडते. हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो. कोरोना लॉक डाउनमुळे ध्वनि प्रदूषण कमी झाले आहे. कारण रस्त्यावर वाहने अधिक कमी असतात. त्यामुळे पक्षांची किलबिल दिवसभर छान ऐकता येते!!
ई-कचरा ही फार धोकादायक असतो. जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विल्हेवाट योग्य ठिकाणी, योग्य रीतीने केली पाहिजे.
अगदी पातळ प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे शक्यतो प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा.
रासायनिक पदार्थ, खते, कीटकनाशक, प्लास्टिक यांच्या जलप्रदूषणामुळे पाण्यातील माशांवर परिणाम होतो. त्यामुळे मासेमारी धंद्यावरही परिणाम होतो.
सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. निदान कमी तरी करायलाच हवे. त्यासाठी संपूर्ण समाजाचे सहकार्य मिळाले पाहिजे. यासाठी आपल्याला जमतील अशा गोष्टी तरी कराव्या. म्हणजे आपण प्रदूषण कमी करू शकू. मोठमोठ्याने लाऊड स्पीकर न लावणे. गरज नसताना गाडीचा हॉर्न न वाजवणे. निर्माल्य अगर कुठलाही कचरा नदीत न टाकणे. गणेशोत्सवात इकोफ्रेंडली मटेरियल सजावटीसाठी वापरणे. शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणणे. ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे. आपले चार चाकी वाहन, स्कूटर इत्यादी कमी वापरणे. जेथे शक्य आहे तेथे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे. आयटी कंपन्यांनी work from home चा पर्याय एम्प्लॉईजना देणे. Rain harvesting करणे.
सर्वच प्रदूषणे आपल्याला थांबवायला हवी. तरच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहील. येकणाऱ्या निरोगी, निकोप पिढीपुढे आपला आदर्श राहील. त्यांना हिरव्या सुंदर वाटेवरून प्रवास करता येईल.
शुभदा दीक्षित, पुणे
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
34 प्रदूषण एक समस्या*
श्री.सुंदरसिंग आर.साबळे गोंदिया 9545254859
प्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमान उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.
जल / पाणी प्रदूषण: - अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, विवध कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.
हवाप्रदूषण:- हवा म्हणजे हवा प्रदूषण,
कारखान्यातून मोठ्या प्रमाणात निघणारा धूर हवेत सोडला जातो, तसेच वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते.
ध्वनिप्रदूषण:-आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.
मृदा प्रदुषण - मृदा म्हणजे मातीचे प्रदुषण
सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.
हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदूषण
हिरवे हिरवे गार गालिचे
हरिततृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ती खेळत होती
किती सुंदर नि बोलके चित्र आहे हे!! ऐकायला आणि गायलाही छान वाटते परंतु हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चालले आहे.बालकवींच्या कवितेतील ओळी नि तो निसर्ग आता राहिला नाही.सातशेपन्नास वर्षांपूर्वी तुकारामांनी वृक्षवल्लींना साद घातली होती आणि निसर्गाशी नाते जोडले होते.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' विसाव्या शतकात विनोबांनी 'निसर्गाकडे वळण्यास' सांगितले. महात्मा गांधींनीही 'खेड्याकडे चला' म्हणजेच निसर्गाशी नाते साधण्याचा संदेश दिला.'दिधले असे जग तया, आम्हांस खेळावया' 'आम्ही कोण म्हणोनि काय पुसता'? असे म्हणत या विद्रूप मानवाने सर्वांग सुंदर वसुंधरेला ही विद्रूप करण्याचा विडाच जणू काही उचलला आहे.
आज आहे मानवाच्या प्रत्येक कृतीतूनही हेच प्रतित होत आहे. मानवाचे अस्तित्व पूर्णत: पर्यावरणावर अवलंबून आहे. हे कळत असूनही मानवाने स्वतःच्या डोळ्यांवर झापडे लावली आहेत. आज वातावरणाचे तापमान वाढले आहे. ओझोन वायूचे संरक्षण कवच विरळ होत आहे. पूर्वी वीसपंचवीस फुटावर विहिरीला लागणारे पाणी आता दोनशे-अडीचशे फूट खणल्यावर लागते. विविध तऱ्हेचे रोग, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्माघात ,हिमालयातील बर्फाचे वेगळं होणं,पाण्याची पातळी वाढणे या गोष्टींचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही आजची जागतिक समस्या बनली आहे. त्यासाठी मानवाच्या फाजील इच्छा आकांक्षा कारणीभूत आहेत. हेच मानव विसरला आहे म्हणून अवघ्या सजीव सृष्टीवर पर्यावरण प्रदूषणाचा महारक्षक झेप घेऊ लागला आहे.
हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठली आहे. युवा पिढीने पृथ्वीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पावले उचलायला हवीत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन प्रकल्प हाती घेऊन राबविले पाहिजेत. प्रदूषणविरहित वाहने वापरून सहकार्य करायला हवे. याच निसर्गाचा उपयोग करून मानवाने जन्मदर आणि आयुष्य वाढविले आहे. मृत्यूदर कमी झाला आहे लोकसंख्या- वाढीचा भस्मासुर इतका फोफावला की निसर्गाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. माणूस स्वतःचा विकास साधण्यासाठी निरनिराळे उद्योगधंदे सुरु करतो. त्यातून निघणारे कार्बन कण नि विषारी वायू, मळी यामुळे जल आणि हवेचे प्रदूषण वाढत आहे.तेच रसायनमश्रित सांडपाणी पिकाऊ शेतात सोडल्यामूळे ती नापिक बनत आहेत.
रस्त्यावर पळणार्या बेसुमार वाहनांमुळे हवेचे प्रदूषण अतिशय वाढले आहे.गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामूळे श्वसनाचे नि फुफ्फुसाचे घातक आजार मानवाला जडलेले दिसतात.अनेक प्रकारच्या या प्रदूषणाने परिसरही प्रदूषित होतो नि मानवी जीवनावर अघोरी परिणाम होतात. अनेक जडीबुटी, दुर्धर रोगांवर उपचार म्हणून वृक्ष,लता वापरतात. शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात झाडांचे महत्त्व विशद करून 'एक मूल एक झाड'ही संकल्पना मांडली. रवींद्रनाथ टागोर म्हणत" झाड लावणे व त्याला पाणी घालणे, ते जतन करणे व त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाला त्याचे स्वतःचे धार्मिक व राष्ट्रीय कर्तव्य वाटले पाहिजे". निसर्गाचा समतोल राखायचा तर वनीकरण मोहीम उघडायला हवी व प्रत्येकाने हाच संकल्प करायला हवा.
सौ. भारती सावंत, मुंबई
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
चला प्रदूषण रोकूया...!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर, शहापूर ,(ठाणे)
निसर्ग खऱ्या अर्थाने सर्वच सजीवांचा पालनहार आहे.हे सर्वांनाच ज्ञात असूनही प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे.याला कारण आहे मानवाची हाव.निसर्ग मानवाची गरज पूर्ण करू शकतो ,हाव नाही !!हे ज्ञात असूनही प्रदूषणाची समस्या निर्माण होतच आहे.
आज पाणी,जमीन ,ध्वनी प्रदूषणापासून अन्न प्रदूषणापर्यंत सर्वच प्रकारच्या प्रदूषणांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.आज खऱ्या अर्थाने विज्ञान आलं आहे ,पण आपलं अज्ञान गेलं नाही!!,अशी स्थिती आहे. सर्वचजण सुज्ञ असूनही ही स्थिती का निर्माण व्हावी हा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे.
शुद्ध हवा घेण्यासाठी आज प्रवासाचे आयोजन केले जाते आणि तिथे जाऊनही आपण वातावरणात प्रदूषितच करण्याचं काम करतो!आपले जीवन सुसह्य करण्यासाठी विविध वस्तूंची निर्मिती करता करता ध्वनी,पाणी आणि हवा कधी अशुद्ध झाली हे कोणालाच कळले नाही.यंत्र सामुग्रीने आपलं जीवन सोयीचे करता करता प्रदूषणरुपी अजगराचा विळखा भूमातेला केव्हा बसला तेच समजले नाही. आज आपली स्थिती हिंदी मधील 'समझ समझकर,समझ को समझो
समझ का मतलब समझ के समझो
समझ समझकर जो ना समझे
ओ मेरी समझ मे ना समझ है।।
या ओळीं प्रमाणे झाली आहे...!!समजतं सगळं पण वळत नाही.
सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचा धोका वाढत असतानाच निसर्ग कधी पुराच्या रूपात, कधी विविध नैसर्गिक प्रकोपांच्या रूपात स्वतःलाच शुद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यातून जीवित आणि मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.कारखान्यातील धूर प्राणी व,पशुपक्षी यांच्यासह मानवाच्या श्वास रोगाला कारणीभूत ठरत आहे,मोठं मोठ्या जलाशयातील सजीव सृष्टी आज त्यात सोडल्या जाणाऱ्या मैला व सांडपाण्यामुळे नष्ट होऊ पाहत आहे.जंगलातील वाघ व बिबटे जंगल सोडून मानवी वस्त्यांकडे अन्नाच्या शोधार्थ शिरकाव करू पाहत आहेत..!या वाघांचे अन्न कोणी कमी केले..?जंगल तोड कोणी केली..?पावसाचं प्रमाण कमी का झालं...?या सर्व गोष्टींना जबाबदार कोण..!!आपणच ना!
एकीकडे आपल्या भस्मासुरा सारखा चौफेर उधळणारा विकास नामक वारू....सजीव सृष्टीचं कसे नुकसान करत आहे याचा ट्रेलर जुलै 99 मधील पुराने घातलेल्या थैमानाने साऱ्या जगाने पहिला आहे. प्रदूषणाने केवळ माणूसच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीच घायाळ झाली आहे.ध्वनी प्रदूषणाने सर्वांच्याच कानाची ऐकण्याची क्षमता क्षीण होत चालली आहे....!!अन्न प्रदूषणाने कर्करोगाचा विळखा मनुष्याला बसत आहे.दूषित पाण्यावर पिकवला जाणार भाजीपाला खाऊन नको त्या आजाराना सामोरे जावे लागत आहे. वायू प्रदूषण श्वासा सारख्या रोगाने लोकांना पछाडीत आहे .या साऱ्या विळख्यातुन माणसाची सुटका होणे कठीण आहे.
बेसुमार होणारी जंगल तोड,खाण काम यामुळे जैवविविधता धोक्यात येऊ पाहात आहे.विविध धरणे व काळव्यांच्या जाळ्यांमुळे विकासाचे चित्र जरी दिसत असले तरी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला आपणच कारणीभूत होत आहोत हे नाकारून चालणार नाही.
आज शहरी भागातील ध्वनी व वायू प्रदूषणामुळे तसेच मोबाईलच्या भरमसाठ वापरामुळे निर्माण होणाऱ्या वायूलहरींमुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.पूर्वी सर्व ठिकाणी आढळणाऱ्या कावळे,चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.चित्ते आज जंगलात शोधूनही सापडत नाही.प्रदूषणामुळे रोडावत चाललेली सजीव सृष्टीतील संख्येने अन्नसाखळीच धोक्यात आली आहे.
'निसर्ग आपला खरा मित्र आहे.' हे आपण फक्त म्हणतोय. पण प्रदूषणामुळे या मित्राची हानी करत असतांनाच आपल्याला सदैव उपयोगी पडणाऱ्या जिवलग मित्राला पारखे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.म्हणूनच सर्वांनी स्वतःला वाचविण्यासाठी निसर्गाला वाचवूया...आणि निसर्गाला वाचविण्यासाठी प्रदूषणाला आळा घालूया!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदूषण (जल,वायु,ध्वनी व इतर)
जल प्रदूषण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते वेगवेगळ्या ठिकाणी असणारे पाणी याच पाण्यान्याला जीवन असे आपण ओळखतो निसर्गाच्या चक्रामुळे आपणास पाणी मिळत असते.या पाण्याचा आपण योग्य प्रकार वापर केला पाहिजे पन त्याचा आपण नित वापर करीत नसल्यामुळे ते दूषित बनत असते पाण्याचे जे स्त्रोत आहेत ते नद्या, नाले,विहिरी,तळी ही स्वच्छ ठेवली पाहिजेत परंतु ते आपण ठेवत नाही नदी काठावर असनारी गावे या पाण्याचा वापर करतात त्याच पाण्यात कपडे धुतले जातात,गाय,म्हैशी,बैल,वेगवेगळी जनावरे धुतली जातात.त्यामुळें पाणी दूषीत बनते.याशिवाय गावातील सर्व सांडपाणी सुद्धा याच नदीच्या प्रवाहा मध्ये सोडले जाते त्यामुळे नदीचेपाणी दूषित होते तसेच नदीच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी साखरकारखाने आहेत त्यामधून टाकावू असणारे मळी सुध्दा ब-याच कारखान्या मधून नदीमध्ये सोडली जाते.त्यामुळे जल प्रदूषण रोज होत असतो.याशिवाय केमिकल कारखान्यामधुन सुद्धा दूषित वाया जाणारे पाणी नदीमध्ये सोडल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. शासनाने यावर योग्य उपाय योजना करुन हे होणारे वेगवेगळे जल प्रदूषण थांबवणे सर्व नागरिकांच्या हिताचे आहे.यादुषीत पाण्याचा वापर केल्यास लोकांचे आरोग्यास धोका संभवतो नव्हे तर साथीचे रोग पसरले जातात केमिकलमळे कधी कधी पाण्यावर विषारी थर तयार झालेमुळे ब-याच ठिकाणी माशासारखे जलचर मरण पावलेल्या घटना केवळ जल प्रदूषानेच होतात हे नाकारून चालणार नाही. यानंतर वायू प्रदूषण हे सुद्धा म त्वाचे आहे कारण पाण्या एवढीच आपणास हवेची गळज असते. हवे शिवाय आपण जगू शकत नाही.त्यामुळे हवा ही स्वच्छ व शुद्ध असली पाहिजे परंतु सध्या जागो जागी असणाऱ्या कारखाने त्याच्या धुराडयामधून मोठे मोठे विषारी धुराचे लोट हवे मध्ये मिसळत असतात त्यामुळे हवा दूषित होते.याशिवाय रोज सर्वत्र मुंगी सारखी चालणारी वहाने त्यांच्या इंजिन मधून अर्धज्वलन झालेला विषारी धुर बाहर पड़त असतो त्यामुळे वायुप्रदूषण मोठया प्रमाणात होत असते.ते सर्व नागरिकाच्या आरोग्यास धोका पोहचते.आपल्या सर्वाना दुषीत हवा घ्यावी लागते.याशिवाय गावो गावी काही महिला रोज तंबाखू पासून दात घासण्यासाठी मिसरी बनवत असताना ती तंबाखू भाजताना त्या मधून जीवघेणा विषारी धूर बाहेर पडत असतो.त्या मुळे परिसरात हवेचे प्रदूषण रोज या प्रकारे होत असते.तसेच सिगारेट व विडी ओढणारे सुध्दा धूर हवेत सोडून हवा प्रदूषीत करतात.म्हणजेच अशी व्यसनी माणसे हवा प्रदूषीत करण्यास एक प्रकारे मदतच करतात हे योग्य नाही.आणि यानंतर ध्वनी प्रदूषण आज आपल्या सभोवती सतत चालू असणा-या वाहनाच्यामुळे कर्णकर्कश आवाजामुळे रोज जीवघेणे ध्वनी प्रदूषण करीत असतात.एवढेच नव्हे तर जागो जागी लग्नाच्या वराती पुढे डॉल्बी किवा डीजे चे मोठमोठे आवाज
ह्रदयाचा ठोका चुकतात.हे ध्वनी प्रदूषणच आहे. आता प्रत्येकाच्या घरोघरी टी.व्ही.,रेडिओ मोठ्या आवाजात सुरु ठेवून शेजा-यांना त्रास होत असतो. हा सुध्दा ध्वनी प्रदूषणच नव्हे काय ? याशिवाय आपण रोज स्वच्छता न पाळल्यामुळे सु्ध्दा ध्वनीप्रदूषण होत असते. लग्नात फटाके वाजवून वायू व ध्वनी दोन्ही एकाच वेळी प्रदूषण होत असते. यावर शासनाने योग्य उपाय शोधले पाहिजे.....
लेखक..जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
*प्रदूषण:एक समस्या*
*श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
मानवाचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी सृष्टीचा विचार देखील न करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली.कारखाने,उद्योग,शहरीकरण यात भरभराटी आली परंतु जगण्यासाठी घ्यावे लागणारे ऑक्सिजन हवेतून घ्यावे लागते आणि हवाच दूषित झाली आहे.त्यामुळे श्वास घेतल्याने श्वासनलिका यामध्ये बिघाड येऊ लागले.हे केवळ दूषित वायूमुळे घडते आहे.केवळ वायू प्रदूषणच होत आहे असं नाही तर जल, ध्वनी,मृदा प्रदूषण देखील होत आहे.या सर्व प्रदूषणाचा विपरीत परिणाम मानवाच्या जीवावर होतो आहे.मानव जात ही स्वार्थी,लोभी यामुळे फक्त स्वतःचाच विचार करीत असल्याने त्याचा वन्यजीवावर देखील परिणाम होत आहे.म्हणून इतर सजीव सृष्टीचा विचार करून,मानवी पर्यावरण,हवामान,तापमान समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण राहण्यासाठी मानवाच्या वृत्ती-प्रवृत्तीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे अन्यथा प्रदूषित वातावरणात अधिक काळ घालविल्यास आजाराला आमंत्रण दिल्यासारखे होईल म्हणून सजग,जागरूक राहून आचरण करायला हवे.
लोकसंख्येने विशाल असलेल्या भारत देशात हातावर पोट असलेले शेतमजूर,कामगार,स्थलांतरित मजूर यामुळे खेडी ओस पडून शहरात गर्दी निर्माण झाली त्यामुळे मोठमोठी शहरे उदयास आली त्याचे रूपांतर महानगरात झाल्याने मोठे उद्योग,कारखाने निर्माण झाले त्यातून विषारी वायू बाहेर पडल्याने हवा दूषित झाली आहे.वायू प्रदूषण ही एक समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे मानवासहित इतर प्राण्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.कार्बन डॉय आक्सइड,सल्पर डॉय ऑकसाईड जास्त प्रमाणात हवेत मिसळल्याने हवेतून ऑक्सिजन दूषित असल्याने मानवाला भिन्न-भिन्न आजाराला आमंत्रण दिल्या जात आहे एवढेच नाही तर त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी,मल निषारण ठेट समुद्री पाण्यात किंवा नदीच्या पात्रात टाकल्यामुळे पाणी दूषित होत आहे तसेच नदीच्या पाण्यात बैल धुणे, कपडे धुणे,पोहणे यामुळे देखील पाणी दूषित होत असल्याने तेच पाणी पिण्यामुळे अनेक आजारांना बळी पडत आहे.
माल, वस्तू याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.शहरीकरण,कारखाने यांना कच्चा मालाचा पुरवठा करण्यासाठी वाजविले जाणारे हॉर्न चा वापर तसेच सण, समारंभ यामध्ये मोठ्याने वाजविले जाणारे डी. जे.याचा परिणाम मानवावर होऊन बहिरेपणा होत आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण ही सुद्धा एक समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे वायू,जल,ध्वनी प्रदूषण याशिवाय मृदा प्रदूषण देखील होत आहे याकडे दुर्लक्षून चालणार नाही.दरवर्षी एकच एक पीक घेतल्याने नापिकी होऊ शकते.वादळवारा, अतिवृष्टी यामुळे जमिनीवरील पातळ थर वाहून जात आहे आणि जमिनीचा पोत घसरत चालला आहे म्हणजेच मृदा प्रदूषण देखील होत आहे त्यामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी आलटून-पालटून पिके घेतल्यास जमिनीची पोत बिघडणार नाही.
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
कोरानाच्या माध्यमातून जग प्रदुषणमुक्त होईल!
देशात खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढलेलं होतं.ध्वनीप्रदुषण,वायूप्रदुषण,पाणीप्रदुषण,त्याचबरोबर मनप्रदुषणही.त्यामुळं कुठं ध्वनीतून आजार,कुठं श्वसनातून आजार,तर कुठं थुंकण्यातून आजार निर्माण होत होते.कुठं मनप्रदुषणातून चो-या, डकैती, खुन, फसवेगीरीही .......प्रदुषणानं कहर माजवला होता. त्यामुळं पृथ्वीच्या आवरणावर त्याचा परीणाम झाला होता.पृथ्वीवरील रहिवाशी लोकांवरही. महत्वाचं म्हणजे प्रदुषणाचे जे प्रकार आहेत.त्यात वाढ झाली होती.
आवरणाचे तीन प्रकार आहेत. वातावरण, जलावरण, शिलावरण.या तीनही आवरणात प्रदुषण आहे.कारखान्यात वाढ झाली.त्या कारखान्यातून निघणारा जो धूर होता.त्या धुरातून सल्फर डाय आक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड निघून व वातावरणात पोहचून वातावरण विषारी झाले.तसेच त्याच कारखान्यातून निघणा-या सांडपाण्यानं पाणी प्रदुषीत झाले.नव्हे तर त्या कारखान्यातून निघालेल्या पांढ-या राखेतून जमीनही प्रदुषीत झाली.त्यानुसार पाणीप्रदुषण,पाणीप्रदुषण अतोनात वाढलं.याचा परीणाम शेतीवर होवून शेती पीकत नव्हती.
आता आणखी एक समस्या वाढली होती.ती म्हणजे ध्वनी प्रदूषण.आता शहरातच नाही,तर गावागावातही प्रदुषण वाढलं होतं.पाणी,वायू,त्याचबरोबर ध्वनीही........
परंतू हे जरी खरं असलं आणि यामुळे झालेल्या पृथ्वीच्या वातावरणावरील परीणाम लक्षात घेता आता अशातच कोरोना व्हायरस आला.त्यात संबंध देशच काय?जगही प्रदुषणमुक्त झाले असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरेल काय?तर याचं उत्तर नाही असं येईल.कारण कोरानाच्या या संकटातून देशाला वाचविण्यासाठी पुर्ण जगात लाकडाऊन झालं.सर्व जगानं आपआपली शहर लाकडाऊन ठेवली.त्यानुसार लोकं घरातच राहायला लागले.जगाने विमान उड्डाण,रेल्वे,बसप्रवास सारं बंद केलं.त्यामुळे गाड्या बाहेर पडल्या नाहीत.कारखान्यातून दुषीत हवा निघाली नाही.या लाकडाऊन च्या काळात कारखान्यातलं सांडपाणी निघालं नाही.तसेच राखही जमानीवर पसरली नाही.लोकं रस्त्यावर आली नाही.गाड्यांचा आवाज नव्हता.लग्नात बँडचा आवाज नव्हता.डीजे दिसला नाही.मोबाईल रिचार्ज बंद झाले.कारण पैसे संपण्याची भीती लोकांच्या मनात होती.याचा परीणाम हा झाला की ध्वनी प्रदूषण काहीअंशी का होईना,ध्वनीप्रदुषण थांबलं.पाणीप्रदुषण बंद झालं आणि वायूप्रदुषणही.कारण हे प्रदुषीत करायला जे घटक जबाबदार होते.ते घराच्या अंदर होते.याचाच सर्वात मोठा परीणाम हा झाला की ज्या सुर्याच्या अतिनील किरणानं पृथ्वी वाचू शकत नव्हती.या सर्व प्रकारच्या प्रदुषणानं पृथ्वीच्या आवरणात जे छिद्र पडलं होतं.जे सुर्याचे तापमान या ओझोन वायूच्या वातावरणीय छिद्रानं जास्त जाणवत होतं.ते आता कमी जाणवेल.सुर्याच्या अतिनील किरणाच्या विषारी प्रभावानं ज्या पृथ्वीवरील वातावरणीय बदलाला घायाळ केलं होतं.ते या कोरोनाच्या निमित्ताने का होईना बंद झालेलं आहे.कारण वातावरणाला पडलेलं छिद्र बंद झालेलं आहे असा दावा शास्रज्ञांनी केलेला आहे.
महत्वाचं सांगायचं म्हणजे खरंच पृथ्वीच्या या वातावरणातील छिद्राला कोरोना संकट फायदेशीर ठरले काय?खरंच याने छिद्र बंद झाले काय?पण ते पाहणे आपले काम नाही.ते शास्रज्ञाचे काम आहे.परंतू एक गोष्ट नक्की की हा बदल जो झाला,तो अतिशय चांगला झाला.कारण बहुतःश सगळी मंडळी घरात होती.त्यांनी या काळात काहीच प्रदुषण केले नाही.तेच तत्व उद्याही टिकवून ठेवायचे आहे.
प्रदुषण जरी तीन प्रकारचं असलं तरी चवथाही प्रकार आम्हाला आज पाहायला मिळत आहे.ते प्रकार म्हणजे मनप्रदुषण.लोकांची आजच्या काळात मनही प्रदुषीत झालेली असून,ज्याप्रमाणे मोबाईलवर बोलण्याने ध्वनीप्रदुषण होवून पक्षांवर परीणाम होवून पक्षी मरण पावले.त्याचाच परीणाम हा झाला की माणसावर या मोबाइल वर बोलण्याचा परीणाम झाला.कुठे याच मोबाईलच्या माध्यमातून हत्यासत्र घडलं.केवळ मोबाईलवर बोलण्यानं नाही तर या मनाच्या माध्यमातून कुठं कुठं खुन,बलत्कार इत्यादी प्रकार घडले,घडताहेत.त्या मनाच्या प्रदुषणालाही रोखण्याची आज गरज असून ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटातून पाणी,वायू आणि ध्वनीप्रदुषणाला आपण काही अंशी थांबवलं.त्याचबरोबर आपल्या मनाच्या प्रदुषणालाही आपण याच कोरोना संकटातून थांबवलं होतं.परंतू आता जास्त काळ लाकडाऊन ठेवता येणार नाही.कारण उपासमारीनं लोकं मरु शकतात.कोरोना संकट जरी असलं तरी लोकांना उपासानं मरु द्यायचं नाही.सरकारजवळ धान्य जरी असलं तरी करोडो रुपयाचं जे नुकसान होत आहे.ते भरुन निघू शकणार नाही.तेव्हा कोरोना संकट जरी असलं तरी ते संकट मानून न घेता आता कामं करावी.पण सावधानता बाळगून.तसेच कुठेही पुर्वीसारखे खर्रे खावून थुंकू नका.भींती रंगवू नका.कारण त्यातून कोरोना पसरु शकतो.तसेच कामावरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा.जमेल तर अंघोळ करुन घ्या.त्याबरोबर मनही स्वच्छ ठेवा.मनालाही धुवून घ्या.पाण्यानं नाही तर चांगल्या विचारानं.कोरोनापासून नक्कीच हा बोध जरुर घ्या.चांगल्या विचारानं मनाचं प्रदुषण थांबवा.तेव्हाच बलत्कार,खुन आणि फसवाफसवीचे प्रकार बंद होतील.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
(4) प्रदूषण
कोणतीही गोष्ट चांगली व्यवस्थित असेल तर तिच्या पासून निर्धोक कार्य पार पडते.
उदाहरण कोणतेही घ्या माणसाची तब्येत ठिक असेल तर तो उत्तम प्रकारे आपली सर्व कामे हताळू शकतो. त्याच्या कामाचा ठसा तो उमठवू शकतो. जर एखाद्या वेळी एखादा कुशल कामगार आपल्या कामातून किंवा कलेतून आपल्या सर्व गुण संपन्नेतून आपल्या मानसिकतेचे सुद्धा दर्शन इतरांना घडवू शकतो.
सर्व ठिक ठाक आहे असे तो आपल्या कार्यातून दाखवून देऊ शकतो अथवा कुठेतरी बाधा आहे हेही तो दाखवू शकतो.
या ज्या बाधा, बाधक गोष्टी तयार होतात ना, ते अडथळे असतात ना ते काही तरी कशामुळे तरी निर्माण होतात. त्याला आपण आडकाठी म्हणू यात.
हे जे आडकाठी धोरण ज्या मुळे तयार होते ते दोष म्हणजेच प्रदूषण दोष होय .
प्रमाणबदध पणा नसला कि आपण या प्रदूषणाकडे पाहतो. कोणत्याही प्रकारच्या सुरळीतपणाला छेद प्रदूषणामुळे येतो. मग परिणाम भोगावे लागतात .
प्रदूषित पर्यावरण- सृष्टीतील पूर्ण आवरण वातावरण विविध प्रकारच्या वायूचे मिश्रण आहे.
नैसर्गिकरीत्या त्यामध्ये प्रत्येकाने आप आपले अस्तित्व प्रमाण सिद्ध केलेले आहे, ठरविलेले आहे. त्यामध्ये थोडासा फरक झाल्यास परिणामाना सामोरे जावे लागते. बहुतांश पृथ्वीचे/ पर्यावरणाचे आरोग्य ठिक नाहीये! अशा प्रकारची निरिक्षणे शास्ञज्ञ नोंदवताहेत अशा बातम्या ही आपण वाचतो, पाहतो. " दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या निरिक्षावरून अनुमान लावतात आता बर्फ खूप कमी साचतो वगैरे वगैरे.
आता नेहमी नेहमी दुष्काळ पडतो जगात कोठे ना कोठे , अवकाळी पाऊस होतो, गारपिट होते, विषारी पाऊस पडतो हे पर्यावरण संतुलित असल्याचे मुळीच लक्षण नाही.
कारण पृथ्वी वरील वृक्ष तोड, जंगलाची जमिन नष्ट करणं तसेच आताची नविन समस्या शहराच्या जवळ कोठेच टेकडी न ठेवणे, सिमेंट जंगल आणि सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेसुमार इंधन वापर.
इंधन वापराने पूर्ण वातावरण दूषित होते आहे म्हणून या सर्व मानव निर्मित संकटांनी हवा दूषित झाली
हवा दूषित झाली सर्व प्राणी माञाचे जीवन विकृत बनले, आरोग्य व्यवस्थित नाही धन धान्य संपन्नता नाही, कृञिम पणा वाढला, ज्या श्रतूचे जे कार्य ते होईना. उन्हाळा ऊन देतो, पावसाळा पाऊस देतो आणि हिवाळा हिव म्हणजे गारवा किंवा थंडी देतो पण आज अशी परिस्थिती होते कि हिवाळ्यात गारवा गुल ! पाऊस तो नसतोच पावसाळ्यात मग उन्हाळा आला कि पाऊस पडतो. म्हणजे ते आपल्या कक्षा सोडतात.
वास्तविक पाहता पावसाळा हा उन्हावर अवलंबून असतो. आणि मग व्यवस्थित जलचक्र फिरते. पण सध्या आपण बातम्या वाचतो समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन व्यवस्थित होत नाही का तर त्यावर वेग वेगळ्या विषारी घटकांचे थर साचलेले असतात म्हणजेच समुद्र तो ही बिचारा सुरक्षित आपण ठेवला नाही त्या वर अतिक्रमण मानवाने केले.
नद्या पहा आपल्या भारत देशाला महान परंपरा लाभलेली आहे प्रत्येक तिर्थ हे नदी किनारीच आहे. नदी शिवाय तिर्थ शोधून सापडणार नाही. सर्व त्या नद्यांचे पाणी आपण तिर्थ म्हणून पवित्र मानतो पण खरंच नद्या चे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का ? तर नाही. ते दूषित पाणी झाले आहे विविध शहराचे सांडपाणी, विविध कारखाने किंवा कंपन्याचे सांडपाणी तिच्या त सोडून देतात ते थांबले पाहिजे.
ध्वनी प्रदूषण तर् विचारू नका विविध उत्सव कार्यक्रम, मोटारी, विमाने,कारखाने या सर्व बाबी मुळे सर्व प्रकारे प्रदूषण होते म्हणून पर्यावरण पोषक उपक्रम राबवण्यात आली पाहिजेत जे शक्य होईल ते नसता आपण ज्या ञासात आज आहोत अशी संकटे नेहमी हजर होतील म्हणून प्रदूषण टाळा, पर्यावरणाला लावा लळा.
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
" प्रदूषण " [ 14 ]
" सुंदर निसर्गास
व्यर्थ देई दूषण
वाढता मानवी
मानसिक प्रदूषण !! "
मित्रांनो , आज आपल्या अवतीभवती जे सर्वच दृष्टीने व्यापक स्तरावर वाढते प्रदूषण पाहतो . त्याला बहुतांशी आपण मानवीप्राणीच जबाबदार आहोत ! प्रदूषण निर्मिती ही आधी आपल्या मनातून होऊन नंतर ती क्रियान्वित होत असते . सुरूवातीला ती एक सूक्ष्म रूप वाटते पण जसजसे विराट रूप घेत जाते तेव्हाच ती आपल्याला समस्या म्हणून जाणवते . म्हणून आधी आपण मानवांनी आपल्या वाढत्या हावी , लोभी , निष्काळजी , कृत्घन स्वभावास अत्यंत कडक शिस्त लावली पाहिजे . तरच आपण या पृथ्वीवरील या स्वनिर्मीत प्रदूषणांस थोपवून धरू शकतो . परिणामी आपल्या येणाऱ्या काही पिढ्यांना जीवदानही देऊ शकतो , हो ना !
" वृक्षतोडीने वाढते
जमिनीची धूप
इंधन जाळून
प्रकृती करी कुरूप !! "
मानव हा श्वासाविना जगूच शकत नाही ! हे माहीत असूनही जी वृक्षे परहिताचा आदर्श असतात त्यांना पूर्णपणे संपवून आपल्या भौतिक सुविधा उपभोगत आहे . पशूपक्ष्यांची बिर्हाडे कुर्हाडीने नष्ट करीत आहे . हे कुठंतरी थांबायला हवंय अशी भावना प्रथम मनात आली पाहिजे . आणि त्यानुसार पावले उचलून भरपूर झाडेवेली लावून पृथ्वी सौदंर्य वृद्धींगत केले पाहिजे .
" वनवन भटकत
राहशील मानवा
परि न मिळेल
तुज शुद्ध श्वास
या जीवनात !! "
ही अशी वेळ यायला काहीच उशीर होणार नाही ! तेव्हा मानवांनी पाणीही काळजीपूर्वक वापरले पाहिजे . काटकसर हा गुण अंगात सर्वांनी बिंबवला पाहिजे . पूजेचे निर्माल्य , अस्थीरक्षा विसर्जन , गणेशविसर्जन , कारखान्यातील दूषित पाण्याचे वहन इ . गोष्टी कटाक्षाने टाळून जलप्रदूषण रोखून धरू शकतो . कारण , " जल है तो कल है ! " शिवाय , " जल हेच जीवन आहे ! " असे आपण म्हणतो ते शाळेतील मुलांच्या घोषवाक्यापुरतेच मर्यादित आहे का ? त्याचा प्रत्यक्षात जीवनात उपयोगात आणले पाहिजे ना ! आपण मोठे माणसंच अशी बेजबाबदार वागलो तर आपली मुलेही तसेच अनुकरण करणार ना ! कारण , " जसे पेराल तसेच उगवेल . " आधी आपण स्वतः सुसंस्कृत व सुसंस्ककारी झाले पाहिजे . " मला काय त्याचं " ही संकुचित भावना सोडून , " हे विश्वची माझे घर " ही भावना आणणे क्रमप्राप्त आहे . त्याविना ही राक्षसी प्रदूषण संपणार नाही .
" सर्व प्रदूषणास
मानवच कारणीभूत
षडरिपूने करवी
पृथ्वीसौंदर्य नेस्तनाभूत !! "
वायू प्रदूषण हे वाढत्या वाहतूक साधनांचा परिणाम होय . सायकलीचे महत्त्व हे शारीरिक स्वास्थ्यासह वायूस्वास्थ्यही अबाधित ठेवते . याची जाणीव ठेऊन निदान काय जवळच्या अंतरासाठीतरी अंमल व्हावा . शिवाय मोबाईलच्या लहरीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव ठेवावी . पक्षीजीव व मानवी शारीरिक आजारास हा मोबाईल कसा आमंत्रित करतो हे समजून उमजून घेतले पाहिजे . तरच हे प्रदूषणाचे सावट पांगवता येईल .
शेवटी असेच म्हणावेसे वाटते की आधी आपल्या अंर्तमनात डोळसपणे डोकावून पहा . आपल्या चुकीवरील पांघरूण बाजूला दूरवर सारा . प्रदूषण टाळून , " जगा आणि जगू द्या ! "
अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. ता. किनवट
जि. नांदेड
मो. क्र. 9552963376
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
..,...........प्रदूषण..................
प्रदूषण ही एक जगाला भेडसावणारी महान समस्या बनली आहे.वाढती लोकसंख्या मुळे मानवाच्या गरजा खूप वाढल्या आहेत .मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यसाठी कोणत्याही स्तरावर पोहचत आहे. मानवाचे जीवन सकाळ पासून ते रात्री झोप पर्यंत निसर्गावर अवलबून असतो.मानव निसर्गातून आपल्या गरजा पूर्ण करून घेतो परंतु निसर्गासाठी कोणतेही योगदान देत नाही.प्रदूषण वेग वेगळ्या प्रकारची आहेत.पा
पाणी प्रदूषण :पाणी हे मानवी जीवनातील मुख्य गरज आहे .परंतु आपल्या स्वार्थासाठी काही लोक दुसऱ्या सजीवाला विचार करत नाही.पाणी ही निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. निसर्गातून मुबलक प्रमाणात पाणी मिळतो म्हणून लोक पाण्याचा विचार न करता कोणत्याही पद्धतीने वापर करतात.सद्ध्या शेतासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकाचे संगोपन करताना पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा केल्या जात नाही.सोडून दिल्या जाते आणि पाहताही नाही .आपल्या देशात मोठं मोठे कारखाने आहेत.कारखान्यातून निघणारी मलई,रसायन पाण्यात सोडले जातात.आणि पाणी दूषित केल्या जाते.मोठ्या मोठ्या नद्यांचे पाणी दूषित होते त्या मुळे पाण्यातील सजीवांच्या जीवाला धोका पोहचतो आणि पण्यातले सजीव मासा,खेकडा,असे अनेक जलचर प्राणी प्राणाला मुकतात म्हणून प्रत्येकानी सगळ्या जीवांचा विचार केल्यास अन्न साखळी तुटणार नाही.सजीव सृष्टी टीकण्या साठी मदत होईल. वर्षातुन फक्त तीन दिवस पाणी पडतो आणि पूर्ण जनतेला पिण्यासाठी वापरावे लागते.म्हणून जपून वापर केल्यास पाणी पुरेल.
वायू प्रदूषण...
वायू प्रदूषण एक खूप मोठी समस्या आहे. मानव आपल्या स्वार्था साठी झाडे कापत आहेत . गरज पेक्षा जास्त हानी करत आहे.त्यामुळे वासुंधरेचे लेणे नष्ट होत आहे .संतांनी सांगितलेली सूवचन
. " वृक्ष वली आम्हा सोयरी" ही संकल्पना केवळ म्हणाण्या पुरते शिल्लक राहत आहे .तापमान अतोनात वाढत असल्यामुळे ओझोन वायूचा थर कमी. होत आहे.सूर्यापासून एनारे अतिनील किरणं शोषून घेण्याचे काम ओझोन थर करत असतो.त्या मुळे सूर्या पासून पृथ्वीवर येणारे अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर पोहचतात त्यामुळे अनेक त्वचेच्या रोगांना कर्क रोगाचे प्रमाण वाढले आहे मानवाला हवा शुध्द मिळत नाही.त्या मुळे सुद्धा अंनेक रोगांची लक्षणे वाढली आहेत.त्या साठी प्रत्येक व्यक्तींनी दरवर्षी एक झाड लावायला हवा ,महाराष्ट्रात अनेक संस्था पर्यावरण जोपासना करण्यासाठी कार्य करत आहेत.नाशिकला ,"आईचे बन" नावाची संस्था उत्तम कार्य करत आहे .आपल्या आईच्या नावाने एक झाड लवाल्या जाते आणि त्याची देखभाल संस्था करत असते. अशे प्रत्येक जिल्ह्यात झाले तर झाडांची संख्या वाढेल आणि प्रदूषणाला अळा बसेल.वाढदिवस,सेवानिवृत्ती कार्य क्रमाला आपण एक रोपटे भेट द्यायला हवे.
कचरा प्रदूषण......
कचरा प्रदूषणही देशाला भेडसावणारी मोठी समस्या आहे .कचरा व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.आपल्या परिसरात दैनंदिन जीवनात विविध प्रकारचा कचरा जमा होत असतो.त्याचे व्यवस्थाप करणे ही काळाची गरज आहे अन्यथा खूप मोठे संकट उभे राहील आपण प्रत्येक गोष्टी साठी शासनावर अवलंबून न राहता आपलीही काही जवाबदारी आहे समजून घेतले पाहिजे.अन्यथा अनेक साथीचे रोग पसरतात म्हणून पर्यावाची सर्वांनी काळजी घ्याल पाहिजे.
"निसर्ग आपली गरज भागवते हाव नाही " हे प्रत्येकानी लक्षात ठेवायला हवी.......
जीवन खसावत
भंडारा 9545246027
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
प्रदुषण ---- नकारात्मक विचारांचे .
➖➖➖➖➖➖➖
आज सृष्टी वर राहणारे सर्व जीव जल, वायू, ध्वनी प्रदूषणाने त्रस्त झाले आहेत. मानवाने स्व कल्याणासाठी नवनवीन वैज्ञानिक शोधांचा आधार घेऊन स्वतःहाचे भौगोलिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तो यशस्वी ही झाला आहे. पण आज संपूर्ण सृष्टी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे .हे सत्य सर्व ज्ञात आहे.
खुप कमी लोकांना मानसिक डिप्रेशन च्या नावाने वाढत चाललेले नकारात्मक विचारांच्या प्रदुषणाचे ज्ञान आहे . काहींना ज्ञान आहे पण ते सत्य स्वीकारायला तयार नाही. नकारात्मक विचार करण्याची आजकाल सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात सवय झाली आहे . काहींना ह्या सवयीतुन मुक्त व्हावेसे वाटते पण आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने ते आणखीनच त्यात अडकत जातात. याचा परिणाम स्वभाव रागीट चिडचिडा होत जातो. मग आपण म्हणतो ही व्यक्ती अशी नव्हती अचानक अशी का वागायला लागली. तर, काहींना नकारात्मक वातावरण तयार करण्यातच आनंद मिळत असतो. याचे एक सर्व ज्ञात उदाहरण म्हणजे अफवा पसरवणे.
आता काळ चालू आहे लॉकडाऊन चा आता संपेल आता संपेल म्हणत म्हणत चौथे लॉकडाऊन सुरू झाले.
आज सर्वच जण मानसिक तणावाखाली वावरत आहेत .एकतर जिवघेण्या आजाराची भीती आणि दुसरे भविष्यात येणार्या आर्थिक संकटाची भीती आज सर्वांनाच भेडसावत आहे.
आज आपण टिव्ही वृत्तपत्र आणि सोशल मिडिया वर सतत कोरोनाच्या च बातम्या पाहतो वाचतो ऐकतो. आज लाखो करोडो लोक ह्या बातम्या पाहता ऐकता वाचता. सर्वांच्या मनात नकारात्मक विचारांचे काहूर सतत उठत आहे. जसे वातावरणात विषारी वायूचे प्रदूषण पसरते त्याच प्रमाणे वातावरणात मानवी विचारांचे प्रकंपन पसरतात . आपले पुर्वज नेहमी म्हणायचे नेहमी शुभ चिंतन करा आणि शुभ बोला कारण वास्तु तथास्तु म्हणत असते. हे काही अंशी खरे ही आहे आपण बोलले शब्द आणि चिंतन केले संकल्प प्रकृतीत मिसळतात. प्रकृती आपल्याला तेच देते जे आपण तिला देतो.
विशेषतः सकाळी उठल्यावर केलेले चिंतन सकाळी बोलेले शब्द नेहमीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असावे. म्हणूनच म्हणतात. सकाळच्या प्रहरी 'राम नाम घ्यावे'. शुभ संकल्प करावे शुभ बोलावे.
याला एक कारण ही आहे .
आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपले अंतर्मन जागृत अवस्थेत असते .त्यावेळी आपण जे संकल्प करू ते सिध्दीस जातात.
अजून एका नकारात्मक मानसिक प्रदूषणावर प्रकाश टाकू या.
काहींना सवय असते भूतकाळात जगायची तर काहींना सवय असते भविष्यकाळात जगायची .
भूतकाळात जगणे म्हणजे सतत घडून गेलेल्या त्रासदायक गोष्टी आठवणे आणि स्वतःला आणि इतरांना दोष देत राहणे . मानवी मन भूतकाळातील दुःखद आणि त्रासदायक गोष्टीतच जास्त भटकत असते. त्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात डिप्रेशन येतं मग स्वभाव चिडचिडा होणे. नात्यात दूरावा येणे, काहींना निद्रानाशाचा देखील त्रास होत असतो.
ह्यातून बाहेर यायचे असेल तर स्वतःला सकारात्मक विचारांची सवय लावणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला एक वही तळ हातावर दोन दिवस तशीच पकडून ठेवायला सांगितली तर हात दुखणार ना ! मग हे तर आपलं मन आहे .आपला सखा सोबती तोच आहे. मग का आपण वाईट भूतकाळात पुन्हा पुन्हा आठवून त्याला त्रास का द्यावा .
आपलं मन सुदृढ तर आपलं तन सुदृढ .
काही तर भविष्याच्या चिंतेने जिवन व्यतीत करतात. जे भूतकाळात आणि भविष्यात जगतात त्यांना वर्तमानाचा आनंद कदापि घेता येत नाही .ते लोक सतत नकारात्मक विचारांनी वेढलेले असतात .
आपल्याला जिवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर
वाईट पाहू नका ,वाईट बोलू नका वाईट ऐकू नका , आणि एक वाईट चिंतन करू नका
न स्वत: साठी न इतरांसाठी .
आपले मन नेहमी सकारात्मक विचारांच्या ऊर्जेने भरलेले असू द्या .
जिथे इच्छाशक्ती प्रबळ असते तिथे काहीच अशक्य नाही.
नेहमी लक्षात ठेवा शंभर नकारात्मक विचारांना एकच सकारात्मक विचार भारी पडत असतो .
सकारात्मक विचारांची मन नेहमी हलके आणि उत्साही राहते तर नकारात्मक विचारांनी मन नेहमी ओझ्या खाली राहते.
आता आपण ठरवायचे मनाला नकारात्मक ऊर्जेचे खत पाणी द्यायचे की सकारात्मक ऊर्जेचे खत पाणी द्यायचे .
नेहमी लक्षात ठेवा सकारात्मक ऊर्जेने मनात सुगंधी फुले उमलतात , तर नकारात्मक ऊर्जेने मनात नेहमी काट्यांचे जंगल तयार होत असते .
फुलं नेहमी सुगंध देतात आणि काटे नेहमी दुःख देतात .
मग आपणच ठरवा आता .
खत पाणी कोणाला घालायचे सकारात्मक ऊर्जेला की नकारात्मक ऊर्जेला !
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव ७७४४८८००८७
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
21
लेख
वाढत्या प्रदूषणाने जीवनमान धोक्यात
पृथ्वीवर अनेक जीव-जंतू,प्राणी,पक्षी राहतात.यामध्ये भुचर व जलचर असे वर्गीकरण केले जाते.सजीव व निर्जीव यांनी नटलेली पृथ्वी आहे.सजीवाचे जीवनमान निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने निसर्गाचे सौंदर्य बहरलेले आहे.निसर्गाचे सौंदर्य ही माणसाला देवाकडून मिळालेली अनमोल भेट आहे.मानव निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःचे जीवनमान आनंदात घालवत असतो.भारत देश निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे.यामध्ये हिमालया सारखी पर्वतरांग,के2 सारखे उंच शिखर,देशाच्या तिन्ही बाजूंनी व्यापलेला अथांग सागर,जम्मू-काश्मीर सारखा बर्फाच्छादित भाग याचबरोबर नदी,नाले,तलाव,धरण वेगवेगळे वृक्ष, फळे-फुले,औषधी वनस्पती या सर्वांचा समावेश आहे.अशा अनेक विविधतेने भारत नटलेला आहे.एकविसाव्या व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाने प्रगतीचे शिखर सर केले आहे.या आधुनिक प्रगतीत काही तोटे सुद्धा झाले आहे.प्रगतीच्या शर्यतीत काही समस्या निर्माण झाल्या आहे. यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे प्रदूषण होय.मानवाने प्रचंड प्रगती केली.स्वतःचे जीवनमान उंचावले.या सर्वांमध्ये प्रदूषण ही समस्या निर्माण झाली.प्रदूषण ही एक समस्या बनली. जी येणाऱ्या काळात मानवाचे जीवनमान व आरोग्यास धोक्याची घंटा आहे.आज आपण पाहतो.प्रदूषणामध्ये ध्वनी प्रदूषण,जलप्रदूषण,हवेचे प्रदूषण या तिन्ही मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.ध्वनी,जल व हवा या मानवाच्या जगण्यातील मुख्य गोष्टी आहे.ज्या प्रदूषण या समस्येने ग्रासलेल्या आहे. या दुष्परिणामाने मानवाचे आरोग्य व आयुष्य धोक्यात आले आहे.शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर आवाज आज नाहीसा झालेला दिसतोय.मानवाच्या वाढत्या अपेक्षा व मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यात मानवाने निसर्गावर अन्याय चालवलेला आहे.आज निसर्गनिर्मित अनेक गोष्टी नाहीशी होताना दिसत आहेत.ज्यामुळे प्रदुषण वाढ होत आहे.
1) हवेचे प्रदुषण
वाढती लोकसंख्या,यातून वाढते शहरीकरण,रस्ते,धरण,उद्योगधंदे, तलाव यासाठी दरवर्षी लाखो झाडांची कत्तल केली जात आहे.सहाजिकच वृक्षतोड झाल्यामुळे हवेचा समतोल बिघडला.शुद्ध हवेची जागा अशुद्ध
हवेने घेतली.निसर्गनिर्मित गोष्टी हळूहळू कमी होत आहे.मानवनिर्मित गोष्टीची वाढ होत आहे.वाहनांचा धुर, कारखाने,कंपन्या यातुन अशुद्ध असे वायू हवेच्या कुशीत ढकलले जात आहे.अर्थात शुद्ध हवा व हवेतील शुद्ध ऑक्सिजन आज मिळत नाही.अशुद्ध हवेमुळे मानवाच्या हवेमुळे मानवाच्या श्वसन संस्थेवर परिणाम होत आहे. यामुळे मानवाचे जीवन मान कमी होत आहे.निसर्गातून फुकट मिळणारा शुद्ध ऑक्सिजन मानवाला आयुष्य जगण्यासाठी लाख रुपये खर्च करून दवाखान्यात कृत्रिम ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे.ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.माणूस प्रगतीच्या मागे धावत असतांना पृथ्वी,निसर्ग व सजीवांचे आयुष्यमान याकडे लक्ष द्यायला विसरला आहे.प्रगती व पैशाचा अहंकार एक दिवस मानवजातीला घातक ठरेल यात शंका नाही.हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवड झाली पाहिजे. झाडे लावून त्याचे उत्तम संगोपन केले पाहिजे.झाडे हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत करतात.हवेतील शुद्ध ऑक्सिजन वाढवण्याचे काम करतात. निसर्ग एक वरदान आहे.ते वरदान कायम स्वरूपी टिकण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा अति वापर टाळला पाहिजे.हवेत सोडले जाणारे अति विषारी वायू व वाहनांच्या द्वारे सोडला जाणारा धूर यावर बंधने घातली गेली पाहिजे.निसर्गाचा अतिवापर हा सजीवातील मानव घटकच करत असतो.स्वतःबरोबर अनेकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम करीत आहे.
2) जल प्रदूषण
प्रदूषणामध्ये दुसरी समस्या जल प्रदूषण आहे.जलप्रदूषण ही समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रुद्र रूप धारण करुन उभी आहे.दरवर्षी पडणारे पावसाचे पाणी,सांडपाणी व कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.शहरी भागात वाढती लोकसंख्यामुळे सांडपाणी व कचरा ही समस्या मोठी बनली आहे. याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे पावसाळ्यात पडणारा पाऊस हेच घाण पाणी व कचरा स्वतःबरोबर वाहात घेऊन जातो.छोटे तलाव,विहीर, धरण याठिकाणी शुद्ध पाणी अशुद्ध करत आहे.यातून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.अशुद्ध पाण्यामुळे मानवाचे आरोग्य बिघडते. आज आपण पाहतो ग्रामीण-शहरी भागातील लोकांना वेगवेगळ्या शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.जल प्रदूषणामुळे गोड्या पाण्याचे स्रोत दरवर्षी कमी होत चालले आहे.निसर्गाकडून मिळणारी पाणी ही देणगी आज विकत घ्यावी लागत आहे.फुकट मिळणारे पाणी शुद्ध करण्यासाठी यांत्रिक प्रक्रिया करायला पैसे खर्च करावे लागत आहे. आज ग्रामीण भागात सुद्धा पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. मानवाने प्रगतीच्या स्पर्धेत असंख्य नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश लावला आहे.यावर विचारविनिमय करायला मानवाकडे वेळ नाही. प्रत्येकाने येणाऱ्या काळातील आरोग्याचा धोका लक्षात घेतला पाहिजे.दरवर्षी पडणारे पावसाच्या पाण्याचे योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढवले पाहिजे.पिण्याच्या पाण्याची योग्य साठवणूक केली पाहिजे. प्रत्येकाने पाणी खराब होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.पाणी हे जीवन आहे.ते जीवापाड जपले तरच दिर्घकाळ टिकेल.
3) ध्वनि प्रदूषण
प्रदूषणामध्ये आधुनिक भेडसावणारी समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. यामध्येसुद्धा विज्ञानाच्या प्रगतीचा विपर्यास झालेला दिसतोय.घराघरात आधुनिक साधने आली.व त्याचा अति वापर सुरू झाला.रेडिओ,टीव्ही, टेपरेकॉर्डर,मोबाईल,डीजे,वाहनांचा कर्कश हॉर्न यामुळे ध्वनी प्रदूषण अधिक होत आहे.मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होत असलेल्या ध्वनीच्या वापराने आरोग्यास धोका पोहचत आहे.शहरी भागात गर्दीच्या ठिकाणी वाहने पास करण्यासाठी मोठ्या कर्कश आवाजात हाॅर्न वाजविला जातो.अनेक जण एकाच वेळी हॉर्न वाजवित असतात.प्रत्येकाच्या जाण्याच्या घाईने निघालेला कर्कश आवाज मर्यादेपेक्षा जास्त निर्माण होतो.त्यातून ध्वनीचे प्रदूषण निर्माण होते.याचबरोबर लग्न समारंभ,सार्वजनिक उत्सव,जयंती यांच्या मिरवणुकीमध्ये बँड पथके आधुनिक डीजे सिस्टीम ठरवून दिलेल्या आवाजाच्या क्षमतेपेक्षा मोठ्यांनी वाजवतात.यातून निघणारा कर्कश आवाजाने अनेकांना कान, ह्रदयाचा त्रास होतो.सार्वजनिक ठिकाणी आवाजाची घालून दिलेले नियम जर योग्य पाळले नाही.तर मानवा बरोबरच पशुपक्ष्यांना सुद्धा याचा त्रास होतो.आज अनेक पक्षी नाहीसे होत आहे.याला प्रदूषण कारणीभुत आहे.मानवाला प्रदूषणाच्या परिणामातून वाचण्यासाठी दवाखान्याचा पर्याय उपलब्ध आहे.पण मानवा बरोबर इतर सजीवांना मात्र प्रदूषणाचे दुष्परिणामातून कोणीही वाचवू शकत नाही.मानवाने स्वतःच्या हट्टापायी सजीव व निसर्ग यांना धोका निर्माण केला आहे.आज सजीव व निसर्ग यांना अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे.कर्तव्या बरोबरच जबाबदारीचे पालन झाले.तर समस्या निर्माण होत नाही.समस्या निर्माण झाल्या नाही तर त्यावर उपाय शोधण्याची गरज भासत नाही.मानवच आपल्या चुकांमधून समस्या निर्माण करतो.व समस्या सुधारण्यासाठी शोधक वृत्तीचा वापर करतो.कुठे तरी या चक्रातून मानव बाहेर पडला पाहिजे.जे निसर्ग निर्मित आहे.त्याला नष्टही करायचे नाही.व त्याचा शोधही लावायचा नाही.निसर्गाच्या सानिध्यात चांगले जीवन व्यतित करायचे. निसर्गाचा व सजीवांचा स्नेह असाच अबाधित ठेवायचा.तरच मानवी जीवन संकट विरहित निर्माण होईल.
राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
~~~~*~~~~~*~~~~~*~~~~~*~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें