*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- तेहतिसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 21 मे 2020 गुरूवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- बचत*
( जल, विद्युत, पैसा व इतर )
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*बचतीने भविष्य घडवा*
आजच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन जीवन एक
लढाई झाली आहे.जीवघेण्या स्पर्धेत सर्वांनाच सहभागी व्हावं वाटतंय, आणि त्यात सहभागी होण्याशिवाय काही पर्यायही उरत नाही. कारण थांबला तो संपला हे माहितच आहे. तरीही पैसा हे सर्वस्व नाही पण पैशाशिवाय कांही होत नाही. असंच चित्र सर्वत्र दिसून येतं. आणि मग माणूस धावत सुटतो सतत आणि सतत पैशाच्या मागं. आगदी न थांबता न थकता. पण मर्यादा असतेच कुठंनं कुठं थांबावंच लागतं. थांबतो तेव्हा बरंच पाणी वाहून गेल्यालं असतं. आता सारं कळत असतं पण त्याचा कांही उपयोग नसतो. पैसा कमवण्याच्या नादात स्वास्थ हरवून माणूस कमावलेला पैसा पुन्हा आरोग्य मिळविण्यासाठी दवाखान्यात घालवतो. पण उज्वल भविष्यासाठी कमावणे आणि काटकसरीत जीवन जगणे हे आपल्या हातात आणि आवाक्यात असताना नेमकं माणूस या उलट वागून अनेक संकटं निर्माण करून घेतो. आपणास अधिक पैसा मिळू लागला की त्याला अनेक वाटाही असतात. अर्थात पैसा हा जर कष्टाचा असेल तर व्यवहार आणि गरजा भागवण्या करिता त्याला वाटा फुटत राहतात, पण पैसा कष्टाचा नसेल आणि तो मिळत राहिला तर त्याच्या फुटणाऱ्या वाटा या फारच वेगळ्या स्वरूपाच्या असतात अर्थात व्यसनाच्या मुक्कामी नेणाऱ्या त्या वाटा असतात. म्हणून आपण गरजे पुरतं कमावून
काटकसरीत जीवन जगत भविष्य हिरवळमय आणि
समृद्ध करण्यासाठी बचतीचा मार्ग अवलंबीने आवश्यक आहे.बचतीतून समृद्धीकडेच मार्ग जातो. हे ज्याला ओळखता येते. ते या आणि याच मार्गाने चालतात. पैसा पैसा करून जमवलेली पुंजी भविष्यात नक्कीच अडचणीच्या वेळी उपयोगात आल्याशिवाय राहत नाही. कोणाला घर बांधायचं असतं, कोणाला मुलाबाळांची लग्न करायची असतात तर कधी कोणाला आजारपण येऊ शकतं. मग हीच बचत एखादया देवाच्या वरदानाऐवढी मोठी वाटत राहते. आणि तिच उपयोगात येऊ शकते. म्हणूनच आजची बचत उद्याचे भविष्य. पण भविष्यात उज्वलता येण्यासाठी बचतीचे मार्ग अवलंबीले पाहिजेत. उज्वल भविष्यासाठी फक्त पैशाची बचत पुरेसी नाही.पैशाची बचत वैयक्तीक भविष्य उज्वल करेल, पण सामाजीक आणि सर्वांगीन सुजलाम सुफलामता येण्यासाठी आनखी कांही गोष्टीची बचत होणे आपेक्षित आहे.जेणेकरुन आपल्या नंतर येणाऱ्या पिढया आपणास कृतज्ञता भावनेतून धन्यवाद म्हणतील. खरे तर पृथ्वीवर आपण अशा थाटात वावरत असतो की आपण या पृथ्वीचे मालक असून पृथ्वी ही आपणास वारसा हक्कानं मिळाली आहे. पण समस्त मानवाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पृथ्वी आपण भावी पिढीकडून उसनी घेतली आहे. तेव्हा या पृथ्वीवर आपण किती जबाबदारीने वागले पाहिजे... ! चार पाच वर्षे सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष आपण अनुभवले आहे. पाण्याची किमंत काय असते हे सर्वात जास्त मराठवाडयाने समजून घेतले आहे. या वर्षी मेघराजाची मर्जी झाली आणि पाऊस पडला. पाणी साचले. चेहरे खुलले, उदासिनता दूर झाली.आत्महत्या संपल्या. टवटवी लकाकून गेली. पक्षी किलबलू लागले.जनावरांच्या हंबारण्यात वेगळेपण जाणवू लागलं. पाणी आणि पावसामुळं येवढे चैतन्य येत असेल तर त्याचे संवर्धन आणि जतन आपण का करू नये. पाण्याची बचत ही काळाची गरज तुम्हा आम्हाला का वाटू नये. ही भविष्याची नांदी समजून आपण पाणी बचत केली पाहिजे.जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी संचय वाढलेला आहे. हा टिकवणे आता आपल्या हातात आहे. दुष्काळाच्या झळा ज्यानी सोसल्या त्यानीच फक्त बचतीचा वसा घ्यावा असे नाही, आज सुपात असणारे उदया जात्यात जाऊ शकतात. तेव्हा सर्व मानव जातीने पाणी बचत हीभविष्यातील संकट लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. अंघोळ करताना, कपडे धुताना, शहरी भागात गाडया धुताना, तसेच अनावश्यक पाण्याची नासाडी टाळून
बचतीचा मंत्र जपला पाहिजे. आणि भविष्य सुखकारक केले पाहिजे. खरं तर माणूस जिथं जिथं पोहचला तिथं त्यानं आपले साम्राज्य स्थापन करण्यासाठी इतर प्राणीमात्रावर आक्रमण करुन अतिक्रमणच केले आहे. त्यातून पर्यावरणास धोका निर्माण तर झाला आहेच पण भविष्याची चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा
सुजानपणाचे गोडवे गाणाऱ्या माणसाने बचतीचा मार्ग अवलंबावा आणि पाणी हे खऱ्या अर्थाने जीवन आहे हे दाखवून दयावे.
जागतीकीकरणाच्या जगभरातील माहोलात कारखानदारीचा वाढणारा वेग आणि घराघरातून
होत असणारा विजेचा वापर ही देखील भविष्यात अंधाराचं साम्राज्य पसरवण्याची बाब ठरू नये. यासाठी पैसा, पाणी, पर्यावरण तसेच वीज वापरावर आवर घालून त्याचीही बचत होणे आणि करणे अत्यंत आवश्यक आहे. वीजेचा अनाठायी वापर सर्वत्र होताना दिसतो आहे. घराघरातून टीव्ही फॅन आणि लाईटची उपकरणे गरजेशिवाय चालू असतात. त्यातूनच लाईटची नासाडी होते. हे थांबलं
पाहिजे. आणि वीजेची बचत केली पाहिजे तरच येणाऱ्या काळात भावी पिढी सुखरुप जीवन जगेल.
एकंदरीत सर्वांनीच जीवनशैलीत बदल करून कोणत्याही बाबतीत बचत अंगीकारली पाहिजे.. ती पैशाची असो, कागदाची असो, वीजेची वा पाण्याची
असो बचत ही केलीच पाहिजे.बचत हा जीवनाचा भाग व्हावा आणि आपला भविष्यकाळ उज्वल व्हावा.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*विजेची बचत -आजची गरज*
*(09)सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला जसं अन्न, पाणी, हवा यांची गरज असते .गोंदियामध्ये अदानी पा़ँवर प्लाट असूनही वीजेची कमतरता जानवते खरं तर विज ही एक गरज बनली असते. आपल्या दैनंदिन आयुष्यातली अर्ध्याहून अधिक कामं ही विजेवरच अवलंबून असतात . म्हणूनच विजेविना आपल्या जगण्याला अर्थच नाही. अशा या विजेची बचत केली नाही ,तर भविष्यात आपल्याला विजेचा तुटवडा जाणवेल. बचतीसाठी खूप मोठं असं काही काम करावं लागत नाही किंवा खूप मोठा त्यागही करावा लागत नाही. वीजबचतीचे काही साधारण उपाय केले की वीज सहज वाचू शकते. प्रत्येकाने वीजबचत केली तर त्याचा फायदाच होणार .
आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तिच्या मागे किती वीज वापर लागतो याचा अंदाज आजपावेतो आपण काढू शकलो नाही. तसेच वरील अनुषंगाने आपण विजेच्या निर्मितीचे स्त्रोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात वापरू शकलो नाही . कारण विजेचे स्त्रोत हे काही नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात मोफत मिळतात. जसे सूर्यप्रकाश, पाणी, वारा, समुद्री लाटा यापैकी सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी " निर्माण होतात.
वारा व समुद्री लाटा यांचे रूपांतर विद्युत उर्जेमध्ये करत असतांना भौगोलिक अडचणी असतात. कारण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. पाण्याचा विचार केला असता, आजपर्यंत आपण फक्त काही प्रमाणात धरणे बांधून त्या पाण्यापासून विजेचे निर्मिती करीत आहोत. ज्या ऊर्जा आपल्याला मोफत मिळतात , त्याचा उपयोग विजेचे रूपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त तीन ते पाच टक्के आपण करून घेतलेला आहे. कृत्रिमरित्या वीज निर्मिती आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासून तयार करून विजेचा वापर करतो. परंतु भौगोलिक पाहणीनुसार आपल्या देशातला कोळसा समोर अंदाजे 40 ते 50 वर्ष पुरतील या प्रमाणात साठा आहे ,असे लक्षात येते. तसेच कोळश्यापासून विजेचे निर्माण करतांना क्षमता 29 ते 30 टक्के आहे. तसेच रासायनिक स्त्रोताचा विचार केला असता आपल्या देशामध्ये रासायनिक स्त्रोत हे दुसऱ्या देशापासून घ्यावे लागतात. तसेच तंत्रज्ञानसुद्धा बाहेर देशाचे वापरणे हे मानवीदृष्ट्या योग्य आहे असे लक्षात येते. कोळसा आणि रासायनिक स्त्रोत या दोन्ही गोष्टींचा वापर करून आज आपण आपल्या वापरात असलेली जवळपास 65 ते 70 टक्के वीज निर्माण करतो.
वरील सर्व बाबींचा विचार करतांना असे लक्षात येते की, आजपासूनच आपण विजेची बचत करणे आवश्यक आहे. आज प्रत्येक व्यक्तिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतसुद्धा विजेची आवश्यकता असते व समोरच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या देशातील विजेचे स्त्रोत व लागणारी वीज यामध्ये समोरच्या 25 वर्षांनंतर फार तफावत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यादृष्टीने आजपासूनच विजेची बचत करणे हेअत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे.
वरील बाब लक्षात घेवून केंद्रीय ऊर्जा विभागाने विजेची बचत करण्यासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकानी करावा. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार ट्युबलाईटच्याऐवजी सी.एफ.एल. व आता नंतर एल.ई.डी. लाईटचा वापर करावा. जेणेकरून विजेची बचत होईल. कारण एल.ई.डी. बल्बचा प्रकाश विस्तारण क्षमता ही प्रत्येक व्हॅटच्या प्रमाणात उत्सर्जित करते. तसेच प्रत्येक व्हॅटला लागणारा विद्युत प्रवाह दोन्ही गोष्टीच्या (सी.एफ.एल. आणि ट्युब लाईट) प्रमाणात फारच कमी लागते. त्यामुळे वीज वितरण क्षमता कमी होईल व प्रत्येकाला वीज बिलामध्येही फायदा होईल. त्याचप्रमाणे *महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाद्वारेही* नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या उर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहे. त्यांच्या योजनेद्वारे लोकांना सूर्यप्रकाशाची ऊर्जा आपण दैनंदिन वापरात कशाप्रकारे करता येईल याची जाणीव लोकांना करून देते आजच् वेळेची गरज आहे.
त्यामध्ये सौरऊर्जा लाईट तसेच सौरऊर्जा हिटरचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशाला वीज बचत करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन वापरात लागणाऱ्या विजेच्या वस्तुंचा सदुपयोग आवश्यकतेनुसार करून घेतल्यास वीज बचत करू शकतो. कारण आवश्यकता नसल्यास ताबडतोब वीज उपकरणे फॅन, लाईट बंद करून घेणे. तसेच ए.सी. चा वापरही इकॉनॉमिक मोडमध्ये केल्यास वीज बचत होईल व त्याचबरोबर क्लोरोफ्लोरो कार्बनसुद्धा कमी प्रमाणात उत्सर्जित होईल. त्यामुळे पृथ्वीच्या परिमंडलामधील जी ओझोन लेअर कमी होत आहे, ती कमी प्रमाणात होईल.तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन घरगुती,दवाखान्यात ,कारखान्यात व कार्यालयामध्ये करून घेतल्यास लागणारी वीज ही कमी होऊ शकते. सी.एफ.एल. व सौरउर्जेचा वापर प्रत्येकाने काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनात वापर करण्यास सुरूवात केली तर देशातील वीज वितरण क्षमता काही प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर वीज वितरणमध्ये भार कमी झाल्यामुळे वीजहानीसुद्धा आपण अप्रत्यक्षरित्या कमी करू शकतो व ही वाचणारी वीज आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते. तीच काळाची गरज आहे. वीज कशी वाचवाल? विजेचा अनावश्यक वापर टाळा .,पंखे, गीझर, फ्रीज यांचा वापर आवश्यकता असेल तेव्हाच वापर करा. .कार्यालयातील कामाच्या वेळी,गरज,नसताना पंखे, विजेचे दिवे सुरू ठेवू नका! .,विजेचा वापर कमी करणारे सीएफ़एल दिवे वापरा. ,टी.व्ही.आणि पंखे यासाठी,विजेचा वापर होतो. त्याचा वापर नसताना बटणे बंद करा.दिवसा भरपूर सूर्यप्रकाश असेल तेव्हा, घरातील खिडक्या, दरवाजांचे पडदे उघडे ठेवा. त्यामुळे घरात स्वच्छ प्रकाश येईल. तेव्हा विजेच्या दिव्यांचा वापर किंवा मोकळी हवा आल्याने पंख्यांचा वापर केला नाही तरी चालू शकेल. लक्षात ठेवा विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती .विजेची सामग्री ही अल्प प्रमाणात उपलब्ध आहे, तर आपल्याला अपारंपरिक उर्जेचे स्त्रोत जसे सौरऊर्जा वापरायला हवे.हीच विजेच्या बचतीसाठी आजच्या काळाची गरज आहे.
