*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- चवेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 01 जून 2020 सोमवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- भ्रष्टाचार*
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
[01/06, 11:27 AM] दुशांत निमकर: *(02) भ्रष्टाचार: एक वैश्विक गंभीर समस्या*
प्रत्येक क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे.भ्रष्टाचार ही एक समाजाला लागलेली कीड असून एक जागतिक समस्या बनली आहे.शिक्षण,आरोग्य,बांधकाम,सामाजिक,राजकीय या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो.भ्रष्टाचाराचा प्रत्यक्ष संबंध लाच घेणे आणि लाच देणे यावर अवलंबून आहे.भ्रष्टाचार म्हणजे लाचखोरीच आहे.सामान्य व्यक्तीला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही म्हणजेच व्यवस्थाच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.अधिकारी,कर्मचारी सामान्य काम असले तरी पैशाची मागणी करतात आणि काम लवकर व्हायला हवं यासाठी देखील सामान्य व्यक्ती पैसे देत असल्याने ही समस्या आणखीनच गंभीर होत असतांना दिसते आहे.भ्रष्टाचार वाढीला कारणीभूत शासनकर्ते व शासनप्रणाली जबाबदार आहे असं वाटते.शाळा,महाविद्यालयात भ्रष्टाचार निवारण अधिनियम याबाबत माहिती दिली जात असली तरी त्याचे आचरण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे आणि सर्रास लाच देणे, घेणे चालू आहेत या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचायला मिळतात.प्रत्यक्षात भ्रष्टाचार वाढीसाठी कारणीभूत म्हणजे व्यक्तीचे अनैतिक आचरण होय त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म होतो असे दिसते.,समाजामध्ये नैतिक मूल्याचा ऱ्हास होत असल्याने अगदी भ्रष्टाचार निवारण संशोधन कायदा धाब्यावर बसवून भ्रष्टाचार करीत असतो त्यामुळे आज भारतासह सर्व देशाला ही कीड लागलेली असून गंभीर समस्या ठरू पाहत आहे.
भारतात लोकशाही संसदीय शासनप्रणाली असून जनताच लोकप्रतिनिधीची निवड करीत असतो पण निवड करीत असतांना सांगोपांग विचार करून मतदान करायला हवं त्यावेळी केवळ लोकप्रतिनिधी पैसे वा इतर वस्तूचे आमिष दाखवून निवडून येत असल्याने लोकप्रतिनिधीवर अंकुश राहत नाही त्यामुळे निवडून आल्यानंतर स्वतःचा स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी जनतेचा कोणताही विचार केला जात नाही त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा,कोळसा घोटाळा,तेलगी प्रकरण,डाळ घोटाळा,चिक्की घोटाळा,जलसिंचन विभागातील घोटाळा असे अनेक घोटाळ्यातून पारदर्शकतेचा आव आणणारे प्रतिनिधींनी हा भ्रष्टाचार केला आहे याला वाचा फोडण्याचे कार्य करणारे पत्रकार आहेत परंतु घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी पत्रकाराला मारहाण झाल्याचे उदाहरण भरपूर आहेत यात पदाधिकारी,अधिकारी यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी दूर राहून पारदर्शक,प्रामाणिकपणाने कार्य करण्यात यावे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र शासनाचा एक रुपया पाठविला असता त्यांच्यापैकी फक्त पंधरा पैसे सामान्य व्यक्तिपर्यत पोहचते त्यामुळे स्वतः प्रामाणिक राहून समाजात आदर्श निर्माण केल्यास भ्रष्टाचार निर्मुलन नक्कीच होऊ शकते.
शिक्षण क्षेत्र यातून सुटलेले नाही.शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असून खाजगी शाळा खूप शालेय शुल्क आकारणी करीत आहे.शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी पैशाची मागणी केली जाते.उदा.शाळेला मान्यता मिळण्यासाठी,मेडिकल बिल काढण्यासाठी व इतर अशा अनेक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आर्थिक व्यवहार केला जातो.आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष संबंध भ्रष्टाचाराशी आहे.सुशिक्षित अधिकारी,कर्मचारी पदावर असतांना अनैतिक आचरणातून पैसे कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे असे केवळ आपल्याच गाव,तालुका,जिल्हा,राज्य,देश नाही तर प्रत्येक देशात ही समस्या आवासून उभी आहे त्यामुळे संविधानातील समतेच्या मूल्याची पायमल्ली होत असून गरीब-श्रीमंतीची दरी आणखी फोफावत आहे.
भ्रष्टाचार निवारण संशोधन कायदा-2018 ची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे गरजेचे आहे.प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी यांनी स्वतःच्या कर्तव्य प्रामाणिकपणाने करावे कारण प्रामाणिकपणा हा त्या सर्वांचा आरसा आहे म्हणून प्रत्येकांनी स्वतः भ्रष्टाचारामुक्त होण्यासाठी लाच देणे वा घेणे टाळले पाहिजे आणि एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यास RTI-2005 (माहिती अधिकार कायद्याचा) वापर करून कठोर कारवाई करण्यात यावी.सध्या परिस्थितीत नेता आणि अभिनेता यांना सामान्य माणूस आदर्श मानत असल्याने त्याचे वर्तन न्यायसंगत,पारदर्शक,प्रतिष्ठा राखणारे असायला हवे तेव्हाच या भ्रष्टाचाररुपी राक्षसाला देशातून नाहीतर जगातून हद्दपार करता येऊ शकते.
✒️ श्री दुशांत बाबुराव निमकर
मु चक फुटाणा, चंद्रपूर
मो न 9765548949
[01/06, 11:28 AM] महेंद्र सोनवने: *(08)*
*भ्रष्टाचार; एक चिंतन*
"गल्लीत मोहल्यात गोंधळ आहे प्रत्येक भ्रष्टाचारी चोर आहे".
सारा देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला, तर एक दिवस सारा देश भ्रष्टाचारात बुडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्नद विचारला तर तो मोठ्या सात्वित संतापाने वरील शब्दात एक भाषण देतो. परंतु देशातला हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी तो एक पाऊलसुध्दा पुढे टाकायला तया नसतो. अर्थात भ्रष्टाचाराचा खात्मा करणे हे काही अशा मध्यमवर्गीय माणसाचे काम नव्हे. ते करणारे अण्णा हजारे सारखे खरोखरच धाडसी लोक आवश्यक आहेत. मात्र या मध्यमवर्गीय माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावेच असावे असे आपण म्हणू शकणार नाही. मात्र त्याने स्वतः भ्रष्टाचार करू नये, शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण आपण कोणाला लाच देणार नाही आणि संधी आली तर लाच खाणारही नाही अशी प्रतिज्ञा त्याने करावी. त्यांनी एवढी गोष्ट केली तरी देशातला भ्रष्टाचार बराच कमी होऊ शकतो. परंतु आपण लोक भाषण देण्यापलीकडे काहीच करत नाही.
"देशाचा हवा विकास, भ्रष्ट नेत्यांना बाळगू नका जवळपास."
हे भाषणसुध्दा जाहीरपणे देत नाही तर आपल्या मित्रांसमोर आणि बायका मुलांसमोर देतो आणि प्रत्यक्षात आपण स्वतःसुध्दा भ्रष्टाचारात लिप्त असतो हे तो मान्य करत नाही. नुकतेच एका अधिकार्या शी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी नेहमीप्रमाणे, पोलीस सध्या जास्त भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप केला. तो आरोप ऐकल्यावर त्या अधिकार्याचा मला राग आला खरे परंतु त्याने आपला राग आवरला आणि भ्रष्टाचाराच्या संबंधात काही माहिती सांगून मलाच काही प्रश्ना विचारले. पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो हे त्यांनी मान्य केले. मात्र पोलीस अधिकारी सतत गुन्हे करणार्याा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनच पैसे खात असतात असे त्यांनी म्हटले. पोलीस पैसा खात असले तरी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोलिसांशी कधी संबंधही येत नाही आणि आपणही पोलिसांना पैसे दिले असे सांगणारे फार कमी लोक भेटतात. या अधिकार्यााने विचारलेला एक प्रश्नण फार भेदक होता. त्याने आमच्यासमोर बसलेल्या सर्वांनाच एक प्रश्नत विचारला, ‘तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देताना देणगी दिलेली आहे का?’ प्रत्येकांनी सांगितले की आम्ही देणगी दिलेली आहे. परंतु मुलांच्या शाळा प्रवेशासाठी देणगी देणे हा कायद्याने गुन्हा आहे हे बर्यातच लोकांना माहीतसुध्दा नव्हते. परंतु या पोलीस अधिकार्याशने याची जाणीव करून दिली आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश हा देणगी देऊन, संबंधित कायदा मोडून झालेला असतो. हे कटूसत्य सांगितले.
पोलीस भ्रष्टाचार करतात, सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप भ्रष्टाचार असतो परंतु या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली नसते. परंतु शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. त्याचा हा युक्तिवाद बिनतोड होता. त्या पुढे जाऊन त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. लग्नात हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, एवढेच नव्हे तर सासर्यासने जावयाला काही भेटवस्तू देणे यालासुध्दा कायद्याने काही बंधने घातलेली आहेत. त्याशिवाय सरकारी कर्मचार्यांतवर, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात किती खर्च झाला आणि त्यांना कोणी कोणी भेटवस्तू दिल्या याची माहिती सादर करण्याचेसुध्दा बंधन आहे. मात्र लग्न समारंभातले हे दोन कायदे सरसकट सर्व लोक मोडत असतात. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सन्माननीय अपवाद असतात. मात्र लग्न समारंभात आपण कायद्याने ठरवून दिलेली अनेक बंधने मोडत असतो, भ्रष्टाचार करत असतो. मात्र आपण भ्रष्टाचार करत आहोत याची फार कमी लोकांना जाणीव असते आणि ज्यांना जाणीव असते त्यांना खंत नसते पण तरीही हे लोक भ्रष्टाचाराच्याबाबतीत लोकांवर आरोप करत असतात.
" भ्रष्टाचार देशातून मिटवू या ,भ्रष्ट राजनेत्याना हटवू या !"
नुकतेच मित्राने छगन भुजबळबद्दल प्रश्नअ विचारला की छगन भुजबळ हे त्यांच्यावरील खटल्यातून सुटतील का त्यांना शिक्षा होईल? अनुभवी पत्रकार म्हणून त्यांना माझे मत हवे होते. त्यांना मी वेगळ्या पध्दतीने माहिती दिली. तुम्ही चप्पल खरेदी करता आणि दुकानदाराकडे पावती मागत नाही. हा गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण सरळ सरळ पावती नाकारतो आणि सरकारचे कराचे उत्पन्न कमी करत असतो. आपल्यावर या प्रकरणात कोणी खटला भरत नाही म्हणून आपण सुरक्षित राहतो. पण तसा खटला भरण्याचा निर्णय कोणी घेतलाच तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. आता छगन भुजबळ 0यांना जवळपास २ हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याबद्दल कोर्टात खेचण्यात आले आहे. त्यांचे हे २ हजार कोटी रुपयांचे अनेक व्यवहार कायदेशीरच असतील का? कितीतरी ठिकाणी आपण चप्पल खरेदी करताना जसा भ्रष्टाचार करतो तसा त्यांनी केलाच असणार. त्यामुळे त्यांच्या सुटण्याचा प्रश्नआच नाही. एवढ्या मोठ्या व्यवहारापैकी एक छोटासा व्यवहार जरी कायद्याच्या कचाट्यात सापडला तरी तरी भुजबळ गजाआड जाऊ शकतात. आपण सगळे भ्रष्टाचारावर लेक्चर देतो परंतु लहान मोठ्या पातळीवर आपण सगळे भुजबळच असतो. मात्र पोलीस पैसे खातात असा आरोप करत असतो.
*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*
*(9421802067 )*
[01/06, 11:46 AM] अमित बडगे: *(38)*
*"भ्रष्टाचार एक संसर्गजन्य रोग"*
चिरीमिरीच्या रुपाने आलेल्या छोट्याशा विषाणूने धारण केलेले विक्राळरूप म्हणजे भ्रष्टाचार होय.हा भ्रष्टाचार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांच्या नसानसांत भिनलेला रोग आहे. आज विज्ञानाची एवढी प्रगती झाली की,प्रत्येक दुर्धर आजारावर इलाज आहे परंतु भ्रष्टाचार हा एकमेव आजार बनलाय की ज्याच्यावर कोणताही विद्वान इलाज शोधू शकला नाही.यामागचे एकमेव कारण म्हणजे याचा संसर्गच एवढा शक्तिशाली आहे की,या रोगाचे उच्चाटन करणे अशक्यच बाब आहे.
आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. एखादे काम कुठलीही लाच न घेता करणे म्हणजे त्या कामाचे महत्व कमी करुन घेण्यासारखे झाले आहे.मतदाराने मतदान पैसे न घेता केले तर त्या मतदाराला महत्व उरेनासे झाले. मतदाराला वाटते,हा उमेदवार उद्या निवडून आल्यावर खोऱ्याने पैसा कमावणार मग मी आज मतदानासाठी पैसे घेतले तर बिघडले कुठे?निवडून येणारा उमेदवार तोच विचार करतो,निवडणुकीसाठी एवढा पैसा खर्च केला मग तो काढण्यासाठी भ्रष्टाचार हा मार्ग निवडतो. शाळेत बालकाला प्रवेश देण्यापासूनच भ्रष्टाचाराची लागण अशी होते,तो भ्रष्टाचार हाडीमाणसी इतका भिनतो की,लपूनछपून निवडलेला हा चोरमार्ग मग राजमार्ग कधी बनतो ,हे लक्षातही येत नाही.
"उजेड ज्याला मागावयास गेलो,
तो सूर्यही लाचार पाहिला मी"
अशी अवस्था सूर्याइतके बुध्दीने तेजस्वी असणाऱ्या व्यक्तीची होते ती फक्त भ्रष्टाचारामुळे! एखाद्या रोगाने ग्रासलेला व्यक्ती जेव्हा हतबल झालेला असतो तेवढीच लाचारी,हतबलता जेव्हा भ्रष्ट व्यक्तीची लाचखोरी पकडल्यावर होते. भ्रष्टाचार हा रोग अतिशय संसर्गजन्य आहे. "देरे हरी पलंगावरी"अशी आळशी वृती जोपासणार्याना तर भ्रष्टाचार हा अगदी चोखंदळ मार्ग वाटतो. जोपर्यंत तो उघडकीस येत नाही तोपर्यंत त्याची लागण इतरांना झपाट्याने होत असते. त्याचा प्रसार झपाट्याने होतो.आज असे एकही क्षेत्र नाही,जिथे या रोगाची लागण झालेली नाही. जुने लोक म्हणत असत,"लोकं मेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खायला कमी करत नाहीत". आधी या बोलण्यात अतिशयोक्ती वाटायची! पण जेव्हा कारगील युध्दाच्या वेळी संबंधित खात्याने कफन घोटाळा केला होता,तेव्हा मात्र मी हातून हादरले होते. ज्या क्षेत्राबद्दल नाव घेताच स्वाभिमानाने छाती वीतभर फुगावी त्या क्षेत्रात जर भ्रष्टाचार एवढा घुसला असेल तर इत्तर क्षेत्राबद्दल कल्पना किंवा विचारच न केलेला बरा!या भ्रष्टाचारामुळे गुणवंताना नाहीतर धनवंताना सर्व बाबींचा फायदा होतो. आज देशात भ्रष्टाचार नसता तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची गरजच पडली नसती. ज्या शिक्षणामुळे परिवर्तनाची दारे उघडली त्या शिक्षणाची दारे मात्र भरमसाठ लाच घेऊनच उघडली जाताहेत,हे किती शोकांतिका आहे!
'एका हाताने टाळी वाजत नाही' हे त्रिवार सत्य आहे. लाच मागणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच गुन्हेगार हा लाच देणारा आहे. कारण या धावपळीच्या युगात कोणाला थांबायला वेळच नाही. प्रत्येक बाब पैसा देवून जेवढ्या लवकर होइल तेवढ्या लवकर करुन घेण्याच्या हव्यासापोटी आपण भ्रष्टाचाराला रोज खतपाणी घालून वाढवतो आहेत. अशा वेळी सर्व भारतीयानी एकत्र येवून काही झाले तरी लाच देणार नाही व घेणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाच घ्यायला हवी.कारण यासंदर्भाने अनेक कायदेही झाले आहेत. परंतु जोपर्यंत मन:परिवर्तन होत नाही तोपर्यंत कायद्याचा काहीही उपयोग होणार नाही.
- अमित प्र. बडगे, नागपूर
(7030269143)
[01/06, 11:52 AM] Ankush Shingade: भ्रष्टाचार की कथा
शासन ने खिचड़ी पकाने का निर्णय लिया था। शासन हर पाच पाच साल मे अपने पाठशाला में बाटने वाले उपक्रम में बदलाव करते थे। अभी खिचड़ी लाये थे।पहले अंडे़, दूध आदि चीज़ बाँटते थे। परंतु कुछ दिन के चलते सरकार ने दूध और अंडे़ बाँटना बंद किये।क्योंकि वहाँपर भ्रष्टाचार होता था। उस अंड़ों में से ज्यादातर अंड़े खराब निकलते थे। अतः दूध में ज्यादातर पानी होने से उसमे अधिकांश पोषक तत्व नही रहते थे। उस वजह से बच्चों के सेहत को भी फक्र नज़र आता था। अपितु कुछ दिन योजनाओं का बौरा बज़ गया। छात्र को क्या देना चाहिए के चक्कर में बरसों बीत गये।तब शासन ने चाँवल बाँटने का प्रावधान लाया।लेकिन उसमे भी भ्रष्टाचार।चाँवल के पाकिट फोड़कर चाँवल बाँटते थे और उस फोड़े हुए चावल में जो भी चाँवल बचता था। वह चाँवल किसी दुकान में बाँट देते थे। कभी कभी तो चाँवल का पाकिट बच्चों के हाथ से फट जाने से चाँवल बच्चों के घर नही पहुँचता था।
शासन ने उसका विचार किया कि वह चाँवल माँ बाप भी खाते थे। उसके बदले पाठशाला में खिचड़ी बनाने का उपक्रम पाठशाला में सरकार ने चालू करने का निर्णय लिया।खिड़की के तहत एक बच्चे को शंभर ग्रँम चाँवल तथा उसके पकाने की पुरी सामुग्री मिलती थी। उस सामुग्री के तहत एक बच्चा सौ ग्रँम चाँवल नही खाता था।अपितु इसमे भी बचता था पैसा।इस योजना के तहत सरकार को जरुर नुकसान हुआ। परंतु पाठशाला वाले बहोत ही धनवान हुए।उनको तो उस पैसों से इतना घमंड़ चढ़ा था कि वे लोग किसी भी अध्यापक को कभी भी पाठशाला से निकाल देते।वकीलों तथा कोर्ट को भी खरीद लेते और फैसलों को अपने पक्ष में तब्दील कर देते।इसी विषय से अध्यापक चिंतीत थे। देश भलाई स्वतंत्र हुआ था। लोगों ने भलाई स्वतंत्र्यता के सपने देखे होगे।देश में भलाई कानून बना होगा और भलाई पाठशालाओं में से पढ़े बच्चों का भविष्य उज्ज्वल बनता होगा। परंतु जिस देश में अध्यापक खुश न था। उस देश की बरबादी नज़दीक आ रही थी।
भ्रष्टाचार के चलते हर पाठशाला में प्रधानाध्यापक छात्र पाठशाला में नही आने के बावजुद भी उसकी मौजूदगी दिखा देता।क्योंकि उसे खिचड़ी का पैसा ज्यादा से ज्यादा मिले और वह उन पैसों में से ज्यादा से ज्यादा पैसा कमाये।अध्यापक भी प्रधानाध्यापक से तकलिफ ना हो।अपितु वे भी उनका साथ दिया करते।सिर्फ दिखावे के लिए दो चार छात्र की मौजूदगी वे अध्यापक नही दिखाते हुए पाठशाला चल रही थी। इसमें शासन के पैसों का खुला अपहार था। परंतु शासन व्यवस्था कुछ नही कहती थी। कुछ करती भी नही थी।क्योंकि शासन व्यवस्था में मंत्रीयों के रिश्तेदार तथा पाठशाला भी उन्ही रिश्तेदारों की थी।
कभी कभी तो पेपर में छपकर आता था कि खिड़की में सर्प पका।चूहाँ पका।फिर भी शासन ने खिचड़ी चालू ही रखी थी।
खिचड़ी बनाते समय हरदिन अलग अलग पदार्थों की खिचड़ी बनाना,हरदिन खिचड़ी पकाना ऐसा नियम था। परंतु पाठशाला वाले कभी खिचड़ी पकाते,तो कभी पकाते ही नही थे। वैसे खिचड़ी के अलग अलग मेनू की जगह एक ही मेनू रहता था। जिस मेनू को खा खाकर छात्र बोर हो गये थे। अपितु वे घर से भोजन लाते। परंतु पाठशाला की खिचड़ी खाते नही थे।कोई कोई तो पाठशाला वाले सिर्फ हल्दी नमक के सिवा खिचड़ी में कुछ भी नही डालते थे। ना ही उसमें तिखापन और ना ही उसमें तेल रहने से उसका स्वाद ऐसे बिगड़ गया कि हर छात्राओं ने अधिकतर खिचड़ी खाना ही बंद किया।तब कितनी भी कम खिचड़ी बनाये पाठशाला वाले। इतनी सारी खिचड़ी बचती कि वह खिचड़ी कचरे मे फेंक देते।वह ऐसी जगह फेंक देते कि जहाँ सुअर,कुत्ते वह खिचड़ी खाते रहते थे। परंतु वे भी पुरी खिचड़ी न खाने से आजुबाजू में दुर्गंध फैलती रहती थी। अतः विषैलें जीवजंतू फैलने का डर भी था। इसी खिचड़ी की वजह से हर इलाके में सुअर दिखाई देते थे। अतः वे सुअर लोगों के बर्तनों को भी मुँह लगाते रहते थे।
कम पकानेपर भी खिचड़ी में कुछ स्वाद की महक न रहने से जो खिचड़ी जो बचती थी।उसमें अध्यापक वर्ग की गलती नही थी। परंतु प्रधानाध्यापक अध्यापकों पर ही चिल्लाता रहता था। धमकाते रहता था। परंतु अध्यापको में से कुछ अध्यापक जब कहते थे कि वह खिचड़ी के हरदिन मेनू बदलाये और हरदिन खिचड़ी अच्छी परायें ताँकि स्वाद के महक से हर छात्र खिचड़ी खा सके। अच्छा स्वाद रहेगा तो कोई भी खायेगा।परंतु जो अध्यापक ऐसा सुझाव प्रधानाध्यापक को देने लगे थे। उनकी प्रधानाध्यापक घृणा करने लगे थे। वे प्रधानाध्यापक उनको बड़ी तकलीफ देने लगे थे। क्योंकि उसमें से बचा चाँवल बेचते समय कभी भी इन अध्यापकों से अपने को क्षति पहूँच सकती है। ऐसे प्रधानाध्यापक को लगता था।
खिचड़ी से मालामाल के गिनती में माधव का प्रधानाध्यापक भी आया था। बाकी लोगों के भाँति वह भी खिचड़ी से पैसें कमाने लगा था। अतः जो जो अध्यापक उसका विरोध करते रहते।वो वो अध्यापकों को वह परेशान करने लगा था। उस परेशानी का शिकार माधव भी हुआ था। क्योंकि माधव को भ्रष्टाचार पहले से ही नही चलता था। वह इमानदार था।बखूबी उसकी इमानदारी की चर्चा पुरे पाठशाला मेें थी। इसलिए उसके प्रधानाध्यापक से झगड़े होते रहते थे।
प्रधानाध्यापक ने सैर में से तथा स्नेहमिलन से भी पैसा कमाया था। तथा उन पैसों के अतिरिक्त बोनाफाईट,परीक्षाशुल्क,सरस्वतीपुजन,तीलगुल,गोपालकाला आदि माध्यम से प्रधानाध्यापक बहोत ही धनवान बना था।वह आदि माध्यम से प्रधानाध्यापक धनवान बनते ही उसका स्वभाव इतना बदल गया कि अब वह किसी पुलिस या किसी कोर्टकचेरी को नही जानता था।
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
[01/06, 1:29 PM] Manisha Pandhare, Solapur: (४०)
मनिषा पांढरे, सोलापूर
भ्रष्टाचारावर नियंत्रण
भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली एक किड आहे. कोणत्याही कामासाठी पैसे देणे/ घेणे याला आपण भ्रष्टाचार असे म्हणतो.आज भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झालेला आहे. कोणत्याही क्षेत्रात आज काम करायचे झाल्यास पैसे दिल्याशिवाय होतच नाही.कोणतेही क्षेत्र असू द्या तेथे भ्रष्टाचार दिसतो. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही भ्रष्टाचाराने शिरकाव केलेला आहे.
आपल्याला भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खरी सुरुवात ही मी माझ्यापासून करायला हवी. प्रत्येकाने असे ठरवले तरच हे शक्य आहे. आपण इतरांकडून अपेक्षा ठेवत असतो पण स्वत: पासून कधीच सुरुवात करत नाही.तीच सुरूवात मी माझ्यापासून केली तर आपल्या कडून प्रेरणा घेऊन इतरही त्याचे अनुकरण करतील.
साध्या साध्या छोटया गोष्टींसाठी देखील आज पैसे द्यावे लागतात.
एक गोष्ट मला आठवते.....
यमराजाच्या दरबारात अनेक घड्याळ लावलेली असतात. सर्व घड्याळ वेगाने फिरत असतात त्यातच एकाने विचारले, " महाराज येथे सर्व देशांचे घड्याळ आहेत पण आमच्या भारत देशाची घड्याळ मात्र दिसत नाही ." तेव्हा यमराजांनी पंख्यांकडे बोट दाखवले......पंख्याला खालील बाजूस एक घड्याळ चिकटलेले होते . हा एक जोक जरी असला तरीही आपल्या देशातील भ्रष्टाचार किती वाढला आहे हे यावरून सहज लक्षात येते.
यासाठी मला कितीही त्रास पडला तरी माझे काम मी पैसे न देता अर्थात भ्रष्टाचार न काम करत राहू. काही कामे होण्यास उशीर होईल पण पाठपुरावा केला तर ते सहज शक्य आहे. तेव्हा आजपासून माझ्यासोबत तुम्हीही ठरवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही आणि करु देणार नाही.
[01/06, 2:07 PM] यशोधरा सोनेवाने गोन्दिया: *(09)*भ्रष्टाचाराचा भस्मासूर*
संपूर्ण भारताला भ्रष्टाचार नावाच्या राक्षसाने ग्रासले आहे.भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोरील गहन समस्या आहे. अगदी सरकारी शिपायापासून ते मोठ-मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटेमोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी द्यावेच लागते, कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही पण कळत नकळत आपणही भ्रष्टाचाराला बढावा देत असतो.
भारताची विकसीत राष्ट्राकडे वाटचाल सुरू असतांनाच लोकसंख्येच्या भस्मासुराने भारताला ग्रासले आहे. सोबतच बेरोजगारी भ्रष्टाचार आहेच.
भ्रष्टाचाराची सुरवात झाली कशी व कुठून ह्याबद्दल कोणीही फारशी माहिती सांगू शकत नाही, पण हे खर आहे कि जस जसा माणसांकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. पूर्वी जेव्हा माणसांकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्यांच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या. त्यांची अपेक्षा फक्त दोन वेळेचे पुरेसे जेवण आणि जीवनावश्यक वस्तू मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ मनाचे होते. जसजशी सुधारणा होत गेली तश्या अनेक चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. गरज नसतानाही त्या हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसांना लोभ वाटू लागला. जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हाव वाढू लागली. ही हावच मूळ आहे भ्रष्टाचाराचे.
आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरफायदा घेऊन कमीतकमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश्य असतो. पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार जेवढा लाच मागणारा माणूस. सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो. किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो. कितीवेळा बघतो आपण नाक्यावर पोलिसांनी पकडले कि सर्वजण पोलिसाच्या हातावर पन्नास – शंभर रुपये टेकवून पुढे निघून जातात. सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखांची लाच दिली जाते. शाळेत- कॉलेजात अॅडमिशन घेताना कोण-कोणाला पैसे चारले जातात. इतकच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. पटत असेल का हे देवाला? आपल्या मनाला तरी पटते का? विचारांची श्रृंखला सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे.किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात.
निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जातात. नंतर जेव्हा अश्या लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. का हे आपल्याला आधी कळत नाही कि जे लोक चांगली काम करून निवडून येण्याऐवजी मतदाराला पैसे चारून निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणार नाही. तेव्हा आपण डोळ्यावर बक्षिसांची पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीमला नाव ठेवत बसतो. पण आपली चूक कबूल करत नाही.
कोरोणामुळे घरी चित्रपट पाहण्याची चंगळच. कालच एक चित्रपट पाहिला . त्यात एक भ्रष्ट अधिकारी असतो जो पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे अॅडमिशन करून देत असतो. त्यामुळे चांगली बुद्धीमत्ता असलेली मुले पुढे येऊ शकत नाही याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवतात. पुढे हीच मुले पैसे चारून पेपर विकत घेऊन पास होतात. काही काळानंतर त्या अधिकाराच्या मुलाला भयंकर रोग होतो आणि त्याचे ऑपरेशन करायचे असते. तो मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथे त्याला पैसे देऊन डॉक्टर बनलेला मुलगा आढळतो. हा काय आपल्या मुलाचे ऑपरेशन करणार म्हणून तो दुसरीकडे जातो पण तिथे सुद्धा हीच परिस्थिती. तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सर्वत्र पैशाच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात. त्याला आपली चूक उमगते ,समजते पण "चिडीया चुग गई खेत अब पछतायं होयं क्या ? "आता वेळ निघून गेलेली असते.
आपणा सर्वाना समजायला पाहिजे की, भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती करायला पाहिजे. थोड्या प्रमाणात त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करून घेतले नाही पाहिजे. कदाचित आपल्या सर्वाना हे पटत असत, पण पटलं तरी आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत जातो. "म्हणतात ना ,कळते पण वळत नाही." जेव्हा दुसरे आपल्या पेक्षा जास्त पैसे देवून आपल्या पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने शंख करत बसतो. कधी कधी तर असे होते की, आपण पैसे देऊन काम करवून घेतो आणि आपल्या ह्या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते, मग तो माणूस एखाद्या गरिबाचे सहज काम करत नाही. कारण त्यात त्याला फायदा वा नफा नसतो. किती त्रास होत असेल गरिबांना या भ्रष्टाचाराचा हा आपण विचारच नाही करत. माझ काम पटकन झालं पाहिजे, पाहिजे तर थोडे पैसे घ्या पण काम करा ही अनेकांची वृत्ती असते.
आपण आपल्याला सुधारत का नाही ? हे सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात येत नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करावी मला कितीही त्रास पडला, कामाला कितीही वेळ लागला तरी ,मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही.मनातही भ्रष्टाचाराचा विचारांचा शिरकाव करू देणार नाही.आणि आपले भविष्य ,उद्याचे नागरिक यांच्या तही भ्रष्टाचाराच्या भस्मासूर शिरकाव करणार नाही असेच धडे गिरवू या!!
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
[01/06, 2:14 PM] senkude: ( 5)
भ्रष्टाचाराचा भस्मासुर
आजच्या काळात भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा निष्ठा का हरवतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अमानवी कृत्य का करतो? मंदिराचा सुवर्णकळस घडवणारा कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्याच्या आचरणाला काय म्हणावे?
माणसाच्या या सार्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती'!
ही उपभोगवादी वृत्ती माणसाच्या अंगात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असेल. आजकाल भ्रष्टाचार हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुव्यवस्था व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात.
फार प्राचीन काळी भ्रष्टाचार नावाचा हा शब्द अस्तित्वात नव्हता. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. भ्रष्ट आचरण करणाऱ्याला वाव नव्हता. पण आज सार्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही तेथे भ्रष्टाचार होत नाही.आज भ्रष्टाचार या शब्दाचा समाजजीवनात सर्रास प्रयोग करण्यात येत आहे.भ्रष्टाचाराचा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची वाळवी आज समाज मनाला पोखरू लागली आहे. समाजातून मानवीय नीतिमूल्यांचा नाश होत असून आज समाजामध्ये लाच घेणे, खोटे बोलणे, फसगत करणे, चोरटा व्यापार करणे, आयकर चुकवणे, अफरातफर करणे, बळजोरी करणे इत्यादी अनैतिक मार्गाचा अवलंब होऊन या अनेकविधी भ्रष्टाचार भ्रष्टाचाररुपी प्राण्यांने संपूर्ण समाज डोंगर पोखरून काढलेला आहे. आज भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात माणूस अडकत चालला
आहे. आता या भ्रष्टाचारातून माणसाची सुटका होणार तरी कधी? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावत आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपले उघड उघड आकांत तांडव करून समाजाला काळीमा फासण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचाराचा ओघ अव्याहतपणे सुरूच आहे. या अव्याहतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधी पायमल्ली बसते? कधी आळा बसतो?
असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो?
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हादगाव जि.नांदेड.
[01/06, 3:09 PM] जी एस पाटील: कोड नं.३६ विषय:-"भ्रस्टाचार" आजचा विषय फार महत्वाचा आहे.भ्रस्टाचार याची आपण फोड़ केली तर ती असेल अशी " भ्रस्ट अधिक आचार" भ्रस्ट म्हणजे वाईट आणि आचार म्हणजे आचरण म्हणजेच साधी सोपी व्याख्या केली तर "वाईट आचरण" म्हणजे भ्रस्टाचार हा शब्द वापरून वापरुन गुळगुळीत झालेला आहे म्हटले तर वावगे होणार नाही.कारण रोजचे कोणतेहि वर्तमान पत्र पाहिली तर कोठे ना कोठे एक तरी बातमी आपणास भ्रष्टाचाराची वाचावयास मिळत असते. या भ्रष्टाचारामध्ये शासनाचे कोणतेहि विभाग यातून सुटलेले नाहीत.हे आज पर्यंत वाचलेल्या वेगवेगळया बातम्या वाचून असेच समाजमन तयार झालेले असेल ते चुकीचे म्हणता येणार नाही. अगदी आपण रोज जे दुध खरेदी करतो ते शुध्द मिळते का? काय काय त्यात मिसळून जनतेच्या जीवाशी खेळणारे महाभागाची भांडाफोड झालेली दूर दर्शन वाहिन्या वरून पाहलेली आहे. हा भ्रस्टाचाराचाच भाग आहे.अशीच आपल्या दैनंदिन वापरातील वेगवेगळ्या अत्यावशक असणा-या खाध्य तेल, कडधान्य, ज्वारी,गहू,तांदूळ ,वेगवेगळ्या डाळी यामध्ये भेसळ करून भ्रष्टाचार मधून सुटका झालेली नाहीं. अगदी काही महाभाग आहेत वहानासाठी लागणारे डिझेल,पेट्रोल ही सुध्दां भेसळयुक्त नसेल असे सांगता येणार नाही कारण काही पेट्रोलच्या पंपाच्या तपासणी करून काही पंप आजहि बंद आहेत ही भ्रष्टाचाराची उदाहरण म्हणता येईल.वेगळ्या ठिकाणी तयार होणारे रस्ते ते तयार करून घेणारे अधिकारी चांगले असले पाहिजेत नाही तर खडी,डांबर कमी वापरून काही ठेकेदार शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून भ्रष्टाचार करतात. आणि भ्रष्टाचार करणारे सर्वच काही सापडत नाहीत. यख साठी भ्रष्टाचार जर रोखायचा असेल तर जनतेने शासनाच्या लक्षात आणून देणेची गरज आहे.नाही तर एकच रस्ता दरवर्षी पावसाळ्यात उखडला जात असतो हे कशाचे लक्षण असते ते तुम्ही समजू शकता वेगळे सांगणेची गरज नाही.शासन काही ना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देवून गाय,म्हैस,शेळ्या,मेंढया खरेदी करण्यासाठी विविध सोसायटी च्या मार्फत जनावरे खरेदी करण्यासाठी जवळच्या बाजाराची निवड करतात पण काही महाभाग स्थानिक सोसायटी कर्मचारी यांचेशी संपर्क साधून आपली पूर्वीची घरचीच जनावरे खरेदी केली असे दाखवून शासनाच्या चांगल्या योजनेचा गैरफायदा घेतात व जनावर खरेदीची रक्क्म खिशात घालतात हे सरकार ला फसवतात हा भ्रष्टाचारच नव्हे का?सर्वच ठिकाणी असे चालते असे नाही पण हे वास्तव नाकारता येणार नाही.याठिकाणी जो कोणी लाभ धारक असणार त्याच्या उत्पन्न काही वाढणार नाही तेवढेच राहणार मात्र तुमचा आमच्या करातून गेलेल्या पैसाचा गैरवापर होणार अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देता येतील. शासकीय इमारती किवा छोटया मोठ्या पूलांच्या बांधकाम ठेकेदारा मार्फत केली जातात हया ठिकाणी काही ठेकेदार शासनास फसवत असतात गुणवत्ता पूर्वक करत नाहीत मुदतीपूर्वीच बांधकाम पडलेल्या घटना आपण दूर दर्शन वर कोसळलेले पूल किवा फुटलेले धरणाचे पाट आपण पाहिलेले आहे व त्या मुळे निरपराध लोकांचे बळी जावून काही कुटुंबे निराधार झालेली आहेत त्यांना आजहि शंभर टक्के मदत मिळालेली नाही अशाना भ्रष्टाचाराचा वास येत असतो.सध्या कोरोनामुळे आपली तिजोरी खाली झालेली आहे त्यामुळे दारुची दुकाने शासनाने सुरु केली आहेत कारण सगळयात जास्त दारूच्या करापासून जास्त ऊत्पन्न मिळते.पण याच दारू बंदी विभागामध्ये काम करणारा अधिकारी स्वतः दारू विकताना दारूच्या दुकानातच रंगेहात पकडलेली बातमी फोटो सह पाहवयास मिळते तर एका आरोग्य अधिका-याच्या शासकीय गाडीतच दारूच्या बाटल्याचा साठा सापडते ही भ्रष्टाचाराची उदारणे नव्हेत का? हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्या शिवाय राहणार नाही.कोरोना या महामारीच्या काळात गावी जाणाऱ्या काही लोकांना प्रवास करणेचा बनावट पास वाटप करणारी टोळी सापडली म्हणजे हे वाईट आचरण नाही का ? शासनाच्या लाचलुचपत विभागा मार्फत विविध ठिकाणी सापळे रचून भ्रष्टाचार करणारे पकडले जातात पण "सापडला तो चोर" या म्हणी प्रमाणे असते त्या संबधीत कोणाचा सहभाग आहे हे सुध्दा शासनाने शोधून काढले पाहिजे.सहज म्हटले जाते " करेल तो भरेल "पण ही पकडली जाणारी घटना या हिमनगाचे टोक आहे.अशा या भ्रष्टाचारी जगात गरीबांना मात्र फार झळ पोहचत असते. भ्रष्टाचारामध्ये मोठे मोठे मासे सुटून जातात पण चिरीमिरी घेणारेच सापडतात. एकाने तर म्हटलेले माझ्या ऐकण्यात आले की भ्रष्टाचार वरुन खाली पाझरत असतो जो अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा चहा सुध्दा स्वीकारत नाही तो कनिष्ठ भ्रष्टाचार करताना घाबरत असतो.पण बोटावर मोजणारेच काही मा.तुकाराम मुंडे यांच्या सारखे शासकीय नियमानुसार काम करणारे व कोणाच्याहि दबावाला बळी न पडता आपले काम निष्ठेने करतात तर त्यांच्या हाताखालील काम करणारा कोणीही भ्रष्टाचार करणार नाही. वरिष्ट अधिका-याच्या बंदोबस्त करण्यासाठी खर्च करावा लागतो तो त्यामुळे कनिष्ट कर्मचारी भ्रष्टाचार करत असतात आणि कधीतरी तरी ते लाचलुचपतच्या सापळ्यात सापडतात वरीष्ट अधिकारी नामानिराळे राहतात.हे सर्व आपणास मराठी चित्रपट "झेड पी"सदाशिव अमरापूरकर यांचा पाहिला असेल तर आपले लक्षात येईल.भ्रष्टाचाराची मुळे कशी पसरलेली आहेत हे आपले लक्षात आल्या शिवाय राहणार नाही. आपल्या देशातील विविध बैंक मधून लाखो हजार कोटि रुपये कर्ज घेऊन परदेशात पळून गेलेले आहेत हा भ्रष्टाचार नव्हे तर दुसरे काय म्हणावे.भ्रष्टाचारामुळेच गरीब हा अत्यंत गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा अगदी श्रीमंत होत चालला आहे.असा हा सहजा सहजी कोरोना सारखा न दिसणारा भ्रष्टाचार जनतेने मनावर घेवून भ्रष्टाचार करणा-याला पकडून देण्यास सरकारला मदत केली तर आपले राज्यच नव्हे तर आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होण्यास वेळ लागणार नाही....लेखक... जी.एस.कुचेकर-पाटील.भुईंज ता.वाई जि.सातारा. मो.नं.७५८८५६०७६१.
[01/06, 3:23 PM] सविता साळुंखे: कोड नंबर 13
भ्रष्टाचार
'भ्रष्टाचार' म्हणजे भ्रष्ट असे आचरण होय .आचरण जे नीतिमूल्यांचा धरून नसते.
भ्रष्टाचार नाही असे एकही क्षेत्र भारतात तरी शोधून सापडणार नाही. शिक्षण, कला, संस्कृती, आरोग्य, धर्म, राजकारण ,समाजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आढळतो. भ्रष्टाचार आहे असे आपण मान्य करतो म्हणजे भ्रष्टाचाराला आपणही कारणीभूत असतो .अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणाऱ्या हा अधिक दोषी असतो ,तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या पेक्षा तो पाहणारा व होऊ देणारा अधिक दोषी असतो.
चारा घोटाळा, बोफोर्स तोफा घोटाळा, जलसिंचन घोटाळा, कारगिल युद्धाच्यावेळी चा कफन घोटाळा यादी करतच गेलो तर कागदही पुरणार नाही एवढी भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे. सर्वसामान्य व्यक्ती म्हणेल मी या घोटाळ्यात कुठे होतो ?;परंतु आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपण भ्रष्टाचारात सामील असतो याचे छोटेसे उदाहरण आपल्याला बघता येईल. जेव्हा बस मध्ये एखाद्या छोट्या मुलाला घेऊन आपण प्रवास करतो आणि कंडक्टर विचारतात या मुलाचे वय किती तर मुलाचे अर्धे तिकीट काढायला नको म्हणून इयत्ता दुसरीत असणाऱ्या मुलालाही आपण बालवाडीत ही जात नाही असे सांगतो म्हणजे सामान्य माणूसदेखील भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा लोकांना जे प्रश्न विचारले त्याला खूप मजेशीर उत्तरे ऐकायला मिळाली. तुमच्याकडे मोबाईल आहे का ?गाडी आहे का? तुमचे स्वतःचे घर आहे का? घरात कोण कोणत्या सुविधा आहेत ?जसे फ्रीज, टीव्ही, गॅस अशा वेळी लोकांनी आमच्याकडे या सुविधा नाहीत असे टाका म्हणजे शासनाकडून येणाऱ्या सुविधा आम्हाला मिळतील असे सर्वेक्षण करणाऱ्याला सुचवले ,म्हणजेच आपले उत्पन्न लपवणे हादेखील भ्रष्टाचार आहे.अनेक अनेक श्रीमंत लोकांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत सापडली आहेत ही शोकांतिका आहे.
सोने खरेदी करताना किती लोक पक्या पावती ची मागणी करतात?
पक्या पावती मुळे टॅक्स भरला जातो हे कुणाच्या लक्षात येत नाही परंतु टॅक्स वाचवण्यासाठी दुकानदार आणि ग्राहक मात्र पक्की पावती करत नाहीत. आपण अनेक वस्तू दुकानातून खरेदी करतो प्रत्येक वेळी आपण बिलाची मागणी का करत नाही? प्रत्येक वेळी बिलाची मागणी केल्यामुळे आपल्याकडं टॅक्स आपोआपच भरला जातो आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो हे आपल्या कधी लक्षात येणार?
लग्नसमारंभात आपल्याला अनेक भेटवस्तू येतात मग आपण आपल्या मालमत्तेचे विवरण देताना आपल्याला आलेल्या प्रत्येक भेटवस्तू चे विवरण त्यात देतो का? हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे हे माहीत असूनही लोक हुंडा हा शब्द न वापरता भेट वस्तू आहेर हा शब्द वापरतात .टॅक्स चुकवण्याचा हा एक मार्ग म्हणजेच भ्रष्टाचार आहे. सरकारी कार्यालयात आपल्या कामाची फाईल लवकर निकालात निघावी म्हणून देखील आपण लाच देतो मग भ्रष्टाचाराची सुरुवात ही सामान्य माणूसच करतो. लाच मागणाऱ्यापेक्षा देणारा देखील दोषी आहे.
भ्रष्टाचार होण्यामागे कारणे शोधण्यास पहिले कारण म्हणजे 'अशिक्षितपणा 'होय लाच देणे हा गुन्हा आहे हे काही लोकांना समजत नाही .आपले काम लवकर व्हावे हा लोभ त्यांच्या मनात असतो भ्रष्टाचाराचे दुसरे कारण म्हणजे परंपरा होय, भ्रष्ट परंपरा होय कारण माझ्या आधीही लोक लाच घेत होते मग मी का घ्यायची नाही? ही मानसिकता भ्रष्टाचाराला खतपाणी घालते. भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे कारण म्हणजे हातातून सत्ता जाण्याची भीती .सत्तेचा वापर करून हवी ती कामे करून घेतली जातात अशी कामे नियमबाह्य असतात.
भ्रष्टाचार थांबविण्यासाठी भारतामध्ये भ्रष्टाचार निवारण कायदा 2018साली करण्यात आला त्यापूर्वीही आरटीआय (राइट टू इन्फॉर्मेशन) 2005 म्हणजे माहितीचा अधिकार कायदा देखील अस्तित्वात आलेला आहे. जितके अधिक कायदे तितकी अधिक कायद्याची पायमल्ली होताना आढळत आहे. मग कायदे असूनही भ्रष्टाचाराला निर्बंध का होत नाही? लाच मागणारा व देणारा दोन्ही गुन्हेगार आहेत मग लाच कोणी मागितली असता त्याविरुद्ध किती केसेस दाखल होतात?
IEC ( इंडिया अगेन्स्ट करप्शन) च्या सदस्य किरण बेदी म्हणतात, "सीबीआय "या संस्थेला सरकारी हस्तक्षेपापासून दूर ठेवा म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालता येईल. सीबीआयला दडपण विरहित चौकशी व निर्णय घेता येतील.
लोकपाल विधेयक संसदेत मंजूर झाले आहे परंतु या लोकपालच्या अंमलबजावणीसाठी किती सामान्य नागरिक पुढे येतात? दुधात पाणी भेसळ करून दूध वाला दूध विकतो पण आपण ते विकत घेतो यात आपलाही काही दोष नाही का? की फक्त पाणी भेसळ करणारा दोषी आहे. आपण त्याचे दूध घेण्याचे बंद केले तर तो ते दूध डेअरीला घालतो परंतु डेअरीमध्ये त्याला आपण देतो त्यापेक्षा कमी भाव मिळतो त्याचे नुकसान होते, आपले नाही तरीही हे सर्व माहीत असून आपण पाणी भेसळ असलेले दूध विकत घेतच राहतो व भ्रष्टाचारी असलेल्या दूध वाल्याला त्याने काहीच फरक पडत नाही .यात ग्राहक म्हणून आपण देखील भ्रष्टाचारी आहोत कारण भ्रष्टाचार सहन करणे म्हणजे देखील भ्रष्टाचार होय हे कधी कळणार आपल्याला?
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते "युवकांचे कर्तव्य म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करणे होय".
भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे कितीही बनत राहतील
परंतु; त्याची अंमलबजावणी करणे तुमच्या आमच्या हातात आहे आपण कायद्याचे पालन मनापासून केल्याशिवाय भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही.
सविता साळुंके, श्रीरामपूर,
9604231747
[01/06, 3:29 PM] Bharti Sawant: भ्रष्टाचार: माझी भूमिका
अरेरे!!.....किती हे घोटाळे!.. जिथे पहावे, ऐकावे तेथे घोटाळेच घोटाळे. बॅंकघोटाळा,शेअर्स घोटाळा, संरक्षण घोटाळा, आदर्श घोटाळा.... सगळेच घोटाळे ! सारा देशच घोटाळ्याने बरबटला आहे. यातून जनावरांचा चाराही सुटला नाही. या घोटाळ्यांनी किडलेला भारत देश सर्वकाही मूकपणे सहन करतो आहे. हा समाजाला लागलेला दुर्धर रोग आहे.अर्थातच हा रोग नवीन नाही. प्रशासन निर्मितीपासूनच त्याचा उद्भव झाला नि आता त्याची पाळेमुळे सर्वत्र फैलावली आहेत. जिथे सत्ता आहे तिथे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. निवडणुकांपूर्वी प्रत्येकजण विकासाची आश्वासने देऊन सत्ता मिळवतो.एकदा सत्ता हातात आल्यानंतर विकास योजना कचरापेटीतच जातात.उदय होतो फक्त भ्रष्टाचाराचा. आपल्या सात पिढ्या बसुन खातील एवढी संपत्ती मिळवण्याची जणूकाही स्पर्धा सुरू होते.आपमतलबी वृत्ती वाढीस लागून स्वतःच्या सुखसोयी पाहिल्या जातात.
प्रत्येकजण स्वार्थी होऊन आपलीच तुंबडी कशी भरेल ते बघत असतो. या रोगाला वेळीच आळा घालायला हवा नाहीतर तो वाळवीसारखा सर्व काही खाऊन टाकेल. भागवतात कलियुगाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्याचा प्रत्यय आज आपणास येत आहे. "ज्या युगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जातो ते युग म्हणजे कलियुग". सत्ययुगात सत्याला, सामाजिक नीति- मूल्यांना किंमत होती.भ्रष्ट माणसाला जबर शिक्षा होत. 'नियमबाह्य वर्तन करणे म्हणजेच भ्रष्टाचार होय'. लाच घेणे, असत्य वर्तन, असत्य भाषण, तस्करी, चोरी, स्वार्थासाठी अमानवी आचरण, अफरातफर संपत्ती मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब ही सारी भ्रष्टाचाराची रुपे आहेत. भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन वेळेतच करावे.
औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच गोष्टीत परिवर्तन घडून आले. उपयोगापेक्षा उपभोगाकडे माणूस जास्त खेचला गेला. कमी कष्टात जास्त पैसा हातात खेळू लागला. त्यामुळे पैशाची हाव वाढतच गेली.सर्व नीतिमूल्यांची पायमल्ली झाली. भ्रष्टाचाराच्या तावडीतून एकही क्षेत्र सुटलेले नाही. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत तसेच सामान्य माणूस, राजकारणी, कलाकाराची कर्तव्य,राष्ट्रहित विसरून भ्रष्टाचाराच्या चढाओढीत गुरफटले गेले. जीवनाच्या गरजा वाढत गेल्या. त्यामुळे पोटापुरतेच मिळवायचे आणि समाजहित जपायचे ही भावनाच नष्ट झाली. त्यामुळे समाजसेवा करणारा मूर्ख, बावळट ठरला. "जसा राजा तशी प्रजा" राज्य चालवणारे भ्रष्ट असल्यावर जनता काय वेगळी असणार ?केवळ थोर पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करून देश सुधारणार नाही.
भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर काढून सन्मार्ग दाखवणारा एखादा वाटाड्या हवा, आपली भूमी आहे राम,कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारख्या शूर योद्ध्यांची. ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनी उपदेशपर केलेल्या अभंगातील आचरणाची व सावरकर, भगतसिंग आणि विनोबाजींसारख्या थोर देशभक्तांच्या बलिदानाची. अशा या महाराष्ट्राच्या भूमीत भ्रष्टाचार बोकाळला आहे.भ्रष्टाचार रोखण्याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी.भोगवादी, चंगळवादी वृत्ती न बाळगता कष्टाने अभ्यासाला प्राधान्य द्यायला हवे. लोकांमधील अज्ञान नष्ट करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. भ्रष्ट आणि अकार्यक्षम राज्यकर्त्यांना खुर्चीवरून खाली खेळायला हवे. सामान्य जनतेचे नैतिक पतन न होऊ देता ,ग्रामस्वराज्य व्यवस्था बळकट करायला हवी. जनशक्ती एकत्र येऊन राज्यसत्ता ही सामान्य माणसांच्या हाती सोपवावी. तेव्हाच भ्रष्टाचाराची ही कीड मरून जाईल आणि देश सुखी, संपन्न, समृद्ध बनेल.
सौ.भारती सावंत
मुंबई
[01/06, 3:33 PM] Jeevansing khasawat: जीवन खासावत
भंडारा 9545246027
. .भ्रष्टाचार..
आपण खातो
शुध्द आहार,!
शरीर आपले
पाचवतो सारा सार!
मग काय गरज आहे ?
भ्रष्टाचार!
भराष्टाचार ही एक समाजाला लागलेली कीड आहे.भ्रष्टाचारामुळे गरीब ,गरीब होत आहे.आणि श्रीमंत ,श्रीमंत
होत आहे.पिकावर जसे तोळधाडीचे सावट पडले आहे.त्या प्रमाणे समाजात शासन दरबारी प्रत्येक ठिकाणी दलालांचे सावट पडले आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी शासन दरबारातील कर्मचारी कोणत्याही स्तरावर पोहचतो.प्रत्येक कार्यालयात सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपले दलाल ठेवलेले असतात.सर्व समण्यावकंची कामे ही दलाल आणि कार्यालयातील लोक होऊच देत नाहीत.काहींना काही त्रुटी काढत असतात आणि कार्यालयाच्या चक्रा मारायला लावतात.सर्व सामान्य व्यक्ती शेवटी थकतो आणि पर्याय नसतो.शेवटी काहींना काही तरी चिरीमिरी केल्याशिवाय पर्याय उरत नाही.आपण कितीही इमानदार असलो तरी समोरचा व्यक्ती इमानदार राहू देत नाही.
आणि हे काम प्रत्येक कार्यालयात चालते .छोटे मोठे गोरख धंदे सतत चालू असतात. सर्व सामान्य व्यक्ती जेंव्हा लाच देतो तेंव्हा तो स्वतःच्या खिशातून ,आपल्या मिलकतीतून,लहान मुलाबाळांच्या तोंडातून काढून देतो तेंव्हा त्याच समोरच नियोजन पूर्ण बिघडत जाते आणि शेवटी कर्ज बाजरी होतो. पण जेंव्हा एखादा दलाल ,किंवा श्रीमंत व्यक्ती जेंव्हा लाच देतो तेंव्हा तो लोकांकडून काढून देतो.स्वतःच्या खिशाला झळ लागू देत नाहीत.
एक सत्य घटना आहे.अंखो देखा हाल आहे.मी माझ्या मित्रा सोबत एकदा जातपडताळणी प्रकरणासाठी गेलो होतो .त्या ठिकाणी जात पडताळणी विभागात खुप मोठं भ्रष्टाचार चालायचं माझ्या मित्राला त्यांनी बऱ्याच चक्रा मारायला लावल्या .तो अतिशय कष्टी झाला.खूप दुखी झाला कारण त्याच्या गावापासून लातूर म्हणजे
आठ तास जाणे आणि आठ तास येणे असा लांब चा पल्ला होता.
येवढ्या लांब जाण्या येण्या साठी त्याच्या कडे पैसे पण मिळत नव्हते .कर्यालातील लोक खूप त्रास द्यायची .तिथेच एका नवीन लीपिकाची निवड झाली होती. जेंव्हा त्यांची निवड झाली तेंव्हा ते एकदम सडपातळ होते.आणि त्या कार्यालयाचे सर्व अधिकारी भृष्याचारी असल्यामुळे .ते लीपिकही भ्रष्टाचारी बनले.प्रकरण दोन वर्ष पेंडींग पडले .आणि आता प्रकरण पी.आय.कडे सोपवले.पी. आय. ने लाचेची रक्कम मोठी मागितली.आता त्याच्याकडे शिल्लक काहीच उरले नव्हते.दोन वर्ष कार्यालयाच्या चक्रा मारून आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थिती अतिशय वाईट झाली होती.आणि त्याने एकदम टोकाचा निर्णय आत्म्म हत्या करण्याचा निर्णय घेतला.त्याने मला तिथूनच फोन केला .मी आता काही जगू शकत नाही ,हा वाक्य त्याच्या तोंडातून निघाला आणि त्याला मी वेगळ्या मार्गाने समजूत घातली .आणि त्याला धीर दिले .त्या क्षणा क्षणात ल्या गोष्टी आजही आठवतात काळीज फासणाऱ्या थरारक गोष्टी आहे.त्याला घरी बोलावून पुन्हा परत घेऊन देण्याच्या अटीवर त्यांची पाच एकर जमिन विक्रीला काढली आणि त्या समाज कल्याण अधिकारी आणि पी.आय .या दोघांची भरती करून दिली रक्कम मोठी होती त्यामुळे ते स्वतः हातात घेत नव्हते.त्यांनी ती रक्कम एका पेंट च्या दुकानात ठेवायला सांगितले.आम्ही दौऱ्यावर आहोत.असे सांगत राहिले .मलाही तेवढी मोठी रक्कम पेंट च्या दुकानावर ठेवायला भीती वाटत होती.शेवटी मला जोखीम पत्करावी लागली आणि मी ती रक्कम ठेवली.आणि तेवढ्यात दोन्ही साहेबांचे फोन स्विच ऑफ झाले आणि अजुन जास्त धडकी वाढली .आता काय करावे सुचत नव्हते.असे काम कधी केले नव्हते.पैसा मेहनतीचा होता.आणि देणगी दान दिल्या सारखे द्यावं लागलं.मन खूप दुखत होत काय करावं समजत नव्हत .मी मनातून त्यांना खूप खालच्या स्तरावर जाऊन शाप देत होतो.
शेवटी न व्हायचेच झाले .त्या पी.आई.कडे आणि समाजकल्याण अधिकाऱ्याकडे अतोनात आर्थिक संपत्ती आहे. आणि तिसऱ्याच दिवशी फोन आला की पी.आय.साहेबांचा एकुलता एक मुलगा मोटर सायकल अपघातात जागीच ठार झालाय,ही माहिती सर्वीकडे पसरली आणि वाईट वाटले.आता त्यांची करोडोंची प्रॉपर्टी खाणारे कुणीच नव्हते.आता म्हातारं वयात गेल्यावर काय ते घरातल्या भिंती सोबत बोलतील काय?आई च हदय आपल्या पुत्र सुखासाठी काय बोलत असेल .अशी विविध विचार माझ्या मनात घोळत होते.असे सतत आठ दिवस विचार करत होतो.पुन्हा समाज कल्याण अधिकाऱ्याचे घरीच पाय घसरुन पडल्याची बातमी आली .पायात रॉड टाकली पाय गुढग्या पासून खूळ खुळे झाले असे माहीत पडले.त्यांच्यावर ही वेळ माझे पैसे खाल्ले म्हणून नाही तर आमच्या सारख्या अनेक लोकांची मने दुखावली त्यामुळे ही वेळ आली .मुलाची पाच एकर जमीन गेली तरीही तो आता सुखी आहे .मनाचा येवढं मोठा शाप बसतो.आणि ह्या कलंक मध्ये ८०/ जनता गुंतली आहे.त्या मुळे समाजाचा विकास खुंटला आहे.राजीव गांधीच एक वाक्य अगदी बरोबर आहे. ,"शासनाकडून एक रुपया विकास कामासाठी निघाला असला तरी तो झिरपत जाऊन समजा पर्यंत जाऊन २०पैसे उरतो.त्या मुळे कोणत्याच गोष्टीचं विकास होत नाही काही लोक वाघासारखी तोंड वासुनच शासनाच्या रक्कम साठी बसलेली असतात. कोणाचाही विचार न करता गिळंकृत करतात .या मागे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.म्हणून प्रसार मध्यम ,समाज जागृती,ह्या सगळ्या माध्यमातून विविध उपाय योजना करून ही कीड बाजूला काढल्यास समाजाचा.,देशातील प्रत्येक घटकाचा खंबीरपणे नक्कीच विकास होईल.
सर्व मिळून अंगिकारू एकच ध्यास!!
भृष्याचाराचा करू मुळापासून सत्यानास!!
तेंव्हाच होईल भारत देशाचा खरा विकास!!
तेंव्हाच घेईल सर्व सामान्य जनता आनंदाचा श्वास.!!
जय हिंद ,! जय भारत!
[01/06, 4:11 PM] शुभदा दीक्षित: ( 11 ) भ्रष्टाचार : एक भस्मासुर
आज भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला राजमान्यता मिळाल्यासारखे झाले आहे. अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वी कोणाच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तर त्या लोकांना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे. बाहेर तोंड दाखवायला लाज वाटायची. पण आज सगळेच बदलले आहे. आज इन्कम टॅक्सी धाड पडली तर त्या गोष्टीचा चक्क अभिमान वाटतो! अशी आपल्या नैतिक मूल्यांची पायरी घसरली आहे.
संविधानिक सर्व नियम धाब्यावर बसवत, अवैध मार्गाने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे मिळवणे, म्हणजे भ्रष्टाचार.
भ्रष्टाचाराचे मुख्य कारण आपल्या कायद्यातील पळवाटा. पैसे देऊन बरेच भ्रष्टाचारी कायद्याच्या कचाट्यातून मानाने सुटतात. अपराध्यांना शिक्षेचे भय राहिलेले नाही .कुठल्याही न्यायालयातील केसचा निकाल लागण्यास खूप होणारा विलंब, ह्यामुळे भीती राहिली नाही.
भ्रष्टाचाराची खालपासून वरपर्यंत सर्व लोकांना सवय लागल्यासारखी झाले आहे. सरकारी ऑफिसात पैसे चारल्याशिवाय आपले काम झाले, तर ती दुसऱ्याला सांगण्यासारखी 'बातमी' असते. यात सगळे काही आले. एखाद्या साहेबा पर्यंत पोहोचण्यासाठी बाहेरचा रखवालदार हि पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही. इतका आपला समाज खालपासून पोखरला गेला आहे.
व्यक्तीने दृढनिश्चय केला तर त्याला काही अशक्य नसते. पण भ्रष्टाचार करण्याची इच्छा असेल तर काहीच होऊ शकत नाही. कारण या व्यक्तीच्या मनात कायम असंतुष्टता, असंतोष असतो. पैशाच्या मागे माणूस लागलेला असतो. म्हणूनच नाटककार वसंत कानेटकर भ्रष्टाचाराला 'मनाचा महारोग' म्हणतात.
असमानता, आर्थिक असो -सामाजिक असो, पद- प्रतिष्ठे मध्ये असो, माणूस स्वतः स्वतःला भ्रष्ट करतो. चंगळवादाच्या हव्यासापोटी हा भ्रष्टाचार केला जातो.
भेसळीच्या अन्नाने, मद्याने, औषधाने अनेक लोकांचे प्राण घेतले आहेत. माणूस माणसाच्या जीवावर उठलाय असे म्हणण्याइतका भ्रष्टाचार निर्ढावला आहे.
अगदी क्षुल्लक गोष्ट, वजनात तराजू मारणे, प्रमोशनसाठी वरिष्ठांना पार्टी देणे, पैसे देणे, इथपासून ते आपल्या राष्ट्राची गुपिते परराष्ट्रांना कळवणे, राष्ट्र संरक्षक हत्यारे खरेदीत घोटाळा करणे, इथपर्यंत माणूस खालच्या पातळीवर उतरला आहे. नीतीचा अंकुश हरवला आहे. Easy money सगळ्यांना हवा आहे.
क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगमुळे सारे जग हादरले. लोकं तहान-भूक विसरून, महत्त्वाची कामे बाजूला ठेवून, नको इतके खेळाडूंवर प्रेम करत, त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. हेच आपले खेळाडू पैशासाठी विकले जातात हे पाहून लोकांना कमालीचा धक्का बसला.
बोगस प्रतिष्ठाना द्वारा पैसा जमवला जातो. तो जातो कुठे? हा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणाने शेत खाण्या सारखे आहे..
'कागदावर वजन ठेवणे' हे अगदी परवलीचे वाक्य झाले आहे. डॉक्टरकीचा हा 'नोबल' व्यवसाय असे म्हटले जायचे. पण आज काही डॉक्टर फसवून पेशंटची किडनी काढून विकतात. खोटा पॅथॉलॉजी रिपोर्ट दाखवून खोटी अबोर्शन्स करतात. 'रोज इतकी ऑपरेशन्स झालीच पाहिजेत' असा 'अलिखित' नियम काही हॉस्पिटलचा असतो.
भ्रष्टाचार आणि राजकारण या दोन्ही ला आपण वेगळे करूच शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत आहेत. याला पुरावेही आहेत. चारा घोटाळा, मुद्रांक घोटाळा, मिग विमाने घोटाळा, टूजी घोटाळा, बोफोर्स घोटाळा, कोल घोटाळा इत्यादी. असा हा राजकारणातला भ्रष्टाचाराचा भस्मासुर.
यासाठी आपल्याकडे न्यायसंस्था, कायदेकानून कडक हवे. दाव्यांचे निकाल लवकर लागून, शिक्षा लगेच व्हायला हवी.
मी देशाचा नागरिक आहे. भ्रष्टाचार न करण्याची नैतिकता माझी आहे. असे प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे.
भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे लोकायुक्त आहेत. देशपातळीवर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर आहेत. लेखा तपासणी करणारी सर्वोच्च यंत्रणा आहे, कॅग आहे. सर्वोच्च न्यायालय आणि खुद्द विधिमंडळे यांचे अधिकार क्षेत्र खूप मोठे आहे. आणखीही बऱ्याच शासनाच्या कायदेशीर यंत्रणा कार्यान्वित आहेत- अँटी करप्शन ब्युरो ते सीबीआय- सगळे असूनही भ्रष्टाचाराचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो का?
भ्रष्टाचारामुळे आपल्या देशाच्या विकासाची गती मंदावते आहे. कारण ही समाजाला लागलेली कीड आहे. सभ्य समाज म्हणूनही आपला विकास जेमतेमच झाला आहे. घरात नातेवाईक, मित्रमंडळीत 'चांगला' सभ्य म्हणून समजला जाणारा माणूस ऑफिसमध्ये त्याच्या खुर्चीत स्थानापन्न झाला की त्याची 'चांगली' भूमिका गळून पडते. तो प्रत्येक सहीचे ठरवून पैसे घेत असतो. ही अशी वैयक्तिक आणि सार्वजनिक सभ्यते मधील दरी असते. अशी दरी राजकीय व्यवहारांमध्ये असते, ती जास्त रुंद असते. भ्रष्टाचारामुळे गरीब व श्रीमंत यामधील दरी वाढते आहे. गरीब जास्त गरीब होतो आहे, श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे.
आज एखादा पैसे न खाणारा अधिकारी वरच्या पदावर येऊन बसला, तर त्याची बदली करण्यामागे सगळे हात धुवून लागतात. आणि त्याची अवस्था शटल् कॉक सारखी होते. ही आजची सत्यस्थिती. आज असे एकही क्षेत्र नाही, जेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर नाही.
मालकाच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव, यांचा आदर्श ठेवणे आज योग्य तरी ठरेल का?
भ्रष्टाचारात पावणे दोनशे देशात आपला 94 वा नंबर लागतो. सबंध जगात भ्रष्टाचाराविरुद्ध जागरुकता निर्माण करण्यासाठी 9 डिसेंबर हा 'अंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस' म्हणून साजरा करतो. यासारखे दुर्दैव ते कोणते?
शुभदा दीक्षित ( 11 )
पुणे
[01/06, 4:38 PM] सौ. जयश्री नीलकंठ सिरसाटे: (37)
*भ्रष्टाचार मुक्त देश घडवुया*
आपला भारत देश दिवसेंदिवस विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे परंतु आपल्या समोर आजही अनेक अतिशय गंभीर समस्या आहेत. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी या सोबत च भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोर असलेली गंभीर समस्या आहे. अगदी छोट्या छोट्या व्यक्ति पासून तत मोठ-मोठ्या लोकांपर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटेमोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी चा खर्च द्यावाच लागतो , कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही पण कळत नकळत आपणही भ्रष्टाचाराला बढावा देत असतो.
या सगळ्यांना काही प्रमाणात आपण सगळेच जबाबदार आहोत. आपणच आपले काम लवकर व्हावे, आपला वेळ वाचावा म्हणून पुढच्या व्यक्ति ला भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहित करतो. काही कळत आणि किही नकळत रित्या हे कार्य करित आहोत.
भ्रष्टाचार हे एका जहाल विषा प्रमाणे आहे. समाजातील आणि देशातील वाईट हेतू ठेवणार्या लोकांच्या मनात हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आपण बघत आहोत.
भ्रष्टाचाराची सुरवात झाली कशी व कुठून ह्याबद्दल कुणीही फारशी माहिती सांगू शकत नाही. पण हे खरेआहे की जसजसा माणसांकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. पूर्वी जेव्हा माणसांकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्यांच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या. त्यांची अपेक्षा फक्त दोन वेळेचे पुरेसे जेवण आणि जीवनावश्यक वस्तू मिळविणे एवढेच होते.पैशाचा हव्यास नव्हता किंवा चैनीची सवय लागलेली नव्हती त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ मनाचे होते. जसजशी सुधारणा होत गेली तश्या अनेक चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. गरज नसतानाही त्या हव्याहव्याश्या वाटू लागल्या. एखाद्या कडे ती वस्तू आहे तर माझ्या कडे पण पाहिजे ही हेवा किंवा स्पर्धेची भावना वाढीस लागली. माणसांना लोभ वाटू लागला. जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हाव वाढू लागली. भ्रष्टाचाराचे मुळचा अति लोभ करणे हे आहे.
आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरफायदा घेऊन कमीतकमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश्य असतो. पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार जेवढा लाच मागणारा माणूस गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त गुन्हेगार लाच देणारा आहे. . सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो. किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो आणि आपल्या ला त्या गुन्ह्याची कल्पना नसते किंवा आपण त्या गोष्टी चा विचारच केलेला नसतो. कितीवेळा आपण बघतो नाक्यावर पोलिसांनी पकडले कि सर्वजण पोलिसाच्या हातावर पन्नास – शंभर रुपये टेकवून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतात. पोलीस फक्त त्यांची ड्यूटी बजावतात पण त्यामागे आपली सुरक्षा हा मुख्य हेतु आहे हेच आपण समजून घ्यायला तयार नाही. उलट त्या पोलिसांनी पकडलं म्हणून त्यांना आपल्या ला सोडा म्हणून पाहिजे ते करायला तयार असतो यात चुक कुणाची? सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावावर लाखो रूपयांची फसवल्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. शाळेत- कॉलेजात अॅडमिशन घेताना कोण-कोणाला पैसे चारले जातात. इतकेच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण 2000- 5000रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. पटत असेल का हे देवाला? आपल्या मनाला तरी पटते का?या भ्रष्टाचाररुपी राक्षसाने देवदर्शनाला सुद्धा सोडलं नाही. मग आपण तर सर्व सामान्य मनुष्य आहोत.
किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात. निवडणुकांमध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जातात. अशा लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. निवडणूकीत झालेला खर्च मग ते आपल्या च नावावरील कामातून काढतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. का हे आपल्याला आधी कळत नाही कि जे लोक चांगली काम करून निवडून येण्याऐवजी मतदाराला पैसे चारून निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणार नाही. तेव्हा आपण डोळ्यावर लालसेपोटी पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीमला नाव ठेवत बसतो. पण आपली चूक कबूल करत नाही हेच भ्रष्टाचाराचे मुळ आहे.
एखादा श्रीमंत वडील जे पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे अॅडमिशन करून देत असते. त्यामुळे चांगली बुद्धीमत्ता असलेली मुले पुढे येऊ शकत नाही याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकी साठी प्रवेश मिळवतात. पुढे ही मुले पैशाच्या बळावर पेपर विकत घेऊन पास होतात किंवा अनेकदा नापास होत कसंतरी शिक्षण पुर्ण करतात. तो ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे सर्वत्र पैशाच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात. अशावेळी रोग्यांना काय होत असेल ते देवच जाणे. जेव्हा त्याच्या कुटुंबातील कुणी आजारी पडतो तेव्हा मात्र तो दुसर्या डाक्टरांकडे जायला सांगतो. आपल्याकडे एक म्हण आहे ' घरच्या डाक्टरांची औषध लागू पडत नाही.' आपणा सर्वाना समजायला पाहिजे कि भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती कधीही फायद्याचे आहे. थोडा त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करायला नको पाहिजे. कदाचित आपल्या सर्वाना हे पटत असते, पण पटत असूनही आपण कळत नकळत भ्रष्टाचार करत जातो आणि जेव्हा दुसरे आपल्या पेक्षा जास्त पैसे देवून आपल्या पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने ओरड करतो. कधी कधी तर असे होते कि आपण पैसे देऊन काम करवून घेतो आणि आपल्या ह्या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते, मग तो माणूस एखाद्या गरिबाचे सहज काम करत नाही कारण त्यात त्याला नफा नसतो. किती त्रास होत असेल गरिबांना या भ्रष्टाचाराचा हा आपण विचारच करत नाही . माझे काम पटकन झालं पाहिजे, पाहिजे तर थोडे पैसे घ्या पण काम करा ही अनेकांची वृत्ती असते.
आपण आपल्याला सुधारायला पाहिजे. हे सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात येत नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करु की, मला कितीही त्रास पडला, कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. तेव्हांच या भ्रष्टाचाररुपी राक्षसाच्या विळख्यातून आपली, आपल्या देशातील नागरिकांची सुटका होईल.
चला तर आपण आपल्यापासून सुरुवात करुया. आजपासून मी भ्रष्टाचाराला बढावा देणारे कोणतेही कार्य करणार नाही आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या कुणालाही हे कार्य करु देणार नाही. मी तयार आहे आपल्या समाजातील जनतेला भ्रष्टाचाराच्या राक्षसापासून वाचवण्यासाठी. आता आपली पाळी आहे.
*सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे*
गोंदिया
9423414686
[01/06, 4:47 PM] सौ भारती तिडके: 39)*****भ्रष्टाचार :-एक भयानक राक्षस.*****
आज स्वतंत्र भारतात, खेड्यापाड्यात, गावोगावी, शहराशहरात, सरकारी कार्यालयात, दवाखान्यात, कंपन्यात सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. सभोवताल पाहिले असता भ्रष्टाचारी देशाचे भयानक रूप आपल्याला दिसून येते. सर्व ठिकाणी गुन्हेगारी, गुंडागर्दी, लाचखोरी, चुकीची शिक्षा इत्यादी अनेक वाईट प्रवृत्तीचे वातावरण पसरलेले आहे. सरकारी, खाजगी कार्यालय कोणत्याही विभागाची असो, तेथे तर खालच्या चपराशी, बाबू पासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत फाईलवर वजन द्यावे लागते. पैसे नसेल तर काम पूर्ण होत नाही. आज मानव मानव राहिला नाही तर तो क्रूर राक्षस याप्रमाणे झाला आहे. सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार आपले घट्ट पाय रोवून बसत आहे. म्हणून भ्रष्टाचार एक भयानक राक्षस आहे.
आपल्या विकास कार्याला अपेक्षित आणि भरीव फळे येत नाहीत, याची एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व स्तरावर बोकाळलेला भयानक राक्षस भ्रष्टाचार.! ज्याप्रमाणे covid-19 ची लागण देशात वाढत आहे त्याचप्रमाणे या भ्रष्टाचाराने देखील एकही क्षेत्र अस्पर्शित ठेवले नाही. जेव्हा समाजाच्या नीतीचा पगडा सैल होतो तेव्हा समाजात भ्रष्टाचार बोकाळतो. माणुसकी हरवते. त्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे समाजातील भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराची रूपे अनेक आहेत, आणि जीवनाच्या सर्व अंगात की वाळवी सारखी पसरलेली आहे.
या भ्रष्टाचाराची आवडते ठिकाण म्हणजे शासकीय व्यवहार. तिथे सत्ता असते, अधिकार असतो. भ्रष्टाचाराची कीड समाजांचे मुळानाच लागलेली आहे.बदली किंवा बढती पाहिजे असेल तर ती जबाबदारी भ्रष्टाचाराकडे सोपवीणे फार सोयीचे होते.
वशिलेबाजी हे भ्रष्टाचाराचे आणखी एक रूप. ओळखीचा किंवा आप्तसंबंध याचा फायदा घेऊन काम साधने हे वशिलेबाजी चे काम. विशेषतः नोकरी मिळविण्याच्या क्षेत्रात वशिलेबाजी ची कर्तबगारी फार प्रसिद्ध आहे. काळाबाजार हे भ्रष्टाचाराची आणखी व्यापारी दर्शन. उपयुक्त व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा ही काळया बाजाराची जननी आणि अधिक किंमत देऊन वस्तू प्राप्त करणे हा आपला सोस असतो. उपयुक्त व दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तूंचा तुटवडा काही अपरिहार्य कारणाने होतो. या परिस्थितीमुळे काळया बाजाराला बहार येतो आणि व्यापारांचा खिसा भरतो.
भेसळ आणि नक्कल हे काळ्याबाजाराचा चुलत किंवा मावस भाऊ, पण विशेष जवळचे सगेसोयरे. दुधामध्ये पाणी मिसळवीणे ही तर सर्वांच्या परिचयाची बाब झाली आहे. रोज नित्यनियमाने गवळी दुधात पाणी मिक्स करतो. फल्लीच्या तेलात पामोलिन तेलाची भेसळ केली जाते. त्यातच हळद मिरच्या पावडर मधील भेसळ समजत देखील नाही.
अफरातफर हे भ्रष्टाचाराची आणखी एक वारसदार. खोटे दस्तऐवज हे त्याचे शस्त्र. हुंडा हा समाजाधिषठीत भ्रष्टाचाराचा एक लोकप्रिय नमुना आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी याचा उपयोग होतो. हा वैचारिक भ्रष्टाचाराचा आधुनिक अवतार. आणि अलीकडे या अवताराला फार भाव आलेला आहे. खुर्चीचे दर्शन व्हावे म्हणून नेता जनतेला लाच देतो. तर बालाजीचे दर्शन लवकर व्हावे म्हणून भक्त पुजाऱ्याला लाच देतो.
असे का घडते ?याचा विचार केला असता श्रम न करता सगळ्यांना झटपट श्रीमंत बनायचे असते. या श्रीमंतीत माणुसकी विकल्या गेली तरी परवा नाही किंवा आपल्या चारित्र्याचा विचार नाही. आजचा समाज अतिशय शुदद्र भावनेच्या आहारी गेलेला आहे. या भ्रष्टाचाराची बीज समाजामध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, शिक्षिता पासून अशिक्षिता पर्यंत, कलावंत, राजकारणी, डॉक्टर ,वकील इत्यादी प्रतिष्ठित व्यक्ती, धर्मरक्षक मंडळी या सर्वांच्या मनात भ्रष्टाचार विषयक विचारांचे थैमान सुरू आहे.
महात्मा गांधीची, नेहरू जींची, ज्योतिबा फुले यांची, लोकमान्य टिळकांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा काळाच्या पडद्याआड गेली. निस्वार्थ देशभक्ती लोपली आणि उरला फक्त भ्रष्टाचाराचा तमाचा
अंधकार!
ही भूमी संतांची आहे. राम कृष्ण या भूमीत जन्माला आले. ज्ञानेश्वर तुकाराम यांनी सत्य आचरणाचा मंत्र दिला. अनेक देशभक्त याच भूमीने जन्माला घातले. अशा या पावन मंगल सात्विक भूमीवर या भ्रष्टाचार नामक राक्षसाने उघड-उघड आकांत-तांडव करावे हेच समाजाला काळीमा फासणारी आहे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. लाच घेणारा आणि देणारा ही तेवढाच दोषी असतो. भ्रष्टाचार ही गोष्ट मुळापासून नष्ट करायला हवी तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासुनच करायला हवी. स्वतः पण भ्रष्ट आणि लाचखाऊ लोकांना समाजापुढे आणायला हवं. स्वतः प्रामाणिकपणे काम करायला हवे. सरकारने भ्रष्ट अधिकारी सेच भ्रष्टाचाराला प्राध्यान्य देणार्यांवर कडक कारवाई करायला हवी. भ्रष्ट लोकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होते. देशात असुविधा आणि विषमता निर्माण होते.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाला वाव दयायला हवा. आपण आपल्या कामात तसेच सरकारी कामात सुद्धा पारदर्शकता आणायला हवी. आपल्या भारत देशात अण्णा हजारे सारख्या व्यक्तीने भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुकारले होते.
भ्रष्टाचार हा क्रूर राक्षस आहे. योग्य नियंत्रण राबवून या भ्रष्टाचारी रुपी राक्षसाला वेळीच आटोक्यात आणणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदीतील एक उक्ती मला आठवते.
"गुरु जनो की मेहनत न जाने देंगे बेकार, सच्चाई से अपने करेंगे जीवन जीवन गुलजार."
सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
8007664039.
[01/06, 5:00 PM] सुंदरसिंग साबळे: *34*
*भ्रष्टाचार एक परीक्षण*
===============
"भ्रष्टाचाराच्या असुराने
मांडला कल्लोळ
मानव जीवनाची
झाली बिकट गुंतावल
भ्रष्टाचाराने घातला
सर्वत्र धुमाकूळ
गोरगरीब करिता
पोटासाठी हळहळ"
भारत देश भ्रष्टाचाराने भरकटलेला आहे. देशातले पुढारी सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. हा भ्रष्टाचार असाच जारी राहिला तर एक दिवस सारा देश भ्रष्टाचारात बुडल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला देशातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारला तर तो मोठ्या सात्वित संतापाने वरील शब्दात एक भाषण देतो. परंतु देशातला हा भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी तो एक पाऊलसुध्दा पुढे टाकायला तया नसतो. अर्थात भ्रष्टाचाराचा खात्मा करणे हे काही अशा मध्यमवर्गीय माणसाचे काम नव्हे. ते करणारे अण्णा हजारे सारखे खरोखरच धाडसी लोक आवश्यक आहेत. मात्र या मध्यमवर्गीय माणसाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढावेच असावे असे आपण म्हणू शकणार नाही. मात्र त्याने स्वतः भ्रष्टाचार करू नये, शासन दरबारातील एखादे काम उशिरा झाले तरी चालेल पण आपण कोणाला लाच देणार नाही आणि संधी आली तर लाच खाणारही नाही अशी प्रतिज्ञा त्याने करावी. त्यांनी एवढी गोष्ट केली तरी देशातला भ्रष्टाचार बराच कमी होऊ शकतो. परंतु आपण लोक भाषण देण्यापलीकडे काहीच करत नाही.
भाषणसुध्दा जाहीरपणे देत नाही तर आपल्या मित्रांसमोर आणि बायका मुलांसमोर देतो आणि प्रत्यक्षात आपण स्वतःसुध्दा भ्रष्टाचारात लिप्त असतो हे तो मान्य करत नाही. नुकतेच एका पोलीस अधिकार्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी नेहमीप्रमाणे, पोलीस सध्या जास्त भ्रष्टाचार करत आहेत असा आरोप केला. तो आरोप ऐकल्यावर त्या पोलीस अधिकार्याला राग आला खरे परंतु त्याने आपला राग आवरला आणि भ्रष्टाचाराच्या संबंधात काही माहिती सांगून मलाच काही प्रश्न विचारले. पोलीस खात्यात भ्रष्टाचार असतो हे त्यांनी मान्य केले. मात्र पोलीस अधिकारी सतत गुन्हे करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडूनच पैसे खात असतात असे त्यांनी म्हटले. पोलीस पैसा खात असले तरी देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोलिसांशी कधी संबंधही येत नाही आणि आपणही पोलिसांना पैसे दिले असे सांगणारे फार कमी लोक भेटतात. या अधिकार्याने विचारलेला एक प्रश्न फार भेदक होता. त्याने आमच्यासमोर बसलेल्या सर्वांनाच एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देताना देणगी दिलेली आहे का?’ प्रत्येकांनी सांगितले की आम्ही देणगी दिलेली आहे. परंतु मुलांच्या शाळा प्रवेशासाठी देणगी देणे हा कायद्याने गुन्हा आहे हे बर्याच लोकांना माहीतसुध्दा नव्हते. परंतु या पोलीस अधिकार्याने याची जाणीव करून दिली आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश हा देणगी देऊन, संबंधित कायदा मोडून झालेला असतो. हे कटूसत्य सांगितले.
पोलीस भ्रष्टाचार करतात, सार्वजनिक बांधकाम खात्यात खूप भ्रष्टाचार असतो परंतु या भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतलेली नसते. परंतु शाळेत प्रवेश घेण्याच्यावेळी प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. त्याचा हा युक्तिवाद बिनतोड होता. त्या पुढे जाऊन त्याने आणखी एक गोष्ट सांगितली. लग्नात हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, एवढेच नव्हे तर सासर्याने जावयाला काही भेटवस्तू देणे यालासुध्दा कायद्याने काही बंधने घातलेली आहेत. त्याशिवाय सरकारी कर्मचार्यांवर, त्यांच्या घरच्या लग्न समारंभात किती खर्च झाला आणि त्यांना कोणी कोणी भेटवस्तू दिल्या याची माहिती सादर करण्याचेसुध्दा बंधन आहे. मात्र लग्न समारंभातले हे दोन कायदे सरसकट सर्व लोक मोडत असतात. त्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सन्माननीय अपवाद असतात. मात्र लग्न समारंभात आपण कायद्याने ठरवून दिलेली अनेक बंधने मोडत असतो, भ्रष्टाचार करत असतो. मात्र आपण भ्रष्टाचार करत आहोत याची फार कमी लोकांना जाणीव असते आणि ज्यांना जाणीव असते त्यांना खंत नसते पण तरीही हे लोक भ्रष्टाचाराच्याबाबतीत लोकांवर आरोप करत असतात.
"साधी राहणी उच्च विचार
त्याचीच प्रगती घेईल वारंवार
नको महागड्या वस्तूचा बाजार
स्वार्थ साधाया नको भ्रष्टाचार"
===============
श्री.सुंदरसिंग आर.साबळे गोंदिया
मो.9545254856
[01/06, 5:36 PM] Milind Gaddamwar: (43) मानसिक रोग " भ्रष्ट्राचार "
' भ्रष्ट्राचार ' (भ्रष्ट +आचार )म्हणजे चुकीची वागणुक.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.तो समाजात वावरतांना दुहेरी भुमिका घेत असतो.तोंडावर एक अन् मागे एक असे त्याचे वागणे असते.याला दुहेरी मुखवटा धारण करणारी माणसे असे फारतर म्हणता येईल.अशी माणसे बेभरवशाची असतात. आपल्या बोलण्यावर ती ठाम रहात नाहीत.दिलेला शब्द पाळत नाहीत.आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कुठलेही टोक गाठू शकतात.सर्वसामान्य माणसाला ती पुरून उरतात.सरकारी नौकरीत अश्याच प्रवृतीच्या माणसांची गाठ पडत असल्याने आणि ती पण संघटीत असल्याने सामान्य नागरिक जेरीस आल्याशिवाय राहत नाही.असाच अनेकांचा अनुभव असतो. फारच कमी ठिकाणी लोकांना योग्य ते सहकार्य करणारी चांगली माणसं आढळून येतात.तेंव्हा आपला जीव भांड्यात पडतो.
आपले मन हे अत्यंत चंचल आहे. क्षणार्धात ते सारे जग फिरून येत असते. आपल्या मनात नाही नाही ते विचार येत असतात.काही चांगले तर काही वाईट विचार असतात.चांगल्या विचारांचा ज्याला आपण सकारात्मक विचार असे म्हणू शकतो.याचा चांगला परिणाम होतो.तर वाईट व नकारात्मक विचारांचा वाईट परिणाम होतअसतो.भ्रष्टाचार हा प्रथम मनात निर्माण होतो.नंतर तो कृतीशील होतो. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.कारण त्याला विशिष्ट प्रकारे हाताळले जाते.एखादा व्यक्ती काम घेऊन आला की त्याला अमुक अमुक व्यक्तिंना भेटा असे सांगितले जाते. भ्रष्टाचाराची सुरुवात ही कार्यालयात पहीले पाऊल टाकण्यापासून सुरू होते. डोअर किपर ते स्टोअर किपर आणि माती, सिमेंट,दगड-धोंडे खाण्यापासून नितीभ्रष्ट झालेल्या माणसात होते.या व्यक्तींना कशाचेच भान रहात नाही.ती एक नशा असते.लोकांना विविध प्रकारे त्रास देऊन आपण ज्या कामाचे वेतन घेतो तेच काम लवकर करून देण्याच्या बहाण्याने पुढील व्यक्तीला मानसिक व आर्थिक त्रास होईल असे वागणे-बोलणे ही भ्रष्टाचाराची पहिली पायरी असते.कमी पैशात होणारे काम जास्त पैसे घेऊन करून देणे हा भ्रष्टाचाराचाच भाग आहे.भष्टाचारास दोघेही जवाबदार असतात.देणारा आणि घेणारा.आपले काम इतरांपेक्षा लवकर व्हावे म्हणून आर्थिक लाभ पोहचविणे हे चुकिचेच ठरते आहे.भ्रष्टाचाराचे स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारचे असते.
आपली निवडणूक प्रणाली ही भ्रष्टाचाराने बरबटली असल्याने आपल्याकडे आपले अमुल्य मत हे विक्री व खरेदी केल्या जाते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहिला मिळत असते.म्हणून निवडणूक लढविणे हे सर्वसाधारण माणसांचे काम राहिलेले नाही असे सांगितले जाते आणि ते खरेही आहे.पैसा लगावो और पैसा निकालो या राजकीय वाटचालीने देशाचे न भरून निघणारे नुकसान होते आहे.याकडे आपले लक्ष जात असले तरीही दुर्लक्ष केले जात असल्याने आपल्याला सुज्ञ नागरिक म्हणवून घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.तो आपण केंव्हाच गमविलेला आहे.आमची लोकशाही किती चांगली यावर फक्त व्याख्यान देणे,चर्चा करणे एवढेच आपणांस ठावे आहे.संरक्षणात भ्रष्टाचार, आरोग्य योजनेत भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार,न्यायदानात भ्रष्टाचार, बांधकामात भ्रष्टाचार अशी लांबलचक यादी ही होवू शकते.याचे कारण आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचार हा समुळ खणून काढलेला नाही.कायद्यातील पळवाटा शोधून मार्ग काढणे सोपे जाते आहे.यामुळे फक्त भ्रष्टाचाराचे फक्त आरोप-प्रत्यारोप होतात.परंतु शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने कायद्याचा धाक राहिलेला नाही.आपल्या शिक्षण प्रणालीत दोष असून भ्रष्टाचाराबद्दल आपल्यात चीड,घृणा निर्माण होईल असे कुठलेही ज्ञान दिले जात नाही.देशप्रेम कशात पाहिले पाहिजे हे शिकविले जात नाही.जोपर्यंत तरूण पिढी च्या मनात भ्रष्टाचाराची आग लागणार नाही तोपर्यंत हे असेच चालणार आहे.यात तिळमात्र बदल अपेक्षित नाही.आज तर गुरूजन वर्गच स्वत: भ्रष्टाचाराचे समर्थन करतांना आढळून येतात.ज्यांच्यावर देशाची संपुर्ण धुरा ही अवलंबून आहे.भ्रष्टाचाराने सारे जग हे व्यापलेले आहे. नविन पिढीचे आणि देशाचे भवितव्य जर उज्वल करायचे असेल तर याची सुरुवात शिक्षणापासून झाली पाहिजे.कारण पक्की मडकी, नविन पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकजणच करीत असतात.देशप्रेमाची ओळख ही शिक्षणातूनच झाली पाहिजे.मुल्यसंवर्धन करणे,जोपासणे, वृध्दिंगत करणे हे काम शिक्षण व्यवस्थेचे आहे.शिक्षक हा त्याचा आधारस्तंभ आहे. ज्याच्या मनात भ्रष्टाचारा विषयीची चीड आहे तो कधीच भ्रष्टाचारास प्रवृत्त होत नाही.बळी पडत नाही.दुस-याने केलेला भ्रष्टाचार खपवून घेत नाही.ही मानवी मनाची बांधनी आहे. शिक्षकवर्ग मुल्यशिक्षणात कमी पडत असल्याने आज संपुर्ण देश भ्रष्टाचारात डुबलेला आहे.याचे सोयरसुतक कुणालाही राहीलेले नाही.भ्रष्टाचाराच्या या आगीत आपणं सर्वजण व संपुर्ण देश हा होळपून निघत आहे.याचे सोयरसुतक कुणालाही राहिलेले नाही असे खेदाने म्हणावे लागते.
* मिलिंद गड्डमवार,राजुरा
भ्र.क्र.९५११२१५२००
[01/06, 5:39 PM] Sujata Jadhav: भ्रष्टाचार:एक समस्या (28)
शासनाच्या किंवा समाजाच्या चाकोरी बाहेर जाऊन कृत्य करणे,म्हणजे भ्रष्टाचार होय.अति हव्यास,घाई,जलगतीने प्रगती करण्याच्या दृष्टीने अथवा कोणत्या तरी आमिषाला बळी पडल्यास,तो भ्रष्टाचार समजला जातो, बरीच तरुण विविध मार्गांनी पैसा कमवायला बघतात,आणि मग लाच घेऊन अथवा देवून भ्रष्ट होतात.
अशा तरुणाईला वेळीच सावधान केले पाहिजे,त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे,सध्या नोकरी मिळणे कठीण झाले आहे,त्यातच सरकारी नोकरी म्हणजेच पर्वणी!! आणि ही नोकरी मिळवण्यासाठी काही वेळेस सर्वसामान्य ज्यांकडे पैसा नाही असे लोक या भ्रष्टाचाराचे शिकार बनतात,मोठं मोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेताना, डॉक्टर, इंजिनिअरिंग साठी देखील पैसा द्यावा लागतो, कधी या भ्रष्ट पैशाला नाव दिले जाते,आम्ही डोनेशन घेतो. आणि शेतकरी कुटुंब असेल तर बिचारे कुठून पैसा उभे करणार,शिक्षकी पेशात बरेच काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्या,विद्यादानाचे काम शिक्षक करतात,त्यांना शिक्षणापासून ते नोकरीला लागतानाही काही रक्कम भरावी लागते,म्हणजे अनुदानाचा टप्पा पार करेपर्यंत पैसा भरूनही पगार चालू होतं नाही.
आपला देश सर्वसामान्य लोकांचा आहे,गरिबी बरीच आहे,तिचे उच्चाटन करता-करता नवनवीन संकटे उभी रहातात, सर्वच क्षेत्रात अथवा सर्वच मंत्री भ्रष्ट असतात असे नाही,काही प्रमाणिकही असतात,मग अशा लोकांचे कधीना कधी भिंग फुटते,काही वेळेस नोकरीत तुम्ही टॉपर असलात किंवा तुम्ही लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू जरी चांगला दिलात,तरी त्यावेळेस नोकरी मिळविताना भ्रष्टाचाराला पायामुळे फुटतात,आणि त्यात तरुण भरकटतो.
तुम्ही सरकारी नोकरीत असाल,तर तुम्हांला भेटणारी मित्रमंडळी कौतुक करण्या ऐवजी तुम्हांला "या नोकरीसाठी किती पैसे भरले"असा प्रश्न करतात,भले तुम्ही तुमच्या टॅलेंटवर लागला असाल तरी,म्हणजेच बघा!!भ्रष्टाचार किती बळावला आहे,ही एक समाजाला लागलेली कीड आहे,एक समस्या आहे!!तिचे वेळीच उच्चाटन केले पाहिजे.
सुजाता जाधव
नवी मुंबई
[01/06, 5:44 PM] डॉ हरिश्चंद्र भोईर: भ्रष्टाचार हाच बनलाय शिष्टाचार
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
शहापूर(ठाणे)
आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे.खरे तर इतका मोठा खंडप्राय देश जगात कोठेही नाही.निसर्गसृष्टीने नटलेला आपला देश...संपन्न असूनही विकसित नाही.याला अनेक कारणे जरी कारणीभूत असली तरी आपल्या देशात असणारा भ्रष्टाचार हे ही एक मोठं कारण आहे.हे विसरून चालणार नाही.भ्रष्टाचार रुपी कॅन्सर ने पोखरल्याने कोणती घटना केव्हा घडेल,आणि कोणता प्रसंग केव्हा येईल हे काही सांगता येत नाही.
भ्रष्टाचार ही एक अशी सिस्टीम आहे.ज्यात देणारा आणि घेणारा अशा दोघानाही त्याचं काहीही सोयर सुतक वाटत नाही.काम लवकर झालं म्हणून देणारा खुश ,सर्व बिदागी मिळाली म्हणून काम करणारा खुश.पण या सिस्टीममध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते सर्वसामान्य माणसांचे. या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार पडतात.कोणी याला बक्षिसी म्हणतो,कोणी वरकमाई तर कोणी याला 'वजन'म्हणतंय.नाव कोणतेही असले तरी यातील होणारी आर्थिक स्वरूपाची उलाढाल मात्र नक्कीच वाईट आहे मध्यंतरी पुराच्या पावसात नुकताच केलेला नवीन पूल वाहून जातो आणि त्याच्या शेजारी असलेला ब्रिटिश कालीन अतिशय जुना पूल मात्र जसाच्या तसा उभा होता....अशी बातमी वाचायला मिळाली.याचं कारण होतं पुलाच्या कामात झालेला भ्रष्टाचार.
या भ्रष्टाचाराच्या किडीमुळेच पाकिस्तान मधील अतिरेकी भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईसह देशाच्या राजधानीवर हल्ला करू शकले हे विसरून चालणार नाही.भ्रष्टाचार म्हणजे 'कुंपनाणेच शेत खाण्याचा प्रकार आहे.
'जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचा शॉर्ट कट' म्हणून भ्रष्टाचाराचा मार्ग आवलंबला जातो.पण यातून आपण आपल्या देशाचे किती नुकसान करतो याचे भान अशा भ्रष्टाचार करणाऱ्याला कळत नाही.स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या माय भूमी आणि देशाला संकटात ढकळणाऱ्या व्यक्ती आपल्याला आपल्या आजूबाजूलाच अनेक दिसतील.
एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रम ९४वा आहे. त्याचबरोबर लोकायुक्त, एसीबी, केंद्रीय दक्षता आयुक्त यांच्या जोडीला न्यायालये ते माहितीचा अधिकार .. अशा भ्रष्टाचारविरोधी यंत्रणाही आपल्या देशात मोठय़ा संख्येने आहेत. मात्र यंत्रणा स्थापन करायच्या आणि त्यांच्या कारभारावर कोणतेही नियंत्रण न ठेवल्यानेच...'भ्रष्टाचारातून भ्रष्टाचार'अशी शृंखलाच बनत जाते.
अगदी लहानातल्या लहान कामांसाठी अनेक हेलपाटे मारायला लावून ज्याची भ्रष्टाचाराला हातभार लावण्याची अजिबात इच्छा नसलेल्या व्यक्तीही शेवटी वैतागून ह्या भ्रष्टाचारी व्यक्तींना लाच देऊन त्यात सामील होतात.
खरं तर भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती इतकीच त्याला लाच देणारी व्यक्तीही जबाबदार असते.हे जरी खरे असले तरी दिवसेंदिवस हेलपाटे मारून वेळ आणि पैसे गमावण्या पेक्षा हा 'चिरीमिरीचा'मार्ग लोकांना योग्य न वाटल्यास आश्चर्य वाटणार नाही.
आज भ्रष्टाचाराने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालाही सोडलेले नाही.कमी गुण असूनही केवळ पैशांचा उपयोग करून आपल्या पाल्याना आवडत्या ठिकाणी प्रवेश देणारी अनेक धेंड आपल्याकडे अनेक दिसतील तर केवळ पैसा नाही म्हणून खितपत पडलेली अनेक गुणवान देखील इथं दिसतील.हा उघड उघड भ्रष्टाचार उघड्या डोळयांनी बघण्याशिवाय सर्व सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही अशी हताश मानसिकता ठेवण्यापेक्षा 'मी भ्रष्टाचार करणार नाही... आणि कोणाला करूनही देणार नाही'असे ठरवल्यास आपल्या देशातील 'भ्रष्टाचार'नक्कीच संपल्याशिवाय राहणार नाही.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर(ठाणे)
9226435827
[01/06, 5:49 PM] वर्षा सागदेव: *भ्रष्टाचार*
भ्रष्टाचार हा शब्द भ्रष्ट आणि आचार ह्या दोन शब्दातून उत्पन्न झाला आहे.म्हणजे भ्रष्ट आचरण. सर्व सामान्यपणे भ्रष्टाचार पैशाशी जोडल्या गेला आहे.लाच घेणे व देणे, पैशाचा गैर व्यवहार करणे इत्यादी.पण भ्रष्टाचारचा खरा अर्थ आहे जेव्हा एखादी व्यक्ती न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करते त्याला भ्रष्टाचार म्हटले जाते. थोडक्यात भ्रष्टाचारचा अर्थ अतिशय व्यापक आहे. सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे त्याचबरोबर वशिलेबाजी, काळा बाजार करणे, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमावणे आदींचाही भ्रष्टाचारात समावेश होतो.
ह्या व्यतिरिक्त सरकारी कर्मचारी आर्थिक व अन्य स्वरूपाचा फायदा करून घेण्याच्या पारंपरिक भ्रष्ट मार्गा व्यतिरिक्त इतर स्वरूपाचाही भ्रष्टाचार करतात. तो म्हणजे कमी दर्जाची सेवा देणे, खोटे भत्ते स्वीकारणे, खोट्या पावत्या सादर करणे, सरकारी यंत्रणेचा खासगी कारणांसाठी वापर करणे इत्यादी. थोडक्यात आधुनिक काळात भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड वाढली आहे की जणू संपूर्ण जीवन आणि जनमानस भ्रष्टाचाराने व्याप्त आहे.
भ्रष्टाचाराची सुरुवात ही कुठून आणि कशी झाली हे कोणालाही माहित नाही. पण याला मानव स्वत: जबाबदार आहे. हे खरे आहे . काही अंशी प्रशासकीय कार्यकालीन कामकाज पद्धती ही वेळकाढू, दीर्घ मुदतीची आणि गुंतागुंतीची असते. यामुळे लाच देऊन लवकर कामे करवून घेण्यात येतात. राज्य आणि प्रशासनाच्या कार्याची व्याप्ती आधुनिक काळात वाढलेली आहे. नागरिकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची अडवणूक करून अतिरिक्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न प्रशासकीय कर्मचारी करतात. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, हितसंबंधी यांच्यातील लागेबांध्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया भ्रष्ट होतात.
वर उल्लेखलेल्या कारणां व्यतिरिक्त मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती हे भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे. स्वार्थीपणा, लोभ, लालसा या मानवी स्वभावातील सहज प्रवृत्ती आहेत. या वृत्तींना माणूस बळी पडतो आणि अतिलालसा बाळगतो, तेव्हा चांगल्या-वाईटाचा विचार न करता माणूस सहज भ्रष्ट बनतो.
*पूर्वीच्या काळात जेव्हा मानवाकडे पैसा नव्हता तेव्हा त्याच्यासाठी दैनंदिन वस्तू याच महत्वाच्या होत्या. माणसाची अपेक्षा फक्त दोन वेळचे पुरेसे जेवण मिळविणे एवढेच होते. त्यामुळे पूर्वीची माणसे ही मेहनती आणि साफ मनाची होती*. परंतु जसीजशी सुधारणा होत गेली तशी मानवाला गरज नसताना सुद्धा त्या वस्तू हव्याहव्याश्या वाटू लागल्या. माणसाच्या मनात लोभ निर्माण झाला.
*माणूस हा जन्माने भ्रष्ट नसतो* पण त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती भ्रष्टाचारी बनवते. म्हणजेच इर्ष्या, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती इ भ्रष्टाचार करण्यास पार पडते
भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. देशामध्ये भ्रष्टाचारची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.भ्रष्टाचार हा देशाला किंवा समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे.जर भ्रष्टाचार वाढतच राहिला तर देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होईल. आज भारत देश विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे.परंतु या देशासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्यात सर्वात गंभीर समस्या भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारा मुळे देशाची अर्थ व्यवस्था डळमळते. त्यामुळे देशात असुविधा आणि विषमता निर्माण होते.
आपल्या देशात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अनेक कायदे झाले अनेकानेक समित्या झाल्या , नवीन कायदे झाले पण भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य झाले नाही. ह्याचे कारण म्हणजे *परत भ्रष्टाचार* भ्रष्टाचाराची समस्या दूर करण्यासाठी सर्व लोकांना प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकारने सुद्धा भ्रष्टाचारी लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. ह्याने काही अंशी आणि काही प्रमाणात भ्रष्टाचार कमी होईल पण त्याचे निर्मूलन होणार नाही
जो पर्यंत माणसाच्या मनात लोभाची भावना असेल तो पर्यंत आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होणार नाही.जो पर्यंत चांगली प्रवृत्ती माणसात येत नाही,अगदी लहानपणा पासून प्रामाणिकताचे बाळकडू मिळत नाही.कितीही कष्ट पडले तरी चालतील पण त्याने सदैव सन्मार्गाचा अवलंब करावा,ही प्रवृत्ती माणसाच्या मनाचा ताबा घेत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन एक स्वप्नच राहिल.
डाॅ.वर्षा सगदेव
.
[01/06, 5:54 PM] Manik Nagave: 07 लेख
भ्रष्टाचार
मानव त्याच्या आचरणाने लोकांच्या लक्षात राहत असतो. आचरणामध्ये सदाचार व भ्रष्टाचार असे प्रकार पडतात. सदाचार म्हणजे चांगले वागणे कुणालाही न दुखवणे, दुसऱ्याच्या चांगल्यासाठी प्रयत्न करणे. तर भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. यामध्ये कोणत्याही प्रकारची नैतिकता नसते. यामध्ये दुसऱ्याला त्रास देण्याचे कृत्य केले जाते. दुसऱ्याला फसवणे.कोणतेही काम सरळ मार्गाने न करता आडमार्गाने म्हणजे लाच देऊन अशा प्रकारची कामे करणे म्हणजे भ्रष्ट आचरण होय.चोरी करणे, लबाडी करणे हे सर्व भ्रष्टाचारामध्येच येतात.
परंतु जेव्हा आपण सदाचरणाने वागतो तेव्हा ते आपल्याला समाधान आनंद देत असते म्हणजे तो आनंद चिरकाल टिकत असतो.परंतु दुसऱ्याला फसवून यश मिळवले तर हा आनंद, समाधान जास्त काळ टीकत नाही व आपल्याला त्याचा कधी ना कधी तरी पश्चाताप करावा लागतो.
भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मा.आण्णा हजारेंनी खूप प्रयत्न केले.माहिती चा अधिकार हे एक नवे शस्त्र त्यांनी अंमलात आणले.त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले.त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना भ्रष्टाचाराला आळा बसला आहे .पण अजून खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
[01/06, 5:57 PM] अर्चना गरुड किनवट नांदेड: कोड क्र. [ 14 ]
" भ्रष्टाचार न संपणारा महारोग "
" घरी आणण्या
चकाकती कार
इमान सोडून
स्विकारी भ्रष्टाचार "
" भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट असे आचरण होय . " ही एक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया होय . ती स्वार्थीवृत्तीतून उदयास येते .. शिवाय कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न करता चौर्यमार्गाने मिळवलेली संपत्ती वा धन म्हणजे भ्रष्टाचार होय ... हा रोग जडलेली व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कार्य करीत नाहीत .. उलट पैशाच्या हव्यासापोटी काळाबाजाराचा डोंगरच निर्माण करतात ... आणि अशा अनितीने मिळणाऱ्या पैशात आपल्या भौतिक सुखसोईची भूक भागवितात .... ही ऐतखाऊ मनोवृत्ती जोपर्यंत मानवी मनापासून कायमची दूर होणार नाही तोपर्यंत हा रोग आटोक्यात येणारच नाही ...
" भौतिक गोष्टींत
मानी धन्यता
मानसिक समाधाना
लेखी न्यूनता "
भ्रष्टाचार निर्माण होण्याचे एकमेव मूळ म्हणजे मानसिक असमाधान हे होय ... इतरांचा , शेजारच्यांचा हेवादेवा करणे ... शेजारी नवीन एखादी भौतिक वस्तू आणली रे आणली की स्वतःच्या पोटात दुखू लागणे .... आणि ती वस्तू तशीच वा त्यापेक्षा सरस ! आणली म्हणजे ही अशी पोटाची तडस आपोआप शमते ... ही अशी वाढत जाणारी हव्यासी भावना या भ्रष्टाचार रोगाला पोषक व हितावह ठरणारी असते ... म्हणून आधी ह्या रोगाच्या मूळावरच घाला घालावा लागेल ... त्यासाठी मानसिक प्रदूषण निर्मूलन केले पाहिजे ...
" सुंदर निसर्गास
व्यर्थ देई दूषण
वाढता मानवाचे
मानसिक प्रदूषण "
खरंच ! मानव हा एवढा हावरट का होत चाललाय ... फक्त काही पैशासाठी मानवी जीवनच उध्वस्त करायला निघालायं ... अन्न , धान्य , औषध , फळे , पालेभाज्या ह्या सर्व प्रकारात तो भेसळ करून आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवीत आहे .... हे कुठंतरी थांबायला हवे .... कोण शिकार होत आहेत ? आपणच मानवजात ... वाह ! शिकारी व शिकारही आपली आपणच घेत आहोत ...हे पातक कर्म जेव्हा प्रत्येक मानवी मनात अगदी अंर्तमनांतून , काळजाच्या देठांपासून ठसेल ...तेव्हाच त्याच क्षणी हा भ्रष्टाचारी रोगांचा पूर्णपणे नायनाट झालाच म्हणून समजा ....
चला तर मग आपल्यापासूनच या वाढत्या महारोगाला आळा नको प्रतिबंधकच प्रामाणिकपणांची सर्वजन लस टोचून घेऊया ... आणि ह्या विराट महाकाय चौफेर विखुरलेल्या महारोगाला मूळासकट दूरवर फेकून देऊया .... आणि एक खरेखुरे देशभक्त होऊन सुंदर व स्वच्छ जीवन आनंदाने जगूया ...
अर्चना दिगांबर गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552963376
चांगल्या विषयाला वाचा फोडली याबद्दल आयोजकांचे मन:पुर्वक अभिनंदन!यांस उस्फुर्त प्रतिसाद दिला याबद्दल लेखकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.एक नियमीत उपक्रम!
जवाब देंहटाएं