मंगलवार, 26 मई 2020

रोज एक लेख :- दिवस एकोणचाळीसावा कोरोनाला पत्र

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- एकोणचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 27 मे 2020 बुधवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- कोरोनाला पत्र*
( शीर्षक मुलांचे कोरोनाला पत्र, आईचे कोरोनाला पत्र, बाबाचे कोरोनाला पत्र आपली कल्पकता वापरून आपण पत्र लिहायचं आहे.. )

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
१)*कोरोनाला पत्र*

अरे,
कोरोना,
         साष्टांग दंडवत...
मी तुला प्रिय म्हंटलं नाही.आणि म्हणणार पण नाही. का म्हणू तरी. पण तुला दंडवत घातला आहे. होय तुला दंडवत घालून आज पोटतिडकीने मी तुला या पत्रातून विचारतोय,' कधी जाणार आहेस तू ..? खूप वैताग दिला आहेस तू.' तुला चांगल्याच शीव्या हसाडायला पाहिजेत. पण मी पडलो हळव्या स्वभावाचा.... शिवाय शिव्या देऊन तुझ्यात काय फरक पडणार. अरे एका माणसाला, एका घराला, एका गावाला, एका तालुक्याला, एका जिल्ह्याला, एका प्रांताला का एका देशाला... तू तर या अख्ख्या जगाला व्यापला आहेस. बरं काय तुझी ती निर्दयता, कोणाच्या ध्यानीमनी नसताना सर्वांना आपल्या आचार विचाराने वर्तन बदल करायला लावला तू. तुझ्या धास्तीने बंदिस्त झाली लोकं, जगात महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या राष्ट्रांना नमावलंस तू. प्रगती आणि निसर्गावर मात करू पाहणाऱ्या अहंकाराने टम्म फुगलेल्या माणसाचा फुगा तू सहज फोडलास. आणि विशेष म्हणजे कोणाच्याही दृष्टीस न पडता. हा आम्ही चुकलो आहे, आमची चूक आम्हाला पण कळते आहे. पण त्याची एवढी मोठी सजा आम्हाला देऊ पाहतोस. अरे एका घरात तरी चार माणसाचे विचार एक असतात का..? आणि एवढ्या विशाल असणाऱ्या जगामध्ये सर्वांच्या आचार आणि विचार आणि आहार प्रवृत्ती कशा सारख्या असतील. होय चुकला माणूस... निसर्गाच्या अन्नसाखळीत बाधा आणली त्यांनं, मांजर, कुत्रे, बेडूक , वटवाघुळ हे काय माणसाचे अन्न आहे का...? पण केला मूर्खपणा. पण काही मोजक्या लोकांसाठी अख्ख्या जगाला तू वेठीस धरलं. अजिबात पटलं नाही मला. हां तुला मजा वाटली असेल, माणसं बंदिस्त झाली आणि पशुपक्षी स्वच्छंद झाले. हो खरं आहे त्यांनी स्वच्छंद राहावं, ते स्वच्छंदी असायलाही पाहिजेत. पृथ्वी काही एका माणसाची एका व्यक्तीची किंवा माणूस जातीची नाही  ती संपूर्ण प्राणिमात्रांची आहे. हे माणूस विसरूनच गेला आहे. ते सांगण्यासाठी तर तू आला नाहीस ना... काही असो बाबा तू थोडं अति केलेस. काही दिवस तुझी दहशत बरी वाटली परंतु तुझा वाढता प्रादुर्भाव पाहता  तुझा राग येऊ लागला आहे. अरे किती दिवस घरात बसणार माणसं, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण मिटवणार, हातावर पोट असणाऱ्या लोकांनी जगायचं कसं घरात बसून. उद्योगधंदे बंद पाडले, आर्थिक कणा दुबळा करून ठेवलास तू. रोजगार बंद पडले लोकांचे. कितीतरी कामगार स्थलांतरित झाले. जातानाचे त्यांचे हाल पावले नाहीत या डोळ्यांना. कोणी मिळेल त्या मार्गाने आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला. हजारो किलोमीटरचा प्रवास पायी चालत पार केला काही लोकांनी. हातात पिशव्या कमरेवर लेकरू खांद्यावर लेकरू. त्यांचे हाल पहावत नव्हते रे. रस्त्यातच बाळंत होण्याची वेळ एखाद्या भगिनीवर यावी... अकरा वर्षाच्या मुलाने सायकलवरून आपल्या  बापाला बाराशे किलोमीटर घेऊन जावं..? किती किती यातना पाहिल्या या डोळ्यांनी किती किती त्रास सहन केले त्या जीवानी. माणसावर अवलंबून असणाऱ्या मुक्या प्राण्यांनाही किती त्रास सहन करावा लागला तुझ्यामुळे... शहरात फिरणारी मुकी जनावरे, कुत्री, अचानक माणसे गायब झाल्यामुळे उपाशी राहू लागली. कर्तव्य मध्ये कसूर न करणाऱ्या डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार आणि तत संबंधित व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. आणि तुझ्यामुळे येणारं मरण तरी किती दुर्दैवी. न रडणारे जवळ, ना नातलग जवळ, ना मृतदेहाचा सन्मान.... फार फार विचित्र दिवस आणलेस तू.
कोरोना तुझ्यामुळे काही चांगल्या गोष्टीही झाल्या आहेत. पण तुझ्या दहशती मध्ये आम्ही फार गळून गेलो आहोत. त्यामुळे तुझ्या कडून चांगल्या गोष्टी झालेल्याचे मी समर्थन इथे करणार नाही. कारण तुला ते गोड वाटेल. आणि जाण्याचे नाव घेणार नाहीस. म्हणून तुझा चांगुलपणा मी बाजूला ठेवतो. आणि तुला निर्वाणीच्या भाषेत सांगतो, बस कर आता लाखो लोकांना सोबत घेऊन तू चालला आहेसच, पण आता थांब. बंद कर तुझे हे थैमान. माणसाची शरणागती लाचारी किंवा मजबुरी असं काही तू समजू नकोस. कारण तू पहिला नाहीस.,, या जगाने अशी अनेक संकटे असे अनेक महामाऱ्या यापूर्वीही सोसल्या आहेत. तुझ्यावरही मात करून माणूस पुढे जाईल यात वाद नाही. परंतु तुझ्या निमित्ताने माणसाला माणूसपण कळाले आणि आपली चूकही कळाली. तेव्हा एखादा विषय किती ताणायचा या बाबत विचार करून तू थांबले पाहिजेस.......
संपूर्ण मानव जातीच्या वतीने मी तुला कळकळीची विनंती करतो आता तू गुमान निघून जा. बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं खूप आहे. पण मी सांगावे आणि तू ऐकावे अशातला भाग नाही. कारण मी जे सांगणार आहे ते तुला सर्व ठाऊक आहे. कारण तुझ्या प्रतापाचीच ती देणं आहे.
ठीक आहे तू जाशील अशीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा भेटण्याची मुळीच आस नाही. तुला थांबण्याचा तर आग्रह मुळीच करणार नाही.
कळावे......
लोभ नसावा, मुक्काम हलवावा...
          तुला वैतागलेला एक पृथ्वीवासी.

        *हणमंत पडवळ*
        *उस्मानाबाद*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*कोरोनाला पत्र*

*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर(02)*

प्रति,
कोविड-19 विषाणू
        पत्र लिहिण्याचे कारण हेच आहे की,मानव हा जगातील एक बुद्धिमान प्राणी आहे.मानवाने या विज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.निरनिराळे रोग,विषाणू,जिवाणू यांची ओळख अगोदरचीच आहे पण कोविड-19 हा जीवघेण्या विषाणूणे भारतासह संपूर्ण जगात थैमान घातले आहे.तुझ्या हाहाकारामुळे सारी जनता भयभीत झाली आहे.अरे,कोरोना जगातील आर्थिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांनाही हादरवून सोडले.आणखी किती थैमान घालशील आणि बळी घेशील. अदृश्य,सुक्षतम तू तरी या मानव जातीला घरी बसवलास. संपूर्ण जगाची आर्थिक घडी कोलमडण्यास कारणीभूत आहेस.ज्यांचे हातावर पोट आहेत त्यांचे किती हाल केलास रे???किती सारे मजूर,कामगार रोजगाराच्या निमित्ताने शहरवाशी झाले होते त्यांना उपाशी मरण्याची पाळी आणून ठेवलीस तू..खूप झालं कोरोना आता यापुढे सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी या पृथ्वीतलावरून लवकरात लवकर निघून जावे अन्यथा आमची मानव जात तुला ठेचून मारल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे.

     कोरोना तू काही प्रमाणात मानवाच्या वृत्ती,प्रवृत्तीत बदल केलास हे उत्तमच झालं असं वाटतं.भारतीय संस्कृतीपासून दूर पळून जाणाऱ्या लोकांना वठणीवर आणले ते बरंच झालं.पाश्चिमात्य देशाच्या संस्कृती भारतीय लोकांच्या वळणी पडायला लागली होती याला वेळीच आळा बसवलास कोरोना तू हे योग्यच केले.तुझ्यामुळे खूपच स्वच्छतेची सवय लागली आजपर्यंत शासनाने 'स्वच्छ भारत अभियान' राबवून अनेक योजना वापरून पैसेही खर्च केलेत पण सध्या आपोआप स्वच्छतेकडे वळले आहे.त्यामुळे निसर्गात झालेला बदल म्हणजे खूप प्रदूषण झाले होते.सर्व उद्योगधंदे,कारखाने,वाहतूक,दळणवळण बंद झाल्याने प्रदूषण आपोआप कमी झाले आणि आजवरी मानव पक्ष्यांना बंदिस्त केले होते ते सारे पशु-पक्षी मुक्त संचार करीत असतांना दिसत आहे हे केवळ कोरोना तुझ्यामुळे शक्य झाले आहे म्हणून अधिक काळ राहून आणखी मानवाला आणखी अद्दल घडवू नका. मानवाला आता कळले आहे.स्वार्थी बुद्धी सोडून निःस्वार्थ वृत्ती नक्कीच धारण करणार आहे.कोरोना तू आता आणखी सूडबुद्धीने मानवाशी वागू नकोस.
        आज पर्यत जगात तुझ्यासारखे नाना विषाणू आले आणि कायमचे गेलेत.म्हणून माझा एक प्रश्न आहे की,तू जेवढा चांगला केला आहेस त्याच्या चौपट नुकसानकारक ठरला आहेस.सारी मानवजात तुझ्यामुळे वैतागलेली आहे.एकमेकांच्या स्पर्शाने प्रसार होत असल्याने माणसं माणसापासून दुरावत चालला आहे.माणुसकी हरपत चालली आहे.प्रत्येक कुटुंब,गाव,तालुका,जिल्हा,देश,जग यात प्रत्येक माणूस दुसरीकडं खोचक वक्रदृष्टीने बघतो आहे.भाऊ,बहीण,बाप,लेक यांच्या पवित्र नात्यात होणारे सोहळे देखील आनंदात करू शकत नाही आहेत त्यामुळे संपूर्ण मानवाच्या आनंदाला विरजन पडले आहेत त्यामुळे कोरोना माझी तुला विनंती आहे की,कृपया या पृथ्वीतलावरून दूर निघून जावे.
धन्यवाद

तुझाच
एक वैतागलेला प्रवाशी
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
***  कोरोनाला पत्र **
    प्रति ,
    पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला मनातून भीती घालणारा रावण कोरोना,
        साष्टांग दंडवत..
    खरंच कोरॉना, काय तुझी ताकद ,काय तुझी हिम्मत ऐवड्या दिवसाचे तलवारीच्या धाकाने,बुद्धी मत्तेच्या जोरावर हवे तेही काम केले आणि नाही तेही कामे केली.अहंकार माजला होता.धुमाकूळ माजला होता.तो सर्व क्षणात काही काळातच सर्वांना एका दावणीला बांधून घरात कोंबलास. वा !तुझ्या पेक्षा महान समजाव कुणाला .सर्व माणसांना दारे खिडक्या लाऊन घरात बसायला लावलाच आहेस .पण माणसं देवाचा आधार घेतात म्हणून तू मंदिराची दारे पण बंद करायला लावलास. मंदिरा पर्यंत सुधा लोकांना धाव घेऊ दिला नाहीस ,तुला सर्वावर अन्याय करून मीच मोठा आहे असं मिरावायच होत ना ,तुलाच काही दिवस महासत्ता गजवयाची होती ना. मोठे मोठे राष्ट्र महासत्ता बनण्याच्या तालात माणुसकी विसरले होते .त्यांना धडा शिकवला ना तू .हो जर तु जगाला आतातरी जगायला संधी दिली तर तुझं नाव आता इतिहासात अजरामर होईल,
    सर्व मानव जीवात लहान पासूनच वरुद्ध मनसा पर्यंत सगळ्यांच्या मनात तुझी भीती भरली आहे भीती पेक्षा धस्की पण भरली आहे.
 काय तुला काहीच कदर  नाही येत आहे का? गोर गरीबांचे हाल होत आहेत,खाण्यासाठी त्यांच्या कडे जेवण नाही.हजारो लोक पायी आपल्या गावाकडे जात आहेत.अरे ते गावात काम धंदे नाहीत .पोट भरत नाही म्हणून गाव ,प्रांत सोडून आले होते.अता ते परत जातील गावात तर त्या गावाचे लोक त्यांना काय म्हणतील .आणि परत जाऊन काय करतील.काही लोकांनी गाव सोडून २०/२२वर्ष पण झाली गावात त्यांना मोजके लोक ओळखतील त्यांनी काय करावं थोडी आतातरी आमची काळजी घेरे !
     अरे तू किती निर्दयी आहेस तुला थोडी सुधा मनाची आणि जनाची लाज वाटली नाही चालत आपल्या गावाकडे जात असताना  दिवस भर चालून  येत  असताना रात्री थोडासा विसावा घेण्यासाठी औरंगाबाद येथे  रेल्वे पट्री जवळ झोपलेल्या १६ जणांचा तू जीव घेतला आहेस .तू ऐवढा धुमाकूळ घातला सर्व तुझ्यापासून कंटाळले आहेत.
  तुझा थोडा सुधा धीर कसं नाही खचला यवतमाळ जिलह्यातील अर्णी येथे .निष्पाप चार लोक मरण पावले आणि १७ लोक जखमी झाले. किती मानव जीवावर दहशत माजवला आहेस तू .
     उत्तर प्रदेश मध्ये अपघातात काही लोकं मरण पावले .तू सगळ्यात जास्त सजा ,दुःख फक्त  गोरगरिबांना दिलास .आणि लहान बालकांना.का बरं तुला मानव जातीवर राग येतो .
       तुझेही काही चुकले नाही मानवाने निसर्ग आपली  गरज पूर्ण करतो हाव नाही. ही गोष्ट माणूस विसरला होता .आणि स्वच्छंदी वागत होता.प्राण्यांना थारा नव्हता परंतु जंगली प्राण्यांनी तुझे कर्तव्य पाहून संधी साधली .मोठ्या मोठ्या शहरात माणसांना तू घरात कोंडलास ना तर सर्व प्राणी, पक्षी मोठ्या मोठ्या शहरात शिरून त्यांना वाटत होते की आपणच या शहराचे मालक आहोत .बरोबर आहे म्हणतात ना प्रत्येकाचा एक दिवस येतो.तू बरोबर  गाव आणि राव यांना सगळ्यांना एका दावानित बांधलास किती कल्पना मोठी आहे रे तुझी.
    मोठ्या मोठ्या शहरात लोक मुठीत जीव धरून जीव जगत आहेत .घरी राहिले तर घरी खाण्यासाठी काही नाही .आणि बाहेर निघाव तर तू तोंड वासूनाच उभा आहे. माझे पण कुटुंब आहे ना रे मी आता काय करू .मला काही झाले तर माझे कुटुंब उघड्या वर पडेल.खरंच तू किती खोडकर आहेस.
    हा.अजुन एक  सांगायचे म्हणजे तुझा जन्म चीन मध्ये युहोन शहरात झाला पण वीणा शस्त्राने जगावर हल्लाबोल करून जगाचा राजा बनला.काय तुझी युक्ती भारी आहे.
       तुला कसा थोडासा विचार येत नाही की माणसाचा सडा तयार केलास शासनाला हात बल केलास .या वेळी सर्व लोकांना घरी बसवला आणि फक्त पोलिस ,डॉक्टर,नर्स यांनी खूप मोठं कार्य केलं.आणि प्रशासन खूप गंभीर पणे परिस्थिती हाताळत आहे.प्रत्येक निर्णय घेताना तू विचार करायला भाग पाडत आहे.  
      बस जास्त नको . तुझ्या पासूनच प्रत्येक जीव वैतागला आहे .लहान लहान मुले शाळेत कधी जाण्यासाठी मिळेल याची वाट पाहत आहेत.
           ठीक आहे तुला सर्व मानव जात नतनस्तक होईल.सगळ्या मानव जाती च्य्या वतीने नतमस्तक करतो
        तू लवकर निघून जाशील ह


जीवन खसावत
भंडारा ९५४५२४६०२७
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोनास पञ 

कोरोना तुला साष्टांग दंडवत.
कोरोना तू आलास आणि साऱ्या जगात हाहाकार झाला. तुला भयभीत होऊन लोकं घरातच आज कोंबून राहत आहे. लोकांची सर्व कामे खोळंबली आहे. तुझ्यामुळे आज आर्थिक दृष्ट्या या देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मानसिक तणाव निर्माण झालाच आहे. परंतु प्रत्येक कुटुंब अडचणीत आहे. भयभीत आहे. तुझ्यामुळे खूप त्रास होत आहे. परंतु त्रास सहन करूनही प्रत्येकजण मार्ग काढत आहे व संयमाने राहत आहे. पण तुझ्यामुळे एक झाले आणि सर्वांना जाणवले तू सर्वांना घरी राहून एकत्र बसण्यासाठी इथे आलास. माणसाला माणूस बनवण्यासाठी  तू आलास. आज हरवत चाललेली माणुसकी तुझ्यामुळे जपायला शिकलीत लोक. ज्यांना आपल्या परिवारासाठी वेळ नव्हता ते आज आपल्या परिवारात राहत आहेत. कुटुंबातील एकमेकांची सुखदुःखे जाणून घेत आहेत. कुटुंबासोबत गप्पागोष्टी करणे छान छान पदार्थ करून खाणे तसेच विविध खेळ खेळणे  त्याचप्रमाणे आपापल्या आवडी, छंद जोपासणेसाठी यानिमित्ताने वेळ मिळाला आहे सर्वांना.

परंतु तुझ्यामुळे गरिबांची पोट भरण्याची सोय आजच्या घडीला होत नाही. गोरगरिबांचे हाल पाहवल्या जात नाही. मजुरांची पायपीट,लहान लहान चिमुकल्यांचे व म्हाताऱ्या माणसाचे हाल आता बघवत नाही. म्हणून कोरोना तुला विनंती करतो की तू आता लवकर निघून जा. व पुन्हा कधीच येऊ नकोस. आम्ही घरातच राहणार बाहेर नाही पडणार जोपर्यंत तू निघून जात नाही तोपर्यंत.


तुझीच या भूमातेवरील आत्मनिर्भर व्यक्ती
अ  ब  क

〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
ता हदगाव जि नांदेड.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*आईचे कोरोनाला संदेश देणारे पत्र*
39)सौ. भारती दिनेश तिडके

   प्रति,
covid-19 वायरस
ठेवूया एक मीटर सुरक्षित अंतर कोरोना होउदे छूमंतर." 
कोरोनाव्हायरस तू कुठून आला? कसा आला? हे मात्र मला माहित नाही. परंतु चीनच्या युहान राज्यातून डिसेंबर महिन्यापासून आलेला आहे. हे मला वर्तमानपत्रातून, समाचारातून कळले.तुला WHO विश्व स्वास्थ संघटन नी कोरोनाव्हायरस महामारी म्हणून घोषित केले आहे. तू अतिशय सुक्षम पण प्रभावी वायरस आहे. आणि तुझे संक्रमण साऱ्या जगावर फार वेगाने फैलत आहे. तू असा संक्रमित वायरस आहे की जो व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर त्याला संक्रमित करतो. तुझे लक्षण W H O ने सांगितलेले आहेत. ते म्हणजे सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होतो. तुला कधी पाहिले नाही. आतापर्यंत तुझ्यापासून संक्रमण रोखण्यासाठी लस निघालेली नाही. covid-19 व्हायरस 70 पेक्षा जास्त देशात फैललेला आहे. कोरोना तू आल्यामुळे देशाची जगाची फार वाईट स्थिती झाली आहे. तुझ्यावाचून वाचण्यासाठी काहीही उपाय नाही. पण बिमारी के लक्षण कमी करण्यासाठी औषध देता येते.
1) जोपर्यंत आपण ठीक होत नाही तोपर्यंत दुसऱ्या पासून अलग राहायचे.
2) हात साबणानी, हँडवॉश नी धुवायला  हवे.
3) शिंकताना नाकावर रुमाल ठेवणे.
4) कोरोना व्यक्तीपासून दूर राहायला हवे.
5) अंडे किंवा मास खायला नको.
6) जंगली जानवरा पासून दूर राहणे.
मास्क घालणे फार आवश्यक आहे.
जळो मेला हा कोरोना:-गो कोरोना
  गो कोरोना.      
कोरोना तू आल्यामुळे देशाची फार वाईट स्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे.lockdown मध्ये गरिबांना उपासमारीची पाळी आलेली आहे. शासन तसेच धान्य जेवण पुरवठा करण्याचे काम करीत आहे. मुलांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. ऑनलाईन क्लासेस सक्सेसफुल नाही. घरी किराणा संपत आलेला आहे. सामान घ्यायला जायला मार्केटमध्ये भीती वाटत आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती निर्माण झाली आहे. पण तुझे संक्रमण झाले तरी घाबरायचे नसते तर 14 दिवस कोरन टाइन व्हायला हवे. अलग रूम, बाथरूम यांचा वापर करायला हवा. म्हणजे दुसरी व्यक्ती संक्रमित होणार नाही.
को:-कोई भी
रो:-रोड पर
ना:-ना निकले.
तू जेव्हा पासून भारतात आला आहेस मला घरची सर्व कामे करावी लागतात. संक्रमित होण्याच्या भीतीने कामवाली बाई ला बंद केले आहे. कुठे जाणे नाही की काही घ्यायला नको. दिवसभर गाउन मध्ये माझा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामातच जातो.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तुझी महामारी आल्यामुळे समाजात काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यात सर्व कुटुंब एकत्र आल्यामुळे "वसुधैव कुटुंब"ही संकल्पना दृढ झाली आहे. श्रीमंत -दाणी व्यक्ती गरीब लोकांना मदत करीत आहेत. स्वच्छ भारत सुंदर भारत संदेश सर्वत्र पसरत आहे. घरचे लोक हॉटेलचे जेवण विसरून घरचे जेवणाला महत्व देत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून मास मटण खाऊ नये अशी लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे. बाहेरून आल्यावर पाय धुणे, हात धुणे इत्यादी चांगल्या गोष्टींची सवय लागलेली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे व आधुनिकीकरणाचे अंधानुकरण बंद झाले आहे. जगातील राष्ट्रे एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे युनिटी आलेली आहे. आपली huminty पावर वाढविण्यासाठी लोक पोष्टिक आहाराचे महत्त्व जाणत आहे. योगा, योगासने, आयुर्वेद यावर भर देत आहेत. जात-पात, धर्म, संप्रदाय हे एक होऊन मानवता हाच धर्म आलेला आहे.
   "  एकमेका साहाय्य करू
     अवघे धरू सुपंथ".
मुलांमध्ये तुझ्यामुळे सहनशीलता आली आहे. समाजातील काही लोक पूर्वी जातीच्या, धर्माच्या नावाखाली मोठे सण लोकांना दिखावा करून पैसे खर्च करत होते. विज्ञान कितीही प्रगत झाला असला तरी साधे जीवन उच्च विचार हा संदेश या महामारी ने सांगितला आहे. शेतकरी राजा चे महत्त्व वाढलेले आहे. काळी माती हीच आई आहे. देव देवळात नसून माणसात आहे. तुझे युद्ध पार पाडण्यासाठी पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आवश्यक सेवा बजावणारे सर्वजण ईश्वर आहे. जगात सर्वात श्रीमंत देश अमेरिका आहे पण तिथेच सर्वात जास्त रुग्ण मरण पावले आहे. म्हणून मानवता ही भारतीय संस्कृती महत्त्वाची आहे.
        आज देशात दीड लाखाच्यावर कोरोनाची संख्या गेलेली आहे. महाराष्ट्रात 52667 च्या जवळपास तुझी संख्या वाढलेली आहे. आता तुझ्यामुळे देशात रेड झोन व नानरेडझोन तयार केले आहेत. संपूर्ण मानव जातीने  Lockdown च्या काळात ज्या चांगल्या गोष्टी शिकल्या त्याचे अनुकरण नेहमी केले तर कोणतीही महामारी कधीच येणार नाही.
कोरोना मी तुझ्यावर एक कविता देखील केलेली आहे.

कोरोनाची महामारी
पहा कशी झाली
आपत्ती साऱ्या दुनिया वर आली
            जगावर भीतीचे संकट
                ओढवले
           कोरोना ने लोकांचे
          हाल बेहाल केले
कोरोना च्या महामारी ने
त्रासून गेले लोक
हतबल झाले प्रशासन 
आणि मजूर लोक
           लॉक डाऊन च्या काळात
           वैभव संपले
           गरीब-श्रीमंत सर्व एक झाले
सोशल डिस्टन्स चे
महत्व कळले
पैशाशिवाय जीवन
मोठे आहे हे समजले
         घरी राहून
        कोरोनाला हरवूया
        देशावर चे संकट
        दुर सारू या.
   सौ. भारती दिनेश तिडके
गोंदिया.8007664039
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*शाळकरी मुलाचे कोरोनाला पत्र*

(अ) प्रिय कोरोना
हात जोडून दंडवत

विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की, घरात बसून बसून नुसता कंटाळा आला. म्हणून शेवटी तुझ्याशी काही तरी संवाद करावे म्हणून पत्र लिहिण्याचा प्रपंच. तुला प्रिय तर म्हणता येणार नाही, कारण आवडणाऱ्याला प्रिय म्हटले जाते. तू तर सर्वांचा नावडता तसा माझा देखील. मार्च महिन्यात अचानकपणे आम्हांला सुट्ट्या मिळत असल्याचे सूचना ऐकून जाम खुश झालो होतो. परीक्षा ऐन तोंडावर आली होती, शाळेतला अभ्यासक्रम जवळपास संपला होता आणि द्वितीय सत्राची परीक्षा होणे बाकी होते. येत्या काही दिवसांत म्हणजे दहावीची परीक्षा संपली की आमच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. पण शाळा बंद झाल्या काही दिवसांनी आमच्या परीक्षा देखील होणार नाही असे बातम्यामधून ऐकण्यात आलं. त्यावेळी तर एवढा आनंद झाला की, तुझ्या नावाने आता पेढे वाटणेच बाकी होते. चीनमधल्या वुहान शहरात तुझा धुमाकूळ चालू होता त्यावेळी आम्ही तुझ्यावर वेगवेगळे विनोद आणि जोक्स करण्यात दंग होतो. चीनला चांगली अद्दल घडविली असं ही कधी कधी मनात वाटून गेलं. त्यानंतर तुझा मोर्चा इजिप्त, अमेरिका असं करत हळूहळू येथे ही दाखल झालास. तुझी वागणूक खरंच खूप निष्ठुर आहे. कुणाला हातात मिळवू देत नाहीस, गळाभेट घेणे तर दूरची गोष्ट. तू कोणत्या माध्यमाद्वारे माणसात प्रवेश करशील याचा काही नेम नाही म्हणून सरकारने अगदी सुरुवातीला जनता कर्फ्यु लागू केली आणि त्यानंतर संपूर्ण देश लॉकडाऊन झालं. पहिला, दुसरा, तिसरा करत आज चौथ्या टप्यात देखील तुझा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेली पन्नास दिवस आम्ही घरात बसून कंटाळलो आहोत. सुरुवातीचे काही दिवस सोन्यासारखे वाटले, नंतरचे काही दिवस चांदीसारखे, त्यानंतर पितळासारखे आणि आता लोखंडाप्रमाणे वाटत आहे, ज्याची काहीच किंमत नाही. टीव्ही तरी किती पहावी, घरातील बैठे खेळ किती खेळावे, घरातील माणसासोबत खेळायला ती मजा येत नाही जी मित्रांसोबत खेळताना येते. सुट्याचा कालावधी असल्याने पुस्तक हातात घ्यावे वाटत नाही. तरी आई वडिलांचे मन ठेवण्यासाठी थोडा वेळ वर्क फ्रॉम होम केलं. पण ते ही आता नको वाटत आहे. शाळेचे मैदान, वर्गखोली, मित्र-मैत्रणी, शिक्षक, धिंगाणा या साऱ्या गोष्टीची परत परत आठवण येत आहे. पण तुझ्या असण्याने कोणाला काही करता येत नाही. आमचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव तर 15 जूनला शाळा उघडणार असे सांगत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून मनाला आनंद झाला पण डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले आहे. दोन मुलांमध्ये शाळेत अंतर ठेवून बसणे, अभ्यास करणे फार कठीण बाब आहे. विद्यार्थी संख्या एवढी मोठी आहे की, एका तुकडीचे चार तुकडी केलं तरच सुरक्षित अंतर ठेवणे शक्य आहे. शाळेत येणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रथम वैदयकीय तपासणी होणे गरजेचे आहे. त्यांच्यात कोरोना नसेल तरच पुढील सर्व क्रिया सोपस्कार पार पडेल. तेच जर पोजिटिव्ह असतील तर शाळेतल्या सर्वाना त्यापासून धोका होणार नाही, हे कशावरून ? हा विचार करून काही पालक मुलांना शाळेत देखील पाठवणार नाहीत. शाळा सकाळ दुपार मध्ये भरवली तरी प्रशासन सांभाळणे अवघडच जाणार आहे. ऑनलाईन शिक्षण द्यावं म्हटलं तर सर्वांकडे तशी सामग्री नाही. जे समोरासमोर शिकवल्याने मिळते ते ऑनलाईन कधी ही मिळत नाही, हे ही सत्य आहे. काही मंडळी ऑनलाईन शिक्षणाला जरा जास्तीचे महत्व देत आहेत. आमच्या पुढील शिक्षणावर जरा अंधार पसरला आहे. 2020 ह्या वर्षाची इतिहासात तुझ्या नावाने नक्की नोंद होणार यात शंका नाही. जगभरातील 50 लाखाहून अधिक लोकांना तू प्रभावित केले असून किती तरी लोकांचा मृत्यू झालेला आहे. तू गेल्यानंतरही तुला एक वचन देतो की, मी स्वच्छतेचे नियम पाळीन, बाहेरून आल्यावर हातपाय धुवूनच घरात प्रवेश करेन, पैश्यामागे न पळता आवश्यक तेवढं संपत्ती कमावेन, कुटुंबाला वेळ देईन, सुरक्षित अंतर ठेवीन, ह्या सर्व नियमांचे मी तंतोतंत पालन करीन. प्लिज कोरोना, तू लवकरात लवकर निघून जा, मला मनसोक्तपणे मोकळ्या मैदानावर खेळू दे, मित्रांसोबत खूप गप्पा मारू दे, एक दोन दिवसांत निघून जाशील असं वाटलं होतं पण तुझा मुक्काम तर खूपच लांबत चाललंय त्यामुळे यावर्षी कोठे सहलीला जाता आलं नाही, कुणाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाता आलं नाही, सोयऱ्यांच्या लग्नाला जाता आलं नाही, एवढंच नाही तर जवळच्या नातलगाच्या अंत्यविधीला जाऊन शेवटचे तोंड देखील पहाता आले नाही. देव लहान मुलांची प्रार्थना ऐकतो असे म्हणतात म्हणून मी प्रार्थना करतो देवा या कोरोनाला आमच्या विश्वातून दूर कर आणि पूर्वीचे दिवस परत एकदा येऊ दे. माझ्या मनातील भावना तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे पत्र पाठवले आहे. मला वाटतं माझया वेदना समजून घेऊन तू लवकरात लवकर काढता पाय घ्यावं.

तुझाच त्रस्त शाळकरी
यशराज

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*(38)*
*कोरोनाला एक पत्र..*

हे अप्रिय कोरोना, 
              तुला पत्र लिहायचे कारण फक्त एवढेच कि, तु संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. कोरोना तु भयंकर संकट घेऊन आला...  मृत्यूच तांडव दररोज बघायला मिळत आहे. तु घेतलेल्या हजारो निष्पाप लोकांच्या बळीमुळे आज प्रत्येक घरात भीतीदायक प्रसंग निर्माण केला आहे. तुझा जन्म हा  चीन मध्ये झाला असे समजले, परंतु तु संपूर्ण जगात पसरला. अमेरिकेत, इटलीमध्ये, स्पेनमध्ये, चायनात आणि भारतात असे अनेक देश मिळून आठ लाख लोकांना तु तुझ्या जाळ्यात पकडलं आहे, आणि चाळीस हजाराच्या वर लोकांचा तु जीव घेतलास. तुला शिक्षा म्हणून तरी काय द्यायची...  कारण तुला पण आम्हीच घडवलं ना... 
             तुझ्या ह्या रुद्र अवताराने तर हाहाकार घातला,  पण तु निसर्गाचे पुन्हा एकदा शुद्धीकरण केलेस. आज कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही, कोणत्याही स्त्री वर होणारा बलात्कार नाही, चोरी नाही, कोणताही काळा बाजार नाही. विस्कळीत झालेल्या परिवाराला तु एकत्र आणलास, लोकांच्या आपुलक्या वाढवल्या, त्यांना स्वच्छ राहायला शिकवलं. तुझ्या ह्या दुहेरी वागण्यामुळे नेमकी तुला काय शिक्षा द्यावी हेच समजत नाही. असं वाटतं आमच्या वाटेला आमचा कर्मा आला आहे. निसर्गासोबत केलेल्या छेडछाडीमुळे, आज आम्हालाच भोगावे लागत आहे. 
             कोरोना लोकांना आता त्यांची चूक कळली. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी तुझी माफी मागते. एक आई,  कोरोना कडे विनंती करते कि माझ्या लेकरांवरती कृपा करावी. तु खुप लोकांचे बळी घेतलेस, आता बस... अजून नको. 
             कोरोना... तु परत जा... तु खरंच परत जा...                                                      
                                                                                                                                            तुझी विश्वासू
                                                                                                                                                 पृथ्वी

-अमित प्र. बडगे, नागपुर
   (7030269143)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोनाला एक पत्र                 कोरोना आमची लायकी दाखवलिस तू  ...................?                                        एप वानरापासून आदिमानव..........होमोहॅबिलीस ..........होमो इरेक्टस.........निऍडरथाल मॅन ते होमो सेपियन ते होमो सेपियन सेपियन.आम्ही पार अंधारयुगातुन हे अवकाशीय युग गाठले.माहीत नाही आणि आठवतही नाही की उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर  आम्ही विसरलो,की हे आकाश,ही धरती,हा समुद्र सगळं काही फक्त आमचाच नाही आहे.हा आहे, इथंराहणाऱ्या,सरपटणाऱ्या, इथं मुक्तपणे विहारणाऱ्या, आणि स्वच्छन्दपणे वावरणाऱ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा आणि सर्व सजीवांचा. कोणत्या तरी क्षणी आम्ही उत्क्रांत झालो आणि भानच गमावून बसलो.पृथ्वीला आणि आकाशाला पाडलेली अगणित छिद्रे आमचीच तर देण आहेत.कधीतरी गरज म्हणून वृक्षांची सालं अंगाला गुंडाळली होती!केव्हा केव्हा प्राण्यांची कातडीही नेसली.....! पण,ती गरज म्हणून.एक शिकारी म्हणून.एक व्यापारी म्हणून नव्हे.म्हणून कोरोना तेव्हा तू आला नसशीलच,कारण तेव्हा तुला उतरावयाचा नव्हता आमचा उन्माद. कारण तेव्हा तो नव्हताच.आम्हाला वेगाने धावता येत नव्हते, वाघासारखे,आम्ही ताकतवानही नव्हतो, हत्तीसारखे आणि आम्हाला आकाशात उडताही येत नव्हते,म्हणून काय झाले 'आम्ही जोराने धावायचे नाही?की आकाशात उडायचे नाहीं?'आम्ही चित्यापेक्षाही वेगाने पळालो,मास्यापेक्षाही चपळाईने पोहलो.आणि गरुडापेक्षाही उंच उडालो.आणि का नाही?आम्ही या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी नाही का?हो 'प्राणीच' पण बुद्धिमान जरी असलो ना तरी बेजबाबदार.पण तू आलास,तू कोठूनही येवो....! आलास मात्र खरा.तुला सजीव म्हणावे तर तू नाहीस आणि निर्जीव म्हणावे तर तर तू समस्त पृथ्वी वासीयांच्या जीवात जीव ठेवला नाहीस.अंतराळात पार मंगळापार टिमक्या मिरवण्याच्या डिंगा मारणारे आम्ही आज तुझ्या धाकाने चार भिंतीत बंदिस्त झालो. मुक्तपणे जमीन,पाणी आणि आकाश इथं विहार करणाऱ्या प्राणी पक्ष्याना कधीकाळी कोंडणारे आम्ही,आज चार भिंतीत कोंडल्या गेलोत. आम्हांले वाटलं नव्हते कधी...!,कधी असं होईल म्हणून.आम्ही या पृथ्वीचे मालक.नव्हे राजे....!ही फक्त आमच्यासाठीच.इथली जमीन, सागर,समुद्र,आकाश सुद्धा फक्त आमचंच.इतर प्राणी,पक्षी यांच्यावर सुद्धा आमचाच अधिकार.अन आम्ही मन वाटेल तसे उपभोग घेऊ याचा.आणि तुझ्यासारखे किती तरी जिवाणू,विषाणू आम्ही लीलया खेळवतोय बघ. पण तू मात्र या खेळात छान मजा आणलीस.पाहिल्यांदा हा मग्रूर आणि पार अवकाशात पोचलेला  माणूस तू खेळवलाय बघ,नव्हे छळवलाय.आम्ही आखलेल्या देशांच्या सीमा,धर्माच्या भिंती तू पार एका क्षणात ढासळून टाकल्या. आमच्या अनुपस्थितीत मोकळा श्वास घेणारी हवा,स्वतःतचं रममाण होणारं निळं निळं पाणी आणि मुक्तपणे बागडणारे पक्षु पक्षी आज आम्हांला सांगतात की तुमची निसर्गाला काहीच गरज नाही आणि तीच आमची लायकी आहे*                      
✍हेमंत साहेबराव पापळे,कारंजा(लाड),जिल्हा वाशीम,9422762278
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मी कोरोनास लिहिलेले पञ...




प्रिय कोरोना, 

            हल्ली तुझी नेहमी च आठवण येते रे! तुझा विचारच मनातुन जात नाही म्हणुन म्हणलं तुला पञ तरी लिहावं...

         तुझी मैत्रीण म्हणून तुझ्या शी बोलतेय रे! अरे तुला सगळेच घाबरायला लागलेत आता तर मला सुद्धा तुझी भिती वाटायला लागलीय. तुला माझी एक विनंती आहे, ऐकशील ना रे! आम्ही शेतकरी लोक आहोत रे,  श्रीमंत नाहीत. तुझ्या येण्यान जे लाॅकडाऊन झाले आहे त्यामुळे तर वाटायला लागलय की, आमचं नशीबच लाॅकडाऊन झालेय बघ...अरे आम्हाला साधं मामाच्या गावी सुद्धा जाणं होत नाही आणि तु जगभर हिंडलास होय...आता तर मला तुझा खुप रागही यायला लागला आहे, तुला कल्पना ही नाही की तुझ्या मुळे आमचे किती नुकसान झाले आहे... आमची हातावरची पोटं आहेत रे बाबा...तुझ्या मुळे सगळी मार्केट सुद्धा बंद झालेत आणि आम्ही वर्षभर मेहनत करून, पोटच्या लेकराहुन जास्त काळजी घेऊन जी धानं मोठी केली, आज त्यांना फळं लागली आहेत आणि मार्केट बंद झालेत.  या पिकासाठी सावकारा कडुन व्याजाने उपसलेला पैसा आम्ही म्हणलं," आता पिकं काढली की कर्ज फेडायचे." आणि जर उभं धान रानात सडुन जात असेल तर आम्ही काय करायचे? याचे उत्तर आहे का तुझ्याकडे...? अरे बाप खचुन गेलाय बघ माझा...आता त्याच्या पुढे भला मोठा प्रश्न उभा आहे की, "आता करायचं काय? खायच काय?" आणि घर चालवायला थोडा पैसा लागत नाही रे बाबा..... अरे!आम्ही राञन-दिस  मातीत जनावरा सारखं राबतोय रे! अरे! डोळ्याला-डोळा लागत नाही,  जीव घोरानं निस्ता झुरून गेलाय बघ... तुला पञ लिहीतेय खरी पण पञात तरी काय-काय मांडु... डोळ्यातुन अविरथ पणे वाहणारी आसवं अशी पञातुन व्यक्त करता येत नाहीत...त्याच काय? दिवसभर उन्हात कष्ट करण्यारया देहाचे चटके पञात मांडता येत नाहीत,  मार्केट बंद झाल्याने रानात सडुन गेलेला माल पञात मांडता येत नाही, पोटातली भुक पञात मांडता येत नाही, संकटानी होरपळून गेलेला जीव पञात मांडता येत नाही, लेकराची भुक पञात मांडता येत नाही, सावकाराचा दाब पञात मांडता येत नाही, आम्हा शेतकरयाचे जीवन या पञात मांडता येत नाही त्याचे काय??? आता तुला किती सांगू कि आमचं अजुन काय- काय मांडता येत नाही...... अरे काल तर एक व्यापारी म्हणाला, "आज माल नेतो काढा. " बरं वाटलं ऐकुन की कमीत-कमी माल डोळ्यांच्या आड तरी होईल.. म्हणुन आई बापानी आणि मी 50-55 डाग शेवगयाचे काढले आणि माल भरायच्या वेळी व्यापारी म्हणाला ,"माल नाही नेणार मार्केटबंद आहेत" अरे! काल किती सारं उन होते चक्कर यायची वेळ आली होती रे तरीही आम्ही दम धरून काम केले याचा काय उपयोग झाला?  कोरोना तुच सांग आता आम्ही काल केलेलं कष्ट तु आम्हाला परत करू शकणार आहे का? अरे आता तो माल जनावराला खाऊ घालायचा का? आम्ही करायचं काय? 
    पण एक शेवटची विनंती आहे मित्रा!!! तु इतक्यात तरी परत जात नाहीस तर मग आम्हाला हळु-हळु चिंतेने मारण्या पेक्षा एकदाचा घारी सारखा ये आणि सगळ्या शेतकरया च्या कुटुंबाला , सगळ्यांना घेउन जा... कमीत-कमी ही जगायची चिंता तरी मिटेल ना....


तुझीच मैत्रीण, 
दिपाली शिवाजी राऊत,
(शेतकरी पुञी)
जिल्हा-उस्मानाबाद. 
7498702706
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*एका भारतीयाचे कोरोनास पत्र.*
--------------------------------------------
लेखन- श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
वाकदकर (9923528494)

–--------–----------------------------
अति अप्रिय कोरोना,
तुला दुरूनच नमस्कार...!

वि. वि.  तुला पत्र लिहण्यास कारण की, तू एक तर माझ्या परिचयाचा नाही आणि तुझा काही संपर्क क्रमांक सुध्दा माझ्याकडे नाही त्यातल्या त्यात मला तुझ्याशी संपर्क करण्याची ईच्छा तर अजिबातच नाही.

अरे कोरोना तू असा अगंतुकपणे आलास तरी कशाला आणि आलाय तरी कुठून.?  कोणी म्हणतय वटवाघुळ प्राण्यापासून आलाय तर कोणी म्हणतंय की  प्रयोगशाळेत पैदा झालाय...! नवलच वाटतं बाबा तुझं..! अरे बाबा तू काय तर म्हणे वूहान शहरात आला होता, तर मग तिथंच राहायचं असतं न ...तू तर एका घरचा जावई जणू सगळीच गावे फिरायला लागलास... तुला एवढी सुद्धा अक्कल नाही कारे...! अरे ज्यांच्याकडे आलाय किंवा ज्यांनी बोलावलंय त्यांच्याकडेकच राहायचं असतं न...!

अरे बाबा कोरोना तू आमच्याकडे येऊन मात्र आम्हा सर्वांनाच चांगलंच सावध केलं बघ...! तू चीन पाठोपाठ स्पेन आणि अमेरिका सारख्या प्रगत देशाला सुद्धा चांगलंच हादरून सोडलंस ,आमचं विज्ञान आणि संशोधन किती प्रगत आहे ...याचंच आत्मचिंतन करायला लावलस ...! पण आमची भारतीय संस्कृती आणि परंपरा मात्र तुला हरवू शकते ...हे तुझ्यामुळे आता जगाला सुद्धा कळलंय...! आमचे लोक पाश्चिमात्य जीवनशैली जगून स्वतःला मोठे शहाणे समजत होते...आता तेच पाश्चिमात्य सुद्धा सगळे  भारतीय सोपस्कार पाळायला लागलेले बघून आमची छाती आता अभिमानाने फुलते बघ...!

अनेक स्वप्नवत आशा आणि आभासी स्वप्नाच्या दुनियेत मृगजळात पोहू पाहणाऱ्या अनेक हावरटांना तू चक्क घरातच कोंडून टाकायला लावलं...! आणि यामुळेच त्यांची पावले आता पुन्हा जमिनीवर टेकू लागलीत... अनेकांनी कित्येक वर्षांपासून आपल्या गावाला परिवाराला रामराम करून सोडलेला गाव तू पुन्हा त्यांना प्यारा करून दिला , हे मात्र भारीच काम  वाटतं तुझं..! रिकामा खर्च करून थाटामाटात केले जाणारे लग्न समारंभ, पार्ट्या, उत्सव, मेळावे, यात्रा, जत्रा सुद्धा तू बंद करायला लावलं आणि माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे याची चांगली जाणीव करून दिली.

तू ज्यांना ज्यांना जवळून भेटलास त्यांना मात्र तू जीवन आणि जग दोन्हीही समजून दिलंस बघ....  तुझ्या येण्याची चाहूल लागताच सगळ्यांनी तुझ्यासोबत त्यांच्या लोकांसाठी सुध्दा घराचे दरवाजे बंद करून टाकल्याने सगळ्यांना संत तुकाराम महाराज यांचा....
नाही कुणाचे कुणी,
तुझे नव्हेरे कोणी,
अंती जाशील एकलाच प्राण्या
माझे माझे म्हणूनी.....।।
हा अभंग अगदी गळी उतरून दिला बघ.


अरे कोरोना तुझ्या येण्याने देव ही संकल्पना फार चांगल्या पद्धतीने समाजाला कळाली. देव तर असतोच ...पण तो दगडात नसून माणसात असतो... हे सुद्धा आता चांगल्या चांगल्यांना समजायला लागलं...

या जगात 
सुख के सब साथी
दुःख में ना कोए....।
याचा सुद्धा प्रत्यय आला.


तरी सुद्धा माणसात देव पाहणाऱ्या लोकांची तू समाजाला ओळख सुद्धा करून दिली, या भारतीय लोकांनी  खूप दान धर्म केलाय.. आणि स्वदेशी वस्तू का खरेदी कराव्या हे सुद्धा बऱ्याच 
ऐश-आरामिंना  समजून दिलंस... आता तरी आमचा देश स्वदेशी वापरेल असं वाटतंय....


तुझ्या येण्याने जे लॉकडावून केलं ना ...त्याचे अनेक चांगले परिणाम सुद्धा बघायला मिळाले..आमची शान म्हणजे 'हिमालय पर्वत' तो तर अगदी सौंदर्यात आपली कात टाकून राहिलाय.... कोसोदूर अंतरावरून त्याचं रुपडं नजरेत भरायला लागलंय आणि अनेक पक्षी ,प्राणी समुद्रसपाटीवर आनंदाने विहार करतांना बघून फारचं नवल वाटतंय.... तू गेला तरी आमच्या सरकारने असाच काही महिन्यांचा कालावधी दरवर्षी लॉकडावून म्हणून ठेवावा असा सुद्धा विचारप्रवाह सुरू झालाय.....! लग्न सुद्धा अशीच साध्या पध्दतीने दरवर्षी लावली जावी ज्यामुळे फारच खर्च आणि बेजारी वाचतेय... असा सूर सुद्धा ऐकायला येतोय...! 

मला माहिती आहे तुला निसर्गाच्या चक्राला आव्हान द्यावं वाटत असेल पण आम्ही तुला घाबरणारे नाही, आम्हाला माहिती आहे की तुझा प्रवेश आमच्या नाका तोंडातून शरीरात होतोय...म्हणून आम्ही आता आजपर्यंत स्वतःचा चेहरा मिरवणारे मात्र तोंडाला मुस्क म्हणजेच मास्क लावून जगणार... आमचे हात नियमितपणे  साबण ने धुवून सॅनिटाइझ करणार...  आम्ही सोशल डिस्टन्स हा नवीन जीवन प्रयोग अमलात आणलाय....


तू जरी हरत नसशील ना तरी सुद्धा आम्ही तय्यार आहोत तुझ्याशी जिंकायला.... शेवटी तुझं आयुष्य तरी किती....! अंत असतोच ना.....! कंटाळून जाशील तू.....इथे ..आजपर्यंत अनेक तुझे व्हायरस परिवारातले अनेक पाहुणे इकडे येऊन गेलेत....आम्ही त्यांना सुद्धा परतवलंय ...तसंच तुला सुध्दा एक दिवस  आपला गाशा गुंडाळून इथून जावेच लागेल.... हाच निरोप देतो आणि माझं पत्र पुरे करतो....



तुझा कधीच न होणारा,
एक भारतीय नागरिक.

लेखन-श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर) 9923528494
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोनास पत्र

प्रिय कोरोना,
            तुला प्रिय म्हणतेय कारण तू माणसाला माणुसकी शिकवलीस. पण गेल्या तीन महिन्यापासून सर्व जगभर धुमाकूळ माजवला आहेस. अजुन किती दिवस तुझा मुक्काम आहे? जगत होतो गरिबीच्या, प्रदूषणाच्या आणि नोकरीच्या कटकटीत पिचत कसेतरी!आलास चीनवरूनी पाहूणा बनुनी.कित्येकांना  टाकलेस मारून. आता माझ्या देशात तरी तू फारच कहर करू लागला आहेस. देवाचे दूत बनून मदत करणाऱ्या डॉक्टर, पोलीस,सैनिक, बस कंडक्टरनाच तू बाधा करू लागलास ? अरे अशाने माणसाचा पापपुण्यावरील विश्वासच उडून जाईल. एकमेकांना साह्य करणारा माणूस एकमेकांपासून दूर पळू लागेल.
                 बस कर बाबा आता तुझा हा प्रकोप! मानते मी, झाली होती  मानवाकडून  निसर्गाच्या विध्वंसाची थोडी चूक ! त्याची इतकी मोठी शिक्षा? चूक सुधारण्याची एक संधी तरी दे.........आता आम्ही वृक्षतोड न करता वृक्षारोपण करू. प्रदूषण, प्लास्टिक नि रसायनांचा वापर कमी करू.तसेच आता जा रे बाबा निघून?..... नको आता आम्हाला तू छळू ,मानवाला तुझ्या घशात गिळू.... आणि आम्ही मृत्यूला कवटाळू...... थकलो आहे आम्ही आता! राहीला नाही कोणी वाली....... असा का आमच्या जीवावर उठलास? कोरोना कोरोना नावाने 'रोना' म्हणजे रडायलाच लावलेस..... तुझ्यामुळे खेड्यातील लोकांना, लहानपोरांना 'लॉक डाऊन', 'क्वारन्टाईन' असे शब्दही कळू लागले आहेत. "आला आहेस तसा परत जा, खूप संहार केलास, कीडा-मुंगीवाणी माणसांना मारत सुटलास......!! अजूनही कितीतरी जीव तुझी लागण होण्याने तडफडत आहेत. नात्यावरील विश्वासच उडू लागला आहे कारण तुझी बाधा झाली की आई, मुलगा, वडील कोणीही रूग्णाच्या वाऱ्यालाही थांबू शकत नाहीत. तुझ्यामुळे मृत्यू आला तरी मृतसंस्कार तर सोडाच पण प्रेतालाही कोणी हात लावत नाहीत. बेवारशासारखे प्रेत उचलून स्मशानात दहन केले जाते.
       "नको रे बाबा इतका संहार!.... आता तुझा पसारा आवर नि  निघून जा खूप दूर.....  पुन्हा न येण्याच्या वाटेवर..... जातोस ना लवकर?"......

तुझ्या जाण्याच्या प्रतिक्षेत,

सौ.भारती सावंत
मुंबई
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
(37)
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे गोंदिया
*कोरोना स एका दुःखी आईचे पत्र*
         ||ॐ||
                     दि. 27/5/2020
   कोविड19,
       एका आईची विनंती,
      तुला खुप दिवसांपासून पत्र लिहायचं म्हणत होते पण आज म्हटलं लिहूनच टाकावं. तुलाही कळायला हव्यात माझ्या भावना. पण तुला काय कळणार एका आईची व्यथा. तु तर फक्त आणि फक्त लोकांना त्रास द्यायलाच आलास. तुझ्यामुळे माझ्यासारख्या किती आईचं तु मन दुखावत आहेस याची जाणीव सुद्धा तुला नसणार. असेल ही कशी रे, तु तर त्या रामायणातील राक्षसांपेक्षाही क्रुर आहेस. ना तुला वयाचं बंधन आणि ना जागेचं. तु संपुर्ण जगात थैमान घातलंस. तुला काय वाटतं तुझ्या या कृत्यामुळे तुला कुणी चांगलं म्हणेल? असा एकही व्यक्ती या पृथ्वीवर नाही जो तुला श्राप देत नसेल.
 आज  मी पत्राद्वारे तुला तुझी समाजातील स्थिति आणि होणारे विघातक परिणामांविषयी माहिती सांगायला म्हणूनच हे पत्र लिहित आहे. तु कुणाशी आणि कोणत्या जन्माचा बदला घ्यायला आला आहेस ते तरी सांग. अरे तुझ्यामुळे असंख्य लोकांना यातना भोगाव्या लागत आहेत. गरिब लोकं रोजगार गेल्यामुळे उपाशी आहेत. उपासमारीने कुटूंबाचे पालन पोषण करु शकत नाही व मृत्यु मुखी पडत आहेत. हजारो मील पायी वाट तुडवत  रोजगार नसल्यामुळे गावाकडे जात आहेत. किती यातना होतात रे त्या छोट्या छोट्या बाळांना कुणी खांद्यावर, कुणी कावड बनवून तर कुणी बॅगवर टांगून उपाशी पोटी, अनवाणी, उन्हातान्हात चालत आहेत. किती लोकांचा तु श्राप घेणार आहेस अरे त्या छोट्या छोट्या बाळावर तरी दया कर. असा कसा रे तु निष्ठुर झालास. तुला काळीजच नाही तर काय दुःख होणार तु तर क्रुरकर्मी आहेस हे मी विसरूनच जाते. माहिती असून सुद्धा लोकं देवाजवळ साकडं घालताहेत.
 तु तर कुणालाच नाही सोडलंस. अरे माझं बाळ माझ्यापासून दुर शिक्षण घ्यायला गेला. मुलापासून आई दुर असते तेव्हा तिचं शरिर सोबत व मन मात्र मुलाजवळ असते. दररोज माझ्या बाळांनं जेवलं  तर असेल ना, त्याची तबियत तर ठीक असेल या काळजीत असणाऱ्या आईच्या काळजाला तु घोर लावून ठेवला आहे. तू अचानक आला आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं झालं. तुझ्यामुळे आणि हो फक्त तुझ्याचमुळे सगळीकडे हाहाकार माजलाय. शिकायला गेलेली मुलं जिथल्यातिथेच अडकली आहेत.
    येण्याजाण्याची सोय नाही, कालेज बंद, मेस बंद, बाहेर जाऊ शकत नाहीत. आपल्या बाळासाठी जीव कासावीस होतोय रे वाटतं तु जिथं कुठं सापडलास की तुला जाॅब विचारावं काय बिघडवलं तुझं या मुलांनी ते तर फक्त आपलं शिक्षण पुर्ण करून आई वडीलांच्या इच्छा पुर्ण करित आहेत, आपलं भविष्य घडवितात आहेत.
 अरे तु तर अवघ्या चार  महिन्याच्या चिमुकल्यांनाही नाही सोडलंस जगात आल्यानंतर सर्वात सुरक्षित ठिकाण असेल तर आईचा स्पर्श ;तु त्या निरागस बाळांना आईच्या प्रेमापासून दुर केलंस एका आईला तिच्या हृदयाच्या तुकड्यापासून दुर करतोस. रामाला तर फक्त चौदा वर्षे वनवास झाला होता आणि सोबत पत्नी सिता आणि भाऊ लक्ष्मण तरी होता पण तु तर तसंही नाही केलंस चौदा दिवस जगाशी नातं तोडून टाकलंस आणि यामध्ये जो जिंकला तो घरी आणि हरला तर..... कल्पना करतांना ही अंगावर काटे उभे होतात. मृत्यु नंतरही कुटूंबियांना त्यांचं मृतदेह सोपवता येत नाही आईला आपल्या मुलाचं अंतिम दर्शन सुद्धा घेता येत नाही.
      तु असा  कसा रे निष्ठुर झालाय लहान लहान मुलं चिमुकल्या हातात 'गो कोरोना 'म्हणून विनंती करतायत पण तुला त्यांची पण दया येत नाही. तुझ्या पासून लोकांना वाचविण्यासाठी पोलीस, डॉक्टर, आशा सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका पासून अनेक यंत्रणा रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत तुला त्यांची पण दया येत नाही. कुठे फेडशील हे सगळे पाप. अरे परिचारिकांना बघ बिचार्‍या लहानग्या बाळांना सोडून, कुटूंबातील व्यक्तिंना तुझी लागण होऊ नये म्हणून दुर राहतात. तिकडे बाळ रडतो व इकडे आई रडत आपलं कर्तव्य निभावत आहे.
   तु एकदाच फक्त एकदा या पृथ्वीवर जन्म घेऊन आई बनून पहा मग कळेल तुला आईचं दुःख काय होतो आणि या सगळ्या गोष्टी ला कारणीभूत फक्त तु आहेस.
 माझं बाळ तिकडे शिक्षणासाठी गेला आणि तुझ्यामुळे लाकडाऊन झालं आणि त्यात अडकून पडलाय. अरे त्याला बरोबर जेवन मिळत नाही आणि मिळालं तरी ते तुझ्यापासून शंभरटक्के सुरक्षित असेल याची शास्वती नाही. तिकडे माझं बाळ उपाशी आणि मी इकडे कशी रे जेवणार, माझ्या गळ्याखाली अन्नाचा घास कसा जाणार. अरे निर्दयी दया कर तु लोकांना एकमेकांपासून दुर केलंस. भेटीगाठी, कुणाच्या सुखात आणि दुःखातही कुणी  सहभागी होऊ शकत नाही.
     आजपर्यंत इतके रोग आले आणि गेले पण तुझ्यासारखा निर्दयी, महामारी आणि जगाचा सर्वनास करणारा मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकं आपल्या घरी यावं सगळ्यांनाच  म्हणतात पण तुला कुणीही म्हणत नाही  तरी तु कशाला इथे आला? तु जात कां नाही? मुलांना त्यांच्या शाळेपासून दुर केलंस, त्यांचं भवितव्य अंधकारमय केलंस. अरे तुला एका दुःखी आईचा शाप आहे तुझं कधीच कुठेच स्वागत होणार नाही तर तुझी जेव्हां ई लोक आठवन करतील तर फक्त शिव्या च देतील.
   आईच्या मनाची स्थिति बघ कशी झाली _
वाट बघत बाळाची डोळे पाणावले, 
बाळाच्या वाटेवरती कोरोना चे काटे आले, 
बाळाची वाट पाहत अश्रुंचा पाझरही आटला.

     चुलीपाशी येते आई आणि रडू लागते,
 उगाचच कपाटात धुसफूस करते,
बाळाच्या आठवणीने हळुच हात फिरवते.

      तुझ्या जाण्याची तर लक्षणंच दिसेना,
अरे राक्षसां तु माघार  कां घेईना,
आईच्या मनाचा तोलही आता गेला,
बाळाचा जीवही आता रडकुंडीला आला.

      आता तरी लवकर जा आणि कधीच येऊ नको हिच तुला एका आईची हात जोडून विनंती आहे.
   गो कोरोना गोssssss
गो कोरोना गोsssss
                  एक दुःखी आई
     सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
                   गोंदिया
        9423414686
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*(09)सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*

*विलगिकरणात ठेवलेल्या गड्याचे  कोरोणास पत्र*



प्रति,
       *कोरोना, covid-19*
हाय..हँलो....कसा आहेस तू!
काय विशेषण लावावे रे तुला! माझे हे पत्र वाचतांना तुला जरी आनंद झाला तरी  ,मला खूप त्रास होत आहे .संताप येत आहे.मी मात्र जिल्हा परिषद हलबीटोला शाळेत विलगिकरण कक्षात ,कुटुंबातील लोकांपासून दूर एकटा चौदा दिवस ह्या वर्ग खोलीत राहणार आहे .फक्य न् फक्त तूझ्यामुळे कोरोणा तुझ्याचमुळे..मला जागण्यासाठी या शाळेतील सोनेवाने मँडम वफंदे मँडम आठ-आठ तास ड्युटीवर राहतात.त्यांचेही हाल मला पाहवत नाही  .आणि रात्री ठाकरे सर व  राऊत सर पहारा देऊन आहेत. भरल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या माझ्यासाठी साठी घालवत आहेत.मला खुपखुप वाईट वाटते ,पण मी तरी काय करू ..हे र्सव तुझ्यामुळे कोरोणा.तू आपल्या  उद्देशात सफल झाला आहे. लाखाच्या घरात लोक मृत्यूच्या दारात गेले आहेत. यमराजाला प्रिय झाले आहेत. करोडो लोक त्यामुळे बाधित होऊन जीवन-मरणाचा संघर्ष करीत आहेत.तुझ्याशी लढण्याकरिता विविध उपाययोजना करीत आहे .पण आकड्यांमध्ये मात्र तूच यशस्वी होऊन यश प्राप्त करीत आहेस,आणि  आकड्यांमध्ये मात्र विजयी होत आहे. असा कसा रे एवढा निर्दयी तू....! पूर्ण देश लाँकडाऊन मध्ये लहान पोरं.. पासून थोरामोठ्या पर्यंत सर्व काही घरात.  काम होऊ शकत नाही  कोणतेही काम करू शकत नाही. सार्या देशाची अर्थ व्यवस्था ठप्प पडून  बसली आहे. एवढा का निर्दय बनला आहेस तू कोरोना?
           सर्व जगाला विळखा घातला असून .....आलास तरी कुठून ?चिनवरून आला तर नाही ना?  साऱ्या जगाला ग्रासून सोडला रे तू?  एवढा  प्रवास  का करतोस? तेव्हा प्रवास करून थकला नाहीस का? प्रवासाची हाव सुटली आहे का रे तुला?तुझे पप्पा (झिंग)रागवत नाही का तुला? रागवणार कसे? ते तर जाम खुश असतीलच! दररोजच्या बातम्यांवरून सारे कळतच आहे, तुझ्या घरच्या लोकांनी सारा जगापासून तुला लपवून ठेवला.तूझ्या पप्पांवर आणि तूझ्यावर डोनाल्ड काका चांगले च रागवले आहेत. त्यांना तर एवढा राग आला आहे की,"बदला" घेण्याची भाषा बोलत आहेत.
             डोनाल्ड काकाच काय, सारा जग, जगातील लोक हो ..हो ..हो.. सारेच नाराज असून बदला काठण्याची भाषा बोलत आहे. संपूर्ण जगावर तुझ्या या छोट्याशा रूपाने *महायुद्धाचा स्वरूप* आणलाय. यांची नाराजी पत्करून तुझी भूक भागली नाही का रे!
          मोदी काकानी तुझा, किती प्रेमाने स्वागत केला. टाळ्या वाजवून, घंटानाद करून, दिवे लावून , आणि टाळ मंजिरे वाजवून तुझा स्वागत केला . पण लोकांना मात्र सर्व आपल्या घरातच राहण्यास बाध्य केलं.म्हणे मास्क आणि सेनिटायजरचा चांगलाच बाजार वाढविला आहेस तू.बाकी सार्या बाजाराला मात्र ठप्प केलास .साऱ्या मजुरांचा हाल करून ठेवलास रे तू. लोक सांगत होते तापमान 30 अंश डिग्री वर गेल्यावर  कोरोणा परत जाणार .पण तू परत जाण्याचा मार्ग  स्वीकारताच नाही .कोरणा जा! माहेरी जा! वाट बघतयं, जा तू परत मायदेशी जा!.. आमच्या संस्कृती सोबतआम्हाला राहू दे.
      तुझ्यामुळे डॉक्टर्स,पोलीस ,आशा सेविका शिक्षक,विद्यार्थी ...किती सांगू  सर्वाना च किती त्रास सहन करावा लागत आहे.लोकांच्या  दगडफेक सहन करीत आहेत .त्यांच्यावरचा विश्वास कमी होत आहे.डाँ ,पोलीस मात्र  पोटतिडकीने आपली सेवा देत आहेत.  पण तुला कशी दया येत नाही रे. तुझ्या मुळे *सर्वधर्मसमभावनेला* तडा गेला आहे. आज हिंदू-मुस्लीम वाद वाढीस लागलेला आहे. या वादाला तुझ्यामुळे खतपाणी मिळत आहे, नको  रे करू तू.... जा कोरोणा जा... मायदेशी परत जा.....
            पण एक बरं झालं .तुझ्यामुळे स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनता येणार आहे . नाही करायचंय तुझ्यासारखा वर्ल्ड टूर .  आम्ही आपल्या देशातच बरे आहोत. पुढे आमच्या देशात स्वच्छ भारत अभियानाला वेळ मिळाला आहे.
गल्लोगल्लीत एकच नाद गुंजतो
*गाडी वाला आया,घरसे कचरा निकाल*...
देख देख तू ,यहाँ वहाँ न फेक,
फैलेगी बिमारी,सबका होगा बुरा हाल....तो क्या करे भैय्या ?...गाडीवाला आया, तु घरसे कचरा निकाल........
             जगात श्रीमंत अधिक श्रीमंत गरीब अधिक गरीब होता. या गोष्टीला मात्र तडा गेला आहे .आमच्या भारतात श्रीमंत गरीबातला गरिबाच्या मदतीला धावून आलेला आहे .सहकार्य करू लागलेला आहे .मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी मदत करू लागले आहेत. फक्त सरकारवरच अवलंबून नाही तर स्वतः धावले आणि मदतगार बनलेआहेत.
           भारत "डिजिटल इंडिया" बनला आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेला ऑनलाईन घेऊ लागले आहेत. घरी बसल्या बसल्या अभ्यास करू लागलेले आहेत. आणि हं.. तुझ्यामुळे *जंगफूड* तर पार बंद झाला. स्वदेशी चाच नाहीतर *ट्रेडिशनल फुड* सुद्धा स्वतः तयार करून खायला लागले आहोत आम्ही . गृहिणी  लोकांची सेवा सुश्रुषा करीत आहे. अजून एक सांगू, दवाखान्यात आजारी लोकांची गर्दीच कमी झाली.तुझ्यामुळे चोरी-चकाटी, अपघात ,अपहरण यांच्यावर काही प्रमाणात तरी आळा बसला आहे.काही चांगल्या गोष्टी घडल्या असल्या तरी कोरोणा तू आम्हाला नको आहेस. तू परत आपल्या मायदेशी जा .....कोरोणा जा ......जा...तुला तुझ्या पप्पाची शपथ . निघून ..जा.
                           तुझाच
              त्रासलेला विलगिकरण गडी
                               गौरव 
लेखिका 
      *सौ.यशोधरा  सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
07 लेख

कोरोनास पत्र

माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर
416106.

कोरोना,
तुला प्रिय म्हणवत नाही. म्हणून फक्त कोरोना असेच तुला संबोधले आहे.तू असा,तू तसा असं कीतीजणांनी तुला विविध विशेषणं दिली. प्रत्येकजण त्यांच्या जागी ठीक आहे.आणि झालयंपण तसच ना? नांव ठेवण्या पाठीमागे खूपच खरी,योग्य कारणे आहेत.नुकसान तर खूपच झालयं.अगदी भरुन न येण्यासारखं.

पण आज मी तुला यासाठी पत्र लिहलं आहे की, तुझ्यामुळे काही चांगल्या व सकारात्मक गोष्टीही झाल्या आहेत.त्यासाठी मी तुला मी हे पत्र लिहीत आहे. तर मग ऐक.

अरे आम्हाला कधी वाटले नव्हते की हे जीव तोडून धावणारे जग असे अचानक थांबेल. लाखो करोडोंची रक्कम देऊनही कुणी राजी झाले नसते.सारे पर्यावरणवादी, सरकार ओरडून सांगत होते की,ग्लोबल वार्मिंग , ओझोनच्या थराला पडत असलेले छिद्र, वाढते हवा,ध्वनी,जल प्रदूषण, नद्यांची झालेली गटारगंगा, पिवळा पडत चाललेला ताजमहाल, शहरीकरणामुळे, रस्तारुंदीकरणामुळे होत चाललेली वृक्षतोड. दिल्लीतील पसरलेले धुलीकण,अशा कीतीतरी प्रश्न आ वासून उभे होते.पण या सगळ्यांकडे जाणूनबुजून सारे दुर्लक्ष करत होते.म्हणतात ना निसर्ग आपला समतोल आपणच राखतो.तेंव्हा मात्र हा विज्ञानवादी मानव अगदी हतबल होऊन जातो.लाचार होतो. कोरोना विषाणू आज तू आमची झोप उडवली आहेस.चीनमधून प्रथम तू आलास.तुझा विषाणू पसरला,असे म्हणता म्हणता तू साऱ्या विश्वात पोहचलाससुद्धा....मी मी म्हणणारे सुद्धा काहीही करु न शकता असहाय्यपणे पाहण्यापलीकडे काहीच करु शकत नाहीत.तू एक जागतिक महामारी ठरला आहेस.तू संसर्गामुळे वाढत असल्यामुळे शोशल डीस्टन्सिंगला पर्याय नसल्यामुळे शासनाने नाईलाजाने लॉकडाऊन हा पर्याय निवडला.

कोरोना तुझी महाभयंकर परीस्थिती पाहता शासनाने लाॅकडाऊन तीन दिवस म्हणत तीस एप्रिल पर्यंत तर आता तीन मे ,सतरा मे म्हणत म्हणत तीस मेपर्यंत वाढवली आहे.जनजीवन विस्कळीत झाले.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.या लॉकडाऊनचे सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परीणाम झाले.वाहतूक, दळणवळण बंद केले त्यामुळे रस्त्यावरची वाहनांची रहदारी कमी झाली. वाहनांच्या मधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड बंद झाला.परीणामी वातावरणात शांतता पसरली. वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण यात भरपूर फरक पडला आहे.कारण प्रदूषणाला सर्वात जास्त कोण कारणीभूत असेल तर तो मानव आहे.मानवाने जिथे जिथे पाऊल ठेवले आहे तिथे तिथे प्रदूषण केले आहे.मग ते वाहणांच्या अतिवापरामुळे त्यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड चे वातावरणात मिसळणे असो वा सणसमारंभात लावलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज असूदे. रोजचा गोंधळ,गजबजाट असूदे .मानवच या सर्वाला कारणीभूत आहे.पण आता हे सर्व थांबल्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. त्यामुळे वातावरण अतिशय स्वच्छ असल्याने आकाश निरभ्र दिसत आहे.कोणताही गोंगाट नसल्यामुळे कमालीची शांतता अनुभवायला मिळत आहे.पक्ष्यांचा कीलबिलाट जो गायबच झाला होता,भूतकाळात जमा झाला होता तो आता स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ऐकू येत आहे.सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांच्या कीलबिलाटाने जाग येते.त्यावेळी आमचे लहानपण आठवू लागते.अनेक ठिकाणी पशूपक्षी निवांतपणे नागरी वस्तीत फीरत आहेत.आकाशात पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतात.समुद्रकिनारी हरणांसारखे पशू निवांतपणे उड्या मारताना तर मुंबईतील सतत गजबजलेल्या समुद्र कीनारी डॉल्फीन माशांच दर्शन होत आहे.हे सर्व सकारात्मक परिणाम आहेत.

आम्हाला माहिती आहे या संकटातून बाहेर पडायचे असेल तर सर्वांना घरातच थांबून रहावे लागणार आहे.सर्व लांब नोकरीस असणारी मुले,सुना आईवडिलांच्याकडे परतले आहेत.शहरीकरणामुळे गावातील जीवन अनुभवण्यास नाकारणाऱ्या लोकांना आता दुसरा पर्यायच नाही.अवास्तव गरजांशिवाय आपण जिवंतच राहू शकणार नाही हा खोटा गैरसमज आता दूर झाला आहे. मानवाच्या गरजाही कीती कमी आहेत याचाही अनुभव लोकांना येत आहे.हे जरी असले तरी याचा नाते संबंधांवरचा परिणाम चांगला व वाईट दोन्हीही होत आहेत.नोकरी व कामामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती ही सतत धावत होती.अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील मुले घरच्या लोकांपासून लांब होती.कुणाला एकमेकांची विचारपूस करायला वेळ नव्हता. पण आता सगळे एकाच छताखाली आले आहेत.एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला आहे. चंगळवादी, भोगवादी संस्कृती ला आळा बसला आहे.जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे पूर्वीच्या दिवसांची आठवण व महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 सदर कालावधीत पैसा व माणुसकी याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा झालाआहे.आज पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व आले आहे.कारण अशा या भयंकर परिस्थितीत एकमेकांना आधार देणे,मदत करणे गरजेचे आहे.आज पैसा असला तरी वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गरीब व श्रीमंत एका रेषेत आहेत.मी मोठा हा अहंभाव बऱ्यापैकी नष्ट होताना दिसत आहे.आज प्रत्येकाला एकमेकांना स्नेह, प्रेम ,आपुलकी ची गरज आहे.

पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे सेवेसाठी असलेल्या समर्पणाबद्दलतर बोलायला शब्दच नाहीत. कारण समाजातील काही आडदांड, विकृत लोकांच्या बेबंदशाही मुळेच कोरोना तू पसरत जात असल्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.या सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार आम्ही कोणत्याही शब्दात प्रकट करु शकत नाही.

पण कोरोना तुला मघ निक्षून सांगते,तूला आता आमच्यातून लवकरच निघून जावे लागेल.तुला हरवण्यासाठी आम्ही सर्वजण घरीच राहू व ही साखळी तोडून टाकू.

कौतुक जास्त होतयं का? नको आता थांबते.नाहीतर तू हुरळून जाऊन इथेच थांबायचास.नको रे बाबा..... तू तुझा गाशा लवकरच गुंडाळ बरं...पुन्हा कधीही न येण्यासाठी... ओके. बाय...

वैतागलेली व्यक्ती
  माणिक

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
(४०) मनिषा पांढरे, सोलापूर



प्रिय कोरोना,
तुला प्रिय म्हणण्यामागे एकच कारण आहे. प्रिय व्यक्ती सांगितलं ऐकतात. तेव्हा तूही माझं एकशील याची मला खात्री आहे. तू आलास खरा पण येताना खूप काही चांगल्या आणि वाईट गोष्टी घेऊन आलास. आणि आमच्यात एक दहशत निर्माण केलीस. 
   आता आम्हाला तू नकोनकोसा झाला आहेस. तू लवकर निघून जावा असे मनापासून वाटत आहे.
         तुझ्यामुळे काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या खऱ्या पण त्यापेक्षा वाईट जास्त पाहायला मिळाले. शहरी भागातील लोकं गावाकडे आले.... शहर शांत झाले... लोक घराच्या बाहेर पडायचे बंद झाले..... रस्त्यावरील प्रदूषण हे कमी झाले.... वातावरण स्वच्छ झाले.... कारखाने आणि गाड्या सतत धोर सोडायच्या त्यामुळे हवेतील प्रदूषण आता कमी झाले आहे.... परिसर शांत झाला..... नैसर्गिक वातावरण उत्तम झाले.... पक्षी ,प्राणी मुक्त संचार करू लागले.
       पण.,...... पण मानव मात्र संकटात सापडला. संसर्ग झाला की कोरणा होतोय म्हणून घराबाहेर निघणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे गरीब माणसांवर उपासमारीची वेळ आली आहे...... हातावर पोट असणाऱ्या लोकांचे तर हाल सुरू झाले...  हाताला कामच नसेल तर खाणार तरी काय?.. असे अनेक प्रश्न निर्माण झाले. .
    भारत देशाची आर्थिक परिस्थिती आधीच डबघाईची आहे. त्यात देशात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचीही उणीव जाणवत आहे. अशा परिस्थितीत तू जाणेच योग्य आहे. तू लवकरात लवकर गेलास तर आम्ही तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही.
                      तुझीच    

                     अप्रियमैत्रिण,
                     मनिषा🙏🏻
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
27.    मेघा अनिल पाटील .                              लहान मुलाचे कोरोनास पत्र
           .. कोरोना.....
     तुला प्रिय म्हणावेसे अजिबात वाटत नाही. कारण तू सर्व  सर्व जगातील व्यक्तींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केला आहे. कुठे कुठे नाही पोहोचला तू..   ..... चीनच्या वूहान पासून तुझी सुरुवात झाली ते अखेर व्हायचे नावच नाही. नोव्हेंबर 2019 पासून तू सर्वत्र पसरतोय ,पसरतोय आणि पसरतोय.प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला तुझ्या  सूक्ष्म ,लहान रूपाने विळखा अत्यंत घट्ट घट्ट होत चाललाय. सर्वत्र तू कहर माजवला आहेस . आम्हा.. शाळकरी मित्रांचा तर तू खूपच नुकसान करून राहिला आहेस. आमचं जीवन तू बदलून टाकले आहेस. काय म्हणावे तुला तुझ्यामुळे सतत घर घर आणि गौरीच आम्ही आहोत. आमच्या शाळा बंद असल्यामुळे
निर्मळ निर्भेळ आनंदी मैत्रांची भेट  नाही. शाळाच भरत नाही म्हणून नही
चढाओढ ,  परीक्षा नाही ,स्पर्धाही नाही 
जागेवरून भांडणं नाहीत की तक्रारी नाहीत.
कट्टी, बट्टी नाही की अबोला नाही, बळजबरी
चिडवणे, रुसणे, हसणे, रागावणे  नाही .
मुख्याध्यापकांची फेरीही नाही तर पर्यवेक्षक सरांचा चक्कर नाही शाळा भरायची व सुटण्याची  घंटा नाही , गोंगाट नाही.
एक हाताचं अंतर नाही की प्रार्थना नाही,
सावधान, विश्राम नाही, सरांचे रागावणे नाही.
इथे मैदानंच नाहीत कानातली गुजगोष्ट नाही की खोटं खोटं मारणेही नाही शाळेमध्ये  आता मधली सुट्टी नाही त्यामुळे इतरांचे डबे वाटून खाणे नाही . आणि लुटुपुटूची भांडणं नाहीत त्याचबरबरीने खोट्या नकलाही नाहीत.शाळा भरणे नाही म्हणजे पाटी फुटणे ही नाही.
भुकेची कळकळ नाही कारण दिवसभर घरीच आहोत ,म्हणून कोणी घरापासून दूरही नाही .पुढील भवितव्यासाठी ज्ञानाची शिदोरी आम्हास शाळे व्यतिरिक्त कुठून मिळेल? तू सर्व लहान-थोर मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहेस, तुझ्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलून गेले आहे...... काय म्हणावे तुला? आमच्या जीवनातील निखळ आनंद तू हिरावून नेला आहेस. फक्त जीवाला जपणे हेच आयुष्य होऊन गेलं आहे......तू सजीव आहेस की निर्जीव आहेस हेदेखील कोणाला उमजलं नाही अत्यंत लहान विषाणूचा रूपात तुम्हाला आणि सर्वत्र कहर माजवला......सर्व प्राण्यांमध्ये मानव प्राणी हुशार असला आम्ही शिकत होतो असे आम्ही समजत होतो , पण हतबल झाले रे.. पण तू तर सगळ्यात हुशार समजतोय स्वतःला... पण लवकरच तुला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे निर्वेध आणि सोपे जाईल.
तुझ्यामुळे  आम्हा सर्वांचे खूप खूप आयुष्य बदलून गेले आहे, त्यामुळे शाळा भरेल का?
शाळेभोवती मैत्र जमून एकत्र डबा खायला मिळणार का? स्नेहसंमलना च्या कार्यक्रमात
धम्माल करता येईल का ? अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कोणी देईल  का?
जा  रे  जा  . ... कोरोना.....
 तू कोणालाही ...नकोना....                
   सदैवतुला घालवून लावण्यासाठी प्रयत्न करणारी.....
श्रीमती मेघा अनिल पाटील
 उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार
Mob.9665189977
Email  patilmeghaa@gmail.com
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
(15)
राक्षसी कोरोनास आभाराचे पत्र

हे कोरोना तुला मास्क घालून व सॅनीटाईझर ने हात धुऊन दुरूनच साष्टांग दंडवत...!

खरंतर जो आपल्यापासून दूर असतो त्याला पत्र लिहावं लागतं. पण जो जवळच आहे त्याला पहिल्यांदाच पत्र लिहीत आहे. कारण, तू चिनहून इतक्या लवकर आमच्यापर्यंत येशील असं वाटलं नव्हतं.
'अतिथी देवो भवं' हि आमची संस्कृतीच आहे. पण तू पहिला अतिथी असावा जो इथून निघून जावा यासाठी आम्ही सर्व भारतीय प्रार्थना करतोय.
तुझ्या येण्याने कित्येक लोकांचा रोजगार गेला, कित्येक लोकांना उपासमार सहन करावी लागली, कित्येक लोकांना आपल्याच माणसांपासून दूर राहावं लागलं. अरे कुठे फेडशील हि पापं ?
तुझ्या येण्याने विज्ञान आणि अध्यात्म दोघेही पहिल्यांदाच एकत्रित येऊन खांद्याला खांदा लावून तू कसा जाशील यावर मार्ग शोधत आहेत.
'राक्षस' हा शब्द आम्ही पौराणिक कथेतच वाचला होता. आणि त्याचा नाश करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो असेही वाचले होते. पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती तुझ्या येण्याने झाली. तुझ्या सारख्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्यासारख्या कितीतरी माणसांनी तुला संपविण्यासाठी देवाचाच अवतार घेतला आहे. तुझ्यामुळे आम्हाला माणसातला देव समजला हे एक चांगला काम तुझ्यामुळे घडलं. याबद्दल मात्र तुझे आभारच मानावे लागतील.
आमच्या या भूमीत कितीतरी थोर महापुरुष येऊन गेले त्यांनी मानवता हा एकच धर्म असल्याचे ठासून सांगितले पण ते आम्हाला पटत नव्हते. पण तुझ्या येण्याने प्रत्येक जातीधर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी माणुसकी हा एकच धर्म जपला आहे. तुझ्यामुळे आमच्यातली माणुसकी आम्हाला समजली त्याबद्दल तुझे आभार मानायचे आहेत.
मानवाने गरजेपुरताच खर्च करावा, पैशांची उधळपट्टी करू नये असं सुद्धा कितीवेळा आम्हाला सांगण्यात आले. पण असं सहज ऐकून अमलात आणू तो मानवप्राणी कसला. पण, तुझ्या येण्याने लोक लग्न समारंभ, सण-उत्सव सुद्धा साधेपणाने साजरे करायला लागले त्याबद्दल सुद्धा तुझे आभार मानायचे आहे.
प्रत्येकाने स्वच्छता जपली पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. इतकंच नव्हे तर स्वतःचे शरीर कसे स्वच्छ ठेवले पाहिजे हे सुद्धा माणसाला सांगून समजत नव्हते तोच माणूस तुझ्या येण्याने प्रत्येक दहा मिनिटाला साबण, सॅनीटाईझर ने स्वच्छ हात धुत आहे. तू जगाला जो स्वच्छतेचा मूलमंत्र दिला त्याबद्दल सुद्धा तुझे आभार मानायचे आहे.
ए कोरोना आता एकच कर आता आमच्या देशातूनच नव्हेतर या जगातून तू रजा घे. तुझे नातलग किंवा विषाणू बांधव एकमेकांसोबत एक वेगळं विश्व निर्माण कर आणि आम्हाला सुद्धा आमच्या माणसांमध्ये राहू दे.

तू जरी आम्हाला सोडून गेलास ना तरी आम्ही तुला कधीच विसरू शकणार नाही हे मात्र नक्की. आम्हाला तुझी कितीही आठवण आली ना तरी परत मात्र येऊ नकोस.

एक त्रस्त पृथ्वीवासी नागरिक

गणेश सोळुंके (जालना)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोनाला पत्र
एक सामान्य तटस्थ नागरीक  म्हणून

    कोरोना
     तू एक अतिसूक्ष्म  विषाणू , तू नाही जिवीत ,एक अर्ध जिवीत अंश तू . परोपजीवी म्हटल्यास चूक नाही ठरणार. कदाचित वटवाघुळा वर अवलंबून होते तुझे अस्तित्व. आज तर तू  मानवात सामावून, मानवाचीच प्राण ऊर्जा ओढून करतोय तू प्रचंड नरसंहार. तू ज्याचे अस्तित्व ही शोधून सापडत नाही असा,आज मानवजातिचा कर्दनकाळ होऊन साऱ्या विश्वात पसरला आहेस. तुझ्या समोर संपूर्ण मानवजात भयभीत, आतंकित आणि हतबल झाली आहे. संपूर्ण विश्व हादरलेत तुझ्या भीतीने. तू माजवला  हाहाकार संपूर्ण जगात .केली अभान गाफील पारध कैक जीवांची घेतले लाखो बळी.हिंदु मुस्लिम शीख ईसाईचा श्रीमंत-गरीब,राजा-प्रजा,शाह-दास सर्वच मानवजात पडली भक्ष्य तुझ्या संहाराची नाही कुठला ही भेदभाव.
          कसोटीच्या काळात  मानवतेचे अलौकिक दर्शन घडते, तसेच मानवतेला असंख्य घुमारे फुटले आहे. दवाखान्यात डाॅक्टर ,नर्सेस वार्डातले,हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचारी वर्ग स्वतःच्या जिवावर उदार होऊन देवदूता सारखे सर्व रुग्णांची काळजी वाहताहेत. तुला शिरकाव करायला किंचित ही वाव मिळू नये,  म्हणून सारी पोलिस यंत्रणा स्वतःच्या जीवांची परवा न करता स्त्यावर उतरली आहे.जागोजागी अन्नछत्र उघडले आहे . तू जो हाहाकार  माजवला आहेस त्याला सर्व शक्तीनिशी मानवता तोंड देती आहे. मानवतेच्या समोर तू तोंडघशी पडत आहे.
         कोरोना तू ह्या मानवजातिचा कर्दनकाळ असला तरी ह्या मुजोर मानवजातिला त्याची जागा ही  दाखविली आहेस तू. मानवाला त्याचा खुजेपणाचा , अपूर्णतेचा ,अज्ञानाचा   साक्षात्कार घडविला आहेस  तू. जगाच्या पटलावर मानव आहे नियतीचे एक खेळणं मात्र, ह्याची पुरेपुर जाणीव करून दिली तू.
         आजचा माणूस स्वतःच उभा होता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, स्वत:च्या अहंकारापायी. दुभंगला होता धर्म आणि जातीच्या  कुंपणात, झाले तेवढे पूरे झाले आता माणूस जागा झाला, मानवजातीचे अस्तित्व संपून जाण्याआधी तुझे अस्तित्व नामशेष झालेच पाहिजे . दुसर्‍याच्या जिवंत शरीरावर जगणाऱ्या परोपजीवी, आता तुझे काही खरे नाही . प्रत्येक जण हात धुवून तुझ्या मागे लागला आहे. आज तुझ्या मुळे संपूर्ण विश्व एकजूट झाले आहे. सारे अस्त्र-शस्त्र आण्विक हत्यारे विसरून , एका आवाजाने, दृढतेने कोरोनांशी लढाया एकत्र आले संपूर्ण जग . हा लढा आहे मानवजातीच्या अस्तित्वाचा, आता तुझा कर्दनकाळ आला आहे. तुझ्या दारूण पराभव करण्यासाठी , तुला संपवण्यासाठी संपूर्ण जग कटिबद्ध , दृढनिश्चित झाले आहे 
 *कोरोना, आता तुझा विनाश आता अटळ आहे*.
      _कोरोना तू मारक आहे संहारक आहे मानवाचा.पण तू तारक ,उद्धाराक ठरला प्रकृतीचा, ह्या निसर्गाचा. स्फटिकशी निळी खळाळणारी गंगा - यमुना, रावी-चिनाब, निळेशार निलांबर आणि तसेच नीलमणीसे हे आकाश. खरच कोरोना तू मारक असूनही प्रकृतीचे हे निर्मळ,निखळ रुप तुझ्याच मुळे पहायला मिळाले हे ही तेवढेच खरे आहे_.
    *अलविदा  कोरोना अलविदा*
 एक सामान्य तटस्थ नागरीक
डाॅ.वर्षा सगदेव
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विषय -"कोरोना"ला पत्र अप्रिय आणि अनोळखी कोरोना यास पत्रास कारण की,तू नेमका कुठे जन्माला आहेस दूरदर्शन वरील बातम्या मध्ये समजले तू चीन देशात जन्माला आला तर तू चीन मध्येच न राहता वेगळ्या देशात कशाला फिरायला लागलास तू चांगले काम करीत फिरला असतास तर तुझे सर्व देशानी स्वागत केले असते पण तू तर वेगळाच निघालास तू तुझ्या जन्मभूमी ला सोडले नाहीस पहिले गुण तू दाखवलेस आणि तुझी तुझ्या देशात किती  अघोरी. ताकद आहे ती दाखवलीस आणि निष्पाप हजारो लोंकांचे प्राण घेऊन जणूकाय  पूर्वीच्या जग जेता सिंकदर सारखा या देशावरून त्या देशावर स्वारी करून अमेरिका ,स्पेन.इटली, फ्रान्स,जर्मनी,इग्लड,टर्की,इराण, रशिया, जपान,पाकिस्तान,दक्षिण कोरिया,भारत, बांगलादेश,श्रीलंका,आफ्रिका खंडात सुध्दा तू आक्रमण करुन लाखो लोकांचे प्राण घेऊन थांबला नाहीस तर तेवढ्या सर्वांची कुटुबे सुध्दा देशोधडीला लागली आहेत.आजपर्यंत जगात वेगवेगळे साथीचे रोग येवून गेलेले आहेत कोटयवधी लोक प्राणास मुकलेले आहेत पण तू मात्र सर्व जगभर हा हा कार माजविला आहेस तुला अशा नरसंहारातून असा कोणता आघोरी आनंद घूत आहेस हे तुलाच माहिती. पण तुझ्या अशा वागण्यामुळे सर्व उद्योग बंद पडलेले आहेत.सर्व देशभर लाकडाऊन आहे सर्वजण आपोआप ल्या घरातच दोन महिने होवून गेले स्वत:ला जणू कोडून घेतलेले आहे.आमचे केंद्र आणि राज्य सरकार तुला आमच्या देशातून पळवून लावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.आमच्या किती अडचणी निर्माण झाल्या त्या तुला पटणार आहेत का ?.तरी सुध्दां ऐक. आम्ही एकमेकात समाजात मिसळू शकय नाही. आमची कामे बंद,ऊत्पन्न बंद ,कारखाना बंद, रोजगार बंद ,तीन फुटाचे अंतर ठेवून समाजात मिळून वागायचे, सर्व प्रकार ची वहातूक बंद रेल्वे,बस सेवा,विमान सेवा सर्व प्रकारची खाजगी वहाने बंद,सर्वत्र संचार बंदी त्यामुळे सर्व आर्थिक बंदी,हातावर पोटभरणारे कामगार आहे त्याच ठिकणी अडकून पडले रोजी रोटी गेली शासन देईल ते खा्ऊन कसे तरी दिवस कंठीत होते एकच तुला हरवण्यासाठी पण त्या च काळात सर्व आमचे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी ,शासकीय ,निमशासकीय सर्व खात्याचे मंत्री स्वत: मुख्यमंत्री जनतेला धीर देवून मार्गदर्शन करीत होते.काही दानशूर लोकांनी केलेली मदत सुध्दा लाख मोलाची ठरली.शेवटी दुस-या राज्यातील मजूळ कंटाळून आपल्या गावी जाणेसाठी पायी निघाले ते रेल्वे रूळावर  रेल्वेखाली बळी सुध्दा गेले केवळ तुला हरवण्यासाठी  पण एवढे प्रयत्न करुन सुध्दा दवाखान्यात तू आमच्या निष्पाप लोकांचा बळी घेतच होतास रोज दूरदर्शनवर  बातम्या ऐकून आमच्या  काळजाचे ठोके चुकत होते.कोणाकडे मदत मागावी तर सर्व देवांची मंदिरे बंद,मशिदी बंद,चर्च बंद इत्यादी बंद असलेमुळे लोकांची देवावरील श्रद्धा कमी झाल्या आहेत.देवावरील विश्वासच उडाला आहे. एवढी जगात महामारी असताना आमचे कोणतेच देव तुझ्याशी सामना करु शकले नाहीत. आम्हीच आता एक होवून तुझ्याशी सामना करून आमच्या देशातून पळवून लावल्या शिवाय राहणार नाही.सर्व जगभर तुला कायमची मुठमाती देणेसाठी लस शोध मोहिम  चालू आहे थोड्याच दिवसात तू या जगातून नाहीसा होशील ही दगडावरची रेष आहे. त्याअगोदर जनाची नाहीं तर मनाची लाज वाटून स्वत: निघून जा.तुझ्या सारख्या कोडग्याना सारखे सांगून तुझ्या वागण्यात बदल होईल असे वाटत नाही.तुझा कायमचाच बंदोबस्त करतो.हीच तुला शेवटची सूचना समज.तुझा अंतकाळ जवळच आला आहे...तुझा अनोळखी  कर्दनकाळ
लेखक  जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मोनं.७५८८५६०७६१
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
(08) *श्री महेन्द्र सोनेवाने गोंदिया*   

*कोरोणास पत्र*

चि.कोरोना,
आज घडीला अख्खा जग तुला वंदन करतो आहे.तू आलास आणि संपूर्ण जगात हाहाकार उडवून टाकला सारे जग तुझ्यामुळे हादरून गेले आहे. लोकांनी आधी तुला एक साधारण छोटासा व्हायरस समजून तुझी गंमत केली, पण त्यांनाही तुझ्या गुणाची कुठे खबर होती तू दिसायला लहान पण तुझी किर्ती मोठी. तुला आठवते तुझा जन्म कुठे झाला? अरे तुझी उत्पत्ती नेमकी कुठं झाली याचे शास्त्रीय दृष्ट्या संशोधन तर झालीच पाहिजे. अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसातच चीन सरकारने कॉमेडीच्या उत्पत्तीविषयी चे कोणतेही संशोधन केंद्राच्या मंजुरीशिवाय प्रकाशित करू नये असे निर्बंध स्वतःच्याच संशोधन संस्था वर्गातले चीनमध्ये कोवीड विषाणू ची पैदास नेमकी कुठे झाली? याची माहिती लोकांना मिळेल अशी मला भीती वाटली असा याचा अर्थ घ्यायचा का तर अधुरीच राहीली पण तुझा नामकरण covid-19 कसा करण्यात आला त्यावरून तू 2019ला तुझे जन्म झाले हे सिद्ध झाले.
 तुझे पहिले दर्शन चीनच्या वाहनांमध्ये एका मनुष्याच्या शरीरातून आढळले व नंतर तुझा प्रसार हा युद्धपातळीवर संपूर्ण जगात लवकरच झाले अशा वेळी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मात्र असा प्रचार केला जात आहे .की,तू चीन मधूनच आलास तुझे पेरेंट्स हे चींचेचे आहेत, पण स्वतः चीन असे म्हणतो की, तुझी उत्पत्ती हा विज्ञान संशोधनाचा मुद्दा आहे ,आणि त्या दृष्टिकोनातून जगापुढे माहिती आली पाहिजे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने चीन व कोरोणा यांचा काहीही संबंध नाही. हा संबंध चुकीचा लावला जात असल्याचे म्हटले आहे.
साडेतीन लाखांहून अधिक लोकांचे तू बळी घेतले आहे. 57 लाखाहून अधिक जणांना तुझा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तुझ्या कीर्तीला *महामारी संकट* असल्याचे जाहीर केले आहे तुझ्या भीतीने भारत व आमचा महाराष्ट्र देखील स्वतःच्या बचावा करिता सत्य आहे पण आतापर्यंत तुझ्यासाठी कोणतीही *चॉकलेट* तयार झाली नाही म्हणून तर लोकांना तुझ्यापासून दूर आहे तुझ्या विरोधात सर्व देशाच्या सरकार व लोकही आपली तयारी करून सज्ज आहेत पण तू काही कोणाला घाबरत नाही. तुझ्या संसर्ग गोरगरीब जनतेवर बसू नये म्हणून दवाखाने व डॉक्टर सुद्धा तयार आहेत 24 तास त्याचा प्रयोग प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत आहे. गर्दीमध्ये तू आपली कला दाखवतात राहतोस म्हणून सरकारने गर्दी व्हायला नको करिता धारा 144 पण लावून ठेवला आहे .त्यासाठी मार्केट बंद ,रेल्वे बंद ,बस बंद, विमान बंद, तसेच माळ टॉकीज शाळा कॉलेज इत्यादी सर्व बंद करून लोकांना घरी राहा असे निर्देश दिले आहे.
        तुझ्या भीतीमुळे सर्व उद्योग , कारखाने सुद्धा बंद झाले . मजदूर खाली झाले. त्यांच्याजवळ पैसा नसून ते उपाशी राहण्यापेक्षा आपल्या गावाकडे निघाले. साधन नव्हते तर पैदल व सायकलने  हजार-पंधराशे किलोमीटर चालून आपल्या गावाला येऊ लागले. त्यांची उपासमारी सुद्धा झाली. ती उपासमारी पाहून इतर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, समाज सेवा, कर्मचारी, राजनैतिक पुढारी, तसेच इतर सर्व दानदाते त्यांनी आपल्या परीने दान करून लोकांना भोजनाची व्यवस्था करून दिली. दानदात्यांचे हात पुढे आले. तुझ्यामुळे हे ही संभव झाले. आपल्या देशात एवढे दानदाता आहेत हे कळले. तुझ्यामुळे देव घाबरले. मंदिर,  मज्जित, चर्च, गुरुद्वारे हे सर्व बंद झाले . मोठमोठ्या देऊळ संस्थानांनी सुद्धा तुझ्यासाठी लढा देण्यासाठी आपली तिजोरी खाली केली व सरकारला मदत केली तुझ्यामुळे देशात वाहनांची धावा धावी बंद झाली . त्यामुळे देशात असणारा प्रदूषण खूप प्रमाणात कमी झाला. कारखाने बंद होऊन त्यांचा प्रदूषण थांबला. त्यामुळे वातावरण शुद्ध झाले दिल्लीचे इंडिया गेट खुलून दिसायला लागले. हिमालयाच्या पाहड्या सुद्धा खुलून दिसायला लागल्या. नद्या शुद्ध पाण्याने वाहायला लागल्या. जंगल फुलू लागले. जंगली जनावरे स्वच्छंदी होऊन भटकायला लागले. इतर बिमारी चेही प्रमाण कमी झाले. 
 हे सर्व तुझ्यामुळे होऊ शकले. तर काही फार वाईट झाले. लोकांची प्राणहानी ईतकी  झाली की पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात एवढे लोक मेले नसावेत एवढे तुझ्यामुळे मृत्यू झाले. म्हणून आता तू आपली लीला पूर्ण कर व माघारी जा. खूप झाले तुझे खेळ. आता थांबव व लोकांना आपले काम करू दे. 
तुझाच 

तुला कधीही न विसरणारा 
__________________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
सविता साळुंके, श्रीरामपूर, कोड नंबर 13.


एका आईचे कोरोनाला पत्र

अप्रिय करोना
        तुला अनेक दुःखितांचे शिव्या व शाप
वि.वी .पत्रास कारण की तुला या जगात येऊन दोन तीन महिने झाले आहेत यापूर्वी तुझे भाऊबंद जसे प्लेग ,स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू  हेदेखील जगात आले आणि संपूर्ण जग त्यांनी देखील त्रस्त करून सोडले होते तेव्हाही जगाने त्यांचा मुकाबला केला होता आणि त्यांना हद्दपार हि केले होते।
जगाचा विध्वंस करायचा असे तुम्ही सर्व रोगांनी ठरवले आहे की काय? पण लक्षात ठेवा ही संपूर्ण मानव जात या सर्व संकटांशी झुंजताना एक होत  आहे. आणि झुंजत  राहणार आहे. आम्ही नक्कीच या संकटावर मात करू तू जे काही थैमान घातले आहेस त्यामुळे आज हजारो माता दुःखी झाल्या आहेत. तुझा प्रवेश भारतात झाला आणि आम्हाला आधी जनता कर्फ्यू  लावावा लागला त्यानंतर पहिला टप्पा दुसरा  तिसरा  आणि आता चौथा टप्पा सुरू आहे किती निष्ठूर आहेस तू. आईला आपल्या लेकराची गळाभेट घेता येत नाही. लेकरू लांब होस्टेल ला आहे म्हणून चिंता वाटत होती काय खात असेल सगळे  बंद ,सगळ्या दुकान बंद कसे हाल झाले असतील लेकराचे माहीत नाही. अनेक हातावर भरणारे  मजूर तुझ्या ह्या दहशतीमुळे घरात बसून राहिलेत . काम धंदा बंद घरात खायला काही नाही अशा परिस्थितीत त्यांनी आपापल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. काहींना रस्त्यातच कोरोना ने गाठले. काही गरोदर मातांना कित्येक दूर पायी प्रवास करावा लागला आणि यातनांना सामोरे जावे लागले. कित्तेक नवजात बालकांना त्यांच्या आईच्या मिठीत राहता आले नाही कारण आईला कोरोना  होता बाळाला दूर राहावे लागले. परदेशात अडकलेल्या कित्तेक भारतीयांना स्वतःच्या आई-वडिलांचे अंत्यदर्शननही घेता आले नाही कीती निष्ठुर आहेस तू . कित्येक करोना बाधीत  मृतांना त्यांच्या आप्तस्वकीयांना शेवटचा अग्नीडाग देता आला नाही. तुझ्यामुळे बाधित झालेल्या रुग्णांची कित्येक माता सेवा करताहेत नर्सच्या रूपात। घरी गेल्यावर स्वतःचा लेकरा पासून दूर राहावे लागते. कित्येक पोलिस करुणा बाधितांच्या संरक्षणासाठी झटत आहेत. त्यांनाही कुटुंब आहे ना रे! घरी गेल्यावर ते सुद्धा लहानशा बाळाची पापी घेऊ शकत नाही.  डॉक्टर सलग न झोपता कोरोना बाधित पेशंटची सेवा करत आहेत. किती तणावाखाली आहेत ते .साठ पासष्ठ वर्षाची आजी-आजोबा घरांमध्येच भीतीने जीवन कंठत आहेत. पाच वर्षाखालील मुलांना बाहेर येता येत नाही कारण बाहेर सगळीकडे तुझें साम्राज्य आहे. मी हे पत्र घरात राहून तुला लिहीत आहे मला माहित आहे मी जर बाहेर पडले तर तू सुद्धा कुणाच्यातरी मार्फत माझ्यावर हल्ला करशील.
सध्या लॉक डाऊन चे चौथे चरण चालू आहे. माझा मुलगा एवढ्या दूरून मला भेटण्यासाठी आला आहे परंतु त्याला चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवले आहे . चीन, अमेरिका,  या देशांमध्ये थैमान घातले आहेस भारतातही तू हातपाय पसरायला सुरुवात केली आहेस पण आम्ही तुला हरवणार. आम्ही आमची प्रतिकारशक्ती वाढवणार, आरोग्याची काळजी घेणार, आम्ही घरातच राहणार, बाहेर वावरताना सुरक्षित अंतर ठेवणार ,आमची काळजी घेणार. तू बेसावध असताना आमच्यावर हल्ला केला आहेस परंतु आता सावधानता बाळगून आम्ही तुझ्याविरुद्ध नक्कीच लढू आणि तुझा प्रत्येक हल्ला परतवून लावणार जिद्दीने ताकतीने; आणि हे सांगण्यासाठीच मी तुला पत्र लिहिण्याचा एवढा प्रपंच मांडला आहे. तु या जगातून निघून जा. आणि आम्हाला सुरक्षितपणे आनंदाने जगू दे

एक खंबीर आई
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
विषय:बाबांचे कोरोनास पत्र(28)

प्रति,
दुष्ट कोरोना,
हाहाकार नगरी

अप्रिय,कोरोना
यांस,
           मी एक सुजाण नागरिक म्हणून तुला पत्र लिहीत आहे,कोरोना बाबा आता बस्स!कर तुझे वागणे,तुझ्या येण्याने कोणास या आनंद झाला नाही उलट दुःखच झाले,आपल्या अस्तित्वाने कोणाला दुःख होत असेल,तर त्या ठिकाणी थांबू नये,एवढी साधी गोष्ट ही बाबा तुला समजू नये,नवलच म्हणावे लागेल,माणसाच्या शरीरात शिरून त्याला हलवून टाकतोस,कधी त्याला मृत्यूच्या वाटेवर नेतोस,मग हे साधे वागणे तुला कळत नाही का रे?तुला.
        बाबा रे! लहानमुलांवर तुझ्या येण्याचा इतका परिणाम झाला की,ती बापडी बाहेर जाण्याचा नावही घेत नाहीत,इतका जुलूम कशाला रस्ते,शाळा,उद्याने,सर्व शांतता पसरली आहे रे तुझ्यामुळे,आणि बापडा गरजेसाठी बाहेर पडतो,त्याला आपल्या जाळ्यात ओढतोस ,तुला दया वाटत नाही का रे वृद्धांची,त्या हातावर पोट असलेल्या श्रमिकांची त्यांचे लोटच्या लोट परत जात आहेत,आमची मुंबई किती दिमाखदार होती,तुझी नजर लागले जणू,साऱ्या जगाला.
       सर्व जीव मुठीत घेऊन बसले आहेत,कधी तुझे समूळ उच्चाटन होते,त्यासाठी नको करू इतका विध्वंस नाहीतर तुझा अंत वाईट होईल.

एक बाबा

सुजाता जाधव
नवी मुंबई
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
एका आईचे कोरोनास पत्र लेखन
[ 14 ]

अप्रिय कोरोना ,
      दंडवत .
वि. वि. पत्रास कारण की , तू आमच्या देशात एक अवदसा होऊन आलीस ... तुझ्या संहारक विषाणूने कित्येक निष्पाप लोकांचा बळी घेतलाय ... तुझ्या अस्तित्वामुळे सारे मानवी जीवन धोक्यात आलेय गं ... कित्येक बालक आपल्या आईबाबांपासून तू कायमचेच हेरावले ... कुणी आईबाप तर कुणी बहिणभाऊ प्राणास मुकले ... कुठे नवरा तर कुठे बायकोही परस्परांच्या अंत्यदर्शनापासूनही दूरावले .... किती छळतीस गं आम्हां मानवांना .... कधी जाणार गं तू कायमची या पृथ्वीवरून ... तुझ्यामुळे आम्हांला नाकतोंड नेहमीच मास्क लावून झाकावे लागतेय .... मोकळेपणानं श्वासही घेऊ शकत नाही ... की कुणा मानवांशी हातात हातही देऊ शकत नाही ... का बाई तू अशी मानवी संबंधात दरी निर्माण करून माणूसकीही संपवू पाहतेस ... जो काही थोडा बहुतांशी उरलेला काळजातील प्रेम आपूलकीचा झरा का आटवू पाहतेस तू ? जमलेल्या लग्नगाठीही तुझ्यामुळे स्थिरावल्या गं ? सर्व वाहतूक बंद होऊन रस्ते सामसूम झालीय ... हातावर पोट असणाऱ्याचे किती आबाळ झालेत गं ... ज्याला तू बाधित केलेस त्याचे जिवंतपणीच सुतक पाळले जातात गं ... जरी तो बरा झाला तरीसुद्धा त्याला बाहेरचाच रस्ता दाखवतात गं ... कित्येक परीक्षा तुझ्यामुळे बंद झाल्यात ... बिचाऱ्या पोरांच्या मेहनतीवर तर तू पाणीच फेरलेस ... तुझ्या विषाणूचे लोण अख्ख्या देशभर पसरून तू हाहाकार माजवीलास गं ... अगं बाई तू मानवघातकी का बनलीस ? जे काही आयुष्य आहे ते आम्हांला सुखा समाधानानं जरा जगू दे ना ... मानवी जीवनावर का अशी कातावून ऊठलीस ? बंद कर गं बाई तुझा हा संहारक स्वैराचार .... भले एकच लाभ झाला तुझ्यामुळे प्रदूषणाला आळा बसून सृष्टी जरा स्वच्छ व शुद्ध झाली ... पण महत्त्वपूर्ण मानवी संपत्ती मात्र तू धोक्यात आणलीस ... माझी दोन्ही हात अगदी कोपरापासून जोडून वाटल्यास तुला लोटांगण करून एकच साकडे आहे गं .... की तू आता या विश्वातून कायमचीच अशा दूर ठिकाणी जा की परत इकडे कधीच फिरकली नाही पाहिजे  .. या आईच्या पान्ह्याची शपथ आहे तुला परत फिरून येऊ नकोस ....  बरं आता पत्र थांबवते ... आशा करते तुला कीव येईल या आईची ...

           तुझीच एक 
                 आशावादी आई .
अर्चना गरूड 
किनवट , जि. नांदेड
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संकलन

1 टिप्पणी:

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...