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*पैशाची बचत आवश्यकच!*
*(08) महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
पैसा हा लोकांच्या उत्पन्नाचा निदर्शक आणि जीवनमानाचाही मापदंड आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पैसा अधिक, त्यांचे उत्पन्नही अधिक, त्यामुळे त्यांचे जीवनमानही उच्च प्रतिचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळेच समाजातील प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अतिश्रीमंत, जमीनदार, उद्योगपती, व्यावसायिक,कारखानदार आणि इतर उच्च उत्पन्न गटातील लोकांकडे पैसा अतिरिक्त असतो. त्यामुळे त्यांच्याकडून पैशाचा वापर योग्य व विवेकी होणे अत्यंत कठीण व अनपेक्षित आहे. मात्र, समाजात अशा लोकांची संख्या मर्यादित असते व पैसा आणि संपत्ती त्यांच्याकडे भरपूर आणि अतिरिक्त असते.पैसा बचतीची आवश्यकतामिळालेल्या पैशाचा योग्य आणि विवेकी वापर, समाजातील अतिश्रीमंत, श्रीमंत, जमीनदार, उद्योजक, व्यावसायिक सोडून इतर सर्वांना योग्य आणि विवेकी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, अशा लोकांच्या कुटुंबातील लोकांच्या आवश्यक गरजाही भागविणे कठीण होत असते. कारण म्हणजे अशा कुटुंबात मिळविणाऱ्यांची संख्या कमी, मात्र उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहणाऱ्यांची संख्या अधिक असते. कुटुंबातील सर्व लोकांच्या गरजा व त्यांचा खर्च भागविणे या मर्यादित उत्पन्नातून शक्य नाही. त्यामुळे त्यांना मिळालेल्या पैशाच्या स्वरुपातील उत्पन्नाचा त्यांनी आपल्या जास्तीत जास्त गरजा भागविण्यासाठी योग्यच वापर करायला पाहिजे. वाढत्या गरजांची संख्या आणि व्याप्तीमुळे काही गरजा (उदा. शिक्षण, आरोग्य, निवारा, व्यवसाय, अपघात, बेकारी) भागविण्यासाठी सर्वच्या सर्व उत्पन्न वर्तमानकाळातच न खर्च करता, त्यातील काही भाग बचत म्हणून बाजूला काढून त्याची सुरक्षित वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे .
बचतीचे मार्ग ही गोष्ट अत्यंत बरोबर आणि महत्त्वाची आहे की, श्रीमंत व अतिश्रीमंत समाजातील लोक सोडून इतर सर्वांनीच वर्तमानातून मिळालेल्या उत्पन्नातून पैशाची काही बचत करणे आवश्यक आहे. अर्थात ही बचत करण्यासाठी नियोजनबद्घ आणि हेतूपुरस्सर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न जर झाला नाही, तर वर्तमानकाळात त्या व्यक्तीस आणि अनुषंगाने त्या कुटुंबास मिळणारे सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होऊन पैशाची बचत होणार नाही. कुटुंबाला कोण कोणत्या मार्गांनी आणि किती उत्पन्न महिन्याला आणि अनुषंगाने वर्षाला मिळते याचा अंदाज बांधायला पाहिजे. त्यानंतर कुटुंबांच्या गरजांच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, आणि कमी महत्वाच्या गरजा असे वर्गीकरण करायला पाहिजे. कुटुंबाला मिळणाऱ्या उत्पन्नातील अत्यावश्यक व आवश्यक गरजांवर खर्च करावा लागणारे उत्पन्न खर्च करावे आणि इतर उत्पन्नाची बचत करावी. अशाप्रकारे, कुटुंबांच्या गरजांची तीव्रतेनुसार क्रमवारी लावून वर्तमानकाळात उत्पन्नातील काही ना काही हिस्सा किमान ३० टक्के उत्पन्न बचत करायलाच पाहिजे. ही ३० टक्के रक्कम दर महिन्यास बचत करण्यात आली, तर वर्षभरात निश्चितपणे चांगली रक्कम बचत करणे शक्य आहे.
बचत गुंतवणुकीची साधनेआपण एकदा गरजांची क्रमवारी लावून आणि काटकसरीचा आश्रय घेवून, अनावश्यक खर्च टाळून व कपात करून बचत निर्माण केल्यानंतर ही बचत नेमकी कोठे गुंतवायला पाहिजे याचा विचार करावा लागतो. ही पैशाची बचत करताना पैशाच्या रोखतेचा व लाभतेचा एकाचवेळेस विचार करायला पाहिजे. कारण भविष्यकाळात अनपेक्षित व अचानक उद्भवणाऱ्या गरजा व संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक पैसाही उपलब्ध व्हायला पाहिजे. याबरोबरच काही परतावाही मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणती बचत गुंतवणुकीची साधने उपलब्ध आहेत आणि कोणत्या दक्षता घ्यायला पाहिजेत याचाही साकल्याने व विवेकाने विचार करायला पाहिजे.
अर्थात अशा कुटुंबांची व लोकांची बचत छोटीच असणार याचाही आपणास विचार करायला पाहिजे. हा पैसा शक्यतो सरकारी बचत साधनांमध्ये गुंतवायला पहिजे. त्यासाठी कोणती अल्पबचत साधने उपलब्ध आहे, आणि ते कोणते फायदे मिळवून देतात याचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी बँका, वित्तीय संस्था, पोस्ट कार्यालय, विमा संस्था यांचाच अग्रक्रमाने विचार करावा. हा अल्पबचतीतील पैसा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बचत ठेव, मुदतबंद ठेव, विमा आवर्ती ठेव यात प्रामुख्याने ठेवणे अत्यंत सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारे आहे. याबरोबरच पोस्ट कार्यालयात बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, राष्ट्रीय बचतपत्रे, पोस्टल विमा या साधनांमध्ये गुंतवणूक करावी व आपला पैसा सुरक्षित ठेवून कांही हमखास परतावा त्या बचतीवर मिळविता येतो. त्यानंतर आयुर्विमा, सर्वसाधारण विमा आणि इतर विमा कार्यालयातही विमा पॉलिसीच्या स्वरूपात बचत करून पैसा सुरक्षितता व परतावा असा सुवर्णमध्य साधता येतो. यातूनही आपणास असे वाटले की आपली बचत अधिक आहे. तर या स्थितीत सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील भाग, समभाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे, म्युचुअल फंड यात गुंवणूक करावी. यातून हमखास पैशाच्या सुरक्षिततेबरोबरच निश्चित असा परतावा मिळेलच यात शंका नाही.
आपल्या बचतीतून आयुर्विमा, आरोग्य विमा, अपघात विमा या स्वरूपातही काही पैशाची बचत करणे आवश्यक आहे. यातून आपणास काही कर सवलतीचाही लाभ मिळ शकेल. कारण त्यातून आपला पैसा सुरक्षित राहण्याबरोबरच निवारा, आरोग्य, आजारपण अशा गरजांसाठीही पैसा आवश्यक त्यावेळी उपलब्ध करणे शक्य होणार आहे. कारण, आज तरी खासगी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करणे कठीण आहे. त्याच्याही पुढे पैशाच्या सुरक्षितेबाबत आणि परताव्याबाबत कमालीची अनिश्चितता आहे. या मितीस सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी साधने यावर अवलंबून राहावे, त्यामुळे पैसा सुरक्षितता व हमखास परतावा मिळणे शक्य आहे. येथे गरज आहे ती पैशाच्या योग्य वापर करून बचतीची आणि तिच्या योग्य गुंतवणुकीची. म्हणून असे म्हणता येईल, आणि ते बरोबरच आहे ‘पैशाची बचत, म्हणजे पैशाची मिळकतच.’
*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
*(9421802067 )*
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
कागदाची बचत ; पर्यावरणाला मदत
मुलांनो, कागदाचा आणि आपला संबंध फार जुना आहे. ज्यावेळी घर सोडून तुम्ही आईं-बाबांचे बोट धरून शाळेत प्रवेश घेतलात तेंव्हापासून जो कागदाचा संबंध आला तो आयुष्यभरासाठी. काही लिहावयाचे असेल की, आपण कागद शोधण्यास सुरुवात करतो. कागदाचा वापर करण्यापूर्वी, तो कागद कश्यापासून तयार करतात ?याविषयी आपण कधी ही जाणून घेतले नाही किंवा तसा प्रयत्न देखील केला नाही. पुरातन काळातील लोक लिहिण्यासाठी झाडांची पाने, साली आणि वल्कले आदिचा वापर करीत असत. त्यानंतरच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कागदाचा शोध लागला आणि आपली लिहिण्याची प्रक्रिया सहज, सोपी आणि सुलभ झाली. कागदाची निर्मिती करण्यासाठी पर्यावरणाची मदत घ्यावी लागते. कागद तयार करण्यासाठी लाकूड, बांबू, चिंध्या,आणि गवत इत्यादीचे लगदा तयार केला जातो म्हणजे यासाठी वृक्ष तोड करावी लागते. त्यास्तव त्या पर्यावरणावर याचा भार पडून पर्यावरण नष्ट होऊ शकते. आपण मागे-पुढे कसलाही विचार न करता वहीतले कागद टराटरा फाडून फेकतो. परंतु कागदाचा पुरेपुर वापर करायला शिकणे आणि तशी सवय लावून घेणे फारच महत्वाचे आहे. एका अर्थाने आपली ही क्रिया पर्यावरणाला पूरक राहणार असून ते मदतच ठरणार आहे. मग कशी करता येईल आपणाला कागदाची बचत ? याचा थोडा विचार करू या. एखाद्या कागदावर थोडीशी रेष पडली म्हणून आपण पूर्ण कागद न लिहिता सोडून देतो किंवा फाडून टाकतो. असे न करता त्याचा पूर्ण वापर करावा. गेल्यावर्षीच्या वहीतील शिल्लक कोरे कागद वेगळे करून त्याची एक स्वतंत्र वही तयार केल्यास वर्षाकाठी एक-दोन वह्या तरी नक्की वाचवू शकतो. गणिताचा सराव कागदावर न करता पाटी-कलम द्वारे केल्यास चांगले. त्यामुळे सुध्दा कागदाची बचत होईल. पाठमोरी कोरे असलेले कागद रफ कामासाठी वापरण्याची सवय लावून घ्यावी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी जमा झालेल्या सर्व लग्नपत्रिकेच्या पाठमोरी बाजु कोरीच असते, त्याचा वापर आपण कधी केलाय का ? शाळेत खेळले जाणारे राजा, राणी, चोर आणि पोलिस या खेळासाठी आपण किती कागद खराब करतो ? याचा कधी विचार केलाय का ? आपल्या हातून कळत-नकळत असे अनेकदा कागद खराब करण्याचे प्रकार घडतात. आपण वर्षभरातून एखादे-दोन वह्याच्या कागदाची बचत केली तर आपल्या हातून पर्यावरण बचतीचे महान कार्य झाल्या सारखे होईल. चला तर मग आजपासून आपण कागदाचा पूर्ण वापर करूया आणि पर्यावरण वाचवू या.
- नासा येवतीकर, 9423625769
( माझ्या पाऊलवाट या पुस्तकांतून साभार )
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
(5)
*पाण्याची बचत, जलसंवर्धन*
हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे विविध रूपात मिळणारी प्रवाही संपत्ती आहे.पाणी हेच जीवन आहे. पाणी जीवनाश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रम द्यावा लागतो. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी भरपूर पाणी लागते.भारतात खूप मोठा भाग पाण्यासाठी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात मिळत नाही. पावसाळी ऋतूतही अंतर्गत चढउतार आहेतच. विविध रुपात मिळणारी पाण्याची ही प्रवाह संपत्ती या जलचक्रामुळे दैनंदिन जीवनात सजीवांना पिण्यासाठी ,वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तरी आपल्या या भारत देशात बऱ्याच भागात पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात आहे. बऱ्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष आपल्याला दिसते. पाण्याची गरज वाढण्याचे अनेक कारणे आहेत. भारतातील लोकसंख्या वाढ ही भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाणी अधिकाधिक लागते. शेतीसाठी भरपूर पाणी लागतं.तसेच उद्योगधंद्यात कारखान्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. आज पाण्याची गरज ओळखून मानवी जीवनाला पाण्याची बचत करणे फार आवश्यक आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमकी गरज ओळखून पाण्याचा दुरुपयोग उधळपट्टी कमी करावी लागेल. जसे की आवश्यक असेल तरच नळ चालू करावा. विनाकारण नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये. दात घासताना आंघोळ करताना आवश्यक तेवढेच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अंघोळीसाठी शावर चा वापर न करता बादलीत पाणी घेऊन वापर करावा. मोरयातील सांडपाण्याचा वापर बागेतील झाडांसाठी करावा. छपरावरून पडणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करावा. किंवा घराच्या छपरावरील पावसाचे पाणी टाक्यात साठवुन पाणी रिचार्ज पीट च्या साह्याने पाणीसाठ्यात भरावे. सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढेच की आपल्या दैनंदिन व्यवहारात सांडपाण्यावर जे पाणी लागते त्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्या पाण्याचा अन्य कामासाठी वापर करणे आवश्यक आहे. पाणीबचत आपल्याला कोणत्या मार्गाने मिळते हे सर्व उपाययोजना आपण करणे आवश्यक आहे. ' पाणी आडवा, पाणी जिरवा' लक्षात घेऊन आपल्याला पाणी अडवता येईल.जसे की अरुंद नाल्यावर छोटे बंधारे बांधून, पाणी अडवून हे पाणी जमिनीत जिरवता येईल. मातीचे बंधारे बांधून पाणी अडवता येईल व मातीत जिरवता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी उद्योग-धंद्यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. तसेच शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते यामध्ये कशी बचत करता येईल ते पाहावे व शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. शेतातील केर कचऱ्याचे आच्छादन करावे. म्हणजेच केरकचरा जमिनीवर पसरवावा त्यामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होईल आणि पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळता येईल. शेतजमिनीत पाणी साठवण्यासाठी खड्डे खोदले तर पाणी बचत करता येईल. बांधकाम करताना कोणत्या ऋतूत बांधकाम करावे हे ध्यानात ठेवून ज्यावेळी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस बांधकामाला सुरुवात करावी. उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण असते अशावेळी जर बांधकाम केले तर पाणी उपलब्ध होणे अवघड होते. अशा वेगळ्या उपाय योजना जर केले तर पाण्याचा अपव्यय टाळता येऊन पाण्याची बचत करता येते.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्याला झाडे लावणे व जगविणे हे काम करणे फार आवश्यक आहे. जर आपण झाडे लावली तर पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात पडेल. व हे पावसाचे वाहून जाणारे पाणी आपण विविध पद्धतींनी जमिनीत साठवून ठेवू शकतो. आभाळातून पडलेल्या पाण्याला आपण प्रयत्नपूर्वक जमिनीत जिरवले पाहिजे. आणि जलसंधारण वाढविले पाहिजे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे ,विहिरी ,नद्या ,यांचे पाणी आटणार नाही. अशाप्रकारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. म्हणून आपण सर्वांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि पाण्याचा अपव्यय न करता पाण्याची बचत केली पाहिजे. तरच आपल्या पुढील भविष्यकाळातील पिढी सुखी ,समृद्ध व आनंदाचे आयुष्य जगेल. त्यासाठी आपल्याला पाणी बचतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना आता करणे फार आवश्यक आहे.
म्हणून माणसाने आपल्या जीवनात
*'पाणी, नाणी, आणि वाणी याचा जपून वापर करावा.'*
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका)
ता.हदगाव जि. नांदेड.
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*पाणी बचत ही काळाची गरज*
*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
अन्न, वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या तीन प्रमुख गरजा असल्या तरी पाणी हे अत्यंत जीवनाश्यक वस्तू आहे.अन्नाशिवाय आपण दोन ते तीन दिवस जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही.पाणी हे जीवन आहे त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर जपून केला पाहिजे.आज दैनंदिन वापरात पाण्याचा वापर होत असते.सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पाण्याचा उपयोग सर्व सजीवसृष्टी करीत असतो.मानवी जीवनात सकाळी उठल्यापासून ब्रश,अंघोळ,स्वयंपाक,पिण्यासाठी,कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असतो त्यामुळे पाण्याची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे म्हणून पाण्याचा जपून वापर केला पाहिजे.
पाण्याचा सर्वाधिक उपयोग होतो.पिण्यासाठी जसा उपयोग होतो त्याप्रमाणे शेतातील पिकांसाठी देखील उपयोग होत असतो त्यामुळे शासनाने 'पाणी अडवा, पाणी जिरवा' यासारख्या अनेक उपाययोजना करून पाण्याची महती सर्वाना लक्षात आली आहे.दररोजच्या व्यवहारात पावलोपावली पाण्याचा उपयोग होत असतो.पाणी हे स्वच्छ,निर्मळ व उकळून पिण्याचे आवाहन सरकार करीत असतो त्यामुळे आजाराला आमंत्रण देऊ नये यासाठी पिण्यासाठी स्वच्छ पाणी निर्जंतुकीकरण करून पिले पाहिजे.आज पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली खाली जात आहे.भारत हा देश कृषिप्रधान देश असल्याने सर्वाधिक 60 टक्के जनता शेती व्यवसायाशी निगडित आहेत.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती केल्या जाते यासाठी शेतामध्ये शेततळे उभारून पाण्याची बचत केली जाते आणि तेच पाणी शेतीला केल्या जाते त्यामुळे शेती पाण्यानेच बहरली जाते म्हणून पाणी हे अत्यंत आवश्यक गरज बनली आहे म्हणून त्याचा पावलोपावली पाण्याचा जपून वापर केला पाहिजे.'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' हे शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना आखली असून त्याचा उपयोग बळीराज्याला व्हावा तसेच विहीर बांधून देणे व जलसिंचनाच्या सोयी निर्माण करून 'सुजलाम सुफलाम' शेती व्हावी हा उद्देश असतो.
महाराष्ट्र शासनाने 'जलयुक्त शिवार योजना' लागू केली आहे.शेती अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी पाण्याची बचत होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असतो.पाण्याविना पिकाची नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्याला पाण्याची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने विहीर,शेततळे,तलाव,नदी यावर धरणे बांधून पाण्याची बचत करून शेतीला वापरले जाते.आपल्या सर्वाला माहिती आहेच की,'शेतकरी जगला तर देश जगेल' म्हणूनच बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते हे उगीचच नाही.आज काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही.आज मराठवाड्यातील बीड,लातूर,अहमदनगर, या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा देखील तुटवडा पडलेला आहे मागील वर्षी लातूर जिल्ह्याला टँकर ने पाणी पुरवठा करावा लागला.इतकी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून 'जगा व जगू द्या' हा संदेश जगाला द्यावे लागणार आहे.
आज प्रवासात इतरत्र जात असतांना तहान लागली तर पाणी प्यावेच लागते म्हणून पाणी बॉटल विकत घ्यावे लागते म्हणून प्रत्येकांनी पाण्याची बॉटल जवळ बाळगणे आवश्यक आहे.पाणी हे अत्यंत जीवनाश्यक गरज असून सर्व सजीव प्राण्याला आवश्यक आहे म्हणून पाणी बचत करणे ही काळाची गरज बनली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात खूप पाणी प्यावे लागते कारण लवकरच आपल्याला तहान लागत असते.पाण्याचा पिण्यासाठी,कपडे धुण्यासाठी वापर होत असतो.दैनंदिन व्यवहारात पाण्याची नितांत गरज असल्या कारणाने पाणी जपून व काटकसरीने वापर करण्यात यावा.पाण्याचा योग्य वापर करावा अनावश्यक ठिकाणी पाण्याची तोटी चालू ठेवल्यास पाण्याचा अपव्यय होतो.तसा अपव्यय होऊ न देता काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि पाण्याची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे.
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
"बचत" बचत करणे म्हणजे काटकसर करण.आपण पाण्याच्या बचती विषयी विचार करू कारण पाणी हे आपणास निसर्गाकडु न मिळत असते.त्यामुळे निसर्गाकडुन जे जे मिळत असते त्या पाण्याची आपण बचत केली पाहिजे.पाणी म्हणजे जीवन आहे.त्यामुळे आपण पाणी नसेल तर आपण जीवंत राहु शकत नाही केवळ आपणासच पाण्याची गरज नाही तर या भूतलावरील सर्व प्राणीमात्राना जीवसृष्टीला पाण्याची गरज असते म्हणून पाण्याची आपण बचत केली पाहिजे. शेती साठी पिकांना पाणी मिळाले तरच शेती पिकणार शेती पिकली तरच आपण अन्नधान्य मिळत राहणार.झाडांना पाणी मिळाले तर झाडे वाढून आपणास फळे मिळणार.
त्यासाठी आपण पाण्याची काटकसर कशी करता येईल याचा विचार करतांना उदा.ऊसाला पाणी देताना पाहिले तर बरेचसे पाणी वाया जात असते त्यामुळे पाणी ठीबक सिंचन योजनेचा वापर केला पाहिजे.ही योजना सर्व पिकांच्या साठी वापरली तर भरपूर पाण्याची बचत होईल.याशिवाय आपल्या गावात पाण्याचा वापर करून खराब झालेले पाणी गावाच्या बाहेर सर्व एका खड्यात एकत्र करून तेच पाणी पुन्हा शेतीसाठी वापरले तर मोठ्या
प्रमाणात पाण्याची बचत होईल.शिवाय हे सांडपाणी म्हणजे एक प्रकारे द्रवरूप खतच पिकांना मिळून पिकांची चांगली वाढ होईल आणि वाया जाणा-या पाण्याचा वापर केलयामुळे अप्रत्यक्ष पाण्याची बचत होईल.गा्वोगावी नळ पाणीपुरवठा योजना आहेत.त्या पाणी सोडणेच्या वेळेचे काटेकोर पालन केले पाहिजे. सर्व नळांना तोटया बसविलेल्या नाहीत त्या मुळे काही गावामध्ये पाणी वाया जात असत ते थांबले तर पाण्याची बचत होईल.दरवर्षी पावसाळयात आपल्या घराचे छपरावर पडणारे पाणी आपल्या घराचे परिसरात ज्याना शक्य आहे त्यानी जमीनीच्या पोटात सिंमेटामध्ये पाणी साठवण्यासाठी टाकी बांधली तर वाया जाणा-या पाण्याची बचत होईल.तसेच घरात पाणी वापरताना योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. पाहुणे आले तरी पाणी देते वेळी तांब्या भांडे दिले तर हवे तेवढेच पाणी घेतले जाईल त्यामुळे उष्टे पाणी होऊन वाया जाणा-या पाण्याची एक प्रकारे बचतच होईल.आपण पुर्वी असा विचार कधी केलाच नाही भविष्यात आपणाला पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जागो जागी विकत घ्याव्या लागतील असे आपल्या कोणाच्या स्पप्नात सुध्दा आले नसेल पण आज आपण प्रवासात पाण्याची बाटली र.रू.२०/-आपण मोजत असतो.इतके महत्व पाण्याचे आजहि आणि भविष्यातहि पाण्यावरूनच भांडण होतील त्यासाठी या पाण्याची बचत करणेची. सवय लावून घेतली पाहिजे.तरच पाणी बचत होईल. त्यामुळे म्हटले जाते "पाणी वाचवा जीवन वाचवा.", आपल्या शासनाने सुद्धा त्या त्या वेळच्या परस्थीतीचा विचार करून वाया जाणा-या पाणी वेगळी धरणे बांधून पाणी संचय केलेला आहे.सरळ नदीतून वाया जाणारे समुद्रात न जाता धरणातच थांबले म्हणजे एक प्रकारे बचत होवून शेती साठी वापरले वापरले जात असते नव्हे तर वीज निर्मिती सुध्दा केली जावून देशाचा विकास होण्यास मदत होत आहे."पाणी म्हणजे जीवन"म्हणून पाणी बचत सर्वानी केली पाहिजे. ....
लेखक ..जी.एस.कुचेकर पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.न.७५८८५६०७६१
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
बचत: पाण्याची
जलसंवर्धन: काळाची गरज
"येरे येरे पावसा, तुला देतो पैसा" या गाण्यामुळे लहानपणीच आपले पावसाशी पर्यायाने पाण्याशी गट्टी जमते. पाण्यात खेळायला, नदीत डुंबायला कोणाला आवडत नाही? लहानपणापासूनच पाऊस आपणास खेळगडी वाटतो. तो आला नाही की आपण बेचैन होतो. तो आल्यावर खुश होतो. पाऊस येतो म्हणूनच आपणास पाणी मिळते. म्हणूनच ही धरती सुजलाम-सुफलाम बनते. सर्जनशीलता हा भूमीचा गुण. त्याच्या जोडीला पाऊस आला की नदी, नाले,ओहोळ यांना वैभव प्राप्त होते. पाऊस माणसाच्या जीवनात हिरवळ फुलवतो आणि समृद्धी देतो. म्हणूनच कितीतरी कवी कल्पना पावसामुळे फुलल्या,बहरल्या आहेत.कवींनी पावसावर कविता नि गाणी रचली आहेत.
चित्रकारांनी चित्रे रेखाटली आहेत.
पाऊस मोठा कलाकार आहे. तो निसर्गाचे रूप बदलवतो,फुलवतो आणि क्वचित रौद्ररूप धारण करून सगळे वातावरण बिघडवतोही. पाणी आपले जीवन आहे. सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत आपल्याला सर्व दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आपल्या देशात वर्षभर पाऊस पडत नाही. पावसाळी चारच महिने असतात. उरलेले आठ महिने पाण्याची साठवण नि जतन करावे लागते. पाऊस उशिरा आला तर वैज्ञानिक संशोधनाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतात. पाणी अडवणे आणि जिरवणे, नाले, तलाव, कालवे यांमधून पाण्याची साठवण करणे, नद्यांना बांध घालून आणि धरणे बांधून पाणी साठवले जाते. दिवसेंदिवस लोकसंख्या आणि पाण्याची गरज वाढत आहे पृथ्वीवरील एकूण जलसंपत्तीपैकी ९७% पाणी महासागरात आहे. ते पाणी दैनंदिन वापरासाठी, शेतीसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी उपयोगी नाही. उरलेल्या ३% जलसाठ्यांपैकी २-२.५% पाणी आहे. त्यातील आपणास १% पाणी उपलब्ध आहे. लोकसंख्या वाढ आणि उद्योगधंद्यांसाठी वापर याचा विचार करता हा साठा फारच तोकडा आहे. त्यामुळे जलसंवर्धनाच्या दुसऱ्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात खूप समस्यांना सामोरे जावे लागेल. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष जमिनीत खोलवर जाऊन मातीला मूळांनी घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे पाणी जमिनीत खोलवर मुरते. हे पाणी जमिनीत झिरपून तेथे साठून राहते.
झाडांचा वाळलेला पालापाचोळा तिथेच राहू दिल्यास पाणी तिथेच जमिनीतच झिरपते आणि मातीची धूप टाळली जाते. डोंगरटेकड्यावर झाडे किंवा हिरवळ लावल्यास पाणी अडवण्यासाठी मोलाची मदत होते. त्यामुळे डोंगर टेकड्या उजाड न राहता तिथली माती तिथे टिकून राहते. आणि खळाळणारे झरे, ओहळ समुद्राला जाऊन मिळण्याऐवजी आपल्याला गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा करू शकतात. पाणी अडवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जागोजागी तलाव बांधणे. त्यामुळे पावसाळ्यानंतरही हे पाणी वापरता येते. धरणे बांधणे किंवा मोठ्या इमारतींच्या तसेच घराच्या छपराला पन्हाळी लावून ते पाणी घरगुती वापरासाठी उपयोगात आणणे, शेताच्या बांधावर तृणधान्य वाढवून देखील पाणी जमिनीत भूजल साठा वाढण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. जमिनी जास्तीत जास्त शेतीसाठी लागवडीखाली ठेवून देखील पाण्याची बचत करता येते.समुद्र व महासागरातील अफाट जलसंपत्तीचे गोड्या पाण्यात रूपांतर करणे हाही जलसंवर्धनातील मुख्य मुद्दा आहे. शिवाय नद्या,ओहळांचे पाणी समुद्रापर्यंत वाहून जाऊ न देता जागोजागी पाणी अडवून साठा करता येईल. पाण्याचा वापर मर्यादित करून तो साठा वापरता येईल याचे नियोजन केले पाहिजे. म्हणजे दुष्काळावरही मात करू शकतो.
सौ. भारती सावंत
मुंबई
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
34
*पाणी बचत काळाची गरज*
"वाचवील पाणी , साठवील पाणी , त्यालाच फक्त, जगवील पाणी."
मित्रांनो आपण सर्वांना ठाऊक आहे की पाण्याचे महत्त्व काय आहे.?तरीही आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्रांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते,पाण्याचा वापर आपण काटकसरीने करायला हवा. आपण इतर दिवस कधी विचार करत नाही,परंतु कमीत कमी जागतिक जलदिनानिमित्त आपण खालील काही गोष्टींचा विचार करायला हवा / संकल्प करायला हवा /प्रतिज्ञा करा किंवा खालीलप्रमाणे इतर उपक्रम घेऊ शकता.
पाण्याला जीवन असे म्हणतात.आपले 'जीवन' वाचविण्यासाठी आपण काय केले पाहिजे.? पाणीच आटले तर.' या विषयावर वर्गात आपण चर्चासत्र किंवा वक्तृत्वस्पर्धा घेऊ शकतो. पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही इतर कोणते मार्ग सुचवाल.? / तुम्ही पाण्याची बचत कशी कराल? आपल्या परिसरातील एखाद्या नदीकडे फिरायला जा,नदीची सद्यस्थिती बारकाईने पाहा.गावातील लोकांकडून या नदीच्या पूर्वीच्या स्थितीविषयी माहिती मिळवा. उदा -नदीला येणारे पूर, पात्रातील पाणी वाहत राहण्याचा कालावधी. नदीच्या पाण्याचा वापर-पिण्यासाठी,धुण्यासाठी,शेतीसाठी,इतर कामांसाठी.नदीच्या पाण्याचे प्रदूषण.नदीकाठची स्वच्छता. नदीतील जीव. पाणी वाचविणे / पाण्याची बचत करणे हे आपले कर्तव्यच समजा.
पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा...
‘पंचतत्व मिल बना शरीरा, जल पावक गगन समिरा' म्हणजे भौतिक रूपात आपल्यास जे शरीर प्राप्त झाले आहे. त्या शरीर सृष्टीसाठी पाणी हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. आज कोरोनात सर्वात चांगला आणि कमी खर्चाचा उपाय सांगितला तो २० सेंकद हात धुवा. अर्थातच पाण्यांशिवाय हे शक्य नाही. आज हे पाणीच लुप्तप्राय होत आहे. आगामी दोन दशकात पाण्याची जी टंचाई जाणवणार आहे, ते चित्र अत्यंत भीषण असणार आहे. कारण पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे आणि पाण्याची उपलब्धता मात्र कमी कमी होत आहे. २०३०पर्यंत पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे. २०३० पर्यंत पाण्याची मागणी ८०० शतकोटी घनमीटरपासून वाढून १६०० शतकोटी इतकी होईल. तेव्हा काय कराल. आपल्याकडे यावर उत्तर नसेल. आपल्याकडे असलेली धरणे, तलाव व त्याची साठवण क्षमता दुप्पट करावी लागतील. याकरीता नविन धरणे बांधणे खर्चिक तर आहेच पण शक्यही नाही. अशा या परीस्थितीत असलेल्या धरणाची जी क्षमता आहे जी गाळामुळे कमी झाली आहे ती गाळ काढून पूर्ण क्षमता निर्माण करावी लागेल. सोबतच नवे जलस्त्रोत कसे वाढविणे शक्य होईल याकरीता लक्ष देणे आवश्यक आहे. याकरीता पाण्याची सप्तपदी महत्वाची आहे.
पाण्याच्या उपलब्धते नुसार शेती व उद्योगांचे नियोजन करावे लागेल.
आपण जो जल वापर करतो त्यात काटकसर करावी लागेल.
पाणी फुकट मिळते म्हणून कसेही वापरतो त्याकडे लक्ष देवून यापुढे पाणी वाया जावू देणार नाही हा निश्चय करावा लागेल.
आपण ज्या परिसरात राहतो तेथे झाडे लावून जलस्तोत्र व प्रदूषण थोपवून धरावे लागेल.
पावसाचे घरावर व छतावर पडणारे पाणी योग्य त्या रितीने एकत्रित करून भूजल पुनर्भरण करावे लागेल.
जलवाटपाचे सुधारीत नियम करून ते कार्यान्वित करावे लागेल.
जलही जीवन आहे हे मान्य असले तरी स्वीकार्य नाही याकरीता जनजागृती करावी लागेल.
सप्तपदी आपल्याला एकाचवेळी आमंलात आणावी लागेल तरच येतां काळ पाणी समस्या विरहीत असू शकेल अन्यथा एक बॅरल पाण्याची किंमत एक बॅरल खनिज तेलापेक्षा अधिक असेल आणि तो दिवस फार दूर नसेल.म्हणून पाण्याची बचत करणे गरजेचे आहे.
श्री.सुंदरसिंग आर.साबळे
गोंदिया
मो.9545254856
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*विषय: आजची बचत; उद्याचे भविष्य*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
लहान असताना पाहिलेला एक प्रसंग, वडिल शेतकरी असल्यामुळे सुटी असली की लहान मोठ्या कामासाठी आम्हाला मदतीला घ्यायचे.बाजरीचे खळे चालु होते.भलीमोठी सुडी (सुडी म्हणजे बाजरी काढनी झाल्यानंतर कनसासहीत त्याच्या पेंढ्या वाळुन त्याचे एकच रचलेले मोठे बुचाड)होती. मोडणी होत आली होती.वडील एका बीळाच्या मागोव्याने कुदळीने खोदत होते.मला समजेना हे काय करताहेत.पण थोड्याच अंतरावर भलामोठा कणसाचा ढिग होता .उंदिर त्या सुडीतील धान्य तर खात होताच,पण पुढील काळासाठी ठेवत होता.या उदाहरणावरुन एक लक्षात घेतले पाहिजे,भलेही तो उंदिर शेतकर्याच्या कष्टाचे खातोय व साठवतोय. पण ती एकप्रकारची बचतच समजुया.
मी आज काही मुद्याला अनुसरुन बचतीचे फायदे व ती बचत कशी करता येईल हे सांगु इच्छिते.
*वेळ*: वेळेच्या बाबतीत बचत करा असं मी म्हणनार नाही.Time is mony.अशी एक म्हण आहे .खरोखर वेळ कुणासाठी थांबत नाही.आजचे काम आत्ताच करा ,उद्याचे काम आजच करा .म्हणजेच वेळेची बचत करा .जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे .गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीही येत नाही .आणि मग पश्चातापाशिवाय पर्याय उरत नाही.
*पैसा*:चंगळवादी संस्कृतीमध्ये कितीही पैसा असला तरीही पुरत नाही.आजची काटकसर उद्यासाठी कामी येत असते .मानसाच्या गरजा वाढल्या. नको त्या सुखसोयीच्या मोहापायी माणुस भरकटत जात आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे नियोजन हवे .आपले उत्पन्न ,गरजा व त्यातुन राहनारी शिल्लक म्हणजेच बचत .अनावश्यक बाबी टाळुन माणुस बचत करु शकतो. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते.आवश्यक आहे तो खर्च तर करायलाच पाहिजे ,पण जिथे गरज नाही असा खर्च टाळुन आपण बचत करु शकतो .माणसाच्या मुलभुत गरजा अन्न,वस्र,निवारा या आहेत. यात चंगळवाद कसा होतो पहा:उदा अन्न : बाहेरचे चमचमीत खाण्याची सवय लागली तर,घरचे अन्न बेचव लागते. ज्यावेळी आपण प्रवासात असतो तेव्हा बाहेर खावेच लागते.पण काही लोक असे आहेत त्यांना हॉटेलच्या जेवनाची चटक लागलेली असते.एक लक्षात घ्या घरचे व बाहेरचे अन्न यात जमिन अस्मानाचा फरक आहे. आता दोघेही नोकरीला घरी हम दो हमारा एक या कुटुंबात बाहेर जेवायला जाण्याचे प्रमाण जास्त असु शकते .पण घरीच आपण सकस व चवदार अन्न बनवले तर बाहेरचे ते जिभेचे चोचले पुरवनारे निकृष्ट प्रकारचे अन्न खाण्याची इच्छा होणार नाही .परिणामी बचत होईल .
वस्र: कपडे चांगले असावेत आजकाल राहणीमानावर फार भर आहे .कधी कधी तर व्यक्तिच्या राहाणीमानावरुन त्याची गरीबी, श्रीमंती याचा अंदाज बांधला जातो. राहणी साधी असली तरी विचार उच्च असावेत.मानसाचा बराचसा व अनावश्यक खर्च हा कपड्यावर होतो हे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण करुन सांगावे. आपल्या किती ड्रेस असावेत,?मुलांना किती ड्रेस असावेत?,कपाटात किती साड्या पाहिजेत? हा एक संशोधनाचा विषय आहे.पण आपण इथे बचत करु शकतो एव्हडच मला सांगायचे आहे.
निवारा: माणसाने खरे तर मानुसकी कमवावी,खुप सारे चांगले मित्र कमवावेत. पण खर्या सुखाला पारखा झालेला माणुस खोट्या सुखामागे धावतो. एका कुटुबातील चार लोकांसाठी किती रुमचे घर असावे? मी तर अस म्हणेल ,जितके घर मोठे तितकी मानसाची मनं दुरावतात.खरतर घर छोटेच असावं व खुप सारा प्रेम, जिव्हाळा तिथे ओतप्रोत भरलेला असावा *घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती* यासाठी नियोजन पूर्वक घरासाठी आवश्यक असेल तो खर्च करावा पण, अनावश्यक खर्च टाळुन बचत करता येवू शकते.आज बचत केलेला पैसा नक्कीच अडीअडचनीला कामी येवू शकतो. म्हणुन मानसाने बचत करायलाच पाहिजे.
*पाणी* गेल्या दोन चार वर्षामध्ये पाऊस पडला नव्हता. आणि दुष्काळाची दाहकता काय असते याचा अनुभव मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्राने घेतलेला आहे.हंडाभर पाण्यासाठी किती वणवण फिरावं लागत होत हे आपण अनुभवले आहे. यातुन आपण काय घेनार आहोत. पाऊस दरवर्षी पडेलच याचा नेम नाही. म्हणुन आहे त्या पाण्याचा वापर योग्य ते नियोजन करुन केला पाहिजे. त्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.पाणी हे जीवन आहे. त्याचे उपयोग : पिण्यासाठी व मानवी जीवनात इतर कामासाठी,जनावरांना पिण्यासाठी, शेतीसाठी,औद्योगिकीकरणासाठी यासाठी पाण्याची गरज लागते.माणुस पाणी किती वापरतो यापेक्षा तो ते कसे वापरतो याला जास्त महत्व आहे.पाणी वाया जानार नाही याची काळजी घेणे म्हणजेच पाण्याची बचत होय. शेतीसाठी पाणी वापरतांना आधुनिक तंत्राचा वापर केला तर पाण्याची बचत होवू शकते. उदा: ठिबक सिंचन,तुषार सिंचन यामुळे पाण्याची बचत होवु शकते.
तसेच कारखाण्यातील पाणी वापर करतांना वाया जाणार्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी इतर कामासाठी वापरले पाहिजे.तसेच पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला पाहीजे उदा: जलपुनर्भरन ,पाणी अडवा पाणी जिरवा यामुळे आपण पाण्याची साठवणुक करु शकतो. व योग्य वापरामुळे बचत करु शकतो.
*वीज*अति वीज वापर केल्यामुळे लोडसेडिंगला सामोरे जावे लागते हे आपल्याला माहित आहे .वीज मिळण्याचे मार्ग म्हणजे जलविद्युत,औष्णिक विद्युत,पवनउर्जा,सौरउर्जा हे आहेत. भरपूर पाणी असेल तर जलउर्जा मिळेल. आज आपल्या हे लक्षात येईल की विज हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय . म्हणुन तिची बचत करुन ती दिर्घकाळ टिकावी असे वाटत असेल तर,जास्तित जास्त सौरउर्जेचा वापर करावा. वीज बचतीचे अनेक मार्ग आहेत .जसे *घरात आवश्यक तेवहडीच वीज वापरावी.सेलो बल्पचा वापर करावा.पाणी तापविण्यासाठी सोलार वापरावे. विजचोरी टाळावी. यातुनच वीजबचत करता येईल.
*कागद*आजकाल सगळीकडे पेपरलेसचा बोलबाला आहे. तरीही अनेक ठिकाणी कागदाची गरज भासतेच. तरी पण कागद जपून वापरुन बचत करुया.
*इंधन*इंधनाची बचत करणे मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे.इंधनाचे साठे मर्यादित असल्याकारणाने ते जपून वापरावे.त्यासाठी पायी चालणे. आठवड्यातुन एखाद्या दिवशी सायकल वापरणे,अशा पर्यायामुळे इंधन बचत तर होईलच शिवाय आरोग्य संवर्धनही होईल.
या सर्व बचतीचा भावी जीवनात नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे आपल्या इच्छाशक्तिची .थोडस नियोजन व थोडी काटकसर किती फायद्याची आहे .
करुया बचत आपण सारे
उज्वल भविष्य घडविण्यारे
आस आहे इच्छा शक्तिची मोठी
बचत करुया उज्वल भविष्यासाठी
सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शा.
पिठ्ठी ता पाटोदा जि. बीड. 9403593764
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
..........बचत.........(जल; विद्युत;पैसा व इतर)
बचत करणे ही आजच्या काळाची गरज आहे. बचत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त पैशाची बचत; पैसा वाचविणे ही संकल्पना दृढ झालेली आहे. परंतु बचत ही जलाची; विद्युत; पैसा व इतर गोष्टी म्हणजेच खनिजे; पेट्रोलियम पदार्थ कोळसा पर्यावरण यांची करायला हवी. सृष्टी वरील सर्वच प्राणीमात्रांना पाणी हे जगण्याकरता आवश्यक आहे. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. अन्न वस्त्र निवारा या जरी माणसाच्या मूलभूत गरजा असल्यातरी एक वेळ माणूस अन्नावाचून जगू शकेल; परंतु पाण्यावाचून जीवन जगणे कठीण आहे.
म्हणूनच पाण्याची बचत करायला हवी. आवश्यक असेल तेव्हाच नळ सुरू करणे; काटकसरीने पाण्याचा वापर करणे हे फार महत्त्वाचे आहे."पाणी अडवा; पाणी जिरवा'"ही योजना शासन युद्धपातळीवर राबवित आहे. शहर खेड्यात सुद्धा जनजागृती करून पाण्याची बचत सांगणे काळाची गरज आहे. शहरांमध्ये विशिष्ट वेळेलाच नळ योजनेद्वारे पाणी दिल्या जाते. पाण्याचा उपयोग घरच्या लोकांनी आवश्यक असेल तेवढाच करायला हवा. मोठ-मोठ्या नद्यान वरती धरणे बांधून जल बचत करायला हवी. आजच्या काळात विद्युत बचतीला फार महत्त्व आहे. नाहीतर साऱ्या जगाला अंधकारमय युगात जावे लागेल. विद्युत नसेल तर लाइटिंग; रनिंग मशिने बंद होतील. त्यामुळे विद्युत बचत ही फार महत्त्वाची बाब आहे.
पाणी आणि विद्युत यांचा जवळचा संबंध आहे. आपण पाणी वाचवितो तर पाण्याची बिल जास्त येत नाही. हा सिद्धांत विद्युत साठी कामात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी फार महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाणी आणि विद्युत. पाण्यावाचून जीवन राहणार नाही तर विद्युत शिवाय रोजच्या आवश्यकता कामे होणार नाही. विद्युत बचत करण्यासाठी लोक कमीत कमी मी उर्जा चा वापर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गरम पाणी कमीतकमी वापरणे; कुशल उपकरणांची निवड; सामानाचा योग्य वापर करून बुद्धी मानाने प्रयोग करणे. जेव्हा लाईटचा उपयोग नसेल तर बटन बंद ठेवायला पाहिजे. घरी दरवाजे बंद ठेवून केवळ उपयोगात येणाऱ्या रूममध्ये. गरम किंवा थंड ठेवून ऊर्जा बचत केली जाऊ शकते.
पाण्याची बचत; विद्युत बचत केली तर पैशाचीही बचत होते. पैसा जीवनासाठी आधारभूत घटक. त्याच्याशिवाय दैनिक जीवनाची आवश्यकता पूर्ण होत नाही. पैशाची बचत करण्यासाठी गुंतवणूक करायला हवी त्यासाठी सर्वसामान्य खर्चासाठी अलग बँक खाते असायला हवे. एक बजेट बनवून पैशाचे नियोजन करायला पाहिजे. ज्या वस्तू आवश्यक नसेल त्या गोष्टी खरेदी करायला नको. आपल्या खर्चासाठी नियोजन करून पैशाचा विनियोग करावा."थेंब थेंब तळे साचे"ही म्हण लक्षात ठेवून पैशाची बचत करायला पाहिजे. ज्याप्रमाणे जल; विद्युत पैशाची बचत आवश्यक आहे त्याचप्रमाणे इतरही गोष्टींची बचत करायला हवी. इतर गोष्टी म्हणजे कोळसा; पर्यावरण; वनस्पती; खनिजे पेट्रोलियम पदार्थ वेळ व कागद इत्यादी.
इंधन देखील अमुल्य आहे. त्याच्याशिवाय देखील आपण जीवनाची कल्पना करू शकत नाही. इंधन बचत म्हणजे असे पदार्थ की जे आपल्याला कोणत्याही प्रकारची ऊर्जा देतात आणि त्या ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो. इंधन तीन प्रकारची आहे. कोळसा लाकडे; पेट्रोल डिझेल केरोसिन; आणि गॅस रूपात एलपीजी गॅस. इंधन नसेल तर जीवन जगणे मुश्कील आहे. कोळशामुळे ट्रेने चालतात. गावात स्वयंपाक करण्यासाठी कोळसा उपयोगात येतो. पेट्रोल आणि डिझेल मुळे सारे वाहने चालतात. एलपीजी गॅस मुळे जेवण व इतर पदार्थ बनविले जाते. म्हणून या सर्व गोष्टींची बचत फार महत्त्वाची आहे.
एकंदरीत बचत करणे ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे.
(Save water ; electricity; ;money; petrol;Gas and save your life.)
सौ. भारती दिनेश तिडके पदवीधर शिक्षिका घुमरा प.स. गोरेगाव जिल्हा परिषद
गोंदिया.
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
बचत : ऊर्जेची
माणूस कुठल्याही गोष्टीसाठी ऊर्जेवर अवलंबून असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरातल्या कितीतरी कामांसाठी ऊर्जेशिवाय दुसरा पर्याय नाही, नसतो. असे वाटते, पूर्वी जेव्हा ही विद्युत ऊर्जा नव्हती तेव्हा कसे लोक जगत असतील ?
आज सबंध जगाला ऊर्जेमुळे किती वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समजून उमजून योग्य रीतीने ऊर्जा वापरल्यास बचत नक्कीच करू शकतो.
आपण स्वतः सुद्धा डॉंकी वर्क न करता स्मार्टली काम केल्यास आपली स्वतःची ही ऊर्जा बचत होतेच की!!!
दक्षिण आफ्रिकेत इंधनाच्या वाढत्या किमती ची समस्या आहे. आपल्याकडे सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किमती खूप वाढत आहेत. दुसरे असे की ही जी तेले आहेत, त्यांचा साठा मर्यादित असतो. आजच्या पिढीने त्याची बचत केली नाही तर पुढच्या पिढीच्या वाट्याला किती इंधन राहिल?
त्यासाठी शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करावा. प्रत्येकाने वेगळी गाडी वापरण्या पेक्षा कार- पुल करून चार-पाच जणांनी एका गाडीतून जावे. घरातून निघताना कामाची यादी करावी म्हणजे जास्त चकरा माराव्या लागणार नाही व इंधन म्हणजे ऊर्जेची बचत होईल. पेट्रोल, डिझेलचा वापर जितका कमी होईल तितकी हवा कमी प्रदूषित होईल. सायकलचा उपयोग करता आला तर उत्तमच.
घरात गरम पाण्याचा वापर कमी करावा. गरम करण्यासाठी ऊर्जा म्हणजे वीज खूप लागते. म्हणून गिझर मध्ये टेंपरेचर कंट्रोलर बसवावा. म्हणजे जेवढे पाणी गरम हवे त्या टेंपरेचर पर्यंत पाणी गरम होईल, त्यामुळे ऊर्जेची बचत होईल. तसेच सोलर हिटर बसवावा. त्यामुळे खूपच उर्जा वाचते व विजेचे बिलही कमी येते. पैशाचीही बचत होते.
घरातील, ऑफिसमधील उपकरणे बाहेर जाताना बंद करावीत. ट्यूबलाईट, कम्प्युटर, ओव्हन, मिक्सर इत्यादी उपकरणे वापरात नसतील तेव्हा बंद करून, त्याचा प्लग काढून ठेवावा. म्हणजे ती उपकरणे पूर्णतया बंद होतात. नाहीतर त्यातून थोडी थोडी वीज वाया जाते. गरज नसताना लाइट, पंखे बंद करावे.
विद्युत ऊर्जेच्या बचतीसाठी ह्याही गोष्टी कराव्या. बल्ब आणि ट्यूबलाइट वर जमलेली धूळ साफ करावी. पंख्यांची ब्लेड साफ करावी. त्यांना नियमित ग्रीसिंग करावे. जुने रेग्युलेटर बदलावे. फ्रीज चा दरवाजा सारखा उघड बंद करू नये. फ्रीज ची कूलिंग ऑइल स्वच्छ ठेवावी. टीव्ही, म्युझिक सिस्टिम, इत्यादी गोष्टी स्टँड बाय मोडवर ठेवू नये. वॉशिंग मशीन मध्ये गरम पाण्याचे टेंपरेचर नियमित करावे. ए.सी. नेहमी 22 ते 25 डिग्री वर ठेवावा. तो उन्हात ठेवलेला नसावा. घरात सीएफएल किंमत एलईडी बल्ब वापरावे. त्यामुळे 75% ऊर्जेची बचत होते. विद्युत उपकरणे आय. एस. आय. मार्क असलेली वापरावी. दिवसा सूर्यप्रकाशाचा वापर जास्तीत जास्त करावा. घरातील टाकी भरताना टायमर लावून ठेवावा. रस्त्यावरच्या दिव्यांचा साठी फोटो इलेक्ट्रिक कंट्रोल स्विच चा उपयोग करावा. म्हणजे वेळच्या वेळेला रस्त्यावरचे दिवे लागतील व बंद होतील. त्यामुळे ऊर्जेची बचत होईल.
घराच्या सभोवती जागा असेल तिथे झाडे लावावी. म्हणजे सावलीमुळे घर थंड राहते. त्यामुळे पंखे, कुलर, एसीचा वापर कमी होतो. घराच्या भिंतींना फिके रंग लावावे, म्हणजे किरणे परावर्तित होऊन जास्त उजेड पडतो. व दिवे कमी लावावे लागतात. जेवण बनवताना सोलर कुकरचा वापर करावा. इलेक्ट्रिसिटी बंद असल्यास सगळे दिवे, पंखे बंद ठेवावे. नाहीतर इलेक्ट्रिसिटी आल्यावर ते तसेच चालू राहतात.
ह्या सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पाळल्या त्याची सवय लावून घेतली तर आपोआपच ऊर्जेची बचत होईल. बिल कमी आल्यामुळे पैशाचीही बचत होईल.
ग्रामीण भागात शेती जास्त प्रमाणात असते. तिथे शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी, बैल बरेच असतात. त्यांचे मलमूत्र, पालापाचोळा वगैरे वापरून गोबर गॅस प्लांट तयार करू शकतो. त्यामुळे स्वयंपाकाला तर गॅस मिळतोच. पण घरातले बल्ब, पंखे त्यावर चालू शकतात. त्यामुळे विद्युत ऊर्जेची बचत होते.
प्रत्येक जण जर म्हणाला, की मी एकट्याने ऊर्जा बचत केल्याने काय होणार आहे? तर लक्षात ठेवा 'थेंबे थेंबे, तळे साचे'. ऊर्जा बचतीमुळे आपला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जाईल. उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल.
शुभदा दीक्षित (11)
पुणे
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
आयुष्य आणि विचारांची बचत करा
प्रत्येकाला आयुष्य भेटलेले आहे.कोणाला एका दिवसाचे तर कोणाला जास्त वर्षाचे त्यानुसार माणसाच्या आयुष्याचे दिनमान ठरलेले आहेत.गाई,कुत्रे,बक-या मेंढ्या यांचे आयुष्य दहा ते पंधरा वर्ष असते तर त्यातच कासवाचे आयुष्य तीनशे वर्ष.किंड्या मुंग्याचे आयुष्य दोन ते तीन दिवसाचे असते.तर झाडाचे आयुष्य कितीतरी दिवस.त्यातच पृथ्वी आणि सुर्याचेही आयुष्य माणसानं संशोधनातून बनवलेलं असून ही पृथ्वी केव्हा नष्ट होणार हेही माणूस सांगतो.
माणसाचं आयुष्यही ठरलेलं असून त्याचं सरासरी आयुष्य हे शंभर वर्षाचे आहे.हे शंभर वर्ष केव्हा निघून जाते ते कळत नाही.हे आयुष्य चांगल्या वाईट घटनांनी गाजलेले असून या घटना आहेत.म्हणून माणूस जीवंत आहे.एखाद्या माणसाला सतत दुःख असेल,तर तोही जीवंत राहू शकत नाही.त्यांचा अल्पावधीत मृत्यू होतो.तसेच एखाद्याच्या आयुष्यात सुखच सुख असेल तर तोही अल्पावधीतच मृत्यू पावतो.त्यामुळं आयुष्य जरी शंभर वर्षाचं असलं तरी कोण केव्हा मरेल हे सांगता येत नाही.महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे.त्याची आपण बचत करायला हवी.
जसजसं आपण आपलं आयुष्य जगत असतो.तसतसे आपले दिवसं निघून जातात.पण या जाणा-या दिवसाबरोबर आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात.हे अनुभव जेव्हा येतात.तेव्हा त्यातून काही विचार निघतात.कुणाला वाईट अनुभव येतात तर कुणाला चांगले.मग विचारही तसेच येतात.ज्यांना कुणाला वाईट अनुभव येतात.त्यांना वाईटच विचार येतील असे नाही किंवा ज्यांना चांगले अनुभव येतात,त्यांना वाईट विचार येतील असे नाही.तेव्हा अनुभव काहीही येवो आमची विचार करण्याची शक्ती ही चांगली असायला हवी.ती जर वाईट असेल तर आमचे विचारही वाईट असतीलच.पण ज्यांची विचार करण्याची शक्ती चांगली असेल त्यांचे विचारही चांगलेच असतील.म्हणून तुमची विचारशक्ती कशी यावर तुमचे विचार अवलंबून असतात.
माणसाचा जन्म हा कितीतरी जन्म घेवून मिळतो अशी आख्यायिका आहे.पुनर्जन्म हा होतो व या जन्मात केलेले पाप पुढच्या जन्मात भोगावे लागते असं म्हणतात.त्यात जरी सत्यता नसली तरी विश्वास हा ठेवावा लागतो.
महत्त्वाचे म्हणजे आज चांगल्या विचारांची गरज आहे.तेव्हा असे विचार आपण संग्रही ठेवायला हवे.त्या चांगल्या विचारांची बचत करायला हवी.ते विचार उडून जाणार नाही.याची काळजी घ्यायला हवी.जेणेकरुन चांगल्या विचारातून चांगले नागरीक घडवता येईल.माणसाच्या आयुष्याची ही बचत करायला हवी.असंच मिळालेलं अनमोल आयुष्य मातीमोल करु नये.कारण वाईट विचारातून आपलं आयुष्य बरबाद होते आणि मिळालेला जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*पाण्याची बचत*
'पाणी हे जीवन आहे' किंवा 'जल नही तो कल नही'..अशा प्रकारची घोषवाक्य किंवा slogan आपण नेहमीच एकत आलो आहोत. ऐकंदरीतच काय तर, सगड्यात सजीवसृष्टी साठी अत्यंत आवश्यक आहे. पण पाण्याचा केवळ निष्काळजी पणे वापर केल्यामुळे 'पाणी बचत' हा कळीचा मुद्दा झाला आहे. पाण्याचा पृष्ठ सगड्यांनाच भेढवसावतो आहे अगदी हंडाभर पाण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागते किंवा टँकरसाठी( tanker) तासंनतास लांबलचक रांगे मध्ये उभ रहावे लागते. या सगड्या परिस्थितिमुळे सामान्य माणूस मात्र हदबल झालयं आणि या परिस्थितीशी सामना करायच्या असेल तर उपाय एकच आहे की पाणाचं अतिशय काळजीपूर्वक नियोजन करण आवश्यक आहे. केवळ पाण्याची बचत करा अस ऐकून किंवा बोलून चालणार नाही तर ते प्रत्येकक्ष्यात आणाव लागणार आहे. मुळात काय तर प्रत्येकाला 'पाणी बचत' ही सवयं बनवावि लागणार आहे आणि हे कस शक्य होणार आहे....
यासाठी जाणून घेऊया पाण्याचे महत्व आणि पाणी वाचवण्याच्या काही सोप्या टिप्स...
2)पाण्याचे महत्व.....?:-
पुथ्वीवर एकूण पाण्याचे प्रमाण 71 टक्के आहे. मात्र हे सर्व पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाही कारण पृथ्वीवरील 96.5 टक्के पाण्याचा भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील फक्त 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंस्था आणि पाण्याची गरज पाहता हे पाणी वाचवण्याची गरज अधिक आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या रिपोर्टनुसार, 2017 सालापर्यंत जागतिक लोकसंख्येमधून केवळ 71 टक्के लोकांना शुद्ध पिण्य
पुथ्वीवर एकूण पाण्याचे प्रमाण 71 टक्के आहे. मात्र हे सर्व पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाही कारण पृथ्वीवरील 96.5 टक्के पाण्याचा भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील फक्त 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंस्था आणि पाण्याची गरज पाहता हे पाणी वाचवण्याची गरज अधिक आहे.
2) घरात पाण्याची बचत कशी कराल? यांचे टिप्स...:-
पाण्याची बचत जशी सामूहिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. तशीच ती वैयक्तिक पातळीवर आणि स्वतःच्या घरातून करणं गरजेचं आहे. आपण रोजच्या कामासाठी वापरत असलेलं पाणी वाचवून आपण देशावर येणारं पाणीटंचाईचं संकट कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो. यासाठी घरात पाणी बचत उपाय नक्की कसा करायचा याच्या काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा. पाणी वाचवण्याचे उपाय अनेक आहेत फक्त ते नीट फॉलो करता यायला हवेत...जसे
1)अंघोळीसाठी नळ अथवा शॉवरचा वापर करण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन त्याने अंघोळ करा. ज्यामुळे अंघोळीसाठी कमी पाण्याचा वापर कमी केला जाईल. बऱ्याचदा शॉवर खाली अंघोळ केल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असते.पाणी बचतीचे उपाय करताना हे लक्षात ठेवणे गरजेच आहे.
2) बाथरूममध्ये जर एखादा नळ अथवा पाईप लिकेज असेल तर त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा. कारण या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ शकते. यासाठी शक्य असल्यास त्वरीत अशी कामे करण्याचा प्रयत्न करा.
3)भाज्या अथवा फळे नळाखाली धुण्याऐवजी ती एखद्या भांड्यात घेऊन धुण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे पाणी कमी प्रमाणात वापरले जाईल.
4) स्विमिंग पुल अथवा वॉटर पार्कमध्ये जाणे तितके टाळा. कारण या माध्यमातून मौजमजा करण्यासाठी आपण अनेक लीटर पाण्याचा अपव्यय करत असतो.
5) बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी तुषार सिंचन अथवा ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करा..
मित्रांनो,
आजच्या स्थितित लोक,
जर का नळ चालू असेल ,तर तो नळ देखील बंद करत नाहीत. आपन जर का पाण्याची बचत केली नाही. तर आपल खूप नुकशान होऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी पाण्याचा वापर योग्य प्रकारे केले पाहिजे,
लोकांना अजूनही पाण्याचे महत्व कळलेलं नाही ये..!
या भुततलावावर पाणीच राहील नाही तर , एक दिवस असा येईल की सपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल..
(पाणी वाचवा ,जीवन वाचवा)
नाव:- अमित बडगे
(नागपुर)
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
# मी जल बोलतोय ! #
मी आहे जल ! तुम्ही मानव मला जीवन असेही संबोधता . कारण माझ्यामुळेच तर तुमचे अनमोल जीवन आहे ना ! माझ्यावाचून तुमचे जीवन निर्थकच ! मी प्रत्येक क्षणी तुम्हांला सहकार्य करतो . तुमची तृष्णा तृप्त करून मी माझे धर्मपालन करतो .एकंदरीत माझे जीवन तुम्हा पृथ्वीवासीयांसाठी स्वाहः करतो !
माझा वापर जसा जीवनात अनेकविध कार्यांसाठी होतो तसाच तुमच्या बोलीभाषेतही होतो . अनेक वाक्यात , म्हणीत , सुभाषितात माझा उपयोग करून घेता गडे ! कधी म्हणता लाथ मारील तेथून पाणी काढीन , तर कधी म्हणता बुक्कीला पाणी पाजवील ! कधी म्हणता माझ्या आशेवर पाणी फिरले तर कधी म्हणता कुठंतरी पाणी मुरतयं ! एकच पाणी हा शब्द विविध अर्थाने व्यक्त करण्याची तुमची हातोटी खरंच वाखाणण्यासारखी आहे बुवा !
बरं हे सर्व जाऊ दे ! मुद्याचं बोलूया जरा आपण ! पूर्वी आम्ही पृथ्वीवर मुबलक प्रमाणात होतो . तुम्ही जेथे लाथ मारालं तेथे आम्ही उपस्थित व्हायचो . खरंच ! अगदी दहावीस फुटांवर आमचा स्त्रोत लागायचा . पण आता हजारो फुटांवर शोधूनही तुम्हाला निराशाच पत्करावी लागते राव ! हे असं का होतंय याचा कधी तुम्हां मानवांनी गांभीर्याने विचार केलातअशा का ? यावरील उपाययोजना कधी जातीने दखल घेऊन पूर्ण केल्या का? मुळीच नाही मानवा !
अरे मानवा! आमचे जीवन हे फक्त तुम्हां पृथ्वीवासीयांसाठीच समर्पित असते रे ! आम्ही आमचा एकही थेंब स्वतःसाठी वापरतो का रे ? मग तू एवढा आमच्या जीवावर का उठलास बाबा ? अरे तुझ्या स्वार्थीवृत्तीने व निष्काळजीपणाने आम्हांला विकृत व अशुद्ध करून ठेवलयं ! आमच्या अस्तित्व कुकलंकित केलेस . अरे आम्ही सुखी तर तुम्ही सुखी ! आमच्या प्रवाहाच्या गतीतच तुमच्या जीवन प्रवाहाची गती ठरलेली असते बाबा ! तू आम्हांला इतके अशुद्ध व प्रदूषित केले की आमची आम्हांला पाहून किळस नि घृणा वाटत आहे . अनेकदा तिर्थक्षेत्री लोक आम्हांला पवित्र व अमृत म्हणून प्राशन करायचे . पण आता आम्हांला विषसमान समजले जातात ! हे सर्व मानवा फक्त नि फक्त तुझ्यामुळेच रे !
पूर्वी आम्ही नदी - नाल्यांतून धो- धो व्हायचो ! आबालवृद्धांपासून प्राणीमात्रांपर्यंत सर्वच आमच्यात मनसोक्त पोहायचे . त्यांच्या आनंदात आम्हीही स्वतःला आनंदीत व कृतार्थ मानून धन्यं व्हायचो ! पण आता हे दृश्य दुरापास्तच होतं चाललयं . वरच्या वर आमची जीवन पातळी खालावत चाललीयं . याला कारणीभूत फक्त आणि फक्त तूच मानवा आहेस , समजलं ! तू आमची इतकी उधळपट्टी व नासाडी केलीस त्याचे मोजमाप करता येत नाही .
अरे , आमच्यासाठी तुझ्या काही बांधवांना कित्येक मैल दुरवर जावे लागते . काही मानव तर आमच्यासाठी इतके आक्रमक होतात की समोरच्याचा जीवही घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत . काही स्त्रीया - मुली आमच्यासाठी घाईघाईनं तोल जावून विहीरीत जलसमाधीस प्राप्त होतात . कुठं पिके आमच्यावाचून करपून जातात तर कुठं बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना जीवाला मुकावे लागते !
मानवा व्यर्थ वेळ दवडू नकोस . सोडून दे जरा तुझा हा अल्लडंपणा ! आमचा अपव्यय टाळून गरजेनुसार वापर कर . आमचा पूर्नवापर करून आमचा संचय वाढव . सुयोग्य व नियोजितरित्या आमची साठवण कर . शेती , कारखान्यात गरजेनुसार आमचा वापर कर . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू भरपूर झाडे - झुडपे लावं ! अरे , ह्या झाडांचा व आमचा चोली - दामनचा संबंध आहे रे बाबा !
जीवनात जसे श्वासाला महत्त्व देतोस तसेच आम्हांला दे ! निदान तुझ्या काही पिढ्या आमच्या दर्शनाचे लाभार्थी ठरतील . पूर्वी राजे - महाराजे आम्हांला करतली घेऊन शपथ घ्यायचे . तेव्हा आज जलसंर्वधन व जलसंरक्षण करण्याची तू शपथ घे .
"आधी केले मग सांगितले " , या उक्तीनुसार तू स्वतःपासूनच आमच्यासाठी कार्याला लाग . आम्हांला वाचवून तुझे आयुष्य वाचवं ! आम्ही संपलो तर तुम्हीही संपणार हे त्रिकालबाधित सत्य आहे . याची जाणीव ठेवून जरा वागं . देशील ना तू मला सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन ! जगवणार ना मलाही तुझ्या अनमोल जीवनासारखं ! शेवटी एवढंच म्हणावंस वाटते , " जल हैं तो जीवन है , जल हैं तो कल है ! "
अर्चना गरूड .
मु. पो. ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552954415
[ 14 ]
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
*पैशाची बचत हीच भविष्याची गुरुकिल्ली*.
आपण दैनंदिन जीवनात सगळीकडे बघतो आहोत प्रत्येक व्यक्ति पैशामागे धावत आहे. समाजातील मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरातील असो प्रत्येकाला आपल्याकडे पैसा असावा असं वाटतं. पैसा असेल तर भविष्य सुरक्षित आहे असे अनुभवी व पोक्तांकडून आपण नेहमीच ऐकत असतो. ज्याच्याकडे पैसा असेल त्यालाच समाजात मानाने पाहिले जाते असा समज सुद्धा आहे.
माझ्यामते माणसाने आपल्या भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात मिळवण्यासाठी पैशाची बचत ही केलीच पाहिजे. केव्हा आणि कशी परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. आताचं ताजं उदाहरण बघा. संपुर्ण जगाला कोविड19 ने ग्रासलेले आहे. अशामध्ये ज्यांनी पैशाची बचत केली होती त्यांना आता ती कामी आली. ज्यांनी फक्त वर्तमान स्थितिचा विचार केला व होतं त्यात समाधान मानलं आणि कमावलेला पैसा सोबतच खर्ची घातला त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता यांना लक्षात आलं की आपण आजपर्यंत थोडी बचत जरी केली असती तर आज उपासमारीची पाळी आली नसती.
म्हातारे व्यक्ति नेहमीच म्हणत असतात की, "पैसा राहील तर कुणीही सेवा करेल." हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्या आईवडिलांनी मुलांना वाढवण्यासाठी, शिक्षणासाठी व नोकरीसाठी स्वतःचं सर्वस्व खर्च केलं त्यांनी भविष्याकरिता कोणतीही बचत केली नाही. त्यांना वाटत होतं की हीच मुले मोठी होऊन आपला सांभाळ करतील. मुले कमवायला लागली की आपण म्हातारपणात फक्त आणि फक्त सुख भोगू आणि आराम करू. पण या गरिब म्हातार्या आईवडिलांचे हे स्वप्न स्वप्नच राहुन जातं कारण हीच मुलं मोठी झाली की आईवडिलांनी केलेल्या कष्टाला विसरतात. त्या म्हातार्या आईवडिलांना तुम्ही असं काय केलं? एकही पैसा तर कमावून ठेवू शकले नाही? मी आपलं पोट भरायचं, आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करायचं की तुम्हा म्हातार्यांवर खर्च करायचा? असं बोललं जातं व त्यांना घराबाहेर काढलं जातं. अशावेळी या म्हातार्या आईवडिलांना पश्चाताप होतो की खरंच आपण जर जीवनात थोडी जरी बचत केली असती तर आज ही पाळी आपल्यावर आली नसती. म्हणून अशा अनुभवींचं अनुभव घ्यायला पाहिजे भविष्याकरिता पैशाची बचत ही केलीच पाहिजे.
'पैसा पैशाकडे धावतो'. अशी एक प्रचलित म्हण आहे. याचे वेगवेगळे अर्थ निघतात. माणसाकडे थोडासा पैसा असेल तर त्यात वाढ व्हावी म्हणून माणूस विविध मार्गाने पैसा कमवायला लागतो व हव्यासापायी होते तेही गमावून बसतो आणि शेवटी डोकं पकडून बसतो. माणसाने पैसा कमावतांना तो योग्यरित्या व योग्य मार्गाने कमावणे आवश्यक आहे. नुसते पैसा कमवायचा व बचत करायची हेच ध्येय नसावे.
पैशाची बचत करतांना पुढील बाबी लक्षात घेऊनच बचत करायला पाहिजे.
पैशाची बचत करतांना काही बाबींचा विचार करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.
*आपल्या कडे असलेल्या पैशातून सर्वप्रथम आपल्या दैनंदिन व आवश्यक गरजा पुर्ण करून मगच बचत करायला हवी. *अनावश्यक खर्च टाळावे व उरलेला पैसा थोडा थोडा करून बचत करावा.
*पोटाला चिमटादेऊन किंवा उपाशी राहुन बचत करायला नको.
* फक्त भविष्य सुरक्षित रहावं म्हणून वर्तमान धोक्यात घालून बचत नकोच.
* मानवी जीवन हे एकदाच मिळतं तरी आहे त्यात समाधान मानुन भविष्याचा विचार करावा.
* नकारात्मक विचारांना दुर करावे. माझ्याकडे पैसा नसेल तर माझं भविष्य कसा होईल या चिंतेने मानवरुपी सुंदर जीवनाला हरवुन बसणार. म्हणून फक्त आणि फक्त भविष्यात येणार्या अडचणींचा नाही तर वर्तमानातील सुखाचा सुद्धा उपभोग घ्यावा.
*पैसा हेच सर्वस्व नसून हे एक उदरनिर्वाहाचं साधन आहे.
*फक्त पैसा असेल तरच मनुष्य सुखी होतो हे विचार बाजूला ठेवा.
असे अनेक कुटुंब आपण पाहतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण सुख नाही. आपल्याकडे भरपूर पैसा असेल तर त्याचा उपयोग समाजाला, समाजातील गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना मदत करायला हवी तरच पैशाचा खरा वापर केल्याचं समाधान लाभेल व घरात सुख येईल. 'पैसा है तो सबकुछ है, वरना कोई किसी को पुछता तक नहीं. 'असा एक गैरसमज समाजात आहे. तो आपल्याला दुर करायला पाहिजे. पैशाच्या श्रीमंती सोबतच मनाची श्रीमंती सुद्धा तितकीच महत्वाची आहे.
पैसा मानवाचे भविष्य सुरक्षित करू शकतो हे 100% खरं म्हणणे योग्य होणार नाही. ज्यांच्याकडे खुप पैसा जमवून ठेवला आहे अशांचे पैशासाठी खुन होत आहेत, दरोडे पडत आहेत, जवळचे व्यक्ति सुद्धा वैरी होत आहेत. पैशाची बचत केल्यानंतर ते योग्य प्रकारे व योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. अज्ञानामुळे व अशिक्षित पणामुळे पैसे बचत केल्यानंतर सुरक्षित न ठेवल्यामुळे शेवटी पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा अनेक कुटूंबियांना आली आहे बचत गुंतवणुकीची अनेक साधने आहेत. त्यांची पुरेपूर माहिती काढुन नंतरच त्या ठिकाणी आपली बचत पुंजी सुरक्षित ठेवायला पाहिजे. एकदा आपण सुरक्षित ठिकाणी पैसे ठेवले आता निश्चिंत राहून चालणार नाही तर काही ठराविक कालावधीनंतर ती ठेव सुरक्षित आहे याची तपासणी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पैशाच्या बचतीच्या हव्यासापोटी आपण कुणावर अन्याय होणार नाही कुणाचे हक्क मारले जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. मानवी जीवनातील खरा यथार्थ हा की आपण आपल्या जीवनात किती जगलो पेक्षा कसे जगलो व आपण आपल्या जीवनात कीती गरजूंना मदत करून सुखी केलं यावर अवलंबून असते. दुसर्याच्या सुखात सुख मानणारा व दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणारा मनुष्य नेहमीच सुखी असतो. म्हणूनच म्हणते की,
फक्त पैसा बचत करणे हेच ध्येय नसावे तर आनंदी व सुखी जीवन जगल्यानंतर भविष्याच्या सुरक्षिततेसाठी केलेली सुरक्षित बचत हीच भविष्याची गुरुकिल्ली होय.
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया.
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
( 4) !! पाणी बचत, काळाची गरज !!
बंडू अंगणात खेळत होता, खेळताना चिखल, माती सारखा फेकत होता,अधून मधून नळ सारखा चालू बंद करायचा,
तेथील भिंतीवर लिहिलेले होते नळाच्या तूट्या नेहमी अनावश्यक वेळी बंद कराव्यात. पण बंडू माञ त्या गोष्टीकडे पूर्ण दूर्लक्ष करायचा, तसा तो लहान अज्ञानीच होता .त्याला एवढी समज नव्हती.तेवढ्यात तिथे शेजारच्या शालिनी काकू आल्या नि एकदमच ओरडल्या "अरे बंड्या, हे काय चालवलस? किती वेळ पासनं हा नळ चालू ठेवलास,. तुला काही समजतय कि नाही?.अरे पैसे नासवणारा ( उडवणारा) असला तरी जमेल पण पाणी नासवणारा नसावा ." मी शेजारी जवळच उभा होतो, पण मी पूर्ण गोंधळून गेलो .
"पैसे उडवणारा असावा, पाणी उडवणारा नसावा." या विचारातच मी पडलो. शालिनी काकू का बरं असे म्हणाल्या असतील या विचारात पूर्ण बुडालो. पाणी नसताना मी त्याच पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलो .शालिनी काकू, बंड्या आणि ते शब्द माझ्या डोक्यातून जाईनात . शालिनी काकू आणि निरक्षर बाई त्यांनी एवढं मोठं तत्व बंड्याला सांगितले आणि मी न सांगता ऐकलं आणि विचार करत बसलो. तसे तत्व कित्येकांनी कित्येकांना सांगितलेले आहेत, पण त्याचा इतका खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला नाही. कि पैसे नासवले तरी चालतील पण पाणी नासवणे नको.
थोडक्यात पैसे पाण्यासमोर महत्त्वाचे नाहीत, तर पाणी महत्त्वाचे आहे.
बघा जगात सर्व गोष्टी रासायनीक प्रक्रिया करून बनवता येतात , पण पाणी कोणी कुठे कृञिम बनविले असे ऐकिवात किंवा अभ्यासात पाहिले नाही. पाणी बनवायची वस्तू अथवा तयार करण्याची नाही, हे सिद्ध होते .फार तर पाणी शुद्ध किंवा इतर सर्व उपयोगासाठी वापरून त्या पासून नविन वस्तू तयार करण्यात येतील किंबहूना येतात. पण तयार होणे नाही.
पाण्याला बरीच नावं आहेत . त्यातील एक नाव जीवन हे आहे.पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे . जीवनात पाणी नसेल तर त्या जीवनात शून्य अर्थ उरेल "जीवाचे जीवन पाणी ,"
पाणी आज खूप महत्त्वाचा ठेवा बनलेले आहे. पूर्वी पृज्यन्यकाळ खूप असायचे असे म्हणे! त्यामुळे पाणी भरपूर असायचे तुटवडा कोठेही भासत नसे . बाहत्तर च्या दुष्काळामध्ये पाणी भरपूर होते, अन्नधान्याचा तुटवडा होता. माणसं अन्न अन्न करून मरायची.
आज उलट आहे, अन्नधान्य विपूल प्रमाणात आहे तर पाण्याचा माञ तुटवडा अधून मधून भासतो. कारण पाऊस कमी जास्त प्रमाणात होतो. असो किती तरी गोष्टी त्यास कारणीभूत आहेत. मतितार्थ असा कि पाणी दुर्मिळ झाले.
जसे पाणी तयार होत नाही तसे ते शिळे ही होत नाही .जलाज्ञा यामध्ये पाहू न घ्या आपल्या लक्षात येईल. पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे अमृत आहे त्याची काळजी घेतली पाहिजे जतन केले पाहिजे.
पाणी आणि बचत, पाण्याची बचत म्हणजे वापर काटकसरीने करायला हवा, उधळण करणे म्हणजे पाणी नको तिथे वापरणे होय. शेवटी पाण्यावाचून काही सत् आणि गत.
बचत आणि ठेव या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. बचतीशिवाय ठेव तयार होत नसते. म्हणून आजची बचत ठेव हि जशी भावी उष्काळ असते तसे आज बचत केलेले पाणी हे उद्याचे संपन्न स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे स्ञोत होऊ शकते. म्हणून पाणी बचत केली पाहिजे.
मासे जीवंत ठेवायचीत पाणी नाही मग एका गृहस्थाने पाच किलो गावरान तूप आणले आणि सोडून दिले ते मासे त्या तुपात चालेल का ? सांगितले पाण्यापेक्षा तूप महाग आहे म्हणून पाण्यापेक्षा तुपात त्यांना ठेऊ या !पण नाही " जीवना वेगळी मासूळी " राहूच शकत नाही. तसे सान जीवापासून ते बलाढ्य प्राणी माञासाठी पाणी गरजेचं आहे.
पाण्याची बचत करा, संभाळा पाणी बिलकूल गरजेची गोष्ट आहे ते कोणातही मिसळते कोणालाही आपलेसे करते , ते चढा कडून उतारा कडे वाहते , पाण्याला आपपर भाव नाही. प्रत्येकाने तुष्ट व्हावे मग ते कोणीही असो उदा . व्याघ्र असो कि गाय आत्मा शांत करणे, तृषा हरविणे हाच उद्देश फक्त असतो.
म्हणून अशा या जीवनाची बचत केली पाहिजे.
पाणी टिकले तरच जग टिकेल अन्यथा जग टिकणारच नाही. जगातील ज्ञात अज्ञात,पशू,पक्षी, किटक सर्व पाण्यामुळे जगतात म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याची बचत करा , पारंपारिक पद्धतीने शेती आणि पिकाला पाणी देण्याची पद्धत बदलली पाहिजे. नविन तुषार, ठिबक पध्दत वापरली पाहिजे तरच पाणी बचत केली जाईल
पाणीच काय कोणतीही गोष्ट, वस्तू असल्या वर तिचे महत्व समजून येत नाही पण तिच गोष्ट नसल्यावर माञ तिचे महत्व उमगते. चातक पक्षी पडणार्या पावसाच्या पाण्याकडे कसा टक लावून पाहत असतो कारण तो जमिनीवरील पाणी पित नाही आणि म्हणून वाट पाहतो. तसं मेघ सुद्धा अतूर असतात चातकासाठी.
आज पाणी बचत सर्वात मोठी गरज होऊन बसली आहे म्हणून पाणी बचत केली पाहिजे.
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
कामाचा उरक हीच वेळेची बचत
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
शहापूर ,(ठाणे)9226435827
आज काल सगळेच जण इतके बिझी आहेत की 'सध्या वेळ नाही',ही सबब सगळेचजण सांगत असतात.परंतु दिवसभर आपण करीत असलेल्या विविध बाबी जर पहिल्या तर किती क्षणांचा आपण योग्य उपयोग करून वेळ वाचवतो हा संशोधनाचा विषय ठरू शकेल.
आपल्या एकूण वेळे पैकी आपण स्वतःसाठी देखील वेळ वाचविणे महत्वाचे असते. आपल्या आरोग्यसाठी जसा उत्तम आहार गरजेचा आहे तितकाच शरीरासाठी व्यायाम ,यांचीही गरज असते.,पण वेळ नाही या सबबी खाली बरेचजण महत्त्वाची गोष्ट टाळून आराम व आळसा मध्ये घालवत असतात. खरे तर दिवसाच्या चोवीस तासांपैकी झोप व जेवण तसेच काही अत्यावश्यक बाबींसाठी दहातास जरी व्यतीत करीत असलो तरी उरलेल्या चौदा तासांतील उपयोग आपल्या दैनंदिनी व्यवहारासाठी करून आपल्या स्वतःच्या मनाला आनंद देणाऱ्या मनोरंजनासाठीही काही वेळ बचत करून ठेवणे आवश्यक असते.
जगामध्ये काही माणसं आपल्या कामातील बराचसा वेळ गप्पा व दुसऱ्यांच्या उगी तुगी करण्यात खर्च करीत असतात.दुसऱ्याच्या निंदा नालस्ती करण्यात वेळ घालविण्या पेक्षा आपला वेळ योग्य कारणासाठी व्यतीत करणे कधीही योग्य असते.
आपल्या स्वतःला आनंद देणाऱ्या ,ज्ञान देणाऱ्या कृती साठी वेळ देण्याबरोबरच आपल्या कुटुंबासाठी आपल्याला उपलब्ध वेळ वाचविणे आवश्यक ठरते.बऱ्याचदा आपल्या व्यापातून उरलेला वेळ मोबाईल,टी. व्ही.बघण्यात घालवला जातो.त्यातून एकाच घरात राहूनही आपल्या मुलांसोबत आपल्या कुटुंबाशी सुसंवाद न राहता पारिवारिक जीवन धोक्यात आल्याची बरीच उदाहरणे पाहायला मिळतात.आज बऱ्याच कुटुंबांमध्ये मुलांना देण्यासाठी वेळ सोडून सर्व काही आहे.परंतु या सर्व काहीमुळे आपल्या मुलांच्या कडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने वेगळेच कौटुंबिकब कलह वाढताना दिसत आहेत.
खरे तर कामाचा उरक हाच वेळेच्या बचतीचा एकमेव मार्ग आहे. वेळेची बचत करणे हे आपल्याच हातात असते.बऱ्याचदा आपल्या सर्वांचा कल एका वेळी एकच काम करण्याकडे असतो.बऱ्याचदा ये खरेही आहे. पण काहीवेळा याच्यांनी बराच वेळ फुकट जात असतो. आपण बाजारात जात असू ...!आणि घरातील संपलेल्या वस्तुंची यादी करण्याची सवय असेल तर एकाच फेरीत आपल्याला आवश्यक गोष्टी घरी आणता येतात.याच वेळी बिल भरणे,पोस्टातील कामे केल्यास आपला बराचसा वेळ वाचू शकतो.आज काल सामजिक माध्यमांच्या अतिरेकी वापराच्या सवयीनं रात्री उशीरा पर्यंत जागणे व सकाळी उशिरा उठण्याची नवी जीवनशैली आल्याने बराचसा वेळ कसा वाया जातो हे कळत नाही. यातूनच तरुणांना आपल्या अभ्यासालाही वेळ मिळत नसल्याची तक्रार आज काल मुले करताना दिसत आहेत.
दोन मिनिटांसाठी ओपन केलेल्या व्हाट्सएपच्या मोहात आजची पिढी इतकी अडकलेली आहे की अनावश्यक मेसेज डिलीट करता करताच त्यांचा बराचसा वेळ वाया जातांना दिसतो.खरे तर उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन हीच यशाची खरी गुरू किल्ली आहे.आपण बिझी असणे हे खरे तर आपल्या प्रगतीचे लक्षण पण हा बीझीपणा कशासाठी वापरतो हे देखील महत्वाचं आहे.आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करून कामाचा उरक वाढवल्यास वेळेची नक्कीच बचत करता येते. आपल्या दैनंदिन वेळेतून काही वेळ स्वतःसाठी ,कुटुंबासाठी आपल्या मनोरंजनासाठी,आपल्या छंदांसाठी देता येऊ शकतात...!अर्थातच हे तेव्हाच शक्य आहे...जेव्हा आपण वेळेचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करू..!!!शेवटी इतकंच लक्षात घ्या 'गेलेली वेळ केव्हाच परत येत नाही....!'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
"उतू नये, मातू नये,बचतीचा वसा टाकू नये ".
आज बाबांनी वेगवेगळी बिले भरण्यासाठी आईकडे महिन्याचे पैसे दिले .आई म्हणाली अहो लाईट बिल जरा जास्त आले पैसे जरा जास्त द्या. बाबा म्हणाले, जास्त म्हणजे ?आई म्हणाली अहो आता सुट्टी आहे; सगळे घरी आहे त्यामुळे लाईट बिल जास्त आले. बाबा चिडले जास्त भरायला काय जातंय तुमचं पैसे मला भरावे लागतात तुम्हाला कुठे? जरा बचत करायला शिका. आई म्हणाली हो' तसं मला एकटीलाच लागते सगळं. आरडाओरड ऐकून शुभा आणि चिंटू दोघेही हॉलमध्ये आले. काय झाले आई? बघा ना तुमचे बाबा कसे ओरडत आहेत? जसे लाईट फक्त मीच वापरते. बाबा म्हणाले सगळेच वापरतात मी तुला एकटीला म्हणत नाहीये काही. शुभा म्हणाली; बाबा काय झाले ? का रागावला आहात तुम्ही ?बाबा म्हणाले'" अरे विज बिल किती आले बघता का ?मला ते पहावे लागते, सर्वांनी बचत केली तर हा भार कमी होणार नाही का ?शुभा म्हणाली, पण कशी करायची ती बचत? आजोबांनी हे ऐकले तेदेखील हॉलमध्ये आले ते म्हणाले, बघा बचत करायची तर विचार करावा लागेल, सध्या सुट्टी आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या रूम मध्ये वेगवेगळी कामे करतो, शुभा तिच्या रूम मध्ये अभ्यास करते, आजी तिच्या रूम मध्ये वाती वळते, आई किचनमध्ये भाजी निवडते, चिंटू मोबाईलवर गेम खेळतो, म्हणजे बघा वेगवेगळ्या रूम मध्ये बसल्यावर फॅन चालू करावा लागतो, कारण सध्या किती उकडते शिवाय लाईट चालू राहतात. त्यामुळे विजेचा वापर वाढतो आपण असे करू या का; आपण आपल्या या सर्व गोष्टी हॉलमध्ये दुपारच्या वेळेत एकत्र बसून केल्या तर एकच जागा लागेल म्हणजे वीज बचत होईल. बघा आहेना उपाय !"शोधा म्हणजे सापडेल". आजी म्हणाली, हो हो बरोबर आहे शुभा अभ्यास करता करता तू कधीकधी विरंगुळा म्हणून किचनमध्ये जातेस कधी हॉलमध्ये जातेस तेवढ्या वेळेत रूम मधला लाईट फॅन बंद करायचा. चिंटू तू देखील रूम मधून बाहेर पडताना लाईट फॅन बंद करायचा, ही सवय सर्वांनी लावून घेतली तर वीज बचत होईल. आजोबा म्हणाले' अरे मला आठवते बऱ्याच वर्षांपूर्वी लोडशेडिंग हा प्रकारच नव्हता दिवसभर लाईट असायची परंतु; हळूहळू वीजेचा वापर वाढला कारखान्यांमध्ये विजेचा वापर वाढला', घरगुती वापर वाढला ,त्यामुळे लोडशेडिंगचे संकटाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे .या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्याचे तर किती हाल होतात. दिवसा लाईट नसते .रात्री मोटारीने शेतीला पाणी भरावे लागते. सर्वांनी वीज बचत केली तर वीज निर्मिती ही त्यातून होते हे लक्षात घ्यायला हवे. बाबा म्हणाले, अगदी बरोबर आहे ; काही वर्षांपूर्वी लोडशेडिंग नव्हते परंतु आता विजेचा वापर वाढल्यामुळे आणि वीज निर्मिती त्या प्रमाणात होत नसल्यामुळे लोडशेडिंगचे संकट उभे आहे . पाण्यावर विद्युत निर्मिती केली जात आहे कोळशापासून वीजनिर्मिती केली जात आहे परंतु कोळसा ही साधनसंपत्ती देखील कमी होत आहे त्यामुळे औष्णिक विद्युत निर्मिती निर्मितीलाही मर्यादा आहे .बऱ्याच ठिकाणी धरणांच्या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते धरणे बांधून त्यावर वीजनिर्मिती करता येते परंतु धरणे तरी किती बांधणार त्याखाली कितीतरी शेतकऱ्यांच्या जमिनी जातात कितीतरी लोकांची घरे जातात त्यामुळे धरणे बांधायला ही काही मर्यादा आहेतच ना. निसर्ग देतोय म्हणून आपण घेतच जायचे का? ती म्हण नाही का, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तसेच आपले झाले आहे का ?पाणी ही निसर्गाची निर्मिती आहे 'निसर्ग तर देत आहेत आपण ते वापरतच आहोत परंतु आता पावसाचे प्रमाण देखील कमी झालेले आहे अशावेळी जलविद्युत निर्मिती प्रकल्पांना ही काही मर्यादा आहेत ना! सध्या सरकारी ऑफिसेस मध्ये पाच दिवसांचा आठवडा केला आहे याचे कारण म्हणजे एक दिवस ऑफिसमधील पंखे ,एसी, लाईटवर चालणारी उपकरणे बंद राहतात त्यामुळे वीज बचत होते. आजी म्हणाली," मी देखील आता वीज बचत करणार आहे .आई म्हणाली, कशी काय हो आई? आजी म्हणाली अगं बऱ्याच दिवसात पाटावरच्या वाटण्याचं आमटीचे जेवण केलेच नाही मी आता ठरवले आहे रविवारी पाट्यावर वाटण करायचं त्यामुळे मिक्सर लावायचा नाही . माझ्याकडून तेवढीच वीज बचत होईल .चिंटू म्हणाला मी आणि शोभाताई आता एका रूम मध्ये बसून अभ्यास करू म्हणजे फॅन आणि लाईटची बचत होईल. बाबा म्हणाले मी सुद्धा आता मोटारीच्या पाण्याने गाडी धुणार नाही मी बादलीमध्ये पाणी घेऊन त्याने गाडी धुणार म्हणजे मोटार तेवढी वेळ चालणार नाही आणि विजेची बचत होईल. आजोबा म्हणाले मी देखील आता मोटार चालु करून बागेला पाणी देणार नाही त्याऐवजी बादली आणि झारीचा वापर करून झाडांना पाणी देईल आणि वीज बचत होईल .आई म्हणाली, मी सुद्धा पाइपने मोटार चालू करून अंगणात पाणी शिंपडायची नाही त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन त्याने पाणी शिंपडेल त्यामुळे वीज बचत होईल . आजोबा म्हणाले, घरगुती वीज बचत झाली परंतु कारखान्यांना व्यवसायिकांना देखील अशीच बचत करावी लागणार आहे ,कारण आजची बचत उद्यासाठी वीज मिळवून देणारी आहे. कारखाने व्यवसायिक यांनीदेखील पाच दिवसाचा आठवडा केल्यास वीज बचत होण्यास हातभार लागेल. काही ठिकाणी विज चोरी होते त्यामुळे देखील महावितरण कंपनीला कमी पैसे मिळतात ही वीजचोरी सर्वांनी रोखली पाहिजे. विजेवर चालणारी उपकरणे खरेदी करताना काळजी घ्यावयास हवी. रेफ्रिजरेटर वर फाइव स्टार ,थ्री स्टार असे लिहिलेले असते या स्टार चा अर्थ असा होतो की या रेफ्रिजरेटर ला कमी वीज लागते. पाणी वॉटर हिटर ने तापवतात त्याऐवजी सौर चुलीचा वापर केल्यास वीज बचत होईल. शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी विजेचा वापर करतो. शेतामध्ये सौर पॅनल चे किट बसवून घेतल्यास वीज बचतीस नक्कीच हातभार लागेल. जलविद्युत निर्मिती औष्णिक विद्युत निर्मिती ह्या खर्चिक बाबी आहेत . याला एक पर्याय आहे तो शोधल्यास वीजनिर्मिती नक्कीच होईल .याला पर्याय काय' तर सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे सूर्यापासून तर आपल्याला फुकट वीज मिळू शकते. सौर पॅनल द्वारे आपण वीज निर्मिती केली असता सूर्याच्या ह्या ऊर्जेचा वापर आपल्याला नक्कीच करून घेता येईल .सौर पॅनल बसवण्यासाठी काही प्रमाणात सरकारकडून अनुदानही मिळते. प्रोत्साहनपर योजना ही आहेत त्याचा फायदा आपण सर्वांनी करून घेऊन वीज बचत नक्कीच केली पाहिजे.
आजी म्हणाली कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच अति विजेचा वापर केल्यास उद्या कदाचित अंधारात या मुलांना बसावे लागेल त्यामुळे निसर्गाने जे दिले आहे ते जपून वापरावे उतू नये, मातू नये वीजबचत जरूर करावी वीज बचतीचा हा वसा टाकू नये .
सविता साळुंके, श्रीरामपूर, कोड नंबर13
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
लेख 07
बचत
" थेंबे थेंबे तळे साचे" म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे आपण ती थोडी थोडी वाचवत गेली त्याची बचत करत गेलो कि त्याचा आपल्याकडे भरपूर साठा असतो. बचत म्हणजे आपल्याकडे असलेल्या वस्तूंमधून थोडे थोडे भविष्यकाळासाठी वाचवत जाणे होय. मग यामध्ये दररोज लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी असतील. जसे की पाणी बचत, पैसा बचत,वेळ बचत इत्यादी अनेक घटकांचा यामध्ये समावेश करता येईल. पण मी आज या ठिकाणी एका वेगळ्या विषयाच्या बाबतीत व्यक्त होणार आहे. ती बचत म्हणजे वेळेची बचत होय.आश्चर्य वाटले ना ? वेळ म्हणजेच समय अनमोल आहे. बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला त्या वस्तू थोड्याफार तरी आपल्याकडे राहतात परंतु वेळ ही अशी गोष्ट आहे ति एकदा आपल्या कडून निघून गेली की ती पुन्हा आयुष्यात कधीही परत येत नाही. तुम्ही म्हणाल वेळेची बचत म्हणजे काय करणार तुम्ही? माझ्या मते वेळेची बचत म्हणजे, मला एखादे काम करायला एक तास लागत असेल, त ते काम करता अर्ध्या तासामध्ये करून राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये आपण दुसरे एखादे महत्त्वाचे काम करू शकतो.जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्या त्या त्या वेळेला होणं अतिशय महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपण आळस पणा करतो. व असलेला अनमोल वेळ ही आपण वाया घालवतो. एकदा का वेळ गेला की तो पुन्हा परत येत नाही. यासाठी आपण किती आटापिटा केला, कितीही पश्चाताप केला तरीही वेळ परत येत नाही. त्यामुळे आपण त्या त्या वेळेला जर वेळेचा सदुपयोग केला तर त्यासारखी गोष्ट दुसरी कोणतीही नाही.
जेव्हा आपल्या घरातील लहान मुल असते, निरागस, संवेदनशील असते, अनुकरणप्रिय असते, आपल्या घरच्या लोकांच्या वरच त्याचा दृढ विश्वास असतो.ही वेळ अतिशय महत्त्वाची असते. त्यावेळेला आपण आपला वेळ देऊन त्या मुलावर संस्कार करण्यामध्ये जर घालवले तर ते मूल पुढे आदर्श नागरिक म्हणून पुढे येईल, आपली सेवा करेल. जर आपण असे केले नाही तर, ते मुल पुढे मोठे होऊन एक बेदरकारकार, असंवेदनशील, मवाली सुद्धा होऊ शकते. अशावेळी आपण पश्चाताप करून आपल्या मुलाकडे लक्ष दिले असते असते तर म्हणत बसलो तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. म्हणजे त्या वेळेला आपण आपल्या असलेल्या वेळेची बचत करून तो वेळ आपण आपल्या मुलांच्या कडे दिला तर आपण आयुष्यभर सुखी व समाधानी राहू शकतो. यालाच वेळेची बचत केली असे म्हणू शकतो.
त्याचबरोबर कोणतेही काम करताना आपण मन ओतून जर ते काम केले तर ते काम चांगले होते व आपल्याकडे वेळ ही उरतो. मग आपण त्या उरलेल्या वेळेमध्ये दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम करू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना खूप वेळ तर वाया घालवला, किंवा एकाच विषयाचे पुस्तक धरून बसले, तर अभ्यासाचा गेलेला वेळेचा पुन्हा वार करुया म्हटलं काही करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आहे त्या वेळेची बचत करून प्रत्येक विषयाला थोडा थोडा वेळ देऊन त्या पद्धतीने अभ्यास केला तर सर्व विषयांचा अभ्यास होऊन जातो. याला सुद्धा आपण वेळेची बचत केली असे म्हणू शकतो. बचत म्हणजे काटकसर, व ही काटकसर आपल्याला भविष्यात उपयोगी पडते. पण वेळेच्या बाबतीत केलेली वेळेची बचत ही त्याच वेळेला जर उपयोगात आणता येते व तसे जर आपण केले तर त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या जीवनात फार होतो.
वेळेची बचत ही माझ्यामते अतिशय महत्त्वाची आहे. वेळेची बचत करा व भविष्याचा पाया मजबूत करा.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
(15)
नैसर्गिक संपत्तीची बचत करणे गरजेचे
या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपण निसर्गाचे खूप काही देणे लागतो. ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र, माती, पाणी यासारख्या बऱ्याच गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. भविष्यकाळाचा विचार करून या नैसर्गिक संपत्तीची बचत करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.
आपण इंधन म्हणून आपल्या सोयीनुसार, सहज उपलब्ध होईल किंवा आपल्याला परवडेल असे ऊर्जेचे स्रोत वापरत असतो.
जसे- गॅस, रॉकेल, जळतन इ.
या स्त्रोतांचा वापर जरी आपण आपल्या सोयीनुसार करत असलो तरी तो मर्यादेत राहूनच करायला हवा. कारण, “जमीन, पाणी व हवा ह्या गोष्टी म्हणजे आपणांस आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देणगी नसून निसर्गाने दिलेली देणगी आहे." हे निसर्गाचे आपल्यावर कर्ज आहे असे समजावे लागेल.
जमिनीतून खनिज तेल, पाणी व कोळसा मिळतो. या जमिनीतून मिळणारी ही संपत्ती जपून वापरणे आवश्यक आहे.
पेट्रोल, तेल, कोळसा, पाणी या सर्व नैसर्गिक प्रकारांचा वापर सर्वाधिक केला जातो. वापराच्या तुलनेने हि ऊर्जा निर्माण होण्यास लागणार अवधी जास्त असतो. त्यामुळे ऊर्जा निर्मिती आणि वापर यात समन्वय साधला गेला पाहिजे. माणसाची हाव इतकी आहे की निसर्गाने दिलेली हि अनमोल साधन-सामुग्री कधी संपेल हे सांगता येणार नाही त्यामुळे वेळीच सावध होऊन या ऊर्जेची, या साधन सामग्रीची बचत करण्याची गरज आहे. आपल्या घरातील गॅस सिलिंडर एखादा आठवडा जास्त चालल्यास अथवा विजेचे बिल कमी झाल्यास आपले पैसे सुद्धा वाचतील आणि ऊर्जा सुद्धा. त्यासाठी स्वतःला बचतीची सवय लावली पाहिजे.
थोडक्यात काय तर निसर्गाने दिलेल्या साधन-सामग्रीचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पर्यावरणाचा समतोल सुद्धा सुधारेल आणि पैशांची सुद्धा बचत होईल.
गणेश सोळुंके, जालना
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
पाण्याची बचत (28)
पाणी म्हणजे जीवन,आणि हे जीवन पृथ्वीतलावर एक नैसर्गिक रित्या आपणास मिळते, पाणी नसेल तर सजीवही नसतील,जगण्यासाठी पाणी हे अमृतच म्हणावे लागेल,पाण्यासाठी दाहीदिशा ! कितीतरी लोक पाण्याच्या शोधार्थ रानोमाळ फिरतात,काही पाण्याचे स्रोत आढळले की त्या घागरभर पाण्यासाठी ओढाताण करत फिरायचे,कुठे भांडयांनी घासून पाणी भरायचे,किती बिकट अवस्था बिचाऱ्यांची!!
पृथ्वीवर पाहिले असता सर्वत्र पाणीच पाणी आहे,परंतु या पाण्याने तहान थोडीच भागणार आहे?पिण्यायोग्य फक्त 3 टक्केच पाणी लाभते,त्यात सुद्धा खेडोपाडी पाण्याची टंचाई त्यामानाने शहरीभागात ही टंचाई जाणवत नाही.पाणी अमूल्य असा ठेवा आहे,त्याला जपले तर भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो,म्हणूनच वॉटर हार्वेस्टिंग, ठिबक सिंचन,पावसाळ्यातील पाणी टाक्या मध्ये साठवून,इत्यादी पाणी बचीतीचे उपाय केले जातात.
शालेय स्तरापासून मुलांना पाण्याचे महत्व सांगितले जाते,विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते, आणि स्वतः विद्यार्थी उपक्रम तयार करतात,घरातील वापरलेले पाणी याचा दुबईमध्ये रिसायकल पद्धतीने वापर केला जातो,समुद्राचे खारट पाणी आता शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे पिण्यायोग्य करण्यात आले आहे,असे केल्याशिवाय तरणोपाय नाही,अधिक लोकसंख्या, साठे,स्रोत कमी आहेत मग यावर उपाय म्हणून काहीतरी करावेच लागणार,विविध उपकरणे पाणी शुद्धीकरणासाठी आहेत परंतु तितके व्यवस्थापनासाठी पैसा हवा,आणि तो कुठे तरी कमी पडत आहे.
सुजाता जाधव
नवी मुंबई
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
. ..........पैसा बचत...........
पैसा बचत काळाची गरज आहे.पैसा हा मानव जीवनात अतिशय महत्वाचे आहे.एक म्हण आहे .,,,"गरिबी आली म्हणून लाजू नये.व श्रीमंती आली म्हणून माजू नये " वेळ काळ सांगून येत नाही म्हणून माणसाने कोणतेही काम करून पैसा मिळवण्यासाठी सक्षम असावे.म्हणजे कठीण परिस्थिती आली तरीही निघून जाते.म्हणून आपल्याजवळ पैसा जास्त आल्यास पैशाचे नियोजन करून ठेवावे.महान उद्योग करणारे उद्योग पती टाटा बिर्ला ,अंबानी या सारख्या लोकांकडे भरपूर संपती आहे आणि त्यांच्या कडची संपती आज देशाच्या संकट काळात उपयोगी येत आहे.
एकदा एका मुलाला त्याच्या वडिलांनी एक कापड दिले आणि सांगितले की हा कपडा तू विकून पैसे कमाव ,मुलाला खूप विचार आला एका कपड्याचे पैसे कसे कमवता एनार तेंव्हा त्या मुलाने त्या कपड्या पासून रुमाल शिवले आणि मुलगा ऐकायला गेला.लोक विचार करू लागले तरी मुलाची विकण्याची तळमळ पाहून एक व्यक्तीने रुमाल गाडी पुसण्यासाठी घेतली.मुलाने दहा रुपये कमावले .पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी असेच एक रुमाल दिली आणि सांगितले आज या कपड्याचे वीस रुपये आन मुलगा पुन्हा विचारात पडला आता काय करायचे ,पण मुलाने जिद्ध सोडली नाही .जवळच करिश्मा कपूरचं कार्य क्रम सुरू होता.तेथे गर्दीतून अतशिरला आणि त्याने त्या रुमालावर सही मागितली .करिश्मा कपूर ने सही दिली आणि पुन्हा सहीची रुमाल ,सहीची रुमाल म्हणून विकू लागला तर वीस रुपये कमावले असे करत त्याला जिद्द लागली आणि तो मुलगा उद्योग पती. झालं.कपडा तोच पण युक्ती वेगळी वापरून पैसा कमावला. म्हणून पैसा हा अतिशय महत्वाचा आहे खर्च करताना काही वाटत नाही पण नंतर पस्तावा येतो.महानुन पापल्या कुटुंबाला पुरेल तेवढी संपाती कमावून ठेवावी.थेंब थेंब तले साचे ही वृत्ती ठेवावी
जीवन खासावत
भंडारा 9545246027
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
धन्यवाद ....!
~~~~◆~~~~~◆~~~~◆~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें