*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- बत्तीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 20 मे 2020 बुध
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- मुलींचे शिक्षण*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
============★=============
21 क्रमांक लेक वाचवा लेक शिकवा
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपण नेहमी वाचतो. प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आई होय.जिचे प्रेम आणि ममत्व याचे ऋण कधीच फेडणे शक्य नाही.नऊ महिने नऊ दिवस बाळाला पोटात सांभाळून,अनेक असह्य वेदना सहन करुन आई बाळाला जन्माला घालते.बाळ आणि आई हे जगातील सर्वात मोठे सुंदर नाते आहे.पण हीच आई कोणाची तरी अगोदर मुलगी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.आई सारख्या अनेक भूमिका स्त्रीला निभवाव्या लागतात.मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर अनेक भुमिकेतुन तिला जावे लागते.लक्ष्मीच्या पावलाने मुलगी म्हणून तिचे आगमन होते.आणी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून ति जात असते.प्रत्येक वडिलाचा अभिमान,गर्व जोपासणारी ती लाडकी लेक होते.जिवापाड प्रेम करणारी लाडक्या भावाची बहीण ती होते. संसाराचा रथगाडा सांभाळून ती उत्तम पत्नी होते.वासल्य,ममत्व जपणारी आई ती होते.थरथरणाऱ्या हातांनी कोवळ्या गालावरचा मुका घेणारी आजी ती होते.संस्कार आणि संस्कृती जोपासणारी समाजातील ती उत्तम स्त्री होते.अशा लेक,बहिण,पत्नी,आई, आजी,मावशी,काकू,आत्या,मामी अशा अनेक भूमिका स्त्रीला तिच्या आयुष्यात निभवाव्या लागतात.अर्थात प्रत्येक स्त्री या सर्व भूमिका उत्तमच निभावते.संस्कार आणि संस्कृती जोपासत प्रत्येक स्त्री या सर्व भूमिकेतून स्वतःला सिध्द करत असते.भारत एकविसाव्या शतकात महासत्तेकडे वाटचाल करताना येणाऱ्या काळात स्त्रीच्या या भूमिका संपुष्टात येतात की काय? ही भीती वाटू लागली आहे.याचे कारण म्हणजे स्वतःला सुशिक्षित,उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात,कुटुंबात भ्रूणहत्या होत आहे.वंशाला दिवा पाहिजे,वंशाला वारसदार पाहिजे.या हट्टापायी भ्रूणहत्या सारखे महापाप घडत आहे.मुलगी जन्माला येण्या अगोदरच तिचे गर्भातच आयुष्य संपवले जात आहे.मुलगा हा म्हातारपणाची काठी,आधार समजला जातो.या समजुतीने मुलगी जन्माला येण्या अगोदरच लाखो रुपये खर्च करून मुलगा की मुलगी असे गर्भनिदान केले जाते.मुलगी सांगितली तर गर्भातच तिची हत्या केली जाते.या सर्व गोष्टी कायद्याने बंद आहे. लिंगनिदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे.असे करणाऱ्या डॉक्टर व संबंधित जोडप्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते.हे माहित असताना सुद्धा अनेक ठिकाणी चोरीछुपे या गोष्टी घडतात.कुठेतरी हे महापाप थांबले पाहिले.या सर्वावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबविण्यात येत आहे.समाजात,खेड्या-पाड्यात,वाडी वस्तीवर याची जागृती केली जात आहे.लेक वाचवा हे सांगण्यामागे खूप महत्त्व आहे.कारण लेक जन्माला आली तरच ती अनेक भुमिका निभाऊ शकेल.मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी असे आपण नेहमी एेकतो,अनेक ठिकाणी वाचतो. जन्मानंतर वडिलांच्या घरी संस्कृतीचा व लग्नानंतर नवऱ्याच्या घरी संस्काराचा प्रकाश पाडणारी ती मुलगीच असते.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.लेक जन्माला आली नसती तर कदाचित तुम्ही आम्ही जन्माला आलो नसतो.कारण हे सुंदर जग आपल्याला ज्या आईमुळे बघायला मिळाले.ती आई कुणाची तरी लेक होती हा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. आजच्या सुशिक्षित समाजाने मुलगा-मुलगी हा भेद केला नाही पाहिजे.आज आपण पाहतो देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे.या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनी,स्त्रीयांनी स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे.देशाचे प्रत्येक महत्त्वाचे पद महिलांनी भूषविलेले आहे.भारत देशाचे सर्वात मोठे पद राष्ट्रपती हे एका महिलेने भूषविलेले आहे.प्रतिभाताई पाटील या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत.स्वर्गीय इंदिरा गांधींनी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून पद भूषविलेले आहे.भारत या देशाला अनेक महिलांची यशोगाथा लाभलेली आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार-या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यासुद्धा अगोदर सिंदखेड राजा च्या जाधव घराण्याच्या लेक होत्या.जिजामाता,राणी लक्ष्मीबाई,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,कल्पना चावला, पी.टी.उषा,लता मंगेशकर,मेरी कोम, सायना नेहवाल यासारख्या महिला मुलगी म्हणूनच जन्माला आल्या. त्यांच्या वडिलांनी जर आजच्या सारखा संकुचित विचार केला असता, तर आपला देश अनेक महत्त्वांच्या या स्त्रीरत्नांना मुकला असता.आणि म्हणून आज लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाला स्वीकारण्याची गरज आहे.मुलींना आनंदाने जन्माला घालूया.तिच्या जन्माचा आनंदाने स्वीकार करूया.हा विचार या महाराष्ट्राला या देशाला शोभणारा आहे.लेक फक्त जन्माला घालून चालणार नाही.तर तिचे उत्तम संगोपण आणि सरंक्षण करणे गरजेचे आहे.तिला चांगले उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे.तिच्या आवडीनुसार तिला करिअर करून दिले पाहिजे.हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.हे कर्तव्य प्रत्येक पालकांनी अभिमानाने स्वीकारले पाहिजे.ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत.यामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वाडी-वस्तीवर गावात उच्च शिक्षणाची सुविधा नसणे,अनेक समाजामध्ये मुलींना उच्च शिक्षणास बंदी,लवकर लग्न करणे,अशा अनेक समस्या आहेत.परंतु या सर्व गोष्टीवर मात करून मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे.पालक म्हणून ते कर्तव्य आहे.म्हणून मुलींना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उंच भरारी घेण्यासाठी आपण पालक म्हणून शुभेच्छा देऊया.कारण मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणीप्रमाणे हा प्रकाश असाच अंखडपणे पडत राहो.यासाठी संकल्प करुया लेक वाचवा लेक शिकवा.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
============★=============
*मुलीचे शिक्षण -प्रगतीचे लक्षण*
*(09)सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
मुली शिक्षण घेतील तरच, समाजकल्यान आणि भारताला समृध्द करतील .शिक्षण काळाची गरज ओळखून शिक्षण मुलींना देणेही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवात खुप मोठया प्रमाणावर बदल झाले आहे . शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या हक्काचे महत्त्व समजते . आजच्या कळात पैसा संपत्ती याला महत्त्व न देता फक्त आणि फक्त शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे . सुशिक्षित व्यक्ती आपल्या गरजा आवडी निवडी आपले हक्क होत असलेला भ्रष्टाचार थांबवू शकतात .
*सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले* यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी मोठ मोठया अडचणींना तोंड दिले .त्यामुळे आज ज्या स्त्रियां शिक्षण घेतल्यामुळे स्त्रियां आपल्या पायावर उभ्या आहेत, त्या आपले स्वाभिमानाने जीवन जगत आहेत . शिक्षण ही काळाजी गरज झाली आज कोणत्याही क्षेत्रात जायचे असेल तर पहिले शिक्षण विचारले जाते . आजच्या काळात जर निवडणुकीला उभे राहायचे असेल तरी सुध्दा शिक्षण विचारले जाते आज जर ट्रक ड्रायव्हर व्हायचे असेल तरी सुध्दा दहावी पास असल्याशिवाय परवाना काढता येत नाही .आजच्या काळात कोणत्याही पदावर जायचे असेल ,कोणतेही काम करायचे असेल तर त्या व्यक्तीचे शिक्षण विचारात घेतले जाते . आजच्या काळात जर मान संपत्ती मिळवायचे असेल तर पहिले त्या व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. आज शिक्षणाला संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे.
जोतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी खुपखुप मोठया प्रमाणावर परिश्रम घेतले. काही काळ त्यांना समाजाने सुध्दा मोठया प्रमाणावर त्रास दिला ,पण त्यांनी शिक्षणासाठी घेतलेला ध्यास सोडला नाही. त्यांनी मुली शाळेत येण्यासाठी मुलींना नवीन कपडे विविध कार्यक्रम शाळेत खेळण्यासाठी खेळणी दिली. त्यामुळे अनेक मुली शाळेत येऊ लागल्या .मुलींची संख्या वाढल्याने जोतीराव फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिक्षण दिले त्यांना सुध्दा समाजाने आणि त्यांच्या घरातील काही व्यक्तींनी सुध्दा त्रास दिला पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींना शिक्षण देणे सुरूच ठेवले .त्यांच्यामुळे मुली आज शिक्षण घेत आहे .
शिक्षण ही आज काळाची गरज आहे . अशिक्षित व्यक्तीला कोणतेही आर्थिक व्यवहाराचे काम करायचे असेल तर, सुशिक्षित व्यक्तीवर अवलंबून राहवे लागते. त्या व्यक्तींना आपले हक्क मिळत नाहीत .जर शिक्षण नसेल तर समाज हा अंधश्रध्देला बळी पडला असता. मानवामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झाली नसती .शिक्षण घेतल्यामुळे मानवामध्ये मित्रता निर्माण झाली आहे .
जीवनामध्ये पहिली पायरी म्हणजे शिक्षण घेणे ही आहे. जर घरातील एक स्त्री शिकलेली असेल तर कुटुंबातील सर्व व्यक्ती शिकतात . शिक्षणावर त्या व्यक्तींचा राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. आज शिक्षण घेतलेल्या स्त्रियां स्वतच्या पायावर उभ्या आहेत. व त्यांची नावे किरण बेदी यांसारख्या स्त्रियां स्वता शिक्षण घेउन स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
आज समाजात शिक्षणामुळे नवनवीन शोध लागले आहेत .*रिक्षापासून अंतरिक्ष*मुलीनी शिक्षणामुळे च गाठले आहे . समाजातील अज्ञान अंधश्रध्दा शिक्षणानेच नाहीशी झाले . सरकारले 18 वर्षीखालील मुलांना शिक्षण घेणे सक्तीचे केले सरकारने 18 वर्षाच्या आतील मुलांना बालकामगारांवर म्हणून बंदी घातली आहे. सरकारने प्रत्येक बालकास मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे .स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार दिला गेल्यामुळे स्त्रियां स्वतच्या पायावर उभ्या राहून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. त्या शिक्षण घेऊन नोकरीला लागून आपल्या घरखर्चाला हातभार लावतात. काही स्त्रियां शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करण्यासाठी गेल्या आहेत. मला असे म्हणावेसे वाटते की, *शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही* याचाच अर्थ असा होतो की एकदा शिक्षण घेण्यास त्यात रस निर्माण झाला तर ,आपण कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू . एखादी व्यक्ती शिक्षण घेतेच जगातील श्रीमंत व्यक्ती तोच की ज्याने शिक्षण घेऊन आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावला आहे आणि ती व्यक्ती दुसऱ्याला शिक्षण दयावे म्हणून प्रयत्न करते. ती व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे .
*मुलगी शिकली, प्रगती झाली*’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणीवर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. ती सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते.समाजकल्यानकारी करण्यासाठी मुलींना शिकविण्याशिवाय तरणोपाय नाही.
लेखिका
*सौ .यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
============★=============
*मुलींचे शिक्षण*
शिक्षण म्हणजे प्रगतीचे लक्षण. मग ते शिक्षण मुलाचे असो किंवा मुलीचे असो. मुलीच्या शिक्षणाबाबत आपण कितीही शिकलो तरी काही भागात काही ठिकाणी काही लोकांच्या मनामध्ये कोती भावना आहे. दारिद्र आणि गरीबी याशिवाय संरक्षणाचा प्रश्न पालकांना सतावत असल्याकारणाने मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसते. खेड्यापाड्यातील मुली काही ठराविक इयत्तेपर्यंत शिकवल्या जातात. पुढील वर्ग गावात नसेल तर बाहेरगावी मुलींना शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यास पालक धजावत नाहीत. रोजचे येणे-जाणे करणे, किंवा शिक्षणासाठी तेथेच ठेवणे पालकांना सोयीचे वाटत नाही. कारण बदलत्या परिस्थितीमध्ये मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याची प्रचिती आपल्याला वर्तमानपत्र, टीव्ही मधून ऐकायला पाहायला मिळते. त्यामुळे पालक मुलीच्या शिक्षणाची अधिक गांभीर्याने दखल घेताना दिसत नाहीत. मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हटले जाते. आणि वास्तविक पाहता ते खरेही आहे, शिक्षणामुळे सुसंस्कृतपणा अंगी येतो. आणि तो सुसंस्कृतपणा आपल्या कुटुंबा मध्ये आपल्या बालकांमध्ये रुजवण्याचा मुलगी प्रयत्न करत असते म्हणून मुलगी शिकली की कुटुंब शिकते असे म्हटले जाते. खरं पाहिलं तर आज कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही की जिथे मुलींचा शिरकाव झाला नाही. त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या कार्यशक्तीवर, त्यांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवून चालणार नाही. कारण महिलांनी मुलींनी कोणते क्षेत्र आज रिकामी ठेवले नाही. पुरुषांची मक्तेदारी असणारे किंवा समजले जाणारे क्षेत्र सुद्धा महिलांनी काबीज केले आहे. आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. पुरुषांचे हे क्षेत्र महिलांचे ते क्षेत्र असा दुजाभाव आपल्याला करता येत नाही. मुलींना ज्या पद्धतीने बंधनात अडकवले जाते त्या उलट पद्धतीने मुलांवर बंधना पेक्षा मोकळी दिली जाते. आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे समाजामध्ये वावरताना मुलींना वाटणारे भय त्यांना होणारा त्रास. आणि या टपोरीगिरीचा मुलींच्या शिक्षणावरती परिणाम होतो. परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचे सोने करण्याची क्षमता आणि ताकद मुलींमध्ये असते. याचा देखील प्रत्यय आपल्या सर्वांना आलेलाच असेल. आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना कितीवेळा आणि कसल्या परीक्षा द्याव्या लागतील म्हणजे तुमची मानसिकता बदलेल. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सुनिता विल्यम, कल्पना चावला, पी. टी. उषा, मेरी कोम किती नावे घ्यावीत, ज्या महिला असूनही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाची उंच शिखरे त्यांनी गाठली. आजकालच्या मुलांना कमी लेखण्याची आवश्यकता नाही, पण तरीही तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांपेक्षा मुलींचे कर्तत्व आणि क्षमता अधिक असताना दिसून येते. यामध्ये मुलांना कमी लेखणे हा भाव मुळीच नाही. मुलगी शिकली म्हणजे ती आत्मनिर्भरही बनू शकते. आणि आत्मनिर्भरता हे काळाची गरज आहे. मुली आणि महिलांचे क्षेत्र म्हणजे केवळ घर आणि स्वयंपाकघर एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही जुन्या आणि कोत्या मनोवृत्ती मुलींना घरामध्ये मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलीचे शिक्षण हे केवळ स्वतःची आत्मनिर्भरता नव्हे तर कुटुंबाची आत्मनिर्भरता यासाठी आवश्यक आहे. मुलगी शिकली पाहिजे, शिकवली पाहिजे.
महिला आणि मुलींच्या शिक्षणाबाबत आज आपण बोलत असलो तरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. आणि म्हणूनच समाजाचा विरोध झुगारून लोकांच्या प्रखरतेला तोंड देऊन मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडेच्या वाड्यात त्यांनी उघडली. आज-काल मुली शिकताना दिसतात परंतु याचे खरे श्रेय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांना जाते. खरं पाहिलं तर त्यांच्या विचारसरणीला धरून वागणारी पिढी म्हणावी अशी तयार झाली नाही. मुलींच्या शिक्षणाबद्दल अनुत्सुकता आणि उदासीनता आजही आपल्याला दिसून येते. महिला सक्षमीकरण हा शब्द आज-काल पर्वणीचा झालेला दिसून येतो. महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर महिला तेव्हाच सक्षम होऊ शकते, जेव्हा ती शिकते, आणि मोठी होती. माणसाच्या जीवणातून अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली नाही.विशेषतः ग्रामीण भागांमधून अंधश्रद्धा नष्ट झाली म्हणता येत नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. महिलांवर होणार्या अन्याय अत्याचार आणि त्यांची मुस्कटदाबी याबाबत फारसा ऊहापोह केला जात नाही. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला सक्षम असली पाहिजे. आणि हे सक्षमीकरण तिच्या शिक्षणातून तिला प्राप्त होत असते. मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, तसेच एसटीने जा-ये करण्यासाठी पास योजना. अशा अनेक योजना मुलींच्या शिक्षणाला प्रेरित करण्यासाठी शासनाने उभ्या केल्या आहेत. परंतु मुलगा हा वंशाचा दिवा समजून पालकांकडून देखील त्याला झुकते माप दिले जाते आणि मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. अलीकडच्या काळामध्ये थोडीशी परिस्थिती बदललेली आहे. परंतु ही परिस्थिती पूर्णतः बदलणे आवश्यक आहे. म्हणून मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
*हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
============★=============
*(08) मुलींचे शिक्षण हेच समाजाचे रक्षण*
जेथे स्त्रियांचा आदर केला जातो तेथे देवता ही वास करत असतो. जेथे त्यांचा सन्मान होत नाही तेथे सारी कर्मे निष्फळ होतात. भारताची एवढी उज्वल परंपरा असून आज सर्वत्र स्त्री असुरक्षित आहे. याची प्रचिती अनेक घटनांतून वर्तमानपत्रातून आपण वाचतो मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने आली होती म्हणूनच या स्त्रियांचे कार्यक्षेत्रे चूल व मूल एवढ्यासाठीच बनले होते.
दुबळी अबला अशीही तिची हेटाळणी केली जायची. या अमानुषते विरुद्ध कोणी ब्र सुद्धा काढला तरी सनातनी धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर एखाद्या जंगली श्वापदांचा सारखी तुटून पडत असत. अशा या मुजोर धर्मांधतेणे वागणार यांना कोण अडवणार? तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे. अशीच वेळ आपल्या समाजात निर्माण झाली होती.
या मनूच्या उक्तीला तडा देणारी, मानवतेला काळीमा फासणारी, सनातनी धर्ममार्तंड त्यांना त्यांची जागा दाखवणारी, स्त्रियांच्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडणारे, सबल स्त्री समाज निर्माण करणारी समाजसुधारकांची एक नवी पिढी पुढे आली आणि "आकाशातील तडपता तारा होणे कदाचित तुम्हाला शक्य नसेल पण अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजळणे मात्र मुळीच अशक्य नाही" असा संदेश देणारे विनोबा भावे, महर्षी केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहनराय या दीपस्तंभांनी आणि आपल्या विचारातून व कृतीतून मुलींचे शिक्षण हे समाजाचे रक्षण आहे हे सत्यात उतरवून दाखविले. समाजात स्त्रियांना स्वाभिमानाने सन्मानाने जगण्याचा महामंत्र दिला. ही स्त्री राजवाड्यापासून ते झोपडीमध्ये कोंडलेली होती. आज समाजसुधारकां मुळे पंतप्रधान पदापासून ते सरपंच होताना प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाने परिश्रमाने जिद्दीने गरुड झेप घेत आहेत.
उदा. पाकिस्तानची कन्या युसुफजाई मलाला अवघ्या सोळा वर्षाची तिने एक नव्या मार्गाचा आदर्श घालून दिला. तलवारीच्या धारदार पात्यापेक्षाही पेणीची लेखणीची ताकद श्रेष्ठ व प्रभावी आहे हे सत्यात उतरवून दाखविली. मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानच्या विद्रोहाला सामोरे जात गोळी झेलली. मरणाच्या दारातून जी परत आपल्या ध्येयाप्रत पोहोचण्याचे प्रयत्न करते हे समाजाचे रक्षण नव्हे का? केवळ मलाच नव्हे तर बलात्काराला बळी पडलेली लखनऊ ची उषा विश्वकर्मा या परिस्थितीतून सावरत मुलींसाठी मार्शल आर्टचे शिक्षण देणारी मरेड ब्रिगेड संघटना स्थापन करून समाजाचे रक्षण करते. हे मुलींचे समाजाचे रक्षण होय.
अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराविरुद्ध घुसमटलेल्या संतापाला शब्द आणि कृती देणाऱ्या देशाची दशा आणि दिशा बदलायला सरसावलेल्या ह्या सामान्य मुलींनी एक असामान्य नेतृत्व सिद्ध केले. एक नवं पाऊल, एक नवं वास्तव्य, एक नवी ओळख निर्माण केली आहे. या सर्वांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवून मुलींचे शिक्षण हेच समाजाचे रक्षण होय असं अभिमानाने व छातीठोकपणे आजच्या घडीला सांगावसं वाटते.
भारतातील स्त्री शिक्षण ही नव्या काळाची नितांत गरज आहे . देशातील महिलांचे योग्य शिक्षण घेतल्याशिवाय आपण अपेक्षा करू शकत नाही कुटुंब , समाज आणि देशाच्या प्रगतीत महिला महत्त्वाची भूमिका निभावतात. देशात लोकशाही यशस्वी होण्यासाठी पुरुषा सह महिला शिक्षण आवश्यक आहे . सुशिक्षित महिला कुटुंब समाज आणि देशातील वास्तविक आनंदाचे स्रोत आहेत. हे खरोखर म्हटले जाते हि एखाद्या पुरुषाला शिक्षित करणे म्हणजे फक्त एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि स्त्रीला शिक्षित करणे हे संपूर्ण कुटुंबाला शिकविते आणि अशा प्रकारे संपूर्ण देशाला एक दिवस शिकविते.
मुलांची पहिली शिक्षिका ही आईच असते . मुलाचे भविष्य आईवर प्रेम आणि काळजी यावर अवलंबून असते . म्हणजे एक स्त्री प्रत्येक मुलाला त्याचा पहिला धडा आईकडून मिळतो म्हणून आईने शिक्षित होणे खूप महत्त्वाचे आहे कारण केवळ एक सुशिक्षित आई आपल्या मुलाची करियर बनवू शकते तर अशिक्षित आणि सुशिक्षित माता आपल्या आयुष्यातील अनेक जीवनाचे पोषण करू शकतील आणि विकसित देशाला जन्म देतील . स्त्री ही एक मुलगी , बहिण, पत्नी आणि आई अशा आयुष्यभऱ्यात बऱ्याच पात्रांची भूमिका निभावतात. कोणत्याही नात्यात सामील होण्यापूर्वी प्रथम ती स्वतंत्र देशाची स्वतंत्र नागरिक असून तिच्याकडे मनुष्या सारखी सर्व हक्क आहेत. जीवनातील सर्व क्षेत्रात अधिक चांगले कार्य करण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण मिळण्याचे अधिकार आहेत.
महिला शिक्षण त्यांच्या आयुष्यात अधिक स्वतंत्र आणि सक्षम बनविण्यास मदत करते. शिक्षण त्यांना त्यांचे मन आणि स्थिती वाढविण्यात मदत करते आणि मागील काळाप्रमाणे त्यांच्या पालकांवर ओझे होऊ नये यासाठी स्त्री शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
महिला शिक्षण त्यांच्या आयुष्यात अधिक स्वतंत्र आणि सक्षम बनविण्यास मदत करते. शिक्षण त्यांना त्यांचे मन आणि स्थिती वाढविण्यात मदत करते आणि मागील काळाप्रमाणे त्यांच्या पालकांवर ओझे होऊ नये यासाठी स्त्री शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
============★=============
( 5)
*'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.'*
*स्त्रीशिक्षण - काळाची गरज*
*“विद्येविना गेले, वाया गेले पशू,*
*स्वस्त नका बसू ,विद्या घेणे.”*
या ओळीतून सावित्रीबाईने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले.
मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा फुले दांपत्य होय.
अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शास्त्र नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृती होते. त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे महात्मा ज्योतिराव यांचे मत होते. म्हणून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले.
१ जानेवारी १८४८ या दिवशी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तत्कालीन ब्रिटिश भारतातील या देशातील तेही महाराष्ट्रातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.भारतातील ही पहिलीच मुलींची शाळा आहे. *सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका!* जानेवारी महिन्यात या शाळेत सहा मुली होत्या. नंतर वर्षाखेरीस शाळेतील मुलींची संख्या ४५ होती.
*“मानवाचे कर्तुत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने , दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणेचे फलित होय."*
प्रयत्नवाद आणि कर्तुत्वावरची अढळ निष्ठा व्यक्त सावित्रीबाईनी केली.असे पराकोटीचे परखड विचार सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी मांडले.
स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला शिक्षणाचा मार्ग. हा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, आगरकर ,कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून स्त्रियांना विद्यालयाची कवाडे उघडी झाली. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटीत स्त्री अग्रेसर आहे.ते केवळ शिक्षणानेच. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येते.
पण काही ग्रामीण आदिवासी भागातील स्त्री अजूनही अशिक्षित आहे. शिक्षित करणे आवश्यक आहे. ती जर सुशिक्षित, सज्ञानी झाली तिचा फायदा कुटुंबास होतो. एक चांगली माता सांस्कृतिक शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ असू शकते, हे स्त्री शिक्षणातून दिसते. म्हणून प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू मनत असतं, “मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे, परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे”. म्हणून स्त्रियांना शिक्षण देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. यावरून स्त्रीच्या शिक्षणाची महती लक्षात येते. म्हणून स्त्रियांना त्यांच्या जीवनातील कार्याची पूर्ती करण्यासाठी शिक्षण आवश्यक असते.
*'स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'.*
स्त्रीही सृजनशील ,सामर्थ्यवान, करुणा जन्य असते.
*'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धारी '.* या जगाचा उद्धार करायचा असेल तर स्ञियांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. जर राष्ट्राचा विकास घडवायचा असेल तर मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे.
जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ज्ञानज्योत पेटवून आपले जीवन उजळावे, प्रज्वलित करावे. कारण स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण ही काळाची गरज ओळखून स्त्रीने विद्या घ्यावी, सुशिक्षित बनावं, आपला नेभळट पणा सोडून धीट बनावं. एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी, आणि एक आदर्श माता म्हणून जगावं. त्यासाठी स्त्रीशिक्षण हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच स्त्री ही समाज परिवर्तनाची देवता ठरेल. हे परिवर्तन आज हळूहळू बदलू पाहत आहे.
आजची स्त्री अबला नाही ,तर सबला आहे. सक्षम बनली आहे.ती कर्तुत्ववान नारी झालेली आहे. आजच्या बदलत्या स्त्रीजीवनाच्या या काळानुसार स्त्री बदलू पाहत आहे. आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे जात आहे.
स्त्री शिक्षणाची महती व्यक्त करताना माझ्या मते.......
*"अंधारमय जीवनात ज्ञानदीप माझा उजळला, फुले सावित्रीबाई मुळे प्रकाश जीवनात झळकला.”*
〰️〰️〰️〰️〰️〰️
©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि.नांदेड.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
============★=============
मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण
****************
श्री. ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर) 【17】
**********************
भारत माता की.....जय..!
'जिच्या हाती पाळण्याची दोरी....
तीच जगाते उद्धारी'.... !
'मुलापेक्षा मुलगी बरी.... प्रकाश देते दोन्ही घरी'... !
'मुलगा मुलगी एक समान....
दोघांनाही शिकवा छान' ....!
अशा प्रकारच्या मोठ्या ही घोषणा देत शाळेतली मुले रस्त्याने जात होती. या मुलांच्या घोषणा ऐकून सखुआजी भांडे घासता जातात तटकन उठून उभी राहिली. 'मीच मोठी चांडाळ होते,मी माझ्या छबूला शिकू दिलं नाहीं. नाहीतर आज मही छबी बीन त्या शाळेतल्या मास्तरीन बाई सारखी मोठ्या तोऱ्यात आज गावातून प्रभात फेरी काढायला आली असती बाई...., छबीची सोबतीन मारवाड्याची कोमल आज मोठ्या ऑफिसात काम करती आन इतकी हुशार असणारी मही छबी रोजच डोक्यावर टोपलं घेऊन शेतात जाती माय....काय नशीब फोडलं मीच माह्या लेकीचं...!" 'पाणावलेल्या डोळ्यांनी मनातल्या मनात पुटपुटतच पुन्हा सखुबाई खाली बसले आणि काम करायला लागल्या.
तो काळच वेगळा होता त्या काळामध्ये मुलींना शिकवण आहे समाजामध्ये कमी समजलं जायचं. महिलांनी चूल आणि मूल एवढच करत राहावे हीच बहुजन समाजामधली एक चुकीची धारणा होती. या धारणेला सखूबाईच्या छबूसारख्या अनेक मुली बळी पडलेल्या आहेत. आजही सुद्धा उच्च शिक्षणाच्या बाबतीत हीच परिस्थिती बघायला मिळते. एकीकडे डिजिटल इंडिया आणि जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न बघत असताना आजही ग्रामीण आणि मध्यमवर्गीय तसेच मागास वर्गातील मुलिंना प्राथमिक शिक्षण सोडून पुढील शिक्षणासाठी समाज,कुटुंब आणि व्यवस्था प्रेरित करत असल्यास फारसं निदर्शनास पडत नाही. या गोष्टीची आजही मनाला खंत वाटते.उच्चवर्णीयांनी शिक्षणाची दारे फार वर्षापासूनच पार केलेली आहेत परंतु मध्यमवर्ग आणि मागास वर्गामध्ये आजही महिलांसाठी शिक्षणाचे दार ही फक्त उद्घाटन करण्यापुरतीच खुली आहेत की काय? असा प्रश्न मला पडतो... 'सर्व शिक्षा अभियान', 'बेटी बचाव बेटी पढाव' सारख्या उपक्रमातून मुलींना शाळेमध्ये प्रवेशित केलं गेलं; परंतु प्रवेशित झालेल्या मुलींना शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं का..?शाळेमध्ये या मुली टिकल्या का..? याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेमध्ये मिळालेला गणवेश अंगावर घालायचा, पुस्तक एका थैलीत ठेवून द्यायचे आणि शेतात कामाला जायचे... अशी परिस्थिती आजही बऱ्याच ठिकाणी नजरेस पडते. गावातील गुरुजींच्या आग्रहास्तव कायद्याचा बडगा बघून आठवीपर्यंत मुलीला शिकण्याला दाखल करणारा समाज मात्र उच्चशिक्षणासाठी मुलींना घरूनच परीक्षा देण्यासाठी प्रेरित करतो आहे .हे सध्याचं वास्तव चित्र आहे. शिक्षण संस्थांना सुद्धा पटावर विद्यार्थी हवे असतात, त्यासाठी तुमच्या मुलीचा दाखला आमच्या शाळेत द्या,आम्ही तिला वर्षभर सांभाळतो, तिची हजेरी दाखवतो आणि शेवटी त्या परीक्षेला पाठवा अशा विचार करणाऱ्या संस्था सुद्धा मुलींच्या शिक्षणाला विषारी पाण्याच्या डोहात तरंगत ठेऊ पाहात आहे की काय..!
वैदिक काळातील गार्गी असो किंवा लोपामुद्रा सारखी सुजान स्त्री, मैत्रेयीसारखी महान ऋषिपत्नी असो; किंवा स्वराज्यातील छत्रपतींना घडवणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, अथवा महाराणी ताराबाई, राजमाता अहिल्याबाई होळकर या सर्व स्त्रियांचा इतिहास आमच्या नजरेसमोर असतानासुद्धा मुलींना आम्ही चूल आणि मूल याच संकल्पनेशी जळून ठेवत आहोत की काय... ? हा प्रश्न मणाला विषन्न करणारा आहे.
शिक्षणाने मुस्तक सुधारते आणि मनगटामध्ये प्रेरणेची ताकद निर्माण होते, याची जाणीव पूर्ण स्तरावरील समाजाला अजूनही झाली नाही हे वास्तव आपल्याला स्वीकारावे लागेल....बेटी धन पराया का या विचाराने अंधकारात जीवन जगणारे पालक आजही मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणासाठी धडपड करताना दिसत नाही याचाच परिणाम लातूर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलेच जास्त असतात.
शिक्षण आणि सुज्ञ झालेली मुलगी एकाच घराला नाहीतर दोन्ही घराला ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकारातून बाजूला काढून सशक्त बनवते आणि स्वतःच्या पायावर कुटुंबाला उभा करण्यास कारणीभूत ठरते. शिक्षणाने स्त्रीचा आत्मविश्वास दुणावतो. नारी शक्तीची जाणीव तिला होते आणि वाढलेल्या आत्मबलाने ती येणाऱ्या संकटांवर प्रहार करण्यासाठी तिच्यातल्या दुर्गा शक्तीला ती जागृत करते. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञान आणि त्याच सोबत संस्कारी जीवनाचा शिक्षणाचा मार्ग हा नक्कीच मुलींच्या मस्तीष्काला मजबूत करणारा आहे.
आज गरज आहे ते विकृत मानसिकतेतून बाहेर येऊन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात उतरवण्याची.आजही उच्चवर्णीयांच्या मुलींना भरमसाठ शिक्षण दिले जाते आणि म्हणून एकाग्रतेने अभ्यास करणाऱ्या मुलीचा अनेक विभागांमध्ये मुलांपेक्षा सरस असल्याचे आपल्याला निकालानंतर लक्षात येते आणि म्हणून प्रत्येक पालकांनी मुलींना शिकवू द्यावे तिची शिक्षणातील क्षमता तिला पाजळू द्यावी...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये दाखवलेली धडपड आजही समाजाला किती मार्गदर्शक आहे...! पोट भरायला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिक्षण आणि शिक्षणाच्या ज्ञानाने आपलं डोकं भरायला सुद्धा द्या...., विद्द्या नसेल तर सगळं जीवनच व्यर्थ आहे .... असा संदेश फुले दाम्पत्याने सर्व समाजाला दिला. एकेकाळी निरक्षर असलेल्या आपल्या पत्नीने अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असलेला कागद हरवला याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी स्वतः महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा निर्माण करून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुलगी शिकली तर घराला पुढे नेई हा विचार त्या काळात त्यांना सुचला आज इतके वर्षे उलटून गेली तरी सुद्धा आम्ही मुलींना फक्त कामापुरतेच आणि साक्षर करण्यापुरतं शिकवत असू तर खऱ्या अर्थानं फुले दांपत्यांनी केलेला विचार आमच्या मनात रुजला आहे की नाही ही शंका निर्माण होते.म्हणून आता आपण आपल्या मुलींना शिकू द्या....मनसोक्त त्यांना त्यांच्या पंखात शिक्षणाचं बळ घेऊन या ज्ञानविज्ञानाच्या आकाशामध्ये गरुड भरारी घेऊ द्या......
नारी तू नारायणी या अर्थानं मुली आणि महिला मधून नारी शक्तीला जागृत करण्यासाठी शिक्षणाचा खतपाणी त्यांच्या या रोपट्याला घालूया आणि ज्ञानाचा अथांग वटवृक्ष बहु देऊन त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये आपण सर्वजण आनंदाने जीवन व्यतीत करू या.
म्हणूनच मुलींना शिकवा आणि समृद्ध होऊ द्या...तेच खऱ्या अर्थाने मुलींचे अर्थातच समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे..
श्री ज्ञानेश्वर झगरेे गुरुजी (वाकदकर)
============★=============
मुलींचे शिक्षण : एक सुंदर स्वप्न
स्वामी विवेकानंद म्हणतात, "स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही". शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच स्वामी विवेकानंदांना याची तीव्र जाणीव झाली होती. महिलेला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव तेव्हाच होईल, जेव्हा तिच्या शिक्षणाने तिच्या विचारांची व्याप्ती वाढेल. त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल .
भारतीय संस्कृती विकासाच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली, तर एक गोष्ट लक्षात येते पूर्व कालखंडात स्त्रीची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची होती. तेव्हा गार्गी सारख्या बायका दरबारातही पुरुषांबरोबर चर्चेत, वादग्रस्त प्रश्नोत्तरात भाग घ्यायच्या. तेव्हा 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताl अशी स्थिती होती. मध्य कालखंडात ती वासना आणि विटंबनेची प्रतीक बनली. नंतर उत्तर कालखंडात गुलामगिरीच्या पाशात स्त्री अडकली. जिथे मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे, तिथेही एक माणूस म्हणून स्त्रीकडे कधीच पाहिले गेले नाही हे वास्तव आहे. लहानपणी बाप, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा या त्रिकोणात स्त्री बंदिस्त झाली होती. चूल आणि मूल यातून ती बाहेर पडली नाही. तिला कोणीही बाहेर काढले नाही. स्त्रीची आता परिस्थिती, 'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी l हृदयी अमृत नयनी पाणी l अशी झाली होती.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे साधारण 1948 सालानंतर स्त्री जागी झाली. आपल्यावरचे अन्याय दूर व्हावेत, समाजात समानता मिळावी, पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे, यासाठी ती प्रयत्न करू लागली. त्यासाठी त्यांना प्रथम शिक्षण मिळाले पाहिजे हे तिने ओळखले. या आंदोलनाची पहिली अग्रणी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. यांनी शाळा सुरु केली. ज्ञानदान सुरू करून महिलांना सक्षम करण्यास सुरुवात केली. त्या सुमारास पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनीही ही शिक्षणाची ज्योत पुढे प्रखरतेने तेवत ठेवली. स्त्रियांच्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडणारे काही समाजसेवक पुढे आले. महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे व विनोबा भावे हे मुलींना शिक्षणाची दिशा दाखवणारे दीपस्तंभ ठरले. त्यांनी स्त्रियांना स्वाभिमानाने, सन्मानाने जगण्याचा महामंत्र दिला. आता मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण हे समाजाने ओळखले. त्यानुसार वाटचाल सुरू झाली. शहरात याची सुरुवात लवकर झाली.
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळत नसे. त्यांची फार कुचंबणा होत असे. ग्रामीण भागातील गरिबी, शिक्षणाच्या बाबतीत पालक अनभिज्ञ, निरक्षर, शिक्षणासाठी लांब वर जावे लागणे अशा कारणांवरून मुलींचे शिक्षण मागे पडत असे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाने खूप मोठा हातभार लावला. 'सर्व शिक्षा अभियान' मोहिमेमुळे मुलींच्या प्राथमिक शिक्षणाला प्रेरणा मिळाली. शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी मुलींना उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, इत्यादी योजना राबवल्या गेल्या. त्यांना मोफत गणवेश, मोफत पुस्तके, विद्यावेतन, एसटीने मोफत प्रवास, अशा ही योजना राबवल्या. मुलींना सगळीकडे शाळेचे शिक्षण मोफत केले. या सर्व योजनांना पूर्ण यश नाही म्हणता येणार, पण बऱ्याच अंशी यश मिळाले. त्यामुळे मुलींच्या जागृकता यायला लागली आणि मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढली.
देशाच्या विकासासाठी एक सुशिक्षित स्त्रीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शिक्षणामुळे आलेली विचारांची प्रगल्भता तिला आयुष्यभर साथ देते. तिच्या कुटुंबासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे ती ठरवते. हे विचार स्वातंत्र्य तिला मिळते.
शिक्षणामुळे स्त्रीला तिच्या अधिकारांची व सशक्तीकरण यांची ओळख होते. ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनते. आर्थिक संकटात तर शिक्षण वरदानच ठरते. ती कुटुंबाचा आर्थिक भार सहज वाहू होऊ शकते. शिक्षणामुळे ती सक्षम होते. कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करू शकते.
स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण वाढावे म्हणून कडक धोरणे व कायदे केले गेले. शासकीय निमशासकीय यंत्रणा मध्ये 30 टक्के आरक्षण मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांत 50 टक्के आरक्षण मिळाले. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्त्रियांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी दिली गेली. कायदेशीर मदतीसाठी राज्य महिला आयोग स्थापन झाला. स्वसंरक्षण व शारीरिक विकास प्रशिक्षण ह्यात जुडो, कराटे, योगा याचा समावेश आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने संगणक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तेथे वसतिगृहाची सोय केली. पतसंस्था, इतर सामाजिक संस्थांद्वारे शिवणकला, ब्युटी पार्लर, मेणबत्त्या बनवणे, अशा कितीतरी छोटे-छोटे कोर्सेस घेतले गेले. ज्यामुळे स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू शकतील.
आज एकविसाव्या शतकात स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाही. आय. टी. क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करत आहेत.इंद्रा नुयी पेप्सीच्या CEO, किरण शॉ मुजुमदार एमडी चेअरमन बायो कॉम., किरण बेदी पोलीस कमिशनर, सुधा मूर्ती इन्फोसिस , यांच्यासारख्या स्त्रिया खाजगी क्षेत्रांमध्ये उच्च पदे विभूषित करीत आहेत. पी टी उषा, सायना नेहवाल, पी व्ही सिंधू यासारख्या महिला क्रीडाक्षेत्र गाजवत आहेत. कल्पना चावला अवकाश भरारीत मागे नाही. भारताचे उच्चपद राष्ट्रपतीपद हे प्रतिभा पाटील यांनी भूषविले, तर इंदिरा गांधींनी पंतप्रधान पद. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जेथे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती, तेथे बायका सहजपणे वावरू लागल्या आहेत, नव्हे खांद्यावर जबाबदारी घेऊन ताठ मानेने वावरत आहेत.
स्त्रीमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, सशक्तीकरण, म्हणजे पुरुषांशी वर धरणे किंवा संघर्ष करणे नव्हे, तर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे वाटचाल करणे. असे झाले तर जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच नारी सक्षम, सशक्त होईल. मग जगाच्या उद्धाराला वेळ काय लागणार?
शुभदा दीक्षित (11)
पुणे
============★=============
आदिवासी मुलींचे शिक्षण
आम्ही परीसरात वावरतो.परीसरात वेगवेगळे समाजबांधव राहात असतात.दलित, आदिवासी,सवर्ण, मागासवर्गीय, अल्पसंख्याक इत्यादी.यापैकी आदिवासी समाज पाहू.
ज्यांचे जीवन मुळात किड्या मुंग्यांवर आधारलेले आहे.ज्यांना खायला भाजी भाकरी मिळणे कठीण आहे असा समाज म्हणजे आदिवासी.हा समाज आजही सामान्य लोकांच्या संपर्कात नाही.कितीतरी कोसो दूर आहे.तिथे आजही पाश्चात्य संस्कृती पोहोचली नाही.
आदिवासी समाजातील मुलींचे आजही विवाह लहानपणीच करतात.बालविवाह प्रथा रुढ आहे.पण काही लोक या समाजातील सुधारलेले अाहेत.कारण ते शहरी भागात संपर्कात राहतात.पण मुळात काही खेड्यात शहरीकरण पोहोचलेले नसल्याने ती मंडळी शिकत नाहीत.त्यामुळं विवाहाचं स्वरुपही वेगळं आहे.मुळात पोटाला कुंकू लावल्यागत तेथील परीस्थिती असून तिथे बदलाची परिस्थिती नाही.त्यांना बदल आवडत नाही. त्यातच शहरी भागातले काही तरुण या खेड्यात जातात.तिथला अशिक्षीतपणा न्याहाळतात व त्या ठिकाणी असलेल्या सुंदर मुलींना भाळवतात.मग काय? या भोळ्याभाबड्या मुलींना मोठमोठे आश्वासन देवून त्यांच्यावर बलत्कार करतात.यातच गर्भपाताच्या औषधीचे ज्ञान नसल्याने कुमारी मातांची संख्या या समाजातील काही मुलींना जीवघेणी ठरते.ही वास्तविकता आहे.
मुळात विचार केल्यास आदिवासी समाजबांधव हे जास्तीत जास्त दुस-यावर विश्वास ठेवतात.एखाद्याशी मैत्री केली तर ती मैत्री टिकवतात.पण त्या मैत्रीत अंतर पडू देत नाहीत.शिवरायांनी स्वराज्य स्थापन करीत असतांना याच आदिवासी लोकांचा वापर करुन घेतला.याच आदिवासी मित्रांची मैत्री केली.ज्या मैत्रीतून स्वराज्य स्थापन तर झालंच.शिवाय या मैत्रीतूनच या आदिवासी बांधवांनी स्वराज्याचे तोरण बांधत असतांना प्राणांचे बलिदानही केले.ह्याच मैत्रीचा फायदा घेवून आज कित्येक तरुण या आदिवासी मुलींच्या मायबापांनाही आश्वाशित करीत या मुलींना शहरात आणतात.त्या मुलींही पराया तरुणांसोबत विवाह करुन शहरात येतात.नव्हे तर शहरात आल्यावर हेच तरुण या आदिवासी दुर्गम भागातील मुलींचा घरकाम करण्यासाठी मोलकरीण म्हणून कामाला लावतात.किंवा या मुलींना वेश्यालयात विकून रग्गड पैसा कमावतात किंवा घरीच तिला वेश्येचे काम करायला लावून कुंटनखाणे चालवतात.आजही वेश्यालय पाहिलं तर आदिवासी भोळ्याभाबड्या मुलींची संख्या या वेश्यालयात जास्त आहे.
आदिवासी समाजात शिक्षणाची हेळसांड होत आहे.ते मुलांना प्राथमिकता देवून शिकवायचेच असेल तर मुलांना शिकवितात.मुलींना नाही.कारण ब-याचशा गावात शाळा पहिली ते चौथीच्या वर्गापर्यंत शाळा आहेत.पुढील शिक्षणासाठी त्यांना पायपीटच करावी लागते.कारण वाहतूकीच्या सोयी नाहीत.ब-याच लांब जावे लागते.त्यातच लांब जातांना जंगली हिंस्र प्राण्यांची भीती वाटत असल्याने अशी मुले जंगलातून जायलाही घाबरतात.त्यामुळं ते शिक्षणात मागे पडतात.
मुले गावात शाळा असल्यानं शिकतात जरुर.पण पुढच्या शिक्षणाची कितीही आस असली तरी हिंस्र प्राण्यांची भीती आणि नदी पार करणे,त्यातच पावसाळ्यात ओंडक्यावरुन नदी पार करतांना घडणारे जीवघेणे प्रसंग त्यांना पुढचे शिक्षण घेवू देत नाही.पर्यायानं ते शिक्षण क्षेत्रातही मागे असतात.
*शासनाच्या उपाययोजना*
शासनाने या आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या.त्यांना आरक्षणाची सोय करुन दिली.पण आरक्षण कुणाला मिळत?खरंच हे आरक्षण त्या तमाम आदिवासी सामान्य लोकांना समजतं का?त्यांना फायदा कसा घ्यायचा हे तरी समजते का?याचं उत्तर नाही असंच आहे.सर्वच क्षेत्रात जरी या लोकांसाठी शासनाने कल्याणकारी योजना जरी आखल्या असल्या तरी त्यांना त्या योजना कळत नाहीत.त्यातच त्यांना शिकविणारे उदासीन घटक पुरेसे नाहीत.
पहिली ते चौथी.कुठेकुठे सातवीपर्यंत शाळा आहेत.पण या शाळेत नियुक्त केलेले शिक्षक शहरी भागातील आहेत.त्यांच्या बोलण्याची भाषा ही या आदिवासी मंडळींना कळत नाही.शिवाय हे शिक्षक या आदिवासी भागात नियुक्त असूनही गावात राहात नाही.हे शिक्षक विकसीत शहरात राहतात.ते आठवड्यातून एकदा शाळेत जातात.तसेच अधिकारी तपासणी करीत नसल्याने ते आठव्या दिवशी जावून शिक्षक हजेरीवर आठही दिवसाच्या सह्या मारतात.शिवाय शिकवायचेच झाले तर रोजच्या शिकविण्यासाठी ते शिक्षक गावातीलच एखाद्या हुशार मुलांना मासीक पाचशे रुपये देवून शिकवायला लावतात.अर्थात मलाई हे शिक्षक खातात.अन् बाकी उरलेलं पाणी त्यांना.पैशाचा अभाव असल्याने या तरुणांना मिळालेले पाचशे रुपये पाच ते दहा हजार रुपयाएवढे वाटतात.संगणकाचा जमाना असला तरी ह्या भागात वर्षोगिनती नेट पोहोचत नाही.अधिकारी वारंवार भेटी देत नाही आणि भेटी दिल्या तरी हे अधिकारी सेटींगवाले असतात.शिक्षक जरी दोषी आढळला तरी त्यांचेवर कार्यवाही होत नाही.कारवाई तर दूरच.खरंच यातून आदिवासींच्या समस्या सुटतील काय?याचेही उत्तर नाही असेच आहे.
राजकारणाचा विचार केला तर राजकारणी या गावात जातात.आपल्या मतलबासाठी या लोकांचा वापर करतात.त्यासाठी त्यांना दारु पाजतात.शंभर रुपयाची नोट देतात.ते शंभर रुपये या लोकांना मोठे वाटत असल्याने या आदिवासींची गठ्ठा मते पडून उमेदवार निवडून येतो.पण तो उमेदवार याच आदिवासी भागात पाच वर्ष पोहोचेलच असे घडत नाही.हे नेतेही मलाई खातात.पण या लोकांना थोडासी सायही मिळत नाही.आज भारत स्वतंत्र्य झाला असला,एवढी वर्ष झाली असली तरी आजही या भागात रस्ते पोहोचले नाही.शिक्षणाच्या सोयी पोहोचल्या नाही.शिक्षकही तन अन् मनाने पोहोचलेले नाहीत.वेतन मात्र उचलेले आहे.तरुण लोकं तेवढे पोहोचलेले आहेत.भोळ्याभाबड्या मुलींना फसविण्यासाठी.तसेच त्यांचा वापर करुन पैसा मिळविण्यासाठी.बदल्यात काहीही न देण्यासाठी.
*तरुणांची भुमिका व शासनाची भुमिका*
आज आदिवासी भागांचाही विकास होणे गरजेचे आहे.तिथेही शिक्षणाच्या सोयी पोहोचणे गरजेचे आहे.तिथेही आरोग्याच्या सोयी पोहोचणे गरजेचे आहे.यासाठी तरुणांनी सेवेच्या दृष्टीने पुढे येणे अपेक्षीत आहे.नव्हे तर त्या भागातील तरुणींना न फसवता त्यांची मदत घेवून नव्हे तर तरुणांचीही मदत घेवून या आदिवासी भागातील मंडळींना मदत करावी.त्यांचा विकास करावा.नव्हे तर त्यांच्या शिक्षणाच्या गैरसोयी दूर कराव्यात.शासनानेही वेतन शिक्षकांना न देता अशा लोकांच्या टीमला द्यावे जे खरंच आदिवासी भागात सेवा करु शकतात नव्हे तर करतात.जे शिक्षक शिकवीत नाहीत.त्यांना तिलांजली द्यावी किंवा स्थानांतरीत करावे.तसेच ज्या शिक्षकांची खरंच मनापासून आदिवासी भागात शिकविण्याची इच्छा आहे.त्यांना पाठवले तरी चालेल.एवढंच नाही तर या भागात शिक्षक नियुक्त करतांना याच भागातील मुलांना शिकविण्यासाठी नियुक्त करावे.जेणेकरुन त्यांच्या मातृभाषेत त्यांना शिकवता येईल.नव्हे तर आवडीने त्यांना शिकता येईल.कारण आपली भाषा कोणालाही आवडते.समजते.तसेच या भागात हे तरुण शिकवितात की नाही हे वेळोवेळी अधिकारी वर्गाने पाहायला हवे नव्हे तर संगनमत न करता वागायला हवं.विशेषतः यासाठी त्यांचा अभ्यासक्रम राबवितांना त्यांचा अभ्यासक्रम त्यांना समजेल असाच असावा.त्यांच्या भोषेतील त्यांची लिपी वापरुन तयार केलेला असावा.
असे जर झाले तर त्यांना आपल्यावरील अत्याचार दूर करता येतील.नव्हे तर कोण आपल्याला फसविणार आहे.कोण फसविणार नाही हे सुद्धा कळेल.त्यांची फसवणूक होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे शासनाच्या योजनाही सामान्य आदिवासी बांधवापर्यंत पोहोचतील.ते सुधारणांच्या कक्षेत येतील.मग कोणतेच नेते त्यांना दारुची बाटली व शंभर रुपये देणार नाहीत व कोणतेच नेते मोठमोठे आश्वासन देवून त्यांना फसवणार नाहीत.जे विकास करु शकतात.तेच नेते निवडून येतील व एकंदर सांगायचे झाल्यास या लोकांचा विकास होईल.नव्हे तर या नेत्यांना निवडून येण्यासाठी करावाच लागेल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
============★=============
"मुलींचे शिक्षण"...... आज आपण मुलींच्या शिक्षनाचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ही जोडगोळी उभी राहते.मनुस्मृती नुसार कोणत्याही स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता त्यांचा काळ हा पारतंत्र्याचा काळ होता मुलीना शिक्षण देणे हे आपल्या धर्मा विरोधी आहे असा त्याकाळी समज होता पण महात्मा जोतिबा फुले याना हे चुकीचे वाटले त्यासाठी मुलींच्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी महिला शिक्षकेची गरज होती त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपण प्रथम आपल्या सावित्रीबाईला घरातच शिकवू नंतर सावित्रीबाई मुलींची शाळा सुरू करू शकते म्हणून सावित्रीबाई ला शिक्षण दिल्यानंतर शाळा पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली पण तेथील लोकांना ते आवडत नव्हते त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई ज्या रस्त्याने शाळेत जात असत त्यावेळीं मनुवादी लोक त्यांचे अंगावर शेणाचे गोळे फेकत,काही अंडी फेकत जेणेकरून त्यांची साडी घाण व्हावी व शाळेत जाऊ नये जेणेकरून शाळा बंद पडेल.पण सावित्रीबाई याला घाबरल्या नाहीत त्यांनी शाळेचे काम अधिक जोमाने सुरूच ठेवले त्यासाठी त्यांनी शाळेत जाताना एक दुसरी साडी बरोबर घेऊन जात होत्या शाळेत गेल्यानंतर खराब झालेली साडी बदलत असत अशाप्रकारे शाळा सुरू ठेवल्यामुळेच" मुलींचे शिक्षण"सुरू झाले त्यामुळे त्यांना भारतातील पहिली शिक्षिका म्हणून ओळखले जाते.त्यावेळी सावित्रीबाईनी दगड धोंड्यांना भिऊन शाळा सुरू ठेवली नसती तर आजची महिला"चूल आणि मूल" यातच अडकून पडले असती .तिचे शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंदच राहिले असते.स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई व त्यांना सहकार्य करणाऱ्या त्याचे पती महात्मा जोतिबा फुले यांनीच घातला आहे .शिक्षणा शिवाय प्रगती करत येणार नाही हे त्यांनी ओळखले होते ते नेहमी म्हणत असत की,"विधे विना मती गेली ,मती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित्त विना शूद्र खचले,एवढे अनर्थ अविध्येने केले" त्यामुळेच त्यानि सावित्रीबाईला मदत करून १८४८ पहिली मुलींची शाळा काढली आज मुलीच्या शिक्षणाचे श्रेय सावित्रीबाई व महात्मा फुले यांचेकडे जाते एक स्त्री शिकली तर थिटे केवळ कुटूंबच शिकत नाही तर दोन्ही कुटुंब शिकली जातात एक माहेरी व दुसरे सासरी.स्त्री दोन्ही कुळांचा उद्धार करू शकते.त्यानंतर स्त्री च्या शिक्षणाचे महत्व लोकांना पटू लागले मुलीला सुद्धा मुलाबरोबर शाळेत घालू लागले नाही तर असा समज होता की "मुलगी म्हणजे परक्या घरच धन" कारण एकदा मुलीचे लग्न करून दिले की आपले कर्तव्य संपले असा समज होता पण तीच मुलगी शिक्षणा मुळे भविष्यात तिच्या स्वतःचे पायावर उभी राहू शकते.हे पालकांना व त्या मुलीला सुद्धा कळल्यामुळे मुलीच स्वतःहून पुढे येऊ लागल्या आहेतत्या आता कोठेच मागे नाहीत हे केलं मुलींच्या शिक्षणाचा परिणाम आहे.ती स्त्री आपल्या थोर स्त्रीयाचा इतिहास वाचू लागली आहे.माता जिजाऊ माता, अहिल्या,माता रमाई,झाशीची राणी लक्ष्मी ,मार्गारेट, इत्यादी वाचून ती आता तयार झाली आहे ती कोणत्याही क्षेत्रात मागे नाही ती राष्ट्रपती ,पंतप्रधान,राज्यपाल मुख्यमंत्री,वायुदल,पायदळ, नाविक अय तिन्ही दलामध्ये अधिकारी पदावर काम करीत आहेत याशिवाय आमदार ,खासदार,डॉक्टर,वकील,मंत्री,कलेक्टर,पोलीस अधीक्षक अभियंता, रेल ड्राइवर अशा एक नव्हे अनेक क्षेत्रात मुलींच्या शिक्षणामुळे प्रगती केलेली आहे.यावरून शिक्षण आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे कळून येते.केवळ सावित्रीबाईच्यामुळे आपण पोहचलेलो आहोत हे विसरता कामा नये पण काही सुशिक्षित महिला आपल्या शिक्षणाचा वापर न करता कर्मकांडामद्ये मग्न आहेत.एक वाचलेली कविता शिकलेल्या मुलींच्यासाठी प्रेरणादायी वाटते ती अशी। " डोळे उघड बया"केलीस का ग घटस्थापना?उपवास कडकडीत धरलाना? नऊ दिवस अनवाणी चालण्याचा पन केलास ना?आता नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे तू बिनधास्त कपडे घाल वर्षभराची एकदाच कसर काढ ..... सखे तू शिकलेली आहेस ना? स्त्री ....मुक्तिची वल्गना करतेस ना? मा..जिजाऊचा आदर्श घेतेस ना ? मग मला सांग सखे मा जिजाऊ नी कडकडित नउ दिवस कधी उपवास केला का? तुज सारखे नउ दिवस नउ रंगाचे कपड़े परिधान केले का ? अग मा जिजाऊने शिवबा घडवाला। सांग सखे मला तू तुझ शिवबा कुठे दडवला? सावित्रिची लेक म्हणते तू विसरली का त्याग सावित्रिचा .तुझ्या शिक्षण साठी तिने मार सोसला दगड शेण गोळे..जेव्हा सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी झटत होती. आग सखे सांग ना तंबोरा घेऊन ती सरस्वती कोणत्या शाळेत मुलींना शिकवत होती ?.सखे अशी कशी ग तू खुली झाली मनुवाद्यांच्या भूलथापांना तू बळी पडली.. सांग मा उपवास पकडून कुणाचे भले झाले? तुझ्या ह्या अंधश्रदेपायी काहींचे पोट भरत गेले अग सोड सखे ही अंधश्रद्धा .. नको गरब्यात तू नाचावे.तुझा आदर्श असू दे मा जिजाऊ सावित्रीबाई यांना तू वाचावे.त्यामुळे मुलींचे शिक्षण आपल्या रोजच्या कामात उपयोग करावा."महात्मा फुले कहते थे"....मंदिर का मतलब होता है मानसिक गुलामीका रास्ता.स्कुल का मतलब होता है जीवन मे प्रकाशक रास्ता.मंदिर की जब घंटी बाजाती है तो हमे संदेश देती है की हम धर्म, अंधविश्वास,पाखंड और मुर्खत की ओर बद्ध रहे है.वही जब स्कूल की घंटी बजती है तो संदेश देती है की हम तर्क पूर्ण ज्ञान ओर बढ़ रहे हैं। ..अब तय करो आपको करना है कि आपको जाना कहा है ... आपण समाजात वावरताना आपली छाप आपल्या कामा तुन दिसली पाहीजे आपल्या कुटुबातआपली सासु हिला आईची माया दिली पाहिजे .तरच" मुलींचे शिक्षण" ...सुरु केले बदल सावित्रिमा फुले यांना लाख लाख सलाम
. .लेखक जी. एस.कुचेकर -पाटील भुइंज ता. वाई जि.सातारा मो.न.७५८८५६०७६१.
============★=============
" मुलींचे शिक्षण "
मुलींचे शिक्षण या विषयावर लिहिणं म्हणजेच सावित्रीबाई फुलें पासूनच लिहिणे योग्य ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1948 मध्ये मुलींची पहिली शाळा तात्याराव भिडे यांच्या वाड्यात सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात श्री ही सून व मॉल आणि डोक्यावर पदर सांभाळण्यात व्यस्त होती, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार समाजाने नाकारला होता. सर्वत्र अज्ञानाचे धर्म रो डीजे व विषमतेचे साम्राज्य घोंगावत होते. त्याकाळी श्रीला गुलाम समजत होते कारण श्री दुसऱ्यावर अवलंबून होती, अशा काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली व सावित्रीबाई फुले यांना अक्षर ज्ञान देऊन पहिली स्त्री शिक्षिका बनविली. त्याकाळी स्त्रियांनी शिकणे म्हणजे ताप आणि त्यांना शिकणे म्हणजे महाभयंकर पाप असे समजले जात होते.शाळेत सावित्रीबाई शिकवताना शिकवतात सनातन मंडळींनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना शाळेत जाता येत असताना लोक अपमानाची भाषा वापरत असत .त्यांच्यावर शेन पाण्याचा चिखलाचा मारा करत असत पण सावित्रीबाई मात्र आपल्या व पतीच्या कार्यासाठी झटत होत्या. त्यांनी न डगमगता आपले काम निष्ठेने केले.
अत्यंत खडतर परिस्थिती स्त्रियांनी सावित्रीबाईंनी केलेले शैक्षणिक कार्य निश्चितच वंदनीय असे होते. सामाजिक दृष्ट रूढी व स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध स्त्रियांच्या हप्ता करिता त्यांनी आपला आवाज बुलंद केला होता. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लक्षात घेतले तर आज आपणास जे मुलींच्या शिक्षणाचे चित्र पहावयास मिळते आहे ते दिसले नसते .
आज शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. अनेक शिष्यवृत्ती तसेच मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आरक्षित जागा यांचे नियोजन केलेले आहे. निश्चितच यामुळे आज स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढले असून सर्व क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत. आज घरूनही मुलींना पाठिंबा मिळत आहे. नोकरीच्या जागी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा स्त्रियांना आदर व सन्मान मिळत आहे. यासाठी सर्व स्त्रिया सावित्रीबाई फुले यांच्या आजन्म ऋणी राहतील. घराला घरपण तसेच संस्कार व मर्यादा यांचे शिकवण स्री मुळेच मिळते .याचा परिणाम त्या स्त्रीच्या कुटुंबातील व्यक्तींवर पुढच्या पिढीवर व तसेच ती वावरत असलेल्या समाजावर देखील होतो . घराला शोभा येते तेही स्री मुळेच , स्री फक्त भाकरीच भाजते असे नाही तर सासू-सासर्यांची सेवा ,पतीसेवा, मुलांचे संगोपन घरकाम देवधर्म करीत करीत अनेक आव्हाने पेलत ती सामाजिक बांधिलकी जोपासत असते .
ज्या स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात उच्चांक गाठला आहे त्यांच्याकडे सहनशीलता श्रद्धा नम्रता उदारता व मर्यादित होता असे दिसून येते म्हणूनच त्यांनी अज्ञानाचा निरक्षरतेचा बुरखा फाडून आपल्या जीवनातील उद्दिष्ट साध्य केले आहे . नियती पुढे त्या पराभूत झाल्या नाहीत ,तसेच स्वार्थही साधला नाही तर कर्तुत्व दाखविण्यासाठी ज्यावेळी त्यांना संधी मिळत होती ,त्या त्या वेळी या संधीचे सोने करून अनेक स्त्रिया प्राचीन व आधुनिक काळात यशस्वी झाल्या आहेत .आणि अशाप्रकारे स्त्रियांनी आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली आहे.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
============★=============
34
कायद्याचे पालन होते की नाही मुलींच्या शिक्षणासाठी सांगणे कठीणच
१८४८ साली भारतातली पहिली मुलींची शाळा फुले दांपत्याने पुण्यात सुरु केली.सनातनी लोकांचा या शाळेला असलेला विरोध सर्वश्रुत आहे.चूल-मुल हेच महिलांचे कार्यक्षेत्र हे ठाम मत असलेल्या सनातनी समूहाला मुलींचं शिक्षण पचनी पडणार नव्हतच.मुलगी शिकली तर सगळ घर शिकणार हा मोठा धोका १८५७ साली इस्ट इंडिया कंपनी सरकारच्या विरोधात झालेल्या उठावात हिंदू-मुस्लीम एकत्र लढले.ब्रिटीश सरकारने भारताचा कारभार कंपनी सरकारकडून काढून घेतला.मात्र हिंदू-मुस्लिमांची एकजूट भविष्यात आपल्याला घातक ठरेल हे ओळखून जाणीवपूर्वक फोडा आणि झोडा नीती ब्रिटिशानी अवलंबली.
भारतीय राजकारणात देशव्यापी पुढारी म्हणून टिळकांचे नाव मोठे होते.मात्र टिळकांचे विचार,असंतोष आणि ब्रिटीश सत्तेविरोधात असलेला लढा राजकीय स्वरूपाचा होता.सामाजिक सुधारणांच्या बाबत टिळकांचा आगरकरांशी असलेला वाद आणि आधी स्वातंत्र्य आणि मग सुधारणा कि आधी सुधारणा आणि मग स्वातंत्र्य हा टप्पा महत्वाचा.जेव्हा ब्रिटीश कायदेमंडळात जागा देण्याची वेळ आली तेव्हा टिळकांचे “ कुणब्यांना संसदेत जाऊन नांगर हाकायचा आहे का ? “ हे वक्तव्य लक्षात घेण्याजोगे.
१९१७ साली करवीर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सर्वाना सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा लागू केला, कोल्हापुरात दलित व्यक्तीला हॉटेल काढून देऊन तिथे स्वतः जाऊन चहा पिला आणि वेगवेगळ्या बोर्डिंग स्थापन करून बहुजनांच्या शिक्षणासाठी तरतूद केली.आंबेडकरांच्या शिक्षणाला आणि कामाला राजर्षी शाहू आणि सयाजीराव गायकवाड या दोघांनी भरीव मदत केली.
मुलींच्या शिक्षणाला महत्व यावे म्हणून टिळकांचा मृत्यू आणि गांधींचा राष्ट्रीय राजकारणात उदय या एकाच वेळी घडलेल्या गोष्टी. फुले-शाहू-आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा आणि शिक्षणातून सत्ता मिळवण्याचा मार्ग , सरकारात वेगवेगळी अधिकारपद मिळवण्याचा मार्ग मोकळा केलेला. आजवर सत्तास्थानी असलेली सनातनी वर्गाची मक्तेदारी बहुजनांनी मोडीत काढायला सुरुवात केली तोच हा महत्वाचा टप्पा.
भारत देशातील काही प्रमाणात चांगले काम मुलींच्या शिक्षणसाठी होत याचा इतर देशात जर्मनीने ज्यू वंशाचे शुद्धीकरण करून सगळ्या जगाला चकित केलेले आहे.अस करून जर्मनीने आपल्या वंशाचा सर्वोच्च गौरव प्राप्त केलेला आहे.जर्मनीने हेही दाखवून दिलेलं आहे कि भिन्न वंशाच्या संस्कृती त्यांची पाळेमुळे भिन्न असल्याने त्यांच्यात ताळमेळ आणि एकजिनसीपणा येऊ शकत नाही.भारतात आपल्याला या गोष्टीकडून खूप काही शिकण्यासारख आहे.
आपल्या दुरावस्थेला आणि कसल्या तरी महान परंपरेच्या , इतिहासात झालेल्या पराभवाला अमुक एक शत्रू कारणीभूत आहे अशी शत्रूलक्षी मांडणी केली कि लोकांना ते आणि आपण या बायनरी मध्ये अडकवून दिशाभूल करणे सोपे जाते. वर्णवर्चस्ववादी पुरुषांची एकचालकानुर्वर्ती संघटना हे संघाच केल जाणार वर्णन खर तर सगळ काही सांगून जात फक्त आपल्याला त्यातला अर्थ समजून घेता आला पाहिजे.
नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून हा भस्मासुर पुढे काय करेल आणि या सगळ्यांचा अंत नेमका काय होईल आणि देश कुठे जाईल सांगता येत नाही. मुलींच्या शिकणं पाहिजे त्या प्रमाणात आताही दिसून येत नाही .कारण आपल्या भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे .
श्री सुंदरसिंग आर साबळे
गोंदिया
9545254856
============★=============
(15)
शिक्षित मुलगी : सामाजिक गरज
पूर्वीच्या काळी मुलींनी शिक्षण घेणे समाजविरोधी कृत्य मानले जात होते. पण, आता जे पालक मुलींना शिक्षण देत नाहीत त्यांना खरं तर समाजाने बहिष्कृत केले पाहिजे. माझ्या या विधानाला कुणी विरोध सुद्धा करेल पण, मला एक बाब येथे नमूद करावीशी वाटते की, पूर्वीच्या काळी मुलींना न शिकू देण्यामागे अनिष्ठ चाली-रीती, अनिष्ठ रूढी-परंपरा होत्या त्यामुळे मुलींना इच्छा असून सुद्धा शिक्षण घेता येत नव्हते. आता तर तशी परिस्थिती नाहीये. मुलींना शिकविण्याची आर्थिक परिस्थिती नसली तरी शासन मुलींच्या शिक्षणावर खर्च करते. इतकं असून सुद्धा जर मुलींना शिकवलं जातं नसेल तर त्यांना बहिष्कृत करू नये तर मग काय करावं ?
मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्यावर खऱ्या अर्थाने संस्कार लावते ती आई. आणि आईच जर अशिक्षित असेल तर त्या चिमुकल्यावर संस्कार तरी कसे घडणार. त्यामुळेच तर म्हणतात ना 'शिकलेली आई घरादाराला पुढे नेई.'
गुणवत्तेचा विचार केला की एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की, मुली या मुलांच्या बरोबरीने म्हटल्यापेक्षा त्यांच्यापेक्षाही पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळेच तर कोणताही निकाल लागला की मुलींच्या गुणवत्तेची टक्केवारी जास्त असते.
एकीकडे मुली सर्वच क्षेत्रात झेप घेत आहे, शासनसुद्धा मुलींच्या शिक्षणावर भरमसाठ खर्च करत आहे, पालक सुद्धा बऱ्याच प्रमाणात जागृत होत आहेत पण दुसरीकडे काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा येते आणि त्याचा त्रास त्या मुलीबरोबरच इतर निष्पाप, निरागस मुलींना सुद्धा भोगावा लागतो याला जबाबदार कोण ?
प्रत्येक समस्येवर शासन, प्रशासन काहीतरी ठोस पावले उचलेल या आशेवर राहणे सुद्धा चुकीचेच आहे. आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर आळा घालणे आपले सुद्धा कर्तव्य आहेच की.
शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरी असं न म्हणता प्रत्येकाने आपल्या जिजाऊंना चांगले शिक्षण दिले तर घरा-घरात शिवाजी घडणे अशक्य नाही. शिकलेली स्त्री ही एका कुटुंबालाच नव्हे तर समाजाच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान देत असते.
"मिळेल मुलींना शिक्षण ,
होईल समाजाचे रक्षण."
गणेश सोळुंके, जालना
============★=============
" स्त्री शिक्षण देशाचे भूषण " ( 14 )
आपल्या भारत देश पुरूषप्रधान संस्कृतीने व्यापून गेलेला आहे . म्हणून स्त्री कितीही मोठ्या पदावर असली तरीही आजही तिच्या भोवती पुरूषी दास्यत्वाचे वलय कायमच आहे . " शिक्षण हे वाघीणीचे दूध असून पिणारा अत्याचाराविरूद्ध गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही ! " हे देशातील संकुचित व अहंकारी पुरूष जाणून असल्यामुळे मुद्दामच स्त्रीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले . कारण त्यांची पारंपारिक पुरूषी सत्तेवर गदा येईल ना ! ही भिती मनात सलून आजही काही उच्चभ्रू समाजात स्त्री उच्च शिक्षणापासून अलिप्त राहिल्या जाते . राजस्थानामध्ये तर आजही मुलगी नकोशी होऊन नवजात स्त्रीभ्रुणाच्या गळ्याला नखे लावून तिला कायमचे संपवले जाते . स्त्रीला तुच्छ , दुय्यम स्थान दिल्या जाते . हे थांबल्याशिवाय कुटुंब , समाज , देश कसा विकसीत होईल ?
कुटुंबात स्त्री व पुरूष ही संसाराची दोन चाके मानली जातात ! पण श्रमीक भार मात्र या स्त्रीच्या खांद्यावरच अधिक दिला जातो . शिवाय स्त्री हीच स्त्रीची शत्रू म्हणून सासू , ननंद , मोठी जाऊ , या विविध रूपात आपल्या भूमिका साकारत असतात . जरासे काही स्त्रीने पुरूषी अन्याय व अत्याचाराबद्दल घरी वाच्यता केली तर .... सासरी तर तिलाच भले बुरे म्हणून वाईट ठरवितात ... आणि माहेरीही आई , भाऊ , वडिल लग्नानंतर परोक्षाची भूमिका साकारतात .... कुठं जाणार ती बिचारी ? तिथेच खितपत , जुलमी बेड्यांनी बंदिस्त होऊन अंतःकरणाने झुरून झुरून मरणार .... हे आता थांबायला हवे .... कायमचेच .... नि ते थांबेल केवळ ' शिक्षणानेच '.....
" हाती कलमतलवार व संविधानाची ढाल " , घेऊन प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर होऊन जगायला शिकले पाहिजे .... स्वतःच स्वतःचा शिल्पकार बनले पाहिजे .... ही जाचक षुरूषी संस्कृतीचे जाळे कलमतलवारीने फाडून त्याची लक्तरे करून जाळून टाकायला हवे ... तरच स्त्री अस्तित्व अबाधित , सुरक्षित व संरक्षित राहील अशा गिधाडी मनोवृत्तीपासून ....
खरे शिक्षण हे स्त्रीयांना अज्ञान , अंधश्रद्धा , कुप्रथा यांची जाणीव करून देते . आजही मुलांना कुलदीपक मानून मुलींना कलंकिनी , दळभद्री मानले जाते ... अरे जो मुलगा ज्या आईच्या गर्भात वाढला तिथेच ही मुलगीही वाढली ना ... मग निसर्गाने दुजाभाव केला नाही ... मानव का करतो ? का तिला बालपणापासूनच सासरी वागण्याचे ट्रेनिंग का देतो ? मुलाला दुधाचा ग्लास व तिला चहाचा घोट का देतो ? मुलगा म्हणून हवे तशे बाहेरगावी बुद्धीमत्ता नसले तरी शिक्षण दिले जाते .... आणि बुद्धिमत्ता असूनही मुलींना शिक्षणात आगेकूच करता येत नाही .... हे सर्व थांबण्यासाठी स्त्रीने हातात परिवर्तनाची कानस घेऊन अशा पुरूषप्रधान मानसिकतेवर शिक्षणरूपी घणाचा घाव घालून स्वरक्षण केले पाहिजे ... कुणालाही मदतीसाठी हाक न मारता स्वतःच सक्षम व आत्मनिर्भर बनले पाहिजे ... स्वत्वाची , स्वसुप्तक्षमतेची ओळख करून त्या स्वतःच स्वतंत्रपणे विकसित करून आपला एक वेगळा निर्भिड व आत्मविश्वासू ठसा प्रस्थापित केला पाहिजे ... तरच स्त्री शिक्षण सार्थकी होऊन देशाला भूषावह ठरेल ....
सर्वच पुरूष असे निष्ठूर नसतात ..छ. शिवराय , म . फूले , छ . शाहूराजे , डॉ . आंबेडकर आदी महान पुरूषांच्या विचारधारा किती श्रेष्ठ आहेत ... त्यांच्या विचारांची कास जर अशा जुलूमकर्त्या प्रत्येक पुरूषांनी अंगीकारली तर ... अशा जुलमात बंदिस्त असणाऱ्या स्त्रीया क्षणभर मोकळा श्वास घेतील ... आणि विशाल ज्ञानगगनी आपली उत्तुंग गरूडभरारी निःशंक घेतील ... आणि पर्यायाने कुटुंबासह आपल्या भारत देशाच्या विकासाला हातभार 100 % लावतील ..... म्हणून " स्त्री शिक्षण हे देशाचे भूषण असते ! "
अर्चना दिगांबर गरूड
मु . पो . किनवट , जि . नांदेड
मो . क्र . 9552954415
============★=============
आत्मनिर्भर लेक --- आत्मनिर्भर भारत
➖➖➖➖➖➖
एकदा आमच्या कामवाल्या मावशी सोबत पंधरा सोळा वर्षांची मुलगी मदतीला म्हणुन आली. तीला फरशी पुसायला सांगून मावशी दुसऱ्या कामाला लागली. ती बादलीत पाणी घेऊन हॉलमध्ये आली. जवळच टेबलावर पडलेले मासिक तिने हातात उचलले आणि चाळू लागली.अगदी साधा सुटसुटीत पंजाबी ड्रेस मध्ये ति मुलगी खुप गोड दिसत होती. मी तीला विचारलं का गं वाचता येतं का तुला ? तीने मानेनेच होकार दिला. तीला मी तिचं नाव विचारलं , तीनं तीचं नावं प्रिया सांगितले . कोणत्या वर्गात जाते मी तिला पुढे विचारले .ती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली लग्न झाले मावशी माझे मागच्या वर्षी. मला शिकायचं होतं पुढे पण घरची परिस्थिती बेताची होती दोन भावंडांच्या शिक्षणासाठी पैसा पुरत नव्हता म्हणून माझ्या वडिलांनी मला नववीत असतानाच शाळेतून दाखला काढून घेतला.मी तीला म्हटलं १२वी पर्यंत मुलींना शिक्षण मोफत आहे. तुझ्या घरच्यांना माहित नाही का ? ताई सर्व माहित होतं पण माझे आई-वडील अशिक्षित असल्याने त्यांचे विचार जुन्या पध्दतीचे आहेत. म्हणायचे काय करणार शिकून चुलच फुकणार ना ! पोरांना शिकायला पैसा लागलं तु कोणती एवढी नोकरी करून आम्हाले पोसनार ! घरची कामं शिकून घे ती कामात येईल तुझ्या. बोलता बोलता तीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी तिला जवळ घेतले. तीच्या डोक्यावरुन हात फिरवला. तिच्या कडे पाहून तीची दया येत होती.
गरीब कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला येणं म्हणजे गुन्हाच असं तिच्या कडे बघून वाटून गेलं. शहरी भागात मुलींच्या शिक्षणाबाबत बर्याच प्रमाणात जनजागृती झाली असली तरी खेड्यातील लोकं मात्र अजून मुलींच्या शिक्षणाबाबत अजूनही जागृत नाहीत. खेड्यातील सत्तर ते ऐंशी टक्के मुलींना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते कारण शाळा कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी असतात म्हणून त्यांना बाहेर गावी पाठवण्यात नकार दिला जातो किंवा घरात भावंडे जास्त म्हणून, मुलीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून तिला पुढे शिकू दिले जात नाही. आजही खेड्यातील शेतकरी अशिक्षित कुटुंब आहेत जिथे मुलीला शिकवण्यासाठी नकार दिला जातो. कारण मुलगी म्हणजे परक्या घरी जाणारं तिला शिकवून काय करायचं ,ती कुठं आम्हाला पोसनार ! ही खेड्यातील लोकांची मानसिकता अजूनही तशीच कायम आहे. 'लेक शिकवा ,लेक वाचवा' असा नारा महिला दिनी लावला जातो. पी.टी. उषा, इंदिरा गांधी, कल्पना चावला यांची आणि इतर काही मोजक्या प्रगतशील महिलांची नावे घेऊन स्टेजवर भाषणे फुलवली जातात. भाषणं ऐकून टाळ्यांच्या गजराने आपली पाठ थोपटून घेतल्याचे समाधान मिळविले जाते .
पण खरी परिस्थिती वेगळी आहे. आजही महिलांना शारिरिक मानसिक तणावाखाली जगावे लागते .
यात तळागाळातील गरीब महिलांची स्थिती फारच दयनीय आहे. कारण शिक्षण अपूर्ण म्हणून स्वतच्या पायावर उभे राहता येत नाही. म्हणून घरात मार खाऊन लोकांच्या घरी धुणीभांडी करून आपले पोट भरावे लागते. प्रिया सारख्या आज हजारो मुली आहे ज्या गरीब आहेत आणि आपले शिक्षण पूर्ण करु न शकल्याने घरात शारीरिक व मानसिक तणावाखाली वावरत असतात.
भारताला जर आत्मनिर्भर करायचे असेल तर खेड्यापाड्यात जाऊन स्त्री शिक्षणाचा जागर केलाच पाहिजे. फक्त शहरातील स्री शिकून भारत आत्मनिर्भर होणार नाही तर खेड्यातील प्रत्येक स्त्री शिकली तर भारत आत्मनिर्भर होईल. स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल आणि शिकलेलं कुटुंब आत्मनिर्भर बनण्यासाठी सक्षम बनेल.
देशाची प्रगतीची दोरी ही देशातील प्रत्येक लेकीच्या हाती आहे.
मग ती लेक शहरी भागातील असो वा खेड्यातील असो.
म्हणूनच 'लेक शिकवा देश आत्मनिर्भर बनवा'.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
============★=============
मुलींचे शिक्षण
शीर्षक - करा साक्षर लेकीला
कुटुंबात पुरुष शिकला तर तो एकटाच साक्षर, शहाणा होतो. परंतु स्त्री शिकली तर सर्व कुटुंब साक्षर बनवते हे उद्गार आहेत स्त्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाज सुधारक महात्मा फुले यांचे. त्या त्या स्फूर्ती मुळेच ते स्वतः साक्षर झाल्यानंतर त्यांनी प्रथम आपली पत्नी सावित्रीला साक्षर बनवले. ऑगस्ट१८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली.
विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली| नीतीविना गती गेली| गतीविना वित्त गेले| वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले||
निरक्षरपणामुळेच मनुष्य अधोगतीला जातो म्हणून मुलींना साक्षर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. हल्ली मुलींना मोफत शिक्षण नि पुस्तक वाटप चालू केले आहे. कारण आपण कितीही पुढारलो तरी मुलींना शाळा शिकविण्यात अजुनही मागासच राहिलो आहोत.मुलीच्या शिक्षणाला घातलेला पैसा आपल्या उपयोगी पडणार नाही.ती लग्न होऊन सासरी जाणार मग कमावलेला पैसा सासरीच वापरणार ही वृत्ती मुलीच्या पालकांची असते.म्हणून तिला शाळा शिकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आपण आजही कमी पडतो किंवा मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवण्यात येत नाही.
या अशा बऱ्याच कारणांमुळे देश मागास राहिला आहे. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात काम करू शकतात.'हम भी कुछ कम नही' हे त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे. परंतु आजही खेड्यात आठवीपर्यंत शाळा असेल तर मुलीला आठवीपर्यंतच शाळा शिकवली जाते. त्यामुळे मुलींची वैचारिक पातळी वाढत नाही. त्या कुटुंबात आपले पाय रोवून उभे राहू शकत नाहीत. त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते.अशा मुली मानसिक छळालाही बळी पडतात. कारण कायद्याच्या पळवाटा त्यांना ज्ञात नसल्याने छळ, जाच सोसून त्या आपले आयुष्य कंठत असतात. त्या आपल्या लेकरांनाही ज्ञान वाटण्यात निर्भर ठरू शकत नाहीत. त्यामुळे जीवनाच्या टप्प्यावर त्या मागे पडतात, एकाकी राहतात, त्यांचे मनोधैर्य कमी होते आणि मानसिक प्रगती खुंटते. साक्षर मुलगी आपोआप सदाचारी, संस्कारी बनते.
चार पुस्तके शिकून ती व्यवहारकुशल बनते. जगात वावरताना ती फसवली, नागवली जात नाही. ती उच्चशिक्षित असेल तर घराची जबाबदारीही पेलू शकते.अडाणी स्त्री प्रसंगी ढेपाळून जाते. परंतु साक्षर मुलगी आपल्या पायावर उभे राहते. दुर्दैवाने पतीचा मृत्यू झाला तर साक्षर मुलगी कुटुंबाची ढाल बनते. ती घराची आण-बाण शान बनून समाजाच्या रोषाला बळी न पडता कुटुंबाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करते. ती पडद्याच्या आत न राहता ताठ मानेने जगू शकते. हिमतीने, धैर्याने संकटाशी सामना करते. ती संकटापासून माघार न घेता संकटाचा सामना करते. ती आई वडिलांचा आणि घराण्याचा स्वाभिमान परत मिळवून देते. त्यामुळे मुलींना शिकवणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे आज गरजेचे बनले आहे. तिच्या संस्कारांचे बीज ती आपल्या लेकरांच्यात पेरते नि ते लेकरू स्वतंत्र जीवन जगण्यास समर्थ बनते. आई, ताई, बहीण, काकी, मामी, आत्या, मावशी या साक्षर असतील तर कुटुंब आणि देशच प्रगत बनतो. काही ठिकाणी लोकं 'घरात लेक जन्मली हे गेल्या जन्माचे पाप आहे' असे समजतात. तिची लिंग निदान चाचणी नंतर किंवा अर्भकावस्थेतच हत्या केली जाते. परंतु मुलीला मुलगा समजून शिकवले, वाढवले तर ती घराण्याची नव्हे तर देशाचे नाव जगाच्या इतिहासात नोंद करू शकेल. फक्त गरज आहे समजूतदार पणाची आणि सहिष्णू वृत्तीची. मुलगी जन्माची अडगळ न समजता" पहिली बेटी धनाची पेटी" असे समजून वाढवाल तर तिच्या कार्यकर्तृत्वाने ती तुम्हाला अभिमानाचे स्थान मिळवून देईल. तुमच्या वृद्धपणाची ती काठी बनेल.तेव्हा लेकीला जन्माला येऊ द्या नि तिच्या पंखांना बळ द्या.मग पहा ती आपले हात आकाशाला टेकेल नि तुमची मान अभिमानाने उंचावेल.
सौ. भारती सावंत
मुंबई
============★=============
'मुलींना शिकवा..देश वाचवा'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
'विद्येविना मती गेली ,मतीविना गती गेली ,गतीविना वित्त गेले,वित्ताविना क्षुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले' असा मूलमंत्र देणारे स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ओळींप्रमाणे शिक्षण सर्वांसाठीच गरजेचे आहे हे अधोरेखित झाले.
'मुलगी शिकली,प्रगती झाली' हे शाश्वत सत्य आज सर्वांनी जरी स्वीकारलं असलं तरीही आजही खेड्या पाड्यात आणि दुर्गम भागात मुलींच्या शिक्षणाची अवस्था भयावह आहे.आजही 'मुलगा वंशाचा दिवा,मुलगी परक्याचं धन'ही मानसिकता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही पाहायला मिळते.आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया मुलांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एक पाऊल पुढेच राहून सर्वच क्षेत्र पादाक्रांत करतांना दिसत आहेत. तरीही मुलींना शिकवताना मुलांपेक्षा काहीतरी हातचं राखूनच निर्णय घेणारे अनेक पालक भेटतील.आजही शाळा बाह्य विद्यार्थ्यांच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींचे प्रमाण हे साठ टक्केच्या वर आहे.हे आकडे मुलींच्या शिक्षणाबाबतचे भयावह चित्र दाखविण्यास पुरेसे आहे.
शासन स्तरावरून मुलींच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या काही खास योजना स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानीही सुरू ठेवावे लागते...या वरूनच मुलीच्या शिक्षणाची परिस्थिती लक्षात येते.खरे तर दहावी ,बारावी वा विविध स्पर्धा परीक्षांमधील मुलींचा टक्का हा सर्वच क्षेत्रात सर्वात जास्त आहे. ही मुलींची 'ताईगिरी' खरे तर सर्वांना सुखावह वाटत असली तरीही इयता पहिलीत दाखल झालेल्या एकूण मुलींपैकी दहावी पर्यंत गळती होणाऱ्या मुलींचे प्रमाण मात्र खूप धक्कादायक आणि काळजी वाढवणारे आहे.
आपण कितीही म्हटलं तरी आजही खेडेगावात मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाबाबत डावे उजवे केलं जातं हे नाकारून चालणार नाही. आजही मुलगी 18 वर्षाची झाल्याबरोबर तिचं लग्न करण्याची घाई केली जाते.मुलींच्या शिक्षणाबाबत आज परिस्थिती बरी दिसत असली तरीही उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचा सर्व्हे केल्यास 80 टक्के मुली ह्या सुशिक्षित घरातीलच दिसतील. याला अनेक सामाजिक ,आर्थिक कारणे कारणीभूत असली तरीही पालकांची मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता असते हे नाकारूनही चालणार नाही.
'शिकलेली आई,घरादाराला पुढे नेई'इतकंच शिक्षणाचे महत्व आहे ही मानसिकता बदलून 'शिकलेली आई समाजाला नव्हे देशाला पुढे नेई' अशी होणे गरजेचे आहे.या साठी पालकांचे उद्बोधन करून 'मुलगी परक्याचं धन'ही मानसिकता बदलण्याची गरज आहे .
मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा खरा खांब असते. संपूर्ण कुटुंबच तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्रीउद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणूनच मुलगा एका कुळाचा उद्धार तर स्त्री दोन कुटुंबांचा उद्धार करते.म्हणूनच आई एव्हढी चांगली शिकवण कोणीही घेऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी शिकलेली स्त्री तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते.
स्त्रीशिक्षणाचं महत्त्व जोतिबा अनेक वर्षांपूर्वी ओळखलं होतं. म्हणूनच १८४८ मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा पुणे येथे सुरू करून, आपल्या पत्नीला, सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना ती चालवायला दिली. महर्षी कर्वेनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. आपण २१ व्या शतकात राहणाऱ्यांनी शहरांपासून दूर असलेल्या गावात, खेडोपाडी, आदिवासी वस्त्यांमध्ये मुलींच्या शिक्षणाला मदत केली पाहिजे. सध्या तरुण पिढी या कामासाठी पुढे सरसावली आहे. म्हणूनच सर्वांनी या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे.
सर्वच क्षेत्र पादाक्रांत करतांना आज मुली दिसत असल्या तरी यात ग्रामीण,दुर्गम आदिवासी भागातील मुलींचे प्रमाण किती हा मात्र संशोधनाचा विषय ठरू शकेल.म्हणूनच सर्वच भागातील मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक प्रयत्नांना अधिक गती देण्याची गरज आहे.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
============★=============
स्त्री-शिक्षण
साक्षर जनता,भूषण भारता.
म्हणजेच साक्षर,सुशिक्षित व्यक्ती जेवढ्या जास्त तेवढे भारताला भूषणावह आहे.भारतात पुरुषांच्या बरोबर स्त्रिया ही सुशिक्षित आहेत. याचे सगळे श्रेय वंदनीय माता सावित्रीबाई यांनाच जाते.स्त्री पुरातन कालापासून अशिक्षित किंवा अडाणी नव्हत्या.तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ब्रम्हवादिनी स्त्रिया होत्या.गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा या विदुषी स्त्रियांनी राजदरबारात वादविवादात ऋषी, मुनींनापण हरवले असल्याचे पुरावे आहेत.
पण मध्ययुगीन काळात अनेक घडामोडी घडल्या व स्त्रिया हळूहळू चार भिंतीच्या आत बंदिस्त झाल्या. मनुवादी दृष्टिकोन बळावला व स्त्रियांचे स्थान एकदम खाली घसरले.कींमत नाहिशी झाली. राजघराण्यातील स्त्रिया फक्त शिक्षण घेऊ शकत होत्या.स्वातंत्र्योत्तर काळानतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी व सावित्रीबाई फुले या दांपत्यांनी स्त्री-शिक्षणाचा पाया रोवला.अतोनात कष्ट, हाल अपेष्टा सहन करून उभयतांनी आपले काम सुरुच ठेवले व तडीसही नेले.सर्व स्त्री-जातीकडून सावित्री मातेला वंदन करते.
स्त्रिया शिकू लागल्या,आपले विचार मांडू लागल्या.सारासार विचार करु लागल्या.
" एक स्त्री शिकली की सारं घर शिकलं "म्हणतात.बरोबरच आहे ते.कारण शिक्षणाने आलेला शहाणपणा,वैचारिकपणा यामुळे त्या आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन कुटुंबाला सुधारतात.आज समाजात सर्वच क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कुठेही कमी पडत नाहीत. उलट आपल्या शिक्षणाचा उपयोग त्या प्रामाणिकपणे करतात. कामात टाळाटाळ करत नाहीत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया दिसतात. कारण एक स्त्री च मुलांना जास्त समजून घेवून त्यांना प्रेमाने शिकवू शकते.आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांना आपली मुलगी सुरक्षित ठिकाणी असल्याची जाणीव सुखावून जाते.
शाळेत स्त्री शिक्षकांच्या उपस्थितीमुळे मुलिंना आपल्या अडचणी बिनधास्त सांगता येतात.व त्या निवांतपणे शिक्षण घेऊ शकतात.सरकारने मुलांना मोफत शिक्षण,बससेवा, मोफत पास,विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या देऊ केल्या आहेत.जेणेकरून मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी.आज सर्व क्षेत्रातील शिक्षणाची दारे मुलींना उघडली आहेत.शिक्षण घेऊन मुली आता स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर, आत्मविश्वासू बनत आहेत.आजच्या शिक्षित,स्वावलंबी स्त्री ला पाहिल्यावर, "बेटी हुँ मैं बेटी, मैं तारा बनुँगी,
तारा बनुँगी मैं सहारा बनुँगी ।
हे गीत कीती सार्थ आहे हे लक्षात येते.निकाल लागल्यानंतर निकालावर नजर टाकली की लक्षात येते की मुलांच्या पेक्षा मुलीच गुणवत्ता यादीत अव्वल आहेत.म्हणजे आजची स्त्री शिक्षणाच्या महत्वाला जाणते.त्याचप्रमाणे मुली या विचार करतात. परीस्थिती समजून घेतात व परीस्थिती कोणतीही असूदे त्यात तडजोड करुन सामावून जातात.ही स्त्रिला मिळालेली जन्मजात देणगीच आहे.
शिक्षणामुळे स्त्री आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकते,त्यांना मदत करु शकते.त्यांच्या शंका दुर करु शकते.आपली आई आपल्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे हे जेंव्हा मुलांच्या लक्षात येते तेंव्हा ती प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागतात.
शिक्षण मग ते कोणतेही असो कधीच वाया जात नाही. त्यामुळे मुलींना, स्त्रियांना शिकवा,साक्षर करा,कुटुंब सुधारा पर्यायाने देश सुधारा.
शिक्षित स्त्री सबला नारी
साऱ्या जगाला उद्धारी
शिक्षणाची गंगा न्या तिच्या दारी
सहजच ती सर्वांचाच उद्धार करी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,जिल्हा. कोल्हापूर
============★=============
मुलींचे शिक्षण काल आणि आज
एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकते असे आपण आज म्हणतो परंतु; आपली भारतीय संस्कृती देखील हेच सांगते. पुरातन काळातील स्त्रिया जसे अपाला, घोषा ,सरस्वती, आदिती यांनी वेद रचना व अध्ययन केले. एवढेच नाही तर खुद्द शिक्षण घेऊन युद्धातही सामील झाल्या. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी शिवाजी महाराज आग्र्याला नजर कैदेत असताना उत्तम राज्यकारभार सांभाळला. त्यापुढील काळ पाहिला तर परकीय आक्रमणे, सत्तेसाठी संघर्ष, दारिद्र्य या कारणांमुळे बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला. संपूर्ण जगाचा विचार केला तर भारतासारखीच परिस्थिती सगळीकडे होती. जातिवाद, साम्राज्यवाद ,गुलामगिरी , सत्तेसाठी संघर्ष यामुळे बहुजन समाज व स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिले. संपूर्ण जगाचा विचार केला तर भारतासारखीच परिस्थिती सगळीकडे होती असे लक्षात येईल . जातिवाद ,साम्राज्यवाद यांना जग सामोरी गेले,महायुद्धे झाली. हळूहळू लोकशाहीकडे वाटचाल सुरु झाली, सर्वाधिकार पुरुषांकडे एकवटण्यास सुरुवात झाली. महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रूपात स्त्री शिक्षणाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली .ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे राज्यघटनेत स्त्री-पुरुष समानता तत्व समाविष्ट झाले. कायद्याने स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळाला. तरीही बालविवाह, मुलगी परक्याच धन अशा विचारांचे शाप काही संपले नव्हते .देशाचे पहिले पंतप्रधान यांना एकच अपत्य म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा स्त्री शिक्षण विषयक दृष्टीकोण बदलला. अजूनही शिक्षणाची वाट बीकट होती. आदिवासी समाज, भटक्या जमाती शिक्षणापासून वंचित होत्या. घरकाम, शेतीकाम, दारिद्र्य, कुपोषण घरातील लहान मुलांना सांभाळणे या समस्या अजगरा प्रमाणे स्त्री शिक्षणाला विळखा घालून बसल्या होत्या .या अजगराच्या विळख्यातुन मुक्ती मिळवण्यासाठी पुढे आल्या त्या अनुताई वाघ. अंगणवाडी म्हणजेच, अनुताईंनी आदिवासी भटक्या कष्टकरी महिला व बालकांसाठी ची अमृत संजीवनी महाराष्ट्राला दिली. अजूनही आई-वडील मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास तयार नव्हते . शासनाने मोफत पाठ्यपुस्तके ,मोफत बस पास, मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अमलात आणल्या .आणि मुली शिकू लागल्या. हा प्रवास सुरू असताना लिंगभेद, स्त्री भ्रूण हत्या, मुलगी नको यामुळे मुलींचा जन्मदर घटला. कुटुंब व्यवस्था ढासळेल की काय अशी स्थिती निर्माण झाली परंतु ;पुन्हा समाजव्यवस्थेला सावरलं ते स्त्रीशक्तीने .भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, इन्फोसिसच्या सुधा मूर्ती, मदर तेरेसा ,ओलंपिक पदक मानकरी पी व्ही सिंधू, आयपीएस अधिकारी किरण बेदी या कर्तुत्ववान महिलांनी यशाची सर्वोच्च शिखरे गाठू त्यांना जन्म देणाऱ्या माता-पित्यांना गौरवान्वित केले .आणि मुलगी हवी ही मानसिकता जनमानसात रुजवली. भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉक्टर कलाम यांनी स्त्री मधील गुणवत्ता ओळखून संशोधक टेसी थाँमस यांच्यावर क्षेपणास्त्रे संशोधन प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. ती त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने पार पडली. शिक्षण प्रवास सुरू आहे पण; वाटेतील अडथळे यांचे स्वरूप बदलत आहे. छेडछाड, लैंगिक अत्याचार या संकटांना शिक्षण घेता घेता ती सामोरी जात आहे. उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते घरातील लोक म्हणतात तुला बाहेर पाठवले तर संरक्षण कोण करणार? त्यापेक्षा नकोच ते शिक्षण! मुलांना व पालकांना प्रश्न पडतो आहे प्रगतीचे यशाचे शिखर गाठायचे की शील जपण्यासाठी लढाई लढायची .इथे मात्र महिषासुरमर्दिनीचे रूप स्त्रीला घ्यावे लागणार आहे. तिला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे .प्रत्येक आईला आपल्या मुलाला सांगावे लागत आहे स्त्री भोग्य वस्तू नाही तर, ती आहे माता, बहीण ,पत्नी ,मैत्रीण. कुटुंबाने आपल्या मुलांना प्रेम, जिव्हाळा, संस्कृतीचे संस्कार दिले तर मुले आदर करतील आईचा, बहिणीचा, मैत्रिणीचा मग प्रत्येक मुलगी निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकेल शिक्षणासाठी ,तिच्या ध्येयासाठी .स्त्री शिक्षणात मोठा अडथळा आहे दहशतवादाचा. पाकिस्तानमध्ये युसूफ मलाला या मुलीला मला व माझ्या बहिणींना शाळेत शिकायचं यासाठी संघर्ष करावा लागला. बंदुकीची गोळी झेलावी लागली. समाजाचे स्वास्थ्य स्त्री
शिक्षणावर अवलंबून आहे एक स्त्री शिकली तर कुटुंब ,त्यानंतर गाव, राज्य व संपूर्ण देश शिकेल.
तू चल पुढे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ग, तुझ्या वाटेवरती असुदे कितीही काचा गं.
तू घे प्रगतीसाठी झेंडा शिक्षणाचा हाती ग , तुझ्या वाटेवरती असुदे कितीही काचा ग. झुगारून बंधने मान यशाने उंच असू दे तुझी ग ,
तुझ्या वाटेवरती असुदे कितीही काचा गं . तू दाखव कर्तुत्व तुझे, सलाम करण्याची झुकतील माना ग, तुझ्या वाटेवरती असुदे कितीही काचा ग
सविता साळुंके ,श्रीरामपूर, कोड क्रमांक 13
============★=============
. ....मुलींचे शिक्षण .......... .
मुलगी म्हटल्यावर समाजाचा मुख्य आधार आहे. समाजात मुलीला आधी मानाचे स्थान होते. स्त्री प्रधान कुटुंब पद्धती होती.नंतर हळू हळू पुरुषांचे वर्चस्व वाढले आणि स्त्री फक्त चूल आणि मुल पुरतीच शिल्लक राहिली आणि फक्त भोगाची वास्तू समजून समाजात स्त्रीचे स्थान अतिशय खलावले गेले.परंतु कर्तबगार स्त्रियांनी आपली जिद्द सोडली नाही.इंरजांच्या काळात स्त्रियांना अतिशय खालच्या दर्जाचे स्थान असत .स्त्रियांची अब्रू लुटली जात असे.स्त्री ही समाजाला प्रगती पथावर अनन्या साठी अतिशय महत्वाची आहे.स्त्रियांना फक्त समाजात फक्त जगवणे म्हणजे जगवण्या पुरता न ठेवता उत्तम शिक्षण दिले पाहिजे .संस्कारित पिढी घडवण्यासाठी पुरुषाची आणि स्त्रियांची गरज आहे.पूर्ण समाज अंधारात असताना मुघलांच्या बेबंद शाही धोरणाला खाईत घालण्याचे काम एका स्त्रीनेच केलं आहे तीच नाव आहे राज माता जिजाबाई या जरी कमी शिकलेल्या असतील तरी त्यांनी आपल्या मुलाचे उत्तम मनोधैर्य वाढुन मोगलांचा संहार करून मराठी सैनिकांना मातृत्व प्रेम देऊन स्वतःची मुले समजून महाराष्ट्राची निर्मिती करणाऱ्या जिजामाता यांना महाराष्ट्र अताही मानाचा मुजरा करतो.
मुलींना शिक्षणाची दार उघडे नसताना लोकांचे दगड धोंडे खाऊन लोक त्यांच्या वर चिखल फेक करत असतं तरीही पण कोणत्याही गोष्टीला न जुमानता ज्योतिराव फुले यांच्या प्रोत्साहनामुळे खंबीर पाऊल ठेऊन केवळ तीन मुलीवर शाळा सुरू करून मुलींना एक नवी दिशा मिळाली आणि धाडस मिळ उन दिलं आणि आज धाडसाने मुली मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन कमकरत आहेत.आणि स्त्रियांना शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भरारी घेण्यात येनाऱ्या,तसेच ज्यांच्या प्रेरणेने देशाची सूत्रे हातात घेणाऱ्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणाऱ्या इंदिरागांधी सारखे व्यक्ती मत्व तयार झाले अशा सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांना आज भारतात प्रत्येक मुलींनी मानाचा मुजरा करणे काही हरकत नाही. मुलींचे शिक्षण तंत्रज्ञानाच्या युगात अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे मुली आता प्रत्येक विभागात कार्य रत आहेत.शिक्षणामुळे भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा ताई देशमुख झाल्या.आहेत.आता स्त्रिया शिक्षणामुळे सीमेवर लढण्या पासून ते विमान चालक या सर्व शासकीय पद्वार त
र आहेच परंतु.उद्योग धंद्यातही स्त्रिया मोलाचे स्थान कमुन स्पर्धेत टिकत आहेत.
सावित्री बाई यांनी तर ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले नसेल तो व्यक्ती पशू प्रमाणे असतो. त्याच्या बुधी मतेत प्रगल्भता नसते असे सांगितले आहे.म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी सांगितले की देशाला महाप्रजास्त्तक बनवायचे असेल तर देशातील प्रत्येक घटकाने देश सेवा करणे अनिवार्य आहे .असे सांगितले .
" मुलगा पेक्षा मुलगी बरी ,प्रकाश देते दोन्ही घरी"
म्हणून मुलीला कमी न जोपासत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीला कमी न लेखता तिला प्रोत्साहन देऊन शिकवले पाहिजे
जीवन खसावत
भंडारा 9545246027
============★=============
लेख: लेक वाचवा लेक शिकवा (28)
मुलींना शिकवा!त्यांना जन्मा येऊ द्या! ,मुलगी शिकली प्रगती झाली, हे विधान खरंच आहे,कारण एक स्त्री जेव्हा शिक्षित होते,तेव्हा ती कुटुंबातील इतरांना शिक्षित करते,जर आपण मागील इतिहास पाहिला तर,सवित्रीमाईंनी मुलींना शिक्षण दिले,आणि हळूहळू स्त्री शिक्षित होऊ लागली,आणि आता जर पाहिले तर स्त्रिया कुठेच कमी नाहीत,अगदी सागर तळापासून ते आकाशापर्यंत स्त्रीने पादाक्रांत केले आहे.
स्त्रीया आता कुठेच कमी नाहीत, महिला सबलीकरणाचा जणू ध्यास घेतला आहे,सासर, माहेर, कुटुंब अशा नानाविध जबाबदाऱ्या सांभाळून त्या नोकरीही करत असतात,भारताच्या अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून पहातो, की स्त्रीया समाज बंधनात असून देखील देशसेवेसाठी लढलेल्या आहेत, स्वतः चे घरदार पणास लावले होते,आता तर तशी बंधने नाहीत,त्यांच्यावर उलटपक्षी त्यांना पाठिंबा दिला जात आहे.
प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते तसेच प्रत्येक स्त्रीच्या मागे ज्योतीबां प्रमाणे भाऊ,वडील,पती किंवा इतर पुरुषही असतात,आता मुलांप्रमाणे मुलीही उच्च शिक्षणासाठी इतर शहरात,जिल्हयात,राज्यात किंवा वेळेनुसार कधी परदेशातही जातात आणि पालक त्यांना परवानगीही देतात,कारण पूर्वीपेक्षा क्षेत्र व्यापक झाले आहे,आणि जग जवळ आले आहे.
पूर्वी वंशाला दिवा हवा,म्हणून मुलींची संख्या वाढत होती, परंतु आता एक,किंवा दोन मुली असतील तरी मुलाचा विचार केला जात नाही,कारण मुलींना मुलांप्रमाणे संविधानानुसार सर्व हक्क आहेत,मग मुलगी अन मुलगा काय?दोन्ही सारखेच फक्त प्रश्न इतकाच की मुलगी ही परक्याचे धन आहे, असे समजले जाते,परंतु आता त्यामध्येही बदल झालेला आहे,मुलीदेखील आई-वडिलांचा सांभाळ करतात.
मंदिरामध्ये,अंत्यसंस्कारी इत्यादी ठिकाणी,वारसा हक्कात देखील तिला पुढाकार दिला जातो,म्हणजेच सर्वच क्षेत्र स्त्रीयांनी व्यापून टाकले आहे,त्यामुळे तिचे शिक्षण किती महत्वाचे आहे याची जाणीव होते,50टक्के आरक्षणानुसार तिला नोकरीत सहभागाचा वाटा मिळतो,त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता स्त्री शिक्षण महत्वाचे आहे.
सुजाता जाधव
नवी मुंबई
============★=============
*मुलींचे शिक्षण,स्त्रीशक्तीचे विकसन*
*श्री दुशांत निमकर चंद्रपूर, 02*
"विशाल भारत देशात
मुलींसाठी राहू या दक्ष
मुलींचे शिक्षण देणे
हेच असायला हवे लक्ष्य"
आज विशाल लोकसंख्येच्या देशात संविधानानुसार स्त्री पुरुष समानता लागू केले आहे.मुलींना देखील पुरुषांप्रमाणे शिक्षण द्यायला हवे.आज जरी सर्व क्षेत्रात महिला प्रगतीपथावर कार्य करीत असल्या तरी बोटावर मोजण्याइतपत आहेत त्यात बदल व्हायला हवा.पालक मुलीना शिक्षण देण्यास तेवढे तयार नसतात.मुलासाठी वाटेल ते करायला तयार होणारे पालक मात्र मुलीबाबत शिक्षणाच्या संदर्भात जागरूक नसतात.मुलगी जन्माला आल्यानंतर ती परक्याचे धन आहे असं समजून दुर्लक्ष केलं जाते.समाजात याच प्रकारे कार्य चालू असते.प्राथमिक स्तरावर शाळेत स्त्री पुरुष समानतेसाठी मीना राजू मंचाची स्थापना करण्यात आली आहे.मुला व मुलींमध्ये कोणताही भेद करू नये.मुलींचे शिक्षण हेच प्रगतीचे लक्षण याप्रमाणे प्रत्येकाने मुलींच्या शिक्षणाबाबत जागृत असले पाहिजे.
पूर्वी इंग्रजांच्या काळात मुलींना शिक्षणाचे द्वार खुले नव्हते.महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी मुलींसाठी द्वार खुले केले गेले.देशातील पहीली मुलींची शाळा 1848 साली भिडेवाड्यात सुरू केली आणि शिक्षणाचा शुभारंभ सुरू करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नुसार ज्याच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाची उद्धारी याप्रमाणे मुलींना शिक्षण देण्याचे यथोचित कार्य सुरू आहेत.आज जरी सर्व क्षेत्रात मुली प्रगतीपथावर असल्या तरी बोटावर मोजण्या इतपतच आहेत.सर्व क्षेत्रात मुलाप्रमाणे मुलींना देखील शिक्षक व नोकरी करण्याचा अधिकार आहे.
समाजात मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची भूमिका बदलली जाते यात कोणताही भेद न करता मुलगा मुलगी एक समान,दोघांनाही शिकवू छान असा निश्चय असायला हवा.मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी शाळा स्तरावर उपस्थिती भत्ता दिला जातो त्याचसोबत सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना,कस्तुरबा बाई बालिका विद्यालय,अहिल्याबाई होळकर मोफत प्रवेश योजना देखील देण्यात येते.जेणेकरून मुलांच्या तुलनेत मुली देखील शिक्षणाच्या प्रांतात अग्रेसर असावे हा शुद्ध हेतू असतो.
आजतागायत अनेक महिलांनी देशाच्या सर्वोच्च पदावर महिलांनी कार्य केले आहे.क्रीडा, शिक्षण,राजकारण या क्षेत्रात प्रगती पथावर असल्या तरी पाहिजे त्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात नाही यामुळे मुलगा असो वा मूलगी यांना समान दर्जा देत पालक,समाज यांनी एकविसाव्या शतकात जागृत असायला हवे.मुली देखील शिक्षण व इतर क्षेत्रात प्रगतीपथावर असल्यातरी बोटावर मोजण्या इतपत आहेत म्हणून 130 करोड भारतीय लोकांत मुलींचा ठसा उमटून दिसावा यासाठी पालक,समाज यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे
============★=============
*मुलींचे शिक्षण*
आज मुली मुलांच्या बरोबरीने शिकत आहेत . एके काळी वर्जित समजले जाणाऱ्या सर्व विषयात मुली पारंगत झाल्या आहेत. मुलांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करीत आहे. पाच आणि सहा आकडी पगार मिळवित्या झाल्या आहेत. पण तरीही कुठेतरी काहीतरी राहून जाते आहे. असे सतत वाटत आहे .एवढय़ा सुशिक्षित मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत मुलींच्या समक्ष असलेल्या आव्हानाचा , त्या मुलीं आहेत म्हणुन त्यांच्या समस्यांचा
विचार मुलींच्या शिक्षणात केला जात नाही.
शहरातील वातावरणात शिकणाऱ्या मुली अगदी मुलांच्या एवढेच स्वातंत्र्य उपभोगतात.आज जवळ जवळ ७०% मुली होस्टेल मध्ये राहून शिकतात ,घरकामाची सवय ही नसते आणि माहिती ही नसते. त्या सुद्धा मुलां सारखंच जगतात. पण लग्न झाल्यावर एका रात्रीत तिचे जीवन बदलून जाते. घरात तिला कळत नकळत दुय्यम दर्जा दिला जातो . तिच्या एवढाच शिकलेला आणि कमविणाऱ्या नवर्याला सुद्धा त्याची तमा नसते. आजच्या तथाकथित स्त्री पुरुष समानतेच्या काळातही हे वातावरण बदलले नाही. ते बदलावे असा फारसा प्रयत्नही होतांना दिसत नाही. अगदी मोकळेपणाने जगलेल्या मुलीला हे बदल कळायला वेळ लागतो ,पचवायला तर खूपच वेळ लागतो. शिक्षणाच्या स्पर्धेत अव्वल येणाऱ्या मुलीला घरातील फारसी माहिती नसते . सासरची माणसे चांगली असली तर निभावून जात ते तिला सांभाळून घेतात ,पण नोकरी व्यतिरिक्त घरकामाची जवाबदारी तिला घ्यायला लागते. त्यामुळे तिचे व्याप वाढतात. तिला स्वतचा असा वेळच मिळत नाही.
काही सासरची मंडळी विचित्र असतात, जुन्या वळणाचे असतात. मला आठवते माझ्या एका मैत्रिणीच्या इंजीनीयर
मुलीचा किस्सा. ती होस्टेल मधे राहून शिकलेली. शिक्षण संपल्यावर लगेच नोकरीही मिळाली आणि सहा महिन्यांत लग्न ही झाले .तिला घरकामा विषयी काही माहित नव्हते. स्वयंपाक येत नाही हे तिने लग्ना आधीच स्पष्ट केले होते. पण लग्नानंतर तिची वेडी वाकडी पोळी सासु आजुबाजुला सगळ्या शेजारच्या लोकांना दाखवायची .प्रत्येकच गोष्टीत सासु सासरे असेच वागायचे.तिचा नवरा अगदी मुग गिळून गप्प रहायचा. लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नाळू दिवसातर सोडाच, रोज रात्री झोपताना ती हेच टेंशन घेऊन झोपायची की आता उद्या काय रामायण घडणार आहे. ही गोष्ट अपवादात्मक नाही,घरच सगळे संभाळून नोकरी कर म्हणनाऱ्या बरीच मोठी आहे.
ह्या शिवाय शिक्षित असो उच्च शिक्षित असो स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोन तोच रुढीवादी, तिला दुय्यम लेखण्याचा, त्या वृती मुळे होणारे कमेंट, बाॅस ची लगट करण्याची वृत्ती ह्या सर्वगोष्टींचा होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्या करीता तिला तयार केले गेले नसते.
कितीही स्त्री मुक्तीच्या बाता मारल्या ,स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या तरीही ही परिस्थिती बदलण्यासाठी
वेळ लागणार आहे. म्हणून मुलीच्या काही मानसशास्त्रीय शिक्षण असावे. तिला माणसाची बाॅडी लेंगवेज, स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आणि त्याची योग्य हाताळणी शिकवणे आवश्यक आहे.
डाॅ.वर्षा सगदेव
थोडा उशीर झाला लेख घ्याल का?
============★=============
धन्यवाद .......!
============★=============
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें