*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- बेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 30 मे 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- एकाग्रता*
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता:यशाचा मार्ग*
माणसाच्या जीवनशैलीमध्ये गती आलेली आहे. आणि गती मध्ये काम करत असताना होणारे काम यशस्वी होईलच याची शाश्वती देता येत नाही. कारण काम करत असताना माणसाची एकाग्रता टिकून राहत नाही. ती न टिकण्याचे कारण म्हणजे त्याची जीवनशैली सुद्धा कारणीभूत आहे. खाण्याच्या सवयी, राहणीमान रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, आहारामध्ये सात्विक पदार्थांचे सेवन न होणे. अशा अनेक गोष्टी एकाग्रतेवर परिणाम करणाऱ्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवघेणी चाललेली स्पर्धा त्यातून येणारा तणाव या साऱ्या गोष्टी आपल्या एकाग्रतेवर परिणाम करत असतात. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू तेथील एकमेकाशी असणारे संबंध आपल्या एकाग्रतेवर प्रभाव टाकू शकत असतात. जीवनामध्ये जे लोक यशस्वी झालेले आहेत मग तो कलाकार असेल, व्यवसायिक असेल, वैज्ञानिक असेल किंवा अनेक क्षेत्रातील कोणी असेल एवढेच काय विद्यार्थी सुद्धा केवळ आणि केवळ एकाग्रतेवरच यशाचे उंच शिखर गाठू शकतो. पुराण काळामध्ये सुद्धा अर्जुनाचे उदाहरण दिले जाते एकाग्रतेच्याबाबतीत. एखादे लक्ष्य पार करण्यासाठी आवश्यकता असते ती एकाग्रतेची. एकच काम अनेकांना सांगितले तर सर्वांकडून ते पूर्ण होत नाही किंवा ते व्यवस्थित पार पाडले जात नाही काही लोकांकडून, काही मोजक्या लोकांकडूनच ते पुर्ण होते. याचे कारण म्हणजे ते लोक त्या कामावर लक्ष केंद्रित करून जबाबदारी पार पडत असतात. काहीना हे लक्ष केंद्रित करणे जमत नाही. त्यामागे त्यांची मानसिकता, अस्थिर मन आणि इच्छाशक्ती या गोष्टी कारणीभूत असतात. शारीरिक स्वास्थ्य साठी हे एकाग्रतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ शारीरिक स्वास्थ्य उपयोगाचे नाही. तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा तंदुरुस्त असायला हवे. आणि त्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेली पद्धत म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणा करून आपण एकाग्रता मिळवू शकतो. याची प्रचिती आजपर्यंत अनेकांना आलेली आहे. योगशास्त्रातही त्याचा आधार आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत, अनेक योगिनी सांगितले आहे, अनेक आध्यात्मिक गुरूंनी देखील सांगितले आहे की ध्यानधारणेमुळे केवळ एकाग्रताच प्राप्त होत नाही तर एकाग्रता वाढीस लागण्यासाठी ध्यानधारणेचा उपयोग होतो.सतर्कता आणि मनाचे लक्ष हे नियमित ध्यानसाधनेचे परिणाम आहेत. असे गुरुदेव रविशंकर यांनी सांगितले आहे.काल्पनिक कथा, मासिके, जाहिराती किंवा मनाला त्रास देणाऱ्या बातम्या पाहिल्याने किंवा वाचल्याने मन अधिक बेचैन होते. टीव्ही आणि इंटरनेटमुळे मन गोंधळून जाते आणि निरर्थक प्रसंग मनात घर करतात. आणि आपली एकाग्रता भंग पावते. त्यामुळे अशा गोष्टीपासून आपण दूर राहणेच योग्य. प्रेरणादायी विचार , चांगल्यांची संगत आणि आरोग्यदायी आहार, त्याचबरोबर नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा या गोष्टीतून आपण मन शांत आणि एकाग्र करू शकतो. एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्याने उत्तम यश संपादन करता येते म्हणूनच विवेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला यशाची गुरुकिल्ली असे म्हणत. या गुरुकिल्लीला आणि वरील गोष्टी जर आपण साध्य केल्या आणि आपले मन जर एकाग्र झाले तर आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी परिपक्वता आपल्यामध्ये आल्यावाचून राहणार नाही.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(08)
*एकाग्रता आणि स्मरणशक्ती*
एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो.
अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणं. लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो.
आपल्याला हवं ते यश मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं. वेळ, पैसे खर्च न करताही अनेक गोष्टींचा सराव करता येईल. एकटय़ानं वा गटात स्मरणशक्तीचे खेळ खेळता येतील.. विविध प्रकारच्या भेंडय़ा लावणं, गोष्ट सांगणं, कविता सादर करणं, विशिष्ट ढंगात विनोद सांगणं, प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवल्याने स्मरणशक्तीला चालना मिळते आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे, त्यावर आपोआप आपलं लक्ष एकाग्र करायचीही सवय जडते.
योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो. अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती याएकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणत. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती.
शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशावेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.
“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशराचे वस्त्रगाळ चूर्ण शास्रशुध्द विधीने मूर्छित केलेल्या गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. अभ्यासातून वेळ काढणे कठीण होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी हे तूप नाकात जरूर टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोंदिया*
*मो. 9421802067*
दिनांक : ३०/०५/२०२०
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
39)मनाची एकाग्रता*******
मनाची एकाग्रता असणे हेच जीवन जगण्यासाठी फार आवश्यक आहे. मनाची एकाग्रता नसेल तर मन चंचल होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती च्या साह्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात एकाग्रता आणि स्मरणशक्ती हि यशाची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे.मनाची एकाग्रता म्हणजे आपण निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी निश्चित केलेले लक्ष किंवा साध्य पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन ध्यानी- मनी- स्वप्नी त्याच गोष्टीचा विचार करत राहणे.आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. योग्यवेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमण आणि त्यावेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते. परीक्षेतील यश असो नोकरीत आपल्यावर सोपवलेले गेलेले काम असो या दोन्ही गोष्टी आपल्याला मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती च्या साह्याने साध्य करता येतात.
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"
रामदास स्वामीचे ही उक्ती मनाची शक्तीची प्रचीती देते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी योगा अभ्यास आणि ध्यान साधनेचा निश्चितच उपयोग होतो. एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिक रित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी असू शकतात.मनाची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणेद्वारा मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. मनाची एकाग्रता हवी असेल तर ध्यान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मन हे विमानापेक्षा ही वेगाने उडणारे आहे."कधी येथे तर कधी कुठे". मनातले विचार हे अव्यक्त कल्पनांच्या पुढे पुढे जात असतात. परंतु त्या मनाचे संगोपन निकोप व्हायला हवे. त्यात स्वैराचार यायला नको, चांगले वाईट विचार मनात आले तर सद्गुण- सद्वर्तनाचे स्वीकार व्हायला हवा. मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे.प्रत्येक मनुष्य जवळ कोणतेही काम करण्याची क्षमता असते. या सर्व प्रगतीचे रहस्य म्हणजेच त्याच्याजवळ असलेली प्रबळ इच्छाशक्ती, जिज्ञासू वृत्ती, मनाची एकाग्रता.
हमको मन की शक्ती देना
मन विजय करे
दुसरो की जय से पहले
खुद की जय करे.
अशी एक प्रार्थना आहे. ती मला खूप आवडते. प्रबळ इच्छाशक्ती मुळे मनुष्य जग जिंकायला निघाला आहे. मानस शास्त्रानुसार ज्याला स्वतावर विश्वास आहे त्यालाच जीवनातला खरा आनंद, सुख उपभोगता येते. आपल्या मनाची एकाग्रता वाढविणे, मनावर नियंत्रण ठेवणे आणि आपली मनशक्ती जागृत करणे हे आपल्याच हाती आहे अडलर नावाचा मानसशास्त्र होऊन गेला. त्याने अनेक व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करून एक सिद्धांत मांडला. मानवी मनाची धाव नेहमी उत्तुंगतेकडे असते. आपल्या मध्ये जर काही कमी असेल तर ती कमतरता भरून निघण्यासाठी ही धाव
अजूनच वाढते. व पुढे जाण्याला मदत करते. आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर, स्वतःवर, आपल्या मनावर, इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. कारण हेच मन कधी कधी आपल्याला आपल्या लक्ष्यापासून, उद्देशापासून वंचित करते. म्हणून पुढे जाण्यासाठी मनाची एकग्रता व मनापासुन इच्छा हवी. ज्या व्यक्तीला पुढे जायचे त्या व्यक्तीला आंतरिक इच्छा हवी. पुरेशी इच्छा नसेल तर मनाची शक्ती जागृत होणार नाही.
स्वतःला आपल्याजवळ सर्वशक्तिमान असलेले मन आहे. व ते आपल्याला अडचणीवर मात करायला शक्ती देणारे आहे, मार्गदर्शन करणारे आहे. यासाठी मनाची एकाग्रता, मनातील बदल हा महत्त्वाचा आहे. मनाची एकाग्रता नसेल तर अभ्यासू वृत्ती नष्ट होते. विध्वंसक बाजूला मन वळते. म्हणून मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी मनातील विचारांना अध्यात्म चांगल्या चिंतन कार्यात गुंतलेल्या पाहिजे. स्वतःची ,समाजाची प्रगती साधणारे विचार, इतरांना मदत करण्याचे विचार, जनकल्याण व मानवता कल्याणाची विचार जर मनात आणले तर आपल्या मनाची ऊर्जा सदैव आपल्या पाठीशी राहते. नशिबात आहे म्हणून होणारच याकडे आपल्या मनातील भावनेने लक्ष देता कामा नये. कारणाचा अंधारातच उद्याचा उषकाल दडलेला आहे. प्रकाशाची जाणीव संपणार नाही. नवी पहाट येईल, तिच्या स्वागतासाठी आपण तयारी करू.. प्रतिकूल परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे. अडचणींचे डोंगर पार करायचे आहे. याकडेच आपण आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे म्हणून मनाची एकाग्रता वाढवावी लागेल.
मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी मन एकाग्र करणे आवश्यक आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास लक्षात राहण्यासाठी मुलांची मनाची एकाग्रता हवी. अनेक संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की नेहमी ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, विषयाबद्दल आवड निर्माण होते. सूर्यनमस्कार व सर्वांगासन असं केल्याने मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. परिणामी चांगली प्रगती होते. प्राणायाम केल्याने तीन तास मनाची एकाग्रता टिकून राहू शकते. आर्ट ऑफ लिविंग शिबिरात शिकविला जाणारा "एकाग्रता"प्राणायाम केल्याने हे साध्य होते. सुदर्शन क्रिया देखील मनाची एकाग्रता वाढवते. पौष्टिक आहार, पूर्ण झोप, ध्यान साधना इत्यादीचा परिपोष चांगला केला तर मनाची एकाग्रता वाढते म्हणून असे म्हणतात की,
"Sound mind in a sound body."
सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
8007664039
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(02) एकाग्रता टिकविणे सध्या आव्हानात्मकच*
"धकाधकीच्या जीवनात
आवश्यक आहे एकाग्रता
ध्यान,प्राणायाम,योगासने
करून मन ठेवावे शांत आता"
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे.या तंत्रज्ञांनी युगात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमधील आभासी गेम खेळण्यात लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सतत खेळत वेळ घालवीत आहेत त्यामुळे सततच्या मोबाईल,लॅपटॉप, टीव्ही वरील चित्रपट,मालिका,गेम यासारखे बघत असल्याने थकवा,कंठाळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक ताणतणाव निर्माण झाल्याने एकाग्रता भंग होत आहे.प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायात अधिक काळ घालवीत असल्याने आराम, विश्रांतीची सवडच आजचा लोभी माणूस विसरत जात असल्याने एकाग्रता भंग होत आहे.सध्याच्या धकाधकीच्या काळात एकाग्रता टिकविणे हे सामान्य व्यक्तीच्या समोर आव्हानात्मक ठरत आहे.स्वामी विवेकानंद यांनी एकाग्रता व स्मरणशक्ती ही 'यशाची गुरुकिल्ली' आहे असे संबोधले होते.कोणत्याही व्यवसायात,कार्यात यश संपादन करायचे असेल तर एकाग्रता संपादन करणे खूप गरजेचे आहे.एकाग्रतेवर यश अवलंबून असतात असे सकारात्मक विचार अमलात आणण्यासाठी आवश्यक आहे.आपले चित्त शांत ठेऊन ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे.शारीरिक कार्य करण्यासाठी शारीरिक ऊर्जा आवश्यक असते पण मानसिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी असावी लागते त्यामुळे मनाचा समतोल राखण्यासाठी एकाग्रता गरजेचे आहे आणि सध्या टिकविणे आव्हानात्मक ठरले आहे.एकाग्रता नसेल तर आपल्या कार्यक्षमतेवर,नवीन गोष्टी शिकण्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो.आज लहान मूल व युवक यांचा स्पर्धा परिक्षेवरील ताण-तणाव यामुळे त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो आहे त्यामुळे सततच्या विविध कामाच्या व्यापामुळे थकवा, कंटाळा, काळजी,चिंता,लक्ष केंद्रित न करणे इत्यादी अनेक कारणांमुळे एकाग्रतेला तडा जात आहे म्हणून एकाग्रता साधने,टिकविणे आजच्या काळाची गरज बनली आहे.
एकाग्रतेने कार्य केल्यास त्याची कार्यक्षमता, निर्णयक्षमता वाढीस लागते. नवनवीन कला कौशल्य शिकण्याची क्षमता निर्माण होते.त्यासाठी मनावरील ताण कमी करण्यासाठी विश्रांती घेणे गरजेचे आहे.दरदिवशी उत्तम झोप,सकस पौष्टिक आहार,सकाळी योगासने,व्यायाम,प्राणायाम केल्याने मनावरील ताण कमी होऊन एकाग्रता वाढीस मदत लागते.गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की,ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे नव्हे तर सतर्कता व मनाचे लक्ष हे नियमित ध्यानधारणेचे परिणाम आहेत म्हणून सतर्कता पाळण्यासाठी आणि मनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सकाळी व्यायाम नियमित केल्यास मन केंद्रित होऊन एकाग्रता वाढीस मदत होऊ शकते.प्राणायाम करीत असताना श्वासावर नियंत्रण ठेऊन श्वास आत,बाहेर केल्यास मन अगदी आनंदी,एकाग्र व शांत राहण्यास मदत होते याचसोबत सकस पौष्टिक आहारासोबत फळे घेतल्यास ताण कमी होऊन मन,शरीर शुद्ध,शांत राहून एकाग्रता निर्माण करून आपल्यासमोरील आव्हान निश्चितच पेलू शकतो ही आशा आहे.
✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(5)
*एकाग्रता*
*'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे' l*
हे ज्ञानेश्वर माऊलीचे सुवचन ऐकले की एकाग्रतेने किती समाधान लाभते हे जाणवते. आपल जीवन यशस्वी करायच असेल तर आपण मनापासून एकाग्रतेने काम केले पाहिजे. तरच आपलं जीवन यशस्वी होतं.
' सर्व जगाला विसरुन मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात'. एकाग्रता म्हणजे एकचित्तता. ही एकचित्ता आपल्याला आपल्या कामात यश मिळवून देते.
आपल्या कामात द्विधा मनस्थिती असेल तर त्या कार्याचा नाश होतो. मननामुळे माणसाला एकाग्रता लाभते. तसेच आपल्या मनाचा एक दोष आहे तो म्हणजे चंचलता. माणसाचे मन हे चंचल असते. हे चंचल मन वाऱ्यासारखे धावत असते. या चंचलतेमुळेच मनात संकल्प ,विकल्प निर्माण होतात.हे स्वैर धावत सुटलेले मन सावरायचे असेल तर आपल्या मनाची सर्व शक्ती दृढपणे स्थिर करून एकाग्रता निर्माण करावी लागेल. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. माणसाने आपल्या कामात इतके तन्मय व्हावे की समोर कोणी जरी आले तरी आपल्याला ते माहित होऊ नये. एकदा नेपोलियनला बिन साखरेचा चहा दिला.नेपोलियनने तो चहा चटकन पिऊन टाकला. तो आपल्या कामात इतका तन्मय होता की चहात साखर नाही हे त्यांना कळलेच नाही.
अशी एकाग्रतेची ,तन्मयतेची, एकरूपता, एकचित्तता, तल्लीनता ची कितीतरी उदाहरणे आहेत. एकाग्रता साध्य करण्यासाठी मनुष्याच्या डोळ्यापुढे एक विधायक ध्येय साधना पाहिजे. आपण ध्येयधुंद होऊन कार्य केले तर जीवनाची यशश्री लाभते.
म्हणून माणसाचे मन हे बुद्धीच्या अनुरोधाने चालणारे असावे. बुद्धीने सांगावे,मनाने करावे. मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असावे. तरच योग्य निर्णय घेता येते. एकदा द्रोणाचार्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती. झाडावर एक पक्षी टांगला होता, आणि त्याच्या डोळ्याचा वेध करायचा होता. आचार्यांनी प्रत्येक शिष्याला जवळ बोलावून विचारले, " तुला काय दिसते?" सगळे म्हणाले झाड दिसते, पाने दिसतात, पक्षी दिसतो. परंतु एकटा अर्जुन म्हणाला, " मला फक्त डोळा दिसतो". अर्जुनाच्या या एकाग्रतेतमुळेच तो वीर धनुर्धर बनला. एक अद्वितीय धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख आहे.
“ध्यान, एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटात मुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परम आवश्यक गुण आहे. ”असे चार्लस् डिकन्स या विचारवंताचे मत आहे. म्हणून माणसाने आपला प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोगीली पाहिजे. अशी ध्यान आणि एकाग्रता ची सवय ठेवावी. एकग्रतेसाठी संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनाचे स्वरूप उलगडायचे असेल तर व्यक्तीने आपले वळण संयमाकडे आहे की स्वच्छंदाकडे आहे हे जाणून घेतले पाहिजे. विनोबा भावे यांनी म्हटले आहे की " संयम ही जीवनाची किल्ली आहे". संयमाची ही जीवनाची किल्ली आपल्याजवळ असेल तर आपल्याला एकाग्रतेची सवय लागेल. आणि आपले मन एकाग्र झाल्यावर आपल्याला अशक्य असे एकही काम नाही. जर एकाग्रतेचा अभाव असेल तर आपले एकही काम यशस्वी होणार नाही. या एकाग्रतेच्या अभावामुळे आपली शक्ती विकेंद्रीत होऊन तिचा अपव्यय होतो. म्हणून जीवनात एकाग्रता, तन्मयता, एकरूपता , एकचीत्तता, परिमिततता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाने एकाग्रतेने काम करावे तरच समाधान मिळते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सुवचनात म्हटले आहे
*'एकाग्र करी मन l तेणे होईल समाधान रे l'*
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि. नांदेड.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड न. ३६ ............विषय : - "एकाग्रता" आपले मनात वेगवेगळ्या प्रकारचे चालू असतात,मन एकाच ठिकाणी स्थिर ठेवणे म्हणजे "एकाग्रता" आणि हे कोणाला सहजा सहजी शक्य नसते त्यासाठी भरपूर प्रयत्न केले तर काहीच अवघड नाही.मन चंचल असते कधी आपन एखादे पुस्तक वाचत असलो तरी मनात जर वेगळा विचार चालू असेल तर पुस्तकात काय वाचले ते सांगता येत नाही म्हणजे "एकाग्रता" नव्हती असेच म्हणावे लागेल.आपण एका ठिकाणी सहल साठी गेलेला असाल तर आपण घरचा विचार विसरून सहली मधील आंनद तेथील नव नवीन वेग वेगळा निसर्ग पाहुन "एकाग्रता" मनात ठेवून आंनद घेतला पाहिजे त्यावेळी घरचा विचार मनात आला की गाईला पाणी कोणी पजल असेल आज घरी काय जेवण केले असेल किवा यावेळी मी काल कोठे होतो हे जर विचार चालू असतील तर त्या सहलीचा काहीच उपयोग नाही हे एकाग्रता आपणास न कळत शिकवून जात असते.शाळे मध्ये विद्यार्थी म्हणून जर शिक्षण घेत असाल तर आपले शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष असल पाहिजे काही शिकविले मधील विचारले तर तुमची एकग्रता असेल तर पटकन उतरे देवू शकता.पण तुमचे लक्ष नसेल तर तुम्ही उत्तर देवू शकणार नाही.एकदा वर्गात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु बैरिस्टर मा.पी.जी.पाटील शिकत असताना शिक्षकानी त्याना उभे केले त्यावेळी हातामध्ये पुस्तक न घेता पुस्तक मधील पान नंबर व ओळ सुध्दा सांगितली ही "एकाग्रता"अशी असली पाहिजे.महाभारतातील द्रोणाचार्य अर्जुन ला व इतर पाण्डवानां विचार तात झाडावर पक्षी बसलेला आहे त्या संबधी प्रत्येकाला प्रश्न विचारतात तुम्हाला झाडावर काय दिसत आहे काही सांगतात पक्षी दिसत्तो,एक सांगतो पक्षाचे पंख दिसतात पण ज्यावेळी अर्जुनावर वेळ येते त्यावेळी अर्जुन सांगतो मला पशाचा फक्त डोळा दिसतो आहे ही "एकाग्रता"असते.आता सध्या एकाग्रता हवी आहे कारण सर्वत्र आपण ध्वनी प्रदूषनामुळे एवढे घायाळ झालो आहोत की एकाग्रता नाही मिळू शकत.वाहना ची रस्त्यावर गर्दी ,रेल्वे, विमान छोटीमोटी इतर वाहन संख्या वाढली आहे ती वाहने गरज म्हणून आपण वापरत असतो त्यांमधुन आवाजाचा त्रास हॉट असतो त्यामुळे एकाग्रता मिळत नाही शहरात राहणाऱ्या विद्यार्थी याना फार त्रा स असतो यावर मात करून अभ्यास करतात.एकदा खेडे गावातील एक मुलगा अभ्यास करीत होता त्याच्या शेजारुन एक बैलगाड़ी धड़ धड़ करीत गेले नंतर तेथे येवून विचारतो येथून थोड्या वेळापूर्वी एक बैलगाड़ी गेलेली पाहिला का? तेव्हा तो म्हणतो मी नाही पाहिली.म्हणजे तो मुलगा एवढा एकाग्र झाला होता त्याला बैलगाडिचा आवाज ऐकु आला नाही.आज पर्यन्त ज्यावेळी वेळी शोध लावले ते केवल आणि केवल एकाग्रता यामुळेच आपण सुध्दा तसाच प्रयत्न केला तर आपल्या स्वत:च्या प्रगतिबरोबर आपल्या देशाची प्रगति करु शकतो ही काळ्या दगड़ावरची रेष ठरेल हे नक्की.....
.लेखक जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता हीच यशस्विता*
आजकाल माझे मन कुठंच लागत नाही, मन अस्वस्थ वाटायला लागतं, वाचलेले काही लक्षात राहत नाही, एक करायला गेलो की दुसरेच होते अशी काही वाक्य आपल्या मित्रांकडून किंवा नातलगातील व्यक्तीकडून ऐकतो तेंव्हा आपण त्यांना एकच सल्ला देतो ते म्हणजे अगोदर मन एकाग्र कर, बाकी सर्व ठीक होईल. मन एकाग्र करणे म्हणजे काय ? मनाची एकाग्रता काय केल्याने मिळते ? या प्रश्नाच्या उत्तरांचा शोध घेतल्यास लक्षात येते की मनाची एकाग्रता म्हणजे आपले लक्ष, अवधान. आपले लक्ष किंवा अवधान नसेल तर मन एकाग्र होणार नाही आणि कोणतीही क्रिया यशस्वीपणे पूर्ण होणार नाही. ही एकाग्रता एका दिवसांत किंवा काही महिन्यात मिळविणारी गोष्ट मुळीच नाही. त्यासाठी लहानपणापासून आपणांस असलेल्या अनेक सवयीचा परिपाक म्हणजे एकाग्रता. एकाग्रता वाढली की आपली स्मरणशक्ती वाढायला लागते. स्मरणशक्ती वाढत गेली की आपण जीवनातील अनेक संकटे लीलया पार करू शकतो. ध्यान धारणा करून चित्त एकाग्र करण्याचे काम पूर्वीचे संत आणि ज्ञानी लोक करत असत. पौराणिक कथेत आपण असे ही वाचले आहे की, हे ऋषीमुनी तपश्चर्या करण्यासाठी घनदाट जंगलात, एखाद्या गुहेत किंवा उंच पर्वतावर जाऊन बसत. त्यांची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यापाठीमागचा उद्देश्य असायचा. सांसारिक जीवन जगताना आपले मन एका गोष्टीवर एकाग्र होतच नाही. मालिका चालू असतांना जसे मध्येमध्ये जाहिराती येतात अगदी तसेच अडथळे अधूनमधून येतात ज्यामुळे आपली एकाग्रता लोप पावते आणि कामाचा खोळंबा होतो. लहान मुलांचे मन खुपच चंचल असते. त्यांना एका जागेवर दोन मिनिटं बसून राहा म्हटले तर ते बसून राहू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे तरच ही मुले भविष्यात हुशार होऊ शकतात. लहान मुलांना छोटी छोटी अनेक सोपी कामे सांगितली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात एकाग्रता वाढू लागते. माझं बाळ अजून लहान म्हणून काही काम सांगितले नाही तर त्यांच्यात एकाग्रता निर्माण होणार नाही. त्याच्या वयाला झेपेल अशी कामे त्यांना करायला देणे म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास समजल्या जाते. मेंदूला जेवढं काम दिलं तेवढं त्याचे आयुष्य वाढत राहते. पण जास्तीचे काम लावणे देखील धोक्याचे आहे. काही जण अति ताण घेतात आणि आपल्या जीवाला मुकतात. पूर्वीच्या काळी मनाच्या एकाग्रतेसाठी व शिक्षणासाठी मुलांना गुरूंच्या घरी पाठवत असे त्यास गुरुकुल शिक्षण पद्धती म्हटले जायचे. त्याठिकाणी त्याला स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावल्या जात असे. विविध प्रकारचे अनुभव शिक्षण त्यांना देऊन त्यांची एकाग्रता वाढविण्याचे काम येथे केले जात असत. पण आज अशी पद्धत नाही म्हणून मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय घरातून लावणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर ही मुले आळशी होऊन भविष्यात म्हणावी तशी प्रगती साधणार नाहीत. शिक्षणासाठी मुलांना शाळेत पाठविले जाते. शिक्षक तेथे शिकविण्याचे काम करतात. शिक्षक शिकविताना काही मुले लक्ष देतात तर काही मुले दुर्लक्ष करतात. जी मुले शिकविण्याकडे आपले पूर्ण लक्ष देतात, अवधान ठेवतात म्हणजे मन एकाग्र करून दिलेलं काम करतात तीच मुले पुढे प्रगती करतात. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत आपण मन एकाग्र करतो तर नावडतीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे ती बाब कधीही जमणार नाही. शालेय जीवनात मुले अमुक विषय सोपा आणि अमुक विषय अवघड असे का म्हणतात ? तर त्या विषयाकडे त्याची असलेली एकाग्रता हेच सर्वात मोठे कारण आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत एकाग्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय काही मिळणार नाही. एकाग्रतेसाठी कान आणि डोळे अत्यंत महत्वाचे आहे. डोळ्याने पाहणे आणि कानाने ऐकणे या क्रिया परिपूर्ण झाले तरच काही गोष्टी कळतात. ह्या दोन गोष्टी जर वजा केले तर आपले मेंदू काहीच कामाचे नाही असेच वाटते. एकाग्रता वाढविण्यासाठी योगासने, ध्यानधारणा आणि प्रार्थना ह्या गोष्टी महत्वाचे आहेत. ज्याचा रोज सराव करणे देखील महत्वाचे आहे. एकाग्रता म्हणजे काय असते ? याचे एक ऊत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबा काका यांच्या जीवनातील एक प्रसंग.
गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता. कुंभारकाम करत असताना देखील तो विठ्ठलाच्या भजनात सदैव तल्लीन राहत असे. विठ्ठलाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे. एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्या वेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत विठ्ठलाचे भजन करीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले. त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी माती खालीवर करीत होता. मातीबरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. विठ्ठलाच्या भजनात तो मग्न असल्यामुळे माती तुडविताना रडलेले मूल ही त्याला समजले नाही. ही विठ्ठलाप्रति असलेली भक्तीतून एकाग्रता लक्षात येते. काही नवीन शिकायचे असेल तर मनाची एकाग्रता वाढविणे हीच खरी यशस्विता आहे.
- नासा येवतीकर, 9423625769
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*34*
आजचा लेखनाचा विषय- एकाग्रता
*श्वासा शिवाय आयुष्य नाही, एकाग्रता शिवाय भविष्य नाही*
==============
"एकाग्रता" (अटेन्शन) हे आपल्या मेंदूतील ऊर्जेचा नेता आहे. आपल्या मेंदूला एकाच वेळी इतकी माहिती मिळत असते, की तो त्या माहितीला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तो ठरावीक माहितीच घेतो.
माणूस मोबाइलवर व्हिडीओ पाहण्यात गुंतला असेल तर आजूबाजूला काय घडते आहे ते त्याला समजत नाही. कारण त्याचे तिकडे लक्ष नसते. आपल्या मेंदूला एकाच वेळी इतकी माहिती मिळत असते, की तो त्या माहितीला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तो ठरावीक माहितीच घेतो. जी माहिती तो ग्रहण करतो तिकडे लक्ष आहे, ‘एकाग्रता आहे’ असे म्हटले जाते. म्हणजे एकाग्रता (अटेन्शन) हे आपल्या मेंदूतील ऊर्जेचा नेता आहे. जेथे अटेन्शन असते तेथे मेंदूतील अधिकाधिक ऊर्जा वापरली जाते. ध्यान म्हणजे प्रयत्नपूर्वक आपले लक्ष ठरावीक ठिकाणी द्यायचे. ध्यान देऊन ऐक असे सांगितले जाते, त्यावेळी इकडे लक्ष दे असेच बोलणाऱ्याला सांगायचे असते. असे सांगावे लागते कारण समोरील व्यक्ती काहीही करीत नसली तरी तिचे लक्ष आपल्या बोलण्याकडेच असेल असे सांगता येत नाही. बऱ्याचदा मनात विचार येत असतात आणि त्यामध्येच माणूस गुंग होऊन गेलेला असतो. आत्ता आपले लक्ष कुठे आहे ते जाणणे आणि ते ठरवून एखाद्या गोष्टीवर किंवा कृतीवर नेता येणे हे मानवी मेंदूचे एक व्यवस्थापकीय कार्य आहे.
"असावी एकाग्रता ही कामत, मनी धरावा सदा एक ध्यास , दिलेल्या कामाची पूर्ति व्हावी , यश मिळेलच मग तुम्ही खास." मेंदूतील प्री फ्रंटल कोर्टेक्स जी कामे करतो त्यातील काही खास कामांना मेंदूची व्यवस्थापकीय कार्ये म्हणतात. एखाद्या कंपनीतील मॅनेजमेंट जशी काम करते, कुठे पैसे खर्च करायचे हे जसे कंपनीत ठरवले जाते तसेच माणसामध्ये कुठे ऊर्जा वापरायची आणि कुठे वाचवायची हे मेंदूतील ठरावीक भाग ठरवीत असतो. या भागाला योग्य प्रशिक्षण मिळाले नसेल तर तो चुकीच्या ठिकाणी ऊर्जा खर्च करीत राहतो आणि त्याचे त्याला भान नसते.
भान वाढवण्यासाठी जो सराव केला जातो त्यालाही ध्यान म्हणतात. यातील एकाग्रता ध्यान म्हणजे लक्ष एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा आणायचे, मेंदूतील एकच फाइल अधिकाधिक वेळ सक्रिय ठेवायची. त्राटक, नामस्मरण, आनापान हे सारे एकाग्रता वाढवणारे उपाय आहेत. यामध्ये ‘आलंबन अधिकाधिक सूक्ष्म करणे’ हे प्रगतीचे लक्षण असते. म्हणजे श्वासाचा स्पर्श जाणण्यासाठी नाकाच्या खाली वरच्या ओठावर लक्ष ठेवायचे. स्पर्श समजू लागला की लक्ष त्या भागातील एका छोटय़ा बिंदूवर ठेवायचे. स्वामी विवेकानंद यांनी या ध्यानाची खूप प्रशंसा केली आहे. विपश्यना शिबिरातील पहिले तीन दिवस असेच ध्यान केले जाते. त्याला आनापान म्हणतात. विद्यार्थ्यांनी असा नियमित सराव केला की त्यांची ग्रहणक्षमता वाढते.
"मनाची स्थिरता,
बुध्दीची कुशाग्रता ,
ताणाची दक्षता ,
तरच साधते एकाग्रता."
==============
✍️ श्री.सुंदरसिंग साबळे
गोंदिया
मो.9545254856
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(38)*
*माणसाची एकाग्रता*
मैनेला, तिचा आवाज;
मोराला, त्याचा पिसारा;
वाघाला, त्याची नखं,
तशी माणसाला - त्याची ‘एका ग्रता’!
सृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे. माणसाची तर अनेक गुणवैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी त्याला उच्च कोटीला नेणारं एक गुण-वैशिष्ट्य म्हणजे ‘एकाग्रता’.
एकाग्रतेमुळे आपल्या मनाची खूप शक्ती वाढते. ती आपल्याला अन्यत्र उपयोगी पडते. एकाग्रतेमुळे आपली कार्यक्षमताही वाढते आणि यश लौकर प्राप्त होतं.
सचिन तेंडुलकरसारखा जगविख्यात फलंदाज असं सांगतो की, “माझ्या यशात, एकाग्रतेचा मोठा वाटा आहे. मी फलंदाजी करताना मला समोरचा अंपायर, रनर किंवा अन्य कोणीही दिसत नाही. दिसतो तो फक्त गोलंदाजाचा हात व त्यातील चेंडू. त्यावरच माझं सगळं लक्ष एकाग्र झालेलं असतं.” असं त्याने एका मुलाखतीत संागितलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
थोडक्यात ‘यश’ आणि ‘एकाग्रता’ यांचं अतूट नातं आहे. कला-क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग-व्यापार, राजकारण, युध्द, अध्यात्म, ध्यान-साधना, इत्यादी सर्वच छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये, यशासाठी एकाग्र प्रयत्न आवश्यक असतात. एकाग्रतेचं महत्त्व हे असं सर्वव्यापी आहे.
परंतु, ‘एकाग्रता’ किंवा ‘ध्यान’ हा विषय आला की, ‘मन एकाग्र होत नाही’ , मनात अनेक विचार येतात’ अशीही अनेकांची तक्रार असते. तेव्हा, आपलं हे चंचल मन एकाग्र कसा करावं, एकाग्रतेतून शांती कशी मिळवावी हे समजून घेताना, प्रथम एकाग्रतेची व्याख्या पाहू.
एकाग्रतेच्या दोन व्याख्या सांगता येतील; त्या अशा -
- आपल्याला आवश्यक त्या गोष्टीकडे संपूर्णपणे लक्ष देण्याची व त्याचवेळी अन्य गोष्टींकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
- आपली भावनिक आणि बौध्दिक शक्ती एकवटून, ती इच्छित काळापर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टांवर, ध्येयावर स्थिर ठेवण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
मात्र, ध्यान आणि एकाग्रता यात एक मूलभूत फरक आहे. तो फरक ‘हेतूचा’ आहे. सामान्यत:, एकाग्रता ही बाह्य यशासाठी- म्हणजे दैनंदिन व्यवहारात यश मिळवण्यासाठी- उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. तर ध्यान ही आपल्या अंतर्मनाच्या शोधाची, तसंच शुध्दीचीही प्रक्रिया आहे. अशा या दोन्हीचा समन्वय साधून, ‘मनशक्ती प्रयोग केंद्राने’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच, एकाग्रता आणि मन:शांतीसाठी विविध पध्दती विकसित केलेल्या आहेत.
-अमित प्र. बडगे , नागपूर
(7030269143)
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(09) *एकाग्रतेसाठी -रामबाण AOL*
एकाग्रता ही नैसर्गिक असते. केवळ मनाला विश्रांती किंवा आराम देऊन एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढविणे शक्य आहे. मनाला आराम देण्यासाठी किंवा विश्रांती देण्यासाठी आपल्या वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात. परंतु तुम्ही निवडलेले साधन मनाची एकाग्रता टिकून ठेवेलच असे नाही. एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी ध्यानधारणाद्वारे मनाला विश्रांती देणे अत्यावश्यक आहे. या सोप्या प्रक्रियेचे बरेच फायदे आहेत आणि त्याच्या उप-उत्पादनांमध्ये सुधारित एकाग्रता, वर्धित बुद्धी आणि विचारांमधील स्पष्टता यांचा समावेश होते .
आपलं लक्ष एकाग्र का होत नाही, लक्षात का राहात नाही, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा.एकाग्रता सुधारण्यासाठी ध्यान आपण एखादा कलाकार, व्यावसायिक, विद्यार्थी किंवा खेळाडू असा, किंवा आपल्या क्षेत्रातील सर्वात कुशल असा. तरीही आपली कार्यक्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता ही शेवटी आपल्या एकाग्रतेच्या किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.
.बरेच लोक लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी खूप संघर्ष करतात. एकाग्रता भंग पावण्यासाठी खूप वेगवेगळी कारणे आहेत. उदा. थकवा, उदासीनता, काळजी, चिंता. लक्ष केंद्रित न होणे किंवा एकाग्रता नसणे ही प्रामुख्याने विखुरलेल्या आणि अस्वस्थ मनाची अवस्था आहे. आपण आपल्या मनास एकाग्र करण्याचे प्रशिक्षण कसे देऊ शकाल?
अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ध्यानधारणा करण्याचा नियमित सराव केल्याने लक्ष वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते. ध्यान आपल्याला वर्तमान काळात राहण्यास अधिक सक्षम करते. आपण बर्या्चदा ऐकतो की ध्यान करण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. परंतु, *गुरुदेव श्री श्री रविशंकर* म्हणतात की'" ध्यान करणे म्हणजे मन एकाग्र करणे नव्हे.तर सतर्कता आणि मनाचे लक्ष हे नियमित ध्यानसाधनेचे परिणाम आहेत". ध्यान आपल्याला फक्त एकाग्रता वाढविण्यासच नाही तर एकाग्रतेची शक्ती किंवा क्षमता वाढविण्यास मदत करते.
कुशल एकाग्रतेकरिता श्वासाचे निरीक्षण करणे.श्वास हा प्राणिमात्र किंवा जीवन शक्तीचा मुख्य स्रोत आहे. आपल्या श्वासाचे निरीक्षण करून आणि श्वासाबद्दल जागृत होऊन आपण शांततेचा अनुभव घेऊ शकता. प्रथमतः आपल्यासाठी एक शांत जागा निवडा. नंतर आपल्या श्वासाच्या नैसर्गिक लयीचे निरीक्षण करा. त्यानंतर ध्यान करा. आपण येथे दिलेल्या कोणत्याही प्रकारे ध्यान करून स्थिर आणि शांत मनाचा अनुभव घेऊ शकता.
. *प्राणायाम*- प्राणायामात प्रामुख्याने आपण श्वास आत घेतो, रोखतो, आणि सोडतो. आपली अल्प आणि दीर्घकालीन उर्जा वाढविण्यासाठी प्राणायाम हा एक मार्ग आहे. आपण ध्यान करणे सुरू करण्यापूर्वी काही मिनिटांसाठी नाडीशोधन प्राणायाम करू शकता. प्राणायाम मनाला आनंदी, एकाग्र आणि शांत ठेवण्यास मदत करतो.
. *सुदर्शन क्रिया* सुदर्शन क्रियेमध्ये श्वासाच्या विशिष्ट नैसर्गिक लयींचा समावेश आहे ज्यामुळे शरीर, मन आणि भावना समक्रमित होतात. सुदर्शन क्रिया हे श्वास घेण्याचे एक अतिशय शक्तिशाली पण खूप सोपे तंत्र मनातील तणाव दूर करून मन शांत आणि एकाग्र करण्यास मदत करते. संशोधनाद्वारे असे आढळले आहे की सुदर्शन क्रिया नियमित करणाऱ्या व्यक्तींना रोग प्रतिकारशक्ती, तग धरण्याची क्षमता आणि निरंतर उच्चऊर्जेची पातळी प्राप्त होते.कोरोणा च्या बचाव करण्यासाठी आपल्या शरीराची *रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास सुदर्शन क्रिया रामबाण* आहे. WHOने प्रमाणित केले आहे की एक सुदर्शन क्रिया-आपल्या डोक्यातील एक शेल ओपन करते.एवढी पावरफूल आहे सुदर्शन क्रिया.आँन लाईन सर्वानी सुदर्शन क्रिया शिकून स्वताःची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोणाला जवळ भटकू देऊ नका.
आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आपली आंतरिक उर्जाउत्तेजित करून समर्पण भावाने उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत करू शकते. AOLम्हणजेच आर्ट आँफ लिव्हिंग ,हँपीनेस प्रोग्राममध्ये योगासन सारख्या नैसर्गिक पद्धती आणि सुदर्शन क्रियेसारख्या श्वासोच्छवासाच्या क्रियांचा समावेश आहे. ह्यामुळे आपले भटकते मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि अर्थपूर्ण आणि इच्छित स्थळी जाण्यास मनाला नेण्यास मदत होते.मन वर्तमानकाळात राहतो भुत,भविष्याच्या विळख्यातून मुक्तता मिळते.जय गुरूदेव !
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*(४०) मनिषा पांढरे, सोलापूर*
*एकाग्रता*
*मुलाखतकार- सद्गुरू तुम्ही एवढे विद्वान आहात. किती पुस्तकांचे तुम्ही वाचन केले आहे.*
*सद्गुरू- अगदी अल्प...कारण मला एवढी काम आहेत की वाचन करायला मला वेळच मिळत नाही.*
*मुलाखतकार- मग आपणास एवढं ज्ञान येत तरी कुठून? अगदी संगणक युगातील सर्व शब्द, जगातील सर्व माहिती कुठून माहिती होते*
*सद्गुरू- तुमच्याच मेंदूतून*
*मुलाखतकार- म्हणजे?*
*सद्गुरू- मी जेव्हा एकाग्र होतो तेव्हा माझे मन तुमच्या मनात मिसळते आणि तुमच्याच ज्ञानावर आधारित मी उत्तरे देतो.*
युट्युबवर ईशा केंद्रावरील ही सर्व माहिती ऐकली आणि एकाग्रता किती महत्त्वाची आहे हे समजले.
मन एकाग्र केले तर जगातील सर्व गोष्टी सहज साध्य करता येतात.
स्वामी विवेकानंद हे एकपाठी होते. एकपाठी म्हणजे एकदा वाचलेले लक्षात राहणे....हे कधी शक्य होतं जेव्हा आपल्यात ही एकाग्रता निर्माण होते. ती सहजासहजी निर्माण होत नाही त्यासाठी आवर्जून प्रयत्नशील रहावे लागते.
एकाग्रता निर्माण करण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी लोक विविध ध्यानप्रकार करतात. त्यात विपषण्णा, सुदर्शन क्रिया, सिंहक्रिया, सहजयोग,भ्रामरी, त्राटक असे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक जरी क्रिया नियमितपणे केली तर एकाग्रता सहज शक्य आहे.
एकाग्रता आल्यास मन शांत होते. आनंदी बनते, सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो, आपण वर्तमानात जगतो.योग्य निर्णय क्षमता वाढीस लागते.
एकाग्रता वर आधारित स्वामी विवेकानंदांचे आणि स्वामी बुधानंद, सरश्री यांच्या पुस्तकाचे वाचन केल्यास आपल्याला याचे महत्त्व लक्षात येईल.एकाग्रता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपण ती मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न केला पाहिजे.
लेखिका,
मनिषा पांढरे, सोलापूर.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड नं 13
"साधूया मनाची एकाग्रता
होउ या मग जगज्जेता"
ज्याला मनाची एकाग्रता साधता येते त्याला प्रयत्नांची पराकाष्टा करून यश नक्कीच प्राप्त होते हे सर्वांनाच माहीत आहे.
विद्यार्थी असो वा व्यावसायिक वा नोकरदार प्रत्येकाला यश प्राप्ती साठी योग्य वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. प्रत्येक जण मन एकाग्र करू शकतो का ?आणि होत नसेल तर काय अडथळे आहेत मन एकाग्र होण्यास?
मन चंचल असल्यास , एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे डोक्यात असल्यास काही दुःखद प्रसंगामुळे व अडचणीमुळे मन अस्थिर असल्यास, काही मानसिक आजार असल्यास गतिमंद, मतिमंद असल्यास मन एकाग्र होऊ शकत नाही. आपल्याला असे वाटते की लहान मुले खूपच चंचल असतात त्यामुळे ती मन एकाग्र करू शकत नाही परंतु असे नक्कीच नसते कारण तुम्ही मोबाईलचे किंवा एखाद्या गोष्टीचे उदाहरण घ्या. जेव्हा तुम्ही मुलाला त्याच्या आवडीची गोष्ट करायला देता तेव्हा ते मन एकाग्र करून ती गोष्ट पूर्ण करते म्हणजेच लहान मुलांमध्ये चंचलता हे कारण हा मन एकाग्र करण्यासाठी बाधा होऊ शकत नाही. एखादा विषय किंवा काम आवडत नसल्यास त्या विषयात मन एकाग्र होऊ शकत नाही याचे उदाहरण म्हणजे गणित ,इंग्रजी या सारख्या विषयांचे उदाहरण देता येईल. काही मुलांना गणित आवडत नाही इंग्रजी आवडत नाही म्हणून त्यांना ते विषय कठीण जातात. त्या विषयातील अभ्यासात ते मन एकाग्र करू शकत नाहीत.
मोठ्या माणसांचे किंवा मुलांचेही उदाहरण याबाबत देता येईल आवडीचा व्यवसाय नसला किंवा आवडीच्या क्षेत्रात शिकण्याची संधी मिळाली नाही तर मन एकाग्र होत नाही व व्यवसाय किंवा अभ्यासात यश मिळत नाही. बऱ्याचदा एखादी मनाविरुद्ध अप्रिय घटना घडल्यास पण एकाग्र राहत नाही. विचारांचे मोहोळ मनात उठते व निर्णय घेता येत नाही. कधी कधी असे होते की विचार वेगळे चालू असतात व कृती मात्र वेगळीच घडत असते याला कारण म्हणजे मन एकाग्र झालेले नसते; त्यामुळेच अशी गडबड होते.
मन एकाग्र होण्यातील आणखी एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे संयम होय. मनावर ताबा किंवा संयम असेल तरच मन एकाग्र होऊ शकते अन्यथा नाही.
जगातील यशस्वी लोकांकडे पाहिल्यास असे लक्षात येईल की एकाग्रता असल्याने त्यांना यश मिळाले. उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर याचे देता येईल सचिन तेंडुलकर म्हणतो," माझ्या समोर कितीही गर्दी असो, प्रेक्षकांचा किती आरडाओरडा, असो परंतु; माझे लक्ष चेंडू आणि फक्त चेंडू वरच केंद्रित असते त्यामुळेच मला यश मिळते.
स्वामी विवेकानंद देखील यशासाठी एकाग्रतेला महत्त्वाचे म्हणत होते.
बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या यशाचे रहस्य देखील एकाग्रता हेच आहे. क्रीडा संस्कृती किंवा कला कोणतेही क्षेत्र असो तुम्ही जे कराल त्यात एकाग्रता असेल तर यश हमखास मिळते. लहान मुलांना जर एकाग्रतेची सवय अंगी लावता आली तर मोठेपणी देखील ते एकाग्रतेमुळे अनेक जण यश संपादन करू शकतात . एकाग्रता साधण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसे; ध्यान ध्यानधारणेमुळे मनामध्ये इतर विचार न येता आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी एकाग्रता साध्य करता येते. ध्यानासाठी तुम्ही शांत जागा निवडा ज्यामुळे तुमचे मन एकाग्र होईल.
लहान मुलांमध्ये एकाग्रता साधण्यासाठी छोटे-छोटे उपक्रम घेता येतील जसे घटनांचा क्रम लावणे, घटना जुळवून गोष्ट तयार करणे ,अपूर्ण गोष्ट पूर्ण तयार करणे. वस्तूंचे प्राण्यांचे वर्णन करणे .ओंकार म्हणणे अथवा गायत्री मंत्र वारंवार म्हणणे. योगासने करणे. सूर्यनमस्कार घालने यामुळे मनाची एकाग्रता साधता येते.
मोठ्या माणसांनादेखील मनाच्या एकाग्रतेसाठी काही गोष्टी करता येतील. मन जर तणावग्रस्त असेल तर अशावेळी मनाला थोडी विश्रांतीची गरज असते. थोडी विश्रांती मिळाली तर मन एकाग्र होऊ शकते मग मनाला विश्रांती कशी देता येईल तर आवडीचे गाणे ऐकणे, बागकाम करणे, किंवा रोजच्या कामात थोडासा बदल करणे. कामाचा ताण असेल तर मनाचा गोंधळ उडतो व एकाग्रता साधता येत नाही. जगात आता सगळीकडे सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे या स्पर्धेला लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच सामोरे जावे लागते .स्पर्धा ही थोडी हसत-खेळत अशा पद्धतीने आपण घेतली तर मनावर ताण येणार नाही व मन एकाग्र होईल.
'त्राटक' हे ध्यान केल्याने मनाची उत्तम एकाग्रता साधता येते तसेच
श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया
केल्यास उत्तम एकाग्रता साधता येते. आयुर्वेदात ब्राम्ही ,शंखपुष्पी अशा औषधांमुळे मनाची एकाग्रता साधता येते असे सांगितलेले आहे. सुगंधी फुले केसात माळणे अथवा शर्टाला लावल्यास त्या सुगंधाने मन प्रफुल्लित होते व मन एकाग्र होण्यास मदत होते.
मन एकाग्र असेल आजूबाजूला कितीही गोंधळ असेल गोंगाट असेल किंवा दुःखाची छाया असेल तरीदेखील आपल्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो व यशप्राप्ती शकतो.
सविता साळुंके, श्रीरामपूर
9604231747
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
*एकाग्रता*
जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर एकाग्रचित्ताने काम करणे आवश्यक आहे. यासाठी मन एकाग्र असने आवश्यक आहे. मन एकाग्र करायचे असेल तर योगसाधना करणे आवश्यक आहे. आपल्या देशात अनेक संत, महात्मे होऊन गेले. त्यानी जिवनाचे रहस्य शोधन्यासाठी त्यानी हिमालय, घनदाट जंगल अशा जागा का निवडले? याचे कारण येथे योगसाधना जागृत करता येऊ शकते. हे साध्य करण्यासाठी मन एकाग्र होणे आवश्यक आहे. याच माध्यमातून त्यानी आपल्या शरीरातील कुंडली जागृत करून सत्याचा शोध लावून जगाला खरा मार्ग दाखविला. उदा. गौतम बुद्ध.
आपले लक्ष साध्य करायचे असेल तर त्या लक्षावर मन एकाग्र असणे आवश्यक आहे...असाच प्रश्न अर्जुनाला विचाले असता त्याने फक्त पक्षाचा डोळा दिसत होता..ही आहे एकग्रता. याच शक्तीच्या आधारावर अजून अर्जुन सारखा योद्धा झाला नाही व होणार नाही.
लहाणपणी शालेय जीवनात आई,बाबा, गुरूजी सांगाचे 'मन लावून अभ्यास कर' यातच ही एकग्रता आहे. मन करारे चित्त, सर्व यशाचे कारण . येवढे महत्व आहे. एकग्रतेमुळे कितीही अवघड काम आपण सहज पणे व चांगले करू शकतो. म्हणून मोठे माणसे एखादे काम चुकले तर म्हणतात, कुठे लक्ष आहे. एकग्रता कमी झाली तर कामात चुका होतात व काम रटाळ असे होते...म्हणून आपले कोणतेही काम, धंदा, नोकरी यात जर एकग्रतेने काम केले तर आपले काम छाप पाडणारे असे होऊ शकते...म्हणून असे म्हणता येईल की, एकग्रता ही यशस्वी जिवनाची पायरी आहे.
बोईनवाड गुणवंत किशनराव
होटाळकर (नांदेड)
9921034211
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
एकाग्रता.
एकाग्रता (एक+अग्रता) चा अर्थ आहे कुठल्याही लक्ष /उद्देश्य प्राप्तिसाठी इतर कोणत्याही गोष्टीवर ध्यान न देता एकच गोष्टी वर ध्यान/ लक्ष केन्द्रित करणे. यश प्राप्तीचा
एकमात्र मार्ग आहे एकाग्रता. असे म्हणतात ना *अर्जुनाची
एकाग्रता अंगी असल्या शिवाय लक्ष्यवेध होत नाही*. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देणे. जळी काष्टी पाषाणी फक्त आपले लक्ष्यच दिसणे. ध्यानी-मनी-स्वप्नी फक्त त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी झटणे.
ही एकाग्रता सहज साध्य नाही. ही जाणीव पूर्वक प्रयत्ना ने साध्य करावी लागते . योग्य वेळी, योग्य त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला जमणं आणि त्या वेळीच आठवाव्यात आणि लक्षात राहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. शरीराला आणि मनाला त्याची सवय लावावी लागते. प्रयत्नांनी ते नक्कीच शक्य असते.
कित्येक हुशार विद्यार्थ्यांना त्याचा हुशारीच्या मानाने कमी मार्क मिळतात त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एकाग्रता नसणे. अनेकांना परीक्षेत मनासारखं यश मिळत नाही. यामागे अभ्यासात लक्ष लागत नाही, आठवत नाही, समोर पुस्तक असतं पण डोक्यात शिरत नाही अशी वेगवेगळी कारणं असतात. पण *मुख्य म्हणजे एकाग्रतेचा अभाव* .
*यावर उतारा म्हणजे एकाग्रता आणि स्मरणशक्ती*
आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा- हवे ते- हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. परीक्षेतील यश असो वा नोकरीत आपल्यावर सोपवले गेलेले काम असो.. या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या साह्य़ानं साध्य करता येतात. याचे कारण या दोन्ही क्षमतांमुळेच आपल्याला हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास येतो. *आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर या क्षमता विकसित करता येतात*.
सर्वात प्रथम आपलं लक्ष एकाग्र का होत नाही, लक्षात का राहात नाही, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा कधी कधी न आवडता विषय आईवडिलांच्या आग्रहाने घ्यावा लागतो , कधी काही मानसिक अस्वस्थता किंवा समस्या असते ,ह्या गोष्टीचे आकलन होणे आवश्यक आहे.
*एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी योगाभ्यास प्राणायाम आणि ध्यानधारणेचा निश्चितच उपयोग होतो. ज्याना ध्यान जमत नाही त्याने जप करावा*.
खालील काही उपाय लहान मोठे सर्वांना करता येतील. एकटय़ानं वा गटात स्मरणशक्तीचे खेळ खेळता येतील. अगदी साधे खेळ म्हणा प्रयत्न म्हणा ह्याने स्मरण शक्ती नक्कीच वाढवता येते जसे रोज काही गोष्टी आठवण्याचा सराव करणे उदा. शाळा किंवा ऑफिस ते घर या मार्गातील रस्ते, त्यावरच्या दुकानांच्या पाटय़ा, इमारतींचे आकार, विक्रेत्यांचे स्टॉल्स, इत्त्यादी त्यातील किती गोष्टी आठवतात ह्या कडे लक्ष देणे. ही यादी वाढवत जाणे . पुढे अजून जास्त कठीण गोष्टी एकाच वेळेस अनेक गोष्टी लक्षात ठेवायचा सराव करणे ,लिहून काढणे. पुढे
वाचलेलं पुस्तक, खेळलेला खेळ, ऐकलेलं भाषण, पाहिलेलं नाटक, चित्रपट, एखादं दृश्य. सहलीच्या वेळी वा सुट्टीत गावी अनुभवलेल्या गोष्टी अशी आठवता येण्याजोग्या गोष्टीं लिहाव्यात . लिहिल्याने स्मरणशक्ती जास्त विकसित होते
विद्यार्थ्यांनी वर्गात दोन तासिकांच्या मधल्या वेळेत, प्रवासात किंवा रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नव्या शिकलेल्या गोष्टी, शिक्षकांनी विचारलेले प्रश्न, वर्गात झालेली चर्चा असे आठवून बघाव्यात.
विविध प्रकारच्या भेंडय़ा लावणं, गोष्ट सांगणं, कविता सादर करणं, विशिष्ट ढंगात विनोद सांगणं, प्रश्नमंजूषा, सुडोकू, शाब्दिक कोडी सोडवल्याने स्मरणशक्तीला चालना मिळते आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे, त्यावर आपोआप आपलं लक्ष एकाग्र करायचीही सवय जडते.
*सकारात्मक सूचना आणि कल्पना करणे*
_ते दृश्य डोळ्यासमोर साकार करणे_
हा* अतिशय ऊपयुक्त आणि सिद्ध झालेला प्रयोग आहे*.
आपल्याला हवं ते यश आपण मिळवलंय, ध्येय साध्य केलंय याची दृश्यकल्पना करा (व्हिज्युलाइजेशन). परीक्षेसाठी छान तयारी करत असल्याचं आणि यशस्वी झाल्याची कल्पना तुमचा यशाचा मार्ग सुकर करतं.
एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच *स्वामी विकेकानंद एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ म्हणत*.
आजच्या स्पर्धात्मक युगात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्याची महत्त्वपूर्ण आयुधे आहेत *मेहनत , एकाग्रता आणि स्मरणशक्ती*
आजच्या काळात नवीन पिढी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिटेशनच्या मार्गाचा अवलंब करीत आहेत. ते थोडीफार ध्यानधारणा करु लागले आहेत, आणि आपल्या कार्यात ही यशस्वी होता हेत
डाॅ.वर्षा सगदेव ना
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(11) एकाग्रता यशाची गुरुकिल्ली
'एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे' असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रता हवीच.
एकाग्रता शब्द आठवला की माझ्या मनात लगेच अर्जुनाच्या गोष्टीशी तो जोडला जातो. एकाग्रतेच्या बाबतीत गुरु द्रोणांनी घेतलेल्या परीक्षेत फक्त अर्जुनच पास झाला. त्यांनी सर्वांना विचारले, "तुम्हाला झाडावर काय दिसत आहे"? एकट्या अर्जुनाने सांगितले, "मला फक्त तो डोळा दिसत आहे ज्याचा मला वेध घ्यायचा आहे". त्याला आजूबाजूचे काही दिसत नव्हते. जे साध्य आहे तेवढेच फक्त त्याला दिसत होते. अशी ही एकाग्रता.
कोणतेही काम करताना, ते पूर्ण होईपर्यंत दुसरा विचार मनात न येणे, इतके लक्षपूर्वक काम करणे त्याला एकाग्रता म्हणतात.
Magnifying glass सूर्यप्रकाशात धरल्यास सगळे विखुरलेले सूर्य किरण त्यातून जाऊन ते एका बिंदूत केंद्रित होतात. तसेच मनात अगणित विचार असले तरी मनाला खेचून आणून एकाच कामावर केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता. ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाची एकाग्रता.
आज ऑफिसमध्ये मला दिलेले कामाचे टार्गेट कसे पूर्ण होणार याची मला चिंता लागली होती. कारण आज माझे कामात लक्षच लागत नव्हते. घरातून निघताना आज नवर्याशी भांडून बाहेर पडले होते ना! कामात चुका पण खूप होत्या. म्हणून मी ठरवले की काम थोड्यावेळ थांबवायचे. एक कप कॉफी घेत शांत खुर्चीत बसायचे. मनाला अंधारून गोंजारून शांत करायचे आणि मग कामाला लागायचे. थोडा उशीर झाला तर होऊ दे. काम तरी व्यवस्थित होईल. म्हणजेच मी भांडणाच्या निमित्ताने आलेल्या सर्व नकारात्मक आलतूफालतू विचारांना मनाच्या बाहेर काढणार आणि फक्त लक्ष देणार आपल्या कामावर, म्हणजे एकाग्र होणार. योग्य वेळी योग्य गोष्टीवर मन केंद्रित करायची सवय मनाला लावलीच पाहिजे.
परीक्षेच्या आधी आपल्या महत्वाच्या नोट्स हरवतात. त्या आपण शोधत असतो. एकीकडे आई आपल्याला हाक मारत असते. पण आपल्याला ती हाक ऐकू पण येत नाही. इतके आपण शोधण्यात गर्क असतो. आपल्याला आजूबाजूचे भान हे राहत नाही, इतकी एकाग्रता त्या शोधण्यात असते. अशीच एकाग्रता हवी.
नोकरीसाठी माझा पहिलाच इंटरव्यू होता. अनुभव काहीच नव्हता इंटरव्यू देण्याचा. तरीही माझा इंटरव्यू खूप छान झाला. मला पाहिजे होती ती नोकरी मला मिळाली. कारण उघड होते. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी चांगल्याप्रकारे दिली होती. म्हणजेच अभ्यासात एकाग्रता होती. मी इतके सारे वाचले होते ते आयत्यावेळी आठवलेही होते. म्हणजे स्मरणशक्ती ने हि आपले काम बजावले होते.
मेंदूत इतक्या गोष्टी साठवलेल्या असतात .
पण ते हवे तेव्हा हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. एकाग्रतेने मुळे स्मरणशक्ती वाढते.
मला गणित विषय आवडत नाही. मला शिवणकाम आवडत नाही. आवडत नाही म्हणजे काय होते? त्या कामात किंवा गोष्टीत एकाग्रता होत नाही. त्यामुळे ते काम हवे तसे होत नाही. नावडता विषयात एकाग्रता न झाल्याने नीट आकलन होत नाही. त्यामुळे त्याला नावडता हे लेबल लावले जाते. एकाग्रतेची क्षमता आपल्याला वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वाढवता येते.
आपण आपल्या 'आत' डोकावून पाहिले पाहिजे. आपले मन चंचल किंवा अस्वस्थ का आहे याचा शोध घेतला पाहिजे. एकदा कारण मिळाले की उपाय योजता येतोच.
मन विचलित करणारी आजची प्रमुख कारणे म्हणजे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी.
एखाद्या वेळेस आपण जे काम करणार असतो त्यासंबंधी आपल्याला जास्त माहिती नसते. त्या बाबतीत आपल्याकडे तसे कौशल्य नसते. असे कारण समजून घेतले पाहिजे म्हणजे विचलन दूर करून एकाग्रता करता येईल.
कामाची पूर्वतयारी केलेली असली म्हणजे प्रत्यक्ष काम करताना विचलन होणार नाही. योग्य वेळी मनाला, बुद्धीला विश्रांती दिली तर पुढचे काम दुप्पट वेगाने होते. एखाद्या वेळेस मन एकाग्र होत नसेल तर संगीत ऐकणे हा एक चांगला उपाय असू शकतो.
आपल्याला समोर कामाचा मोठा डोंगर दिसला की असे वाटते, बाप रे! एवढे काम कसे होणार? पण त्याच कामाचे छोटे छोटे तुकडे केले, तर एकाग्रता करण्यास सोपे जाते. तसेच कामाच्या वेळेच्या बाबतीतही. तुम्हाला कामाचा शेवट दिसत असेल तर कामाच्या वेळेत एकाग्रता चांगली होते. त्यामुळे इतक्या वेळात मी काम संपवले पाहिजे, असे ठरवता आले पाहिजे.
कुठलीही गोष्ट काम करताना इतरांपेक्षा आधी म्हणजे लवकर सुरू करा. म्हणजे कामाचे नियोजन व्यवस्थित होते. त्यामुळे घाई होत नाही. मन आणखी दुसरीकडे भरकटत नाही.
मन एकाग्र झाले की कुठलेही काम करण्यास ऊर्जा चांगली मिळते. मग यश ठरलेलेच आहे.
एकाग्रतेसाठी ध्यान करावे. त्यामुळे भरकटलेल्या मनाला, अडथळे बाजूस सारून एकाग्र करायला मदत करते. त्यामुळे प्रायोजित काम करण्यात मन सक्षम बनते. ध्यान आपल्याला वर्तमान काळात राहण्यास अधिक समक्ष करते. सतर्कता ही ध्यानामुळे येते.
आपले जे ध्येय आहे त्याला आपण visualise केले पाहिजे. प्रत्यक्ष डोळ्यासमोर सारखे ठेवले तर ध्यानी- मनी- स्वप्नी तेच राहते. त्यामुळे त्या कामातील खाचाखोचा समजतात. त्यातील अडचणींवर मात कशी करता येईल याची उत्तरेही त्यात सापडतात. हे सर्व पूर्ण एकाग्रतेने मुळे घडते.
आजूबाजूला असणाऱ्या असंख्य विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करणारी एकाग्रतेची किल्ली आपल्या जवळ असली तर यश आपलेच.
शुभदा दीक्षित (11)
पुणे
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
सौ.भारती सावंत
एकाग्रता
एकांत मिळाल्याशिवाय कधी
साधत नाही मनाची एकाग्रता
धकाधकीच्या जीवनात रोजच
दैनंदिन कामाची होते व्यस्तता
पूर्वी तपश्चर्या करण्यासाठी ऋषीमुनी हिमालयात किंवा रानावनात बसत. मनाची एकाग्रता असेल तर चिंतन-मनन नि जपजाप्य संकल्प पूर्ण होतात .शहरात किंवा वसाहतीत मन कधीच एकाग्र होऊ शकत नाही. खरे तर आपले मन खूप चंचल असते. त्यास एका जागेवर बसवणे येरागबाळ्याचे काम नाही. कारण जर मनाची चंचलता दूर झाली तर आपले तन मन एकाग्र होते. म्हणजेच एकाग्रता साधण्यासाठी जीवाशिवाचे मिलन होणे आवश्यक आहे.ज्ञानेश्वर, चक्रधर, निवृत्तीनाथ आणि चांगदेव अशा कितीतरी संत महंतांनी आपल्या इंद्रियांवरील संयमाने मनाची एकाग्रता साधल्याचे आपणास वाचावयास मिळाले आहे. त्यामुळेच वयाच्या पंधराव्या वर्षी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मनुष्य एका कामात व्यस्त असताना दुसरे काम करू शकत नाही. नाहीतर 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी स्थिती होऊन बसते. नि कोणतेच काम धड न होता त्या कामाचे उचित फलित मिळत नाही.
त्यामुळे ज्ञानी किंवा अभ्यासक प्रथम एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करतात. जीवनात काही साध्य करून घ्यायचे असेल तर इंद्रियांवरील नियंत्रण आवश्यक.चंचल मनाला आवर घालावा. काही मुले दिवसा झोपतात नि रात्रीच्या नीरव शांततेत त्यांचा अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचे मन त्यांच्या काबूत राहते आणि मनाची एकाग्रता लागते. काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते रात्री अभ्यास केल्याने चांगले फळ प्राप्त होते. परंतु झोपेवर नियंत्रण ठेवावे लागते आणि शांत वातावरणात अभ्यासही छान होतो.सुप्रसिद्ध कादंबरीकार किंवा लेखक आपले लेखन करण्यासाठी पहाटेची वेळ निवडतात. प्राणायाम, योगासनेही सकाळचा गजबजाट चालू होण्यापूर्वी केला जातो. त्यामुळे मनाची एकाग्रता असेल तर त्याचे फळ चांगले मिळते.बुद्धी आणि मन यांची सांगड घालता आली की आपणास कामाचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे आपण चांगले कार्य करण्यासाठी सूर्योदयापूर्वीचीच वेळ निवडतो. एकांतात विचारांची साखळी गुंफली जाते. दुसऱ्या कडून व्यत्यय येत नसेल तर आपल्या मनचक्षूंना आपण जागे ठेवतो नि नवनव्या कल्पनांचा उदय होतो. त्यामुळे मन नि शरीर यांचा मेळ लागण्यासाठी शांत वातावरण असणे फायद्याचे. याच्यामुळे आपल्या हातून सत्कार्यही घडत असते. आपण आपल्या कामात तरबेज होतो. साफल्य मिळते नि उचित परिणिती मिळते. आपल्या मनासोबत श्वासावर नियंत्रण ठेवू शकतो.
विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवत असताना बाहेरून आवाज किंवा काही व्यत्यय असेल तर मनाची एकाग्रता लागत नाही आणि कितीही अभ्यास केलेला असला तरी आपली प्रश्नपत्रिका सोडवण्यात तो सफल होऊ शकत नाही. त्यामुळे जीवनात यशाच्या पायर्या चढण्यासाठी मन एकाग्र असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले उपनिषदे, वेद, शास्त्र, पुराण आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. आपण त्यांचे आकलन करू शकतो. कार्यात यशाची पायरी चढायची असेल तर मनाला प्रथम एकाग्र करणे महत्त्वाचे. नाही तर बहिणाबाई चौधरींच्या कवितेप्रमाणे
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर अशी अवस्था होऊन जाते.
सौ.भारती सावंत
मुंबई
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
➖➖➖➖ ➖➖
भरकटणारे मनं आणि गमावलेली एकाग्रता
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
एखाद्या विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे .मनाने सतत त्या ध्येयाचाच ध्यास धरणे .आणि बुध्दी त्या सतत ध्येयाचेच चित्र रेखाटने . ही आहे खरी एकाग्रता. बुध्दी हा मानवाला मिळालेला तिसरा नेत्र आहे. त्याच्या सहाय्याने आपण आपले ध्येय स्पष्टपणे पाहू शकतो . आधि एखादं ध्येय मनात येत मग , त्याचं चित्रीकरण करण्याचं काम बुध्दी करत असते .
मनं आणि बुध्दी हे मानवाला मिळालेले सूक्ष्म अवयव आहे .
त्यांना आजपर्यंत तरी कोणी पाहु शकलं नाही . कोणीही ठामपणे त्यां अवयवांची जागा शरीरात कोठे आहे हे सांगू शकत नाही . त्याबद्दल अनेकांची भिन्न भिन्न मत आहेत ..
जरी मन आणि बुद्धी डोळ्यांनी पाहू शकत नाही तरी आपण आपल्यात असल्याचे अनुभवतो.
कोणी म्हणतं बुध्दी मेंदू मध्ये असते पण मेंदूचे ऑपरेशन करताना दिसते का? कोणी म्हणतं मन हृदयात असतं पण हार्ट सर्जरी करताना कोणाला मन सापडले का ?
समजा , एका लहान मुलाने एक व्हिडिओ गेम पाहिला आणि त्याला तो खूप आवडला, तेव्हापासून त्याचं मन सतत त्या व्हिडिओ गेमचाच ध्यास धरेल तो शरिरानं शाळेत असेल किंवा कूठे ही असेल पण मन मात्र व्हिडिओ गेम जवळच असेल . त्याच्या बुध्दी सतत त्या गेमचंच चित्र रेखाटन करत राहिलं जो पर्यंत तो व्हिडिओ गेम त्या मुलाला प्राप्त होत नाही ..
याचाच अर्थ तो व्हिडिओ गेम मिळवणे हे त्याचे प्रमुख ध्येय बनेल मन आणि बुद्धीने तो सतत त्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलेले असेल . अशाप्रकारे जर एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर त्याच्या मन आणि बुद्धीचा एकचं ध्यास असला पाहिजे अभ्यास आणि अभ्यास मन आणि बुद्धी इकडे तिकडे भरकटली तर तिथे एकाग्रता असू शकत नाही .
सर्वत्र तनाव आणि चिंता यांचे प्रमाण झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे . आजकाल लहान मुले सूध्दा तनाव ग्रस्त दिसून येतात , लहानसहान कारणांवरून भांडणं करतात चिडचिड करतात
कारण घरात नेहमीच लहान मोठ्या कारणांमुळे सतत होणारे वाद आणि त्यामुळे बनलेले घरातील तणावग्रस्त वातावरण , घरांतील आपसी संबंधांमध्ये प्रेमाचा अभाव अशा वातावरणात मन भरकटणे स्वाभाविकच आहे .
घरातील तणावग्रस्त वातावरणाचा परिणाम लहान थोरांच्या मनावर कमी जास्त प्रमाणात दिसून येतो .
जर मनात एखाद्या बद्दल राग असेल तरं मन सतत त्याला धडा शिकविण्याचाच विचार करत राहिल अशा परिस्थितीत मन दूसरी कडे एकाग्र होऊ शकत नाही .
ज्या मनात इतरांबद्दल इर्षा आणि तिरस्काराची भावना असेल तर ते मन एकाग्र होऊ शकत नाही .
काही पालक आपल्या पाल्याची तुलना सतत इतर मुलांशी करीत असता . त्या पालकांना जरा सुध्दा कल्पना नसते की ,आपण आपल्या पाल्याचे मनोबल कमजोर करीत आहोत . आपल्या मुलांना सतत इतर मुलांचे उदाहरणे देऊन सतत त्यांना टोचून बोलणे अशाने लहान मुलांचे मनोबल कमजोर होत जाते अशी मुले अभ्यास एकाग्रतेने करु शकत नाही.
अशी मुले अभ्यास व ईतर ठिकाणी मागे पडतात ..
लहान वयात जर मनोबल कमजोर झाले तर ती मुलं मोठेपणी आत्मविश्वासाच्या अभावानेच सर्वच ठिकाणी मागे पडतात.
आपल्या पाल्याला मिळालेल्या लहान लहान यशाचे कौतुक करा. त्याला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करा. त्याच्या कडून जर काही चुक झाली तर त्या मागचं कारण प्रेमाने शोधा त्यांना रागवू मारु नका यामुळे मुलं पुन्हा पुन्हा तिच चुक करतात. इतरांशी त्याचि तूलना करुन त्याला हिणवू नका. त्याला समजून घ्या . त्याला त्यावेळी जास्त प्रेमाची गरज असते . अशावेळी जर त्यांना पालकांकडून प्रेम नाही मिळालं तर मग मुलं तेच प्रेम मित्र मैत्रिणींमध्ये शोधतात . मग पालकांशी मोकळेपणाने संवाद करणे टाळतात आणि पालकांचे ऐकत नाहीत . मित्र मैत्रिणींचा सल्ला त्यांना योग्य वाटू लागतो .. दैवयोगाने जर मित्र आणि मैत्रिणींची संगत चांगली असेल तर ठिक नाहीतर अशी मूलं वाईट संगतीत राहून आपलेच नुकसान करुन घेतात .
टी.व्हि ., इंटरनेट आणि मोबाईल ही साधने अशी आहेत कि ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो .पण त्याचा अति गैर वापरही होऊ शकतो . जर आपण त्याचा अति वापर केला तर आपलं मन आणि बुद्धी इतरत्र भरकटू लागते. जरं आपणच सतत यातच गुंतून गेलो तर आपल्या पाल्याला कुठल्या तोंडाने सांगणार या साधणांपासुन दूर रहा . आधि आपल्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले पाहिजे तरच तुमचे पाल्य तुमचे अनुकरण करेल ..
मन आणि बुध्दीला अस्थिर करण्यात आल्या साधनांचा ही मोठा वाटा आहे .
काहींना लहानपणापासूनच संघर्षमयी जीवन वाट्याला आले असते . त्यांच्या मार्गात नेहमीच काटें पसरलेले असतात ..पण दृढता आणि संयम यांच्या जोरावर ते पुढील आयुष्यात यश संपादन करतात .
"जर आयुष्यात उंच शिखरे गाठायची असतील तर निश्चय दृढ हवा जिथे निश्चय दृढ तिथे ध्येय स्पष्ट असते ."
"मगं मार्गात कितीही काटें असले तरी यश आपलेच असते ."
ज्या गोष्टी एकाग्रतेला बाधक ठरतात त्या टाळायला हव्यात ..
राग ,व्देष ,मत्सर यांनी आपला स्वभाव चिडचिडा होत जातो आणि आपली बुद्धीत ग्रहण करण्याची क्षमता कमी होत जाते.
म्हणून नेहमी सरळ स्वभावी राहणं हे हितकारक ठरते .जे सरळ स्वभावी असतात त्यांचं मन इतरत्र भटकण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते...
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
7744880087
➖➖➖➖➖➖➖➖
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(37)
*एकाग्रता *
'एकाग्रता ' या शब्दातच अर्थ दडलेला आहे. सरळ अर्थ लावायचा म्हटलं तर फक्त एकाच गोष्टीवर अग्र म्हणजे प्रथम किंवा प्राधान्य देणे. आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अनेक गोष्टी होत असतात. एकावेळी एकाच गोष्टीवर केंद्र बिंदु ठरवून लक्ष पुरवणे म्हणजे एकाग्रता होय.
प्रत्येकाच्या जीवनात एकाग्रतेला महत्व असतो. आपण बघतो की अनेकदा वारंवार वाचून सुद्धा एखादी गोष्ट लक्षात राहत नाही किंवा काही कालावधीनंतर आठवत नाही. त्याचे अनेक कारण असू शकतात पण सर्वात मोठे कारण आहे एकाग्रता नसणे.
एकाग्रता ही फक्त बोलण्याने, वाचल्याने किंवा सांगितल्याने येणार नाही. त्याकरिता प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनातील काहीवेळ स्वतःला द्यावा लागेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळे एवढे व्यस्त आहेत की निर्जीव मशीन प्रमाणे यंत्रवत रात्रंदिन कामाच्या मागे धावत असतात.
एकाग्रता नसण्याचे दुसरे कारण म्हणजे अनुवांशिकता सुद्धा असू शकते. एकाग्रता नाही हे आपण विविध लक्षणांवरून समजू शकतो. एखादी गोष्ट वारंवार नजरेपुढे येणे, कितीही केलं तरी कामात लक्ष न लागणे, लवकरच विसरणे, इत्यादी. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येते की मन एकाग्र नाही आणि एकाग्रतेचा अभावामुळे हे सर्व होत आहे.
एकाग्रता आणण्यासाठी विविध मार्ग आहेत. मेडीटेशन, योग, ध्यानधारणा, विपश्यना अशासारखे अनेक उपायांनी जीवनात मन एकाग्र करून आनंदी जीवनजगता येईल. हे सर्व करण्याकरिता मनावर संयम किंवा ताबा मिळवणे हे महत्वाचे आहे. मन हे विचलित असते. कधी कुणाकडे भरकटेल हे सांगता येत नाही. स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी एकांत आवश्यक असतो. एकांतात सर्व गोष्टींकडून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. आपण नियमित श्वासोच्छ्वास करित असतो तेव्हा नाकाद्वारे शरिरात येणारा श्वास व बाहेर सोडतो तो उच्छ्वास यावर लक्ष केंद्रित करावे. नियमित सरावामुळे हे शक्य होऊ शकते. आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या व जीवनात होणाऱ्या गोष्टींकडून लक्ष बाजुला सारून फक्त श्वासावर नियंत्रण करता येईल. अशाप्रकारे योगसाधना, विपश्यना हे सुद्धा मिळतेजुळते आहे. यामुळे मनाची विचलित होण्याच्या क्रियेवर ताबा मिळवता येईल व कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येईल. लक्ष केंद्रित करता आले म्हणजेच एकाग्रता आली.
एकाग्रता असली की वाचलेला भाग चटकन लक्षात येतो. विस्मरण होत नाही, लक्षकेंद्रित होतो आणि या सर्वांचा फायदा व्यक्ति ला आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो. म्हणूनच म्हणतात की 'मनाची एकाग्रता ही यशाची पहिली व महत्वपूर्ण पायरी आहे.'
एकाग्रता वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ति परत्वे छंद सुद्धा उपयोगी पडतात. उदा. शब्दकोडे सोडवणे, सुडोकू, मार्गशोधणे, सुंदर हस्ताक्षर काढणे,स्मरणशक्ती वाढवणारे खेळ, वाचलेला भाग किंवा ऐकलेली गोष्ट लिहुन काढणे असे अनेक प्रकार आहेत जे एकाग्रता वाढविण्यात मदत करतात.
एकाग्रता फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर सर्वांनाच आवश्यक आहे. प्रत्येकाला एकावेळी अनेक कामे करावी लागतात तेव्हा मनाची एकाग्रता ही महत्वाची आहे. ज्याप्रमाणे महाभारतातील अर्जुनाला फक्त त्याचं ध्येय म्हणजे फक्त माशाचा डोळाच दिसत होता. मन हे चंचल आहे व ज्याने मनावर ताबा मिळवला व एकाग्रता आली त्याला जीवनात यशस्वी व आनंदी जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करता येते.
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
एकाग्रता...
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
वाकदकर (17)
'एकाग्रता ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे' असे स्वामी विवेकानंद म्हणतात. मन एकाग्र असताना केलेल काम हे यशस्वी होतेचं असा कित्येकांचा दावा खरा ठरलेला आहे. याचा अर्थ आपल कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी मन एकाग्र असणे गरजेचे आहे., परंतु ज्या मनाच्या बाबतीमध्ये विषय लागू करतो ते मन नेमकं आहे कसं याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. प्राणी यासाठीच अनेक वर्षापासून मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र निर्माण झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मानवी मनाचा अभ्यास त्यानंतर मानवी वर्तनाचा अभ्यास आणि पुन्हा मानवी मनाचा अभ्यास याच पद्धतीने आज मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हीच पद्धत अस्तित्वात आहे.
बुद्धी आणि मन
चित्त अहंकार हन
हे चतुरविध चिन्ह
जान अंतकरणाचे...
असं भावार्थदीपिका या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर सांगतात. यावरून अंतकरण चतुर्थ यामध्ये बुद्धी,मन ,चित्त आणि अहंकार यातून माणसाचा अंतकरण बनते असे स्पष्ट होत. या मनाच्या बाबतीमध्ये अनेक संतांनी, शास्त्रांनी आणि साहित्यिकांनी वेगवेगळे चिंतन मांडलेल आहे.
काय काय करितो या मना .
परी न आवरी नारायणा..
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येते पिकावर.
याचा अर्थ माणसाचं मन हे अतिशय चंचल आहे.या मनाला एका ठिकाणी स्थिर राहणे म्हणजेच मनाची एकाग्रता जागृत करणे हे होय. आणि या मनाला एकाग्र करणं हा अभ्यासाने साध्य होणारा विषय आहे.
you born to blossom या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी माणसाला आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी तीन गोष्टी सांगितलेल्या आहे. या पैकी पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करणे, दुसरी चांगले वाचन करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि नीस्वार्थी अर्थात परमार्थी जीवन जगणे होय.
यामध्ये मनाला प्रसन्न करण्यासाठी माणसाच्या मनाची एकाग्रता वाढवण्याकरिता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी प्रार्थना सुंदर उपाय सांगितलेला आहे. प्रार्थना म्हणजे कुठलाही कर्मकांड नसून माणसाच्या मनाला एका ठिकाणी चांगलं वळण लावण्यासाठी शिस्त देण्याचा तो मार्ग आहे.त्यामानाने चांगला विचार केल्यास मनामध्ये चांगल्या गोष्टींची निर्मिती होते आणि त्यानुसारच मन कृत्य करायला लागतं आणि मग मनाने ठरवलेल्या गोष्टीवर मन केंद्रित होतं आणि मग मनाची एकाग्रता वाढते.
मौन,जप ,प्राणायाम ,ध्यान, धारणा यातून सुद्धा मनाची एकग्रता वाढवता येते.
आपल्यासमोर असलेले ध्येयहे निश्चित केल्यास आपले म्हणून त्याच गोष्टीवर केंद्रित होते आणि मग त्यातून मनाची एकाग्रता वाढायला मदत होते. महाभारतातील एक कथेमध्ये द्रोणाचार्य अर्जुनाला विचारतात की तुला त्या झाडावर काय दिसते? त्यावेळी अर्जुनाचे चारही भावंडे वेगळे उत्तर देतात, परंतु अर्जुन मात्र मला त्या झाडावर वेध घेत असताना पक्ष्याचा डोळा दिसतो हेच उत्तर देतो, आणि खऱ्या अर्थाने तो इतिहासप्रसिद्ध धनुर्धारी बनतो.याचा अर्थ आपल्याला जे काम पूर्ण करायचे आहे त्याच कामावर सर्व शक्ती केंद्रित करणे म्हणजेच मनाची एकाग्रता वाढवणे होईल.
मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी आणखी काही गोष्टी करता येईल ते खालील प्रमाणे आहे:-
नियंत्रित जीवन शैलीचा वापर करून मनाची एकाग्रता वाढवतात.करत असलेले काम नियमितपणे वेळच्यावेळी केल्यास मन शांत होते आणि त्यातून मनाला समाधान मिळत जाते आणि मनाची एकाग्रता वाढते.यातून चांगल्या सवयींची रुजवणूक होते मनाला चिडचिडेपणा करण्याची गरज राहत नाही अतिशय समाधान पूर्वक दिलेले काम व्यवस्थित पूर्ण होऊन एकाग्रता वाढते.
योग्य विचार-वाचन जसे मनाचे खाद्य आहे तो योग्य विचार करणे हेसुद्धा मनाचे खाद्य आहे,म्हणून चांगल्या वाचनातून चांगले विचार घडत असतात.चांगल्या विचारातून चांगली कृती होते आणि मन समाधानी,आनंदी होते त्यातून माणसाची एकाग्रता वाढते.
व्यवस्थित झोप आणि व्यायाम हीसुद्धा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी कारणीभूत घटक आहेत.
मेडिटेशन आणि प्रार्थना केल्याने मनाची एकाग्रता वाढवता येईल.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
(4) एकाग्रता
मनुष्य हा समूहशिल प्राणी आहे. समूहाने राहणे हे मनुष्य जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.
समूहातील प्रत्येक घटकांचे आवडी-निवडी , सवयी, गरजा सोडविणे हे त्या समूहातील प्रत्येकाने स्वतःचे काम समजून सोडवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
.पूर्वी पासून अदिमानवा पासून हे चालत आलेलं आहे. नंतर पुढे बदल होत गेले आणि मानव टोळक्या टोळक्याने राहू लागला वस्तीकरून राहू लागला.
तदनंतर पुन्हा मानवाच्या आणखी गरजा वाढल्या, अन्न पूर्वी कच्चे खाल्ले जायचे परंतू नंतर भाजून किंवा शिजवून खाणं पद्धत आली, वस्त्र, निवारा ह्या गरजा वाढल्या आणि त्यांना मूलभूत गरजा म्हणून पाहण्यात येऊ लागले. जसा जसा मानवाचा विकास होत गेला तसा तसा तो बदलत गेला. पुढे मूलभूत गरजा मध्ये आणखी ही एक गरज मानवाची वाढली. आजच्या परिस्थितीतील नाही. पुरातन काळापासूनच ही गरज होती असे म्हणावे लागेल कारण उल्लेख इतिहासात आढळतो आहे ती गरज म्हणजे शिक्षण होय.
शिक्षण म्हटलं कि लक्ष अवधान मेहनत या बाबी आल्या आणि त्या सर्व बाबी मन, चित्त या वर अवलंबून असतात आणि चित्त हे एकाग्रतेवर अधारित असते. चित्त, मन जर स्थिर नसेल तर शिक्षण घेणं सोडा काहीच आत्मसात होऊ शकत नाही.
मुळात शिक्षण ही प्रक्रिया मनावरच चालते म्हणजे शिक्षण मनाला द्यावे लागते. शरीराला देण्यात येणारे शिक्षण हे वेगळे असते. आणि मनाला मिळणारे संस्कार हे शिक्षण असते म्हणून मन एकाग्र करावे लागते. लक्ष द्यावे लागते निट ऐकावे लागते, पहावे लागते. विश्व वंदनीय माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहित असताना किंबहूना सांगताना समस्त श्रोत्यांना विनंती करतात " तरी अवधान एक बार दिजे! मग सर्व सुखाशी पाञ होईजे! हे प्रतिज्ञोत्तर माझे! उघड ऐका!!
तुम्ही फक्त लक्ष एक वेळ दया, मी तुम्हाला निश्चित फळ देईन. अशी प्रतिज्ञा पूर्वक विनवणी करतात, त्या श्रोत्यांना एकाग्रतेने विवेचन ऐकवितात.
जगातील सर्व एकाग्रतेने विद्या प्राप्त केलेल्या विद्यार्थी मंडळींची उदाहरणे आपल्याला ज्ञात आहेत महाभारत काळात अर्जुन महाधनूर्धर बनला कारण एकाग्रता एकदा गुरू द्रोण सर्व शिष्य गण घेऊन एका वनांत जातात.
तेथे सर्वाची परीक्षा घेण्यासाठी गुरू सर्वांना बोलावतात, एका झाडावर एक पक्षी बसलेला असतो त्या पक्षाचा डोळा लक्ष सांग तात आणि लगेच प्रत्येकाला आळी पाळीने बोलावतात . आणि विचारातात बोल शिष्या तुला काय दिसते. सर्व जन सांगतात झाड, पक्षी असे गुरू सर्वांना अप्राञ ठरवतात मग अर्जूनाला बोलावतात आणि विचारतात बोल शिष्या तुला काय दिसते तेव्हा अर्जून उदगारतो मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. कारण झाड आणि पक्षी माझं लक्ष नाही लक्ष फक्त डोळा आहे. तेव्हा अर्जून पाञ ठरतो कारण एकाग्रता हे होते.
गुरू द्रोणानी एकलव्याला शिक्षण देण्यास नकार दिल्या नंतर त्याने गुरू द्रोणाचा चिखल मातीचा पुतळा तयार करून एकाग्रता पूर्वक लक्ष दिले आणि विद्या प्राप्त केली. येथे ही एकाग्रता महत्त्वाचा भाग ठरली.
एकाग्रता मानवी मनाची मानसिकता आहे एखाद्याचे मन जर एकाग्रतेत रमले नाही तर सर्व गोष्टी शून्य ठरतात
सांगेन एक छोटीशी गोष्ट एकाग्रता किती महत्त्वाचा घटक आहे ते एकदा एका महान गुरू कडे शंभर विद्यार्थी विद्या मिळविण्यासाठी एका नदी काठी आश्रमात असतात गुरू त्यांना नविन नविन गोष्टी तत्व सांगत असतात. आणि असेच एक दिवस गुरू त्यांना नदीवर घेऊन जातात , जाताना बरोबर एक दुलडी जी वाळलेल्या बाम्बू पासून बनवलेली असते. ती खूप सछिद्र असते आणि ती भरून जो विद्यार्थी आश्रमात पाणी आणिन तो विद्यार्थी पास किंवा पाञ असे गुरूजीनी सांगितले.
विद्यार्थी एकमेकांशी बोलू लागले, गुरूजी बद्दल उलट चर्चा करू लागले. " गुरूजी हे शक्य नाही, काही तरी चुकतंय " तुम्ही निट दुसरा प्रश्न द्या शंभर पैकी नव्याण्णव विद्यार्थ्यानी हेच उत्तर दिले. एक जन माञ हे एकाग्रतेने ऐकत होता गुरू कडे पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता सर्व समजून घेऊन त्या पध्दतीने क्रिया करू लागला. आणि शेवटी आश्रमात पाणी घेऊन गेला. कोण होता तो एकाग्र लक्ष देणारा कुशाग्र विद्यार्थी तर ते होते भारतरत्न स्व.माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम साहेब.
त्या दुलडीला त्यांनी लाखो वेळेस पाण्यात खालीवर केले खूप वेळ मेहनत घेतली आणि गुरूचा शब्द खरा बनविला
म्हणजे एकाग्रतेने लक्ष दिले आणि तेच केले आणि अजरामर बनले थोडक्यात एकाग्रता ही मानवाची अतिशय महत्वाची गोष्ट आहे
भागवत गर्कळ बीड
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
07 लेख
एकाग्रता
" अरे,लक्ष कुठे आहे तुझं ? इकडे लक्ष दे "
अशी वाक्ये आपल्याला सगळीकडेच ऐकायला मिळतात. या वाक्यावरून विचारणाऱ्याला हे एकच सांगायचे असते की तू तुझं लक्ष एकाग्र कर. मानवाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हा गुण आवश्यक आहे. एकाग्रता म्हणजे आपण कोणतेही काम करत असताना आपले पूर्ण लक्ष त्या कामांमध्ये देणे होय.त्या कामात गुंगून जाणे होय. एकाग्रता च्या विरोधी चंचलता हा शब्द आहे. यशस्वी व्यक्तींचा जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्या येते की या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना कोणतीही गोष्ट एकाग्रपणेच केलेली आहे. अभ्यास करत असताना एकाग्रचित्ताने केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. कारण त्या वेळेला आपले पूर्ण लक्ष त्या अभ्यासामध्ये लागून राहिलेली असते. विद्यार्थी जीवनामध्ये एकाग्रतेला फार महत्त्व आहे.
आज सगळीकडे आपण पाहतो की भौतिक सुखाचा सुळसुळाट झालेला आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे प्रत्येकाच्या घरी टीव्ही , मोबाइल यासारखे इलेक्ट्रॉनिक साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना आपले लक्ष अभ्यासात केंद्रित करणेस, एकाग्र करणे कठीण होऊन बसले आहे. कारण ह्या बाह्य आकर्षणाचा परिणाम लहान मुलांच्या मेंदुवर लवकर होतो व बाह्य आकर्षनेच मुलांच्या मेंदूचा ताबा मिळवतात. त्यामुळेच त्यांना अभ्यासात मन एकाग्र करणे जमत नाही.
आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला असलेल्या सर्व नोकरदारांना सुद्धा आपले मन एकाग्र करणे कठीण होऊन बसले आहे. कारण त्यांना कामाचा व्यापच इतका आहे की बाकीचा विचार करायला त्यांच्या मेंदूला वेळच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थी असो किंवा नोकरदार असो ते वैतागून जातात. कामाची विभागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मेंदूला पण ताण येतो. त्यामुळे चिडचिड वाढते, कलह वाढतो, तणाव वाढतो. म्हणून कोणत्याही गोष्टींमध्ये एकाग्र चित्ताची खूप आवश्यकता आहे.
जे काम नेमून दिलेले आहे ते काम तर आपल्याला केले पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता आपण एकाग्रचित्तही राहिले पाहिजे.मग आपण हे कसे काय केले पाहिजे? यावर काही उपाय आहे का? तर यावर उत्तर असे आहे की हो आहे, यावर उपाय आहे. आणि तो म्हणजे मनाची एकाग्रता साधण्याचा सर्वात उत्तम साधन म्हणजे योगासन व प्राणायाम करणे होय. आपण दररोज सकाळी योगासन, प्राणायामाचे विविध प्रकार केले तर आपोआपच आपल्या मनावर आलेला अतिरिक्त ताण हा नष्ट होऊन जातो व आपण दिवसभर प्रफुल्लित राहतो.आपण कोणत्याही ताणतणावा शिवाय राहतो व दिलेल्या कामांमध्ये आपण आपले मन एकाग्र करून दिलेले काम पूर्ण करतो.
एकाग्रता हा गुण सर्वांनाच गरजेचा आहे. घरामध्ये काम करणारी गृहिणी तिला आपले घरचे कामकाज वेळच्या वेळी होते ते कशामुळे होते ?उत्तर आहे मनाची एकाग्रता.आपल्या डोक्यामध्ये हजारो विषय असतील तर आपले एकही काम धड होत नाही त्यामुळे एकावेळी एकच विचार आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवला व एकाग्रचित्ताने काम केले तर सर्वच थांबलेली आपली कामे यशस्वी होत असतात. तलावाकाठी बसलेला जो बगळा असतो तो शांत बसून एकाग्रतेने माशाची वाट पाहतो तेव्हांच त्याला खाण्यासाठी मासा मिळतो. म्हणजे त्याला त्याच्या एकाग्रतेचे फळ मिळते.यावरून हेच सार निघते की एकाग्रता हा महत्त्वाचा गुण आहे.सर्वांनाच त्याचे महत्त्व समजले पाहिजे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोड क्र. [ 14 ]
" चित्ताची एकाग्रता "
" मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू दैना
आता होतं भूईवर
गेलं गेलं आभायात ! "
या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीतून मानवी चंचल मनांचे यथार्थ दर्शन घडून येते . खरंच , ' मन ' ही एक अशी अनाकलनीय संकल्पना आहे . जी कुणालाही स्पष्टपणे उलगडून दाखविता येत नाही . ती आपले स्वरूप निरंतर बदलत असते . अशा बदलत्या चंचल मनात एकाग्रता कशी काय राहील ? ती राहते केवळ स्थिर मनोवृत्ती असणाऱ्या मनात ! आपण नदीच्या स्थिर पाण्यातूनच आपले प्रतिबिंब पाहू शकतो . पण जर ते पाणी आपण हलवून अस्थिर केले तर आपले प्रतिबिंबही आपल्याला हलते व अस्थिरच दिसणार ... ही पाण्याची स्थिती अगदी आपल्या चित्ताशी तंतोतंत मिळतीजुळती आहे ... कारण चित्त स्थिर असल्याशिवाय एकाग्रता साध्य होणार नाही ... म्हणून आधी चंचल मन स्थिर करावे ! ते कसे करावे ? त्यासाठी काय काय करावे ? ते नियंत्रित कसे ठेवावे ? हे सहजासहजी शक्य होत नाही ! त्यासाठी कठोर मानसिक तपोसाधना करावी लागते ... मनाला विवेकाच्या लगामाने नेहमी अंकीत करावे लागते .... मनात फक्त आणि फक्त सात्त्विक भावनांचाच संचय करावा लागतो ... जे काही वाईट , दोष , दुर्गुण आहेत ते महत् प्रयासाने अंर्तमनातून कायमचेच दूरवर फेकून द्यावे लागतात ... काम , क्रोध , मोह , लोभ , माया , मत्सर या षडरिपूंचा तनमनातून त्याग करावा लागतो ... मन नेहमी संयमी , शांत , सद्विवेकी , सदाचारी , परस्परांप्रती प्रेम , करूणा , कणव ठेवावी लागते ... तेव्हा कुठे चंचल मन स्थिर व स्थितप्रज्ञ होणार ... आणि चित्ताची एकाग्रता आपसूक येणार ....
चित्ताच्या एकाग्रतेसाठी काही प्राणायाम , आसने , सकारात्मक विचारसरणी , संगीत , कलोपासना , ध्यानधारणा , छंद , वाचन इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो ... शिवाय ज्योती त्राटक , बिंदू त्राटक , सूर्य त्राटक , श्वासावर लक्ष केंद्रित करणे , आज्ञाचक्रे जागृत करणे , स्वयोंपचार पद्धती , स्वसुचन पद्धती , स्वसंमोहन पद्धती इत्यादींच्या आधारे चित्त एकाग्रता आणता येते ... पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात आंतरिकदृष्ट्या काही तरी शिकण्याची , आत्मसात करण्याची प्रखर अशी इच्छा व तळमळ आधी निर्माण झाली पाहिजे .... तरच ती व्यक्ती एकाग्रतेसाठी प्राप्त ठरते ... अन्यथा जबरदस्तीने खाऊपीऊ घातल्यास परिणामी उलटीच होईल व सर्व मेहनत पाण्यात जाईल ...
म्हणून आधी आंतरिक तहान भूक महत्त्वाची आहे त्याशिवाय स्वतःहून एकाग्रता येत नाही ... आणि ओढून ताणून आणलेली एकाग्रता फळास प्राप्त होत नाही ... स्वयंस्फूर्तीने एकाग्रता आल्यास हमखास यशप्राप्ती मिळतेच ...
अशाप्रकारे मानवी मनात उपरोक्त प्रकारे प्रयत्नपूर्वक व स्वयंस्फूर्तीने एकाग्रता आणता येईल ... " मन करारे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण !! " हेही एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ... शेवटी एवढेच म्हणेल की ,
" स्वभाव सोडा उग्र
मन होईल एकाग्र
गाठाल यशोमार्ग
धारता शांती मार्ग ! "
अर्चना दिगांबर गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552963376
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें