सोमवार, 4 मई 2020

रोज एक लेख :- दिवस सोळावा राग / क्रोध

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- पंधरावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 04 मे 2020 सोमवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- राग / क्रोध*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 *क्रोध:*
राग आणि भिक माग म्हणतात ते काही खोटे नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रसंग आलेले असतातच असतात. अगदी ताजे काही प्रसंग असतील. किंवा पाठीमागे पाहिले तर आपल्या आयुष्यामध्ये कधी  ना  कधी आलेले असे काही प्रसंग असू शकतात. जिथे आपल्या क्रोधामुळे रागामुळे आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान सोसावे लागले असेल, किंवा आपल्या मुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला असेल, किंवा दुसऱ्याच्या रागामुळे आपल्याला त्रास झाला असेल किंवा दुसऱ्याच्या रागामुळे आपले नुकसान झाले असेल. बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये काम करत असताना बॉस रागावला, किंवा आपण जिथे काम करतो त्याठिकाणी एखादी घटना घडली सहकार्यावर राग व्यक्त करता येत नाही किंवा बॉसवरती राग व्यक्त करता येत नाही.त्यावेळेला राग व्यक्त करण्यासाठी आपलं हक्काचे ठिकाण असतं, ते म्हणजे आपली पत्नी. आता हे सर्वांसाठीच आहे असं नाही. कांहीचा उलट अनुभव असतो. घरातील राग बॉस आपल्या ऑफिसमध्ये काढतो. कोणी सहकार्यावर काढतात. तर कोठेच काढता येत नसेल तर स्वतःवरच काढतात,म्हणजे उपाशी राहणे, कोणाशीही न बोलणे. वेगवेगळे प्रकार असतात. 
नव्याचे काही  दिवस संपतात आणि आपलं वय वाढू लागते. त्या वेळेला घरातील लोकांनाही आपला कंटाळा येऊ लागतो. आपला स्वभाव आणि आपल्या घरातील लोकांचा स्वभाव याचा काही वेळेला ताळमेळ जमत नाही. याचा प्रत्यय बऱ्याच वेळेला एकत्रित कुटुंब असताना अनुभवयास येत होता. एकत्रित राहण्याची सवय नसणाऱ्यांना किंवा एकत्रित कुटुंबात राहण्याची इच्छा नसणाऱ्यांना वेगळे राहण्यासाठी कारण लागत होते, आणि त्या कारणातून क्रोध व्यक्त होण्यास सुरुवात व्हायची. क्रोधाची आठवण निघालीच आहे तर.... मी लहान असताना माझा एक प्रसंग मला याठिकाणी आठवतोय. साधारण तिसरी-चौथीत असेन मी. मला सकाळी उठल्या बरोबर जेवणाची सवय असायची. खाण्यासाठी ताज्या स्वयंपाकाची आवश्यकता नव्हती शिळेच मला आवडायचे. आणि ते देखील जर शिल्लक नसेल तर मग माझे तांडव चालू व्हायचे. मी लहान असल्यामुळे मला थोडे संभाळून घ्यायचे. परंतु वारंवार असेच घडत राहिले तर माझ्या कृतीकडे दुर्लक्षही व्हायचे. आणि त्यांचे दुर्लक्ष झाले तर मात्र मला माघार घेतल्याशिवाय पर्याय नसायचा. आणि मला आज कळून येते की राग आणि भिक माग हे काय असते ते. नंतर मात्र आईच्या कलेने घेऊन मला लवकर जेवायला वाढावे अशी विनंती करायचो. मग शहाणा म्हणून मला शाबासकी मिळायची आणि माझी गाडी रुळावर यायची. मोठ्या भावाचे लग्न  झाले वहिनी घरामध्ये आली. भूक हा माझा वीक पॉईंट आहे. हे वहिनीच्या लवकरच लक्षात आले. कारण एक वेळा असेच प्रकरण घडले. उन्हाळ्याचे दिवस होते दुपारच्या वेळेला मी विहिरीवरती पोहून आलो होतो. पोहोलो असल्यामुळे जबरदस्त भूक लागली होती. घरामध्ये सर्वजण वामकुक्षी घेत होते. कोणालाही त्रास नको म्हणून मीच भाकरीचे टोपली उघडले. पाहतो तर फक्त आर्धी भाकरी त्यात होती, भूक तर जबरदस्त लागली होती. आणि फक्त अर्धी भाकरी पाहिल्यानंतर माझी डोके सरकले आणि क्रोध अनावर झाला. मी जोरजोरात आदळआपट सुरू केली. लगेच वहिनींना जाग आली. तोपर्यंत माझ्या रागाने अगदी वरची पातळी गाठली होती. थंड पाणी भरून ठेवलेला डेरा माझ्या सपाट्यामध्ये आला. पाण्याने भरलेला तांब्या उचलला आणि मी डेरावर मारला. मोठा दीड-दोन घागरीचा डेरा माझ्या रागाने ढेर झाला. घरात सर्वत्र पाणी पाणी झाले. आणि माझा क्रोध बघून वहिनीचे सुद्धा पाणी पाणी झाले. मला कुठलाही अटकाव न करता किंवा माझ्याशी कुठलेही संभाषण न करता त्यांनी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि माझ्या समोर काही मिनिटात जेवणाचे ताट वाढून आले. तो प्रसंग आजही आठवून आम्ही दिलखुलास हसत असतो. वाढीचे वय आणि समज आल्यामुळे आज-काल राग कमी झालेला आहे परंतु पूर्ण संपलेला नाही. याची प्रचिती बायकोलाही अधून मधून येत असते. परंतु  क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक ठिकाणी वाचावयास मिळाले आहे. ते अंगीकारण्याचा अनेक वेळा प्रयत्नही केला आहे. परंतु संपूर्ण यश अद्याप आलेले नाही. पण झालेली प्रगती हीसुद्धा काही कमी नाही. आता आणि यापुढे देखील मी जाणीवपूर्वक क्रोधावर  नियंत्रण करण्याचा प्रयत्न नव्हे यशस्वी प्रयत्न करत आहे,करणार आहे. कारण क्रोधाचे दुष्परिणाम मला चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत. आता माझी सटकली, मला राग येतोय म्हणण्याचे खरं तर दिवस राहिले नाहीत. उलट ताणतणावापासून दूर राहून आरोग्य जपण्याचे दिवस आहेत. बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे. आजकालची पिढी अत्यंत संवेदनशील झालेले आहे. आपले रागावणे त्यांच्यापुढे शिल्लक आहे. धाव धाव धावणाऱ्या जगामध्ये स्पर्धा जीवघेणी तयार झालेली आहे. आणि अशा वेळेला ताणतणाव निर्माण होत असतो. त्यामुळे प्रेमाने आणि गोष्टी साकार होऊ शकतात रागावण्याची आवश्यकता नाही, किंवा क्रोध करण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट सर्वांनाच स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. क्रोधामुळे स्वतःचे नुकसान होतेच होते आपल्या शरीरातील रक्तदाब वाढतो आणि आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. शिवाय रागावर नियंत्रण जर राखता आले नाही तर समोरच्याचे  सुद्धा अपरिमित नुकसान होऊ शकते त्यासाठी क्रोध हा कधीही चांगला नाही. गोड बोलून आणि समायोजनाने सर्व गोष्टी साध्य करता येतात. कदाचित म्हणूनच म्हटले आहे प्रेमाने जग जिंकता येते. आणि हे खरेही आहे. तेव्हा आपण संकल्प करूया क्रोध यावर नियंत्रण ठेवून सर्वांशी प्रेमाने वागू या.
        *हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
-------------------------------------------------------------------
 *राग अनावर होतो तेव्हा*
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
            सामान्यपणे  आपला राग सहजतेने व्यक्त जातो.आणि दुसर्याचा राग तेवढ्याच सहजतेने स्विकारले जात नाही.   अशावेळी  राग  त्याविरोधीआहे ,हसरेपणा  .तो खुप महाग  असतो . सामान्यतः  राग स्वस्त आणि हसणे महाग असते . पण गुरूदेव सांगतात ,आपले हसणे अतिशय स्वस्त करा!  हास्य  स्वस्त करून प्रत्येकाला वाटावे आणि आपल्या रागाला खुपखुप किंमती करावे. रागाने आपले शरीर आंकुचन पावते.चेहऱ्यावर आठ्या येतात .आणि विशेष म्हणजे रागीट चेहरा कुणालाही आवडत नाही .काही वेळेला रागीट स्वभावाच्या व्यक्तीला पाहून लोक युटर्न घेतात. मार्ग बदलवून घेतात. 
                    रागाचा परिणाम व्यक्त करणार्यावरच होत नसून आजूबाजूला नकारात्मकभाव पसरले जातात. परिणामी वादविवाद  वाढीला लागतो .आपलेच रावतात.
            राग हा मानवी  स्वभाव आहे भावना व्यक्त करण्याचे राग एक साधन आहे ,माध्यम आहे.  राग अनावर झाले तर अनिष्ट घडायला वेळ लागत नाही.म्हणूनच रागावर काबू मिळविता आले पाहिजे .
              आजची तरूणाई जोषिली आहे .त्यांना" हु" सहन होत नाही.अशावेळी त्यांना" ब्र "शब्द कोणी काढला तरी त्यांच्या पारा सातव्य आसमानावर असतो.
          राग ही मनाची अवस्था आहे ती प्रत्येक  व्यक्ती मध्ये असते. राग म्हणजे मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्या घटनेच्या एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय.  अपयश प्राप्तीच्या  मार्गातीलअडथळा ,नैराश्य, वैफल्य संशय,भिती त्यावर मात करण्यासाठी  मनाने उभारलेली एक प्रकारची प्रतिक्रिया यंत्रणा असते.
                      राग व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार समजून येत आहेत ,यातही शारीरिक पण (डोळे काढणे,नाकपुढ्या मोठे करणे काढणे ,आदळ-आपट करणे,) प्रत्यक्ष,हाणामारी ,शारीरिक इजा करणे ,प्राणघातक हल्ला करणे ,समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहचविणे, वा प्राणघातक हल्ला करणे ,व्यक्तीला वा दुसऱ्याला जबरदस्तीने परावृत्त करणे, समोरच्या व्यक्तीला हवी असलेली व्यक्तीचा अपमान करणे, एक वा अनेक कारणाने आपण राग व्यक्त करत असतो. अफवा पसरविणे,फुकटच बोलण्याचे टाळणे .वा बोलत नसेल तर त्याला मदत न करता तटस्थ राहणे .अशी एक वा अनेक कारणे आहेत राग व्यक्त करण्याचे. खरंतर आम्हाला मुलांना मारायचे नसते .  
      प्रार्थना रागीट स्वभावाची होती .तिला राग आला की ती आदळआपट करायची. वारवार समजावून सूद्धा ऐकत नसे. 
     अशावेळी आई तिच्यावर वर दोन-तीन घागरी पाणी घालत असे  मग ती शांत होत असे.
स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीतही  असेच घडत असे .रागावर नियंत्रण करू  न शकल्यामुळे ते एका क्रोधागारात जाऊन बसत असत . माणसाचे सहा शत्रू असतात. ते म्हणजे काम,क्रोध  लोभ मोह मत्सर . या शत्रू वर विजयमिळविला तरच मानसाला सुखाने जगता  येते.
                    असं म्हणतात कि राग जावावा म्हणून  उड्या मारावे. हालचाल केली तर ताणतनाव कमी होतो. आकाशाकडे वर एकटक पहात रहावे.तारे मोजावे. सतत जमीन व जमिनीवर झोपावे.धरती माता आपल्याला शांत करते .रागआल्यावर घडलेल्या प्रसंगाचे सतत म्हणन करीत राहावे.  काय करून चांगले करता येईल ?याचा विचार  सतत करत रहावे.  नेहमी दुसऱ्याला दोष न देता स्ताः विचार करून विचार सांगावे.असं वाटते.  काळजी वाटते .उशिरा आल्यामूळे  मनामध्ये वारंवार वेगवेगळे विचार येतात .असे आपुलकीचे शब्द वापरले तर मनात राग येत नाही .समोरचालाही राग येत नाही. समोरच्याला तान  येत नाही .आपला ही तान  कमी होत असतो  . तणावाची परिस्थिती आपल्यावर निर्माण झाली तर कमी होऊ शकते. याचा विचार करणे फारच महत्वाचे असून मनात आदराचे स्थान निर्माण झाले तर ताण कमी करता येईल .यासाठी विनोदाचा सुयोग्य वापर करता आला तर खूपच बरं ! म्हणून मन मोकळे करणे त्यांचे विचार जानून घेणे. व्यक्त होणे, विचार करण्याची त्यांना संधी देणे .आपणही त्यांना विचार ऐकण्यास भाग लावणे .आणि मुख्य म्हणजे सुविचार करता आला की त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. .आपल्या प्रति योग्य पद्धतीने गोष्टी पटवून देता आले तर आपल्या बद्दल आदरभाव निर्माण होणे साहजिकच आहे. राग अनावर होत आहे?. खूप मला ओळखत आहे का ?  स्वतःवर नियंत्रण ठेवणे, आविचारापासून सुविचारापर्यंत जाणे. अस्वस्थते पासून शांती कडे जाणे.    असंतोषते कडून  संतोषपणा स्विकारणे होय. संकूचितपणापासून विशाल तिकडे जाणे होय.
सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
( 9420516306 )
-------------------------------------------------------------------
अति क्रोध करू नये
मुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध  होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे 
' अति क्रोध करू नये ।
 जिवलगास खेदू नये । 
मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।। 
रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही
- नागोराव सा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
( माझ्या पाऊलवाट या पुस्तकांतून साभार )
-------------------------------------------------------------------
 *रागाचे दुष्परिणाम*
कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय? 
मी हसत उत्तर दिलं,  राग म्हणजे दुसर्याची चूक असतांना स्वतःला त्रास करुन घेणे.
जे लोक आपले म्हणणे शब्दात व्यक्त करू शकत नाही आपला दृष्टीकोन दुसऱ्याला समजू शकत नाही खरं म्हणजे त्यांनाच राग येतो.  
माचिस दुसर्याला जाळायच्या आधी स्वतःला जाळत असते नंतर दुसर्याला त्याच प्रमाणे राग पहिले स्वतःला जाळते नंतर दुसर्याला.
राग ही एक मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम नित करू शकत नाही. राग ही एक मनाची अवस्था आहे. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. मनाविरुद्ध घडणार्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय. अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते.
रागाची कारणे :  जीवशास्त्रीय घटक- टेंपोरेल लोब आणि लिंबिक सिस्टिम कारणीभूत, विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था, ॲड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण, डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग.
अनुवांशिक घटक - रागाची भावना आनुवंशिक असू शकते. XYY सिंड्रोम असणार्या व्यक्ती, अनुवांशिक व्यक्तिमत्त्व दोष.
मानसशास्त्रीय कारणे - तीव्र स्वयंकेंद्री असणार्या व्यक्ती, चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणार्या व्यक्ती, चिकित्सा न करता मत बनवणार्या व्यक्ती, संशयी, आनंदी वृत्तीचा अभाव असणार्या व्यक्ती, न्यूनगंड, लैंगिक दमन.
राग व्यक्त करण्याचे प्रकार -
शारीरिक : हाणामारी / शारीरिक इजा किंवा प्राणघातक हल्ला, दुसर्या माणसांच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवणे किंवा प्राणघातक हल्ला करणे, समोरच्या व्यक्तीला त्याला हव्या असणार्या गोष्टीपासून जबरदस्तीने परावृत्त करणे, समोरच्या व्यक्तीला हवी असलेली मदत मुद्दाम न करणे.
मानसिक : व्यक्तीचा अपमान करणे, समोरच्या व्यक्तीबद्दल अफवा पसरविणे, समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचे टाळणे, समोरची व्यक्ती संकटात असेल तर मदत न करता तटस्थ राहणे.
रागाचे परिणाम
• रागावणारी व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागावते, त्या व्यक्तीस मानसिक त्रास होतो. रागाचे प्रमाण जास्त आणि अयोग्य असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्याची; तसेच तीव्र रागाची भावना निर्माण होऊ शकते. नंतर तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण-तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात.
• साधारणपणे आपल्या जवळच्या म्हणजे घरातील व्यक्तीवरच राग व्यक्त करण्याची सवय असते. कारण बाहेर आलेला राग त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ न शकल्याने अशा व्यक्ती तो राग दडपून टाकते. मग घरी आल्यानंतर ज्या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा मृदु स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर हा राग काढला जातो. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर!
• या अशा सतत व्यक्त होणार्या रागामुळे घरातील मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये भीती, नैराश्य, न्यूनगंडाची भावना आणि त्यातूनही पुन्हा रागाचा उद्रेक होऊन तो इतरांना घातक ठरू शकतो. म्हणूनच कौटुंबिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो.
• राग अनावर असणार्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. नातेसंबंध बिघडतात, कामावर समाजव्यवस्थेचा परिणाम होतो.
• रागीट स्वभावाची व्यक्ती जर उच्चपदस्थ असेल तर रागाच्या भरात त्याने घेतलेला निर्णय समाजासाठी घातक ठरू शकतो.
• रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे कारण रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ शकतो.
रागावणार्यात व्यक्तीवर होणारे परिणाम :
या व्यक्तीमध्ये - मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते. अस्वस्थता, बेचैनी, नैराश्याची भावना, मंत्रचळेपणा; तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते. काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्चात्तापाची भावना, नैराश्य, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्चात्ताप, नैराश्य त्यातून इतरांना किंवा स्वतःला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.
रागावर नियंत्रण - पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे. इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे. आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत, अशी कल्पना करणे. आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे. आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे. आपल्याला राग आला कि आपण बसण्य च्या स्थितीत किवा झोपण्याच्या स्थितीत जायचं.
क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागामुळे मनुष्य स्वत:चे फार मोठे नुकसान करून बसतो आणि नंतर फक्त उरतो तो असतो पश्चात्ताप. क्रोधामुळे आपल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जन्मभराचे संबंधएका क्षणात संपुष्टात येतात. वास्तूत सांगण्यात आले आहे काही सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता. वास्तूनुसार घाणीमुळे क्रोधाचा निर्माण होतो, म्हणून आपले घर किंवा प्रतिष्ठानाच्या स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवा. घरात मकडीचे जाळे नसावे. घरात दोन्ही वेळेस उदबत्ती लावावी. घरात देवांना ठेवण्यासाठी योग्य व स्वच्छ जागेची निवड करावी. सकाळी सूर्याला जल अर्पित करावे. मंगळवारी बेसन आणि मसाल्यांचे दान केल्याने राग शांत राहतो. स्वयंपाकघरात गॅसच्या डावीकडे पाणी नाही ठेवायला पाहिजे. दक्षिणेकडे तोंड करून भोजन नाही करावे. बीमच्या खाली न तर बसायला पाहिजे ना झोपायला पाहिजे. असे झाल्याने घरात क्लेश वाढतो. घराच्या नाळीत जर अन्नाचे कण राहून जातात तर असे होऊ देऊ नये. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने क्रोध शांत होतो. घरातील पूर्व दिशेत कुठलेही जड वस्तू ठेवू नये आणि घरात लाल रंगांचा वापर करू नये.                                                                                                                           ____________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
-------------------------------------------------------------------
 राग हा विनाशचे कारण 
     राग, क्रोध हे मानवी अध्दपदनाचे कारण आहे. प्रेमाने बरेच कामे होऊ शकतता तेच क्रोधामुळे बिघडतात.  घरचे वडीलधारी माणसे सांगत की, संयम, शांती हे मानसाचे विकासाचा मार्ग आहे पण क्रोधामुळे मानसाचे संबंध, नाते हे तुटतात, दुर होतात. म्हणून क्रोध हा मानसाच्या विकासामधील अडथळा आहे.
        आई-बाबा लहापणी सांगायचे की,बाबा रे,  तू राग करू नये कारण राग हा पाच मिनटाचा असतो व त्या वेळी जर आपण आपला संयम सोडला तर आपणास मोठी किंमत मोजावी लागते.  पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते ,म्हणून स्वतः वर विश्वास, संयम आवश्यक आहे.  कोणीतरी म्हटल आहे, ' विनाश कारी विपरीत बुद्धी' .म्हणून माणसाने राग, क्रोध पासून दुर राहीले पाहीजे. 
     आज जगात क्रोधापाही  एकमेकांचा जिव घेण्यासाठी तयार आहेत. यातूनच अनेक अपराध घडत आहेत. आज जागतीक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, आपले मत लादण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला  जात आहे .या कुरघोडी मुळे आज आपण जागतीक महामारी चा सामना करावा लागत आहे व यात निष्पाप गरीब जनता मरत आहे, पिळली जात आहे. याला जबाबदार कोण? या करीता माणसात नैतीक मूल्य आवश्यक आहे. ह्या मुल्याचे अधपतन क्रोध, राग या मुळे होते. याने फक्त आणि फक्त विनाश होतो. याकरिता संयम बाळगा, प्रेम करा, दुसर्याला समजून घ्या. तरच मानव जातीचे कल्याण आहे. 
      क्रोध,अपमान यामुळे मानव आपला बदला घेण्यासाठी अमानवी क्रत्य करतो याचच कारण बलात्कार, हत्या, लुबाडणूक अशासारखे प्रकरण घडतात. 
     आपला देश हा संताचा देश म्हणून समजला जातो. तसेच अनेक धर्म, जाती चे लोक राहतात याकरीता सलोख्याने नांदण्या करीता नैतीक मूल्याची गरज आहे. ही मुल्य आपणास या मातृभूमीतून, थोर संताकडून भेटले आहे म्हणून माझा देश प्रेमाने, सलोख्याने राहतो याचे कारण संस्कार.  हे संस्कार क्रोध, राग याने लय पावतात म्हणून यापासून दुर राहीले पाहीजे. 
                बोईनवाड गुणवंत किशनराव 
    .............(होटाळकर)नांदेड 9921034211
-------------------------------------------------------------------
राग 
         "अति राग नि भीक माग" मराठीमध्ये ही म्हण प्रचलित आहे. मनुष्याला राग येण्याची अनेक कारणे आहेत. बालपणी मुल कोणत्या संस्कारात वाढले यावर रागाची परिसीमा अवलंबून असते. बालपणी आई-वडील अति लाड करणारे किंवा मारकुटे असतील तरी ते बालक रागीट बनते. बालपणी मुले हट्ट करतात नि हट्ट केलेली वस्तू दिली नाही तर काहीजण आदळआपट करतात, त्रागा करतात. त्यामुळे घाबरून किंवा प्रेमाने पालक त्या मुलांचा हट्ट पूर्ण करतात. तेच मुल पुढे जाऊन आणखी हट्टी नि रागीट बनते. आपणाला कोणतीही गोष्ट त्रागा केल्याशिवाय मिळणार नाही असा ग्रह करून घेते आणि त्याचा स्वभाव तसाच बनून जातो.
           काहींना नकार, अपयश ऐकायची सवय नसते. त्यामुळे असे प्रसंग आले तरी राग येतो. कधी कधी ते उच्चतम पातळी गाठतात. वस्तू फोडतात, फेकून देतात यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु शारीरिक आजार, व्याधीही जडतात. रागाचा पारा चढला  तर हृदयविकार, लकवा यासारखी दुखणी मागे लागतात. त्यामुळे राग आला की मनातल्या मनात दहा अंक मोजावे असे वयस्कर लोक सांगतात त्यामुळे राग आटोक्यात येतो नि पुढील धोका टळतो. प्राणायाम करूनही रागावर नियंत्रण ठेवता येते.राग येण्यास आर्थिक परिस्थिती किंवा घरातील लोकंही जबाबदार असतात. पत्नी किंवा आई वडील घरात कटकट करणारे असतील तर ती व्यक्ती चिडचिडी होऊन कायमची रागीट बनते. संसाररथाची दोन्ही चाके सुरळीत असतील तर रागापेक्षा प्रेमच जास्त बहरते. हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. काही लोकांना रुबाब,दडपशाही दाखवण्यासाठी सतत राग दाखवायला आवडतो. त्यामुळे त्यांचेच नुकसान होते.म्हणूनच शांत डोक्याच्या माणसाचे आयुष्य निरोगी आणि जास्त चांगले असते. असे लोक स्वतःसोबत दुसर्‍यांनाही आनंद देतात. जीवन हसतेखेळते ठेवतात. याउलट रागीट मनुष्याची प्रगती खुंटते आणि जीवन वैराण, वाळवंट वाटू लागते.असे बेचव आणि अळणी  आयुष्य जगताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुसर्‍यांकडून कधीच प्रेमही मिळत नाही.

सौ. भारती सावंत
मुंबई
-------------------------------------------------------------------
रागावर नियंत्रण ठेवावे...

"क्रोध हा जीवनात
मानवाला घातक आहे
रागावर नियंत्रण करणे
हाच त्यावर उपाय आहे."
        मानवी जीवनात सुख व दुःख ह्या मानवाच्या भावना आहेत तशाच राग येणे हे देखील मानवाची एक भावनाच आहे.राग येण्यावरून मनुष्याचा रागीट स्वभाव आहे हे लक्षात येते.राग,संताप,क्रोध आल्यामुळे अनेक समस्येला सामोरे जावे लागते.कधी कधी अगदी जवळच्या व्यक्तीला रागामुळे हानी पोहचते.राग ही एक मानवाची प्राकृतिक व सामान्य भावना आहे.प्रत्येक व्यक्तीला कमी-अधिक प्रमाणात राग येत असतो.रागामुळे स्वतःच्या आयुष्याला नुकसानकारक तर असतेच पण त्याचा इतरांवर देखील वाईट परिणाम होत असतो.जो व्यक्ती रागिष्ट आहे त्याचा कुटूंबातील सदस्य,शेजारी,समाजावर देखील परिणाम होत असतो.शास्त्रज्ञांच्या मते,क्रोधी असलेल्या व्यक्तीला ह्र्दयविकाराचा धोका उद्भवू शकतो.पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका दुपट्टीने वाढण्याची शक्यता असते म्हणून शारीरिक हानी सोबत जीवित हानी देखील होऊ शकते यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
          युवावस्थेत असतांना येणारा राग हा खूप भयंकर असतो.तारुण्यात आपल्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो.अशावेळी रागिष्ट व्यक्तीच्या विचारवृत्तीत बदल होऊन विचारबुद्धिच कमकुवत होते त्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होते व कार्यक्षम वृत्ती खुंटते त्यामुळे आत्मविश्वासाची कमी निर्माण होते,धैर्याने काम करू शकत नाही,एकमेकांवर दोषारोप करणे,दुसऱ्याला दोषी ठरविणे,शिव्या देणे,चिडचिडेपणा वाढतो,वादविवादात जास्त रस घेतो,आपल्या इच्छेवर पाणी सोडणे यासारख्या अनेक बाबी आपल्या हातातून निसटते.आपण 'आऊट ऑफ कंट्रोल' झाला असतो म्हणतो म्हणजेच एकंदरीत त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम घडत असतो.म्हणून जीवन सुखदायी,आरोग्यदायी जगण्यासाठी क्रोध हा घातक असतो म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
     तुम्ही 'Angry bird' हा लहान मुलांकरिता बनविलेला चित्रपट आहे.यात मुख्य भूमिकेत असलेला व्यक्ती खूप रागिष्ट असतो त्यामुळे त्याचा इतरांना खूप त्रास होत असल्याने तो स्वतःचे घर अज्ञात स्थळी समुद्रकिनारी बांधतो.तिथे तो एकलकोंड्यासारखा बनून जातो शेवटी एक निर्णय घेतो की,आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे आणि त्याप्रमाणे वर्तन करीत असतो तेव्हा तोच व्यक्ती जेव्हा बदल होऊन गावात येतो त्यावेळेस त्या गावचा 'हिरो' बनतो यावरून लहान मुलांसाठी बनविलेला चित्रपट मोठ्या व्यक्तीला देखील संदेश देऊन जातो म्हणून मनुष्याने रागावर नियंत्रण करण्यासाठी शक्य असलेल्या सर्व उपाययोजना करावे.
        रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने,व्यायाम नियमित करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.कोणतीही गोष्ट करतांना त्याचा शांत वृत्तीने विचार करून उत्तर द्यावे.'बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे.' राग आल्यास दीर्घ श्वास घेऊन हळुवार सोडावे.आपल्या कुटुंबात,शेजारी,समाजात एखाद्या गोष्टीवरून वाद होत असल्यास स्वतःच्या हाताच्या मुट्टी घट्ट करून  दिर्घश्वास घ्यावा व तणावमुक्त असल्याचा परमोच्च आनंद घ्यावा.कोणत्याही कामावर,शाळेत,महाविद्यालयात जातांना किंवा कोणतेही काम करण्यासाठी गेले असता घाई करू नये कारण 'घाई हे संतापाला निमंत्रण देत असते'.एकूण चोवीस तासांपैकी सात तास आरामात झोप घ्यावी.झोप न झाल्यामुळे डोकेदुखी,तणाव,चिडचिडेपणा वाढतो म्हणून दररोज सात तास तणावरहित झोप घ्यावी.कधी कधी कुटुंबात आपल्या पत्नीसोबत भांडत होते त्यावेळी न रागावता मनातल्या मनात अंक मोजत राहून शांत राहण्याचा प्रयत्न करावा.रागामुळे मनात असलेल्या क्रोधामुळे चुकीचे शब्द निघून वादाला आमंत्रण होऊ शकते त्याऐवजी शांत बुद्धीने थोडया वेळानंतर सुसंवाद घडवून आणावा. कधी कधी रेल्वे,बस,ट्राफिक यामध्ये उशीर झाला की,लगेच आपल्याला राग येतो अशावेळी मन शांत ठेवण्याकरिता आपल्या मोबाईल मधील आवडीचे गाणे लावून मन प्रसन्न ठेऊन रागावर नियंत्रण ठेवता येते आणि शारीरिक व मानसिक ताणतणाव रहित जीवन जगता येते.वरील सर्व उपायांचा वापर करून रागावर नियंत्रण ठेवावे.
✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
       चक फुटाणा, चंद्रपूर
 मो न 9765548949
इमेल:dushantnimkar15@gmail.com
-------------------------------------------------------------------
राग , क्रोधाग्नी 

असं म्हणतात 'क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे.' माणसाला दुर्बल  करण्यासाठी राग ही एकमेव गोष्ट कारणीभूत आहे.या  क्रोधाचा अग्नी प्रज्वलित झाला की माणूस दुर्बल होतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा या रागामुळे होणारे दुषपरिणाम काय होतील याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. कारण आपल्यामध्ये निर्माण झालेली क्रोधाग्नी ही आपण आपल्या न पटणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा शत्रूच्या साठी प्रज्वलित करतो. आणि हे निर्माण झालेली क्रोधाग्नी ही ज्याच्यासाठी निर्माण केली त्याच्यापेक्षा जास्त आपल्यालाच जाळून भस्म करते. म्हणून आपल्याला स्वतः राग आला तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.  या पृथ्वीतलावर, निसर्गामध्ये राग ही अशी एकमेव गोष्ट आहे जे माणसाला पशू बनवते, विकृत करते.  म्हणून आपण क्रोध निर्माण झाला तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही कारणाने आपल्यामधील क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा परिणाम अतिशय दुःखदायक, वेदनादायक  व कठीण असतो.
क्रोध हा एक प्रकारचा ज्वाला आहे. तो निर्माण झाला की आपल्यातील चांगले गुण किंवा आपल्यामध्ये असलेला  विवेक  नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा आपल्यामधील क्रोध निर्माण होतो तेव्हा आपली बुद्धी चालत नाही. आपण काय करत आहोत याचे भान आपल्याला स्वतःला राहत नाही.
म्हणून आपण आपल्या रागाला  कितपत आवर घालायचं  हे आपल्याच आटोक्यातील बाब आहे. या क्रोधाचा अग्नी आपल्यामध्ये जेव्हा संचारतो तेव्हा आपण स्वतःवर अतिशय संयम ठेवायला हवा. शांत राहायला हवं. संयम आणि शांतता ठेवली तर आपल्या रागावर आळा बसेल. नियंत्रण राहील. नाहीतर म्हणतात ना 'अती राग आणि भिक माग, हे ही खरेच आहे. 
म्हणून शांतता आणि संयम ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. या 
गुरुकिल्ली ने  आपल्या अविवेकी पणावर कुलूप बसेल. मानवी जीवनात सुख आणि समृद्धी निर्माण करायची असेल तर संयमाची आणि शांततेची नितांत आवश्यकता असते. कारण आपल्याला सुखी संपन्न आयुष्य जगायचं असेल तर संयम बाळगणे आवश्यक असते. 
नाहीतर आपल्यामधील क्रोध निर्माण झाला तर त्याचा दुष्परिणाम अतिशय वाईट होईल. आणि मग माणसाला पश्चाताप होते. हा पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर आपल्या मूर्खतेतेतून निर्माण झालेल्या या  क्रोधाला संयमाचा आणि शांततेचा लगाम घालायला हवा. तेव्हाच आपल्याला सुखी आणि संपन्न जीवनाकडे जाता येतं. 
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
-------------------------------------------------------------------
राग / क्रोध.                                
क्रोध हा माणसाचा शञू असतो .म्हणून क्रोधाला कोणीही जवळ करू नये . क्रोध, राग हा आत्म शञू माणसाच्या नाशास कारणीभूत होतो म्हणून माणसाने रागाला जवळ करू नये. रागावर माणसाने विवेकाने विजय मिळाविला पाहिजे. प्रत्येकाने  आपली अंतर् क्रिया जपून केली पाहिजे , कोणत्याही प्रकारची गोष्ट करण्या पूर्वी अनेक वेळा विचार केला पाहिजे कारण विचार करून न बोलणं हे पश्चात्तापास कारणीभूत होते . बोलून पश्चात्ताप करण्यापेक्षा विचारपूर्वक बोललं तर् समोरच्या स राग किंवा क्रोध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून या गोष्टी करणे गरजेचे आहे .                रागा पेक्षा शहाणपणा महत्वाचा आहे .                                         आतापर्यंत रागाने कोणाचेही इतिहासात भले झाल्याचे उदा. नाही. राग म्हटलं की आपणाला एक पाञ आठवतं ते म्हणजे भगवान परशुराम . परशुरामानी क्रोधामध्ये आईचा वध केला . जमदाग्नी र्ऋषी हे क्रोधी पाञही इतिहासात होऊन गेलं .क्रोधा मूळे शारीरिक हानी सुद्धा होते . रागाने घरांमधील सर्व सदस्यांचे मानसिक संतुलित बिघडू शकते . घरात शांती समाधान लाभावे असे वाटत असेल तर रागाला छेद दिला पाहिजे .
राग किंवा क्रोध का येतो याचे मूळ लक्षात घेतलं पाहिजे कारण या गोष्टी माणसाच्या शिक्षण , आरोग्य आणि तो ज्याच्या वर आपली उपजीविका भागवतो त्या गोष्टीवर माणसाचा स्वभाव अवलंबून असतो आणि स्वभावावरच राग आणि क्रोध अवलंबून असतो म्हणून या बाबी ज्या च्या सक्षम असतात त्या सोसायटीत , त्या समाज रचनेत या बाबी बहुतांश ठिकाणी कमी प्रमाणात दिसून येतात .             क्षणात राग असत्याच नसत्यात रूपांतर करू शकतो . क्षणाचा राग अयुष्य उध्वस्त करू शकतो म्हणून रागाला मानवाचा वैरी म्हणतात . म्हणून या वैरी रूपी शञूवर संयम रूपी अस्ञाने विजय मिळाविणं हे संयमी वीराचं परम कर्तृत्व आहे .  म्हणून रागाला प्रत्येकाने चार हात दूर ठेवले पाहीजे .
भागवत गर्कळ
-------------------------------------------------------------------
राग
 सविताचं आणि राजेशचं कडाक्याचं भांडण झालं. कारण क्षुल्लक होते. चुकून सविता कडून पाण्याचा ग्लास फरशीवर राहिला आणि नेमका तोच छोट्या सलीलला खेळतांना लागला. थोडं पायाला खरचटलं त्याला. मग सुरू झालं वादळ. शब्दाने शब्द वाढत गेला. सविता खूप वेळा सांगत होती. मी काय मुद्दाम केले का? माझं नाही  का सलीलवर प्रेम. झालं त्याचा अजूनच पारा चढला. त्याने तोच ग्लास फेकला आणि तो नेमका टीव्हीवर जाऊन आदळला. टीव्हीची काच फुटली. केवढ्यात पडला तो राग. 
राग एक भावना आहे. माणसाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की राग येतो. पण सगळेच आपल्या मनासारखे थोडेच होते. रागावर आपणच नियंत्रण ठेवायला हवे. नाहीतर नाती तुटतात. नको ते प्रसंग ओढवतात. उगीचच मग अबोला आणि जीवाला घोर. थोडसं प्रसंगावधान ठेवलं तर ह्या साऱ्या गोष्टी टाळता येऊ शकतात. एकजण रागवला तर दुसऱ्याने शांत बसावे. योगा, प्राणायाम करावे. व्यायाम करावा. राग आल्यावर एक ते दहा उलटे आकडे म्हणावेत. लोक तर राग कसा नियंत्रित करावा म्हणून शिबिराला पण जातात. तुमच्या शरीरासाठी सुद्धा राग चांगला नाही. रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश इत्यादी समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. रागात माणूस मनाला येईल ते बोलून जातो. समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते. समोरची व्यक्ती परत त्याला किंमत पण देत नाही.
 थोडक्यात राग म्हणजे आपणच आपली अनादराची पायरी गाठणे.
प्रिती दबडे,पुणे
9326822998
-------------------------------------------------------------------
 नको रे मना क्रोध हा खेदकारी
काम , क्रोध ,लोभ   मद माया आणि मत्सर हे  सहा तत्व षड्रिपू म्हणून मानले जातात .   मानवाचे हे सहा वैरी आहेत पण त्याचा अतिरेक झाला तर!    प्रापंचिक जीवनात मनुष्यांनी वरील सहा गुणांनी वैर
केले तर तो प्रपंच करील कसा ? व्यवहार करील कसा ?   विषय वासनेचा त्याग करावा तर वंशविस्तार कसा होईल ?     प्रपंचाच्या गरजा भागविण्यासाठी , लोभ व मोह हे गुण आवश्यकच आहेत . देशाचे संरक्षण करणारे जवान , सिमेवर तैनात असतात . त्यांनी जर क्रोधाला तिलांजली दिली  तर शत्रूवर ते तुटून पडणार नाहीत . मग देशाचे रक्षण कसे होईल . 
वर उल्लेखिलेल्या काम , क्रोध , लोभ , मोह , मद आणि मत्सर सन्याशांसाठी , अध्यात्मिक साधकांसाठी शत्रू असतील ही पण सामान्य प्रापंचिका साठी ते मित्रच आहेत फक्त त्यांचा जोपर्यंत आतिरेक होत नाही तो पर्यंत .
    वासनेच्या संगे नको जाऊ मना , असे आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे .     अति लोभ , व मोह या मुळे अपेक्षा वाढतात व त्या पूर्ण झाल्या नाहीत की माणसाला  राग येतो , क्रोध उत्पन्न होतो . एखादी गोष्ट भेटली नाही तर ती मिळवण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जातो .  त्याच्या अंगी मद (अभिमान) व मत्सर जागृत होतो .   मला जी गोष्ट पाहिजे ती मी मिळवतोच असा गर्विष्ठ पणाची भाषा तो बोलत असतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तो काहीही करतो अगदी एखाद्याचा खून करण्यास ही तो मागे पुढे पाहत नाही . शेवटी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते . त्याचे घरचं उद्वस्त होते .  
      अति रागा मुळे , ब्लडप्रेशर , हृदयरोग , मधूमेह इत्यादी असाध्य रोग मागे लागतात . मन बेचैन होते . झोप लागत नाही . शरीरावर ,आरोग्यावर विपरीत परिणाम होतो .
 गरजा कमी केल्या . समोरच्या व्यक्तींना समजून घेण्याची वृत्ती अंगी बाणवली , आनंदी राहाण्यासाठी मेडीटेशन ची सवय लाऊन घेतली तर जीवन सुसह्य होईल .  अति रागा मुळे विनाशच होतो . तो टाळून आपण आपले व कुटूंबातील सदस्यांचे तीने सुकर करुया .
                                   अरविंद कुलकर्णी.
                                   पिंपरखेड कर
                                 9422613664
-------------------------------------------------------------------
राग

क्रोधाने अविवेकी होतो मानव
सारासार विचार पडतात गहाण
सोडून टाकू संहारक शत्रूला
आपसूकच बनणार जगी या महान.
 मानवी जीवन सफल असफल होण्या पाठीमागे त्याचा स्वतः चाच स्वभाव कारणीभूत ठरतो.समाधानी व शांत व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रवास सातत्याने व समाधानाने करून यश मिळवू शकतो. पण अशांत व्यक्ती कोणतेही काम करत असताना आतताईपणा दाखवतो. त्यामुळे तो कामामध्ये अयशस्वी होतो किंवा काम लवकर होत नाही,लवकर यश मिळत नाही. यशस्वी व्यक्ती  नेहमी आपल्या षड्रीपूंवर विजय मिळवून असतो.काम,क्रोध,लोभ,मोह, मद,मत्सर  हे मानवाचे षड्रीपूं आहेत. म्हणूनच क्रोध हा मानवाचा शत्रू आहे. क्रोधाने आपली विवेकबुद्धी काम करेनाशी होते. आपल्या हातून चुका होतात. एखाद्या गोष्टी विरुद्ध मनात आलेल्या अनिर्बंध व आवेशयुक्त भावना उत्पन्न होणे म्हणजेच क्रोध होय. एकदा का माणसाला राग आला की त्याला कोणतीही गोष्ट सहन होत नाही. त्याच्या मनात बदल्याची भावना निर्माण होते. व हे अतिशय वाईट आहे.  नेहमीच क्रोध विवेकावर भारी पडतो. त्यामुळे राग आलेली व्यक्ती आपली विवेकबुद्धी गहाण ठेवते व वाईट कृत्य तिच्या हातून घडून येते.
 क्रोध सर्वप्रथम त्या व्यक्तीला स्वतःला जाळत असतो. काही लोकांना असं वाटत असतं की आपल्याला राग आला तर रागाच्या भरात आपण एखादे कृत्य केले तर ते धाडसी कृत्य होते असा गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. क्रोधामुळे नेहमी अहितच होत असते.
ज्या महान व मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी नेहमी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले होते. त्यांच्या मते.....
 क्रोध हा मानवाचा मोठा शत्रू आहे. क्रोधाने फक्त वैरत्वाचीच भावनाच निर्माण होते.क्रोधाने कधीही सुख व शांती मिळत नाही.होरेसने तर ,"क्रोध म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे".तर महात्मा गांधींनी  असे म्हटले आहे की," रागामुळे मानवाची सहिष्णूता संपते.त्यामुळे ते मानवाचे मोठे शत्रू आहेत."अल्बर्ट आईन्स्टाईन ने असे म्हटले आहे की ", राग ज्या व्यक्तींच्या हृदयात असतो ते लोक मूर्ख असतात." मार्क ट्वेन असे म्हणतात की," क्रोध हे असे विष आहे की ते ज्याच्यावर टाकले जाते त्यालाही जाळते व ज्या पात्रातून टाकले आहे त्या पात्रालाही जाळते." भगवान बुद्ध असे म्हणतात की," क्रोधाला बाळगणे म्हणजे दुसऱ्यावर टाकण्याकरता गरम कोळसा स्वतःच्या हातात घेण्यासारखे आहे, कारण तो कोळसा दुसऱ्याला तर जाळतोच पण स्वतःच्या हाताला प्रथम जाळतो." बायबल मध्ये असे म्हटले आहे की,"  मूर्ख मनुष्य राग आला कि तो आपला राग जोरजोराने आरडाओरडा करून व्यक्त करतो पण एखाद्या बुद्धिमान व्यक्ती ला आला तर तो आपला राग अतिशय शांततेने आणि संयमाने प्रकट करतो."  हिंदी साहित्यिक प्रेमचंद असे म्हणतात," राग येतो त्यावेळेला तो दुसऱ्याला दुःख देतोच,शिवाय त्याच्याबद्दलची वाईट भावना सर्वांच्या समोर प्रकट करतो."
म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेला प्रथम त्याचा परिणाम काय होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे."  ज्यावेळी पाणी उकळत असते त्यावेळी त्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला राग येतो त्या वेळेला आपल्याला बाकीचे काहीही समजत नाही.ज्याच्या मनात नेहमी क्रोध असतो तो कधीही सुख व समाधानाने राहू शकत नाही. त्याला स्वतःलाही कधीही आत्मसंतुष्टपणा मिळत नाही. त्याच्याशी बाकीचे लोकही फटकून वागतात,प्रेमाने, स्नेहाने कोणीही वागत नाही. बाकीचे लोक त्याच्यापासून लांब लांब जायला लागतात. व असा माणूस एकाकी बनतो. एकाकीपणा मुळे वैफल्यग्रस्त होतो. वारंवार राग यायला लागतो. ते सतत दुसऱ्यावर चिडत असतात. अशा लोकांना शीघ्रकोपी म्हटले जाते.
यावर काही उपाय आहे का?  हो आहे.जरूर आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो, त्यावेळेला आपला राग लगेच प्रकट न करता आपण दोन सेकंद शांत रहावे. किंवा आकडे मोजावेत. म्हणजे आपला राग शांत होतो, व आपल्या हातून होणारे वाईट कृत्य टळते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे शांती व क्षमा करणे होय. कारण क्षमा केल्यामुळे  क्रोधाचा पेटलेला अग्नि आपोआप शांत होतो. व आपणाकडून दुसऱ्या कुणालाही दुखावले जात नाही. त्यामुळे दुसऱ्यांचे आपल्याबद्दल मत चांगले होते. ज्या वेळेला आपल्याला राग येतो आपण रागाने एखादी गोष्ट बोलून जातो व नंतर वाटते की आपण असे बोलायला नको होते.पण वेळ निघून गेलेली असते. व आपल्याला आपण बोललेला शब्द परत घेता येत नाही. त्यामुळे बोलून शब्दांचे गुलाम होण्यापेक्षा न  बोलता आपण शब्दांचे मालक होणे केव्हाही चांगले असते.
जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर जो क्रोध आपला शत्रू आहे त्याला टाळून आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. जिथे क्रोध असतो तिथे प्रेम, समाधान कायम टिकलेले पहायला मिळत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यामधील षड्रीपूंवर ,खासकरून क्रोधावर आपणाला ताबा मिळवता आला पाहिजे.संयमी बना,क्षमा करा,क्रोधाला जिंका.
जीवन आहे सुंदर गाणे गायचे
नको थारा क्रोधाला मनात 
प्रेम,स्नेह,विवेकाने वागून 
यशस्वी पाऊल टाकू जीवनात.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
-------------------------------------------------------------------
क्रोधातभवती संमोह ,संमोहात स्मूतीविभ्रम ,
स्मूर्तीभ्रंशात बुध्दिनाश
बुद्धिनाशात प्रणशती।
याप्रमाणे क्रोध म्हणजेच राग हा मानवाला इतका विकोपाला नेऊ शकतो की शेवटी त्याचा प्राण सुद्धा जाऊ शकतो. कुणीही क्रोध केल्याने त्या वक्तीचा स्वतःवरचा ताबा सुटू शकतो. आणि मग राग आलेला व्यक्ती स्वतःला विसरून त्याचा अंतसुद्धा होऊ शकतो.
महाभारतात असा प्रसंग आहे की जेव्हा दुर्योधन पांडवांकडून  मारला गेला त्यावेळी आंधळ्या धृतराष्ट्राचा क्रोध अति अनावर झाला आणि त्यांनी कपट बुद्धीने त्यांच्या जवळ असलेल्या भीमाला आलिंगन देण्याची ईच्छा व्यक्त केली त्यावेळी त्यांना आलेला क्रोध ओळखून भगवान श्रीकृष्ण यांनी भीमाला त्याच्या ऐवजी भीमाचा तयार केलेला पक्क्या मातिचा पुतळा धृतराष्ट्राच्या हाती दिला आणि पुत्रवियोगाने क्रोधीत झालेल्या धृतराष्ट्राने  पुतळ्याला कडकडून मिठी मारली,तेव्हा त्या पुतळ्याला त्यांनी आपल्या मिठीत कडकडून चोपवले आणि भुगा भुगा केला, त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटले की, या वृद्ध माणसाने हा पुतळा कसा  फोडला ...? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांनी या घटनेला धृतराष्ट्राचा क्रोध कारणीभूत असल्याचे सांगितले. यावरून आपल्याला क्रोधाची परिणिती कळू शकते.
व्यावहारिक जीवनात क्रोध करणारी व्यक्ती कधीही इतरांची आपलीशी झाल्याचे निदर्शनास येत नाही. क्रोधाने जवळची माणसे सुद्धा परकी होतात.. सतत राग व्यक्त करणाऱ्या बापाजवळ त्याची स्वतःची मुले सुद्धा यायला घाबरतात. 
काही माणसांना सहसा राग लवकर येत नाही आणि आलाच तर मग मात्र लवकर शांत होत नाही असं निदर्शनास येते. काही माणसांना सहज राग येतो आणि सहजच शांत सुद्धा होतो,असं काही चित्र समाजात दिसून येतंय.
रागीट स्वभावाची माणसे मुले एकलकोंडी असतात, इतरांमध्ये फारसी मिसळत नाहीत. राग हा तामस गुण म्हणून ओळखला जातो तो माणसाचा एक प्रकारचा शत्रूच आहे. 
आवर्जून राग येणार नाही याचाच प्रयत्न करूया आणि आलाच तर रागाल आवर घालायला शिकूया..
-झगरे गुरुजी(वाकदकर)
-------------------------------------------------------------------
 राग
    मित्रांनो राग म्हणजे एखाद्या विषयी वाईट विचार येणे.चिड निर्माण होने.नको नको ते शब्द मुखातून बाहेर पडने. म्हणजेच जेव्हा ऐखाद्याच्या मनाचा तोल ढासळला कींवा संयम सुटला की क्रोध अनावर होतो आणि मग एका क्षणात मागचा,पुढचा विचार न करता अशी घटना घडते‌.की सगळा विनाश होता क्षणी क्रोधी ढसाढसा रडायला लागतो.आणि त्यालाच कळत नाही हे कसं घडलं. काम,क्रोध,लोभ,मोह,माया,मत्सर हे माणसा मधले विकार आहे. आणि या सहा विकारांचा जो अंत करतो त्याला संत म्हणतात. पण मनुष्य या विकांरान मध्येच गुरफटलेला असल्यामुळे तो स्वताचाच शत्रु बनला आहे.सध्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खुप बदललेल्या आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर विचारांनवर निश्चित होतो.त्यात छोटे व विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे मन  संकुचित झाले आहे.पुर्वि ऐकत्र कुटुंबात कुठलीही वस्तू वाटुन घेतल्या जाई. आज तसं नाही राहिले.  वाटुन तर पण नाही हा शब्द च ऐकुन घ्यायला तयार नाही.त्यामुळे लहान वयापासूनच सर्व मूला, मुलींचा हट्टीपणा वाढला आहे आणि मग जर ऐखादी गोष्ट नाही मिळाली की लगेच राग येतो.  सहनशीलता न राहिल्यामुळे  रागाचे रूपांतर वेगवेगळ्या संकटात होते.आणि ते संकट निस्तारता, निस्तारता पुरेवाट होते. अलिकडे छोट्या कुटुंबातील पती,पत्नी चे वाद इतके विकोपाला जातात की शेवटी रागाच्या भरात सोडचिठ्ठी कींवा आत्महत्या नाहीतर  एकमेकांच्या खुनावर टपले असतात. दुसरे म्हणजे पेपर मध्ये गुण कमी मिळाले तरीसुद्धा मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकायला मिळतात.याला कारण फक्त न आवरनारा राग , शेतकऱ्यांची परीस्थिती तशीच , नुकसान झाले की विषारी औषध प्राशन करून आत्महत्या. पुर्विच्या स्त्रियांना सासरी खुप त्रास असायचा पण त्या माहेरी न सांगता स्वता सहन करायच्या, ती वेळ निघून जायची आणि मग सुखाचे दिवस ही त्या भोगत असे पण हे सगळं सहन करण्याची ताकद ठेवत असे.आज दिवसाढवळ्या मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकले जातात ते फक्त रांगा पोटी पण याला कारनेही भरपूर आहे.आई, वडिलांचा धाक नाही,सतत मोबाईल चा वापर व त्यात होणारे संवाद,संस्कारक्षम शिक्षणाचा अभाव, भौतिक सुविधांच्या आहारी गेल्यामुळे आणि ती नंतर न मिळाल्याने, विविध व्यसनाधीनता मुळे स्वभाव चिडचिडा व रागिट होने. यावर उपाय लहान वयापासूनच त्याला नाही या शब्दाची सवय लावून त्यातील  सहनशीलता वाढविणे, रोज कीमान अर्धा तास त्याचे मन शांत राहण्याकरिता मेडिटेशन करून घेतल्यास नक्कीच रागावर नियंत्रण मिळवुन मनुष्य आपले जीवन सुखी करू शकतो. मित्रांनो आपल्या मुखातून निघणार्या शब्दा्वरअवलंबून आहे की आपण  हजारो लोकआपल्या जवळ बोलावून शकतो व हजारो लोक आपल्या पासून दूर नेऊन शकतो.प्रेमाने जग जिंकता येते आणि रागाने सर्व विनाश . आता आपल्याला ठरवायचे आहे प्रेमाला सोबत ठेवायचे की रागाला.

सौ . मेघा विनोद हिंगमिरे 
शिक्षिका.
भारत विद्यालय वेळा, हिंगणघाट.
वर्धा
7798159828
-------------------------------------------------------------------
 "क्रोध : जिवंत असल्याचा पुरावा"

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहा माणसाचे शत्रू मानले जातात. पण हे गुण-दोषच माणसाचा जिवंतपणा सिद्ध करत असतात. नाहीतर माणूस एक रोबोट म्हणून राहिला असता. आयुष्यात जसं प्रेम, ममता महत्वाचे तसाच क्रोध, राग, संताप सुद्धा महत्वाचा आहे. फक्त त्याचा जास्त उद्रेक होता कामा नये.
राग व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. कुणाचा राग लगेच चेहऱ्यावर दिसतो तर कुणाचा राग हा लगेच लक्षात येत नाही. त्याला आपण राग गिळणे असं सुद्धा म्हणू शकतो.
जगात असा व्यक्ती नसेलच की ज्याला राग येत नसेल. नेमका राग कशामुळे येत असेल याचा विचार करून बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल की, क्रोधाचे प्रमुख चार प्रकार सांगता येतील. 
1.शारीरिक, 2.बौद्धिक, 3.भावनिक, 4)सात्विक
1) शारीरिक क्रोध : जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती आपल्याला उगाच खेटतो अशा वेळी हा राग जास्त प्रमाणात व्यक्त होत असतो. जसे एखादा व्यक्ती आपल्याला म्हणाला की, "काय रे ए तुला दिसत नाही का ? डोळे फुटले की काय तुझे ?
अशावेळी व्यक्त होणार राग हा शारीरिक स्वरूपातील असतो.
2)बौद्धिक : आपली तत्वे, परंपरा, विचार, चाली-रीती, समजुती, अपेक्षा यांना कोणीतरी डिवचत असेल तर यावेळी येणार राग हा बौद्धिक स्वरूपाचा असतो याला आपण वैचारिक पातळीवरील क्रोध सुद्धा म्हणू शकतो. 
3)भावनिक : आपल्या भावनांना दुसऱ्याकडून जर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर आपल्याला राग येतो. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या हिंसक घटना या भावनिक पातळीवर डिवचल्या गेल्याने येणाऱ्या रागाचे उत्तम उदाहरण आहे. 
4)सात्विक : वरील तिन्ही प्रकारापेक्षा मला हा शेवटचा प्रकार खूप आवडतो. कोणावरही अन्याय होताना पाहून जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याला सात्त्विक संताप असे म्हणतात. कारण या ठिकाणी रागाचे कारण व्यक्तिगत नसून मानवनिष्ठ असते. असा सात्त्विक संताप चांगलाच नव्हे तर आवश्यकही मानला जातो. त्यामुळे माणसातील वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होते असे समजण्यात येते. स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक यांचा इंग्रजांविरोधात असलेला संताप हा सात्विक संतापाचा एक भाग होता म्हणूनच तर आजचे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय.
अनिष्ट चालीरीती, अनिष्ट रूढी-परंपरा यांना विरोध करण्यासाठी संतापाची लाट उसळली होती.
जर खरंच राग, क्रोध, संताप वाईट असेल तर याच संतापामुळे स्वातंत्र्य उपभोगतोय, स्वतःचे विचार व्यक्त करू शकतोय.
थोडक्यात सांगायचे म्हणजे क्रोध वाईट आहे तसा वेळप्रसंगी चांगला सुद्धा आहे. 
क्रोधामुळे माणसाने स्वत:वरील नियंत्रण गमवता कामा नये, रागामुळे त्याची  विचार करण्याची क्षमता कमी होता कामा नये, रागातून त्याच्या हातून चुका घडता कामा नये. 
शेवटी पूर्णतः वाईट काहीच नसते वाईट असतो तो मानवाचा अतिरेकी स्वभाव...!
गणेश सोळुंके, जालना
8390132085
-------------------------------------------------------------------
क्रोधाची ढोबळ व्याख्याच करायची झाली तर क्रोध म्हणजे, मना सारखे न घडल्याने, डिवचले गेल्याने माणसाच्या आत निर्माण होणाऱ्या संवेदनेतून उमटणारी प्रतिक्रियां. ह्या प्रतिक्रियांच्या मुळात आहे मीपणाची भावना , मोठेपणाची भावना माणसाचा अहंकार .
आपले विचार, आपल्या समजुती, अपेक्षा, आपली तत्त्वे, यांना कोणीतरी मोडता घातला की आपल्याला राग येतो.
    क्रोधाची तीन अंगे शारीरिक, भावनिक व वैचारिक अशा तिन्ही पातळींवर असतात. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते अथवा सैल होते, त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते व त्याच्या हातून चुका घडू लागतात  म्हणुन क्रोधाचे दुष्परिणाम सुद्धा तिन्ही पातळी वर होतात.शारीरिक  पातळी वर बल्डप्रेशर, ह्रदयरोग ,लकवा आणि बरेच आजार होतात. मानसिक पातळीवर ताण तणाव वाढतो,कार्यक्षमता कमी होते,व्यक्ती भांडखोर बनते,आणि एकटी पडते. एकटेपणा मुळे नैराश्यमुळे व्यसनाधिन होते. ह्या दुष्परिणामांमुळे क्रोध समस्या बनतो. व माणसाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
     क्रोध हा केवळ माणसाच्याच पाचवीला पुजलेला आहे असे नाही, तर बडय़ा बडय़ा देवतांना व ऋषिमुनींनाही त्याने सोडलेले नाही. कामदेवाच्या खोडीने ध्यानभंग झालेल्या शिवाने क्रोधायमान होऊन आपल्या क्रोधाग्नीने कामदेवास कसे भस्म केले याची कथा बहुश्रुतच आहे. तसेच क्रोधित ऋषींमुनींनी त्यांच्या क्रोधास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना दिलेल्या शापांच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमध्ये वाचावयास मिळतात. मानवी इतिहासातदेखील क्रोधित राजांनी त्यांच्या प्रजेवर केलेल्या जुलमांच्या तसेच संपूर्ण राज्येच्या राज्ये नष्ट केल्याच्या कथा वाचावयास मिळतात. आत्ता, अगदी हल्लीच्या काळात देखील रागाचा उद्रेक व त्याचे दुष्परिणाम दर्शविणाऱ्या अनेक घटना आपणास पाहावयास मिळतात. राग किंवा क्रोध म्हणजे नेमके काय? त्याचे स्वरूप कसे असते? हा माणसाच्या पाचवीलाच पुजलेला आहे की, त्यापासून माणसाची सुटका होऊ शकते? रागाला नियंत्रित कसे करायचे?
     क्रोधाच्या प्रक्रियेची तीन अंगे स्पष्टपणे दिसतात. डिवचले जाणे, त्यामुळे आपल्या आत संवेदना निर्माण होणे आणि त्यातून आपली प्रतिक्रिया बाहेर पडणे. रस्त्याने चालताना कोणी जर आपल्याला विनाकारण ढकलले तर आपल्याला राग येतो व पटकन आपल्या मुखातून प्रतिक्रियात्मक शब्द बाहेर पडतात, ‘‘काय रे ए, दिसत नाही का, की तुझे डोळे फुटलेत.’’ या ठिकाणी डिवचण्याची प्रक्रिया ही शारीरिक पातळीवर सुरू झालेली असते. आपल्या भावनांना दुसऱ्याकडून जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपल्याला राग येतो. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या िहसक घटना या भावनिक पातळीवर डिवचले गेल्याने येणाऱ्या रागाचे उत्तम उदाहरण आहे. 
      माणसाने कितीही राग सोडायचा म्हटले तरी तो सुटत नाही. राग सोडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले की, मग माणसाला अधिकच राग येतो. राग आलेल्या व्यक्तीला आपणास राग आला आहे हे कधीच मान्य होत नाही. तिला जर कोणी म्हटले की, एवढे रागवायला काय झाले, तर ती लगेच म्हणते की मला कुठे राग आला आहे; तुम्हालाच तसे वाटते आहे. एखाद्यास आलेल्या रागाची इतरांनी दखल घेणेही आवश्यक असते. अशी दखल न घेतल्यास त्याला अधिकच राग येतो. ‘मी एवढा रागावलोय, पण कुणालाही त्याचे काहीच वाटत नाहीये,’ असे विचार आपल्यापकी किती तरी जणांनी मनातल्या मनात अनुभवले असतील. 
   लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, ‘राग करू नये’ परंतु प्रश्न हा आहे की, हे कसे शक्य आहे? रागवायचे नाही ?’ क्रोधरुपी झंझावात जेंव्हा येतो, तेंव्हा ? काही करायच्या आत क्रोध आपल्यावर स्वार होतो.कारण  राग येतो, तेंव्हा आपण सजग नसतो. एखाद्या लाटेप्रमाणे रागाची भरती येते आणि निघून जाते आणि अनेकदा ती लाट खेद व पश्चात्ताप मागे ठेऊन जाते.
रागाच्या/क्रोधाच्या निवारणासाठी आपण क्रोधाचे, रागाचे मुळ कारण जाणून घेणे आवश्यक आहे. 
क्रोधाला जाणून घेऊ या.
जेंव्हा तुमच्या आजूबाजूला काही दोष, उणीवा पहाता, तुम्ही त्या स्वीकारू शकत नाही, हे तुमच्या ध्यानात आले आहे नां? उदा. जेंव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचे करते, 
तेंव्हा रागामुळे ते दोष, त्या उणीवा दूर हूऊ शकत नाही, हे प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे . ती परिस्थिती सजगतेने आहे तशी स्वीकारल्याने आपण ते दोष, त्या उणीवा दूर करू शकतो. तुमच्या मनात सहाजिकच आले कां की, ‘सांगणे खूप सोपे आहे, परंतु हे कृतीत कसे आणायचे?’  हे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेली मनाची स्थिती कशी प्राप्त होईल? आपल्या मनाला, भावनांना प्रत्यक्षपणे हाताळणे सोपे नाही. म्हणून आपल्याला काही साधनांची मदत घेणे गरजेचे आहे.
*क्रोध नियंत्रणाचे तीन पैलू आहेत* :
१.शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे
२.  पूर्वीच्या क्रोधाचा मनावरील भक्कम पगडा
३. सजगतेचा अभावामुळे दोष, उणीवा आणि चुका 
       यांचा अस्वीकार.
   *एकेक पैलू जाणून घेऊ या*.
शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे
  *जसे अन्न तसे मन* तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता 
       तुमच्या हे लक्षात येते कां बघा, काही काही दिवस खूप अस्वस्थ वाटत असते, कारण तुमचा आहार तुमच्या मनावर आणि भावनांवर मोठा परिणाम करतो. ठराविक प्रकारचा आहार तुमच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करतो. अश्या प्रकारचा आहार टाळल्याने तुम्हाला रागावर नियंत्रण प्राप्त करण्यास मदत होईल. उदा. मांसाहार, मसालेदार आणि तेलकट आहा
 *विश्रांती’चे सामर्थ्य जाणा* !
आदल्या रात्री तुमचे जागरण झाले असेल तर तुम्हाला कसे वाटत असते ? त्यावेळी तुमची जास्तच चिडचिड होते नां ? शरीरातील थकवा आणि अस्वस्थता मनामध्ये चिडचिड आणि क्षोभ निर्माण करतात. दररोज ६ ते ८ तासांची झोप घेणे गरजेची आहे. यामुळे शरीर आणि मनाला व्यवस्थित विश्रांती मिळते ज्यामुळे क्षोभ निर्माण होणे कमी होते.
‘*योगासन’ करणे उत्तम*
दहा ते पंधरा मिनिटे योगासने केल्याने शरीरातील अस्वस्थता निघून जाण्यास मदत होते. सूर्य नमस्काराच्या काही फेऱ्यानी सुरवात करणे चांगले. इतर व्यायाम प्रकारांपेक्षा योगासनांमुळे शरीर आणि श्वासामध्ये समन्वय प्राप्त होतो. योगासनांमुळे शरीराला दिलेल्या ताण-दाब-पिळामुळे ऊर्जेची पातळी वाढते.
प्रियम खन्ना म्हणतात, “ज्या दिवसामध्ये मी तणावग्रस्त असते तेंव्हा मला शरीरामध्ये खूप ताठरता जाणवते, ज्यांच्यामुळे मी खूपच अस्वस्थ आणि क्षुब्ध राहून राग येण्याचे प्रमाण वाढते. योगामुळे हि ताठरता निघून जाते  आणि परिणामतः शांत, निवांत मन प्राप्त होते.
*प्राणायाम*
भस्त्रिका आणि नाडी शोधन सारख्या प्राणयामांमुळे मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. जेंव्हा मन शांत – स्थिर असते तेंव्हा क्षुब्ध होण्याचे, राग येण्याचे प्रमाण कमी होते.
*क्रोधावर कायमचा ‘उतारा*'
रागापासून मुक्तीसाठी काही दीर्घ श्वासन केल्याने त्वरित मदत होईल. ज्या क्षणी तुम्ही रागवाल, डोळे बंद करून काही दीर्घ श्वास घेऊन मानसिक स्थिती मधील बदल अनुभवा. दीर्घ श्वासामुळे तणाव निघून जाईल आणि मन पूर्व स्थितीत शांत होण्यास मदत मिळेल.
*वीस मिनिटांचा ‘स्व’ मधील प्रवास*
सातत्याने योगसाधना, प्राणायाम आणि आहाराबाबातीत दक्षता अस्वस्थता दूर करण्यास सहाय्य करेल, परंतु शांत आणि समतोल मनस्थिती कशी टिकवावी ? सातत्याने ‘निव्वळ वीस मिनिटांचे ध्यान पूर्ण दिवसभरासाठी पुरेसे आहे.
डाॅ.वर्षा सगदेव 
ता.क. मी आर्ट ऑफ लिव्हिंग ची टीचर आहे. तिथे आम्ही जे शिकवतो त्याचा सारांश दिला आहे
-------------------------------------------------------------------
" क्रोध - एक विषारी कंटक "
     मित्रांनो , आपण आपल्या सभोवती वेगवेगळ्या स्वभावाची माणसे पाहत असतो . त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यावरून आपण त्यांना ओळखतो . एखाद्या व्यक्तीला पाहून आपण म्हणतो , " हा माणूस खूपच शांत आहे ! " तर एखाद्याला पाहून आपण तेथून शक्य तेवढया लवकर पळ काढण्याचा प्रयत्न करतो . कारण ती व्यक्ती फारच रागीट असते . " अरे ! हा तर साक्षात जमद्गनीचा अवतार आहे ! याच्या कचाट्यात आपण सापडलो तर आपलं काही खरं नाही ! चला येथून लवकर दूर गेलेल बरं !! " असे मनातल्या मनात पुटपुटत असतो . कारण अशा तापट व रागीट माणसांचा काही नेम नसतो . ते कधीही कंसाचा अवतार धारण करू शकतील हे सांगू शकत नाही . अशा व्यक्ती विवेकशून्य असतात . आपण आपल्या मार्गाने गुपचूप शांतपणे जात असलो तरीही त्या विनाकारण आपल्याला बोलण्यास उत्तेजित करतात . नि आपण नकळत ह्या अशा बलेला सामोरे जाऊन मनःस्ताप करून घेतो . 
   " क्रोधाची मनी पेटता मशाल
     होई रसाळवाणी आपसूक जहाल 
    अंगी संचारता क्रोधाचे भूत
    भासे तो साक्षात यमदूत !! "
     खरंच ! हा क्रोध किती भयंकर असतो ना !! अशा क्रोधी मानवाची भाषा तर ऐकावीही वाटत नाही . कानात बोट घालून घ्यावेसे वाटते . इतकी ती भाषा निच व खालच्या स्तरावरील असते की ऐकणारा बेशुद्ध होऊन जाईल ! ह्या क्रोधी माणसात प्रत्यक्षात यमदेवाचे दर्शन अनुभवत असतो .
     " जाई क्रोधाने हरवून विवेक 
       धावूनही येई संकटे अनेक 
       न राही वर्तनात तारतम्य
       घडे गुन्हा हातूनही अक्षम्य !! "
     असा हा  'क्रोध ' मानवाला विवेक गमावून फक्त विघातक संकटेच निर्माण करतो . आणि या रागाचा पारा कधी एवढा उच्चांक गाठतो की समोरच्या माणसाला मग तो कुणीही असोत ! त्याला या जगातून कायमचाच संपवतो . म्हणून या रागाचे दुष्परिणाम समजून त्यावर वेळीच नियंत्रण ठेवावे !!
     हल्ली , सध्या कोरोनामुळे जे लॉकडाऊन झाले त्यामुळं तर प्रत्येक घरी या रागाचे छोटे - मोठे विविध पडसाद अनुभवास येतात . कारण लॉकडाऊनपूर्वी घरात पती - पत्नीचे भांडण झाले तर डोकं शांत करण्यासाठी पती घराबाहेर पडायचा . पण आता ते शक्य नसल्यामुळे आगीत तेल ओतल्या जाऊन केवळ भडका मात्र होत असतो , हेही खरंच आहे ना!! शिवाय पती बाहेर कामाला गेल्यावर पत्नीही शेजारणीकडे जाऊन आपल्या सुख - दुःख वाटायची . मन मोकळ्या गप्पा करून मानसिक ताण - तणाव कमी केला जायचा . शिवाय मुलेही बाहेर मोकळ्या वातावरणात चार -  चौघांशी हसून - खेळून आनंदीत व्हायची . पण ती आज मोबाईल गेम व टि. व्ही. वरील कार्टून पाहून आक्रमक व चिडखोर बनली . काही मुले तर फक्त गेम खेळायला फोन नाही दिला म्हणून गळफास अडकवून रागात जगाचा निरोपही घेत आहेत . आता या उन्हाळ्यात कुठं पाणी टंचाई असते . तिथे काहीजण तर भांडभर पाण्यासाठी हाणामारी करून रक्ताचा सडाच घालतात . कुणी दारू - जुगार आदी व्यसनपूर्तीसाठी पैसे नाही दिले म्हणून पत्नी , मुले  , मित्र  , नातेवाईक इ . चा खूणही करायला मागेपुढे पाहत नाहीत . एवढं डोक रागाच्या लाव्हारसात उकळलेले असते अशा या क्रोधी यमदूताचे !
     " संचारता अंगी विध्वंसक क्रोध 
       अंर्तमनाने घ्यावा मुळाचा शोध 
       न करावे आपापसात युद्ध 
       सांगून गेले तथागत बुद्ध !! "
     जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा त्या रागाचे मूळ कोणते आहे ? त्याचे परिणाम कोणते होतील ? खरंच मला अशाप्रकारे असभ्य भाषेत बोलण्याची गरज आहे का ? अशी आदळआपट करण्याची आवश्यकता आहे का ? हिंसाचार करूनच मी माझे मत , विचार , निर्णय दुसऱ्यावर लादू शकतो काय ? प्रेम व सौदाहर्यतेने हे कार्य मी करू शकत नाही का ? " जगा आणि जगू द्या ! " ही भावना जेव्हा प्रत्येक व्यक्ती अंर्तमनाशी बांधून वागील , तेव्हाच या क्रोध निच्चांक पातळी गाठेल ! हे एक निर्विवादित सत्य आहे जे हजारो वर्षापूर्वी एका महान व्यक्तीने सांगून जगाला शांततेचा संदेश दिला . 
     ती महान व्यक्ती म्हणजेच " भगवान तथागत गौतम बुद्ध " होय !! खरंच त्यांच्या मूर्तीकडेही क्षणभर पाहिले तर मन प्रसन्न व शांत होते . त्यांच्या चार आर्यसत्य व अष्टांगमार्ग यांचा जीवनात प्रामाणिकपणे उपयोग केला तर मानव हा क्रोधासह ह्या अख्ख्या विश्वावरही विजय मिळवू शकतो !! हे शाश्वत सत्य आपल्याला नाकारता येत नाही ! भलेही ह्या मार्गाने जाताना आपल्या षडरिपूंचा अडथळा येईल पण एकदा पाऊल तर पुढे टाकून पहा !! हळूहळू ह्या मार्गाने जात जात आपण आपल्यासह इतरांच्याही जीवनात निदान चार  सुखाचे क्षण निश्चित आणूया ! हे अशाश्वत आपले आयुष्य सार्थकी व सन्मार्गी लावूया !! चला तर मग या शांततेच्या मार्गाने वाटेत येणाऱ्या ' क्रोधरूपी विषारी  कंटकाला " बाजूला सारूया . अन्यथा त्या काट्याचे विष आपल्यायोगे सर्व जगभर अवश्य पसरेल ! यात तिळमात्र शंकाच नाही . तेव्हा जीवनात या अशा विषारी काट्याला अजिबात थारा देणार नाही अशी स्वतःच्या अंर्तमनाशी प्रतिज्ञा घेऊया ! ह्या प्रतिज्ञेचे प्रामाणिकपणे व काटेकोरपणे पालन करून आनंदी व समाधानी होऊया ! 
     अर्चना दिगांबर गरूड 
     मु . पो. किनवट , जि. नांदेड 
     मो. क्र . 9552954415
-------------------------------------------------------------------
रागाला(क्रोधाला) औषध आहे 
अति क्रोधाने कार्यभाग नासतो यावर सर्वांचे एकमत असणार यात शंका नाही आपले मित्र, नातेवाईक, कामातील सहकारी यापैकी कोणी रागीट स्वभावाचे असतील तर आपल्याला अशा व्यक्तींशी जुळवून घेताना फार त्रास होतो असा अनुभव  सर्वांनाच येतो.कधीही राग येत नाही अशी व्यक्ती जरा दुर्मिळच आहे हल्लीच्या युगात.रागीट व्यक्तींच्या सहवासात राहायला कोणाला आवडते बरे?अरे जमदग्नीचा अवतार आहे बर तो जरा जपून ह असे अतिरागीट व्यक्तीच्या बाबतीत म्हटले जाते.
काम ,क्रोध, मोह, मद, मत्सर, माया,हे शडरिपू प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत जे या षडरिपूवर विजय मिळवतात ते संत म्हणून ओळ्खले जातात.
एकदा संत एकनाथ महाराज गोदावरी नदीवरून अंघोळ करून पुन्हा घरी निघाले होते तेव्हा एक माणूस मुद्दाम त्यांच्या अंगावर थुंकला ही घटना तुमच्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या बाबतीत घडली असती तर काय प्रतिक्रिया दिली असती आपण एक तर त्या व्यक्तीला कडक शब्दात त्याच्या वागण्याचा जाब विचारला असता किंवा त्याला काही प्रतिउत्तर म्हणून  मारामारी केली असती.संत एकनाथ मात्र अतिशय शांत राहिले त्या व्यक्तीस काहिही न म्हणता पुन्हा गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करून आले असे अनेक वेळा झाले शेवटी थुंकणारी व्यक्ती कंटाळली
तो माणूस महाराजांना म्हणाला मी एवढे वेळा तुमच्यावर थुंकलो
तुम्ही मला काहीच न म्हणता ,न रागावता ,न भांडणतंटा   करता कितीतरी वेळा अंघोळ करून आलात याचे कारण सांगा. यावर एकनाथ महाराज म्हणाले मी का रागावू तूमच्यावर उलट चांगलेच वागलात तुम्ही  माझ्यावर एवढ्या वेळा थुंकला नसता तर मला एवढया वेळा  गोदावरी स्नानाचे पुण्य मिळाले असते का ?मीच आभारी आहे तुमचा हे पुण्यकार्य तुमच्यामुळे घडले. 
मनुष्य किंवा प्राणी या दोघांनाही राग केव्हा येतो  जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध काही घडते लहान मूल त्याला खूप भूक लागली असेल आणि खायला प्यायला लवकर मिळाले नाहीतर रागावते,
त्याला हवे तसे खेळणे नाही मिळाले तर रागावते , फार वेळ आई किंवा कुटुंबातील कोणी नाही दिसले तर असुरक्षित वाटून त्याला राग येतो अशा वेळी त्याला वेळेवर खायला देऊन, कधी खेळणे देऊन , कधी प्रेमाने जवळ घेऊन आपण त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो .त्या लहान मुलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यास ते मूल राग व्यक्त करते , सतत दुर्लक्ष झाल्यास राग हा त्याचा स्वभावाचाच भाग बनतो याचाच अर्थ लहानपणापासून प्रेम, काळजी घेतली गेल्यास वेळोवेळी योग्य समज मिळाल्यास मूल चिडचिडे होणार नाही .आजकाल प्रत्येक घरात दोनच मुले असतात किंवा काहींना एकच मूल असते अशा मुलांच्या सर्व मागण्या आई वडील 
पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात कोणत्याही गोष्टीला नकार ऐकण्याची सवयच राहत नाही या मुलांना .एखादी गोष्ट खरेदी करणे खरच गरजेचे आहे का,ती वस्तू मिळवण्यासाठी आई वडीलाना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव कितीजण आपल्या मुलांना करून देतात?
समाजात गरजवंत लोकही आहेत आपल्याला सर्वकाही मुबलक प्रमाणात मिळते आहे; पण काहीजण वंचित राहतात त्यांना आपण सामाजिक जाणिवेतून काही देने गरजेचे आहे ही भावना मुलांमध्ये लहानपणापासून रुजवली गेली पाहिजे म्हणजे वाटणे, वाटून देणे याचे महत्व कळेल आणि मग आपोआप
मी, माझे, मलाच मिळायले हवे इतर कुणालाच नको अशी भावना कमी होत जाऊन क्रोधाचे कारणच संपुष्टात येईल.
क्रोधाचे कारण शोधल्यास असे लक्षात येईल शहरी व ग्रामीण संस्कृतीतील एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती व विभक्त कुटुंब पद्धती होय.
शहरात पैसे, जागेची अडचण , आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे   एकत्र कुटुंब पद्धतीत राहता येत नाही  आई वडील दोघेही काम करतात मूल एकतर घरी एकटे असते किंवा पाळणाघरात असते.
पाळणाघरात अनेक इतरही लहान मुले असतात काळजी घेण्यासाठी काही व्यक्ती असतात 
अनेक मुलांना सांभाळायचे असेल तर सांभाळणारी व्यक्तीही चिडचिड करण्याची शक्यता नाकारता येत नाही , सांभाळणारी व्यक्ती स्वभावाने प्रेमळ असेल तर मुलावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि रागीट असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम म्हणजे मुलंही रागीट स्वभावाचे बनू शकते.
लहान मूल अनुकरणप्रिय असते
त्याच्या संपर्कात येणारी व्यक्ती पाहून तेही स्वभावाचे अनुकरण करते घरातील आजी, आजोबा, आई,  वडील इतर नातेवाईक
कसे वागतात यावरही मुलाचा स्वभाव अवलंबून असतो हे सर्व झाले लहान मुलांच्या बाबतीत पण कधीकधी मोठी माणसेही जी शांत प्रेमळ असतात  अचानक रागीट स्वभावाची बनतात याचीही अनेक कारणे आहेत जसे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी, व्यवसाय यामध्ये अपयश, दीर्घकाळ असणारे आजारपण,
आर्थिक अडचणी, अपघात, घरातील भांडणे ,मानसिक आघात ही झाली कारणे व्यक्ती रागीट का बनते याची.
कधीकधी रागीट व्यक्तीही शांत स्वभावाची बनते हो रागालाही औषध आहे बर का. योग्य आहार ,योग, ध्यान धारणा, कामातील ताण कमी होणे, आवडते छंद जोपासणे, प्रेमळ व्यक्तीचा सहवास लाभने यामुळेही राग म्हणजे क्रोध कमी होऊ शकतो .क्रोधाने क्रोधाला कधीही जिंकता येत नाही पण
क्रोधाला प्रेमाने अवश्य जिंकता येते म्हणजेच रागाला औषध आहे.
सविता साळुंके
9604231747
salunkesavita@gmail. com
-------------------------------------------------------------------
  राग अनावर होता......

            आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो हसत-खेळत जेवण चालले होते. मी मात्र गप्प गप्प होते. तेवढ्यात माझी लेक म्हणाली," आज भाजीला काही चवच नाही लागत नाही नेहमी सारखी." लगेचच 'ह्यांनी'  त्याला दुजोरा देत भाजीत मीठ नसल्याचे सांगितले. तरीही सासूबाई माझी बाजू घेत म्हणाल्या, "अरे, अन्नाला  नावे ठेवू नये.  होतं असे एखादे वेळेस. मन नसेल थाऱ्यावर तिचं." झालं! तेवढ्याने माझा पारा चढला. मी उठून स्वयंपाकघरात आवराआवर करायला निघून गेले. माझी तोंडाने बडबड,धूसफूस चालली होती. रात्री झोपेपर्यंत दिसेल त्याच्यावर मी तोंडसुख घेत होते. माझ्या तावडीत सापडायला नको म्हणून सगळे लवकरच आपल्या खोलीत गेले. चिडीचूप झाले. सकाळी माझा राग शांत झाला होता.  मला मुलांवर राग काढल्याचा पश्चाताप होत होता. खरं तर बाॅसने माझा अपमान केला होता. नसलेल्या चुका दाखवल्या होत्या. त्याचा राग मी घरात काढत होते. दुखऱ्या मनाच्या वेदना आणि त्यामुळे आलेला राग, काल शमला  नव्हता. त्या रागाचा कटू भावनेचा स्पर्श, केलेल्या अन्नाला होणारच होता. त्यामुळे कालच्या स्वयंपाकाला चवच नव्हती.
               माझे आजोबा अतिशय उत्तम हुशार असे नावाजलेले वकील होते. त्या वकिलीचे, अशीलांचे प्रश्न, त्यात ते बहुदा गुंतलेले नेहमी असावेत. त्यामुळे एक प्रकारचा राग त्यांच्या मनात सारखा धुमसत असे. त्यामुळे घरात त्यांच्या समोर यायला सगळे घाबरायचे. कुठल्या शब्दाने त्यांचा अपमान होईल ते समजायचे नाही. कुणी हसलेले चालायचे नाही. ते समोर असलेल्या माणसावर राग काढून आपले मन शांत करायचे की काय कोण जाणे? त्यांचे अस्थिर , अशांत मन, थोडे मनासारखे झाले नाही तर, त्यांचा राग अनावर होत असे. मग त्या रागाच्या तडाख्यात सापडेल तो माणूस होरपळून जात असे. पूर्वीच्या पिढीत अशी रागीट माणसे नेहमीच असत.
              मनाच्या आतताईपणामुळे, येणाऱ्या रागामुळे जे कटू शब्द तोंडून जातात, त्याचे परिणाम तत्कालीन कमी आणि दूरगामी जास्त असतात. ज्या व्यक्तीवर रागावतो ही दुखावली जाते. जखम मनावर खोलवर होते. त्यामुळे नात्यावर परिणाम होतो. नात्यातला निखळ पणा जातो.
           कधी स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास नसतो.
त्यातच अपयश वाट्याला येते, अपमान होतो. कधी मनात सतत आपण अन्यायग्रस्त आहोत अशी भावना असते. त्यामुळे दुसर्‍या कुणाच्या कामाचे, यशाचे कौतुक केले तर सहन होत नाही. मनातील खदखद आपल्या हक्काच्या माणसावर बाहेर काढली जाते.
            ज्याचा रागाचा पारा पटकन चढतो, राग ताब्यात राहत नाही, तो वस्तूंची फेकाफेक, वस्तू फोडणे, डोके आपटून घेणे, स्वतःला मारून घेणे, असे प्रकार करतो. तो माणूस रागाने बिथरलेलाच असतो. या रागाच्या भडक्यात चांगल्या गोष्टी बेचिराख होऊन जातात. म्हणून त्या रागाला क्रोधाग्नी म्हणतात. हा क्रोध वेळीच शांत झाला तर बरे. नाहीतर क्रोधाचे वडवानल म्हणजे अग्नि प्रलय व्हायचा!! 
           आमच्या घरी "सातच्या आत घरात" असा नियम होता. मला खेळताना भान राहिले नाही. मी घरात साडेसात वाजता आले. सहाजिकच मला त्यादिवशी घरात जेवण मिळणार नव्हते. मी उपाशीच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला कळले माझ्यामुळे आई पण उपाशीच झोपली. तेव्हा मला माझी चूक उमगली. आईने शांतपणे माझी चूक दाखवून दिली होती.
          मुलंच ती. कधी हट्ट करणार, कधी नाटाळ पणा करणार. तरी कधी रागवायचं, किती रागवायचं, कोणती शिक्षा द्यायची, शांतपणे कधी घ्यायचं, ह्या  सगळ्याचं तारतम्य पालकांनी बाळगायला हवं.  मुलांचं मन फुलासारखे कोमल. त्यामुळे मार केव्हा जिव्हारी लागेल सांगता येत नाही. त्यातून आपली चूक नसेल तर फारच मन जखमी होतं.
          असं म्हणतात, राग आला की चालून यावं, धावावं. उशीवर बुक्के मारावेत. याचा अर्थ शरीराने हालचाल केली की, ताण कमी होतो. राग आला की जमिनीवर झोपावे. पृथ्वीमाता आपल्याला शांत करते. राग आला की एक ते पन्नास आकडे मोजावे. वेळ मध्ये गेला की रागाचा भडका कमी होतो. वेळ रूपी गार पाणी मनावर पडते. एखाद्या विनोदी वाक्याने ताण कमी करावा. राग आला की श्‍वासाची गती वाढते. म्हणून दीर्घ श्‍वसन करावे.
            रागावून कसंही बोलण्यापेक्षा बोलण्याची पद्धत बदलावी. मुलाला बाहेरून येण्यास उशीर झाल्यास, अद्वातद्वा न बोलता, "तुझी काळजी वाटल्यामुळे मी फोन करत होते" असे म्हणावे. "तू माझे पैसे चोरलेस" असे न म्हणता आडवळणाने पर्समध्ये पैसे नाहीत हा निरोप त्या व्यक्तीस पोचवावा.
           स्थित प्रज्ञाची व्याख्या सांगताना गीतेत म्हटले आहे, ' वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते'l
ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले तो मुनि स्थिर बुद्धीचा म्हंटला जातो.
          'क्रोधाद्भवति सम्मोह:l'   क्रोधामुळे मूढता येते म्हणजे अविचार उत्पन्न होतो.
           क्रोध म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा स्वतःला करून घेणे. एकदा राग आला की आपली विचारशक्ती नष्ट होते. त्यामुळे चूक काय आणि बरोबर काय हे कळतच नाही. जर आपण बरोबर असू तर दुसरा काय म्हणतो यावरून रागावण्याची काही जरूरी नाही. आणि समजा आपली चूक असेल तर आपल्याला रागवण्याचा हक्कच नाही. क्रोधात तुमच्या तोंडी असे शब्द हवेत की राग शांत झाल्यावर तुमच्या नजरेतून तुम्ही पडला नाही पाहिजे. क्रोधामुळे साधलं काही जात नाही. पण तोडलं मात्र जातं, नुकसान मात्र खूप होतं.
          रागावल्यावर नुकसान आपल्या प्रकृतीचे होते. मेंदूतून अॅड्रीनॅलीन हार्मोन जास्त वाहू लागते. श्‍वासाची गती वाढते. याचा परिणाम ब्लडप्रेशर वाढवण्याकडे होऊ शकतो. म्हणून रागावर ताबा हवा. शांत राहण्याची सवय करून घ्यायला हवी.
म्हणूनच लक्षात ठेवा ,
गुस्से में बनता कुछ नही, हाँ पर जाता बहुत कुछ हैl
क्रोध करते समय थोडा रुक जायेl
और गलती करते समय थोडा झुक जायेl
दुनिया की सारी समस्याएँ हल हो जायेगी
शुभदा दीक्षित पुणे
-------------------------------------------------------------------
"राग/क्रोध"
      "काम,क्रोध,लोभ, मद आणि मत्सर हे षड्रिपू मानवाच्या आयुष्याचे स्वाभाविक गुण आहेत.राग येणं महत्वपूर्ण नाही तर महत्वपूर्ण हे आहे की, आपण"राग"कशा रीतीने परावर्तित करतो!सगळा खेळ मानवी मनाच्या वागणुकीवर आहे.जर कोणी स्वतःच्या रागाला/क्रोधाला योग्यपध्दतीने नियंत्रित केले,त्याला योग्य मार्ग दिला तर तो राग विध्वंसक/विनाशक न बनता मानवी जीवनास व स्वतः त्या"जमदग्नी"सम व्यक्तीसही योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. नाहीतर ,रागाने "विध्वंस"आणि" विनाश"अटळच असतो.
        उदाहरणार्थ,महान स्वीडिश  टेनिसपटू"बेयोन्ड बोर्ग"त्याच्या किशोरवयात खूपच हिंसक वृत्तीचा होता.त्याच्या शाळेतून त्याच्या हिंसक कृत्यांची,मारहाणीच्या अनेक तक्रारी रोजच घरी पालकांना कळविल्या जात.एकदा शाळेतील टेनिसच्या मॅच मध्ये "बेयोन्ड"ने एका मुलाला जबरदस्त मारहाण केली. शिक्षकांनी बेयोन्ड च्या आईला शाळेत बोलावून घेतले व बेयोन्ड च्या समोरच सांगितले,"मॅडम,राग मानू नका पण,टेनिस हा खेळ सभ्य आणि चांगल्या घरातील व्यक्तीच खेळतात,आणि आपला मुलगा ह्या खेळास लायक नाही.
       हे अपमानकारक बोलणं बोर्गच्या मनाला तीव्र वेदना देणारं ठरले नी त्याने स्वतःशीच ठरवलं की,मी टेनिससाठी काहीही करेन पण,माझ्या रागाला आवर घालेन किंबहुना त्या रागालाच माझ्या आयुष्यातून कायमचे दूर करून टाकेन.बेयोन्ड ने स्वतःच्या अंतरातील रागाला गिळंकृत करण्याचा संकल्प करून स्वतःचे रुपांतरण एका महान टेनिसपटूच्या रुपात केले.आणि तो असा महान खेळाडू बनला की,पुढील अनेक वर्ष जेव्हा बोर्न चे नाव निघेल तेव्हा लोक त्याला एक महान टेनिसपटू म्हणूनच ओळखतील...!!
         रागाचे असे सकारात्मक रुपांतरण फक्त एकट्या व्यक्तीसाठीच आवश्यक नसते तर,पूर्ण समाज व देशासाठी सुध्दा आवश्यक असते."जपान"हा देश अशाच रुपांतरणाचे एक मोठे उदाहरण आहे. दुसऱ्या महायुद्धापर्यंत "जपान"हा देश एक मोठा "साम्राज्यवादी"शक्तीचा देश होता.परंतु,"हिरोशिमा"व"नागासाकी"सारख्या आण्विक जखमेने जपानला असा काही जबरदस्त धक्का दिला की,त्या देशाला त्यांचे विचार, साम्राज्यवाद ह्यांना बाजूला सारून शांतीच्या, प्रगतीच्या मार्गाने जाण्यास भाग पाडले आणि बघता-बघता जपान आर्थिक महासत्ता बनला.आपल्या विचार,रागाला सकारात्मक, विधायक ,प्रगतीच्या वाटेवर कसे नेता येऊ शकते ह्याचे मूर्तीमंत उदाहरण जगापुढे जपानने स्वतःच्या कष्टातून ,प्रगतीतून ठेवले आहे.
           बिहारमधील अवलिया"दशरथ मांझी"ने रस्त्यातील अवाढव्य डोंगराच्या अडसरामुळे आपल्या पत्नीस वेळीच दवाखान्यात नेऊ शकला नाही आणि ती मृत्यू पावली.मांझी असा क्रोधी व्यक्ती होता की,त्याच्या क्रोधाने तो सगळ्या जगाला भस्मसात करेल आणि हा राग/क्रोध जर त्याच्यात नकारात्मक रीतीने घर करून बसला असता तर,मांझी जीवनभर भ्रमिष्ट, वेडा बनून फिरत राहिला असता.पण,तसे काही घडले नाही. मांझी ने स्वतःच्या रागाला एका संकल्पपूर्ण योजनेत परिवर्तीत केले,आणि हातात हातोडी घेऊन वर्षानुवर्षे त्याच्या पत्नीच्या मृत्युतील अडसर ठरलेल्या डोंगराला फोडून मार्ग बनविण्याच्या कामी त्याचा राग उपयुक्त ठरला.
        आजकाल हरएक व्यक्ती, समाज रागाच्या परिसीमा गाठत आहेत. पण,ह्या रागाने ते नेमकं काय साध्य करत आहेत?हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनाला विचारायला हवा.आजची शिक्षण पद्धती,समाजव्यवस्था ह्या रागाचे परिवर्तन कसे करावे?त्याबद्दल व्यवस्था असणारे शिक्षण व उपाययोजना हे सांगण्याच्या मनस्थितीत सध्या तरी नाही,असे खेदाने नमूद करावे वाटते.मग ह्यावर उपाय प्रत्येकाने स्वतःच स्वतः शोधायला हवा......!!बरोबर ना..??
😊©️✒️शुभांगी विलास पवार(कंदी पेढा)-नागठाणे, सातारा
-------------------------------------------------------------------
राग
  एक गाव होत.त्या गावात चिंटू नावाचा मुलगा राहत होता.अतिशय खोडकर आणि खूप रागीट. राग त्याच्या नाकावरच असायचा.मित्र त्यापासून दूर राहायचे.आई वडील कंटाळायचे.एकदा त्याच्या बाबाने एक युक्ती लढवली,चिंटू ला सांगितलं जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू  अंगणातील कुंपणात खिळे ठोकायचे, जेव्हा जेव्हा चिंटूला राग यायचा तेव्हा तो खिळे ठोकायचा.खिळे ठोकणे कठीण वाटू लागले त्याला मग त्याला रागावर नियंत्रण ठेवता येऊ लागले.खिळे ठोकण्यापेक्षा राग कमी करणे चांगले आहे.हळू हळू खिळे कमी झाले.तो खुश झाला.तो बाबाकडे गेला आणि म्हणाला बाबा माझा राग गेला.बाबा म्हणाले आता जेव्हा तुला राग येईल तेव्हा हे खिळे तू पुन्हा उपटून काढायचे.राग आला की आता खिळे उपटायचे होते.बघता बघता खिळे नाहीसे झाले.पण छिद्रे मात्र राहिली. बाबा म्हणाले बघितलस का आपण जेव्हा एखाद्याला रागात बोलतो तेव्हा त्याच्या मनावर खोल जखम झालेली असते ती कधी बुझू शकत नाही. त्यामुळे कोणालाही वाईट बोलायचे नाही.चिंटूला त्याची चूक कळाली.
   मित्रांनो आपण पण असेच करतो ना ,जेव्हा राग येतो तेव्हा हवे ते बोलून जातो ,कधी विचार पण करत नाही समोरील व्यक्तीला काय वाटले असेल.जेव्हा चूक कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.कधी कधी राग येणे चांगले  असते पण त्याचा अतिरेक होणार नाही याची पण काळजी घ्यायला हवी.
    निलम गायकवाड 
     पुणे
-------------------------------------------------------------------
रागावरही प्रेम करा
        राग ही नवीन विचाराची जननी आहे.रागावरही प्रेम करावे.त्यालाही आपलं मामावं.दूरावू नये.मात्र रागाला अंगलट करु नये.
        आम्हाला राग येतो.तो एवढा येतो की तो सहन होत नाही.त्याचा उद्रेक होतो.मग उद्रेकातून विनाश होतो.हा विनाश होवू नये.म्हणून आपण रागावर प्रेम करुन त्या रागाला शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण आम्ही माणसं आहोत.
          राग,लोभ,मद मत्सर हे आपले शत्रू.तेव्हा त्याचा द्वेष केल्यास आपल्याला हानी होते.परंतू यावर प्रेम केल्यास विजय प्राप्त होतो.हा विजयच पुढे आपल्या उन्नतीसाठी लाभदायक ठरतो.
        रामायणात कैकेयीनं रामाला वनवास दिला होता.त्याचा लक्ष्मणाला राग येत होता.त्याचा राग रामालाही येतच असेल.तरीही रागावर नियंत्रण करुन नव्हे तर प्रेम करुन राम वनवासात गेला.त्या क्षणाला विधीलिखीत मानलं.त्याचा परीणाम हा झाला की अत्याचारी रावण मारला गेला अर्थात मरण पावला.हा रागावर प्रेम केल्याचाच परीणाम.
        रावण ही विद्वान होता.सारे शास्र,वेद विद्या त्याला पाठ होत्या.पण त्याच्याच कुबूद्धी भरलेली होती.तो निरपराधांची हत्या करायचा.त्याने केलेल्या साधुच्या हत्या प्रचलित आहेत.त्यांनी अशाच केलेल्या साधुच्या हत्येतून रक्त गोळा करुन ते रक्त जनकपुरीतील भुमीत टाकलं.त्या रक्तानं अपवित्र झालेली जनकपुरीतील भुमी बंजर झाली होती.तिथं कोणतंच अन्न पिकत नव्हतं.तेव्हा सीतानं जन्म घेतला व ती बंजर झालेली भुमी सुपीक बनली.असा आहे.रागाचा परीणाम.रावणाला साधूचा राग येत असल्याने त्याने केलेल्या साधुच्या हत्या त्याच्या नाशाश कारणीभूत ठरल्या.महाभारतातही तसंच झालं.
        महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले.याचा द्रौपदीला खूप त्रास झाला.शरीराने व मनाने ती खूप खंगली होती.वयस्कर दिसत होती.हस्तिनापुरात 
सर्वदूर विधवा दिसत होत्या.अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती.एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती..
तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले.त्याला पाहून तिला राहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली.ती म्हणाली,
        "सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं?"
        भगवान कृष्ण म्हणाले,
          "पांचाली नियती खूप निष्ठुर असते.ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस.फक्त दुर्योधन आणि  दुःशासन नाही तर सर्वच कौरव संपले.द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता?"
          द्रौपदी त्यावर म्हणाली.कारण तिच्या मनात भयंकर राग होता.कौरवांचा.तिचा भरदरबारात अपमान झाला होता.
          "कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?"
            त्यावर क्रिष्ण म्हणाला, 
           "नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव 
सांगायला आलो आहे.आपल्या कर्माची  फळे आपल्याला दिसत नाहीत.पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही."
          त्यावर द्रोपदी म्हणाली,
          "कृष्णा, मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं  तुला म्हणायचं आहे का?"
        क्रिष्ण म्हणाला,
         "नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस.तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!"
         द्रौपदी म्हणाली,
          "क्रिष्णा ,मी काय करू शकत होते?"
         कृष्ण म्हणाला,
        "तुझ्या स्वयंवराच्या  वेळी तू त्याचा अपमान करायला नको होतास.त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस की 'अंधे का पूत्र अंधा' व खिदळून हसत त्याचा सार्वजनिक अपमान केला नसता तर तुझं वस्रहरण झालं नसतं.कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती.तू राग बाळगला म्हणून हे सगळं घडलं.नाहीतर घडलं नसतं."
          महत्वाचं म्हणजे आपण आपले असे शब्द बोलू नयेत की दुस-याला त्या शब्दांचा राग येईल. शब्दच आपले कर्म बनवतात.आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा.नाहीतर त्याचे दुष्परीणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.जगात  फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या   दातात नाही तर जिभेत विष आहे.म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं.बेलगाम बोलण्यानंच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं.
           म्हणून राग आलाच तर त्याच्यावर प्रेम करीत त्याचं पालनपोषण करावे.जेणेकरुन तुमचा राग काहीवेळानं शांत होईल व तुम्ही रागासोबतच स्वतःमध्ये शांती वदवू शकाल.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
-------------------------------------------------------------------
 'राग एक मानसिक गरज...'
  
         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
  
  'राग म्हणजे 'स्व' ला बसलेला तडा
  राग म्हणजे खदखदनारा द्वेषाचा सडा'
  व्यावहारिक जीवनातील परवलीचा शब्द म्हणजे' राग'.या भूतलावर मानसिक संतुलनातील महत्त्वपूर्ण गोष्ट..!!,आश्चर्य वाटलं असेल ना..!पण हे खरं आहे.खरं तर राग व्यक्त करणे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे..ज्या मुळेच माणसाच्या मनाचे संतुलन राहू शकते.राग वा क्रोध जर नसता तर माणूस मनामध्ये कुढत बसून कदाचित त्याचे मानसिक संतुलन बिघडले असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या 'स्व' ते लक्षण आहे.हा 'स्व' दुखावला की माणसाचा अहंकार जागृत होतो...आणि त्यातूनच त्याला राग येतो.प्रेम आणि राग या एकाच नाण्याच्या दोन बाजू...! राग आणि अनुराग नसते तर कदाचित मानवी जीवन हे वेगळ्या प्रकारे वाहवत गेले असते. जशी ढगांच्या गडगडाटा शिवाय पावसाची शीतल धार अनुभवता येत नाही,लोखंड तप्त केल्याशिवाय त्याच्यापासुन उपयुक्त वस्तूची निर्मिती करता येत नाही. तद्वतच रागा शिवाय अनुरागाची किंमत कळत नाही.
  खरे तर बऱ्याचदा आपण रागावतो कुणावर...!आपला राग कुणावरही व्यक्त होत नाही.ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो, जिच्याकडून आपल्या काही तरी अपेक्षा असतात.त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही की आपल्याला राग येतो...!!
मंगेश पाडगावकर प्रेमा विषयी म्हणतात "प्रेम कुणावर करावं?...प्रेम कुणावरही करावं....'  पण  राग व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला अगोदर आपल्या हृदयात स्थान द्यावं लागतं....ही झाली रागाची एक बाजू!!
   पण आपण ज्या व्यक्तीचा प्रचंड द्वेष करतो,किंवा ज्या व्यक्तीने आपल्या शेपटावर पाय देऊन आपल्याला दुखावलेले असते...अपमानित केलेले असते अशा व्यक्तींचाही आपल्याला राग येत असतो...!!  'नावडतीचे मीठ आळणी म्हणतात' ते उगाच नाही..!अशी न आवडणारी माणसं नुसती दिसली तरी आपल्या 'तळ पायाची आग मस्तकात जाते..' आणि त्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट,त्याने केलेली  प्रत्येक कृती बद्दल आपल्या मनात क्रोधाची भावना निर्माण होते.अति क्रोधाने पूर्वी केलेली सर्व कामे लयाला जातात.प्राचीन काळा पासुनच याची अनेक उदाहरणे सांगता येतील..!,महाभारतातील दुर्योधनाचा क्रोध सर्वश्रुतच आहे.क्रोधाने माणसाची मती भ्रष्ट होऊन त्याचा विवेक हरवतो आणि एखादे दृष्कृत्य त्याच्या हातून घडते.बेभान होऊन ते कृत्य व्यक्तीच्या हातून घडते परंतु नंतर त्याला पश्चाताप होतो... पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.'रागाला डोळे नसतात' असं म्हटलं जातं ते काही उगाच नाही!!म्हणूनच समर्थांनी म्हटले असावे
   'नको रे मना क्रोध हा खेदकारी'
 खरं म्हणजे अजिबात राग व्यक्त न करणारी व्यक्ती दुर्मिळच...!वरून कितीही शांत दिसणाऱ्या व्यक्तीला देखील कधी ना कधी राग व्यक्त करण्याची पाळी येतेच.परंतु हा रागही क्षणभंगूर  आणि विवेकी असावा. 
  खरे तर व्देषावर विजय मिळवणेही सोपी गोष्ट नाही. माणूस पावलोपावली व्देषाला बळी पडू शकतो. चारचौघातल्या व्देषाविषयी मी मुळीच बोलत नाही. व्देष आत दबा धरून बसलेला असतो आणि तो उथळ कारणानेच उफाळतो असेही नाही. अगदी आतल्या आणि सबळ कारणाने व्देष मानसिक पातळीवर फणा काढू शकतो. अशा व्देषाला बाहेर निघायला जागा सापडली नाही तर  भयंकर विकृत घटना घडू शकतात. क्रोधाचेही तसेच. क्रोधाने जगात अनेक वाईट घटना घडतात. त्या आपण वर्तमानपत्रातून आणि चॅनल्सवरूनही रोज वाचतो- पाहतो. वरवरचा असलेला क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत साचलेला क्रोध कशानेही जाऊ शकत नाही.काहींच्या नाकावर सतत राग असतो अगदी क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून रागावणाऱ्या व्यक्ती बघितल्या की वाटतं यांना 'आनंद'शब्दाचाच तिटकारा असावा.
 राग म्हणजे आपल्या स्वतःचे अस्तित्व दाखविण्याची सर्वोच्च पातळी मानावी लागेल म्हणूनच आग्ऱ्याच्या दरबारात शिवरायांनी त्यांच्या झालेल्या अपमानाचा रागावून लगेच निषेध व्यक्त केला.परंतु त्याची परिनिती आणि सुटकेसाठी करावी लागलेली धडपड आपल्या सर्वांना ज्ञातच आहे.म्हणूनच समर्थांच्या 'प्रमाणामध्ये   सर्व काही असावे....' ही उक्ती लक्षात ठेवा.
शेवटी जाता जाता इतकंच म्हणावेसे वाटते
'जरी कोणी तूजला क्रोध दावी । 
जपुनि तेथें त्वां शांति आदरावी ।'
        डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
------------------------------------------------------------------- विनाशाचे मूळ " क्रोध "
माणसाचे मन हे उधळणाऱ्या घोड्याच्या टाका सारखे असते.मिळेल त्या जागेवर दौडत राहते.क्षणात जगाची सफर करण्याची ताकत मनात असते.मनाचा मागोवा घेणे म्हणजे समुद्राच्या पाण्याचा तळ गाठण्यासारखे आहे.मनासारख्या गोष्टी घडल्या तर मन आनंदी होते.एखादी नको असलेली सहज गोष्ट घडली तर लगेच मन दुखावते.ती प्रगट होते. त्यालाच क्रोध आला असे आपण म्हणतो.क्रोध म्हणजे विनाशाचे आमंत्रण होय.माणसाला क्रोध आला की,त्याच्या मनावर व विचारावर त्याचा ताबा राहत नाही.आपण कुणासमोर बोलतो,काय बोलतो याचे भान माणसाला राहत नाही.क्रोध मुळात प्रत्येकात असतो.फक्त काही जण प्रगट करतात.तर काहीजण याला आवर घालतात.क्षणाक्षणाला सैरावैरा वायूच्या वेगाने धावणाऱ्या मनावर ताबा मिळवला.तर क्रोध येणारच नाही.क्रोध आमचा चांगुलपणा आहे. चांगले वाईट क्षणात ओळखून विचारांना प्रगट व्हायला लावते ते मन. आयुष्यात जन्माबरोबर प्रत्येकाला सुंदर शरीर व सुंदर मन मिळते.पुढे याच शरीराच्या साथीने मन इच्छा, आकांक्षांचा डोंगर सजवायला लागतात.यशाची शिखरे व प्रतिष्ठेचा डोंगर रोजच काबीज करावे असे वाटते.आयुष्याच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माणूस क्षण क्षण झिजत राहतो.कधीकधी मात्र ही शिखरे व डोंगर काबीज होत नाही.याचा माणसाला प्रचंड राग येतो.मनुष्य सतत क्रोधित राहतो.यातून तिरस्काराच्या भावनांनी सतत व्यक्त होतो.त्याचाच क्रोध त्याला जाळत असतो.क्रोध हा स्वतःचाच शत्रू आहे.तो एकदा आपल्या मनावर ताबा गाजवायला लागला,की आपल्या हातून नको असलेल्या चुका घडत जातात. क्रोधामुळे नाती-गोती,यश,प्रतिष्ठा क्षणात धुळीस मिसळते.क्रोधावर नियंत्रण ठेवले नाही.माणूस अनेक गोष्टींपासून दुरावत जातो.क्रोधाला संयमात रूपांतर करता आले पाहिजे. क्रोधाला योग्य औषध म्हणजे नम्रता होय.नम्रपणा सतत जवळ ठेवला तर क्रोध जवळही भटकत नाही. अहंकाराची वलयं हळूहळू नाहीशी होत जाते.माणसाचा स्वभाव हा वेगवेगळ्या फुलांच्या अलंकारांनी नटलेला आहे.राग,लोभ,मत्सर, अहंकार,नम्रपणा,प्रामाणिकपणा या अलंकारांना ओळखता आले पाहिजे. क्रोधाच्या अंलकारा पेक्षा नम्रतेचा अलंकार अंगी बाळगला.तर जीवन रंगाप्रमाणे उमटून व सुगंधा प्रमाणे सुवाच्छ होऊन जाते.जीवनात मिळविलेल्या अनेक गोष्टींना टिकवण्यासाठी क्रोधा आवरता आला पाहिजे.माणसाला जगातील कोणतेच विचार हरवत नाही.तर त्याचा क्रोध त्याला अपयशाची पायरी चढायला लावतो.जगात सुंदर नाती,सुंदर लोक आहे.ती जपतांना फक्त त्यांना आपल्या  क्रोधाचा वरखंडा लागू देऊ नये.सुंदर विचारांची वेसन मनाला सतत घालून ठेवली.व संयमाचा ओलावा पाझरत राहिला.तर क्रोध कधीच आपले डोके वर काढणार नाही.एकदा क्रोध नाहीसा झाला की,मनुष्य चंदनाच्या वृक्षाप्रमाणे सतत सुगंधी होऊन जाईल.

राजेंद्र प्रल्हाद शेळके सहशिक्षक
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा 9823425852
rajendrashelke2018@gmail.com
-------------------------------------------------------------------
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...