*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- अठ्ठाविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 16 मे 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- वाचन*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
प्राप्त लेख
01) हणमंत पडवळ, उस्मानाबाद
02) दुशांत निमकर, चंद्रपूर
04) भागवत गर्कळ,
05) श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड
06) डॉ.हरिश्चंद्र भोईर, ठाणे
07) श्रीमती माणिक नागावे, कोल्हापूर
08) महेंद्र सोनेवाने, गोंदिया
09) सौ.यशोधरा सोनेवाने, गोंदिया
10) सौ.भारती सावंत, मुंबई
11) शुभदा दीक्षित, पुणे
13) सविता साळुंके, श्रीरामपूर
14) अर्चना गरुड, नांदेड
15) गणेश सोळुंके, जालना
16) डॉ.वर्षा सगदेव, नागपूर
17) झगरे गुरुजी
21) राजेंद्र शेळके, बुलढाणा
23) सुधाकर पाटील
26) जीवन खासावत
28) सुजाता जाधव
36) श्री जी. एस. पाटील
*ज्ञानाचे स्त्रोत--वाचन*
*(09) सो.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धी अधिक वाढतेआणि मन प्रगल्भ होते . तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे. त्याच बरोबर आपले जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपल्या ज्ञानामध्ये अधिक वाढ करण्यासाठी वाचन हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे. पूर्वीच्या काळी अन्य विषयांची पुस्तके मिळण्याची जागा म्हणजे – वाचनालय होय. आजच्या आधुनिक युगात सुद्धा वाचनालये विकसित आहेत. या वाचनालायत साहित्य, ग्रंथ, निबंध लेखन पुस्तक अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात. परंतु आज या पुस्तकांची जागा ही इंटरनेट ने घेतली आहे. आज ऑनलाईन साईट यामुळे अन्य विषयांवरील विविध पुस्तके ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे .
‘वाचाल तर वाचाल ’ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे. हे आपण सर्वच जाणतो; परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी हा लेखप्रपंच. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल.आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे .अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.
तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल ,तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. जेवढे पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, *“वाचाल तर वाचाल”*. हे खरेच आहे.
वाचनाने शब्द संपत्ती वाढते वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.त्याचा उपयोग तो निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो.लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान समृद्धी वाढते . त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.
आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.
वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते.जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावतो.त्यांच्या विचारांशी आपण समरस होत असतो.आज महान लोक नसले तरी त्यांचे ग्रंथ आहेत,पुस्तके आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही . अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.पुस्तके वाचून आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. मात्र काय वाचावे?हे फारच महत्वाचे आहे.जीवन घडवणारी पुस्तके आहेत. तशी जीवन बिघडवणारी पुस्तकेसुद्धा आहेत.यासाठी आपले शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत . " युवक वाचतील तर देश वाचेल ".
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. आपण सर्वजण शाळेत असल्यापासून वाचनाचे महत्त्व ऐकत आलो आहोत. कारण शाळेत शिक्षक नेहमी वाचन किती महत्वाच हे सांगत असतात.
जे लोक अन्य पुस्तकांचे वाचन करतात त्यांना अनेक फायदे देखील होते. मनुष्याजवळ असलेले ज्ञान हे त्याची फार मोठी शक्ती आहे. कारण याच शक्तीच्या साहाय्याने मानव हुशार व चपळ बनतो.वाचन केल्याने मेंदूला चालना मिळते आणि नवनवीन शब्दांमुळे त्याच्यामध्ये प्रगती होते.विविध विषयांची पुस्तके वाचल्यामुळे नवीन माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानात अधिक भर पडते.वाचनामुळे आपली शब्द संपत्ती वाढते.ज्याचा उपयोग आपण निबंध, लेखन आणि भाषणामध्ये करू शकतो.तसेच लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि कविता यांची या सर्वांविषयी माहिती मिळते. यामुळे आपल्या सामन्यात ज्ञानात भर पडते
वाचन हे आपल्या सर्वांसाठी अधिक उपयुक्त आहे. म्हणून आपण सर्वानी पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांना सुद्धा वाचायला सांगितली पाहिजेत. जेणेकरून आपली वाचन संस्कृती ही जपली जाईल.तसेच वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरित केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आवडत्या विषयापासून वाचनाची सुरुवात केली पाहिजे आणि वाचनाचा आनंद घेतला पाहिजे.
*लेखिका*
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
'वाचन संस्कृती जपूया....'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
शहापूर ,(ठाणे)9226435827
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाची कास धरत प्रत्येक क्षेत्र आपण पादाक्रांत करत आहोत. विविध प्रकारचे सोशल मीडियाचा भारमार झाल्याने आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन ,लॅपटॉप आणि संगणक आल्याने जग अगदी बोटांवर आले आहे.सर्व प्रकारच्या ज्ञानाचा खजिनाच जणू काही आपल्याला सापडला असल्याने.... प्रत्येकजण स्वतःला बीझी समजू लागला आहे.यातूनच वाचन संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागला आहे.
पूर्वीच्याकाळी प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचन व्यासंग जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न करीत असे.विविध प्रकारची पुस्तके वाचन करणे हेच बहुदा मनोरंजनाचेही साधन होते. मनोरंजनाबरोबरच वाचता वाचता ज्ञान प्राप्ती आपसुकच होत होती.जशी शरीराला अन्नातून ऊर्जा मिळते तद्वतच मनाचे उत्तम अन्न म्हणजे वाचन होय.आपले आचार शुद्ध करायचे असतील तर वेळो वेळी त्याला वाचनाचा बूस्टर डोस नक्कीच देणे गरजेचे आहे.वाचन केवळ मनोरंजनासाठीच नाही तर आपल्याला प्रगल्भतेकडे नेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
वाचनाचा व्यासंग माणसाला कधीही एकटेपणाची जाणीव निर्माण करून देत नाही.दुःखात मनाला नवीन उभारी देण्यासाठी तर सुखात पाय जमिनीवर ठेऊन कवेत अंबर घेण्याचा निगर्वीपणा दर्शविण्यासाठी वाचन उपयोगी पडते.वाचन मनाला प्रसन्न ठेवण्याचंच नव्हे तर प्रभावी वक्तृत्वासाठी अतिशय महत्वाचे ठरते.वाचनाने कोणत्याही विषयावरचं आपलं ज्ञान अपडेट ठेवता येतं!!
जीवनातील प्रत्येक दुःखाच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी वाचन छंद अतिशय उपयुक्त आहे.व्यवहारिक जीवनाच्या प्रत्येक संकटाशी सामोरे जाण्याची शक्ती वाचनाने मिळते.वाचन हे एक प्रकारच्या टॉनिकचे काम करते. वाचन व्यासंग असणारी व्यक्तीला आत्मविश्वासच नाही तर जीवन संग्रामात जगण्याची कलाच शिकवली जाते.
माणूस जन्मतःच बोलायला शिकत नाही.काय बोलावे ,कसे बोलावे, कधी बोलावे,प्रसंगानुरूप मौन साधण्याची कला साधण्यासाठी वाचन अतिशय उपयुक्त ठरते.उच्चार,विचार आणि आचार यांच्या शुध्दता तुम्ही काय आणि कसे वाचन करता यावरच अवलंबून असते.
वाचन आध्यत्मिक विचारांचा वारसा,भूतकालीन घडामोडीतून भविष्यकाळाची वाटचाल,नव्याचा ध्यास घेऊन जुन्याचा बोध मिळविण्याचा राजमार्ग आहे. पूर्वी घडलेल्या चुकांची माहिती घेऊन नाविन्याचा शोध व संशोधन अशा सर्वच बाबींसाठी आपण घेतलेले ज्ञानच
उपयुक्त ठरत आहे.
रामदास स्वामी यांनी म्हटल्या प्रमाणे
दिसामाजी काहीतरी लिहीत जावे,
प्रसंगी अखंडित वाचीत जावे।।
वाचनाशिवाय आपल्या मनाला योग्य खाद्य पदार्थांचा पुरवठा होत नाही.शरीर तजेलदार , बळकट आणि पिळदार होण्यासाठी ज्याप्रमाणे व्यायामाची गरज असते त्याच प्रमाणे आपला मेंदू तल्लख,तजेलदार आणि अष्टवधानी होण्यासाठी वाचनाची गरज असते.आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा लेखकाचे म्हणणे ऐकत असतो. वाचन करत असतानाच आपण त्या पुस्तकातील विचारांशी तादात्म्य पावतो...पुस्तकातील पात्रे आपल्याशीच जणू संवाद करीत आहेत जणू समाधीची स्थिती निर्माण होऊन आपल्या सर्वच दुःखातून काहीकाळ का होईना आपण दूर जाऊन आपले मन ताजेतवाने होते.
आज जगात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्तींनी आपल्या वाचन छंदाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. त्यापैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आणि भूतपुर्व राष्ट्रपती डॉ.ए. पी जे.अब्दुल कलाम इत्यादी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा खूप छंद होता. म्हणून ते गमतीने म्हणत की," माझ्या मृत्युनंतर माझ्यावर ग्रंथाच्या दुकानदाराचे देणे राहील." उत्कृष्ट ग्रंथाचा अनमोल ठेवा आणि ' वाचाल तर वाचाल' असा अनमोल संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती स्मरणशक्ती दांडगी होती एकदा वाचलेली गोष्ट ते कधीच विसरायचे नाहीत त्यांनासुद्धा वाचनाचा खूप छंद होता. जे पुस्तक वाचन करण्यास इतरांना एक दोन महिन्यांचा कालावधी लागायचा ते पुस्तक स्वामीजी तीन दिवसातच वाचून काढायचे आणि तेही पान नंबरसहीत त्यांच्या स्मरणात राहायचे . असा वाचनाचा महिमा आघात आहे. ही वाचन संस्कृतीची साखळी जोडण्यासाठी,वाचनसंस्कृती वाढवूया....प्रवासातून आपल्या मुलांसाठीच नव्हे तर भावी पिढीसाठी एक तरी पुस्तक विकत घेऊया वाचन व्यासंग वाढवूया आणि
'असा धरी छंद जाई तुटुनीया भाऊबंद' या उक्तीचा आनंद घेऊया.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
*वाचन*
सोशल मिडियाचा वाढता प्रभाव आणि जीवन जगण्याची पाश्चात्य प्रभावित जीवनशैली आपल्याला वेगळ्याच आचरणात वावरायला लावत आहे. वाचनाने मनाची समृद्धी विकसित होत असते. प्रत्यक्ष समाजामध्ये न भेटलेली माणसे, त्यांचे चारित्र्य दीपस्तंभासारखे दिशादर्शक ठरणारे असते. त्यांचे कर्तृत्व आपल्यासाठी आदर्श असते. त्यांच्या जीवनातील प्रसंग आपल्याला प्रेरणादायी ठरत असतात. अशी माणसं समाजामध्ये शोधुन सापडत नाहीत. परंतु ती आणि तशी माणसं आपल्याला पुस्तकांमधून भेटू शकतात. आणि म्हणूनच वाचनाचा छंद आपल्याला जडला पाहिजे, आपण तो अंगीकारला पाहिजे, आपण तो स्वीकारला पाहिजे, आपण त्याच्यामध्ये रस दाखवला पाहिजे. आपल्याला एवढे शॉर्टकट वागण्याची सवय लागली आहे. व्हाट्सअप वर आलेला मेसेज देखील रीड मोरच्या पुढे वाचण्यास नको वाटते. चटक मटक वाचण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. आणि त्यामुळेच संस्कारक्षम वाचन कमी झालेले आहे. थोरांची चरित्रे वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा-अठरा तास वाचन केले आणि विद्वत्ता प्राप्त केली. अशी थोर विभूती आणि अशी थोर लोक आपल्या या भारत वर्षामध्ये आहेत. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत तर नाहीतच. उलट वाचन संस्कृती नष्ट होते की काय या भीतीखाली वावरत आहोत. याच बाबीचा सर्वांगीण विचार करून मी आणि माझे आठ-दहा सहकारी मिळून ”वाचन भिशी” एक नाविन्यपूर्ण उपक्रम चालवला आहे. दर महा केवळ शंभर रुपये प्रत्येकाकडून घेऊन जमलेल्या रकमेतून, सहकारी सदस्यच्या नावाची चिठ्ठी काढून त्याला त्याच्या आवडीचे एक पुस्तक घेण्यास प्रेरित करायचे. बऱ्याच वेळेला आपण पुस्तक घेऊ इच्छित असतो परंतु हजार रुपये, सातशे आठशे रुपये किंमत असल्यामुळे ते घेण्याचे आपण टाळत असतो. वाचन भिशी मधून ही अडचण दूर झाली. आम्ही बारा लोक या वाचन भिशीचे सदस्य आहोत. प्रत्येक महिन्याला बाराशे रुपये जमा होतात. चिट्ठी उचलून भाग्यवंत विजेता ठरल्यानंतर त्याला हजार रुपये द्यायचे आणि त्याच्या आवडीचे पुस्तक पुढच्या मीटिंगच्या वेळेला वाचनाच्या मुद्यासहित घेऊन यायला सांगायचे. दोनशे रुपये गटाकडे जमा करायचे. त्या दोनशे रुपयाचे सदस्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेल्या पैशातून अनोखी भेट द्यायची. शिवाय एकमेकाकडे वेगवेगळी पुस्तके जमलेले आपसात वाचायला घ्यायची. वाचलेल्या पुस्तकाचे आपल्याला आवडलेल्या घटनाचे प्रसंगाचे वर्णन आणि विश्लेषण सदर बैठकीमध्ये करण्यात येते. यामुळे केवळ पुस्तके घेऊन घरामध्ये ठेवली जात नाहीत, तर ती वाचली जातात. आणि यातून वाचन संस्कृती वाढीस लागते. जो वाचतो तो आत्मविश्वासाने उभा राहतो. चारचौघात बोलण्याचे धाडस त्याच्यामध्ये निर्माण होत असते. वाचनाने आत्मविश्वास निर्माण होतो. आपलं वक्तृत्व फुलून येतं. हजरजबाबीपणा तसेच समयसूचकता या गुणांची वाढ होते. नाविन्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती निर्माण होते. काहीतरी लिहिण्याची उर्मी तयार होते. यापैकी बहुतांश गुण सर्व सदस्यांनी प्राप्त केलेले आहेत,आणि त्यात ते यशस्वीही होतात. त्यामुळे वाचन संस्कृतीची ही वाचन भिशी लाभदायक झाल्याचा आनंद आम्हा सर्वानाच आहे. कर्तुत्वा बरोबर नेतृत्व करण्याचे सामर्थ्य वाचनामुळे निर्माण होते.म्हणून हा अट्टहास आम्ही केला आणि तो यशस्वीही झाला आहे.याचे अनुकरण अनेकांनी करावी यासाठी या ठिकाणी मी हे नमूद करत आहे. वाचनातून आपल्याला अनुभव मिळतो. आपली जडणघडण होते. थोर व्यक्तीत्वांची ओळख होते. त्यांनी झेललेले कष्ट आणि त्यातून काढलेले मार्ग आपल्याला समजतात. आपल्या आचार विचार व उच्चारावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे वाचनसंस्कार रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. वाचनाने व्यक्तीमत्व विकास घडत असतो. वाचनातून समज निर्माण होते. वाचनामुळे कल्पकता निर्माण होते, वाचनामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, वाचनामुळे माणूस बनता येते,साधकबाधक विचार करता येतो. वाचले ते अंगिकारले तर समाज परिवर्तन होऊ शकते. सारांश देश बदलण्याचे सामर्थ्य वाचकात आहे. वाचक वाढले की लिहणाऱ्याला उर्जा मिळते. त्यांच्याकडून अधिक दर्जेदार साहित्यनिर्मिती होवू शकते. वैयक्तीक, सामाजीक, सांस्कृतीक संवर्धनासाठी वाचन आवश्यक आहे.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
*वाचाल तरच वाचाल*
*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
"वाचाल तर वाचाल
वाचाल तर शिकाल
शिकाल तर टिकाल
नाहीतर बाजूला फेकाल"
आज मानवाचा मेंदू विकसित होण्याकरिता खुराक म्हणून अखंडपणे वाचनाचा व्यासंग अत्यंत आवश्यक आहे.सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.मागील भूतकाळातील इष्ट-अनिष्ट चालीरीती,रूढी,परंपरा,सण, समारंभ,पोशाख या सर्व बाबींची सांगोपांग विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे.भविष्याचा वेध घेऊन जीवनात यशाच्या पायऱ्या पादाक्रांत करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही.वाचन केल्यामुळेच ज्ञान मिळते आणि त्या ज्ञानाचा उपयोग समाजात व्यवहारासाठी करीत असतो. जगात,देशात,राज्यात चालू असलेल्या घडामोडीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी ऐकणे किंवा वाचणे गरजेचे आहे.श्रवण, भाषण,वाचन, लेखन या चार प्रक्रिया आहेत.वाचन हे मनाचे अन्न आहे.वाचन केल्यामुळे मन, मेंदू,मनगट मजबूत होतात.मेंदू सशक्त बनतो आणि सशक्त मेंदू कोणासमोर लाचार होत नाही वा नतमस्तक ही होत नाही त्यासाठी वाचन ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'वाचाल तर वाचाल' हे आम्हा जनतेला संदेश दिलेला आहे.आपण नेहमीच म्हणतो की,'ग्रंथ हेच गुरू' आहे.ग्रंथासारखा दुसरा सखा नाहीच.पुस्तक हे तर आपले मार्गदर्शक,दिशादर्शक आहे.मनुष्यप्राणी समाजशील प्राणी असल्याने ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी मनाचे अन्न म्हणजे वाचन आवश्यक आहे.बऱ्याचदा एकदा नोकरी संपादन केल्यानंतर पाठरावस्था निर्माण होऊ वाचनाकडे दुर्लक्ष केल्या जाते पण त्यामुळे वाचन प्रक्रियेशी प्रामाणिक पणाने व्यक्त होत नाही म्हणजेच आपणच आपली मती खुंटण्यास जबाबदार असतो.विद्यार्थी दशेत असतांना केवळ परीक्षेत पास व्हायचे असल्याने वाचनाशी गट्टी जुळली असं सहज बोलून जातो पण असा हेतू न ठेवता वाचनाशी घट्ट मैत्री केली पाहिजे आणि वाचन संस्कृतीला बळकट करण्यास मदत करायला हवी.जो चांगला ऐकू शकतो तोच चांगला बोलू,लिहू शकतो.एवढेच नाही तर स्वतंत्रपणे मत व्यक्त करू शकतो.जेवढे वाचन अधिक तेवढ्याच गतीने उत्तम वक्ता या नात्याने मतप्रदर्शीत करू शकतो.
समुद्र तुम्ही बघितला असेलच.समुद्रातील पाणी सतत प्रवाही असते.एका ठिकाणी थांबलेलं नसतेच मुळी.. म्हणून आपण म्हणतो की,'थांबला तो संपला'.वाचन हे प्रवाही असलं पाहिजे त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यानुसार विविधांगी कौशल्य आत्मसात करता येते.आजचं युग बघितलं असता केवळ लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षर नाहीच तर येणाऱ्या अनेक संकटांना तोंड देत तिथून मार्गक्रमण करण्यासाठी मन, मेंदू बळकट असले पाहिजे.विचारप्रक्रिया सतत प्रवाही असली पाहिजे तेव्हाच वाचनप्रक्रिया अधिकाधिक गतिमान होईल.म्हणून 'वाचाल तरच वाचाल' अन्यथा प्रत्येक छोट्या कार्याकरिता इतरांवर अवलंबून राहता कामा नये यासाठी वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाहीच.
"वाचाल तर वाचाल,वाचाल तरच विकसित व्हाल"
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
*'वाचन हे मनाचे अन्न आहे.'*
माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज भासते तशीच गरज आपल्या मेंदूला सुद्धा असते. आणि ती गरज वाचनाने समृद्ध होते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्ञान वाढविण्यासाठी म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने मनुष्य सुसंस्कारित होतो. वाचनाने माणसाच्या विचार करण्याची क्षमता प्रगल्भ होते. वाचनाने'मनुष्याची बुद्धी वृद्धिगत होते. वाचनाने विकास होतो. आपली जीवन समृद्धता, मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला अधिकाधिक वाचन करणे आवश्यक आहे.
वाचण्याची अधिकाधिक सवय लावून घेणे आवश्यक आहे. असं म्हणतात 'वाचनाचा लावा छंद ,त्यातच आहे खरा आनंद.'माणसाला खरोखर चा आनंद मिळवायचा असेल तर पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण
'वाचन प्रेरणा'दिवस म्हणून साजरा करतो. सर्वांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात. ज्ञानवंत ,गुणवंत व्हायचे असेल तर वाचनाचा छंद लावून घेणे आवश्यक आहे. माणसाने नेहमी श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत होणे व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने किमान एक तास तरी वाचन करावे. आपण जे वाचन करत असतो ते वाचन आपण मन व मेंदू यांची स्थिरता कायम ठेवून वाचावे. असे वाचन केलेले कायम स्वरूपी स्मरणात राहते. नाहीतर भराभर वाचून साठत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षाप्रमाणे असते. मानवी जीवनाचे सार ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचन करावेच लागेल. म्हणूनच मानवाच्या जीवनात पुस्तकांना , ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मानवाला आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीवी करण्याचे हे कार्य ग्रंथच करत असतात. वाचनामुळे आपले जीवन जगण्याचे सामर्थ्य वाढते व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. वाचनामुळे आपल्या मनाची उदासीनता दूर होते. वाचनामुळे आपल्या भावभावनांना प्रतिसाद मिळतो. आणि आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. मनात उद्भवणार्या शंकांचे निरसन वाचनामुळे होते. मनुष्य जीवन जगत असताना एकाकी राहू शकत नाही. त्याला कोणाचा तरी सहवास हवासा वाटतो. अशा एकाकी' सहवासात त्या व्यक्तीने पुस्तक वाचनाचा छंद जोपासला तर त्याच्या उर्वरित आयुष्याचा काळ चांगल्यारितीने व्यतीत होतो. पुस्तक वाचण्याच्या छंदामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अधिकाधिक व्यापक गोष्टींची माहिती मिळते. मानवाच्या जीवनात वाचनास फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र व निवारा याची जशी गरज असते.तसेच ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे फार महत्त्वाचे आहे. आपले परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन फार आवश्यक आहे. वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. आणि ह्या ज्ञान प्राप्तीमुळे मनुष्य या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. ज्यांचे वाचन अधिकाधिक त्यांचे ज्ञान अधिक. माणसाला जगण्यासाठी अन्न जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व मन ,मेंदूसाठी वाचनाचे आहे . म्हणूनच म्हणते
*'वाचाल तर वाचाल'.*
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हदगाव जि. नांदेड.
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
*वाचनाचे महत्त्व*
*वाचनाने मिळते ज्ञान, दुर होते हो अज्ञान*
*याची ठेवा थोडी जाण, ज्याने वाढते तुमची शान*
वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धी अधिक वाढते. तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.त्याच बरोबर आपले जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपल्या ज्ञानामध्ये अधिक वाढ करण्यासाठी वाचन हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे. पूर्वीच्या काळी अन्य विषयांची पुस्तके मिळण्याची जागा म्हणजे – वाचनालय होय. आजच्या आधुनिक युगात सुद्धा वाचनालये विकसित आहेत. या वाचनालायत साहित्य, ग्रंथ, निबंध लेखन पुस्तक अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात.परंतु आज या पुस्तकांची जागा ही इंटरनेट ने घेतली आहे. आज ऑनलाईन साईट यामुळे अन्य विषयांवरील पुस्तके ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे.
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे. हे आपण सर्वच जाणतो; परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी हा लेखप्रपंच. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल.आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.
तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, “वाचाल तर वाचाल”. हे खरेच आहे.
वाचनाने शब्द संपत्ती वाढते वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.त्याचा उपयोग तो निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो.लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते.त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.
आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.
वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते.जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावतो.त्यांच्या विचारांशी आपण समरस होत असतो.आज महान लोक नसले तरी त्यांचे ग्रंथ आहेत,पुस्तके आहे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला अन्य पर्याय नाही अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.पुस्तके वाचून आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. मात्र काय वाचावे?हे फारच महत्वाचे आहे.जीवन घडवणारी पुस्तके आहेत तशी जीवन बिघडवणारी पुस्तकेसुद्धा आहेत.यासाठी आपले शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत युवक वाचतील तर देश वाचेल".
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. आपण सर्वजण शाळेत असल्यापासून वाचनाचे महत्त्व ऐकत आलो आहोत. कारण शाळेत शिक्षक नेहमी वाचन किती महत्वाच हे सांगत असतात.
जे लोक अन्य पुस्तकांचे वाचन करतात त्यांना अनेक फायदे देखील होते. मनुष्याजवळ असलेले ज्ञान हे त्याची फार मोठी शक्ती आहे. कारण याच शक्तीच्या साहाय्याने मानव हुशार व चपळ बनतो.वाचन केल्याने मेंदूला चालना मिळते आणि नवनवीन शब्दांमुळे त्याच्यामध्ये प्रगती होते.विविध विषयांची पुस्तके वाचल्यामुळे नवीन माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानात अधिक भर पडते.वाचनामुळे आपली शब्द संपत्ती वाढते.ज्याचा उपयोग आपण निबंध, लेखन आणि भाषणामध्ये करू शकतो.तसेच लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि कविता यांची या सर्वांविषयी माहिती मिळते. यामुळे आपल्या सामन्यात ज्ञानात भर पडते
वाचन हे आपल्या सर्वांसाठी अधिक उपयुक्त आहे. म्हणून आपण सर्वानी पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांना सुद्धा वाचायला सांगितली पाहिजेत. जेणेकरून आपली वाचन संस्कृती ही जपली जाईल.तसेच वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरित केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आवडत्या विषयापासून वाचनाची सुरुवात केली पाहिजे आणि वाचनाचा आनंद घेतला पाहिजे.
*नुसतेच वाचन नको आहे, वाचन पचनी पडले पाहिजे*
*केल्या वाचनाने जीवनही, वचनबद्ध घडले पाहिजे*
*डोक्या डोक्यात मनापासून, सद् विचारांची भरणा व्हावी*
*अन् न वाचणारांनी कसोसीने, वाचण्यासाठी प्रेरणा घ्यावी*
_______________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
'ए फ्रेंड इन नीड इस फ्रेंड इंडीड' या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र असे माणसाबाबत होते. परंतु त्याचा ग्रंथ हाच खरा मित्र असतो. तो त्याचाच खरा सखा सोबती असतो. 'वाचाल तर वाचाल' ही म्हण उगीच नाही म्हटली.प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो जसे पोस्टाची तिकिटे जमविणे, जुनी नाणी जमा करणे, चित्रकला, रंगकाम. परंतु वाचन हा छंद असणारी माणसे फार विरळाच. वाचन हा उत्तम छंद आहे. वाचनामुळे मनोरंजना- बरोबरच ज्ञानप्राप्तीही होते. वाचणाने वेळ खूप चांगला जातो. नवनव्या लोकांच्या लिखाणाची, विषयांची ओळख होते. लेखकाला भेटल्याचा आनंद मिळतो. संगणकाच्या युगात हीच पुस्तकेआपणास इंटरनेटवरही वाचायला मिळतात.
इंटरनेटवरही याची माहिती सखोल व सविस्तरपणे मिळते. बालपणीच वाचनाचा छंद लागणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजी आजोबा लहान मुलांना गोष्टी सांगत. घरातील ताई-दादा गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत. त्यामुळे मुलांना आपोआपच वाचनाची गोडी लागे. वाचनाने ज्ञान वाढण्यास मदत होई. पूर्वीच्या काळी गुरुजी वर्गात येण्यापूर्वी सर्व विषयांच्या पाठांचे वाचन झाले पाहिजे अशी त्यांची सक्त ताकीद असे. त्यामुळे प्रार्थना होताच मुले धडे वाचायला चालू करत. प्रत्येक जण एकेक पान असे वाचन सुरू करत. असे मोठ्याने वाचन करण्यामुळे उच्चार देखील सुधारत असत. सततच्या वाचनामुळे कविता नि धड्यांचे पाठांतरही होई.
वाचनामुळे माणूस विचार करू लागतो. पुस्तके वाचून आपले आपण जीवन नव्याने जगू शकतो. थोर स्वातंत्र्यसेनानी, उद्योजक, शास्त्रज्ञ, राज्यकर्ते यांची चरित्रे वाचून नवचैतन्य प्राप्त होते. आपण काहीतरी करावे अशी स्फूर्ती मिळते. संत साहित्याने जगण्याची नवी दिशा मिळते. अध्यात्मिक, भक्तीपर ग्रंथ मनःशांती देतात. वाचनामुळे मनुष्य बहुश्रुत होतो. संतांमुळे व्यवहार किंवा जगण्याची एक नवीन शिकवण मिळते. ग्रंथ आपल्याशी हितगूज करतात. आपण एकटे असलो, आजारी असलो, जवळ कोणी आपली जवळची व्यक्ती नसेल तर हे ग्रंथ आपल्या एकटेपणाची जाणीव दूर करतात.आपल्याशी सुखसंवाद साधतात. सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी आजारपणातच ग्रंथनिर्मिती केली होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुरुंगात असताना ग्रंथ हे त्यांचे सोबती होते. त्यांनी तुरुंगात राहूनच अचाट अशा ग्रंथांची निर्मिती केली. परिस्थितीशी झुंज देण्याची वेळ आली तर माणसाने ग्रंथरूपी सोबत्याची मदत घ्यावी. ग्रंथा सारखा दुसरा सोबती नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांच्या अभंगगाथा यासारखे ग्रंथ जीवनातील प्रत्येक वळणावर, चढ-उतारावर आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. जीवनातील प्रत्येक उपाय कोणत्या ना कोणत्या ग्रंथात आपल्याला पहावयास मिळतात. कधी मन दु:खी असेल तर तत्वज्ञानाचे ग्रंथ मनाला दिलासा देतात. मन आनंदी असेल तर हलक्याफुलक्या कविता नि कथा, कादंबऱ्या वाचताना त्या आनंदाला बहर येतो. विनोदी ग्रंथ मनाची मरगळ घालवायला मोलाची मदत करतात. संसाराला कंटाळून विजनवासात जाणारी मंडळी स्वतः- बरोबर ग्रंथ सोबत म्हणून घेऊन जातात. त्यामागे वेळेसही ग्रंथ हेच सोबती होय हेच कारण असावे.
ग्रंथ आपल्याला गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतात. कोपर्निकसला त्यांनीच मार्ग दाखवला रस्किनच्या ग्रंथांचे वाचन करताच बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले आणि त्याच क्षणी त्यांच्यातील महात्म्याचा अवतार उदयास आला. चरक, सुश्रुत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ग्रंथ आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरले आहेत. थोर व्यक्तींचे चरित्रग्रंथ ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करतात, आपणाला योग्य दिशा दाखवतात. हजारो पाकक्रिया, सुरुची, रुचिरा, अन्नपूर्णा यासारखे ग्रंथ गृहिणींना पाककला शिकवतात. खऱ्या सहचारिणी पेक्षा जवळच्या बनतात. एखादी पाकक्रिया बिघडली तरी सख्या हसतात, चेष्टा करतात. परंतु ग्रंथ त्याच्यावर नवीन पर्याय शोधून सांगतात. पु. ल. देशपांडे यांचे पूर्वरंग, अपूर्वाई यासारखे ग्रंथ काकासाहेब कालेलकर, गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथांच्या सहवासात आपल्याला जगाची सहल घडवते.ग्रंथांना आपण कसेही वागवले तरी ते आपल्याला दूजाभाव देत नाहीत. ते आपल्याला ज्ञानच पुरवत राहतात. चैतन्य, आनंद फुलवतात. म्हणून ग्रंथ हेच आपले खरे सोबती असतात. आणि वाचनाचा छंद आपणास आयुष्यभर आनंदच देऊन जातो.
सौ.भारती सावंत
मुंबई
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
. ...........वाचन....., ....... ....
वाचन हा मानवी जीवनातील विकासाचा महत्वाचा पाया आहे.वाचन संस्कृती म्हणजे मानवी विकासाच्या टप्याचे महत्वाचे पाऊल होय. ,"वाचन म्हणजे मनाला निर्मळ करणारा साबण होय"
वाचनामुळे मानवाच्या संकल्पना स्पष्ट होतात.गुंतागुंतीच्या संकल्पना सोडवण्यास मदत होतात.वाचनामुळे मन शुद्ध ,ताजे तवांणे राहते वाचनात अधबुत शक्ती आहे.डॉक्टर अब्दुल कलाम यांनी वाचनाचा छंद जोपासला होता.त्यातून त्यांनी छंद मर्यादित न ठेवता साकार वृत्ती जोपासली.आणि देशालाच नाही तर जगाला एक नवी दिशा प्राप्त करून दिली तेवढी मोठी ताकद वाचनात असते.डॉक्टर बाबासाहेब यांनी वाचनाचा छंद जोपासत अनेक डिग्र्या हस्तगत केल्या आणि देशाला संविधान मिळून दिले आज पूर्ण भारत देश संविधानाच्या चौकटीत राहून काम काज करत आहे.वाचनामुळे आपल्याला आपण ज्या लेखकाचे पुस्तक ,लेख ,विचार,वाचत असतो तेंव्हा त्या लेखकाने अंतःकरणाने लिहिलेले विचार असतात त्यांच्या संकल्पना आपण वाचत असतो .आपल्या विचारांचा आणि लेखकाच्या विचाराचा ताळमेळ बसवत असतो.तेंव्हा आपुलकी,प्रेम,व्यक्तिमत्व विकास या सद्भवणेचा विकास होत असतो.मला साक्षात आलेला अनुभव म्हणजे मी आठव्या वर्गात शिकत असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक लेख वाचला त्या लेखाचे नाव होते "आत्मविश्वासा पेक्षा दुसरी दैवी शक्ती नाही ,,," हा लेख सलून मध्ये कट्टींग झाल्या नंतर थोडासा वाचन करावं म्हणून वाचन करायला लागलो वाचनाची चुळबुळी शांत बसू देत नव्हती .आणि लेख पूर्ण वाचून काढला . लेख खूप सुंदर होता.लेखात खूप मोठं जीवनाचं सार होत .आणि एका लेखाने माझे आयुष्य बदलले . तेवढी मोठी ताकत वाचनात असते. म्हणून आपण आपल्या लहान मुलांना वाचनाची सवय लहान पानापासून लावायला हवी .पण लहान मुलांना ही सवय केंव्हा लागेल आई वडिलांना जर वाचनाचा छंद असेल तर.. पण अताची समोरच्या पिढीचे वाचन कमी होत चालले आहे आणि मुले मोबाईलच्या आंतरजाळात अडकली आहे त्या मुळे आजची मुले संकुचीत बुध्दीची होत आहेत.संस्करापासून दुरावत आहेत.मुलाचे ज्ञान जेवढे पुस्तक वाचनाने ज्ञान दृढ होते तेवढे ज्ञान मोबाईल मधून होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की तुमच्या जवळ दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या तो तुम्हाला. कसे जगायचे ते शिकवेल.व एक रुपयाची भाकर घ्या त्याने तुमचे पोट भरेल.त्यात शिक्षक ,प्राध्यापक,वकील,डॉक्टर या लोकांनी तर दररोज एक पुस्तक वाचायलाच हवे कारण हे लोक समाजाला दिशा देणारे स्त्रोत आहेत.वाचन मुळे ज्ञान प्राप्त होते .व समाज योग्य दिशेने वाटचाल करेल. प्रत्येक शाळेत वाचनालय हवे व वाचनालयात विविध प्रकारचे पुस्तक असायला हवे.व मुलांना वाचनाचा छंद शाळेपासूनच लावायला हवे.अब्दुल कलाम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की प्रत्येक मुलाला योग्य दिशा शाळेतून मिळत असते .म्हणून लहान मुलांना मोबाईल मध्ये न अटकावता वाचनाचा छंद लावायला हवा."वाचाल तर वाचाल" ही संस्कृती जोपासू या......,
जीवन खसावत भंडारा
9545246027
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
!!"वाचाल तर वाचाल "!!
ज्ञान दिल्याने वाढते न दिल्या स ते नष्ट होते हा संक्रमणाचा नियम आहे.
म्हणून ज्ञान दिले पाहिजे, ज्ञान देत असताना देणाराचे वाढते आणि घेणाराचे तर वाढतेच वाढते यात शंकाच नाही. पण ज्ञान देणारा ज्ञानी कसा या अवस्थेतवर अरूढ झाला हे पाहिले पाहिजे, तर या गोष्टीतील रहस्य वाचन या गोष्टी कडे येईल म्हणजे वाचनामुळेच संबंधित ज्ञानी मनुष्य आपणाला ज्ञान देत आहे असे सिद्ध होईल.
वाचनामुळे ज्ञान वाढते इथपर्यंत गोष्ट खरी आहे त्या मुळे मनुष्य ज्ञान संपादन करतो , तो कुशल बनतो या सर्व बाबी बहुतांशी लोकांना पटकन पटतात पण एखादा कुशाग्र बुद्धीचा मनुष्य शंका उपस्थित करीत असतो कि ज्ञान देणारा मनुष्य कधी कधी अंध असतो, कधी कधी निरक्षर असतो मग काय म्हणता.ज्ञान वाचनामुळे वाढते ते .
हा बरोबर आहे शंका आगदी रास्त गोष्ट आहे. तर या गोष्टीच शंकेचे उत्तर हे आहे कि वाचन म्हणजे नुसते स्वत:चे वाचन नसून दुसर्याचे वाचन अर्थपूर्ण ऐकणे म्हणजे सुद्धा वाचन होय.
मग अंध किंवा निरक्षर मनुष्य सुद्धा ऐकून वाचक आणि श्रोते दोन्ही भूमिका बजाऊ शकतात
आज पर्यंत अशी उदाहरणे आपण पाहिलेली ऐकलेली आहेत कि जे अजात अक्षर शञू असून सुद्धा किती तरी ग्रंथ संपता त्यांच्या मुखोद्गत आहेत, शिवाय किती तरी मोठी माणसं आपण पाहिली त्यांचे सर्व अध्यात्मिक भगवदगिता, ज्ञानेश्वरी,गाथा इ. पाठ आहे. हे त्यांना लाभलेल्या वाचन संस्कृतीचे फलित म्हणावे लागेल.
अशा प्रकारे वाचन आणि वाचन संस्कृती या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
आज मनुष्य आळशी बनत चालला आहे साधना, मेहनत घेण्याची तयारी तो विसरून चालला आहे. साध वाचन करणं जर मानवाला कंटाळवाणे वाटत असेल तर ही खूप मोठी खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.
मनुष्य जन्मत: ज्ञानी नसतो, देवावतारी महा पुरुष केवळ अपवाद म्हणून सोडले तर बाकी इतरांनी ज्ञान घेऊन च ज्ञान दिले पाहिजे हे तत्व जगला दिले. तेही एका ठिकाणी म्हणतात" भाष्यकारा ते मार्गू पुसित " याचा अर्थ असा कि शास्ञ वाचून पुढे लिहावे, बोलावे .
वाचन महत्त्वाचा भाग मानले जाते कारण वाचन सर्व अडचणी सोडवू शकतं. आजपर्यंत चा इतिहास सांगतो की वाचनामुळे जगाचा , पर्यायाने देशाचा विकास नक्कीच होऊ शकलेला आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकं वाचन केलं कि त्या वाचनामुळे एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना तयार केली. डॉक्टर आंबेडकर तासन् तास सारखे वाचन करायचे, त्यांच्या कडे किती तरी ग्रंथ , पुस्तके असायची.
त्यांनी जवळपास पन्नास हजार पुस्तकं वाचली. जगातील सर्व देशांच्या घटना वाचल्या, आणि त्या सर्वाहून वेगळी आपली राज्य घटना बनविली.
अशा या महान वाचकांना माझा प्रणाम!
जर वाचन नसते , तर ग्रंथ, पुस्तके या गोष्टी तयार करून ठेवण्यात काही अर्थ उरला नसता
म्हणून आपणास इतिहासातील कोणत्याही घटना, किर्ती समजली नसती. मानव मागिल घटनांचा परामर्ष घेऊन पुढे मार्ग क्रमण करत असतो. त्याला त्या सर्व गोष्टीचे आकलन वाचनामुळे होते.
आणि मग त्या योगे माणूस अपेक्षित बदल किंवा त्यातील बारकावे लक्षात घेतो.
म्हणजेच वाचन किंवा वाचन संस्कृती त्यावेळी आपले गुरू किंवा गाईड मार्गदर्शक बनतात.
साधं उदाहरण घ्या आपण रस्त्याने भरधाव वेगाने पुढे जात असू, त्या वेळी रस्त्याच्या कडेला आपल्याला मार्गदर्शनपर बोर्ड असतात "रस्ता वळणाचा आहे, वाहने हळू चालवा , " जर आपण वेळीच न लक्ष दिले , फलक वाचला नाही तर गोंधळ होऊ शकतो. येथे वाचाल तर वाचाल ही गोष्ट आगदी पटते.
आता आपण थोडसं गुरुजनांकडे वळू या शिक्षण देणे आणि घेणे ही अखंड आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे. येथे आता झाले सर्व असे नाही. मग शिक्षक कायमच विद्यार्थी असला पाहिजे, नविन ज्ञान, कल्पना, पद्धती त्याला माहिती पाहिजेत आणि त्या माहिती साठी फक्त वाचन आणि वाचनच पूरक आहे.म्हणून वाचाल तर वाचाल.
वाचन संस्कृती , वाचन प्रेम या गोष्टी मुळे आपल्याला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या सारखे नर रत्न मिळाले. विविध साहित्यिक मिळाले कथा कादंबरीकार मिळाले आपण वाचन केले किंवा वाचनास परावृत्त केले तरी त्यांना धन्य वाटेल. वाचनामुळे आपणाला मिळालेल्या अनुभवातून निश्चितच आपले आणि आपल्या देशाचे भले होईल आणि जीवन एका उंचीवर पोहोचेल म्हणून जरूर जरूर चांगले वाचन करा, आपण सर्व वाचन करूयात आणि समृद्ध बनूया. पुस्तकं हेच गुरू आणि तेच आपले तारक म्हणून " वाचाल तर वाचाल!
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
‘*वाचाल तर वाचाल*’
ही म्हण आजच्या घडीला ही तितकीच किती समर्पक आहे. वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय.
वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नव्हती पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. तरीही जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. असं कारण सांगितलं जातं. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे.
*लोकमान्यांनी* ‘_तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा_’ असा संदेश दिला आहे. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी दिला. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत गुंतल्यामुळे त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष नाही. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असतो आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितीज विस्तीर्ण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात.
वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो. त्या अनुषंगाने वाचन त्यांना मदत करू शकते.हे आपण सर्वच जाणतो परंतु आजच्या तरुण पिढीला याचं फारस महत्त्व वाटत नाही.मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.
वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुस-याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही करायला पाहिजे ही वृत्ती वाढीस लागते
आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे.ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे. मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत असलणारै आजच्या तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाचन संस्कृती जपण्याशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. तरुण पिढीने पुस्तक वाचन हा छंद जोपासला पाहिजे.
त्यासाठी सर्वात सोपा सहज आणि प्रत्येक पालकांनी करण्या सारखा उपाय म्हणजे लहानपणी मुलांना गोष्टी सांगायचा. हळुहळू गोष्टींचे पुस्तक वाचून दाखवायचे. त्यांना आपसुक रोज नवीन गोष्ट ऐकायची सवय लागते. त्यांना नवीन पुस्तके ऐकायची सवय लागते, आणि वाचता यायला लागले की ते नवीन विषयाची पुस्तके. वाचायला लागलात. त्यांना वाचायची गोडी लागते.मोठे झाल्यावर ही ते नियमितपणे वाचत राहतात.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर .
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
" वाचन : अंर्तमन विकासाची गुरूकिल्ली " [ 14 ]
" यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुपासयति !
तस्य दिवाकर किरणैर्नलिनी दलमिव विकास्यते बुद्धिः !! "
उपरोक्त संस्कृत सुभाषिताचा अर्थ हा वाचनाशी संलग्नित आहे . तो म्हणजे , " जो वाचन , लेखन व निरीक्षण करतो , शंकानिरसनासाठी प्रश्न विचारतो , प्रसंगी विद्वानांच्या सहवासात राहून त्यांची सेवाही करतो , त्याची बुद्धी सूर्यकिरणांनी कमळदळे उमलावीत तशी विकसित होत असते . " मानवी जीवनात जसे अन्न आवश्यक आहे . तसे वाचन हे मानवी मनाची भूक शमवून आयुष्य सार्थक करणारे एक अन्नच होय . म्हणून प्रत्येक मानवाला या वाचनरूपी अन्न सेवन केल्याने सुदृढ व निरोगी मनःप्राप्ती होते .
वाचन हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे . वाचनाने माणूस ज्ञानी होतो , आणि खरा ज्ञानी हा लोकांना तारतो . शिवाय तो बहुश्रुत व विवेकी होतो . नवनवीन साहित्य वाचून मानवाच्या सुंदर चारित्र्याची निर्मिती होते . तो विचारी बनतो .त्यामुळे अज्ञानाचे भ्रम नाहीसे होतात . वाचन मानवी मनपरिवर्तन करण्याचे एक प्रभावी साधन आहे . त्यामुळे आपोआपच वर्तन बदल घडून येते . चांगला माणूस निर्माण करून अवगुण सुधारावयाचा असेल तर प्रथम सवई व विचार यात आमुलाग्र बदल झाला पाहिजे . आणि तो केवळ या वाचनानेच होतो . श्यामची आई या पुस्तक वाचनाने बालमने सुसंस्कृत होतात . तर म. गांधी लिखीत सत्याचे प्रयोग या पुस्तक वाचनाने मानव हा सत्यमार्गी होतो . स्वा . सावरकरांच्या स्फूर्तीदायी काव्याने प्रत्येक नागरिकांच्या रक्तात देशभक्ती सळसळून वाहू लागते . कवी प्रदिप लिखीत " ए मेरे वतन के लोगो .... " या देशगीतांने देशवासीयांच्या मनात अमर हुतात्म्यांबद्दल कृतज्ञता निर्माण होऊन देशासाठी प्राणार्पणाची भावना निर्माण होते .
" काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् !
व्यसनेन च मूर्खाणां , निद्रया कलहेन वा !!
अर्थात बुद्धीवान माणसाचा वेळ काव्य , शास्त्रवाचन व विनोदात आनंदाने जातो पण मूर्खांचा वेळ व्यसनात , झोपेत वा भांडणात जातो . पहा हा फरक निर्माण करतो वाचन ... वाचनाने मानव प्रयत्नवादी होतो . परिणामी " मी सर्व काही करू शकतो " ही भावना वृद्धींगत होते . तोच मानव स्वतःच्या भाग्याचा शिल्पकार होतो . पर्यायाने देशहितेष्णू होतो . बालमनात वाचन चौकसवृत्ती निर्माण करून ज्ञानलालसा वाढवीते . वाचनातून येणारी एकाग्रता ही यशाची प्रथम पायरी चढणे सहज सुलभ होते .
वाचन हे अंर्तमनाचा सर्वांगीण विकास घडवून आणणारे एकमेव साधन होय . त्यामुळे नैतिक मूल्यांची रूजवात होऊन अंतःकरण समृद्ध होते . आत्मा व बुद्धी यांचा विकास होतो . अंगी शौर्य , संयम , विनम्रता , परहितसहिष्णूता , विवेक , सेवावृत्ती , देशप्रेम , त्यागवृत्ती , इ . सद्गुणांचा वर्षाव होतो .
" वाचतील रानेवने तर फुलतील मानवी जीवने "
वाचनामुळे मुक्त व निर्भय मनांच्या व्यक्ती निर्माण होतात . आत्मविश्वास व आत्मनिर्भयता येऊन मानव सामर्थ्यशाली होतो . मनाच्या कोर्या कागदावर श्रेष्ठ व्यक्तींचे अनुभवविश्व रेखांकित केल्या जाते . त्याच्या फलश्रृतीरूपात तो मानव आदर्श जीवनाकडे वाटचाल करतो . त्याचे मन उदार खंबीर होऊन मनगट बलशाही होतात .
" पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत सुखी व श्रीमंत असतो . त्याला वाचनाने समाधान व आनंद मिळतो . आणि ज्यांचा आनंद कायम टिकतो त्याला नित्य दिवाळीच असते . चला तर मग आपण सर्व मिळून ह्या दिवाळीच्या सणाचा निदान चार पाच पाने वाचून आनंद द्विगुणीत करूया . असे हे वाचन मनोरूपी हिरास पैलूच तर पाडण्याचे कार्य करते . आणि आंर्तमन दिव्य तेजाने आयुष्यभर प्रकाशीत करते ....
अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. ता. किनवट ,
जि. नांदेड , मो. क्र . 9552963376
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
एकच ध्यास ; वाचन विकास
शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही , याकडे सुद्धा लक्ष ठेवावे. कारण जी मुले अवांतर पुस्तकांचे वाचन करतात त्यांचाच अभ्यास पक्का असतो असा आजपर्यंतचा अनुभव सांगतो. परंतु आपण तसे न करता मुलांवर नेहमी अभ्यासाचे ओझे टाकीत असतो. फालतू वाचन करण्यात वेळ घालविण्यापेक्षा तेवढाच वेळ शाळेचा अभ्यास केलास तर चार-पाच मार्क जास्त पडतील ! असा उपदेश मुलांना प्रत्येक घरातून मिळत असतो. यातून आपण आपल्या मुलांना फक्त परीक्षार्थी बनवित नाही काय ? याशिवाय मुले जास्तीत जास्त वेळ वाचनात कसा घालावतील या दृष्टिकोनातून आपण कधी विचार केलाय का ? मुलांना अवांतर वाचन करता यावे यासाठी घरात वाचनासाठी उपयुक्त असा पुस्तकांचा साठा करावा. मुलांना पुस्तकालयाच्या ठिकाणी नेऊन त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडण्यास मदत करावी. लहान मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिक किंवा साप्ताहिक वृत्तपत्राचे वर्गणीदार व्हावे. यातून मुलांवर हळूहळू वाचन संस्कार होऊ शकतात. टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे पाहण्यापेक्षा पुस्तकातील रंगीत चित्रे पाहणे कधी ही चांगले. कारण टी.व्ही. किंवा मोबाईलवरील चित्रे मुलांना निर्बुद्ध, आळशी व अकार्यक्षम बनवू शकतात. तर पुस्तकातील चित्रे मुलांना नवप्रेरणा देतात, चेतना निर्माण करतात. त्यातून त्यांना काही तरी नवनिर्मिती करण्याची स्फूर्ती मिळते. वाचनातून मग मुलांच्या बुद्धीचा विकास होतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जर वाचनाचे वेड राहिले नसते तर ते महामानव बनूच शकले नसते आणि त्यांच्या हातून घटना निर्मितीचे एवढे महान कार्य घडले नसते. तासनतास ते ग्रंथालयात बसून वाचन करीत असत. त्यातूनच त्यांना नवीन ज्ञान मिळत होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे दिवसातून अठरा तास वाचन करीत असत. परंतु आज सर्वाना वाचन म्हटले की कंटाळा येतो. घरात मुलांना पुस्तकांचे वाचन करा असे म्हणण्यापूर्वी घरातील वडीलधारी मंडळीनी वाचन करणे आवश्यक आहे. रोज सकाळी आपल्या घरात येणाऱ्या वृत्तपत्राने मुले वाचनाकडे वळू शकतात. आपल्या घरी कमीतकमी दोन वृत्तपत्र नियमित यायला हवे. यामुळे नकळत मुले अवांतर वाचनाकडे जाऊ शकतात. अगदी सुरुवातीला तो चित्रेच पाहिल परंतु कालांतराने त्याला त्यातील मजकूर वाचण्याची आवड लागते. जो चांगल्या प्रकारे वाचन करतो त्याचीच प्रगती उत्तमप्रकारे होत असते. शाळेत आज अशी स्थिती बघायला मिळते की पाचव्या वर्गातील मुले दुसऱ्या वर्गातील पुस्तकांचे अस्खलित वाचन करू शकत नाहीत. याचे करणे अनेक असू शकतात. मात्र खरे कारण म्हणजे त्याच्या वाचनाकडे आजपर्यंत कोणी लक्षच दिले नाही. चांगल्या प्रकारे लिहू शकतो मात्र वाचताना अडखळतो, असे का ? याचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय काय ? अर्थात याचे उत्तर नाही असे येते. वाचन करता येत नसल्यामुळे मुलांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते आणि कालांतराने तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जातो. प्राथमिक शिक्षण चालू असतानाच त्या मुलांवर वेळीच उपचार झाल्यास मुलांची प्रगती शक्य आहे. प्रत्येक मूल शिकू शकते, वाचू शकते असा विश्वास जोपर्यंत शिक्षकांमध्ये तयार होत नाही तोपर्यंत त्या मुलांची प्रगती होऊ शकत नाही. शिक्षकांचा मुलांविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोनच मुलांना पुढे नेऊ शकते आणि नकारात्मक दृष्टिकोन आपणास प्रयत्न करायला सुरुवात करू देत नाही. एखाद्या मुलांना काय येते आणि काय येत नाही हे आपण आत्ताच ठरविता येत नाही. पण त्या मुलांना तो भाग समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीने सांगावे लागते. आजपर्यंत आपण प्राथमिक वर्गात महाविद्यालयाच्या व्याख्यान पद्धतीने सांगत आलो. गरज असणाऱ्या मुलांना आणि गरज नसणाऱ्या मुलांना सुद्धा तेच शिकवीत आलोत म्हणजे समानतेने शिकविलो. पण ज्याला अजून शिकविण्याची गरज आहे, ती त्याची गरज पूर्ण न करता पुढे जात राहिलो त्यामुळे तो मागे पडला, त्याला कधी तरी समतेने शिकविलो काय ? प्रत्येक शिक्षकांनी याचे स्वतः शी आत्मपरीक्षण करणे आज गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने यावर्षी इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील सर्व मुलांना अस्खलित वाचन करता यावे म्हणून साठ दिवसाचा मूलभूत वाचन विकास कार्यक्रम आणित आहे. ज्यात प्रत्येक मुलांची वाचन विकासाच्या आठ टप्प्यात विचार केला जाणार आहे. विद्यार्थी ज्या टप्प्यावर आहे तेथून त्या विद्यार्थ्यांचा वाचन कौशल्य विकसित करता येणार आहे. डॉक्टर ज्या प्रकारे एखाद्या रुग्णाची केस स्टडी करतो त्याचा धर्तीवर शिक्षक आत्ता मुलांची केस स्टडी करणार आहेत. सर्व शिक्षकांचा आत्ता एकच ध्यास लागलेला आहे ते म्हणजे वाचन विकास. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणूनच म्हटले आहे " वाचाल तर वाचाल "
- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
इंटरनेटच्या काळात वाचनाचा छंद जोपासुया
माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पुस्तक होय.माणसाला बालपणापासून घडवण्याचे काम संस्कार करतात.कुटुंबातून व शाळेतून उत्तम संस्कार मिळत असतात.असाच वाचनाचा संस्कार बालपणी आपले गुरुजी आपल्याला देतात.अ आ इ पासून ज्ञ पर्यंत आपली स्वर व व्यंजनाशी ओळख होते.हळूहळू आपण वाचायला शकतो. वाचनामुळे आयुष्यात किती मोठा फायदा होतो,ते त्या वयात कळत नाही.पण आपण वाचन करत जातो.हीच वाचनाची सवय माणसाला आयुष्याला समृद्ध बनवते. कारण प्रत्येक जण ज्या प्रकारचे वाचन करतो,त्यानुसार त्याचे विचार बनत जातात.विचारावर त्याचे आचरण घडत जाते.आचरणातून त्याचे कार्य घडत असते.म्हणून वाचनाची सवय ही प्रत्येकाला असलीच पाहिजे.वाचनामुळे माणूस किती मोठा होतो,याचे उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेत जायला लागले.त्या काळातील समाजाने अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना खूप छळले.यामध्ये वर्गातील विद्यार्थी सुद्धा मागे नव्हते.वर्गातील मुले बाबासाहेबांशी बोलत नसत.त्यांना जवळ बसू देत नसत. कुणी स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करत नव्हते.यातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाशी मैत्री झाली.याचा फायदा असा झाला की,याकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली.मिळेल ते पुस्तक त्यांनी वाचुन टाकले.यामुळे त्यांच्या ज्ञानात प्रचंड वाढ झाली.वाचनामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अठरा-अठरा तास अभ्यास करण्याची सवय लागली होती.वाचनामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले.आज संपूर्ण भारत देशात व देशाच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांचे विचार व कार्याची प्रेरणा घेतली जाते.म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे.वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. भारत देशाने विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगती केली.या प्रगतीचा प्रभाव थोडासा आजच्या तरुण पिढीवर विरुद्ध होताना दिसत आहे.त्याचे कारण असे की आजची तरुण पिढी मोबाईल व इंटरनेट मध्ये प्रचंड गुंतली आहे.आज प्रत्येक व्यक्तीकडे अत्याधुनिक मोबाईल आहे.त्यामुळे वाचनाची सवय हळूहळू कमी होत चालली आहे.कुटुंबातील संवाद कमी होत आहे.गप्पागोष्टी, संवाद,चर्चा होताना दिसत नाही.याचे कारण म्हणजे मोबाईल,इंटरनेट,टीव्ही, लॅपटॉप, वाट्सअप,फेसबुक,ट्विटर,यासारख्या गोष्टींचा अतिवापर होय.आजकाल वाचन सुद्धा मोबाईल वरच होऊ लागले. मोबाईल वर वेगवेगळ्या बातम्या कळतात.आपण त्याला वाचन समजु लागलो.वाचन हे साहित्य लेखनातील,पुस्तकी असायला पाहिजे.यामुळे वैचारिक पातळी अत्यंत चांगली होते.विचारांची देवाणघेवाण उत्तम होते.जुन्या काळात प्रत्येक जण न्यूज पेपर आवडीने वाचायचा.वाचनालयात जाऊन वाचन करायचा.अनेक कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह,प्रवास वर्णन,नाटक,संवाद पत्रिका,आवडीने वाचायचे.आज मात्र असे घडतांना दिसत नाही.वाचकांची संख्या फार कमी झाली.आपण पाहतो शिक्षणाची टप्पे पार करताना प्रत्येक जण वाचन करतो.अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी वाचन करतो.स्वतःची ध्येय साध्य झाले की, जो तो आपापल्या व्यवसायात,नोकरीत,काम धंद्यात स्थिरावतो.व हळूहळू वाचनापासून दूर होतो.माणसाला ज्याप्रमाणे शारीरिक वाढ व विकासासाठी उत्तम आहार व व्यायामाची गरज आहे.त्याप्रमाणे बौद्धिक विकासासाठी वाचनाची गरज आहे.वाचनामुळे मनुष्य आनंदी राहतो. माणसाच्या रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते.प्रत्येकाला लहानपणापासून वाचण्याची सवय लागावी यासाठी राज्यसरकारने 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सुरू केला आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो.डॉ.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून आपण सर्वजण नियमित वाचन करूया व इतरांना सुद्धा वाचनाची प्रेरणा देऊया.
राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा जि बुलडाणा
9823425852
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
वाचनाचे महत्व
सुधाकर रामदास पाटील, ठाणे
7798963063
वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वाचन सखोल होते. ग्रामीण भागात जन्माला येऊन केवळ स्वतःची चिकाटी आणि अहोरात्र वाचन या बळावर ते नावाड्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकले. त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
पुस्तके का वाचावीत? यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात. भगतसिंगला फाशी दिले जाणार होते. त्याच्या आदल्या रात्री भगतसिंग तुरुंगात एक पुस्तक वाचत बसले होते. तुरुंगाच्या बाहेर जेलर फेर्या मारत होता. न राहुन त्याने विचारले," अरे तुला तर उद्या फाशी देणार आहेत. मग या पुस्तक वाचण्याचा काय फायदा?" तेव्हा भगतसिंग म्हणाले, "माझ्या वाचनातून अनेक क्रांतिकारक जन्माला येतील". गांधीजी म्हणतात,' ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भुईसपाट'.
माझी मराठी भाषा ज्ञानाचे भांडार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,' माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन.
अनेक संत महात्म्यांनी माझी मराठी फुलवली आहे . अनेक साहित्यिकांनी ती समृद्ध केली आहे. अर्थातच हे साहित्य आजच्या पिढीने वाचणे गरजेचे आहे. भाषा कोणतीही असो , मग ती मराठी असेल, हिंदी असेल ,उर्दू असेल किंवा इंग्रजी असेल, प्रत्येक भाषेत समृद्ध साहित्य आहे. त्याचा रसास्वाद घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त वाचन करणे गरजेचे आहे. वाचनाने मनुष्य संस्कृत होतो, समृद्ध होतो, विचार प्रगल्भ होतात, भलेबुरे कळू लागते, संवेदना जागृत होतात ,देश हित कळू लागते, हे विश्वची माझे घर असा विशाल दृष्टिकोन तयार होतो, आयुर्वेदातील किंवा वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक माहिती ज्ञात होते, वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होतो. कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती, शैक्षणिक क्रांती , सामाजिक क्रांती माहिती होते. आमचा सामाईक सांस्कृतिक वारसा जोपासण्याची प्रेरणा मिळते. वाचनातूनच लिहिण्याची प्रेरणा मिळते आणि पुन्हा नवे नवे साहित्य तयार होत जाते. परिणामी आपली भाषा समृद्ध होत जाते.
दुर्दैवाने आज वाचनाचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसते. व्हाट्सअप ,फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरचे तोकडे वाचन निश्चितच पुरेसे नाही. यासाठी ग्रंथालयात जाऊन स्वतःचे पुस्तक घेऊन किंवा दुकानातून पुस्तक विकत घेऊन त्याचे वाचन करणे किंबहुना तशी सवय स्वतःला लावून घेणे काळाची गरज आहे. लेखकांना प्रोत्साहन देणे हे आपल्यासारख्या सजग वाचकांना सहज शक्य आहे .
ऑनलाइन किंवा पीडीएफ वाचन करणे शक्य असले तरी त्यामुळे मुद्रित साहित्य विकले जाणार नाही .
चला तर मग वाचनाचा ध्यास घेऊया ,उद्याची पिढी सक्षम बनवूया.
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~ छंद वाचनाचा
लोकमान्यांनी, '"तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा" असा संदेश दिला. "धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा", असा उपदेशही त्यांनी दिला. आजच्या जगात मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतो. त्याच्या कामावरही त्याचा प्रभाव पडतो.
वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करायला हवे. जगण्याच्या परिपूर्णतेने साठी वाचन आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे.
मला वाटतं, मला वाचनाची आवड माझ्या वडिलां मुळेच लागली असावी. आमच्याकडे छान पुस्तकांचे कपाट होते, ज्यामुळे घराची शोभा आणखीनच वाढली होती. त्यात बर्याच लेखकांची पुस्तके आपल्या ब्राऊन पेहरावात विराजमान झालेली होती. मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची थप्पी कायम टेबलावर असायची. माझ्या डोळ्यासमोर माझे वडील चष्मा लावलेले, तोंडात पानाचा बार लावून, आरामखुर्चीत बसून पुस्तक वाचत आहेत, असेच येतात. अगदी लहानपणी मी पऱ्यांच्या गोष्टी ज्यात राजकुमार चमत्कार करायचे. अशी पुस्तके वाचत असे. पण वडिलांच्या मार्गदर्शनामुळे माझी आवड बदलली. महान लोकांची चरित्रे मी वाचू लागले. स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर यांची पुस्तके मी अधाशासारखी वाचली. त्यामुळे माझ्या विचारांना वेगळी दिशा मिळाली. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी पुढे बदलली ती मात्र गीता वाचनामुळे.
जसजशी मी मोठी होत गेले तसतसे आपण काय वाचावे हे ठरवता आले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. त्या वाचनात सातत्य हवेच. वाचनाचा रियाज रोज हवा. वाचन नेहमी सकस असावे. ज्यात काही वेगळा दृष्टिकोन मांडलेला असतो असे वाचन केले पाहिजे. ज्यातून काहीतरी बुद्धीला खाद्य मिळेल असे सकस वाचन हवे. ते सतर्क पण हवे. ज्या वाचनाचा काही उपयोग नाही ते म्हणजे वेळ वाया घालवण्या सारखेच. वाचना बाबतीत आपण चोखंदळ असायला हवे. चौफेर वाचनाने आपल्या विचारांचे क्षितीज विस्तारते. काहीजण आनंदासाठी वाचतात. काही जण कुतूहलापोटी वाचतात. रमेश मंत्री म्हणतात तसे, 'वाचनात सुख, सुखासाठी वाचन असावे'.
आपले साहित्य प्रेम डोळस, सजग असायला हवे. त्याला चांगला स्तर असावा. अशा वाचनामुळे आपल्याला लिहिण्याची प्रेरणा मिळते. लेखनाच्या सर्जनशीलतेचा किंवा निर्मितीचा पाया आहे .
कुठल्याही विषयात जाऊन, कुठल्याही काळात जाऊन हवे असलेले पुस्तक मिळवून वाचन करू शकतो. वाचनामळे विचारांचा समतोल साधला जातो. नको असलेल्या विचारांचा कचरा बाहेर टाकू . वाचनास जात-पात-धर्म देश-विदेश कुठलीही सीमा नाही.
साहित्यामुळे जीवन उजळून निघते. सौंदर्याला सुगंध येतो तो साहित्यामुळे.
पुस्तक बाग इतकी प्रचंड मोठी आहे. त्यातली कितीही फुले खुडली तरी ती कमीच. वाचावे तेवढे कमीच. ही भावनाच माणसाला विनम्र करते.
मी कॉलेजात जाऊ लागले, तसे मला ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, गदिमा आवडू लागले . माझं वाचन एक दिशा घेऊ लागलं.
ना. सी. फडके यांनी शृंगारिक कादंबऱ्या मी वाचून काढल्या . वि.स. खांडेकरांची लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा, समाजहिताचा प्रचार, ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये मला खूप भावली. कुसुमाग्रजांची 'विशाखा' म्हणजे उच्चकोटीचे वैभव. 'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती.
नंतर रणजित देसाईंची 'स्वामी', शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय', विश्वास पाटीलांचे 'पानिपत' मी वाचले. विद्याधर पुंडलिक, स्नेहलता दसनूरकर, य.गो. जोशी असे कितीतरी नामवंत लेखकांना मी वाचत गेले.
ग.दि.मां.च्या कवितेतील ओळींनी माझ्या हृदयात खोल हात घातला आणि मी काव्याच्या प्रेमात पडले...
मग आवडतील तशा शांताबाई शेळके वाचल्या. त्यांची साधी सरळ मराठमोळी भाषा मनाचा ठाव घेते.
इंदिरा संतांची कविता अतिशय संवेदनशील. आपल्याच मनातले विचार जणू त्या मांडत आहेत असे वाटते.
मर्ढेकर, ग्रेस ही वाचले. पण ते फार पचनी पडले नाहीत. त्यांच्या कविता थोड्या अवघड वाटल्या, थोड्या गूढ वाटल्या. त्यावेळी त्या डोक्यावरून गेल्या.
अगदी अलीकडे प्रवीण दवणे, संदीप खरे वाचले. प्रवीण दवणे यांचे निसर्ग वर्णन नव्हे, ते चित्र असतं जणू. संदीप खरे यांच्या कविता विषय लहान पण विचार मोठा अशा असतात.
समीक्षाचे वाचन हेही सकस वाचन. त्यामुळे आपल्या लेखनाची प्रत सुधारण्यास खूप मदत होते.
प्रत्येक मनुष्य वेगवेगळी स्वप्ने पहात असतो. त्या स्वप्नांच्या अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला वाचन देते. आपल्या परिघा पलीकडचं जग पाहण्याची दिव्यदृष्टी केवळ वाचनामुळे लाभू शकते.
वाचनामुळे लक्ष किंवा मन एकाग्र करण्याची सवय अंगी जडते.
पुस्तकातील छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक प्रमाण अक्षरे. ती अक्षरे त्यापासून तयार झालेली वाक्ये सतत आपण मेंदूत साठवत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण अचूक शब्दांची छाया स्मृती म्हणजे फोटो मेमरी तयार होते. त्यामुळे नंतर कधीही चुकीचे किंवा प्रमाण शब्द वाचले की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषा ज्ञानाकडे घेऊन जातो.
आई-वडिल, शिक्षक यांच्याकडून बरेचदा काही गोष्टी मनावर थोपवल्या जातात. या जोखडातून मुक्तता होते ती वाचनामुळे. नीर-क्षीर विवेक म्हणतात तो वाचनामुळे येतो.
सुरुवातीला खरी वाचनाची आवड लागली ती पुलंच्या साहित्यामुळे. त्यांचे 'व्यक्ती आणि वल्ली' माझे आवडते पुस्तक. पुलंचे वाचन करताना ओठावर स्मित ठेवूनच आपण वाचतो.
वाचनामळे माझ्या संध्येला मस्त रंग भरले आहेत. खूप मजा येते. त्यामुळे मला आता पटले आहे की वाचन ही एक संस्कृती आहे. एक साधना आहे.त्यामुळे आत्मा उजळून तृप्त होतो.
माझे मन हल्लीच्या आधुनिक युगात एका बाबतीत साशंक आहे. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या युगात मुलांचे पुस्तकांचे आकर्षण कमी होत आहे का? वाचन संस्कृती कमी होते आहे का? वाचनाचे विषय बदलत आहेत का? वाचनाचा स्तर बदलत आहे का? पण ह्यावर खात्रीने मी असेच म्हणेन की वाचनाला पर्याय नाही. " वाचतो तो वाचतो."
शुभदा दीक्षित पुणे
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
(15) वाचनसंस्कृती जोपासणे मोठे आव्हान...
'वाचाल तर वाचाल' असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. मी शाळेत असतांना आमचे शिक्षक वाचन करण्याचे महत्व नेहमी सांगत असे. पण त्यांचे ते बोलणे तेव्हा पटत नव्हते. पण जसा-जसा मोठा होत गेलो तसा-तसा मी आपोआप पुस्तकांकडे खेचल्या गेलो. उन्हाळ्याच्या सुट्टया होत्या. आम्ही सगळे भावंडं मामाच्या गावाकडे आलो होतो तेव्हा माझ्या मावस बहिणीने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने "चंपक" नावाचे एक पुस्तक मला भेट म्हणून दिले होते. वर्षभर अभ्यास आणि ताईने पण पुस्तक दिलं म्हणून मी सुरुवातीला ताईवर रुसलो होतो. पण जेव्हा तिने ते पुस्तक बळजबरीने वाचायला लावले ते केव्हा वाचून पूर्ण झाले हे मलाच कळले नाही. आणि तेव्हा पासून खऱ्या अर्थाने वाचनाची आवड निर्माण झाली आणि पुस्तकांशी मैत्री झाली. आता सुद्धा सकाळी उठल्यावर हातात पेपर असल्याशिवाय चहा घ्यावासा वाटत नाही. रात्री जेवण झाल्यावर पुस्तकाचे एकतरी पान वाचल्याशिवाय शांतता मिळत नाही. वाचन करणाऱ्या व्यक्तींमध्ये मला एकसमान गुण आढळतो आणि तो गुण म्हणजे सहनशीलता, सामंजस्य, शांतता. जो व्यक्ती खरा वाचक असतो तो सहजासहजी राग किंवा द्वेष व्यक्त करत नाही. आणि हि येणारी पिढी सुद्धा संस्कारी, सुसंस्कृत, सहनशील निघावे यासाठी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेतील मुलांना आवर्जून पुस्तकेच भेट देतो. लग्नकार्यात गेलो, कुणाचा वाढदिवस असला तरी त्यांना पुस्तकच भेट म्हणून देतो.
भावी युवापिढी जोपासण्यासाठी वाचन सुंस्कृती जपणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण काही संकल्प करणे गरजेचे आहे. जसे....
थोर महापुरुषांची जयंती नाचून साजरी केल्यापेक्षा वाचून साजरी केली पाहिजे. वाढदिवस केक कापून साजरा करण्याऐवजी पुस्तके वाटून साजरा केला पाहिजे. दिवाळीला फटाके फोडून प्रदूषण केल्यापेक्षा दिवाळी अंक विकत घेऊन मेंदू तल्लख केला पाहिजेत. मंदिरे उभारून माणसांना जाती-जातीत विभागल्यापेक्षा गावा-गावात ग्रंथालये उभारली गेली पाहिजे. गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे. आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल.
गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~
पुस्तक माझ्या जीवनाचा सखा
पुस्तकेच आहेत खरे मित्र
एकाकीपणा आपला घालवतात.
दु:खातसुद्धा सुखाच्या,
राजमार्गाचा रस्ता दाखवतात.
खरे आहे हे.कारण पुस्तके आपल्याला योग्य रस्ता दाखवतात.माझ्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्त्व आहे. थोर साहित्यिक, मातृह्रदयी ,कवीमनाचा स्वतःच्या आईला साऱ्या जगात पोहचवणारे साने गुरुजींच्या शामची आई या पुस्तकाने माझ्या मनावर अधिराज्य केले आहे.मी कीतीतरी वेळा हे मातृप्रेमाचे महंन्मगल स्त्रोत असलेले पुस्तक वाचून काढले आहे.प्रत्येकवेळी डोळ्यात आसवांचा महापूर आलेला आहे.भावनेचा बांध फुटलाआहे.
गद्य, श्लोक,पद्य,बखर,कथा, कविता, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके आज आपल्याला पहायला मिळतात.या सर्व प्रकारच्या पुस्तकांची आज सर्वांनाच आवश्यकता आहे.पुस्तकाशिवाय आपल्याला कशाचेही ज्ञान कसे मिळणार?अज्ञानाच्या अंध:कारामध्ये गटांगळ्या खाणारी व्यक्ती ज्ञानाच्या प्रकाशात येण्यासाठी पुस्तकाचा आधार घेते.जर आपण आपल्या आयुष्यात स्वतःचे ज्ञान वाढववायचे असेल तर,आयुष्य समृद्ध करायचे असेल, आपले जीवन विकासाच्या वाटेकडे न्यायचे असेल तर आपल्याला पुस्तके नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असतात.जेव्हा आपण पुस्तके वाचतो त्यावेळी आपल्या मतांमध्ये फरक पडतो.सकारात्मक वा नकारात्मक विचारसरणी मनात आणण्यापूर्वी आपले मन रिकामे असते. पण पुस्तक वाचणानंतर आपला विचार बदलतो. पुस्तके वाचल्यास आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो.पुस्तके आपल्या मेंदूला ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन देतात.आपण आयुष्य जगताना पुस्तक आपल्याला काय चांगले आणि काय वाईट आहे याबद्दल माहिती देतात पुस्तकप्रेमी नेहमीच पुस्तकावर बोलतात.आपले जीवन एक संघर्षमय जीवन आहे.पुढे काय होईल?हे आपल्यालामाहित नसते पण जेंव्हा आपल्याला या संघर्षपूर्ण जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागतो, तेंव्हा त्या समस्येचपासून बचाव करण्यासाठी पुस्तके आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. पुस्तके आपले खरे मित्र आहेत. कारण जेव्हा आपण आनंदी असतो किंवा दु: खी असतो तेव्हा.सर्वप्रथम आपण आपल्या मित्रांना सांगतो. आणि आपल्या मनावरचे दडपण कमी करतो.त्याच प्रकारे पुस्तके देखील आपल्याला आनंद देतात.जेंव्हा आपण दुःखात असतो तेंव्हा आपले मन खूप उदास असते. अशा वेळी आपल्या हातात एखादे चांगले पुस्तक सापडले तर ते वाचल्यानंतर आपले मन हलके होते. एखाद्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या उदासी भावना बाहेर येतात.तो विचार करु लागतो.सारासार विचार केल्यानंतर त्याला योग्य दिशा सापडते.त्याच्या मनातील वाईट विचार बाहेर येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपण प्रसिद्ध यशस्वी लोकांच्या जीवनकथा वाचाव्यात.कारण तेंव्हाच आपल्याला कल्पना येते की या लोकांच्या जीवनात किती समस्या आल्या होत्या तरीही त्यांनी त्यांचा सतत सामना केला आणि शेवटी त्यांना यश, कीर्ती मिळाली.अशाचप्रकारे जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात उदासीनता येते आणि आपण दु:खी असतो , तेंव्हा आपल्या मनात एक नवीन आशा पुस्तकांच्यामुळेच जन्माला येते आणि आपल्याला नवीन कार्य करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे पुस्तकांच्यामुळे नेहमीच गौरवशाली जीवनाच्या महामार्गाचे दरवाजे उघडत असतात.
पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ते चांगले मार्गदर्शक आहेत.कारण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम वाचन करते. समाजात चांगले काय आहे, काय वाईट आहे, नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे हे आपल्याला वाचनानेच समजू शकते. आपल्या मनात चांगल्या, वाईट भावना कधी येतात हेदेखील आपल्याला ठाऊक नसते.पुस्तके समाजभावनांचे सामाजिक आरसे असतात.जेंव्हा जेंव्हा साहित्यिक, कवी त्यांचे लेखन करतात,तेंव्हा त्यांच्या वेळेस समाजात ज्या घटना घडतात त्या सर्वांचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो.तेच त्यांच्या लेखनात येत असते. कधीकधी ते परमानंदी असतात, तर कधी विचलित होतात ते त्यांच्या मनातील विचार त्यांच्या लेखनातून प्रकट करतात.दररोज जे काही घडते ते त्यांच्या लेखनातून पुस्तकात येते. त्याच बरोबर साहित्यिकांच्या मनाचे प्रतिबिंबही पुस्तकात दिसते.जेंव्हा एखादा साहित्यिक उदास मनाने बसलेला असतो आणि त्याची प्रतिभा जागृत होते, तेव्हा दु:खद भाव त्याच्या लिखाणात येतात. आणि उदास मनाची व्यक्ती जेंव्हा ते वाचते तेंव्हा त्याला ते स्वतःचेच दु:ख वाटते,आणि त्याला ते आवडते.त्याच्या मनाच्या भावनांचे प्रतिबिंब त्याला त्या पुस्तकात दिसते.आणि त्याला वाटते की माझेच दु:ख येथे व्यक्त केले गेले आहे.
आयुष्यातील बर्याच समस्या आपल्याला त्रास देतात. जर आपणास काही सुचत नसेल तर अशावेळी जर आपण पुस्तक वाचले तर आपले मन त्या पुस्तकांच्या विचारांमध्ये भटकत राहते. खरोखरच हा योग्य मार्ग आहे.कारण यामुळे तर आपले चंचल मन स्थिर होते आणि चांगले विचार करण्यास सुरवात करते.पुस्तक वाचणे फार महत्वाचे आहे. कारण पुस्तके शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात,आपल्या विचारांचे समर्थन करतात.म्हणून, प्रत्येक घरात ग्रंथालय व पुस्तकसंपत्ती असली पाहिजे.जर एखाद्यास एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा मनातील भावभावनांची आंदोलने चालली आहेत. अशावेळी पुस्तकांद्वारे आपला त्रास कमी करू शकतो. आपण बर्याच महान लोकांचे चरित्र पाहतो तेव्हा हे समजते की या लोकांना जीवनात पुस्तके वाचणे नेहमीच आवडत होते.त्यांनी खूप वाचनही केले आहे.अशा पुस्तकांमधून प्रेरित होऊन त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी स्वतःच त्यांचे जीवन एका पुस्तकात बंद केले जेणेकरुन ते वाचणाऱ्यांना,अनेक पिढ्यांमधील लोकांना प्रेरणा मिळेल.जेव्हा घरातील मोठी माणसे पुस्तके वाचतात, तेव्हा घरी असणारी छोटी मुलंही पुस्तके वाचण्यास सुरवात करतात.आजकालच्या मुलांचा बराचसा वेळ टीव्ही पाहण्यात किंवा मोबाइलवर गेम खेळण्यात घालवला जातो.त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.संवेदनशीलता नष्ट होत आहे.ही सवय त्यांना भविष्यात त्रास देणारी आहे.शाळेत शिक्षकांना व घरात पालकांनाहीया मुलांचा त्रास होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.पण जर मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण केली तर हे सर्व हळूहळू थांबेल.कारण पुस्तके मुलांना योग्य मार्ग दाखवतात.मुलांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव करुन देतात.आणि मुले अभ्यासामध्ये रस घेऊ लागतील.जेंव्हा आपण आपला,मुलांचा, घरच्यांचा वाढदिवस साजरा करतो,त्यावेळी आम्ही चॉकलेट व इतर वस्तू गिफ्ट म्हणून देतो.पण अशांवेळी जर आपण एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ती भेट नेहमीच आपल्याबरोबर राहते आणि चांगली माहिती देखील देते.माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही पुस्तकांची आवड होती.ते नेहमी पुस्तके वाचत असत.पुस्तकांवरील त्यांचे प्रेम पाहून सरकारने त्यांचा वाढदिवस " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.ही चांगली गोष्ट आहे.त्यादिवशी मुलांना सर्व शाळांमध्ये वाचायला सांगितले जाते, पुस्तकांविषयी माहिती दिली जाते, लोकांना पुस्तकांचे महत्त्व सांगितले जाते. ही सर्वांसाठी प्रेरणा आहे.जेंव्हा जेंव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळेल तेंव्हा आपण त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, आपले ज्ञान वाढविले पाहिजे.
मला आशा आहे की या पुस्तकाविषयी आपुलकी सर्वांच्या मनात रुजावी. आणि त्यांनी आपला मोकळा वेळ वाचनात घालवावा. जेणेकरून त्यांच्या मनात जे काही दुःख आहे,ते दूर होईल.हा आपला सखा नेहमी आपल्या बरोबर राहतो.सदैव प्रेरणा देत राहतो.
लेखिका श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जि. कोल्हापूर
9881862530
वाचन हे मनाचे खाद्य...
**********************
श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी.
(वाकदकर) 【17】
**********************
'वाचन' ही माणसाच्या मनाची शिदोरी असून ,वाचनाचा विचार माणसाच्या मनावर बिंबतो आणि त्यातूनच कृतीला चालना मिळते... देशातील प्रत्येक नागरिकाने वाचते राहिले पाहिजे...
'वाचाल तर वाचाल' हे मर्मवाक्य अगदी बालपणापासूनच कानपाठ झालेलं असेल,पण नेमकं आपण खरच वाचन करतो का? आणि वाचन करण्याची सवय आपल्याला आहे का? तशी संधी आपल्याला मिळते का ? याचं चिंतन प्रत्येक साक्षर व्यक्तीने करणे अपेक्षित आहे. सध्याच्या या इलेक्ट्रोनिक युगात अनेक प्रसारमाध्यमांचा झपाट्याने प्रसार होताना दिसतोय, प्रत्येक घरात टीवी,इंटरनेट तसेच प्रत्येक हातात मोबाईल सर्रास दृष्टीस पडतोय. यामधून वेळ काढून वाचन करणारे वाचक दुर्मिळच. एकदा का हातातील भ्रमणध्वनी ऊघडला की कित्येक तास त्यावर घालणारे महाभाग पुस्तक वाचा म्हटलं की तोंड पाडतात. तसंही थोडक्या वेळातील व्हिडीओ बघून त्यावरून बरच काही शिकवणारे टिकटोक सारखी अप्प्स मोबाईल वर उपलब्ध करून देण्याची स्पर्धाच सध्या इलेक्ट्रोनिक माध्यमांत दिसून येत आहे. तरीसुद्धा पुस्तकातून मिळणारे लेखकाचे विचार,त्याची भाषाशैली, लेखकाची समरसता या गोष्टीला मात्र पर्याय मिळूच शकत नाही हे वाचकांनाच पटेल.
खेळणाऱ्या, मोबाईल ,टीवी पाहणाऱ्या मुलांना "चला रे बस करा आता,घ्या पुस्तक आणि करा अभ्यास" असे म्हणणारे पालक आपल्या पाल्यांदेखत कधी पुस्तक वाचत बसतात का? हा विचार पालकांनी करावा. एका घरात जेव्हा पालक, आई ,आजोबा पुस्तक,वर्तमानपत्र वाचतांना लहान मुलाला दिसते;त्यावेळी ते अज्ञानी बालक सुद्धा आपल्या हातात काहीतरी धरून वाचत असल्याचा आव आणतांना दृष्टीस पडते. याचा अर्थ थोरामोठ्यांनी अगोदर करावे आणि मग फक्त पहावे.. कदाचित त्यांना सांगण्याची गरजच पडनार नाही. प्रत्यक व्यक्तीने आपल्या पाल्यांना आवडत्या विषयाचा अभ्यास करून त्यावर आधारित पुस्तके जर घरात उपलब्ध करून दिली तर नक्कीच पाल्य त्याचे वाचन करेल. खेळ, चित्रपट,पाककला, शेती,विज्ञान,तंत्रज्ञान, आध्यात्म आणि एकंदरीत सगळ्याच विषयाची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. याचा पुरेपूर वापर करत लग्नसमारंभ,वाढदिवस, भेटीगाठी या कार्यक्रमांत आवर्जून एखादे पुस्तक भेट म्हणून देण्याचा पायंडा पाडवा.
याच्याही पुढे जाऊन संगणकावर उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या वेबसाईट आवर्जून पाल्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वाचनात वाचकाच्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत परंतु ते त्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वाचतांना मात्र आपले योग्य विचाराचे असल्याचे वाचकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने ठरविणे गरजेचे आहे अन्यथा सध्यस्थितीत अनेक कुविचारी, अश्लील, अराजक साहित्य सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.
"पुस्तकाचे गाव भिलार' या गावाची संकल्पना प्रत्यक गावात समजुतीने रुजविण्याचा प्रयत्न व्हावा. ग्रामपंचायतीने आपल्या गावत आदर्श वाचनालय,ग्रंथालय निर्माण करून त्यामध्ये गावातील शेतकऱ्यांसाठी कृषी,मत्स्य,कुकुटपालन, विविध लघुउद्योग यावर आधारित साप्ताहिके,मासिके उपलब्ध करून द्यावीत. महिलांसाठी पाककला, क्रांतिकारी महिलांची जीवन चरित्र , पारंपारिक गीते,लोककला जोपासणारी पुस्तके येथे उपलब्ध व्हावी,याशिवाय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, शोध निबंध,विविध प्रयोग,खेळ यावर आधारित पुस्तके तर अनेक कथा, कादंबऱ्या ,प्रवासवर्णने ,नाटके खेड्यातील वाचकांना उपलब्ध करून दिल्यास नक्कीच वाचकांची संख्या वाढून वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हायला सुरवात होईल.
वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळते, नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो. लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते. त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.
आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.
शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन योग्य पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत.गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे.आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल.
वाचनातून माणूस विचार संपन्न होण्यास मदत होते, वाचण्याने जगातील विचार समजून घेऊन आपल्या जीवनक्रमात त्याचे प्रतिबिंब दिसून येते.शरीराला जशी अन्नाची गरज यशाचं मनाला विचारांची गरज असते आणि हे विचार नक्कीच चांगल्या वाचनातून मिळवता येतात. वाचनाने मनाची भूक पूर्ण होते आणि वाढते सुद्धा! एकदा वाचनाची सवय जडली तर सतत वृद्धिंगत होत जाते आणि मग चांगल्या वाचनातून माणूस घडायला वेळ लागत नाही. शेवटी वाचाल तर वाचाल!!!!!!!
- श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी. (वाकदकर)
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
एक पाऊल वाचन समृद्धीकडे
भारतातील ज्ञानी समृद्ध मनुष्य कोण ?असा प्रश्न विचारल्यास आपल्यापुढे नाव येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचे. का बर आपण त्यांना ज्ञानी बुद्धिमान असे म्हणतो त्याचे कारण म्हणजे त्यांचे अफाट वाचन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे अब्दुल कलाम दिवसातील अठरा-अठरा तास वाचन करीत असत. डॉक्टर आंबेडकर परदेशात असताना लायब्ररीत बसून 18 तास वाचत असत. बसल्यानंतर पुन्हा उठून जेवायला गेलो तर वेळ जाईल म्हणून लायब्ररीच्या पुस्तकात पाव ठेवून तोच खात असत म्हणजे वाचनाची भूक भागवण्यासाठी त्यांनी पोटाची भूक मात्र कमी केली होती किती हा त्याग वाचण्यासाठी .वाचनाने मनुष्य घडतो तसे आंबेडकर घडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील पन्नास हजार पुस्तके वाचली होती .त्यांचे वाचन उत्तम होते म्हणूनच ते एक उत्तम लेखकही झाले. भारताचे संविधान त्यांनी लिहिले ते अफाट वाचनाच्या सामर्थ्यावर. डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस तर आपण वाचन दिवस म्हणून साजरा करतो त्यानिमित्ताने पुस्तके वाचण्यास आपण विद्यार्थ्यांना देतो आणि स्वतःही वाचतो.
मला आठवतंय लहान असताना वडील वर्तमानपत्र आणत असत. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा साप्ताहिक देखील घेत असत. दिवाळीच्या सुट्टीत भरपूर दिवाळी अंक आम्हाला वाचण्यास मिळत असत. मला आठवते माझ्या वाढदिवसाला त्यांनी मी इयत्ता तिसरीत असताना चतुर बिरबल हे पुस्तक भेट दिले होते हे पुस्तक जवळ जवळ मी वीस वर्ष जपून ठेवले त्यानंतर मी ते मी एका शाळेच्या वाचनालयाला दिले. त्यावेळी फार काही कपडे किंवा चैनीच्या वस्तू घ्याव्यात असं वडिलांनाही वाटत नव्हतं त्याचा फायदा आम्हाला आज होतो आहे. आज आम्ही वाचनाने समृद्ध झालो म्हणून लेखनही करू शकतो ;आणि हाच वारसा आमच्या मुलांना देऊ शकतो. खरंच किती समृद्ध वारसा दिला आहे आपल्याला आपल्या आई वडिलांनी आणि तोच वारसा देतोय आपण आपल्या पुढच्या पिढीला.
आम्ही लहान असताना आमचे आजोबा आमच्या आजीला गीता ग्रंथ वाचन करून दाखवत असत; आणि त्यातील कोणत्याही अध्यायाचे अर्थही सांगत असत, आम्ही अवतीभवती खेळत असायचो .कधीकधी आजोबा आम्हाला बसवायचे आणि वाचन करायला सांगायचे .यातूनच आम्हाला वाचनाची गोडी लागली. लहानपणी आजी आम्हाला किर्तनाला , प्रवचनाला नेत असे . तिथे महाराज लोक काही काही उदाहरणं देत, काही संस्कृत श्लोक सांगत असत , त्यांचे अर्थ सांगत असत ,आम्ही आजीला विचारायचो हे कसे काय सांगतात हे यांना कसे जमते आजी म्हणायची ते मोठी पुस्तके वाचतात आणि म्हणून आपल्याला एवढे छान ज्ञान देऊ शकतात .लहानपणी माझे वडील वर्तमानपत्रातील 'सुविचारधन' म्हणून कात्रणे कापून ठेवत आजही त्यांची फाईल तशीच आहे त्यांच्या नातवंडांना ते प्रेरणा देतात. माझ्या मुलालाही नवनवीन गोष्टी ऐकण्याची खूप आवड आहे.
माझी मुलगी लहान असतानाचा हा एक किस्सा मला आठवतोय तिचे वडील वर्तमानपत्र वाचायचे; आणि ती अवतीभोवती दुडू दुडू धावायची मध्येच विचारायची तुम्ही काय वाचता मला सांगा. मग तिचे पप्पा वर्तमानपत्रातील एखादी बातमी वाचून दाखवत असत ते काही तिला समजले नाही ,कळले नसेल मग तिने पेपर मधील सर्वात मोठ्या शब्दावर बोट ठेवले .पेपर मधला सगळ्यात मोठा शब्द म्हणजे पेपरचे नाव तिला दिसले. ती पप्पांना म्हणाली, याला काय म्हणतात पप्पा म्हणाले 'सकाळ'. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पेपर आल्यानंतर ती घरात सर्वांना सांगू लागली मला पेपर वाचता येतो .आजोबा म्हणाले वाच बरे मग , तशी ती म्हणाली हे बघा हे नाव मी वाचते 'सकाळ' आणि तिने वाचलेला पहिला शब्द आठवून आम्ही सगळे आजही हसतो.
आज आजूबाजूला मोबाईल, टीव्ही ,इंटरनेट यामुळे वाचन संस्कृती कमी होते असे आपल्याला वाटते का? नाही वाचन संस्कृती जपणे हे तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या हातात आहे .आपण जसे वागतो मुले तसेच अनुकरण करतात; म्हणजेच आपल्याला पुढच्या पिढीवर संस्कार करायचे असतील तर आपल्याला प्रथम तसे वागायला हवे तुम्ही मोबाईल मध्ये फेसबुक,व्हाट्सउपवर आलेले उत्तम लेख, कथा,निबंध जर मुलांना वाचून दाखवले तर मुलांनाही वाचनाची गोडी नक्कीच लागेल. आज आपण वाढदिवसानिमित्त अनेक भेटवस्तू वाटतो त्यात पुस्तकांचा समावेश केला तर! लग्न समारंभात साड्या ऐवजी पुस्तके भेट म्हणून दिली तर! शाळेमध्ये देखील मुले वाढदिवसानिमित्त पुस्तके वाचनालयासाठी भेट देऊ शकतात. काही जणांचा असा समज आहे पुस्तके वाचायची म्हणजे खूप पैसे खर्च करायचे आणि एकदा पुस्तक वाचून झाले की काय मग त्याची किंमत? कशाला पुस्तकासाठी खर्च करायचा परंतु विचार केला तर असे दिसेल एका साडी साठी किंवा एका ड्रेस साठी आपण हजार रुपये घालू शकतो याचं हजार रुपयांची आपण पुस्तके घेतली तर त्याचा उपयोग आपल्या एकट्याला न होता घरातील सर्वांना होतो .घरातील सर्वांची वाचन झाल्यावर आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना ही पुस्तके वाचायला देऊ शकतो; म्हणजे वाचनाने समृद्धी आणि ज्ञान आपण सहज वाटू शकतो.
पाडव्याला पती आपल्या पत्नीला एक पुस्तक भेट देऊ शकतो. भाऊबीजेला भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून एक पुस्तक देऊ शकतो. काहींचे म्हणणे असते ,धकाधकीच्या जीवनात कुठे आहे वेळ पुस्तक वाचायला? परंतु "आवड असली की सवड मिळते" असे म्हटले जाते. रात्री झोपण्यापूर्वी दोन दोन पाने वाचली तरीही आठवडाभरात आपले एक पुस्तक वाचून नक्की होऊ शकते. आपण पैशांच्या भिशी करतो तसेच पुस्तकांची भिशी केली तर नक्कीच सर्वजण पुस्तकांच्या रुपात श्रीमंत होतील. ऐतिहासिक ,सामाजिक ,विनोदि, अध्यात्मिक ,काल्पनिक कादंबरी, पाककला ,वैज्ञानिक संशोधन अशा कितीतरी विषयांवरची पुस्तके आज उपलब्ध आहेत लहान मुलांना आपण गोष्टीचे पुस्तके भेट दिली तर त्यांनाही आपोआप वाचनाची सवय लागते शाळेतील मुलांना तर त्यांच्या शाळेतील वाचनालये म्हणजे एक पर्वणीच असते.
सुदृढ शरीरासाठी व्यायाम ,उत्तम आहार गरजेचा असतो, तसेच उत्तम मनासाठी देखील बुद्धीला खाद्य म्हणून वाचन आणि लेखन या गोष्टींची आवश्यकता असते. "रिकामं मन हे शैतानाच घर असतं ".असं म्हणतात. मन रिकामं राहिलं त्याच्यावर वाचन संस्कार झाले नाहीत तर ;व्यसन, भांडण, मारामारी ,इतरांची कुचेष्टा ,इतरांनाही सतत नावे ठेवणे, इतरांचा अपमान करणे , विध्वंसक कृत्य करणे अशा गोष्टी मनुष्याच्या हातून नकळत घडत जातात परंतु मनावर वाचनाचे, चिंतनाचे ,मननाचे लेखनाचे संस्कार झाले तर हातून विध्वंसक कृत्ये होणार नाही इतरांच्या दुःखाची जाणीव होते, समाजासाठी आपण काहीतरी चांगले करावे ही वृत्ती मनामध्ये निर्माण होते ,त्यानुसार मग आपली कृती घडत चालते. विद्यार्थी, गृहिणी, व्यवसायिक, संशोधक, शेतीच्य आधुनिक पद्धती जाणून घेण्यासाठी शेतकरी ,नोकरदार यांना आपले ज्ञान अद्ययावत ठेवायचे असेल तर वाचन हा चांगला मार्ग आहे .'आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार 'असे म्हटले जाते ;त्याचप्रमाणे वाचन केले नाही 'तो विषय समजला नाही तर आपण अज्ञानी राहतो व आपलेच नुकसान होते. पुस्तक हा असा मित्र आहे जो आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतो, जीवनाची दुःखद वाट सुखद करतो आपला मित्र राहतो, आपल्याला विचारी व विवेकी बनवतो."वाचाल तर वाचाल" असे उगीच म्हटलेले नाही ! चला तर मग वाचनासाठी रोज थोडा वेळ देऊया आणि जीवन समृद्ध बनवूया.
सविता साळुंके ,श्रीरामपूर कोड नंबर 13
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
"वाचन" ..
"वाचाल तर वाचाल "ही म्हण आपण ब-याच वेळा ऐकली असेल याचे कारण हे किती महत्वाचे आहे त्या तीन शब्दातच आपणास कळते.वाचनाचे महत्व अपार आहे.वाचनाने आपल्या ज्ञानात भर पड़ते.आपली वाचनाने कल्पना शक्ती वाढते.वाचन हे ज्ञान संग्रह करण्याचे महत्वाचे साधन आहे. वाचनामळे आपले मश कायम तरूण राहते. वाचनामुळे आपण इतरापेक्षा नेहमी एक पाऊल पुढेच टाकत असतो.आपणास जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर आपणास वाचणाची आवड निर्माण करावीच लागेल.आपली बुध्दी विकसीत करण्यासाठी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. वाचन आपला ताण कमी करते.जगण्यासाठी पोटाला जशी अन्नाची गरज असते तसेच वाचन हे आपल्या मेंदू चे एक प्रकारे अन्नच आहे.वाचनाच्या सवयीमुळे आपण वेगवेगळी पुस्तके वाचली पाहिजेत पुस्तकतील प्रत्येक पानातून ज्ञान मिळत असते.वाचनाच्या छंदामुळे एखाद्याचे एखाध्या पुस्तकामुळे आयुष्य घडत असते. तर वाचना मुळेच केवळ पुस्तकातील एक पान सुध्दा माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळू शकते.नव्हे तर वाचनामुळे पुस्तकातील केवळ एका विचाराने एखाद्याचे आयुष्य घडत असते. आज पर्यंत जे जे थोर विभूति होवून गेलेल्या आहेत त्या केवळ त्यांच्या वाचनाच्या सवयीमुळे हे विसरून चालणार नाही.डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर केवळ १८-१८ तास सलग वाचन करीत होते त्यामुळेच त्यानी आपल्या देशाचे संविधान लिहू शकले हा वाचनाच्या सवयी मुळेच होऊ शकले हे नाकारता येणार नाही.वाचनाची सवय असणारी व्यक्ती कायम आनंदी असते. किती हि मोठ मोठी संकटे आली तर ते सहज त्या संकटाचा सामना करु शकतात.ते कधीहि नाराज नसतात.वाचनाच्या सवयी मुळे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गितारहस्य नावाचा ग्रंथ लिहछ शकले. आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ आक्टोंबर हा जन्मदिन हा गेल्या चार वर्षापासून "वाचन प्रेरणा दिन"म्हणून प्रत्येक शाळा मधून साजरा केला जात असतो.या दिवशी फक्त विध्यार्थी वाचन करतात.शाळेतील ग्रंथालयातून वेगवेगळी पुस्तके त्या दिवशी वाचनासाठी दिली जातात.एवढे वाचनाचे आगळे वेगळे महत्व आहे.ग्रंथ हे आपले गुरु आहेत.आपल्या साहित्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार कथा,कविता,कांदबरी,पोवाडे, लावणी,ललीत साहित्य आहे. यापुढे कोणाचा वाढदिवस असेल त्यावेळी.वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी भेट वस्तू म्हणून पुस्तकेच दिली पाहिजेत.शासनाने प्रत्येक गावी ग्रंथालय बांधली पाहिजेत जेणे करून सर्व नागरीकांची वाचनाची आवड निर्माण होईल.आज ताजी बातमी वाचण्यासाठी हवी असेल तर वर्तमान पत्रे गावोगावी ग्रंथालयात वाचण्यासाठी ठेवली पाहिजेत.याशिवाय वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचण्यासाठी ठेवली तर वाचकांची संख्या वाढलेली आपणास दिसेल.महात्मा फुले याना वाचनाची आवड़ होती त्यामुळेच त्यानी "थामस पेन"यांचे पुस्तक वाचून त्याना समाजसेवेची आवड़ निर्माण झाली.
डॉ. ए.पी.जे.कलाम वाचनाचे महत्व सांगताना म्हणतात एकादे एकच चांगले पुस्तक हे शंभर चांगल्या मित्रांची बरोबरी करू शकते.एवढे महत्व पुस्तक वाचनाचे आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकच आदेश " नाचून मोठे होऊ नका तळ वाचून मोठे व्हा.माझ्या नावाचा जय जय कार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहिलेले काम प्राण पणाने पुर्ण करा.जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाणःयाचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल...तळ पुस्तक जगण्याची कला शिकवेल."हे एवढे वाचनाचे महत्व आहे.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेलेले होते पण ते केवळ दुस-या कडून दुकानाचे फलक वाचून घेत असत.वाचून वाचून पुढे लिहण्यास शिकले. ही वाचणाची ताकत असते त्यांनीच पुढे कथा, कांदब-या, लिहल्या केवळ वाचनामुळेच.प्रत्येक भारतीय नागरिकांनी केवळ टी.व्ही. मालिका व मोबाईल खेळत बसण्यापेक्षा आपण वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे तर आणि तरच "आपल मस्तक वाचून सशक्त" झाल्या शिवाय राहणार नाही.म्हणूनच आपण सगळीकडे ऐकलेले आहे"वाचाल तर वाचाल" .......लेखक/कवी- जी.एस.कुचेकर-पाटील.भुईंज ता.वाई जि.सातारा.मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
वाचनाचे महत्व
"वाचेल तो वाचेल" या उक्तीप्रमाणे वाचन हे महत्वाचे आहे,ती निरंतर काळाची गरज आहे,वाचनामुळे डोके सुधारते,चार लोकांत बुद्धी पाझरता येते,पूर्वी बरेच लोक अशिक्षित होते,त्यामुळे वाचनाचे इतके महत्व लोकांना वाटत नव्हते,परंतु आता वाचन कला सर्वाना अवगत असल्याने,त्याचे महत्वही लक्षत ठेवून वाचन केले जाते.
उदाहरण दयायचे झाले तर, एखादा विदयार्थी नियमानुसार पास तर होतोय परंतु,त्याचे वाचन कसा करतो,यावर त्याची बुद्धिमत्ता समजते,इतक्या मोठया संख्येने वाचक निर्माण झालेत,म्हणूनच वर्तमानपत्रे,कथा,कादंबऱ्या,पुस्तके दिवसेंदिवस छापली जात आहेत.माणसाच्या बुद्धिमतेत वाढ झाली आहे,सुजाण नागरिक तयार झालेत.
मल्टि मीडिया हे देखील अशीच कामे करत आहेत, मोबाईल हा सवंगडी असल्याने त्यावर येणारे मेसेज आवर्जून वाचले जातात,लहान वयात वाचन चांगले व्हावे,म्हणून शाळेत असताना विवीध वाचन पद्धती अवलंबिल्या जातात,स्पर्धा घेतल्या जातात,प्रत्येकाला वाचनामुळे आपले हक्क,कर्तव्ये याची माहिती आहे,नसली तरी वाचून त्याचा उपयोग केला जातो.
वाचन एक असे माध्यम आहे,की त्याने समूहाला शिक्षित करता येते,त्याचे उदाहरण स्त्री शिक्षणाचा पाया सावित्री माऊलीने घातला,आणि त्यामुळे एक स्त्री शकली की साऱ्या कुटुंबाला साक्षर करते,असेच केले तर बरेच लोक वाचन करून वाचतील,वाचतील म्हणजे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल,.
जो वाचेल तो शिकेल,वाचन असेल तो कोणत्याही क्षेत्रात टिकेल,फक्त सर्टिफिकेट मिळवणे,इतकेच नव्हे तर वाचन महत्वाचे आहे,आणि वाचन ही क्रिया आयुष्यभर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
सुजाता जाधव नवी मुंबई
~~~~~~~~~~~~★~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें