*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- आठरावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 06 मे 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- वेळ / समय*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
*वेळ मौल्यवान आहे*
निसंर्गाने पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना विनामूल्य दिलेली अमुल्य भेट म्हणजे " वेळ "होय .जिचे काहीही मुल्य आपण निसर्गाला परत करीत नाही . मानव सोडला तर प्रत्येक जीव वेळेचे सदुपयोग करतांना दिसतो . उदाहरणार्थ मुंगी आकारणी व शक्तीने सर्वात लहान आसली तरी सदैव लगाकर काम करत असते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात ती कधिच शांत बसत नाही . तिला माहीत असते पावसाळ्यात आपणास बाहेर पडता येणार नाही मग ,मग अन्नाची साठवण आपल्याला आताच केली पाहिजे .छोटासा जीव पण वेळेच्या बाबतीत किती काटेकोरपणे नियोजन करून भविष्याच्या किती सकारात्मक विचार करते परंतु आपण वेळेत किती दुरुपयोग करतो. कारण आपल्याठायी वेळेचे महत्त्व काहीच नाही. आपल्या अपयशाचा मागचे कारण प्रमूख कारण म्हणजे वेळेचा अपव्यय होय.वाळ खुप महत्त्वाची आहे .शक्तिशाली आहे. कधीच कुणासाठी थांबत नाही आणि रंकाचा राव होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. तुमच्या परिस्थितीला तुम्ही कधीच जबाबदार ठरवू शकत नाही. कारण परिस्थिती वाईट वा चांगले होण्यास आपणच कारणीभूत ठरत असतो."तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ".तुम्ही वेळेचा कसा वापर करता यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून वेळेचे आदर करा आणि तिचा सदुपयोग करा.
काळ वेळ कोणासाठी सांगून येत नाही .वेळेचे महत्व समजून काम करायला हवे .एकदा याची जाणीव आपल्या अंगी वळण्यासाठी वाईट वेळेच आपल्यावर यावे लागते. पैशाचा व्यवस्थापन आपण करतो करायला हवे अन्यथा आपल्या वेळेचा सदुपयोग न होता दुरुपयोगच होतो. खरंच वेळेचा सदुपयोग आपण करतो का ? हा प्रश्न सर्वांना पडायला हवा . आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचे क्षण लक्षात घ्या .आजचा वेळ वाया घालून तसेच वायफळ गोष्टींमध्ये गुंतलेले असतो.त्याऐवजी त्याचा सदुपयोग करून आपण आपल्या भौतिक तसेच आध्यात्मिक विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील असायचा हवेत. तसेच मित्रांनो आपला वेळ एखाद्या पक्षाप्रमाणे आपल्या हातून भूतकाळाकडे उडून जात असतो. लक्षात घेण्यासारखी बाब आहे की आपण आपल्या जीवनाला उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकतो .कार्य हे वेळेवर केले तेव्हाच हे शक्य आहे .विचार करा .आपल्या जीवनात चा संकल्प चा शोध घ्या वेळेचे महत्त्व आपल्याला त्यावेळी कळत ज्या वेळीकळत नाही.ज्या वेळेस आपल्याकडे खूप वेळ असते. जेव्हा वेळ सोडून गेलेली असते, तेव्हा मात्र आपण त्याची कदर करत असतो.तेव्हा फक्त आणि फक्त आठवणी सोबत असतात .एखाद्या खेळाडूला त्याचे महत्त्व चांगलेच माहीत असते. सेकंदाचा काही भाग सोडल्यास अपयश पदरी पडतो. अशा वेळी धावले तरी वेळेला वाचता येत नाही .कारण वेळ कधीच थांबवता येत नाही . त्याची तरतूद करताना वर्तमान हातातून अलगद निसटून जातो क्षणार्धात हा वर्तमानकाळ भूतकाळात गणला जातो .आयुष्य हे काळानुसार चालते .कुणी कुणासाठी थांबत नाही .कोणी स्वप्नाच्या मागे धावतो तर कोणी पुरेसा वेळेचा सदुपयोग कामानुसार करवून घेतो.कधी वेळ जाता जात नाही तर, कधी वेळ अपुरा पडत असतो . सगळ्यांनी जाणायला हवे येणाऱ्या सर्व क्षणाच्या आनंदाने स्वागत करायला आपण शिकलो तर ,, खरंच वेळेचे महत्त्व जाणत आहोत हे समजायला हरकत नाही.
आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे?. कुणी म्हणेल पैसा ,कुणी म्हणेल दिवस , कुणासाठी आत्मसन्मान तर कुणासाठी नाती ,पण खूप कमी लोक आहेत या जगात जे वेळेचे महत्त्व जाणतात आणि वेळेला मौल्यवान म्हणतात .कमी लोक आहे जे वेळेचे महत्त्व जाणवत वेळेचा सदुपयोग करतात .खरंच वेळ मौल्यवान गोष्ट आहे .या जगात वेळ सोडून कोणतीच मौल्यवान वस्तू नाही. वेळेचे महत्त्व जाणून त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. कारण सर्वांनाच माहीत आहे की एकदा गेलेली वेळ परत येत नाही .
सर्वात अनिश्चित गोष्ट आहे पुढच्या क्षणाला काय होईल . कोणालाही माहीत नसते ज्योतीष्य वा कोणताही प्रसिद्ध शास्त्रज्ञ अचूकपणे सांगू शकत नाही . आपल्या हातात असलेल्या प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे काळजी न करता भविष्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजे . भूतकाळात घडलेल्या चुकांवर प्रस्तावना करण्ऐवजी जुने पाहावे आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे . प्रत्येक क्षण भरभरून जगणे महत्त्वाचे आहे. भविष्याची काळजी न करता ,हाती नसलेल्या भौतिक सुखांच्या मागे न धावता आज आपल्याकडे जी आहे त्याचा उपयोग घेता आला पाहिजे . "टाकीचे घाव शोषल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. "आज आपल्याकडे किती वेळ आहे आणि काही लोकांकडे कदाचित पुरेसा वेळ नसेल .पहिल्यांदा वेळेला सांभाळून वापरले पाहिजे वेळ काम करण्यासाठी वापरा किंवा आपल्या परिसरात सोबत घालवा किंवा निसर्गाच्या सानिध्यात रहा . प्रत्येक क्षण असा जगा की तो क्षण पुन्हा आपल्याला उपभोगता येणार नाही.तेव्हाच आपल्याला कधीही अपसोस करण्याची पाळी येणार नाही.
, वेळ ही जगातील कोणत्याही हिर्यापेक्षा ,खजिण्यापेक्षा महत्वपूर्ण आहे. कारण एकदा गेलेली वेळ कितीही पैसा दिला तरी परत येऊ शकत नाही. भरपूर पैसा असेल जगातील कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकते पण वेळ विकत घेता येणार नाही . शास्त्रज्ञ असेल तरी तो वेळेला परत आनू शकत नाही .जोवेळेचे महत्त्व समजू शकत नाही तर वेळेही त्याचे महत्व जाणत नाही. वेळ वाया घालवत राहिलो तर, आपल्याला पुढे येणाऱ्या वेळ आपल्या उद्ध्वस्त करू शकतो .वेळ आपल्याला पुन्हा सावरण्याची संधी देणार नाही.
लेखिका .....
*सौ. यशोधरा सोनेवाने गोंदिया*
( 9420516306 )
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
*वेळेच महत्व*
काळ, क्षण, टाइम, समय, वेळ...कुठलही नाव घ्या. पण ही जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेळ हा कोणासाठी हि थांबत नाही तो निरंतर चालत राहतो म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते पक्त वेळेच्या माध्यमावर ठरवले जाते. हे आपल संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे, ते वेळेबरोबरच चालते.
आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल यश, कोणासाठी आत्मसन्मान मोठा असेल तर कोणासाठी नाती. पण खूप कमी लोक आहेत या जगात जे वेळेचे महत्व जाणतात. किंबहुना खूप कमी लोक आहेत जे वेळेचे महत्व जाणून वेळेचा सदुपयोग करतात. खरतर वेळे एवढी मौल्यवान गोष्ट या जगात कोणतीच नाही. प्रत्यकाने वेळचे महत्व जाणून त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे कारण सर्वांनाच माहित आहे कि एकदा गेलेली वेळ परत येत नाही.
तुम्ही कुठे हि कामाला जा तुम्ही काम तर खूप करणार पण तुम्हला मान-धन वेळे अनुसारच मिळणार. मोठ्यातील मोठी कंपनी असो कि गावतले छोटे दुकान सर्व वेळे अनुसारच चालतात म्हणून तर सांगतात न वेळ हि संपत्ती आहे. गेलेले पैसे परत मिळवता येतात, न आवडणारी नोकरी सोडता येते पण वेळेचे तसे नाही गेलेला वेळ परत कधीच परत येत नाही, आणि वेळ कधी कोणाच्या मर्जी अनुसार हि चालत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य परिश्रम केले तर तुम्हला कष्टाचे योग्य फळ मिळनाराच. हे सर्व वेळेचे महत्व सर्व थोर लोक जानतात म्हणूनच तर आपली शाळा वेळे अनुसार चालते आपण वेळेवर अभ्यास केला तर आपल्यांना चांगले गुण मिळतात. शाळाच नाही तर रेल्वे स्टेशनवर आपण पाहिले असेलच ट्रेन वेळेवर धावतात आणि ट्रेन कोणा साठी हि शनभर हि थांबत नाही वेळ चुकली तर समजा ट्रेन चुकली.
अस म्हटल जाते की, ज्या मनुष्याला वेळेचे नियोजन करता आले त्याला यशाच्या कुलपाची चाबी सापडली. परंतु हे साध्य करने किती जनाना शक्य होते. या जगात पाणी, सूर्यप्रकाश, हवा, जमीन आणि वेळ ह्या गोष्टी मनुष्य कधीही निर्माण करूच शकत नाही. आयुष्य हे सुध्दा जन्म व मृत्यू या दोन बिंदूतील काळ आहे. मग जो काळ अथवा वेळ आपण निर्माण करू शकत नाही त्याचा उपयोग कटाक्षाने केला पाहिजे. एकदा तो हातातून गेला की तो कायमचाच जातो.
जगात सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात २४ तासच मिळतात, कुणालाही २५ तास नाही मिळत. अस असताना, या जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी का होतात? याच मुख्य कारण आहे वेळेचा सदुपयोग. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही ते अपयशी ठरतो.कुणीही आजचा वेळ उद्या साठी वाचवून ठेवू शकत नाही. फक्त त्या वेळेचा तो योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. लक्षात ठेवा, स्वतःच्या वेळेचा स्वतःपेक्षा कुणीही योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट प्रत्येकासाठी आहे. काही वेळा तर वेळ हाच सर्वस्व बनून बसलेला असते. वेळ फक्त त्यांचाच मान राखते जे वेळेचा मान राखतात. वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून आपल्या प्रगतीत तसेच उन्नतीसाठी ती फार महत्त्वाची भूमिका बजावते. गांधीजी नेहमी म्हणत “मी वेळेला सन्मानापेक्षा श्रेष्ठ मानतो.” आपण आपले सर्व कार्य वेळेवर केले तर सुख आणि यश मिळते. ख-या अर्थाने आज जगालाच वेळेचे महत्त्व पटले आहे.
आतापर्यंत एवढे महान सम्राट होऊन गेले या पृथ्वीवर, अनेक शास्त्रज्ञ, महान संत जन्माला आले या धरतीवर परंतु कोणीच वेळेवर विजय मिळवू शकले नाही. किती महान सत्ता आल्या आणि गेल्या परंतु काळाची सत्ता कोणीही जिंकू शकले नाही. अनंत काळापासून वेळ आपल्या मर्जीने चालत राहिला आहे. भविष्यातही कोणी असो वा नसो पण वेळ मात्र नक्की असणार आहे. वेळ निःपक्षपातीपणे, सर्वांनाच संधी देत पुढे जात राहतो. तो कधीही गरीब- श्रीमंत, लहान- थोर, उच्च – नीच असा भेदभाव करत नाही. ज्या व्यक्ती हुशारीने आणि शिताफीने या संधींचा फायदा घेतात त्याच व्यक्ती प्रगती करतात.
एखादा विद्यार्थी जर पहिल्यापासूनच आभ्यास करत असेल तर परीक्षेच्या वेळीस त्याला जास्त त्राण येत नाही कारण त्याचा आभ्यास आधीच झालेला असतो. ऐन वेळेस तो आजारी पडला किंवा इतर काही कारणांमुळे आभ्यासाला पुरेसा वेळ देऊ शकला नाही तरी बिनधास्त परीक्षा देऊ शकतो. ऑफिसमध्ये किंवा घरीसुद्धा कोणतेही काम वेळेआधीच पूर्ण केले तर काम झाले असल्याचे समाधान लाभते, किंवा काही अडथळे असल्यास दुसरा मार्ग काढण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो. म्हणूनच वेळेचा उपयोग कसा करून घ्यावा या साठी निरुस्त्साही न राहता, आपल्या दिवसभरच्या कामाची योग्य आखणी केली पाहिजे. भविष्यातील आपले लक्ष्य आताच ठरवून त्यासाठी आपल्याला आता काय करावे लागेल हे ठरविले पाहिजे आणि त्याप्रमाणे आतापासूनच मेहनत केली पाहिजे. असे केल्यास आपले भविष्य उज्ज्वल असेल यात काहीही शंका नाही. कोणतेही चांगले काम करण्यासाठी चांगला मुहूर्त न शोधत बसता आताच ते काम सुरु करा कारण प्रत्येक क्षण हा चांगलाच असतो आणि आत्ताचा क्षण सर्वोत्तम आहे.
_________________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
*मो. 9421802067*
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ !
क्षणात होत्याचं नव्हतं करणारी ! राजाला रंक आणि रंकाला राजा करणारी . वाट पहायला लावणारी हीच ती वेळ .
समय बडा बलवान होता है !
वेळ कोणासाठीही कधी थांबत नाही . आपल्याला सर्वांना आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य चा इतिहास माहित आहे . नंदवंशाने भर दरबारात आर्य चाणक्याचा अपमान केला . त्याच वेळी चाणक्याने प्रतिज्ञा केली की मी नंदकुळाचा नाश करीन व त्यांचे राज्य नामशेष करीन . काळ आणि वेळेचा योग्य वापर करून चाणक्याने नंदवंशाची राजवट संपविली व चंद्रगुप्त ला गादीवर बसवून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली !
वेळेचा महिमा आगाध आहे . तीचा सदुपयोग करुन घेता आला पाहिजे . आजच्या तरुण पिढीचा विचार केला तर ती जास्तच बेफिकीर होत चालली आहे . कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यांची सुंदर वस्तू बनवतो . तसा आपण आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे .
निघून गेलेला दिवस , निघून गेलेली वेळ परत कधीच येत नाही मग काही लोक तिला पकडायला आयुष्यभर तीच्या मागे फरफटत जातात पण ती काही हाती लागत नाही .
नौकरी वर असताना वाटेल तसा पैसा खर्चला . मौजमजा केली पण बचत केली नाही . मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काही तरतूद केली नाही . निवृत्ती नंतरच्या आजारपणासाठी पैशाची बचत केली नाही . आता हातपाय थकले आजारपणासाठी लोकांच्या हाताकडे बघायची वेळ आली . त्यासाठीच लहानपणी शाळेत शिस्त , स्वावलंबनाचे धडे गुरुजी देत असतात . त्याचा तुम्हाला आयुष्यात पुढे उपयोग व्हावा म्हणून .
परिक्षेला एक महिना राहिला की विद्यार्थी जागे होतात . मग रात्र रात्र जागून अभ्यास करतात . अति जाग्रणाने आरोग्यावर परिणाम होतो . पेपर लिहायच्या वेळी डुलक्या खातो , ऐनवेळी काय लिहायचे ते देखील विसरतो . परिणामी मार्क कमी पडतात मग नशिबाला दोष देणे सुरू होते . किंवा आपल्या अपयशाचे खापर आई वडिलांवर फोडले जाते .
मी नौकरीत असताना माझा एक मित्र होता . तो नेहमी म्हणायचा यार मला या नौकरीचा कंटाळा आलाय . दुसर्यांची ताबेदारी नको वाटते . आपला स्वत: चा छोटा मोठा व्यवसाय करावा . धंदा , व्यवसायात आपले मालक आपण असतो . वाटेल तेव्हा करावा , वाटेल तेंव्हा सुट्टी घ्यावी . कोणाची बाॅसिंग नाही , कोणाची ताबेदारी नाही . आणि महिनाभर नौकरी करुन महिन्याच्या शेवटी ठराविक रक्कम हातात पडते . व्यवसायात रोजच पैसा येतो . हे त्यांचे बोलणे ऐकून मी म्हणालो "तू कोणता व्यवसाय करायचे ठरविले आहेस ? तर मित्र म्हणाला अजून ठरवले नाही , विचार करायला थोडा वेळ पाहिजे . पुन्हा सहा महिन्यांनी भेटल्यावर त्याला विचारले अरे काय झाले तुझ्या व्यवसायाचे ? ठरवले का कोणता व्यवसाय करायचा तो ?
सध्या भांडवल नाही , अजून ती वेळ आली नाही .
पुन्हा काही दिवसांनी त्याला व्यवसायात बद्दल विचारले तर म्हणतो , आता पैसा आहे पण मार्केट डाऊन आहे . धंदा चालणार कसा ? अजून थोडी वाट पाहायचे ठरवले आहे . दरम्यान नौकरी वर दुर्लक्ष होत गेल्यामुळे वारंवार सुचना देवून ही कामात सुधारणा होत नसल्यामुळे वरीष्ठांनी त्याला कामावरून काढून टाकले आणि आता त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली .
योग्य वेळ येण्याची वाट पाहाता पाहाता हातातली आलेली संधी सोडयाची नसते . मराठीत एक म्हण आहे . हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये नाहीतर तेल ही गेले आणि तूप ही गेले , हाती आले धुपाटणे अशी गत होते .
हेतू शुद्ध असेल तर कुठलीही वेळ योग्य च असते . त्या वेळेचा कुशलतेने योग्य वापर करुन आपण आपली प्रगती करुन घ्यावी . योग्य वेळेची वाट पहात वेळ घालवू नये .
"हीच ती वेळ" म्हणून कामाला लागावे .
TIME IS MONEY अशी इंग्रजी म्हण आहे .
शुभस्य शिघ्रम !
अरविंद कुलकर्णी पिंपरखेड कर
9422613664
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
कोरोनाची वाईट वेळ
कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले.कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने संपुर्ण देशात लाॅकडाऊन एक,दोन व तीन असे टप्पे केले.या लाॅकडाऊन काळात गल्ली ते दिल्ली पर्यंत लोकांनी घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करायचीआहे.लाॅकडाऊनमुळे अनेक अडचणीचा सामना प्रत्येकाला करावा लागला. ग्रामीण भागातील अनेक मजूर कामाच्या शोधात शहरात येत असतात.मिळेल ते काम स्वीकारून,शहरातच स्थिरावतात.दोन पैसे कमावून आपला संसार भागवत असतात.या झगमगत्या सोनेरी शहरात स्वतःच्या परिस्थितीला घेऊन येत असतात.लाॅकडाऊनमुळे छोटे-मोठे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. साहजिकच छोटे व्यवसायिक व मोठ्या उद्योगधंद्यातील मजूर यांच्या हातचे काम बंद झाले.कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना घरातच बसून ठेवले.सहाजिकच हाताला काम नाही.अर्थात काम नाही,म्हणजे पैसा येणे बंद झाले.यातच एसटी बस, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे शहरातून स्वतःच्या गावी जाता येत नाही.देशात अनेक भागात मजूर अडकून पडले आहे. कोरोनाच्या या संकटात जगण्याची परीक्षा सुरू झाली.पुन्हा एकदा परिस्थितीने छळले.एक वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.गरिबाने दिवसभर काम केले.तर रात्री चुल पेटते.हि सत्य परिस्थिती मजुर वर्गाची आहे.देश बंद,काम बंद,पैसे मिळणे बंद,त्यामुळे पोटाला बंद ठेवण्याची वेळ आली.सरकार,सामाजिक संस्था,सेवाभावी लोक यांच्या कडून मिळालेल्या मदतीवर कसेबसे जगणे सुरू होते.यात कोरोनाचे संकट आजुबाजूला सावली सारखे छत धरुन उभेच होते.किती दिवस असे थांबणार या विचारात हे मजुर लोक होते.किमान स्वतःच्या गावी गेलो तर,कसेही करुन पोट भरेल.कोरोना पासुन वाचता येईल.या विचाराने अनेकांनी या लाॅकडाऊन काळात सरळ देशभर हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरु केला.उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात दिवसभर पायपीट करत राहायचे. मिळेल ते अन्न खायचे.नाही मिळाले तर पाणी पोटात ढकलून पुढे चालत राहायचे.जेव्हा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.तेव्हा मनुष्य हतबल होऊन जातो.त्याची इच्छाशक्ती त्याला जगवत असते.अनेक मजुरांनी "आम्ही जातो आमच्या गावा,आमचा रामराम घ्यावा" असे म्हणत शहराला रामराम ठोकला.अनेकांनी शेवटीआपले गाव गाठले. जीवनात अशी वेळ कधी येईल.असे स्वप्नात सुद्धा त्यांना वाटले नसेल.अनेकांना हाताला काम नाही.तशी पोटाला पोटभर अन्न नाही.सरकारी मिळेल ती मदत घ्यायची व काही दिवस पोटाची भूक भागवायची.लॉकडाऊन उठेल व हाताला काम मिळेल.या आशेपोटी एक एक दिवस मोजत लाॅकडाऊन संपायची वाट पाहात बसायचे.अशातच लाॅकडाऊन एक सुरू असतांना,देशाच्या पंतप्रधानांनी दुसरे 21 दिवसाचे लाॅकडाऊन घोषित केले.एका छोटाश्या प्रकाश किरणांना,एखाद्या घनदाट काळोखांनी गिळून टाकावे.तसे क्षणात आशेचे किरण नाहीसे होऊन गेले.पुन्हा 21 दिवसाच्या नजर लावून सगळे जण बसले.या एकदिवस दिवसात कोरोनाचा नायनाट होईल असे वाटत होते.पुन्हा एकदा कोरोनाने नशिबाची क्रूर थट्टा केली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला.नाईलाजास्तव तिसरे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले.फरक एकच झाला.अगोदरचे दोन लाॅकडाऊन ब्लॅकेन व्हाईट होते. तिसरे मात्र कलरफुल झाले.कोरोना रुग्ण संख्येवरुन रेड,ऑरेंज,ग्रिन अशा तीन प्रकारे जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली.या प्रकारावरून काही नियमात थोडेफार बदल करण्यात आले.मात्र सामान्य नागरिकांना गोरगरीब मजुरांना हे कलरफुल लॉकडाऊन अपयशीच ठरले.काही गोष्टी सुरु तर काही गोष्टी बंद.यामध्ये हाताला न कुठले काम मिळत आहे ना घराच्या बाहेर पडून कामाचा शोध घेता येत आहे.यावर्षी कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद झाल्या आहे.यात लग्न समारंभ,मोठे-मोठे सामाजिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक सण-उत्सव बंद करण्यात आलेले आहे.त्याबरोबरच कंपन्या, हॉटेल्स, मॉल्स,चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहे.अशा ठिकाणी हाताला मिळणारे काम सुद्धा बंद झाले.भलेही सरकारने कलर झोन नुसार काही बाबतीत सूट दिली.पण कोरोनाच्या भितीमुळे लोक आजही घराबाहेर पडायला घाबरत आहे.अनेक राज्य, देश आर्थिक संकटाच्या छायेत ढकलला जातोय.कधी काळी सोन्याचा धूर निघणारा हा देश आज मात्र कोरोनाच्या संकटापुढे हतबल झाला आहे. देशाला प्रतिष्ठा व पैशापेक्षा देशातील प्रजा महत्त्वाची आहे.आज अनेकांना वाचविण्यासाठी देशात सर्व यंत्रणा सज्ज आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने या संकटात योगदान देत आहे. कोरोनाने आज जगावर संकटाची वेळ आणली आहे.प्रत्येक देश या संकटातून बाहेर पडण्यासाठी झटत आहे.भारतासारखा सुजलाम सुफलाम देशही पूर्ण ताकदीने या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे.देशातील जनतेने सुद्धा या संकटात एकजुटीने देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.देश वाचला तर आपण वाचू,सामान्य जनता वाचली तर देश वाचेल.कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही.म्हणून वेळेचा सदुपयोग करुया.लाॅकडाऊनच्या काळात देवाला साकडे घालूया.की या संकटातून देशाला सुखरूप बाहेर सोडव. भारत या गरीब जनतेचा देश आहे.कष्टकरी शेतकऱ्याचा, घाम गाळणाऱ्या मजुराचा,नामस्मरण करणाऱ्या वारकर्याचा देश आहे.निश्चितच भारत हा पवित्र व भाग्यशाली,प्रयत्नवादी देश आहे.एक दिवस वाट चुकलेला कोरोना या देशातून निघून जाईल.आज आलेली वेळ निघून जाईल.गरज आहे ती नियमांच्या पालनाची व अनेक गोरगरीब लोकांना सहकार्याची.कोरोना बाधित रुग्णांना हिम्मत देण्याची ही वेळ आहे.वेळ,काळ कधीही कुणासाठी थांबत नाही.वेळ,काळाचे चक्र सदैव सुरू राहते.आज आलेली कोरोना व्हायरस संकटाची वेळ निघून जाईल.एक दिवस लाॅकडाऊनची सुद्धा वेळ संपेल.पुन्हा एकदा सगळीकडे जमेल गर्दी व माणसाला माणसाच्या माणुसकीच मिळेल साथ.
राजेंद्र प्रल्हाद शेळके शिक्षक
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा 9823425852
rajendrashelke2018@gmail.com
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळेला महत्व द्या
वेळेला महत्व द्या.मी मृत्यू बोलतोय. मृत्यू........मृत्यू अंतिम सत्य आहे.याच मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध तपश्चर्येला निघाले.तब्बल बारा वर्ष त्यांनी तप केलं.एका पिंपळाच्या झाडाखाली बसून.त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ते सिद्धार्थ गौतमावरुन भगवान गौतम बनले.
मृत्यू हा ठरलेला असतो.कोणाच्या जीवनात लवकर येतो.तर कोणाच्या जीवनात उशिरा.पण ज्यांच्या घरी येतो.ते मात्र दुःखी होतात.रडतात,आलाप करतात.मग मय्यत होते.त्यानंतर रक्षा विसर्जन.मग टक्कल करणे.सर्व प्रकारचे रितीरिवाज करीत.शेवटी भिंतीवर फोटो.कशासाठी तर ती माणसे सदैव स्मरणात राहावी म्हणून.
सिद्धार्थाबाबतही चमत्कार दाखवतात काही काही लोक. कोणी कोणी असंही म्हणतात की देवानं चमत्कार केला आणि ज्ञानप्राप्ती झाली.कोणी म्हणतात.सिद्धार्थ गौतम बुद्ध हे विष्णुचा अवतार.पण हे सारासर चुक आहे.कारण तथागतांना चमत्कार मान्य नव्हता.
ऐषआराम संपन्न घरातून तथागत जेव्हा परीचर्येला निघाले तेव्हा त्यांनी तीन दृश्य पाहिली.ती तीन दृश्य ही वास्तविक होती.पण त्यांना ती तीन दृश्य चमत्कारी वाटली.असाही चमत्कार खरंच असतोच का? याचं उत्तर शोधण्यासाठी ते संसारमुक्त झाले.कधी त्यांनी अन्नत्यागही करुन पाहिला.पण चमत्कार झाला नाही.कारण चमत्कार होतच नसतो.हे सिद्धार्थ ने दाखवले.
माणूस जेव्हा विचार करीत असतो.तेव्हा विचार करता करता असंख्य विचार माणसाच्या मनात येतात.काही वाईट विचार मनात घोळत असतात.चांगलेही विचार मनात घोळत असतात.त्यातून कोणी कोणी जे वाईट विचार असतात ते घेतात.तर कोणी चांगले विचार घेतात.सिद्धार्थांच्याही मनात असे चांगले वाईट विचार आलेत.विचारांची कालवाकालव झाली त्यांच्या मनात आणि अचानक असे असंख्य चांगले विचार त्यांच्या डोक्यात निर्माण होवून ते विचार जगाला देण्याची प्रेरणा बाराव्या वर्षी त्यांना वाटायला लागली.हा चमत्कार नव्हता.तर जगाला ते विचार देण्याची ज्ञानप्राप्ती होती.
त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार कधीही मरणाचं दुःख बाळगू नये.कारण मरण येणार आहे.ती अटळ गोष्ट आहे.याचा जर आपल्या मनात विचार करीत असलो तर दुःख वाटेल.तसा विचार करु नये.कोणीच करु नये.म्हणजे मरण आलेच,तर कोणी दुःखी होणार नाही.त्यानुसार मरणानंतर रडणे हे ही दुःख असून त्याचीही तथागत पृष्टी करीत नसत.मरणानंतर रडून काही उपयोग नाही असे ते म्हणत नव्हे तर शिष्यांना उपदेश देतांना कोणतीही कामे ही वेळेवरच करा.वेळ बहुमुल्य आहे असेही सांगत.ते अहिंसेला अतिशय महत्व देत.सत्य बोलणे नव्हे तर जास्त अन्नसंचय करु नये असेही मानत.
त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार हा ब-याच राज्यात झाला.अंगुलीमाल सारख्या दरोडेखोरालाही त्यांनी केवळ आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि शांततेच्या मार्गानं हरवलं.आपण कोणाला मारु नये.नव्हे तर आपण आपल्या बोलण्यातून कोणाला दुःख देवू नये हेही तत्वज्ञान तथागतांचेच.त्यांचे ज्या ज्या लोकांनी तत्वज्ञान मानले.ते ते महान ठरले.कलिंग युद्धातून बोध घेवून सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारला.तो जग विख्यात केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील बौद्ध धम्माचे अनुयायी बनलेह.कारण हाच एक धम्म असा होता की जो अस्पृश्यता निवारण करु शकत होता.नव्हे तर या अस्पृश्यांना समाजात मानाचं स्थान निर्माण करुन देवू शकत होता आणि ते मानाचं स्थान समाजात निर्माण करुन दिलेही.जर या धम्माने वास्तविकता त्यागून दांभिकता पसरवली असती तर हाही धम्म लयास गेला असता.
जनावराला वाचा फोडून बोलायला लावणारा हा धम्म नाही.एकीकडे प्राणी माणसासारखे बोलतात तर दुसरीकडे तेच प्राणी भाव म्हणून नवसाला कापले जातात.हे या गौतमाला कधीच पटले नाही.त्यांनी वेळेला अतिशय महत्व दिलं.मृत्यूची वेळ ठरलेली असून तो वेळेवरच येेतो.त्यामुळं कोणीही घाबरुन न जाता मृत्यूचा स्विकार करावा असे सांगणारा गौतम.या गौतमाची जयंती जग साजरी करीत आहे. पण ही जयंती साजरी करीत असतांना निदान एक दिवस तरी त्यांच्या विचारानुसार वागावे.तेव्हाच त्यांना त्यांच्या जन्म घेण्याचं सार्थक झाल्यासारखे वाटेल.महापुरुष जन्म घेतात.कशासाठी तर आपल्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी.आपल्या भरकटलेल्या मनाला वळण लावण्यासाठी.जर आपणर अशा महापुरुषांचे विचार पाळत नसलो तर खरंच आपल्या जन्माला काहीही किंमत नाही.हेच सांगितले गौतमानं.आपण वर्षभर जरी शैतानासारखं वावरत असलो तरी चालेल.पण खरंच एक दिवस गौतमाचे तत्वज्ञान पाळून पाहा.मग सांगा काय फरक पडतो तो.आज वाढत चाललेली शैतानी वृत्ती,त्या वृत्तीवर विजय मिळविण्यासाठी गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा वापर करणे अगत्याचे आहे.एवढेच मी सांगेन.
आज कलीयुग आहे.कलियुगात प्रत्येकांच्या मनात शैतानच वावरत आहेत.त्याच्या मनात पुढेही शैतानच असेल नव्हे तर पराकोटीची अंधश्रद्धा असेल.आज कलीयुगात हर मंदीरातही नवश म्हणून बकरेही कापले जातात व देवही नवसाला पावतात..तसेच अत्याचार करणारे घटक पाठीवर पोळ्याही शिजवायला लावतात.रेड्याच्या मुखातून वेद वदवायला लावतात व भिंतही चालवायला सांगतात.हे तेवढेच खरे आहे.माणुसकी मरत चाललेली आहे.वेळेला कोणी पाळत नाही.प्रत्येकाला कमी वेळात व कमी श्रमात पैसा हवा आहे.पण तो मिळणार कसा? यासाठी चो-या,लुटमार,डाके.
खरंच यासाठीच बौद्ध तत्वज्ञानाची गरज आहे.जास्त अन्नसंचय करु नये.चोरी करु नये.बकरे कोंबडे कापू नये तर पाळूही नये.सत्य बोलावे.खोटे वदू नये.नशा पाणी करु नये.व्याभिचार करु नये.खोटे आश्वासन देवू नये.वासनेची भावना ठेवू नये.लोभ करु नये हे सगळं वदवून घेण्यासाठी आणि समाजाला सुधरविण्यासाठी.......
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
*हिच ती वेळ*
हिंदी चित्रपटाची सुरुवात फार सुंदर स्लोगनने होते...."जमी और आसमा लहू से लाल है अहिंसा के देश मे अग्निकाल है...|" तसेच दादा कोंडके यांच्या चित्रपटातही त्यांनी सांगितले होते,की वेळ आली बघा तिथं देव करी काय हो...अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो... आपला भारत देश अहिंसेचा पुजारी असणारा देश. राजकीय स्वार्थापोटी या भारतात नांदणाऱ्या अनेक जाती, धर्म आणि पंथ यांना विचलित करून, त्यांच्यात मतभेद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम इथल्या धुरिणांनी केलेले आहे. आणि नेहमीच केलेले आहे. पण सदासर्वदा एक वेळ कायम राहत नाही.लोक शहाणे होत आहेत. पुढाऱ्यांची खेळी आणि अटकळ लोक ओळखत आहेत. आणि म्हणूनच एक माणूस एका माणसाला अनेक वेळा फसवू शकेल, एक माणूस अनेक माणसांना एक वेळा फसवू शकेल,पण एक माणूस अनेक माणसांना अनेक वेळा फसवू शकणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. कारण वेळ संधी देत असते.परंतु ती संधीच आहे हे ओळखण्याचे कौशल्य आपल्यामध्ये असावे लागते. प्रगतीची उंच शिखरे गाठलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वाकडे आपण पाहिले किंवा त्यांचे चरित्र अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की, जीवनात वेळेला किती महत्त्व दिले आहे.शिवाय आघात करायला आलेल्या वेळेलाही त्यांनी किती शिताफीने परतवून लावले आहे.गीतेत सांगितले प्रमाणे 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता...|' याचा अर्थ सर्व गोष्टी भाग्यावर सोडून द्याव्यात असा नव्हे. आपण आपले कर्तुत्व आणि कर्म करीत राहिल्यानंतर फळ हे निश्चित मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी वेळेची आवश्यकता असते. आणि ती वेळ आणण्याचे कौशल्य किंवा आपले भाग्य निर्माण करण्याचे कौशल्य आपल्यामध्ये असले पाहिजे. जो मनुष्य वेळेची कदर करतो. त्या मनुष्याची, वेळ सुद्धा निश्चितच कदर करत असते. म्हणून माणसाने भूतकाळात न रमता आणि भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगले पाहिजे. भूतकाळाच्या आनंदात आणि भविष्याच्या चिंतेत जर वर्तमान आपण घालवू लागलो. जगण्यातला आपला वेळ फुकट जाणार आहे. भूतकाळाच्या पायावर आणि वर्तमानाच्या खांद्यावर भविष्याची इमारत उभी असते. तेव्हा वेळेला जाणून वर्तमानाचा आनंद घ्या.
माणसाच्या शरीरामध्ये एकदा आळस शिरला, की तो कुठलेही काम व्यवस्थित पूर्णत्वाकडे जावू देत नाही. म्हणूनच म्हटले आहे 'कल करे सो आज कर आज करे सो अब कर... कल प्रलय होगा तो करेगा कब..|' कोरोनमुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती आपल्याला या उक्तीची चांगली प्रचीती आणून देते. अनेक स्वप्न उराशी बाळगली होती आणि अनेक स्वप्न आपली अधुरी राहिली आहेत. वेळीची सबब सांगून कितीतरी कामाची आपण चालढकल करत होतो. आणि आज आपल्याकडे केवळ वेळ आणि वेळच शिल्लक आहे. तरीदेखील आपण त्या वेळेचा सदुपयोग करतो की नाही याचे अवलोकन केले पाहिजे. जुन्या काळातील लोक अशिक्षित असले तरीसुद्धा ते कोणतीही गोष्ट वेळेवर करत होते, त्यांना वेळेची जाण होती. परंतु आज काल घाईगर्दी मध्ये प्रत्येकजण सांगत सुटला आहे की मला वेळ नाही.... कोणीही आणि कुठेही थांबायला तयार नाही. प्रत्येकाला माझेच काम आगोदर झाले पाहिजे अशी भावना निर्माण झालेली असते. आणि या घाईगर्दी मुळे होणारे काम घडण्या पेक्षा बिघडू शकते. याची जाणीवही त्यांना नसते. आणि काही वेळेला आपणच याच्या उलट परिस्थिती निर्माण करून ठेवलेले असते. त्यावर करायला हवे ते आपण वेळेवर करत नाही. करता येईल बघू पुन्हा असे म्हणत कामाचा ढीग वाढत जातो. आणि मग एक ना धड भाराभर चिंध्या म्हणतात अशी परिस्थिती निर्माण होते.वेळेच्या बाबत सांगत असताना मला आणखीन दुसरी बाब सांगावीशी वाटते... माणसाने वेळेबरोबर बदलायला हवे, आजकालच्या मुलांना वेळेचे महत्त्व पटवून देत असताना आमच्या काळामध्ये हे होते, आमच्या काळामध्ये ते होते, आम्ही असं करत होतो, तसं करत होतो असे वारंवार सांगण्यात अर्थ नाही. उलट आपणच बदललेल्या परिस्थितीनुसार आणि वेळेनुसार बदलले पाहिजे. यासाठी एक उदाहरण दिले जाते, डिजिटल युगामध्ये झालेली क्रांती आणि झालेले बदल नोकिया सारख्या कंपनीने, आणि एचएमटी घड्याळ यासारख्या कंपनीने स्वीकारले नाहीत. म्हणून औद्योगिक क्षेत्रातून या कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला. अर्धाच बदललेल्या वेळेचा अंदाज त्यांनी घेतला नाही. असेच म्हणावे लागेल. शेवटी मित्रांनो आलेली वेळ ही थांबणार नाही, आणि येणारी वेळही आपल्यासाठी थांबणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाचा वेळोवेळी विचार करा आणि आपले आयुष्य समृद्ध करा. कारण हिच ती वेळ आहे.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ- एक अनमोल दागिना
दहावीचा निकाल होता समीरचा. भीती होती थोडी मनात आणि शेवटी जे नको व्हायला ते झाले. राहिले समीरने दोन विषय. समीर खूप रडला. तो म्हणाला," मी वेळ घालवला नसता आणि अभ्यास केला असता तर आज ही वेळ आली नसती." पण आता म्हणून काय उपयोग? हत्ती गेला आणि झोपा केला.
इंग्रजीमध्ये म्हटलं जातं 'टाईम वेट्स फॉर नन.' वेळ ही फार अनमोल गोष्ट आहे. एकदा हातातून निसटली की संपलं. कित्येक गोष्टी पैशाने खरेदी करता येतात. पण वेळ नाही. वेळेचा उपयोग हा चांगल्या गोष्टींसाठी तसेच योग्य पद्धतीने करायला हवा. यशस्वी होण्याचा हा एक मूलमंत्र आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याची ताकद वेळेत आहे. आपल्यालाही यश चाखता येईल जर आपण वेळेची कदर केली तर. म्हणतात ना, तुम्ही वेळेची कदर केली तर वेळ तुमची कदर करेल. वेळेचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे. मुलांच्या बाबतीत अभ्यास, खेळ आणि इतर उपक्रमांचे नियोजन तर मोठ्यांच्या बाबतीत बाहेरील कामे,स्वतःचे छंद तसेच घरातील कामे याची सुंदर सांगड घालता येते जर वेळेचे तंतोतंत जुळणारे गणित असेल तर. आजचा काळ लॉकडाऊनचा. मी हा लिखाणाचा छंद जोपासते आहे. वेळेचा सदुपयोग करत आहे. कोणतेही ज्ञान, कोणतीही घेतलेली मेहनत वाया जात नाही. कधी ना कधी उपयोगी पडते. जीवनात वेळ हा सगळ्यात मोठा महागडा दागिना आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून उद्या करायचे आज करा. आज करायचे ते आत्ता करा. आजकाल प्रमोशन देखील त्याच व्यक्तीला दिले जाते जो योग्य वेळेत, कमी वेळेत जास्त काम करतो. वेळ दवडू नका. लागा कामाला आजपासून. एक शिस्त अंगी बाळगा. वेळेचे महत्त्व जाणा. मग वेळ तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालेल. वेळेचा अनमोल ठेवा जपा.
प्रिती दबडे, पुणे
9326822998
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळेचे गणित
आज सकाळी उठल्या उठल्या मला 'ह्यांनी' सांगितले की "दोन दिवस मी कामानिमित्त बाहेर गावी जाणार आहे" दोघेही लेक आज ट्रीप ला जाणार होते. ते रात्रीपर्यंत परतणार नव्हते. सासू-सासरे आधीच तीन आठवड्याच्या युरोप टूरवर गेलेले होते. आज अगदी सगळं मनासारखं घडत आलेलं होतं.आज सबंध दिवस म्हणजे 24×60×60 माझ्या एकटीचा म्हणजे अगदी माझा होता. तो मनासारखा घालवायचा असं मी ठरवलं होतं. 'जी वेळ तुम्ही वाया घालवत आनंद घेता ती वेळ वाया जात नाही.' आमच्याकडे त्यामानाने माझ्या मैत्रिणींना कमी बोलावलं जातं. दरवेळी बहुदा बाहेरच कुठेतरी आम्ही भेटतो. म्हणून यावेळेस सर्वांना घरी बोलवावे. त्यामुळे घरात थोडा निवांतपणा येताच मी मैत्रिणीचे फोन नंबर फिरवायला सुरुवात केली. माझ्या अपेक्षे प्रमाणे एक सोडून बाकी सर्व पाच जणींनी माझ्या निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला. पण नीला बघा .नेहमीप्रमाणे पहिल्या माझ्या वाक्यानंतर नकार देऊन मोकळी झाली. "नाही गं मला नाही जमणार. मला कुठे आहे वेळ? असे म्हणून दहा कामांचा पाढा तिने माझ्यासमोर वाचला.
मी तिला म्हटले, "अगं, ही सर्व कामे आम्ही पण करतोच. तू जरा वेळेची मॅनेजमेंट कर ना.तू आज तुझ्या कामांची यादी कर. त्यात priority कुठल्या कामाची आहे ते बघ. तेवढी करून तू ये. अगं सगळ्याजणी येणार आहेत. घर आज अगदी मोकळे आहे. त्यामुळे आपल्याला अगदी धम्माल करता येईल बघ". पण तिचा आपला नन्नाचा पाढा चालू.
खरं सांगू का, तिला अति स्वच्छतेचे वेड. त्यामुळे तिला वेळेची मॅनेजमेंट जमतच नाही. स्वच्छतेच्या नादात आपले स्वास्थ्य बिघडवून घेते. आणि मग होते सारखी चिडचिड. बाकी सगळ्यासाठी वेळ कमी पडतो. अगदी अंतरातल्या व्यक्तीची भावनिक भूक तिच्या लक्षात येत नाही. इतकी ती त्या जाळ्यात आडकते. मग तिला उगाच वाटतं आपलं आयुष्य म्हणजे,' एकला चलो रे. आपल्याला कोणाची मदत नाही .'
ह्या नीलाच् म्हणणं असं की, 'तुमच्याकडे काय बाई दहा नोकर आहेत. त्यामुळे तुमच्याकडे वेळच वेळ असतो. तुझं काय बाई सगळं छानच छान आहे. मला नसतो बाई वेळ. कारण हिचा सुपरवुमन होण्याचा अट्टाहास. ह्या अट्टाहासा साठी लागणारे वेळेचे गणित मात्र तिला जमत नव्हतं.
मी जर मुलांना वेळ दिला नाही, मुलांना कशात अपयश आले तर बोट आईकडे दाखवले जाते. पण हा वेळ देणे हा qualitative असावा quantitative नसावा. त्यामुळे थोडासा वेळ मुलांबरोबर घालवला तरी पुरतो. पण ही गोष्टच लक्षातच येत नाही.
मुलांना स्वावलंबन शिकवले, साधी साधी कामे त्यांनी आपापली केली, तर आपला केवढा वेळ वाचतो. इतरांची नको ती कामे अंगावर घेतल्याने मुलांना आपण पंगू बनवतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. झेपत नसलेल्या कामांना हो म्हणून आपण आपलेच टेन्शन वाढवतो, बाकी काही नाही. म्हणून योग्य वेळी 'नाही' म्हणता आलं पाहिजे. नाहीतर घरातले सगळेच आपल्याला गृहीत धरू लागतात.
त्या दिवशी नीला कडे एक मिटिंग होती. इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे कपडे वॉशिंग मशीनमध्ये उशिरा धुतले गेले. त्यामुळे तिचा नवरा म्हणाला, "इतक्यात तुझ्याकडे माणसे यायला लागतील, तर मी कपडे वाळत टाकतो." पण जणू तिचा अभिमान दुखावला गेला. मी कुठल्याही जबाबदारीत कमी पडत नाही. मला तुमची मदत अजिबात नको." असा विचार करून आपले श्रेय जाईल म्हणून तिने नवऱ्याची मदत नाकारली. खरंतर असं काही नसतं. आपला स्वतःचा मेंटल ब्लॉक असतो. त्यापलीकडे जाऊन आपण विचार करत नाही आणि वेळेचे गणित चुकते. वेळे बरोबर कसं पळायचं किंवा चालायचं हे आपल्या हातात असते.
एकदा ऑफिसमध्ये माझ्या अंगावर एक बालंट आलं. त्यात माझी काही चूक नव्हती. त्यामुळे माझ्या आसपासच्या, ज्यांना मी जवळचे म्हणत होते अशाही लोकांचं वागणं माझ्याशी एकदम बदललं. तेव्हा माझ्या लक्षात आलं. वेळ सोडून आपलं असं या जगात कोणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे 'आपले' असतात. वेळ खराब असेल तर 'आपले' पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते.
लेखिका गौरी देशपांडे म्हणतात, "जे काम कामवाली बाई करू शकते, ते त्यांनाच करू द्यावे. बौद्धिक काम आहे ते ती नाही करू शकत. ते काम फक्त गौरी देशपांडे करू शकते. ती वेळ मी चांगल्या तऱ्हेने वापरू शकते." पण असा विचार करायला मनाचा खंबीरपणा हवा.
आयुष्यात वाईट दिवस हे प्रत्येकालाच येतात. वेळ चांगली - वाईट, शुभ - अशुभ असं काहीच नसतं. आपण तो वेळ चांगला किंवा शुभ करून दाखवायचा असतो. ज्यांनी वाईट वेळ पाहिली आहे ते इतरांचं वाईट करू शकत नाही.
आपण घोड्यावर बसलो तर त्याचा लगाम आपल्या हातात हवा. घोड्यावर आपले नियंत्रण हवे. तसेच आयुष्याच्या कालप्रवाहात आपले वेळेवर नियंत्रण हवे. मग तुम्ही पूर्ण वेळ गृहिणी असा, नाहीतर करियर करत असा. वेळेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातीच हवा. वेळ या चौकटीतून स्वतःच्या जीवनाकडे आपण कसे बघत आहोत हे खूप महत्त्वाचे असते. वेळेबरोबर वाहून जाणे बरोबर नव्हे. तर वेळ आपल्या ताब्यात हवी. कुठलाही व्यसनी माणूस त्या व्यसनात वाहून गेलेला असतो. त्या व्यसनाला सरावल्यामुळे ती गोष्ट सोडणे अतिशय अवघड होऊन बसते. तसेच वेळेचे आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही एवढी महत्त्वाची गोष्ट आपण कायम विसरतो. Time is money. वेळ मॅनेज करता आली तर स्वतःचा वेळ राखता येईल. आपले आवडते छंद पुरे करता येतील. कारण तो वेळ फक्त आपल्या हक्काचा असेल. आपणच आपले गुरू बनले पाहिजे. म्हणजे आपल्या अशा समस्यांची उत्तरे मिळतील. मग तुम्हीच ठरवा काय आहे आपल्या वेळेचे मोल.
शुभदा दीक्षित पुणे
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ : वेळेसारखा गुरु कुणीच नाही
वेळेसारखा गुरु कुणीच नाही. कारण वेळ माणसाला जे शिकवते ते कुणीच शिकऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे चांगले दिवस चालू असतील तर त्याच्या अवती-भोवती मित्र परिवार, नातलगांचा मेळा भरलेला इसतो. पण त्याच व्यक्तीवर जर वाईट वेळ आली तर त्याचे सखे-सोयरे सुद्धा त्याची साथ सोडून देतात. हि वेळच शिकवीत असते की, कोण लांबचे ?, कोण दूरचे ? कोण आपले ? कोण परके ? हीच तर वेळेची खरी गंमत आहे.
त्याचबरोबर एखादा व्यक्ती आयुष्यभर कष्ट करत राहिला असेल परंतु त्याच्या नशिबात जर सुख-समाधान नसेल तर त्याच्या कष्टाला सुद्धा काहीच किंमत राहत नाही. त्यामुळेच तर म्हणतात ना, "समय से पहले और भाग्य से ज्यादा कभी नाही मिलता."
वेळ, काळ कुणासाठी थांबत नसतो. आपल्यालाच वेळेनुसार बदलावे लागत असते.
संत कबिरांचा एक छान दोहा आहे "कल करे सो आज, आज करे सो अब, पल मे परलय होगी बहुरी कारेगा कब ?" याचं उदाहरणच द्यायचं झालं तर इकदा दोन शेतकरी भाऊ आप-आपल्या शेतात काम करत असतात. मोठा भाऊ त्याची सारब कामे वेळेत व निसर्गाचा अंदाज घेऊन काम करत असतो. तर लहान भाऊ मनाप्रमाणे वाट्टेल तेव्हा काम करतो, वाट्टेल तेव्हा आराम करत असतो. तेव्हा मोठा भाऊ त्याला संगतो की, अरे हि मॅक्क्याची कणसं लवकर काढ. पाऊस आल्यावर उगाच भिजतील. पण लहान भाऊ काही ऐकत नाही. उलट तो म्हणतो जाऊदे आज नाही करत. आज ले जीवर आलंय. करील की उद्या. असं म्हणून घराकडे निघून जातो. मोठा भाऊ मात्र त्याचं-त्याचं काम आटोपुनच घरी जातो.
सकाळी दोघे पण शेतावर येतात तेव्हा लहाण्याच्या शेतात पाणी साचलेले असते, मका पूर्ण भिजलेली असते. ते सगळं दृश्य बघून त्याला डोक्यावर हात मारल्याशिवाय पर्याय नसतो.
त्यामुळे माणसाने प्रत्येक काम वेळेतच करायला हवे.
वेळेपेक्षा शक्तीशाली कुणीच नसावं.
------
गणेश सोळुंके, जालना
8390132085
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ
घड्याळबाबा भिंतीवर टिकटिक करतात आम्हाला म्हणतात सहावाजले आता उठा
गेलेली वेळ नि वय कधीही मागे फिरून येत नाही. "जो थांबला तो संपला" या उक्तीप्रमाणे हल्ली सर्वजण घड्याळा- बरोबर पळत असतात. प्रत्येक ठिकाणी वेळेला फार महत्त्व आहे. परीक्षेला वेळेत पोहोचले नाही तर परीक्षेस बसू दिले जात नाही. बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर उशीरा पोहोचले तर गाडी निघून गेलेली दिसते. त्यामुळे कोणतेही काम करायचे असेल तर वेळेतच करण्याचा कटाक्ष हवा त्यामुळे त्रास होत नाही नि पश्चाताप करायची वेळ येत नाही.वेळच्या वेळी कामे केली तर कामाचा पसाराही होत नाही.मनावर,शरीरावरचा ताणही वाढत नाही.वेळेत होणाऱ्या कामाची नेहमीच प्रशंसाही होते. म्हणून यशस्वी जीवनाचा मूलमंत्र गांधीजींनी थोडक्यात सांगितला होता."उद्याचे काम आजच कर आणि आजचे काम आत्ता कर".गांधीजी त्यांची सर्व कामे वेळेत करत म्हणूनच त्यांना आयुष्य आनंदाने जगता आले.
दरवेळी प्रत्येकाची वेळ चांगलीच असेल हे सांगता येत नाही, पण वेळेचे बंधन आणि त्या वेळेवर निर्भयपणे मात केली तर जीवन जगण्याचा ताण जाणवत नाही.त्याचा जीवनकाल चांगला,यशस्वीरित्याच जातो. वेळेचे बंधन पाळले नाही तर जीवनात प्रत्येक गोष्टींत हार पत्करावी लागते. "समजदार को इशारा काफी है" आज आपली वेळ असते तर उद्या दुसऱ्याची असते. म्हणूनच म्हटले आहे "चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" ज्यावेळेस सासु असते तेव्हा जास्त त्रास दिला तर जेव्हा सुनेचा दिवस येईल तेव्हा ती मनाप्रमाणे वागणारच आणि सासूच्या त्रासाचा बदला घेणारच. म्हणून प्रत्येक गोष्टीला संयम हवा. वेळेचा सदुपयोग करून घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे असेल तर धीराने सर्व गोष्टी साध्य होत असतात.जीवन सुकर होते.
" ही वेळही जाईल" या ओळीतच एवढे सामर्थ्य आहे की खचून गेलेल्या व्यक्तीलाही उबारा मिळतो नि तो फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उडून गगनभरारी घेतो.
सौ.भारती सावंत
मुंबई
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
" वेळ / समय "
" हा, भाऊ तू धन्य आहेस काय सांगू तुझा काल आला होता पर तुझी वेळ आली नव्हती ." असे सहज आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात एखाद्या ठिकाणी दुर्घटना हूकून गेल्यावर. एखाद्याचे सांत्वन करताना . वेळ ही सर्व प्राणीमाञाला मिळालेली देण आहे. ती चा योग्य सदूपयोग करून घेणं हे ज्याच्या त्याच्या हाती असते म्हणून मागे पहात पहात वेळ कसा व्यवस्थित घालवावा हे ज्याने त्याने ठरवावे . बहुतेक मोठी माणसं जी होऊन गेली त्यांनी वेळेचे सोने बनविले आहे . कारण एकदा का वेळ निघून गेली कि कधीच परत येत नाही
ती भूतकाल जमा होते म्हणून वेळ माणसाने जपली पाहिजे . विद्यार्थी जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे त्याने प्रत्येक वेळी सावध असलं पाहिजे , ज्या वेळी जे होणं आहे ते केलेच पाहिजे म्हणतात वेळेत जी कक्षा पादाक्रांत होणे आहे ती केलीच पाहिजे तरच टिकून राहता येते अन्यथा नाही .विद्यार्थी उपदेश हे विद्यार्थ्या विचार कर मना विद्यार्थी जीवन मिळाणार नाहीच पुन्हा . " समयाशी सादर व्हावे ." तत्पराता त्याच्या कडे असावी असा तो भाग आहे .
वेळ प्रतेक मानवाच्या जीवनातील यू टर्न देण्या घेण्याची , सुवर्ण संधी मिळवून देण्यासाठीची एक देणगी आहे . तिचा भरपूर फायदा उचलला पाहिजे . एकतर कलियुगात माणसाला अल्प अयुष्य आहे ( प्रत्येक युग संपत असताना मानवी अयुष्यातील एक शून्य कमी कमी होत गेले ) सरासरी 100 वर्ष मानवी अयुष्य मानले जाते . पण सध्या 100 पार करणारा फार फार विरळा जाणे . बरं या पैकी अर्धा वेळ राञीचाच म्हणजे झोपेतच जातोय त्यापैकी उरलेला खाणपेन मध्येच जातो आणि मग कर्तृत्व करण्यासाठी आणखी खूप कमी वेळ उरतो त्यातच किर्ती करावी लागते बघा संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांना फक्त एकवीस वर्ष च वेळ मिळाला विश्व वंदनीय माऊली बनले , जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना फक्त बेचालीस वर्षे मिळाले पंचम वेद गाथा निर्माण केला आणि अवघ्या जगाचा माथा सुधारविला . छञपती शिवाजी महाराज यांना फक्त पन्नास वर्षे मिळाले आणि एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं . वेळेचं महत्त्व या थोर मंडळीनी जाणलं आणि एवढं हिमालया पेक्षा ही भव्य असे कार्य जगा समोर मांडलं .
वेळेचे महत्व प्रत्येकाने जानले पाहिजे . वेळ कोणत्याही प्रकारे कोणाला ही माफ करत नाही .कारण विश्व वंदनीय माऊली ज्ञानेश्वरीत बोलतात " उपजे तो नासे ! नासे तो पूनरपि दिसे !! घटिका यंञ जैसे !!! परिभ्रमेगा !!! म्हणजे वेळ प्रत्येक जीवाला सारखे फिरवतोय जन्म मरण , जन्म मरण सारखे चक्र ते कसे तर घटिका यं ञ म्हणजेच घड्याळ जसे पुन्हा पुन्हा फिरून येते तसे .
वेळ ही माणसाला बदलता येत नाही पण मेहनत करून कष्ट करून ती काल वेळे ची सुवर्ण वेळ बनविता येते खटवंग नावाचा राजा मरणा पूर्वी फक्त एक तासात मोक्ष मिळवून गेला . परिक्षिती राजा सात दिवसाच्या वेळेत स्वत: मुक्त झाला कारण तक्षक सर्प त्याला दंश करणार आहे अशी आकाशवाणी होते राजा दु:खी होतो मी आता काय केले पाहिजे विचारतो मग महर्षी शुकाचार्य त्याला सात दिवस श्रीमद भागवत कथा सांगतात आणि मग राजा सात दिवसाच्या वेळेत मुक्त होतो अजरामर होतो .
थोडक्यात वेळीच जर आपण वेळेचे महत्व जाणून वेळ काढला योग्य वाटाड्या , मार्गदर्शक गुरू किंबहुना गाईड निवडला तर आपण आपल्या जीवनाचे सोने बनवू शकतो कारण योग्य माणसाच्या सानिध्यात योग्यच होत असते . त्यांनी वेळेवर विजय मिळालेला असतो . म्हणून वेळ बरबाद न करता आपल्या हाताने आपले जीवन सुधारविले पाहिजे " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " म्हणून समय बरबाद न करना ! भागवत लक्ष्मण गर्कळ (.बीड )
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ, काळ ,समय
परमेश्वर एकावेळी एक क्षण देतो तर दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. म्हणजेच वेळ ही कधी कुणासाठी थांबत नसते. वेळ ही आपले कार्य निमुटपणे पार पाडत असते.
'वेळ कुठलीच शुभ नसते किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो असे दादा धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.' आणि खरच ते योग्य पण आहे.
म्हणून माणसाने वेळीच जागे होऊन आपल्याला सोपवलेले काम योग्य करणे होय. कारण वेळ गमावणे म्हणजे शक्ती गमावणे होय. म्हणून वेळेचा सदुपयोग करून घेऊन आलेल्या संधीचे सोने करणे. कारण जेव्हा एखादी संधी आपल्याला येते ही वेळ पुन्हा येईलच असं काही नाही. कारण वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. आपल्या हातून होणारे योग्य काम, कर्म हे आपण वेळेवरच पार पाडायला हवे.
या साऱ्या जगाला व्यापून राहिलेला काळ हा कधी संपतच नाही. अनेकदा असं वाटतं की आज उद्यासाठी जगावं! पण काळाचा दगड डोक्यावर कोसळला की उद्याचा दिवस पाहायला मिळत नाही! कारण हा कठोर काळ म्हणजे साक्षात मृत्यू होय. आपण आपल्या जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवन सतारीच्या तारा केव्हा तोडतो ते समजत नाही. कालच्या आठवणी मनात ठेवून उद्याच स्वागत करावं पण काळ उद्याच दर्शन घडू देईल की नाही सांगता येत नाही.
" बळें लागला काळ हा पाठीलागी
जीवा कर्मयोगें जनी जन्म माझा झाला
परी शेवटी काळ मुखी निमाला
महाथोर ते मृत्यूपंथेची गेले
किती एक ते जन्मले आणि मेले
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
घडीने घडी काळ आयुष्य नेतो"
----- समर्थ
माणसाचा जन्म झाला तेव्हा त्याचा मृत्यू अटळ झालेला असतो. जन्म आणि मृत्यू या दोन मधल्या अंतरातील वेळ म्हणजे आपल्या हातून घडून येणारी कर्म. आपण केलेले कर्मच आपल्याला मृत्यूनंतरही अनंत काळ जिवंत ठेवत असतात. या जगात किती आले किती गेले तरी आयुष्यातील वेळ कधी कुणासाठी थांबली नाही आणि थांबणारही नाही. म्हणून वेळीच जागे होऊन वेळेचा सदउपयोग घेणे योग्य होय.कारण क्षणक्षणाने आयुष्य संपत आहे......!!!
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
समय बडा बलवान है!
मित्रांनो सर्व जग सध्या आप आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.पण हे करत असतांनाच वेळेचे भान ठेवनेहि गरजेचे आहे. आयुष्याचा जर विचार केला तर एक लक्षात येईल की ज्याने वेळेला महत्त्व दिले तो विजेता ठरला.याला कारण प्रत्येक वेळेस परीस्थिती अनुकूल राहीलच याची खात्री नाही.पण तशाही परिस्थितीत आपण कोणत्या कामावर आपला वेळ घालवला हे तितकेच महत्वाचे आहे.अतिमहत्वाच्या कामांकरिता गावाला जाणारया व्यक्तिची गाडी सुटते ,तेव्हा त्याला वेळेचे महत्त्व विचारा, नौकरी करीता मुलाखतीसाठी उशिरा पोहोचल्यावर वेळेचे महत्त्व काय असते हे त्या तरुणाच्या चेहर्यावर बघा.न ऊ महिने न ऊ दिवसांनंतर बाळाच्या जन्माच्या वेळेस मिळणारे सुख आणि दुःख त्या आईला विचारा.उन्हात रस्त्यावर घसा कोरडा झाल्यावर अचानक कोणीतरी थंडगार पाणी आपल्याला आनुन देतो आणि ते पितांना त्यावेळेस मिळणारे समाधान आणि मन शांत करणारा आनंद आठवा.घरात खुप अडचन असतांना एखाद्याने अचानक केलेल्या मदतीची ती वेळ आठवणीत राहते.आलपिक मध्ये एक सेकंदाचा फरक पडलेल्या यशाचे व अपयशाच्या वेळेचे महत्त्व त्या खेळाडूला विचारा.याचाच अर्थ पैसा, मानुस, शिक्षण या घटकांमध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे वेळ.जर वेळेचे नियोजन केले तर जिवनात यश संपादन करता येईल.पण नेहमी बर्याच लोकांचे नियोजन चुकत. नको त्या वेळेस खरेदी, उधळपट्टी, त्यामुळे आर्थिक नियोजन चुकत, शिक्षण घेतांना जबाबदारी ने विचार करून निर्णय न घेणे कींवा निष्काळजीपणा,मग नोकरी न मिळाल्याने नैराश्य पदरी पडने,लग्नाच्या वेळेस अनुभवी व्यक्तींचा सल्ला न घेणे, त्यामुळे पुढे वैवाहिक जीवनात वादळ निर्माण करून घेने. या सगळ्या गोष्टी साठी योग्य वेळी योग्य निर्णय महत्त्वाचे असतात. मुलं लहान असतांना त्याचे शिक्षण महत्त्वाचे आहे.त्याच्या साठी संपत्ती गोळा करने महत्त्वाचे नाही.नाहीतर पैसा कमविल्या जाईल आणि मुलगा काय तर अशिक्षित. वेळ गेल्यावर तो शिकु शकनार नाही पण शिकला असेल तर पुढे संपत्ती जमवुन शकेल. याहिनंतर नशिब आहेच . तुम्ही कितीही हुशार असाल तरी तुमची जर वेळ चांगली नसेल तर तुम्ही काहीही करु शकत नाही. भले भले रंकाचे राव झाले आणि रावाचे रंक झाले. वेळ कुणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हनुन वेळेला महत्त्व द्या .वेळेचा सदुपयोग करा.कल करेसो आज कर आज करे सो अब कर.
सौ मेघा विनोद हिंगमिरे .वर्धा 7798159828
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ
वेळ नाही कुणाची गुलाम
ना घालू शकतो कोण वेसण
येणार ही नाही तो कधीही परत
म्हणून वापरुया जपून आपण
वेळेच्या बाबतीत हे पूर्णपणे बरोबर आहे. वेळ,समय,टाईम,वक्त सगळ्यांना माहिती आहे. पण या वेळेचे महत्त्व ज्याने जाणले त्याने आयुष्यात यश मिळवले आहे.वेळ कधीही कुणाची गुलाम नाही. आपण सर्वजण वेळेचे गुलाम आहोत.कारण एकदा का वेळ आपल्या हातून निघून गेली की ती पुन्हा कदापीही परत येय नाही. वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची असते.अगदी एका कींवा अर्ध्या सेकंदाचा वेळही खेळाडूंच्या,तंत्रज्ञानाच्या बाबतीत कींवा शास्त्रज्ञांच्या बाबतीत तंतोतंत खरी आहे.प्रत्येक विद्यार्थ्याकडे पूर्ण एक वर्ष असते पास होऊन पुढच्या वर्गात जायला,स्वतःला सुधरायला.पण याचा वापर जर त्यांनी योग्य रितीने केला नाही, त्याकडे दुर्लक्ष केले तर ते वर्ष वाया जाते.ते पुन्हा कधीही परत येत नाही.कॉलेजकुमारही त्यांचे वर्ष फालतू दंगामस्ती करण्यात, तास चुकवण्यात घालवतात. आयुष्यातील महत्वाची वर्षे ते वाया घालवतात,जी त्यांना आयुष्यात जीवनमूल्ये व जीवनमार्ग निवडताना उपयुक्त होणार असतात. नंतर कीतीही पश्चाताप केला तर कधीही, काहीच होऊ शकत नाही. कारण ती वेळ निघून गेलेली असते.
" टाईम ईज मनी " असे म्हटले जाते.वेळ म्हणजे पैसा,धन,संपत्ती होय.कारण पैसा सुद्धा अतिशय काळजीपूर्वक खर्च करायला हवा.पैसा पुन्हा मिळवता जरी येत असला तरी तो गेलेला पैसा जातोच.पण वेळ मात्र गेली की गेली.पुन्हा परत येत नाही. म्हणून आहे त्या वेळेचा उपयोग आपण योग्य वेळेला योग्य तसाच वापर,उपयोग करुन घेतला पाहिजे.वेळ अशी गोष्ट आहे की ती आपल्या ताकदीने मानवाचे संपूर्ण जीवनच बदलवून टाकू शकते.वेळेचा योग्य वापर केला की व्यक्ती अत्यंत गरीब,संघर्षाच्या परीस्थितीतून यशस्वी जीवनात प्रवेश करतो तर वेळेचा उपयोग योग्य रितीने करुन घेतला नाही तर यशाच्या शिखरावर असलेली व्यक्ती क्षणार्धात अपयशी होउन पश्चातापाच्या अग्नीत होरपळू लागते.आज प्रत्येकजण पैशाच्या,यशाच्या,प्रसिद्धीच्या पाठीमागे पळत आहे.त्यामुळे आपल्या मुलांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही. जी मुले त्यांचे भविष्य आहेत.आताच जर मुलांना योग्य वळण लावले नाही, त्यांना वेळ दिला नाही, त्यांच्या मनात प्रेमभावना, कुटुंबातील लोकांच्या बद्द्ल सद्भावना निर्माण केली नाही. तर भविष्यात आपल्याकडे पैसा भरपूर असून पण आपुलकीने बघणारी प्रेमाची जवळची माणसे,आपली मुले असणार नाहीत. मग आयुष्यभर ज्या पैशाच्या पाठीमागे लागलो त्या पैशाचा आता काय उपयोग ? होय ना ? म्हणून वेळेला महत्त्व देऊन वेळच्यावेळी त्या त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.वेळ आपला चांगला गुरु आहे.आपल्यावर आलेल्या परीस्थितीतून जाताना कोण आपला व कोण परका हे वेळच आपल्याला दाखवून देतो.आपल्याला चांगला धडा,चांगली शिकवण देतो.
वेळ आहे संपत्ती पैसा
जपून वापर करुया
विकासाच्या वाटेवरती
कास याची धरुया
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
यशस्वी जीवनात वेळेचे नियोजन
भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जाणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवित राहलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगु शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिध्द आहेत ज्या की एकदा गेल्या नंतर परत मिळविता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली तरी परत मिळविता येत नाही. त्यामुळे आपणाजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पध्दतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतुन उठणे, खाणे, खेळणे, शाळा, शिकवणी, टी. व्ही. पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरविलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अति महत्वाचे वर्ष आहे म्हणून बाकीच्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खुप अभ्यास केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियमितपणा ठेवल्यास महत्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यास डोईजड वाटत नाही. मित्राशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टी व्ही पाहणे आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदुला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, "हे काम पूर्ण करा " अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
कल करे सो आज कर,आज करे सो अब कर
"जीवनात व्हायचे यशस्वी
तर वेळेचे महत्व जाणावे
वेळ थांबत नाही कोणासाठी
म्हणून वेळेनुसार चालावे"
प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे योग्य नियोजन करून आपला प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा अन्यथा आपल्या आयुष्याची धूळधाण स्वतःच करीत आहोत हे समजून घ्यावे.आज जगात सर्वोच्च पदापर्यंत पोहचलेली व्यक्ती अगदी वेळेच्या सेकंदाचा विचार व नियोजन करून अंमलबजावणीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.अशा व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवनाची वेल फुलवावी.जन्मल्याबरोबर बाळाला शाळेत टाकत नाही त्याचे बालपण पूर्णपणे समयविरहीत असते कारण त्याला तेवढी समज नसते पण जसजसे वय वाढत जाते तसतसे शारीरिक वाढीबरोबर मानसिक वाढ होतांना पालक म्हणून वेळेचे महत्व पटवून देण्यात यावे.आज तंत्रज्ञानी युग असल्याने वडील फेसबुक,वॉट्सअप्पवर तर आई टिक-टॉक या सोशल साईट्स वर वेळ घालवीत असतात त्यामुळे आपोआप आपल्या मुलांकडे देखील वेळ देत नाही त्यामुळे स्वतःच्या घरातील मुले देखील एकलकोंडी बनतात व अनोखा न्यूनगंड निर्माण होतो त्यामुळे वेळेचे महत्व मुलांना पटवून देण्यासाठी पालक म्हणून आपले आचरण आदर्श असायला हवे.
लहान बाळाचा पहिला गुरू आई-वडील असतात त्यामुळे आई-वडिलांनी वेळेचे महत्व जाणून कार्य करावे त्यानंतर वेळेचे महत्व पटवून देणारे गुरुजन वर्ग यांचा समाजात सन्मान असतो कारण समोरची पिढी घडविण्याचे सत्कार्य त्यांच्या हातातून घडत असते.मुलांच्या शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी खेळाला महत्व आहे त्याच प्रमाणे वेळेला देखील महत्व आहे.वेळ जगातील कोणत्याही धनाढ्य व्यक्तीसाठी देखील थांबत नाही तर मानव वेळेसाठी थांबत असतो.आज देशातीलच नव्हे तर जगातील संपूर्ण मानवजात घड्याळाच्या चक्राप्रमाणे फिरत असते.जीवनाचा विकास करण्यासाठी व महत्वपूर्ण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करणे आवश्यक आहे.महाराष्ट्रात होऊन गेलेले संत,समाजसुधारक यांनी वेळेचे महत्व जाणून कार्य केल्यामुळे स्वातंत्र्याची फळे चाखली जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस तासांपैकी अठरा तास अभ्यासकरून आजच्या तरुणाईला वेळेला अनमोल संदेश दिला आहे.'आळस मानवाचा शत्रू आहे' म्हणून मानवातील स्वभावदोष असलेला आळस व गर्व जाळून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी दिनक्रम ठरवून त्यानुसार अंमल करावा.व्हीकटर ह्युगो यांच्यानुसार,जीवन हे खूपच छोटं आहे,तरीही वेळेचा अपव्यय करून आपण त्याला आणखी छोटं करतो म्हणून 'कल करे सो आज कर,आज करे सो अब कर' हा मानस प्रत्येकांनी अंगी बानवायला हवा तेव्हाच जीवनात यशस्वी होऊ शकतो.
✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळेच महत्व:-
"काळ, क्षण, टाइम, समय, वेळ...कुठलही नाव घ्या. पण ही जीवनातील सर्वात महत्वाची व गरजेची गोष्ट आहे हे मात्र १०० टक्के एकदम खर आहे. ही एक अशी गोष्ट आहे जे कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही किंवा पैसाने विकत घेता येत नाही. हिन्दी भाषेत एक खुप छान सुविचार आहे...
“ईश्वर एक बार में एक ही क्षण देता है,
और दुसरा क्षण देणे सें पहीले,
पहीले वाले क्षण को छीन लेता है।”
म्हणजे एकदा जर वेळ गेला की तो पुन्हा परत येत नाही. वेळेमुळे अनेक गोष्टी घडतात तर अनेक गोष्टी बिघडतात. वेळे वर इंग्रजी भाषेत सुद्धा कित्येक म्हणी आहेत, जसे टाइम इज मनी (Time is money), वन हू टेक्स टाईम सिरीअसली, टाईम टेक्स देम सिरीअसली. (One who takes time seriously, time take them seriously) इत्यादि. मराठीत म्हणतात न काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
अस म्हटल जाते की, ज्या मनुष्याला वेळेचे नियोजन करता आले त्याला यशाच्या कुलपाची चावी सापडली. परंतु हे साध्य करणे किती जनांना शक्य होते. या जगात पाणी, सूर्यप्रकाश, हवा, जमीन आणि वेळ ह्या गोष्टी मनुष्य कधीही निर्माण करूच शकत नाही. आयुष्य हे सुध्दा जन्म व मृत्यू या दोन बिंदूतील अंतर आहे. मग जो "काळ "अथवा "वेळ "आपण निर्माण करू शकत नाही त्याचा उपयोग कटाक्षाने केला पाहिजे. एकदा तो हातातून गेला की तो कायमचाच जातो.
जगात सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात २४ तासच मिळतात, कुणालाही २५ तास नाही मिळत. अस असताना, या जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी का होतात? याच मुख्य कारण आहे वेळेचा सदुपयोग. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही ते अपयशी ठरतो.
कुणीही आजचा वेळ उद्या साठी वाचवून ठेवू शकत नाही. फक्त त्या वेळेचा तो योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. लक्षात ठेवा, स्वतःच्या वेळेचा स्वतःपेक्षा कुणीही योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट प्रत्येकासाठी आहे. काही वेळा तर वेळ हाच सर्वस्व बनून बसलेला असते. वेळ फक्त त्यांचाच मान राखते जे वेळेचा मान राखतात. वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून आपल्या प्रगतीत तसेच उन्नतीसाठी ती फार महत्त्वाची भूमिका बजावते.
गांधीजी नेहमी म्हणत “मी वेळेला सन्मानापेक्षा श्रेष्ठ मानतो.” आपण आपले सर्व कार्य वेळेवर केले तर सुख आणि यश मिळते. ख-या अर्थाने आज जगालाच वेळेचे महत्त्व पटले आहे.
म्हणून तर वेळ म्हणजे मानवी जगण्याला एका शिस्तबद्ध साच्यात अडकवून ठेवणारी शिस्तबद्ध गुरू आहे.त्यामुळे तर जग व्यवस्थित चालले आहे नाहीतर,वेळ सुद्धा थिजून जायची न?
😊©️✒️शुभांगी विलास पवार,(कंदी पेढा)-सातारा
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
" वेळीच वेळेला जाणावे "
मानव हा या पृथ्वीवरील सर्वांत बुद्धीमान प्राणी होय . त्याने आपल्या बुद्धीच्या व प्रयत्नांच्या सामर्थ्यावर सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली . जो मानव सतत प्रयत्न व खटाटोप करतो तो आपल्या आयुष्यात यशस्वी निश्चितच होत असतो . असा प्रयत्नवादी मानव हा वेळेला आपल्या आयुष्यात खूपच मौल्यवान समजतो . " वक्तशिरपणा " हा गुण अंगी बाळगून जीवन सार्थक करतो .
" वक्त की किमत होती हैं अनमोल !
क्योंकि लौटके न आता
बिता हुआ पल !! "
खरंच ! गेलेला काळ , वेळ परतून कधीच येत नाही . तेव्हा आजच्या वेळेची किंमत ही अनमोल - लाखमोल असते . मला एक सांगायला आपण आपले बालपण परत मिळवू शकतो का ? नाही ना .... आपण आपल्या शैक्षणिक जीवनात वेळेला महत्त्व देऊन जेवढा अभ्यास केला ..... तेवढ्याच पात्रतेची , क्षमतेची फळे आता आपण चाखत आहोत ... आता आपल्या मनात विचार येत असेल की , मी तेव्हाच जर अभ्यासाला भरपूर वेळ दिला असतो तर ..... आज मी एखाद्या भल्यामोठ्या पदावर राहिलो असतो .... मी व माझा परिवार सुखासिन झाला असता ... आता असा पश्चात्ताप करून काही होणार आहे का ? नाही ना ! म्हणून भविष्याचा विचार करून वेळेला सुवर्ण संधी मानून तिचा उपभोग घ्यावा !! कारण संधी ही दररोज आपल्या आयुष्यात येत नसते फक्त आपण वेळेवर तिचा लाभ घ्यावा लागतो . त्यासाठी अंगातील आळस व आराम कोसो दूर सारावा लागतो . " दे रे हरी पलंगावरी !! " ही वृत्ती सोडून द्यावी लागते ...
वेळ ही कठीण प्रसंगी आपली परीक्षा घेत असते . हा वेळच आपल्या जीवनात यशापयश निर्माण करतो . म्हणून योग्य वेळी योग्य काय करण्याची सवय अंर्तमनाशी बाणवून घ्यावी .
शिस्त हा जीवनाचा पाया असतो . शिवाय योग्य वेळेवर आहार , विहार , निद्रा करावी . जेणे करून मन प्रसन्न व समाधानी राहील ... ताण - तणाव , टेन्शन , डिप्रेशन , इ . पासून मुक्ती मिळेल ... स्वावलंबी बनून जगावे ... इतरांवर अवलंबून जगू नये ...
वेळेवर दैनंदिन काम करावेत ... वेळेवर ऊठणे , बसणे , खाणे , पिणे व्हावे .. योग्य पद्धतीने केल्यास कामात यश तर मिळेलच पण विश्रांतीही मिळेल ...
वाईट वेळ हीच मानवाला आपल्या - परक्याची जाणीव करून देते ... तेव्हा या वेळेलाही हिंमतीने व आत्मविश्वासाने सामोरे जावे ... कारण चांगल्या वेळी हितचिंतक मागेपुढे फिरतात ... पण संकटकाळी मात्र आपल्याकडे पाठ फिरवीतात ... हं ! काही बोटावर मोजण्या इतकी माणसं खंभीर होऊन आपल्याला संकटाशी झुंजायला प्रेरितही करीत आसतात ... तेव्हा ही संकट वेळही धैर्याने व विवेकाने आपण तोंड देऊ शकतो ...
नेहमी आपण नशीबाला दोष न देता ... आपल्यातील उणिवा व दोष जाणून घेऊन त्यांचे निर्मूलन करावे ... भलेही संकटे ही कष्टप्रद असतात ... ती त्रासदायक वेळच्या त .... म्हणून न घाबरता वेळीच पाऊल पुढे उचलले पाहिजे ... कारण ही संकट वेळच माणसाला आत्मनिर्भर बनवितात ... म्हणून आपल्याला वेळेशी मैत्री केली पाहिजे ...
" जीवनी जाणला ज्याने वेळ
तोच जिंकील आयुष्याचा खेळ !! "
तात्पर्य , वेळेचे महत्त्व जाणून एक उत्कृष्ट खेळाडू होऊन हा आयुष्यरूपी खेळ वेळेत खेळायला हवा ... तरच आपण या जीवनात प्रत्येक कार्यात जिंकू शकणार ...
अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळेचा महिमा
समय बडा बलवान होता है| असे सुभाषित आपण नेहमीच म्हणतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेही सहजच बोलून जातो. पण काळ आणि वेळ या म्हटलं तर अति भयंकर गोष्टी आहेत.
कोणती वेळ काय येईल काहीच सांगता येत नाही. एकेकाळी ज्यांच्याघरी म्हशी पुरण पोळ्या खायच्या त्यांच्या मुलांना भीक मागताना पाहून वेळेचा महिमा किती भयानक असतो याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
काल परवाच सकाळी मॉर्निंगवॉक च्या निमित्ताने रस्त्याने फिरत असताना खूप सारा जनसमुदाय राष्ट्रीय महामार्गाने त्यांच्या गावी म्हणजे उत्तरप्रदेशात पायी चालत निघालेले पाहिले. मानवतेच्या दृष्टीने सहज एका परिवाराची चौकशी केली असता असे लक्षात आले की त्यांचे वडील गावी सिरीयस आहेत. त्यांना मुलाबाळांना भेटायची ईच्छा आहे. पण महाराष्ट्रातून खास करून मुंबई वरून गावी जाणे शक्य नाही. ट्रेन बंद आहेत. शासन जायला परवानगी देत नाही. अशा वेळी अशी अनेक माणसे पायी चालत निघाली. त्यांचा मुंबईमध्ये कापड व्यापार आहे . 8 ते 10 माणसे त्यांच्याकडे कामाला आहेत. त्यांची स्वतःची गाडीही आहे. दोन वेळा त्यांनी गाडीतून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी गाडी जाऊ दिली नाही. अखेर त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. आज ते अत्यंत व्याकुळ दिसत होते. चार दिवसांपासून अंघोळ नाही .कपडे कसेतरीच. पोटात भूक.पायांमध्ये गोळे आलेले. गावातील काही समाज संस्थांनी त्यांना जेवण दिले.क्षणिक बरे वाटले असेल तरी पुढच्या प्रवासाची कल्पना न केलेली बरी.अशीही वेळ आयुष्यात येऊ शकते अशी कधी तरी आपण कल्पना केली होती का ?
हर एक का अपना समय होता है | राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. पूर्वेला सकाळी उगवणारा सूर्य सायंकाळी पश्चिमेला मावळणार असतो. पौर्णिमेला गरगरीत गोल असलेला चंद्र अमावस्येला अस्तित्वहीन असतो. झाडाला आलेली नवी पालवी खाली पडलेल्या सुकेल्या पानांना हसत असते. झाडावर झोके घेत आनंदाने डुलत असते.पण एक वेळ त्यांच्यावर अशी येते की पिवळी होऊन तीच पाने खाली गडून पडतात आणि माणसे त्यांच्यावर पाय ठेवून चालू लागतात. म्हणूनच काळ आणि वेळ यांचे भान ठेवून वाटचाल करणे ही काळाची गरज आहे.
पावसाळ्यात काही वनस्पती अचानक उगवतात, वाढतात आणि लगेचच नष्ट होतात. पण ज्या वनस्पती हळूहळू आपली मुळे घट्ट रोवतात. ऊन वारा,पाऊस यांचा सामना करायला शिकतात त्या वनस्पती वर्षानुवर्षे टिकून राहतात. अगदीच जोराचे वादळ आले तर नम्र होऊन वाकतात. ऊन आले तर पाने गळून पडतात परंतु तरीही त्या जगतात. कारण त्यांना काळाचे आणि वेळेचे भान असते.
हेच आपणही निसर्गाकडून शिकायचे आहे. आजची प्रतिकूल वेळ उद्या निश्चितपणे नसेल यावर आपला दृढविश्वास हवा. किंवा आज जर उधळपट्टी केली तर उद्याचा विनाशकाळ जवळ आलेला आहे याची जाणीव असू द्यावी.वेळ आणि काळ हे आयुष्याचा अर्थ सांगून जातात.
म्हणूनच जुन्याकडून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या असे म्हटले जाते.
सुधाकर रामदास पाटील
ठाणे
7798963063
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ /समय
ईश्वरआपल्यालााने आपल्याला अमूल्य असा मनुष्यजन्म दिला आहे. ईश्वराने दिलेल्या हा अमूल्य ठेवा वाया न घालवता त्याचा प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला पाहिजे. वेळेला , काळ ,क्षण. टाईम. समय वेळ काहीही नाव द्या. पण ही जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी परत येत नाहीत . जुन्या काळी जागो जागी एक पाटी दिसायची *Time is Money Time wasted Money wasted*.पण मला ते पटायचं नाही. कारण *पैसा परत कमवता येतो गेलेली वेळ कधीच परत येत नाही*.मी एका जागेवर अतिशय समर्पक पाटी वाचली *Time is Life Time wasted Life wasted* हे अगदी खरे आहे,वाया गेलेला वेळे म्हणजे आपले आयुष्यच वाया गेले असते. आयुष्य मर्यादित असल्याने जीवनातील प्रत्येक कृती वेळेवरच करणे आवश्यक आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे *काळ आला होता पण वेळ आली नव्हती*इथे काळ आणि वेळ जरी समानार्थी असले तरी अतिशय वेगळ्या अर्थाने वापरल्या गेले आहे इथे काळाचा खरा अर्थ मृत्यू आहे. मला असे वाटते की काळाचा, वेळेचा अपव्यय , त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांचा ताण सुद्धा मृत्यू जवळ आणण्याचे निमित्त बनते. आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात, डेडलाईनच्या युगात
प्रत्येक जण तणावग्रस्त आहे. कामाचा ताण येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो.
तणावाचे दुष्परिणाम सर्वविदित आहे. नव्वदटक्के आजारांचे मुख्य कारण दैनंदिन जीवनाचे तणाव आहे.
ह्या तणावाचे निवारण आहे का!
त्या करीता आपल्याला तणावाचे विविध पैलू जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे आणि सर्वव्यापी कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्यप्रणालीचा अभाव. नियोजनबद्ध कार्यप्रणालीचा *रामबाण मंत्र* आहे वेळेचे नियोजन. वेळचे नियोजन केल्यास दिलेली वेळ पाळली जाते. त्यामुळे
व्यक्तीची कार्यक्षमता वाढते.
कुठल्या कामाला प्राधान्य द्यावे हे कळते.
कामाचे ओझे घरी घेऊन जावे लागत नाही.
“माफ करा काम झाले नाही”, हे उत्तर मान खाली घालून द्यावे लागत नाही.
नवीन संधी चालून येतात.
तुम्हालाही वक्तशीर बनायचे आहे? तर पुढील गोष्टी काळजीपूर्वक करा.
कोणत्याही कार्याची मुदत ठरविण्यासाठी खालील गोष्टी ध्यानात धेणे आवश्यक आहे. कितीही महत्वाचे असेल तरीही त्या कामाला किती वेळ लागू शकतो, आपल्याकडे हा वेळ आहे का, काय अडचणी येऊ शकतात, या सर्वाचा विचार करून लोकांना मुदत द्या. भावनेच्या भारत येऊन कोणतेही काम पूर्ण करण्याचे वचन देऊ नये
पूर्व तयारी - काम सुरु करण्याआधी करावयाची सर्व तयारी करूनच काम सुरु करा म्हणजे अडचणी येऊन काम मध्येच थांबवावे लागणार नाही आणि वेळेत काम पूर्ण होईल.
तत्काळ सुरवात - जमेल तितक्या लवकर कामाची सुरवात करणे गरजेचे आहे. “Well beginning is half done” असं म्हणतात. उत्तम सुरवात म्हणजे काम योग्य दिशेने जाणार याची खात्री मिळते. त्यामुळे टाळाटाळ न करता काम सुरु करणे, हा पहिला मंत्र आहे.
अवघड गोष्टी सर्वात आधी- ज्या कामाला जास्त वेळ लागणार आहे किंवा तुमच्या मते अवघड आहे, ते सर्वात आधी संपले, तर हातात जास्त वेळ उरेल आणि मुदतीच्या आधी काम संपेल. त्यामुळे अवघड आणि वेळखाऊ गोष्टी आधी संपवाव्या.
लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर करा- कामाची मुदत जवळ आली असेल तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कारण जर तुम्ही तुमचं १००% एकच गोष्टींचे दिलं तरच काम गतीने संपते.
नाही म्हणायला शिका ,बऱ्याचदा “नाही” म्हणणे कठीण असते पण तेच सोयीचे ठरते. अधिकच्या कामासाठी नकार देणे आवश्यक आहे कारण डोईजड झालेल्या अनेक मुदती दिसत असतील,तर एकही काम पूर्ण होत नाही. त्यापेक्षा जे आहे तेवढेच नीट करणे आणि वाढीव काम अंगावर न घेणे शहाणपणाचे आहे.
_मुदत चुकली तर काय करावे_?
कोणतेही काम पूर्ण करताना काय अनपेक्षित अडचणी येतील आपल्याला सांगता येत नाही. पण काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी कंबर कसून काम करणे आपल्या हातात आहे. सर्व काळजी घेऊनही मुदतीची वेळ पाळू शकला नाहीत, तर घाबरू नका. काम पूर्ण न होण्याचे काही वैध कारण तुमच्याकडे असेल, तर ते स्पष्ट करा आणि माफी मागा. कामाची मुदत वाढवून देण्याची विनंती तुम्ही करू शकता. तुम्हाला पुढची मुदत मिळत असेल, तर उत्तमच. तुम्हाला मिळालेली _दुसरी संधी असेल ती_.
नियोजन हा ईश्वरी गुण आपल्याला आयुष्यात सदैव उपयोगी पडतो. तो आपला बहुमूल्य वेळ आणि श्रम वाचवतो. त्यामुळे नियोजन कौशल्य शिका आणि आनंदी जगा हे आपण आपल्या मुलांना अगदी ठासून सांगितले पाहिजे.
मुलांना सुद्धा नियोजनबद्ध कार्यप्रणालीचे महत्त्व,आणि त्याचे लाभ समजवून सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. निश्चित केलेल्या वेळेप्रमाणेच सर्व कृती करणे, म्हणजेच नियोजनाप्रमाणे कृती करणे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळेची अधिक बचत होऊन अल्प वेळेत आपली अधिक कामे होतात. अशा प्रकारे वेळेचा वापर आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो.म्हणजेच नियोजनाप्रमाणे कृती करणे. नियोजनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळेची अधिक बचत होऊन अल्प वेळेत आपली अधिक कामे होतात. अशा प्रकारे वेळेचा वापर आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो.
मुलांना दैनंदिनी जीवनाच्या छोट्या गोष्टी मधून वेळेचे नियोजन करण्याचे धडे पालकांनी दिले पाहिजे. हे सोपे नाहीच पण चिकाटीने कधी खेळाच्या माध्यमातून तर कधी चुरशीने कार्य वेळेवर करायची सवय लावणे अतिशय आवश्यक आहे. पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त स्पर्धात्मक आयुष्य जगण्याची वेळ येउ शकते. त्या करीता त्यांना सज्ज करण्याची जवाबदारी आपलीच आहे.
डाॅ.वर्षा सगदेव
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ अमूल्य आहे
शलाकाचा आज शेवटचा पेपर होता आल्याबरोबर आईने विचारले का ग कसा होता पेपर? शलाका थोडी नाराजीने म्हणाली अग आई काय सांगू वेळच पुरला नाही निबंधाचा प्रश्न शेवटी लिहिला आणि तिथेच फसगत झाली माझी मार्क गेले ग .शलाका खूप हळहळत होते हे सर्व आजोबा ऐकत होते आजोबा म्हणाले वेळेवर सराव केला असता निबंध लिहीण्याचा तर मार्क गमावण्याची ही वेळ आली नसती. शलाका म्हणाली बरोबर आहे आजोबा तुमचं मी निबंध लिहिण्याचा सराव केला असता तर आज मार्क गमावण्याची ही नामुष्की माझ्यावर आली नसती.
शलाकाच्या बाबांना ऑफिसला जायचे होते दहा वाजता बस होती शलाकाच्या आईला ते म्हणाले आवर पटकन किती उशीर झालाय आज नक्की मला लेट मार्क पडणार तुझ्यामुळे आजी म्हणाली तिच्यामुळे कशाला तू उशिरा उठलास वेळेचे महत्त्व नाही आणि मग असं ओरडत बसायचं रात्री उशिरापर्यंत जागरण करायचं मग सकाळी लवकर उठायचं नाही मग उशीर नाही होणार तर काय रे लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा मिळेल वेळेचे गणित कधी समजणार तुम्हाला वेळेचे गणित चुकलंय की आयुष्याचे गणितही चुकतय बर का लक्षात ठेव .
शाळेतील मुलं ,नोकरदार महिला, नोकरदार पुरुष , व्यावसायिक असोत की शेतकरी सर्वांना वेळेचे महत्त्व आहेच आता वेळेवर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला ही त्याच्या पिकाला मुकावे लागते म्हणजेच प्रत्येक गोष्ट वेळत झाली पाहिजे . वेळेचे बंधन निसर्गालाही असते बरं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यात हिवाळा ,तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यात उन्हाळा असे निसर्गाचे अविरत चक्र चालू असते निसर्ग या वेळेमध्ये कार्य करू शकला नाही तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण पृथ्वीवर आपणा सर्वांना पाहायला मिळतात. वेळेत पाऊस पडला नाही तर दुष्काळाला सामोरे जावे लागते आणि वेळेनंतर पाऊस पडला तर पिकांचे नुकसान होते म्हणजेच पावसालाही वेळेचे गणित समजून घ्यावं लागतंच निसर्गातील प्रत्येक घटक वेळेनुसार कार्य करत गेला तरच कालचक्र व्यवस्थित चालते नाहीतर निसर्गचक्र बीघडते आज वेळ सांगण्यासाठी आपल्याकडे घड्याळ ,कालनिर्णय ,मोबाईल, स्टॉपवोच अशा कितीतरी वस्तू आहेत दिल्लीमध्ये जंतर-मंतर याठिकाणी फार पूर्वीचे असे घड्याळ बनवलेले आहे सूर्याच्या सावलीवर आधारित असे हे घड्याळ आहे. पूर्वी वाळूचे घड्याळ होते त्यावरून वेळ समजायची माझी आजी ओसरी मध्ये आलेल्या उन्हावरून दिवसभराचे वेळापत्रक सांगायची. पूर्वी शेतकरी कोणत्या नक्षत्रावर पाऊस पडणार् किती प्रमाणात पडणार् त्यानुसार कोणते पीक घ्यायचे हे ठरवत असे शेतीची कामेही त्यानुसारच ठरवत असे. आजच्या काळात हवामान खाते पावसाचा अंदाज वर्तवते व त्यानुसार सगळीकडे निर्णय घेतले जातात.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर शाळेत जाणे वेळेवर अभ्यास करणे वेळेवर सूचनांचे पालन करणे वेळेवर खेळ ,अभ्यास जेवण ,मौजमजा,झोप या गोष्टींची सांगड घालण्याचे महत्त्वाचे असते अन्यथा शारीरिक ,मानसिक नुकसान होऊ शकते.
एका गृहिणी साठी घरातील स्वच्छता वेळेवर करणे वाणसामान वेळेवर आणणे धान्य वेळेवर निवडणे कोणत्या ऋतूत कोणता आहार असावा याचे नियोजन करणे ,वेळेवर जेवण बनवणे ,सर्वांना वेळेवर जेवायला देणे घरातील सर्वांचे आरोग्य जपताना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे हे महत्त्वाचे आहे यातील एका जरी गोष्टीला वेळ कमी-अधिक मिळाला तर तिचे स्वतःचे तिच्या कुटुंबाचे शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान होऊ शकते.
एका व्यावसायिका साठी त्याने आपला व्यवसाय वेळेत सुरु करणे अथवा बंद करणे वेळेत आपल्या ग्राहकासाठी वस्तू उपलब्ध करून देणे वेळेत हिशोब ठेवणे इन्कम टॅक्स वेळेत भरणे ही कामे महत्त्वाची आहेत ही कामे करण्यास उशीर झाला तर त्याचेही आर्थिक मानसिक नुकसान होऊ शकते.
अहो आपली पृथ्वीदेखील वेळेचे बंधन पाळते ती स्वतःभोवती चोवीस तासात एक फेरी पूर्ण करते तर सूर्याभोवती एक फेरी 365 दिवसात पूर्ण करते म्हणजे पृथ्वीला देखील बंधन पाळावे लागते निसर्गाला वेळेचे बंधन आहे मग तुम्ही आम्हीदेखील वेळेत सर्व कामे का करू नयेत?
इन्कम टॅक्स वेळेत भरणे, पाणीपट्टी, घरपट्टी, लाईट बिल वेळेत भरणे, घराचे कर्जाचे हप्ते वेळेत भरणे ही कामे वेळेत केली तर आपली व देशाची उन्नती होते आर्थिक नुकसान टळते. डॉक्टरांनी सांगण्यापूर्वीच सकाळी नियमित व्यायाम करणे योगासने करणे अशी वेळेत कामे केली तर आरोग्य राखले जाते वेळेवर कामे झाली नाहीत तर काय नुकसान होते हे तर आपण पाहिले परंतु वेळेत कामे होण्यासाठी वेळापत्रक कसे बनवायचे ते देखील पाहूया शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे व्यावसायिकाने वर्षभरात आपल्याला कोणकोणते व्यवसाय वाढवायचे आहेत कसे वाढवायचे आहेत किती प्रमाणात वाढवायचे आहेत त्याचे वेळापत्रक करावे गृहिणीने तसेच कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने घरातील करावयाच्या कामाची यादी करावी कुटुंबातील सर्वांनी मिळून घरातील कामाचे वेळापत्रक बनवावे त्यानुसार काम करावे वृद्धांनी आपल्या आजार आजारपणाची काळजी घेण्यासाठी औषधे कधी घ्यायची जेवण कधी करायचे याचे वेळापत्रक बनवावे कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्याला कोणते कौशल्य सिद्ध करायचे त्यासाठी किती वेळ द्यायचा याचे वेळापत्रक बनवावे आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहेत ती नाती आजी-आजोबा आई-वडील काका-काकू मित्र-मैत्रिणी सहकारी पती-पत्नी मुले यांनादेखील किती वेळ द्यायचा हे ठरवायला हवे म्हणजे नाती जपली जातील आणि वेळेत सावरतील बहरतील . निसर्गाशी संवाद साधण्यासाठी निसर्गासाठी देखील थोडा वेळ द्यायलाच हवा वेळेचे हे वेळापत्रक ज्याला बनवायला जमेल आणि त्यानुसार वागायला जमेल त्याच्यासारखा आनंदी मनुष्य जगात दुसरा नाही.
पैशाने होणारे नुकसान भरून निघते पुन्हा कमावता येते परंतु वेळ निघून गेल्यावर हातात पश्चातापखेरीज काही उरत नाही.कोणी केलेल्या मदतीसाठी वेळेवर आभार मानणे, एकमेकांना वेळेवर मदत करणे वेळेवर चूक मान्य करून ती सुधारणे यासाठी वेळ द्यायलाच हवा म्हणूनच वेळ अमूल्य आहे हेच खरे वेळेचे मोल ज्याला कळले तोच खरा रत्नपारखी.
सविता वी साळुंके
9604231747
salunke savita42@gmail. com
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
वेळ
Time is money
वेळ ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.वेळ कालही महत्वाची होती,आजही आहे आणि उद्या पण राहणार. वेळ विनामूल्य मिळते पण ती अमूल्य आहे.वेळ विकत घेता येत नाही पण वापरता येते. वेळ साठवून ठेवता येत नाही पण वापरता येते पण वेळ निघून गेली की पुन्हा परत येत नाही.
जर तुम्ही ज्ञान,नाती किंवा पैसा निर्माण करत नसाल तर तुम्ही वेळ व्यर्थ घालवत आहात. गेलेली वेळ पुन्हा येत नाही.वेळ गोष्टी घडवत असते.जो माणूस आपल्या आयुष्यातील एक तास व्यर्थ घालवतो त्याला आयुष्याची किंमत समजली नाही.वेळ हा सर्वात चांगला शिक्षक आहे.वेळेने आयुष्य बनलेले आहे.वेळेची गुंतवणूक करा.
नुसते व्यस्त असून फायदा नाही,तुम्ही काय करत आहात याला महत्व आहे.
वेळ ही वाळू सारखी असते. वाळू जशी हातातून निसटते तशीच वेळही आपल्या आयुष्यातून नकळत निसटून जाते.वेळेची किंमत 1 सेकंदाने हरलेल्या धावपटूला विचारा, अंथरुणावर शेवटचा श्वास मोजणाऱ्याला विचारा. वेळेचे महत्त्व जाणा व ध्येयाला लागा.
कधीही कोणाच्या वेळेला हसू नका. आज जी वेळ समोरील व्यक्तीवर असते ती आपल्यावर पण येऊ शकते .वेळेचा अपमान करू नका.जो वेळेची किंमत जाणतो तो यशस्वी होतो.
संत कबीर यांनी म्हटले आहे "कल करे सो आज कर,आज करे सो अब..." कोणतेही काम करताना नंतर करू असे न म्हणता आतापासून सुरुवात करावी कारण वेळ पुन्हा येत नाही.
निलम गायकवाड( पुणे)
6/5/2020
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
'करू सदुपयोग वेळेचा'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
हिन्दी भाषेत एक खुप छान सुविचार आहे...
'ईश्वर एक बार में एक ही क्षण देता है,
और दुसरा क्षण देने से पहिले,
पहिले वाले क्षण को छीन लेता है।'
एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा परत येत नाही.जीवन क्षणभंगूर आहे.प्रत्येक क्षण महत्वाचा....!!म्हणूनच जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती वेळ. इंग्रजी सुभाषिता मध्ये Time is money असं म्हटलं गेलं आहे.
वेळ अनेक प्रकारची असते.चांगली वेळ जगण्यातील आनंद वाटायला तर वाईट वेळ कसं जगावं हे शिकवण्याचे काम करते.या दोन्ही वेळांच्या दरम्यान आपण कसे वागतो त्या वरून नियती आपल्याला वेग वेगळे धडे शिकवून जाते.म्हणूनच कदाचित काळाच्या उडीला....'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'असं म्हटलं जातं असावं.
वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे.साधली तर भले आणि नाही साधली तर पुन्हा तशी वेळ हाती लाभणे कठीण.म्हणूनच 'मौका देखके चौका' मारणारा जीवनात यशस्वी होत असतो.म्हणूनच ज्याने 'वेळ ' सांभाळली त्याने यशाचं शिखर गाठलंच..!
वेळेचे महत्त्व सर्वाना समजूनही प्रत्येकजण वागताना मात्र दिसत नाही.आळस आणि मनोरंजनात गुरफटलेल्या तरुणाईला आपल्या शिळोप्याच्या गप्पांमधून उसंत न मिळाल्याने त्यांना वेळ अपुरा पडतो आणि त्याच वेळी कामात व्यस्त असलेल्या उद्योमशील व्यक्ती मात्र आपली उद्योगशिलता सांभाळून सर्व आवश्यक गोष्टींना पुरेसा वेळ देतो.'वेळ मिळत नाही'असा बहाणा सांगणारे झोपाळू वीर बरेच असतात.ज्यांना भरपूर वेळ असूनही योग्य नियोजना अभावी त्यांना वेळ कमी पडत असतो. म्हणूनच संत कबीर म्हणतात--
'कल करे सो आज कर
आज करे सो अब
पल मे परलय होयेगा
बहुरी करोगे कब'
वेळ हा वाहत्या पाण्यासारखा असतो .ज्या प्रमाणे वाहते पाणी तहान भागवत भागवत पुढे पुढे जाताना... जो या गंगेत हात धुण्याची संधी साधतो त्यालाच त्याचा लाभ मिळतो.तसेच वेळेचं आहे....वेळ ही सतत पुढे जात असते....जगात सर्व काही पुन्हा मिळू शकते पण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून ज्याला वेळ साधता आली त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणे हा जरी शिस्तीचा भाग असला तरीही वेळेचे व्यवस्थापन सांभाळणं हा देखील महत्वाचा भागवआहेच.
वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जी कोणासाठीही कधीच थांबत नाही. म्हणून तर तुम्ही किती कष्ट करून किती मोठे झालात ते फक्त आणि फक्त तुम्ही वेळेचा उपयोग कसा केला आहात यावर अवलंबुन असते.तुम्ही आम्हीच नव्हे तर संपूर्ण जगच वेळेचे गुलाम आहे आणि ते वेळेबरोबरच चालते.
जगात सर्वांनाच सारखा वेळ मिळत असतो.सर्वांना एका दिवसात २४ तासापेक्षा जास्त वेळ मिळत नाही . तरीही जगातील बरीच माणसे यशस्वी होतांना तर काही माणसे अपयशी होतांना दिसतात. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही तो अपयशी ठरतो. वेळ कुणीही धरून ठेऊन साठवू शकत नाही. पुढील काळासाठी वेळ वाचवण्यासाठी हळू हळू का होईना प्रत्येक क्षणाचा उपयोग करता आला पाहिजे.
म्हणूनच प्रत्येकाने संत रामदास स्वामींचा
घटका गेली पळे गेली
तास वाजे झणाणा ।
आयुष्याचा नाश होतो
राम कां रे म्हणाना।।
हा बोध लक्षात घेऊन स्वतःच्या वेळेचा स्वतःपेक्षा कुणीही योग्य प्रकारे वापर करू शकत नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
.. वेळ. . वेळ आपल्या जीवनात अतिशय महत्वाची आहे .वेळ मौल्bयवान आहे.वेळेचा सदुपयोग करणारे लोकं आपल्या जीवनात यशस्वी ठरत असतात.तर काही लोक काहीच न करता वेळच नाही असे म्हणत असतात. व शेवटी नशिबाला दोष देत असतात. काही लोक वेळेचे बंधन पाळत असतात.वेळेचे महत्त्व पाळणारे लोकं सद्बुद्धी तून यश मिळवत असतात.वेळ ही बहुमूल्य आहे. वेळे संबंधी एक विचारवंत सांगतात की "एका वर्षाचे मोल काय असते हे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा.," . ". "एका महिन्याचा मोल काय असते हे बाळाला अकाली जन्म देणाऱ्या आईला विचारा.". " " एका दिवसाचे मोल काय असते हे साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा.". "एका तासाचे महत्त्व काय असते हे भेटीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रेमिकाना विचारा.,". " एका मिनिटांचे मोल काय असते हे गाडी चुकलेल्या व्यक्तीला विचारा". "एका सेकांदाचे महत्त्व काय असते हे अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा" " एक मिली सेकंदाचा मोल काय असते हे ऑलिंपिक मध्ये दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या धावपटू ला विचारा." म्हणून वेळ ही मूल्यवान आहे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर लोकाकडे अजिबात वेळ नाही.सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्यावर चालत असतात.आणि आपली प्रगती घडऊन आणतात .व इतरांसाठी सुद्धा वेळ देत असतात. स्वतः साठी तर सर्वच जगतात पण इतरांसाठी जगण्या मध्ये अधिक आनंद असतो. वेळ मर्यादित आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने वेळेचा सदुपयोग करून घ्यावं. भूतकाळाचा विचार करून भविषाची शिदोरी जपून ठेवता येते. ... जीवन खासवत भंडारा 9545246027
••+••+••+••+••+••+••+••+••+••+••+••
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें